Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘वारी लालपरीची’प्रदर्शनाला प्रतिसाद

$
0
0

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळातर्फे मध्यवर्ती बसस्थानकावर आयोजित 'वारी लालपरीची' प्रदर्शनाला प्रवाशांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दोन चित्ररथांच्या माध्यमातून एसटीची विविध रुपे, कालानुरूप झालेल्या बदलांची मांडणी प्रदर्शनातून करण्यात आली. एसटीचे विभागीय नियंत्रक रोहन पलंगे आणि ज्येष्ठ प्रवासी दत्तात्रय आणि मंगला खोडके (रा. अंबाई टँक, कोल्हापूर) या दाम्पत्म्च्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेनुसार चित्ररथाच्या माध्यमातून 'वारी लालपरी' प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दोन बसमध्ये चित्ररथ आहेत. लाल साधी गाडी, लालपरी ते शिवशाही बसची मॉडेल्स प्रदर्शनात आहेत. एसटीमधील अंर्तगत बांधणी, विविध मार्गांवरील त्यांचा प्रवास, एसटीकडून दिल्या जात असलेल्या सेवांची माहिती देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत एसटीमध्ये झालेले बदल यातून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. हे अनोखे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. दरम्यान, मंगळवारी (ता. २५) गडहिंग्लज बसस्थानक, बुधवारी इचलकरंजी बसस्थानक, गुरुवारी सांगली बसस्थानक, शुक्रवारी मिरज बसस्थानक, शनिवारी विटा बसस्थानक येथे प्रदर्शन होणार आहे.

(मूळ कॉपी)

कोल्हापूर : सरकारच्या परिवहन विभागातर्फे येथील मध्यवर्ती बसस्थानकावर 'वारी लालपरीची' प्रदर्शन झाले. प्रदर्शनात दोन चित्ररथाव्दारे एसटीची विविध रूपे, कालानुरूप झालेल्या बदलांचा उलगडा करण्यात आला. विभागीय नियंत्रक रोहन पलंगे आणि ज्येष्ठ प्रवासी दत्तात्रय खोडके, मंगला (रा. अंबाई टँक, कोल्हापूर) या दांपत्याहस्ते उदघाटन झाले.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतील 'वारी लालपरी'चे प्रदर्शन चित्ररथाव्दारे दाखवले आले. चित्ररथासाठी दोन बसचा वापर करण्यात आला. उदघाटनानंतर प्रवाशांना प्रदर्शन पाहण्यासाठी खुले करण्यात आले. लाल साधी गाडी, लालपरी ते शिवशाही बसच्या विविध प्रकारच्या मॉडेलची प्रतिकृती दाखवण्यात आली. एसटीमधील अर्तंगत बांधणी, विविध मार्गावरील त्यांचा प्रवास, दिल्या जात असलेल्या सेवांची माहिती देण्यात आली. चित्ररथातील एसटीमध्ये एका बाजूने जाऊन प्रदर्शन पाहत दुसऱ्या बाजूच्या प्रवेशव्दाराने बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली. पाच वर्षात एसटीमध्ये झालेले बदल यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारचे अनोखे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती.

---------

प्रदर्शन येथेही : मंगळवार (दि.२५) : गडहिंग्लज बसस्थानक, बुधवार : इचलकरंजी, गुरूवार : सांगली, शुक्रवार : मिरज, शनिवार : विटा

-------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठीच्या संवर्धनासाठी घुमला आवाज

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा व महाराष्ट्रात मराठीचा सन्मान जपला जावा यासाठी तिचे संवर्धन व्हावे अशी मागणी करत ऐतिहासिक बिंदू चौक येथे सोमवारी सकाळी सामूहिक शपथ घेत आवाज घुमला. शिवसेनेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी दहा वाजता बिंदू चौक येथे संजीवन स्कूल, प्रायव्हेट हायस्कूल विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची रॅली आली. त्यांच्या हातात मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी फलक होते. शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शरद सामंत, सुजीत चव्हाण यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून मराठी संवर्धन मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. शिवशाहीर राजू राऊत यांच्या नेतृत्वाखाली, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मराठीची महती सांगणारी शपथ घेण्यात आली. यामध्ये 'माझी मातृभाषा मराठीचा सन्मान, प्रचार, प्रसार व्हावा. ही भाषा जागतिकस्तरावर सन्मानाने पोहोचावी यासाठी मी शपथबद्ध आहे' अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या. मी रोजच्या व्यवहारातील संवाद मराठी भाषेतूनच करेन, परभाषेच्या आक्रमणापासून मराठीला वाचवण्यासाठी माझे प्राधान्य असेल. मराठी भाषेतील वाचन, मनोरंजनाला मी पसंती देईन. पुढील पिढीला मराठी भाषेचा गोडवा पटवून देईन अशी सामुदायिक शपथ घेण्यात आली.

यावेळी शरद सामंत म्हणाले, 'मराठीला अभिजात दर्जा मिळावा अशी तिची परंपरा आहे. मराठी संवर्धन ही चळवळ बनली पाहिजे. एकूण ५२ बोली भाषांसह समृद्ध असलेल्या मराठीचे आस्तित्व इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे धोक्यात आले आहे. मराठीला जगवायचे असेल तर प्रत्येकाने या चळवळीत सहभाग घेतला पाहिजे.'

यावेळी डॉ. अरूण शिंदे, शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, शुभांगी पोवार, दिपाली शिंदे, सुनीता हनिवाळकर, उमेश बुधले, मंजित माने, राजू जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळसकरची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकरला कोल्हापूर आणि बेळगावमधील दोघांनी मदत केली होती, अशी माहिती चौकशीत पुढे आली आहे. या दोघांचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून गुप्तता पाळली जात आहे. दरम्यान, कळसकरला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. राऊळ यांनी दिला. कोल्हापूर पोलिसांनी त्याची रवानगी मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात केली आहे.

पानसरे हत्येतील नववा संशयित कळसकर याला कोल्हापूर एसआयटीने ताब्यात घेतले होते. त्याला कोर्टापुढे हजर केला असता १४ दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. या कालावधीत पथकाने त्याची तपासाच्यादृष्टीने चौकशी केली. कळसकर याचे वास्तव्य पानसरे हत्येपूर्वी उद्यमनगर परिसरात होते. तो कुठे रहात होता, कोणत्या ठिकाणी काम करत होता याबाबत पोलिसांनी माहिती घेतली. कळसकरला स्थानिकांनी मदत केली आहे का, याचाही तपास करण्यात आला. कळसरकने तपासात बेळगाव व कोल्हापूरमधील दोन व्यक्तींनी मदत केल्याची माहिती दिली आहे. त्या दोघांची नावे माहीत नसल्याचे त्याने सांगितले आहे. पण त्यांचे वर्णन त्याने पोलिसांना सांगितले आहे. सरकारी वकिलांनी याबाबत कोर्टाला माहिती दिली आहे. कळसकरने सांगितलेल्या वर्णनाची व्यक्ती शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. कळसकरने सांगितलेल्या व्यक्ती कोणत्या संघटनेत काम करत होत्या, याचीही माहिती घेतली जात आहे.

पानसरे हत्येत वापरलेल्या पिस्तुलाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कळसकर याच्याकडे होती. संशयित भारत उर्फ भरत जयवंत कुरणे (रा. महाद्वार रोड, बेळगाव), सागर लाखे यांची बेळगाव येथील बसस्थानकात बैठक झाली होती. पिस्तुलाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याची जबाबदारी कळसकरकडे होती. पोलिसांनी तपास करताना कळसकरला बेळगाव, कोल्हापुरात फिरवले होते. तपासाच्या काळात तो राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत होता.

दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी कळसकरला कोर्टात हजर करण्यात आले. त्याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी कळसकरची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात केली.

...

एसआयटीकडून गुप्तता

कळसकर याच्याकडे चौकशी केली असता आणखी दोन साथीदार असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याने सांगितलेल्या वर्णनानुसार कोल्हापूर आणि बेळगावमध्ये पोलिस तपास करत आहेत. गौरी लंकेश हत्येच्यावेळीही त्याचे बेंगळुरूमध्ये वास्तव्य होते, अशी माहिती पुढे आली आहे. कोल्हापुरातील साथीदाराचा तपास करताना एसआयटीकडून गुप्तता पाळली जात आहे. तपासाचा अहवाल कोल्हापूर एसआयटीकडून बंद लिफाफ्यातून हायकोर्टाला सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लाटकरांना विरोध का?’

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या नूतन महापौरपदासाठी इच्छुक नगरसेवका अॅड. सूरमंजिरी लाटकर यांना भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी दर्शविलेला विरोध कितपत योग्य आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस किसन कल्याणकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे. पत्रकात म्हटले आहे, 'लोकसभा निवडणुकीत भाजप, ताराराणीच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा प्रचार केला. त्याच पक्षाच्या नगरसेविका असलेल्या लाटकर यांच्या उमेदवारीला महापौरपदाच्या निवडणुकीत विरोध का? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू लाटकर हे नगरसेवक असताना त्यांनी विविध माध्यमातून शहर विकासासाठी प्रयत्न केले. त्यांच्याबद्दल भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांत काही मतभेद असतील. पण शहर विकासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना नाकारु नये अशी अपेक्षा आहे. गल्लीबोळातील राजकारण महापालिकेत न आणता खऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला विकासकामाची संधी द्यावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लूटप्रकरणी आणखी तिघे संशयित ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार पळवून रोख रक्कम आणि दागिने लुटणाऱ्या गुन्ह्यातील आणखी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मोठी रक्कमही त्यांच्याकडून हस्तगत केली आहे. पोलिसांनी यापूर्वी या गुन्ह्यात पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

येथील लक्ष्मी गोल्ड बुलियन कंपनी सोने चांदी दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय करते. या कंपनीचा वाहनचालक व दोन सहकारी १४ जून रोजी कोल्हापुरात येत असताना राजेंद्रनगर येथे मोटारीसह लुटारुंनी कर्मचाऱ्यांना पळवून नेले. बांबवडे आणि आंबा येथे चालक व कर्मचाऱ्यांना मारहाण करुन लुटारुंनी मोटारीत असलेले रोख ५२ लाख रुपये, दोन किलो सोने असा सुमारे एक कोटी १८ लाख रुपयांचा माल लुटला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या गुन्हाचा छडा लावताना लक्ष्मण पवार (वय २६, रा. खटकेवस्ती लिंगीवरे, ता. आटपाडी, जि. सांगली), गुंडाप्पा तानाजी नंदीवाले (२६, रा. तमदलगे, ता. हातकणंगले), अविनाश बजरंग मोटे (२६), अक्षय लक्ष्मण मोहिते (२६), इंद्रजीत बापू देसाई (२४, रा. तिघे हातकणंगले) या पाच संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख ३२ लाख रुपये व एक किलो सोने जप्त केले. पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता आणखी तीनजणांची नावे उघड झाली आहेत. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठी रक्कम हस्तगत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅकॅडमींची दुकानदारी जोरात

$
0
0

मालिका लोगो ... शिक्षणातील 'दुकानदारी'

भाग १

सध्या कोल्हापूर शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील काही मोठ्या गावात 'अॅकॅडमी' नावाची नवी दुकानदारी सुरू झाली आहे. पालकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत या अॅकॅडमींनी लुटालूट सुरू केली आहे. कॉलेज आणि या नव्या 'दुकानदारां'नी मिळून सध्या शिक्षणक्षेत्रात जी दुकानदारी सुरू केली आहे, ती अतिशय भयावह आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकारावर 'महाराष्ट्र टाइम्स' ने टाकलेला हा प्रकाशझोत.

......

Gurubal.Mali@timesgroup.com

@gurubalmaliMT

कोल्हापूर

सीईटी, जेईई, नीट, नाटा, आयआयटी, जेईई टू सह सर्व प्रवेश परीक्षेत यश मिळवायचे असेल तर 'अॅकॅडमी' ला प्रवेश घेतल्याशिवाय पर्याय नाही, अशी मानसिकता रूजवून सध्या कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात नवी शैक्षणिक दुकानदारी सुरू झाली आहे. गल्लीबोळात अशा अॅकॅडमींचे पेवच फुटले आहे. दोन लाखांपेक्षा अधिक फी घेणाऱ्या या दुकानदारांनी मार्केटिंगचे नवनवे फंडे वापरल्याने सर्वसामान्य पालकही त्याला बळी पडत आहेत. यामुळे मात्र कॉलेज रिकामे आणि अॅकॅडमी हाऊसफुल्ल असे चित्र दिसत आहे.

शहरात आणि जिल्ह्यात शंभरावर कॉलेज आहेत. त्यामध्ये कला, वाणिज्य अभ्यासक्रमाची सोय असली तरी विज्ञान शाखेची सोय असलेल्या कॉलेजची संख्या कमी आहे. बहुसंख्य कॉलेज अनुदानित आहेत. त्यामुळे अकरावी व बारावीचे शिक्षण केवळ एक ते दोन हजारात पूर्ण करता येते. विनाअनुदानितच्या नावाखाली मध्यंतरी बरीच कॉलेज मनमानी फी आकारत होते. पण त्याला सरकारने निर्बंध घातले. प्रत्येक शाखेनुसार फी ठरवून दिली. त्यानुसार अकरावी व बारावी सायन्ससाठी पंधरा हजारापर्यंत फी आकारली जाते. म्हणजे विनाअनुदानित तुकडीला प्रवेश मिळाला तर पंधरा हजारात विद्यार्थी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकतो. एकही मुलगा प्रवेशापासून वंचित राहू नये, याची काळजी सरकार घेत असते. यामुळे नामांकित नसले तरी इतर कॉलेजला विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळतो.

अकरावीला कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर क्लास आवश्यकच आहे, अशी पालक आणि विद्यार्थ्यांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे अकरावी व बारावी सायन्सला शिकणारा आणि क्लासला न जाणारा विद्यार्थी दुर्मिळच. प्रत्येक विषयाला पाच ते वीस हजार रूपयांपर्यंत फी मोजून सर्वसामान्य पालकही या मुलांना क्लासला पाठवतात. कॉलेजमध्ये जे प्राध्यापक आहेत, तेच बाहेर क्लास घेतात. शिवाय खासगी क्लासचालकांची संख्याही वाढली आहे. शहरातील गल्लीबोळात कोचिंग क्लासचे फलक झळकत आहेत. या क्लासच्या पाठोपाठ आता अॅकॅडमी नावाने सर्वत्र मोठी दुकानदारी सुरू झाली आहे. कॉलेजची फी हजार रूपये, क्लासची साधारणत: तीस ते चाळीस हजार तर या अॅकॅडमीची फी तब्बल दोन ते चार लाखापर्यंत आहे. एवढी मोठी रक्कम भरून तेथे प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे.

सीईटी, जेईई,नाटा, आयआयटी, नीटसह सर्व प्रवेश परीक्षेला सामोरे जायचे असेल तर अॅकॅडमीशिवाय पर्यायच नाही अशी मानसिकता पालकांची झाली आहे. यामुळे ऐपत आणि आर्थिक क्षमता नसतानाही पालक या अॅकॅडमींच्या प्रेमात पडल्यासारखे मुलांचे प्रवेश घेत आहेत. मुलांची संख्या वाढवण्यासाठी नवेनवे मार्केटिंग फंडे वापरत या संस्थांची दुकानदारी वाढली आहे. यामुळे कॉलेजमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याने पटावर कॉलेजच्या आणि हजेरी अॅकॅडमीत अशी अवस्था झाली आहे. यामुळे कॉलेज रिकामे आणि अॅकॅडमी हाऊसफुल्ल असे चित्र सध्या शहरातच नव्हे तर जिल्ह्यातही दिसत आहे.

क्रमश:

......

चौकट

शहरातील कॉलेजची फी

अनुदानित .... विनाअनुदानित

विवेकानंद ५८० १४५४०

कमला ११५० १५०००

महावीर १४२२०

न्यू कॉलेज २००० १५०००

जीकेजी कॉलेज १४०० १४०००

शाहू कॉलेज १५०० १५०००

राजाराम कॉलेज १२८०

......

अॅकॅडमींची फी

आकाश इस्ट्यिट्यूट २ लाख ३५,०००

श्रध्दा अकॅडॅमी १ लाख ४४,०००

महेश ट्युट्योरियल्स २ लाख २५०००

यशवंत अॅकॅडमी ९००००

केसीपी १ लाख ६००००

संजय घोडावत अॅकॅडमी २ लाख १४ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिल रायडर्सतर्फे जुलैमध्ये पन्हाळगड-पावनखिंड मोहिम

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शाळा व महाविद्यालयीन युवक, युवतींना गडकिल्ल्यांची व इतिहासाची ओळख व्हावी म्हणून हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशतर्फे जुलै महिन्यात 'पन्हाळगड ते पावनखिंड' या राज्यस्तरीय पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले आहे. सहा ते सात जुलै, २० ते २१ आणि २७ ते २८ जुलै अशा तीन मोहिमा होणार असल्याची माहिती संवेदना सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे व हिल रायडर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या मोहिमेचे सह संयोजक संवेदना सोशल फाऊंडेशन आहे.

प्रमोद पाटील म्हणाले, 'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाची मोहिम आखली आहे. पन्हाळगड येथील बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोहिमेला सुरुवात होईल. पहिल्या दिवशीचा मुक्काम अंबवडे येथील चंद्रमौळी वाडीत आहे. दुसऱ्यादिवशी पांढरेपाणीतर्फे पावनखिंडीकडे प्रयाण होईल. विद्यार्थ्यांसाठी मोहिमेचे शुल्क २०० तर इतर सर्वांसाठी ३०० रुपये इतका आहे. या शुल्कामध्ये नाष्टा, चहा व जेवण खर्च समाविष्ठ आहे. इच्छुकांनी शिवस्वरुप खरी कॉर्नर, सुपर सोनिक बेट सायबर रोड आणि समिर अॅडव्हेंचर्स पर्ल हॉटेल शेजारी नाव नोंदणी करावी.'

चिकोडे म्हणाले, 'विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख करुन देण्यासाठी मोहिम अतिशय उपयुक्त आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा. मर्दानी खेळ, शाहिरी पोवाडा, ऐतिहासिक प्रसंगावर व्याख्यान यामुळे मोहिमेच्या माध्यमातून इतिहासकालीन प्रसंगांना उजाळा मिळणार आहे. '

अंबवडे येथे वीस शौचालय मंजूर

हिल रायडर्सचे पाटील म्हणाले, 'पालकमंत्री पाटील व आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून अंबवडे येथे वीस शौचालय बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. दहा महिलासाठी व दहा पुरुषासाठी असतील. यामुळे पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे. पदभ्रमंतीच्या वाटेतील वाड्या वस्तीवरील मुलामुलींना शालेय साहित्य वाटप, रेनकोट, टिफीन या वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे. फाऊंडेशनने वाड्यावस्त्यांवरील लोकांना वैद्यकीय सेवा देत दुर्गम भागातील १४ मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर शहर, जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

$
0
0

सोलापूर शहर, जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर शहर आणि पंढरपूर, सांगोला, मोहोळ आणि मंगळवेढ्याच्या काही भागात रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास दमदार पाऊस झाला. सकाळपर्यंत पाऊस सुरू होता. रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस जवळपास दोन तास मुसळधार कोसळला. पहाटेपर्यंत रिमझिम कोसळला. हवामान विभागाच्या नोदींनुसार ५३.५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पहिल्याच मोठ्या पावसाने महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी थांबल्याने ठिकठिकाणी तळी निर्माण झाली होती. पाण्याचा निचरा होण्यास जास्तीचा वेळ गेल्याने नागरिक व वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. विजापूर रोडवरील विनय हौसिंग सोसायटी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे टाटा इंडिगो वाहनावर झाड पडल्याने रस्ता बंद झाला होता. शिवाय स्मार्ट सिटीच्या कामामुळे खोदण्यात आलेली माती रस्त्यावर येऊन दलदल निर्माण झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. सोलापूर शहरातील जुना कारंबा नाका येथील ओढ्याच्या कामामुळे नागरिकांना शेजारच्या रस्त्याचा आधार घेताना जीव धोक्यात घालावा लागल्याचे दिसून आले.

पंढरपुरात संततधार

पंढरपूर शहर आणि आसपासच्या गावातून सोमवारी पहाटे पाचनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. पाच वाजल्यानंतर पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. सकाळी सात वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतामध्ये पाणी साठले होते, तर पंढरपूर शहरातील गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी अनेक भागात रस्त्यावर वाहिल्याचे दिसून आले.

गेल्या महिनाभर तालुक्यातील शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनचे आगमन लांबले होते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. त्यामुळे उशिरा का असेना मान्सूनचे आगमन तालुक्यात झाल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसाचा जोर असाच राहावा, आशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पाणीटंचाईला दिलासा

मोहोळ तालुक्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांमध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वळीव पावसाने पाठ फिरवल्यानंतर मान्सूननेही सक्रिय होण्यास बराच अवधी घेतला. त्यामुळे बळीराजासह सर्वच चिंतेत होते, पण रविवार रात्रीपासून मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांची चिंता काहीशी दूर झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कराड तालुक्याच्या वानरवाडी गावाच्या शिवारात

$
0
0

कराड तालुक्याच्या वानरवाडी गावाच्या शिवारात पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांची भेट भेट घेऊन चर्चा केली. या वेळी त्यांनी कोळपणीचा आनंद घेतला.

राम जगताप

...........

कराडमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड आणि परिसरामध्ये रविवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला होता. सोमवारी दुपारी पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. परिसरातील शेतकऱ्यांनी नुकत्याच केलेल्या पेरण्या, टोकणीसाठी या पावसाचा चांगला उपयोग होणार आहे. सोमवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. कराड परिसरात आता पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. कराड शहरामध्ये मात्र पादचारी व दुचाकीस्वारांची सलग दोन दिवस आलेल्या पावसामुळे चांगलीच भंबेरी उडाली. दुपारच्या वेळेतच पावसाने हजेरी लावल्याने मुख्य बाजारपेठेतील व्यापारी, व्यावसायिकांसह फळ व पालेभाज्या विक्रेत्यांची त्रेधातिरपिट उडाली. शाळा, महाविद्यालयांच्यात प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पावसात भिजत घर गाठावे लागले. शहरातील रस्ते पावसामुळे चिखलमय झाले होते, डबक्यांत पाणी साठल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत होती.

दरम्यान, परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मेहनतीची कामे अपूर्ण राहिल्याने या पावसाचा कुळवणी व पेरणीसाठीच्या कामांसाठी मोठा उपयोग होणार आहे. ज्यांची मेहनतीची कामे पूर्ण आहेत त्यांना शेतामधील पेरणी, टोकणीसाठी या पावसाचा चांगला उपयोग होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

............

एसटी-टेम्पोच्या धडकेत तीन जखमी

कराड :

एसटी बसने-आयशर टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी चारच्या सुमारास पुणे-बेंगळूरू महामार्गावरती मलकापूर येथील डी-मार्ट समोर हा अपघात घडला. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने महामार्गावरतीच अडकून पडल्याने एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. आयशर चालक रवींद्र प्रताप सिंह (वय ३४, रा. पुणे), एसटीमधील महिला प्रवाशी वनिता प्रकाश शेळके (वय ४७, रा. विरार, ठाणे) व रुपाली विकास परीट (वय २५, रा. तुजारपूर, ता. वाळवा) अशी जखमींची नावे आहेत. रविवारी सायंकाळी उशीरा या बाबतची नोंद येथील शहर पोलिसांत करण्यात आली.

अर्नाळा डेपोची अर्नाळा-कोल्हापूर गाडी (एम-एच-१४ बी. टी २२६१) कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. त्याच दिशेने जाणाऱ्या अन्य एका ट्रकने एसटीला चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केला. त्यामुळे एसटी बस चालकाचा ताबा सुटून बस महामार्गावरील लोखंडी दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला जाऊन कोल्हापूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोला (एम -एच ४ ई- एम ८७११) धडक दिली.

.......

पृथ्वीराज चव्हाणांची

शिवारफेरी अन् कोळपणी

म. टा. वृत्तसेवा, कराड

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील वांग खोऱ्याचा दौरा केला. त्यांच्या विशेष प्रयत्नातून पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे, त्या कामाचे भूमीपूजन चव्हाण यांच्या हस्ते झाले. परिसरातील शेतामध्ये खरिपातील भात, भुईमूग व ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. एका शेतात वयोवृद्ध शिवाजी ज्ञानू तोडकर भात पिकात कोळपणी करीत होते. तेथे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव चव्हाण यांनी कोळपे चालवले.

........

तुंबळ हाणामारीत पाच जखमी

कराड :

शेरे (ता. कराड) येथील यादव मळा येथे दोन कुटुंबात शेतजमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून, दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी नऊ जणांवर रविवारी सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा एक कोटी वृक्षलागवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वन विभाग, सामाजिक वनिकरणसह विविध सरकारी विभागातर्फे चालू पावसाळ्यात एक कोटी १३ लाख २२ हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. एक कोटी, १४ लाख, ४२ हजार खड्डे तयार आहेत. एक जुलैपासून लागवडीस प्रारंभ होईल, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेट बेन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गंत जिल्ह्यात लोकसहभागातून २०१६ मध्ये दोन कोटी, २०१७ मध्ये चार कोटी, २०१८ मध्ये १३ कोटी झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यापैकी ८० ते ८४ टक्के झाडे जगली आहेत. पाणी नसल्याने न जगलेल्या ठिकाणी दुसऱ्या रोपांची लागवड केली आहे. यंदा वन प्रशासन, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायत, इतर विभागातर्फे एक कोटी १४ लाख ४२ हजार रोपांची लागवड करण्यात येईल. वन आणि सामाजिक वनिकरणतर्फे जुलैपर्यंत तर इतर विभाग ऑगस्टअखेरपर्यंत रोप लागवड करतील. वन प्रशासनाकडून नऊ महिन्यांची वाढलेली रोपे मोफत उपलब्ध करून दिले जातील.

लागवड केलेल्या रोपांच्या संख्येची माहिती www.mahaforest.nic.in या वेबसाइटरवर फोटो आणि व्हिडिओसह ३० सप्टेंबरपर्यंत अपलोड करण्याची मुदत आहे. याशिवाय वैयक्तिक लाभार्थीनाही झाडे देण्यात येतील. जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माच्या स्वागतप्रसंगी २२ हजार, ६१० जणांना 'जन्म वृक्ष' नावाने, विवाह झालेल्या कुटुंबात वूध, वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी ७ हजार ४२९ कुटुंबांना 'शुभमंगल' नावाने, दहावी, बारावी उत्तीर्ण होणे, नोकरी लागणे, निवडणुकीत विजयी उमेदवारांना आनंदासाठी 'आनंद वृक्ष' नावाने ११ हजार ७७० जणांना, निधन झालेच्या व्यक्तीच्या नावे रोप लागवडीसाठी २९ हजार ४३९ जणांना 'स्मृती वृक्ष' नावाने, माहेरच्या आठवणीसाठी सहा हजार ५१० जणांना 'माहेरची झाडी' नावाने रोपांचे वाटप करण्यात येईल. मुलगी जन्माला आलेल्या नऊ हजार ७७५ कुटुंबांना विनामूल्य पाच साग, दोन आंबा, फणस, जांभूळ, चिंचेची प्रत्येकी एक असे एकूण १० रोप देण्यात येतील. यासाठी संबंधित कुटुबांकडून अर्ज भरून घेतले आहेत.

पालकमंत्री पाटील यांच्या

हस्ते उदघाटन

हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते एक जुलैला सकाळी ९ वाजता रोप लागवडीने वृक्षारोपन कार्यक्रमाची शुभारंभ होईल. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे, असे बेन यांनी सांगितले.

रोपांच्या संवर्धनप्रश्नी सारवासारव

तीन वर्षांत लावलेल्या रोपांतील किती झाडे जगली, त्याची प्रत्येक रोपनिहाय माहिती घेतली आहे का, वास्तव परिस्थिती काय यासंबंधीच्या प्रश्नांना उत्तर देताना बेन, जिल्हा उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ, जिल्हा सामाजिक वनीकरण अधिकारी दीपक खाडे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. रोपांच्या संवर्धनाकडे दूर्लक्ष होत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिंग, रामदास पाटील यांना शाहू गौरव पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानतर्फे राजर्षी शाहू जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानतर्फे शाहू जयंतीदिनी बुधवारी (ता. २६) शहरातून मिरवणूक, शाहू विचारकार्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना 'शाहू गौरव पुरस्कार' वितरण करण्यात येत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाबा महाडिक व उपाध्यक्ष हिंदुराव हुजरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाडिक म्हणाले, 'प्रतिष्ठानतर्फे मानसिंग पाटील व रामदास पाटील यांना 'शाहू गौरव पुरस्कार'जाहीर झाला आहे. मानचिन्ह, ग्रंथ भेट, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मिरवणुकीत शहरातील ८५ तालमी, शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बोर्डिंगचे पदाधिकारी, विद्यार्थी सहभागी असतील. मिरवणुकीत दहा सजविलेल्या बैलगाड्या, दहा घोडी, कोगील गावजे, ५० मुलींचे लेझीम पथक, लाठीकाठी, १०० कलाकारांचे ढोल ताशा पथक हे आकर्षण असेल.

शाहूभक्त गंगाराम कांबळे यांच्या सत्यसुधारक हॉटेलचा सेट मिरवणुकीत असेल. एका वाहनावर हा सेट असणार आहे. सजीव देखाव्यात गंगाराम कांबळे यांचे नातू प्रफुल्ल राजाराम कांबळे हे हॉटेलमध्ये मालक म्हणून दिसणार आहेत. उभा मारुती चौक येथून दुपारी चार वाजता मिरवणुकीला प्रारंभ होईल. तत्पुर्वी पुरस्कार वितरण सोहळा होईल.'

पुरस्कारप्राप्त मानसिंग पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार कार्यावर आधारित २५०० पुस्तकांचे वाटप केले आहे. प्रा. नानासाहेब साळुंखे लिखित 'शाहूंच्या आठवणी'ग्रंथांचे प्रकाशन केले. श्रीराम पचिंद्रे लिखित 'शाहू' कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला.

रामदास पाटील हे येथील श्री शाहू वैदिक विद्यालय येथे पुरोहिताचे काम पाहतात. वैदिक विधी, सत्यशोधक विधी, शिवधर्म विधी या माध्यमातून समाजात प्रबोधनाचे काम केले. विधीच्या वेळी रोपांची लागवड, लोकांना पाणी व धान्य बचतीच्या संकल्पाविषयी प्रोत्साहित करतात.

पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मदन पाटील, डॉ. संदीप पाटील, खजानिस अॅड. बाबा इंदूलकर, सदस्य उज्ज्वल नागेशकर, आदिल फरास, राजू सावंत, फुलेवाडी तालीम मंडळाचे अध्यक्ष नागोजीराव पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील उपनगरात घरफोडी करणारी टोळी करवीर पोलिसांनी जेरबंद केली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यामध्ये एक विधिसंघर्षग्रस्त बालक असून त्याला ताब्यात घेतले आहे. त्यांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली असून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दत्तात्रय भिकाजी पाटील (वय २८, रा. कात्यायनी रोड, कळंबा), दीपक लोकनाथ सिंह ( १९, रा. साळोखेनगर, कळंबा), पवन रमेश पडळकर ( २०, रा. कळंबा, ता. करवीर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, गॅस सिलिंडर, एक मूर्ती असा एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी माहिती देताना सांगितले, ' एप्रिल, मे महिन्यात सुटीच्या काळात चोरट्यांनी कळंबा, साने गुरुजी वसाहत, आर.के.नगर परिसरातील बंद घरे फोडून मोठ्या प्रमाणात लूट केली होती. उपनगरात एकाच ठिकाणी चार ठिकाणी चोरी झाल्याने खळबळ माजली होती. करवीर पोलिसांनी उपनगरात तपास सुरू केला असता हवालदार प्रशांत माने यांना, कळंबा गावच्या परिसरातील चौघे तरुण रात्रीच्या वेळी संशयितरीत्या फिरत असतात, अशी माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार चौघांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता, त्यांनी घरफोड्यांची कबुली दिली. त्यांच्या टोळीत अन्य व्यक्तींचा समावेश आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारावरही नजर ठेवली जात आहे.'

.........

चैनीसाठी चोऱ्या

अटक केलेल्या संशयितांनी चैनीसाठी चोऱ्या करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. विधिसंघर्षग्रस्त बालकच या टोळीचा सूत्रधार आहे. त्याच्या सल्ल्यानुसारच चौघेजण मिळून चोऱ्या करत होते. कात्यायनी मार्ग परिसरात तो राहत असून त्याचे आई वडील शेती करतात. अटक केलेल्या संशयितांच्या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखेार पोलिस निलंबित

$
0
0

कोल्हापूर

दीड हजार रुपयांची लाच घेणारा पन्हाळा पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश बापूसाहेब खुटावळे (वय ५३, रा. फुलेवाडी) याला पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी निलंबित केले. २१ जून रोजी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून खुटावळेला अटक केली होती. अदखलपात्र गुन्हा दखलपात्र करण्यासाठी खुटावळे याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिद्रे हत्येतील आरोपींवर आणखी आठ कलमे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी आरोपपत्रात आणखी आठ कलमांचा समावेश केल्याने संशयित आरोपींवरील गुन्ह्याचा चाप आवळला गेला आहे. सोमवारी अलिबाग कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तीवादामुळे त्यांनी सुचवलेल्या आठ कलमांचा समावेश आरोपपत्रात करण्यात आला.

बिद्रे हत्या प्रकरणाची अलिबाग न्यायालयात न्यायमूर्ती आर. जी. मलशेट्टी यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली आहे. सोमवारी विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांनी वाढीव कलमासंदर्भात युक्तिवाद केला. त्यांनी सुचवल्यामुळे १२० ब, २०१, ३६४, ४६५, ४६८, ४७१, ४१७, २१८ अशी आठ कलमे वाढवण्यात आली आहेत. या कलमांमुळे संशयित आरोपी अभय कुरुंदकर, त्याचा मित्र राजेश पाटील, फळणीकर, भंडारी अशा चौघांनी संघटित होऊन कट रचणे, खोटे पुरावे तयार करणे, पोलिसांची दिशाभूल करून तपासात अडथळे निर्माण करणे, आदी आरोप लागले आहेत.

अभय कुरुंदकरने जामीन अर्ज सादर केला होता. मात्र त्याच्यावर आरोप निश्चिती झाल्यामुळे जामीन मिळण्यात अडचणी येणार आहेत. कुरुंदकरचे वरिष्ठ वकील कोर्टात हजर नव्हते, त्यामुळे जामीन अर्जावरील सुनावणी चार जुलै रोजी ठेवली आहे. यावेळी न्यायालयात अभय कुरुंदकरसह खुनातील सर्व आरोपी हजर होते.

...

वाढीव कलमांचा फायदा

वाढीव कलमांचा फायदा खटल्यात होणार आहे, अशी प्रतिक्रिया अश्विनी यांचे पती राजकुमार गोरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'नवी मुंबई पोलिसांनी १२० ब हे कलम व इतर महत्त्वाची कलमे लावली नव्हती. याचा फायदा आरोपींना होण्याची दाट शक्यता होती; मात्र सोमवारी ८ कलमे वाढवल्यामुळे याचा फायदा आम्हाला होणार आहे. या निर्णयामुळे आम्ही समाधानी आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवालदारासह पंटर लाच घेताना जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिल्ली येथे तपास करण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी २५ हजार रुपये लाच घेणाऱ्या लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचा हेड कॉन्स्टेबल अजिज रमजान शेख (वय ५२) आणि त्याचा पंटर दाऊद बाबालाल पाटणकर (४५, रा चांदणी चौक, रविवार पेठ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी कारवाईची माहिती दिली. गुन्ह्यातील तक्रारदार सेवानिवत्त बँक कर्मचाऱी आहे. तक्रारदाराने जाहिरात बघून दिल्ली येथील सौभाग्य फायनान्स कंपनीकडे आठ कोटी रुपये कर्जासाठी ऑनलाइनद्वारे मागणी केली होती. कर्ज देण्यासाठी कंपनीने वेळोवेळी पैशाची मागणी केली, असता तक्रारदाराने आरटीजीएसद्वारे २२ लाख ३७ हजार ९०० रुपये कंपनीच्या खात्यावर जमा केले. पण नंतर कंपनीने गाशा गुंडाळवल्यावर फसवणूक झाल्याचे संबंधिताच्या लक्षात आले. त्यांनी याबाबतची लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा २०१८ मध्ये नोंदवला होता. या गुन्ह्याचा तपास लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील करत होते.

दिल्लीतून संशयितांना आणण्यासाठी उपनिरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक जाणार होते. या पथकात हेड कॉन्स्टेबल देसाई याचाही सहभाग होता. दिल्लीला जाण्यासाठी तक्रारदाराकडे शेख यांनी खर्चासाठी २५ हजाराची मागणी केली. पद्मा चौकातील चहा विक्रेता आणि शेख यांचा पटंर दाऊद पाटणकरने लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास निरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या पथकाने सापळा लावला. तक्रारदाराने पद्मा चौकात दाऊद याच्याकडे लाचेची २५ हजाराची रक्कम दिली. यावेळी पथकाने दाऊदला ताब्यात घेतले. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात जाऊन अजिज शेख याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. शेख व पाटणकर यांच्या घराची झडतीही घेण्यात आली. रात्री उशिरा दोघांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे श्याम बुचडे, मोहन सौंदत्ती, शैलेश पोरे, मयूर देसाई, रुपेश माने यांनी कारवाईत भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यापारी संकुलावर ठेकेदाराचा कर्जाचा बोजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्या जेम्सस्टोन व्यापारी संकुलाची मालमत्ता दाखवून जयहिंद कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड, डिव्हीजन ऑफ भारत उद्योगच्या श्रीचंद कुकरेजा यांनी वैश्य बँक राजारामपुरी शाखेचे तब्बल ६५ कोटी तर संकुलाच्या सार्वजिनक पार्किंगच्या जागेवर आठ कोटी अशा ७३ कोटींच्या कर्जाची उचल केली आहे. कर्जाची उचल करताना सहायक आयुक्त संतोष जिरगे व तत्कालीन इस्टेट ऑफिसर राम काटकर यांनी संमतीपत्र दिले असून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार केला आहे,' असा आरोप उपमहापौर भूपाल शेटे यांनी पत्रकार बैठकीत केला. तसेच सर्वांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.

उपमहापौर शेटे म्हणाले, 'विचारे मार्केट येथील रिसनं ५१७/२ 'ई' वॉर्ड येथील ८,९०३.१ चौ.मी. जागेवर बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभा केले आहे. संकुलाचे काम जयहिंद कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड, डिव्हीजन ऑफ भारत उद्योगाने केले आहे. २००६ मध्ये व्यापारी संकुल महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याने ठेकेदाराचे सर्व हक्क संपुष्टात आले. २०० भाजी मार्केट गाळ्यांसह २०,६९६ स्क्वेअर फूट पार्किंगची जागाही हस्तांतरीत झाली. महापालिकेच्या ताब्यात गाळे आल्यानंतर ९९ वर्षाच्या भाडेपट्टीने गाळे भाडेकरुना देण्यात आले.'

'ठेकेदार कंपनीचा संकुलावरील हक्क संपुष्टात आल्यानंतर कंपनीचे ठेकेदार श्रीचंद कुकरेजा व संचालक सूर्यकांत कुकरेजा यांना वैश्य बँकचे कर्ज मिळवून देण्यासाठी सहायक आयुक्त जिरगे व इस्टेट अधिकारी काटकर यांनी रजिस्टर दस्त नोंदणी नसताना बेकायदेशीरपणे 'ना हरकत' प्रमाणपत्र दिले. पत्र देताना ते पार्किंगची जागा न वगळता देण्यात आले. त्यामुळे बँकेने पार्किंगच्या जागेवरही आठ कोटी रुपये कर्ज दिले. सर्व प्रकरणासाठी ठेकेदार कंपनीसह बँक व महापालिकेचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर आयुक्तांनी त्वरीत फौजदारी गुन्हा दाखल करावा,' अशी मागणी उपमहापौर शेटे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकांचे आज आझाद मैदानात धरणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कोल्हापूर

ज्येष्ठ नागरिकांच्या गंभीर समस्यांबाबत शासनाकडे निवेदने दिलेली आहेत. आंदोलने केली आहेत. आमदार व मंत्र्यांना ज्येष्ठ नागरिकांचे समस्या सांगितल्या आहेत. परंतु राज्य सरकारचे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबतचे धोरण अत्यंत उदासिन आहे. शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण ९ जुलै २०१८ रोजी मंजूर केले. धोरण मंजुरीसाठी अधिवेशनामध्ये चर्चा झाली. काही आमदारांकडून लक्षवेधी सूचनाही मांडण्यात आल्या. परंतु शासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्याविरोधात गुरुवारी (ता. २७ जून) मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चाचा निर्णय राज्य संघटनेने (फेस्कॉम) घेतला आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता किमान पन्नास हजार ज्येष्ठ नागरिक एकत्र येत आहेत. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्याशिवाय या सभेमध्ये आंदोलनाची पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे अशी माहिती राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदसिद्ध अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप यांनी दिली. मोर्चाच्या तयारीसाठी २२ जून रोजी राजारामपुरीत फेस्कॉम कोल्हापूर विभागाची मिटींग झाली. अध्यक्ष पी. के. माने, उपाध्यक्ष यशवंत चव्हाण, सचिव अंजुमन खान, जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजीराव हिलगे, डॉ. जगताप, शहरअध्यक्ष दिलीप पेटकर, विजय चव्हाण, वि. मा. शहा, आनंदराव पाटील, जगन्नाथ भोरे, आण्णासाहेब दानोळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुतुची बाग पुन्हा विकसित करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मंगळवार पेठ येथील तुतूच्या बागेत व्यापारी संकुल उभा करताना उद्यानासाठी सुमारे आठ ते दहा गुंठे जागा राखीव ठेवण्यात आली होती. या जागेचा विकास अद्याप झालेला नाही. राखीव जागेवर पुन्हा उद्यान विकसित करावे', अशी मागणी बालगोपाल तालीम परिसरातील रहिवाशांनी मंगळवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे, 'मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी येथे पूर्वी रिसनं १०८२ मध्ये तुतूची बाग होती. तसेच महापालिकेचा आर्यांग्ल दवाखाना होता. २००३ मध्ये या जागेवर महापालिकेने बीओटी तत्वावर व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेतला. बागेचे अस्तित्व राखण्यासाठी मोठे जनआंदोलन झाले. आंदोलक व लोक प्रतिनिधींशी चर्चा करुन महापालिकेने दवाखाना सुस्थितीत चालू ठेवण्याबरोबर आठ ते दहा गुंठे जागा उद्यानासाठी राखीव ठेवण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर दवाखाना सुस्थितीत सुरू ठेवला, पण उद्यानाचा अद्याप विकास केलेला नाही. उद्यानाचा विकास न झाल्याने येथील अबालवृद्धांना विरंगुळ्यासाठी कोणतेही ठिकाण उपलब्ध नाही. तसेच मोकळ्या जागेवर अनाधिकृत केबिनधारकांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. महापालिकेकडे उद्यान विकसित करण्यासाठी निधी असून या निधीचा वापर करुन राखीव जागेत तुतूच्या बागेचा विकास करावा.' शिष्टमंडळात प्रकाश मंडलिक, संजय भोसले, किरण जाधव, राजेंद्र मंडलिक, निवास शिंदे, सुशांत चव्हाण, अक्षय शेळके, राहुल चव्हाण, धनंजय जाधव आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांचा भर गाठीभेटींवर

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरिता मोरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या महापौर पदासाठी दोन जुलै रोजी निवड होणार आहे. महापौरपदी आपली वर्णी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छूक उमेदवार अॅड. सुरमंजिरी लाटकर व माधवी गवंडी यांनी नगरसेवकांची गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. आमदार हसन मुश्रीफ महपौरपदाचा उमेदावर जाहीर करणार असले, तरी नेत्यांपर्यंत पक्षातील नगरसेवकांनी आपल्या नावाची शिफारस करण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महापालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असून शिवसेनाही सत्तेत सहभागी आहे. पक्षांतंर्गत ठरलेल्या फॉर्म्युलानुसार एक वर्ष महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. यापैकी पहिल्या सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला असून पुढील सहा महिन्यांसाठी नव्याने निवड होणार आहे.

गेल्या महापौर निवडीदरम्यान मोरे, अॅड. लाटकर व गवंडी इच्छुक होत्या. पक्षनेतृत्वाने मोरे यांना प्रथम उमेदवारी देताना अॅड. लाटकर यांना पुढीलवेळी संधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर शहरासह जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाल्याने पक्षनेतृत्व कोणाच्या बाजूने कौल देणार याबाबत शहरवासियांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आमदार मुश्रीफ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून नाव जाहीर करणार असले, तरी इच्छुकांनी नगरसेवकांच्या गाठीभेटीला सुरुवात केली आहे. पक्षातील महापालिकेतील सदस्यांनी आपल्या नावाची शिफारस करण्यासाठी अॅड. लाटकर व गवंडी यांनी जोरदार संपर्क मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

अॅड. लाटकर यांचे पती व राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस, माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी नगरसेवकांसह शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह काँग्रेसच्या काही नगरसेवकांची भेट घेतली. तर सोमवारी माधवी गवंडी यांचे पती माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांनी राष्ट्रवादीमधील सहकाऱ्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीमधील दोन्ही इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने पक्षांतंर्गत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

भाजप, ताराराणी आघाडी विरोधी आघाडीमध्ये शांतता दिसत असली, तरी उमेदवार कोण यावरच त्यांची रणनिती ठरणार आहे. ताराराणी आघाडीच्यावतीने स्मिता माने यांच्या नावाची प्रथमच चर्चा सुरू असताना सीमा कदम व उमा इंगळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

.........

चौकट

गाफील डावाची पुन्हा मोर्चेबांधणी

डिसेंबरमध्ये झालेल्या महापौर निवडीदरम्यान मोरे यांना उमेदवारी दिल्यास विरोधी भाजप-ताराराणी आघाडी ताकदीने उतरणार नाही, असे वातावरण निर्माण केले होते. त्याचवेळी अॅड. लाटकर यांना उमेदवारी दिल्यास संपूर्ण ताकद लावणार असल्याची चर्चा जोरदार रंगली. परिणामी मोरे यांना संधी मिळाली. पण भाजप-ताराराणी आघाडीने जयश्री जाधव यांना उमेदवारी देवून अखेरच्या क्षणापर्यंत महापौरपदाची निवड ताकदीने लढवली. निवडीला काही मिनिटे अवधी असताना अश्विनी रामाणे यांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले. यावेळीही अॅड. लाटकर यांना विरोध करताना पुन्हा गाफीलपणाचा डाव भाजप-ताराराणी आघाडी खेळणार का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटातर्फे गुरुवारी धरणे

$
0
0

कोल्हापूर: सातव्या वेतन आयोगासंदर्भात वेतननिश्चिती करण्यासाठी प्राध्यापकांकडून होत असलेल्या आर्थिक मागणीचे व्यवहार बंद करावे, यासाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे गुरुवार (ता. २७) रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर दुपारी तीन ते सायंकाळी सहा यावेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, प्राध्यापकांच्या वेतननिश्चितीबाबत २९ जूनपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असून सुटातर्फे आंदोलन स्थगित करावे, असे शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्यावतीने सुटाला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. मात्र जोपर्यंत ठोस कार्यवाहीचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही अशी भूमिका सुटातर्फे घेण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images