Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रोज हवेत हजारभर दाखले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने शहर आणि करवीर तालुक्यातून विविध प्रकारचे दाखल काढण्यासाठी महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रात गर्दी होत आहे. ६० दिवसांत तहसील कार्यालयाकडून १६ हजार, ७६४ दाखले देण्यात आले आहेत. अजूनही पाच हजार, ७८६ दाखले प्रलंबित आहेत. रोज एक हजार दाखले मागणीसाठी होत असलेले अर्ज आणि प्रत्येकाला दाखला लवकर मिळण्याच्या घाईमुळे वशिलेबाजी वाढली आहे. यातून दलालांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

दहावी, बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. प्रवेशावेळी ओरिजनल दाखला जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी ओबीसी, मराठा प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, नॉन क्रिमिलेयर, डोमिसिअल असे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी, पालक धडपडत आहेत. जातीच्या दाखला मिळण्यासाठी नियमानुसार ४५ दिवस आणि इतर दाखल्यांसाठी १५ दिवसांची मुदत आहे. मात्र प्रवेश आणि नोकरीच्या ठिकाणी दाखला हजर करण्यासाठी मुदत कमी असल्याने संबंधितास लवकर दाखला हवा आहे. ते तलाठी, महा ई-सेवा केंद्र, तहसीलदार, प्रांतकार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परिणामी ही कार्यालये गर्दीने गजबजून गेली आहेत.

शहर आणि करवीर तालुक्यात ३०० ई सेवा, आपले सरकार केंद्र आहेत. त्यात सध्या रोज एक हजार दाखल्यांची मागणी होत असल्याने यंत्रणा हतबल झाली आहे. वर्ष वाया जात आहे, प्रवेशाची, नोकरीवर हजर करण्याची मुदत संपत आहे, साहेब काहीही करून दाखला आजच द्या, अशी विनवणी करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे तहसील कार्यालयात गुरूवारी दिवसभर दिसले. अनेकजण दाखल्यांसाठी आमदार, खासदारांच्या स्वीयसहायकाकडून वशिला लावत होते. काहीजणांना दलाल हेरत होते. त्यांना लवकर दाखले काढून देण्यासाठी कमीत दीड हजार रुपयांपर्यंत वसूल केले. परिणामी प्रत्येक सेवेसाठी ३५ रुपये घेणे बंधनकारक असताना त्यांना दुप्पट तिप्पट पैसे मोजावे लागले.

उशिर झाल्याने धावपळ

दहावी, बारावीचा निकाल लागण्याआधीच दाखले काढून घेणे आवश्यक आहे. मात्र तहान लागल्यानंतर, विहीर खोदण्याची बहुतांशी पालकांच्या मानसिकतेमुळे मे, जून, जुलै महिन्यात दाखले काढण्यासाठी गर्दी होते. वेळेत दाखले मिळत नाहीत. लुटीला सामोरे जावे लागते. निर्धारित वेळेत दाखला न मिळाल्यास प्रवेशाची संधी हुकते. यामुळे दाखले काढण्यासाठी पालकांनी उशिरा जागे होणे धोक्याचे आहे, असे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे.

केंद्रातच मिळतो दाखला

दाखल्यासाठी जवळच्या महा ई-सेवा, आपले सरकार केंद्रात आवश्यक कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन भरलेला अर्ज संबंधित नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत कार्यालयात कार्यवाही, पडताळणी होऊन डिजिटल स्वाक्षरी झाल्यानंतर ज्या केंद्रातून अर्ज भरलेला असतो, तेथेच दाखला मिळतो.

१ मे ते २८ जून अखेर वितरण केलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांची संख्या

उत्पन्न : १००८७

डोमिसिअल :२९१४

जात : १८३०

नॉन क्रिमिलेयर १३९४

आर्थिकदृष्या मागास :३८

शाळा, कॉलेजमध्ये प्रवेशांची प्रक्रिया सुरू असल्याने दाखले काढण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज येत आहेत. शक्य तितक्या लवकर पात्र असलेल्यांना दाखले देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणखी दोन आठवडे गर्दी राहणार आहे. या काळातही दाखले देण्याची प्रक्रिया कोणत्याही टप्यात रेंगाळू नये, असे आदेश तहसीलदार, नायब तहसीलदारांना दिल्या जातील.

सचिन इथापे, प्रांताधिकारी, करवीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मॅट बदलून द्या

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या निवासी क्रीडा प्रशालेतील निकृष्ट दर्जाचे कुस्तीचे मॅट बदलावे. अन्यथा तो मॅट जिल्हा परिषदेच्या दारात आणून ठेवू, असा इशारा करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिला. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, १५ कोटींच्या ठेवीवर प्रशालेचे व्यवस्थापन चालवले जाते. तेथे तालुका पातळीवर खेळात चांगली कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अशा प्रशालेत कुस्ती आणि कब्बडीसाठी दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडून ३० लाखांचा मॅट देण्यात आला आहे. या मॅटचा दर्जा निकृष्ट आहे. त्यामध्ये असलेला स्पंज साध्या गादीमधील आहे. नामांकित कंपनीचा बोगस लोगो असलेला मॅट आहे. त्याला चेन आहे. यामुळे मॅटवर खेळताना खेळाडूंना दुखापत होत आहे. म्हणून त्वरित मॅट बदलून द्यावा. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 21

एज्युकेशन लोनचा ३६१६ विद्यार्थ्यांनी लाभ

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर

आर्थिक कारणामुळे शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून बँकांनी सुरु केलेल्या शैक्षणिक कर्जाचा (एज्युकेशन लोन) जिल्ह्यातील ३६१६ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. भारतात आणि विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बँकांनी गतवर्षी ६० कोटी ९५ लाख रूपये कर्जाचे वाटप केले. आगामी शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने शैक्षणिक कर्जाचे वाटप करण्यासाठी बँका सज्ज झाल्या आहेत.

व्यावसायिक शिक्षण महाग झाल्याने गुणवत्ता असलेल्या विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे अन्य शाखेत प्रवेश घेतात. वैद्यकीय, इंजिनिअरिंग, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवण्यासाठी पाच ते वीस लाख रुपयांचा खर्च येतो. खर्चामुळे शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ येऊ नये यासाठी शैक्षणिक कर्ज देण्यात येते. राष्ट्रीय, सहकारी, खासगी, जिल्हा बँकेकडून शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या कर्जावर चक्रवाढ व्याज आकारले जात नाही.

कर्ज देताना गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कर्ज दिले जाते. डोनेशन देणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज दिले जात नाही. कर्जासाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. बँक ऑफ इंडियाने ऑनलाईन 'विद्यालक्ष्मी' पोर्टल काढले आहे. या पोर्टलवर कर्जासाठी अर्ज करावा लागतो. डिप्लोमा, डिग्रीसाठी कर्ज दिले जाते. त्यासाठी कॉलेजकडून कोटेशन मागितले जाते. कोटेशनमध्ये कॉलेजचे शुल्क, होस्टेलचे भाडे, पुस्तके, प्रोजेक्टला लागणाऱ्या खर्चाची माहिती द्यावी लागते. त्यानुसार कर्ज दिले जाते. विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्षे नोकरी व व्यवसायासाठी मुदत दिली जाते. त्यानंतर कर्जाचे हप्ते भरावे लागतात. सात ते दहा वर्षाची मुदत असते. काही बँका कर्ज मंजूर झाल्यानंतर दर महिन्याला व्याज भरावयास सांगतात तर काही बँका शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुद्दल व व्याजाची आकारणी करतात. या कर्जावर सरळ व्याज आकारले जाते. नियमित व्याज भरल्यावर पाच ते सात वर्षांनी व्याजामध्ये एक टक्के सवलतही काही बँकाकडून दिली जाते.

शिक्षणाबरोबर परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वीस लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्ज दिले जाते. राष्ट्रीय बँकाबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेबरोबर व नागरी व सहकारी बँकाकडून शैक्षणिक कर्जाचे वाटप केले आहे.

...

कोट

'दरवर्षी ४० ते ५० विद्यार्थ्यांना कर्ज दिले जाते. हुशार व प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जाचा लाभ घेत यश मिळवले आहे. यावर्षीही आम्ही शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

के.एल. प्रसाद, क्रेडिट मॅनेजर, बँक ऑफ इंडिया

....

'व्यावसायिक व परदेशी शिक्षण घेणाऱ्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कर्ज दिल्यानंतर पहिले सात ते साडेसात वर्षे पालकांनी फक्त कर्जावरील व्याज भरायचे असते. दरवर्षी २०० ते ३०० विद्यार्थी याचा लाभ घेतात.

शशिकांत पाटील, मॅनेजर, एसबीआय

...

'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकेने कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. दरवर्षी ५० ते ६० विद्यार्थ्यांना कर्ज दिले जाते.

डॉ. ए.बी. माने, सीईओ, केडीसीसी बँक

...

कर्जासाठी लागू असलेल्या अटी

कर्जासाठी भारतीय नागरिकच अर्ज करु शकतो.

उच्च शिक्षणासाठी दहा तर विदेशातील शिक्षणासाठी वीस लाख कर्ज मर्यादा

बँकांकडून कर्जावर ९.३० ते १३ टक्के व्याज आकारले जाते.

या कर्जावर इनकम टॅक्सच्या कलम ८० ई नुसार सूट मिळते.

कर्जासाठी आई वडिल, भाऊ बहिण, पती पत्नीसह अर्जदार जामीन राहू शकतात.

कर्जासाठी प्रवेश मिळाल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते.

विदेशातील शिक्षणासाठी तेथील युनिव्हर्सिटीचे पत्र द्यावे लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्राथमिक’च्या सभापतीपदासाठी दोन अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापतीपदासाठी काँग्रेसचे श्रावण फडतारे तर भाजपच्या विजय खाडे- पाटील तर उपसभापतीसाठी राष्ट्रवादीच्या सचिन पाटील व ताराराणी आघाडीच्या अर्चना पागर यांनी शुक्रवारी नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही पदासाठी दोन जुलै रोजी निवड सभा होणार आहे. शिक्षण मंडळावर सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे वर्चस्व असले, तरी महापौरपदाच्या उमेदवारीवरुन घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे सभापती-उपसभापती निवडीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी मुदत संपल्याने बुधवारी (ता. १९) झालेल्या महापालिकेच्या सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मंडळाच्या सभापती, उपसभापतीपदासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने दोन जुलै निवड सभा होणार असल्याचे जाहीर केले. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने सत्ताधारी व विरोधी आघाडीने महापालिकेत गर्दी केली होती. महापौर निवडीच्या नाट्यमय घडामोडी सुरू असताना सभापती व उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. सभापतीपदासाठी काँग्रेसकडून फडतारे व भाजपकडून खाडे-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव कारंडे यांच्याकडे दाखल केला. तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे पाटील व ताराराणी आघाडीच्या पागर यांनीही अर्ज दाखल केला. सभापतीपदासाठी फडतारे विरुद्ध खाडे-पाटील तर उपसभापतीपदासाठी पाटील विरुद्ध पागर अशी लढत होईल. पुढील वर्षभर सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार होते. पण पक्षाने हे पद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला. मंडळामध्ये सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे वर्चस्व असले, तरी महापौर निवडीचा उमेदवार ठरवताना घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे सभापती व उपसभापती निवडीलाही विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सुकता, तणाव आणि नाट्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अत्यंत तणावपूर्ण वातावरणात आणि नाट्यमय घडामोडींमध्ये महापालिकेच्या महापौरपदाच्या उमेदवारीदरम्यान लोकसभा निवडणुकीचे पडसाद उमटले. सुमारे पाच तास झालेल्या राजकीय घडामोडीत महापौरपदाच्या प्रमुख दावेदार अॅड. सुरमंजिरी लाटकर यांचा अखेरच्या क्षणी पत्ता कट झाला आणि उमेदवारीची माळ नगरसेविका माधवी गवंडी यांच्या गळ्यात पडली. राष्ट्रवादी पक्षातंर्गत कारभारी नगरसेवकांचा लाटकर यांना असलेला विरोध आणि ताराराणी आघाडीने केलेल्या राजकीय खेळीने गवंडींना एकप्रकारे लॉटरी लागली. मात्र राजकीय घडामोडीत अॅड. लाटकर यांना सलग दुसऱ्यांदा महापौरपदाने हुलकावणी दिली. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

राष्ट्रवादीच्या महापौर सरिता मोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर दोन जुलै रोजी निवड सभा होणार आहे. तत्पूर्वी महापौरपदासाठी उमदेवार जाहीर करण्यासाठी महापालिका वर्तुळात नाट्यमय घडामोडी घडत होत्या. मोरे यांना उमेदवारी देताना पुढीलवेळी अॅड. लाटकर यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन पक्षनेतृत्वाने दिले होते. परिणामी लाटकर यांची प्रमुख दावेदारी मानली जात होती. पण त्याचवेळी गवंडी व महिला बालकल्याण सभापती अनुराधा खेडकर यांची नावे चर्चेत आली. खेडकर यांची पक्षनेतृत्वाने समजूत काढल्यानंतर केवळ लाटकर व गवंडी यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु होती. गुरुवारी झालेल्या नगरसेवकांच्या मुलाखतीदरम्यान काही नगरसेवक व कारभारी नगरसेवकांनी लाटकर यांच्या नावाला विरोध केला. पण आमदार मुश्रीफ यांच्यासह काँग्रेसचे आमदार सतेज पाटील लाटकर यांच्या बाजूने असल्याने जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. शुक्रवारी सकाळी मुश्रीफ यांनी नाराज नगरसेवकांची भेट घेवून समजूत काढली. शासकीय विश्रामगृहावर सर्व घडामोडी सुरू असतानाच विरोधी ताराराणी-भाजप आघाडीचे सदस्य विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात बसून राष्ट्रवादीमधील घडामोडींवर लक्ष ठेवून होते. महापौरपदाचे नाव जाहीर झाल्यानंतरच निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय होणार होता. त्यासाठी ते राष्ट्रवादीमधील काही कारभारी नगरसेवकांच्या संपर्कात होते.

मुलाखतींचा सोपस्कार पूर्ण करुन मुश्रीफ हे आमदार पाटील यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीसाठी विश्वेश्वरय्या हॉल येथे दाखल झाले. त्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शनही केले. मात्र या बैठकीस प्रा. जयंत पाटील अनुपस्थित असल्याने पडद्यामागे हालचाली सुरु असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तरीही अनेक नगरसेवक लाटकर यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगत होते. परिणामी काँग्रेसच्या गोटातही शांतता होती. लाटकरही उमेदवारी निश्चित मानून समर्थकांसह महापालिकेत दाखल झाले. त्यांची उमेदवारी गृहीत धरुन विरोधी आघाडीचे सदस्य स्मिता माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरसचिवांसमोर बसले होते. त्याचवेळी विरोधी गटातील नगरसेवकांनी राष्ट्रवादीतील नगरसेवकांशी संपर्क साधत लाटकर यांच्याऐवजी अन्य उमेदवार दिल्यास अर्ज दाखल न करण्याचा प्रस्ताव दिला. प्रस्ताव थेट पक्षनेतृत्वापर्यंत गेल्यानंतर त्याला त्यांनी संमती दिली. बाहेर घडामोडी सुरु असताना दोन्ही आघाडीचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या गटनेत्यांच्या कार्यालयात बसले होते. प्रा. पाटील हे बंद लखोटा पोवार यांच्या घरी देवून महापालिकेत आले. काही क्षणात पोवार लखोटा घेवून आले. पोवार यांनी गवंडी यांच्या नावाला पसंती दिल्याचे जाहीर करताच काँग्रेसचे काही नगरसेवक तडक कार्यालयातून बाहेर पडले. अर्ज भरण्यास काही मिनिटांचा अवधी असल्याने सर्वजण अर्ज दाखल करण्यास जावू लागले.

उमेदवारी डावलल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लाटकर यांचे कार्यकर्ते आक्रमक बनले. उमेदवारी डावलल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. लाटकर त्यांची समजूत घालत होते. त्याचवेळी त्यांनी 'स्थायी'च्या चेंबरमध्ये काँग्रेस नगरसेवकांशी चर्चा केली. तरीही कार्यकर्ते शांत होत नव्हते. त्यांच्यातून सुटका करुन घेत लाटकर दाम्पत्य अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. गवंडी यांनी नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सुचक सचिन पाटील व अनुमोदक लाला भोसले यांचा उल्लेख आहे. दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते अर्ज भरुन गेल्यानंतर विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी गवंडी यांच्यासह माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नावाचा जयघोष केला. मात्र केवळ अर्धा ते पाऊण तासात घडलेल्या घडामोडींमुळे लाटकर यांच्या पत्ता कट झाला. त्यांची उमेदवारी मागे पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा फटका बसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु होती.

.............................

दिवसभरातील घटनाक्रम

स. ११.०० : राष्ट्रवादीचे पदाधिकारी शासकीय विश्रामगृह येथे दाखल

१२.३० : आमदार हसन मुश्रीफ यांचे आगमन व पदाधिकाऱ्यांची बैठक

१.०० : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना व्हीप लागू

१.०० : शहराध्यक्ष पोवार, माजी नगरसेवक अदिल फरास, प्रकाश गवंडी यांच्यामध्ये वादावादी

१.३० : माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांची दिलगिरी

२.०० : आमदार मुश्रीफ यांची नगरसेविका लाटकर, गवंडी यांच्याशी चर्चा

२.३० : आमदार मुश्रीफ नगरसेवकांच्या संयुक्त बैठकीसाठी रवाना

३.३० : आमदार मुश्रीफ व पाटील यांच्या मोर्चेबांधणीच्या सूचना

४.०० : पदाधिकारी महापालिकेकडे रवाना व लखोट्याची प्रतीक्षा

४.३० : शहराध्यक्ष पोवार लखोटा घे‌वून उपस्थित व गवंडींच्या नावाची घोषणा

४.४० : लाटकर समर्थकांचा संताप, जोरदार घोषणाबाजी

४.४५ : ताराराणी आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय

४.५० : गवंडींचा अर्ज दाखल व महापौरपदाची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट

५.०० : भाजप-ताराराणी आघाडीचा जयघोष

५.१५ : गवंडी समर्थकांचा जल्लोष

................................

चौकट

गवंडींनी घेतली आमदार मुश्रीफांची भेट

गुरुवारच्या बैठकीत उमेदवारांच्या मुलाखतीवेळी पक्षांतर्गत वाद उफाळून आला होता. त्याचे पडसाद उमटू नयेत, यासाठी माधवी गवंडी यांचे पती प्रकाश गवंडी यांनी कागल येथे आमदार मुश्रीफ यांची भेट घेतली. भेटीदरम्यान पक्ष संधी देईल त्यावेळी पद भूषवण्याची ग्वाही दिली. त्यांच्या भेटीमुळे नाराजी दूर झाल्याचे स्पष्ट झाले.

..........

माजी नगरसेवक मोरे यांची दिलगिरी

माजी महापौर सरिता मोरे यांचे पती व माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी महापौरपदाच्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त करत थेट मुश्रीफ यांच्याशी वाद घातला. परिणामी ते सकाळपासून बैठकीकडे फिरकले नव्हते. माजी नगरसेवक अदिल फरास त्यांना घेवून मुश्रीफांच्या भेटीसाठी आले. मोरे यांनी मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात काम करणार असून झालेला प्रकार गैरसमज व अनावधानाने घडला असून दिलगिरी व्यक्त करतो. तसेच यापुढे पक्ष कार्यात सक्रिय राहणार असल्याचे सांगितले.

.............

२०१३ नंतर महापौर निवड बिनविरोध

ताराराणी आघाडीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने महापौरपदी राष्ट्रवादीच्या नगरसेविका गवंडी यांची बिनविरोध निवड होईल. यापूर्वी २०१३ मध्ये पक्षाच्या नगरसेविका सुनिता राऊत यांची बिनविरोध निवड झाली होती. बिनविरोध निवडीमुळे महापौर निवडीत होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या चुराड्याला ब्रेक लागला.

..........

पोवार, फरास, गवंडी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक

महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने काही नगरसेवकांना व्हीप लागू करणारी पत्रे दिली होती. तसेच उर्वरीत नगरसेवकांची व्हीपवर स्वाक्षरी घेतली जात होती. स्वाक्षरी करण्यास गवंडी यांनी नकार देताच पोवार संतप्त झाले. फरास यांनी मी स्वाक्षरी घेऊन देता असे म्हणताच 'अध्यक्षपदा'ला सन्मान आहे की नाही, अशी संतप्त भावना पोवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.

...........

लाटकर समर्थक आक्रमक

अॅड. लाटकर यांची उमेदवारी डावलल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. अर्ज दाखल करण्यासाठी लाटकर दाम्पत्याला पोवार घेवून जात असताना समर्थकांनी रोखून धरले. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी महापालिका दणाणून सोडली. लाटकर त्यांना शांत करण्याच्या प्रयत्न करत असताना त्यांनी अधिकच संताप व्यक्त केला. दंगा सुरु असतानाच प्रकाश गवंडी धावत येवून दोन महिन्यानंतर राजीनामा देणार असून अर्ज भरण्यास येण्याची विनंती केली. त्यानंतर दोघेही अर्ज दाखल करण्यास गेले. तेथून बाहेर पडल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर पुन्हा समर्थकांनी त्यांना घेरले. सर्वजण आमदार मुश्रीफ व पाटील यांना भेटण्यासाठी बाहेर पडले. मात्र दोन्ही नेते नसल्याने ते बराचवेळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात थांबून होते. शनिवारी दोन्ही आमदारांची भेट घेवून आपली कैफियत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

..................

सहलीच्या आनंदावर विरजण

महापौर निवडीमध्ये विरोधी भाजप-ताराराणीचा विरोध अपेक्षित धरुन शनिवारी दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक सकाळी गोवा येथे सहलीला जाणार होते. तसे आदेश पक्षनेतृत्वाने दिले होते. त्यानुसार त्यांनी अजिंक्यतारा कार्यालयातून सहलीला जाण्याची तयारी केली होती. पण निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांच्या सहलीच्या आनंदावर विरजण पडले.

....................

राष्ट्रवादी, ताराराणी, भाजपची युती?

महापौरपदासाठी दुपारी साडेचारपर्यंत लाटकर यांचे नाव निश्चित झाल्याचा सर्वांचा समज होता. त्यांच्या नावाला काँग्रेस नेतृत्वाचा पाठिंबा असल्याने राजू लाटकरही निश्चिंत होते. पण अखेरच्या क्षणी ताराराणी आघाडीने गवंडी यांना उमेदवारी दिल्यास महापौर निवडणुकीतून माघार घेण्याची ऑफर दिली. या ऑफरचा स्वीकारही करण्यात आला. त्याची माहिती गटनेत्यांच्या कार्यालयात दिल्यानंतर स्थायी समिती सभापती देशमुख यांच्यासह काँग्रेसचे अन्य नगरसेवक तडक बैठकीतून बाहेर पडले. त्यांनी चेंबरमध्ये लाटकरांसोबत चर्चाही केली. पण त्याला फार उशीर झाला होता. परिणामी राष्ट्रवादी, ताराराणी व भाजपची युती झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.

................

नगरसेवक आम्हाला त्रास देतात

'नगरसेवकांच्या बैठकीदरम्यान सहलीला सर्वजण एकत्र जा. वेगवेगळे जाऊ नका. प्रत्येकाला जायचे असते. पण अनेकजण आढेवेढे घेतात,' अशी टिपणी मुश्रीफ यांनी केली. त्यावर त्वरीत आमदार सतेज पाटील यांनी सर्वजण एकत्र असल्याचे सांगितले. 'सर्वजण एकाच बाबतीत एक आहेत. पण त्रास आम्हाला देतात,' असे मुश्रीफ म्हणताच एकच हशा उमटला.

..........

चर्चा वरिष्ठ नेत्यांच्या फोनची

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राजू लाटकर यांनी विरोधी उमेदवाराचा प्रचार केल्याची तक्रार माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली होती. त्यांना उमेदवारी दिल्यास योग्य संदेश जाणार नसल्याचेही सांगितले होते. परिणामी लाटकर यांच्या उमेदवारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेरच्याक्षणी त्यांचे नाव मागे पडले. त्यांना उमेदवारी देवू नये, असा फोन खासदार सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष जयंती पाटील यांनी केला असल्याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांना चाळीस टक्के बांधकाम सक्ती

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

@gurubalmaliMT

कोल्हापूर : औद्योगिक वसाहतींतील मध्यम आणि लघु उद्योजकांसमोर आणखी एक नवे संकट आले आहे. मिळालेल्या भूखंडावर चाळीस टक्के बांधकाम न केल्यास उर्वरित भूखंड परत घेण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. बांधकामाचे प्रमाण दहा टक्क्यावरून थेट चाळीस टक्के करण्याच्या या निर्णयाने मुळातच मंदीत असलेल्या उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. दोन वर्षांत बांधकाम करेपर्यंत विना वापर म्हणून कर भरावा लागणार असल्याने उद्योजकांची अवस्था 'दुष्काळात तेरावा महिना', अशी झाली आहे.

अलिकडे अनेक कारणांनी औद्योगिक क्षेत्रावर सध्या मंदीचे सावट आहे. इतर राज्यात कमी दरात मिळणारा कच्चा माल, तेथील सरकारकडून मिळणाऱ्या सवलती आणि महाराष्ट्रात वीज दरात झालेली वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे राज्यातील बहुसंख्य उद्योजक अडचणीत आहेत. यात मध्यम व लघु उद्योजकांची संख्या मोठी आहे. या परिस्थितीत रिकाम्या भूखंडावर बांधकाम करण्याचा आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिला आहे. विशेष म्हणजे 'सेझ' मधील मोठ्या उद्योजकांना यातून सूट दिली आहे.

भूखंडावर दहा टक्के बांधकाम करण्याची सक्ती आहे. पण नव्या नियमानुसार चाळीस टक्के बांधकामाचा आदेश देण्यात आला आहे. चाळीस टक्क्यांपेक्षा कमी चटई क्षेत्राचा वापर असलेल्या भूखंडाचे येत्या वीस दिवसांत सर्वेक्षण करून संबंधित भूखंडधारकांना नोटीस देण्यात येणार आहे. बांधकामासाठी दोन वर्षांची मुदत दिली आहे. तोपर्यंत विना वापराबद्दलचा कर भरावा लागणार आहे. या काळात बांधकाम न केल्यास भूखंड परत घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. शिवाय यापुढे वाटप होणाऱ्या सर्व भूखंडांना किमान चाळीस टक्के एफएसआय बांधकाम करणे सक्तीचे केले आहे.

या निर्णयातून मोठे प्रकल्प वगळले आहेत. ज्यांनी शेकडो एकर जमीन घेऊन त्याचा वापर न करता ठेवले आहेत त्यांच्या जमिनी परत घेण्याऐवजी लघु उद्योजकांच्या जागेवर सरकारने डोळा ठेवला आहे. मंदीमुळे नव्या गुंतवणुकीसाठी पैसे नसताना दोन वर्षांत बांधकाम करण्याचा आदेश देणे अन्यायकारक असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. ते म्हणाले, 'नवीन उद्योगांना जमीन मिळवून देण्याच्या गोंडस नावाखाली लघु उद्योजकांवर अन्याय केला जात आहे. यापेक्षा ज्यांनी अनेक वर्षापासून घेतलेल्या जमीनींचा वापरच केला नाही, त्यांच्या जमिनी परत घ्याव्यात.'

सरकारच्या या नव्या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व उद्योजकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन जुलै रोजी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकाराने मुंबईत बैठक बोलावली आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे.

.. ...

बरेच उद्योजक जागा घेतल्यानंतर किरकोळ दिखाऊ बांधकाम करून भूखंड अडवून ठेवतात. यामुळे ज्यांना उद्योग उभारायचे आहेत त्यांना सरकार जागा देऊ शकत नाही. यामुळे या जागांचा वापर उद्योगवाढीसाठी व्हावा, यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

अविनाश सुभेदार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी

.. ..

वीजदरवाढ आणि उत्पादन खर्चातील वाढ तसेच स्पर्धांमुळे उद्योजकांची अवस्था बिकट झाली आहे. अशावेळी खुल्या भूखंडावर बांधकाम करण्याचा आदेश अन्यायकारक आहे. याविरोधात सरकार पातळीवर तातडीने पाठपुरावा करण्यात येईल.

ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

. .. . .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उचंगी धरणग्रस्तांना जमिनीऐवजी पैसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आजरा तालुक्यातील उचंगी धरणग्रस्तांना १५ जुलैपर्यंत पर्यायी जमिनीच्या मोबदल्यात पैसे देण्याचा निर्णय शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी वारणा, चांदोली, आंबेओहोळ, धामणी, एरंडोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतही चर्चा करण्यात आली. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्फनाला धरणासाठी आठ दिवसांनंतर आवश्यक जमिनीचे संपादन करणे, चांदोली अभयारण्यग्रस्तांना जाखले येथे दिलेल्या जमिनीचे सपाटीकरण करून देणे असे निर्णयही बैठकीत घेण्यात आले. यावेळी पुनर्वसनासाठी अतिरिक्त असलेल्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांकडून काढून घेण्याची कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या लिपिकास काटकर यांनी खडे बोल सुनावले. यावेळी पुनर्वसन अधिकारी वैभव नावडकर, प्रांताधिकारी संपत खिलारी, विजया पांगारकर, संपत देसाई, मारुती पाटील, डी. के. बोडके आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेतन निश्चितीसंदर्भात पत्र

$
0
0

कोल्हापूर: सातवा वेतन आयोगानुसार प्राध्यापकांची वेतन निश्चिती करताना पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील वेतन निश्चितीची तपासणी करण्यात येते. तसेच काही प्राध्यापकांच्या बाबती यापूर्वी झालेल्या चुकीच्या निश्चितीप्रकरणी वसुली करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागातील लेखाधिकारीमार्फत देण्यात येतात. जर अशा प्रकरणात प्राध्यापकांकडून वसुली करावी लागत असेल तर प्रथम संबंधित प्राध्यापकांना लेखी सूचना द्यावी, तसेच संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी तोपर्यंत कोणत्याही प्रकारे वसुली करू नये. वसुली करावयाची असल्यास देय फरकातून ही रक्कम समायोजित करावी अशा सूचना शिक्षण संचालक धनराज माने यांनी राज्यातील सर्व शिक्षण संचालकांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानधनात वाढ

$
0
0

कोल्हापूर: जि. प. च्या आरोग्य विभागाकडील आरोग्य परिचरांच्या वेतनात वाढ करावी यासाठी सातत्यान केलेल्या आंदोलनाला न्याय मिळाला, असे पत्रक करवीर कामगार संघाने प्रसिद्धीस दिले आहे. सरकारने सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना १२०० रुपयांवरुन तीन हजार इतकी दरमहा वेतन देण्याचा आदेश काढला आहे. त्यांना २०१६ पासूनचा फरकह दिला जाणार आहे. आरोग्य परिचरांच्या वेतनात वाढ करण्यात येणार असल्यामुळे आतापर्यंतच्या आंदोलनाला यश मिळाल्याचे पत्रकांत म्हटले आहे. कॉम्रेड बाबा यादव, दिलीप पोवार, अॅड. बाळासाहेब पोवार यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणे आंदोलन आज

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व कोल्हापूर जिल्हा महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी (ता. २९) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी दोन ते पाच या वेळेत आंदोलन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्यारेलाल यांच्या उपस्थितीत सोमवारी मैफल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकारांच्या जोडीतील प्यारेलाल यांच्या उपस्थितीत त्यांची गाणी व त्यांच्यासोबत संवाद यावर आधारित सूरसंगम कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ब्राह्मण बिझनेस फोरम यांच्यावतीने दोन जुलै रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे ही मैफल होणार आहे,' अशी माहिती दिलीप गुणे व सचिन जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. जीवनगाणे वाद्यवृंदतर्फे कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका एक जुलैपासून केशवराव भोसले नाट्यगृह येथे उपलब्ध होणार आहेत.

जगताप म्हणाले, 'भारतीय सिनेसृष्टीतील यशस्वी संगीतकारांच्या जोड्यांपैकी लक्ष्मीकांत व प्यारेलाल यांची जोडी आहे. त्यांनी अनेक चांगली गाणी दिली आहेत. या जोडीतील लक्ष्मीकांत यांचे निधन झाल्यानंतर प्यारेलाल यांनी कुमार सोनू यांच्यासमवेत गाण्यांच्या रचना केल्या.'

सूरसंगम या कार्यक्रमात प्यारेलाल संगीतकार कारकीर्दीविषयी संवाद साधणार आहेत. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत व पाश्चिमात्य संगीत यांचा वापर संगीतकार म्हणून कसा केला याविषयी ते प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. तसेच जुन्या काळातील रेकॉर्डिंग पद्धत, वाद्यांच्या माध्यमातून ध्वनीनिर्मिती याबाबचे किस्सेही सांगणार आहेत. यावेळी दिलीप गुणे, केदार गुळवणी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंधळी, जोशी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोंधळी, जोशी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, गायरानची जमीन घरकुलांसाठी द्यावी, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना देण्यात आले.

निवेदनात, जातीच्या दाखल्यांसाठीची १९६१ पूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करावी, आरक्षणाचे प्रमाण वाढवावे, बार्टीच्या धर्तीवर भटक्या विमुक्तसाठी स्वतंत्र संशोधन संस्था स्थापन करावी, असंघटीतासाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी, अंबाबाई, तुळजाभवानी, रेणुका देवी मंदिरात सरकार नियुक्त पुजारी म्हणून गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजातील व्यक्तीची नेमणूक व्हावी, कारागिर, लोककला, लोककलावंत संवर्धनासाठी संशोधन केंद्र निर्माण करावे, केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या दादा इदाते आयोग समितीच्या शिफारशी जशास तशा लागू कराव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनात समाज मंडळाचे अध्यक्ष सुभाष भोजणे, अभिजीत गजगेश्वर, बबन कावडे, बाबासाहेब कावडे, संजय भोळे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणाचा निकाल हा जनतेचा विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षण हायकोर्टाने वैध ठरवल्यानंतर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट घेऊन आंदोलनात सहभाग घेऊन पाठबळ दिल्याबद्दल आभार मानले. न्यू पॅलेस येथे शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी शाहू महाराजांनी आरक्षण संदर्भात माहिती घेऊन मराठा आरक्षण लढ्यामध्ये कोल्हापूर हे केंद्रबिंदू ठरले असून न्यायालयाचा हा निकाल म्हणजे जनतेचा विजय असल्याचे सांगितले.

गतवर्षी मराठा आरक्षण ठोक इशारा आंदोलनात शाहू महाराज, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. यशवंत थोरात सहभागी झाले होते. शाहू महाराजांच्या पाठबळामुळे आंदोलनातील कार्यकर्त्यांना बळ मिळाले. आंदोलन स्थगित करण्यासाठी राज्य सरकारकडून थेट मंत्रीगट कोल्हापुरात आला होता. त्यांनी हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण आंदोलन मंजूर होईल, असे आश्वासन दिले होते. महाराजांनी दिलेल्या अनमोल सहकार्याबद्दल सकल मराठा समाजाच्यावतीने आभार मानण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, अॅड गुलाबराव घोरपडे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, मुस्लीम बोर्डिगचे कादर मलबारी, प्रकाश पाटील, प्रदीप माने, गौरव गवळी, उमेश पोर्लेकर, हर्षल सुर्वे, उत्तम जाधव, आदी उपस्थित होते.

दरम्यान, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार निवृत्त जिल्हा न्यायाधीश के.डी.पाटील यांच्या कसबा बावडा येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला. पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी भक्कम पुरावे देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. पवार यांनी पाटील यांचे, आरक्षणासाठी केलेल्या अविश्रांत परिश्रमाबद्दल कोल्हापूरवासियांना आपला अभिमान वाटतो, अशा शब्दांत आभार मानले. यावेळी के.डी.पाटील म्हणाले, 'पुरावे गोळा करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. हायकोर्टाने आयोगाच्या शिफारशी मान्य केल्याचे समाधान मोठे आहे.' यावेळ प्रवीण पालव,अभिजित बुकशेट,प्रथमेश नेसरीकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरमध्ये परिचारकास मारहाण

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रुग्णाला सलाइन लावताना बेडवर हात आपटल्याच्या गैरसमजातून रुग्णाच्या नातेवाइकांनी परिचारकास मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी दोन तास काम बंद आंदोलन केले. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले. अखेर या घटनेची दखल घेऊन मारहाण करणाऱ्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत रात्री उशिरा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिव्हरला सूज येऊन पोटात पाणी झाल्याने शामराव तुकाराम जाधव (रा. शिवाजी पार्क) गेल्या दहा दिवसांपासून सीपीआरमधील दूधगंगा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर उपचार घेत आहेत. शुक्रवारी दुपारी दीड वाजता परिचारक स्टेफन सुहास समुद्रे त्यांना सलाइन लावत होते. त्यावेळी रुग्ण जाधव यांनी हात बेडवर आपटला. मात्र, परिचारक समुद्रे यांनीच जाधव यांचा हात बेडवर आपटल्याच्या गैरसमजातून जाधव यांच्या मुलाने समुद्रे यांना मारहाण केली. त्यावेळी दोघांच्यात शाब्दिक वाद झाला. सुमारे पंधरा मिनिटे वाद सुरू होता, त्यामुळे तणाव वाढला. अखेर समुद्रे यांनी घडलेला हा प्रकार सहकाऱ्यांना सांगितला.

महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा हसमत हवेरी यांना हा प्रकार समजल्यानंतर त्या या ठिकाणी आल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोरच ठिय्या मारला. जोरदार घोषणाबाजी करून मारहाणीचा निषेध केला. आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून घेतले. त्यांना घडलेला प्रकार सांगितला. रुग्णाच्या नातेवाइकाकडून डॉक्टर आणि परिचारक, परिचारिकांवर हल्ले वाढत आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी. त्यासह प्रत्येक वॉर्डमध्ये सुरक्षारक्षक नेमावा. सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी केली. त्यावेळी डॉ. लोकरे यांनी याप्रकरणी एक जुलैला बैठक घेतली जाईल, असे सांगितले.

दरम्यान या सर्व प्रकाराची माहिती कर्मचाऱ्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. संशयित अल्पवयीन आहे.

०००००

नातेवाइकांची धावपळ

दुपारी दोन ते चार या वेळेत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने सीपीआरमध्ये नातेवाइकांची धावपळ उडाली. दाखल असलेल्या काही रुग्णांवर सुरू असलेले उपचार थांबले. काहींचे सलाइन सुरू होते. मात्र, ते काढण्यासाठी कर्मचारी नव्हते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांची मोठी तारांबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यातील दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यटनासाठी कोल्हापुरात आलेल्या पिरंगुट (मुळशी, पुणे) येथील दाम्पत्याने विष पिऊन आत्महत्या केली. लक्ष्मीपुरी परिसरातील हॉटेल पल्लवी येथे हा प्रकार घडला. विनोद रमाकांत जोशी (वय ५९), त्यांची पत्नी मीना (५५) अशी त्यांची नावे आहेत. मुलगा श्रेयस (वय १८) याची प्रकृती गंभीर आहे. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. त्यांनी आर्थिक अडचणी आणि कर्जाला कंटाळून सहकुटुंब आत्महत्या करीत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी कुंटुबीय २६ जूनला कोल्हापुरात आले होते. दोन दिवसांसाठी त्यांनी हॉटेल बुक केले होते. २७ जून रोजी तिघांनी रात्री जेवण केले. त्यानंतर खोलीचा दरवाजा बंद करुन घेतला. २८ जूनला त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येऊन लागल्याचे वेटरने हॉटेलमालकाला सांगितले. त्यांनी शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस तत्काळ दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा फोडून पाहिले असता तिघेही बेशुद्धावस्थेत आढळले. घटनास्थळी पोलिसांना विषाची बाटली सापडली. मुलगा श्रेयसचा श्वास सुरू होता. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जोशी दाम्पत्याने गुरुवारी रात्री विष प्राशन केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरुन त्याची ओळख पटविण्यात आली.

आत्महत्या केल्याच्या प्रकाराने हॉटेलचे व्यवस्थापन गडबडून गेले. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडलेले प्रश्न मार्गी लावू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'शहराच्या विकासासाठी व विविध योजनांसाठी राज्य नियोजन मंडळातून भरघोस निधी आणू. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, खंडपीठ मंजुरीसह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावू,' असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

आमदार क्षीरसागर यांची नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांच्या हस्ते सत्कार केला. क्षीरसागर म्हणाले, 'शहरासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नाचा आढावा घेतला जात आहे. अशा प्रश्नासाठी प्राधान्यांने निधी आणला जाईल.'

यावेळी ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, सुहास भेंडे, बाळासाहेब शेटे, सुभाष चौगुले, किरण सांगावकर, अॅड. सतीश खोतलांडे, बाळासाहेब सन्नकी, बी. एस. पाटील आदी उपस्थित होते. राजू वाली यांनी प्रास्ताविक केले. राजेश पाटील-चंदूरकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदी माधवी गवंडी बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदासाठी राष्ट्रवादी पक्षांतर्गत दिवसभर झालेल्या अत्यंत उत्कंठापूर्वक आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या क्षणी अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्याऐवजी माधवी प्रकाश गवंडी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. विरोधी ताराराणी-भाजप आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने गवंडी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले. २ जुलैला होणाऱ्या विशेष सभेत त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होईल. उमेदवारी न दिल्याने लाटकर समर्थकांनी राष्ट्रवादी गटनेता कार्यालयासमोर संताप व्यक्त केला.

महापौर सरिता मोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी दोन जुलैला महापालिकेची निवड सभा होणार आहे. महापौरपदासाठी नाव निश्चित करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होती. शुक्रवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी लाटकर आणि गवंडी यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा केली. बैठकीनंतर लाटकर यांचे नाव निश्चित झाल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर विश्वेश्वरय्या हॉल येथे आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक होऊन महापौर निवडीची मोर्चेबांधणी करण्यात आली. त्यानंतर सर्वजण अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. शहराध्यक्ष आर. के. पोवार हे आमदार मुश्रीफ यांच्याकडून लखोटा घेऊन आल्यानंतर अर्ज दाखल होणार होता. मात्र या बैठकीला नगरसेवक प्रा. जयंत पाटील अनुपस्थितीत होते. त्याचवेळी विरोधी ताराराणी आघाडीची बैठक हॉटेल पॅव्हेलियनमध्ये सुरु होती.

अर्ज दाखल करण्यासाठी सर्व नगरसेवक राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील यांच्या कार्यालयात थांबले होते. प्रा. पाटील यांच्या आगमनानंतर काहीवेळात लखोटा घेऊन शहराध्यक्ष पोवार हेही दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा अवधी असल्याने ताराराणी-भाजपचे नगरसेवक स्मिता माने यांचा अर्ज दाखल करण्यासाठी स्थायी समिती सभागृहात बसले होते. पोवार यांनी गवंडी यांचे नाव जाहीर करताच ताराराणी आघाडीने अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला आणि गवंडी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले.

.. .. ..

संयुक्त बैठकीनंतर नाट्यमय घडामोडी

दोन्ही नगरसेवकांची बैठक होऊन सर्वजण महापालिकेत जात होते. त्यावेळी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांना प्रा. पाटील यांनी मोबाइलद्वारे दोन अर्ज भरण्याची सूचना केली. देशमुख यांच्या वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असताना हा निरोप आल्याने सर्वजण तेथेच थांबले. देशमुख यांनी उपमहापौर भूपाल शेटे यांना गवंडी व लाटकर यांचे अर्ज भरुन ठेवण्याची सूचना केली. त्याचवेळी लाटकर यांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले.

०० ० ० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी शनिवार २९ जून

$
0
0

योग शिबिर : जागतिक योगदिना निमित्त योग शिबिर, स्थळ : प्रभातीर्थ अपार्टमेंट, ताराबाई रोड, वेळ : सकाळी ७ व सायंकाळी ५ वा.

प्रतिमा पूजन : बाळासाहेब पाटील-कौलवकर यांच्या जयंतीनिमित्त आर्य समाज एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीने प्रतिमा पूजन, स्थळ : शाहू दयानंद हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वेळ : सकाळी १० वा.

व्याख्यान : सहकारमूर्ती तात्यासाहेब मोहिते यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकरी सहकारी संघाच्या वतीने व्याख्यान, वक्ते : प्रा. डॉ. ए. एम. गुरव, विषय : विक्री व्यवस्थापन व सहकार, स्थळ : शेतकरी संघ, मुख्य कार्यालय, वेळ : सकाळी १० वा.

सन्मान समारंभ : आंतरराष्ट्रीय ब्राह्मण संसदेच्या वतीने ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान समारंभ, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सकाळी १०.३० वा.

चर्चासत्र : कोल्हापूर जिल्हा मंडप लाईटिंग डेकोरेशनच्या वतीने 'मंडप एक्स्पो'अंतर्गत जीएसटीवर चर्चासत्र, स्थळ : रामकृष्ण हॉल, मार्केट यार्ड, वेळ : सायंकाळी ४ वा.

अधिवेशन : बामसेफच्या वतीने जिल्हा अधिवेशन, उद्घाटक : प्रेमानंद मौर्य, स्थळ : कॉन्फरन्स हॉल, शाहू स्मारक भवन, वेळ : सायंकाळी ४ वा.

संगीतमय संध्याकाळ : कोल्हापूर कला रसिकांच्या वतीने 'एक सुरेल संध्याकाळ' सांस्कृतिक कार्यक्रम, स्थळ : राम गणेश गडकरी हॉल, पेटाळा, वेळ : सायंकाळी ५ वा.

परिषद : कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने 'स्तनाचे आजार' विषयावर परिषद, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सायंकाळी ५ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचं ठरलंय.. महागात पडलं

$
0
0

मुश्रीफ ... धनंजय महाडिक फोटो

\B

\Bम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीत पक्षाचा अधिकृत उमेदवार असतानाही 'आमचं ठरलंय' म्हणत विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा पहिला फटका माजी नगरसेवक राजू लाटकर यांना बसला. त्यांच्या पत्नीच्या हातातोंडाशी आलेला महापौरपदाचा घास तर गेलाच शिवाय या निमित्ताने आमदार हसन मुश्रीफ व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडली.

लाटकर हे एकेकाळचे महाडिक यांचे कट्टर समर्थक. धनंजय महाडिक यांचे जवळचे मित्र. महापालिकेतील त्यांची एंट्री देखील याच गटाकडून झाली. पण नंतर मुश्रीफ आणि महाडिक यांच्यात दुरावा आला, तेव्हा लाटकरांनी कागल आणि कसबा बावड्यावर जास्त प्रेम दाखवले. यामुळे महापालिका निवडणुकीत दोन वेळा त्यांच्या पराभवासाठी महाडिक गटाच्या काहींनी उघडपणे प्रयत्न केला. याचा राग म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकीत 'आमचं ठरलंय' म्हणत शिवसेनेचा प्रचार केला. केवळ प्रचारच नाही तर सेनेच्या शहरातील प्रचाराची सर्व सूत्रे ताब्यात घेताना व्यासपीठावरही ते अनेकदा दिसले. यामुळे महाडिक गटाचे ते लक्ष्य झाले.

महापौर म्हणून अॅड. सूरमंजिरी लाटकर यांना संधी देण्याचा शब्द आमदार मुश्रीफांनी सहा महिन्यांपूर्वीच दिला होता. त्यानुसार सरिता मोरे यांचा राजीनामा घेण्यात आला. मोरेंच्या राजीनाम्याने लाटकरांचा मार्ग मोकळा झाला. पण मोक्याच्या वेळी माजी खासदार महाडिक यांनी लोकसभेतील प्रचाराचा मुद्दा पुढे आणला. पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी तक्रार केली. पक्षाविरोधी काम करणाऱ्यास उमेदवारी देऊ नये अशी मागणी केल्याने मुश्रीफांची अडचण झाली. एकीकडे पक्ष फुटण्याची भिती आणि दुसरीकडे दिलेला शब्द या कात्रीत ते अडकले. अशावेळी खंदा समर्थक असतानाही 'राजू आता थांब' म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. यामुळे माधवी गवंडी महापौर होणार असल्या तरी या निमित्ताने लोकसभेचे पडसाद या निवडीत उमटल्याचे स्पष्ट झाले.

अॅड. लाटकरांना डावलावे लागल्याने मुश्रीफ नक्कीच नाराज झाले असतील. कारण सहा महिन्यापूर्वी ज्यांना शब्द दिला, त्यालाच थांब म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. याला माजी खासदार महाडिकांची भूमिका कारणीभूत ठरली. लोकसभेत त्यांनी पक्षाचा प्रचार केला, पण या प्रचारात कुठेच खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यावर टीका केली नाही. यामुळे त्यांनी नेमके काय केले याबाबत महाडिकांच्या मनात शंका आहेच. शिवाय जिल्ह्याच्या राजकारणात ते आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर आहेत. लाटकरांच्या नावाला पाटील यांचा भक्कम पाठिंबा होता. यामुळेच महाडिक यांनी त्यांना टोकाचा विरोध करत डाव उलटवला. यामुळे या दोन नेत्यांमध्ये आता नव्याने वादाची ठिणगी पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images