Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासीनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार परिसरातील हॉटेल, यात्री निवास, लॉजमध्ये थांबण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाचे ओळखपत्र, साहित्याची कसून तपासणी करूनच प्रवेश देण्याच्या सूचना पोलिसांनी हॉटेल आणि लॉज मालकांना केल्या. लॉज आणि यात्री निवासाची दिवसातून एकदा झडती घेऊन तपासणी केली जाणार असल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले.

नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापुरात येणारे भाविक लॉज, हॉटेल, यात्री निवासात थांबतात. काही रेकॉर्डवरील गुन्हेगारही या ठिकाणी थांबण्याची शक्यता आहे. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर अंबाबाई मंदिर असल्याने देशभरात हायअलर्ट जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलिसांनी या परिसरातील यात्री निवास, लॉज मालकांना सूचना दिल्या आहेत. यात्री निवासातील सीसीटीव्हीचे फुटेज दररोज तपासावे. संशयित व्यक्ती वाटल्यास तत्काळ पोलिसांना कळावा, अशा सूचना केल्या आहेत. मंदिर परिसरातील लॉज आणि यात्री निवासाची दिवसातून एकदा झडती घेतली जाणार आहे. संशयित भाविकांची चौकशी केली जाणार आहे. त्यासह मंदिरात होणारी गर्दी, लूटमारी, पाकिटमारी आणि मंदिराची एकूण सुरक्षा व्यवस्थेसाठी २४ तास हत्यारी पोलिसांचा खडा पहारा ठेवला आहे. २५० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून मंदिर परिसरातील सर्व हालचालीवर देखरेख ठेवली जात आहे. संशयित चोरट्या महिला, सराईत गुन्हेगार गर्दीत घुसणार नसल्याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे. शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात रविवार पासून झाली. या कालावधीत किमान १० लाख भाविक दर्शनासाठी येतील, अशी शक्यता गृहीत धरून चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. सकाळी आठ ते रात्री आठ व रात्री आठ ते सकाळी आठ अशा दोन शिफ्टमध्ये बंदोबस्त नेमला आहे. चोरी रोखण्यासाठी साध्या वेशाताली महिलांचे पोलिस पथक तैनात केले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, मंदिरात प्रवेश करताना धातू शोधक यंत्रणा बसविली आहे.

बंदोबस्त असा

पोलिस निरीक्षक: २

एपीआय, उपनिरीक्षक: १०

पोलिस कर्मचारी :१२५

होमगार्ड : ५०

वाहतूक पोलिस : २५

बॉम्ब शोधक पथक: १

दहशतवाद विरोधी पथक: १

श्वान पथक: १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराईत गुन्हेगाराकडूनगावठी पिस्तुल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील एसएससी बोर्ड परिसरात बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या राजेंद्रनगर येथील सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. संशयित जुबेर उर्फ दाद्या आयुब किल्लेदार (वय २४) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी सांगितले की, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्या पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार जुबेर किल्लेदार हा एसएससी बोर्ड परिसरातील एका बसस्टॉपवर उभा आहे. त्यानुसार पथकातील श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, रणजित कांबळे, संजय पडवळ, उत्तम सडोलीकर, किरणगावडे, सुजय दावणे, प्रदीप पोवार, वैभव पाटील यांनी पाळत ठेवून झडप टाकून किल्लेदारच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याने पिस्तुल कोठून खरेदी केली, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूरज साखरेचा साथीदार मुजावरला मुंबईत अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेकायदेशीर सावकारीसह भूखंड माफियांची टोळी म्हणून दहशत निर्माण केलेल्या 'एस एस गँग'चा म्होरक्या संशयित सूरज साखरेच्या साथीदार युनूस हसन मुजावर (वय २८, आराम कॉर्नर, घुडनपीर दर्गा परिसर) याला सापळा रचून पोलिसांनी रविवारी मुंबईत अटक केली. त्याला सोमवारी (ता. ३०) पुणे येथील विशेष मोक्का कोर्टात हजर केले जाणार आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एस एस गँग'चा मुख्य म्होरक्या सूरज हणमंतराव साखरे, त्याचा साथीदार ऋषभ सुनील भालकर, पुष्कराज मुकुंद यादव, धीरज अण्णा नेजकर हे तिघेही कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहेत. या टोळीतील संशयित अभी ऊर्फ युवराज मोहन महाडिक (रा. मंगळवार पेठ), युनूस मुजावर आणि पार्थ (पूर्ण नाव नाही) हे पसार होते. युनूस मुजावर हा चुलत भाऊ शहाबाज अन्वर मुजावर (रा. बिद्रा कर्मशिअल, कॉम्लेक्स, महाकाली रोड जोगेश्वरी, अंधेरी पूर्व मुंबई) यांच्या घरी आल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला समजली. पथकाने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. तो साखरे याच्या सोबत राहून पैसे वसुली करत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. दरम्यान पोलिसांनी सर्व संशयितांच्या घरांवर छापे टाकून सावकारकीतून मिळविलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या खरेदीदस्तांच्या फायली, बँक पासबुके जप्त केली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक पद्मा कदम तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचितची दुसरी यादी आज जाहीर होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी (ता. ३०) सकाळी अकरा वाजता जाहीर होणार आहे. राज्यातील २०० इच्छुक उमेदवारांचा यादीत समावेश असून, जिल्ह्यातील विधानसभेच्या उर्वरित आठही उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, इचलकरंजीतून माजी आमदार प्रकाश आवाडे वंचितकडून लढणार नसल्याचे समजते. त्यामुळे शिरोळ, हातकणंगले मतदारसंघांत वंचित स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहे.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत इच्छुक उमेदवारांची गेले तीन दिवस मुंबईत दादर येथील आंबेडकर भवनात बैठक झाली. या बैठकीत राज्यातील २०० जणांची नावे निश्चित झाल्याचे समजते. राधानगरी मतदारसंघातून गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, शिरोळ मतदारसंघातून छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील, कोल्हापूर उत्तरमधून महावितरण कंपनीचे निवृत्त अधिकारी एस. पी. कांबळे, हातकणंगलेतून इंद्रजित कांबळे, प्रेमकुमार माने, स्वाभिमानीचे प्रमोद कदम, शाहूवाडीतून डॉ. सुनील पाटील, कागलमधून संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पेठेत एमबीएच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पेठेतील आयरेकर गल्ली येथील तारकेश संतोषानंद पाटील (वय २३) या एमबीएच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी छताच्या हुकाला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तो सायबरमध्ये एमबीएमच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारकेश शनिवारी रात्री जेवण करून आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. सकाळी आठ वाजता त्याच्या वडिलांना त्याला हाक मारली, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. दहा मिनिटे खोलीसमोर थांबून दरवाजा उघडत नसल्याने संशय आला. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी मुलाने छताच्या हुकाला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर धक्का बसला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. तारकेशचे वडील शहरातील एका कॉलेजमध्ये लिपिक आहेत. मुलाने आत्महत्या केल्याने वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या पहिल्या यादीतपी. एन., ऋतुराज पाटील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये करवीर मतदारसंघातून माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांचा समावेश आहे. शिवसेनेने जिल्ह्यातील विद्यमान आमदारांसह कागल आणि चंदगड येथील इच्छुकांना एबी फॉर्म वितरित केले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी सोमवारी दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेना, भाजप स्वतंत्रपणे लढतील या अपेक्षेने दोन्ही पक्षात मोठ्या संख्येने इनकमिंग झाले आहे. कागल मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविण्याच्या पवित्र्यात असलेल्या म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि आणि चंदगड मतदारसंघातून इच्छूक असणाऱ्या डॉ. नंदिनी बाभुळकर यांची पंचाईत झाली. चंदगडच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कन्या नंदिनी या गेले काही दिवस राष्ट्रवादीपासून अंतर राखून होत्या. मात्र त्याठिकाणी शिवसेनेकडून संग्राम कुपेकर यांना एबी फॉर्म मिळाला आहे. यामुळे बाभूळकर आता पुन्हा राष्ट्रवादीकडून चाचपणी करत आहेत. तर समरजितसिंह घाटगे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे. दरम्यान, घटस्थापनेचा मुहूर्त साधत काँग्रेसने ५१ उमेदवारांच्या यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील कडेगाव पलूस मतदारसंघातून विद्यमान आमदार विश्वजित कदम व जत मतदारसंघातून विक्रम सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई चरणी भाविकांची मांदियाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी दिवसभरात ७० हजार भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद झाली. मेटल डिटेक्टर यंत्रणेनुसार भाविकांची नोंद घेण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता पारंपरिक लवाजम्यात अंबाबाईची सुवर्ण पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिरातही दर्शनासाठी दिवसभर गर्दी झाली. सिंहासनारूढ रूपात तुळजाभवानी देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. सकाळी कर्नाटक हायकोर्टचे न्यायाधीश के. सोमशेखर, छत्रपती संयोगिताराजे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दिवसभर कारंजा चौक येथे भक्तीगीत, भावगीतांचे कार्यक्रम रंगले.

रविवारपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. महिन्याचा चौथा शनिवार व रविवार असल्याने सलग सुटीचा योग साधत पर्यटक भाविकांची रविवारी मंदिरात मोठी गर्दी होती. मुख्य दर्शनरांग असलेल्या पूर्व दरवाजातून दिवसभरात १९ हजार १५६ भाविकांनी मंदिरात प्रवेश करत अंबाबाईचे थेट पेटीचौकातून दर्शन घेतले. पश्चिम दरवाजातून १४ हजार ७७६, दक्षिण दरवाजातून १३ हजार ८५४ तर उत्तर दरवाजातून १८ हजार १८४ भाविकांनी अंबाबाई मंदिरात प्रवेश केल्याची नोंद झाली. या सर्व भाविकांनी देवीचे मुखदर्शन घेतले.

रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या सुवर्ण पालखीत ठेवण्यात आलेल्या अंबाबाईच्या उत्सवमूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. अलंकारीक पूजा, पालखी मिरवणूक याचे थेट प्रक्षेपण मंदिराच्या आवारात लावण्यात आलेल्या स्क्रीनवर भाविकांना पाहता येत आहे.

दरम्यान, शहरातील विविध सार्वजनिक तरूण मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात दुर्गामूर्तीची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली. सायंकाळी सहानंतर आकर्षक रोषणाईसह वाद्यांच्या निनादात दुर्गामूर्तींचे आगमन झाले. तर रात्री शहरातील अनेक भागामध्ये दांडियाचे फेर घुमू लागले.

प्रसादाचा लाभ

नवरात्रोत्सवात भाविकांसाठी देवस्थान समिती, अंबाबाई भक्त मंडळ यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था व व्यक्तींच्यावतीने भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय कक्षही स्थापन करण्यात आला आहे. अंबाबाई भक्त मंडळाच्यावतीने रविवारी ५०० भाविकांनी मोफत अन्नछत्राचा लाभ घेतला. मंदिरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस, स्वयंसेवक यांच्यासाठीही मोफत अन्नछत्र सेवा पुरवण्यात आली आहे. तसेच नवरात्रकाळासाठी दोन लाख लाडू प्रसाद विक्रीसाठी तयार ठेवण्यात आला असून कळंबा कारागृहातील महिला कैद्यांनी हा प्रसादाचा लाडू बनवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीनं तरुणाला उडवले; जागीच मृत्यू

$
0
0

सोलापूर: राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीनं एका तरुणाला उडवलं आहे. अपघातात जबर जखमी झालेल्या तरुणाचा उपचाराआधीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं संतप्त झालेल्या जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केल्याची माहिती देखील समोर येत आहे.

बार्शी तालुक्यातील शेळगाव होळे येथे आज सकाळी ही घटना घडली. सावंत यांची गाडी बार्शीहून शेळगावकडे निघाली होती. भरधाव वेगात असलेल्या या गाडीनं भाजी विकणाऱ्या एका तरुणाला धडक दिली. त्यात तो जबर जखमी झाला. उपचाराला नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. श्याम असं या तरुणाचं नाव आहे.

अपघात झाला तेव्हा तानाजी सावंत हे गाडीतच होते. मात्र, अपघातानंतर लगेचच त्यांनी दुसऱ्या एका गाडीनं घटनास्थळावरून काढता पाय घेतला. या घटनेमुळं लोकांमध्ये संताप असून सावंत यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहूवाडी एमआयडीसी, पर्यटनाकडे दुर्लक्ष

$
0
0


शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील अडचणीच्या भौगोलिक परिस्थितीनेच औद्योगिक विकासाला खीळ बसल्याचा बोलघेवडेपणा येथील नागरिकांच्या माथी मारला जातो. यावर कट्टर गटातटाच्या राजकारणाला वाहून घेणारी येथील जनता लोकप्रतिनिधींवर दबाव राखण्याऐवजी भावनेला केंद्रस्थानी ठेवून राजकीय नेत्यांच्या मागे-मागे करीत राहिल्याने येथील अदृश्य विकासरथाची चाकेच निखळून पडल्याचे वास्तव पाहायला मिळते. 'उदय साखर'च्या निमित्ताने तालुक्यात औद्योगिकरणामुळे विकास होईल असे वाटले, पण विकासाच्या वाटा अद्याप काळोखातच पडून आहेत. यात सरकारच्या बदललेल्या नियमावलीने तालुका औद्योगिक वसाहतीचा बळी घेतल्यातच जमा आहे. नावांतील अदलाबादली व्यतिरिक्त कागदपत्रातच 'जीव' अडकलेले काही उद्योगही पुढे सरकले नाहीत. तरुणांच्या हाताला काम नाही, व्यावसायिक, औद्योगिक शिक्षणाच्या संधीही उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यासाठी तरुणांना बाहेरच जावे लागते.

शाहूवाडीचा निम्मा अधिक भूभाग पावसाळा संपताच कोरडवाहू म्हणून अर्थात पाण्यासाठी तहानलेला दिसतो. यावर उपाय म्हणून अस्तित्वात येऊ पाहणारे रणवरेवाडी, तळपवाडी, सोनुर्ले यांसारखे महत्त्वाकांक्षी लघू पाटबंधारे प्रकल्प रखडले, तसेच काही ठिकाणी नवीन प्रकल्प हाती घेण्याच्या संधीही दवडल्या गेल्या आहेत. 'वारणा' उजवा कालवा 'सुप्रमा'नंतरही निरूपयोगी ठरला आहे. जलयुक्त शिवारसारखी सरकारी जलसंधारण मोहिमाही 'विशिष्ट' विकास डोळ्यासमोर ठेवून राबविल्याचे लपून राहलेले नाही. साहजिकच जल-जमीन समीकरण प्रभावीपणे विकासाकडे सरकू शकलेले नाही. आजवर औषधे, गौण खनिजांचे निमित्त करून त्याच निसर्गाच्या गळ्यालाच नख लावण्याचा 'उद्योग' बिनबोभाट चालविल्याने बदल्यात खोल खाईत सरकलेले 'थ्रीजी' (जल, जंगल, जमीन) घटक हे विकासाचा भाग बनण्याची शक्यता कालपरत्वे धूसर बनत गेली. त्यातच सुमारे ७० गावांना 'इको सेन्सिटिव्ह झोन'चा विळखा पडल्याने ती अधिकच गडद झाली आहे. बांबवडे येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम गेल्या तीन दशकांपासून रखडले आहे, तर ऐतिहासिक विशाळगड परिसर, अनुस्कुरा, जुगाई येळवण, आंबा परिसर, उदगिरी व धोपेश्वर तसेच पन्हाळागड, मसाई पठार अशी घाटमाथ्यावरील लक्षवेधी ठिकाणे दुर्लक्षित पर्यटनाच्या श्वासात गुरफटून गेली आहेत. तर शेतकरी, महिलांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न सोडविणारा वाटाड्या उद्योगही प्रलंबितच म्हणावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली - कोल्हापूर मार्ग, पंचगंगा प्रदूशणाने विकासाला खीळ

$
0
0


आमदार सुरेश हाळवणकर व डॉ. सुजित मिणचेकर हे सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे असे दोन आमदार असतानाही हातकणंगले तालुक्याचा दहा वर्षांत विकासासाठी मोठ्या प्रमाणात झगडावे लागले असून पंचगंगा नदी प्रदूषण, सांगली-कोल्हापूर महामार्ग, हुपरीची चांदी क्लस्टर योजना, हातकणंगले क्रीडासंकुल, तीन औद्योगिक वसाहतींतीमधल रस्ते, पेठवडगाव बायपास रस्ता आदींसह अनेक महत्त्वाची विकासकामे दहा वर्षांत पूर्ण करता आले नाहीत. त्यामुळे तालुक्यात नाराजीचा सूर उमटत आहे.

तालुक्यातील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अनेक कामे संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाची केल्याने अनेक तक्रारी झाल्यानंतर त्याला काळ्या यादीत टाकले आहे. यामुळे ठेकेदार न्यायालयात गेल्याने हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. हा महामार्ग नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचा समावेश होऊन जमीन अधिग्रहण प्रक्रिया अद्याप सुरू आहे. चांदी व्यवसायासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या चंदेरी नगरी हुपरी शहरासाठी प्रलंबित असलेली चांदी क्लस्टर योजना गेल्या चौदा वर्षांपासून रखडल्यामुळे उद्योजकांतून नाराजी व्यक्त होत आहे. हातकणंगले शहरासाठी क्रीडासंकुल मंजूर होऊन पंधरा वर्षे झाली परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी क्रीडासंकुल अद्याप पूर्ण झाले नाही. तालुक्यातील पंचतारांकित, लक्ष्मी, शिरोली या तीन औद्योगिक वसाहतींमध्ये प्रमुख समस्या रस्त्यांची असून सत्ताधारी भाजप-शिवसेनेने या समस्येचे निराकरण केले नाही. त्यामुळे दळणवळणाच्या साधनांचा अभाव असल्याने या औद्योगिक वसाहतीत येणारे अनेक उद्योग कर्नाटकात स्थलांतरित होत आहेत.

जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न पंचगंगा नदीचे प्रदूषण. मात्र, याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूर व इचलकरंजी शहर, लक्ष्मी औद्योगिक वसाहत, पंचतारांकित औद्योगिक वसाहत आदींचे सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत असताना अधिकाऱ्यांनी राजकीय हस्तक्षेपाने तोंडी कारवाई करण्यापर्यंत काही केलेले नाही. पंचगंगेच्या काठावरील गावांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याच्या फक्त वल्गना झाल्या, पण कारवाई शून्यच. त्याबरोबर पेठवडगाव शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम पंधरा वर्षापासून रखडलेले आहे. आदी अनेक महत्वपूर्ण प्रलंबित कामांमुळे तालुक्यातील जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरात्रोत्सवामुळे फळांना मागणी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून भाजी मंडयांत फळांची मागणी वाढली आहे. हिमाचल प्रदेश, काश्मीरहून सफरचंदाची मोठी आवक झाली असून प्रतिकिलो ५० ते १८० रुपयांनी विक्री होत आहे. भाजीपाल्यांचे दर स्थिर असून टोमॅटोच्या दरात किरकोळ पाच रुपयांनी वाढ झाली आहे.

पितृपंधरवड्यात भाजी खरेदीत मोठी उलाढाल झाल्यानंतर नवरात्रोत्सवासाठी फळबाजार सज्ज झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात नऊ दिवस भाविक उपवास करताना फक्त फलाहार करतात. त्यामुळे फळांना मागणी वाढली आहे. राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथे फळांची आवक वाढली आहे. परदेशी सफरचंदापेक्षा भारतीय सफरचंद चवीला गोड असल्याने ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. ५० ते १८० दराने सफरचंदाची विक्री होत आहे. सफरचंदाच्या खालोखाल केळ्यांना मोठी मागणी आहे. एक डझन केळ्यांचा दर २० ते ६० रुपये असून जवारी केळीचा दर २० ते ८० रुपये हे. चिकू,मोसंबी, पेरू, डाळींबाचे बाजारात आगमन झाले आहे. सिताफळाचा दर प्रतिकिलो १०० ते १५० रुपये आहे. तासगाव आणि कर्नाटकातून सिताफळाची आवक झाली आहे. सोलापूर, जत, पंढरपूरातून डाळींबाची आवक झाली आहे. प्रतिकिलो ३० ते १०० रुपये दराने विक्री सुरू आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)
वांगी : ४० ते ६०
टोमॅटो : २० ते ३०
भेंडी : ६०
ढबू : ४०
गवार : ८०
दोडका : ६०
कारली : ६०
वरणा : ४० ते ६०
हिरवी मिरची : ४०
फ्लॉवर : १५ ते ४० (प्रति गड्डा)
कोबी : १५ ते २० (प्रति गड्डा)
बटाटा : २५
लसूण : ८० ते १००
कांदा : ४० ते ५०
आले : १०० ते १२०
पडवळ : १५ ते २० (प्रति नग)
मुळा : १२ ते १५ (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)
मेथी : १०
कांदा पात : १०
कोथिंबीर : १० ते २०
पालक : १०
शेपू :१०
चाकवत : १०
करडा : १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)
सफरंचद : ५० ते १४०
डाळिंब : ३० ते १००
पेरू: ५ ते १० (प्रति नग)
चिकू : ५० ते ६०
मोसंबी : ५० ते १२०
केळी : ३० ते ६० (डझन)
जवारी केळी : २० ते ८० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा आजपासून सुरळीत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

बालिंगा पंपिंग हाऊस येथील 'महावितरण'च्या सबस्टेशनच्या कामासाठी बंद असलेला पाणीपुरवठा आजपासून (मंगळवार) सुरू झाला. सबस्टेशनमधील बिघाड काढण्यात सोमवारी सायंकाळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले. दुरुस्तीनंतर सायंकाळी सहा वाजल्यापासून बालिंगा उपसा केंद्रांतून पाणी पुरवठा सुरू झाला. मात्र दुरुस्तीमुळे पाणी न आलेल्या भागात ऐन सणात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली.

बालिंगा येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये बिघाड झाला होता. दुरुस्तीसाठी या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत केला होता. येथे शहराला पाणीपुरवठा करणारे बालिंगा उपसा केंद्र असल्याने विद्युत पुरवठ्याअभावी उपसा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे सोमवारी सकाळी व सायंकाळच्या सत्रात होणारा पाणी आले नाही. नवरात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात झालेली असताना पाणी न आल्याने नागरिकांना धावपळ करावी लागली. ए. वॉर्डातील काही भागाला तर सी. व डी. वॉर्डातील सर्वच प्रभागांतील नागरिकांना त्याचा फटका बसला.

महावितरणने सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुरुस्ती पूर्ण केली. त्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्यानंतर सायंकाळी सहा वाजता बालिंगा उपसा केंद्रातून पुरवठा सुरू झाला. वितरण टाकी भरून घेतल्यानंतर मंगळवारी सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे महापालिकेचे तांत्रिक अधिकारी रामदास गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान महावितरणचे काम सुरू असताना दिवसभर महापालिकनेने वितरण निलिकेवरील जंप व जोड मारणे यांसह अन्य कामे करून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप जिल्ह्यात बॅकफूटवर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील पाच जागा पक्षाकडे घेण्याची तयारी केलेल्या भाजपला केवळ दोनच जागांवर समाधान मानण्याची वेळ आली आहे. शिवाय चार मतदारसंघांतून लढण्याची चर्चा असलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरुडमधून उमेदवारी निश्चित केल्याने जिल्ह्यातील सेनेचा मार्गच मोकळा झाला आहे. जिल्ह्यात एकही सुरक्षित मतदारसंघ न मिळाल्याने पाटील यांना पुण्यातून लढावे लागत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप बॅकफूटवर गेला असून शिवसेना मात्र सुसाट आहे.

गेल्या चार वर्षांत पश्चिम महाराष्ट्रात विशेषता कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाटील यांनी भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली. स्थानिक स्वराज्य संस्थेसह सहकारी संस्थाही ताब्यात घेतल्या. लोकसभेला ताकद वापरत शिवसेनेच्या दोन जागा मिळवून दिल्या. जिल्ह्यातील दहा मतदारसंघात पक्ष प्रबळ करताना उमदेवारही तयार केले. पण, रविवारी सेनेच्या आठ उमेदवारांची नावेच जाहीर झाल्याने भाजपच्या इच्छुकांची कोंडी झाली. युती झाली तर पाच आणि नसेल तर दहा जागा लढवण्याची तयारी या पक्षाने केली होती. पण, आता केवळ इचलकरंजी आणि दक्षिणवरच समाधान मानावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताकद असूनही भाजप बॅकफूटवर गेला आहे. चंदगड, राधानगरी, कागल, उत्तर आणि शाहूवाडी या पाच मतदारसंघांत या पक्षाची मोठी अडचण झाली आहे.

पालकमंत्री पाटील यावेळी जिल्ह्यातील चारपैकी एका मतदारसंघातून मैदानात उतरणार हे नक्की होते. त्यासाठी चंदगड, राधानगरी, उत्तर आणि इचलकरंजी यापैकी ते कोणता मतदारसंघ निवडतील याची उत्सुकता होती. राधानगरी व उत्तर हे सुरक्षित मतदारसंघ आहेत, अशी त्यांच्या गटात चर्चा होती. पण, रविवारी अचानक युतीचे उमेदवारच जाहीर झाल्याने पालकमंत्री जिल्ह्यातून लढणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झाले. कागल हा मुख्यमंत्र्यांनी उमेदवार जाहीर केलेला मतदारसंघ होता. तेथेही सेनेने बाजी मारली. त्यामुळे जिल्ह्यात भाजप बॅकफूटवर आणि सेना सुसाट असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.

कोथरूड हा पालकमंत्री पाटील यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी या मतदारसंघाला प्राधान्य दिले असावे. पण, जिल्ह्यातील एकही मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षित करता आला नाही , हे पालकमंत्री पाटील यांचे अपयशच म्हणावे लागेल. उमेदवारी देतो म्हणून त्यांनी दहा मतदारसंघांत अनेकांना आश्वासने दिली. त्यांना पक्षात घेतले. पण, आता केवळ दोन मतदारसंघ या पक्षाला मिळणार असल्याने आठ ठिकाणी इच्छुकांची अडचण झाली आहे. यातील काही ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेविरोधात कोण लढणार?

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यात दोन खासदार व सहा आमदार अशा संख्याबळाने युतीचा मोठा भाऊ ठरलेल्या शिवसेनेने विधानसभेसाठीही आठही जागा मिळवत प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. 'एबी' फॉर्म दिलेल्या उमेदवारांसमोर काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच काही अपक्षांचे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे. युतीविरोधात लढण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आतापर्यंत हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील व ऋतुराज पाटील या तिघांची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवाय बंडखोरही रिंगणात उभे राहणार असल्याने सेनेच्या उमेदवारांविरोधात कोण याची उत्सुकता आहे.

कोल्हापूर उत्तरसह करवीर, शाहूवाडी, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, चंदगड, कागल या मतदारसंघातील विद्यमान आमदार व इच्छुकांना शिवसेनेने 'एबी' फॉर्म दिले. अस्वस्थता संपल्याने उमेदवारांनी मेळावे व भेटीगाठी घेत प्रचाराला धडाक्यात सुरुवातही केली. युती धर्माप्रमाणे भाजपला ठिकठिकाणी मदत करावी लागणार आहे. त्यामुळे तेथील भाजप इच्छुक नेते अस्वस्थ झाले आहेत. काँग्रेस आघाडीकडून तीन जागांवरील उमेदवार निश्चित आहेत. त्यांचाही जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने तेथील इच्छूक अंधातरी आहेत.

'कोल्हापूर उत्तर'मध्ये राजेश क्षीरसागर यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही क्षीरसागर यांच्यासमोर तगडा उमेदवार नसल्याची स्थिती आहे. त्यांच्याविरोधात आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. प्रचारासाठी केवळ १९ दिवस आहेत. उद्योजक चंद्रकांत जाधव, वसंतराव मुळीक, सत्यजित कदम यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. पण ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे आधी उमेदवारी, नंतर प्रचार म्हटले तरी कितपत आव्हान त्यांच्यासमोर उभे राहील याची साशंकता आहे.

करवीर मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची थेट लढत होईल. तिथे युती, आघाडीतील मित्रपक्ष कशी मदत करतात, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किती मते मिळवेल यावर लढतीतील चुरस वाढेल.

शाहूवाडीमध्ये आमदार सत्यजित पाटील यांच्यासमोर पारंपरिक विरोधक विनय कोरे यांचे आव्हान असेल. करवीर व शाहूवाडी या दोन्ही मतदारसंघात दोन्हीकडील उमेदवारांनी बेरजेचे राजकारण केल्याने दुरंगी लढती होतील, असे दिसते.

राधानगरीमधून प्रकाश आबिटकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून के. पी. पाटील की ए. वाय. पाटील यांचा निर्णय झालेला नाही. काँग्रेसकडील अरुण डोंगळे, सत्यजित जाधव, वंचित बहुजन आघाडीकडून जीवन पाटील, भाजपकडील राहुल देसाई यांनी तयारी केली आहे. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता असल्याने मतदा संघात उमेदवारा वाढतील.

शिरोळ मतदारसंघातही इच्छुकांची संख्या मोठी आहे. आमदार उल्हास पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून राजेंद्र पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी किंवा अनिल मादनाईक, भाजपकडून अनिल यादव, माधवराव घाटगे, राजवर्धन निंबाळकर हे निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. आघाडीत हा मतदारसंघ कोणाकडे यावर उमेदवार व बंडखोरी ठरेल. भाजपकडून इच्छूक असलेलेही बंडखोरीच्या मनस्थितीत आहेत.

हातकणंगले मतदारसंघात डॉ. सुजित मिणचेकर यांना पुन्हा उमेदवारीची संधी मिळाली असून तिथे काँग्रेसचे राजूबाबा आवळे, भाजपकडून अशोकराव माने, जनसुराज्यचे माजी आमदार राजीव आवळे इच्छूक आहेत. अशोकराव माने बंडखोरी करणार की थांबणार हेही लवकर स्पष्ट होईल.

कागल मतदारसंघ भाजपकडे घ्यायच्या तयारीने समरजित घाटगे यांनी प्रचार सुरू केला. तिथे सेनेने माजी आमदार संजय घाटगे यांना उमेदवारी देऊन समरजित यांच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना आव्हान देत युतीकडून संजय घाटगे सामोरे जाणार की समरजित यांच्या बंडखोरीमुळे युतीची ताकद विभागणार हे पहावे लागणार आहे.

चंदगड मतदारसंघात सेनेची हक्काची मते आहेत. तेथे संग्राम कुपेकर यांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले गोपाळराव पाटील, भरमू पाटील, नंदिनी बाभूळकर यांच्यापैकी कोण बंडखोरी करणार?, राजेश पाटील हे काँग्रेस की राष्ट्रवादीकडून हे लवकरच समजेल. येथे काहीजण वंचित बहुजन आघाडीकडूनही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

मतदारसंघ शिवसेना उमेदवार विरोधी उमेदवार

उत्तर राजेश क्षीरसागर चंद्रकांत जाधव (काँग्रेस), सत्यजीत कदम (ताराराणी आघाडी)

करवीर चंद्रदिप नरके पी. एन. पाटील (काँग्रेस)

शाहूवाडी सत्यजीत पाटील विनय कोरे (जनसुराज्य शक्ती)

राधानगरी प्रकाश आबीटकर के. पी. पाटील, ए. वाय. पाटील (राष्ट्रवादी), अरुण डोंगळे (काँग्रेस)

हातकणंगले डॉ. सुजित मिणचेकर राजूबाबा आवळे (काँग्रेस), अशोकराव माने (भाजप), राजीव आवळे (जनसुराज्य शक्ती)

शिरोळ उल्हास पाटील राजेंद्र पाटील (राष्ट्रवादी), राजू शेट्टी, अनिल मादनाईक (स्वाभिमानी), अनिल यादव, माधवराव घाटगे, राजवर्धन निंबाळकर (भाजप)

चंदगड संग्राम कुपेकर राजेश पाटील (काँग्रेस), गोपाळ पाटील, भरमू पाटील (भाजप), नंदिनी बाभूळकर (राष्ट्रवादी)

कागल संजय घाटगे हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), समरजित घाटगे (भाजप)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी कार्ड वाटप प्रकरणात महाडिक यांना क्लिनचीट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शहरातील प्रापर्टी कार्ड वितरण करण्यात आले आहे असा अहवाल शहर सीटीसर्व्हे प्रशासनाने दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांना दिला आहे. तो अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या प्रापर्टी कार्ड वितरणाबाबतच्या तक्रारीत पहिल्या टप्यात तरी क्लिनचीट दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या प्रकरणात तक्रारदार आमदार पाटील किती ताकदीने पाठपुरावा करणार यावर पुढील कार्यवाही अवलंबून राहणार आहे.

अमल महाडिक 'दक्षिण'चे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात आमदार पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील काँग्रेसकडून रिंगणात आहेत. हायव्होल्टेज लढत असल्याने एकमेकांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. यातूनच शनिवारी आमदार पाटील यांनी आचारसंहितेच्या काळात अमल महाडिक हे शहरात प्रॉपर्टी कार्ड वाटप करत असल्याची तक्रार व्हॉट्सअॅपवरून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली होती. देसाई यांनी ही तक्रार चौकशीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर यांच्याकडे वर्ग केली. यासंबंधी नावडकर यांनी सीटीसर्व्हे विभागाकडून अहवाल मागितला.

सीटीसर्व्हे प्रशासनाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच कार्ड वाटप केल्याचा अहवाल दिला आहे. या अहवालावर सहमत आहे, असा शेरा मारून नावडकर यांनी आचारसंहिता विभागाचे प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्याकडे तो अहवाल पाठवला आहे.

आमदारांना पोटशूळ का?

'तब्बल चाळीस वर्षे प्रलंबित असलेला प्रॉपर्टीकार्डचा प्रश्न आमदार अमल महाडिक यांनी सोडवला. जे आमदार मंत्री असताना हे प्रश्न सोडवू शकले नाहीत, ते प्रश्न महाडिक यांनी सोडविल्याने त्याचा काँग्रेसच्या आमदारांना पोटशूळ उठला आहे का? असा सवाल महापालिकेतील भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी केला आहे. पत्रकात म्हटले आहे की, महाडिक यांनी भागाचा कायापालट केला. प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न सोडवला. आता प्रचारासाठी मुद्दा नसल्याने काँग्रेसचे आमदार तक्रारींची उठाठेव करत आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेत टेंडरपूर्वीच अॅडव्हॉन्स बुकिंग

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

Tweet@:gurubalmaliMT

कोल्हापूर : 'टेंडर नोटीस... मधील काम नं... हे काम अॅडव्हॉनस सुरू आहे, त्यामुळे कोणत्याही कंत्राटदारांनी हे टेंडर भरू नये' असे लेखी पत्र देत सध्या महापालिकेत बहुतांश सर्वच नगरसेवकांनी जवळच्या कंत्राटदारांसाठी अॅडव्हॉन्स बुकिंग सुरू केले आहे. नगरसेवक आणि ठराविक कंत्राटदारांची साखळी झाल्याने सध्या निविदा प्रक्रियेविनाच काही कामे सुरू असल्याचे समजते. इतरांना निविदा भरण्यास मज्जाव केल्याने स्पर्धाच होत नसल्याने महापालिकेच्या निधीची सामूहिक लूट सुरू आहे. प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे. दरम्यान, नगरसेवकांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे कंत्राटदार हैराण झाले असून अनेकांनी या व्यवसायालाच रामराम केला आहे.

महापालिकेच्यावतीने सर्व विकासकामांसाठी ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबवली जाते. निविदा प्रक्रियेत स्पर्धा असावी, कामे दर्जेदार आणि निधीचा गैरवापर न होता व्हावीत यासाठी ही प्रक्रिया अवलंबण्यात आली. पण या पारदर्शक प्रक्रियेला फाट्यावर मारत सध्या काहींनी नवीनच आयडिया लढवली आहे. ठराविक कंत्राटदारांनी ही प्रक्रिया ताब्यात घेतली असून त्याला नगरसेवकांची साथ मिळत आहे.

महापालिकेने कोणत्याही कामाचे टेंडर प्रसिद्ध करताच दुसऱ्याच दिवशी संबंधित प्रभागातील नगरसेवकाचे सर्व कंत्राटदारांना पत्र जाते. कंत्राटदारांच्या अंतर्गत व्हॉट्सअॅप ग्रुपवर 'टेंडर नोटीस.... मधील ... हे काम अॅडव्हॉन्स सुरू आहे. त्यामुळे त्याचे कोणीही टेंडर भरू नये. काही अडचण असल्यास मला भेटावे' असे पत्र त्या ग्रुपवर टाकले जाते.

हे पत्र पाहून एकही कंत्राटदार टेंडर भरण्याचे धाडस करत नाही. जो टेंडर भरेल त्याला पश्चाताप होईल अशाच पद्धतीने नंतर त्याला वागणूक मिळते. प्रत्येक नगरसेवकाचा कंत्राटदार ठरलेला आहे. काही नगरसेवकांच्या घरातील नातेवाईकच कंत्राटदार आहेत. प्रभागातील काम त्या विशिष्ट व्यक्तीलाच मिळावे यासाठी नगरसेवकांनी ही नवी पद्धत वापरली आहे. त्यामुळे टेंडर नोटीस ही प्रक्रिया केवळ नावालाच शिल्लक उरली आहे. प्रत्येक कामाचे नगरसेवक अॅडव्हॉन्स बुकिंग करीत असल्याने व्यावसायिक स्पर्धाच बंद झाली आहे. त्यामुळे कंत्राटदार भरेल ती निविदा प्रशासन मान्य करते. यातून एकप्रकारे जनतेच्या निधीची लूटच सुरू आहे.

महापालिकेत पूर्वी चारशेवर कंत्राटदार होते. मात्र अॅडव्हॉन्स बुकिंगच्या या पद्धतीमुळे आणि प्रत्येक नगरसेवकाने कंत्राटदारच फिक्स केल्याने सध्या केवळ ६० ते ७० इतके मोजकेच कंत्राटदार कार्यरत आहेत. इतरांनी या व्यवसायाला 'रामराम' करण्यास सुरूवात केली आहे. टेंडरपूर्वी कोणतेच काम करता येत नाही. पण, इतर कंत्राटदारांना भुलवण्यासाठी काहीजण किरकोळ खुदाई करत काम सुरू असल्याचा दिखावा करतात. नगरसेवक त्याच्या पाठिशी असल्याने इतर कंत्राटदार काहीही करू शकत नाहीत. एखाद्याने विरोधात निविदा भरलीच तर नंतर एवढे अडथळे आणले जातात की तो पुन्हा असे धाडस करत नाही. नगरसेवक आणि कंत्राटदारांच्या नव्या साखळीने महापालिकेत लूट सुरू आहे. प्रशासनाला याची माहिती असूनही नगरसेवकांचा रोष कशाला घ्यायचा? असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

कोट

टेंडरपूर्वी अॅडव्हॉन्स काम करण्याची पद्धत महापालिकेत नाही. पण, असे प्रकार घडत असतील तर संबंधित विभागीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यांचा वापर केला जाईल.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुक बंडखोरीच्या तयारीत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवसेनेने सहा आमदारांसह आठ मतदारसंघात उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असलेल्या इच्छूक बंडखोरीच्या तयारीत आहेत. या उमेदवारांच्या परतीचे दोर कापले गेले आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढतीची शक्यता आहे.

युतीमध्ये भाजपला किती जागा मिळणार याकडे इच्छुकांचे लक्ष होते. भाजपने मागणी केलेल्या कागल आणि चंदगड मतदारसंघात अनुक्रमे संजय घाटगे आणि संग्राम कुपेकर यांना सेनेने एबी फॉर्म दिल्याने इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे. इच्छुकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांचा संपर्क होत नसल्याने इच्छूक हवालदील झाले आहेत.

कागल मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात काढून घेण्यासाठी भाजपने शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगेंना बळ देण्यासाठी पुणे म्हाडाचे अध्यक्षपदही दिले. घाटगे यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांनी विकासकामांचे नारळ फोडले गेले. घाटगे यांनी प्रचारासाठी पायाला भिंगऱ्या बांधल्या. पण ही जागा सेनेला गेल्याने घाटगे यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागेल. पुढील दोन दिवसांत या घडामोडींची शक्यता आहे.

चंदगड मतदारसंघ सेनेला गेल्याने माजी आमदार भरमू पाटील, गोपाळ पाटील, हेमंत कोलेकर, रमेश रेडेकर, शिवाजी पाटील या इच्छुकांत निराशा आहे. राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर याही भाजपवर नजर ठेऊन होत्या. पण चुलत भावाला एबी फॉर्म मिळाल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीकडे प्रयत्न सुरू केले आहेत. या मतदारसंघात चंदगड तालुक्यातील एकच उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

शिरोळमध्ये भाजपकडील गोकुळचे तज्ज्ञ संचालक अनिल यादव बंडखोरीच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन बहुजन विकास आघाडीकडून लढण्याचा विचार करत आहेत. दिलीप पाटील आणि माधवराव घाटगे यांच्या मदतीवरच त्यांची पुढील भूमिका ठरेल.

राधानगरीत राहुल देसाई हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत गटाचा मेळावा घेऊन भूमिका जाहीर केली जाईल. कोल्हापूर उत्तरमधून उद्योगपती चंद्रकांत जाधव यांच्याशी काँग्रेसने संपर्क साधला आहे. त्यामुळे येथेही बंडखोरी अटळ मानली जाते.

शिवसेनेला एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे आमेच पक्षाच्या वरिष्ठांशी संपर्क सुरू आहे. नेत्यांच्या आदेशानुसार निवडणुकीची तयारी सुरू होती. युती झाली तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.

- राहुल देसाई, राधानगरी मतदारसंघ

आम्ही शिरोळची जागा मागत होतो. पण, सेनेने विद्यमान आमदारांना एबी फॉर्म दिले आहेत. भाजपच्या नेत्यांशी आमचा संपर्क झालेला नाही. बहुजन विकास आघाडीच्यावतीने निवडणूक लढवण्याचा विचार आहे. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भूमिका जाहीर करणार आहे.

- अनिल यादव, शिरोळ मतदारसंघ

युतीची अद्याप घोषणा झालेली नाही. पण सेनेने विद्यमान आमदारांना एबी फॉर्म दिल्याने भाजप काय भूमिका घेईल याची वाट पहात आहे. नंतर आमचे कार्यकर्ते निर्णय घेतील.

- चंद्रकांत जाधव, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगेश्वरी कॉलनीत गरबा-दांडियाची धमाल

$
0
0

मुख्य बातमीला जोड

योगेश्वर कॉलनीत गरबा-दांडियाची धमाल

पाचगाव रोडवरील योगेश्वरी कॉलनी परिसरात नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसाच्या कालावधीत गरबा, दांडियाची धमाल असते. योगेश्वर तरुण मंडळातर्फे गेली १९ वर्षे उत्सव साजरा करण्यात येतो. घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. आकर्षक मंडप, विद्युत रोषणाईच्या झगमगाटांनी परिसर खुललेला असतो. देवीची रोज वेगवेगळ्या रुपात पूजा बांधतात. उत्सव कालावधीत रोज गरबा, दांडियाचे आयोजन केले होते. योगेश्वरी कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, रायगड कॉलनी, जगतापनगर, एन टी सरनाईकनगर या भागातील लहान मुले, मुली, युवती, महिलांचा यामध्ये समावेश असतो. उत्सवाच्या शेवटच्या दोन दिवशी प्रत्येकाला आईस्क्रीम वाटप केले जाते. मंडळाचे प्रमुख सुहास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कमिटीचे अध्यक्ष अभिजित परुळेकर, मंदार पुजारी, सागर नाटेकर, अमित गुरव, काशीनाथ परीट, गणेश बारपट्टे आदी कार्यकर्ते उत्सव कालावधीतील कार्यक्रमांचे नियोजन करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदवीधर’साठी आजपासून मतदार नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदार नोंदणीसाठीचे अर्ज सोमवारी तालुक्याला पाठवले. आज, मंगळवारपासून प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

'पदवीधर' साठी २० जून २०१४ रोजी मतदान झाले होते. २० जून २०२० रोजी विद्यमान आमदारांची मुदत संपणार आहे. यासाठी आतापासून मतदार नोंदणी करून घेतली जात आहे. १ नोव्हेंबर २०१९ पूर्वी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेले मतदार होण्यास पात्र ठरणार आहेत. पुणे विभाग मतदारसंघात नोंदणी करण्यासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमधील निवासाचा पुरावा आवश्यक आहे. निवास पुराव्यासाठी रेशनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, निवडणूक ओळखपत्र यापैकी एक तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षाचे मार्कलिस्ट, पदवी प्रमाणपत्र या कागदपत्रांची अॅटेस्टेड कॉपीज सादर करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ नोव्हेंबर २०१९ आहे. १९ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येईल. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरअखेर दावे, हरकती स्वीकारण्यात येईल. २६ डिसेंबरला हरकती निकालात काढण्यात येतील, तर ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होईल.

...

कोट

'पदवीधर मतदार नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. यासाठी आवश्यक विहित नुमन्यातील अर्ज तालुक्याला पाठवले आहेत. अर्ज निशुल्क आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत प्रांतकार्यालयात अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

सतीश धुमाळ, उपजिल्हाधिकारी, निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरगावकर ट्रस्टतर्फे उद्या ‘यंग सिनीअर्स’चा सत्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

उतारवयातही समाजातील विविध क्षेत्रासाठी योगदान देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या २२ यंग सीनिअर्सचा मंगळवारी (ता. १) गौरव करण्यात येणार आहे. दिवंगत अनंतराव कोरगावकर सामाजिक सेवा संघ ट्रस्ट आणि पुलाची शिरोलीतील कोरगावकर पेट्रोल पंपाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रम होईल.

एक ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मानचिन्ह, मानपत्र, शाल व तुळशीचे रोप देऊन संबंधितांचा सत्कार होणार आहे. या समारंभासाठी निवृत्त मेजर संजय शिंदे, कर्नल संजीव सरनाईक, पोलिस उपअधीक्षक स्वाती गायकवाड, आणि कौन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रजनी मगदूम हे प्रमुख पाहुणे आहेत. कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शिक्षण, सामाजिक, आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्यांचा ट्रस्टतर्फे गेली सात वर्षे गौरव करण्यात येत आहे. त्यानुसार यंदा आयोजित कार्यक्रमात २२ मंडळींचा सन्मान होईल. तसेच नऊ वर्षीय स्केटिंगपटू केदार गायकवाडचा सत्कारही केला जाणार आहे.

पत्रकार परिषदेला आशिष कोरगावकर, आकाश, राज आणि अनिकेत कोरगावकर, सुधाकर तोडकर आदी उपस्थित होते.

यांचा होणार सत्कार

रजनी शेटे, डी. सी. पाटील, आदिलशा उस्मान नदाफ, एस. डी. लाड, मोहन हवालदार, आप्पासाहेब देसाई, महादेव गायकवाड, श्रीकांत आडिवरेकर, कमांडंट राजाराम शिंदे, आनंद म्हाळुंगेकर, देवदत्त रुकडीकर, शशिप्रभा परुळेकर, रत्नमाला घाळी, विजय जाधव, शालाबाई व श्रीधर घुगरे, बाबुराव कबाडे, गिरीधारी नारंग, शिवाजी आडूरकर, बंकत चोरगे, सूर्यकांत वायदंडे, सुभाष झगडे आणि हर्षनिल सेवा केंद्राचे श्याम भागवत यांचा सत्कारमूर्तीमध्ये समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images