Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दर्शन मंडपासाठी जागेची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिर आवारात प्रस्तावित असलेल्या दर्शन मंडपामुळे मंदिर झाळोळून जाणार असल्याचा मुद्दा उपस्थित करून दर्शन मंडपाला विरोध होत आहे. या विरोधाला पर्यायी मार्ग काढण्याच्या दृष्टीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यालगत असलेल्या शिंदे सरकार यांच्या जागेची पाहणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आली. याबाबत शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून जागा हस्तांतरणाबाबत त्यांच्याकडून होकार आल्यास मंदिर विकास आराखड्यातील दर्शन मंडप उभारणीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.

गुरुवारी सकाळी ११ वाजता महापौर माधवी गवंडी, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी महापौर हसीना फरास, माजी नगरसेवक आदिल फरास, देवस्थानचे प्रभारी सचिव शिवराज नायकवडी, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, प्रकाश गवंडी यांनी फरासखान्यासह जुना राजवाडा पोलीस ठाण्याला व प्रांत कार्यालयाला लागून असलेल्या शिंदे सरकार यांच्या इमारतीची पाहणी करून जागा निश्चित केली.

तीर्थक्षेत्र विकासातंर्गत अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे काम सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सात कोटी रुपयांचा निधी महापालिका प्रशासनाकडे आला आहे. यामध्ये दर्शन मंडप उभारणीने सुरुवात करण्याचे नियोजन आहे. विद्यापीठ हायस्कूल प्रवेशद्वारासमोर असलेल्या रिकाम्या जागेत दर्शन मंडप उभारण्याबाबत प्राथमिक निर्णय घेण्यात आला होता. दर्शन मंडपासाठी साडेचार कोटी रुपयांचे बजेट काढण्यात आले होते. मात्र या जागेत दर्शन मंडपाची नवीन इमारत बांधल्यास पुरातत्व नियमाचे उल्लंघन होईल तसेच या जागेतून दिसणारे मंदिराच्या शिखराचे सौंदर्य झाकोळून जाईल, या मुद्द्यावरून वारसास्थळ समिती व आर्किटेक्ट असोसिएशनच्यावतीने दर्शन मंडपासाठी निवडलेल्या जागेवर आक्षेप घेतला आहे. तसेच स्थानिकांकडूनही या नियोजित दर्शन मंडपाच्या जागेला विरोध होत आहे. याबाबत झालेल्या प्राथमिक चर्चेत हेरिटेज समितीच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर यांनी दर्शन मंडपाच्या जागेसाठी फरासखान्याच्या जागेचा मार्ग सुचवला होता. दरम्यान सध्या दर्शन मंडपाच्या जागेला होत असलेल्या विरोधाचा विचार करून फरासखाना व प्रांत कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या शिंदे सरकार यांच्या मालकीच्या इमारतीची पाहणी करून जागेसाठी पर्याय निवडण्यात आला.

दर्शन मंडपासाठी शिंदे सरकार यांच्या जागेबाबत त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करण्यात येईल. या जागेसाठी योग्य मोबदला देऊन जागेची मागणी करण्याचा प्रस्ताव आहे. शिंदे कुटुंबीयांनी हा प्रस्ताव स्वीकारला तर दर्शन मंडपाच्या आराखड्यात बदल करण्याची प्रक्रिया केली जाणार असून तत्पूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

मनकर्णिका कुंड खुले करणार

मंदिर आवारातील महालक्ष्मी उद्यानाखालील मनकर्णिका कुंड पुन्हा खुले करण्याचा विचार देवस्थान समिती करत आहे. ही जागा देवस्थानकडे देण्यात यावी अशी मागणीही महापालिकेकडे करण्यात आली असून येत्या महापालिकेच्या सभेत चर्चेला आणावा अशीही मागणी देवस्थानतर्फे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बोगस बियाणांप्रश्नी कंपन्यांवर गुन्हे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बोगस बियाणे आणि खतांचा पुरवठा करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत. त्यांना काळ्या यादीत टाकावे. यामध्ये कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जातील', असा इशारा कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरूवारी दिला. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यातील कृषी योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. डॉ. बोंडे म्हणाले, बोगस बियाणे, खते पुरवलेल्या कंपन्यांविरोधात जे शेतकरी ग्राहक न्यायालयात गेले आहेत, त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा करावा. साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर अधिक भर द्यावा. कृषी सहाय्यक ग्रामपंचायतीमध्ये बसतात की नाही, त्याचा अहवाल सादर करावा.'

यावेळी आमदार अमल महाडिक यांनी कृषी औजार बँकेचा उपक्रम राबवावा, अशी मागणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सहनिबंधक अरूण काकडे यांनी पीक कर्जाची माहिती दिली. उपसंचालक भाग्यश्री पवार यांनी स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, आमदार शिवाजीराव नाईक, विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत पाटील यांचे आज जंगी स्वागत

$
0
0

कोल्हापूर

भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज, शुक्रवारी (ता. १९) कोल्हापुरात येत आहेत. भाजपच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. दसरा चौकात दुपारी एक वाजता पाटील यांचे आगमन होणार आहे. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. पालकमंत्र्याचे गडहिंग्लज आणि चंदगड येथे कार्यक्रम होणार आहेत. स्वागताला जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कनिष्ठ सहायकांनी थकविले प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालविकास प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ सहायक बी. एम. पाटील हे वैयक्तिक लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यास जाणूनबुजून विलंब लावत आहेत. त्यांच्यावर दफ्तर दिरंगाईप्रकरणी पाटील यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, असे पत्रच महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनी प्रशासनाला दिले.

सभापती मगदूम प्रतिनिधीत्व करत असलेल्या माणगाव मतदारसंघात व्यक्तिगत लाभार्थी योजनेंतर्गत शिलाई मशीन, पिठाची गिरण, सायकल वाटप करण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांकडून बालविकास प्रकल्प अधिकारी कोल्हापूर ग्रामीण कार्यालयातील कनिष्ठ सहायक पाटील यांनी प्रस्ताव घेतले. यासंदर्भात संबिधतांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर आचारसंहिताचे कारण सांगितले जाते. लाभार्थ्यांकडून जमा केलेले प्रस्ताव त्यांनी वरिष्ठ कार्यालयांना प्रस्ताव सादर केले नाहीत. त्यांच्यावर दफ्तर दिरंगाई व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चौकशी करुन प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याकडे चौकशीचे पत्र दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीख पुलाची फेरउभारणी करा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गावरील पन्नास वर्षे जुन्या बाबूभाई परीख पुलाची फेरउभारणी करा अशी मागणी करण्याचा निर्णय परीख पूल बचाव कृती समितीने केला आहे. या पुलाखालील वाहतुकीची समस्या दूर व्हावी यासाठी पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख, स्थानिक नगरसेवक संजय मोहिते, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सचिव शिवनाथ बियाणी यांच्यासह परिसरातील व्यापारी, नागरिकांनी पुलाला भेट दिली. महापालिकेचे नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते. दरम्यान, रविवारी (ता. २१) मध्य रेल्वेचे अॅडिशन एक्झिक्यूटीव्ह इंजिनीअर कोल्हापूरला भेट देणार आहेत. त्यांच्याकडे ही मागणी करण्यात येणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती आणि दक्षिण भागाला जोडणाऱ्या परीख पुलाखालून चारचाकी व दुचाकींची वाहतूक होते. रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पुलाचे दुखणे वाढले आहे. नागरिक, वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे. पुलाच्या पिलरचे पापुद्रे निघाले असून स्लॅपचे ढपले पडल्याने सळ्या उघड्या पडल्या आहेत. महानगरपालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे बारमाही सांडपाणी येथून वाहत असते. गटारीवर लावलेल्या उंच लोखंडी जाळ्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. पुलाला असलेला धोका ओळखून त्याची फेर उभारणी व्हावी या मागणीसाठी अनेकजण सरसावले आहेत. त्यामध्ये इंजिनीअर, डॉक्टर, रेल्वे प्रवासी, स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. अर्किटेक्ट शेख यांनी परीख पुलाची नव्याने उभारणी करण्याची गरज व्यक्त केली. परिसरातील स्थानिक नागरिकांनी पुलाच्या खाली ड्रेनेजचे पाणी तुंबते याकडेही लक्ष वेधले. अभियंता सरनोबत यांनी परीख पूल हा रेल्वेच्या मालकीचा असून पुलाखालील रस्ता महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याचे सांगितले. पूल रेल्वेच्या मालकीचा असल्याने आमच्याकडे फेर उभारणी करण्याचा अधिकार नाही. पण, महानगरपालिका त्यासाठी सहकार्य करेल. पुलाच्या बांधकामाबाबत सातत्याने रेल्वे प्रशासनाला महापालिकेने पत्रे पाठवली असल्याचे सांगितले.

नगरसेवक संजय मोहिते यांनी पाच बंगला परिसरातून येणारे सांडपाणी शहाजी लॉ कॉलेजकडे वळविण्यात आले आहे असे सांगितले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून येणारे पाणी येथे साचते. या समस्या टाळण्यासाठी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज व्यक्त केली. शिवनाथ बियाणी यांनी रविवारी रेल्वेचे अधिकारी कोल्हापुरात येणार असल्याचे यावेळी सांगितले. त्यांच्या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांकडे स्ट्रक्चरल ऑडिटसह पूलाची फेर उभारणी करण्याची मागणी करण्याचा निर्णय झाला. बैठकीला रेल्वे समितीच्या सदस्यांसह आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय झाला. रेल्वे प्रशासन केंद्र सरकारकडे असल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्याकडे या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रेल्वे धिम्या गतीने

परीख पुलाला ५० वर्षे पूर्ण झाली असून रेल्वे प्रशासनाकडून परीख पुलावरुन धिम्या गतीने रेल्वे चालवली जाते. पुलाखालून मोठ्या प्रमाणावर वाहने जात असतात. या पार्श्वभूमीवर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन पुलाची रुंदी वाढवता येऊ शकते का यावरही चर्चा झाली.

लोगो : मटा भूमिका

गरजेनुसार पुलाची

पुन्हा उभारणी व्हावी

कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गावरील बाबूभाई परीख पुलाखालून सातत्याने वाहनांची ये-जा सुरू असते. पुलाला ५० वर्षे झाली असून पूल नवीन करावा किंवा त्याची पुनर्रचना करावी अशी मागणी सातत्याने होत असते. त्याबाबत सोशल मीडियावर झालेल्या जागृतीतून लोक एकत्र आले आहेत. परीख पूल बचाव कृती समिती स्थापन झाली आहे. शहरातून राजारामपुरी, शाहूपुरीकडे जाण्यासाठी पुलाखालील रस्त्याचा वापर होतो. पुलाचे आर्युमान कमी झाल्याने अपघात होण्याची भीती सातत्याने वाहनचालकांना सतावत असते. पुलावरुन रेल्वे जात असताना अनेक वाहने पुलाखालून जाण्यास धजावत नाहीत. या पार्श्वभूमीवर पुलाची फेर उभारणी होण्याची गरज आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन पुढील उपाययोजना केली पाहिजे. पुलाखाली या भागातील सांडपाणी जमा होते. या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांना येथे सतत लक्ष ठेवावे लागते. कर्मचाऱ्यांना दहा ते पंधरा दिवसांनी येथे स्वच्छता करावी लागते. तरीही अनेकदा नागरिकांना सांडपाण्यातून वाहने चालवायला लागते. हे थांबविण्यासाठी पुलाची पुनर्रचना व्हायला हवी. यासाठी खासदार, आमदार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे.

०००

(मूळ कॉपी)

परीख पूलाची पूनर्रचना करा

रविवारी रेल्वे अधिकाऱ्यासोबत पहिली बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गावरील पन्नास वर्षे जुना असलेल्या बाबूभाई परीख पुलाची पुनर्रचना करा, अशी मागणी करण्याचा निर्णय परीख पूल बचाव कृती समितीने केला आहे. रविवारी (ता. २१)मध्य रेल्वेचे अॅडिशन एक्झिक्युटिह इंजिनअर कोल्हापूरला भेट देणार असून त्यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.

शहर आणि शहराच्या दक्षिण भागाला जोडणार परीख पूल असून, त्याच्या खालून चारचाकी व दुचाकींची वाहतूक होते. रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पुलाचे दुखणे वाढले असून नागरिक आणि वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे. पुलाच्या पिलरचे पापुद्रे निघाले असून स्लॅपचे डपले पडल्याने उघड्या सळ्या दिसू लागल्या आहेत. महानगरपालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे बारमाही सांडपाणी वाहत असते. गटारीवर लावलेल्या उंच लोखंडी जाळ्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे.

पुलाला असलेला धोका ओळखून सोशल मिडियांच्या माध्यमातून अनेकजण सरसावले आहेत. त्यामध्ये इंजिनिअर, डॉक्टर, रेल्वे प्रवासी, स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. आज पुलाची समस्या दूर व्हावी यासाठी पुढाकार घेणारे अर्किटेक्ट इंजिनिअर फिरोज शेख, स्थानिक नगरसेवक संजय मोहिते, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सचिव शिवनाथ बियाणी, परिसरातील व्यापारी व नागरिकांनी पूलाला भेट दिली. यावेळी महानगरपालिकेचे नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.

अर्किटेक्ट इंजिनअर शेख यांनी परीख पूलाची पुर्नरचना करण्याची गरज व्यक्त केली. तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांनी पुलाच्या खाली ड्रेनेजचे पाणी तुंबते याकडेही लक्ष वेधले. अभियंता सरनोबत यांनी परीख पूल हा रेल्वेच्या मालकीचा असून पुलाखालील रस्ता महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याचे सांगितले. पूल रेल्वेच्या मालकीचा असल्याने आमच्याकडे पुनर्रचना करण्याचा अधिकार नाही. पण महानगरपालिका त्यासाठी सहकार्य करेल. पुलाच्या बांधकामाबाबत सातत्याने रेल्वे प्रशासनाला महानगरपालिकेने पत्रे पाठवली असल्याचे सांगितले.

नगरसेवक संजय मोहिते यांनी पाच बंगला परिसरातून येणारे सांडपाणी शहाजी लॉ कॉलेजकडे वळवण्यात आले आहे असे सांगितले. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून येणारे पाणी साचते. या सर्व समस्या टाळण्यासाठी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज व्यक्त केली.

शिवनाथ बियाणी यांनी रविवारी रेल्वेचे अधिकारी कोल्हापूरात बैठकीत येणार असल्याचे यावेळी सांगितले. या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांकडे स्ट्रक्चरल ऑडिटसह पूलाची पुनर्रचना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला रेल्वे समितीच्या सदस्यासह अर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय झाला. रेल्वे प्रशासन हे केंद्र सरकारकडे असल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती, प्रा. संजय मंडलिक, धैयर्शिल माने, यांच्याकडे या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

०००००००

रेल्वे धिम्या गतीने

परीख पूलाला ५० वर्षे पूर्ण झाली असून रेल्वे प्रशासनाकडून परीख पुलावरुन स्लो रेल्वे चालवली जाते. पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहने जात असतात. या पार्श्वभूमीवर परीख पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन पुलाची रुंदी वाढवता येऊ शकते का यावरही चर्चा झाली.

०००००००

मटा भूमिका

कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गावर बाबूभाई परीख पूल असून त्याच्या खालून वाहनांची वाहतूक सुरु आहे. या पुलाला ५० वर्षे झाली असून पूल नवीन करावा किंवा त्याची पुनर्रचना करावी अशी मागणी सातत्याने होत असते. पण त्यावर आवाज उठवण्यासाठी सोशल मिडियावर लोक एकत्र आले असून परीख पूल बचाव कृती समिती तयार झाली आहे.

शहरातून राजारामपुरी, शाहूपुरीकडे जाण्यासाठी परीख पुलाचा अंडरब्रीजवरुन वाहतूक सुरु असते. पण या पुलाचे आयुष्यमान कमी झाल्याने अपघात होण्याची भिती सातत्याने वाहनचालकांना सतावत असते. पूलावरुन रेल्वे जात असताना अनेक वाहक वाहन थांबवून रेल्वे जाण्याची वाटही पहात असल्याचे चित्र पहायला मिळते. या पार्श्वभूमीवर पुलाची पुनर्रचना शास्त्रीय दृष्ट्या होण्याची गरज आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन पुढील उपाययोजना केली पाहिजे. परीख पूल अंडर ब्रीज असल्याने परिसरातील सांडपाणी या भागात जमा होते. या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी दहा ते पंधरा दिवसाला भेट देऊन उपाययोजना करत असतात. नागरिकांना सांडपाण्यातून वाहने चालवायला लागते. हे सर्व बंद होण्यासाठी परीख पूलाची पुनर्रचना होण्यासाठी नागरिक एकवटले असून यापुढची जबाबदार खासदार, आमदार आणि अधिकाऱ्यांची आहे.

(फोटो अमित गद्रेंच्या फोल्डरमध्ये )

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आराखड्यात सदस्यांची भूमिका मोलाची

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'सरकारच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत ग्रामपंचायतची कामगिरी महत्वाची आहे. ग्रामपंचायत वार्षिक विकास आराखडा हा ग्रामीण भागाशी निगडीत आहे. यासह पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्यात जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका मोलाची ठरणारी आहे. या विकास आराखड्यात नाविन्यपूर्ण योजना, संकल्पनांचा समावेश करावा' असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०१९-२० अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. ग्रामपंचायत विभागातर्फे जिल्हा परिषद सदस्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षा महाडिक बोलत होत्या.

याप्रसंगी 'यशदा'कडील प्रशिक्षक आनंदा शिंदे, मानसिंग सावरे, समीर पाटील, श्रीमती राणी पाटील यांनी वार्षिक व पंचवार्षिक विकास आराखड्यामागील संकल्पना मांडली. या दोन्ही विकास आराखड्यात जिल्हा परिषद सदस्यांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या ग्रामविकासाशी निगडीत योजनेत लोकप्रतिनिधींचे कार्य यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केले.

ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या सुषमा देसाई यांनी प्रास्ताविक केले. सचिन शिरदवाडे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी आभार मानले. याप्रसंगी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, गटनेते अरुण इंगवले, सदस्य अशोक माने, सतीश पाटील, सुभाष सातपुते, विजया पाटील, स्वरुपाराणी जाधव, प्रियांका पाटील यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी मोर्चा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी २०२०मध्ये आहे. शताब्दी वर्षाचे औचित्य साधून ठिकठिकाणी त्यांच्या स्मारकांची उभारणी सुरू आहे. मात्र त्यांचे आजोळ तळसंदे आणि जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या कोल्हापुरात स्मारक उभारणीच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकार व प्रशासनाने या दोन्ही ठिकाणी अण्णाभाऊंचे स्मारक साकारावे या मागणीसाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला.

महापालिका व जिल्हाधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे, जिल्हाध्यक्ष सनी कावळे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिंदू चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला. बिंदू चौक, शिवाजी चौक मार्गे कार्यकर्ते मोर्चाने महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर मोर्चा सीपीआर चौक, दसरा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. अण्णा भाऊ साठे हे जागतिक किर्तीचे साहित्यिक आहेत. त्यांना कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. परिवर्तन चळवळीत व राज्याच्या उभारणीत त्यांचा वाटा आहे. त्यांचे कोल्हापुरात व जन्मगावी तळसंदे येथे स्मारक उभे करावे अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. आंदोलनात सतीश लोंढे, सुभाष साठे, सतीश भंडारे, लिलाधर कांबळे, बबन शिंदे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हसन मुश्रीफांना भाजपचं पक्षप्रवेशाचं आवतन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गडहिंग्लज येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना भाजप प्रवेशासाठी आमंत्रण दिले आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर काँग्रेसने नियुक्त केलेल्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक जण भाजपमध्ये आल्यावर आश्चर्य वाटायला नको, असे म्हटल्यावर ‘काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी खुलासा करण्याचे कारण काय?’ असा प्रश्न करत ‘मी टोपी फेकली. ती विश्वजीत कदम यांना बसली’, असा खुलासा करत पाटील यांनी गुगली टाकली.

दसरा चौकात सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी गडहिंग्लजच्या कार्यक्रमातील किस्सा सांगितला. पालकमंत्री प्रत्येकाला पक्षात येण्याचे आवाहन करत आहेत, असे मुश्रीफ भाषणात म्हणाले. पण मी काही पक्षात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर पाटील यांनी मुश्रीफांना, 'अजून वेळ गेलेली नाही भाजपमध्ये या’ असे सांगितले आहे. पुढील पाच वर्षात आमचेच सरकार येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आमचे सरकार असेपर्यंत तुम्ही म्हातारे व्हाल. तुमचा अनुभव, तुमच्यातील सहृदयता, रुग्णासाठी केलेली सेवा वृत्ती अद्वितीय आहे. अल्पसंख्याक समाजातील नेता आम्हाला हवा आहे. त्यामुळे तुम्ही भाजपमध्ये याच, असं पाटील म्हणाले.

एकीकडे पालकमंत्री मुश्रीफांना पक्षात येण्याचे आवाहन करत असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदारांना तुम्ही भाजपमध्ये या असे थेट निमंत्रण दिले नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. ज्या काँग्रेसच्या आमदारांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटते ते रात्री अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला. काँग्रेस नेतृत्वाची पक्षावर पकड असेल तर त्यांनी रात्री अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या आमदारांना थांबवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

सांगलीतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे दहा आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असे म्हटले होते. तसेच काँग्रेसने नव्याने नियुक्त केलेल्या पाच कार्याध्यक्षापैकी एकजण भाजपमध्ये आला तर आश्चर्य वाटायला नको असे म्हटले होते. त्यावर आमदार विश्वजित कदम यांनी खुलासा केला. मी त्यांचे नाव घेतले नव्हते. मग खुलासा करण्याचे कारण काय? मी टोपी फेकली आणि ती कदम यांना बसली. त्याला मी काय करणार? असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता, मला मुख्यमंत्रीपदाची शून्य महत्वकांक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने जी जबाबदारी सांगितली ती प्रामाणिपणे पार पाडल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींचा संस्कृती वाढवण्याचा सल्ला

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीनी अभिनंदनचा फोन केला. त्यावेळी त्यांनी पक्ष मजबूत करण्याबरोबर आपली संस्कृती वाढवण्यासाठी अध्यक्ष केले आहे, असा सल्ला दिला. संस्कृती म्हणजे देव, धर्म असा अर्थ नसून आपली संस्कृती म्हणजे जगण्याचे नियम, दोन माणसांनी चांगले कसे वागावे, कसे व्यवहार रुजवायचे आहेत, असा संस्कृतीचा व्यापक अर्थ आहे. जनता व कार्यकर्त्यांत सुहृदयता सर्वसामान्य प्रश्नांसाठी कसे भांडतील अशी संस्कृती गावागावात मजबूत करायची आहे. अशी संस्कृती रुजवायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यासाठी आंदोलन

$
0
0

कोल्हापूर

पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे येथील सार्वजनिक जागेतील येण्याजाण्याच्या वाटेतील अडथळा दूर करावा, या मागणीसाठी ग्रामस्थ सुरेश पाटील यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यांनी निर्णय घेतला नाही. याप्रश्नी मार्ग काढण्यास जाणूनबुजून विलंब लावला जात असल्याच्या निषेधार्थ पाटील यांनी गुरुवारी आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलालाच्या उधळणीत त्र्यंबोली यात्रेस प्रारंभ

$
0
0

(फोटो अमित गद्रे)

कोल्हापूर टाइम्स टीम

पारंपरिक पी... ढबाकच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत शुक्रवारी त्र्यंबोली यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. नदीला आलेल्या पावसाच्या नवीन पाण्याचा गल्लीबोळांतील देवदेवतांसह त्र्यंबोली देवीस जलाभिषेक घातला जातो. पुढील दहा दिवसांत दोन मंगळवार व एका शुक्रवारी शहरातील तालीम, मंडळांच्या वतीने यात्रा होणार आहे.

शुक्रवारी पंचगंगा नदीवर पारंपरिक वाद्यांच्या गजरात कुमारिकांनी डोईवरून घागरीतील पाणी देवीला अर्पण केले. उन्हाच्या तडाख्यामुळे कार्यकर्ते व महिला घामाघूम झाल्या होत्या. काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कावडीतून, तर काहींनी वाहनातून घागरी आणून पाणी वाहिले. त्र्यंबोली देवीला आंबिल-घुगऱ्याचा शाकाहारी, तर म्हसोबाला मांसाहारी नैवेद्य दाखविण्यात आला. टेंबलाई मंदिर टेकडीवर यात्रेनिमित्त खेळणी तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे टेकडीला जत्रेचे स्वरूप आले आहे. २६ जुलैला शहरातील बहुतांश तालमी व मंडळांनी यात्रेचे आयोजन केले आहे. त्यासाठी वर्गणीचे फलक चौकात लावण्यात आले आहेत. वर्गणी जमा करणे, वाजंत्री ठरवणे या कामांचे नियोजन सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मीटर बदलातून कमिशनगिरी

$
0
0

मनपा लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पाणीपुरवठ्याचे मीटर सुस्थितीत असताना बंद असल्याचे सांगून मीटर रीडर हे नागरिकांना मीटर बदलण्यास भाग पाडतात. नवीन मीटर खरेदी करताना त्यामध्ये त्यांचे कमिशन असून बिलावर मीटरबंदचा शिक्का जाणीवपूर्वक मारत आहेत,' असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सभापती शारंगधर देशमुख यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत केली. सभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि मीटर रीडरच्या कमिशनगिरीवर पाणीपुरवठा विभागाला सदस्यांनी लक्ष केले.

सलग दोन आठवडे शहरात पाण्याचा बट्ट्याबोळ झाला होता. स्थायी समिती सभेत त्याचे पडसाद उमटले. सदस्या माधुरी लाड म्हणाल्या, 'पाणी उपसा करणारे पंप वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. तसेच डांबरी पॅचवर्क बंद असून प्लांटवर कचरा पडला आहे.' सभापती देशमुख म्हणाले, 'बालिंगा उपसा केंद्रातील पाचपैकी तीन पंप सुरू आहेत. त्यातील दोन बंद पडले असून पाचही पंप सुरू ठेवावेत.' दरम्यान, सर्व उपसा पंपांची दुरुस्ती झाली असून पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही, अशी दक्षता घेतली जाईल. तसेच पंपांच्या देखभालीसाठी स्वतंत्र पथक ठोक मानधनावर कार्यरत ठेवू, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

दीपा मगदूम म्हणाल्या, 'चालक पुरवण्याचा ठेका घेतलेली कंपनी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देत नाही. तसेच ठराविक लोकांचा भविष्य निर्वाह निधी जमा करत असून महापालिकेकडून नियमित पैसे मिळत नसल्याचे कारण देत आहेत.' त्यावर 'महापालिका नियमित निधी देत असून सर्व जबाबदारी ठेकेदार कंपनीची आहे. भविष्य निर्वाह रक्कम जमा केली जात नसल्यास त्यांच्यावर कारवाई करु,' असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले. संदीप कवाळे म्हणाले, 'राजारामपुरी येथील जनता बझार चौकातील ड्रेनेज लाइन साफ करण्याबरोबरच आयर्विन ख्रिश्चिन ग्राउंड ते जनता बझार चौकापर्यंतची ड्रेनेज लाइन बदलावी.'

....

चौकट

बांधकाम फाइल त्वरीत मंजूर

'डीपी रस्ता ताब्यात देण्यासाठी जागा मालक तयार आहेत. पण नगररचना विभाग जागा ताब्यात घेण्याबाबत दिरंगाई करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. कार्यालयातून बांधकामाच्या फाइल मात्र तत्काळ मंजूर होतात,' असा आरोप सभापती देशमुख यांनी केला. या आरोपानंतर आठवड्यात याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुश्रीफ, तुम्ही भाजपमध्ये या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यात पुन्हा युती सत्तेवर येणार आहे, तुमचे काम चांगले आहे, सत्तेबाहेर राहून तुम्हाला काम करता येणार नाही, पाच वर्षानंतर तुमचे वय होईल, म्हणून तुम्ही आताच भाजपमध्ये या,' असे आमंत्रणच भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना शुक्रवारी दिले. 'पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीचे दहा आमदार भाजपात येणार हे खरे आहे. मुश्रीफ हे अकरावे आमदार असतील. ते अल्पसंख्यांकही आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याचा भाजपला नक्कीच फायदा होईल. तेव्हा भाजपात येण्याचा निर्णय तातडीने घ्यावा,' असेही त्यांनी सुचवले.

प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री पाटील यांनी गडहिंग्लज येथील कार्यक्रमात मुश्रीफ यांना भाजप प्रवेशासाठी आमंत्रण दिले. प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यावर काँग्रेसने नियुक्त केलेल्या पाच कार्याध्यक्षांपैकी एकजण भाजपमध्ये आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे म्हटल्यावर 'काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी खुलासा करण्याचे कारण काय?' असा प्रश्न करत 'मी टोपी फेकली. ती विश्वजीत कदम यांना बसली', असे सांगत त्यांनी गुगली टाकली.

येथील दसरा चौकात सत्काराला उत्तर देताना प्रदेशाध्यक्षांनी गडहिंग्लजच्या कार्यक्रमातील किस्सा सांगितला. पालकमंत्री प्रत्येकाला पक्षात येण्याचे आवाहन करत आहेत, असे मुश्रीफ भाषणात म्हणाले. पण आपण काही पक्षात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर पाटील यांनी मुश्रीफांना, 'अजून वेळ गेलेली नाही, भाजपमध्ये या' असे सांगितले . पुढील पाच वर्षात आमचेच सरकार येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आमचे सरकार असेपर्यंत तुम्ही म्हातारे व्हाल. तुमचा अनुभव, तुमच्यातील सहृदयता, रुग्णासाठी केलेली सेवावृत्ती अव्दितीय आहे. अल्पसंख्याक समाजातील नेता आम्हाला हवा आहे. मुश्रीफ यांच्यासारखा संवेदनशील, सहृदयी माणूस मी पाहिला नाही. वेळ गेल्यानंतर पळापळ सुरू करण्यापेक्षा आत्ताच पक्षात येण्याची संधी आहे. ती संधी त्यांनी सोडू नये. कारण मी जे बोलतो ते करून दाखवतो. म्हणूनच भाजपात येणारे मुश्रीफ अकरावे आमदार असतील,' असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता, मला मुख्यमंत्रीपदाची शून्य महत्वकांक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

...

चौकट

'त्या' आमदारांना थांबवावे

एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुश्रीफांना पक्षात येण्याचे आवाहन करत आहेत. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदारांना तुम्ही भाजपमध्ये या, असे थेट निमंत्रण दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या काँग्रेसच्या आमदारांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटते, ते रात्री अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. काँग्रेस नेतृत्वाची पक्षावर पकड असेल तर त्यांनी रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या आमदारांना थांबवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी कार्डसाठी त्वरीत प्रस्ताव पाठवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहरातील सुमारे एक लाख मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाही. प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्याशी चर्चा करत असून त्याबाबतचा निर्णय सरकार तातडीने घेणार आहे. मिळकतदारांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव व ठराव तत्काळ द्यावेत,' अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली. त्यांनी या प्रश्नाला प्राधान्यक्रम देऊ, अशी ग्वाही दिली. महाडिक यांनी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात शुक्रवारी बैठक घेतली.

आमदार महाडिक म्हणाले, 'कोल्हापूर नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर हद्दवाढ झालेली नाही. नागरिकरणामध्ये वाढ झाल्यानंतर शहराशेजारील शेतीमध्ये गुंठेवारी व प्लॉट पाडून घरे बांधण्यात आली. अशा मिळकतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रॉपर्टी कार्ड नसलेल्या मिळकतदारांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. पंतप्रधान आवास योजनेसह बँकेच्या अर्थपुरवठ्यापासून अशा मिळकतींचे मालक वंचित राहिले आहेत. सर्वसामान्य लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सप्टेंबरपूर्वी सोडवण्यासाठी महापालिका, नगरविकास आणि महसूल विभागाशी समन्वय साधत आहे. शहरामध्ये २००८ मध्ये झालेल्या एका पाहणीत ८० हजार मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड नसल्याचे समोर आले होते. सद्य:स्थितीत ही संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. अशा सर्व मिळकतदारांचा प्रश्न मार्गी लावला जाईल.'

दरम्यान, 'महापालिका, जिल्हा महसूल विभाग आणि नगरविकास विभागाने समन्वयाने काम केल्यास हा प्रश्न त्वरीत सुटू शकतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा प्रश्न निकालात निघण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवावा. तसेच सभागृहाने तसा ठराव करावा. सिटी सर्व्हेच्या पाहणीसाठी आवश्यक निधी सरकारकडून मिळवू,' असेही महाडिक यांनी बैठकीत सांगितले. बैठकीस भूमी अभिलेख अधिकारी किरण माने, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपनगररचनाकार नारायण भोसले, नगरसेवक विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाई जलतरणची नवीन तंत्राने दुरुस्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'रंकाळा परिसरातील अंबाई जलतरण तलावाची चार दिवसांत सामुदायिक पाहणी करू. तलावातील त्रुटींची नोंद घेऊन नवीन तंत्राद्वारे त्रुटी दूर करून जलतरणपटूंना अद्ययावत तलाव उपलब्ध करून देऊ,' अशी ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जिल्हा जलतरण प्रशिक्षक, पालक व खेळाडू समितीला दिले. समितीने शुक्रवारी निवेदन देऊन जलतरण तलावातील असुविधांचा त्यांच्यासमोर पाढा वाचला. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, 'महापालिकेच्या वतीने १९७७ पासून रंकाळा परिसरात अंबाई जलतरण तलाव कार्यान्वित केला. शिकाऊ तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना तलाव उपयोगी ठरत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तलाव असुविधांच्या गर्तेत सापडला आहे. ऐन उन्हाळ्यात तांत्रिक कारणामुळे महिन्यातील पाच ते सहा दिवस तलाव बंद असतो. फिल्टरेशन प्रक्रिया बंद पडत असल्याने जलतरणपटूंना त्वचेच्या विकाराला सामोरे जावे लागते. प्रशासनाच्या ताब्यात तलाव असताना येथे नियमित देखभाल केली जात नाही. परिणामी येथे पोहणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. तरी तलावाची त्वरित दुरुस्ती करावी.'

निवेदन स्वीकारल्यानंतर आयुक्त म्हणाले, 'तलावाची शिष्टमंडळासह पाहणी करू. त्यानंतर येथील त्रुटी अद्ययावत तंत्राद्वारे दूर करू.' शिष्टमंडळात रमेश पोवार, माजी शिक्षण सभापती अशोक पोवार, समीर चौगले, उमेश कोडोलीकर, संभाजीराव जगदाळे, वसंतराव मुळीक, लाला गायकवाड, रघुनाथ कांबळे, कादर मलबारी, सुभाष देसाई, सुरेंद्र घोरपडे, अशोक रामचंदाणी, महादेव पाटील, आदी उपस्थित होते.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीबीएसच्या कमी झालेल्या जागा पुन्हा मिळतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील त्रुटींमुळे एमबीबीएसच्या ५० जागा कमी झाल्या. महाविद्यालयातील बहुतांशी त्रुटी दूर झाल्या असून इंडियन मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार आवश्यक सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत. त्यामळे कमी झालेल्या जागा पुन्हा मिळतील, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू होईल,' अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. शुक्रवारी ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांना पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. लहाने म्हणाले, 'औषधांची उपलब्धता आणि सीपीआर रुग्णालयाला लागणारे ११ व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी हापकीन संस्थेकडे सहा कोटींचा निधी वर्ग केला आहे.' यावेळी आमदार अमल महाडिक यांनी कॅन्सर युनिट सुरू करण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी २० कोटी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. डॉ. लहाने पुढे म्हणाले,' निधी मिळाल्यास लवकरच सीपीआर रुग्णालयात कॅन्सर युनिट सुरू करता येईल. रुग्णालयात एमआरआय मशीन उपलब्ध करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. रुग्णालयातील केवळ १४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करता येईल. मात्र उर्वरीत कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवर काम करावे लागेल. महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. गरज भासल्यास लोकसेवा आयोगाकडून रिक्त पदे भरुन घेतली जातील. तसेच खराब झालेल्या बेड बदलून नवीन घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.' यावेळी अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांडपाण्याचा गावनिहाय शोध

$
0
0

जिल्हा परिषदेचा लोगो..

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना आखताना सांडपाणी निर्मितीच्या उगमापर्यंतचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. पंचगंगा नदी व तिच्या उपनद्यांच्या काठावरील सर्व ग्रामपंचायतींमधील सांडपाणीविषयक माहिती संकलित केली जात आहे. सात तालुक्यांतील तब्बल १७५ गावांची एकूण लोकसंख्या, पाणीपुरवठा स्रोत, तयार होणारे सांडपाणी, नाल्यातून वाहणारे सांडपाणी, घनकचरा, जैववैद्यकीय अशा ११ घटकांचा शोध घेतला जाणार आहे.

ग्रामीण भागात सांडपाणी निर्मितीस कारणीभूत घटकांचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. गगनबावडा, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी व शिरोळ या सात तालुक्यांतील गावनिहाय माहिती उपअभियंता व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेला सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना खास सूचना केल्या आहेत. या तालुक्यांतील संबंधित गावातील सांडपाणीविषयक माहिती संकलित करून त्यावर स्थानिक पातळीवर उपाययोजना आखण्याचे नियोजित आहे.

सर्वेक्षणात गावांतील विविध घटकांची इत्थंभूत माहिती जमविण्याच्या सक्त सूचना आहेत. यामध्ये गावची लोकसंख्या, जवळची नदी, पाणीपुरवठा योजान, नळाद्वारे जोडलेली घरे, सार्वजनिक नळ व इतर कूपनलिका, सांडपाणी निर्मितीचे स्रोत, गावातील शौचालयाचे प्रकार, सांडपाण्याचे प्रमाण या घटकांचा समावेश आहे. गावातील घनकचरा, कचरा संकलन करण्याची पद्धत आणि सद्य:स्थितीत उपाययोजना विचारात घेतल्या जाणार आहेत. सात दिवसांत माहिती सादर करण्याच्या सूचना आहेत.

...

सर्वाधिक गावे करवीरमधील

पंचगंगा व तिच्या उपनद्यांच्या काठावरील ग्रामपंचायतींची माहिती संकलित केली जाणार आहे. यामध्ये करवीर तालुक्यात सर्वाधिक ६२ गावे आहेत. यापाठोपाठ राधानगरी ३२, गगनबावडा २९, हातकणंगले १५, पन्हाळा १३, शाहूवाडी सात आणि शिरोळ तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे.

...

सर्व्हिसिंग सेंटर, औद्योगिक संस्थांवर लक्ष

शहरालगतच्या आणि मोठ्या लोकवस्तीच्या गावांतील हॉस्पिटले, सर्व्हिसिंग सेंटर, मंगल कार्यालये व उद्योग संस्थांचे सांडपाणी थेट नाल्यात आणि त्याद्वारे नदीत मिसळते. मटण, मासे, चिकन विक्री दुकानांतून घनकचरा निर्माण होतो. ग्रामीण भागात हा कचरा उघड्यावर टाकला जातो. सर्व्हिसिंग सेंटर, मंगल कार्यालये, विविध प्रकारच्या औद्योगिक संस्थांतून निर्माण होणारे सांडपाणी कुठे उघड्यावर, तर काही गावांत नाल्यामध्ये मिसळत आहे. पंचगंगा नदी प्रदूषणास हे घटक कारणीभूत आहेत. या सर्व संस्थांमध्ये रोज निर्माण होणारे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनबाबत गावपातळीवर कशा पद्धतीने उपाययोजना आखता येतील, याबाबत प्रशासन नव्याने विचार करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची आज सभा

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेची महासभा शनिवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात होणार आहे. महापौर माधवी गवंडी सभेचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सभेत माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याच्या सदस्य ठरावावर चर्चा होईल. तसेच महापालिकेच्या प्राथमिक व घरफाळा मिळकतदारांना विमा सवलत देण्यासाठी आलेल्या स्थायी समिती प्रस्तावावरही चर्चा होणार आहे. त्याचबरोबर ऐन पावसाळ्यात उद्भवलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून पाणीपुरवठा विभाग सभागृहात सदस्यांकडून लक्ष केला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दहा आमदार निवडून आणू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

' जिल्ह्यात शिवसेनेचे सहा तर भाजपचे दोन आमदार आहेत. दोन जागा विरोधकांकडे असून आगामी विधानभा निवडणुकीत या दोन्ही जागा जिंकून जिल्ह्यात दहा जागा निवडून आणूया', असे आवाहन भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दसरा चौकात शुक्रवारी जल्लोषी स्वागत करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी स्वागत केले. पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी 'प्रदेश का नेता कैसा हो, चंद्रकांत पाटील जैसा हो' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

स्वागताला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्या नावाचा प्रदेशाध्यक्षपदासाठी निर्णय घेतला तेंव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. पक्षाने यापूर्वी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. आता मिळालेल्या जबाबदारीत वाढ झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला आणखी मजबूत करायचे आहे.'

आगामी विधानसभा निवडणुकीत दहा जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले. ते म्हणाले, 'जिल्ह्यात शिवसेनेचे सहा तर भाजपचे दोन आमदार आहेत. ऊर्वरित दोन जागांवर युतीच्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे. भाजपमध्ये जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ. अन्यथा संघर्ष करुन दोन्ही जागा जिंकून आणू.'

लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने एकजुटीने काम केल्याने कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा, सोलापूर, अहमदनगर या जागा जिंकल्या आहेत, असे सांगून पाटील यांनी आगामी निवडणुकीत भाजप शिवसेना युती म्हणून लढणार आहोत. भाजपबरोबर शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्यासाठी टीमवर्क दाखवावे, असे आवाहनही केले. यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, महापालिका भाजप गटनेते नगरसेवक विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, सुभाष रामुगडे, अॅड. संपतराव पवार, माजी नगरसेवक आर.डी. पाटील, माणिक पाटील, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...

संस्कृती वाढवण्याचा मोदींचा सल्ला

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले,'निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदनाचा फोन केला. त्यावेळी त्यांनी पक्ष मजबूत करण्याबरोबरच आपली संस्कृती वाढवण्यासाठी अध्यक्ष केले आहे, असा सल्ला दिला. संस्कृती म्हणजे देव, धर्म असा अर्थ नसून आपली संस्कृती म्हणजे जगण्याचे नियम, दोन माणसांनी एकमेकांशी चांगले कसे वागावे, चांगले व्यवहार रुजवावेत, असा संस्कृतीचा व्यापक अर्थ आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठासंदर्भात आज मुंबईत बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन होण्याच्या मागणीसाठी मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग यांची खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी शनिवारी (ता. २०) दुपारी एक वाजता भेट घेणार आहेत. वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाच्या निमंत्रणासह खंडपीठाची चर्चा त्यांच्यासोबत केली जाणार आहे, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. रणजित गावडे यांनी दिली.

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी गेली ३४ वर्षे लढा सुरु आहे. त्यासाठी खंडपीठ कृती समितीने आजअखेर आंदोलने, मोर्चे, निवेदने, कोल्हापूर बंद, कोर्ट कामकाजावर असहकार आदी आंदोलने केली आहेत. मात्र त्यासंदर्भात अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यातील वकिलांनी या प्रश्नासंबंधी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली. खंडपीठ स्थापन होण्यासंदर्भातील अंतिम निर्णय हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश घेऊ शकतात. त्यासाठी त्यांची भेट घेतली जाणार आहे. गेले दोन महिने त्यांच्या भेटीसाठी कृती समिती प्रयत्नशील होती. त्यासाठी जिल्हा बार असोसिएशनच्या विशेष बैठकीत ठरावही केला होता. त्यानुसार २० जुलै रोजी बैठकीचे निमंत्रण कृती समितीला मिळाले आहे.

मुख्य न्यायाधीश यांच्यासमोर खंडपीठ संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव सादर केला आहे. सरकारने जागेसह निधीची उपलब्धता करून देण्याचेही लेखी पत्र दिले आहे. त्यासाठी तत्काळ मंजुरी द्यावी, अशी विनंती शिष्टमंडळ करणार आहे. खंडपीठासाठीचा गेल्या ३४ वर्षांच्या संघर्षाचा आढावा त्यांच्यासमोर मांडला जाणार आहे. यावेळी कोल्हापुरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या वकील प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्याचे निमंत्रण दिले जाणार आहे. शिष्टमंडळात ज्येष्ठ विधीतज्ज्ञ के. ए. कापसे, पी. आर. पाटील, महादेवराव आडगुळे, डॉ. संतोष शहा, गुरुप्रसाद माळकर, बाळासाहेब पाटील, सचिन पाटील यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळतीमुळे पाणीपुरवठा विभागाचा कारभार उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआर रुग्णालयास पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला छेद देवून पाणी वळवलेली चोरी गळतीमुळे गुरुवारी उघड झाली. स्थानिक नगरसेवकांच्या दबावामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पापाची तिकटी येथे केलेला प्रकार उघड झाल्यानंतर शुक्रवारी नवीन जोडलेल्या पाइपला पुन्हा गळती लागली. सीपीआरला कोणतीही पूर्वपरवानगी न घेता विभागाने केलेल्या कृत्यांबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सीपीआर रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी पापाची तिकटीपासून स्वतंत्र पाइपलाइन टाकली आहे. रुग्णांना मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सीपीआरला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला फाटा देवून ती बाजारगेट प्रभागात घेण्याचा प्रयत्न सुरू होता. गुरुवारी या प्रयत्नाला यश आले. मात्र नवीन जोडलेल्या लाइनला गळती लागल्याने प्रशासन आणि नगरसेवकांचा कारभार उघड झाला. मोठ्या लाइनला फाटा देवून पाणी वळवून खड्डाही बुजवण्यात आला. मात्र गळती दुरुस्ती करुन पुन्हा खड्डा बुजवण्यात आला. तरीही शुक्रवारी सकाळी पुन्हा नव्या पाइपलाइनला गळती लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images