Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लाड हे बेकायदेशीरपणे तज्ज्ञ संचालकपदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेची वार्षिक सभा रविवारी, १५ सप्टेंबर रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये होणार आहे. या सभेत तज्ज्ञ संचालक दादा लाड व तथाकथित लाचार आघाडीच्या नेत्यांची आम्हाला भिती नाही. लाड हे सत्तेसाठी तज्ज्ञ संचालक म्हणून बेकायदेशीरपणे पदाला चिकटून बसले आहेत. त्यांचा सभेत निषेध करणार आहे', अशी माहिती संचालक समीर घोरपडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

घोरपडे म्हणाले, 'पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र रानमाळे सेवानिवृत्त झाल्यानंतर विरोधी आघाडीशी हातमिळवणी करून पुढील सत्तेची मोर्चेबांधणी करीत आहेत. लाड आणि रानमाळे यांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले असून त्यांच्या या प्रवृत्तीस विरोध करणार आहे. सभेत लाड यांना बेकायदेशीर हस्तक्षेप टाळण्यासंबंधी उपनिबंधकांनी आदेश दिले आहेत. यामुळे लाड यांनी सभेच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये. सभासदांना कर्जाचा व्याजदर १२ टक्क्यांवरून १० टक्के करावा, सभासद भागभांडवल सरकारी नियमानुसार २० हजारांवरून १ लाख करावे, मयत सभासद कल्याण निधी योजनेतील सभासद हिस्सा परत करावा, पात्र असलेल्यांचे सभासदत्व पूर्वग्रहदूषितरित्या रद्द करू नये.' पत्रकार परिषदेस संदीप पाटील, शहाजी पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टीपी, केएमटीच्या कारभारावर ताशेरे

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आस्थापना खर्चात ५३ कोटी ४० लाखांची वाढ होणार आहे. विकासकामांपेक्षा १६ टक्के खर्च जादा होणार आहे. महापालिका ही कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आहे की विकासकामांसाठी, असा प्रश्न उपस्थित करत सेवा देणारे नगररचना (टीपी) व केएमटी विभागाचे कर्मचारी कामाशी बांधील आहेत का? संकटकाळी लपून बसणारे कर्मचारी शहरवासियांची पिळवणूक करत आहेत,' असा आरोप करत शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत नगरसेवकांनी टीपी व केएमटी कर्मचाऱ्यांचे वाभाडे काढले. सभेच्या अध्यक्षस्थांनी महापौर माधवी गवंडी होत्या. महालेखापाल संजय सरनाईक यांनी वेतन आयोग लागू झाल्यानंतर निर्माण होणारा आर्थिक लेखाजोखा सभागृहात मांडला. कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत केएमटी प्रशासनाने प्रस्तावच तयार न केल्याने उपमहापौर भूपाल शेटे चांगलेच संतप्त झाले. गटनेते सत्यजित कदम म्हणाले, 'स्कूल बोर्ड व केएमटी कर्मचाऱ्यांचा वेतन आयोगात समावेश करा. कर्मचाऱ्यांपेक्षा नगरसेवक जास्त काम करतात. जुने 'डॉक्टर' असते, तर सर्वांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले असते,' असा टोला तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे नाव न घेता लगावला.

अशोक जाधव म्हणाले, 'आर्थिक बाजू भक्कम असल्याशिवाय वेतन आयोग लागू करत नाहीत. बाजू भक्कम करण्यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या? अनेक अधिकारी, कर्मचारी घडाळ्याकडे पाहून काम करतात. पूरस्थितीत अनेक कर्मचारी लपून बसले, ते नंतर उगवले. महापालिकेच्या मेहरबानीवर केएमटी किती दिवस चालणार. फुकट ८० बसेस मिळूनही केएमटी तोट्यात का? पार्ट्यांसाठी ३०-३० चालक, वाहक रजेवर अचानक जातात. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. तसेच त्यांना सहजासहजी वेतन आयोग लागू करु नका.' नियाज खान म्हणाले, 'केएमटीला प्रादेशिक परिवहन खात्याचे पाठबळ मिळत नाही. त्यामुळेच वडापची संख्या वाढत आहे. केएमटीच्या १५ पार्किंगच्या जागांच्या निविदा प्रसिद्ध केल्या, मात्र निविदेमध्ये दहा टक्के वाढ केल्याने सर्व निविदा फेल झाल्या. अनेक स्टॉपवर वडापच्या गाड्या उभ्या असतात, पण कर्मचारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत. '

प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'केएमटीला आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीत बदल होईल का? टीपीकडे आयुक्तांचे दुर्लक्ष झाले असून त्यांच्याकडे अनेक फायली प्रलंबित आहेत. त्यासाठी कँप का लावला जात नाही. पर्यटन हंगामामध्ये केएमटीचे चालक रजा टाकून जातात. त्यासाठी त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला पाहिजे. केवळ स्वच्छता म्हणजे विकास नव्हे.' रत्नेश शिरोळकर म्हणाले, 'खर्चाची बाजू वाढत असताना जमेची बाजू अनिश्चित आहे. नगरसेवकांना स्वनिधी वाढवून मिळत नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.' चर्चेत भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, रुपाराणी निकम, शेखर कुसाळे, विजय खाडे-पाटील यांनी भाग घेत उत्पन्नवाढीच्या विविध उपाययोजना सुचवल्या.

.........

चौकट

शहरात निवारा मिळत नाही - भोपळे

सभागृहात काही ठराविक नगरसेवक बोलतात. त्यामुळे इतरांना बोलण्याची संधी मिळत नाही, अशी खदखद व्यक्त करत बोलायला देणार नसालल, तर स्लिपिंग कोच आणून द्या, अशी मागणी करत कमलाकर भोपळे यांनी टीपी विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. 'शहरात अन्न, वस्त्र मिळते, पण टीपीच्या कारभारामुळे निवारा मिळत नाही. टीपी म्हणजे टेंपल असून नारायण भोसलेंकडे प्रथम कौल लावावा लागतो. नंतर एडीटीपी कौल देतात. अधिकाऱ्यांच्या वृत्तीमुळे नागरिकांची पिळवणूक होत आहे.'

......

विकासकामावर परिणाम होण्याची भीती

नगरसेवकांना दरवर्षी विकासकामांसाठी पाच ते सात लाखांचा निधी मिळतो. अपुऱ्या निधीमुळे विकासकामे करण्यावर अनेक मर्यादा येत आहेत. त्यामुळे अनेकदा नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागते. काही नगरसेवकांनी याबाबत सभागृहात सखोल माहिती दिली. नगरसेवकांबाबत अशी वस्तुस्थिती असताना वेतन आयोगामुळे अस्थापना खर्चात आणखी वाढ होणार असून वाढीव खर्चामुळे विकासकामांवर परिणाम होणार असल्याची भीती अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार उदयनराजे भोसलेआज दिल्ली करणार भाजपप्रवेश

$
0
0

खासदार उदयनराजे भोसले

आज दिल्ली करणार भाजपप्रवेश

म. टा. वृत्तसेवा, सातारा

साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आज, शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती उदयनराजे भोसले यांनी ट्विट करून दिली आहे. खुद्द उदयनराजेंनीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिल्यामुळे सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशांच्या निर्णयाचा मोठा धक्का राष्ट्रवादी कॉँग्रेसला बसला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. 'सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मला भाजपमध्ये जावे लागत आहे, तुमच्या विषयी माझ्या मनात सदैव आदर असेल, तुमचे आशीर्वाद असू द्या,' असे म्हणून उदयनराजे यांनी पवारांचा निरोप घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देण्याच्या मनस्थितीत असलेल्या उदयनराजे भोसले यांची दस्तुरखुद्द शरद पवारांनी पुण्यात भेट घेऊन दोन तास चर्चा केली. या भेटीमध्ये उदयनराजेंची समजूत घालण्यात शरद पवार यशस्वी झाल्याची चर्चा रंगली होती. बैठकी वेळी पवारांसोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि साताऱ्यातील आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. उदयनराजे भोसले यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात उत्सुकता होती. भाजपमध्ये प्रवेश करायचा की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे? या बाबत त्यांनी समर्थकांशी चर्चा केली होती. अखेर त्यांनी भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

.............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामराजेंचा कार्यकर्ता मेळावाकोणत्याही निर्णयाशिवाय संपला

$
0
0

रामराजेंचा कार्यकर्ता मेळावा

कोणत्याही निर्णयाशिवाय संपला

सातारा

गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीला रामराम करून, शिवसेनेच्या शामियान्यात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण, त्यांच्या पक्ष सोडण्याची आणि शिवसेना प्रवेशाची निव्वळ चर्चाच सुरू आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

निंबाळकर यांनी शुक्रवारी फलटणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यात रामराजे नाईक-निंबाळकर पक्ष सोडण्याची घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. पण, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी आलो आहे, असे सांगणाऱ्या नाईक-निंबाळकर यांचा कार्यकर्ता मेळावा कोणत्याही निर्णयाशिवाय संपला. त्यामुळे रामराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेणार, या विषयी उत्सुकता ताणली गेली आहे.

रामराजे निंबाळकर म्हणाले, 'आमचे हिरो देवानंद, अमिताभ बच्चन नव्हते तर, शरद पवार होते. आता मला फक्त शरद पवार यांना न दुखावता तुमचे मन राखायचे आहे. आमची पार्टी शरद पवारच होते. राष्ट्रवादी नव्हे, मी त्यांच्याविषयी काहीच बोलणार नाही. त्यांच्याबद्दल कायम आदर राहील. मुळात मला कोणीही अस्वस्थ करू शकत नाही. मध्यंतरी माझी २५ वर्षांची कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या मनात कुठल्या पार्टीत जायचे? राष्ट्रवादी सोडायची का? हे जाणून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे.'

मेळाव्याला आमदार शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील लोकही आले आहेत, असा उल्लेख रामराजे निंबाळकर यांनी केला. 'राजकारण जर करायचे असेल आणि तरुण पिढीच्या इच्छा आकांशा जाणून घेतल्या पाहिजेत. अन्यथा आपला काही उपयोग नाही. हल्ली राजकारणाचेच मार्केटिंग झाले आहे. मला कोणावर टीका करायची नाही. मी माझा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला बोलावले आहे. मला तुमच्याकडून एक निर्णय हवा आहे. विकास कामाला खरंच मत मिळतात का?, असा प्रश्न ही निंबाळकर यांनी मेळाव्यात उपस्थित केला.

शिवेंद्रसिंहराजे सोडले तर औद्योगिकीकरण बाबत जिल्ह्यातील कोणीही लोकप्रतिनिधी बोलत नाही, असे सांगत त्यांनी शिवेंद्रसिंह राजेंचे कौतुक केले. 'सध्या नुसती जत्रा भरली आहे. महामेळावा, महाभरती, असे शब्द वापरले जात आहेत. जायचीच वेळ आली तर तरुण पिढीचा विचार करून जावे लागेल. पण वेळ आली तर, माझ्या हातून झाले तर तुमचे सोनंच होईल, कोळसा होऊ देणार नाही,' असा विश्वास ही कार्यकर्त्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्च ध्वनीयंत्रणेला फाटा

$
0
0

उच्च ध्वनीयंत्रणेला फाटा

टीम मटा, पुणे

सांगली, मिरज, कराड, सातारा आणि सोलापुरात पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उच्च ध्वनीयंत्रणेला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. उच्च ध्वनी यंत्रणेच्या जागी ढोल, ताशे व लेझीम, टाळ-मृदंग तसेच धनगरी ढोल-खैताळांनी गजर केला. सांगली, मिरज, कराड आणि साताऱ्यातील विसर्जन मिरवणुकीवर महापुराची गडद छाया दिसून आली. अनेक गणेश मंडळांनी साधेपणाने विसर्जन मिरवणुका काढल्या.

कराडमध्ये ढोल ताशांचा गजर

कराड :

कराड शहरासह ग्रामीण भागांतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणुकांना गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी अकरा वाजता पासून प्रारंभ करण्यात आला. विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांकडून उच्च ध्वनीयंत्रणेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना पसंती देत, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गेल्या अकरा दिवसांपासून घराघरांत, चौकाचौकांत विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चा करून त्याच्या भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या गणेशभक्तांनी भक्तिमय वातावरणात पारंपरीक पद्धतीने निरोप दिला. संपूर्ण गणेशोत्सव काळात व विसर्जन मिरवणुकी वेळी उच्च ध्वनी यंत्रणेचा वापर करू नये, या पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिल्याने ढोल, ताशे व लेझीम, टाळ-मृदंग तसेच धनगरी ढोल-खैताळांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. विसर्जन मिरवणुकीत लोकप्रतिनिधींनीही सहभाग नोंदवल्याने गणेशभक्तांचा उत्साह दुणावला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडमध्ये विसर्जनावेळीबुडून दोघांचा मृत्यू

$
0
0

कराडमध्ये विसर्जनावेळी

बुडून दोघांचा मृत्यू

कराड :

कराड तालुक्यातील मालखेड व आगाशिवनगर येथील दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत दोन युवकांचा गणेश विसर्जनावेळी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. मालखेड (ता. कराड) येथे गणपती विसर्जना दरम्यान कृष्णा नदीत तीन युवक बुडल्याची घटना घडली. मात्र, यातील दोघांना वाचवण्यात यश आले. त्यातील एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव अनिरुद्ध संजय मोहिते (वय १९, रा. बेलवडे बुद्रुक ता. कराड) असे आहे. या घटनेतील योगेश अजित मोहिते व प्रज्वल राजेंद्र सुतार (दोघेही रा. बेलवडे बुद्रुक) यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बेलवडे बुद्रुक येथील काही युवक गणपती विसर्जनासाठी मालखेड येथील कृष्णा नदी पात्रामध्ये गेले होते. या वेळी तेथील विष्णू-लक्ष्मी मंदिरानजीकच्या कृष्णा घाटावरती सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जनादरम्यान अनिरुद्ध संजय मोहिते, योगेश अजित मोहिते व प्रज्वल राजेंद्र सुतार हे तिघे पाण्याच्या तीव्र प्रवाहाबरोबर वाहत चालल्याचे अन्य युवकांच्या निदर्शनास आले. या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या युवकांसह मालखेड येथील स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यातील योगेश मोहिते व प्रज्वल सुतार या दोघांना वाचवण्यात यश आले. मात्र, नदीत पाणी जास्त असल्यामुळे अनिरुद्ध मोहिते याचा बराच वेळ ठाव न लागल्याने, तसेच तो प्रवाहाबरोबर खोलवर वाहत गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दोन तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर अनिरुद्धचा मृतदेह हाती लागला.

दुसरी घटना आगाशिवनगर येथे घडली. कोयना नदी पात्रात घरगुती गणेशाचे विसर्जन करताना युवक वाहून गेल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र वाहून गेलेल्या युवकाचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. विसर्जन करून माघरी येत असताना नदीपात्रात पाय घसरल्याने चेतन काका शिंदे (वय २१,रा. दत्त मंदिरानजीक, आगाशिवनगर) हा नदीच्या पाण्यात वाहून गेला. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्याचे शोध कार्य सुरू केले असून, पोलिस व प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र, त्याचा अद्यापही थांग लागलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिमाखदार मिरवणुकीने उत्सवाची सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आनंद, उत्साह आणि चैतन्याने भारलेल्या मंगलमयी उत्सवाची पारंपरिक आणि दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास सांगता झाली. पारंपरिक वाद्ये आणि डीजेचा आवाज गुरुवारी घुमला असला, तरी शुक्रवारी सकाळपासून पोलिसांच्या 'दे धक्का'मुळे अनेक वर्षांनी मिरवणुकीचा कालावधी एका तासाने कमी झाला. पावसाच्या हलक्या सरींच्या उपस्थितीत अन् कोणताही अनुचित प्रकार न घडता अतिशय शांततेत 'पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात साडेपंचवीस तासांनी बाप्पाला निरोप दिला गेला. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची आरती झाल्यानंतर शहरातील पारंपरिक विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली.

बैल उधळले

पुणे : लक्ष्मी रस्त्यावर ऐन मिरवणुकीत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या रथाचे बैल उधळल्याने नागरिकांची पळापळ झाली. बैलांनी सैरभैर होऊन नागरिकांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याने झालेल्या धावपळीत काही जण किरकोळ जखमीही झाले. बऱ्याच कालावधीनंतर बैलांवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने अनर्थ टळला. रथ ओढणाऱ्या बैल जोडीवर सतत पडणाऱ्या लाइट्समुळे त्यांचा ताबा सुटून ते उधळले. बॅरिकेड्स तोडून बैलांनी नागरिकांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या मुळे रथाची चाकेही वळली परंतु, काही कार्यकर्ते आणि बैलांच्या मालकांनी बैलांना नियंत्रणात आणून पुन्हा मिरवणुकीच्या रस्त्यावर उभे केले.

उच्च ध्वनीयंत्रणेला फाटा

कोल्हापूर : सांगली, मिरज, कराड, सातारा आणि सोलापुरात पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उच्च ध्वनीयंत्रणेला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. उच्च ध्वनी यंत्रणेच्या जागी ढोल, ताशे व लेझीम, टाळ-मृदंग तसेच धनगरी ढोल-खैताळांनी गजर केला. सांगली, मिरज, कराड आणि साताऱ्यातील विसर्जन मिरवणुकीवर महापुराची गडद छाया दिसून आली. अनेक गणेश मंडळांनी साधेपणाने विसर्जन मिरवणुका काढल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात बाप्पाला जल्लोषात निरोप

$
0
0

सोलापुरात बाप्पाला जल्लोषात निरोप

सोलापूर :

गेल्या अकरा दिवसांपासून चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी विसर्जन मिरवणुकीने झाली. उच्च ध्वनी यंत्रणेला फाटा देत, हलग्यांचा कडकडाट, ढोल ताशांच्या गजरात, लेझीमचा बहारदार खेळ, संगीताच्या तालावर टिपऱ्या अन् नाशिक ढोलचा ताल आणि गुलालाची मुक्तहस्ते उधळण करीत गणपती बाप्पा मोरया.., पुढच्या वर्षी लवकर या..,च्या गजरात शहरातील आठही मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला उत्साहात निरोप दिला. गणपती घाट, विष्णू घाट, संभाजी तलाव, नवले विहीर आदी ठिकाणी गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

लोकमान्य मध्यवर्ती, सार्वजनिक मध्यवर्ती, पूर्व विभाग, लष्कर, विजापूर रोड, होटगी रोड, विडी घरकूल आणि हैद्राबाद रोड मध्यवर्ती मंडळांच्या स्वतंत्र विसर्जन मिरवणुका निघाल्या. सकाळपासूनच गणेशभक्तांचा उत्साह संचारला होता. त्यातच दुपारी उत्साहात अधिकच भर पडला. मानाचा आजोबा गणपती, पणजोबा गणपती आणि ताता गणपतीची पूजा झाल्यानंतर सार्वजनिक लोकमान्य आणि पूर्व विभागाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक मार्गावर आणि कंबर तलाव, गणपती घाट, विष्णू घाट येथे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक मार्गावर कुठला अडथळा येऊ नये यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, वायरमन मार्गावर ठाण मांडून बसले होते. मनपा प्रशासनाने ही जय्यत तयारी ठेवली होती. जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणाही कामाला लावली होती. एकूणच मिरवणूक शांततेत पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यात ट्रॅव्हल-ट्रकच्या अपघात सहा ठार

$
0
0

साताऱ्यात ट्रॅव्हल-ट्रकच्या अपघात सहा ठार

म. टा. वृत्तसेवा, सातारा

पुणे-बेंगळुरू महामार्गावर म्हसवे-लिंब गावाच्या हद्दीवर डी-मार्टसमोर खासगी लक्झरी बस व ट्रक यांचा भीषण अपघात होऊन सहा जण जागीच ठार झाले, तर वीस जण गंभीर जखमी झाले. ही घटना पहाटे साडेपाचच्या दरम्यान झाल्याचे सांगण्यात येते. कर्नाटककडे जाणाऱ्या एसआरएस ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने ट्रकच्या मागील बाजूस धडकल्याने हा भीषण अपघात घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले असून, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्ग पावसाने खराब झाला आहे. आनेवाडी टोलनाका-काशीळ या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला होता. पुण्यावरुन कर्नाटककडे जाणारी एसआरएस ट्रॅव्हल्सची खाजगी बस पहाटे लिंब खिंड ओलांडून कराडच्या दिशेने जात होती. ट्रॅव्हल्सचा वेग जास्त होता, त्यामुळे पुढे असणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स मागील बाजूने जोरदार धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, चालकाच्या केबिनसह त्याच्या मागील दोन तीन आसनाचा भाग तुटला आहे. मृत झालेल्या सहा जणांमध्ये चालकाचा समावेश आहे. वीस प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. डॉ. सचिन गौड पाटील, विश्‍वनाथ गड्डी, गुड्डु तुकाराम गावडे, अशोक रामचंद्र जुनघरे, अब्बस अल्ली काटकी, यांचा मृत्यू झाला आहे. अन्य एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातात एसआरएस कंपनीची ट्रव्हल्स के. ए. ०१ एएक ९५०६ या बसचा चक्काचूर झाला.

............

साताऱ्यात कृत्रिम तलावात विसर्जन

सातारा :

सातारा शहर व परिसरातील शेकडो सार्वजनिक मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. जिल्ह्यात नोंद झालेल्या ३ हजार ६८० मंडळांचे तर ९० हजारांहून अधिक घरगुती गणपती विसर्जन करण्यात आले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली व शुक्रवारी सकाळी पाच वाजता शंकर पार्वतीच्या रुपातील मूर्तीच्या विसर्जनाने या मिरवणुकीची सांगता झाली. सदाशिव पेठेतील मानाच्या सम्राट महागणपती मंडळाची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाल्यानंतर शहरातील मानाचे व मोठे असणारे मोती चौकातील प्रतापसिंह मंडळ, पंचमुखी मंडळ, मयूर सोशल क्लब आदी मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन मिरवणुकीने झाले. शुक्रवारी

सकाळी मानाच्या पाच गणपतीनंतर शंकर पार्वती गणेशाचे तलावात विसर्जन होऊन या मिरवणुकीची सांगता झाली. रात्री बारा नंतर मिरवणुकीतील वाद्ये थांबवण्यात आली होती. मिरवणुकीत उच्च ध्वनी यंत्रणेला परवानगी न मुळे विविध ढोल व बेंजो पथकांचा सहभाग दिसून येत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फलटण पोलिसांची गणेशभक्तांना मारहाण

$
0
0

फलटण पोलिसांची गणेशभक्तांना मारहाण

सातारा

फलटणमध्ये विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केल्याने महिला, लहान मुले व युवक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांच्या या अमानुष लाठीमाराचा गणेश मंडळांनी निषेध केला आहे. गजानन चौक येथे बैठक घेऊन संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

शहरातील मोठ्या गणेश मंडळाची मिरवणूक गजानन चौक, जबरेश्वर मंदिर व राम मंदिर, श्रीराम चौकी येथून निघते. या वेळी मिरवणूक बघण्यासाठी फलटण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जबरेश्वर मंदिर येथे दगडीचाळ व अमरज्योती गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींची मिरवणूक सुरू होती. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा व बँकेच्या समोर नागरिक मिरवणूक बघण्यासाठी थांबले होते. या वेळी अचानक उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व पोलिस निरीक्षक प्रताप पोमन, पोलिस उपनिरीक्षक दळवी यांच्यासह ६० ते ७० पोलिसांनी मिरवणूक बघणाऱ्या नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक लाठीमार होत लहान मुले, महिला व पुरुष तसेच वयोवृद्ध नागरिकांची धांदल उडाली, चेंगराचेंगरी झाली. काही नागरिकांनी चेंगराचेंगरीत खाली पडलेल्यांना उचलून बाजूला केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांकडून मारहाण करण्यात आलेल्या ठिकाणी चप्पल व बुटांचा मोठा खच पडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील ८३५ घरांची पडझड

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

पूरबाधित क्षेत्रातील इमारती निवासायोग्य असल्याची खातरजमा करण्यासाठी करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून शहरातील ८३५ घरांची पडझड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरामुळे शहरवासियांचे एक कोटी ५४ लाख ३१ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानीचा अहवाल महापालिका प्रशासनाने महसूल विभागाला सादर केला आहे. अहवाल राज्य सरकारला सादर केल्यानंतर नुकसानग्रस्तांना तीन हजारापासून ९५ हजारांपर्यंत नुकसान मिळणार आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर महापुराने निम्म्या शहराला वेढा दिला. दहा ते १२ दिवस पाण्याने दिलेल्या वेढ्यात अनेक इमारती होत्या. अनेक दिवस इमारती पाण्यात असल्याने अशा इमारती निवासायोग्य असल्याची खात्री करण्यासाठी २६ ऑगस्टपासून स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात केली होती. स्ट्रक्चरल ऑडिट असोसिएशन, पाच इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने विभागीय कार्यालयाच्या उपशहर अभियंत्याच्या नेतृत्वाखाळी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. शनिवारी (ता. ७) महापालिकेच्यावतीने ऑडिटचे काम पूर्ण करण्यात आले असून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

इमारती अनेक दिवस पाण्यात राहिल्याने काँक्रिट, दगड, वीटा निखळू शकतात. तसेच बहुमजली इमारती लोड बेरिंगवर असल्याने भार सोसू शकतात का, किंवा इमारतींचा अशंत: (१५ टक्के) भाग कोसळलेला असल्यास उर्वरीत इमारत भार पेलू शकते का, याची तपासणी स्ट्रक्चरल ऑडिटच्या माध्यमातून करण्यात आली. त्यानुसार ८३५ घरांची पडझड झाली असून १३८ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. तसेच १७७ इमारती निवासायोग्य नसल्याचे अहवाल नमूद केले आहे. तपासणीनंतर इमारतींची डागडुजी अथवा उतरवून घेण्याची सूचना महापालिका प्रशासनाने संबंधीत मिळकतदारांना केली आहे. त्याचबरोबर नुकसानीचा अहवाल जिल्हा महसूल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. अहवालानुसार शहरातील ८३५ घरांचे एक कोटी ५४ लाखांचे नुकसान झाले आहे. अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारला सादर केल्यानंतर नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

...

चौकट

१३८

पूर्ण पडलेली घरे

३०

पूर्ण पडलेल्या झोपड्या

पक्क्या स्वरुपाची किरकोळ पडझड

६६८

कच्च्या घरांची किरकोळ पडझड

एक कोटी ५४ लाख

एकूण नुकसान

...

मिळणारे नुकसान रूपयांत

९५,१००

पूर्ण पडलेले घर

४,९००

पूर्ण पडलेली झोपडी

५,२००

पक्के घर किरकोळ नुकसान

३,२००

कच्चे घर किरकोळ नुकसान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंगरोड दुरुस्तीसाठी आमदार महाडिकांचे उपोषण

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा साई मंदिर ते फुलेवाडी रिंगरोडच्या दुरुस्तीसाठी महापालिकेतील सत्तारुढ आघाडी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत दक्षिण मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी शुक्रवारी सकाळपासून उपोषण सुरू केले होते. महापालिका प्रशासनाकडून आश्वासनासह स्ट्रीट लाइटच्या कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले. दरम्यान, 'विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदारांनी उपोषणाला सुरुवात केली आहे,' असा आरोप स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

रिंगरोड रस्त्यासाठी २०११-१२ मध्ये नगरोत्थान योजनेतंर्गत १०७ कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार महाडिक यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असल्याने कधी थेट पाइपलाइनचे काम तर कधी आचारसंहितेचे काम म्हणून रस्त्याच्या कामाला जाणिवपूर्वक दिरंगाई केली. प्रशासन आणि सत्तारुढ आघाडी जाणिवपूर्वक काम करत नसल्याने महाडिक यांनी शुक्रवारपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेत स्थानिक रहिवशांसह गंगाई लॉन परिसरात उपोषण सुरू केले. दिवसभर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते. पण लेखी आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर रात्री उशीरा अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी घटनास्थळी भेट घेवून रस्ता कामासाठी मिळत नसलेले ठेकेदार, अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या महापुराची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत त्यांच्यांशी सविस्तर चर्चा केली.

'रिंगरोडवरील पाणी गळती काढण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. स्ट्रीट लाइटच्या कामाला त्वरीत सुरुवात केली आहे. तसेच रहदारीला उपयुक्त होईल असा रस्ता तयार करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले,' त्यामुळे उपोषण स्थगित करत असल्याचे आमदार महाडिक यांनी सांगितले.

उपोषणामध्ये विजय देसाई, संजय सावंत, अशोक देसाई, अमोल माने, राजू जाधव, कुलदीप सावरतकर, भाऊ कुंभार, संजय माने, सुनील वाडकर, संतोष माळी, माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह स्थानिक रहिवासी सहभागी झाले.

...

चौकट

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उपोषण

'रिंगरोडचे काम २४ मे रोजी निर्माण कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. निविदा मंजूर झाल्यानंतर त्वरीत कामाला सुरुवात झाली. मात्र अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे ठेकेदाराला काम करता आले नाही. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा कामास सुरुवात करण्याची सूचना बुधवारी (ता.११) संबंधित ठेकेदाराला दिली आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबतची माहिती न घेता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार उपोषणाला बसले आहेत. यापूर्वी रस्त्याचे काम व्हीयूबी कंपनीला दिले होते. पण आमदारांच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या ठेकेदाराला केलेल्या मारहाणीमुळे ते काम सोडून गेले. त्यामुळे दीड वर्षापासून काम प्रलंबित राहिले असून त्याचा चार कोटीचा फटका महापालिकेला बसला आहे', असा आरोप स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रभागेत एका बुडाला

$
0
0

चंद्रभागेत एका बुडाला

पंढरपूर :

श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी गेलेले दोन तरुण जुन्या दगडी पुलाजवळ बुडाले होते. यातील एकाला येथील नागरिकांनी वाचविले, तर दुसरा तरुण वाहून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. बुरुड गल्लीतील तरुण जयवंत मोरे व दिनेश साळुंखे हे गणेश विसर्जनासाठी भीमा नदीवरील जुना दगडी पूल येथे गेले होते. या वेळी तोल जावून ते नदीत पडले. जयवंत मोरे वाहून गेला, तर दिनेश साळुंखे याला नागरिकांनी वाचविले. बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आज अपुरा पाणीपुरवठा

$
0
0

कोल्हापूर

बालिंगा पंपिंग स्टेशनमधील विद्युत पंपामध्ये बिघाड झाल्याने शनिवारी शहरात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. तर शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीला लागलेली गळती दूर करण्यासाठी सोमवारी (ता. १६) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्ती कालावधीत दोन दिवस ए, बी, व 'ई' वार्डाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा अपुऱ्या दाबाने होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिले आहे. पत्रकात म्हटले आहे, 'बालिंगा पंपिंग स्टेशनमधील तीन पैकी एका विद्युतपंपामध्ये बिघाड झाल्याने दोन पंपांद्वारे उपसा सुरू आहे. गुरुवारी विद्युतपंपामध्ये झालेला बिघाड दूर करण्यास सुरुवात केली असली, तरी अद्याप पूर्ण दुरुस्ती झालेली नाही. परिणामी शनिवारी सी व डी वॉर्डात अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीला लागलेली गळती दूर करण्यासाठी सोमवारी व मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धक्कादायक! गणेश विसर्जन मिरवणुकीत बारबाला नाचवल्या

$
0
0

पंढरपूरः अनंत चतुदर्शीच्या दिवशी राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. मात्र, सांगोल्यातील एका गणेश विसर्जन मिरवणुकीत बारबाला नाचवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगोल्यातील अचकदाणी गावाजवळ असलेल्या एका वस्तीत विसर्जन मिरवणुकीत बारबाला नाचवल्याचा प्रकार घडला. सोशल मीडियामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची काही माहिती आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अचकदाणीमधील एका वस्तीवर गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीवर या बारबालांना नाचवण्यात आले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षीही घेर्डी या गावात असाच प्रकार घडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उदयनराजेंविरुद्ध लढलेले नरेंद्र पाटील पवारभेटीला!

$
0
0

सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश होत असतानाच माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. माथाडी कायद्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमची त्यांच्याशी पूर्वनियोजित भेट ठरली होती. त्यानुसार ही भेट घेतल्याचे ते म्हणत असले तरी सध्याच्या राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी उदयनराजेंविरोधात लोकसभेची निवडणूक लढवून तब्बल ४ लाख ४६ हजारांवर मते घेतली होती.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता या जागेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच घेण्यात येईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राजकिय हालचालींना वेग आला आहे. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकताही ताणली गेली आहे.

सध्यातरी राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची नावे घेतली जात आहे. यासोबतच आघाडीचा उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचाही उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून विचार होऊ शकतो. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

सातारची जागा शिवसेनेच्या वाट्याची!

नरेंद्र पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, माथाडी कायद्याला ५० वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने शरद पवार यांच्याशी आमची भेट घेण्याचे ठरले होते. त्यानुसार ही भेट झाली. उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन आज भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्याचा आणि या भेटीचा काहीही संबंध नाही. हा केवळ योगायोग आहे, असे पाटील म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांचा विश्वासू माणूस आहे. त्यामुळे मी कशाला गडबड करू, असे नमूद करत साताऱ्याच्या जागेचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. साताऱ्याची जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे. उद्या निवडणूक लागली तर कोणत्या चिन्हावर ही निवडणूक लढविली जाईल, हे नेतेच ठरवतील, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात ट्रॅव्हल-ट्रकच्या अपघात सहा ठार

$
0
0

साताऱ्यात ट्रॅव्हल-ट्रकच्या अपघात सहा ठार

म. टा. वृत्तसेवा, सातारा

पुणे-बेंगळुरू महामार्गावर म्हसवे-लिंब गावाच्या हद्दीवर डी-मार्टसमोर खासगी लक्झरी बस व ट्रक यांचा भीषण अपघात होऊन सहा जण जागीच ठार झाले, तर वीस जण गंभीर जखमी झाले. ही घटना पहाटे साडेपाचच्या दरम्यान झाल्याचे सांगण्यात येते. कर्नाटककडे जाणाऱ्या एसआरएस ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने ट्रकच्या मागील बाजूस धडकल्याने हा भीषण अपघात घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले असून, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्ग पावसाने खराब झाला आहे. आनेवाडी टोलनाका-काशीळ या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला होता. पुण्यावरुन कर्नाटककडे जाणारी एसआरएस ट्रॅव्हल्सची खाजगी बस पहाटे लिंब खिंड ओलांडून कराडच्या दिशेने जात होती. ट्रॅव्हल्सचा वेग जास्त होता, त्यामुळे पुढे असणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स मागील बाजूने जोरदार धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, चालकाच्या केबिनसह त्याच्या मागील दोन तीन आसनाचा भाग तुटला आहे. मृत झालेल्या सहा जणांमध्ये चालकाचा समावेश आहे. वीस प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. डॉ. सचिन गौड पाटील, विश्‍वनाथ गड्डी, गुड्डु तुकाराम गावडे, अशोक रामचंद्र जुनघरे, अब्बस अल्ली काटकी, यांचा मृत्यू झाला आहे. अन्य एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातात एसआरएस कंपनीची ट्रव्हल्स के. ए. ०१ एएक ९५०६ या बसचा चक्काचूर झाला.

............

साताऱ्यात कृत्रिम तलावात विसर्जन

सातारा :

सातारा शहर व परिसरातील शेकडो सार्वजनिक मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. जिल्ह्यात नोंद झालेल्या ३ हजार ६८० मंडळांचे तर ९० हजारांहून अधिक घरगुती गणपती विसर्जन करण्यात आले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली व शुक्रवारी सकाळी पाच वाजता शंकर पार्वतीच्या रुपातील मूर्तीच्या विसर्जनाने या मिरवणुकीची सांगता झाली. सदाशिव पेठेतील मानाच्या सम्राट महागणपती मंडळाची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाल्यानंतर शहरातील मानाचे व मोठे असणारे मोती चौकातील प्रतापसिंह मंडळ, पंचमुखी मंडळ, मयूर सोशल क्लब आदी मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन मिरवणुकीने झाले. शुक्रवारी

सकाळी मानाच्या पाच गणपतीनंतर शंकर पार्वती गणेशाचे तलावात विसर्जन होऊन या मिरवणुकीची सांगता झाली. रात्री बारा नंतर मिरवणुकीतील वाद्ये थांबवण्यात आली होती. मिरवणुकीत उच्च ध्वनी यंत्रणेला परवानगी न मुळे विविध ढोल व बेंजो पथकांचा सहभाग दिसून येत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामराजेंचा कार्यकर्ता मेळावा कोणत्याही निर्णयाशिवाय संपला

$
0
0

सातारा: गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीला रामराम करून, शिवसेनेच्या शामियान्यात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण, त्यांच्या पक्ष सोडण्याची आणि शिवसेना प्रवेशाची निव्वळ चर्चाच सुरू आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

निंबाळकर यांनी शुक्रवारी फलटणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यात रामराजे नाईक-निंबाळकर पक्ष सोडण्याची घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. पण, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी आलो आहे, असे सांगणाऱ्या नाईक-निंबाळकर यांचा कार्यकर्ता मेळावा कोणत्याही निर्णयाशिवाय संपला. त्यामुळे रामराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेणार, या विषयी उत्सुकता ताणली गेली आहे.

रामराजे निंबाळकर म्हणाले, 'आमचे हिरो देवानंद, अमिताभ बच्चन नव्हते तर, शरद पवार होते. आता मला फक्त शरद पवार यांना न दुखावता तुमचे मन राखायचे आहे. आमची पार्टी शरद पवारच होते. राष्ट्रवादी नव्हे, मी त्यांच्याविषयी काहीच बोलणार नाही. त्यांच्याबद्दल कायम आदर राहील. मुळात मला कोणीही अस्वस्थ करू शकत नाही. मध्यंतरी माझी २५ वर्षांची कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या मनात कुठल्या पार्टीत जायचे? राष्ट्रवादी सोडायची का? हे जाणून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे.'

मेळाव्याला आमदार शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील लोकही आले आहेत, असा उल्लेख रामराजे निंबाळकर यांनी केला. 'राजकारण जर करायचे असेल आणि तरुण पिढीच्या इच्छा आकांशा जाणून घेतल्या पाहिजेत. अन्यथा आपला काही उपयोग नाही. हल्ली राजकारणाचेच मार्केटिंग झाले आहे. मला कोणावर टीका करायची नाही. मी माझा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला बोलावले आहे. मला तुमच्याकडून एक निर्णय हवा आहे. विकास कामाला खरंच मत मिळतात का?, असा प्रश्न ही निंबाळकर यांनी मेळाव्यात उपस्थित केला.

शिवेंद्रसिंहराजे सोडले तर औद्योगिकीकरण बाबत जिल्ह्यातील कोणीही लोकप्रतिनिधी बोलत नाही, असे सांगत त्यांनी शिवेंद्रसिंह राजेंचे कौतुक केले. 'सध्या नुसती जत्रा भरली आहे. महामेळावा, महाभरती, असे शब्द वापरले जात आहेत. जायचीच वेळ आली तर तरुण पिढीचा विचार करून जावे लागेल. पण वेळ आली तर, माझ्या हातून झाले तर तुमचे सोनंच होईल, कोळसा होऊ देणार नाही,' असा विश्वास ही कार्यकर्त्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर महाजनादेश यात्रेवेळी रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सकारात्मक दृष्टिकोनातून सोडवणूक करावी. महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्र्यांसोबत संघटनेच्या प्रतिनिधींची भेट घालून द्यावी अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली. जर मागणीचा विचार झाला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेप्रसंगी रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा आशा वर्कर्स व गट प्रवर्तकांनी शनिवारी दिला.

निश्चित मानधनासाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी शनिवारी बिंदू चौकात ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला आंदोलनासाठी एकवटल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा करुनही सरकार दखल घेत नाही असा आरोप करत सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. तोंडाला काळ्या फिती लावून मूक धरणे आंदोलन केले. आंदोलनाचा,शनिवारी बारावा दिवस होता.

आशा कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये आणि गट प्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन मिळावे यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर चक्री आंदोलन सुरू आहे. संघटनेचे कार्यकर्ते वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधत आहेत.

आशा कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर काढलेल्या मोर्चावेळी पालकमंत्र्यांनी बुधवारी यासंदर्भात मानधनवाढ करून आदेश काढू असे आश्वासन दिले होते. त्याचीही पूर्तता झाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. शनिवारी, करवीर, कागल, हातकणंगले, राधानगरी अशा विविध भागातील आशा कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. कॉम्रेड चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील आदींची भाषणे झाली. महिला कर्मचाऱ्यांनी पांढऱ्या साड्या परिधान करुन व काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. आंदोलनात संगीता पाटील, उज्ज्वला पाटील, सुरय्या तेरदाळ, सुप्रिया गुदगे, मंदाकिनी कोडग, विमल अतिग्रे यांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा

आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. रेल्वे स्टेशन परिसरात महिला कर्मचारी एकत्र जमणाार आहेत. त्या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघेल. सकाळी ११ वाजता मोर्चाला प्रारंभ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलंड, वळिवडेचे बंध झाले अतूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जर्मनी आणि रशियाकडून पोलंड बेचिराख होत असताना आमच्या पाच हजार नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने आश्रय दिला. पोलीश नागरिकांसाठी संस्थानाने मानवतावादी भूमिकेतून मदत केली. त्याचे ऋण फेडू शकत नाही. ८० वर्षांनंतरही कोल्हापुरातील वळिवडे गावाविषयीच्या आमच्या भावना कायम आहेत. प्रेम, मैत्री, मानवतेचा सेतू कायम रहावा,' अशी भावना पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रिझीदॅज यांनी व्यक्त केली. वळिवडे येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण प्रिझीदॅज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार संभाजीराजे छत्रपती, धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पोलंडचे राजदूत ॲडम बुरॉकोस्की, पोलिश एअरलाइन्सचे अध्यक्ष मिल्झाक्झार्स्की, कौन्सूल जनरल डॅमियन आयर्झिक उपस्थित होते.

उप परराष्ट्र मंत्री प्रिझीदॅज म्हणाले, 'वळिवडे येथे होणारे संग्रहालय हे मानवतेचे प्रतिक असेल. कोल्हापूर परिसरात उद्योग, व्यवसाय, सांस्कृतिक, पर्यटन या क्षेत्रांमध्ये आदान-प्रदान केले जाईल. दिल्लीप्रमाणे वार्सा ते मुंबई थेट हवाई वाहतूक सुरू केली जाईल.'

खासदार संभाजीराजे यांनी सोहळ्याची माहिती दिली. ते म्हणाले, 'कोल्हापूरकरांना अभिवादन करण्यासाठी पोलंडचे शिष्टमंडळ इथे आले आहे. १९४३ ते १९४८ या पाच वर्षांच्या काळात पाच हजार पोलंडवासी वळिवडेत वास्तव्यास होते. संस्थानाने त्यांना हॉस्पिटल, चर्च, शाळा, पोस्ट ऑफिस, रेकॉर्ड ऑफिस या सुविधा देण्यासह खाण्या-पिण्याची, राहण्याची सोय केली. या काळात इथली संस्कृती, इथले नियम त्यांनी शिस्तप्रिय पद्धतीने स्वीकारले. या वास्तव्याला पोलंडवासीय आपले दुसरं घर मानतात. या ऐतिहासिक ठिकाणी लवकरच संग्रहालय उभारण्यात येणार आहे.'

प्रधान सचिव भूषण गगराणी म्हणाले, 'दुसऱ्या महायुद्धात सर्वाधिक नुकसान पोलंडचे झाले. संकटसमयी ते वळिवडेत आले. इथल्या लोकांनी त्यांना प्रेम दिले. कोल्हापूरने केलेली मदत अजूनही ते विसरत नाहीत.'

जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, संयोगिताराजे छत्रपती, शहाजी छत्रपती, कर्नल विजयसिंह गायकवाड, वळिवडेचे सरपंच अनिल पंढरे, गांधीनगरच्या सरपंच रितू लालवाणी उपस्थित होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी आभार मानले.

'चमका कोल्हापूर हमारा'

राजदूत ॲडम बुरॉकोस्की यांनी हिंदीत भाषणाला सुरुवात केली. 'नमस्ते कोल्हापूर... मेरे भाईयों और बहनों आज का लम्हा बहुत बहुत महत्वपूर्ण है' असे सांगत त्यांनी कोल्हापूरच्या मदतीबद्दल आभार मानले. त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कविता म्हणून दाखवली. 'दीप बुझे पश्चिमी गगन के, व्याप्त हुआ बर्बर अँधियारा, किंतु चीर कर तम की छाती, चमका हिंदुस्थान हमारा.. असे सांगून 'चमका कोल्हापूर हमारा' असे शब्द त्यांनी उच्चारताच उपस्थितानी टाळ्यांचा कडकडाट केला.

राजदुतांकडून मराठीत भाषण

कौन्सूल जनरल डॅमियन आयर्झिक यांनी 'नमस्कार' असे म्हणत मराठीतून भाषण केले. 'कोल्हापूर संस्थानाने पोलंडवासियांना संरक्षण दिले. इथल्या मातीतला दयाळूपणा, नागरिकांची सद्भावना पोलंडवासिय सदैव आठवणीत ठेवतील. राजर्षी शाहू महाराजांचा हाच वारसा मजबुत करण्यासाठी त्यांचे वारसदार खासदार संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. दोन्ही देशाचे संपर्क मजबुत होतील,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आंद्रेस झिनेस्कींकडून मराठीत अंकगणित

वळिवडेतील शिबिरात राहिलेले पोलंडवासीय आंद्रेस झिनेक्सी आणि वांदा कोरस्का यांनी आपल्या भावनांना उजाळा दिला. झिनेस्कीने भाषणाची सुरुवात करताना एक, दोन, तीन, चार, ... १७, १८, १९, २० असे अंकगणीत उच्चारताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

पोलीश मुलीचे स्थळ

वळिवडेत वास्तव्य करणारे डेनिस मुलींसमवेत शिष्टमंडळासमवेत आले आहेत. त्यांना दोन मुली असून २२ वर्षीय मुलीचा विवाह शहाजीराजे यांच्याबरोबर होऊ शकतो का? अशी विचारणा त्यांनी संभाजीराजे यांना केली. संभाजीराजे यांनी डेनिसची मुलाखत शहाजीराजेंशी करून दिली. शहाजीराजेंनी 'युरोपात माझ्या अनेक मित्र, मैत्रिणी आहेत. तुमच्या मुलीचे स्थळ मी निवडले तर माझ्या पोलीश मैत्रिणी चिडतील', असे सांगून त्यांना कटवल्याचे संभाजीराजे यांनी भाषणात सांगितल्यावर उपस्थितांनी हसून त्याला दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images