Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शरद पवारांकडून पूरग्रस्तांना दिलासा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळीसह शहरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना पवारांनी 'तुम्ही एकटे नसून, तुमच्या मागे सर्व महाराष्ट्र उभा आहे', अशा शब्दांत दिलासा दिला. चिखली आणि आंबेवाडीतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडे सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. पूरग्रस्तांना कर्जमाफी करुन त्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीचा पाठपुरावा केंद्र आणि राज्य सरकारकडे केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

पूरग्रस्त पाहणीसाठी दोन दिवस पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. बुधवारी पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यापूर्वी दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिग येथे त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन केले. त्यानंतर चिखली, आंबेवाडी, वरणगे पाडळीसह शाहूपुरीतील कुंभार गल्ली, बापट कँप परिसराची पाहणी केली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार पी.एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, करवीर पंचायत समिती सभापती राजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

आंबेवाडी येथील मारुती मंदिरात त्यांनी पूरग्रस्तांशी चर्चा केली. सध्या पुरग्रस्त कुठे राहतात, किती घरे पडली, याची त्यांनी माहिती घेतली. आंबेवाडीचे यापूर्वीच पुनर्वसन झाले असताना त्या ठिकाणी जायला कोणती अडचण आहे याची विचारणा केली. यावेळी सरपंच सिकंदर मुजावर यांच्यासह ग्रामस्थांनी, पुनर्वसन झाले आहे, त्या ठिकाणी विजेची सोय नाही. प्रॉपर्डी कार्डला नावे नसल्याने बँकांचे कर्ज मिळत नसल्याचे सांगितले. त्यानंतर चिखली,वरणगे पाडळीतील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. 'पुनर्वसन झालेल्या ठिकाणी तुमची वास्तव्याची तयारी असेल तर आम्ही सरकारकडे मागणी करु,' असे पवार यांनी सांगितले.

पवार यांनी तिन्ही गावातील ऊस शेती, जनवारांची माहिती घेतली. बहुतांशी ऊस पाण्याखाली गेला असल्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांची टीम येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ४० हजार एकरांत तयार केलेल्या उसाच्या बियाणाचाही वापर करता येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चिखलीत पवार यांनी सरपंच उमा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य एस.आर.पाटील, पोलिस पाटील अरुण दळवी यांच्याशी चर्चा केली. वरणगे पाडळी येथे सरपंच अनिता कांबळे, सदस्य शिवाजी गायकवाड, शिवाजी पाटील, पोलिस पाटील महादेवी कांबळे उपस्थित होते.

...

चौकट

कुंभार समाजाची

कर्जमाफीची मागणी

शाहूपुरी कुंभार गल्ली येथे पवार यांनी स्थानिक नागरिक व उद्योजकांशी चर्चा केली. बापट कॅम्प येथे कुंभार कारगिरांकडून नुकसानची माहिती घेतली. उत्सवासाठी घेण्यात आलेले बँकेचे कर्ज माफ व्हावे, अशी मागणी यावेळी कुंभार समाजाने केली. यावेळी माजी महापौर मारुतराव कातवरे, तानाजी कुंभार यांच्यासह कुंभार समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


च ट क म ट क

$
0
0

नारळाची वडी आणि केळ्याचे पराठे

भारती पाटील, नाशिक

गेले दोन आठवडे आपण नाशिक शहरातील उपवासाच्या विविध पदार्थांची चव चाखली. यावेळी आपण उपवासासाठी घरीच काही पदार्थ कसे करता येतील, याबाबत जाणून घेणार आहोत.

आपल्या सणवारांची निसर्ग आणि आहाराशी सांगड घातलेली आहे. सृष्टी फळाफुलांनी आणि हिरव्यागार वनश्रीने नटलेली असताना श्रावणापासून थेट दिवाळीपर्यंत सणांची योजनाच असते. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण आताच झाले. आता गणपती येतील. त्यामुळे यासर्व सणवारात धार्मिक कार्य, मंगलकार्य, पूजा यात श्रीफळ अग्रस्थानी असते. सागराला नारळ अर्पण करूनच कोळी बांधव मासेमारीसाठी आपली नाव पाण्यात सोडतात. म्हणून नारळाला खूप महत्त्व आहे. आहारापासून ते पूजाविधीपर्यंत नारळ खूप गरजेचे आहे. त्यामुळे आज आपण नारळाची वडीची चव चाखणार आहोत.

---

टोमॅटो नारळवडी

साहित्य : एक मध्यम आकाराच्या नारळाचा खव, १०० ग्रॅम खवा किंवा मिल्क पावडर, सव्वा वाटी साखर, दोन चमचे पीठी साखर, थोडे तूप, दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोचे साल व बिया काढून मिक्स केलेला पल्प.

कृती : नारळाचा खव, रवा, साखर, टोमॅटो पल्प व्यवस्थित एकत्र करा. जाड बुडाच्या पितळी पातेल्यात एक चमचा तूप घाला आणि मध्यम आचेवर ठेवा. तूप वितळताच वरील मिश्रण त्यात घाला आणि उलथण्याने हलवा. हे करताना एक काळजी घ्या की बुडास हे मिश्रण लागायला नको. गोळा तयार होऊ लागला की ताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण ओता. हाताला थोडे तूप लावून एकसारखे पसरा. वरून पिठीसाखरेचा थर लावा आणि गरम असतानाच सुरी अथवा चमचाने वड्या पाडा. वाळवल्यानंतर या वड्या मोकळ्या करा. अशाप्रकारे बिटाचा किंवा आंब्याचा पल्प वापरुनही वड्या करता येतील.

केळ्याचे पराठे

साहित्य : पाव किलो चाळलेले कणीक, अर्धी वाटी बारीक रवा, चवीपुरते मीठ, आवडीनुसार साखर, थोडेसे तेल किंवा तूप, तीन केळी सोलून त्याचा पल्प.

कृती : कणकेत चवीपुरते मीठ आणि थोडे गरम तेल किंवा तूप घालून नीट एकत्र करा. केळी कुस्करून त्यात आवडीनुसार साखर एकजीव करा, रवा थोडा भाजून घ्या. कणीक, रवा, केळ्याचा कुस्करा सर्व एकत्र करून परोठे लाटता येतील इतके एकत्र घट भिजवा. साधारण पाच मिनिटे मुरल्यावर मध्यम आकाराचे पराठे लाटून थोडे तूप सोडून भाजावे. खोबऱ्याच्या चटणीसोबत हे पराठे गरम गरम सर्व करा.

-----

उपवास कशावर सोडणार

परवा तिसरा श्रावण सोमवार. श्रावण महिना आला की उपवासाचे खमंग पदार्थ खाण्यासाठी खवय्ये अगदीच आतूर झालेले असतात. त्यामुळे उपवास सोडतानाही काही हटके आणि वेगळे चविष्ठ पदार्थ ताटात असले की दिवसभर पोटात भुकेने ओरडणारे कावळे सायंकाळी शांत होतात.

वरण भात

महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये अगदी दररोज होणारा हा आवडीचा पदार्थ. उपवास सोडतानाही वरण-भाताचा बेत आखता येऊ शकतो. त्यासोबत गरमागरम पोळी आणि बटाट्याची चटणी, गवारच्या शेंगांची भाजी, भेंडीची भाजीदेखील चालू शकते. गोड पदार्थ म्हणून थोडा साजूक तुपातील शिरा केला तरी चालेल. त्यामुळे उपवास सोडण्यासाठी अस्सल मराठमोळं जेवण म्हणजे वरण भात.

डाळ बाटी

डाळ बाटी हा या दिवसातील सगळ्यात आवडता पदार्थ. डाळबाटी उपवास सोडण्यासाठी केले तर घरातील मोठ्यांपासून अगदी लहानग्यांपर्यंत साऱ्यांनाच जेवण आवडेल. तुम्ही डाळ बाटी घरी करू शकत नसाल नाशिक शहरातील अनेक महाराष्ट्रीयन हॉटेलल्समध्ये ही डीश उपलब्ध आहे.

श्रीखंड पुरी

बाहेर हलका पाऊस पडत असताना गरमागरम तळलेल्या पुरीसोबत श्रीखंड चाखण्याची मजा काही औरच. त्यामुळे तुम्ही उपवास सोडण्यासाठी श्रीखंड पुरीचाही बेत आखू शकतात. आता घराघरात नवीन लोणचे असणार. त्यामुळे या श्रीखंड पुरीसोबत लोणचेही ताटात वाढू शकतात. तसेच तोंडाला चव हवी असेल तर गरमागरम भजेही काढू शकतात.

कढी खिचडी

आजकाल घराघरात खाण्याच्या पदार्थांमध्येही नेहमीपेक्षा वेगळी डीश तयार करण्याकडे महिलांचा कल असतो. त्यामुळे उपवास सोडण्यासाठी गरमागरम कढी आणि मसाल्याची खिचडीचाही बेत तुम्ही आखू शकतात. सोबत उडदाचे किंवा नागलीचे पापडही भाजून घेऊ शकतात. या कढीसोबत भजेही तळून घ्या. कारण कढी आणि भजे खाण्याचा आनंदही तुम्ही घेऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांच्या पंचनाम्याला साताऱ्यात गती पालकमंत्री विजय शिवतारे यांची माहिती

$
0
0

पूरग्रस्तांच्या पंचनाम्याला साताऱ्यात गती

पालकमंत्री विजय शिवतारे यांची माहिती

सातारा

'जिल्ह्याला यंदा दुष्काळाचा आणि अतिवृष्टीचा सामना करावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीक्षेत्राचे, पशुधनाचे, घरांचे व सार्वजनिक मालमत्तेची पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. पूरग्रस्त ग्रामीण भागातील १ हजार ३५८ कुटुंबांच्या बँक खात्यावर १ कोटी ४३ लाख तर शहरी भागातील ६१४ कुटुंबांच्या बँक खात्यांवर ८१ लाख इतके अनुदान जमा करण्यात आले आहे. पाच हजार रुपये प्रती कुटुंब या प्रमाणे २८ लाख १० हजार रुपयांचे अनुदान रोखीने वाटप करण्यात आलेले आहे. दुष्काळ व पुरस्थितीच्या निवारणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून विशेष बाब म्हणून १२ कोटींची तरतुदही करण्यात आली आहे,' अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य सरकारी सोहळ्यात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या नंतर ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस, गृह रक्षक दलाची मानवंदना स्वीकारून उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आदी उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, 'अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कृषी क्षेत्राचे, घरांचे पशुधनाचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे ज्या गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे तो सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीला आदेश देण्यात आले आहे. मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी इतर तालुक्यातील महावितरणचे कर्मचारी अतिवृष्टी भागात वर्ग करण्याचे आदेशही दिले आहेत. अतिवृष्टीमुळे कृषी क्षेत्राचे, घरांचे तसेच पशुधनाचे नुकसान झाले आहे, याचे पंचनामे लवकरात लवकर व्हावे यासाठी इतर विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचे आदेश दिले आहेत. रोगराई वाढू नये म्हणून पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागांमध्ये वैद्यकीय पथके पुरेशा औषधसाठ्यांसह तैनात ठेवण्यात आलेली आहेत.'

दुष्काळी भागात १२९ छावण्या

माण, खटाव व फलटण या दुष्काळी तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी १२९ चारा छावण्या मंजूर करण्यात आलेल्या होत्या. या छावण्यांमध्ये ६ हजार ७६६ लहान जनावरे व ५० हजार ४४२ मोठी जनावरे, असे एकूण ५७ हजार २०८ जनावरे या छावण्यांमध्ये होती. या चारा छावण्यांवर आतापर्यंत ८ कोटी ९९ लाख ७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत, असेही शिवतारे म्हणाले.

................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाने केला पाणीपुरवठा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे सावट ओळखून गेल्या चार दिवसांत पूरपरिस्थितीच्या काळात शिवाजी विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रामधून सुमारे दहा लाख लीटरहून अधिक पाणी शहरवासीयांना उपलब्ध करून देण्यात आले, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी महानगरपालिकेची जल शुद्धीकरण यंत्रणा पाण्याखाली गेल्याने नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे सभोवती पुराचे पाणीच पाणी असूनही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील ही परिस्थिती लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने आपल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी महापालिकेच्या टँकरसह त्यांनी भाड्याने घेतलेल्या टँकरमधून शहराला पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली आहे. यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला. विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत 'जलयुक्त विद्यापीठ' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. तीन मोठे जलाशय, आठ विहीरी, सहा शेततळी आदींच्या माध्यमातून सुमारे ४० कोटी लीटरची साठवण क्षमता निर्माण करण्यात यशस्वी झालेले शिवाजी विद्यापीठ गेल्या दोन वर्षांत पाण्याच्या संदर्भात पूर्णतः स्वयंपूर्ण झाले आहे. यंदा विद्यापीठाने महापूर स्थितीत पाणीटंचाईग्रस्त असलेल्या कोल्हापूर शहराला आपल्या क्षमतेनुसार दिवसाला सरासरी दोन ते अडीच लाख लीटर इतके शुद्ध पाणी पुरविण्यात यश मिळविले आहे. महापालिकेच्या टँकरसह सर्वसामान्य नागरिकांची सुमारे चारशे ते पाचशे वाहने कॅम्पसमधून दैनंदिन पिण्याचे पाणी घेऊन जात आहेत.

चारा छावणीसाठीही मदत

शिवाजी विद्यापीठाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासही विद्यापीठाने मोठा हातभार आहे.पूरग्रस्त भागातील मुक्या जनावरांचा चारा-वैरणीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्या चार दिवसांत सुमारे चाळीस ट्रॉली चारा विद्यापीठाच्या कॅम्पसमधून आपत्तीग्रस्त भागातील जनावरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या दृष्टीनेही विद्यापीठ आपल्या शिव सहायता-आपत्ती निवारण कक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पूरग्रस्तांच्या रोषाला घाबरुन पालकमंत्र्यांचे पुण्यात ध्वजवंदन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात उद्भवलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात थांबून राहणे आवश्यक होते. परंतु गेले चार दिवस ते कोल्हापूरबाहेर आहेत. पूरग्रस्तांच्या रोषाला घाबरूनच पालकमंत्र्यांनी कोल्हापूरऐवजी पुण्यात ध्वजवंदन केले',असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

पत्रकात असे म्हटले आहे, वास्तविक अशा गंभीर परिस्थितीत पालकमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे काटेकोरपणे आणि तातडीने होण्यावर लक्ष ठेवायला हवे होते. सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते पुण्यात आणि पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजवंदन झाले असते तर ते अधिक उचित झाले असते. पूरग्रस्तांच्या साथीने ध्वजवंदन केले, असा संदेश समाजात गेला असता. उलट, ८० वर्षीय शरद पवारांनी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येऊन पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पवार यांचा आदर्श पालकमंत्र्यांनी घेण्याची आवश्यकता होती. महापुराने जिल्हा आणि शहर पंधरा-वीस वर्षांनी मागे गेला आहे. आपत्तीमुळे हजारो कोटींचे नुकसान झाले असताना पालकमंत्री परगावी राहतात, ही बाब जिल्ह्याच्यादृष्टीने निश्चितच दुर्दैवाची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशमूर्तींची कमतरता भासणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशमूर्ती व्यवसायाला महापुराचा फटका बसल्याने यंदा गणेशोत्सवात मूर्तींची कमतरता भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे घरगुतीसह मंडळांच्या मूर्ती बुक करण्यासाठी भाविकांकडून कुंभारगल्लीत विचारणा होऊ लागली आहे. तयार झालेल्या मूर्ती महापुरामुळे खराब झाल्या आहेत. तेवढ्याच नवीन मूर्ती तयार करणे आता अशक्य आहे. मूर्तींना असणाऱ्या मागणीचा विचार करता मूर्तिकारांच्या हातातही फारसा वेळ राहिलेला नाही.

यंदा पुराचा फटका बापट कॅम्पसह शाहूपुरी कुंभार गल्लीला मोठ्या प्रमाणात बसला. बापट कॅम्प येथे मूर्ती तयार करण्याचे १५० कारखाने असून येथील ७० टक्के कारखान्यांना कमीअधिक फटका बसला आहे. कच्च्या आणि रंगवलेल्या मूर्ती आठ दिवस पाण्यात असल्याने त्या ठिसूळ आणि खराब झाल्या आहेत. शाहूपुरी कुंभार गल्लीतील मूर्तिकार के.आर. कुंभार यांच्यासह इतरांच्या कारखान्यांनाही मोठा फटका बसला. शहरातील तालमी आणि मंडळांच्या मूर्ती कुंभार यांच्या कारखान्यात रंगवून तयार होत्या. आता या मंडळांना पर्यायी मूर्ती उपलब्ध करुन द्याव्या लागणार आहेत. उपनगरातील व्यापाऱ्यांनी महापूर येण्यापूर्वी मूर्ती खरेदी केल्या असल्याने त्या सुरक्षित आहेत. बापट कॅम्पमधील काही मूर्तिकारांनी मार्केट यार्डमधील गोडावूनमध्ये मूर्ती हलवल्या. त्यामुळे शहरात ७० ते ८० टक्के घरगुती आणि सार्वजनिक मंडळांना मूर्ती पूजेसाठी मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शहरातील सर्व मंडळे आणि तालमींनी कुंभार कारागिरांना मूर्तींबाबत सहकार्याची तयारी दर्शवली आहे. अनेक मंडळांकडून विशिष्ट रचनेतील मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. पण काही मूर्तीच वाहून गेल्या तर काही खराब झाल्याने मूर्तिकार जी मूर्ती उपलब्ध करुन देतील ती स्वीकारण्याची तयारी मंडळांनी दाखवली आहे.

अनेक कारागिरांकडे कच्च्या मूर्ती आहेत. पण दहा ते बारा दिवस पुरातच गेल्याने मूर्ती रंगवण्यासाठी वेळ कमी पडणार आहे. एक मूर्ती रंगवण्यासाठी २८ वेळा ब्रश फिरवावा लागतो. यंदा एकाच रंगातील फक्त आखणी केलेली मूर्ती भाविकांना उपलब्ध करुन देता येईल का, याचा विचार कारागिरांकडून सुरू आहे. पुरामुळे कारखान्याची स्वच्छ करताना कारागिर व त्यांचे मदतनीस आजारी पडू लागल्याने मूर्तींच्या फिनिशिंगवर परिणाम होणार आहे.

०००००

गणोबा आणि शाडू मूर्तींवर परिणाम

चिखलापासून गणोबा तयार केला जातो. पण गणेबासाठी लागणारा चिखल आणि माती महापुरामुळे उपलब्ध होणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मूर्ती मिळेल पण गणोबा मिळणार नाही, अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पावसाने शाडू मूर्ती वाळण्यात अडचणी येत आहे. पुढील काही दिवस कडकडीत ऊन पडले तर मूर्तिकामाला वेग येऊ शकतो.

०००००

यंदा वीस ते तीस टक्के मूर्ती कमी पडण्याची भीती असली तरी कुंभार व्यावसायिक भाविकांना मूर्ती उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाविक आणि मंडळेही कुंभार व्यावसायिकांना सहकार्य करत आहेत.

रिंकू कुंभार, बापट कॅम्प

.. . . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्त भागातील चोऱ्यारोखण्यासाठी विशेष पथके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराने अनेकांची घरे उद्धवस्त झाली. मात्र काही ठिकाणी चोरट्यांनी पूरग्रस्तांची घरे फोडली. चिखली, आंबेवाडी, लक्ष्मीपुरी परिसरात चोरट्यांनी ८० तोळे सोने आणि दोन लाखांहून अधिक रोकड लंपास केली. पूरग्रस्तांच्या घरातील चोऱ्या रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्या आहेत. त्यासह जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यांसाठी ४०० हून अधिक अतिरिक्त पोलिस बंदोबस्त दिल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. पूरग्रस्त भागात संशयित दिसल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्तांच्या घरातील चोऱ्या रोखण्यासाठी विशेष पोलिस पथके नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी तत्काळ विशेष पथकांसह जादा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांची बंद घरे फोडून चोरीचे प्रकार घडले आहेत. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी त्या-त्या हद्दीतील पोलिस निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. त्यासह पूरग्रस्त भागातील चोरी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना केल्या आहेत. त्यासाठी या भागात दररोज पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. पथकातील पोलिस कर्मचारी चिखली, आंबेवाडी, लक्ष्मीपुरी, बापट कॅम्प, दुधाळीसह शहरातील पूरग्रस्त भागात गस्त घालणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात पूरग्रस्त भागातील चोरी रोखण्यासाठी ४०० हून अधिक अतिरिक्त कर्मचारी दिले आहेत. हे कर्मचारी पूरग्रस्त भागात जाऊन पेट्रोलिंग करणार आहेत.

दरम्यान, पूरग्रस्तांना मदत म्हणून सरकारने रोख रक्कम वाटप करण्याचे काम सुरु आहे. काही ठिकाणी पूरग्रस्त भागात काहीजण पैसे घेवून मद्यपान करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्यानुसार पूरग्रस्त भागातील दारुअड्डे, बिअर बार परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सरकारकडून दिली जाणारी मदत ही महिलांच्या हाती दिली जात आहे. त्या ठिकाणीही पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी भटंकती सुरूच

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराच्या तडाख्यातून महापालिकेच्या शहर पाणीपुरवठ्याची अद्याप सुटका झालेली नाही. बालिंगा व शिंगणापूर पंपिंग स्टेशनमधून उपसा सुरू नसल्याने शहरवासियांना घागरभर पाण्यासाठी भटंकती करावी लागत आहे. नागरिकांची तहान भागवण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसभरात टँकरच्या १७४ फेऱ्या झाल्या असल्या, तरी अनेक भागातील नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची एक घागरही मिळाली नसल्याचे चित्र आहे. कळंबा फिल्टर हाउस येथून रात्रंदिवस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून सायंकाळी फिल्टर हाउस ते निर्माण चौकापर्यंत टँकरच्या रांगा लागल्या होत्या.

सलग १२ दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, भाजीपाला व पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासियांचे प्रचंड हाल झाले. इतर सुविधा पूर्वपदावर आल्या. पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनू लागला आहे. शिंगणापूर व बालिंगा पंपिंग स्टेशन महापुरात बुडाल्याने ५ ऑगस्टपासून शहर पाणीपुरवठा ठप्प झाला. आठ दिवसांनंतर बालिंगा पंपिंग उपसा केंद्रातून पाणीपुरवठा सुरू झाला असला, तरी अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही.

शहरवासियांना पिण्याचे पाणी देण्यासाठी महापालिकेच्या टँकरसह भाडेतत्वावर टँकर घेण्यात आले. तसेच अनेक संस्थांनी टँकर दिले. १७४ टँकरद्वारा पाणीपुरवठा सुरू असला, तरी अनेक भागात टँकर पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे एक घागर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. बालिंगा उपसा केंद्रातून पाणीपुरवठा सुरू झाला असून शनिवारपासून 'सी, 'डी' वॉर्डासह फुलेवाडी, आपटेनगर, सानेगरुजी वसाहत, शाहूपुरी निम्मा भाग, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी, बागल चौक, शिवाजी पेठ व मंगळवार पेठेतील काही भागाला पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील किमान काही भागाला दिलासा मिळणार आहे.

...

महिलांचा रास्ता रोको

गेल्या बारा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. टँकरद्वारा पाणीपुरवठा सुरू असला तरी, नियोजनाअभावी नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विशेषत: महिलांचे प्रचंड हाल सुरू आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत जटील बनला असल्याने त्यांचा संयम हळूहळू सुटू लागला आहे. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी आले. आपटेनगर परिसरातील महिलांनी सायंकाळी सात वाजता रास्ता रोको आंदोलन करुन आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. महिलांनी आक्रमक होत महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महिलांच्या प्रश्नाने अधिकारीही निरुत्तर झाले. अधिक टँकर देण्याचे आश्वासन देत त्यांची समजूत काढली.

...

चौकट

विद्युतपंप घेवून जाणारा डंपर उलटला

शिंगणापूर पंपिंग स्टेशनमधून पुरात बुडालेले तीन विद्युतपंप कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी बाहेर काढले. गोकुळ शिरगाव एमआयडीसीकडे दुरुस्तीकडे पंप घेवून जात असलेला डंपर चंबुखडी येथील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नावर पाणी फिरले. नगरसेवक राहुल माने यांच्या मदतीने क्रेन मागवून डंपर उभा करुन पुन्हा पंप त्यामध्ये ठेवण्यात आले. त्यासाठी सुमारे तीन तासाचा वेळ गेला. पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल सुरू असताना घडलेल्या अपघातामुळे अधिकारी व कर्मचारीही हबकून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यशंवतराव खर्डेकर यांचेहृदयविकाराच्या झटक्याने निधन

$
0
0

यशंवतराव खर्डेकर यांचे

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सातारा :

सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक यशंवतराव उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर जहागीरदार आप्पासाहेब निंबाळकर (खर्डेकर) यांचे ते नातू होत.

पंचायत समितीचे उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचे ते वडील आणि साताराचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मामा होत. दादाराजे शिवेंद्रराजेंचे सासरेही लागतात. श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांनी जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळात अनेक वर्षे काम केल्यानंतर बॅँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपविली होती.

श्रीमंत दादाराजे खर्डेकर एक संयमी, स्वच्छ चारित्र्याचे, निगर्वी आणि निस्वार्थी व्यक्तिमत्त्व होते. मी राजकारणात अनेकांच्या बरोबर राहिलो, अनेकांना राजकीयदृष्ट्या योग्य सहकार्य केले. मात्र, आमच्या अडचणीच्या काळात श्रीमंत दादाराजे खर्डेकरांनी आम्हाला केलेली मदत, ठामपणे पाठीशी उभा राहून दिलेली ताकद निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिक्रिया हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांना घरे बांधून देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंगळवार पेठेतील तालमी आणि मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून शिल्लक वर्गणीतून पूरग्रस्तांसाठी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दैवज्ञ बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीत मंडळांनी या उपक्रमासाठी मदत जाहीर केली. राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या मार्गदर्शनानुसार या उपक्रमाचे नियोजन केले आहे.

महापुराने कोल्हापूरसह जिल्ह्याला मोठा फटका बसला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अनेकांची घरे पडली आहेत. राज्यातून मोठ्या प्रमाणावर कोल्हापुरात मदत येत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील मंडळांनी हातभार लावावा यासाठी मंगळवार पेठेतील तालमी आणि मंडळांची बैठक झाली. बैठकीत प्रिन्स ग्रुपचे अशोक पोवार यांनी बैठकीची भूमिका स्पष्ट केली. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी लष्कर, नाविक दल, प्रशासन, राजकीय नेते, पक्ष, तरुण मंडळे, नागरिक आपल्या कुवतीप्रमाणे काम करत आहेत. नैसर्गिक आपत्तीनंतर पंधरा दिवसानंतर गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदा गणेशोत्सव साधेपणाने आणि धार्मिक वातावरणात साजरा करुन शिल्लक वर्गणीतून पुरग्रस्तांना मदत करण्याची भूमिका विशद केली. या भूमिकेला मंगळवार पेठेतील सर्व मंडळे व तालमींनी पाठिंबा दिला.

शहरात अनेक गरीब आणि मध्यमवर्गीयांची घरे पडली आहेत. ही घरे बांधून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार राजर्षी शाहू तरुण मंडळाने ५१ हजार रुपयांची मदत जाहीर केली. बालगोपाल, पाटाकडील, सणगर गल्ली, बजापराव माने, बोडके गल्ली, जंगी हुसेन, तालीम मंडळ, लेटेस्ट, अमर तरुण मंडळाने २१ ते २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी २१ हजार, रणजीत जाधव, नितीन सावंत, शुभंकरोती हॉल यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची घोषणा केली. सामाजिक कार्यकर्ते जयकुमार शिंदे यांनी रोख पाचशे रुपये संयोजकांकडे दिले.

मंडळांनी दिलेली मदत एकत्रित राजर्षी शाहू तरुण मंडळाकडे मदत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच शहरात घरे पडलेल्या जागांचा सर्व्हे तयार करुन घरबांधणी सुरु करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. मंगळवार पेठेतील काही मोठ्या तालमी आणि मंडळे कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मदत जाहीर करणार आहेत. बैठकीला बालगोपाल तालमीचे अध्यक्ष निवासराव साळोखे, पाटाकडील तालमीचे अध्यक्ष एस.वाय. सरनाईक, माणिकराव मंडलिक, वसंतराव मुळीक, नंगीवली तालमीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, संभाजीराव जगदाळे, बाबा पार्टे, हिंदूराव घाटगे, आनंदराव पायमल, अजित सासने, माजी नगरसेवक अदिल फरास, राजू भोसले दी उपस्थित होते. रमेश मोरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बोलेरो गाडीला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या बोलेरो हौदा गाडीला शु्क्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहून नागरिकांनी आरडाओरड केली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन बंब पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. वाहनाचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम नानासो वरुटे (रा. कसबा बीड, ता. करवीर) हे शुक्रवारी कामानिमित्त बोलेरो हौदा गाडीतून (एम. एच. ०९ सी. के. १७१७) जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी पार्किंगमध्ये गाडी पार्क केली होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक बोलेरो गाडीच्या बॉनेटमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर दिसू लागल्या. या प्रकाराने येथील कर्मचारी आणि कामानिमित्त आलेल्या उपस्थितांनी गर्दी केली. आजूबाजूला अन्य वाहने पार्क केली होती, मात्र आग भडकण्याची शक्यता असल्याने भीतीने ते बाजूला सरकले. जिल्हाधिकारी कार्यालयातून घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. जवान सरदार मालदार, कपिल यादव, सुजित थोरात, चंद्रकांत पाटील, केरबा निकम, पुंडलिक माने, आदींनी दोन पाण्याच्या बंबांतून पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरातील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शहराला महापुराचा प्रचंड तडाखा बसला. आठवड्यापेक्षा जास्त दिवस अनेक भागात पाणी राहिले. त्यामुळे इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे. अशा पूरबाधित क्षेत्रातील इमारती निवासायोग्य असल्याची खात्री करण्यासाठी महापालिकेने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट असोसिएशन आणि शहरातील पाच इंजिनीअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. सोमवार (ता. २६) पासून ऑडिट सुरू होणार आहे. त्यानंतर अहवाल तयार करण्यात येणार आहे. सरकारकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईसाठी या अहवालाचा फायदा होणार आहे.

मुसळधार पावसामुळे निम्म्या शहरात महापुराचे पाणी आले. महापुरामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले. दहा ते १२ दिवस पुराचे पाणी राहिल्याने अनेक इमारतींना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरुन पूरबाधित क्षेत्रातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मोहिमेला शहरातील स्ट्रक्चरल ऑडिट असोसिएशन मदत करणार आहे. त्यासाठी लागणारे इंजिनीअर उपलब्ध होण्यासाठी शहरातील न्यू पॉलिटेक्निक, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, डॉ. डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेज व केआयटी कॉलजच्या प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून त्यांनी प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांची टीम देण्याचे मान्य केले आहे.

अनेक दिवस इमारती पाण्यात किंवा पाण्याखाली राहिल्याने काँक्रिट, दगड, वीटा निखळू शकतात. तसेच बहुमजली इमारती लोड बेरिंगवर असल्याने भार सोसू शकतात का? किंवा इमारतींचा अशंत: (१५ टक्के) भाग कोसळलेला असल्यास उर्वरीत इमारत भार पेलू शकते का? याची तपासणी केली जाणार आहे. तपासणीमध्ये इमारतीची डागडुजी अथवा उतरवून घेण्याची सूचना महापालिका प्रशासनाच्यावतीने केली जाणार आहे. तपासणीमध्ये संपूर्ण इमारत पडलेली निदर्शनास आल्यास एक लाख रुपये तर अंशत: पडलेली असल्याने सहा हजार रुपये सरकारी नियमानुसार नुकसान भरपाई मिळणार आहे. महसूल खात्याकडून पंचनामा करत असताना हा तपासणी अहवाल त्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

.. .. .. .. .. .. ..

यंदाच्या मोहिमेचा फायदा

यावर्षी महापालिकेने पोलिस बंदोबस्तात धोकादायक इमारती उतरवण्याची मोहीम घेतली. मोहिमेमध्ये १४ इमारतींचा धोकादायक भाग उतरवून घेतला. हा भाग उतरवून घेतला नसता तर मुसळधार पावसात इमारती पडून जीवितहानी झाली असती, असे मत तज्ज्ञाकडून व्यक्त होत आहे.

.. .. .. .. ..

अनेक दिवस इमारत पाण्यात राहिल्याने धोका होण्याची शक्यता असते. त्यासाठी पूरबाधित क्षेत्रातील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. महापालिका अभियंत्यासह शहरातील इंजिनीअर आणि विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

.. .. .. .. .... .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पॅचवर्कला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संततधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या पॅचवर्कला शुक्रवारपासून सुरुवात झाली. ताराराणी चौक, बिंदू चौक व संभाजी नगर रस्त्यावर तातडीने पॅचवर्क करण्यास सुरुवात केली. पॅचवर्कसाठी लागणाऱ्या डांबरासाठी मल्टीनॅशनल कंपनीबरोबर प्रशासनाचा पत्रव्यवहार सुरू असून रेडीमिक्सद्वारे पॅचवर्क करण्यासाठी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचा सर्व्हे करण्यास सुरुवात झाली आहे.

जुलै महिन्यातील पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची दैना उडली. अनके रस्त्यांवरुन वाहन चालवणे वाहनधारकांना मुश्कील बनले होते. महापालिकेने मुरुम टाकून तात्पुरती मलपट्टी केली. पण त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसांमुळे टाकलेला मुरुम वाहून गेल्याने छोट्या खड्ड्यांचे भल्या मोठ्या खड्ड्यात रुपांतर झाले. महापूर ओसरल्यानंतर महापालिकेने घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये पॅचवर्कच्या कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना केल्या. बैठकीत रेडीमिक्स पद्धतीने पॅचवर्क करण्याचे धोरण निश्चित केले. पण या पद्धतीने पॅचवर्क करताना डांबरी रस्त्यामध्ये मिसळू शकले नसल्याने ही पद्धत काँक्रिट रस्त्यासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रशासनाने काँक्रिट रस्त्यांचा सर्व्हे करण्यास सुरुवात केली.

मात्र डांबरीकरणाद्वारे शक्य असलेल्या ठिकाणी पॅचवर्क करण्यास सुरुवात झाली. सकाळी ताराराणी चौक, बिंदू चौक व नंगिवली चौकापासून संभाजीनगरपर्यंतच्या रस्त्यावरील पॅचवर्कला सुरुवात झाली. यापूर्वी टाकलेला मुरुम कर्मचाऱ्यांनी बाजूला करुन पॅचवर्क करण्यात आले. त्यासाठी महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या डांबराचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यांमध्ये इमन्शन तंत्राद्वारे पॅचवर्क केले जाते. त्या तंत्राद्वारे शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात येणार असून त्यासाठी दोन मल्टिनॅशनल कंपनीकडून डांबर मिळवण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. दोन दिवसांत या दोन्ही कंपन्यांकडून डांबर उपलब्ध होणार असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी महापालिकेकडील रस्ते काम करणाऱ्या ठेकेदारांची बैठक घेतली आहे. त्यांच्याकडून मोफत मजूर पुरवले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दादाराजे खर्डेकर यांचे निधन

$
0
0

सातारा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ नेते श्रीमंत यशवंतराव उर्फ दादाराजे खर्डेकर (निंबाळकर) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात मुलगा श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, सून, दोन नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी आसू (ता. फलटण) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सहकार आदी क्षेत्रातील विविध मान्यवर, फलटण तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे त्यांचे जावई होत. एक मितभाषी, संयमी व्यक्तीमत्व म्हणून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात व समाजकारणात त्यांची ओळख होती. फलटण तालुक्याच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले. शिक्षण, उद्योग, सहकार क्षेत्रामध्येही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातवा वेतन आयोगाच्या ठरावास मंजुरी

$
0
0

मनपा ... लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. कर्मचाऱ्यांना सरकारच्या शिफारसीनुसार वेतन आयोग लागू करण्याच्या ठरावाला शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा ठराव मंगळवारी (ता.२०) होणाऱ्या महासभेत चर्चेला येणार आहे. महासभेने ठरावाला मंजुरी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगावर शिक्कामोर्तब होणार आहे. अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.

राज्य सरकारने जानेवारी महिन्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची घोषणा केली. त्यानुसार महापालिका, नगरपालिका व नगरपरिषद वगळता इतर कर्मचाऱ्यांना घोषणेचा फायदा झाला. सहा महिन्यानंतरही नवा वेतन आयोग लागू न झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची प्रतीक्षा होती. २३ जुलै रोजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. या घोषणेमुळे महापालिकेच्या तिजोरीवर प्रतिमहिना चार कोटींचा बोजा पडणार असला तरी, कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शुक्रवारी स्थायी समितीमध्ये चर्चा झाली. चर्चेनंतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला व त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. आता हा ठराव मंगळवारी होणाऱ्या महासभेत चर्चेला येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पूरग्रस्तांना घरफाळ्यामध्ये सवलत द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापुरामुळे शहरातील नागरिकांच्या घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पुराचे पाणी येवून ज्या नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे, त्यांना घरफाळयांमध्ये शंभर टक्के विशेष सवलत द्यावी. तसेच ज्यांच्या घरात पाणी जा‌ऊन नुकसान झाले आहे, अशा मिळकतदारांना ५० टक्के सवलत द्यावी,' अशी सूचना स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी केली.

शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीला महापूर येवून शहरावर मोठे संकट आले. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अस्मानी संकाटात सापडलेल्या पूरग्रस्तांना नागरिक, स्वयंसेवी, सामाजिक व राजकीय संघटना जमेल ती मदत करत आहेत. तसेच महापालिकेकडून मदत पुरवली जात आहे. महापुरामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. अशा मिळकतदारांना घरफाळ्यांमध्ये सवलत देण्याची आवश्यकता आहे. पडझड झालेल्या मिळकतदारांना शंभर टक्के सवलत देताना ज्यांच्या घरात पाणी घुसले आहे, त्या मिळकतदारांना ५० टक्के सवलत द्यावी. याबाबतचे पत्र देशमुख यांनी आयुक्तांना दिले.

दरम्यान, महापुरामुळे केएमटी बसेवा ठप्प झाली. १३ दिवस बंद असलेल्या केएमटीमुळे पासधारकांना मोठा फटका बसला. या पासधारकांनी १३ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. या मागणीचा विचार करुन देशमुख यांनी केएमटी सेवा पूर्ववत सुरू झाल्यापासून पासधारकांना १३ दिवस मुदतवाढ देण्याचे आदेश केएमटी प्रशासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांच्या छावणीत चोरी

$
0
0

सांगली :

पूरग्रस्तांना स्थलांतरीत केल्यानंतर पाण्याखाली असलेली त्यांच्या घरातील साहित्य चोरट्याने लुटून नेल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी पूरग्रस्तांच्या छावणीत शिरून चोऱ्या केल्याचे समोर येत आहे. राजमती गर्ल्स हायस्कूलमध्ये स्थलांतरीत झालेल्या कुटुंबाने स्टीलच्या डब्यात ठेवलेली २० हजाराची रोकड, बोरमाळ, मंगळसूत्र, कानातील ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. या प्रकरणी रागनगोंडा शरणगौड बिराजदार यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूर: दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

$
0
0

पंढरपूर : अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आल्याचे समजते. आरोपींपैकी एकाने बलात्काराच्या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पीडितेला दिल्याचे समोर आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पीडिता ही आरोपींपैकी एकाची मैत्रीण होती. आरोपीने या मुलीला एका अनोळखी ठिकाणी बोलावले. तिथे त्याचे चौघे मित्र आधीच आले होते. या पाच जणांनी तिला दारू पाजली आणि त्यानंतर बलात्कार केला. यातील एकाने या सर्व घटनेचे चित्रण केले आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. याचाच गैरफायदा घेऊन या नराधमांनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. तसंच तिच्याकडे पैसेही मागितले. हा सर्व प्रकार तिनं आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे. तर एक जण फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅचवर्कसाठी मोफत मनुष्यबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिवृष्टीमुळे शहरातील बुहतांशी रस्ते खराब झाले आहेत. खराब झालेल्या रस्त्यांच्या पॅचवर्कचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत बांधलेल्या रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ महापालिकेच्या नोंदणीकृत ठेकेदारांकडून मोफत देण्यात येणार आहे. याबाबत महापालिका अधिकारी व ठेकेदारांच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. सोमवारी (ता. १९) पॅचवर्कच्या कामाला सुरुवात होणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयआरबी कंपनीकडून ४९ किलोमीटर रस्त्यांची बांधणी करण्यात आली आहे. अंशत: काँक्रिट व डांबरीकरणाद्वारे रस्ते तयार करण्यात आले आहेत. शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यांवर पॅचवर्क करण्यात येणार आहे. महापालिकेच्यावतीने शहरातील अन्य रस्त्यांचे पॅचवर्क करण्यास सुरुवात झालेली असताना रस्ते प्रकल्पातील रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी महापालिकेच्या नोंदणीकृत ठेकेदारांना आवाहन करण्यात आले होते. या रस्त्यांचे पॅचवर्क आरएमसी रेडीमिक्स काँक्रिटद्वारे करण्यात येणार आहे. यासाठीचे साहित्य महापालिकेकडून पुरवण्यात येणार आहे. मात्र आवश्यक मनुष्यबळ नोंदणीकृत सात ठेकेदारांकडून मोफत देण्यात येणार आहे. त्याबाबतची बैठक शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या दालनात झाली. बैठकीत लागणारे आवश्यक मनुष्यबळ मोफत देण्याचे ठेकेदारांच्यावतीने जाहीर करण्यात आले. शशिकांत पोवार, नंदू साळोखे, बी.एम. पाटील, नरेंद्र मांगलेकर, वीरेंद्र मांगलेकर, रवींद्र जोशी, विनोद माने, प्रसाद व्हराळे यांच्यावर विभागनिहाय रस्त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

शेंडापार्क ते इंदिरा सागर हॉटेल, क्रशर चौक ते पुईखडी, इंदिरासागर हॉटेल ते कळंबा, जावळाचा गणपती ते फुलेवाडी, शाहू नाका ते टेंबलाई उड्डाणपूल, शिवाजी विद्यापीठ ते माऊली चौक, सायबर चौक ते शेंडा पार्क, शाहू स्मारक ते महावीर कॉलेज, तावडे हॉटेल ते ताराराणी चौक, उड्डाणपूल ते एसपी ऑफिस, महावीर कॉलेज ते शिये नाका व खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यांवरील पॅचवर्क करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या देखरेखेखाली एकात्मिक रस्ते प्रकल्पातील रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदारांचे बोटींतून बचावकार्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वत:कडील तीन बोटी उपलब्ध केल्या. समवयस्क मित्रांना सोबत पाण्यात उतरले, तीन दिवसाच्या कालावधीत शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी पोहचविले. अन्नधान्य आणि जीवनाश्यक वस्तूंची मदत केली. रमणमळा, महावीर कॉलेज परिसर आणि इतर ठिकाणी मिळून या पाचजणांच्या पथकाने जवळपास एक हजार लोकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे हलवले. त्यांना अन्य प्रकारची मदत मिळवून देण्याचे काम केले. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचे व्हाइस चेअरमन गोरख माळी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जपली.

महापुरामुळे सिद्धार्थनगर, रमणमळा, महावीर कॉलेज परिसर, न्यू पॅलेस परिसर, शाहूपुरी, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. काहींच्या घरात पाणी शिरले, कुणाची दुकाने पाण्यात बुडाली. रमण मळा, न्यू पॅलेस परिसर आणि महावीर कॉलेजजवळच्या परिसरातील अनेक लोकांनाही झळ बसली.

शहराभोवती महापुराचा विळखा घट्ट होत असल्याचे लक्षात येताच नागरिकांच्या सुरक्षेसाठी बचाव यंत्रणा गतिमान झाल्या. या बचाव यंत्रणांबरोबरच कारखानदार गोरख माळी, व्यापारी शाम कागले, उद्योजक श्रेणिक पाटील, राहुल पाटील, आणि प्रतिक बत्तासे हे मदतकार्यासाठी पुराच्या पाण्यात उतरले. माळी यांच्याकडे तीन बोटी होत्या. त्या बोटीद्वारे त्यांनी मित्रांच्या मदतीने लोकांना पुरातून सुरक्षितस्थळी पोहचविण्याचे काम केले. मंगळवार ते गुरुवार असे तीन त्यांनी शेकडो लोकांना पुरातून बाहेर काढले. काही ठिकाणी कमरेइतके पाणी होते, पाण्याला वेगही मोठा होता. त्यावर अतिशय धीराने मात करत संकटग्रस्तांना आधार दिला.

'महापुरात अडकलेल्या लोकांची सुटका आणि त्यांना सर्व प्रकारची मदत यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते. पूरग्रस्तांसाठी वेगवेगळ्या पातळीवर मदतकार्य सुरू होते. त्यामध्ये आपलाही वाटा या भावनेने माझ्याकडील तीन बोटी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिल्या. आम्ही सगळ्या मित्रांनी वेगवेगळे टीम करुन बचावकार्य राबविले', असे माळी यांनी सांगितले.

फोटो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images