Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कपड्यांची बाजारपेठ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम फॅशनेबल कपड्यातील वैविध्यता, लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन, आणि साड्या, शूटिंग-शर्टिंगवर आकर्षक सवलतींचा वर्षाव यामुळे कोल्हापुरातील कपड्यांची बाजारपेठ सध्या गजबजली आहे. दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर

बाजारपेठ सज्ज झाली आहे. रेडिमेड व फॅशनेबल कपडे खरेदीकडे वाढता कल आहे. ग्राहकांचा हा कल लक्षात घेऊन दुकानदारांनी स्वतंत्र दालने थाटली आहेत. महाद्वार रोड, शिवाजी रोड, ताराराणी रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, स्टेशन रोडसह विविध भागातील कपड्यांची दुकाने सजली आहेत. सध्या गाजत असलेले सिनेमे आणि वाहिन्यावरील मालिकांचा प्रभावही कापड मार्केटवर दिसत आहे. वेगवेगळ्या मालिकेतील गाजलेल्या व्यक्तिरेखांच्या वेशभूषेची क्रेझ पाहावयास मिळत आहे. गाजलेल्या मालिका आणि त्यातील

व्यक्तिरेखांनी परिधान केलेल्या वेशभूषेची जाहिरात काही जणांनी केली आहे. सोबतीला दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलती जाहीर केल्या आहेत. तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत सवलत, ठराविक

रकमेच्या खरेदीवर भेटवस्तू अशा ऑफर्स आहेत. सणासुदीला नवीन कपडे खरेदी मोठ्या प्रमाणात होते. लहान मुलांच्या तयार कपडयांच्या बाजारपेठेत यंदाही फॅशन्सची चलती आहे. मुलांच्या कपड्यांचे मार्केट मोठे आहे. दुकानदारांनी लहान मुलांच्या कपडयांचे स्वतंत्र दालनच तयार केले आहे. तरुणांमध्ये जॅकेट आणि फॅन्सी ड्रेसचे आकर्षण आहे. ब्रँन्डेड कपडे व नामवंत कंपन्यांचे जीन्स खरेदी करण्याकडे युवा वर्गाचा कल आहे. विविध डिझाइनमध्ये टी शर्ट आहेत. युवतींमध्ये वर्कमधील चुडीदारचे आकर्षण आहे. महिला वर्गासाठी नऊवारी साड्यांच्या असंख्य व्हरायटीज आहेत. सिल्क साड्या, पैठणी, वर्क साड्या, फॅन्सी साड्या, कांचीवरमसह वेगवेगळ्या प्रांतातल्या आणि कलाकुसरीने सजलेल्या साड्या महिला वर्गांना आकर्षित करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समरजित घाटगे भाजपमधून बाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल विधानसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच 'म्हाडा', पुणे विभागाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोमवारी तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 'म्हाडा'चा राजीनामा दिला. आता ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबतची घोषणा ते आज, मंगळवारी कागलमधील बीकेएम भवनमध्ये होणाऱ्या मेळाव्यात करतील.

युती होवो किंवा न होवो समरजित घाटगे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे चित्र दोन वर्षे होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन वर्षांत तीनदा कागलला येऊन त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दोन वर्षे भाजप त्यांना ताकद देत होता. संजय घाटगे यांना विधान परिषदेवर घेऊन समरजित यांना विधानसभेला उमेदवारी देण्याबाबत दोन महिने चर्चा होती. काही दिवसांपूर्वी महाजनादेश यात्रा कोल्हापुरात आली असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची घोषणाही केली. घाटगे यांनी तीन वर्षांत जोरदार तयारी केल्याने ते मुश्रीफ यांना जोरदार टक्कर देतील, असे वातावरण निर्माण झाले. पण रविवारी अचानक शिवसेनेने संजय घाटगे यांची उमेदवारी निश्चित केली.

युती होणार असल्याने समरजित यांना भाजपची उमेदवारी मिळणार नाही, हे रविवारीच स्पष्ट झाले. त्यामुळे नाराज झालेल्या समरजित यांनी सोमवारी तातडीने मुंबई गाठली. मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी आपण मोठी तयारी केली आहे त्यामुळे थांबणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. 'म्हाडा' अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील समरजित यांना पक्षात घेण्यापासून ते ताकद देण्यापर्यंत सर्व पातळ्यांवर त्यांच्यासोबत होते. पण रविवारी सेनेने अचानक आक्रमक भूमिका घेत उमेदवारीच जाहीर केल्याने त्यांचीही अडचण झाली. पाटील आणि फडणवीस यांनी घाटगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही.

घाटगे यांनी वेळोवेळी मुश्रीफ यांना आव्हान दिले आहे. यामुळे ते थांबतील, असे सध्या तरी वातावरण नाही. ते अपक्ष म्हणून मैदानात उतरतील, हे जवळपास स्पष्ट आहे. यामुळे भाजपमधील ही पहिली बंडखोरी ठरणार आहे. मंगळवारी कागलमध्ये होणाऱ्या मेळाव्यातच ते उमेदवारी घोषणा करण्याची चिन्हे आहेत. विधानसभेची उमेदवारी देतो, म्हणून पक्षाने अनेकांच्या हातात कमळ दिले. पण आता युती झाल्याने उमेदवारी देणे अशक्य झाले. यामुळे घाटगे यांच्यासह अनिल यादव, माधवराव घाटगे, राहुल देसाई, चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेकजण बंडखोरीच्या तयारीत आहेत.

०० ०० ००

कागलमधून तीन वर्षांत मोठी तयारी केली आहे. मात्र युती निश्चित झाल्याने आपल्याला भाजपची उमेदवारी मिळाली नाही. पुढे काय करायचे, याचा निर्णय मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केला जाईल.

समरजित घाटगे, अध्यक्ष, 'म्हाडा'

०० ०० ०० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमसी बँकेसमोर निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रुईकर कॉलनी येथील पीएमसी बँक शाखेसमोर प्रांत ग्राहक सरंक्षण संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली खातेदार आणि ठेवीदारांनी सोमवारी निदर्शने केली. बँकेचे संचालक, व्यवस्थापन,एचडीआयएल संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या संचालकांचे भाजपशी कनेक्शन असल्याने कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, सहा महिन्यात दहा हजार रुपये काढण्याची सवलत रिझर्व्ह बँकेने दिल्याने शहरातील सहाही शाखांसमोर खातेदार आणि ठेवीदारांच्या रांगा लागल्या होत्या. शाखांतून मोठ्या प्रमाणात रक्कम काढल्याने दुपारी सर्व शाखांतील रक्कम संपली. त्यानंतर बँकेने रांगेतील ग्राहकांना टोकन दिले आहे. मंगळवारी त्यांना रक्कम दिली जाणार आहे.

संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, संचालक मंडळाने बँकेची लूट करुन नऊ लाख १२ हजार ठेवीदारांना संकटात लोटले आहे. बँकेने आठ हजार कोटी रुपये कर्ज वितरण केले असून तीन हजार कोटींहून अधिक रक्कम एचडीआयएल आणि त्यांच्या बेनामी कंपन्यांना कर्ज देण्यात आले आहे. बँकेच्या संचालकांची भाजपशी जवळीक आहे. बँकेवरील कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत आहे. खातेदारांच्या रक्कमेची जबाबदारी संचालकांची असून गैरव्यवहार करणाऱ्या संचालकांवर गुन्हे दाखल करुन त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत. तसेच बँकेतील एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण असल्याने त्याचा उपयोग करुन ठेवीदारांना पैसे द्यावेत. ठेवीदार आणि खातेदारांना दिलासा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. आंदोलनात अभय मोरे, राहुल उदगटे, दीपक कश्यप, अब्दुल मिरशिकारी, तानाजी मोरे, विशाल जगदाळे, अविनाश सकट यांच्यासह ठेवीदार, खातेदार सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’चा पाच जागांसाठीचा आग्रह कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सहभागी होताना शिरोळसह जिल्ह्यातील पाच मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळण्यासाठी दबाव वाढवला जात आहे. संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांच्यासह निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी मध्यरात्रीपर्यंत बैठक झाली. आघाडीतून 'स्वाभिमानी'ला मिळालेल्या जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीतील इच्छुकांनी बंडखोरी करू नये, अशीही चर्चा झाली आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. अजूनही 'स्वाभिमानी'ला कोणते मतदारसंघ मिळणार हे निश्चित नसल्याने इच्छुकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

भाजप, शिवसेनेच्या विरोधात महाआघाडी साकारत आहे. त्यात 'स्वाभिमानी' घटक पक्ष असणार आहे. आघाडीतून त्यांनी शिरोळ, हातकणंगले, चंदगड, शाहूवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी केली आहे. यामुळे आघाडीच्या नेत्यांसमोरील डोकेदुखी वाढली आहे. 'शिरोळ'मधून राष्ट्रवादीकडून राजेंद्र पाटील- यड्रावकर इच्छुक आहेत. ती जागा स्वाभिमानीला गेल्यास ते बंडखोरी करण्याच्या तयारी आहेत. असे झाल्यास 'स्वाभिमानी'चे इच्छुक इतर मतदारसंघात बंडखोरी करतील, असाही सूर निघत आहे. यामुळे संघटनेला मतदारसंघ सोडताना बंडखोरी थोपवण्याचीही अट राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांना घालण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे जागा वाटपासंबंधी नवे पेच निर्माण होत आहेत. दरम्यान, शिरोळमधून माजी खासदार शेट्टी यांनी लढावे, अशीही मागणी होत आहे. सावकर मादनाईक लढणार नसतील, तर रिंगणात उतरण्याच्या तयारीत शेट्टी आहेत. यासंबंधी अजूनही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यांच्यातही लढण्यासंबंधीचा संभ्रम कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या सातारा दौऱ्यात कोल्हापूरच्या उमेदवारीवर तोडगा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उमेदवारी यादी जाहीर होण्यास विलंब होत असल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांची घालमेल वाढली आहे. आघाडीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार कागल, चंदगड, राधानगरी आणि शिरोळ या जागा राष्ट्रवादीला असल्याचे सांगितले जाते. मात्र कागल वगळता इतर तीन मतदारसंघात उमेदवार निवडीवरुन घोळ आहे. दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी (ता. १) सातारा व कराड दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात सातारा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांसह कोल्हापूर जिल्ह्यातील तीन ठिकाणच्या उमेदवारीचा फैसला होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर राधानगरी भुदरगड, चंदगड आणि शिरोळ मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राधानगरी मतदारसंघात माजी आमदार के. पी. पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या दोघांनी उमेदवारी मागितली आहे. जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सोमवारी तुरंबेत मेळावा घेऊन निवडणूक लढविण्याची पुनरूच्चार केला. दोघेही निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्याचवेळी पक्ष जो आदेश देईल तो अंतिम असेल असेही स्पष्ट केले आहे. पवारांच्या कराड दौऱ्यात या दोघांनी बोलावून उमेदवारीवरुन निर्माण झालेला पेच सोडविला जाईल अशी शक्यता आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील की डॉ. नंदिनी बाभूळकर असा नव्याने प्रश्न निर्माण झाला आहे. कुपेकर गटाच्या कार्यकर्त्यांची बुधवारी बैठक होणार असल्याचे सांगितले जाते. शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर निवडणुकीच्या तयारीत आहेत. या मतदारसंघात स्वाभिमानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन ऑक्टोबर रोजी राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्जांची धांदल सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पितृपंधरवडा संपण्याची वाट पाहणाऱ्या इच्छुकांनी सोमवारी उमेदवारी अर्ज नेण्यास प्रारंभ केला. सोमवारी १५० जणांनी २९३ अर्ज नेले. यात आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील यांचा समावेश आहे. राधानगरी, इचलकरंजी आणि शिरोळ विधानसभा मतदार संघात सोमवारी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाले.

सोमवारी आमदार अमल महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार उल्हास पाटील, आमदार हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, जनता दलाचे नेते आणि माजी आमदार श्रीपतराव शिंदे,राधानगरी मतदार संघातून विजयसिंह कृष्णाजी मोरे, 'इचलकरंजी'तून अभिजित खोत, 'शिरोळ'मधून शिवाजी संकपाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज घेतलेल्या प्रमुख इच्छुकांची नावे मतदारसंघ अशी :

चंदगड : नगराध्यक्षा स्वाती महेश कोरी, श्रीपतराव दिनकराव शिंदे, महेश नरसिंगराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर, गंधालीदेवी संग्रामसिंह कुपेकर, अप्पी पाटील, राजेश नरसिंगराव पाटील, सुश्मिता राजेश पाटील, रमेश रेडेकर, सुनीता रमेश रेडेकर, प्रभाकर खांडेकर, गोपाळराव मोतिराम पाटील, अशोक काशिनाथ चराटी, उदयसिंह रामचंद्र चव्हाण. (२७ जणांनी ४० उमेदवारी अर्ज).

राधानगरी : मिलिंद चव्हाण, सलीम खाडे, दीपसिंह आण्णासाहेब नवणे. (१२ जणांनी २९).

कागल : आमदार हसन मुश्रीफ, नविद मुश्रीफ, समरजित घाटगे, नवोदिता घाटगे. (१३ जणांनी ४९).

कोल्हापूर (दक्षिण) : आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, आमदार सतेज पाटील, प्रतिभा सतेज पाटील, ऋतुराज पाटील. (१५ जणांनी ४०).

करवीर : आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके, शैलेजा नरके, पी. एन. पाटील. (१० जणांनी २७).

कोल्हापूर उत्तर : चंद्रकांत जाधव, बंडा साळुंके, सागर चव्हाण, अमित आडसुळे (२० जणांनी २६).

शाहूवाडी : आमदार सत्यजित पाटील, बाबासाहेब पाटील. (७ जणांनी १५).

हातकणंगले : संजय कांबळे, ॲड. इंद्रजित कांबळे, किरण कांबळे, राजू आवळे, संगीता हांडोरे. (१६ जणांनी १९).

इचलकरंजी : माजी मंत्री प्रकाश आवाडे, जि. प. सदस्य राहुल आवाडे.(१४ जणांनी २४).

शिरोळ : आमदार उल्हास पाटील, उज्ज्वला उल्हास पाटील, अनिल मादनाईक, दिलीपराव माने - पाटील, प्रमोद पाटील, जि. प. सदस्य राजवर्धन विठ्ठलराव निंबाळकर. (१६ जणांनी २४).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनसुराज्य’कडून चंदगडमध्ये चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जनसुराज्य शक्ती पक्षाने शाहूवाडी-पन्हाळा, हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला असताना करवीर आणि चंदगडमधूनही उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. दोन्ही मतदारसंघात युती किंवा आघाडीकडून उमेदवारी न मिळालेला नाराज उमेदवार जनसुराज्यमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

भाजप शिवसेना महायुती झाल्यानंतरही शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातून माजी मंत्री व जनसुराज्य पक्षाचे संस्थापक डॉ. विनय कोरे रिंगणात असणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्य मतदारसंघातून उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. जनसुराज्य पक्ष भाजपचा सहयोगी पक्ष असला तरी शाहूवाडी-पन्हाळा व हातकणंगले मतदारसंघातून उमेदवार देणार आहे. हातकणंगले मतदारसंघातून माजी आमदार राजीव आवळे यांच्याबरोबर डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. अविनाश सावर्डेकर तसेच दलितमित्र अशोकराव माने इच्छुक आहेत. करवीर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते प्रदीप पाटील-भुयेकर यांनी जनसुराज्य पक्षाकडून रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. पाटील यांना ऐनवेळी जनसुराज्यची उमेदवारी मिळाल्यास करवीरमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी ३० सप्टेंबर ०००००

$
0
0

शिबीर : सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, छत्रपती शाहू सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआरच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर, स्थळ : ऑडिटेरिअम हॉल, सीपीआर, वेळ : सकाळी ९.३० वा.

कार्यक्रम : अनंतराव कोरगांवकर सामाजिक सेवा संघाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा सत्कार, स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन, वेळ : सकाळी ११ वा.

भजन : शिवाजी चौक तरुण मंडळाच्यावतीने सोंगी भजन स्पर्धेत एल.जी.संगीत सोंगी भजन, स्थळ : शिवाजी चौक, वेळ : रात्री ८ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सूरज साखरेचा साथीदार मुजावरला मुंबईत अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेकायदेशीर सावकारीसह भूखंड माफियांची टोळी म्हणून दहशत निर्माण केलेल्या 'एस एस गँग'चा म्होरक्या संशयित सूरज साखरेच्या साथीदार युनूस हसन मुजावर (वय २८, आराम कॉर्नर, घुडनपीर दर्गा परिसर) याला सापळा रचून पोलिसांनी रविवारी मुंबईत अटक केली. त्याला सोमवारी (ता. ३०) पुणे येथील विशेष मोक्का कोर्टात हजर केले जाणार आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एस एस गँग'चा मुख्य म्होरक्या सूरज हणमंतराव साखरे, त्याचा साथीदार ऋषभ सुनील भालकर, पुष्कराज मुकुंद यादव, धीरज अण्णा नेजकर हे तिघेही कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहेत. या टोळीतील संशयित अभी ऊर्फ युवराज मोहन महाडिक (रा. मंगळवार पेठ), युनूस मुजावर आणि पार्थ (पूर्ण नाव नाही) हे पसार होते. युनूस मुजावर हा चुलत भाऊ शहाबाज अन्वर मुजावर (रा. बिद्रा कर्मशिअल, कॉम्लेक्स, महाकाली रोड जोगेश्वरी, अंधेरी पूर्व मुंबई) यांच्या घरी आल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला समजली. पथकाने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. तो साखरे याच्या सोबत राहून पैसे वसुली करत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. दरम्यान पोलिसांनी सर्व संशयितांच्या घरांवर छापे टाकून सावकारकीतून मिळविलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या खरेदीदस्तांच्या फायली, बँक पासबुके जप्त केली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक पद्मा कदम तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रयतेच्या साक्षीनं साताऱ्याच्या राजांनी भरला अर्ज

$
0
0

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती घेतलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघा बंधूंनी आज एकत्रितरित्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपापले निवडणूक अर्ज दाखल केले. शिवेंद्र यांनी जावळी मतदारसंघातून विधानसभेसाठी अर्ज भरला तर, उदयन यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला.

भाजपवासी झालेल्या या दोन्ही बंधूंनी काही दिवसांपूर्वीच राजीनामे दिले होते. ते आता भाजपकडून निवडणुका लढणार आहेत. या दोघांनी आपल्या हजारो समर्थकांसह आज अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना एकमेकांना पाण्यात पाहणारे शिवेंद्र व उदयन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दिलजमाई झाली आहे. त्याची प्रचिती आज आली. दोन्ही बंधूंनी आपापल्या कार्यकर्त्यांसह एकाच वेळी अर्ज दाखल केले.
<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FChh.UdayanrajeBhonsleOfficial%2Fvideos%2F2654609827934864%2F&show_text=0&width=267" width="267" height="476" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्यानं सातारा जिल्ह्यात उदयन व शिवेंद्र यांच्याबद्दल आकर्षण आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी जिल्ह्यात आपापल्या कार्यकर्त्यांचे जाळेही विणले आहेत. मात्र, पक्षांतर केल्यामुळं काही कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावल्याचे बोलले जाते. सातारा जिल्ह्यानं आजवर नेहमी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. सातारा जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळं गेल्या अनेक निवडणुकांत उदयन व शिवेंद्रराजे सहज निवडून येत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने दोघांच्याही विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अद्याप त्यांच्या विरोधात उमेदवार ठरले नसले तरी त्यांना कडवी लढत द्यायची, असा निश्चय राष्ट्रवादीनं केला आहे. उदयनराजे यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा माजी खासदार श्रीनिवास पाटील हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, तर शिवेंद्रराजे यांना दीपक पवार यांच्या रूपानं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. हे आव्हान ते कसे परतावून लावतात, याविषयी उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून माझं यू-ट्यूबही रडलं'

$
0
0

सातारा: 'पक्ष सोडून जाणार्‍याच्या डोळ्यांत पाणी बघून माझं यू-ट्यूब चॅनेलही रडलं. त्यांच्या अभिनयाबद्दल त्यांना महाआँस्कर द्यायला हवा. १६ संसार सांभाळणाऱ्यांना मला शिव्या घातल्याशिवाय झोप लागत नाही. दूध डेअरी विकणाऱ्यांनी आणि ज्यांना पाण्यातलं काही कळंत नाही, त्यांनी मी मंत्रिपदासाठी पाणी विकले असले आरोप करू नये, अशी बोचरी टीका रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे व खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर केली.

विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

फलटण येथे राजे गटाच्या वतीने आयोजित युवा संवाद मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना रामराजे बोलत होते. 'आज रडीचे राजकारण सुरू आहे व विकासाचे राजकारण मागे पडत आहे. कंपनी ही नोकरीसाठी आणायची असते. दूध डेअरी ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर देण्यासाठी काढायची असते. माणचे आमदार म्हणतात की काय केले? दूध डेअरी काढली ती कशी काढली हे सर्वांना माहिती आहे, मागील ५ वर्षे ज्यांनी टीका केली ते भाजपात गेलेत. त्यांनी ८० कोटी रुपयांचे कर्ज कार्यकर्त्यांच्या नावावर घेतले आहे. सभापतीपद हे कम्पाऊंडच्या आत आहे. मला पद मिळण्यासाठी ही निवडणूक लढवायची नाही. परंतु चुकीच्या प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपणास जिंकायची आहे. जिल्हा व तालुका व मला सुखरूप ठेवायचे असेल तर आपल्याला चूक करून चालणार नाही, विकृत माणसं एकत्र येतात तेव्हा आपल्याला एकत्र राहावे लागणार आहे. आमचं राजकारण त्यागाचं राजकारण आहे.

गेली ३० वर्षे अविरत कष्ट केले आहे. काही जणांना रामराजेंना शिव्या घातल्याशिवाय झोप लागत नाही. हा जिल्हा सुखरूप ठेवायचा असेल तर आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्यांना पाण्यातलं काही कळत नाही. ह्यांच्या हातात हा जिल्हा दिला तर त्यांना ११ तालुके संपवायला एक वर्षही लागणार नाही, अशी भीतीही रामराजे यांनी व्यक्त केली. दीपक चव्हाण यांना मागील दोन वेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, युवा नेते विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपूर, पुण्यातील जागांसाठी शिवसेनेने आग्रह धरला नाही: पाटील

$
0
0

कोल्हापूर: सात ते आठ जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. नागपूर आणि पुणे जिल्ह्यात सर्व जागा भाजपला मिळाल्या आहेत, असं सांगतानाच शिवसेनेनेही या जागांसाठी आग्रह धरला नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. तसेच येत्या ४ ऑक्टोबर रोजीच युतीत कुणाला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चंद्रकांत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भाजप शिवसेना युती झाली असल्याने अनेकजण नाराज झाले आहेत, रडले आहेत, चिडले आहेत. जिवंत माणसंच रियॅक्ट होतात. काहीजण चिडून बंडखोरी करतील, अर्ज दाखल करतील. पण त्यांची पक्षावर श्रध्दा असल्याने सात तारखेपर्यंत सर्व बंडखोर माघार घेतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. १९८२ पासून पुण्याचे माझे नाते असल्याने पुणेकर मला परका मानत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

कोल्हापूरला फक्त भाजपला दोनच जागा मिळाल्या आहेत, यावर चर्चा होते हे बरोबर नाही, अशी खंत व्यक्त त्यांनी व्यक्त केली. ‘युतीमध्ये जागा वाटप करताना फॉर्म्युला ठरला आहे. सात ते आठ जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाही. नागपूर आणि पुणे जिल्ह्यात सर्व जागा भाजपला मिळाल्या आहेत. पण शिवसेनेनेही त्यासाठी आग्रह धरला नाही. जागा वाटपात न्याय अन्याय होत राहतो. सातारा जिल्ह्यात भाजपला आठ पैकी पाच तर सांगली जिल्ह्यात आठ पैकी चार जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहेत. गेल्यावेळी कागल आणि चंदगड मतदार संघात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे या जागा त्यांना मिळाल्या आहेत. कागलमध्ये समरजित घाटगे यांनी चांगली तयारी केली होती हे मला मान्य आहे. त्यांच्यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले. पण आमचे सर्व कार्यकर्ते चांगले असल्याने जागा वाटपाचा निर्णय ते मान्य करतील. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होत्या.

जागा वाटप ४ तारखेला कळेल

शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आहे. दोन्ही पक्षांना जागा किती हे आता सांगता येणार नाही. चार ऑक्टोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, हे स्पष्ट होईल, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले. सात तारखेला राज्यातील सगळे बंडोबा थंड होतील. कोथरूड जितकं मला माहित आहे, तितकं कोणालाच माहीत नाही, मला कोथरूडकर बाहेरचा म्हणणार नाहीत. युतीचा फॉर्म्युला लोकांना कळण्याची गरज नाही. युती झाली हे पुरेसं, असं त्यांनी पुण्यातील कोथरूडमधून उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सांगितलं.

युतीत छोटा भाऊ सेनाच; फक्त १२४ जागा लढणार

भाजपच्या पहिल्या यादीतून खडसे, तावडेंना डच्चू

घोसाळकर मुंबईबाहेर, सावंत वेटींगवर; सेनेची नव्यांना संधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर अर्बन बँकेचा १५ टक्के लाभांश

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची १०६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष उमेश निगडे-देशमुख यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीत झाली. बँकेने सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर केला.

अध्यक्ष निगडे म्हणाले, 'बँकेच्या ठेवीमध्ये ९.६४ टक्के वाढ झाली आहे तर कर्जामध्ये १४.५६ टक्के वाढ झाली. बँकेचा स्वनिधी १३५ कोटी रुपये असून सीआरएआर १८.७१ टक्के इतका अत्यंत भक्कम आहे. बँकेने सर्व तरतुदी करुन १०.६८ कोटी निव्वळ नफा मिळविला. बँकेने मागील १२ वर्षांपासून निव्वळ एनपीए प्रमाण शून्य टक्के ठेवले आहे. ग्रॉस एनपीएचे प्रमाण ६.३५ टक्के राखणेत यश मिळवले आहे.'

यदांच्या अतिवृष्टीमुळे महापुरात नुकसान झालेल्या बँकच्या पूरगस्त सभासदांच्या कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत करण्याच्या निर्णयाबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष कुत्ते यांनी सभेचे नोटीसीचे वाचन केले. मुख्य कार्यरत अधिकारी सुरेश चौगुले यांनी सभेचे विषयवार वाचन केले. सभासद संजय वाघापूरकर, प्रा. रुपा शहा, जनार्दन जाधव, आर. डी. पाटील, सदानंद कवडे, प्रकाश आमते, प्रकाश नाईकनवरे, उदय मिसाळ, रविंद्र गुरव, पोपट मुरगुडे, शिवाजी पाटील, प्रतापसिंह जाधव आदींनी केलेल्या सुचनांचे निरसन केले. इयत्ता १० वी, १२ वीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविलेल्या सभासदांच्या व कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सभेला उपाध्यक्ष राजन भोसले, संचालक नामदेवराव कांबळे, शिवाजीराव कदम, विश्वासराव काटकर, बाबासाहेब मांगुरे, यशवंतराव साळोखे, सुभाष भांबुरे, मधुसूदन सावंत, रविंद्र धर्माधिकारी, सुमित्रा शिंदे, तज्ज्ञ संचालक केदार कुंभोजकर, आबाराव देशमुख, अधिकारी बी. डी. खरोशे

यांच्यासह कमर्शिअल बँकेचे अध्यक्ष राजेंद्र डकरे व संचालक अॅड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेच्या चेअरमन सुलोचना नायकवडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्येयासक्त वृत्तीला सेवाभावाची जोड

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : कॉलेज जीवनात त्या उत्कृष्ट टेबल टेनिसपटू होत्या. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना त्यांनी नृत्याच्या आवडीतून भरतनाट्यममध्ये विशारद पूर्ण केले. एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत पाच वर्षे मल्टी नॅशनल कंपनीत विभागीय व्यवस्थापक म्हणून कामाचा ठसा उमटविला. विवाहानंतर गेल्या २४ वर्षाच्या कालावधीत कोरगावकर कुटुंबीयांचा सामाजिक कार्याचा, विविध संस्थांना मदतीच्या माध्यमातून उभारी देण्याचा वसा चालविताना पल्लवी आशिष कोरगावकर यांनी व्यवसाय, उद्योग, क्रीडा, कला व शिक्षण क्षेत्रात आपल्या कामाने स्वतंत्र ओळख निर्माण केली. ध्येयासक्त वृत्तीने काम करताना इतरांपुढे आदर्श घालून दिला.

ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून समाजातील विविध घटकांसाठी कोरगावकर कार्यरत आहेत. पल्लवी या मूळच्या मध्यप्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथील. १९९७ मध्ये त्यांचा उद्योजक आशिष यांच्याशी विवाह झाला. दलितमित्र अनिल कोरगावकर आणि अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त सुचिता कोरगावकर यांच्या त्या स्नुषा. विवाहानंतर कोल्हापुरात आल्यानंतर, आजेसासरे व कट्टर गांधीवादी कार्यकर्ते प्रभाकरपंत कोरगावकर यांच्या जीवनकार्यांने त्या प्रभावित झाल्या. न्यायप्रिय व दानशूर म्हणून प्रभाकरपंताची ख्याती होती. प्रभाकरपंतांनी 'गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्था' स्थापन करुन आपल्या हिश्श्याची आयुष्यभरातील रक्कम ट्रस्टच्या कामासाठी दिली.

कोरगावकर कुटुंबीय हे परोपकरी व दातृत्वाचा वसा जपणारे. कोल्हापूरच्या विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थेच्याजडणघडणीत कोरगांवकर ट्रस्टचा वाटा आहे. या कुटुबांच्या दातृत्वातून अनेक संस्था उभ्या राहिल्या. परोपकारी व सामाजिक बांधिलकीचा वसा आणि वारसा पल्लवी यांनी पुढे चालविला. उद्योग, व्यवसाय, शिक्षण, सेवाभावी संस्था अशा प्रत्येक ठिकाणी काम करताना त्यांनी व्यवस्थापकीय कौशल्य, सुधारणावादी दृष्टीकोन, समर्पण व कृतीशील विचार या चतुसूत्रीचा अवलंब करत संस्थांना नवा आयाम दिला. सामान्य घटकात नवी उमेद निर्माण केली. या साऱ्या कामात पती आशिष यांच्यासह कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे सहकार्य माझ्यासाठी मोलाची ठरल्याचे त्या कृतज्ञतापूर्वक नमूद करतात.

'फिनिशिंग स्कूल'माध्यमातून युवकांमध्ये सॉफ्ट स्कील

कोल्हापूरच्या परिसरातील मुलांमध्ये टॅलेंट आहे, कष्टाची तयारी आहे. पण बहुतांश वेळेला ही मुले संभाषण कौशल्यात कमी पडतात. इंग्रजी भाषा अवगत नसते. मुलाखतीप्रसंगी स्वतचे योग्य पद्धतीने प्रेझेंट करताना संकोचतात. यामुळे क्षमता असूनही अशा मुलांची संधी डावलली जाते. या मुलांची नेमकी गरज ओळखून त्यांच्यासाठी 'फिनिशिंग स्कूल'सुरू केले आहे. फिनिशिंग स्कूल, कौशल्य सेंटर ऑफ एक्सलेन्सद्वारे युवकांना व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य विकसित केले जाते. या सॉफ्ट स्कीलमुळे दरवर्षी एक हजार युवकांना लाभ मिळत आहे.

टुरिझम, पाणी नियोजनावरही काम

गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्थेत त्या कार्यरत आहेत. संस्थेद्वारे मागासवर्गीय मुलामुलींसाठी होस्टेल्स चालविली जातात. धर्मादाय संस्थेतर्फे हुशार व गरजू मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेतर्फे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र चालविले जाते. कोरगावकर उद्योग समूहाच्या सीईओ, भारतीय उद्योग परिसंघ दक्षिण महाराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्षा, आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा, भारतीय जल संस्था मंडळ कोल्हापूर शाखेच्या उपाध्यक्षा अशा विविध संस्थेच्या उच्च पदावर काम करताना त्यांनी कार्यकक्षा विस्तारल्या. त्यांना टुरिझमची आवड आहे. कोल्हापूरच्या पर्यटन क्षेत्र विस्तारावे यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

लोगो : नवदुर्गा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत महाडिकांचा अर्ज

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मंगळवारी साधेपणाने अर्ज भरला. 'गेल्यावेळी नवखे असलेले महाडिक यावेळी विकासकामांच्या जोरावर दहा हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजय होतील', असा विश्वास प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला. युतीमध्ये जिल्ह्यात भाजपला कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजी हे दोन मतदारसंघ मिळाले आहेत.

पालकमंत्री पाटील मंगळवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. नंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासमवेत ते पक्षाच्या बिंदू चौकातील कार्यालयात आले. यावेळई आमदार अमल महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे स्वागत केले. पालकमंत्री पाटील यांनी महाडिक यांना अर्ज भरण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते पुढील दौऱ्यासाठी जात असताना धनंजय महाडिक यांनी त्यांना अर्ज दाखल करताना उपस्थित राहण्याचा आग्रह केला. तो मान्य करुन पालकमंत्र्याच्या वाहनातूनच आमदार महाडिक अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

पाटील यांच्या उपस्थित महाडिक यांनी करवीर प्रातांधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे अर्ज भरला. आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, गोकुळचे संचालक बाबा देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, भाजप ग्रामीण अध्यक्ष हिंदूराव शेळके यावेळी उपस्थित होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली होती. महापालिकेतील विरोधी पक्षनेते विलास वास्कर, माजी महापौर सुनील कदम, नगरसेवक सत्यजित कदम, ईश्वर परमार, राजाराम गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

विकासकामांच्या जोरावर विजयी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेमुळे जिल्ह्यातील सर्व दहा जागांवर युती विजयी होईल. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून १० हजारांपेक्षा जास्त मतांनी महाडिक विजय मिळवतील. गेल्यावेळी ते नवखे होते. पण पाच वर्षांत त्यांनी विकासकामांसाठी मोठी निधी आणला. मुख्यमंत्र्याजवळून त्यांनी शिताफीने निधी आणला आहे. निश्चितच ते विजयी होतील अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यासाठी मोठा निधी आणला आहे. मतदारसंघात विकासकामे केली आहेत. आणखी काही कामे सुरू आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. मतदारांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने माझा विजय निश्चित आहे.

- अमल महाडिक, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकी रॅलीने कांबळेंचा उमेदवारी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे (भाकप) सतीशचंद्र कांबळे यांनी मंगळवारी दुचाकी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारसंघातून रॅली काढत शक्तिप्रदर्शनाने लक्ष वेधले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला.

बिंदू चौकातून कांबळे यांच्या रॅलीची सुरुवात झाली. उमा पानसरे, नामदेव गावडे, चंद्रकांत यादव, सुभाष जाधव, रघुनाथ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उघड्या जीपमध्ये थांबून कांबळे मतदारांना आवाहन करीत उभे होते. त्यामागे रॅली होती. उमा टॉकिज, शाहू मील, राजारामपुरी मेन रोड, बागल चौक, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, दसरा चौक, दाभोळकर कॉर्नर, सदर बजार, कदमवाडी, कसबा बावडा, आरटीओ कार्यालयमार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. तेथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी शहर आणि जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. वाद्यांचा निनाद, ढोल ताशांचा गजर, पक्षांचे झेंडे अशा उत्साही वातावरणात अर्ज दाखल केले. दक्षिण विधानसभा मतदासंघातील विद्यमान आमदार अमल महाडिक, शाहूवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील, 'करवीर'मधून काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी दक्षिणमधून तर 'इचलकरंजी'तून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपड्यांची बाजारपेठ सजली

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम फॅशनेबल कपड्यातील वैविध्यता, लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन, आणि साड्या, शूटिंग-शर्टिंगवर आकर्षक सवलतींचा वर्षाव यामुळे कोल्हापुरातील कपड्यांची बाजारपेठ सध्या गजबजली आहे. दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर

बाजारपेठ सज्ज झाली आहे. रेडिमेड व फॅशनेबल कपडे खरेदीकडे वाढता कल आहे. ग्राहकांचा हा कल लक्षात घेऊन दुकानदारांनी दालने थाटली आहेत. महाद्वार रोड, शिवाजी रोड, ताराराणी रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, स्टेशन रोडसह विविध भागातील कपड्यांची दुकाने सजली आहेत. सध्या गाजत असलेले सिनेमे आणि वाहिन्यावरील मालिकांचा प्रभावही कापड मार्केटवर दिसत आहे. वेगवेगळ्या मालिकेतील गाजलेल्या व्यक्तिरेखांच्या वेशभूषेची क्रेझ पाहावयास मिळत आहे. गाजलेल्या मालिका आणि त्यातील

व्यक्तिरेखांनी परिधान केलेल्या वेशभूषेची जाहिरात केली आहे. दुकानदारांनी सवलती जाहीर केल्या आहेत. पन्नास टक्क्यापर्यंत सवलत, ठराविक

रकमेच्या खरेदीवर भेटवस्तू अशा ऑफर्स आहेत. सणासुदीला नवीन कपडे खरेदी मोठ्या प्रमाणात होते. लहान मुलांच्या तयार कपडयांच्या बाजारपेठेत यंदाही फॅशन्सची चलती आहे. मुलांच्या कपड्यांचे मार्केट मोठे आहे. दुकानदारांनी लहान मुलांच्या कपडयांचे स्वतंत्र दालनच तयार केले आहे. तरुणांमध्ये जॅकेट आणि फॅन्सी ड्रेसचे आकर्षण आहे. ब्रँन्डेड कपडे व नामवंत कंपन्यांचे जीन्स खरेदी करण्याकडे युवा वर्गाचा कल आहे. विविध डिझाइनमध्ये टी शर्ट आहेत. युवतींमध्ये वर्कमधील चुडीदारचे आकर्षण आहे. महिला वर्गासाठी नऊवारी साड्यांच्या व्हरायटीज आहेत. सिल्क साड्या, पैठणी, वर्क साड्या, फॅन्सी साड्या, कांचीवरम आदी साड्या महिलांना आकर्षित करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला खाली खेचू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

'देशाच्या विकासापेक्षा लोकांच्या भावनेशी खेळणाऱ्या सरकारला खाली खेचण्याशिवाय गत्यंतर नाही,' असा निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांची उमेदवारी मोठ्या शक्तिप्रदर्शनाने दाखल करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेवळी पवार बोलत होते.

पवार म्हणाले, 'राज्यात स्त्रियांना सन्मान नाही, शेतमालाला भाव नाही म्हणून तो आत्महत्या करत आहे. आपण काय विकास केला असे विचारले की सरकारचे प्रतिनिधी ३७० कलम हटवल्याचे सांगतात. काश्मीरमधील सर्वसामान्य जनतेला जगण्याची भ्रांत आहे, तेथील लोकांचे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. जगायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आणि सरकार मात्र आम्ही शांतता निर्माण केल्याचे सांगते. मात्र हे वास्तव नाही.'

विरोध करणाऱ्यांना नाउमेद करण्याचे उद्योग हे सरकार करत असल्याचे सांगून पवार म्हणाले, 'सत्येचा गैरवापर करून विरोधकांना दडपण्याचा कारभार सध्या सुरू आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती लपवली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे आदेश दिले. तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता आयुष्यात कसलाही गुन्हा केलेला नसताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.'

०० ०० ०० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑक्टोबरमध्ये बँकांना११ दिवस सुट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधी जयंती, दसरा दिवाळी या सणांसह साप्ताहिक सुट्ट्या धरुन ऑक्टोबर महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. २१ दिवसच बँकांचे कामकाज चालणार आहे.

बुधवारी (ता.२) गांधी जयंतीची सुट्टी बँकांना राहणार आहे. सहा ऑक्टोबरला रविवार असून, ८ ऑक्टोबरला विजयादशमीची सुट्टी मिळणार आहे. काही बँकांकडून सात ऑक्टोबरला खंडे नवमीची सुट्टी देण्यात आली आहे. १२ तारखेला दुसरा शनिवार, तर १३ तारखेला रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे.

दिवाळी सणावेळी बँकांना सुट्ट्यांचा बोनस मिळणार आहे. २६ तारखेला चौथा शनिवार तर २७ तारखेला रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे. सोमवारी २८ तारखेला दीपावली पाडवा, तर २९ ऑक्टोबरला भाऊबीजेची सुट्टी मिळणार आहे. सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. पण काही बँकांकडून भाऊबीजेच्या दिवशी कामकाज सुरू राहण्याची शक्यता आहे. दसरा आणि दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक ग्राहक ठेवी ठेवत असल्याने काही बँका ठराविक कालावधीसाठी सुरू राहणार आहेत. पण या काळात फक्त ठेवी स्वीकारल्या जाणार आहेत. बँक कामकाज या दिवशी बंद ठेवले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images