Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मनसेकडूननोटिसींची होळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संभाजीनगर येथील कामगार चाळ धोकादायक बनली असल्याने महापालिका प्रशासनाने रहिवाशांना नोटिसा दिल्या आहेत. निवारा हिरावून घेणाऱ्या या नोटिसांची होळी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महापालिकेच्या मुख्य इमारतींसमोर करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'महापालिका कर्मचाऱ्यांसाठी संभाजीनगर येथे कामगार चाळीची उभारणी केली आहे. कर्मचाऱ्यांकडून मासिक वेतनातून घरभाडे घेतले जाते. मात्र या इमारतीची कधीही दुरुस्ती केली नाही. सद्य:स्थितीत इमारत धोकादायक बनली असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून कर्मचाऱ्यांना इमारत खाली करण्यासाठी नोटीस दिली आहे. कर्मचाऱ्यांचा निवारा हिरावून जागा बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे. हा डाव हाणून पाडू.' यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, बबन चावरे, रितेश पटवणे, नर्मदा पटवणे, पूजा पटवणे, रेवती धनवाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृत्रिम पावसाच्या चाचणीसाठीसोलापुरात विमाने दाखल

$
0
0

कृत्रिम पावसाच्या चाचणीसाठी

सोलापुरात दोन विमाने दाखल

सोलापूर :

सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने आता सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सोलापूरच्या विमानतळावर दोन विमाने दाखल झाली आहेत. सोलापूरसह औरंगाबाद आणि नगर या तीन ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. या पावसाचे निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय हवामान विभागाकडून एक पथक सोलापुरात दाखल झाले आहे.

केगाव येथील सिंहगड कॉलेजच्या इमारतीवर रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे. सोलापुरात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाल्यास सोलापूर नजीकच्या उस्मानाबाद, लातूर आणि पुणे जिल्ह्याला लाभ होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी करण्यासाठी सर्वप्रथम हवामानाचा अंदाज घेतला जातो. हा प्रयोग खूपच खर्चिक असल्याने सरकारी पातळीवर खूपच काळजी घेतली जाते. दरम्यान, केंद्रीय पथकाकडून या विमानांद्वारे ढगांचा अंदाज घेतला जाणार आहे. त्या नंतरच प्रयोगाला सुरुवात करण्यात येणार आहे. सोलापूर विमानतळावर कृत्रिम पावसाला आवश्यक असलेली मशिनरी बसविण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीत खोटे शपथपत्र;उपनगराध्यक्षांवर गुन्हा

$
0
0

निवडणुकीत खोटे शपथपत्र;

उपनगराध्यक्षांवर गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, कराड

सन २०१६ साली झालेल्या कराड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी येथील उपनगराध्यक्ष जयवंत आत्माराम पाटील यांच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबतची फिर्याद गुरुवारी सायंकाळी उशीरा सुंदरराव जगन्नाथ गोसावी (रा. शनिवार पेठ, कराड) यांनी दिली आहे.

नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली होती. सदर निवडणुकीमध्ये जयवंत आत्माराम पाटील यांनी प्रभाग क्रमांक आठ 'ब' मधून जनशक्ती आघाडीतर्फे नगरसेवक म्हणून उमेदवारी अर्ज सादर करून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते सध्या उपनगराध्यक्ष पदावर काम करीत आहेत. मात्र त्यांनी निवडणुकीवेळी शपथपत्रात अपूर्ण व खोटी माहिती दिल्याप्रकणी इम्तियाज महिबूब बागवान (रा. गुरुवार पेठ, कराड) यांनी २० जुलै २०१७ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या अर्जाची चौकशी कराडचे उपविभागीय दंडाधिकारी हिम्मत खराडे यांच्यामार्फत झाली असून, त्या अनुषंगाने साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पालिक मुख्याधिकारी यांना सूचना केल्या होत्या.

दरम्यान, जयवंत पाटील यांनी निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या शपथपत्रात पूर्ण व खरी माहिती देणे अपेक्षित होते. त्यांनी पत्नी सुनिता पाटील व मुलगा सिद्धांत पाटील यांच्या नावे २५ ऑक्टोबर २०१६ पूर्वी त्या मिळकती खरेदी केल्या आहेत. त्याची माहिती त्यांनी शपथपत्रात नमूद करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक आपल्या शपथपत्रात नमूद केली नाही. जयवंत पाटील यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पाटील व त्यांची पत्नी सुनीता यांचा व्यवसाय शेती असल्याचे नमूद केले होते. परंतु, पाटील यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील स्थावर मालमत्तेच्या तपशिलांमध्ये कृषी जमीन नसलेचा उल्लेख केला आहे. त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या तसेच मुलांच्या नावे असलेली मिळकतीची माहितीही अपूर्ण व खोटी सादर करून निवडणूक आयोगाच्या या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी उशीरा कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

.............

कोयना धरणात ५० टीएमसी पाणीसाठा

कराड :

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रातील छोटे-मोठे धबधबे, ओघळी व डोंगरदऱ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे शिवसागर जलाशयात पाण्याची आवक मंदगतीने सुरू आहे. सध्या धरणात ६६७८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ५० टीएमसी इतका झाला आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण ४७.५० टक्के भरले आहे.

ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्ह पडत असल्याने उन्हाळा असल्यासारखे भासत आहे. गेल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरूवात केल्याने कोयना धरणात समाधानकारक पाणीसाठा होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. दमदार पर्जन्यवृष्टी होणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील बामणोली, वळवण, सोनाट या परिसरातही पावसाने उसंत घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद घर फोडले

$
0
0

बंद घर फोडले

सातारा

काशीळ येथे सेवानिवृत्त महसूल अधिकारी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे ४ लाखांची रोकड व २१ तोळे सोन्यावर डल्ला मारला. सुमारे ११ लाखांचा ऐवज लुटल्याने परिसरात घबराट पसरली आहे. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करूनही चोरट्यांचा माग लागला नाही.

गुलाबमहंमद भालदार हे सेवानिवृत्त मंडल अधिकारी असून, येथील हायस्कूलसमोर त्यांचा बंगला आहे. ते पत्नी रविजासह येथे वास्तव्य करतात. त्यांची दोन मुले रशीद व सुलतान हे नोकरीनिमित्त मुंबई व पाचगणी येथे राहतात. शुक्रवारी, १२ जुलै रोजी रात्री गुलाबमहंमद भालदार पत्नीसह मुलगा रशीद याला भेटायला मुंबई येथे गेले होते. बुधवारी त्यांच्या घरी वीज मीटरचे रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी गेला होता, त्या वेळी त्याला भालदार यांच्या घराचा दरवाजा तुटलेला दिसल्याने त्याने शेजाऱ्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

............

वाहतूक झाली धोकादायक

सातारा :

सातारा शहराकडून परळीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ऐतिहासिक बोगद्यात दहा दिवसांपूर्वी दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्या नंतर या ठिकाणी वारंवार मातीचा भराव व दगडे कोसळत राहिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्या नंतर या ठिकाणच्या धोकादायक दरडी हटवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली असून, वारंवार कोंडी होत आहे.

..........

पावसाच्या दडीमुळे खरिपाची चिंता

सातारा :

मान्सूनचा पाऊस उशीराने सुरू झाल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्याही उशिराने झाल्या. आता पिकांची उगवण होऊन पिके चार-पाच पानांवर आली आहेत. आता पाण्याची निकड असतानाच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पेरण्या अडचणीत आल्या आहेत. मुळात कमी पावसामुळे आतापर्यंत बाजरीची फक्त ४६ टक्केच पेरणी झाली आहे. अद्यापही जिल्ह्यातील सर्व पिकांचे मिळून ९२ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येणे बाकी आहे.

जिल्ह्याच्या पूर्वेकडे खरीप हंगामात बाजरीचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४९ हजार ५३१ हेक्टर असले तरी आतापर्यंत फक्त २२ हजार ९५८ हेक्टरवर पेरा झाला आहे. माणमध्ये २१ हजार ६७० पैकी ११ हजार ६४१ हेक्टरवर, तर खटावमध्ये १० हजार ६४५ पैकी ५ हजार ५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कोरेगावमध्ये सुमारे सव्वादोन हजार हेक्टरपैकी ८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. जुलै महिना संपत आल्याने यापुढे बाजरीची पेरणी होणे अवघड आहे. दरम्यान, पश्चिमेकडे मात्र पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या कामाला वेग आला आहे. या भागात भात, सोयाबीन, नाचणी, तूर, उडीद, मका, भुईमूग, अशी पिके घेण्यात येतात. या पिकांची पेरणी व लागण सुरू आहे.

.......

राज्यस्तरीय कुस्तीपटूची आत्महत्या

सातारा :

फलटण येथील माजी नगरसेवक किशोर पवार यांचा मुलगा प्रतीक किशोर पवार (वय १८ वर्ष रा. जाधववाडी, ता. फलटण) याने गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याला तातडीने अधिक उपचारासाठी फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. फलटण शहरातील एक उमदा पैलवान म्हणून तो परिचित होता. त्याने विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा, विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत, तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने कमी वयातच ठसा उमटवला होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित बहुजन आघाडीतर्फे आज महिला मेळावा

$
0
0

........ माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाची फिरती विज्ञान प्रयोगशाळा सोलापूर : विज्ञान-तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार व्हावा, शहरासह ग्रामीण भागातील माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांनाही विज्ञान तंत्रज्ञानाचे प्रयोग करता यावे तसेच या संदर्भात प्रत्यक्षात प्रॅक्टिकल ज्ञान घेता यावे, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. लॅब ऑन व्हील, असे या उपक्रमाचे नाव असून, विद्यापीठाच्या वर्धापन दिनी म्हणजे १ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जालना जिल्ह्यातील विकास कामे पूर्णत्वाकडे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

गेल्या चार वर्षांच्या काळात जालना जिल्ह्यात चार हजार ७०० कोटी रुपयांच्या माध्यमातून विकास कामे पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

मंठा तालुक्यातील कानफोडी येथे मुख्य ग्रामसडक योजनेंतर्गत कानफोडी-कटाळा तांडा-कटाळा या ३ कोटी ८१ लाख रुपयांच्या कामाची सुरुवात गुरुवारी लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, भुजंगराव गोरे, भाऊसाहेब कदम, गणेशराव खवणे, संदीप बोराडे, नरसिंग राठोड, उपविभागीय अधिकारी डव्हळे, तहसीलदार सुमन मोरे, कार्यकारी अभियंता चौधरी, उपअभियंता म्हस्के यांची उपस्थिती होती.

लोणीकर म्हणाले,'जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात येत आहे. ग्रामीण भागातही पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात विकास कामे करण्यात येत आहेत. या कानफोडी व परिसरातील नागरिकांची रस्त्याबाबत बऱ्याच‍ दिवसांची मागणी होती. ती आज या निमित्ताने पूर्ण होत आहे.'

मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यापासून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासावर भर दिला असून वीज, पाणी, रस्ते यासारख्या मुलभूत गरजांसाठी जिल्ह्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'अण्णा भाऊं'चे स्मारक उभारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक ऑगस्टपासून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. अण्णा भाऊंचे स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार जन्मशताब्दी नियोजन बैठकीत करण्यात आला. मुस्लिम बोर्डिंग येथे शनिवारी सर्वधर्मीय प्रतिनिधींची बैठक पार पडली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दीवर्ष एक ऑगस्टपासून सुरू होत आहे.

जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी शनिवारी मुस्लिम बोर्डिंग येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांसह विविध जातीधर्मातील लोक उपस्थित होते. बैठकीत उपस्थितांनी जन्मशताब्दीनिमित्त कोणते कार्यक्रम घ्यावेत याबाबत सूचना केल्या. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, पोवाडे, कामगार चळवळ, सीमा लढ्यातील योगदानाबद्दल वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंधेला म्हणजे ३१ जुलै रोजी शाहू स्मारक भवन येथे शाहिरी मुजरा हा कार्यक्रम होणार आहे. एक ते सात ऑगस्ट या आठवड्यात सरकारने दूरदर्शनवरून अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर निर्माण झालेले चित्रपट प्रसारित करावेत, अशी विनंती राज्य सरकारला केली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठातील अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे काम गतिमान व्हावे, यासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले जाणार आहे.

अण्णा भाऊ यांचे मुंबईतील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे, यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. अण्णा भाऊंचा कोल्हापूरशी ऋणानुबंध होता. त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींना उजाळा देण्यासाठी कृतज्ञता परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने चळवळींमध्ये काम करणाऱ्या निवडक कार्यकर्त्यांचा सत्कारही केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जावे यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भेट घेण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळा कोल्हापुरात व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रा. विश्वास देशमुख, शाहीर दिलीप सावंत, कादर मलबारी, रघुनाथ कांबळे, गणी आजरेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण द्रविड होते. बबन रानगे, विजय शिंदे, आप्पासाहेब देसाई, संजय आवळे, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते. सर्वसमावेशक जन्मशताब्दी जातीपातींमध्ये राष्ट्रीय नेत्यांची विभागणी करून उत्सव साजरे करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशावेळी अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी मात्र कोल्हापुरातील सर्व जातीधर्मीय एकवटले आहेत. कोल्हापूरकरांच्या उपक्रमामुळे अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती बदलणार नसल्याचा पुनरुच्चार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. रासायनिक संवर्धन प्रक्रियेला चार वर्षे पूर्ण झाली असून तज्ज्ञांकडून मूर्तीची तपासणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंदिराच्या शिखराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

अंबाबाईची मूर्ती झिजली असल्याने ती बदलण्यात येणार आहे, अशा चर्चेने शुक्रवारी जोर धरला होता. याबाबत देशभरातील भाविकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. देवस्थान समितीने खुलासा केल्यानंतर शनिवारी मूर्ती बदलण्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'अंबाबाईच्या मूर्तीवर २०१४ मध्ये औरंगाबाद पुरातत्त्व विभागाने रासायनिक प्रक्रिया केली आहे. त्यामुळे मूर्ती अतिशय सुस्थितीत आहे. मूर्तीची कोणत्याही प्रकारची झीज झालेली नाही. अंबाबाईचे श्रीपूजक आणि देवस्थान समितीच्या पुजाऱ्यांनी मूर्तीची तपासणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत मूर्ती बदलणार नाही.'

अंबाबाई मंदिराच्या शिखरांना तीनशेहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. मूर्तीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात होणार नाही. फक्त शिखरांचे स्ट्रक्चरल ऑडिट होईल असा खुलासाही जाधव यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रांजणगावात पत्नीचा गळा दाबून खून पती ठाण्यात हजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर

रांजणगाव शेणपुंजी येथे पत्नीचा गळा दाबून खून करून पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना शनिवारी (२० जुलै) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.

ममता आनंद लोखंडे असे मत महिलेचे नाव आहे. आनंद सुरेश लोखंडे (वय २५, रा. पवननगर रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे. आनंद लोखंडेचे ममतासोबत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षाची मुलगी प्रज्ञा, तीन वर्षांचा मुलगा संघर्ष अशी दोन मुले आहेत. कुटुंबासोबत मुकुंदवाडी येथे राहत असताना ८ जुलै रोजी त्याची पत्नी दोन्ही मुलासह घरातून निघून गेली होती. त्याची नोंद त्याने ११ जुलै रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर त्याला पत्नी मुलासह नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली त्यावरून तो तिथे गेला असता त्याच्या पत्नीसोबत मुकुंदवाडीतील प्रमोद खनपटे नावाचा युवक होता. तेथील एका हॉटेलमध्ये नाष्टा करत असताना याबाबत पत्नीला विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तर दिली. एकमेकांशी ते खाना-खुणा करीत असल्याचे आनंदला लक्षात आले. त्यावेळी आनंदने प्रमोदला मारहाण केल्यानंतर प्रमोद तिथून निघून गेला. पत्नी व मुलांना घेऊन मुकुंदवाडीला आला. पत्नीचे प्रमोदसोबतचे अनैतिक संबंध असल्याने व तो घरासमोरच राहत असल्याने त्याचा विसर पडावा म्हणून आनंद कुटुंबासह वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव येथे राहण्यासाठी आला होता. त्याने पत्नीचा मोबाइल काढून घेतला होता. शुक्रवारी रात्री यावरूनच दोघात वाद झाले होते. शनिवारी सकाळी पळून गेल्याच्या कारणावरून पुन्हा दोघांत वाद सुरू झाला. आनंदची आई मुलांना शाळेत घेऊन गेली होती तसेच वडील वयस्कर असल्याने एका जागेवरच बसून असतात. यावेळी दोघांचा वाद विकोपाला गेला यात रागाच्या भरात आनंदने पत्नीचा गळा दाबला. यानंतर आरोपी स्वतः वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनला हजर होऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी दवाखान्यात पाठवला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन महिन्यात तीन हजारांनी वाढले सोने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने सोन्याच्या करात केलेली अडीच टक्क्यांची वाढ तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची मागणी वाढत असल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. गेल्या तीन महिन्यात प्रतितोळा ३१०० रुपयांहून अधिक वाढ झाली. मजुरीच्या खर्चासह दागिन्यांचा दर ३८ हजारांवर गेल्याने बाजारात खरेदीवर मर्यादा आली आहे. या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक बाजारात सोन्याला मागणी वाढली आहे. याशिवाय अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉरचा परिणामही सोने दरावर झाला आहे. यातच केंद्र सरकारने सोन्याच्या करात अडीच टक्क्यांनी वाढ करून दरवाढीस हातभार लावला. परिणामी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दराने उसळी घेतली. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा कोल्हापुरातील दर ३२ हजार ८१० रुपये होता. १८ मे रोजी हा दर ३३ हजार १८० रुपयांवर गेला. जून महिन्यात जागतिक घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला. अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरची तीव्रता वाढली. जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली. लग्नांचे मुहूर्त आणि सणासुदीचे दिवस यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याची मागणी वाढल्याने याचा परिणाम दरवाढीवर झाला. जूनच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याचा दर ३५ हजार रुपयांपर्यंत गेला.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावर अडीच टक्के कर वाढवल्याची घोषणा केली. याचा तातडीने परिणाम होऊन सहा जुलैला सोन्याचे दर ३५ हजार ४०० रुपयांवर गेले. १२ जुलैला तो ३५ हजार ६०० रुपयांवर गेला. यानंतर गेल्या आठवडाभरातील दर ३५ हजार ५०० रुपयांच्या आसपास आहे. शनिवारी हा दर ३५ हजार ९३० रुपयांवर जाऊन पोहोचला. दरवाढ सुरूच असून, लवकरच ३६ हजारांवर सोन्याचा दर पोहोचणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. हे सर्व दर जीएसटीसह आहेत.

दरम्यान, येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने खरेदी मंदावली आहे. गुंतवणूकदारांनी खरेदी थांबवली आहे. अत्यावश्यक व किरकोळ खरेदी सुरू असल्याने उलाढाल कमी झाली आहे. दागिन्यांची खरेदी करताना ग्रॅमला मजुरीचे दर वेगळे पकडले जातात. दागिन्यांच्या प्रकारानुसार ग्रॅमला १०० ते ८०० रुपयांपर्यंत मजुरीचे दर आहेत. सरासरी ३०० रुपये मजुरीचा दर गृहित धरल्यास प्रतितोळा तीन हजार रुपयांची वाढ होते. म्हणजेच दागिने खरेदी करताना प्रतितोळा दर सुमारे ३९ हजारांपर्यंत जातो.

.. ..

जागतिक घडामोडी आणि केंद्र सरकारने कस्टम ड्युटी वाढवल्याने सोन्याचे दर वाढत आहेत. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे दरातील चढ-उतार सुरूच राहील. काही काळानंतर बाजारात स्थिरता येण्याची शक्यता आहे.

भरत ओसवाल, अध्यक्ष, जिल्हा सराफ संघ

.. . .

सोन्याच्या दरात मजुरीचे पैसे पकडून खरेदीचा दर ३८ हजारांवर जातो. दरात वाढ झाल्याने जुने सोने देऊन नवीन घेण्याचा ट्रेण्ड सध्या मार्केटमध्ये दिसत आहे. गुंतवणूकदारांना मात्र आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल असे दिसते.

कुलदीप गायकवाड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ संघ

.. .. . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाडीअड्ड्यात ऑगस्टपासून पे अँड पार्किंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार व्हीनस कॉर्नर येथील गाडीअड्ड्यामध्ये एक ऑगस्टपासून पे अँड पार्किंगला सुरुवात होईल. तत्पूर्वी शहर अभियंता, नगररचना विभाग आणि संबंधीत अधिकाऱ्यांनी पाहणी करावी' असे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिले. सभेत गाडी अड्ड्यातील अनधिकृत केबिन्स, अतिक्रमणांवरुन इस्टेट, नगररचना, पवडी विभागाला नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले.

मेहजबीन सुभेदार यांनी, 'कोर्टाने गाडीअड्डा परिसरातील अनधिकृत केबिन हटवण्याचे आदेश दिले आहेत. इस्टेट विभाग मात्र कारवाई करीत नाही. काही अधिकारी केबिनधारकांना कोर्टात जाण्याचा सल्ला देत केवळ चहा-नाष्ट्यासाठी तेथे जातात' असा गंभीर आरोप केला. सुभेदार यांच्या आरोपानंतर नगरसेवकांनी इस्टेट अधिकारी प्रमोद बराले, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपरचनाकार नारायण भोसले यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले. सत्यजित कदम यांनी केबिनधारक पार्किंगच्या आडवे येत असल्यास केबिन्स पाडून टाकण्याची सूचना केली. तर विजय सूर्यवंशी यांनी तीर्थक्षेत्र आराखड्यातील तरतुदीनुसार पे अँड पार्किंग करण्याची मागणी केली.

नियाज खान म्हणाले, 'उद्यमनगर येथे एका उद्योजकाने डीपी रोडवर फाउंड्री बांधली आहे. जवाहरनगरात खुल्या जागेवरही अशाच पद्धतीने बांधकाम केले आहे. त्याचे सर्व पुरावे नगररचना विभागाला दिले. मात्र, अतिक्रमणे हटविण्यासाठी नोटिसही दिली जात नाही. सर्वसामांन्य नागरिकांना बांधकाम परवाना मिळत नाही. पण बिल्डरांना त्वरीत परवाना मिळतो.' उमा बनछोडे म्हणाल्या, 'शाहू उद्यानाच्या मागील बाजूस तीन वर्षाच्या मुदतीने किसन भालकर यांना केबिन लावण्यास जागा दिली. ही केबिन रहदारी अडथळा ठरत असल्याने काढण्याची गरज आहे. मात्र केबिन काढली जात नाही. केबिनधारकांकडून पैसे घेतले आहेत का? अधिकाऱ्यांचे हितसंबंध तेथे आहेत का?' या आरोपावर दुकान काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून आठ दिवसांत त्यावर कार्यवाही होईल. असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडीतून महापालिकेला भुर्दंड

$
0
0

नगरसेवकांचा आरोप; १२ प्रभागांत मांडणार लेखाजोखा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ईएसएसएल कंपनीच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या एलईडी प्रकल्पाची सभागृहाला वस्तूनिष्ठ माहिती दिलेली नाही. एलईडी बसविल्यानंतर विज बिलात कपात होणार का? नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे जादा वॅटचे दिवे बसवल्यास बिलामध्ये वाढ होऊन महापालिकेला आर्थिक भुर्दंड बसणार आहे. अशी भिती व्यक्त करत १२ प्रभागात प्रकल्प कार्यन्वित झाल्यानंतर त्यांचा लेखाजोखा मांडा. खर्च जास्त होणार असल्यास प्रकल्प थांबवा अशी एकमुखी मागणी नगरसेवकांनी शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. प्रशासनाकडे खर्चामध्ये कपात होणार का? याचे ठोस उत्तर नसल्याने प्रकाशमय प्रकल्पाचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या.

महापालिका आणि कंपनीबरोबर झालेल्या कराराच्या अधारे नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी कंपनीचे अधिकारी दीपक कोकाटे यांच्यासह प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. ते म्हणाले, 'प्रकल्प राबवण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी सभागृहात सातत्याने दबाव आणला. प्रकल्प राबवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. १२ प्रभागात उच्च तंत्राचा वापर करुन दिवे बसवले. पण ते एका दिवसांत गेले. नॅशनल लाइप कोडनुसार कंपनीसोबत करार झाला. मात्र करारामध्ये त्याचा वापर दिसत नाही. नगरसेवकांच्या मागणीनुसार दिवे बसवल्यास विज बिलात किती वाढ होणार? दिवे कार्यन्वित केलेल्या ठिकाणी बिलात निम्म्याने बचत झाली का? त्याबाबतचा सर्व्हे झाला का? ' कोकाटे यांनी एका वॅटसाठी ५२ रुपयांपेक्षा जास्त पैसे कंपनी घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तर विजय सूर्यवंशी यांनी त्यापेक्षा जास्त पैसे देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

रत्नेश शिरोळकर म्हणाले, 'प्रकल्प सुरू करण्यापूर्वी केवळ बिलात ५० टक्के बचत होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र वस्तुनिष्ठ अहवाल किधीही सभागृहाला दिला नाही.' तर मुरलीधर जाधव म्हणाले, 'ज्या प्रभागात दिवे बसवले तेथील विज बिलात बचत झाली का? त्याच सर्व्हे करा. संपूर्ण प्रकल्पाचा लेखाजोखा मांडा. प्रकल्प खर्चिक होणार असेल, तर प्रकल्प थांबवा.' आशिष ढवळे यांनीही याच पद्धतीची सूचना केली. तर सत्यजित कदम यांनी अमृत योजनेप्रमाणे एलईडी दिव्यांचा सर्व्हे भोगस असल्याचा आरोप केला. उपमहापौर भूपाल शेटे यांनी आयएसओ मानांकन असलेले दिवे बसवण्याची मागणी केली.

'१२ प्रभागातील काम तीन टप्प्यात होणार आहे. अद्याप काम पूर्ण झालेले नाही. प्रशासनाकडून चार महिन्यात पडताळणी अहवाल अहवाल मिळालेला नाही.' असा खुलासा कंपनीचे अधिकारी कोकाटे यांनी केला. आयुक्त म्हणाले, 'रस्त्यांच्या रुंदीनुसार दिवे बसवले जातील. प्रकल्पावर विभागीय कार्यालयाचे विभागप्रमुख देखरेख ठेवतील. दिव्यामध्ये बिघाड झाल्यास ४८ तासात कंपनी दुरुस्ती करेल. दुरुस्ती न झाल्यास कंपनीवर कारवाई केली जाईल.'

कमलाकर भोपळे म्हणाले, 'टिपर आल्यानंतर कोंडाळे उचलण्यात आले. पण टिपर अद्याप पडून आहेत. उद्घाटनाला पाहुणा मिळत नसल्यास शिवाजी पुलाप्रमाणे उद्घाटन करा. अन्यथा टिपरसाठी स्वतंत्र शोरुम बांधा.' महापौर गवंडी यांनी दहा दिवसांत टिपरचे उद्घाटन होईल. असे स्पष्ट केले. विलास वास्कर यांनी फेरीवाले शुल्क देत नसल्याने पाच वर्षात महापालिकेचे साडेसहा कोटीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करत इस्टेट विभागाला धारेवर धरले. उमा इंगले, उमा बनछोडे, सुरमंजिरी लाटकर, पूजा नाईकनवरे, रुपाराणी निकम यांनी विविध प्रश्न विचारुन प्रशासनाची कोंडी केली.

.........................................

चौकट

संतोष गायकवाड ठाम

संभाजीनगर प्रभागातील ओपन स्पेसमधील बागेला नाव देण्याचा सदस्य ठराव आला होता. 'घर पाडून वाचनालय' ऊभा करण्यास मान्यता देणार नसल्याचे स्पष्ट करत संतोष गायकवाड यांनी त्याला विरोध केला. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी केला. त्याचवेळी किरण नकाते यांनी मंडळाने जागा मागितले नसल्याचे स्पष्ट केले. त्याचेवळी दिलीप पोवार यांनी स्थानिक नगरसेवकांचे हक्क हिरावून घेवू नका. असा टोला मारला. तर स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी स्थानिक नगरसेवकांची परवानगी नसल्याने प्रस्ताव नामंजूर करण्याची मागणी केली. यावेळी पुन्हा गायकवाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. पण ते अखेरपर्यंत आपल्या मतावर ठाम राहिले.

.....................

१३ ठराव मंजूर

सभेत कार्यपत्रिकेवरील सहा व पुरवणी पत्रिकेवरील सात अशा १३ विषयांचे ठराव सभागृहाने मंजूर केले. दोन विषयांना उपसुचनेशिवाय मंजुरी देत पुरवणीमधील पाच ठराव ऑफिस प्रस्तावासह पुन्हा सभागृहाला सादर करण्याचा निर्णय घेतला. तर तीन विषय पुढील मिटिंगमध्ये ठेवण्यात आले.

..................

पाहुणा परदेशातून येणार का - कदम

कचरा उचलण्यासाठी टिपर खरेदी केल्या. पण कचरा उचल करण्यास सुरुवात झालेली नाही. टिपर चालवण्यास व घंटा वाजवण्यास कर्मचारी आहेत का? अशी विचारणा करत उद्घाटनाला विलंब का? उद्घाटनासाठी परदेशातून पाहुणा येणार का? असा प्रश्न सुनील कदम यांनी उपस्थित केला. तर वास्कर यांनी उद्घाटनासाठी डोनाल्ड ट्रंप यांना निमंत्रीत करा. असा टोला लगावला. यावेळी सत्तारुढ व विरोधी गटात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल लिक होऊन मृत्यू

$
0
0

नाशिक : दुचाकीतील पेट्रोल लिक असल्याने सायलेन्सरवर पेट्रोल पडून ते पेटल्याने एकाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना ध्रुवनगर परिसरात घडली. निरंजन घनशाम सरोदे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीचे पेट्रोल लिक होत असल्याची बाब निरंजन यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी दुचाकीचे इंजिन बंद करीत असतानाच सायलेंसरवर पेट्रोल पडून भडका उडाला. त्यातच निरंजन हे ४० ते ४५ टक्के भाजले. उपचारादरम्यान, शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस हवालदाराचा मृत्यू

$
0
0

हवालदाराचा मृत्यू

सातारा : महामार्ग पोलिस केंद्र भुईंज, येथील पोलिस हवालदार सचिन सर्जेराव फरांदे (३८) हे शुक्रवारी सकाळी महामार्ग पोलिस केंद्र भुईंज येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना अस्‍वस्‍थ वाटू लागले. त्यामुळे त्‍यांना रुग्‍णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे सांगण्यात आले. सचिन फरांदे यांनी या पूर्वी सातारा शहर पोलिस ठाण्यातही काम केले आहे.

कासवर वीजनिर्मिती?

सातारा : कास धरणाची उंची वाढवल्यामुळे सातारा शहरात तसेच परिसरातील गावांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही. कास धरणाच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटसाठी वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. या शिवाय या धरणात बोटिंगसारखा उपक्रमही सुरू करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिले. कास तलावाचे उंची वाढविण्याचे काम पुढील वर्षी पूर्ण होईल. या कामामुळे सातारकरांचा पुढील पन्नास ते साठ वर्षांचा पाणीप्रश्न मिटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौर ऊर्जेचे अकरा प्रकल्प पूर्ण

$
0
0

सौर ऊर्जेचे अकरा प्रकल्प पूर्ण

सोलापूर :

कृषिपंपांना दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली आहे. बारामती परिमंडल अंतर्गत महावितरणकडून स्वतःच्या उपकेंद्रांच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या ९.५ मेगावॅट क्षमतेचे अकरा सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

बारामती परिमंडल अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ३१८५ किलोवॅटचे चार प्रकल्प तर बारामती मंडलमध्ये ३६४३ किलोवॅटचे पाच सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी व चाचणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत नऊ सौर प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. सातारा जिल्ह्यात २७४७ किलोवॅटचे दोन प्रकल्प या पूर्वीच कार्यान्वित झाले आहे. हे सर्व प्रकल्प महावितरणने ३३/११ केव्ही उपकेंद्रांच्या जागेत उभारलेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसामुळे बळीराजा सुखावला

$
0
0

मराठवाड्यातील काही भागात पावसाची हजेरी

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यातील नांदेड, बीड, जालना, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागांत शनिवारी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही भागातील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तर काही भागात रखडलेल्या पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. कमी-अधिक प्रमाणात रात्रभर पडणाऱ्या पावसाच्या सरीमुळे बळीराजा सुखावला आहे.

नांदेडमध्ये पेरण्यांना सुरुवात

नांदेड : गेल्या दीड महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. पन्नास टक्क्यापेक्षा अधिक शेतकरी पेरणीसाठी आतूर झाले होते. यंदा पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतातूर होते. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू झाला. शुक्रवारी रात्री पावसाला प्रारंभ झाला. कमी अधिक प्रमाणात रात्रभर पडणाऱ्या पावसाच्या सरी सकाळी साडेदहापर्यंत बरसल्या. दमदार पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही सुखावले आहेत. जिल्ह्यातील सोळा पैकी अकरा तालुक्यात दमदार पाऊस झाला. बिलोली तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. किनवटसह काही भागात मात्र पावसाची वक्रदृष्टी कायम आहे.

लातूर जिल्ह्यात १८ मिलिमीटर पाऊस

लातूर : जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण १८.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लातूर जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत १९.४८ टक्के इतकी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस अहमदपूर तालुक्यात ३३.५० मिलिमीटर तर सर्वात कमी पाऊस औसा तालुक्यात ७.४३ मिलिमीटर इतका झाला.

लातूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस तालुकानिहाय पुढीलप्रमाणे लातूर १२ मिलिमीटर, औसा ७.४३ मिलिमीटर, रेणापूर १० मिलिमीटर, उदगीर २९.७१ मिलिमीटर, अहमदपूर ३३.५० मिलिमीटर, चाकूर १३.४. मिलिमीटर, जळकोट ११.५० मिलिमीटर, निलंगा १६.१३ मिलिमीटर, देवणी २२.३३ मिलिमीटर, शिरुर अनंतपाळ २४.३३ मिलिमीटर अशी पावसाची नोंद झाली.

बीडमध्ये पावसाची हजेरी

बीड : बीड जिल्ह्यात दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी ६६६ मिलिमीटर असताना त्या तुलनेत २० जुलै अखेर जिल्ह्यात ११२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जूनअखेर पेरणी पुरता पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र, त्यानंतर गेल्या दहा दिवसांत पाऊस गायब झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्प अजुनही कोरडे आहेत. शुक्रवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाले. शुक्रवारी रात्री अकराही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यात सर्वाधिक परळी तालुक्यात ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर त्यानंतर केज तालुक्यात २६ मिलिमीटर, शिरूरमध्ये सर्वात कमी एक मिलिमिटर पाऊस पडला. पावसामुळे खरीपाच्या कापूस, सोयाबीन, उडीद, मुगासारख्या पिकाला काही अवधीसाठी जीवदान मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्शन मंडपप्रश्नी आठवड्यात बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत भवानी मंडपात उभारण्यात येणाऱ्या दर्शन मंडपप्रश्नी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि स्थानिक नगरसेवकांची आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. दर्शन मंडपाची जागा बदलण्यावरुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे ही बैठक होणार आहे. जागा बदलल्यास पुन्हा सर्व प्रक्रिया राबवावी लागणार असल्याने त्वरीत निर्णय घेण्याची सूचनाही त्यांनी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांना केली.

नियोजित दर्शन मंडपाला विरोध होऊ लागल्यामुळे महापालिका आयुक्त व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी नवीन जागेची पाहणी केली. या पाहणीचा संदर्भ घेत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान पालकमंत्री पाटील यांनी आयुक्तांसमोर नाराजी व्यक्त केली. 'नियोजित ठिकाणीच दर्शन मंडप झाला पाहिजे. मंडपाची जागा बदलल्यास पुन्हा निधीसाठी प्रयत्न करावे लागतील. सद्यस्थितीत मंडपासाठी सात कोटींचा निधी मिळाला असून प्रथम तो खर्च झाला पाहिजे. निधी खर्च होण्यापूर्वीच आराखड्यात बदल केल्यास पुन्हा वेळेचा अपव्यय होईल. त्यावर पुन्हा सूचना येतील, चर्चा होईल. बदललेल्या जागेचा पुन्हा आराखडा तयार करावा लागेल. एकाच कामासाठी किती दिवस वाया घालवायचे याचाही विचार करावा लागेल. त्यामुळे दर्शन मंडप जेथे ठरला आहे, तेथेच करावा लागेल. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्या' अशी सूचना पालकमंत्र्यांनी आयुक्तांना केली. त्यामुळे आयुक्त, जिल्हाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्षांची बैठक आठवड्यात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अण्णा भाऊं’चे स्मारक उभारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक ऑगस्टपासून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. अण्णा भाऊंचे स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार जन्मशताब्दी नियोजन बैठकीत करण्यात आला. मुस्लिम बोर्डिंग येथे शनिवारी सर्वधर्मीय प्रतिनिधींची बैठक पार पडली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दीवर्ष एक ऑगस्टपासून सुरू होत आहे. जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी शनिवारी मुस्लिम बोर्डिंग येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांसह विविध जातीधर्मातील लोक उपस्थित होते. बैठकीत उपस्थितांनी जन्मशताब्दीनिमित्त कोणते कार्यक्रम घ्यावेत याबाबत सूचना केल्या. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, पोवाडे, कामगार चळवळ, सीमा लढ्यातील योगदानाबद्दल वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंधेला म्हणजे ३१ जुलै रोजी शाहू स्मारक भवन येथे शाहिरी मुजरा हा कार्यक्रम होणार आहे. एक ते सात ऑगस्ट या आठवड्यात सरकारने दूरदर्शनवरून अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर निर्माण झालेले चित्रपट प्रसारित करावेत, अशी विनंती राज्य सरकारला केली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठातील अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे काम गतिमान व्हावे, यासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले जाणार आहे.

अण्णा भाऊ यांचे मुंबईतील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावे, यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. अण्णा भाऊंचा कोल्हापूरशी ऋणानुबंध होता. त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींना उजाळा देण्यासाठी कृतज्ञता परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने चळवळींमध्ये काम करणाऱ्या निवडक कार्यकर्त्यांचा सत्कारही केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जावे यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भेट घेण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळा कोल्हापुरात व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रा. विश्वास देशमुख, शाहीर दिलीप सावंत, कादर मलबारी, रघुनाथ कांबळे, गणी आजरेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण द्रविड होते. बबन रानगे, विजय शिंदे, आप्पासाहेब देसाई, संजय आवळे, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते.

सर्वसमावेशक जन्मशताब्दी

जातीपातींमध्ये राष्ट्रीय नेत्यांची विभागणी करून उत्सव साजरे करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशावेळी अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी मात्र कोल्हापुरातील सर्व जातीधर्मीय एकवटले आहेत. कोल्हापूरकरांच्या उपक्रमामुळे अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अकरावी’च्या दुसऱ्या फेरीत५२७ अर्जांचे संकलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीअतंर्गत शनिवारी ५२७ अर्जांचे संकलन झाले. विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक २३४ अर्ज जमा झाले आहेत. याशिवाय कला शाखा इंग्रजी माध्यमसाठी एक, कला शाखा मराठी माध्यमसाठी ३९, वाणिज्य शाखा मराठी माध्यमसाठी ११८ अर्जांचे संकलन झाले आहे. वाणिज्य शाखा इंग्रजी माध्यमासाठी १३५ अर्ज जमा झाले आहेत.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी शाखा, माध्यम, आरक्षण आणि पसंतीक्रम यामध्ये बदल केला आहे, त्यांनी आपल्या फॉर्मची हार्ड कॉपी मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील मुख्य केंद्रात जमा करावे. अन्यथा आपला अर्ज दुसऱ्या फेरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. उर्वरित विद्यार्थ्यांनी २२ व २३ जुलै रोजी अर्ज जमा करावेत असे आवाहन अकरावी केंद्रीय प्रवेश परीक्षा समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस पाइपलाइनसाठीच्याखोदाईला मनपाची मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात पाइपद्वारे गॅस पुरवठा करण्याच्या योजनेसाठी शहरातील रस्त्यांची खोदाई केली जाणार आहे. यासाठी महापालिकेला निकषांनुसार नुकसानभरपाई मिळणार असल्याने प्रशासनाने शनिवारी प्रस्तावाला त्वरीत मान्यता दिली. योजनेसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याचे आदेश महापौर माधवी गवंडी यांनी दिल्यानंतर प्रशासनाने कार्यवाही केली.

'शहरात गॅस योजनेतील पाइपलाइन टाकण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने परवानगी द्यावी' असे लेखी मागणीपत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रशासनाला दिले होते. वस्तूत: योजनेला मंजुरी देण्यासाठी महापालिकेचा ठराव लागत नसल्याने केवळ प्रशासनाच्या परवानगीने काम सुरू करता येते. त्यामुळे सभेत हा ठराव घेण्यात आला नाही. यापूर्वी महासभेने शहरात कोणताही प्रकल्प राबवताना रस्त्याची खोदाई करताना होणारी नुकसान भरपाई देण्यासाठी दर निश्चित केले आहेत. त्यानुसार रस्त्यांची दुरुस्ती करून दिली जाणार आहे. सर्वसाधारण सभेत ठराव नसल्याने सोशल मीडियाद्वारे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महापौर गवंडी यांनी प्रशासनाला परवानगी देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी थेट पाइपलाइनद्वारे गॅस योजनेच्या खोदाईला त्वरीत परवानगी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images