Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तूट भरुन काढण्याचे आव्हान

$
0
0

महापालिका लोगो

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

मार्चअखेरीस वसुली मोहीम जोरदार राबवल्यानंतरही महापालिका प्रशासनाला २०१८-१९ आर्थिक वर्षामध्ये दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आले. नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होईपर्यंत ४३६ कोटी उद्दिष्टापैकी ३०३ कोटींचा महसूल कसाबसा जमा झाला. परिणामी तब्बल १३३ कोटींची तूट निर्माण झाली आहे. अपेक्षत उद्दिष्टाचा टप्पा पार करता न आल्याने त्याचा पुढील वर्षातील विकासकामांवर निश्चितच परिणाम दिसून येईल. तूट भरुन काढण्याबरोबर नव्या आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नव्या उत्पन्नाच्या स्रोतांचा धांडोळा प्रशासनाबरोबर, सभागृहालाही घ्यावा लागेल.

२०१८-१९ चा महापालिकेचा आर्थसंकल्प मांडताना प्रशासनाला ४३६ कोटी महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले होते. यामध्ये प्रामुख्याने घरफाळा, पाणीपुरवठा, नगररचना, इस्टेट आणि परवाना विभागांवर भिस्त ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या एलबीटी व मुंद्राक शुल्क अनुदानाचाही समावेश होता. गेल्या दहा वर्षात महापालिकेचे उत्पन्न ३०० कोटीच्या पुढे गेलेले नाही, ही वस्तुस्थिती असताना उद्दिष्टाचा आकडा प्रचंड फुगवण्यात आला. नागरिकांचा रोष पत्करण्यास सभागृह इच्छुक नसल्याने स्थानिक करात वाढ करण्याचे सर्व पर्याय बंद असताना दिलेले उद्दिष्ट कसे पूर्ण करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला. परिणामी ३०० कोटींचा टप्पा पार करतानाही प्रश्नासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

घरफाळा व पाणीपुरवठा विभागाने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी 'सवलत योजना' जाहीर केली. घरफाळा विभागाने जानेवारीपासून तर पाणीपुरवठा विभागाने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस योजना जाहीर केली. परिणामी दोन्ही विभागांची वसुली ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली. मात्र इतर अनेक ‌विभागांचे न्यायालयीने दावे, बांधकाम विभागाला लागू झालेली नियमावली त्याचा परिणाम वसुलीवर स्पष्टपणे दिसून आला. घरफाळा विभागाने ६२ कोटी तर पाणीपुरवठा विभागाने ५८ कोटी वसूल करुन मनपाच्या तिजोरीत मोठी भर घातली असली, तरी घरफाळा व पाणीपट्टी न भरणारे मोठे थकबाकीदार अजूनही मोकाट आहेत. विशेषत: सरकारी कार्यालयांकडील थकीत पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे. 'ड' वर्ग नियमावली आणि सरकारलाही परवाना स्वरुपात मोठी रक्कम मनपा तिजोरीतील गेल्याने वसुली कमी राहिली. इस्टेट विभागाकडील गाळेधारकांच्या भाडेपट्टीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नाने वसुलीवर गंभीर परिणाम केला आहे.

महापालिकेच्या एकूण उत्पन्नातील ६३ टक्के खर्च प्रशासनावर होत असल्याने उर्वरीत शिल्लकीतून शहराचा विकास कसा करायचा अशा प्रश्न निर्माण होणार आहे. दीड वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. निवडणुकीपूर्वी प्रत्येक नगरसेवक प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधीची मागणी करणार, त्यांची मागणी कशी पूर्ण करायची असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होणार आहे.

...........................

चौकट

पालिकेच्या तिजोरीवर गंभीर परिणाम

जकात बंद झाल्यानंतर स्थानिक संस्था कर (एलबीटी) सुरू करण्यात आला. २०११ ते १५ पर्यंतच यातून महापालिकेला दरवर्षी ११० ते १२५ कोटीचे उत्पन्न मिळत होते. नंतर २०१५ मध्ये राज्य सरकारने एलबीटी बंद करुन महापालिकांना मासिक अनुदान सुरू केले. पण यामध्ये नियमितता नसल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.

................

चौकट

विभाग निहाय वसुली

विभाग उद्दिष्ट वसुली

घरफाळा ६९ कोटी २८ लाख ६२ कोटी ४२ लाख

नगररचना ५४ कोटी ९२ लाख ३७ कोटी ३७ लाख

एलबीटी १४२ कोटी १३१ कोटी

इस्टेट ३४ कोटी ३९ लाख पाच कोटी २९ लाख

परवाना ५ कोटी १३ लाख दोन कोटी ४९ लाख

पाणीपुरवाठा ५८ कोटी ९९ लाख ५२ कोटी ७० लाख

एकूण महसुली बजेट ४३६ कोटी ३०३ कोटी १४ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेर्लेतील तिघांच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा

$
0
0

२ सिंगल फोटो..

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहिता स्वाती पाटील हिने दोन लहान मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पती, सासू, सासरा, विवाहित नणंद अशा चौघांवर शाहूवाडी पोलिसांत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. शारीरिक छळ करून मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद स्वातीचे वडील कृष्णा देवजी धुमाळ (वय ७२, मूळ गाव भाटशिरगाव, सध्या रा. घनसोली, नवी मुंबई) यांनी शाहूवाडी पोलिसांत दिली. पती महेश शिवाजी पाटील, सासरा शिवाजी बापू पाटील, सासू नंदा शिवाजी पाटील (तिघेही रा. नर्ले) तसेच नणंद सारिका पाटील (रा. सोनवडे, ता. शाहूवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता नेर्ले येथे तिन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी सासरा शिवाजी पाटील व सासू नंदा पाटील यांना सकाळी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, नर्ले येथील माजी सैनिक शिवाजी बापू पाटील पत्नी नंदा, सून स्वाती, नात विभावरी, नातू देवांश यांच्यासह गावी राहत होते, तर स्वातीचा पती महेश सध्या सैन्यात जैसलमेर (राजस्थान) येथे सेवेत असून, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तो तिथून गावी निघाला आहे. भाटशिरगाव (ता. शिराळा) स्वातीचे माहेर असून, तिचे वडील कृष्णा धुमाळ प्रिंटिंग व्यवसायानिमित्त सध्या पत्नीसह नवी मुंबईत वास्तव्यास असतात. स्वातीने दोन मुलांसह आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर वडील कृष्णा धुमाळ यांनी घटनास्थळी दाखल होईपर्यंत मृतदेह हलवू नये म्हणून शाहूवाडी पोलिसांना कळविले होते.

गुरुवारी रात्री उशिरा साडेदहाच्या सुमारास धुमाळ नातेवाइकांसह नेर्लेत पोहोचले. धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्वातीचे लग्न सन २०१३ मध्ये महेशशी झाले तेव्हा १५ तोळे सोने आणि एक लाख रुपये हुंडा दिला होता. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत सासरच्यांकडून स्वातीचा छळ सुरू झाला. यात चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण, मानसिक छळ करून सतत कोंडमारा केला जात होता. मध्यंतरी सासरच्यांनी तिला माहेरी पाठवून पुन्हा नांदविण्यास नकार दिला होता. जावई महेश, नणंद सारिका यांचाही आई-वडिलांना पाठिंबा मिळत असल्याने स्वाती प्रचंड तणावाखाली होती. त्यातून तिने हे कृत्य केले.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी स्वातीने काहीक्षण आगोदर मोबाइलवरून संपर्क केलेल्यांमध्ये पती महेश याच्याशीही ती बोलल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांनी रात्री दीड वाजता घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानानंतर आचारसंहिता होणार शिथील

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीचा अतिरेक झाल्याने सर्वच घटकांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे परिणाम जाणवत आहे. यामुळे आचारसंहिता कधी संपणार, अशी विचारणा सर्वत्र होत आहे. दरम्यान, २३ एप्रिलला मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथील करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

दहा मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून रात्री साडेदहाच्याआत शहरातील हॉटेल बंद करण्याची सक्ती केली आहे. परिणामी रात्री उशिरा येणाऱ्या पर्यटकांना रात्रभर उपाशी राहावे लागत आहे. धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक कार्यक्रमांनाही परवानगीची सक्ती केली आहे. एक लाखांपेक्षा अधिक रक्कम काढणाऱ्यांच्या बँक खात्यावर वॉच आहे. आचारसंहिता अंमलबजावणी पथकाकडून बेहिशोबी पैसे जप्त केले जात आहेत. त्याची एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. म्हणून मतमोजणीनंतर म्हणजे २३ मेनंतर कि २३ एप्रिलला मतदानानंतर आचारसंहिता शिथील होणार यासंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र मतदानानंतर शिथिल होणार असल्याने आचारसंहितेचा जाच आणखी चार दिवस सहन करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात परिवर्तन निश्चितमाधव भंडारी यांचा विश्वास

$
0
0

साताऱ्यात परिवर्तन निश्चित

माधव भंडारी यांचा विश्वास

कराड :

'सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना प्रचारामध्ये मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता या मतदारसंघात परिवर्तन निश्चित आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र पाटील यांच्या पाठिशी उभे रहा,' असे आवाहन भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. मेढा येथे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी उमेदवार नरेंद्र पाटील, माजी आमदार दगडू सपकाळ, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, अमित कदम आदी उपस्थित होते.

भंडारी म्हणाले, 'या विभागातील धरणांची कामे अपूर्ण राहिली आहेत. धरणे सध्या पूर्ण नाहीत, ती पूर्ण करण्यासाठी व अन् कामे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. हे युतीचे सरकार नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. नरेंद्र पाटील तुमच्यासाठी कधीही उपलब्ध होणारे असे नेते आहेत. त्यामुळे नरेंद्र पाटील सातारा जिल्ह्यासाठी नक्कीच सर्व गोरगरिबांना मदत करतील. नरेंद्र पाटील एक भक्कम विकासाच्या दिशेने चालणारे नेतृत्व आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नरेंद्र पाटील यांनी प्रचंड मतांनी विजयी करा.'

...........

कराडमध्ये आंबेडकर, ओवेसींची सभा

कराड :

सातारा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर आणि असुदुद्दीन ओवेसी यांची रविवारी सकाळी अकरा वाजता जनता व्यासपीठावर जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने देण्यात आली.

संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून दडपशाही सुरू आहे, असा आरोप ही करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहीर प्रचाराची सांगता उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी उद्या, रविवारी (ता. २१) सायंकाळी सहानंतर जाहीर प्रचाराची सांगता होईल. त्यानंतर मतदान होईपर्यंत जिल्ह्याबाहेरील राजकीय पक्षांशी निगडीत व्यक्ती तसेच प्रचारात कार्यरत होते अशांना जिल्ह्यात थांबता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली.

पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघासाठी मंगळवारी २३ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होत आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२६ अन्वये मतदानाआधी ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करण्याची तरतूद केली आहे. मतदारसंघाबाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे वातावरण मुक्त व निपक्ष राहण्यात अडचण येऊ शकते. यामुळे सर्वच उमेदवारांनी मतरसंघात नाव नसलेल्यांना आपल्या गावी जाण्यास सांगाावे. जाहीर प्रचार संपल्यानंतर निवडणूक प्रशासन, पोलिस प्रशासनाने दक्ष राहून प्रचारासाठी आलेली बाहेरील व्यक्ती मतदारसंघात राहणार नाहीत, त्याची खात्री करावी. यासाठी पोलिस प्रशासनाने कल्याण मंडप, समाज मंदिरांची तपासणी करावी. तसेच सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करावी, समूह मतदारांवर लक्ष केंद्रीत करावे.

...................

चौकट

जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण

करणे बंधनकारक

मतदान आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे २२ व २३ एप्रिलला वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. रविवारपासून मतदान होईपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आहे. बेकायदेशीर जमाव जमविणे, सार्वजनिक सभा, बैठका घेणे, पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. मात्र मतदानासाठी घरोघरी भेटी देता येते, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुतार लोहार समाजातील नागरिकांचा सत्कार

$
0
0

कोल्हापूर

सुतार लोहार समाजातील १०० ज्येष्ठ नागरिकांचा येत्या मे महिन्यात सत्कार करण्यात येणार आहे. यानिमित्ताने कला, क्रीडा, यांत्रिकी, अभियांत्रिकी या क्षेत्रात ठसा उमटविलेल्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव होणार असल्याची माहिती सुतार, लोहार समाज उन्नती संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा राधा रवींद्र मेस्त्री यांनी दिली.

कार्यक्रमाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत सखी उन्नती मंचच्या अध्यक्षा रुपाली सातार्डेकर, सुरेखा सुतार, शोभा सुतार, सुनंदा सुतार, लता लोहार, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सुतार, अमित सुतार आदींची भाषणे झाली. वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी सुतार लोहार समाज उन्नती संस्था कार्यालय, लोळगे हॉल, फिरंगाई दवाखान्यासमोर येथे दुपारी चार ते सात या वेळेत फोटोसहित नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे संस्थापक दिगंबर लोहार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'सत्ताधारी भाजप सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखली. शेतकरी, कष्टकरी, वंचित घटकांवर सातत्याने अन्याय केला आहे. अल्पसंख्याक, दलित, मागासवर्गीयांची गळचेपी करणाऱ्या मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचा,' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी अकबर मोहल्ला येथे सभेचे आयोजन केले होते. मलिक म्हणाले, 'भाजप सरकार हे संविधानविरोधी आहे. जातीयवादी शक्तींना निवडून दिल्यास देशात अराजकता माजेल. देशाच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला निवडून द्या. महाआघाडीकडे सत्ता दिल्यास देशात धर्मनिरपेक्षता राहील. अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या खासदार महाडिकांना पुन्हा विजयी करा.' माजी सभापती आदिल फरास म्हणाले, 'देशाला सक्षम बनविण्यासाठी बहुजन समाजाने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठीशी राहावे. गांधी परिवाराचे देशासाठी असलेले योगदान विसरुन चालणार नाही.'कृष्णराज महाडिक यांचेही यावेळी भाषण झाले. याप्रसंगी नगरसेविका रियाज सुभेदार, बिलाल गडकरी, आरिफ काझी, बादशहा शेख, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, नसिब महात, शमशाद नदाफ आदी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला भाजप, शिवसेना सरकारने बासनात गुंडाळून ठेवले आहे. त्याचा कोल्हापुरातील फेरीवाल्यांना फटका बसला. फेरीवाल्यांच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी खासदार महाडिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. आगामी निवडणुकीत शहरातील फेरीवाल्यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा काँग्रेसच्या फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष महंमदशरीफ शेख यांनी केली. लक्ष्मीपुरी येथील आघाडीच्या प्रचार कार्यालयात शहरातील असंघटित फेरीवाल्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी रियाज कागदी, रणजित पोवार यांची भाषणे झाली. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी, जोतिराम बाचूळकर, राजाराम पाटोळे, जहिदा मुजावर, सुनीता राऊत, गणपतराव बागडी, संजय कुराडे आदी उपस्थित होते. .............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरेवाडीत पालकमंत्र्यांची प्रचारफेरी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोरेवाडी, कळंबा, हणबरवाडी या गावात प्रचारफेरी काढली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, 'गोकुळ'चे संचालक बाबा देसाई यांच्यास युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत विराज पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन कार्यकर्त्यासोबत चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापुरातील उमेदवारांची धाकधूक वाढली

$
0
0

सोलापुरातील उमेदवारांची धाकधूक वाढली

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी १९ लाख ५० हजार मतदारापैकी १० लाख ८१ हजार ३८६ म्हणजेच ५८. ४५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या लोकसभेच्या तुलनेत ही टक्केवारी वाढल्याचे दिसत असले तरी मतदारांच्या संख्येत दीड लाखाने वाढ झाली आहे. हे पाहता मतदानाचा टक्का फारसा वाढला नसल्याचे दिसून आले आहे. सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्वर महास्वामी, प्रकाश आंबेडकर हे तीन प्रबळ उमेदवार आणि मतदारसंघातील जातीय समीकरणे या पार्श्वभूमीवर आता सर्वजण आकडेमोडीत गुंतले आहेत. एकूणच तीन ही दिग्ग्जांची धाकधूक वाढली असल्याचे दिसत आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात २०१४ साली ९ लाख ५१ हजार मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यामध्ये ५ लाख १७ हजार ८७९ मते घेऊन भाजपचे शरद बनसोडे दीड लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना ३ लाख ६८ हजार ३०५ मते मिळाली होती. यंदा भाजपचे महास्वामी, काँग्रेसचे शिंदे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार आंबेडकर यांच्यासह १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. मात्र, गुरुवारी झालेल्या मतदानात व शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून मतदानाचा टक्का फारसा वाढला नसल्याचे दिसून आले. परंतु, झालेले ५८. ४५ टक्के मतदान कोणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता वाढली आहे.

विधानसभानिहाय आकडेवारी (टक्के)

मोहोळ : ६४. ०८

सोलापूर शहर उत्तर : ५८. ७९

सोलापूर शहर मध्य : ५५. ०८

अक्कलकोट : ५६. ८६

सोलापूर दक्षिण : ५६. ४९

पंढरपूर : ५९. ४४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेवर अत्याचार, तिघा सावकारांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजाराच्या व्याजापोटी चार महिने अत्याचार केल्याप्रकरणी तीन सावकारांवर शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सद्दाम मुल्ला (रा. यादवनगर), हरिष स्वामी (रा. रुईकर कॉलनी), आशीष पाटील (रा. सायबर चौक, राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत. पीडितेच्या पतीने यापूर्वी तक्रार देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भेट घेतली. त्यांनी शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी सांगितले की, कळंबा परिसरातील युवतीने पुणे येथील एका युवकासोबत सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला आहे. त्याला कोल्हापुरात व्यवसाय सुरू करायचा होता. त्याने रुईकर कॉलनीतील मित्र हरीष स्वामीच्या मदतीने मुल्ला व पाटीलकडून ३० हजार रुपये व्याजाने घेतले. त्यासाठी दिवसाला ३ हजार रुपये व्याज देण्याची अट घातली. त्या युवकाने तीन दिवसांचे १० हजार ५०० रुपये व्याज दिले. मात्र चौथ्या दिवसापासून व्याज दिले नसल्याने मुल्लाने तगादा लावला. त्याने विवाहितेला कॉलसह व्हॉट्स अॅप मेसेज केले. व्याजाचे पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्याने पैशाच्या बदल्यात तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. मुल्लाने त्यानंतर परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आणखी दोन मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. त्याला नकार दिल्याने शिवीगाळ केली. तिच्या पतीला अज्ञात ठिकाणी नेऊन मारहाण केली. हा त्रास सहन न झाल्याने पीडितेने ‘अंनिस’शी संपर्क साधला. सीमा पाटील, गीता हसूरकर, मंगल पवार यांनी पीडितेसह पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

युवती उच्चशिक्षित

पीडिता अभियांत्रिकी शाखेची पदवीधर आहे. तिचे आजोबा नुकतेच पोलिस उपअधीक्षक पदावरुन निवृत्त झाले आहेत. प्रेमविवाहाला घरच्या मंडळींचा विरोध होता. त्यामुळे काही दिवस नातेसंबंध दुरावले होते. तिला कुणाचाही आधार नसल्याने तिघा सावकारांनी गैरफायदा घेतला.

पीडित विवाहितेच्या जबाबावरुन संशयित तिघा सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे. संशयितांना लवकरच अटक करू.
प्रेरणा कट्टे, शहर पोलिस उपअधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदीजी तुमचे व यशोदाबेनचे काय झालेः मुंडे

$
0
0

पंढरपूर

भाजप वाल्यांना स्वतःचे लेकरु होत नाही. मात्र, बारसं करायची हौस असल्याने शेजाऱ्याचं लेकरु आणून पाळण्यात घालतात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज भाजपवर टीका केली. भाजपचे ८० टक्के उमेदवार हे काँग्रेस, राष्ट्रवादीमधून आयात केलेले आहेत. आपल्या लेकरांवर हे बारशाचा आनंद घेतात आणि कमळ फुलले, असे सांगत भाजपच्या इनकमिंगवर निशाणा साधला.

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारासाठी आज कुर्डुवाडी येथील सभेत मुंडे बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. तुम्ही पवार यांच्या घरापर्यंत पोहचत असाल तर मी तुमच्या घरात घुसू का? असा सवाल मुंडे यांनी केला. मोदीसाहेब तुमचे आणि यशोदाबेनचे काय झाले? हे तरी सांगा असं म्हणत मुंडे यांनी थेट मोदींना टोला लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईने पोटच्या दोन मुलींना विष पाजून मारले

$
0
0

सोलापूर, प्रतिनिधी

पतीसोबत झालेल्या भांडणातून सोलापूरमधील रेश्मा भोसले या महिलेने पोटच्या दोन मुलींना विषपाजून मारले. यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. रेश्मावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोलापूरच्या उत्तर भागात नान्नज गावापासून काही अंतरावर कृष्णा भोसले आणि रेश्मा भोसले हे शेतात राहतात. शेतमजुरी करून हे कुटुंब आपली उपजीविका करत होतं. पती व पत्नीमध्ये आज सकाळी भांडण झालं. याचा राग मनात धरून रेष्मा भोसले (वय २९) हिने श्रावणी (वय ४) आणि श्रेया (वय २) या आपल्या पोटच्या दोन मुलींना विष पाजले. शेतातील फवारणीचे घरात ठेवलेले कराटे नावाचे विषारी औषध तिने मुलींनी दिले. नंतर स्वतः औषध पिण्याचा आणि घरात दोरखंड लावून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर घरासमोरील मोठ्या सिंटेक्स टाकीमध्ये उडी घेतली. पण शेजारच्या काही व्यक्तींनी तिला बाहेर काढलं. तसंच दोन्ही मृत मुलींना व रेश्मा भोसले हिला सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. या घडलेल्या घटनेने नान्नज व परिसरातून हळहळ व्यक्त होतेय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद पडलेल्या इंजिनचा उपयोग होणार नाही: देवेंद्र फडणवीस

$
0
0

सातारा:

कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोदी भयाने पछाडले आहे. त्यांना मोदी द्वेष करण्यापलिकडे काहीच काम नाही. शरद पवारांनी साताऱ्यात बंद पडलेल इंजिन कितीही चालवले तरी त्याचा उपयोग होणार नाही. देशाचे भवितव्य कोणाच्या हाती सुरक्षित असणार आहे याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे, त्यामुळे बालाकोटवरील कारवाईचे पुरावे मागणाऱ्या जातीयवादी शक्तींना भीक न घालता राष्ट्रीय अस्मितेसाठी नरेंद्र मोदी याचे हात बळकट करा,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात केले.

गांधी मैदानावर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, 'यंदा महायुतीने नरेंद्र पाटील यांच्या सारखा उमदा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. देशाचे स्थैर्य, सुरक्षितता, अस्मिता , याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे. गेल्या ५५ वर्षांत काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारचा भ्रष्टाचार व अनाचार देशाने पाहिला. गेल्या पाच वर्षांत मोदींनी सामान्य माणसाचे पार दर्शी सरकार दिले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात देशाची सूत्र कोणाच्या हाती द्यायचे याचे उत्तर स्पष्ट झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचा राजकीय रंगारंग बघून राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी माघार घेतली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक प्रचार शिगेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला', 'कुठं बी हुडीक, मुन्ना महाडिक' अशा दुमदुमणाऱ्या घोषणा, वाजतगाजत गल्लीबोळातून निघालेल्या पदयात्रा, गळ्यात मफलर, डोक्यावर टोपी आणि उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत शहर पिंजून काढणारे कार्यकर्ते यामुळे शनिवारी कोल्हापूर शहर आणि परिसरातील प्रचार शिगेला पोहोचला. शिवसेना-भाजप महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची नेतेमंडळी पदयात्रेत उतरल्यामुळे प्रचाराची खुमारी आणखी वाढली. उमेदवारांसह मंत्री, आमदारांनी शहराच्या विविध भागांत पदयात्रा काढल्याने प्रचारात रंग भरला.

राजारामपुरी, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, गंगावेश, रंकाळा टॉवर, उत्तरेश्वर पेठ, बुधवार पेठेत सानेगुरुजी वसाहत, नागाळा पार्क, कदमवाडी, कसबा बावडा या परिसरातील प्रचारफेऱ्यांनी वातावरण ढवळून निघाले. मोठ्या पदयात्रा आणि घोषणाबाजीमुळे कार्यकर्त्यांतील टोकाची ईर्षाही अनुभवली. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा दणदणाट रात्री दहापर्यंत सुरू होता. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रचारात कुठलीच कसर राहू नये यासाठी सर्वच नेत्यांनी पायाला भिंगरी बांधली होती.

शनिवारी सकाळी साधारणपणे नऊच्या सुमारास शहराच्या दोन वेगवेगळ्या भागांत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी प्रचाराला प्रारंभ केला. युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रचाराच्या मैदानात उतरले. राजारामपुरी जनता बझार येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगरचे अध्यक्ष संदीप देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, भाजपचे पदाधिकारी विजय जाधव, उद्योजक चंद्रकांत जाधव, शिवसेनेचे दुर्गेश लिंग्रस, आदींच्या उपस्थितीत पदयात्रा निघाली. त्यापाठोपाठ मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, रंकाळा टॉवर, नागाळा पार्क भागात धडाक्यात पदयात्रा निघाली.

०००

राष्ट्रवादीच्या पदयात्रेला प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी सकाळी गंगावेश, रंकाळा बसस्थानक परिसर, रंकाळा टॉवर, दुधाळी, वाघाची तालीम परिसर पिंजून काढला. सकाळी नऊच्या सुमारास गंगावेश येथील कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पदयात्रेला प्रारंभ झाला. नगरसेवक किरण शिराळे, शेखर कुसाळे, ईश्वर परमार, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, विकी महाडिक, सतीश धरपणकर, अमोल पाटील, विराज चिखलीकर, नाना आयरेकर यांचा पदयात्रेत सहभाग होता. उत्तरेश्वर पेठेनंतर पदयात्रा शुक्रवार पेठ जैन गल्लीतून बुधवार पेठेत दाखल झाली. सायंकाळी क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, मंडलिक वसाहत, सुभाष रोड, सानेगुरुजी वसाहत, तुळजाभवानी कॉलनीत काढलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

००००

बावड्यात सेनेच्या प्रचारफेरीत काँग्रेसचे नगरसेवक

प्रा. मंडलिक यांच्या प्रचारार्थ आमदार राजेश क्षीरसागर यांनी कसबा बावड्यात पदयात्रा काढली. या प्रचारफेरीत शिवसेनेसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक नगरसेवक मोहन सालपे फेरीच्या अग्रभागी होते. याशिवाय दिनकर उलपे, संजय लाड, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, भीमराव बिरंजे, राजू काझी, राहुल माळी यांच्यासह श्रीराम सोसायटीचे आजी-माजी संचालकांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरंगाईदेवीची पालखी सोमवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फिरंगाई तालीम मंडळातर्फे फिरंगाई देवी पालखी सोहळा सोमवारी (ता. २२) होणार आहे. फिरंगाई देवी मंदिर, फिरंगाई तरुण मंडळ, न्यू गणेश तरुण मंडळ, शाहू फ्रेंडस सर्कल, चॅलेंज ग्रुप, फिरंगाई तालीम, विद्यार्थी कामगार मित्र मंडळ, लाल चौक मित्र मंडळ ते पुन्हा फिरंगाई मंदिर असा पालखी मार्ग आहे. रात्री नऊ वाजता पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. याप्रसंगी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पालखी सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रविकिरण इंगवले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेते-अभिनेत्यांनी प्रचारात रंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांनी प्रचारात रंग भरला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची जयसिंगपूर येथील टोलेबाजी आणि आदेश बांदेकर, अंकुश चौधरी यांच्यासह हिंदी-दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाशराज यांचा प्रचारात सहभाग हे यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील विशेष आकर्षण ठरले. पक्षाचा उमेदवार मैदानात नसतानाही राज ठाकरे यांनी प्रचंड टोलेबाजी करत राजकीय आखाडा गाजवला.

कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक तर हातकणंगलेत स्वाभिमनीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे प्रचारात आहेत. दरम्यान, प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना, भाजपाने संयुक्त सभा घेत वातावरण निर्मिती केली. युतीच्या प्रचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात प्रचाराचे रणशिंग फुंकले. याप्रसंगी राज्यमंत्रीमंडळातील बहुतांश मंत्र्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार ही मंडळी प्रचाराची आघाडी सांभाळत आहेत.

आघाडीचे नेते मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्ष आघाडीही प्रचारात आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन वेळा कोल्हापूर दौरा, त्यांच्या उपस्थितीत कागल, पेठवडगाव, गांधी मैदान येथील जाहीर सभेने कार्यकर्त्यांना चार्ज केले. राष्ट्रवादी काँग्रेसने गांधी मैदान येथे जंगी सभा घेऊन शक्तीप्रदर्शन केले. आरपीआयचे जोगेंद्र कवाडे यांचे भाषण गाजले. आघाडीच्या प्रचारात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी.एन. पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, स्वाभिमानीचे प्रा. जालिंदर पाटील, प्रा. मच्छिंद्र सकटे हे आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म टा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाचा चौकशी अहवाल समितीकडून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सादर केला आहे. मित्तल यांनी या अहवालाच्या आधारे राज्य सरकारकडे माहिती सादर केली आहे. प्रशासनाने कारवाईची शिफारस केल्याचे वृत्त आहे.

शिक्षणाधिकारी लोहार यांच्या कामकाजावरुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय गाजला होता. त्यांच्या कामकाजाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. समिती सदस्यांच्या स्वाक्षरीसह हा अहवाल सीईओ मित्तल यांच्याकडे सादर केला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून त्यांच्या कामकाजाच्या चौकशी समितीचा अहवाल आणि शिफारशी सरकारकडे पाठविला आहे. यासंदर्भात मित्तल यांच्याशी संपर्क साधला, 'चौकशी समितीचा अहवाल हा गोपनीय आहे. त्या संदर्भात सरकारकडे माहिती कळविली आहे' असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद सदस्यांना भाजपकडून नोटीस

$
0
0

जिल्हा परिषद सदस्यांना भाजपकडून नोटीस

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विरोधी उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, पदाधिकाऱ्यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. करवीर तालुका अध्यक्ष वसंत पाटील, तालुका उपाध्यक्ष नितीन संकपाळ, जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, मनीषा टोणपे, संध्याराणी बेडगे, पंचायत समिती सदस्य रमेश चौगले, सरिता कटेजा, सुरेखा सातपुते, प्रकाश टोणपे, विलास बेडगे, शंकर सातपुते यांना जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांना पक्षातून निलंबित करण्यात का येऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्यवस्थापन’ची होणार तातडीची बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुबार पदवी प्रमाणपत्राची छपाई, प्रमाणपत्रावरील एका सहीचा घोळ याप्रश्नी पेचात सापडलेल्या विद्यापीठ प्रशासनाने व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे. प्रशासनाकडून सदस्यांना सोमवारी (ता.२९) व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार असल्याचे कळविले आहे. पदवी प्रमाणपत्रप्रकरणी चौकशी समितीने सादर केलेला अहवाल वादात सापडला आहे.

त्रिसदस्यीय समितीने, विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभातील पदवी प्रमाणपत्रातील घोळाला दीक्षान्त विभाग जबाबदार असल्याचा अहवाल दिला आहे. व्यवस्थापन परिषदेच्या २२ मार्च रोजी झालेल्या बैठकीने चौकशी समितीच्या शिफारशीनुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मात्र समितीचा अहवाल हा वरिष्ठांना पाठीशी घालणारा आणि कनिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुंतविणारा असल्याचा आक्षेप शिक्षक व विद्यार्थी संघटनांनी नोंदविला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय कनिष्ठ अधिकारी सहीचा व दुबार प्रमाणपत्र छपाईचा निर्णय घेऊ शकत नाहीत, यामुळे सही व दुबार छपाईचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी वेगावली आहे. दुसरीकडे एक महिना होऊनही व्यवस्थापन परिषदेतील अनेक सदस्यांना चौकशी समितीचा अहवाल मिळाला नाही. प्रमाणपत्रावरुन प्रशासन पेचात सापडल्यामुळे या प्रश्नी चर्चा करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक होणार असल्याचे कळविले आहे. या बैठकीत काय निर्णय होणार यावर बरेचसे अवलंबून आहे.

अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक

विद्यापीठाच्या कामकाजावरुन प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर तक्रारी वाढल्या आहेत. 'सुटा' संघटनेने थेट आरोप नोंदविले आहेत. दुसरीकडे प्रशासनाने सुटाकडून विद्यापीठाची बदनामी सुरू असल्याचे उत्तर दिले. दरम्यान सद्यस्थिती पाहता अधिकाऱ्यांविरोधात तक्राीसंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांची शनिवारी मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत कायदेविषयक सल्ला घेतल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आमचं ठरलंय खरं करून दाखवा’

$
0
0

म .टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

'राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि प्रतापराव गुर्जर यांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे. 'नुसत आमचं ठरलंय म्हणून गप्प बसू नका, ते मंडलिकांना विजयी करून करून खरं करून दाखवा,' असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. गडहिंग्लज येथे शनिवारी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.

ठाकरे म्हणाले, 'योजना येतात आणि जातात, सरकार येतं जातं, पण देश स्थिर असतो. देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदींच्या पाठीशी शिवसेना उभी राहिली आहे. देशात देशद्रोहाचा कायदा आणि काश्मीरमधील ३७० वे कलम काढण्याचा निर्धार काँग्रेस आघाडी सरकारने आपल्या जाहीरनाम्यातून केला आहे. या देशद्रोही मंडळींनाच या निवडणुकीतून आता हद्दपार करा. भाजप-सेना एकत्र येताच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट पुढाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. म्हणूनच ५६ पक्ष एकत्र येऊन मोदींना विरोध करत आहेत.'

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'गोकुळ हा महाडिकांचा प्राण आहे. आपली राजकीय समीकरणे बिघडू नयेत म्हणून धनंजय महाडिक यांना शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा सल्ला देण्यात आला. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यासाठी त्यांच्यावर सक्ती करण्यात आली. गोकुळ मल्टिस्टेटसाठी महाराष्ट्र सरकार ना हरकत दाखला देणार नाही.'

यावेळी प्रा. संजय मंडलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट करून कोल्हापूरच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे अभिवचन दिले. प्रचारसभेत संजय घाटगे, समरजित घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर, गोपाळराव पाटील, संग्राम कुपेकर आदींची भाषणे झाली.

...आणि हे महाडिक कुठे?

आपल्या पतीला वीरमरण आले म्हणून खचून न जाता सातारची स्वाती महाडिक सैन्यात दाखल होऊन देशसेवा करते आणि विरोधी पक्षाचे उमेदवार कोल्हापूरचे महाडिक गोकुळची मलई खाण्यासाठी कोणत्याही थराला जातात. तेव्हा महाडिकग्रस्त कोल्हापूर जिल्हा स्वच्छ करा आणि आपलं ठरलं, हे मतदानातून सिद्ध करा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>