Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चोरी, घरफोडी तपासात पोलिस ‘फेल’

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर

अवैध व्यवसायातील मटका, जुगार, सावकारांविरोधात कोल्हापूर पोलिसांनी जोरदार मोहीम सुरु केल्याने नागरिकांतून सार्वत्रिक स्वागत होत आहे, मात्र चोरी, घरफोडीच्या तपासात पोलिस 'फेल' झाल्याची भावना पसरत चालली आहे. तपास पथकात समन्वयाचा अभाव, बंद पडलेली रात्रीची गस्त यामुळे चोऱ्या वाढल्या असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शहर व उपनगरातून दीड महिन्यात ९० तोळे दागिने चोरीला गेले आहेत.

शहरातील उपनगरे, फ्लॅट, बंगल्याबरोबरच वर्दळ असलेल्या गल्लीबोळात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पर्यटनाला चालना मिळावाी यासाठी सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे फिरायला गेलो तर घरी चोरी होईल, ही भावना नागरिकांना सतावत चालली आहे. चोरटे बंद असलेली घरे शोधून चोरी करत असताना पोलिसांकडून मात्र संथगतीने तपास सुरु आहे. मटका, जुगारासह सावकारी करणाऱ्यांना पोलिसांनी चाप लावला आहे. या मंडळींचे अवैध व्यवसाय पोलिसांना माहीत होते. तसेच त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाले असल्याने त्यांच्यावर मोक्का गुन्हे दाखल करण्यात पोलिसांना जादा प्रयत्न करायला लागले नाही. पण इच्छाशक्तीच्या जोरावर गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात झाली आहे. गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी ज्याप्रमाणे पोलिसांनी पावले उचलली आहेत, त्याप्रमाणे तपासात मात्र ढिलाई होत आहे. शहर व उपनगरातून सर्वसामान्य व मध्यमवर्गियांच्या घरातील चोरांचा तपास करण्यात स्थानिक पोलिस स्टेशनमधील डी.बी.पथके व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अपयशी ठरला आहे.

घरफोड्यांच्या तपासात डॉग स्कॉड, ठसे तज्ज्ञांना पाचारण केले जाते. ठसे तज्ज्ञांच्या अहवालाला वेळ लागत असल्याने तपासास विलंब लागत आहे. स्मार्ट सिटीद्वारे कोल्हापुरात चौकाचौकात उभारण्यात आलेले सीसीटीव्ही चोरट्यांना अटक करण्यात मदतनीस ठरलेले नाहीत. पोलिसांकडून रात्रीची गस्त व्यवस्थित केली जात नसल्याने चोरट्यांकडून रात्री दोन ते चार या वेळेत चोऱ्या होत असल्याने गस्तीबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन मोबाईल दुकानातील चोरीचा छडा चोवीस तासांत लावला. पण शहरात गेल्या दोन महिन्यात १५ ते २० घरफोड्या झाल्या असून त्याचा मागसूमही लागलेला नाही. चोरीचे दागिने खरेदी विक्री करणाऱ्या सराफांकडेही काणाडोळा केला जात आहे. चेन स्नॅचरनी पुन्हा डोके वर काढले असून कारच्या काचा उचकटून, दुचाकीच्या डिकी उचकटून पैशाच्या बॅग, दागिन्यांच्या पर्सही चोरल्या जात आहेत. भाजी मंडई, महाद्वार रोडवर पर्स व मोबाइल चोरीचे प्रकार वाढले असतानाही पोलिसकडून गहाळ रजिस्टरमध्ये नोंदी केल्या जात आहेत.

..............

मागील दीड महिन्यातील चोऱ्या

साळोखेनगर बंगला : सहा तोळे दागिने

मुक्त सैनिक वसाहत अभियंत्याचा बंगला: दहा तोळे दागिने

गजानन महाराज नगरातील बंगला पाच लाखांचा ऐवज

केएमसी महाविद्यालय कार्यालय: दोन हजार

शुक्रवार पेठ डंगरी गल्लीतील घर : १९ तोळे दागिने, ४० हजार रोकड

आर.के.नगरातील बंगला: १५ तोळे दागिने, १० लाख रोकड

कदमवाडी लक्ष्मीनारायण नगर: चार तोळे दागिने

आर.के.नगर चेन स्नॅचिंग: तीन तोळे दागिने

मुक्त सैनिक वसाहत: अडीच तोळे दागिने

प्रथमेश नगर पोलिसाचे घर: दीड तोळे दागिने

मोरेवाडी, अष्टविनायक पार्क :१५ तोळे दागिने, तीन लाखांची रोकड

.................

मटा भूमिका

तत्काळ तपासाची गरज

सध्या घरांना चांगली कुलपे, लोखंडी दरवाजे लावूनही घरफोड्या होत आहेत. घरफोड्या, चोऱ्यांच्या तपासात पोलिस अपयशी ठरत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आपल्या घरी चोरी होईल, अशी भिती प्रत्येक कुटुंबाला वाटू लागली आहे. अनेक कुटुंबे परगावी जाण्याचे टाळत आहेत. बाजार अथवा कार्यालयात गेल्यावर परत घरी आल्यावर चोरी होणार नाही याची शाश्वती नाही. बाजारात मोबाइल व पर्स चोरटे, दुचाकी व चारचाकी फोडल्या जात आहेत. दोन ते तीन दिवसाला कुठे ना कुठे घरफोडी ठरलेली आहे. एखाद्या समारंभाला दागिने घालून जावे इतकी सुरक्षितता महिलांना वाटत नाही. समाजातील सर्व स्तरांमध्ये भितीचे सावट गडद होत असताना पोलिस अधिकाऱ्यांकडून ,'पोलिस आहेत, तुम्ही काळजी करु नका' हा आत्मविश्वास नागरिकांत जागवण्यासाठी घरफोड्या, चोऱ्यांचा तपास तत्काळ करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'कला-संस्कृती'चे शेअरिंग

$
0
0

Appasaheb.mali @timesgroup.com Tweet : Appasaheb_MT कोल्हापूर : ते दोघे आर्किटेक्ट, कलाक्षेत्राविषयक दोघांनाही मनस्वी आवड. कला, संस्कृती आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ झाल्या पाहिजेत ही त्यांची आंतरिक भावना. या उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आर्किटेक्ट मिलिंद रणदिवे व सिकंदर नदाफ यांनी राजेंद्रनगर परिसरातील शिव-शिल्प कॉलनीतील निवासी इमारतीला कलात्मक लूक दिला आहे. 'सराय शेअरिंग कल्चर'ची सुरुवात केली आहे. चित्रकार, शिल्पकारांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनासाठी आर्ट गॅलरी, कार्यक्रम, वर्कशॉपसाठी हॉलची उभारणी केली आहे. निसर्गाचा सहवास अनुभवत प्रदर्शनातील कलाकृती पाहण्याचा अनोखा आनंद या ठिकाणी लाभतो. 'सराय शेअरिंग कल्चर'मधील आर्ट गॅलरीमुळे कोल्हापूर व परिसरातील नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. पेशाने आर्किटेक्ट असलेल्या रणदिवे व नदाफ यांनी वैशिष्ट्यपूर्णरित्या आर्ट गॅलरी साकारली आहे. जुन्या वास्तूमध्ये बदल करताना कलादालनाला साजेशी बांधणी केली. चित्रकृती

व शिल्पकृती मांडण्यासाठी प्रशस्त दालन, कलाकृती उठावदार दिसतील या पद्धतीची प्रकाश योजना आणि निसर्ग सहवास ही कलादालनाची वैशिष्ट्ये आहेत. कलाकारांसाठी गेस्ट रुमची सुविधा आहे. सध्या कोल्हापुरात आर्ट गॅलरीची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे. गॅलरीची संख्या कमी आणि प्रदर्शन भरविणाऱ्या कलाकारांची संख्या मोठी असे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे अनेकांना प्रदर्शनासाठी सात, आठ महिने कलादालनासाठी प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर राजेंद्रनगर एसससी बोर्डनजीकच्या चौकातील 'शेअरिंग कल्चर'मधील आर्ट गॅलरी नवोदितासाठी हक्काचे व्यासपीठ ठरत आहे. कला, संस्कृती आणि सामाजिक व अन्य विषयावर चर्चा, संवाद आणि मनमुराद गप्पा यातून कल्चर शेअरिंग होईल ही त्या मागील भावना आहे. याविषयी बोलताना मिलिंद रणदिवे म्हणाले, ''सराय...' या नावापासूनच वेगळेपण जपले आहे. कारावॅन सराय या

शब्दजोडीतून सराय हा शब्द आहे. त्याचा संदर्भ प्राचीन अशा 'सिल्क रुट'शी जोडला आहे. सिल्क रुट ही अशी जागा आहे जिथे काही लोक काही काळ एकत्र येतात. सांस्कृतिक देवाणघेवाण करतात. ज्या माध्यमातून अनुभवांची समृद्धी वाढते. शेअरिंग कल्चरमध्ये कला, संस्कृती, सामाजिक व अन्य विषयावर चर्चा, मनमोकळा संवाद होईल'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय समीकरण बदलणार

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

@gurubalmaliMT

कोल्हापूर

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा निकाल काहीही लागला तरी जिल्ह्याचे राजकीय समीकरण मात्र निश्चितपणे बदलणार आहे. महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्ष पेटण्याबरोबरच दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत मिठाचा खडाही नक्कीच पडणार आहे. युतीमध्ये देखील श्रेयवाद अथवा पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याची शर्यत रंगणार असल्याने त्याचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर उमटणार आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी लागणार आहे. पण याचवेळी आगामी राजकारणाचा फैसला देखील होणार आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक अथवा धनंजय महाडिक यांच्यात कुणीही निवडून आले तरी राजकीय समीकरणे बदलणार हे नक्की आहे. मंडलिक निवडून आल्यास त्याचे सर्व श्रेय आमदार पाटील हे घेतील. ज्यामुळे भाजप आणि शिवसेना विरोधात पाटील असा श्रेयवाद रंगणार आहे. आमदारांनी दिलेली रसद, राबवलेली यंत्रणा यामुळेच मंडलिकांची ताकद वाढली. यातून महाडिक यांचा पराभव झाल्यास पाटील आणि महाडिक यांच्यातील संघर्ष वाढणार आहे. त्याचे पडसाद आगामी विधानसभा, विधान परिषद, गोकुळच्या निवडणुकीबरोबरच इतर काही सहकारी संस्थामध्येही उमटतील. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना कोंडीत पकडण्यासाठी आमदार पाटील, चंद्रदीप नरके, प्रा. संजय मंडलिक हे ताकदीने मैदानात उतरतील. त्यांना आमदार हसन मुश्रीफ सोयीने मदत करतील. पण याचवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका महत्वपूर्ण राहील. निकाल काहीही लागला तरी ते महाडिक यांना मदत होईल अशीच भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पी.एन. पाटील हे मात्र महाडिक यांच्या बाजूने राहतील असे चित्र आहे.

महाडिक निवडून आल्यास ते विधानसभा निवडणुकीपासूनच आमदार पाटील यांच्या विरोधात रान उठवतील. तेव्हा देखील आघाडी धर्म बाजूला ठेवला जाईल. यामुळे आघाडी झाली तरी धर्म कोण पाळणार हा मोठा प्रश्न असेल. लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी सोयीने प्रचार केला. तो कसा केला हे गुरूवारी कळणार आहे. अनेकांनी आतून एक आणि बाहेरून वेगळा प्रचार केला आहे. त्याचा पुरावाच मिळणार आहे. यामुळे त्याचे पडसाद आगामी राजकारणावर उमटणार आहेत.

............

महाडिक राष्ट्रवादीत की भाजपमध्ये ?

राष्ट्रवादीचे खासदार असूनही भाजपच्या सोयीचे काम केल्याचा आरोप खासदार महाडिक यांच्यावर झाला. यामुळे पक्षात त्यांच्याबाबत नाराजी होती. त्याचे पडसाद प्रचार आणि मतदानात उमटले. ते विजयी झाल्यास याच पक्षात राहतील. पण पराभव झाल्यास ते हातात 'घड्याळ' बांधून पुढील राजकारण करतील का याबाबत आतापासूनच उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. कारण स्वकियच सोबत नसल्याने या निवडणुकीत झालेला त्रास त्यांनी अनुभवला आहे. आघाडी असूनही काहींनी उघड आणि काहींनी छुपा विरोध केल्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुकीचा निकाल उलटा लागल्यास ते थेट भाजपला जवळ करतील, त्यासाठी चंद्रकांत पाटील तयारच असतील. पण हे सारे आजच्या निकालावरच अवलंबून राहणार आहे.

...........

चौकट

शेट्टी हॅटट्रीक करणार ?

हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांना पराभूत करण्यासाठी राज्य पातळीवरून यंत्रणा राबवली गेली. नवखा उमेदवार असूनही धैर्यशील माने यांनी जोरदार हवा केली. शेट्टी यांचा पराभव झाल्यास तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फार मोठा दणका असेल. त्याचा परिणाम विधानसभेवरही होणार आहे. दोन्ही काँग्रेसनी शेट्टी यांना मदत केली, पण निकाल उलटा लागल्यास या नेत्यांनी केवळ बाहेरून मदत केल्याचा पुरावा मिळेल. जातीय समीकरणे या मतदारसंघात जाणवल्याने सेना विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा वेगावली. शिवसेना विजयी झाल्यास तो इतिहास होईल. कारण या मतदारसंघात आजपर्यंत सेना अथवा भाजपचा उमेदवार कधीच विजयी झाला नाही, उलट पराभव देखील मोठ्या फरकाने झाले आहेत. यामुळे स्वाभिमानी विजयी झाल्यास शेट्टींच्या हॅटट्रीकसह संघटनेची ताकद वाढणार आहे, पण पराभव झाल्यास संघटनेच्या ताकदीवरच मर्यादा येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौन बनेगा खासदार ?

$
0
0

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज, गुरूवारी संध्याकाळपर्यंत जाहीर होईल. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला आघाडी आणि युती या दोन्हीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या उमेदवाराच्या विजयाची खात्री दिली आहे. अवघ्या काही तासांनी निकालाचा कल समजणार आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच मतदारांची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे.

........................

शेट्टींचा विजय एक लाख मताधिक्क्याने

भाजप सरकारच्या शेतीविरोधी धोरणाचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यांच्यासोबत आघाडी करताना शेती आणि शेतकरी हिताच्या धोरणाच्या अंमलबजावणीच्या अटी घातल्या. त्या अटींचा आघाडीने जाहीरनाम्यात समावेश केला आहे. प्रचाराच्या कालावधीत मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे एक लाख मताधिक्क्याने विजयी होतील. वंचित विकास आघाडीमुळे थोड्याफार प्रमाणात चळवळीच्या मतांची विभागणी झाली. पण शेट्टी यांचा विजय निश्चित आहे.

प्रा. जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष

...............

जिल्ह्यात इतिहास घडणार

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात यंदा इतिहास घडणार आहे. या ठिकाणी शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने विजयी होतील. जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिवसेनेचे खासदार होण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न यंदा साकार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ताकद देण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात भगवा फडकणार हे निश्चित आहे.

संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

..................

दोन्ही ठिकाणी आघाडीची बाजी

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्षांची आघाडी होती. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार शंभर टक्के विजयी होतील. हातकणंगले मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी हे मोठ्या मताधिक्क्यांनी बाजी मारतील. कोल्हापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व खासदार धनंजय महाडिक हे पुन्हा खासदार असतील. दोन्ही मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी व मित्र पक्षांनी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात मतदारसंघ ढवळून काढले आहेत. लोकांचा मोदी सरकारच्या विरोधात रोष आहे.

प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

..................

विजय आमचाच, विरोधकांची केवळ हवाच

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार हमखास निवडून येतील. कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांची केवळ हवाच होती. प्रत्यक्षात मतदार राष्ट्रवादीचे उमेदवार व खासदार महाडिक यांच्या पाठीशी होते. यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार होणार आहे. दोन्ही मतदारसंघात आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने प्रचार केला आहे. हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी मोठे मताधिक्क्य घेऊन विजयाची हॅट्‌ट्रिक करतील. एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरतील. आघाडीला घवघवीत यश मिळेल.

ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

............

युतीच्या उमेदवारांना चांगले मताधिक्य

भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने हे चांगल्या मताधिक्क्यांनी विजयी होतील. युतीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कालावधीत एकसंधपणे प्रचार केला. शिवाय गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारने लोकाभिमुख कारभार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. हातकणंगलेत धैर्यशील माने यांच्यासारखे युवा नेतृत्व लोकांच्या पसंतीस उतरले आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी व काँग्रेससोबत केलेली आघाडी लोकांना आवडली नाही. कोल्हापुरात मंडलिकांच्या प्रचारात युतीसह आघाडीतील नाराज घटक सक्रिय होते.

महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. सदस्याकडूनस्वखर्चातून पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी तालुक्यातील तुळशी, धामणी नदीकाठावर असलेल्या गावांत आणि वाड्या-वस्त्यांवर यावर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वारंवार केली. पण तांत्रिक अडचण बाजूला ठेवून जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी स्वतः पाण्याचा टँकर आणून पाल बुद्रुक परिसरात पाणीपुरवठा सुरू केला आहे. या उपक्रमाचे धामोड परिसरातून स्वागत होत आहे.

यावर्षीच्या तालुक्यातील तुळशी, धामणी परिसरातील वाड्यावस्त्यांवरील लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक पाण्याचे स्रोतसुद्धा कोरडे पडत चालले आहेत. पाणी मिळवण्यासाठी परिसरातील नागरिक पायपीट करत आहेत. टँकरमधून पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी नागरिकांनी केली. परंतु राधानगरी हा टँकरमुक्त तालुका असल्याने पुन्हा टँकर सुरू करता येत नाही. सुरू केल्यास त्याचे इंधन आणि इतर भाडे कसे भागवावे याबाबत तरतूद नसल्याने टँकर सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण बनले होते. कडक उन्हाळा सुरू असताना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आणि सर्वच सरकारी कामे ठप्प झाली.

जिल्हा परिषद सदस्य प्रा. विनय पाटील यांनी मात्र काही गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले नाही. शेवटी त्यांनी स्वखर्चातून पाल बुद्रुक गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

००००

पाल बुद्रुक गावात यावर्षी झरे आटले आहेत. तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना सरकारी यंत्रणा नियमावर बोट दाखवून टाळाटाळ करत आहे. अशा प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी टँकररद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

सागर जाधव, पोलिसपाटील, पाल बुद्रुक

०००

तुळशी नदीच्या परिसरात अनेक गावांत पाणीटंचाई आहे. पाल बुद्रुकचीही अशीच गंभीर स्थिती आहे. या गावातील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी मी स्वतः पाण्याचा टँकर सुरू केला आहे. परिसरातील कोणत्याही गावात पिण्याचे पाणी कमी पडू देणार नाही.

विनय पाटील, जिल्हा परिषद सदस्य

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीची जहागिरी संपुष्टात येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लोकसभेच्या राज्यातील ४८ जागांपैकी ४४ जागांवर युतीचे उमेदवार विजयी होतील. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकत या पट्ट्यातील दोन्ही काँग्रेसची जहागिरी संपुष्टात येईल,' असा ठाम विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच शरद पवारांच्या कुटुंबातील एकही उमेदवार विजयी होणार नाही,' असे भाकितही पाटील यांनी केले.

एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांची धावपळ सुरू झाल्याचा टोला पाटील यांनी लगावला. ते म्हणाले, 'देशात एनडीए २९० आणि महाराष्ट्रात ४४ जागांवर विजय मिळवेल. ज्या पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर होती तेथे सर्व दहा जागांवर युतीचे उमेदवारांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांपैकी एकही उमेदवार निवडून येणार नाही.'

'सुप्रीम कोर्टाने व्हीव्हीपॅटची संपूर्ण मतमोजणी करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सर्व विरोधी पक्ष टीका करत असून ते एकप्रकारे देशाच्या व्यवस्थेवरच अविश्वास व्यक्त करत आहेत. विरोधी पक्षाची ही भूमिका चिंताजनक आहे. इव्हीएम मशिनद्वारे निकाल बदलायचा असता तर सर्वच जागांचा निकाल फिक्स केला असता. तमिळनाडू, केरळ येथील निकाल बदलता आला नसता का? एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षाही वेगळा निकाल लागल्यास विरोधी पक्ष कोणती भूमिका घेणार?' असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.

.. .. .. .

.. .. .. .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींनी शेतकऱ्यांची दु:खे सांगू नयेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काहीजणांना मी जळी-स्थळी दिसत असल्याने अपुऱ्या आणि अर्धवट माहितीवर ते सातत्याने टीका करत असतात. माजी बागायती नसली, तरी जिरायती आहे. मीही शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांची दु:खे मला सांगू नयेत,' असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता लगावला. बुधवारी खरीप आढावा बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'नोकरदारांप्रमाणे शेतकऱ्यांना दरमहा काही ठरविक रक्कम मिळण्यासाठी राज्य सरकारच्या विचारधीन असलेल्या ठेव योजनेची माहिती देत असतो. शेतकऱ्यांनी ठेवलेल्या ठेवीवर १९ टक्के व्याजाने काही रक्कम मिळेल, अशी माहिती जळगाव येथील खरीप आढावा बैठकीत दिली. मात्र संपूर्ण माहिती न घेता शेतकरी कर्ज घेऊन मुदतबंद ठेव ठेवतात, असे म्हटल्याचा माझ्यावर आरोप करतात. शेतकऱ्यांची सर्व दु:खे फक्त यांनाच कळतात अशा अविर्भावत ते अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करतात. त्यांची शेती किती आहे, मला माहीत नाही. माझी अडीच एकर शेती आहे. त्यांची बागायती असेल, पण माझी जिरायती असून मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दु:खे मला सांगू नयेत.'

शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांचा नामोल्लख टाळत पालकमंत्री म्हणाले, 'एक महान नेते अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावरुन घरासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा देत रास्ता रोको आंदोलन करुन लोकांना त्रास देत आहेत. पण विकास आराखड्यासाठी ८९ कोटीच्या निधीला राज्यसरकारने मंजुरी दिली असून सात कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. आचारसंहितेमुळे निविदा काढता आली नाही. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याप्रमाणेच श्री क्षेत्र जोतिबा विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून पाच कोटींचा निधी मिळाला आहे. पण काहींना प्रसिद्धी हवी असल्याने माझ्यावर आरोप करत आहेत.'

......

चौकट

सरकट कर्जमाफीचा विचार सुरू, पण निर्णय नाही

'शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी विचार करत असतात. दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. सद्य:स्थितीत संपूर्ण कर्जमाफी करण्याचा विचार सुरू आहे, पण अद्याप निर्णय झालेला नाही. दुष्काळाची स्थिती लक्षात घेऊन १,४०० चारा छावण्या, पाच लाख नागरिकांना रोजगार दिला असून ६७ लाख शेतकऱ्यांना साडेचार कोटी पोहोच केले आहेत,' असेही पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा अशी चूक करणार नाही, अद्दल घडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मैदानातील वाद उफाळून राडा करणाऱ्या दिलबहार आणि पाटाकडील तालमीच्या कार्यकर्त्यांची बुधवारी कळंबा कारागृहातुन सुटका झाली. गेले दोन महिने त्यांचा कळंबा कारागृहात मुक्काम होता. कारागृहाबाहेर पडल्यानंतर पुन्ही अशी चूक करणार नाही. आता अद्दल घडली, असे सांगत कार्यकर्ते नातेवाईकांच्या समोर रडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटिसींमुळे नगरसेवकांमध्ये संताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणूक मतमोजणीदरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. नोटीस दिलेल्या व्यक्तींमध्ये कोणताही गुन्हा दाखल केलेल्या नगरसेवकांचा समावेश असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. काहीजणांनी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन खुलासा केला. पण जिल्हाबंदीबाबत संभ्रमावस्था कायम आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी कलम १४४ (हद्दपार) व १४९ (प्रतिबंधात्मक कारवाई) नुसार महापालिकेच्या नगरसेवकांना सोमवारी नोटिसा बजावल्या. यामध्ये उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक प्रवीण केसरकर, लाला भोसले, नगरसेविका छाया कवाळे यांचा मुलगा गणेश कवाळे, नगरसेविका सविता घोरपडे यांचे पती सतीश घोरपडे, माजी नगरसेवक जालंधर पोवार, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, रघुनाथ टिपुगडे यांच्या अन्य नगरसेवकांचा समावेश होता. यातील बहुतांशी नगरसेवकांवर कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल नसल्याने त्यांनी नोटिसा प्राप्त झाल्यानंतर संताप व्यक्त केला.

नोटीस दिलेल्या व्यक्तींना मंगळवारी व बुधवारी खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही नगरसेवकांनी खुलासा केला. मात्र खुलासा केल्यानंतर संबंधीतांना प्रतिबंधात्मक कारवाईची अंमलबजावणी करायची अथवा नाही याबाबत संभ्रमावस्था कायम राहिली. प्रतिबंधात्मक कारवाई झुगारुन नोटीस प्राप्त व्यक्ती शहर अथवा जिल्ह्यात आढळून आल्यास त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमहापौरांसह २१ आजी माजी नगरसेवकांवरील नोटिसा मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हमीपत्र दिलेल्या २१ जणांना बजाविलेल्या प्रतिबंधात्मक नोटिसा पोलिस प्रशासनाने बुधवारी मागे घेतल्या. मात्र हमीपत्र न दिलेल्या १२० जणांना २४ मे च्या मध्यरात्रीपर्यंत हद्दपार केले आहे. उपमहापौर भूपाल शेटे, कॉग्रेसचे नगरसेवक प्रवीण केसरकर, लाला भोसले, नगरसेविका छाया कवाळे यांचा मुलगा गणेश कवाळे, ताराराणी आघाडीच्या नगरसेविका सविता घोरपडे यांचे पती सतीश घोरपडे, माजी नगरसेवक जालंधर पोवार, शिवसेनेचा पदाधिकारी रघुनाथ टिपुगडे यांच्यासह २१ जणांवरील मतमोजणीच्या दिवशी प्रवेशबंदीच्या नोटिसा पोलिस प्रशासनाने सायंकाळी मागे घेतल्या. त्यांनी आपल्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असे हमीपत्र दिले असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सांगितले. काही नगरसेवकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन विनाकारण नोटिसा आल्याची भूमिका मांडली होती.

दरम्यान, जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सागर कदम, सूरज साखरे, तानाजी पाटील, स्वप्नील चौगुले, अमर झाड, सागर साळोखे, सचिन कुरडे, सागर कुरडे, अमित ठिकपुर्लीकर, संतोष चांदणे, खंडू माने, सचिन गायकवाड, रावसाहेब इंगवले, दयानंद नागटिळे, ऋषिकेश इंगवले, विशाल दिंडोर्ले, रोहित पोवार, वैभव राऊत, रिंकू उर्फ विजय देसाई यांना हद्दपार करण्यात आले. तर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अभिजित मोरे, प्रसार उर्फ पप्पू रणदिवे, जमीर मणेर, इम्रान मुजावर, रणजित पाटील, संदीप कांदेकर, हेमंत कांदेकर, सुजित जरग, रणजित मोरस्कर, शाहरुख शिकलगार, युनूस मुजावर, अजय हत्तेकर यांना हद्दपार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कला-संस्कृती’चे शेअरिंग कल्चर

$
0
0

लोगो: साहित्य संस्कृती

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : ते दोघे आर्किटेक्ट, कलाक्षेत्राविषयक दोघांनाही मनस्वी आवड. कला, संस्कृती आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ झाल्या पाहिजेत ही त्यांची आंतरिक भावना. या उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आर्किटेक्ट मिलिंद रणदिवे व सिकंदर नदाफ यांनी राजेंद्रनगर परिसरातील शिव-शिल्प कॉलनीतील निवासी इमारतीला कलात्मक लूक दिला आहे. 'सराय शेअरिंग कल्चर'ची सुरुवात केली आहे. चित्रकार, शिल्पकारांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनासाठी आर्ट गॅलरी, कार्यक्रम, वर्कशॉपसाठी हॉलची उभारणी केली आहे. निसर्गाचा सहवास अनुभवत प्रदर्शनातील कलाकृती पाहण्याचा अनोखा आनंद या ठिकाणी लाभतो.

'सराय शेअरिंग कल्चर'मधील आर्ट गॅलरीमुळे कोल्हापूर व परिसरातील नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. पेशाने आर्किटेक्ट असलेल्या रणदिवे व नदाफ यांनी वैशिष्ट्यपूर्णरित्या आर्ट गॅलरी साकारली आहे. जुन्या वास्तूमध्ये बदल करताना कलादालनाला साजेशी बांधणी केली. चित्रकृती व शिल्पकृती मांडण्यासाठी प्रशस्त दालन, कलाकृती उठावदार दिसतील या पद्धतीची प्रकाश योजना आणि निसर्ग सहवास ही कलादालनाची वैशिष्ट्ये आहेत. कलाकारांसाठी गेस्ट रुमची सुविधा आहे.

सध्या कोल्हापुरात आर्ट गॅलरीची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे. गॅलरीची संख्या कमी आणि प्रदर्शन भरविणाऱ्या कलाकारांची संख्या मोठी असे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे अनेकांना प्रदर्शनासाठी सात, आठ महिने कलादालनासाठी प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर राजेंद्रनगर एसससी बोर्डनजीकच्या चौकातील 'शेअरिंग कल्चर'मधील आर्ट गॅलरी नवोदितासाठी हक्काचे व्यासपीठ ठरत आहे. कला, संस्कृती आणि सामाजिक व अन्य विषयावर चर्चा, संवाद आणि मनमुराद गप्पा यातून कल्चर शेअरिंग होईल ही त्या मागील भावना आहे.

याविषयी बोलताना मिलिंद रणदिवे म्हणाले, ''सराय...' या नावापासूनच वेगळेपण जपले आहे. कारावॅन सराय या शब्दजोडीतून सराय हा शब्द आहे. त्याचा संदर्भ प्राचीन अशा 'सिल्क रुट'शी जोडला आहे. सिल्क रुट ही अशी जागा आहे जिथे काही लोक काही काळ एकत्र येतात. सांस्कृतिक देवाणघेवाण करतात. ज्या माध्यमातून अनुभवांची समृद्धी वाढते. शेअरिंग कल्चरमध्ये कला, संस्कृती, सामाजिक व अन्य विषयावर चर्चा, मनमोकळा संवाद होईल'

चित्रकार, शिल्पकारांसाठी नवे कलादालन

महिनाभरात या आर्ट गॅलरीत चित्रांची तीन प्रदर्शने झाली. आर्ट गॅलरीविषयी सांगताना शिल्पकार प्रशांत धुरी म्हणाला, 'चित्रकार, शिल्पकारांसाठी हे कलादालन म्हणजे एका अर्थी प्रोत्साहन ठरेल. सध्या शहरात कलादालनाची संख्या कमी आहे. यामुळे कलाकारांना वर्ष, वर्षभर प्रदर्शनासाठी वाट पाहावे लागते. सराय शेअरिंग कल्चरमधील आर्ट गॅलरीची उभारणी हटके आहे. येथील कलादालनात कलाकृती मांडताना वेगळा फिल अनुभवयास येत आहे.' दरम्यान या कलादालनमध्ये सध्या शिल्पकार प्रशांत धुरी, चित्रकार वर्षा धुरी या पती-पत्नींनी व चित्रकार प्रितम चिवटे व प्रियांका चिवटे या बहिणभावांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनात चाळीसहून अधिक चित्रे, दहाहून अधिक शिल्पकृती आहेत. स्क्रॅप, लाकूड व अन्य मटेरिअयलचा वापर करून शिल्पकृती तयार केल्या आहेत. गोल्डफिश, शहामृग, घोडा, मेंढा या कलाकृती लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. विविध विषयावरील अॅक्रेलिक माध्यमातील चित्रे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवितात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टपाली मतपेट्या बंदोबस्तात रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज, गुरूवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. दरम्यान, बुधवारी दुपारनंतर सैनिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात घेऊन गेले. वाहनात पेट्या ठेवणे, त्या मतमोजणीच्या ठिकाणी पोहच करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी विशेष लक्ष दिले. दिवसभर कर्मचाऱ्यांची मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली.

'कोल्हापूर'साठी कसबा बावड्यातील रमणमळा तर 'हातकणंगले'साठी राजाराम तलावाजवळील शासकीय गोदामात, आज गुरूवारी सकाळी सातपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होत आहे. दोन्ही ठिकाणी चुरशीने लढत झाल्याने कोल्हापूरसाठी ७०.७ तर हातकणंगलेसाठी ७०.२८ टक्के मतदान झाले आहे. सैनिक, सरकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ पर्यंत टपाली मतदान करण्याची संधी मिळाली. त्यानुसार २३ एप्रिलला मतदान झाल्यानंतर एक महिना रोज टपालाने मतपत्रिका येत राहिल्या. 'कोल्हापूर'साठीच्या मतपत्रिका जिल्हाधिकारी कार्यालय कक्षात आणि 'हातकणंगले'साठीच्या मतपत्रिका अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात ठेवण्यात आल्या होत्या. त्या मतपत्रिकांच्या पेट्या बुधवारी दुपारनंतर पोलिस बंदोबस्तात मतमोजणी ठिकाणी घेऊन गेले.

दोन्ही ठिकाणी २२०४ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू, नये यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत प्रशिक्षणाच्या फेऱ्या सुरू राहिल्या. गुरूवारी सकाळी पाच वाजताच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर हे पहाटे पाच वाजताच दाखल होतील. त्यानंतर स्ट्राँगरूमचे सील उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर फोडण्यात येईल. विधानसभा मतदारसंघनिहाय मांडण्यात आलेल्या २० टेबलवर यंत्राचे वाटप होईल. सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. फेरीनिहाय निकाल जाहीर केला जाईल. दोन्ही ठिकाणी सहा चौकात एलईडी स्क्रिन लावण्यात येईल.

...........

बंदिस्त टेम्पोसाठी प्रतीक्षा

'हातकणंगले'साठी टपाली मतपत्रिकांच्या आठ पेट्या मोठ्या ट्रकवजा टेम्पोतून घेऊन गेले. टेम्पोत पेट्या ठेवल्यानंतर उमेदवार प्रतिनिधींच्या सह्या घेण्यात आल्या. 'कोल्हापूर'साठीच्या टपाली मतपत्रिकांच्या सहा पेट्या पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापनाच्या लहान वाहनात ठेवल्या होत्या. मात्र ते वाहन बंदिस्त नव्हते. यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बंदिस्त टेंम्पातून पेट्या नेण्याचा आदेश दिला. त्यानुसार स्वत: दुसरा बंदिस्त टेंम्पो येईपर्यंत कार्यालयात स्वत:च्या कक्षासमोर ते बसून राहिले.

..........

अॅपवरही निकाल

निवडणूक आयोगाच्या व्होटर हेल्पलाईन अॅप मोबाईलवर डाऊनलोड केल्यास इंटरनेट असल्यास घरबसल्या लाईव्ह फेरीनिहाय निकाल कळणार आहे. अधिकाऱ्यांनी फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यापूर्वीच अॅपवर मतदानाची संख्या कळेल. यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी गर्दी कमी होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. अॅन्ड्रॉइड मोबाईलवर गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन व्होटर हेल्पलाईन असे इंग्रजीत टाइप करून अॅप डाऊन लोड करता येते.

...........

कार्यकर्त्यांनी येथे थांबावे

कोल्हापूर मतदारसंघ

मेरी वेदर मैदान, होमगार्ड कार्यालयाशेजारी, कसबा बावडा : काँग्रेस,राष्ट्रवादी व इतर मित्रपक्षाचे कार्यकर्ते.

पोलिस फुटबॉल मैदान : शिवसेना, भारतीय जनता पक्ष, इतर मित्रपक्षांचे कार्यकर्ते

पितळी गणपती मंदीर : वंचित बहुजन आघाडी, इतर पक्षांचे कायकर्ते व अपक्ष उमेदवारांचे समर्थक

..........

हातकणंगले मतदारसंघ :

पाटील मळा, सरनोबतवाडी : स्वाभीमानी शेतकरी संघटना, कॉग्रेस, राष्ट्रवादी, इतर मित्रपक्षाचे कार्यकर्ते

केएसबीपी उद्यान, शिवाजी विद्यापीठ चौक व परीसर : शिवसेना, भारतीय जनता पक्ष

वृत्त्पत्रविद्याशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ : वंचित बहुजन आघाडी, इतर पक्षांचे कायकर्ते व अपक्ष

----

निकालापूर्वीच अभिनंदनाचे

डिजीटल फलक

निकाल लागण्यापूर्वीच दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार राजू शेट्टी आणि भाजप, शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाचे आणि अभिनंदनाचे फलक समर्थकांनी ठिकठिकाणी लावले. सोशल मिडियातही अतिउत्साही कार्यकर्ते अभिनंदनाचे आशय टाकत राहिले. प्रमुख सर्वच उमेदवारांचे समर्थक विजयाचा दावा करत आहेत.

--------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रँचोने घेतला अखेरचा श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर पोलिस दलाच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील 'रँचो' या श्वानाचा किरकोळ आजाराने बुधवारी मृत्यू झाला. शासकीय इतमामात सलामी देऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सलग सात वर्षांच्या सेवेनंतर रँचोने अखेरचा श्वास घेतला. अंत्यसंस्कारावेळी पोलिसांनाही अश्रू अनावर झाले. शनिवारी (ता. २५) त्याचा वाढदिवस होता. वाढदिवसापूर्वीचे त्याचा अकाली मृत्यू झाल्याने पोलिस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.

विविध गुन्ह्यांच्या तपासासह स्फोटक आणि बॉम्ब शोधण्याचे काम पोलिस दलातील श्वान पथकाकडून केले जाते. कोल्हापूर पोलिस दलात गुन्हे शोध श्वानपथकात स्टेला, बेला, ग्लोरी, झेबा आणि लिना असे पाच श्वान कार्यरत आहेत. या पथकातील रँचो श्वानाची प्रकृती गेल्या १५ दिवसांपासून बिघडली होती. त्याला यकृत आणि फुफ्फुसाचा त्रास सुरू झाल्याने त्याच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदन करून रँचोला बॉम्बशोधक नाशक कार्यालयासमोर आदरांजली वाहण्यात आली. बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देऊन त्याच्यावर सरकारी इमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने उपस्थित होते.

बॉम्बशोधक आणि नाशक पथकात 'रँचो' आणि 'रॉकी' असे दोन श्वान कार्यरत होते. दोघेही सख्खे भाऊ आहेत. २५ मे २०११ रोजी जन्म झालेल्या रँचो आणि रॉकीला इचलकरंजी येथील महेश सुतार यांच्याकडून आठ वर्षांपूर्वी पथकाने घेतले होते. त्यांना पुणे येथे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यापूर्वी हे दोन श्वान महत्त्वाची कामागिरी बजावत होते. श्री अंबाबाई मंदिरात दररोज या श्वानाकडून तपासणी केली जाते. या पथकातील पोलिस उपनिरीक्षक विकास टेके यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनर प्रकाश दुधाळे आणि जीवन कांबळे यांच्यासह १८ कर्मचारी या पथकात कार्यरत आहेत.

०००००

रँचोची कामगिरी

शाहू टोल नाक्याजवळ झालेल्या स्फोटावेळी मोलाची कामगिरी

अंबाबाई मंदिराची दररोज तपासणी

घरफोडी, चोरीचे गुन्हे उघड करण्यास मदत

०००

कोट....

रँचोच्या अकाली मृत्यूमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे काम आणि आठवणीने पोलिसांचे अश्रू अनावर झाले. रँचोची आठवण आमच्या कायम स्मरणात राहील.

प्रकाश दुधाळे, प्रशिक्षक

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वित्त’मधील आठ जणांचीहोणार खातेनिहाय चौकशी

$
0
0

जि. प. चा लोगो वापरावा....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम व त्या संदर्भातील पावत्यांच्या हिशेबाचे प्रकरण सध्या गाजत आहे. वित्त विभागातील ढिसाळ कामकाजामुळे कर्मचाऱ्यांना फटका बसला, हे प्रकरण ताजे असताना या विभागातील आठ अधिकाऱ्यांनी २००८-०९ पासूनचा खर्चाचा ताळेबंद सादर केला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आठजणांची खातेनिहाय चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यांना केव्हाही नोटिसा लागू होऊ शकतात.

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सीईओंच्या मान्यतेने हा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला आहे. वित्त विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांना ही नोटीस लागू होईल. पंचायत राज समितीने सप्टेंबर २०१८ मध्ये जिल्हा परिषदेचा दौरा केला होता. पंचायत राज समितीने दौऱ्यात वित्त विभागातील लेखा परीक्षाणावरून आक्षेप नोंदविले होते. पंचायत समितीकडून ज्या त्या महिन्याचा ताळेबंद वित्त विभागाकडे सादर होतो. या ताळेबंदातील त्रुटी, फरक आढळल्यास वित्त विभागाचे अधिकारी त्यामध्ये दुरुस्त्या सुचवितात. जमा-खर्चात आढळलेल्या त्रुटींबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, त्यांनी कसल्याही प्रकारची दुरुस्तीची कार्यवाही केली नाही.

याप्रकरणी हातकणंगले पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी शिवाजी कोळी, वरिष्ठ सहायक श्रीपती केरू, गगनबावड्याचे सहायक लेखाधिकारी संजय साबळे, वरिष्ठ सहायक सागरकुमार गावित, कागलचे सहायक लेखाधिकारी प्रवीण होगाडे, शाहूवाडीचे सहायक लेखाधिकारी बाळासाहेब पुजारी वरिष्ठ सहायक अशोक पाटील, सुहास आमटे यांच्यावर खर्चाचा ताळमेळ सादर केला नसल्याच्या तक्रारी होत्या. पंचायत राज समितीच्या दौऱ्यातही हा प्रश्न उपस्थित झाला होता समितीनेही कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव सीईओ मित्तल यांच्याकडे दिला होता. या प्रस्तावाला बुधवारी मान्यता मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार शेट्टींनी केली वायफायची खात्री

$
0
0

येथील राजाराम तलावाजवळील शासकीय गोदामात आज सकाळी आठ वाजता हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या परिसरात संशयास्पद वायफायची रेंज दाखवताच स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी बुधवारी सायंकाळी खात्री केली. निवडक कार्यकर्त्यांसह मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची भेट घेतली. परिसरात वायफाय सुविधा नसेल असे सांगण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी मोबाइलवर वायफायचे कनेक्श्न कसे दिसले, अशी विचारणा केली. त्यावेळी चाचणीसाठी वायफाय सुरू केल्याचे काटकर यांनी सांगितले. वायफायव्दारे इव्हीएम यंत्र हॅक होण्याच्या शक्यतेने सतर्क राहून शेट्टी यांनी खात्री करून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाया पडण्याच्या बहाण्याने गंठण लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पेठेतील फिरंगाई मंदिरासमोर दर्शन घेऊन बसलेल्या वृध्देला पत्ता विचारत पाया पडण्याच्या बहाण्याने चोरट्याने गळ्यातील गंठण लंपास केले. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वृध्देने गंठण हाताने ओढून धरल्याने ते तुटून सात ग्रॅमचे गंठण चोरट्याच्या हाती लागले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुक्मिणी परमानंद ढाले (वय ७०) या बुधवारी दुपारी फिरंगाई मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. उन्हाचा तडाखा असल्याने त्या मंदिराच्या बाहेर सावलीला बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ दुचाकीवरुन एक तरुण आला. खाली उतरुन त्यांना पत्ता विचारत पाया पडण्याचा बहाणा करीत त्याने थेट गळ्यात हात घालून गंठण हिसडा मारुन घेण्याचा प्रयत्न केला. ढाले यांनी हाताने गंठण धरुन ठेवल्याने ते अर्धवट तुटून चोरट्याच्या हाती लागले. त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटा दुचाकी घेऊन पसार झाला. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्याचा शोध पोलिस घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाच्या घातपाताची शक्यता

$
0
0

कोल्हापूर

डोक्याला गंभीर मार लागलेल्या सदरबाजार येथील गौतम अप्पासाहेब कांबळे (वय ३५) या तरुणाचा घातपात झाल्याची चर्चा आहे. मात्र शाहूपुरी पोलिसांनी डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची नोंद ठाण्यात केली आहे. प्राथमिक तपासात संशयास्पद पुरावे मिळाले नसून, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. दरम्यान, गौतमच्या जवळच्या नात्यातील व्यक्तीनेच त्याच्या डोक्यात काठी मारल्याने मृत्यू झाल्याचे समजते.

गौतम कांबळे हा ८ मे रोजी डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत शाहूपुरी पोलिस ठाण्यात आला होता. या ठिकाणी तो दारातच चक्कर येऊन बेशुद्ध पडला. पोलिसांनी त्याला रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. तेथे ९ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे नाव, पत्ता माहिती नसल्याने 'बेवारस मृत्यू' अशी नोंद करून 'सीपीआर'मध्ये शवविच्छेदन केले. या वेळी डोक्याला मार लागून रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी शोध घेतला असता, तो गौतम कांबळे असल्याचे समजले. त्याचे आई, वडील, भाऊ व पत्नी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गौतम हा बेरोजगार असून मद्यपी होता. आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे त्यांनी जबाबात लिहून दिले आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी गौतम कांबळे याचा खून झाला असून, शाहूपुरी पोलिसांनी हे प्रकरण दडपले असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेलनाडे बंधूंसह तलाठ्यावर खंडणीप्रकरणी गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कराराने कसायला घेतलेल्या जमिनीची खोट्या सातबाराद्वारे खरेदी करुन त्या जागेतून वाहतूक करण्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी संजय तेलनाडे याच्यासह पाचजणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुनिल तेलनाडे, अ‍ॅड. अमित सिंग, सागर कचरे व कबनूरचा तलाठी एस. बी. सुतार यांचा समावेश आहे. या प्रकरणी धुळाप्पा आप्पा पुजारी (वय ६२, रा. चंदूर) यांनी फिर्याद दिली आहे. तब्बल सात वर्षापासून हा प्रकार सुरु होता.

चंदूर येथील रहिवाशी धुळाप्पा पुजारी यांनी कबनुरातील गट क्रमांक ६५८ अ ही उदय मोरे व मानाजीराव चव्हाण आणि बापू चव्हाण यांच्या मालकीची शेतजमीन सन २००० मध्ये कराराने कसायला घेतली आहे. मात्र संजय तेलनाडे व सुनिल तेलनाडे यांनी कबनूर तलाठी सुतार याच्या संगनमताने या मिळकतीचा खोटा सातबारा तयार करुन मूळ वारसांपैकी चव्हाण बंधूंना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून सन २०१२ मध्ये ती खरेदी केली. या संदर्भात पुजारी अथवा मोरे यांची कोणत्याही प्रकारची संमती घेतली नाही. खरेदीनंतर सदरची मिळकत ही पुजारी यांच्याकडे कसायला असल्याने कायदेशीरपणे ती जागा आपल्या कब्जात येणार नाही हे लक्षात आल्यानंतर सुनिल तेलनाडे, सागर कचरे व अ‍ॅड. अमित सिंग यांनी पुजारी यांना सातत्याने दमदाटी करत पुजारी व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. सन २०१२ पासून फेब्रुवारी २०१९ पर्यंत हा प्रकार सुरु होता. तेलनाडे याने खरेदी केलेल्या मिळकतीतून ऊस व पिक वाहतूक करण्यासाठी पुजारी यांच्याकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.

शहर व परिसरात तेलनाडेची दहशत असल्याने पुजारी यांनी या प्रकरणाची आजतागायत कोठेही वाच्यता केली नव्हती. मात्र तेलनाडे बंधूंच्या गँगवर मोक्काची कारवाई केल्यानंतर पोलिस दलाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार पुजारी यांनी शिवाजीनगर पोलिसात रितसर तक्रार दाखल केली . तेलनाडे टोळीविरुध्द अन्य कोणाच्या तक्रारी असतील त्यांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी कराव्यात त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, या जमिनीच्या खरेदीपोटी तेलनाडे बंधूंनी चव्हाण यांना धनादेश दिले होते. मात्र ते न वटता परत आल्याने चव्हाण यांनी न्यायालयात तक्रारही दाखल केली होती. तक्रार दिल्यानंतर तेलनाडे याच्या सांगण्यावरुन सुनिल तेलनाडे, सागर कचरे व अमित सिंग यांनी चव्हाण बंधूंना दमदाटी करत ही तक्रार मागे घेण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे.

संजय व सुनिल तेलनाडे यांच्यासह त्यांच्या एसटी सरकार गँगवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. मागील दहा वर्षात तेलनाडे बंधूंनी अवैधरित्या मिळविलेल्या मालमत्तेची चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांकडेही चौकशी केली जाणार असून त्याने अन्य कोणाच्या नावे मिळकती अथवा आर्थिक व्यवहार केले आहेत, अशांकडेही चौकशी करुन कारवाई केली जात आहे. या खंडणी प्रकरणाचा तपास करुन या टोळीवर मोक्का लावण्यात येणार असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

....

स्वतंत्र पथक तैनात

मोक्का लावण्यात आलेल्या नगरसेवक संजय व सुनिल तेलनाडे बंधूंच्या शोधासाठी एक स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले असून एक तांत्रिक टीमही कार्यरत आहे. एक पोलिस निरिक्षक, एक सहाय्यक पोलिस निरिक्षक व चार पोलिस कर्मचारी यांचे पथक तैनात करुन ते सातत्याने तेलनाडे बंधूंच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच बंगला परिसरात महिलांच्यात हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी पाच बंगला परिसरात आठ ते दहा महिलांमध्ये किरकोळ वादावादीतून बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जोरदार हाणामारी झाली. यावेळी त्यांच्या झटापटीमध्ये परिसरात पार्क केलेल्या पाच ते सहा दुचाकींची तोडफोड झाली. अचानक घडलेल्या या प्रकाराने परिसरात तणाव पसरला. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, शाहूपुरी पाच बंगला स्टार टॉवर परिसरात बुधवारी दुपारी साडेबारा वाजता या परिसरातील दहा ते बारा महिलांच्यात किरकोळ कारणावरुन वादावादी झाली. महिलांनी शिवीगाळ सुरु केल्याने हा वाद वाढत गेला. एकमेकाच्या अंगावर धावून गेल्याने पळापळ झाली. काहींनी दगड भिरकावल्याने महिलांच्यात राडा झाला. परिसरातील छोट्या गल्लीत मिळेल त्या ठिकाणी त्या धावत सुटल्या. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजार जण जिल्ह्यातून हद्दपार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर दोन राजकीय गट एकमेकांसमोर येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासह कोल्हापूर परिक्षेत्रात शांतता भंग करणाऱ्या सुमारे एक हजार जणांना हद्दपार होण्याच्या नोटिसा बजाविल्या असून कोल्हापुरातील चारशे जणांचा समावेश असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी दिली.

डॉ. वारके म्हणाले, 'कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, मुरगूड, इचलकरंजी, याठिकाणी केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) आणि राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपीएफ) प्रत्येक एक तुकडी तैनात केली आहे. सांगलीमध्ये दोन राजकीय गट, सातारा येथेही दोन राजकीय गट आमने सामने येऊन वाद निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत. सांगली जिल्ह्यात तासगाव, आटपाडी, मिरज ही संवेदनशील ठिकाणे आहेत. सातारा येथेही दोन राजकीय नेत्यांच्या समर्थकांच्या वाद होण्याची शक्यता गृहीत धरून ४०० हून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पुणे ग्रामीणमध्ये बारामती, दौंड आणि सोलापूर येथे बंदोबस्त तैनात केला आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातही काही सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, सराईत गुंड आणि प्रक्षोभक वक्तव्य करुन सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्यांना नोटिसा बजाविल्या आहेत.

अॅडमिनवर गुन्हा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग करणारे काही मेसेस सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यास संबधित पोस्ट व्हायरल करणारा आणि त्या ग्रुपच्या अॅडमिनवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परिक्षेत्रातील सायबर शाखांना या विशेष सूचना दिल्या आहेत. विजयी आणि पराभूत झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्ते, त्यांच्या समर्थकांनी व्हायरल केलेल्या पोस्ट कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणाऱ्या असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

चार हजारांवर पोलिस बंदोबस्त

'लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात ४१४० जणांचा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. विनापरवानगी विजयी मिरवणूक काढल्यास गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. मतमोजणीनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दोन्ही मतदारासंघातील ३३ ठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पक्ष कार्यालय, उमेदवारांची निवासस्थाने, महत्त्वाच्या चौकांत स्वतंत्र पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मतमोजणीच्या ठिकाणी सुमारे २०० मीटर परिसरात गुलाल, फटाके उडविण्यास, विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे. शहरात विनापरवानगी विजयी मिरवणूक काढता येणार नाही. ही मिरवणूक काढल्यास संबधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. मतमोजणी परिसराच्या दोनशे मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची हत्यारे, मोबाइल, कॉर्डलेस फोन, स्पीकर, खासगी वाहने नेण्यास, मजकूर छापणे-प्रसिद्ध करण्यास मज्जाव केला आहे.

तैनात केलेला बंदोबस्त

२४००

पोलिस

१५०

अधिकारी

१ तुकडी

एसआरपीएफ पथक

१५००

होमगार्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images