Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कलम ३७० वरून उदयनराजे भडकले

$
0
0

कलम ३७० वरून उदयनराजे भडकले

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'कलम ३७० या मुद्यावर निवडणूक होत आहे. ही निवडणूक काश्‍मिरची आहे की, महाराष्ट्राची,' असे विरोधक विचारत आहेत. असा प्रश्न एका पत्रकाराने उदयनराजेंना करताच ते भडकले. उदयनराजे म्हणाले, 'जे असे प्रश्‍न उपस्थित करतात, त्यांनी देशात राहू नये. स्वतःच्या प्राणाची बाजी लावून जवान देशाचे रक्षण करीत असतात. त्यांच्याबद्दल हे लोक महाराष्ट्राचा काय संबंध आहे, असे विचारतात. त्यांना लाज वाटायला पाहिजे.'

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत प्रसंगी उदयनराजे बोलत होते. उदयनराजे म्हणाले, 'आपले जवान आहेत म्हणून देश सुरक्षित आहे. कधी तुम्ही त्यांच्या कुटुंबात डोकावून पाहिले आहे का? जी तरुण मुले शहीद होतात, ही मुले कोणाचे तरी वडील असतात, कोणाचे तरी पती असतात. त्यांच्या कुटुंबाची होणारी वाताहत मी पाहिली आहे. कलम ३७० रद्द झाल्याने देशात शांतता नांदत आहे. आमची मुले सुखरुप आहेत. गड-किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांनी विशिष्ट उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन बांधले आहेत. त्या किल्ल्यांचा जिर्णोद्धार, देखरेख झालीच पाहिजे. त्यासाठी निधीची आवश्‍यकता आहे. त्यासाठी गड-किल्ल्यांवर टुरिझम क्‍लस्टर झाले पाहिजे. रोप-वे झाले पाहिजेत. मग ज्येष्ठ नागरिकांना सोयीचे होईल. देश-परदेशातील लोक मोठ्या प्रमाणात येतील. पूर्वी जे गडावर रहायचे आणि आजही जे राहतात. ते तिथेच साध्या पद्धतीने मंदिरात लग्न करतात. किल्ले विकसीत करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तेथे हॉटेल, बार सुरू करण्याचा सरकारचा प्रस्ताव असेल तर माझाच काय सगळ्यांचाच विरोध असला पाहिजे.'

पंतप्रधान मोदींचे होणार शाही स्वागत

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विधानसभेच्या साताऱ्यात जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज, गुरुवारी दुपारी दोन वाजता सैनिक स्कूलच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. या बाबत उदयनराजे म्हणाले, 'शाहुनगरीच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचे शाही स्वागत करू. त्यांना एक तलवार, साताऱ्याच्या राजघराण्याचे प्रतीक राजमुद्रा आणि मेघडंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देणार आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन हजारांवर कर्मचाऱ्यांनीकेले पोस्टल मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या तीन हजार ४१ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बुधवारअखेर पोस्टल मतदान केले. त्यामध्ये ५९५ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे', अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदान करण्याची संधी निवडणूक प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे. पोस्टल मतदान २० ऑक्टोबरअखेर स्वीकारण्यात येणार आहे. बुधवारअखेर झालेले मतदान (विधानसभा मतदारसंघनिहाय) असे : चंदगड : २३८, राधानगरी : ५१९, कागल : ५३२, कोल्हापूर दक्षिण : २२१, करवीर : ४०७, कोल्हापूर उत्तर : १२४, शाहूवाडी : १४३, हातकणंगले : २८१, इचलकरंजी : १३१, शिरोळ : ३४५.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष

$
0
0

कराड :

'देशाचा अर्थिक विकास दर घसरला आहे. वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गोष्टींशी भाजपला कोणतेही सोयरसुतक राहिलेले नाही. कलम ३७० हटविल्याच्या आनंदात जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यामध्ये ते रमले आहेत,' अशी टीका ज्येष्ठ अभिनेते व कॉँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवडणूक प्रचारार्थ मलकापूर (ता. कराड) येथे बुधवारी दुपारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सिन्हा म्हणाले, 'मी बिहारी बाबू या नात्याने सांगतो की, पृथ्वीराज चव्हाण व श्रीनिवास पाटील हे शानदार, जानदार, दमदार, कर्तबगार, जंगप्रिय व लोकप्रिय नेते आहेत. ही त्यांच्या विजयाची सभा आहे. या दोघांना कराड दक्षिण व मलकापूरच्या जनतेने कधीच नापास केलेले नाही. या निवडणुकीत ते एक नंबरने त्यांना पास होतील, याची मला खात्री आहे. सत्ताधाऱ्यांकडे अमाप पैसा आहे. महाराष्ट्रात काँग्रेस महाआघाडीचे सरकार निश्चित येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५६ इंच छातीने अर्थव्यवस्था सुधारत नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केवळ ५६ इंच छाती असून चालत नाही तर त्यासाठी अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्याने कठोर उपाययोजनांची गरज असते’, असा टोला माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी येथे बुधवारी लगावला. नोटबंदी आणि त्यानंतर घाईने घेतलेल्या जीएसटी अंमलबजावणीच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट बनल्याचा आरोपही सिन्हा यांनी पत्रकार बैठकीत केला.

डबघाईला जात असलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची गरज प्रतिपादित करून सिन्हा म्हणाले, ‘देशापुढील आर्थिक संकट दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी करावी लागेल. अन्यथा संपूर्ण देश डबघाईला येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकखांबी नेतृत्वामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून तेच सर्वस्वी जबाबदार आहेत. तारतम्य न राखता गेली सहा वर्षे आर्थिक धोरणे राबवली गेली. त्याचा सर्वांत पहिला फटका कृषी क्षेत्राला बसला. त्यानंतर लघु व मोठ्या औद्योगिक क्षेत्रावर परिणाम झाला. मागणी, खरेदी, गुंतवणूक आणि निर्यातीवर परिणाम झाल्याने मंदीचा सामाना करावा लागत आहे. जीएसटी लागू करताना महसुलात १५ टक्के वाढ अपेक्षित होती. प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा पाच टक्के वाढही झाली नाही. जीएसटीतही वारंवार बदल केल्याने पायाभूत सुविधांवर परिणाम झाला.’

सिन्हा म्हणाले, ‘पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात १९९८ मध्ये जगभरात मंदी होती. त्याचवेळी घेतलेल्या अणुचाचणीमुळे अनेक देशांनी आर्थिक निर्बिंध लागले. यातून देश सावरण्यासाठी अनेक तज्ज्ञांची मते जाणून घेतली. त्यानुसार अर्थनीती ठरवली. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. मात्र सध्याचे सरकार विकासाची बोगस आकडेवारी सादर करत आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अर्थव्यस्थेत सुधारणा सुरू केल्या तरी ती रूळावर येण्यास तीन वर्षे लागतील. मंदी दूर करण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्समध्ये सवलत दिली असली तरी त्याचा फायदा काही मोजक्या खासगी कंपन्यांना झाला. जागतिक पातळीवर क्रूड ऑइलचे दर कमी झालेले असताना त्याचा फायदा सरकारला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी करुन घेता आला नाही.’ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांचा आत्मविश्वास ढळला आहे, असे निरीक्षणही सिन्हा यांनी नोंदवले.

मंत्री बोलायला घाबरतात

‘नेतृत्वाच्या एकाधिकारशाहीमुळे मंत्रिमंडळातील एकही मंत्री बोलत नाही. मंत्र्यांना पंतप्रधानांकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाची माहिती नसते. नोटबंदीच्या निर्णयाची माहिती तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही नव्हती. जीएसटीबाबत अशाच पद्धतीने निर्णय घेतला. त्यामुळेच अनेकदा या निर्णयात बदल करावे लागत आहेत. नेतृत्वापुढे बोलण्यास केंद्रातील सर्वच मंत्री घाबरतात आहेत’, असे सिन्हा म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० रुपयात जेवण द्यायला गेल्या ५ वर्षात कोणी थांबवलं होतं: अजित पवार

$
0
0

पंढरपूर: पूर्वी झुणका भाकर योजना होती ... झुणका गेली नदीपलीकडे आणि भाकरीही तशीच गेली ....मंगळवेढ्यात प्रचार सभेदरम्यान अजित पवार यांची तुफान टोलेबाजी पाहायला मिळाली. १० रुपयात जेवण आणि १ रुपयात आरोग्य तपासणी यांच्या कोणी दिली होती का? हे करायला गेली पाच वर्षे यांना कोणी थांबवलं होतं का ? अशा शब्दात आज अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मंगळवेढा इथं आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके यांच्यासाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. पवार यांनी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना देखील टीकेचं लक्ष केलं. 'तुम्हाला आम्ही आमदार , मंत्री आणि पालकमंत्री केलं आणि तुम्ही तिकडं नाचायला लागला .. आपलं वय काय , प्रतिष्ठा काय आणि हालगी वाजली की तुमच्या अंगात यायला लागलय .. हे शोभत नाही अशा शब्दात पवार यांनी ढोबळेंवर टीका केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कुस्ती आणि पैलवानावर फटकेबाजी करताना इथं आमचा पैलवान तयार आहे... तुम्ही उतरा ... लंगोट लावा मग बघु कोण जिंकतय असं म्हणत आमचे पैलवान तुम्हाला दोन मिनिटात चितपट करतील असं सांगत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्याना आव्हान दिलं.
71630427

राणे जिथे गेले त्या पक्षाची विल्हेवाट लागली: उद्धव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपसात भांडणारे सत्ता कशी चालवणार? मोदींचा जोरदार हल्ला

$
0
0

सातारा: काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी आहे. दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणे सुरू आहेत, असं सांगतानाच जे पक्ष आपआपसात भांडण करतात ते सत्ता कशी चालवणार? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा येथे केला.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो, अशी मोदींनी मराठीत भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांची जंत्री सादर करतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. साताऱ्याला अभेद्य किल्ला मानणारे लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यास घाबरत होते. त्यामुळेच राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणूक लढविण्याची गळ घातली. पण साताऱ्यात काही खरं नसल्याचं लक्षात आल्याने चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचंच नाव पुढं केलं. मात्र पवार हे राजकारणातील मुरलेले खेळाडू आहेत. त्यांना हवेचा अंदाज सर्वात आधी येतो. त्यामुळे त्यांनीही काळाची पावलं ओळखत साताऱ्यातून लढण्यास नकार दिला. साताऱ्यातून लढण्यास दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी पळ काढला, असा टोला हाणतानाच उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजेंना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून द्या, असं आवाहन मोदींनी केलं.

काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी आहे. त्यांच्यात फूट पडलेली आहे. ते राज्याला काय दिशा देतील? असा सवाल करताना फूट पाडा आणि मलई खा हा एकमेव कार्यक्रम असणाऱ्यांना निवडून देणार का? असा सवालही मोदींनी केला. आम्ही देशाच्या हिताचे जेवढे निर्यण घेतले त्या सर्वांना विरोधकांनी विरोध केला हे दुर्देव आहे. विरोधक राफेलबाबत अपप्रचार करतात तेव्हा देशासाठी वीरपूत्र देणाऱ्या साताऱ्यातील या पिढीला वेदना होतात. ३७० कलमला विरोध होतो, सावरकरांची बदनामी केली जाते तेव्हा साताऱ्याचा पारा चढतो, असं मोदी म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीला जनभावना समजत नाही. त्यामुळेच मतदारांनी त्यांना दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिक्षा दिली. आता महाराष्ट्रात आणि हरयाणातही त्यांना शिक्षा मिळणार आहे, असं सांगतानाच महाराष्ट्र आणि हरयाणात भाजपचा विजय नक्की आहे, असंही मोदींनी सांगितलं.


मोदी दूरदृष्टी असलेले नेते

दरम्यान, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते असल्याचं सांगितलं. गेल्या दहा वर्षात दोन्ही काँग्रेसने कोणतीही विकासकामे केली नाहीत. त्यांनी केवळ भ्रष्टाचार केल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही साताऱ्यासाठी काहीही कामे केली नसल्याचे स्पष्ट केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हाय होल्टेज’मुळे पैशांचा महापूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीत हाय होल्टेज लढतीच्या ठिकाणी पैशाचा महापूर वाहत आहे. निवडणूक प्रशासनाला चकवा देत मतदारांपर्यंत थेट लाभ पोहचवण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे. पूरबाधित अपार्टमेंटमधील कुटुंबांनाही १५ हजारांची सरकारी मदत देऊन मतदारांची मर्जी वळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही कुजबुज सुरू झाली आहे. जेवणावळींचे कुपन घरपोच झाल्याने शाकाहारी, मासांहारी जेवणावळींच्या पार्ट्या वाढल्या आहेत. कुपन दिलेल्या हॉटेलमध्ये गर्दी होत आहे.

विधानसभेच्या प्रचारावर प्रत्येक उमेदवारास २८ लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटीने खर्च अनेक उमेदवार करीत आहेत. दहा मतदारसंघातील १०६ उमेदवार रिंगणात आहेत. यातील विद्यमान नऊ आमदारासह अनेक उमेदवरांची मालमत्ता कोट्यवधीची असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले आहे. उमेदवारांची संख्या वाढल्याने आणि काही ठिकाणी प्रतिष्ठेची लढत होत असल्याने निवडणुकीत कमालीची इर्षा निर्माण झाली आहे. त्यातून कोल्हापूर दक्षिण, उत्तर, शिरोळ, कागल विधानसभा मतदारसंघातील लढत हायहोल्टेज बनली आहे. उर्वरित मतदारसंघातही चुरशीने लढत होत आहे. तुलनेत तुल्यबळ लढत असलेल्या ठिकाणी प्रमुख उमेदवारांनी खर्चासाठी हात सैल सोडला आहे. यामुळे मतदारांची चंगळ होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक प्रशासनाची पथके कार्यरत आहेत. पथकांची नजर केवळ जाहीर प्रचार, कार्यक्रम, बैठकापुरतीच मर्यादित आहे.

गोपनीय होणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यावर या पथकाला मर्यादा येत आहेत. उमेदवारांच्या मनुष्यबळासमोर निवडणूक प्रशासनाची यंत्रणा तोकडी पडत आहे. त्याचा फायदा उठवत पैशाचा वारेमाप वाटप होत आहे. मतदारांच्या संख्येनुसार पाकिटातील रक्कम ठरत आहे. अशी पाकिटे वाटप करण्याची जबाबदारी उमेदवारांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते निभावत आहेत. अनेक मतदारांना हॉटेलमधील जेवणाचे कुपन दिले जात आहेत. ते घेऊन मतदार मेजवाणीवर ताव मारताना दिसत आहेत. शहरात कुटुबांना जेवणाचे कुपन तर खेड्यांमध्ये सामूहिक जेवणावळी घातल्या जात आहेत. उमेदवार खर्चाची माहिती खरी देतात की खोटी देतात याची पडताळणीही केली जात आहे. यासाठी प्रशासन प्रत्येक उमेदवाराचा खर्च नोंदवत आहे. उमेदवारही खर्चाचा अहवाल ठेवत आहेत. प्रशासन आणि उमेदवारांच्या खर्च पडताळणीत तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारास नोटीस देऊन खुलासा घेतला जात आहे.

बाहेर गावच्या

मतदारांचे बुकिंग

नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी अनेक मतदार बाहेरगावी आहेत. त्यांना संपर्क साधण्यासाठी दक्षिण, उत्तर, कागल, शिरोळ मतदारसंघातील उमेदवारांच्या समर्थकांत स्पर्धा लागली आहे. त्यांना मतदानादिवशी आणणे, नेणे, जेवणांची सोय करण्याचे नियोजन आतापासून केले जात आहे. यासाठी वेगळी यंत्रणा लावण्यात आली आहे. थेट मतदान केंद्रावरच त्या मतदारांना पोहच करण्याचे टार्गेट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनापासून आघाडी, यंदा परिवर्तन निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनता दलासह मित्र पक्षांची आघाडी विधानसभा निवडणूक प्रचंड आत्मविश्वासाने आणि जिंकण्याच्या इराद्याने लढवित आहे. मनापासून आघाडी झाल्यामुळे जिल्ह्यात परिवर्तन निश्चित आहे. एकाद्या मतदारसंघाचा अपवाद वगळता जिल्ह्यातील इतर सर्वच ठिकाणी आघाडीचे उमेदवार चांगल्या मताधिक्क्यांनी विजयी होतील इतके आश्वासक वातावरण आहे. यामुळे पुन्हा एकदा हा जिल्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडींचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल,'असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, 'काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मित्रपक्षांना सोबत घेऊन विधानसभेसाठी भक्कम आघाडी तयार केली. आघाडीचे नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये परस्परांविषयी विश्वास, सहकार्याची भावना आहे. आघाडीतील सगळे पक्ष हातात हात घालून प्रत्येक मतदारसंघात काम करत आहेत. मुळात कोल्हापूर जिल्हा हा दोन्ही काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे. जिल्ह्यातील बहुतांश संस्था आजही दोन्ही काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आघाडीची ग्रामीण भागांशी नाळ आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नांची जाणीव आहे. लोकांना याची खात्री पटली असून हा वाढता जनाधार आघाडीच्या उमेदवारांना विजयापर्यंत नेईल.'

पाटील म्हणाले, 'भाजप, सेनेच्या पाच वर्षांच्या कारभाराला लोक कंटाळले आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी युतीच्या नेत्यांनी लोकांना भरमसाठ आश्वासने दिली. पण सत्तेवर आल्यानंतर आश्वासनांची पूर्तता झाली नाही. यामुळे लोकांचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे. महागाई, विस्कटलेली आर्थिक घडी, रोजगार निर्मितीला बसलेली खीळ, शेती प्रश्नाकडे डोळेझाक या कारणामुळे समाजातील कुठलाच घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. या सरकारला घरी बसविण्यासाठी तो संधी शोधत होता. मतदार, येत्या २१ तारखेला सरकारवरील रोष मतपेटीद्वारे व्यक्त करून २४ तारखेला सध्याच्या राज्यकर्त्यांना सत्तेवरून पायउतार करतील.'

पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. युवावर्ग मोठ्या संख्येने आघाडीकडे आकर्षित होत आहे. यामुळे राज्यासह जिल्ह्यात परिवर्तन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात तीन ठिकाणी निवडणूक लढवित आहे. राष्ट्रवादीला यंदा जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळणार आहे. राधानगरी, भुदरगड मतदारसंघात माजी आमदार के. पी.पाटील मोठ्या मतांनी विजयी होतील. कागलमधील तिरंगी लढतीचा फायदा आमदार हसन मुश्रीफ यांना होणार आहे. चंदगडमध्ये राजेश पाटील यांच्यासारखा आश्वासक चेहरा लाभल्याने राष्ट्रवादी पुन्हा विजयी पताका फडकाविणार हे निश्चित आहे. आघाडीला प्रत्येक मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे. यामुळे जिल्ह्यात हमखास परिवर्तन होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावठाणातील पेठांवर विरोधकांची नजर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार, उत्तरेश्वर पेठ आणि सोमवार पेठ या शिवसेनेच्या बालेकिल्यावर विरोधकांकडून शिरकाव करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी 'कॅश' करण्यासाठी जोरदार गणिते मांडली जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. गुरुवारी दिवसभर गल्लोगल्ली प्रचाराने वेग घेतल्याचे दिसले.

शनिवार पेठेतील फरशी बोळात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे घर आहे. येथील निवडणूक कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी होती. नागरिकांची शिष्टमंडळे कार्यालयात त्यांना भेटत असल्याचे चित्र मिळाले. येथील गल्लीबोळात शिवसेना, काँग्रेस आणि भाकप उमेदवारांच्या प्रचार करणाऱ्या रिक्षांच्या आवाजाने प्रचारात रंग भरला आहे. प्रत्येकजण नोकरी, व्यवसायात गुंतला असला तरी चर्चा विधानसभा निवडणूकीची पहायला मिळाली.

'उत्तरे'त कोण येणार याचे आडाखे बांधले जात आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर सिद्धार्थनगराची नाराजी सत्ताधाऱ्यांविरोधात असली तरी जुना बुधवार पेठेतील बहुतांशी मंडळे, तालमी, नगरसेवक, माजी नगरसेवकांचा सेनेलाच पाठिंबा मिळणार असा दावा परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तर काही नाराज घटकांकडे विरोधकांनी, काँग्रेसने चाचपणी सुरू केल्याची चर्चाही अनेकांकडून ऐकायला मिळाली. आमदार क्षीरसागर पेठेतील आहेत. कोणत्याही वेळेत उपलब्ध होतात. तातडीने मदत होते, नागरी समस्यांच्या आंदोलनात ते पुढे असल्याने त्यांनाच मतदान मिळणार, अशी मते अनेकांनी व्यक्त केली गेली. परिसरात आठरापगड जाती असल्याने बुरुड, शिंपी, नाभिक, तेली, गवळी, जोशी, परीट, लोणार, कुंभार या गल्ल्यांत सेनेचा जोर आहे. आज पेठांच्या परिसरात पथनाट्यांमधून आमदार क्षीरसागर यांच्या विकासकामांचा, राजकीय, सामाजिक घडामोडींचा प्रचार सुरू होता.

काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव नवखा चेहरा असला 'फुटबॉल'मुळे ते तरुण वर्गाला चांगला परिचित आहे. या परिसरातील जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर, ऋणमुक्तेश्वर परिसरातील फुटबॉल संघ, त्यांचे समर्थक आणि प्रेक्षक वर्गावर जाधव यांच्या क्रीडाक्षेत्रातील कार्याची भुरळ आहे. बहुतांशी माहिला काँग्रेस उमेदवारांबाबत परिचित नाहीत. उत्तरेश्वर पेठ, मस्कूती तलाव, पंचगंगा तालीम परिसरात, दुधाळी, रेगे तिकटी या परिसरात काँग्रेसला प्रतिसाद मिळत आहे असे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र भाजप आणि शिवसेनेची हक्काची मते विरोधकांना फोडता येणार नाहीत असे मत अनेकांनी व्यक्त केले. बुधवारी उत्तरेश्वर पेठेत मिळालेल्या काँग्रेसच्या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादामुळे सत्ताधाऱ्यांना सतर्क रहावे लागले, असे मतही शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

गुरुवारी दुपारी ऋणमुक्तेश्वर तालीम, बाजारगेट, महापालिका परिसरात काँग्रेसची रॅली काढण्यात आली. दुपारी एक वाजता रॅली असतानाही काँग्रेस कार्यकर्तांनी चांगली गर्दी केली होती. सोमवार पेठेतील अकबर मोहल्ला, महाराणा प्रताप चौक परिसरातील सत्ताधाऱ्यांना 'पारंपरिक' विरोध कायम आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक रमेश पोवार यांनी आघाडीच्या मतासाठी बांधणी सुरू केली आहे. तरीही येथे सत्ताधाऱ्यांविरोधातील जोरदार प्रयत्न काँग्रेसने सुरू ठेवले आहेत.

सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांची घोषणा होत असली तरी शहरातील रस्त्यांच दुर्दशा झाली आहे. पापाची तिकटी, गंगावेश, रेगे तिकटी, पंचगंगा नदी या रस्त्याची चाळण झाली आहे. महानगरपालिकेला निधीची कमतरता असल्याने राज्य सरसकारचा निधी रस्त्यांसाठी उपलब्ध करण्याची गरज होती.

- विजय शिंदे, शुक्रवार पेठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकसभा, विधानसभेतही स्रियांना आरक्षण गरजेचे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना काम करण्याची संधी १९९२च्या ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीने दिली. त्यातून महिलांना मोठ्या प्रमाणात राजकारणात स्वतःला सिद्ध करता आले. असे आरक्षण लोकसभा व विधानसभेतही मिळणे गरजेचे आहे. कारण सर्वच राजकीय पक्ष पुरेशा प्रमाणात महिलांना टिकेटेही देतांना दिसत नाहीत. कोणत्याही क्षेत्रात मिळालेल्या संधीचे सोने करून राजकारण, समाजकारण व परिवर्तनाला नवी दिशा देण्याची क्षमता स्त्रियांनी सिध्द केली आहे' असे मत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले. त्या समाजवादी प्रबोधिनी, सचेतना मंडळ, महिला सबलीकरण कक्ष व तक्रार निवारण समिती जयसिंगपूर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आणि निवृत्त मुख्याध्यापिका उषाताई पत्की यांच्या सहकार्याने आयोजित 'राजकारण आणि स्त्रिया' या विषयावरील चर्चासत्रात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ख्यातनाम लेखिका प्रा. डॉ. तारा भवाळकर होत्या.

प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनंदा शेळके हे चर्चासत्रातील सहवक्ते होते. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी प्रस्ताविक केले. मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. इचलकरंजी संस्थानाचे जहागीरदार श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

चर्चासत्रात डॉ. सुनंदा शेळके म्हणाल्या, 'मानवी उत्क्रांतीत स्त्रियांनी सामाजिक विकासात मोठे योगदान दिले आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात स्त्रियांचे योगदान मोठे होते. स्वतंत्र भारतातही सर्वोच्चस्थाने महिलांनी समर्थपणे भूषविली आहेत. वास्तविक स्त्रियांनी बाहेरची वादळे घरात येऊ नयेत म्हणून घराचा दरवाजा बंद केला. पण त्यातून तिचाच कोंडमारा झाला आहे. त्याला वाचा फोडणे ही महिलांच्या राजकारणाची खरी गरज आहे.'

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, 'सर्वार्थाने समानता समाजात प्रस्थापित करायची असेल तर विवेकी वर्तन व्यवहाराची गरज आहे. राजकारणात स्त्रियांनी अधिक मोकळेपणाने सक्रिय व्हावे अशी परिस्थिती निर्माण करण्याची गरज आहे. हा प्रश्न नव्या समाजरचनेतील महत्वाचा प्रश्न असून स्त्रियांनी न्यूनगंड व पुरुषांनी अहंगंड सोडला पाहिजे.'

उषाताई पत्की यांनीही राजकारण आणि स्त्रिया या विषयाकडे समग्रतेचे भान ठेऊन पाहण्याची गरज प्रतिपादित केली.

अध्यक्षस्थानावरून डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, 'शेतीपासून वस्त्र विणण्यापर्यंतचे सारे शोध स्त्रियांनी लावलेले आहेत. स्त्रीचे मातृत्व, सृजनशीलता स्वयंसिद्ध असते. जन्म -भरण - पोषण -रक्षण प्रवासात स्त्रियांचे योगदान मोठे आहे. राजकारण आणि स्त्रिया यांचा विचार करताना मोकळेपणातून शुद्धतेकडे प्रवास होण्याची गरज आहे.

कार्यक्रमास साहित्यिका नीलम माणगावे, वनिता होरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश माणगावे आदींसह विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. डॉ. एस. एस. महाजन यांनी आभार मानले.

फोटो

'राजकारण आणि स्त्रिया' चर्चासत्रात बोलताना डॉ. भारती पाटील. मंचावर उषाताई पत्की, डॉ. सुनंदा शेळके, डॉ. तारा भवाळकर, प्रसाद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी ब्रिगेडचा काँग्रेस आघाडीला पाठिंबा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

संभाजी ब्रिगेड (सामाजिक) या संघटनेने विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संघटनेतर्फे काँग्रेस आघाडीला पाठिंबा देत असल्याचे पत्र काँग्रेसचे नेते गुलाबराव घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, काँग्रेस कमिटी सचिव संजय पोवार-वाईकर यांच्याकडे दिले.

कार्याध्यक्ष हुजरे पाटील म्हणाले, 'संभाजी ब्रिगेड ही संघटना गेली २५वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या निवडणुकीत संघटनेने काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. गेल्या पाच वर्षात राज्यातील भाजप,शिवसेनेच्या सरकारने जातीयवादी राजकारण केले. युती सरकारने, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारकार्याला तिलांजली देण्याचे काम केले. मुंबईत शिवस्मारकाची एकही वीट न रचता कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला.भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता आल्या नाही. शेतमालाला हमीभाव, रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे संघटना या निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय राहणार आहे.'

पत्रकार परिषदेला संघटनेचे प्रविण पाटील, शिवाजी खोत, चेतन पाटील, बाबा महाडिक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी सुविधांसाठी मतदारांचे बहिष्कारास्त्र

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम शहराचा विस्तार वाढत गेल्यानंतर अनेक उपनगरांची निर्मिती झाली. उपनगरे किंवा कॉलनी विकसित करताना पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी संबंधित विकासकांची असते. विकासकांसह लोकप्रतिनिधी आणि महापालिकेकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी पायाभूत सुविधांसाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्यानंतर महापालिका यंत्रणा तातडीने कामाला लागली. मतदारांनी ऐन निवडणुकीमध्ये बहिष्काराचे शस्त्र हाती घेतल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात का असेना त्यांना सुविधा देण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र धामधूम सुरू आहे. प्रचारादरम्यान उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. पण शहराजवळील अशी अनेक उपनगरे आहेत की, तेथे लाइट, पाणी व रस्त्यांची सुविधा दिलेली नाही. अनेकदा नागरिकांनी महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरवा केला, पण त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. उपनगरे किंवा कॉलन्या वसविताना तेथील पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची आहे, पण त्याकडेच दुर्लक्ष केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वर्षांनुवर्षे पाठपुरावा करूनही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात कळंबा रिंगरोडजवळील नंदनव पार्कमधील नागरिकांनी प्रथम बहिष्काराचे शस्त्र उगारले. त्यानंतर विचारेमाळ येथेही असाच प्रकार घडला. तर एका खासगी अपार्टमेंटमधील रहिवाशांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे तक्रार करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या महापालिका यंत्रणेने नंदनवन पार्क येथील रस्ते व स्ट्रीट लाइटचा प्रश्न निकालात काढला. विचारेमाळ येथील आंदोलन ऐनवेळी कोणाच्या सांगण्यावरून स्थगित केले हे गुलदस्त्यातच राहिले. मात्र, एका खासगी अपार्टमेंटधारकाविरोधात आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीची दखल त्वरित घेण्यात आली. नगररचना विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित भेट घेऊन महापालिकेत विकासक आणि अपार्टमेंटधारकांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्याचा निर्णयही लवकरच लागेल. मात्र, पायाभूत सुविधांसाठी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयाची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. पण यामुळे महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अपयशही यानिमित्ताने दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॅशन्स, स्टाइल सजावटही ट्रेंडी

सायकल रॅलीव्दारे शहरात मतदान जागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी शहरातून मतदान जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अधिकारी रॅलीत सहभागी झाले.

जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतर्फे आयोजित रॅलीची सुरूवात गांधी मैदानापासून झाली. जिल्हाधिकारी देसाई यांच्या हस्ते रॅलीचे उदघाटन झाले. यावेळी बोलताना देसाई म्हणाले, 'येत्या २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे. या दिवशी घटनेने दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क प्रत्येक मतदाराने बजावला पाहिजे. हा संदेश अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी सायकल रॅली आणि सह्यांची मोहीम सहाय्यभूत ठरेल. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ७५.१५ टक्के मतदान झाले होते. यापेक्षा अधिक मतदान यावेळी होण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा.'

महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'शहरवासियांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. निर्भय आणि मुक्त वातारणात मतदान करावे.'

दरम्यान, गांधी मैदानापासून निघालेली सायकल रॅली महाव्दार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका, सीपीआर, दसरा चौक मार्गे बिंदू चौक येथे आली. तिथे रॅलीची सांगता झाली. रॅलीत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, दिवाकर कारंडे, प्रियदर्शनी मोरे, एस. के. यादव यांच्यासह शहरातील शाळांतील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅपी दिवाली, नो गिफ्ट प्लीज’

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कक्षाच्या प्रवेशद्वारावरील कागदी फलक अधिकारी आणि अभ्यागतांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.'हॅपी दिवाली, नो गिफ्ट प्लीज' (दिवाळीच्या शुभेच्छा, कृपया भेटवस्तू नको) असा तो फलक आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा चांगला निर्णय घेतला आहे. दिवाळीत महागड्या भेटवस्तू देण्याची अपेक्षा, आग्रह आणि अप्रत्यक्षपणे सक्ती करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी भेटवस्तू नाकारण्याचा निर्णय घेत कृतीतून पारदर्शक भूमिकेचा संदेश दिला आहे.

दिवाळी सणाला २५ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. शुभेच्छा देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना समाजातील अनेक घटकांतील लोक भेटत आहेत. अधिकाऱ्यांची आपल्यावर मर्जी राहावी यासाठी हजारो रुपये किमतीतील ड्राय फ्रूट्स, मौल्यवान वस्तू भेट म्हणून शुभेच्छा सोबत देतात, असे चित्र सार्वत्रिकपणे दिसते आहे. कोणत्याही निमित्ताने किमती भेटवस्तू सरकारी यंत्रणेत स्वीकारणे अप्रत्यक्षपणे लाचखोरीला प्रोत्साहन देण्याचाच प्रकार आहे. तरीही याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून अधिकारी भेटवस्तू स्वीकारतात हे वास्तव आहे. यामुळे ते देण्यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर रांग लागलेली असते.

यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातही असेच चित्र होते. मात्र, याला विद्यमान जिल्हाधिकारी देसाई अपवाद ठरले आहेत. त्यांनी आपल्या दालनाच्या प्रवेशद्वारावरच भेटवस्तू नको, असा फलक लावला आहे. अशी भूमिका घेणारे अलीकडच्या काळातील हे पहिलेच जिल्हाधिकारी असल्याचे असल्याचे सांगण्यात येते. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली. अल्पावधीच त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. त्यांनी लोकसभेची प्रक्रिया यशस्वीपणे हाताळली. ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात प्रभावीपणे प्रशासकीय कामगिरी करून बाधितांना दिलासा दिला. महसूलसारख्या प्रशासनात राहूनही ते सातत्याने पारदर्शकेतेचा आग्रह धरतात. अतिशय संयमाने आणि चिकित्सकपणे प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या गुप्त पळवाटा बंद करण्यासाठी ते विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. पारदर्शक प्रशासनातून सामान्यांना सहज न्याय देण्याच्या मानसिकतेतून त्यांनी आता दिवाळीत गिफ्ट स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

००००

इतर अधिकाऱ्यांसमोर आदर्श

महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, पाटंबधारे, कृषी, नगर रचना, ट्रेझरी, जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण अशा विविध सरकारी विभागांत दिवाळीच्या तोंडावर आणि त्या दरम्यान अधिकाऱ्यांना गिफ्ट कोणते द्यायची, यावर चर्चा रंगते. अनेकवेळा किमती गिफ्टसाठी कर्मचारी वर्गणीही काढत असतात. ठेकेदारांशी संबंध येणाऱ्या सरकारी कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या कक्षात गिफ्टचा पाऊसच पडतो. मात्र, यावेळी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी देसाई यांनीच दिवाळीसाठी कोणत्याही प्रकारची भेटवस्तू स्वीकारणार नाही, असा फलक लावला आहे. त्यांच्या या चांगल्या भूमिकेचे अनुकरण जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यासह सर्वच विभागांतील अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी होत आहे.

००००

कोट...

यापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी सेवा बजावली तिथे कोठेही दिवाळीच्या निमित्ताने गिफ्ट स्वीकारले नाही. यामागे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. मात्र, सरकारी अधिकारी गिफ्ट घेत नाहीत, हा चांगला संदेश सामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. याच मानसिकेतून येथेही मी गिफ्ट न घेण्याचा निर्णय घेतला. तसा फलकही कक्षाच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. असेच अनुकरण इतर विभागातील अधिकाऱ्यांनीही करावे, अशा आवाहनाचे पत्रक काढण्यात येईल.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संभाजी ब्रिगेडमध्ये पाठिंब्यावरुन मतभेद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संभाजी ब्रिगेडतर्फे (सामाजिक) जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला. मात्र त्यांचा हा निर्णय नागरिकांची व मतदारांची दिशाभूल करणारी आहे, अशी तक्रार करवीर मतदारसंघातील संभाजी ब्रिगेडच्या उमेदवार डॉ. प्रगती चव्हाण यांनी करवीर पोलिस स्टेशन व करवीर मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

डॉ. चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीमध्ये संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, हिंदुराव हुजरे-पाटील, प्रविण पाटील, शिवाजी खोत, चेतन पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. या प्रकारावरुन संभाजी ब्रिगेडमधील अंतर्गत वाद उफाळला. गुरुवारी दुपारी हिंदुराव पाटील यांनी जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, शिवाजी खोत, चेतन पाटील यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. संभाजी ब्रिगेडची राज्य कार्यकारिणी आणि प्रविण गायकवाड यांनी सर्वानुमते हा निर्णय घेतल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. पत्रकार परिषदेला बाबा महाडिकही उपस्थित होते.

हुजरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस आघाडीला पाठिंबा देत असल्याचे पत्रही काँग्रेसचे नेते गुलाबराव घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, काँग्रेस कमिटीतील सचिव संजय पोवार वाईकर यांना दिले. यानंतर काही वेळातच ही बातमी सोशल मिडीयावरुन व्हायरल झाली. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडकडून करवीर मतदारसंघातून डॉ. प्रगती चव्हाण या अधिकृत उमेदवार आहेत. ब्रिगेडच्या अधिकृत उमेदवार असताना काहीजणांनी दुसऱ्या आघाडीला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण कोणत्याही पक्षाला जाहीर अथवा छुपा पाठिंबा दिलेला नाही. पाठिंबा दिल्याचा खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी तक्रार चव्हाण यांनी दिली. यासंबंधीची माहिती जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजारांवर कर्मचाऱ्यांनीकेले पोस्टल मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या तीन हजार ४१ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बुधवारअखेर पोस्टल मतदान केले. त्यामध्ये ५९५ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे', अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदान करण्याची संधी निवडणूक प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे. पोस्टल मतदान २० ऑक्टोबरअखेर स्वीकारण्यात येणार आहे. बुधवारअखेर झालेले मतदान (विधानसभा मतदारसंघनिहाय) असे : चंदगड : २३८, राधानगरी : ५१९, कागल : ५३२, कोल्हापूर दक्षिण : २२१, करवीर : ४०७, कोल्हापूर उत्तर : १२४, शाहूवाडी : १४३, हातकणंगले : २८१, इचलकरंजी : १३१, शिरोळ : ३४५.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासक, इतिहासप्रेमी संतप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वगळण्याच्या प्रकारावरून समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शिवभक्त रस्त्यावर उतरतील, असा इशाराही शिवप्रेमी व इतिहासप्रेमींनी दिला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही,' असा सज्जड दम दिला आहे. 'ज्यांनी कुणी ही आगळीक केली, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा. मुळात यांचे धाडसच कसे झाले?' असा सवालही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या या घोडचुकीवर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेचे आसूड ओढले जात आहेत. खासदार संभाजीराजे यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या कामकाजावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करत हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे म्हटले आहे.

संभाजीराजे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व देशभर पोहचावे यासाठी महाराष्ट्रवासियांसह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जावा म्हणून प्रयत्न करत आहे. अनेकदा शालेय शिक्षण मंत्र्यांची यासंदर्भात भेट घेतली.'

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम शालेय वयातच मुलांना समजावा, पराक्रमाची ओळख व्हावी म्हणून चौथीच्या पुस्तकात त्यांचा इतिहास गेल्या कित्येक वर्षापासून समाविष्ठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची ओळख आणि चौथीचे पुस्तक असे समीकरण ठरले होते. महाराजांचा इतिहास शिकत अनेक पिढ्या घडल्या आहेत, याकडेही इतिहास अभ्यासकांनी लक्ष वेधले. महाराजांच्या कर्तबगारीचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे. जगभरातील अभ्यासक, संशोधक शिवचरित्र अभ्यासत आहेत. मात्र राज्यातील आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वगळण्याची दुर्बुद्धी सुचावी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे मतही अनेकांनी नोंदविले.

भाजप, शिवसेनेच्या सरकारकडून सातत्याने सोयीचा इतिहास मांडण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. यापूर्वीही ही सुभाष साठे यांचे 'रामदास स्वामी हेच शिवाजी महाराजांचे गुरु आहेत' अशा आशयाचे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्याच प्रकार घडला. मात्र त्याला राज्यभरातून विरोध झाल्यामुळे पुस्तक मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. सरकारने, शिवरायांच्या इतिहासाशी खेळखंडोबा करू नये. राज्यातील लोक हा प्रकार सहन करणार नाहीत.

इंद्रजित सावंत, इतिहास अभ्यासक

छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक व्यक्तिमत्व आहे. त्यांचा इतिहास, पराक्रम जर आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला माहीत नसेल तर मंडळाची कीव करावीशी वाटते. मंडळाचा हा प्रकारच धक्कादायक आहे. चौथीतील मुलांचे वय संस्कारक्षम असते. यामुळे चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायमस्वरुप शिकविण्याविषयी यापूर्वी सरकारी पातळीवर ठरले आहे. शिक्षण संचालकांनी तत्काळ खुलासा करावा. महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही. नागरिक शांत बसणार नाहीत. इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आंदोलने करतील.

डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक

छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक पातळीवर महामानव आहेत. त्यांच्याविषयी जगातील अनेक भाषेत समकालीन लेखकांनी लेखन केले आहे. फ्रेंच, डच, पोर्तुगालमध्ये लिखाण प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने त्यांचा इतिहास पुसण्याबाबतची मोठी चूक केली आहे. गेली काही वर्षे सातत्याने शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी कसे करता येईल यादृष्टीने काही मंडळी प्रयत्नशील असतात. संपूर्ण महाराष्ट्राने एकदिलाने या प्रकाराविरोधात आवाज उठविला पाहिजे. तरच न्याय मिळू शकेल.

डॉ. रमेश जाधव, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगार निर्मितीत सरकार अपयशी : ज्योतिरादित्य शिंदे

$
0
0

मटा. प्रतिनिधी, कोल्हापूर
गेल्या पाच वर्षात देशात २२०५ उद्योग बंद पडले. लाखो तरुण बेरोजगार होत आहेत. नव्याने रोजगार निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे,' अशी टीका काँग्रेसचे खासदार जोतिरादित्य शिंदे यांनी केली. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या 'युथ कनेक्ट' कार्यक्रमात ते बोलत होते.

हॉटेल सयाजी येथे शिंदे यांचा युथ कनेक्ट हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली. 'गेल्या पाच वर्षात देशातील २२०५ उद्योग बंद पडले. अनेक नामांकित कंपन्या, कारखाने बंद होत आहेत. लाखो तरुणांचा रोजगार जात आहे. सरकारच्या फसलेल्या धोरणांमुळे बेरोजगारीचे संकट गंभीर होण्याचा धोका आहे. रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरले. नोकऱ्यांची नवीन संधी निर्माण करणारे सरकार गरजेचे आहे', असं शिंदे म्हणाले.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या: मनमोहन
राज्य सरकारने पाठ्यपुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांवरील वगळलेल्या पाठाबद्दल बोलताना ते म्हणाले, 'इतिहास आणि वर्तमान यातून उज्ज्वल भविष्य निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने देशातील सर्वात मोठ्या योद्ध्याची गौरवशाली परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. हा इतिहास जपल्यास चांगले भविष्य घडवता येईल. शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज असताना सरकार चुकीच्या पद्धतीने शालेय पाठ्यपुस्तकातून त्यांच्यावरील पाठ काढून टाकत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'ईडी'ला 'येडी' बनवून टाकू: शरद पवार

$
0
0

पंढरपूर: देशातले मोदी सरकार सरकारी यंत्रणा गुन्हेगारांच्या विरोधात वापरण्याऐवजी राजकीय विरोधकांवर वापरत आहेत. माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम सध्या तुरुंगात आहेत, तर कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागत आहे, असे सांगत मला मात्र 'ईडी'ची भीती दाखवू नका. मी मेल्या आईचे दूध प्यायलो नसून मी तुमच्या 'ईडी'लाच 'येडी' करून टाकीन, अशी तुफानी टोलेबाजी आज शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ आज येथील शिवतीर्थावर पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपाठीवार राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आवर्जून उपस्थित होते.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचा इतिहास नव्याने लिहिण्याबाबत वक्तव्य केले असतानाच राज्य सरकारने चौथीच्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांवरील धडा वगळल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब गंभीर असून शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांना अभ्यासात ठेवणे आवश्यक असताना ते काढण्याचे पाप हे सरकार करीत असल्याचा घणाघात पवार यांनी केला.

छत्रपतींच्या जाज्वल पराक्रमाचा इतिहास असलेल्या गडकिल्ल्यावर आता हे दारूचे अड्डे आणि छमछम सुरु करायला लागले आहेत, असे सांगत तुम्हाला हेच करायचे असेल तर जाना मोडनिंबला, असा टोला पवारांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनाही पवारांनी लक्ष्य केले. तुम्ही दुसऱ्याला उभे करून कुस्तीची भाषा करताय मात्र आमचे पैलवान तुम्हाला कसे चितपट करतात, हे २४ तारखेला दिसेल, अशी फटकेबाजी पवारांनी केली.

यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांना चिमटा घेतला. भालके गेले दोन महिने भाजप आणि शिवसेनेत जाण्याच्या तयारीत होते मात्र शेवटी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भालके जाणार म्हणून आम्ही पंढरपूरमधील काँग्रेसची उमेदवारी शिवाजी काळुंगे यांना दिली होती. मात्र आता भारत भालके हेच काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, असे सांगत काळुंगे यांनी उमेदवारी मागे घेतली नसली तरी आमचे उमेदवार भालकेच असल्याचा निर्वाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images