Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोयनेतून विसर्ग बंद

$
0
0

कोयनेतून विसर्ग बंद

कराड :

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर घटल्याने कोयना धरणाच्या सहाही वक्र दरवाजांतून विनावापर सोडण्यात येणारे पाणी मंगळवारी बंद करण्यात आले. सध्या केवळ पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत घट होऊन विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. धरणात सरासरी 22 हजार 162 क्युसेकने पाणी येत आहे. धरणात सध्या १०३.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

$
0
0

रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत पंढरपुरात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुदैवी घटना सोमवारी रात्री उशिरा येथील नवीन बसस्थनाकाजवळील रेल्वे ट्रॅकवर घडली. सकाळी रेल्वे ट्रॅकवरुन जाणाऱ्या काही लोकांनी ही घटना पाहिल्यानंतर अपघात झाल्याचे समोर आले. सोमवारी परिवर्तिनी एकादशी होती. एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी आले होते. विठ्ठल दर्शनासाठी आलेले बाहेरगावचे भाविक असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. एका व्यक्तीच्या हाताच्या मनगटावर विठ्ठल-रुक्मिणीचे चित्र गोंदण्यात आले आहे. या वरून ते भाविक असावेत, असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णा भिमाचे पाणी मराठवाड्याला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या महिन्यात आलेल्या महापुराची परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ नये, यासाठी कृष्णा - भीमा स्थिरीकरण जलनियोजन प्रकल्पांतर्गत पावसाळ्यातील अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी पुणे विभागाच्या दुष्काळी जिल्ह्यात आणि विदर्भात नदीजोडव्दारे वळवण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण जागतिक बँकेच्या पथकातील अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. मंगळवारी पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाने राधानगरी धरणस्थळावर हा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावासह विविध पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ यांनी नदीजोड प्रकल्पासाठी २७ हजार कोटी रूपये आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले.

जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापूर आल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्तांना मदत करणे, पुनर्वसन आणि पुन्हा पूर येऊ नये यासाठीच्या उपाययोजनांसाठी महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेकडे पैसे मागितले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जागतिक बँक व्यवस्थापनातील अधिकारी राज सिंग, रंजन सामंतराय, युकिया टानका, आय जसब्रान्ड, विजयशेखर कदलकोंडा यांच्या पथकाने राधानगरी धरणास भेट दिली. तेथील विश्रामगृहातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. बैठकीत अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ यांनी धरणांतील पाण्यामुळे महापुरात भर पडू नये, यासाठी काय केले पाहिजे, यासंबंधी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, 'कृष्णा -भीमा खोऱ्यांत कुंभी, कासारी, कडवी, वारणा, कोयना, कृष्णा, निरा धरणे आहेत. पावसाळ्यात ही धरणे भरल्यानंतर नद्यांव्दारे पाणी कर्नाटकात जाते. नद्यांना पूर येतो. धरणक्षेत्र आणि परिसरात अतिवृष्टी झाल्यास महापूर येतो. हे टाळण्यासाठी या खोऱ्यातील नद्यांचे वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात वळवण्याच्या प्रस्तावास २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. पाईपलाईनव्दारे नद्या जोडत सायफन पध्दतीने हे पाणी नेता येवू शकते.'

जागतिक बँकेचे अधिकारी सामंतराय म्हणाले, 'नदी जोड प्रकल्प चांगला आहे. मात्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहे. यामुळे पुढच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यास पूर येऊ नये, यासाठी काय केले पाहिजे, याचा प्रस्ताव तयार करा. यासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी मुरण्यासाठी छोटे बंधारे घ्यावेत. धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन करावे. पूरबाधित घरांचे पूररेषेबाहेर पुनर्वसन करावे.' बँकेचे अधिकारी कदलकोंडा यांनीही नदीजोड प्रकल्पासंबंधी अनेक शंका, आक्षेप नोंदवले. नद्यांव्दारे जाणारे पाणी शेवटपर्यंत किती पोहचेल, असा प्रश्न उपस्थित केला.

...

लवादाचे आक्षेप

कृष्णा- भीमा खोऱ्यांतून उजनी प्रकल्पाव्दारे मराठवाड्यात पाणी नेण्यासाठीच्या प्रकल्पासाठी २७,००० कोटींची गरज आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्य सरकारच्या पाणी वाटपाचा मुद्दा अडचणीचा ठरणार आहे. यावरूनच या प्रकल्पास कृष्णा पाणी वाटप लवादाने आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीवरही या प्रकल्पाची यशस्विता अवलंबून आहे. हे मुद्दे जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थित केले. यामुळे तातडीने करण्यासारखे उपाय सुचवावेत, असे त्यांनी सांगितले.

...

२१० किलोमीटरची पाइप

' कुंभी, कासारी, कडवी, वारणा, कोयना, कृष्णा, भीमा, उजनी नदी जोड करण्यासाठी २१० किलोमीटरची पाइपलाइन टाकावी लागणार आहे. नैसर्गिक उतारावरून पाइप टाकत नद्या जोडून पाणी विसर्ग पुढे नेण्यात येणार आहे. याामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील धरणांतील पाण्यामुळे येणारा महापूर टाळता येईल. दुष्काळी भागातील ५ लाख हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. पाच जिल्ह्यातील कमी पावसाच्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल', असे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, रोहीत बांदिवडेकर यांनी सांगितले.

...

नवीन दरवाजे तयार करा

राधानगरी धरणातील पाण्यामुळे कोल्हापूर, शिरोळ तालुक्यात पूरस्थिती गंभीर होते. स्वयंचलित दरवाजे असल्याने या धरणातील पाणी पातळीचे नियोजन करता येत नाही. धरण हेरीटेज आहे. स्वयंचलित दरवाजे काढून काहीही करता येत नाही. यामुळे स्वयंचलित दरवाजाजवळ नविन दरवाजे तयार करा. त्यातून पाहीजे त्यावेळी पाण्याचा विसर्ग करून पूर नियंत्रणात आणता येईल', असे जागतिक बँकेचे अधिकारी सामंतराय यांनी सुचवले. असे दरवाजे तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार केल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले.

...

मुख्यमंत्र्यासमवेत उद्या चर्चा

जागतिक बँकेच्या पथकाने केलेली पाहणी, पाटबंधारे विभागाने सादर केलेला नदी जोड प्रकल्पाचा प्रस्ताव यावरील अंतिम अहवाल १२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करण्यात येईल. तेथे पूरनियंत्रणासाठीच्या दीर्घकालीन उपाययोजनांसाठी किती निधी आवश्यक आहे, जागतिक बँक पैसे किती देऊ शकते, हे स्पष्ट होईल, असे पूरबाधितांच्या पुनर्वसनाचे पालकत्व असलेले मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानीचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या महिन्यातील महापुरामुळे नुकसान झालेल्या विविध ठिकाणाची पाहणी जागतिक बँकेच्या पथकाने मंगळवारी केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातीत पथकाने नुकसानीचा आढावा चित्रफितीद्वारे घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर जिल्हा तर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी जिल्ह्यातील नुकसानीची सविस्तर माहिती दिली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बँकेचे अधिकारी अनुप कारनाथ, पियुष शेखसारिया, पूनम अहलुवालिया, राज सिंग, रंजन सामंतराय, युकिओ टानका, आय जसब्रान्ड, विजयशेखर कलदकोंडा, इदुआर्दो फेरइरा यांच्यासह एशियन बँकेचे प्रतिनिधींचे पथक सकाळी ११ वाजता दाखल झाले. या पथकासोबत झालेल्या बैठकीत भविष्यामध्ये महापूर आल्यास नुकसान होणार नाही, पूरबाधित गावांचे पुनर्वसन करणे, राधानगरी धरणांचे स्वयंचलित दरवाजांबरोबरच नवीन हायड्रोलिक दरवाजे बसविणे, अपूर्ण धामणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची गरज असल्याचे देसाई यांनी सांगितले.

बैठकीत महापूर आलेल्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाची आणि पूरग्रस्त भागातील रस्त्यांची उंची वाढवणे, आवश्यक त्याठिकाणी उड्डाण पूल बांधणे, महावितरणचे ट्रान्सफार्मर उंचावर बसवणे, अंशत: तसेच पूर्णत: बाधित झालेल्या घरांची पुनर्बांधणी करणे, धरण क्षेत्राच्या खाली रेनगेज नेटवर्क उभारणे यावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त ठिकाणच्या उपाययोजना, पुनर्वसनाची माहिती दिली.

यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह पाटबंधारे विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसागर रस्त्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या अनेक दिवसांच्या जोरदार पावसाने उघडीप घेतल्याने लाडक्या गणरायाचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी मंगळवारी रस्त्यांवर जनसागर लोटला. राजारामपुरीतील तांत्रिक देखावे, शिवाजी चौकातील गणपती दर्शनासाठी लागलेल्या भल्या मोठ्या रांगा, जुना बुधवार आणि शनिवार पेठेतील सामाजिक आशयावरील देखावे, मंगळवार पेठेतील कलात्मक मूर्ती आणि शिवाजी पेठेत मोजकेच जिवंत देखावे पाहण्यसाठी तुडुंब गर्दी झाली.

महापुराच्या विध्वंसामुळे अनेक मंडळांनी साधेपणाने गणेशत्सोव साजरा केला असला तरी मोजक्याच व परंपरा टिकवणाऱ्या मंडळांनी देखाव्याची मांडणी केली आहे. गेले दहा दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली होती. देखावे सुरू होऊनही गेल्या दोन दिवसांत सायंकाळी आणि रात्री दमदार पावसामुळे भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले होते. पण मंगळवारी पावसाने उघडीप दिल्याने सात वाजल्यापासून नागरिक रस्त्यांवर उतरले.

राजारामपुरीत देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने मुख्य मार्ग बंद केला होता. विद्युत रोषणाईने नटलेली काल्पनिक मंदिरे आणि तांत्रिक देखावे पाहण्यासाठी भाविक मंत्रमुग्ध झाले होते. जय शिवराय तरुण मंडळाचा 'वीर हनुमान' आणि मराठा तरुण मंडळाचा 'रामभक्त हनुमान' हे देखावे नागरिकांचे हॉट स्पॉट ठरले होते. रस्त्यांच्या दोन्ही भोवती खाद्य पदार्थाचे स्टॉल लागल्याने मुख्य रस्ता फूड मॉल झाला होता. चटकदार पदार्थाावर ताव मारत नागरिकांकडून खेळणी, इमिटेशन ज्वेलरी खरेदीत मोठी उलाढाल झाली. यंग जनरेशनच्या घोळक्यांनी मुख्य रस्त्या आणखीन तरुण झालेला पहायला मिळाला. सहकुटुंब देखावे पाहण्याऱ्यांची संख्याही मोठी होती.

शिवाजी चौकातील महागणपती आणि संयुक्त शिवाजी चौकातील भव्य दिव्य गणेशाचे रुप डोळ्यात साठवताना भाविकांचे हात आपोआप जोडले जात होते. गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या काही वर्षांत शनिवार पेठ आणि जुना बुधवार पेठेतील मंडळांनी देखावे पाहण्यासाठी नागरिकांना खेचले आहे. छोट्या मोठ्या गल्लीतील देखावे पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होता. या देखाव्यावर महापुराचे प्रतिबिंब पहायला मिळाले. पूरग्रस्तांना वाचवण्याऱ्या गणेशाची अनेक रुपे पाहण्यासाठी बच्चे कंपनीची धडपड होती. मोबाइलवर फोटो घेण्यासाठी अनेकजण धडपडत होते. डांगे गल्ली तरुण मंडळ, सोल्जर ग्रुप, न्यू अमर तरुण मंडळ, गिरणी कॉर्नर मित्र मंडळाचे देखावे आकर्षण ठरले.

संभाजीनगर तरुण मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. मंगळवार पेठेतील कलकल तरुण मंडळ, गडगडाट तरुण मंडळ, पद्मावती तरुण मंडळाच्या मूर्ती पाहण्यासाठी दर्दी नागरिकांनी गर्दी केली होती. आज अनेक ठिकाणी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले असल्याने प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. पुलाव, तुपातील शिरा आणि मसाले दूधाचे वाटप सुरू होते. रात्री उशिरापर्यंत राजारामपुरीसह शनिवार पेठ, बुधवार पेठेला जाग होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपासमोर निदर्शने

$
0
0

कोल्हापूर: 'रमाई आवास योजनेतंर्गत महापालिका हद्दीतील झोपडपट्टीतील बांधकामांना सरकारी नियमानुसार परवानगी द्यावी.' या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. मगणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले. देसाई यांनी संबंधित विभागाशी चर्चा करुन मार्ग काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. झोपडपट्टीबाबत राज्य सरकार व महापालिकेने घेतलेल्या निर्णयाची कागदपत्रे सादर करत अतिरिक्त आयुक्त देसाई यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. चर्चेनंतर देसाई यांनी आयुक्त, नगररचना, उपशहर अभियंता यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी राजन पिडाळकर, केशव लोखंडे, धनाजी सकटे, डॉ. प्रगती चव्हाण, अश्विनी नाईक, संभाजी लोखंडे, प्रफुल्ल कांबळे, दिलीप कांबळे यांच्यासह झोपडपट्टीतील रहिवासी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११०० कोटींचा आराखडा

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरात झालेले नुकसान आणि भविष्यातील उपाययोजनांसाठी ११०० कोटींची आवश्यकता असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागतिक बँकेच्या पथकाला मंगळ‌वारी दिली. पथकासमोर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसान व भविष्यातील उपाययोजनाबाबतचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पथकांने शहरात विविध ठिकाणी पाहणी केली.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात महापूर आला. पंचगंगा नदीचे पाणी निम्म्या शहरात आल्याने महापालिकेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचे पथक शहरात आले आहे. पथकातील सात अधिकाऱ्यांची तीन पथकामध्ये विभागणी करण्यात आली. पथकातील पूनम अहलुवालिया, मानसी नानावटी, पियुष रामकृष्णन यांनी शहरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, अरुणकुमार गवळी, रामचंद्र गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.

पथकाने शिंगणापूर जॅकवेल, कळंबा फ्लिटर हाऊस, दुधाळी एसटीपी प्लांट, शिवाजी पूल, मुस्लिम बोर्डिंग, शाहूपुरी कुंभार गल्ली, दुधाळी नाला, रेणुका मंदिर आदी परिसराची पाहणी केली. तत्पुर्वी शहर अभियंता सरनोबत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पथकासमोर नुकसानीचे सादरीकरण केले. पुढील काळात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. महापुरातून सावरण्यासाठी ११०० कोटींची आवश्यकता आहे. भविष्यात अशी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास ५०० कोटी तर स्ट्रॉम वॉटरसाठी ४०० कोटीची आवश्यकता असल्याचे पथकाला सांगितले.

मूर्तींची खरेदीच नाही

शाहूपुरी कुंभार गल्ली येथे पथकाने पाहणी केली. पाहणी दरम्यान कुंभार गल्लीत मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती आढळून आल्या. याबाबत आयुक्तांनी कारागिरांशी गणेश मूर्ती अद्याप शिल्लक कशा? अशी विचारणा केली. त्यावेळी पुरामुळे भाविकांनी मूर्ती खरेदी केली नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पथकाला पुराची दाहकता लक्षात आली. त्यानंतर पथकांने येथील अनेक कुटुंबांसमवेत चर्चा करुन पुरपरिस्थितीची माहिती घेतली.

यासाठी आवश्यक निधी

खराब रस्ते दुरुस्तीसाठी

उद्यानांची पुन्हा उभारणी

मनपा शाळा इमारतींची डागडुजी

शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी उपसाकेंद्रे नव्याने उभे करणे

ड्रेनेज व पाइपलाइन नव्याने टाकणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ : आकर्षक

$
0
0

लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती पूलगल्ली तालीम मंडळ : २१ फुटी गणेश मूर्ती श्री स्वयंभू गणेश मित्र मंडळ कोंडाओळ : आकर्षक गणेशमूर्ती शिवशाही मित्र मंडळ कोंडाओळ : आकर्षक गणेश मूर्ती भगवा ग्रुप तरुण मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती सत्यनारायण मित्र मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती गाईड मित्र मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागतिक बँकेकडे ३२ हजार ९०० कोटींची मागणी

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे, पुनर्वसन, सार्वजनिक मालमत्तेची पुर्नउभारणी आणि महापूर नियंत्रणासाठी पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी जागतिक बँकेकडून ३२ हजार ९०० कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने कर्ज म्हणून केली आहे. यामध्ये सर्वाधिक २७ हजार कोटी कृष्णा - भीमा स्थिरीकरण जलनियोजन प्रकल्पातून दुष्काळी भागात पाणी वळण्यासाठी मागण्यात आले आहे. यावर प्राथमिक निर्णय आज, गुरूवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत होणार आहे.

महापुरामुळे जिल्ह्यात ५ हजार कोटींवर नुकसान झाले आहे. करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडीसह शिरोळ तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. एक लाख २ हजार ७४३ कुटुंबे बाधीत झाली, तर ४१ हजार घरांची पडझड झाली आहे. शहर आणि जिल्ऱ्यातील १५ हजार २९९ किलोमीटर रस्त्यांची वाट लागली. विविध ठिकाणचे ९८ पूल धोकादायक बनले आहेत. महापुराचे पाणी आल्याने राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता. यामुळे पाणी आलेले ठिकाण उंच करावे लागणार आहे. अशी एकूण १२ किलोमीटरची उंची वाढवावी लागणार आहे. शिरोळ तालुक्यात कुरूंदवाड, मजरेवाडी, हेरवाड, बस्तवाड, अकिवाट गावांशी संपर्क तूटू नये, यासाठी फ्लायओव्हर ब्रीज प्रस्तावित केले आहेत. यापुढे महापूर आला तर नुकसान होऊ नये, झाले तर कमी व्हावे, यासाठीच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

अतिवृष्टी झाल्यानंतर धरणातील विसर्गामुळे पूरस्थिती गंभीर होऊ नये, यासाठी ११५ टीएमसी पाणी दुष्काळी भागाला वळवण्याच्या पूर्वीच्या प्रस्तावाला पुन्हा पुर्नजिवित करण्यात आले आहे. यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणातील निधी राज्य सरकार उपलब्ध करू शकत नाही. यामुळे सरकारने जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन पूरबाधित भागात कामे करण्याचे नियोजन केले आहे. सरकारकडून कर्जाची मागणी केल्यानंतर मंगळवारी जागतिक बँकेच्या पथकाने पूरबाधित ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांच्याकडे जिल्हा प्रशासनाने तयार केलेला ३२ हजार ९०० कोटींचा कर्जाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावावर सरकारशी ते चर्चा करतील. देण्यात येणाऱ्या कर्जाची परफेड सरकार कशी करणार, किती वर्षानी करणार यासंबंधी धोरणात्मक निर्णय स्पष्ट केल्यानंतर बँक मागितलेल्यापैकी किती कर्ज द्यायचे याचा निर्णय घेणार आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आठवडाभरात सुरू होणार आहे. त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते सक्रिय असतील. तोपर्यंत कर्जाच्या प्रस्तावाचा ठोस पाठपुरावा कोण करणार असा प्रश्न निर्माण होणार आहे.


पडझड झालेल्या घरांची पुर्नबांधणी : ५५४ कोटी ६५ लाख

पुराचे पाणी वळवणे आणि धरणांची दुरूस्ती : २७ हजार ८१२ कोटी

खराब रस्ते दुरूस्त, पुर्नबांधणी करणे, पुलांची उंची वाढवणे : ३ हजार २८९ कोटी

वीज वितणरण व्यवस्था दुरूस्ती करणे, पूर आल्यास वीज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठीचे उपाययोजना करणे : ९८३ कोटी

शेतीचे आणि भूस्खलनाने नुकसान झालेल्यांना भरपाई देणे : २६० कोटी



'जागतिक बँकेकडे कर्ज प्रस्ताव दिला आहे. त्यांचे पथक पूरबाधित क्षेत्राची पाहणी करून गेले असून ते कर्जाचा प्रस्ताव प्राथमिक मान्यतेसाठी सरकारकडे ठेवतील. सरकार आणि जागतिक बँकेने मान्यता दिल्यानंतर कर्जाचे पैसे मिळण्यासाठीची पुढील प्रक्रिया सुरू होईल.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी



प्रत्यक्ष कर्ज मिळण्यास विलंब

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज मंजुरीची रक्कम जागतिक बँकेकडून मिळण्यास विलंब लागणार आहेत. तोपर्यंत आवश्यक कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केंद्र सरकारकडून ५०० कोटी अनुदानाची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून त्वरीत निधी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजकीय वजन वापरण्याची गरज ठळक बनली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जनासाठी सज्जता

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या ११ दिवसांपासून चैतन्याची उधळण करणाऱ्या लाडक्या, विघ्नहर्ता गणरायाला गुरुवारी भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात येणार आहे. विसर्जन सोहळ्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह भक्तांची तयारी पूर्ण झाली आहे. तर विसर्जन व्यवस्थित करता यावे यासाठी महापालिकेची यंत्रणाही सज्ज आहे. विसर्जन मार्गावर ३००० हजार पोलिसांची करडी नजर असेल. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीचा वॉचही राहील.

गुरुवारी, अनंत चतुर्दशीदिवशी सकाळी नऊ वाजता खासबाग मैदान येथे मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशमूर्तीचे महापौर माधवी गवंडी यांच्या हस्ते पूजन होईल. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल. महापालिकेने सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी पापाची तिकटी येथे कक्ष उभारला आहे. महापौर गवंडी, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह पदाधिकारी तेथे उपस्थित राहतील. श्रीफळ, पान, सुपारी, रोप देऊन स्वागत केले जाणार आहे. विसर्जन मार्गावर अन्य संस्था, संघटना, राजकीय पक्षांनीही स्वागत कक्ष उभारले आहेत.

गणेशमूर्तींचे इराणी खणीमध्ये विसर्जन व्हावे यासाठी महापालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पवडी, आरोग्य व ड्रेनेज विभागाच्या ६०० कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती केली आहे. ७० ट्रॅक्टर-ट्रॉली, १२ डंपर, आठ जेसीबी, चार अँम्ब्युलन्स व दोन पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि विद्युत विभागाचे दोन बूम अशी यंत्रणा येथे आहे. मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. मार्गावर लाकडी आणि लोखंडी बॅरिकेड्स, वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर अडथळा ठरणाऱ्या सर्व झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यात आली आहे.

पंचगंगा नदी घाटासह राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, बापट कॅम्प, इराणी खण येथ गणेशमूर्ती संकलनाकरिता मंडप उभारण्यात आले आहेत. इराणी खणीवर सार्वजनिक मूर्ती विर्सजनासाठी दोन जेसीबी आहेत. विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतींभोवती बॅरिकेड्स उभारले आहेत. नागरिकांनी अशा इमारतीच्या परिसरात अगर इमारतीमध्ये प्रवेश करु नये, असेही आवाहन महापालिकेने केले आहे. अग्निशमन दलामार्फत विसर्जनाच्या पाच ठिकाणी दक्षता पथक, सुरक्षा गार्डसह साधनसामुग्री ठेवली आहे. पावसामुळे नदीची पाणीपातळीत वाढली असल्याने सार्वजनिक मंडळांनी मूर्तींचे विसर्जन नदीमध्ये न करता इराणी खणीत करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या बेस्ट ऑफ प्लेस डॉट कॉम वेबसाइटला पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विविध प्रांतातील लोकप्रिय वस्तूंची ऑनलाइन खरेदी एका क्लिकवर करता यावी यासाठी कार्यरत असलेल्या कोल्हापुरातील www.bestofplace.com या वेबसाइटला मराठी अर्थविषयक मासिक 'अर्थसंकेत'च्या डिजिटल इंडिया २०२० कार्यक्रमांमध्ये इनोव्हेटिव्ह ई कॉमर्स वेबसाइट हा पुरस्कार देण्यात आला. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सुधीर म्हात्रे यांच्या हस्ते वेबसाइटचे संचालक हर्षवर्धन भुरके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बेस्ट ऑफ प्लेस या वेबसाइटची माहिती देताना भुरके म्हणाले, 'देशातील विविध ठिकाणच्या प्रसिद्ध वस्तू जगातील असंख्य ग्राहकांना उपलब्ध करून देणाऱ्या या वेबसाइटने वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध ठिकाणच्या प्रसिद्ध साड्या, दागिने, चादर, घोंगडे, देवांचे फोटो, देवांच्या मूर्ती व इतर वस्तूंची विक्री वेबसाइट वर होत आहे.' यावेळी नवीन तंत्रज्ञान व ई-कॉमर्स या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक अर्थसंकेतच्या अमित बागवे यांनी केले. रचना बागवे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंच मूर्तीचे विसर्जन इराणी खाणीत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पंचगंगा नदीची पाणीपातळी अद्याप कायम असल्याने गणेशमूर्ती विसर्जनासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे १३ फुटांपासून पुढे उंच गणेशमूर्तीचे विसर्जन सार्वजनिक गणेश मंडळांनी क्रशर चौकातील इराणी खणीत करावे. पंचगंगा नदीवर विसर्जनाचा अधिक ताण न देता परिसरातील तलावात करावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले.

अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, 'पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी सुमारे ३९ फुटांपर्यंत आहे. दरवर्षी मंडळांकडून पारंपारिक पद्धतीने पंचगंगा नदीत मूर्तीचे विसर्जन केले जाते. सध्या पाणीपातळीची स्थिती पाहता नदीवर मोठ्या मूर्तीचे विसर्जन धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सुमारे १३ फुटांपर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीवर शक्य आहे. त्यापुढील उंच मूर्तींसह एकवीस फूटी मूर्तींचे विसर्जन कोल्हापूर-राधानगरी रोडवरील इराणी खाणीत करावे. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी सुमारे चार हजारांवर पोलिस तैनात केले आहेत. ५५० विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ते पोलिसांना सहकार्य करणार आहेत. इचलकरंजी शहरातही नदीची पाणीपातळी कायम आहे. त्यामुळे येथील मंडळांनी परिसरातील खाणीत विसर्जन करावे.'

अधीक्षक देशमुख म्हणाले, 'सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांसह होमगार्ड, स्वयंसेवक, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या, बॉम्ब शोधक पथक असेल. मुख्य मार्गावर मिरवणूक रेंगाळणार नाही याची दक्षता घेतली जाईल. त्यासह उच्च ध्वनियंत्रणा रस्त्यावर आणल्यास तत्काळ जप्तीची तयारी पोलिसांनी केली आहे. अखेरपर्यंत पोलिसांचा मिरवणुकीवर वॉच राहणार आहे. विसर्जन मार्गावर २०० सीसीटीव्ही बसविले आहेत. सायबर चौकापासून ते पंचगंगा नदी, इराणी खण यांसह प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. महापालिकेने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांचे लक्ष असेल. हुल्लडबाजांवर कारवाई केली जाणार असून मिरवणूक रेंगाळण्यास कारणीभूत ठरणारे, विनाकारण वाद घालणाऱ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे. विसर्जन मार्गावर टेहळणी पथके, छेडछाडविरोधी पथके तैनात केली जातील.'

बंदोबस्त असा

पोलिस अधीक्षक

अपर अधीक्षक

उपअधीक्षक

४५

निरीक्षक

१०२

उपनिरीक्षक, एपीआय

२५०

कॉन्स्टेबल

१२००

होमगार्ड

३००

स्वयंसेवक

३ तुकड्या

राज्य राखीव दल

बॉम्ब शोधक पथक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉँग्रेसमध्ये मिळणार तरुणांना संधी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलल्याने जिल्हा कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. प्रकाश आवाडे कॉँग्रेसमधून बाहेर पडताच कार्यकारिणीतील त्यांच्या समर्थकांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. काही पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे रिक्त होणाऱ्या जागांवर तरुणांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. यानिमित्ताने तब्बल २१ वर्षांनी कार्यकारिणीत बदल होणार आहेत.

खासदार शरद पवार १९९९ मध्ये कॉँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी जिल्हा कॉँग्रेस कमिटीची पुनर्रचना झाली. जिल्हाध्यक्षापासून सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. तेव्हा जिल्हाध्यक्षपदी पी. एन. पाटील यांची निवड झाली, तर शहराध्यक्षपदी प्रल्हाद चव्हाण यांची निवड झाली. जिल्हा कार्यकारिणीमध्ये पदाधिकाऱ्यांसह ३१ सदस्यांची निवड केली होती. यात जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांचाही समावेश होता. कार्यकारिणीवर वर्णी लागली तरी, प्रत्यक्षात मात्र काही मोजकेच चेहरे जिल्हा कॉँग्रेस कमिटीत सक्रीय होते. ही स्थिती आजपर्यंत कायम आहे. जिल्हाध्यक्षांच्या गटाचे सदस्य सोबत असतात. अन्य नेत्यांचे समर्थक पदाधिकारी बैठकांसाठी फिरकत नाहीत, असा प्रघात कॉँग्रेसमध्ये आजही कायम आहे.

जिल्हाध्यक्षपदी प्रकाश आवाडे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. इच्छुकांच्या नावांची एक यादी तयार केली होती. ती यादी प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली होती. मात्र, प्रदेश पातळीवर नेतृत्वाच्या अस्थिरतेमुळे नवीन कार्यकारिणीची घोषणा झालीच नाही. यानंतर आवाडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडल्याने त्यांचे समर्थकही अस्वस्थ आहेत. सध्याच्या कार्यकारिणीत असलेले जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सातपुते यांच्यासह पाच ते सहा सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. रिक्त होणाऱ्या जागांवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. निवडणुकीपूर्वी नवीन कार्यकारिणी जाहीर केल्यास याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो. यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील कार्यभार घेताच नवीन कार्यकारिणी तयार करण्यास प्राधान्य देणार आहेत. यासाठी त्यांनी जुन्या कार्यकारिणीची यादी मागवून घेतली आहे. या कार्यकारिणीत प्रकाश सातपुते, एस. के. माळी, आदींचा समावेश आहे.

नवीन कार्यकारिणीमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यात जिल्हाध्यक्ष आमदार पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळू शकते. करवीरमधून युवराज गवळी, शशिकांत खोत, भुजगोंडा पाटील, चंदगडमधून विद्याधर गुरबे, भुदरगडमधून सत्यजित जाधव, गगनबावड्यातून भगवान पाटील, बजरंग पाटील, हातकणंगलेतून माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या समर्थकांना संधी मिळणार आहे. आजऱ्यातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनाही जिल्हा कार्यकारिणीत संधी मिळू शकते. यात बहुतांश चेहरे तरुण आणि सतेज पाटील गटात सक्रीय असलेले आहेत. इचलकरंजीत शहराध्यक्ष पदासह कार्यकारिणीवर काम करण्यासाठी इच्छुकांनी जिल्हाध्यक्षांकडे फिल्डिंग लावली आहे.

प्रदेश कार्यकारिणीवरही संधी

सध्याच्या प्रदेश कार्यकारिणीत प्रकाश सातपुते आणि तौफिक मुल्लाणी यांचा समावेश आहे. यापैकी प्रकाश सातपुते सध्या आ‌वाडे गटासोबत आहेत. यामुळे त्यांची जागा रिक्त होण्याची शक्यता असल्याने त्या जागेवर नव्याने निवड होऊ शकते. यासाठी महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्यासह अन्य नावांची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा आठवड्यात फैसला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध मतदारसंघांतील इच्छुकांच्या उमेदवारीचा फैसला पुढील आठवड्यात होणार आहे. प्रदेश राष्ट्रवादीकडून इच्छुकांना बैठकीचे निरोप मिळाले आहेत. गणेशोत्सव संपल्यानंतर चार दिवसांत मुंबईत बैठक होणार आहे. त्या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या निवडणुकीची रणनिती ठरण्याचे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी तीसहून अधिक जणांनी मुलाखती दिल्या होत्या. मात्र, आघाडी धर्मानुसार राष्ट्रवादीला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून कोल्हापूर उत्तर, कागल, राधानगरी भुदरगड, चंदगड आणि शिरोळ या पाच मतदारसंघांवर दावा केला आहे. मातब्बर नेत्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी, चंदगड व शाहूवाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे तळ्यातमळ्यात, ठिकठिकाणची गटबाजी अशा समस्यांनी पक्षाला ग्रासले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभेसाठी आघाडी निश्चित आहे. राष्ट्रवादीतर्फे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात इच्छुकांच्या मुलाखती झाल्या होत्या. पक्ष निरीक्षक व आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या होत्या. शाहूवाडी आणि राधानगरी मतदारसंघांतील उमेदवारीवरून पक्ष निरीक्षकांसमोर मतभेद निर्माण झाले होते.

पक्षाकडून कागलमधून आमदार हसन मुश्रीफ, शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यंदाची निवडणूक लढवायची म्हणून दोघांनीही तयारी सुरू केली आहे. यामुळे राधानगरीतील उमेदवारीचा तिढा कायम आहे. कोल्हापूर उत्तरमधून उद्योगपती व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक आदिल फरास यांनी मुलाखती दिल्या आहेत.

बाभूळकरांचा निर्णय लांबणीवर

पक्ष निरीक्षकांसमोर आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी यावर्षी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांचे नाव उमेदवारीसाठी अग्रस्थानी आहे. मात्र, बाभूळकर यांचा ओढा भाजपकडे आहे. कार्यकर्त्यांशी त्या भाजप प्रवेशासंदर्भात चाचपणी करत आहेत. रविवारीही त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशाप्रसंगी त्यासुद्धा हाती कमळ घेतील अशी शक्यता होती. मात्र, भाजपकडून उमेदवारीचा अद्याप शब्द मिळाला नाही. शिवाय हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडे होता. उमेदवारीचा गुंता कायम असल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. बाभूळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू शकते. एम. जे. पाटील यांनीही राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे.

राष्ट्रवादीत सध्या शांतता

माजी खासदार धनंजय महाडिक, निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीला रामराम केला. चंदगड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर भाजपच्या वाटेवर आहेत. मानसिंगराव गायकवाड भाजपच्या संपर्कात आहेत. कोल्हापूर दक्षिण, करवीर, शाहूवाडी मतदारसंघात पक्षाकडे सक्षम उमेदवार नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरून अन्य पक्षांत बैठका, मेळाव्यांचा जोर असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शांतता आहे. प्रदेश पातळीवरील आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अन्य मतदारसंघांतील इच्छुक

कोल्हापूर दक्षिण : रोहित पाटील, निरंजन कदम, महादेव माने

इचलकरंजी : नितीन जांभळे, बाळासाहेब देशमुख

हातकणंगले : भास्कर शेटे, अनिल कांबळे, लखन बेनाडे,

करवीर : मधुकर जांभळे, सोनाजी पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्या जीवांच्या मदतीसाठी सरसावणारे हात

$
0
0

Mahesh.patil@timesgroup.com

Tweet@: MaheshpMT

अचानक घरात एखादा साप आला अनेकांची भीतीने गाळण उडते. कधीतरी रस्त्यात एखादा जखमी प्राणी, पक्षी आढळला तर नेमके काय करायचे हे अनेकांना सुचत नाही. मग, काय करायचे याचा प्रश्न पडतो. मात्र, समाजात मानवतेच्या भावनेने कार्यरत असलेले प्राणीप्रेमी, सर्पमित्र अडचणीला धावून नेतात. धनंजय नामजोशी ऊर्फ नाना असोत वा त्यांच्यासोबत कार्यरत असलेले देवेंद्र भोसले. समाजातील अडचणीच्या घटकांना मदतीसाठी ते नेहमीच तत्पर असतात. पशू, पक्षी, प्राण्यांसह नागरिकांसाठीही ते 'सुखकर्ता' वाटतात.

सर्पमित्र, प्राणीमित्र नाना

रंकाळा परिसरात राहणारे धनंजय नामजोशी ऊर्फ नाना हे प्राणीमित्र आणि सर्पमित्र म्हणून सर्वत्र परिचित आहेत. गेली १४ वर्षे ते नागरिकांसह पशू, पक्ष्यांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. लहानपणापासून वडिलांमुळे त्यांना पशू, पक्षी, प्राण्यांविषयी कुतुहल. रंकाळ्यासमोर रहायला असल्याने पाणथळ भागात साप भरपूर असायचे. त्यात पाणसर्प भरपूर. मात्र, नंतर यातील विषारी, बिनविषारी अशा सापांची माहिती ते मिळवत गेले. त्याविषयी अभ्यास करू लागले. त्यातून प्राण्यांनाही मदतीची आवड निर्माण झाली. एखाद्याच्या घरी साप आला असा कॉल आला तरी ते लगेच तेथे पोहोचतात. सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. केवळ साप नव्हे तर घुबड, घार, माकड, मोर, घोरपड अशा पक्षी, प्राण्यांचीही सुटका त्यांनी केली आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी (इं.) या संस्थेच्या माध्यमातून ते कार्यरत असतात. थॅलेसेमिया निर्मूलन सोसायटीचे अध्यक्ष, 'रक्तदाता कोल्हापूर'चे सदस्य अशा विविध माध्यमातून ते कार्यरत आहेत.

देवेंद्र भोसलेंचा मदतीचा हात

मंगळवार पेठेत राहणारे देवेंद्र भोसले यांना ट्रेकिंगची आवड. त्यामुळे त्यांनी अेक गड-किल्ल्यांची, जंगलांची भटकंती केली. काही वर्षांपूर्वी एका घरात साप आल्यावर त्यांना बोलावण्यात आलं. अनुभव नव्हता, माहिती नव्हती तरीही त्यांनी धाडस केलं. साप व्यवस्थित पकडून त्याला जंगलात सोडलं. तेव्हा सापांविषयी शास्रोक्त माहिती मिळविण्याचे त्यांनी ठरवलं. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीचे (इं) प्रमुख डॉ. अमीन सय्यद हे त्यांचे मार्गदर्शक. विषारी-बिनविषारी सापांची माहिती घेताना त्यांनी वाइल्ड लाइफ क्षेत्रात काम सुरू केले. शहरात गेल्यावर्षी शिरलेल्या गव्यांची शोधमोहीम, साने गुरुजी वसाहतीत आलेल्या सांबराला सोडविणे, माजी खासदार महाडिक यांच्या बंगल्यात शिरलेला बिबट्या अशा अनेक मोहिमांवेळी ते अग्रेसर होते. नुकत्याच आलेल्या महापुरात त्यांच्यासह वीस जणांची वाइल्ड लाइफ क्षेत्रातील टीम पुरातून घरांमध्ये आलेल्या सापांच्या सुटकेसाठी कार्यरत होती. केवळ सापच नव्हे तर पक्ष्यांनाही पुराचा फटका बसल्याचे ते सांगतात. साप पकडण्याचे काम हौसेखातर नव्हे तर पूर्ण प्रशिक्षण घेऊन केले जावे अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिखली पूरग्रस्तांना मदत

$
0
0

कोल्हापूर : पुणे येथील निवृत्त पोलिस कल्याण संस्थेच्या येथील शाखेतर्फे करवीर तालुक्यातील चिखलीतील पूरग्रस्तांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कमलाकर यांच्याहस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी श्रीकांत पाटील, विनायक जाधव, सुरेश पवार, डी. एस. घोलराखे, बी. एम. पाटील, बी. बी. आंबी, एकनाथ खोत, किशोर घाडगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात स्त्री मुक्तीची समता यात्रा १४पासून

$
0
0

कोल्हापूर : मुंबईतील स्त्री मुक्ती संघटना व कोल्हापुरातील श्रमिक महिला मोर्चाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात स्त्री मुक्ती समता यात्रा आयोजित केली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मंचच्या माध्यमातून यात्रेचे नियोजन केले आहे. १४ ते १८ सप्टेंबर या कालावधीत ही यात्रा होणार आहे. यावेळी नाट्यप्रयोग, प्रदर्शन, विद्यार्थिनींशी संवाद या कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती सुवर्णा तळेकर यांनी दिली.

तळेकर म्हणाल्या, 'या यात्रेनिमित्त स्त्री समानतेचा जागर करणारे विविध उपक्रमांतर्गत 'मुलगी झाली हो' या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. १४ रोजी इचलकरंजी येथील डीकेटीई कॉलेज येथे नाटकाचा प्रयोग होणार आहे. १५ रोजी कोल्हापुरातील न्यू कॉलेज येथे, १६ रोजी नेसरी येथील मुलींची शाळा व एस .एस. महाविद्यालय येथे प्रयोग होणार आहे. १७ रोजी आजरा महाविद्यालयात हे नाटक होणार आहे. याशिवाय खुले प्रयोगही होणार आहेत. १८ रोजी युवतींसाठी लक्ष्मीपुरीतील श्रमिक संघाच्या कार्यालयात शिबिर होणार आहे. ज्योती म्हापसेकर यांनी लिहिलेल्या मुलगी झाली हो या नाटकातून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची मानसिकता दृढ करण्याचा विचार मांडला आहे. या नाटकात अमोर केरकर, अलका पावनगडकर, शोभा कोकितकर, प्रज्ञा सराफ यांच्या भूमिका आहेत.' यावेळी श्रद्धा मगदूम, अनंत कुलकर्णी, नयना सावंत, अतुल दिघे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणावरून प्रशासन धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. अतिक्रमण विभाग मात्र कारवाई करताना दिसत नाही. खाद्य पदार्थांच्या अनेक गाड्या वाहतुकीला अडथळा ठरतील अशा ठिकाणी उभा असतात. फुटपाथ फळ विक्रेत्यांनी काबीज केली असताना प्रशासन काय करत आहे,' अशी प्रश्नांची सरबत्ती करत बुध‌वारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत अतिक्रमण विभाग आणि प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले. चेअरमन फॉर दि मिटिंग म्हणून सदस्य सचिन पाटील यांनी सभेच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली.

'शहरात सर्वत्र अतिक्रमण वाढत असतानाच शाळेच्या १५० मीटर परिसरात पानटपऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य रस्त्यावरील झाडे तोडून हातगाड्या व फिरत्या खाद्य पदार्थांच्या गाड्या उभा राहत आहेत. अतिक्रमण विभागाला ही वस्तुस्थिती दिसत नाही का?' अशी विचारणा सत्यजित कदम, राजाराम गायकवाड व संजय मोहिते यांनी केली. 'गणपती विसर्जनमार्गावरील पॅचवर्क कामासाठी अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी वर्ग केले आहेत. अनंत चतुर्थदशीनंतर मोहीम व्यापक करण्यात येईल,' असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले. दीपा मगदूम यांनी 'स्पॉट बिलिंग बंद का आहे?' अशी विचारणा केली. तर सविता भालकर यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 12

‘वृक्ष प्राधिकरण’कडे वर्षानुवर्षे अर्ज प्रलंबित

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घर बांधकाम, वाहतूक, विद्युत वाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या व वृक्ष तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे अर्ज पाठववा लागतो. शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाही समिती व सदस्यांकडून सुचवल्या जातात. पण समितीकडे आलेले अर्ज वर्षानुवर्षे निर्गत होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या या तक्रारींचे पडसाद स्थायी समितीत उमटून खदखद व्यक्त झाली. पुन्हा या विषयावर महापालिकेच्या सभेत पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीचे पदसिद् अध्यक्ष आयुक्त आहेत. समितीमध्ये सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व शहर अभियंत्यासह चार तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे. उद्यान ‌विभागाकडे धोकादायक वृक्ष किंवा फांदी तोडण्यासाठी अर्ज दाखल केला जातो. उद्यान विभागाकडून अर्ज समितीकडे सादर झाल्यानंतर वृक्ष किंवा फांदी (सहा इंचापेक्षा मोठी) तोडण्यासाठी परवानगी दिली जाते. ही परवानगी देताना सर्वसामान्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडले जाते,ठरविक लोकांना मात्र त्वरीत मंजुरी मिळते.

जून २०१८ पासून समितीमधून पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर व निर्सगमित्र संस्था बाहेर पडली. गेल्या दीड वर्षांपासून समितीचा कारभार सदस्यांविना सुरू असताना अर्जांची वेळेत दखल घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवार पेठेतील सोमेश्वर चौक येथील सतीश सावर्डेकर या ज्येष्ठ नागरिकाने घरावर आलेली धोकादायक फांदी तोडण्यासाठी २०१५ मध्ये अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी लोकशाही दिनातही तक्रार केली. आयुक्तांपासून सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांना त्यांनी स्वतंत्र अर्ज दिले. पण यावर अद्याप निर्णय झालेला नाही. निर्णयच होत नसल्याने ते प्रचंड भीतीच्या छायेत वावरत आहेत. अशीच स्थिती शाहू स्मारक भवनच्या पिछाडीस असलेल्या अर्जदाराची झाली आहे. कोणत्याही क्षणी झाड उन्मळून पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी उद्यान विभागाकडे अर्ज केला. पण त्यांचीही अवस्था सावर्डेकर यांच्यासारखी झाली आहे. त्यामुळे समितीचे कामकाज नेमके चालते कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उपस्थित होत आहे.

याबाबत उद्यान विभागाशी संपर्क साधला असता उद्यान विभागाकडे एकही अर्ज प्रलंबित नसल्याचे सांगण्यात आले. विभागाच्या खुलाशानुसार जर अर्ज प्रलंबित नसतील तर स्थायी समितीमध्ये उपस्थित केलेला प्रश्न चुकीचा होता का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना फांदी छाटण्यास परवानगी मिळत नसताना टेंबे रोड येथील नुकत्याच झालेल्या खाद्य शॉपीसमोरील वृक्षाच्या फांद्या तोडण्यास मात्र समितीने त्वरीत मंजुरी दिली असल्याचे समोर आले आहे. यानिमित्ताने समितीचा कारभार कोणाच्या मार्गदर्शनानुसार चालतो हेदेखील समोर येण्याची आवश्यकता आहे.

...

चौकट

राजीनामा दिलेल्या संस्थेच्या

पदाधिकाऱ्याची स्वाक्षरी

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून शहरवासियांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर समितीमध्ये महापौर, उपमहापौर, सर्व गटनेते यांचा समावेश करण्यासाठी आयुक्तांची भेट घेणार असल्याचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात यापैकी उपमहापौर, विरोधी पक्षनेता, पक्षप्रतोद यांचा समितीमध्ये समावेश असल्याचे खुद्द सदस्यांसह सभापती देशमुख यांना माहिती नव्हते. त्याचबरोबर एक संस्था प्राधिकरण समितीमधून दीड वर्षापूर्वी बाहेर पडली आहे. त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याची नियोजित बैठकीसाठी स्वाक्षरी उद्यान समितीच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images