Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘महाराष्ट्र’, ‘न्यू’च्या इमारतीची नव्याने बांधणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस यंदा शताब्दी महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. त्यानिमित्त संस्थेने महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, न्यू कॉलेजची पूर्वेकडील जुनी इमारत व मुलींच्या वसतिगृहाची इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा संकल्प केला आहे. यासह संस्थेच्या अन्य कामांसाठी दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी आजी-माजी विद्यार्थी, पदाधिकारी, सेवक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निधी देऊन सहकार्य करावे,' असे आवाहन संस्थेचे व्हाइस चेअरमन आर. डी. पाटील (वडगावकर) यांनी पत्रकार परिषदेत केले.

पाटील म्हणाले, 'राजर्षी शाहू महाराजांनी प्रिन्स शिवाजी यांच्या स्मरणार्थ एक जुलै १९२० रोजी संस्थेची स्थापना केली. सध्या संस्थेच्या नऊ शाखा कार्यरत आहेत. त्यामध्ये १३ हजार विद्यार्थी आणि १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेला २००३ मध्ये राज्य सरकारकडून 'आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार' मिळाला. दरम्यान, एक जुलै २०१९ पासून संस्थेच्या शताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शताब्दी संकल्पपूर्ती अंतर्गत महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व न्यू कॉलेजची पूर्वेकडील जुनी इमारत नव्याने बांधण्याचे ठरविले आहे. तसेच न्यू माध्यमिक विद्यालय उचगाव व कॉलेज ऑफ आर्किटेक्चरसाठी नवीन इमारत बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.'

ते पुढे म्हणाले, 'संस्थेच्या विविध शाखांमध्ये भौतिक सुविधांची उपलब्धता, शतकमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिका प्रकाशन, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. संस्थेच्या २०११ ते २०२० या कालावधीतील वाटचालीवर आधारित 'बहुजन पर्व भाग २'ची ग्रंथनिर्मिती सुरू आहे. संस्थेच्या प्रस्तावित कामासाठी १० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. संस्थेचे हजारो माजी-विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदस्थ आहेत. त्यांनी संस्थेच्या कार्याला मदत करावी. संस्थेला दिलेला निधी ८० जी खाली आयकर सवलत मिळण्यास पात्र ठरणार आहेत.'

पत्रकार परिषदेला संस्थेचे चेअरमन डी. बी. पाटील, खजानिस आर. डी. आतकिरे, निधी समिती प्रमुख आर. डी. पाटील, डी. जी. किल्लेदार, आप्पासाहेब वणिरे, सविता पाटील, विनय पाटील, सी. एम. गायकवाड, डी. बी. इंगवले, आदी उपस्थित होते.

००००

मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

शतकमहोत्सव सांगता समारंभ एप्रिल २०२० मध्ये घेण्याचा संस्थेचा मानस आहे. या कार्यक्रमासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संस्थेतर्फे आयटीआय सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साखर दोन रुपयांनी महागली

0
0

कोल्हापूर: पितृ पंधरवड्यास सुरुवात झाली असून साखरेचा दर प्रतिकिलो दोन रुपयांनी महाग झाली आहे. ग्राहकांनी तांदूळ, हरभरा डाळ, तूरडाळ, रवा, आटा आणि सोजी रव्याला मागणी वाढली आहे. बाजारपेठेत धान्य कडधान्याचे दर स्थिर आहेत.

या आठवड्यापासून साखरेचे दर वाढू लागले आहेत. साखरेचा दर प्रतिकिलो ३४ ते ३६ रुपयांवरुन ३८ रुपये झाला आहे. दसरा आणि दीपावली या सणासुदीच्या काळात साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पितृ पंधरवड्यात घरोघरी महालयाची तयारी सुरु आहे. पूजेसाठी सातू आणि काळ्या तीळांची मागणी वाढली आहे. ५० ग्रॅम सातूचा दर १० रुपये तर काळे तिळाचा दर २० रुपये आहे. विविध प्रकारचा तांदूळ बाजारात उपलब्ध असून त्याचा दर प्रतिकिलो ३२ पासून ६८ रुपये आहे. हरभरा डाळीचा दर प्रतिकिलो ६४ ते ६८ रुपये आहे. पुरण पोळीसाठी ग्राहकांकडून हरभरा डाळीची मागणी वाढली आहे. खीर व शिरा करण्यासाठी रवा आणि सोजीचा रव्यालाही मागणी वाढली आहे. रव्याचा दर प्रतिकिलो ३४ रुपये तर सोजी रव्याचा दर ४० रुपये आहे.

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३६

शेंगदाणा : १२०

मैदा : ३४

आटा : ३२

रवा : ३४

गूळ : ५०

साबुदाणा : ८८

वरी : ९२

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ९२

मूगडाळ :, ९२

उडीद डाळ : ६८

हरभरा डाळ : ६८

मसूर डाळ : ६४

मसूर : ७० ते १४०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९६

काळा वाटाणा : ६८

मूग ८८

मटकी : १२०

छोले : ९०

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४० ते ५०

गहू : २८ ते ३४

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : ३२

नाचणी : ३६

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १३५

सरकी तेल : ८८

खोबरेल : २४०

सूर्यफूल : ९० ते १०५

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १६०

जिरे : २८०

खसखस : १२००

खोबरे : १८० ते २०० १६०

वेलदोडे : ६०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतासोबत उद्योग, व्यापाराचे नवे पर्व

0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

'युरोपियन समुदायापैकी पोलंड हा भारतात मोठी गुंतवणूक करणारा देश आहे. दोन्ही देशांचा जीडीपी सारखाच असल्याने याठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून मोठे समाधान मिळेल. महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापुरात वस्रोद्योग, फाउंड्री, चर्मद्योग व पर्यटन क्षेत्रात अमाप संधी आहे. दिल्लीप्रमाणे मुंबई किंवा पुणे ते वॉर्सा अशी विमान वाहतूक सुरू करण्याचा पोलीश विमानसेवेचा मनोदय आहे' अशी माहिती पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मर्सिन प्रिझीदॅज यांनी शनिवारी दिली.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुमारे पाच हजार पोलंडवासी कोल्हापुरात आश्रयासाठी आले होते. त्यामुळे गेल्या ७७ वर्षांपासून कोल्हापूर व पोलंडचे भावनिक बंध निर्माण झाले आहेत. दरवर्षी पोलंडवासीय येथे येऊन त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात. त्यापुढे जाऊन सांस्कृतिक, पर्यटन, औद्योगिक व व्यायसायिक संबंध दृढ करण्यासाठी हॉटेल सयाजी येथे भारत-पोलंड औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते.

परिषदेनंतर पत्रकार परिषदेत प्रिझीदॅज म्हणाले, 'भविष्यात सांस्कृतिक आदान-प्रदान तसेच व्यापार-उदीम जास्तीत जास्त वाढविण्यासाठी पोलंड सरकार प्रयत्न करणार आहे. कोल्हापूर-पोलंड व्यवसाय वृद्धीसाठी फोरम स्थापन करू.'

'पोलंडवासियांबरोबर कोल्हापूरचे भावनिक नाते पूर्वीपासून आहे. हे नाते अधिक दृढ करण्याच्या शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत' असे सांगून प्रधान सचिव भूषण गगराणी म्हणाले, 'कोल्हापूर आणि पोलंडमधील भावनिक नाते अधिक दृढ करण्यासाठी राज्य सरकार प्रोत्साहन देईल. पोलीश उद्योगांची राज्यात गुंतवणूक करण्याची इच्छा असून चाकण येथे यापूर्वीच एल्यूटेक हा धातूंवरील प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. दिल्लीप्रमाणे मुंबई किंवा पुणे ते वॉर्सा अशी विमान वाहतूक सुरू करण्याचा पोलीश विमानसेवेचा मनोदय आहे. अन्न प्रक्रिया, चर्मद्योग, वस्त्रोद्योग पर्यटन तसेच शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्याचा पोलंडचा मनोदय असल्याचे राजदूत ॲडम बूरॉकोस्की यांनी व्यक्त केला आहे.'

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'कोल्हापूर आणि पोलंडवासियांचे गेल्या ७७ वर्षांपासून भावनिक बंध निर्माण झाले आहेत. भविष्यात सांस्कृतिक, पर्यटन, व्यावसायिक आणि औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्धार भारत-पोलंड औद्योगिक परिषदेत करण्यात आला. त्यासाठी कोल्हापूर बिझनेस फोरम स्थापन करण्यात येईल. फोरमद्वारे उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येईल. पोलंडमध्ये चांगल्या संधी असल्याने त्याचा फायदा कोल्हापूर परिसरातील उद्योजकांना होईल. त्यासाठी लवकरच उद्योगपतींचे एक शिष्टमंडळ पोलंडला पाठवण्यात येणार आहे.'

परिषदेमध्ये स्थानिक उद्योजकांनी अन्न प्रक्रिया, चर्मोद्योग, वस्रोद्योग, चांदी, फाउंड्री उद्योगांबाबत पोलंड शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी पोलिस एअरलाइन्सचे प्रमुख राफेल, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल, आयुक्त डॉ. अमन मित्तल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्यासह प्रधानमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, ट्रेडविंगमधील तज्ज्ञ व कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी विज कर्मचाऱ्यांचेउद्यापासून बेमुदत धरणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कंत्राटी विज कर्मचाऱ्यांची पीएफ, विम्याची रक्कम वेळेत संबंधित कार्यालयात जमा करावी, महिन्याच्या सात तारखेला वेतन जमा करावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विज कंत्राटी कामगार संघाच्यावतीने सोमवारपासून (ता. १६) बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात होणार आहे.

याबाबत संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, 'राज्य विद्युत मंडळाचे तीन कंपन्यांमध्ये विभाजन झाले. विभाजनानंतर कंपन्यांची आर्थिक स्थिती व कामाचा वाढता बोजा कमी करण्याच्या उद्देशाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांपेक्षा हे कर्मचारी अचूक काम करत असल्याने कंपन्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाली. कंत्राटी कर्मचारी नेमण्यासाठी ठेकेदारांना महावितरणकडून अनेक नियम व अटी लागू केल्या आहेत. मात्र, नियम व अटींचे उल्लंघन करुन कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते. पीएफ व विमा रक्कम वेळेत न भरणे, दर महिन्याला ठराविक दिवशी जाणीवपूर्वक वेतन न करणे आदी प्रकारांनी कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. त्याचबरोबर कर्मचारी पुरवण्याबाबत शून्य टक्के कमिशनवर एका ठेकेदाराने कंत्राट घेतले आहे. हा ठेकेदार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून महिन्याला एक हजार ते १५०० रुपये कपात करतो. जे कर्मचारी या रकमेला विरोध करतात, त्यांना कमी करण्याची धमकी दिली जात आहे. या अन्यायाविरोधात सोमवारपासून (ता. १६) महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांनी पत्रकातून दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टेरी टॉवेल एक्सपो’चेसोलापुरात आयोजन

0
0

'टेरी टॉवेल एक्सपो'चे

सोलापुरात आयोजन

सोलापूर :

सोलापूर येथे २५ ते २७ सप्टेंबर २०१९ दरम्यान होणाऱ्या 'व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्सपो अँड समिट २०१९' या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या उत्पादकांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लघुद्योग महामंडळाच्या वतीने प्रत्येकी ३०,००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे पत्र नुकतेच या प्रदर्शनाच्या सयोजकांना केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहे.

सोलापुरात खास बनणाऱ्या टेरी टॉवेलच्या प्रभावी मार्केटिंगसाठी 'टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन'च्या वतीने सोलापुरात तीन दिवसीय टेरी टॉवेल आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देश-विदेशातील असंख्य ग्राहक, खरेदीदार, पर्यटक, आयात- निर्यातदार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी व कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. जगात लागणाऱ्या कोणत्याही प्रकारचे, दर्जाचे टॉवेल सोलापुरात तयार होतात. केवळ प्रभावी विपणन व्यवस्थेअभावी सोलापुरात हा उद्योग मागे पडला आहे. देश-विदेशात आपले उत्पादन थेट पोहचावे यासाठी हे भव्य प्रदर्शन भरविण्यात येत आहे. २०हून अधिक देशातील प्रतिनिधींनी या प्रदर्शनाच्या भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर पोलिस उपअधीक्षकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0
0

लाचखोर पोलिस उपअधीक्षकाचा

अटकपूर्व जामीन फेटाळला

सोलापूर : रेश्मा पडेकनूर खून प्रकरणातील साक्षीदारांना गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या कर्नाटकातील पोलिस उपअधीक्षक महेश्‍वर गौड-पाटील (उपविभागीय पोलिस अधिकारी, बागेवाडी, जि. विजयपूर, कर्नाटक) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

रेश्मा पडेकनूर खून प्रकरणात नगरसेवक तौफिक शेखसह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. रेश्मा व तौफिक यांच्यातील वाद मिटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समीउल्लाह शेख यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली होती. या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी समीउल्लाह यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. पहिला हप्ता घेण्यासाठी मल्लिकार्जुन शिवय्या पुजारी (वय ३६, पोलिस हेड कॉन्स्टेबल) व रियाज खासिमसाहब कोकटनूर (वय ३४, खासगी इसम) हे दोघे २२ ऑगस्ट रोजी रात्री सोलापुरात आले होते. हवालदार पुजारी याने पोलिस उपअधीक्षक पाटील यांच्याशी समीउल्लाह यांचे फोनवरून बोलणे करून दिले. पाटीलच्या सांगण्यावरून समीउल्लाह यांनी पुजारी आणि कोकटनूर या दोघांकडे एक लाख रुपये दिले. त्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्‍कम स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडले होते. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात कर्नाटकातील पोलिस उपअधीक्षक महेश्‍वर गौड-पाटील याने सोलापूरच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालाने तो फेटाळून लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिळेल तेथे काम करणार’

0
0

'मिळेल तेथे काम करणार'

आनंदराव पाटील

कराड :

'प्रेमलाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी संघटना उभी केली, जिल्ह्यात लढत होतो. मात्र, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या भोवती कोंडाळे निर्माण झाली आहे. या कोडाळ्याची लायकी पण नाही. त्या कोंडाळ्याशी संघर्ष करून पुन्हा संघटनात्मक बांधणी करावी लागणार आहे. मिळेल तेथे काम करणार, गप्प बसणार नाही,' असा इशारा आमदार आनंदराव पाटील यांनी देत बंडखोरीचे संकेत दिले आहेत.

विजयनगर (ता. कराड) येथील पार्वती मंगल कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. आमदार पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटापासून दूरावले आहेत. त्या बाबात निर्णय घेण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, 'वाड्याला आगा लावून वांग भाजणारी लोकं आता कॉँग्रेसमध्ये वाढू लागली आहे. त्यांना गावागावांत, गटागटांत भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजायची आहे. या कोंडाळ्याच्या विरोधात आता संघटन बांधणी करायची आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल तर आनंदराव पाटील आता गप बसणार नाही. मिळेत तेथे काम करून कोंडाल्याच्या विरोधात संघटन वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे.'

या वेळी अ‍ॅड. विजयराव कणसे, निसार मुल्ला, राजेंद्र चव्हाण, जितेंद्र भोसले, विजय चव्हाण, रवींद्र दुबे यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरेंद्र पाटील शरद पवारांना भेटले

0
0

नरेंद्र पाटील

शरद पवारांना भेटले

सातारा :

माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माथाडी कामगारांचे नेते आणि अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली.

सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. नरेंद्र पाटील यांनी मागील लोकसभा निवडणूक उदयनराजेंविरोधात लढवून ४ लाख ४६ हजार मते घेतली होती. उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता या जागेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच घेण्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय हालचालींना गती आली आहे. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे.

सध्या तरी राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक नितीन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची नावे घेतली जात आहे. या सोबतच आघाडीचा उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून विचार होऊ शकतो. या सर्व घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेनेचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे.

पवारांची भेट केवळ योगायोग

या संदर्भात नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'माथाडी कायद्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शरद पवार यांच्याशी भेट झाली, ही भेट पूर्वनियोजित होती. आजच उदयनराजेंनीही राजीनामा दिला आणि मी पवारांना भेटलो आहे, हा केवळ योगायोग आहे. मी मुख्यमंत्र्यांचा विश्‍वासू माणूस आहे, मी कशाला गडबड करू. साताऱ्याच्या जागेचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. साताऱ्याची जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे. उद्या निवडणूक लागली तर कोणत्या चिन्हावर ही निवडणूक लढविली जाईल, हे नेते ठरवतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निम्म्या भागात अपुरा पाणीपुरवठा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्याने सी आणि डी वार्डात शनिवारी दिवसभर अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा झाला. दिवसभरात २६ टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजता बिघाड काढण्यात यश आले असून बालिंगा उपसा केंद्रातून पूर्ण क्षमतेने उपसा सुरू झाला. दरम्यान शिंगणापूर जलवाहिनीला लागलेली गळती दूर काढण्यास सोमवारपासून सुरूवात होईल. त्यामुळे ए., बी. आणि ई. वॉर्डातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.

बालिंगा उपसा केंद्रातील तीन विद्युत पंपांपैकी एक पंप बंद पडल्याने शुक्रवारपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. शनिवारी दिवसभर पंपाची दुरुस्ती सुरू होती. दुपारी अडीच वाजता दुरुस्ती पूर्ण झाली. त्यानंतर सायंकाळी साडेसहानंतर तिन्ही विद्युतपंप सुरू झाले. मात्र सकाळी पाणी येणाऱ्या भागात अपुऱ्या दाबाने पाणी आल्याने नागरिकांना टँकरद्वारा पाणी देण्यात आले. कळंबा फिल्टर हाउस येथून १५ व कसबा बावडा फिल्टर हाउस येथून ११ अशा २६ टँकर फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

आझाद चौक, राजकपूर पुतळा, आपटेनगर, सुभाष रोड, नागाळा पार्क, सिद्धार्थ नगर, रमण मळा, लक्ष्मीपूरी, कसबा बावडा (शाहू विद्यालय), राजारामपुरी, बिंदू चौक, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. रविवार सकाळपासून सी व डी वॉर्डातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. दरम्यान चंबूखडी येथे शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीला लागलेली गळती दूर करण्यास सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस ए, बी व ई वॉर्डातील प्रभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बंद काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा

0
0

महाजनादेश यात्रेत उदयनराजे सहभागी होणार

भाजपच्या महाजनादेश यात्रेचे रविवारी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मंचावर उदयनराजे भोसले जाहीर कार्यक्रमात प्रथमच सहभागी होण्याची शक्यता आहे. वाई येथे पाचवड फाट्यावर माजी आमदार मदन भोसले यांच्याकडून महाजनादेश यात्रेच्या रथाचे स्वागत केले जाणार आहे. दोन हजार दुचाकी स्वाराची रॅली शिरवळ-खंडाळा-वेळे-सुरूर-पाचवड फाट्यावरून पुढे वाढे फाटा येथून सातारा शहरात येणार आहे. गोलबागेला वळसा घालून कर्मवीर पथावरून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाणार आहे. तेथून मुख्यमंत्री सैनिक स्कूल मैदानावरील जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत भाजप साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. कराड उत्तर मतदारसंघात मसूर येथे स्वागत सभेनंतर कराड येथे मुख्य सभा सायंकळी सहा वाजता पोहचणार आहेत. दोन स्वागत सभा व दोन जाहीर सभांनी सातारा जिल्ह्याचे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

युतीच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

भारतीय जनता पक्षाने आयात उमेदवार लादल्यास सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे निष्ठावंत कार्यकर्ते त्याला पाडण्याचे काम करतील, असा इशारा पश्चिम विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार, अमित कदम, शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य एस. एस. पार्टे गुरूजी व माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. पवार यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत निष्ठावंतांनी आपली थेट भूमिका मांडत पक्षश्रेष्ठींना अल्टीमेटम दिला आहे. दीपक पवार म्हणाले, माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विषयी सातारा विधानसभा मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. आयात उमेदवार लादला तर त्याला पाडण्याचे काम करू व आम्ही समविचाराने निष्ठावान उमेदवार उभा करू.'

...........

पृथ्वीराज चव्हाण यांचा नकार

उदयराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कॉँग्रेसकडून लढणार आहेत, अशी चर्चा शनिवारी दिवसभर सुरू होती. मात्र, चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. अशी कोणताही शक्यता अथवा नियोजन नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजनादेश यात्रा सोमवारी कोल्हापुरात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा सोमवारी (ता. १६) कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता इचलकरंजीत जाहीर सभा होणार असून मंगळवारी शहरातील प्रमुख मार्गावरुन यात्रा काढण्यात येणार आहे. कळंबा (ता. करवीर) येथे छोट्या सभेचे आयोजनही करण्यात आले. जिल्ह्यात यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार असून त्यासाठी आज महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत नियोजनासाठी बैठक झाली.

सोमवारी सांगलीहून जनादेश यात्रा कोल्हापुरात दाखल होईल. जयसिंगपूर, शिरोळमार्गे इचलकरंजीत मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी सभा होणार आहे. शिरोळ येथे छोट्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. इचलकरंजीतील सभा आटपून मुख्यमंत्री कोल्हापूरकडे रवाना होतील. ताराराणी चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. उपस्थित नागरिकांसमोर सभा घेतली जाईल. रात्री ते कोल्हापुरात मुक्काम करणार आहेत.

मंगळवारी ११ वाजता दाभोळकर कॉर्नर येथून महाजनादेश यात्रेस सुरुवात होणार आहे. व्हीनस चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, आझाद चौक, उमा टॉकीज चौक, सावित्रीबाई फुले रुग्णालय, गोखले कॉलेज चौक, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर पेट्रोल पंप, आयटीआय रोड मार्गे कळंबा येथे यात्रा काढण्यात येणार आहे. हॉकी स्टेडियम आणि कळंबा येथे छोट्या सभा होणार आहेत. यात्रा मार्गावर चौकाचौकात मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. कळंबा येथील सभा आटपून इस्पुर्ली, मुधाळतिट्टा मार्गे राधानगरीकडे यात्रा जाणार आहे.

यात्रेच्या नियोजनासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत माजी खासदार महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्याचे आवाहन केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी यात्रा मार्गावरील स्वागतासंबधी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. बैठकीला सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, संतोष भिवटे, महानगरपालिका विरोधी पक्षनेता विलास वास्कर, गटनेते विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात मुख्यमंत्री म्हणाले, मी आता छत्रपतींचा मावळा!

0
0

सातारा: छत्रपती शिवरायांच्या नावाखाली महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीने छत्रपतींच्या वंशजांना काय दिले? छत्रपतींचे घराणे घेणारे नाही देणारे आहे. भारतीय जनता पार्टीत उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांचा सन्मान कमी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा सैनिक स्कूलच्या प्रांगणात महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत दिली. सातारा शहराच्या हद्दवाढीसह मेडिकल कॉलेजचे याच वर्षी प्रवेश, साताऱ्यातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पन्नास कोटी व उरमोडीच्या उर्वरीत कालव्यांचे भूमीपूजन अशा घोषणांचा मुख्यमंत्र्यांनी पाऊस पाडला.

संपूर्ण सातारा शहरातून आलेल्या जनादेश रॅलीला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा सैनिक स्कूलच्या प्रांगणावर सायंकाळी सव्वासहा वाजता यात्रेचे आगमन झाले. त्यानंतर जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'छत्रपतींचे वंशज आज आमच्यासमवेत आमच्या पक्षात एकाच मंचावर आहेत यापेक्षा वेगळा सुदीन कोणता. महाजनादेश यात्रेचे साताऱ्यात भरभरून स्वागत झाले त्यासाठी मी सातारकरांचे मनापासून आभार मानतो. उदयनराजे यांनी मला पगडी दिली शिवेंद्रराजे यांनी तलवार दिली. त्यामुळे मी आता छत्रपतींचा मावळा आहे. छत्रपतींनी मागण्या नाही तर आदेश करायचा असतो. फाइल पूर्ण असेल तर सातारा शहर हद्दवाढीच्या प्रस्तावावर मी उद्याच सही करतो. गिरिश महाजन यांची तयारी असेल तर याच वर्षी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.'

सातारा शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पन्नास कोटी रुपये व उरमोडी धरणाच्या कालव्यांच्या कामांच्या भूमीपूजनाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दोन्ही राजांनी भाजपामध्ये विनाअट प्रवेश केला. त्यांच्या अटी या जनतेच्या विकास कामासाठी होत्या. अटींचे प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीने दोन्ही राजांना काय दिले? जनतेच्या विकास कामांसाठी त्यांची धडपड आहे. छत्रपतीचे वंशज पक्षात आल्याने पक्षाची बळकटी वाढली आहे. महाजनादेश यात्रेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता महाराष्ट्राचा निकाल काय असणार आहे, हे वेगळे सांगायला नको. गेल्या पाच वर्षांच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आम्ही जनतेशी संवाद साधतोय. विरोधी पक्षाकडे तेल लावलेला पैलवानच उरलेला नाही. पुन्हा समृद्ध महाराष्ट्रासाठी राज्यात भाजपची सत्ता आणायची आहे, असे नमूद करत सातारा जिल्हा पूर्णपणे बेघरमुक्त करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.



छत्रपतींच्या वंशजांच्या कार्यक्षमतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रवादीला आता महाराष्ट्रातील जनता त्यांची जागा दाखवून देणार आहे, अशी टीका फडणवीस यांनी करत उदयनराजे व शिवेंद्रराजे यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले.

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उदयनराजे भोसले , शिवेंद्रराजे भोसले, खासदार संजय काकडे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर, कांताताई नलावडे, आमदार बाळासाहेब भेगडे, नगराध्यक्ष माधवी कदम, डॉ. दिलीप येळगावकर, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार उपस्थित होते .

मुख्यमंत्र्याच्या घोषणा

१. फाईल पूर्ण असेल सातारा हद्दवाढीच्या प्रस्तावावर सही
२. सातारा जिल्हा बेघर मुक्त करणार
३. मेडिकल कॉलेजचे याच वर्षी अॅडमिशन
४. उरमोडी कालव्यांची तातडीने भूमीपूजने

उदयनराजेंचे राष्ट्रवादीवर टीकास्त्र

उदयनराजे यावेळी म्हणाले की, राष्ट्रवादीत असताना आमच्या कामाच्या फायली थेट कचऱ्याच्या डब्यात जात होत्या. असे एक नाही अनेकवेळा झाले. कोणतेही काम वेळेत पूर्ण झाले नाही. आघाडी सरकारने अनेक प्रकल्प रखडवून ठेवले. मात्र, हजारो कोटींची कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहेत. मला राष्ट्रवादीने काही दिले नसले तरी किमान सहनशीलतेचा एखादा पुरस्कार तरी द्यायला हवा होता, अशीही कोपरखळी राजेंनी लगावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यदायी जिवनासाठी रंकाळ्यावर वॉकथॉन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात कोल्हापूरकर नेहमीच पुढे असतात. रविवारी सकाळी ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या साक्षीने अशाच एका आरोग्यदायी उपक्रमाला नागरिकांची दाद मिळाली. पाच किलोमीटरच्या थ्रीडी वॉकथॉन उपक्रमाला मोठी दाद मिळाली. महापुराला समर्थपणे तोंड देत कोल्हापूरवासीय पुन्हा उभे राहत असल्याचे यातून दिसून आले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते वॉकथॉनला सुरुवात झाली. दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त ५ देशांत, २० राज्यांतील १९२ शहरांत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. उपक्रमात अठराशेहून अधिक आबालवृद्ध सहभागी झाले.

रविवारी सकाळी पावसाची रिपरिप कायम होती. त्यामुळे पाच किलोमीटरचा पल्ला गाठता येईल का? याविषयी साशंकता होती. जिल्हाधिकारी देसाई, आयुक्त कलशेट्टी यांच्यासह सहभागी शेकडो नागरिकांनी शालिनी पॅलेस, रंकाळा चौपाटी, संध्यामठ, राजकपूर पुतळा, क्रशर चौक, पतौडी खण ते पदपथ असा पाच किलोमीटरचा मार्ग ३० मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण केला. उपक्रमात सर्वाधिक ८१ वर्षांचे बाळासाहेब माने यांनी सहभाग नोंदवला. तर अवघ्या ८ वर्षांच्या आशिष पवारनेही पाच किलोमीटरचे वॉकथॉन पूर्ण केले. उपक्रमात सहभागी संतोष जगताप यांनी सर्वात आधी प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा मान मिळवला.

वॉकथनॉनंतर मान्यवरांच्या हस्ते सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापुरादरम्यान केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उपस्थितांना स्वच्छतेचा संदेश दिला.

उपक्रम संयोजनात प्रणील खाडे, किशोर दानेकर, वैभव नाईक, किरण श्रेष्ठी, बाबासो पाटील, दीपक देशपांडे, अमित रेगे, हेमंत दळवी, राजू नांद्रे, कुंदन ओसवाल यांनी सहभाग घेतला. स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, रुपाराणी निकम, संजय मोहिते, अश्पाक आजरेकर, मदन चव्हाण, राहुल चोरडिया, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टचे अजय कोराणे उपस्थित होते. विशाल चोरडिया यांनी प्रास्ताविक केले.

अनेक संस्थांचा सहभाग

वॉकथॉन उपक्रमात युनिक ऑटोमोबाइल्स, रोटरी क्लब ऑफ स्पेक्ट्रम, ब्रँड बॉक्स मीडिया सोल्यूशन्स, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनीअर्स, बच्चनवेडे कोल्हापुरी, कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप, आम्ही कोल्हापुरी व्हॉट्सअॅप ग्रुप, क्रिकेटवेडे ग्रुप, रंकाळा वॉकर, आम्ही कोल्हापुरी फेसबुक ग्रुप, माणुसकीची भिंत, मैत्रेय प्रतिष्ठान, जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर, १०८ रुग्णवाहिका या संस्थांनी सहभाग घेतला.

०००

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात कोल्हापूरकर नेहमीच पुढे असतात. महापुराला समर्थपणे तोंड देत कोल्हापूरवासीय पुन्हा उभे राहत आहेत. रविवारी सकाळी रंकाळ्याच्या साक्षीने थ्रीडी वॉकथॉन पाच किलोमीटर चालण्याचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात झाली. दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त ५ देशात २० राज्यात १९२ शहरात उपक्रम राबवण्यात येत आहे. उपक्रमात अठराशेहून अधिक आबालवृद्ध सहभागी झाले.

रविवारी सकाळी पावसाची रिपरिप कायम होती. त्यामुळे पाच किलोमीटरचा मोठा पल्ला पार होणार का अशी शंका आयोजकांना होती. मात्र जिल्हाधिकारी, आयुक्त तसेच इतर उच्चपदस्थ व्यक्तींसह शेकडोजणांनी शालिनी पॅलेस, रंकाळा चौपाटी, संध्यामठ, राजकपूर पुतळा, क्रशर चौक, पतौडी खण, पदपथ असा मार्ग ३० मिनिटात यशस्वीपणे पूर्ण केला. या उपक्रमात ८१ वर्षाचे बाळासाहेब माने व ८ वर्षाचा आशिष पवार यांनी सहभाग नोंदवला. संतोष जगताप यांनी सर्वात आधी प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा मान मिळवला. यावेळी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापुरात दरम्यान केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उपस्थितांना स्वच्छतेचा संदेश दिला. मान्यवरांच्या हस्ते सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. उपक्रम संयोजनात प्रणील खाडे, किशोर दानेकर, वैभव नाईक, किरण श्रेष्ठी, बाबासो पाटील, दीपक देशपांडे, अमित रेगे, हेमंत दळवी, राजू नांद्रे, कुंदन ओसवाल यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, रूपाराणी निकम, संजय मोहिते, अशपाक आजरेकर, मदन चव्हाण, राहुल चोरडिया, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टचे अजय कोराणे उपस्थित होते. विशाल चोरडिया यांनी प्रास्ताविक केले.

या संस्थांनी घेतला सहभाग

युनिक ऑटोमोबाईल्स, रोटरी क्लब ऑफ स्पेक्ट्रम, ब्रँड बॉक्स मीडिया सोल्यूशन्स, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनअर्स, बच्चनवेडे कोल्हापुरी, कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप, आम्ही कोल्हापुरी व्हाटसअप ग्रुप, क्रिकेटवेडे ग्रुप, रंकाळा वॉकर, आम्ही कोल्हापुरी फेसबुक ग्रुप, माणुसकीची भिंत, मैत्रेय प्रतिष्ठान, जाएंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर, १०८ रुग्णवाहिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधुरिमाराजेंनी ‘उत्तर’ मधून लढावे

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'राजर्षी शाहू महाराजांचा विचार विधानसभेत पोहोचविण्यासाठी छत्रपती घराण्यातील व्यक्तींची आवश्यकता असून पक्ष, गटतट न पाहता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी जाहीर करावी. आता नाही, तर कधीच नाही अशी ठाम भूमिका घेत 'मधुरिमाराजे हेच कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे उत्तर आहे. त्यांच्या विजयासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करतील' असा निर्धार माजी आमदार, मालोजीराजे छत्रपती यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारच्या बैठकीत केला.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत छत्रपती घराण्याची कोणतीच भूमिका ठरत नसल्याने, माजी आमदार मालोजीराजे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मधुरिमाराजे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी या भावनेतून भवानी मंदिरामध्ये कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने बैठक घेतली.

यावेळी ताराराणी आघाडीचे नगरसेवक राजाराम गायकवाड म्हणाले, ' छत्रपती घराण्यावर शहरवासीय प्रेम करतात. या प्रेमापोटीच मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची तळमळ आहे. कार्यकर्ते जबाबदारी घेण्यास तयार आहेत. दोनवेळा झालेल्या पराभवाची सल आमच्या मनात असली तरी विजयाचा आत्मविश्वास आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीने निवडणूक लढवावी.'

काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश पोर्लेकर म्हणाले, 'छत्रपती घराण्यावर प्रेम असल्याने मधुरिमाराजेंनी काँग्रेसची उमेदवारी घ्यावी अथवा अपक्ष लढावे. पण निवडणूक लढवावी.'

भोई समाजाचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे म्हणाले, 'विरोधकांच्या विजयाचा अश्वमेघ रोखण्यासाठी मधुरिमाराजे यांनी मैदानात उतरण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या रुपाने बहुजन समाजाचा आवाज विधानसभेत पोहोचला पाहिजे. लोक स्वयंस्फूर्तीने प्रचाराला येतील. भोई समाज त्यांच्या पूर्णपणे पाठिशी राहील.'

बैठकीत मावळा ग्रुपचे उमेश पोवार, फत्तेसिंग जाधव, गोपी पोवार, संदीप पाटील, अजय इंगवले आदींनी मनोगत व्यक्त करून विधानसभा निवडणुकीबाबतची भूमिका मांडली. ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, सत्तार मुल्ला, गणपतराव भोई, बापू लिंगम, समीर घोरपडे, उदय कुंभार, प्रदीप शेलार, शशिकांत नलवडे, सतीश वडणगेकर, प्रकाश टिपुगडे यांच्यासह विविध तालीम संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिष्टमंडळ आज भेटणार

बैठकीनंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते न्यू पॅलेसवर दाखल झाले. मात्र, नियोजित कार्यक्रमामुळे शाहू महाराज बाहेरगावी आहेत. त्यामुळे सोमवारी (ता. १६) आजी-माजी नगरसेवकांसह सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत फोनवरून त्यांना भेटीविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मधुरिमाराजे यांच्याशीही फोनवरून संपर्क साधला. त्यांनी, 'कोणताही निर्णय घाईगडबडीत घेता येणार नाही. कुटुंबाशी चर्चा करुन निर्णय घेऊ' असे सांगितल्याची माहिती पोर्लेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंड करण्यापेक्षा जाग्यावर परवाना द्या

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सरकारचा एखाद्या निर्णय असो वा समाजात घडलेली एखादी बरी-वाईट घटना. त्याचे पडसाद सोशल मीडियावर हमखास उमटतात. घटना किंवा निर्णयावर खुमासदारपणे त्याची खिल्ली उडवली जाते. समर्थनात आणि विरोधातील अशा प्रतिक्रियांमुळे अनेकदा वादाचेही प्रसंग उद्भवतात. नुकत्याच लागू केलेल्या मोटर वाहन कायद्यातील नवीन तरतुदींवर खुमासदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रतिक्रियांतून हा तुघलकी कायदा असल्याचे प्रथमदर्शनी नेटकऱ्यांचे मत बनले आहे. 'दोष संपवा, दोषी नाही' असा सल्लाही नेटकऱ्यांनी दिला आहे. सद्यस्थितीत निवडणुकीमुळे याची अंमलबजावणी तात्पुरती थांबली असली तरी याविरषी रोष व्यक्त होत आहे.

देशातील कोणतेही शहर असो, तेथे वाहतूक नियमांचे उल्लंघन नेहमीच होते. नियमांची अंमलबजावणी सर्वांनी करावी असा संकेत असला, तरी बहूतांश वेळा नियम मोडण्याकडे कल असतो. नियम मोडल्यामुळे मोठे अपघात घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे अपघातांना अटकाव आणि नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नुकताच मोटर वाहन कायद्यातील तरतुदींमध्ये बदल करण्यात आला. बदल करताना दंडाच्या रकमेत भली मोठी वाढ केली. त्यावर सर्वत्र तिव्र प्रतिक्रिया आहेत. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी जोरदार टिपणी करत या निर्णयाची खिल्ली उडवली.

अपघातांचे प्रमाण कमी असावे अशी सर्वांचीच धारणा असली, तरी वाहन परवाना, हेल्मट सक्ती, ट्रीपल सीट प्रवास, विमा पॉलिसी किंवा वाहन प्रदूषण प्रमाणपत्रासाठी केलेल्या दंडाबाबत सोशल मीडियातून नाराजी व्यक्त होत आहे. वाहन परवाना देताना वाहनाधकांची होणारी फरपट, विमा पॉलिसीची मोठी रक्कम याद्वारे पिळवणूक होत असल्याचेही नेटकऱ्यांनी दाखवून दिले.

दंड करण्यापेक्षा दंड होणारी कारणेच नष्ट करा असा सल्ला देताना 'हेल्मेट नसल्यास ५०० रुपये घेऊन हेल्मेट द्या, विमा पॉलिसी नसल्यास दंडाची रक्कम घेऊन ऑन दी स्पॉट पॉलिसी द्या, वाहन परवाना नसल्यास जाग्यावरच परवाना द्या' असा सल्ला देताना 'दोष संपवा, दोषी नाही' असा अपरोधिक टोलेबाजीही अनेकांनी केली आहे.

'पगार आहे ८००० रुपये आणि वाहतुकीचा दंड आहे १०००० रुपये. मग हेच का अच्छे दिन' अशी खिल्ली उडवताना अनेकांनी सद्यस्थितीतील महागाईवरही वर्मी घाव घातला आहे. सोशल मीडियात उमटलेल्या या प्रतिक्रिया पाहता सरकारच्या या तुघलकी निर्णयाला विरोध वाढतच जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाल्यांचे लाड पालकांच्या अंगलट

अनेक पालक केवळ आपल्या मुला-मुलीच्या लाडापोटी मोटारसायकल, बाइक घेऊन देतात. कमी वय असताना दिलेल्या वाहनांमुळे अनेकदा अपघातही घडतात. अशा कटू प्रसंगांना अटकाव करण्यासाठी अल्पवयीन ड्रायव्हिंगसाठी पालकांना तब्बल २५ हजारांचा दंड व तीन वर्षांचा कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच ड्रंक अँड ड्राइव्हसाठी दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. नेटकऱ्यांनी इतर तरतुदींवर हल्लाबोल केला असला, तरी या दोन नियमांचे स्वागतही केले आहे. 'पाल्यांचे लाड पालकांच्या अंगलट' अशा स्लोगनमधून अनेकांनी यावर टिप्पणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्षीरसागर यांची यंदा हॅटट्रिक

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राजेश क्षीरसागर यांची आमदारकीची हॅटट्रिक साधून कोल्हापूर उत्तरमधून भगवेच 'उत्तर' द्यायचे, असा निर्धार शिवसेनेच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात करण्यात आला. क्षीरसागर यांना पुन्हा आमदार करण्याची साऱ्यांची तीव्र इच्छा असल्याने ही हॅटट्रिक होणारच असली तरी कोणीही गाफील राहू नये. शेवटपर्यंत ताकदीने प्रयत्न करण्याचेही आवाहन करण्यात आले.

केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये शिवसेनेचा 'लक्ष्य विधानसभा २०१९ निर्धार मेळावा' झाला. त्यामध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन तसेच शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावतीने भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकाडे यांनी सत्कार स्वीकारला. अध्यक्षस्थानी भानुदास यादव महाराज होते.

खासदार मंडलिक म्हणाले, 'लोकसभेच्या निवडणुकीत झालेले मतदान पाहता कोल्हापूर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाले. आमदार क्षीरसागर यांनी केलेल्या कामातूनच उत्तरचे 'उत्तर' दिले आहे. त्यांच्यासमोर कोण उमेदवार अजून ठरलेला नाही. पण शिकार करायचीच असली तरी पूर्ण तयारीने जावे लागते. त्यामुळे पुढील निवडणुकीत आगामी कॅबिनेट मंत्र्याला निवडून देत असल्याचे समाधान शहरवासीयांना मिळणार आहे. क्षीरसागर मंत्री झाले तर शहरातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न निकाली निघतील. लोकसभेच्या मताधिक्यापेक्षाही मोठ्या इर्षेने निवडून देऊन हॅटट्रिक साधावी. त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्य आमदारही युतीचे विजयी करण्याचा निर्धार करू.'

आमदार क्षीरसागर म्हणाले, 'कार्य अहवालात दिलेल्या कामापैकी १० टक्के जरी काम कुणी केल्याचे दाखवले तर आताच निवडणुकीमधून माघार घेतो. दहा वर्षात जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. अनेकजण इच्छूक असतात. पण आता समोर येण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे कुणीतरी घोसाळकरच निवडणुकीला समोर येईल, असे वाटते. युतीतील दोन्ही पक्षामधील मंत्र्यांनी चांगले काम केले आहे. युती होणार असून २५० आमदार निवडून येतील. आगामी काळात रंकाळा तलाव, शहराचा विकास आराखडा, शाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारक, शहरात येणाऱ्या प्रवेश मार्गांचे चौपदरीकरण, अवैध धंदे बंद करण्याचे काम करण्यात येणार आहे. शिवसेनेबाबत कोणतीही चुकीची बाब खपवून घेतली जाणार नसून गद्दारी न करता सदैव पक्षासाठी काम करत राहणार आहे.'

भानूदास यादव महाराज यांनी कार्यकर्त्यांमध्ये असलेली उर्जाच क्षीरसागर यांना तिसऱ्यांदा आमदार करणार आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी साऱ्यांनी उभे रहावे, असे आवाहन केले.

शहराध्यक्ष रविकिरण इंगवले म्हणाले, 'क्षीरसागर यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्याविरोधात कुणी उमेदवार लढण्यास तयार नाही. तरीही प्रत्येक प्रकारची खबरदारी घ्यावी लागणार आहे. क्षीरसागर यांनी महापुरुषांच्या पुतळ्याचे केलेले सुशोभीकरण यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केलेले नाही.' माजी स्थायी सभापती सुनील मोदी म्हणाले, 'खासदारांनी उत्तरचे उत्तर दक्षिणमध्ये पाठवले असल्याने आता उत्तरमध्ये युतीचाच उमेदवार निवडून येणार हे पक्के आहे.'

माजी परिवहन सभापती नियाज खान, भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, ऋतुराज क्षीरसागर, सदानंद कोरगावर, विशाल देवकुळे यांची भाषणे झाली. यावेळी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, प्रतिज्ञा उत्तूरे आदी उपस्थित होते. अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले.

'हॅटट्रिकशिवाय चप्पल नाही'

जुना शिवसैनिक अशी ओळख असलेल्या कमलाकर किलकिले यांनी, 'जोपर्यंत आमदार राजेश क्षीरसागर हे हॅटट्रिक करणार नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही,' असा निर्धार जाहीर केला. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमधून अन्य कार्यकर्त्यांनाही उर्जा मिळत राहील, असे मनोगत अन्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याने गाठली पन्नाशी!

0
0

कोल्हापूर: बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाल्याने भाजी मंडईत दर भडकले आहेत. कांद्याची प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांनी विक्री होत असल्याने पुढच्या काही कालावधीत कांदा ग्राहकांना रडवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मंडईत घेवड्याचा दर प्रतिकिलो ८० रुपयांवर स्थिर आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर वाढू लागले आहेत. प्रतिकिलो २० रुपयांवरुन कांदा गेले काही दिवस ३० रुपये होता. पण अतिवृष्टीमुळे खरीपाचे नुकसान झाल्याने आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर आठवडाभरात दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. मध्यम आकाराचा कांदा ४० रुपये तर मोठ्या आकाराच्या कांद्याची विक्री ५० रुपयाने होत आहे. मोठ्या आकाराच्या कांद्याला हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी आहे.

पावसाची अधूनमधून पडत असला तरी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. पितृपक्षामुळे भाज्यांना मोठी मागणी आहे. दोडका, वरणा यांचा दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपये असून भेंडी ५० ते ६० रुपयांवर स्थिर आहे. चवळी शेंग, श्रावण घेवडा, घेवडा, गवार चा दर प्रतिकिलो ८० रुपयांनी विकला जात आहे. टोमॅटोचा दर घसरला असून प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी विक्री होत आहे. पितृ पंधरवड्यात मोहोर या भाजीला मोठी मागणी असून प्रति ढीग १० रुपयांनी विक्री होत आहे. पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असली तरी मेथी पेंढीचा दर १० ते १५ रुपये आहे. कांदा पात, करडा, शेपू, पालक पेंढींचा दर १० रुपयांवर स्थिर होता.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ६० ते ८०

टोमॅटो : १० ते २०

भेंडी : ५० ते ६०

ढबू : ४०

गवार : ८०

दोडका : ४० ते ६०

कारली : ४०

वरणा : ४०

हिरवी मिरची : ४०

फ्लॉवर : १५ ते ४० (प्रति गड्डा)

कोबी : १० ते २० (प्रति गड्डा)

बटाटा : २० ते २५

लसूण : ८० ते १००

कांदा : ४० ते ५०

आले : १००

मुळा : १२ ते १५ (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १० ते १५

कांदा पात : १०

कोथिंबीर : १० ते २०

पालक : १०

शेपू :१०

करडा : १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १२० ते १४०

डाळिंब : ६० ते ८०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारांबाबत सेना निर्णय घेईल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवसेनेचे खासदार काँग्रेसच्या व्यासपीठावर उपस्थित राहतात हे प्रथमच पाहत आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे खासदारांच्या कृतीबाबत शिवसेना पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील,' अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर निशाना साधला. 'मी भाजपमध्ये असून भाजप शिवसेना युती झाल्यास पक्षाच्या आदेशाप्रमाणे शिवसेना उमेदवारांचा प्रचार करणार आहे, ' असे त्यांनी स्पष्ट केले.

महाजनादेश यात्रेसंदर्भात भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या मेळाव्यात खासदार मंडलिक उपस्थित होते, याबाबत काय सांगाल? या प्रश्नांवर त्यांनी मंडलिक यांच्यावर टीका केली. 'भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम केले जाईल. यापुर्वी धनंजय महाडिक युवाशक्ती, भागिरथी महिला मंचसह अन्य संघटनेच्यावतीने कार्यरत होते. यापुढे पक्ष जो आदेश देईल, त्याप्रमाणे काम केले जाईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपमध्ये माझा प्रवेश झाला असला तरी अनेकजण माझ्यासमवेत पक्षात प्रवेश करणार आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनादेश यात्रेत व्यस्त असल्याने तुर्तास पक्षप्रवेश करणारे थांबले आहेत. ताराराणी आघाडीचे नगरसेवक, काही पक्षांचे पक्षप्रमुखही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.' असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज कृतज्ञता सोहळा

0
0

कोल्हापूर: ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामध्ये मदत केलेल्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, नगरसेवकांचा महापालिकेच्यावतीने कृतज्ञता सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे. सोमवारी (ता. १६) सकाळी साडेदहा वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे. यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचाही सत्कार करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामध्ये अनेकांनी मदतीचा हात दिला. तर पूर ओसरल्यानंतर शहर स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला. या सर्व घटकांचा सत्कार महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महापौर माधवी गवंडी व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजनादेश यात्रा आज कोल्हापुरात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे आज सोमवारी (ता. १६) कोल्हापुरात आगमन होणार आहे. सांगलीतील कोल्हापुरात येताना अंकली पुलावर त्यांचे स्वागत होणार असून इचलकरंजीत सभा होणार आहे. मंगळवारी शहरातून यात्रा काढण्यात येणार असून कळंबा, इस्पुर्ली, मुधाळतिट्टा आणि राधानगरीत छोट्या सभा होणार आहेत. महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे,' अशी माहिती भाजपचे महानगरअध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, 'सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, पलूस, तासगाववरून अंकली पुलावर मुख्यमंत्री फडवणीस यांचे जिल्ह्यात आगमन होणार आहे. जयसिंगपूर येथे विक्रमसिंह मैदानात छोटी सभा होणार असून साडेपाच वाजता इचलकरंजीत थोरात चौकात मोठी सभा होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. इचलकरंजीतील सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री रात्री साडेआठ वाजता ताराराणी चौकात येणार आहेत. तेथे छोटी सभा झाल्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी त्यांचा मुक्काम कोल्हापुरात असेल.

मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता ताराराणी चौकातून महाजनादेश यात्रेस सुरुवात होणार असून दाभोळकर कॉर्नर, व्हिनस चौक, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, आझाद चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, गोखले कॉलेज, ध्यानचंद हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, आयटीआय मार्गे कळंबा येथे जाणार आहे. यात्रा मार्गात चौकाचौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. रॅलीच्या पुढे कार्यकर्त्यांची मोटारसायकल रॅली असेल. यात्रेत अंदाजे २० ते २५ हजार नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. कळंबा येथे मुख्यमंत्र्यांची छोटी सभा होणार आहे. त्यानंतर ते इस्पुर्ली, शेळेवाडी मार्गे मुधाळतिट्टा, सोळांकुरातून राधानगरीला जाणार आहेत. इस्पुर्ली, मुधाळतिट्टा, राधानगरीत छोट्या सभा होणार आहेत. राधानगरीतून महाजनादेश यात्रा कोकणात जाणार आहे.'

पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, बाबा देसाई, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, संतोष भिवटे आदी उपस्थित होते.

लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे

'केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा जनतेला लाभ झाला आहे. या लाभार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाजनादेश यात्रेस उपस्थित रहावे,' असे आवाहन माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले. 'महानगरपालिका, नगरापालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना सरकारने मदत केली आहे. तसेच पालकमंत्र्यांनी शहरातील मंडळे आणि तालमींना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्यांनीही यात्रेस उपस्थित रहावे,' असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री जाणार औरंगाबादला

मुख्यमंत्र्याचा सोमवारी कोल्हापुरात मुक्काम असेल. पण त्यांचा औरंगाबादला एक कार्यक्रम असल्याने मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता ते कोल्हापुरातून बेळगावला जाणार आहेत. बेळगावहून ते विमानाने औरंगाबादला जाणार आहे. औरंगाबादचा कार्यक्रम आटोपून ते परत ११ वाजता कोल्हापुरात येणार आहेत. कोल्हापुरातून साडेअकरा वाजता पुन्हा जनादेश यात्रेस सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images