Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राज्यात वर्षभरात १६९ जणांना एचआयव्ही

$
0
0

कोल्हापूर:

एचआयव्ही/एड्स निर्मूलनात यशस्वी ठरल्याचा दावा सरकार करत असले तरी गेल्या अठरा वर्षांत राज्यातील ३ हजार ८६६ रुग्णांना रक्तसंक्रमण आणि इतर घटकांमधून एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांतील हे प्रमाण ९४३ तर २०१८-१९ या वर्षात १६९ रुग्णांना रक्तसंक्रमण आणि इतर माध्यमातून एचआयव्हीची लागण झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यकतेवेळी तातडीने रक्त देणेही किती धोक्याचे आहे, ही बाब स्पष्ट होत आहे. एचआयव्हीचा हा धोका कमी करण्यासाठी आधुनिक नॅट (न्यूक्लिक ॲसिड टेस्ट) चाचणी गरजेची आहे. मात्र जिल्ह्यात केवळ एका खासगी रक्तपेढीकडे अशी यंत्रणा उपलब्ध आहे. त्यामुळे याबाबत आणखी सजग रहावे लागणार आहे. देशात अंदाजे २ हजार ५०० रक्तपेढ्या असून त्यातील केवळ २ ते ३ टक्केच ‘नॅट’ चाचणी करतात.

एचआयव्ही/एड्स निर्मूलनासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असतात. मात्र रक्तसंक्रमण आणि इतर माध्यमांतून एचआयव्ही होण्याचे प्रमाण वाढत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडे (‘नॅको’) मागितलेल्या माहितीत ही बाब उघड झाली. रक्तपेढ्यांमधील दूषित रक्तामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी सध्या एलायझा चाचणी वापरली जाते. मात्र ही तपासणी एचआयव्ही, हिपॅटायटिस ‘बी’, हिपॅटायटिस ‘सी’ यांसारख्या आजारांचे पहिल्या टप्प्यातील निदान करताना निष्फळ ठरत आहे. त्यामुळे रक्त संक्रमणातून एचआयव्हीसारखे आजार पसरत आहेत. त्यासाठी राज्यातील सार्वजनिक रुग्णालयातील रक्तपपेढ्यांसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये आधुनिक ‘नॅट’ चाचणी सक्तीची गरजेची आहे. मात्र सद्यस्थितीत ‘नॅट’ चाचणीचा खर्च मोठा आहे. त्यामुळे या चाचण्यांकडे दुर्लक्ष होते.

‘नॅट’ मुळे होणारे फायदे
‘नॅट’ या प्रभावी तंत्रज्ञानाद्वारे सर्वाधिक सुरक्षित रक्तपुरवठा केला जाऊ शकतो, असे खात्रीशीरपणे सांगितले जाते. सामान्यतः रक्तातील प्लाझ्मा, प्लेटलेट्स आणि पांढऱ्या पेशींचे विघटन करून ते रुग्णांच्या गरजेनुसार दिले जाते. या चाचणीत पीसीआर तंत्रज्ञान वापरले जाते. त्यात डीएनए सेग्मेंटचे विभाजन केले जाते. यामध्ये रक्तात संसर्गित झालेल्या विषाणूंची जनुके शोधून काढली जातात. आधुनिक तंत्राच्या सहाय्याने रक्त नमुन्याचे अॅम्प्लिफिकेशन करून विषाणूची खातरजमा केली जाते. त्यामुळे ‘विंडो पीरियड’ म्हणजे जंतू संसर्ग झाल्यापासून ते जंतूसंसर्ग लक्षात येण्याचा कालावधी कमी झाल्याने लवकरात लवकर रोगनिदान होते. पुण्यातील केईएम रुग्णालय आणि एका खासगी रक्तपेढीत ‘नॅट’ चाचणीमुळे संकलित रक्तातील आजारांच्या विषाणूंचे निदान पहिल्या टप्प्यात झाले. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवघेण्या आजारांच्या संक्रमणापासून वाचवता आले. ‘नॅट’मुळे एचआयव्ही व हिपेटायटिसचे निदान पहिल्या दोन दिवसांत करणेही शक्य आहे. त्याचा विंडो पीरिएड कमी होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

पॉइंटर
रक्त संक्रमणातून होणाऱ्या एचआयव्हीत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली आघाडीवर
दरवर्षी देशात ८५ हजार ते १ लाखापर्यंत रुग्णांना एचआयव्हीची लागण
राज्यात दरवर्षी २१ हजारावर एचआयव्हीचे रुग्ण

रक्तसंक्रमणातून एचआयव्ही लागण झालेले रुग्ण (२०१८-१९)
उत्तर प्रदेश २४१
प. बंगाल १७६
महाराष्ट्र १६९
गुजरात १३९

देशपातळीवरील आकडेवारी
२०१६-१७ १ हजार ५४१
२०१७-१८ १ हजार ४०६
२०१८-१९ १ हजार ३४२
तपासणी पद्धत विंडो पीरियड(एलायजा) विंडो पीरियड(नॅट)
एचआयव्ही २५दिवस ५ दिवस
हिपॅटायटिस ‘बी’ ६० दिवस ५ दिवस
हिपॅटायटिस’सी’ ७५ दिवस ५ ते ७ दिवस

एचआयव्ही व हिपॅटायटिस आजाराचे निदान होण्यात ‘नॅट’ चाचणी फायद्याची ठरते. त्यामुळे विंडो पीरियड कमी होण्यास मदत होते. सद्यस्थितीत रक्तसंक्रमणातून एचआयव्हीचा होणारा वाढता संसर्ग पाहता ‘नॅट’ चाचण्या सुरू करण्यासाठी रक्तपेढ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

डॉ. वरुण बाफना, रक्तविकार तज्ज्ञ, सीपीआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहू पुरस्कारात पुन्हा घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना देण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू पुरस्कार निवडीत यंदाही घोळ झाला. पुरस्कारासाठी निवडण्यात येणाऱ्या सदस्यांच्या नावाबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत न झाल्यामुळे पुरस्काराची घोषणा संध्याकाळपर्यंत लांबणीवर टाकण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढवली. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुरस्काराचे राजकारण केल्याचा आरोप विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून होत आहे.

इचलकरंजीतील राजकारणातून राहुल आवाडे यांना पुरस्कार नाकारला. इचलकरंजीच्या राजकारणातून आवाडे यांना पुरस्कार नाकारण्यात आला. आवाडेंना पुरस्कार मिळाला असता तर विधानसभा निवडणुकीत भाजपाला त्रास झाला असता या भीतीने इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्यावर दबाव आणला आणि नाव वगळण्यास भाग पाडले, असा आरोप महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनी केला. जिल्हा परिषदेत आवाडे गट हा भाजपसोबत आहे. त्या गटाच्या सदस्या मगदूम या महिला व बालकल्याण समिती सभापती आहेत. पुरस्कारासाठी राहुल आवाडे यांनी प्रस्ताव दाखल केला होता. त्यांच्या नावासाठी मगदूम यांनी आग्रह धरला होता.

बुधवारी (ता. २६) दुपारी १२ वाजता पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार होती. जिल्हा परिषदेत सकाळी राजर्षी शाहू जयंतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक झाली.

निवड समितीच्या बैठकीत पुरस्कारसाठी एकमत झाले नाही. समितीने पुरस्कारासाठी दाखल दहापैकी सहाजणांची नावे निवडण्याचा अधिकार अध्यक्षा शौमिका महाडिक यांना दिला होता. मात्र त्या यादीमध्ये आवाडे यांचे नाव नसेल तर अध्यक्षांचा निर्णय मान्य असणार नाही, असा पवित्रा मगदूम यांनी घेतला. 'पुरस्कार यादी निवडताना आपले मत विचारात न घेता हुकूमशाही पद्धतीने नावे घोषित केली, त्याचा निषेध करते.' असे सांगत पुरस्कार निवडीच्या घडामोडीचा गुरुवारी दुपारी भांडाफोड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. राजकारणामुळे पुरस्काराचे पावित्र्य धोक्यात आले असून त्याचे नाव बदलून पालकमंत्री, आमदार, खासदार पुरस्कार असे नाव द्यावे, अशी मागणी गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तासभर खलबते करुनही पुरस्कार यादीवरून मतैक्य झाले नाही. पुरस्कार जाहीर करण्याची वेळ उलटून गेल्यानंतर तासाभरांनी जिल्हा परिषद सदस्य शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे समिती सचिव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी पत्रकार परिषद घेतली. अध्यक्षा महाडिक यांनी शाहू पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांची नावे जाहीर केली. सदस्यांचे नावे सायंकाळपर्यंत जाहीर करू असे सांगत वेळ मारून नेली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पत्रकाद्वारे नावे जाहीर केली.

\B

या सदस्यांनी दिले प्रस्ताव\B

दरम्यान जि.प. सदस्यांना द्यावयाच्या पाच पुरस्कारासाठी भाजपचे सदस्य महेश चौगुले, कल्पना चौगले, सुनीता रेडेकर, काँग्रेसचे सुभाष सातपुते, पांडुरंग भादिंगरे, रेश्मा देसाई, ताराराणी आघाडीचे राहुल आवाडे, राष्ट्रवादीचे जीवन पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे मनीषा माने आणि चंदगड क्रांती युवक आघाडीचे कल्लाप्पाण्णा भोगण यांच्या प्रस्तावांचा समावेश होता. कागल पंचायत समितीच्या सभापती राजश्री माने, गगनबावडयाच्या सभापती मंगल कांबळे, हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा सनदी आणि भुदरगड पंचायत समिती सदस्या आक्काताई नलवडे यांनी प्रस्ताव दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममधून दोन भामट्यांनी पन्नास हजार रुपये लांबवले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सेव्हिंग अकाउंटवरील बॅलेन्सचे स्टेटमेंट काढण्याचा बहाणा करीत एटीएम सेंटरमधून दोन अनोळखी व्यक्तींनी ग्राहकांच्या खात्यावरील ५० हजार रुपये लंपास केले. २५ जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी चंद्रकांत शंकर कुंभार (वय ५८ रा. प्लॉट क्रमांक ४०, दत्त कॉलनी, रिंगरोड, फुलेवाडी) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी सांगितले की, कुंभार हे २५ जून रोजी दुपारी रंकाळा टॉवर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमधून गेले. त्यावेळी या एटीएम सेंटरमध्ये दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी हिंदीतून कुंभार यांच्यासोबत संवाद साधला. ते म्हणाले, 'आपका अभि ट्रॅझेक्शन सुरू है, आप एटीएमसे स्टेटमेंट निकालो और जावो' असे सांगितले. कुंभार यांनी बॅलेस स्टेटमेंट काढण्यास सांगितले. त्यावेळी या दोघांनी स्टेटमेंट काढतो, असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेऊन पहिल्यांदा दहा हजारांची रक्कम काढली. त्यानंतर काही वेळाने ट्रान्झॅक्शन चुकीचे असल्याचे सांगत दुसऱ्यांदा एटीएम कार्ड स्वाइप करुन ४० हजारांची रोकड एटीएममधून काढून दोघेही पसार झाले. कुंभार यांच्या मोबाइलवर एसएमएस आल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेतर्फे ५०० वृक्षांचे रोपण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेने अनोख्या पद्धतीने राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करत त्यांच्या कार्यास अभिवादन केले. रंकाळा येथील राजर्षी छत्रपती शाहू स्मृती उद्यान परिसरात वृक्षरोपण करुन जयंती साजरी केली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

'स्वच्छ, सुंदर व हरीत कोल्हापूर' यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. विशेषत: महापुरुषांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करुन त्यांना अभिवादन केले जात आहे. राजर्षी शाहू जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यासाठी महिन्यापूर्वी रंकाळा तलावाच्या पूर्व बाजुकडील गाळ काढून परिसर स्वच्छ करण्यात आला होता. सकाळी श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. रंकाळा तलाव परिसरात एक हजार झाडे लावण्यात येणार आहेत. जयंतीनिमित्त बुधवारी ५०० रोपे लावण्यात आली.

जिल्हाधिकारी दौलत देसाई, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, माजी महापौर सरीता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयक्तु डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'शहर स्वच्छ, सुंदर व हरीत करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून एक चळवळ उभा राहिली आहे. सलग नऊ रविवारी घेतलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संस्थांनी आपला सहभाग नोंदवला. शहरातील ५६ बागांपैकी ताराबाई उद्यान लोकसहभागातून स्वच्छ व विकसीत करण्यास सुरुवात झाली आहे. महावीर उद्यानही अशाच पद्धतीने विकसीत करण्यात येईल.'

शहरात राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेबाबत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. निसर्ग नवलाई ग्रुपच्या डॉ. सुरेखा पाटील, नवस्वराज्य चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संदीप प्रभाकर यांनी रोपे व कंपोष्ट खत दिले. नगरसेविका हसिना फरास, सुरेखा शहा, नगरसवेक महेश सावंत, अजित राऊत, अजित ठाणेकर, माजी नगरसेवक बाजीराव चव्हाण, नंदकुमार मोरे, उत्तम कोराणे, दत्तात्रय टिपुगडे, अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात समता दिंडी

$
0
0

साताऱ्यात समता दिंडी

सातारा :

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक न्याय दिन म्हणून शहरातून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने झांजपथक, लेझीमच्या तालावर काढण्यात आलेल्या समता दिंडीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू बोर्डिंग, पोवई नाका, सातारा येथून सकाळी साडेआठ वाजता समता दिंडीला प्रारंभ झाला. या समता दिंडीमध्ये सातारा शहरातील विविध विद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थ्यींनी उत्कृष्टरित्या संचलन केले. समता दिंडीमध्ये राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभाग तसेच विविध विकास महामंडळांच्या योजनांची चित्ररुपाने माहिती देणाऱ्या चित्ररथांचा समावेश होता. या चित्ररथांद्वारे भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजना व बिज भांडवल योजनांची जनजागृती करण्यात आली.

.....

.....

जातीच्या दाखल्यासाठी

जलद कृती आराखडा तयार

सामाजिक न्यायमंत्री डॉ.खाडे

सातारा :

'भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात यशस्वी झाले आहे. त्याचबरोबर बीसी, ओबीसी व आर्थिक दुर्बल घटक, अल्पसंख्यांक अशा सर्वानाच या पूर्वीच आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे जातीचे दाखले काढण्यासाठी सर्व तहसील, प्रांत कार्यालये या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे जातीच्या दाखल्यासाठी जलद कृती आराखडा तयार केला जाईल,' असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी सातारा येथे विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

सध्या जातीच्या दाखल्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अधिकारी वर्गाने जात न पाहता क्रमवारीनुसार जातीचे दाखले वितरित करावे, अशी मागणी कार्यकर्त्यानी केल्यामुळे जातीच्या दाखल्यासाठी जलद कृती आराखडा तयार केल्याने त्याची लवकरच अंमलबजावणी होणाार आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या वसतीगृह, आश्रमशाळा या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे जेवण व साहित्य तसेच इमारतीचे बांधकाम करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लाच घेताना अटक

सातारा :

सातारा येथील उपविभागीय अधिकारी (प्रांत) अधिकाऱ्यांचा सरकारी वाहनावरील खासगी चालक विनायक लक्ष्मण गायकवाड (वय ५२) यास एक हजाराची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. या घटनेनंतर तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांच्या सरकारी वाहनावरील खासगी चालक विनायक लक्ष्मण गायकवाड यांनी तक्रारदाराला पुनर्वसन जमिनी बाबत प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाची प्रत मिळवून देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने या संदर्भात गायकवाड याला अनेकदा निकालाची प्रत मागितली तथापि गायकवाड याने देण्यास टाळाटाळ केली. एक हजार रुपयाची मागणी वारंवार होऊ लागल्याने तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्याशी संपर्क साधला होता.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात चोरांचा सुळसुळाट

$
0
0

सोलापुरात चोरांचा सुळसुळाट

सोलापूर :

सोलापूर शहरात बुधवारी दिवसाढवळ्या सकाळी ९ ते १० दरम्यान हिसका मारून सोन्याची चैन पळवून नेण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. यामुळे सोलापुरातील महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यापैकी दोन घटना शहराच्या गजबजलेल्या नवी पेठ भागात तर तिसरी घटना मशाळवस्ती येथे घडली आहे. येथे तर घराच्या कंपाउंडमध्ये घुसून चोरट्याने महिलेच्या गळ्यातील गंठण ओढून नेले. मोटारसायकलींवरील दोघा चोरट्यांनी नवी पेठेत पोलिस आहोत, असे सांगून महिलेला थांबवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले. पहिला प्रकार सकाळी नऊ वाजता काळी मशीद ते जिजामाता सभागृह या रस्त्यावर घडला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी सोशल मीडियावर चोरांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधांच्या किमती कमी होणार

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMt

हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दीर्घ आजारांवरील वैद्यकीय खर्चात वाढ झाल्याने त्याचा भार कुटुंबावर पडतो. अनेकदा अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होते. उपचार आणि औषधांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने औषध कंपन्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक १ हजार ३२ औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णांना स्वस्तात औषधे मिळणार आहेत. जनऔषधी स्टोअर्सना ७०० विविध प्रकारची औषधेही पुरवली जाणार आहेत.

जेनेरिक औषध दुकानांच्या माध्यमातून सामान्य रुग्णांना अत्यल्प दरात औषध पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचा फायदा गरीब रुग्णांना होत आहे. नव्या निर्णयानुसार ७०० प्रकारची औषधे जनऔषधी सेंटरमध्ये पुरवली जाणार आहेत. तर काही स्टोअर्सना रोज २० ट्रक औषधे पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्करोग आणि इतर आजारासंबंधीच्या ४२ औषधांचे व्यापारी मार्जिन निश्चित केल्याने औषधांच्या किमती ९० टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत. त्याचा फायदा दीर्घकाळ औषधे घेणाऱ्या रुग्णांना होणार आहे.

जेनेरिक औषध केंद्राच्या माध्यमातून स्वस्तात औषधे मिळावीत, या हेतूने 'ना नफा ना तोटा', या तत्त्वावर केंद्रे सुरू करण्यात आली. त्यामुळे ४५ रुपये कमाल किमतीचे औषध ११.५० रुपयात उपलब्ध झाले. जेनेरिक औषधांचा वापर करून अमेरिकेसारखी प्रगत राष्ट्रे शेकडो अब्ज डॉलर्सची बचत करतात. या देशातून ५० हजार कोटींची जेनेरिक औषधे निर्यात होतात. मात्र आपल्याकडे चढ्या किमतीत ब्रॅण्डेड औषधे विकली जातात. ती रुग्णांना परवडणारी नसतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग अशा आजारांवर नियमित आणि दीर्घकालीन औषधे घ्यावी लागतात. त्यामुळे जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्यास रुग्णावरील आर्थिक ताण कमी होणार आहे.

जेनेरिक दरात हवी ब्रँडेड औषधे

दीर्घकालीन आजारावर घ्याव्या लागणाऱ्या औषधांच्या किमती प्रचंड असल्याने औषध दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सातत्याने होते. जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांच्या दरात कमालीची तफावत आहे. जेनेरिक औषधांच्या उपलब्धतेमुळे उपचार स्वस्त होणार असले तरी त्याच्या दर्जाबाबत सरकारने खातरजमा करावी. सरकारनेच पुढाकार घेऊन औषध निर्मिती कंपन्यांना जेनेरिकच्याच दरात ब्रँडेड औषधे उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होते. ब्रँडेड आणि जेनेरिकमध्ये काहीच फरक नसतो असे सरकारचे मत असेल तर त्यांना औषध निर्मिती कंपन्यांना तसे सांगण्याची हिंमत दाखवावी लागणार आहे, असे वैद्यकीय अभ्यासकांचे मत आहे.

सरकारने औषधांच्या किमती निश्चित करण्याचे ठरवल्याने सामान्य रुग्णांना फायदा होणार आहे. मात्र जेनेरिक औषध दुकानांना सरकारला वेळेत औषध पुरवठा करावा लागणार आहे. शहरात सध्या २५ जेनेरिक औषध दुकाने आहेत. रुग्णांचाही प्रतिसाद चांगला आहे.

- शिवाजी मोटे, जेनेरिक औषध विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त बिल मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्रात लोकायुक्त नियुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मसुदा समितीची बैठक २८ जूनला मुंबईत होणार आहे. बैठकीत लोकायुक्त मसुद्याला अंतिम स्वरुप दिले जाईल. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होईल,' असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ते म्हणाले, ' लोकायुक्त विधेयकाच्या मंजुरीनंतरच्या वर्ष-दीड वर्षाच्या काळात राज्याच्या परिस्थतीत नक्कीच बदल झालेला दिसेल. आंदोलन समाजात परिवर्तन घडविणारे असते. शाहूंनी परिवर्तनाची मोठी चळवळ यशस्वी केली. त्यांचे सामाजिक, आर्थिक विषमता संपविण्याचे, अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य सदैव प्रेरणा देणारे आहे. चारित्र्य चांगले असेल तर चळवळी यशस्वी होतात, यासंबंधीचा आदर्श आणि कृतिशील उदाहरणे महाराजांनी घालून दिली. सद्यस्थितीत देशाला चारित्र्यवान नेतृत्वाची गरज आहे.'

दिखाऊ स्वरुपाची आंदोलने यशस्वी होत नाहीत, असे स्पष्ट करून ते म्हणाले, 'कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहचून परिवर्तनाची लढाई केली पाहिजे. गावागावांत परिवर्तनाची लढाई सुरू झाली तर सगळीकडे यश येईल. राळेगणसिद्धीमध्ये परिवर्तनाचे अनेक प्रयोग केले. श्रमदान करुन दलित व्यक्तींची कर्जे फेडली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला.'

.. .. ... ... .

राजू शेट्टी लढाऊ कार्यकर्ता

राजू शेट्टी यांचा लोकसभेतील पराभव यासंबंधीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, 'चळवळीतील कार्यकर्त्यांचा कधी पराभव होत नसतो. चळवळीतील कार्यकर्ता समाजासाठी जगत असतो. लोकांची कामे कर्तव्य म्हणून करत असतो. तेव्हा लोकांसाठी लढणाऱ्या व्यक्तीचा पराभव झाला असे कसे म्हणायचे? शेट्टी यांचा पराभव झाल्याचे मी मानत नाही.'

०० ० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा सदस्य, १६ कर्मचाऱ्यांना पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतर्फं उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहा सदस्य आणि १६ कर्मचाऱ्यांना शाहू पुरस्कार जाहीर केला. मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जि. प. सदस्य महेश चौगुले ( भाजप, उचगाव), सुनीता रेडेकर (भाजप, सरंबळवाडी आजरा), मनीषा माने (जनसुराज्य शक्ती,अंबप), रेश्मा देसाई (काँग्रेस, गारगोटी), कल्लाप्पाण्णा भोगण (क्रांती युवक आघाडी, कोवाड), हातकणंगले पंचायत समिती सदस्य व माजी सभापती रेश्मा सनदी (कबनूर)तर कर्मचाऱ्यांमध्ये विलास कोडलीवार (बांधकाम विभाग), कक्ष अधिकारी ज्योती साळोखे (पंचायत समिती, शिरोळ), वरिष्ठ सहायक अनिल पाटील (पंचायत समिती, करवीर), महावीर भिवरे (सामान्य प्रशासन विभाग), वाहनचालक अनिल कोळेकर (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग), भिकाजी जानकर (परिचर, माध्यमिक शिक्षण विभाग), कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव शिंदे (पंचायत समिती हातकणंगले), सहायक लेखाधिकारी वैशाली पवार (अर्थ विभाग), आरोग्य सेवक राहुलराज शेळके (पंचायत समिती शिरोळ), आरोग्य सहायक मानसिंग वडर (आरोग्य केंद्र, नांदणी), उषा खोडके (आरोग्य केंद्र, कोतोली), आरोग्य सहायक पूजा घाटगे (आरोग्य केंद्र, आळते), औषध निर्माण अधिकारी महेश कोळेकर (आरोग्य केंद्र, वाटगी) व अभियांत्रिकी सहायक संदीप भाट (विभागून) पशुधन पर्यवेशक धनाजी राणे (पंचायत समिती, गडहिंग्लज)व प्रकाश गायकवाड (पशुवैद्यकीय दवाखाना, वडणगे) यांना पुरस्कार विभागून दिला.

पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केलेल्या सगळ्याच सदस्यांची कामगिरी चांगली आहे. प्रत्येकांनी वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. यामुळे नावे निवडताना वेगळे निकष लावता येतील का, त्यांची जिल्हा परिषद व्यतिरिक्त कामगिरी, सभागृहातील वर्तणूक या साऱ्या गोष्टींचा पुरस्कारासाठी विचार झाला.

शौमिका महाडिक, अध्यक्षा जिल्हा परिषद

सत्ताधाऱ्यांनी विरोधी आघाडीतील एकाही सदस्याची कामगिरी विचारात घेतले नाही. जे सदस्य कधी सभागृहात तोंड उघडत नाहीत, केवळ सत्ताधाऱ्यांना पोषक भूमिका घेतात अशांना पुरस्कार देत पक्षपातीपणा केला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाच्या पुरस्कारात राजकारण, वशिलेबाजी होऊ नये.

राहुल आवाडे सदस्य, ताराराणी आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'वेस्टमधून बेस्ट' प्रयत्न कौतुकास्पद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'देशामध्ये पर्यावरणाचा प्रश्न जटील बनला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सामुदायिक प्रयत्नाची आवश्यकता असून जयंती नाला परिसरात वेस्टमधून बेस्ट निर्माण करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे,' असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले. जयंती नाला पंप परिसरात बुधवारी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हजारे म्हणाले, 'स्वच्छ भारत निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सर्वांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्यास स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचेही संवर्धन होईल. जयंती नदीचा नाला झाला. त्याला आपणच जबाबदार आहोत. नाल्याची स्वच्छता करण्यासाठी त्याची विभागणी करून वेस्ट ते बेस्ट करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.' आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले 'श्रमदानातून दोन महिन्यापासून प्रत्येक रविवारी जयंती नाल्याची स्वच्छता केली जात आहे. पूर्वी जयंती नदी होती, परंतु कालांतराने मानवी वस्ती वाढल्याने नदीला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले. सुमारे १४ किमीचा नाल्याची विभागणी करून स्वच्छता केली जात आहे. त्याची जबाबदारी संघटना, संस्था व उद्योजकांना दिली आहे. नाल्यातील पाणी शुद्ध राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.' यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, माजी महापौर सरिता मोरे, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता आर. के. पाटील, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, दिलीप देसाई, उदय गायकवाड, कॉ. दिलीप पोवार, पारस ओसवाल व ड्रेनेज विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वेस्टमधून बेस्ट’ प्रयत्न चांगला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशामध्ये पर्यावरणाचा प्रश्न जटील बनला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सामुदायिक प्रयत्नाची आवश्यकता असून जयंती नाला परिसरात वेस्टमधून बेस्ट निर्माण करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे,' असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले. जयंती नाला पंप परिसरात बुधवारी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

हजारे म्हणाले, 'स्वच्छ भारत निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सर्वांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्यास स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचेही संवर्धन होईल. जयंती नदीचा नाला झाला. त्याला आपणच जबाबदार आहोत. नाल्याची स्वच्छता करण्यासाठी त्याची विभागणी करून वेस्ट ते बेस्ट करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.'

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले 'श्रमदानातून दोन महिन्यापासून प्रत्येक रविवारी जयंती नाल्याची स्वच्छता केली जात आहे. पूर्वी जयंती नदी होती, परंतु कालांतराने मानवी वस्ती वाढल्याने नदीला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले. सुमारे १४ किमीचा नाल्याची विभागणी करून स्वच्छता केली जात आहे. त्याची जबाबदारी संघटना, संस्था व उद्योजकांना दिली आहे. नाल्यातील पाणी शुद्ध राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.'

यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, माजी महापौर सरिता मोरे, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता आर. के. पाटील, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, दिलीप देसाई, उदय गायकवाड, कॉ. दिलीप पोवार, पारस ओसवाल व ड्रेनेज विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी गुरुवार २७ जून

$
0
0

डायरी २७ जून

योग शिबिर : जागतिक योगदिनानिमित्त योग शिबिर, स्थळ : प्रभातीर्थ अपार्टमेंट, ताराबाई रोड, वेळ : सकाळी ७ व सायंकाळी ५ वा.

पुस्तक प्रदर्शन : ग्रंथ कॉर्नर यांच्या वतीने पुस्तक प्रदर्शन, स्थळ : शाहू स्मारक भवन, वेळ : सकाळी १० ते रात्री ९ वा.

कार्यशाळा : कृषी विभाग, विभागीय कृषी संशोधन केंद्र व मका सुधार प्रकल्पाच्या वतीने 'मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन' विषयावर एकदिवसीय कार्यशाळा, स्थळ : कृषी महाविद्यालय, वेळ : सकाळी १० ते ५ वा.

सत्कार : चेतना विकास मंदिरच्या वतीने हेलन केलर जयंतीनिमित्त नीलेश छडवेलकर यांचा सत्कार, हस्ते : आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, स्थळ : चेतना विकास मंदिर, शेंडा पार्क, वेळ : सकाळी १०.३० वा.

गुणगौरव : हेलन केलर व छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, हस्ते : मुख्याध्यापक पी. एन. पाटील, स्थळ : अंधशाळा, मिरजकर तिकटी, वेळ : सकाळी १०.४५ वा.

शैक्षणिक साहित्य वाटप : हेलन केलर जन्मदिनानिमित्त नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडच्या वतीने (नॅब) अंध विद्यार्थी व अंध पालकांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, हस्ते : सीईओ अमन मित्तल, स्थळ : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन हॉल, शिवाजी उद्यमनगर, वेळ : दुपारी १ वा.

पुरस्कार वितरण : अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी गौरव व प्रेरणा पुरस्कारांचे वितरण, हस्ते : माजी आमदार राजीव आवळे, स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, वेळ : सायंकाळी ५ वा.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तर आम्ही विरोध केला नसता’

$
0
0

'महापौर सरिता मोरे यांचे काम चांगले होते. पदावर त्यांना कायम ठेवले असते, तर आम्ही विरोध केला नसता.' असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांना लगावला. राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पालकमंत्री पाटील व आमदार पाटील शाहू जन्मस्थळ येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. महापौर मोरे यांनी पक्षातंर्गत ठरलेल्या फॉर्म्युलानुसार राजीनामा दिला असून नव्या महापौर निवडीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. महापालिकेतील राजकारणाचा संदर्भ घेत 'मोरे यांचे काम चांगले होते. त्यांना बदलण्याची आवश्यकता नव्हती. त्यांना महापौरपदी कायम ठेवले असते, तर आम्ही विरोध केला नसता.' असा टोला पाटील यांनी लगवाताच हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवड २ जुलैला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपद निवठीसाठी दोन जुलै रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात निवड सभा होणार आहे. महापौरपदासाठी शुक्रवारी (ता. २८) दुपारी ३ ते ५ वेळेत नामनिर्देशपत्र दाखल करण्याची मुदत असून महापौर निवडीनंतर प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती व उपसभापतिपदासाठी निवडसभा होणार आहे. निवड सभेचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी महापालिकेला प्राप्त झाला. पीठासन अधिकारी म्हणून जि. प.चे सीईओ अमन मित्तल यांची नियुक्ती केली आहे.

महापौर सरिता मोरे यांनी राजीनामा दिल्याने महापौरपद रिक्त झाले असून नव्या निवडीचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी विभागीय आयुक्ताशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी दोन जुलै रोजी महापौर निवडीची सभा जाहीर केली असून महापौर निवडीनंतर प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापती व उपसभापतिंची निवड होईल. महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर व माधवी गवंडी यांची नावे चर्चेत असून विरोधी भाजप-ताराराणी आघाडीही महापौरपदाच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे. ताराराणी आघाडीच्या स्मिता माने, सीमा कदम व उमा इंगळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ मुंबईमध्ये असून गुरुवारी ते कोल्हापुरात दाखल होणार आहेत. याच दिवशी ते पक्षाच्या नगरसेवकांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्याची शक्यता आहे. मोरे यांच्या राजीनाम्यानंतर नव्या निवडीला अवघे पाच दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने या कालावधीत महापालिकेच्या राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडणार आहेत.

'प्राथामिक' सभापतिपदाबाबत उत्सुकता

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण सभापती व उपसभापतिपदासाठी दोन जुलै रोजी निवड सभा होणार आहे. सत्तारुढ काँग्रेस आघाडीमधील सत्तेच्या फॉर्म्युलानुसार सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार आहे. नुकत्याच झालेल्या सभेत सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक व गटनेते सुनील पाटील व सचिन पाटील यांची वर्णी लागली. या दोघांपैकी एकाला सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र हे पद काँग्रेसकडे राहिल्यास नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांनाही सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी संयुक्त बैठक

महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील राजकीय घडामोडी वेगवान होऊ लागल्या आहेत. प्रत्येक निवडीपूर्वी सत्तारुढ आघाडीच्या नगरसेवकांची संयुक्त बैठक होते. ही बैठक शुक्रवारी (ता. २८) होणार आहे. बैठकीत महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करून निवडक नगरसेवक अर्ज दाखल करण्यासाठी जातील, असे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरळक पावसाने शहर चिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि परिसरात बुधवारी सकाळी पावसाच्या जोरदार सरी आल्या. दुपारनंतर पावसाच्या तुरळक सरींमुळे पावसाळी वातावरण तयार झाले. पावसामुळे कमालीचा गारवा निर्माण झाला होता. गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसांमुळे अंबाई टँक परिसरात मोठे झाड उन्मळून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली.

बुधवारी सकाळी साडेदहा वाजता पावसाला जोरदार सुरुवात झाली. पंधरा ते २० मिनिटे चांगला पाऊस झाला. दुपारी दीडनंतर तुरळक सरी येत होत्या. त्यामुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबले. पाण्यातून वाट काढत वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागली. शहरात सुरू असलेल्या काही कामांच्या ठिकाणी पावसामुळे दलदल निर्माण झाली. भूमीगत पाइपलाइनचे काम सुरू असलेल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली. कसबा बावडा, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, कुंभार गल्ली, अंबाई टँक आदी परिसरातील गटारी तुंबल्या.

ढगाळ वातावरण आणि तुंबलेल्या गटारींमुळे डासांची पैदास वाढली असून सीपीआर, प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाल्याचे दिसत आहेत. इचलकरंजीतील ७२ वर्षीय अण्णासाहेब पोवार यांना वातावरणाचा त्रास जाणवल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने प्रशिक्षण दिलेल्या आपदा सखी ज्योती पागडे हिने ब्लँकेटच्या सहाय्याने स्ट्रेचर तयार करून जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी पत्रकातून दिली.

सांडपाणी थेट पंचगंगेत

पावसामुळे जयंतीनाल्यामधील बंधाऱ्यावरून सांडपाणी वाहून जात आहे. हे सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. यामुळे नदीतील पाणी दूषित झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुण मानसिक आजाराच्या विळख्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत समाजातील सर्वच घटकांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. शहरी भाग मानसिक आजाराला बळी पडत असताना ग्रामीण भागातही मानसिक आजाराचे लोण पसरत आहे. नकारात्मक शारीरिक प्रतिमांमुळे निर्माण होणाऱ्या ताणातून राज्याच्या ग्रामीण भागातील १८ वर्षांपर्यंतच्या ११ टक्के व्यक्ती नैराश्याला बळी पडत असल्याची गंभीर बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे.

शाळकरी मुले ते ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई येथील पोद्दार फाउंडेशनच्यावतीने मानसिक आरोग्य जागरुकता सप्ताहाच्या निमित्ताने राज्याच्या ग्रामीण व निमशहरी भागात मानसशास्त्र विषयक कार्यशाळांचे आयोजन केले होते. या कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना बॉडी शेमिंगमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे डॉक्टर व समुपदेशकांच्या निदर्शनास आले. फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वतःवर ओढवून घेतलेल्या नकारात्मक शारीरिक प्रतिमांचे तोटे समजावून देऊन जाणीव जागृती करण्यात आली. यासाठी शाळा, अंगणवाड्या, समाज मंदिरे या ठिकाणी तणाव व्यवस्थापनाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. पोद्दार फाउंडेशनने युवक बिरादरी संस्थेशी भागीदारी केली असून मानसिक आरोग्यासाठी अपायकारक ठरणाऱ्या घटकांची ओळख समाजातील सर्व स्तरावर पोचवण्यासाठी वेगवेगळी सत्रे व अभ्यास कार्यशाळांचे आयोजन केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशातील ७.५ टक्के नागरिक मानसिक आजारांचे बळी ठरत आहेत. त्यापैकी अनेकांना मानसिक आजाराबद्दल कोणतीही माहिती नसल्याने उपचार घेण्यास टाळाटाळ केली जाते. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ नुसार, २० पैकी एक भारतीय व्यक्ती डिप्रेशनचा बळी ठरतो. २०१२ मध्ये १५ ते ४९ वर्षे वयोगटातल्या साधारण दोन लाख ५८ हजार व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना मानसिक आजाराबाबत कोणतेही उपचार वेळेवर मिळत नाहीत. त्या तुलनेने शहरी भागात मानसोपचार तज्ज्ञ सहज उपलब्ध होतात. मात्र, अजूनही मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेण्याची मनोभूमिका तयार होत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातही मानसिक आजाराबाबत मोठे गैरसमज असल्याने न्यूनगंडातून औषध उपचार टाळले जातात. त्याचा परिणाम म्हणून अनेक मनोविकार निर्माण होतात.

नकारात्मक शारीरिक प्रतिमा हे मानसिक आरोग्यापुढचे एक मोठे सामाजिक आव्हान असून आता ग्रामीण व निमशहरी भागातही ही समस्या बळावते आहे. नकारात्मक स्वयंप्रतिमा आणि किमान आत्मसन्मान यामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम होत असतो. या समस्येला तोंड देण्यासाठी समाजातल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचून जाणीव जागृती उपक्रम घेतला जात आहे. तरुणाईने या उपक्रमात सहभागी व्हावे.

- डॉ. प्रकृती पोद्दार, मानसशास्त्रविषयक अभ्यासक

शहरी भागात १० वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांत नैराश्य जास्त

२१ ते २५ वयोगटातील युवा वर्ग नैराश्याचा बळी

बेरोजगारी, शिक्षण, घरगुती अडचणी, व्यसनाधीनता नैराश्येमागील कारणे

भारतात सात कोटी मनोरुग्ण

देशातील ६.५ टक्के लोकांना मानसिक आजार

१ लाख लोकांमागे १०.९ टक्के व्यक्तींच्या मनात आत्महत्येचे विचार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुमला शाहू नामाचा गजर

$
0
0

फोटो-अर्जुन टाकळकर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'छत्रपती शाहू महाराज की जय' असा जयघोष, रिमझिम पाऊस, डफावर पडणारी थाफ, लेझीम घुंगराचा नादमय आवाज, फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी, चित्ररथ, सजीव देखावे, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, पारंपरिक वाद्यांचा गजर अशा राजेशाही थाटात राजर्षी शाहू महाराज यांच्या १५४ व्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कोल्हापूर सर्वसमावेशक राजर्षी शाहूप्रेमी, शाहू प्रतिष्ठान व शाहू प्रेमी संघटनांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीत नागरिकांनी सहकुटुंब सहभाग घेतला.

मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाइन, महापालिका महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, देवल क्लबमार्गे मिरजकर तिकटी असा मिरवणुकीचा मार्ग होता. नागरिकांनी घरोघरी शाहू प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता मिरजकर तिकटी येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात झाली. मधुरिमाराजे छत्रपती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, आर. डी. पाटील, आदिल फरास, अजित ठाणेकर, बाबा पार्टे, दौलत देसाई, निवास साळुंखे, डी. बी. पाटील, लाला गायकवाड उपस्थित होते

मिरवणुकीत सर्वच वयोगटांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विशेषत: शाळकरी विद्यार्थी व महिलांची संख्या लक्षणीय होती. खास पारंपरिक फेटे व वेशभूषा करून महिलांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला. राजर्षी शाहूंच्या विकासकामांची माहिती देणारे चित्रमय प्रबोधनात्मक फलक ट्रॅक्टरवर लावण्यात आले होते. फलकावर भवानी मंडप, मराठा बोर्डिंग, खासबाग मैदान, कळंबा तलाव, छत्रपती शाहू स्टेडियम, साठमारी मैदान, राधानगरी धरण, जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, शेतीविकास अशा विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकण्यात आला. चित्रमय फलकांमुळे शाहू महाराजांच्या समृद्ध इतिहासाच्या आठवणी जाग्या झाल्या. ट्रॅक्टरवर आरुढ शाहूंचा पुतळा लक्षवेधी ठरला. मिरवणुकीत पट्टणकडोलीच्या ५० जणांच्या गजनृत्य मंडळाने अप्रतिम नृत्य सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. हलगीच्या ठेक्यावर महिलांनी लेझीम नृत्य सादर करून सुप्त कलागुणांचे प्रदर्शन केले. मिरवणुकीत करवीर तालुक्यातील गिरगाव आणि कोपर्डे गावच्या वारकरी बांधवांनी टाळ-मृदंगानी मिरवणुकीत रंगत आणली. त्यांनी रामकृष्ण नामाचा गजर करत टाळ-वीणावादन केले.

मुस्लिम बांधवांचा मोठा सहभाग

कोल्हापूरला हिंदू-मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा आहे. गेली शेकडो वर्षे येथील हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने नांदतात. दोन्ही धर्मांतील सण व उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मिरवणुकीत यळगूडच्या करबला मेल या संस्थेच्या वतीने पांढरा सलवार परिधान करून मुस्लिम बांधव तिरंगी गोंडे हातात घेऊन नृत्यात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान उस्ताद यांनी करबला मेलचे नेतृत्व केले.

चित्ररथ देखावा

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानतर्फे शिवाजी पेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ८५ तालमींचे पदाधिकारी व कार्यकर्ते, बैलगाड्या व घोडागाड्या, ५० मुला-मुलींची शिवकालीन युद्धकलेची पथके, १०० लोकांचे ढोलपथक सहभागी होते. शाहूभक्त गंगाराम कांबळे यांच्या सत्यसुधारक हॉटेलचा चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होता. शाहू कार्यात सक्रिय असणारे शाहू वैदिक पुरोहित रामदास पाटील व शाहू ग्रंथाचा प्रचार-प्रसार करणारे मानसिंग पाटील यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बाबा महाडिक, डॉ. संदीप पाटील, हिंदुराव पाटील, महेश कोरडे, उज्ज्वल नागेशकर, बाळा गवळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवित्र पोर्टलमधील माहिती दुरुस्तीस मुदतवाढ द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पवित्र पोर्टलमध्ये भरलेली माहिती दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी ४० हून अधिक डीएड, बीएड व उच्च पदवीधारक उमेदवारांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

पवित्र पोर्टलमधील माहिती दुरुस्त करण्यासाठी शिक्षक बुधवारी मुख्यालयात आले होते. बहुतेक उमेदवारांच्या अर्जावर ड्राफ्ट कॉपी असा उल्लेख होता याकडे लक्ष वेधले. पोर्टलमध्ये माहिती भरताना सर्व्हर डाऊन, अचानक लॉग आऊट होण्याचे प्रकार घडल्याने उमेदवारांनी निदर्शनास आणले. यामुळे माहितीत दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली. शिष्टमंडळात नानासााहेब पाटील, जयश्री होलार, स्नेहल कोळी, विनायक पोवार, वसुंधरा सुतार, निलेश शिंदे, सरिता माने आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० पासून युवा संवाद

$
0
0

कोल्हापूर: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे २० जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत 'हिंसेला नकार मानवतेचा स्वीकार' या विषयीचे युवा संवाद परिषद यशस्वी करण्याचा निर्धार जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत झाला. जिल्हा कार्याध्यक्ष विनायक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची पोर्ले येथे बैठक झाली. दरम्यान वीस ऑगस्ट रोजी नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्याने, निर्भय वॉकचे आयोजन केले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत निकम, प्रमोद शिंदे, अनिल शेलार, हर्षल जाधव, प्रमिला भोसले, सुजाता म्हेत्रे आदी उपस्थित होते. रमेश वडणगेकर यांनी आभार मानले. अंनिसच्या पन्हाळा शाखेतर्फे उत्तरे येथील मंगल रामचंद्र पाटील या महिलेचे जटा निर्मूलन केले. कार्यकर्त्या गीता हसूरकर, मंगल पवार, सुजाता म्हेत्रे यांनी महिलेस जटामुक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक गणनेची प्रक्रिया सुरू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्र सरकारतर्फे सातवी आर्थिक गणना करण्यात येणार आहे. त्याची तयारी जिल्हा पातळीवर सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या नियोजन विभागातर्फे जिल्हा स्तरावर समन्वय समितीची स्थापना करण्याचे आदेश २१ जून रोजी देण्यात आले आहेत.

दर पाच वर्षांनी घरोघरी भेट देऊन आर्थिक गणना केली जाते. २०१४ मध्ये सहाव्या आर्थिक गणनेचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. यंदा होणारी सातवी गणना आहे. या गणनेत सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय, कृषी, सेवा, सहकार आदी क्षेत्रांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. यांसह प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन सविस्तर माहिती घेण्यासाठी प्रगणकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रगणकांनी संकलित केलेल्या माहितीची छाननी पर्यवेक्षक करतील. एकूण प्रगणकांपैकी १० टक्के प्रगणकांच्या कामाची पडताळणी दुसऱ्या टप्यात होईल. त्यानंतर तिसऱ्या टप्यात उपमहासंचलक, क्षेत्रिय कार्य विभाग, राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनांकडून छाननी केली जाईल.

गणनेच्या नियोजनासाठी राज्यस्तरावर अपर मुख्य सचिव, विकास आयुक्त, नियोजन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील १४ सदस्यांची समिती असेल. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती असेल. त्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी १२ सरकारी सदस्य, दोन विशेष निमंत्रित आणि जिल्हा सांखिकी अधिकारी सदस्य सचिव असतील. जिल्हा समितीतर्फे गणनेवेळी निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवणे, स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करणे, गणना पूर्ण झाल्यानंतर जिल्हा स्तरावर अहवाल मंजूर करून प्रसारित करण्यात येणार आहे. गणनेविषयी सध्या प्रशासकीय पातळीवर प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. प्रत्यक्षात कधीपासून गणना होणार, यासंबंधी मार्गदर्शन सूचना अद्याप आलेल्या नाहीत. त्या आल्यानंतर प्रगणकांची निवड करून गणनेच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

गणना होणारे प्रमुख घटक

शिधापत्रिकाधारक, स्वस्त धान्य दुकानदार, वर्षाला संकलित होणार महसूल, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न व खर्च, जिल्हा परिषदेचे उत्पन्न-खर्च, तालुकानिहाय बँका, सहकारी संस्था, आयुर्विमाविषयक आकडेवारी, जलसंपदा लाभक्षेत्र, उद्योग, रोजगार, स्वयंरोजगार, कामगार, पणन संस्था, वस्त्रोद्योग, दळणवळण सुविधा, रस्ते, शाळा, महाविद्यालयांची संख्या, पशूगणना, जनगणना, पर्यटन, रोजगारासंबंधीचे वास्तव, विकासासंबंधीचे चित्र, कुटुंबांचे आर्थिक स्तर, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठ्यासाठीच्या योजनांची संख्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images