Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रयोगातून साधली शेतीप्रगती

$
0
0

लोगो : प्रयोगशील शेतकरी

००००

एंट्रो....

पारंपरिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरत उसाबरोबर भात, भुईमूग, सोयाबीन, भाजीपालासारख्या कमी कालावधीच्या पिकांतून प्रगती साधता येत असल्याचे स्वकष्टातून दाखवून दिले आहे. अशा उपक्रमशील शेतकऱ्यांची दखल राज्य सरकारकडून घेतली जाते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या केवळ एक दिवस अगोदर २०१७-१८ कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार कसबा सांगाव येथील सुरेश मगदूम, शेतीनिष्ठ पुरस्कार चाफोडी येथील कुंडलिक पाटील व शेतीमित्र पुरस्कार मोहन पाटील या जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा जाहीर झाला आहे. तर इतर पुरस्कारांमध्ये नऊ शेतकऱ्यांनी स्थान मिळवले आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा आढावा आजपासून.

०००००

फोटो दोन

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : कसबा सांगाव (ता. कागल) येथील सुरेश मगदूम म्हणजे आधुनिक शेतीची कास धरणारे व्यक्तिमत्त्व. कोरडवाहू पिकांपासून बागायत पिकांचे हमखास उत्पन्न घेणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख. सोयाबीन, भात, भुईमूग, झेंडू, केळी, भाजीपाला व ऊस अशी सर्वच पिके यांच्या शेतात घेतली जातात. काळम्मावाडी धरण आणि कॅनॉलला पाणी येण्यापूर्वी भात, ज्वारी, तंबाखू यांसारख्या पिकांतून त्यांनी प्रगती साधली. काळम्मावाडी धरणाचे पाणी कागल तालुक्यात फिरू लागल्यानंतर मगदूम यांच्या शेतातील पिके बदलून गेली.

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देताना एकाचवेळी विविध पिके घेण्याचा हातखंडा निर्माण केला. बाजारातील एखाद्या पिकाचे दर ढासळल्यास इतर पिकांमुळे शेतीवर विपरित परिणाम होऊ नये, याची विशेष काळजी घेतली. शेतीला सेंद्रीय खते मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी दुग्ध उत्पादनाला सुरुवात केली. त्याचा प्रचंड फायदा त्यांना झाला. शेतीसोबत दुग्ध उत्पादनाचा जोड व्यवसाय करताना त्यांनी आर्थिक प्रगती साधली. ऊस उत्पादनातून दीड ते पावणे दोन वर्षांत उत्पन्न मिळत असल्याने सोयाबीनसारख्या नगदी पिकावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी एकरी १५ क्विंटल उत्पादन घेतले. त्याची दखल पंचायत समिती व जिल्हापातळीवर घेण्यात आली. त्यानंतर केवळ सोयाबीन उत्पादनाचा राज्यस्तरावरील पुरस्कार २००९ व २०११ मध्ये मिळाला. त्यासाठी ते सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्यावर भर देतात. कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पिकांमध्ये बदल करतात. त्यांच्या शेतात नारळ, चिकू, हापूस, केशर फळ पिकेही घेतली जातात. १९७५ पासून त्यांनी शेतीमध्ये सुरू केलेले प्रयोग अव्याहतपणे सुरू आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातूनच त्यांनी एकदा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ व आता कृषिभूषण पुरस्कार मिळवला आहे. त्यांचे प्रयोग युवा शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहेत.

००००

कोट

खतांचा केवळ वारेमाप वापर केल्याने उत्पादनात वाढ होणार नाही. योग्य खतांची मात्रा देण्यासाठी माती परीक्षण करण्याची आवश्यकता आहे. सेंद्रीय खतांचा वापर केल्याशिवाय रासायनिक खतांची मात्रा लागू होणार नाही. हमखास उत्पन्नवाढीसाठी पाणी आणि खतांचे योग्य व्यवस्थापन अनिवार्य आहे.

सुरेश मगदूम, कृषिभूषण पुरस्कार विजेते

०००००

सामाजिक कार्यातही अग्रेसर

शेतीला मुबलक पाणी देण्यासाठी सामुदायिक नळ पाणीपुरवठा योजना उभारण्याचा मगदूम यांनी निर्धार केला. दहा शेतकऱ्यांना एकत्र करत सुमारे पाच कि.मी.वरून योजना सुरू केली. प्रत्येकी २५ लाख रुपये खर्च करून त्यांनी योजनेला गती दिली. योजनेच्या माध्यमातून बारमाही पाणी मिळू लागल्याने त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांचीही आर्थिक प्रगती झाली.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खराब रस्त्यांप्रश्नी व्यंगचित्रांद्वारे फटकारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील रस्त्यांची खराब अवस्था, महापालिका प्रशासनाचा रस्ते दुरुस्तीवरून सुरू असलेला खेळखंडोबा यावर व्यंगचित्रकार शिराज मुजावर यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून फटकारे ओढले आहेत. शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि प्रशासनाच्या कारभाराचे त्यांनी व्यंगचित्रांतून वाभाडे काढले आहेत.

'मोहंजोदडो, हडप्पासारखं एखादं शहर सापडतंय का पाहू या, खड्डा बराच खोल आहे, तो खणण्यासाठी फारसा खर्चही येणार नाही' तसेच 'बाळाला घरात नको रस्त्यावरच चालायला शिकव म्हणजे मोठे झाल्यावर त्याला रस्त्यातील खड्डे चुकवायची सवय होईल' अशा आशयाची व्यंगचित्रे नागरिकांत चर्चेचे विषय ठरली आहेत. मुजावर यांनी व्यंगचित्रांद्वारे महापालिकेच्या कारभारावर प्रकाशझोत टाकला आहे. येथील नेशन फर्स्ट या संस्थेच्या पुढाकारातून शहरात ठिकठिकाणी खराब रस्त्यांविषयी अभिनव पद्धतीने आंदोलन सुरू आहे. व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके आणि चौकाचौकांत त्याचे प्रदर्शन अशा पद्धतीने ते सुरू आहे.

गेल्या तीन दिवसांत शहरातील विविध भागांत मुजावर यांच्या व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके झाली. शुक्रवारी गंगावेस परिसरात या उपक्रमाचा प्रारंभ झाला. नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी विजय तायशेट्ये, अनिरुद्ध कोल्हापुरे, केशव गोवेकर, विवेक कुलकर्णी, कुलदीप नाळे, सुप्रिया मोहिते, ओंकार खराडे, निखिल मोरे, आदी उपस्थित होते.

दरम्यान, शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत भवानी मंडप येथे प्रात्यक्षिके झाली. शहरातील खड्ड्यांसह विविध समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. रस्त्याच्या अवस्थेवर नेमकेपणाने भाष्य करणारी व्यंगचित्रे नागरिकांत चर्चेचा विषय ठरली आहेत. मुजावर यांनी रविवारी सकाळी सहा ते दहापर्यंत रंकाळा चौपाटी येथे व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके सादर केली. सोमवारी (ता. १८) राजारामपुरी पहिली गल्ली येथे व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन होणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत हे अभिनव आंदोलन होईल.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या प्रश्नांचे भिजत घोंगडे

$
0
0

लोगो : मटा विशेष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर-जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे प्रश्न केंद्र सरकारच्या स्तरावर प्रलंबीत आहेत. निधीअभावी रखडलेली पंचगंगा नदीची प्रदूषणमुक्ती, राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण, कोल्हापूर ते सांगली महामार्गाचे काम, मुंबई मार्गावरील जलद रेल्वे, खंडपीठाच्या मागणीला लावल्या जात असलेल्या वाटाण्याच्या अक्षता, शहरातील वाहतूक सुधारणांसाठीचा निधी, इचलकरंजीला जोडण्याचा नवा रेल्वेमार्ग, कराड ते बेळगाव रेल्वेमार्गाची बंद झालेली फाइल, ई बस, पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांची उपेक्षा अशा कोल्हापूरच्या अनेक प्रलंबित प्रश्नांचा गुंता वाढतच चालला आहे. केंद्रात सत्तारुढ शिवसेनेचे संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोन खासदार निवडून आले. त्यामुळे प्रश्नांच्या सोडवणुकीला चालना मिळेल असे वाटत होते. मात्र अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेना विरोधी पक्षात बसल्याने या खासदारांना आता संघर्षाशिवाय पर्याय राहिलेला नाही.

केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ शकतो. पण कोल्हापूरच्या पाचवीला संघर्ष पुजल्याची परिस्थिती आहे. कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडण्यासाठी २५ वर्षांपासूनच्या मागणीची दखल घेतली जात नव्हती. गेल्या पाच वर्षात त्यावर निर्णय होऊन कामाला सुरुवात झाली. दळणवळण सुविधांमध्ये सुधारणा केल्या तर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. त्यादृष्टीने प्रयत्न केले गेले. त्याला फारसे यश आलेले नाही. खंडपीठाच्या मागणीसाठी सहा जिल्ह्यातील वकील व पक्षकारांकडून सतत आंदोलन केले जात आहेच. शिवाय, पाठपुरावा करुनही त्याबाबत केंद्र सरकारकडून काही निर्देश दिले जात नाहीत. आता नवीन प्रश्नांची भर पडत चालली आहे. इचलकरंजीपर्यंत रेल्वेमार्ग जोडण्याच्या कामाची वाटचाल थांबली आहे. कराड ते बेळगाव हा इचलकरंजी परिसराच्यादृष्टीने आवश्यक रेल्वेमार्गाची फाइल बंद केली आहे. महापालिकेकडून ई बसचा प्रस्ताव सादर केला गेला. त्याचा निर्णय अपेक्षित आहे. पूरग्रस्त व अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने काही मदत दिली आहे. पण, केंद्र सरकारने केवळ आश्वासने दिली आहेत. या नुकसानीतून मार्ग काढण्यासाठी मोठ्या पॅकेजची गरज आहे.

दळणवळण प्रकल्पांसाठी प्रतिक्षा

पुणे-बेंगळुरु महामार्गाचे चौपदरीकरण तसेच कोल्हापूर सांगली महामार्गाच्या कामांची रखडपट्टी सुरू आहे. कराड ते बेळगाव या नवीन रेल्वेमार्गाची आवश्यकता असताना ती फाइलच बंद करण्याचा गंभीर प्रकार झाला आहे. मुंबईसाठी प्रवाशांची प्रचंड मागणी असताना एक जलद रेल्वे सुरू करता आलेली नाही. इचलकरंजीसाठी नवीन रेल्वे मार्गासाठी सर्व मंजुरी झाल्या आहेत. पण त्याचे काम पुढे सरकरत नाही. याबरोबरच शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तातडीने उड्डाणपूल, रिंगरोड यासारख्या मोठ्या उपाययोजनांची गरज आहे. देशभरात पर्यावरणासाठी ई बस वापरण्यास सुरुवात झाली असताना कोल्हापूर महापालिकेनेही ५० बसचा प्रस्ताव सादर केला आहे. तो मंजूर होईल, असे सांगण्यात येत होते, पण तोही लटकला आहे.

नदी प्रदूषणमुक्तीचे प्रस्ताव रखडले

पंचगंगा नदी ही पिण्याच्या पाण्याचा मोठा स्त्रोत असल्याने त्यातील प्रदूषण रोखण्यासाठी कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. त्यातून महापालिकेने केंद्र सरकारच्या मदतीने एक एसटीपी प्रकल्प उभा केला. पण नदीकाठावरील गावांमधून व एमआयडीसीमधून होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी ९७ कोटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याची मंजुरी दूरची गोष्ट असून अजून त्याला सचिवस्तरावरील समितीकडून मान्यता दिलेली नाही. यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर दबाव आणून प्रस्तावांना मंजुरी आणण्याची गरज आहे. याशिवाय रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचाही मुद्दा आहे.

पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना निधी नाहीच

ऑगस्टमधील महापुराने, अतिवृष्टीबरोबरच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे, व्यवसायांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोल्हापूर शहर, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी या परिसरात झालेल्या नुकसाचे आकडे हजार कोटींवर गेले आहेत. त्यासाठी राज्य सरकारने तातडीची मदत केली पण ती तोकडी आहे. मदतीसाठी ६४० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. तसेच जागतिक बँकेकडून ३२ हजार कोटीच्या कर्जाची मागणी करणारा प्रस्ताव दिला आहे. पिकांचे झालेले अतोनात नुकसान पाहता पीक विम्याची रक्कम मिळण्याची गरज निर्माण झाली आहे.

ओल्या दुष्काळाने मोडलेल्या शेतकऱ्यांच्या उभारीसाठी अधिवेशनामध्ये आक्रमकपणे भूमिका मांडणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी हेच उद्दिष्ट असेल. पीकविम्याच्या रकमेसाठीही पाठपुरावा केला जाणार असून जिल्ह्यातील खंडपीठ, रेल्वेबाबतच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यात येणार आहे.

- संजय मंडलिक, खासदार

इचलकरंजी परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कराड ते बेळगाव या रेल्वेमार्गाची फाइल बंद का केली? त्याची माहिती घेऊन तो पुन्हा मार्गस्थ लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. वस्त्रोद्योगामध्ये आलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदत देण्यासाठीही आवाज उठवला जाणार आहे.

- धैर्यशील माने, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी संस्थांच्याहीनिवडणूका इव्हीएमवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी काळात सहकारी संस्थांच्या निवडणूकाही 'इव्हीएम' वर घेण्यात येणार आहेत, अशी माहिती सहकार निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष, डॉ. जगदीश पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पावसाळा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या कोल्हापूर विभागातील सहा हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढील वर्षी २०२० मध्ये घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर विभागातील सहकार विभागातील कामांचा आढावा घेण्यासाठी डॉ. पाटील शनिवारी कोल्हापुरात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत इव्हीएमचा वापर केला जातो. इव्हीएमची उपयुक्तता लक्षात घेऊन सहकार संस्थांच्या निवडणूकीत त्याचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक काळात मतदारयादी वेबसाइटवर प्रकाशित करण्याचा प्रयत्न प्राधिकरणाकडून केला जाईल.'

कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक, राजारामबापू दूध संघासह सहा हजार संस्थांची निवडणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'जिल्ह्यातील पाच साखर कारखाने, १५ सूत गिरण्या, चार बाजार समिती, २२९१ विकास सेवा संस्था, १२२९ दूध संस्थांची निवडणूक होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील ५ साखर कारखाने, ९ सूतगिरण्या, शिखर संस्था, बाजार समित्या, ११९१ विकास सेवा संस्था आणि २३९ संस्थांच्या निवडणूक होणार आहेत.'

प्राधिकरणाकडून निवडणूक यंत्रणा राबवण्यात येणार असून पात्र संस्थांनी १२० दिवस आधी मतदारयादी प्राधिकरणाकडे सादर करण्याचे बंधन असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करुन त्यावर हरकती मागवल्या जातील. त्याची छाननी, सुनावणी होऊन अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूका निकोप वातावरणात सुरळीत कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. निवडणूक प्रकिया यशस्वी करण्यासाठी कायद्यातील बदल, नवे जुने आदेश यांचा अभ्यास करण्याची सूचनाही त्यांनी केली.

बैठकीला प्राधिकरणाचे सचिव वाय. पी. गिरी, दुग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर, विभागीय सह निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, प्रादेशिक साखर सहसंचालक एस. एन. जाधव, विभागीय उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा निबंधक अमर शिंदे, दुग्ध विभागाचे जिल्हा उपनिबंधक अरुण चौगुले आदी अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथाडी-व्यापारी वाद मिटवण्यासाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गूळ खरेदीदाराकडे असलेल्या माथाडी कामगारांना हमाली वाढविण्यास नकार दिल्याने त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गूळ व्यापारी आणि माथाडींमधील वाद मिटवण्यासाठी आमदार विनय कोरे यांनी मध्यस्थी केली असून, त्यावर सोमवारी (ता.१८) तोडगा निघण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस सुरू असलेल्या आंदोलनामुळे गूळ उत्पादकांचे नुकसान होत आहे.

मार्केट यार्ड येथील शेती उत्पन्न बाजार समितीतील गूळ खरेदीदार व्यापाऱ्यांकडे साडेतीनशेहून अधिक हमाल आहेत. शेतकऱ्यांकडून गूळ खरेदी केल्यानंतर गूळ वाहतूक, शिलाई, शिक्के मारण्याचे काम केले जाते. गूळ व्यापारी आणि माथाडी यांच्यात २०१५ मध्ये हमालीवाढीसंदर्भात करार झाला असून, दर चार वर्षांनी दहा टक्के हमाली वाढविण्याचे ठरले होते. करारानुसार चार वर्षे पूर्ण झाले असून, माथाडींनी हमाली वाढवून देण्याची मागणी केली. त्याला गूळ व्यापाऱ्यांनी नकार दर्शविल्यावर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गूळ सौद्यावर थोडा परिणाम झाला आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सभापती बाबासाहेब लाड यांच्यासह व्यापारी प्रतिनिधींनी प्रयत्न केले. सभापतींच्या आश्वासनानंतर माथाडींनी काम बंद आंदोलन मागे घेतले, पण हमाली वाढवण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने हा वाद चिघळला आहे. हा वाद अखेर आमदार विनय कोरे यांच्याकडे गेला आहे. आमदार कोरे यांनी माथाडींचे प्रतिनिधी, व्यापाऱ्यांची चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. हमाली वाढीसंदर्भात सोमवारी व्यापारी पत्र देणार असून त्यानंतर काम सुरू होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहिमेला सामाजिक संस्थांचे बळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतर्फे सुरू असलेल्या महास्वच्छता अभियानाला रविवारी सामाजिक संस्थांचे बळ मिळाले. व्हाइट आर्मी, ज्येष्ठ नागरिक संघ, नरके फाउंडेशनसह विविध सामाजिक संस्थांनी मोहिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात दहा टन कचरा व प्लास्टिक संकलीत करण्यात आले. रंकाळा परिसर आणि पदपथ उद्यानामधील स्वच्छतेनंतर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी रंकाळा तलावापासून स्वच्छतेला सुरुवात झाली. पदपथ उद्यान व इराणी खण परिसरातील प्लास्टिक व कचरा गोळा करण्यात आला. यावेळी मोहिमेत विविध संस्था व विद्यार्थी सहभागी झाले. शेकडो हात बोचऱ्या थंडीत राबताना दिसत होते. हुतात्मा गार्डन व पदपथावर ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी स्वच्छता करीत होते. पंचगंगा नदीघाट, जयंती नाला पंपिंग स्टेशन, शाहू स्मृती उद्यानाची सफाई करण्यात आली. दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, हॉकी स्टेडियम ते भक्तीपूजा नगर, पितळी गणपती चौक ते धैर्यप्रसाद हॉल, सायबर चौक ते शेंडा पार्क, शिवाजी विद्यापीठ मेनरोड, कसबा बावड्यातील जिल्हा न्यायालय ते भगवा चौक या रस्त्यांची सफाई केली. नंतर रस्ते विकास प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या डिव्हायडरवरील झाडांना पाणी देण्यात आले. जयंती नाला पंपिंग स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

संकलीत झालेला कचरा सहा डंपरच्या मदतीने कसबा बावडा येथील सरवळीमध्ये टाकण्यात आला. श्रमदानातून स्वच्छता झाल्यानंतर महापालिकेचे १५० आरोग्य कर्मचारी ठिकठिकाणी सफाई करत होते. स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर, आर्किटेक्ट असोसिएशन अँड इंजिनीअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे, रंकाळा मॉर्निंग वॉक ग्रुप, व्हाइट आर्मी, नरके फाउंडेशनचे विद्यार्थी, वंदेमातरम यूथ, हुतात्मा गार्डन कट्टा ग्रुपचे जेष्ठ नागरिकांसह मुख्य लेखापरिक्षक संजय सरनाईक, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, कनिष्ठ अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार आदी उपस्थित होते.

साहिल चिकन सेंटरला दंड

शहरातील अनेक नाल्यांमध्ये कचऱ्यासोबत मटण व चिकनमधील उर्वरित कचरा टाकला जातो. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी आल्या. आरोग्य पथकाने अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाईही केली. रविवारी स्वच्छता मोहीम सुरू असताना साहिल चिकन सेंटरकडून रामानंदनगर ओढ्यात कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. त्याची गंभीर दखल घेत संबंधीतांना ५०० रुपये दंड करण्यात आला.

अशी होती यंत्रणा

जेसीबी

डंपर

आरसी गड्या

पाणीपुरवठा टँकर

१५०

आरोग्य कर्मचारी

००००००००

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या महास्वच्छता अभियानाला रविवारी सामाजिक संस्थांचे बळ मिळाले. व्हाइट आर्मी, ज्येष्ठ नागरिक संघ, नरके फाउंडेशन यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी मोहिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात दहा टन कचरा व प्लास्टिक संकलीत करण्यात आले. रंकाळा परिसर आणि पदपथ उद्यानामधील स्वच्छतेनंतर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

सकाळी रंकाळा येथून आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेला सुरुवात झाली. रंकाळा पदपथ उद्यान व इराणी खण परिसरातील प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करण्यात आला. मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर विविध संस्था व विद्यार्थी सहभागी झाले. शेकडो हात बोचऱ्या थंडीत राबताना दिसत होते. हुतात्मा गार्डन व पदपथावर ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी स्वच्छता करताना दिसत होते. त्याचबरोबर पंचगंगा नदीघाट, जयंती नाला पंपिंग स्टेशन, शाहू स्मृती उद्यानांची सफाई केली. दसरा चौक ते खानविलकर पेट्रोलपंप, हॉकी स्टेडियम ते भक्ती पूजा नगर, पितळी गणपती ते धैर्यप्रसाद हॉल, सायबर चौक ते शेंडा पार्क, शिवाजी विद्यापीठ मेनरोड, बावडा कोर्ट ते भगवा चौक आदी रस्त्यांची सफाई केली. त्यानंतर रस्तेविकास प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या डिव्हाडरवरील झाडांना पाणी देण्यात आले. तर जयंती नाला पंपिंग स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

संकलीत झालेला कचरा सहा डंपरच्या मदतीने कसबा बावडा येथील सरवळीमध्ये टाकण्यात आला. श्रमदानातून स्वच्छता झाल्यानंतर महापालिकेचे १५० आरोग्य कर्मचारी ठिकठिकाणी सफाई करत होते. यावेळी स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, आर्किटेक्ट असोसिएशनचे अँड इंजिनीअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे, रंकाळा मॉर्निंग वॉक ग्रुप, व्हाइट आर्मी, नरके फाउंडेशनचे विद्यार्थी, वंदेमातरम् यूथ, हुतात्मा गार्डन कट्टा ग्रुपचे जेष्ट नागरिक यांच्यासह मुख्य लेखापरिक्षक संजय सरनाईक, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, कनिष्ठ अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार आदी उपस्थित होते.

........................

चौकट

साहिल चिकण सेंटरवर दंडात्मक कारवाई

शहरातील अनेक नाल्यामध्ये कचऱ्यासोबत मटण व चिकनमधील उर्वरित कचरा टाकला जातो. याबाबतच्या तक्रारी अनेकदा प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. आरोग्य पथकाने यापूर्वी अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. रविवारी स्वच्छता मोहीम सुरू असताना साहिल चिकन सेंटरमधील कचरा रामानंदनगर ओढ्यात टाकल्याचे निदर्शनास आले. त्याची गंभीर दखल घेत संबंधीताला ५०० रुपये दंड करण्यात आला.

..................

अशी होती यंत्रणा

जेसीबी

डंपर

आरसी गड्या

पाणीपुरवठा टँकर

१५०

आरोग्य कर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तारुढ गट पन्हाळा मुक्कामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या मंगळवारी (ता. १९) होत असलेल्या महापौर-उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नगरसेवक रविवारी सायंकाळी सहलीला रवाना झाले. सत्तारुढ गटाचा मुक्काम पन्हाळ गडावर असून विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी शहरातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीच्या सावध हालचाली सुरू आहेत.

महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अॅड. सूरमंजिरी लाटकर व भाजपने भाग्यश्री शेटके यांना संधी दिली आहे. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे संजय मोहिते विरुद्ध ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे यांच्यामध्ये लढत होणार आहे. सत्तारुढ आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असले, तरी आघाडीने नगरसेवकांना सहलीवर नेण्याची परंपरा या निवडी दरम्यानही कायम राखली आहे. सर्व सदस्य सायंकाळी पन्हाळ्याला मुक्कामासाठी रवाना झाले. सर्व सदस्य मंगळवारी सकाळी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. एका खासगी वाहनातून ते निवड सभेसाठी हजर राहतील.

प्रत्येक पदाधिकारी निवडीमध्ये गतिमान हालचाली करुन सत्ता परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजप-ताराराणी आघाडीमध्ये काहीशी शांतता दिसत आहे. मात्र, पडद्यामागू हालचाली सुरू असल्याचे समजते. सत्तारुढ गटातील नगरसेवकांसह शिवसेनेचे काही नगरसेवक आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे चार नगरसेवक थेट काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय राहिल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यात राहणार आहे. परिणामी, विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी सहलीवर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वसंत मुळीक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वसंतराव मुळीक यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुळीक हे गेली अनेक वर्षे मराठा महासंघात सक्रिय आहेत.

गेली २५ वर्षे मुळीक मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदाचा कारभार पाहत आहेत. कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीत त्यांचा हिरीरीने पुढाकार राहिला आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना ९० सामाजिक संघटनांना राजर्षी शाहू सलोखा मंचच्या माध्यमातून एकत्र आणले. मराठा आरक्षण क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक म्हणून कोल्हापूरसह आसपासचे जिल्हे ढवळून काढले. सीपीआर बचाव कृती समितीच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सुविधेसाठी ते प्रयत्नशील राहिले. कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था, संघटनेशी निगडीत आहेत. राजर्षी शाहू जन्मस्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न केले. पुणे येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्या माध्यमातून कोल्हापुरातील व्यक्तीला पहिल्यांदाच मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठ देणार १०७८ प्रकल्पग्रस्तांना न्याय

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाला सामाजिक परिणामाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारतर्फे ३० लाख रूपयांचे सल्लागार शुल्क मिळाले आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, स्थानिक घनकचरा प्रकल्प व प्रकल्पबाधित लोकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्याबाबत सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील १०७८ प्रकल्पबाधित कुटुंबांना न्याय मिळणार आहे. अशा प्रकारचा निधी मिळाल्याने अभ्यास केला जाणारा हा शिवाजी विद्यापीठातील पहिलाच उपक्रम आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत सामाजिक परिणामांचा अभ्यास करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१६मध्ये घेतला. त्यानुसार सरकारने अहवाल सादरीकरणासाठी उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थेने सहभाग घ्यावा अशी मागणी केली. या मागणीनुसार विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेओहोळ, सर्फनाला, कडगाव व रुकडी चिंचवड या चार गावातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांच्या अभ्यासाचा प्रस्ताव देण्यात आला. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय ककडे यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेल्या चारही प्रस्तावांना राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील प्रकल्प उभे राहत आहेत. सिंचन प्रकल्प, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घनकचरा व्यवस्थापन, पूल बांधकामांसारख्या प्रकल्पांमध्ये त्या-त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. सिंचन प्रकल्पग्रस्त अनेक कुटुंबांना गेल्या २० वर्षापासून पर्यायी जमिनी किंवा अन्य सुविधा मिळालेल्या नाहीत. जमिनी गेल्यामुळे आर्थिक कमाई, रोजगाराचे साधन गेले आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील तरूण मदतस्वरूपातील नोकरी व्यवसायाच्या प्रतीक्षेत आहेत. जमिनीला पर्यायी जमिनी, घराला पर्यायी घर, बांबू शेतीच्या सध्याच्या दरापेक्षा चारपट रक्कम मिळावी अशी प्रकल्पग्रस्तांची सरकारकडे मागणी आहे. आजपर्यंत अनेक आंदोलने करूनही न्यायासाठी प्रकल्पबाधित कुटुंबांना न्याय मिळालेला नाही. सर्पनाला, कडगाव, रुकडी येथील प्रकल्पबाधितांच्या कुटुंबातील अनेकांची हयात पर्यायी सुविधांच्या प्रतीक्षेत संपत चालली आहे. आंबेओहोळ येथील सिंचन प्रकल्पाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. या प्रकल्पबाधित कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्तर खालावत चालला आहे. त्यातून निर्माण झालेल्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्याची जबाबदारी अर्थशास्त्र विभागाकडे सोपवण्यात आली आहे. या अभ्यासात्मक अहवालातील शिफारशींनुसार सरकारतर्फे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची आशा निर्माण झाली आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाबाबत शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाकडून त्रयस्थ संस्था म्हणून मूल्यांकन अभ्यास केला जात आहे. घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता यावर सरकारकडून होणाऱ्या खर्चाचे मूल्यांकनही महत्त्वाचे ठरत आहे.

कोट

प्रकल्पबाधितांनाही सरकारतर्फे योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारतर्फे ३० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्ह्यातील चार गावांमधील प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक समस्यांचा अभ्यास करण्याचे काम उपक्रमातून केले जाणार आहे. १६ छोट्या तर ४ मोठ्या प्रकल्पांच्या अभ्यासासाठी या निधीचा वापर होणार आहे. सामाजिक शास्त्र शाखेच्या माध्यमातून अशा प्रकारचा अभ्यास प्रथमच होत आहे.

- डॉ. विजय ककडे, प्रकल्प समन्यवक, सामाजिक परिणाम अभ्यास विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'२०१९-२० च्या गळीत हंगामासाठी प्रतिटन दर जाहीर करण्यासाठी गुरुवारी (ता. २१) दुपारी चार वाजता शिवसेनेच्या वतीने तिसऱ्या ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. चालू हंगामातील दराबरोबर दोन वर्षांच्या थकीत एफआरपीप्रश्नी आंदोलनाची पुढील दिशा परिषदेत ठरविण्यात येणार आहे,' अशी माहिती जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील व संभाजीराव भोकरे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.

जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रकाश आबिटकर, ज्येष्ठ शेतकरी नेते मारुतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषद होणार आहे, असे स्पष्ट करताना पाटील म्हणाले, 'जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडे २०१८-१९ हंगामातील एफआरपीची रक्कम थकीत आहे. उत्पादकांची देणी प्रलंबित असताना दराचा तिढा न सोडविता हंगामाला सुरुवात केली आहे. कारखाना सुरू करताना सर्वच कारखान्याचे पदाधिकारी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्याचे जाहीर करत आहेत. पण रक्कम मात्र कोणीच जाहीर करत नाही. त्यामुळे दर जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरू करु देणार नाही.'

'अतिवृष्टी आणि महापुरामुळे ऊस पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी चांगला दर देण्याची आवश्यकता आहे. एफआरपीसोबत पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान, शेतकरी व शेतमजुरांचे निवृत्तिवेतन, पीक विमा व केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान आदी बाबींवर परिषदेत चर्चा करून ठराव करण्यात येणार आहेत,' असे पाटील यांनी सांगितले.

भोकरे म्हणाले, 'खते, बी-बियाणे यांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली. पण त्या प्रमाणात एफआरपीमध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक कर्जाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. या सर्व विषयावर परिषदेत चर्चा होणार असून परिषदेला ऊस उत्पादक व शेतमजूर यांनी उपस्थित राहावे.' पत्रकार बैठकीस अविनाश शिंदे, उत्तम पाटील, अशोक पाटील, अरविंद पाटील, चंद्रकांत भोसले यांच्यासह सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधा द्या, उद्योग वाचवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगलेच्यावतीने (मॅक) रविवारी आयोजित बैठकीत उद्योजकांनी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यापुढे येथील समस्यांचा पाढाच वाचला. अन्य राज्यांच्या तुलनेत असणारे २५ ते ३० टक्के वाढीव विजेचे दर, एमआयडीसीतील अंतर्गत खराब रस्ते, तिप्पट वाढविलेले सेवा शुल्क, कागल-सातारा महामार्गावरील लक्ष्मी टेकडीवरील उड्डाणपूलाची गरज, पोलिस स्टेशन, घनकचरा व्यवस्थापन अशा विविध मागण्यांचे निवेदन उद्योजकांच्यावतीने आमदार जाधव यांना देण्यात आले.

यावेळी उद्योजक संजय पेंडसे म्हणाले, 'औद्योगिक विकास महामंडळाने एक नोव्हेंबरपासून पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांचा सेवा शुल्कचे दर साडेचार रुपयावरून पंधरा रुपये केल्यामुळे उद्योग बंद पाडण्याचे काम सुरू आहे.'

हरिश्‍चंद्र धोत्रे यांनी वीजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेने २५ ते ३५ टक्क्यांनी जास्त आहेत. घरगुती, व्यापारी व शेतकरी ग्राहकांचे वीजदर देखील २२ टक्क्यांनी वाढणार आहेत. येत्या दोन वर्षांत ग्राहकांवर ३० हजार ८४२ कोटी रुपयांची जादा वसुलीचा प्रस्ताव महावितरण कंपनीने आयोगासमोर दाखल केला आहे. ही दरवाढ राज्याच्या विकासासाठी घातकच आहे, असे स्पष्ट केले.

सचिन कुलकर्णी म्हणाले, 'कागल-पंचतारांकित एमआयडीसीमध्ये कागल-सातारा महामार्गावरून प्रवेश करताना होणाऱ्या अपघातांचा विचार करताय पुलांची नितांत गरज आहे सहापदरी महामार्गाच्या कामाअंतर्गत येथे उड्डाणपूल व्हावा.'

मॅकचे अध्यक्ष गोरख माळी म्हणाले, 'एका बाजूला सेवाशुल्क, वीज दर वाढविणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाने दुसऱ्या बाजूला कागल-हातकणंगले हा दहा किलोमीटरचा रस्ता खड्डेमय होऊनही दुर्लक्ष केले आहे. रस्त्यासाठी २८ कोटी रुपये मंजूर होऊनही अद्याप त्याचे काम सुरू झालेले नाही. शिवाय औद्योगिक वसाहतीमधील नवीन आराखडा, अंतर्गत रस्तेदेखील केलेले नाहीत. ज्यांची कामे झाली, तीही खराब झाली आहेत.'

अशोक दुधाणे म्हणाले, 'यापूर्वी उद्योगांना जिल्हा उद्योग केंद्राकडून जागा खरेदीपत्र, भाडेकरार, डिड ऑफ असाइन्मेंट अशा प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कमाफी मिळत होती. नवीन धोरणामुळे ही सामूहिक प्रोत्साहन योजना ३१ मार्च २०१८ पासून बंद केली आहे. तीदेखील पुन्हा सुरू करून मुद्रांक शुल्कमाफी मिळायला हवी. पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात वेस्ट सँड व कारखान्यांमधून निघणारा घनकचरा टाकण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून भूखंडाची सातत्याने मागणी केली. परंतु अद्याप जागा देण्यात आलेली नाही. त्याची पुर्तता करावी.'

कागल पंचतारांकित एमआयडीसीचा विस्तार एका बाजूला वाढत असताना यामध्ये काम करणारे कामगार, उद्योजक, येथे येणारे पर्यटक यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस स्टेशनची कार्यवाही झाली. मात्र याठिकाणी इमारत व्हावी. सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवला जावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सचिन शिरगावकर यांनी ग्रामपंचायतीच्या करांचा विषय पुन्हा सुरू करा. सेवाशुल्क घेऊनही एमआयडीसी काहीच कामे करत नाही, असे स्पष्ट केले.

संस्थेला भुखंडाची मागणी

एमआयडीसीमध्ये कामगार कौशल्य विकास केंद्र व मल्टीपर्पज हॉल उभारण्याकरिता संस्थेला ३००० स्क्वेअर मीटरचा भूखंड मिळावा अशी यापूर्वी मागणी झाली होती. ६ जानेवारी २०१८ रोजी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्याला तत्त्वतः मान्यता दिली. त्याचा पाठपुरावा करून कामगारांच्या कौशल्य विकास केंद्रासाठी भूखंड मिळावा अशी मागणी यावेळी मोहन कुशिरे यांनी केली.

यावेळी आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, 'विजेचे दर कमी करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न केले. तरीही यापूर्वीच्या सरकारने दरवाढ केली. सरकारने उद्योजकांचे कंबरडे मोडले. मीही उद्योजक आहे. सरकारने वीजदर कमी करावेत, अडचणी सोडवावेत यासाठी माझा आग्रह असेल. उद्योग टिकवण्याच्या दृष्टीने जे करावे लागेल ते करू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: बाइक-टेम्पोचा भीषण अपघात; ३ ठार

$
0
0

कोल्हापूर: सांगली बायपास मार्गावरील जैनापूर (ता.शिरोळ) येथे टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यातील भीषण अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. गुणपाल रोजे (२७), सुहास कोठावळे (२६) आणि विपूल रमेश पाटील ऊर्फ अजिंक्य अशी मृतांती नावे असून त्यांपैकी एक दानोळी (ता.शिरोळ) येथील, तर दोघेजण मजले (ता. हातकणंगले) येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे दानोळी व मजले गावावर शोककळा पसरली आहे.

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-सांगली बायपास रस्त्यावरून टेम्पो (एमएच १३ एएक्स २६८२) कोल्हापूरच्या दिशेने जात होता. जैनापूर येथे पोल्ट्री फार्मजवळ मोटारसायकल (एमएच ०९ डीटी ५६२४) आणि टेम्पोची धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती, की मोटारसायकल टेम्पोच्या पुढील भागात घुसली. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गुणपाल रोजे व विपुल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला; तर कोठावळे यांना गंभीर दुखापत झाली. रुग्णवाहिकेतून सांगली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यवर्ती भागात साडेसहाशे खड्डे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील शिवाजी पुतळा चप्पल लाइन ते पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर माजी आमदार संजयसिंह गायकवाड पुतळ्यापर्यंतच्या भागात सुमारे साडेसहाशे खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे वाहनधारकांची हाडे खिळखिळी असून परिसरात नागरिक हतबल झाले आहेत.

शिवाजी पुतळा ते गंगावेस या मार्गावरील चप्पल लाइनपर्यंतचा रस्ता लहान-मोठ्या खड्ड्यांनी व्यापला आहे. लहान, मोठे असे सुमारे २४० खड्डे येथे आहेत. पापाची तिकटी ते गंगावेश मार्गावर १२२ खड्डे आहेत. आनंद टायपिंग सेंटर ते वडणगेकरांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर लहान-मोठे ५४ खड्डे आहेत. नंतर लक्ष्मी गल्लीच्या पश्चिमेकडील बाजू, अर्बन बॅक, गंगावेश या मार्गावर ६८ खड्डे आहेत. अर्बन बँकेसमोर मोठे खड्डे असून चारचाकी वाहनांना याठिकाणी वेग कमी करावा लागतो. गंगावेस दूध कट्टा तर खड्ड्यांनी भरला आहे. त्यातच गेले अनेक दिवस थेट गटरचे पाणी रस्त्यावर येत असल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गंगावेस, रेगे तिकटी, शुक्रवार पेठ पोलिस चौकी मार्गावर २५० खड्डे आहेत. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर विद्यालय, रेगे तिकटी या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सोमेश्वर गल्ली, धनवडे गल्ली ते गायकवाड पुतळा मार्गावर १५० खड्डे आहेत. आखरी रास्ता तरुण मंडळ, जामदार क्लब, गायकवाड पुतळा या मार्गाची अवस्था पाणंदीसारखी झाली आहे.

गोव्याकडे जाणारी वाहने चप्पल लाइन, गंगावेशमार्गे गगनबावडा, राधानगरी रस्त्याकडे जातात. या रस्त्यांवर दोन्ही बाजूला पाणी निचरा होण्यासाठी गटर नसल्याने रस्ता लवकर खराब होतो. या मार्गावर वळणे असून मोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याची भीती आहे.

- धनंजय पाटील, पापाची तिकटी

फोटो : अर्जुन टाकळकर

९२३१ गंगावेश परिसरात रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

९२३६ रेगे तिकटी येथील खड्ड्यात सांडपाणी मिसळत असून खड्ड्यांची खोली जास्त असल्याने हलक्या वाहने चालवताना मोठ्या दणका बसत असतो.

(सतीश घाटगे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता कमी, खड्डे जास्त

$
0
0

फोटो अर्जुन टाकळकर ९१९९

फोटो ओळी, मिरजकर तिकटी परिसरात रस्ता पूर्ण उखडला आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील मध्यवस्तीतील बिंदू चौक ते नंगीवली चौक हा मार्ग नेहमी गजबजलेला असतो. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, रविवार पेठ, लक्ष्मीपुरीला जोडणारा हा मार्ग. मार्गाच्या दोन्ही बाजूला रहिवासी वस्ती, हॉटेल, दुकाने, व्यापारी संकुले असल्याने दिवसभर वाहतूक सुरू असते. मात्र बिंदू चौक ते नंगीवली चौकपर्यंत रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी विदारक स्थिती आहे. या मार्गावर ठिकठिकाणी एकूण सुमारे २९० खड्डे पडले आहेत.

बिंदू चौकात दोन वेळा पॅचवर्क आणि खडीकरण केले. हा रस्ता पुन्हा उखडला आहे. बिंदू चौकाकडून गायन समाज देवल क्लबकडे जाताना खड्ड्यातून वाट काढावी लागते. खादी ग्रामोद्योग संघाच्या ऑफीससमोरील रस्त्यावरील खड्ड्यातून वाट काढावी लागते. पुढे जुन्या देवल क्लब इमारतीसमोर पुन्हा खड्ड्यांशी सामना करावा लागतो. खासबागजवळील बस थांबा, खाऊगल्लीकडे जाणारा रस्ता खराब झाला आहे. या ठिकाणी लहान लहान खड्ड्यांची मालिकाच नजरेस पडते. मिरजकर तिकटी जाताना वाहनधारकांना हाच अनुभव येतो. मंगळवार पेठेतील हनुमान मंदिराच्या समोरील आणि मागील बाजूच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. साई मंदिरासमोरील रस्ता खराब झाला आहे. या मार्गावरुन नंगीवली तालीम चौककडे जाताना रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने हाकताना कसोटी लागत आहे.

(वार्तांकन : सचिन यादव, आप्पासाहेब माळी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुसमट

$
0
0

कोल्हापूर शहराच्या सर्वसाधारण हवेच्या गुणवत्तेचा दर्जा चांगला असला तरी, महानगरपालिकेच्या कसबा बावड्यातील घनकचरा प्रकल्पाने निम्म्या शहर प्रदुषणाच्या ज्वालामुखीवर असल्याची स्थिती बनली आहे. प्रकल्पात दररोज २०० टन कचरा टाकला जात असला तरी त्याच्यावर प्रक्रिया होत नाही. महापालिका वास्तव नाकारत असली तरी कचरा टाकायला जागा नसल्याने तो अनेकदा पेटवला जातो असे स्थानिक नागरिक सांगतात. कसबा बावडा, लाइन बाजार, कदमवाडी या परिसरासह ताराबाई पार्क, नागाळा पार्क, सर्किट हाउस, कारंडेमळा हा उच्चभ्रू परिसरही हवा प्रदुषणाच्या फेऱ्यात सापडला आहे. हे वाढते प्रदूषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे दु:ष्परिणाम यावर टाकलेला प्रकाश.

कोल्हापूर टाइम्स टीम

दररोज सायंकाळी पेटणाऱ्या कचऱ्यामुळे कसबा बावडा रोडवरील घनकचरा प्रकल्प नागरिकांच्या आरोग्यावर बेतला आहे. त्यापासून निर्माण होणाऱ्या धुरामुळे प्रदूषणात भर पडून निम्म्या शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना फुफ्फुस, श्वसनाचे विकार जडत आहेत. दम्याच्या रुग्णांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. तर परिसरातील गर्भवतींच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. सुमारे दोन लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

कसबा बावड्यातील कचरा प्रकल्पावर लागणाऱ्या आगींमुळे रहिवासी वस्तीसोबतच सरकारी कार्यालये, जिल्हा न्यायालय, प्राथमिक व माध्यमिक शाळा, कॉलेजीस प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहेत. शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या नागाळा पार्क, ताराबाई पार्क परिसरही हवा प्रदूषणाच्या कचाट्यात सापडला आहे. कचऱ्याने पेट घेतल्यानंतर सायंकाळी कसबा बावडा, जाधववाडी, कदमवाडी, कारंडे मळा, सदर बाजार, रमणमळा, पोलिस लाइन परिसरात धुराचा त्रास जाणवू लागतो. रविवारी रात्री नागाळा पार्क, ताराबाई पार्क, महावीर गार्डन, जिल्हाधिकारी कार्यालयासह दसरा चौक, व्हीनस कॉर्नरचा परिसरही धुराने वेढला गेला.

कसबा बावडा रोडवरील घनकचरा प्रकल्प आणि परिसर एकूण चौदा एकरचा आहे. यापैकी आठ एकरहून अधिक जागेत कचऱ्याचे डोंगर साठले आहेत. येथे दहा लाख टनाहून अधिक कचरा साठल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. शहरातून दररोज जमा होणारा २०० टनाहून अधिक कचरा येथे टाकला जातो. त्यावरील विघटन प्रक्रियेबाबत वादाची स्थिती आहे. कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्पांचा खेळखंडोबा सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरुन जगावे लागत आहे. अष्टेकरनगर, देवार्डे मळा, कामगार चाळसह आसपासच्या भागात कचऱ्याच्या धुराचा, दुर्गंधींचा सर्वाधिक सामना करावा लागतो.

धुक्यामुळे धुराचा दाट थर

देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये सध्या प्रदूषणाचा प्रश्न गाजत आहे. तेथील हवेचे प्रदुषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. अशा बड्या शहरासारखीच धोक्याची स्थिती कोल्हापुरात निर्माण होण्याचा धोका नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या थंडीचा सीझन आहे. धुके असल्यामुळे धूर साठून राहतो. हवा फारशी खेळत नसल्याने या काळात जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषणाचा विळखा घट्ट होत आहे. दिल्लीसारखी अवस्था निम्या शहराची बनल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सोयरिक जुळवताना अडचणी

कचरा प्रकल्पाला लागून असलेल्या नागरी वस्तीमध्ये आरोग्य विषयक समस्या ही नित्याची बाब बनली आहे. या भागात आता सामाजिक समस्या तयार होत आहेत. कचऱ्याचा डोंगर, पेट घेतलेला कचरा, धुराचे लोट आणि भागात पसरणारी दुर्गंधीमुळे सोयरीक जुळविताना अडचणी येत आहेत. या भागात मुलांची लग्ने जुळविताना कचऱ्याच्या समस्यामुळे नकार पचवावा लागतोयाकडे भागातील नागरिक लक्ष वेधतात. धुरामुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या प्रदूषणामुळे गर्भवतींना काळजी घ्यावी लागत आहे.

घनकचरा प्रकल्पावर कचऱ्याच्या डोंगरात रोज भर पडत आहे. दुसरीकडे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प बंद आहे. कचरा प्रकल्पाभोवती कंपाऊंड नाही. येथे कचरा वर्गीकरणची प्रक्रिया नाही. शहरातील कचरा, कत्तलखान्यातील कचरा आणून येथे टाकला जातो. साधारणपणे परिसरातील दोन लाख लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. नागरिकांच्या आरोग्य विषयक तक्रारी वाढल्या आहेत. प्रशासनाने गांभीर्याने हा विषय हाताळावा, अन्यथा या ठिकाणी कचरा टाकू देणार नाही. कचरा प्रकल्पाकडे जाणारे रस्ते अडवू.

- सत्यजित कदम, नगरसेवक ताराराणी आघाडी

येथील कचरा प्रकल्पामुळे नागरिकांच्या समस्येत भर पडत आहेत. सामाजिक समस्याही यातून निर्माण होत आहेत. कचरा आणि प्रदूषणामुळे डेंगी आणि तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. सायंकाळी लहान मुलांना घराबाहेर पडता येत नाही अशी स्थिती आहे. कारण कचऱ्यामुळे येथे कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांनी गाय, म्हशी, शेळी या पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्यांमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. राजकारण बाजूला ठेवून कचरा प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे.

- चंद्रकांत घाटगे, माजी नगरसेवक

धुराचा त्रास होणारी महत्त्वाची ठिकाणे

- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कसबा बावडा रोड

- मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये २२ हून अधिक कार्यालये

- जिल्हा न्यायालय परिसर, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय

- कसबा बावडातील मेडिकल व इंजिनीअरिंग कॉलेज

- दत्ताबाळ विद्यालय, होलीक्रॉस व सेंट झेविअर्स स्कूल

- राजर्षी शाहू विद्यालय, महावीर कॉलेज परिसर

- न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, विवेकानंद कॉलेज

१४ एकर

कचरा प्रकल्पाचा परिसर

१० लाख टन

प्रकल्पस्थळावरील कचरा

२०० टन

दररोज टाकला जाणारा कचरा

२०००००

धुराचा त्रास होणारी लोकसंख्या

- कचऱ्यापासून वीज निर्मितीत अडथळे

- कचरा वर्गीकरणासह त्यावरील प्रक्रिया बंदच

- नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींत वाढ

- उच्चभ्रू परिसरालाही दुषित हवेचा फटका

- महापालिका व लोकप्रतिनिधींचे डोळेझाक

- नागरी वस्ती, सरकारी कार्यालये, शाळांना धुराचा त्रास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील रस्त्यांसाठीसहा कोटींचा प्रस्ताव

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापूर, अतिवृष्टीने खराब झालेल्या शहरातील रस्त्यांसाठी प्रति किलोमीटर एक लाख रुपये यांप्रमाणे ६३० किलोमीटरसाठी ६ कोटी ३० लाखांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. हा निधी त्वरीत मिळावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे. तत्पूर्वी खड्डे भरण्यासाठी शिल्लक निधी वापरावा अशा सूचना महानगरपालिका प्रशासनास दिल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी शहर, जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळास दिल्या. शिष्टमंडळातर्फे रस्ते दुरुस्ती तातडीने करावी या मागणीचे निवेदन देसाई यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. तात्पुरत्या स्वरुपात मुरुमाने खड्डे भरण्यात आले. आता त्या खड्ड्यांतील मुरुम निघाले आहे. त्यामुळे रस्ते खड्डेमय झाले आहेत. पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्याने रोज हजारो भाविक परजिल्ह्यांतून, राज्यभरातून येत आहे. त्यांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत असल्याने शहराची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे कोल्हापूरचे नामांतर खड्डेपूर करावे, अशा प्रतिक्रिया आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी महानगरपालिकेकडे निधी नाही. त्यांच्याकडे ठोस उत्पन्नाचे स्त्रोत नाही. त्यामुळे रस्त्यांसाठी सरकारकडून भरीव निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना अशोक पोवार, रमेश मोरे, अजित सासणे, गणी आजरेकर, अजित सासणे, सुभाष देसाई, दादा लाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराब रस्त्यांना ठेकेदार जबाबदार

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विभागीय कार्यालयांतंर्गत खराब रस्त्यांप्रश्नी संबंधित ठेकेदारांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत. ज्या ठेकेदारांचा रस्ते कामांबाबत दोष दायित्व कालावधी शिल्लक आहे. त्यांच्याकडून तत्काळ रस्ते दुरुस्त करुन घेण्यात येणार आहेत,' असे आश्वासन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाला सोमवारी दिले. समितीने त्यांची भेट घेवून खराब रस्त्यांप्रश्नी जाब विचारला. बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने शहरवासियांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी झालेल्या रस्त्यांची अवस्था दयनीय असतानाच २०१७ पासून आतापर्यंत केलेल्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. २०१७ ते २०१९ पर्यंत केलेल्या रस्त्यांचे दोष दायित्व संबंधित ठेकेदारांवर असते. अशा खराब झालेल्या रस्त्यांची जबाबदारी ठेकेदारांवर देणार की नाही, याचा जाब विचारण्यासाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाने शहर अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, रावसाहेब चव्हाण, रमेश मस्कर, आर. के. जाधव उपस्थित होते. समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत दुरुस्ती कधी करणार अशी विचारणा केली.

शहर अभियंता सरनोबत म्हणाले,' तीन वर्षांपूर्वी काम केलेल्या रस्त्यांची तपासणी चारही विभागीय कार्यालयामार्फत केली आहे. दोष दायित्व कालावधी असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करुन घेण्यासाठी संबंधित ठेकेदारांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत.' मात्र कार्यकर्त्यांनी झालेल्या एक-एक रस्त्याची माहिती सांगत त्यामधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.

माजी नगरसेवक अनिल कदम म्हणाले, 'राजारामपुरी परिसरात तीन रस्ते झाले आहेत. ड्रेनेज व सांडपाणी वाहून जाण्याची कोणतीही व्यवस्था ठेकेदाराने केलेली नाही. त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांवर सोपवणार का?'. याचवेळी अन्य कार्यकर्तेही आपआपल्या भागातील समस्या मांडू लागले. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर सरनोबत यांनी दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांची दुरुस्ती त्वरीत करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

बैठकीस माजी नगरसेवक अशोक पोवार, पांडूरंग आडसूळ, दिलीप पोवार, गणी आजरेकर, श्रीकांत भोसले, किशोर घाटगे, अॅड. पंडित सडोलीकर, राजाराम सुतार, विजय पोळ, रणजित आयरेकर, आर्किटेक्ट असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे आदी उपस्थित होते.

.....

चौकट

कृती समितीमध्ये एकवाक्यता हवी

खड्डेमुक्त रस्ते हा शहरवासियांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. त्याविषयी गेल्या काही दिवसांपासून कृती समितीच्यावतीने कालबध्द कार्यक्रम हाती घेवून प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे. सोमवारच्या बैठकीदरम्यान एका कार्यकर्त्याने अधिकाऱ्याची बाजू घेतल्याचा समज करुन घेऊन दुसरा कार्यकर्ता आक्रमक बनला. त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. इतर सदस्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.

.....

... अन्यथा धिंड काढू

बैठकीत विभागीय कार्यालयांच्यावतीने २०१७ पासून झालेल्या रस्त्यांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये काही रस्ते चांगले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कार्यकर्ते अधिकच संतापले. 'अधिकाऱ्यांसमवेत रस्त्यांची पाहणी करु. पाहणीदरम्यान सर्वच रस्ते खराब असतील तर त्यांची धिंड काढू,' असा इशारा रमेश मोरे यांनी दिला.

..................

०००

(मूळ कॉपी)

दोष दायित्वामधील रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती

प्रशासनाचे कृती समितीला आश्वासन

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विभागीय कार्यालयातंर्गत खराब रस्तेप्रश्नी संबंधीत ठेकेदारांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत. ज्या ठेकेदारांची रस्ते कामांबाबत दोष दायित्व कालावधी शिल्लक आहे. त्यांच्याकडून तत्काळ रस्ते दुरुस्त करुन घेण्यात येणार आहेत.' असे आश्वासन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाला सोमवारी दिले. समितीने त्यांची भेट घेवून खराब रस्तेप्रश्नी जाब विचारला. बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले.

शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याने शहरवासियांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी झालेल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असताना २०१७ पासून आतापर्यंत केलेल्या रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली आहे. २०१७ ते २०१९ पर्यंत केलेल्या रस्त्यांचे दोष दायित्व संबंधीत ठेकेदारांवर असते. अशा खराब झालेल्या रस्त्यांची जबाबदारी ठेकेदारांवर देणार की नाही? याचा जाब विचारण्यासाठी कृती समितीच्या शिष्टमंडळाने शहर अभियंत्यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, रावसाहेब चव्हाण, रमेश मस्कर, आर. के. जाधव उपस्थित होते. समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत दुरुस्ती कधी करणार अशी विचारणा केली.

सरनोबत यांनी तीन वर्षापूर्वी काम केलेल्या रस्त्यांची तपासणी चारही विभागीय कार्यालयामार्फत केली आहे. दोष दायित्व कालावधी असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करुन घेण्यासाठी संबंधीत ठेकेदारांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या असल्याचे सांगितले. तरीही कार्यकर्त्यांनी झालेल्या एक-एक रस्त्यांची माहिती सांगत त्यामधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. माजी नगरसेवक अनिल कदम म्हणाले, 'राजारामपुरी परिसरात तीन रस्ते झाले आहेत. ड्रेनेज व सांडपाणी वाहून जाण्याची कोणतीही व्यवस्था ठेकेदारांने केलेली नाही. त्याबाबत कोणती कार्यवाही करणार. त्याची जबाबदारी संबंधीत ठेकेदारांवर सोपवणार का?' असा प्रश्न उपस्थित केला. याचवेळी अन्य कार्यकर्तेही आपआपल्या भागातील समस्या मांडू लागले. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर सरनोबत यांनी दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांची दुरुस्ती त्वरीत करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

बैठकीस माजी नगरसेवक अशोक पोवार, पांडूरंग आडसूळ, दिलीप पोवार, गणी आजरेकर, श्रीकांत भोसले, किशोर घाटगे, अॅड. पंडित सडोलीकर, राजाराम सुतार, विजय पोळ, रणजीत आयरेकर, आर्किटेक्ट असोसिएशन ऑफ इंजिनीअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे आदी उपस्थित होते.

...................

चौकट

कृती समितीमध्ये एकवाक्यता हवी

खड्डेमूक्त रस्ते करणे हा शहरवासियांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. त्याविषयी गेल्या काही दिवसांपासून कृती समितीच्यावतीने कालबद्द कार्यक्रम हाती घेवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आजच्या बैठकीदरम्यान एका कार्यकर्त्यांने अधिकाऱ्याची बाजू घेतल्याचा समज करुन दुसरा कार्यकर्ता आक्रमक बनला. त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. इतर सदस्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. बैठकीनंतर मात्र समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता हवी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

...................

.......अन्यथा धिंड काढू

बैठकीत विभागीय कार्यालयाच्यावतीने २०१७ पासून झालेल्या रस्त्यांची माहिती दिली. त्यामध्ये काही रस्ते चांगले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कार्यकर्ते अधिक संतापले. 'अधिकाऱ्यांसमवेत रस्त्यांची पाहणी करु. पाहणी दरम्यान सर्वच रस्ते खराब असतील तर त्यांची धिंड काढू.' असा इशारा मोरे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदार्थविज्ञान विभाग ठरला उत्कृष्ट अधिविभाग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने यावर्षी प्रथमच घोषित करण्यात आलेला उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार पदार्थविज्ञान अधिविभागाने पटकावला. विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्र या दोन गटातील अधिविभागांचे मूल्यमापन करून दहा लाख रूपयांच्या पुरस्कारासाठी पदार्थविज्ञान या अधिविभागावर शिक्कामोर्तब करण्यात आले. रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विभागाच्या वतीने अधिविभाग प्रमुख डॉ. पी. एस. पाटील यांनी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी विविध उपक्रमांचे उदघाटन, गुणवंत प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, सेवक यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्र सभागृहात हा कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांच्यासह अधिकारी, अधिव्याख्याते उपस्थित होते.

विद्यापीठाचा मानबिंदू असलेला विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या प्रतिकृतीचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बी.आर. खेडकर यांनी मूळ पुतळा साकारला आहे. त्या पुतळ्याच्या प्रतिकृती पगमार्क आर्ट गॅलरीचे रमण कुलकर्णी, अतुल डाके आणि मनोहर टॉइजचे दीपक महामुनी यांनी साकारल्या आहेत. त्यांचाही गौरव करण्यात आला. शिवपुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण करणे, हा आपल्या आयुष्यातील गौरवाचा क्षण असल्याची भावना डॉ. भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी पहिली प्रतिकृती कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कुलगुरू डॉ. भोसले यांना भेट दिली.

त्याचप्रमाणे विद्यापीठाचा बॅज, फोल्डर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे 'शिव-ज्ञानसागर इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी' व 'इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम' (आयआरआयएनएस) आणि वॉक थ्रू लीड बॉटेनिकल गार्डन या उपक्रमांचेही कुलगुरू डॉ. भोसले यांच्या हस्ते व्हर्चुअल उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यापीठ, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय, कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर 'नॅक'चे 'अ' मानांकन मिळविणाऱ्या ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज, सातारा व आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज, रानंदनगर, बुर्ली या संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार झाला.

दरम्यान, सकाळी विद्यापीठातील बॉटॅनिकल लीड गार्डनमध्ये डॉ. उद्धव भोसले यांच्यासह डॉ. देवानंद शिंदे, वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यासमवेत भटकंती मोहिम राबवण्यात आली. यावेळी डॉ. एस. आर. यादव, डॉ. मकरंद ऐतावडे आदी उपस्थित होते.

पुरस्काराचे मानकरी

प्रा. डॉ. संजय शामराव चव्हाण (रसायनशास्त्र अधिविभाग) यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मनोहर अनंत कुलकर्णी (सहाय्यक अधीक्षक, आस्थापना विभाग), लक्ष्मण भीमराव परीट (प्र. शाळा परिचर, रसायनशास्त्र अधिविभाग) यांना गुणवंत सेवक सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ. धनाजी गोविंदराव कणसे (भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली) यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कृत करण्यात आले. प्रा. डॉ. भरत आदाप्पा नाईक (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर) यांना बॅरिस्टर पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेतील प्रथम (विभागून): शुभम रमेश हत्तरकी, संकेत उदय माळी, द्वितिय (विभागून): सुंदरकुमार कांबळे, सुभाष पोपटराव वाणी, तृतीय (विभागून) उदयणादित्य पाटील, युवराज जगताप या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनी दुरुस्तीला सुरुवात

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर योजनेतील कळंबा रिंगरोडवरील जलवाहिनीच्या दुरुस्तीला मंगळवारपासून सुरुवात होणार होती. मात्र दुरुस्तीच्या पूर्वतयारीसाठी केलेल्या कामादरम्यान जलवाहिनीला गळती लागल्याने क्रॉस कनेक्शनसह गळती काढण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली. दुरुस्तीमुळे साळोखेनगर टाकीवर अवलंबून असलेल्या काही भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कळंबा रिंगरोडवरील बुद्धिहाळकर नगर येथील जलवाहिनीला गळती लागली आहे. तसेच साळोखेनगर टाकीजवळ क्रॉस कनेक्शन घेण्यात येणार आहे. त्यासाठी शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने मंगळवारपासून दुरुस्तीच्या कामाचे नियोजन केले होते. त्यामुळे शिंगणापूर ते आपटेनगर व आपटेनगर ते साळोखेनगर टाकीपर्यंतचा पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार होता. दुरुस्तीची पूर्वतयारी म्हणून सोमवारी खोदाईला सुरुवात करण्यात आली. खोदाईदरम्यान जलवाहिनीला गळती लागल्यामुळे पूर्वीच्या दुरुस्तीला तातडीने सुरुवात करण्यात आली. जेसीबी मशीनच्या मदतीने संपूर्ण जलवाहिनी खुली करण्यात आली असून जोडकाम करण्याचे काम कर्मचारी रात्रभर करत होते. दरम्यान, सोमवारी आपटेनगर व साळोखेनगर टाकीवर अवलंबून असलेल्या भागांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मंगळवारी सकाळी काम पूर्ण झाल्यानंतर क्रॉस कनेक्शनच्या कामाला सुरुवात होणार आहे. 'मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत काम पूर्ण करुन बुधवार सकाळपासून पाणी उपसा सुरू होईल,' असे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता बी. एम. कुंभार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडीत फोफावला गांजा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

शाहूवाडी परिसरात गांजा आणि अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. या नशाबाजीच्या विळख्यात सापडून अनेक किशोरवयीन मुले आणि तरुण बरबाद झाले आहेत. अनेकजण त्याच मार्गावर आहेत. बांबवडे, मलकापूर आणि सरूड या गावात गांजा विक्रीची ठिकाणे आहेत. 'हप्ते'बाजीमुळे बिनबोभाट हा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे यांपैकी दोन ठिकाणी महिला तर उर्वरित ठिकाणी एक तरुण फिरून गांजा विक्री करतो. संबंधित तरुणाला आलेल्या 'कॉल'नुसार गांजा पोहोचवला जातो.

पुण्यातील तरुण-तरुणीही येथे गांजाची नशा करण्यासाठी येतात. पंधरा दिवसांपूर्वी पुण्याहून आलेल्या तीन तरुणी मलकापुरात आल्या होत्या. येथे कोपऱ्या-कोपऱ्यांत चौकशी करून नशेची 'वस्तू' शोधून काढलेल्या या तरुणींनी अमेणी घाटात धुंद होऊन धिंगाणा घातला होता. अशा प्रकारांची तक्रार करणाऱ्या नागरिकांना मात्र 'नेमकी ठिकाणे दाखवा, कारवाई करू', असे घोटीव उत्तर पोलिस अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळते. ज्यांनी अशा प्रकारांचा शोध घ्यायचा तेच नागरिकांना 'कामाला लावू' पाहत आहेत. त्यामुळे नशेचा हा व्यापार बिनबोभाट वाढत आहे.

मलकापूर, बांबवडे, सरुड गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणाहून कागदी पुडीत गांजाची विक्री होते. परंतु हा प्रकार यंत्रणेच्या नजरेत येत नाही. मलकापूर येथे शाळी नदीच्या तीरापासून, स्टेडियमच्या कोपऱ्यातील शाळेची बंद इमारत, सोमवार पेठेपुढील ऐतिहासिक वाड्याचे प्रवेशद्वार, कोरवी समाज गल्ली अशी अनेक ठिकाणे गांजा विक्री आणि नशा करणाऱ्यांनी बदनाम केली आहेत.

बांबवडे-सोनवडे मार्गावरील ओढ्यालगत दाट झुडपांमध्ये अनेक महिने चाललेला नशेचा अड्डा स्थानिक शेतकऱ्याने अलीकडेच मोडून काढला. आता कॅनॉल परिसरात हा अड्डा स्थिरावल्याची चर्चा आहे. तेथे पुणे, सोलापूर, सांगलीसह कोल्हापूर परिसरांतून अलिशान वाहनांतून येऊन नशा करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. सरुड येथील एके ठिकाणी येताना सराईतांना सहज चालत जाण्याच्या बहाण्याने गांजा मिळतो. नवख्या माणसाला मात्र 'पुडी' मिळत नाही.

.. .. .. .. ..

तस्करीचे रॅकेट

काही स्थानिकांच्या मदतीने गांजाची तस्करी होते. पुढे दलालांमार्फत गावातील ठराविक ठिकाणी त्याची विक्री केली जात असल्याचे समजते. जोमात चालणाऱ्या गांजा आणि अमली पदार्थांच्या विक्रीने तरुणाई मात्र विळख्यात सापडत आहे.

.. ..

धोके भयंकर

व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्ती मेंदूमधील पेशींच्या रचनेत अनैसर्गिक बदल झाल्यामुळे एकलकोंडी बनते, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. अशा व्यक्तीचे चालणे, बोलणे आणि वागण्यातील बदलही तीव्रतेने जाणवतो. बहुतेकवेळा अशी व्यक्ती अति शांत, क्वचितप्रसंगी शीघ्रकोपी बनते. पाल्यांनी मुलामध्ये झालेले हे बदल ओळखून त्यांचे समुपदेशन गरजेचे आहे. मात्र मात्र अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली मुले पुन्हा सरळ वाटेवर परतण्याची शक्यता अंधूक असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करतात.

.. .. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images