Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्वाभिमानीचे सांगली जिल्हाध्यक्ष देशमुख महायुतीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी भाजप शिवसेना महायुतीला पाठिंबा दिला. देशमुख हे कोकरुड (ता. शिराळा) येथील असून काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांचे चुलत बंधू आहेत. २००९ पासून ते स्वाभिमानी शेतकरी पक्षात कार्यरत होते.

कृषीमंत्री सदाभाऊ खोत आणि कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत देशमुख यांनी पाठिंब्याची घोषणा केली. जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले, 'शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात बंड करून २००९ मध्ये स्वाभिमानीचा झेंडा हातात घेतला. गेली दहा वर्षे सांगली जिल्ह्यात 'स्वाभिमानी'ची बांधणी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातील कारखानदारांविरोधात रस्त्यांवर लढा दिला. बारामती, इंदापूर, पंढरपूर येथील आंदोलनात अग्रेसर होतो. पण ज्यांच्या विरोधात लढा दिला त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या पंक्तीला खासदार राजू शेट्टी बसले असल्याने त्यांच्या विरोधात महायुतीला पाठिंबा देत आहे. सांगली जिल्ह्यातील 'स्वाभिमानी'चे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या समवेत असल्याचा दावाही देशमुख यांनी केला. विशिष्ट जातीचे राजकारण करणाऱ्या शेट्टींच्याविरोधात बहुजन समाज एकवटतोय,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधनवृत्त.... श्रीमती शांताबाई माळी

$
0
0

शांताबाई माळी

कोल्हापूर : येथील शांताबाई दिनकर माळी यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माती सावरणे विधी शनिवारी (ता. २०) सकाळी नऊ वाजता वीरशैव रुद्रभूमी येथे आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार धनंजय महाडिक दौरा

$
0
0

खासदार धनंजय महाडिक

सकाळी आठ वाजता : उचगावला प्रचारफेरी

सकाळी नऊ ते अकरा : राजारामपुरी रोड शो, गाठीभेटी

सायंकाळी पाच वाजता : कनानगरात प्रचार फेरी

सायंकाळी सहानंतर : कागल तालुक्यात सभा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबीक कार्यक्रमांवर आचारसंहितेचे सावट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अतिरकेचा फटका अनेक घटकांना बसत आहे. कौटुंबीक कार्यक्रमांनाही परवानगी घ्या, अन्यथा गुन्हा दाखल होईल, अशी विनंतीवजा धमकी निवडणूक प्रशासन देत आहे. त्यामुळे कधी एकदा आचारसंहिता संपते अशी सार्वत्रिक भावना तयार झाली आहे. आचारसंहिता आणि जमावबंदीमुळे सांस्कृतिक, घरगुती कार्यक्रमांवरही निर्बंध आले आहेत. त्यावर अवलंबून असणाऱ्यांना रोजगाराला मुकावे लागले आहे.

१० मार्चपासून आचारसंहिता लागू झाली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कौटुंबीक कार्यक्रमांना परवानगीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जावळ, वाढदिवस, लग्न, वास्तूशांती अशा कार्यक्रमांसाठीही परवानगीची सक्ती केली आहे. यासाठी एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. मात्र, परवान्यांसाठी आवश्यक कादगपत्रे गोळा करण्याचा त्रास संबंधितांना होत आहे. परवान्यातील जाचक अटी वाचून त्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे. शहरातील उत्तर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रशासनाकडून तब्बल साडेतीनशेहून अधिक परवाने देण्यात आले आहेत. यावरून आचारसंहितेची किती दहशत निर्माण झाली आहे, हे स्पष्ट होते.

मंगल कार्यालयधारकांनाही रात्री दहानंतर जेवणावळीवर बंदी आणली आहे. यामुळे मंगल कार्यालय, सांस्कृतिक हॉलची विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर दहानंतर जेवण वाटप करता येणार नाही, कार्यक्रमासाठी परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले जात आहे. सरकारी यंत्रणेकडून परवानगी घ्यायला हवी म्हटल्यानंतर 'नको रे बाबा, हेलपाटे मारावे लागतात. कर्मचारी गेल्याक्षणी भेटतील याची शाश्वती नसते,' अशी नकारात्मक भावना लोकांत तयार होत आहे.

नवख्या अधिकाऱ्यांमुळे घोळ

एखादा कार्यक्रम कौटुंबीक असला तरी कोणता कार्यक्रम राजकीय हेतूने आयोजित केला आहे, त्याची माहिती संबंधीत पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी, गोपनिय पोलिसांना असते. त्यामुळे सरसकट सर्वच कार्यक्रमांना परवानगी बंधनकारक करणे गैर आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांचे खासगीत मत आहे. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत अशा प्रकारचा अनुभव कधीही आला नव्हता. पहिल्यांदाच आचारसंहितेचा बाऊ करून करून वेठीस धरले जात असल्याचा आरोप होत आहे. निवडणूक प्रशासनातील नवख्या अधिकाऱ्यांमुळे त्यांनी ही भूमिका घेतली काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

पोलिसांची डोकेदुखी वाढली

लहान कार्यक्रमांनाही परवानगी देताना कागदपत्रे रंगवायला लागतातच. त्यामुळे परवानगी देण्यासाठी नियुक्त कर्मचारीही हतबल झाले आहेत. संबंधीत कार्यक्षेत्रातील पोलिसांना ना हरकत दाखला देण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. कायदा, सुव्यवस्था राखणे, महत्वाच्या नेत्यांसाठी, सभांच्या बंदोबस्तात मोठ्या संख्येने पोलिस आहेत. त्यामध्येच कौटुंबीक समारंभांच्या परवानगीसाठी दाखले देण्याचे काम वाढल्याने पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

मंगल कार्यालयांना फटका

आचारसंहितेच्या घोळात काहींनी लग्नकार्य, अन्य समारंभ लांबणीवर टाकणे पसंत केले आहे. त्याचा फटका मंगल कार्यालयांनाही बसत आहे. परिणामी लग्नाच्या कार्यक्रमांना लागणारे मंडप साहित्य, जेवणाच्या साहित्याला मागणी कमी झाली आहे. यावरील उलाढालीवर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे मंगल कार्यालयधारकही कधी एकदा मतदान होईल आणि आचारसंहिता शिथिल होईल, त्याची प्रतीक्षा करत आहेत.

कौटुंबीक व इतर कार्यक्रम मंगल कार्यालयात, सांस्कृतिक हॉलमध्ये घेण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. हॉलमध्ये रात्री दहानंतर जेवणावळींवर निर्बंध आणले आहेत. याविरोधात सर्वांनीच आवाज उठविण्याची गरज होती. सध्या मतदानाची तारीख जवळ आल्याने तशी भूमिका घेतलेली नाही.

- सागर चव्हाण, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सामाजिक सेवा सांस्कृतिक मंगल कार्यालय संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन सोशल ग्रुपतर्फे पाण्याची भांडी, धान्य सुपुर्द

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पाणी व अन्नासाठी उन्हाच्या तडाख्यात फिरणाऱ्या पक्ष्यांसाठी ज्येष्ठ व्यापारी वनेचंद कटारिया यांच्या वाढदिवसानिमित्त जैन सोशल ग्रुप मेन कोल्हापूरच्यावतीने पाण्याची भांडी व धान्य सुपुर्द करण्यात आले. पक्ष्यांसाठी मदत करण्याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स' ने केलेल्या आवाहनाला समाजातून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार विविध ग्रुप साहित्य जमा करत आहेत.

उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांच्या सोईसाठी पाणी व धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने 'पक्षी वाचवूया' मोहीम राबवण्यात येत आहे. तीन वर्षापासून सुरू असलेल्या मोहिमेला समाजातील दानशूर तसेच विविध सामाजिक संस्थांच्यावतीने दरवर्षी भरपूर प्रतिसाद मिळतो. वनेचंद कटारिया हेही प्राणी व पक्षीप्रेमी असून या मुक्या प्राण्यांना मदत करण्याच्या भावनेतून तेही पाण्याची भांडी व धान्य देत आहेत. गुरुवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार जैन सोशल ग्रुप मेन कोल्हापूरच्या अध्यक्ष सुनीत परिख व सचिव रज्जू कटारिया यांच्या हस्ते व सर्व कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत 'मटा' कडे साहित्य सुपुर्द करण्यात आले.

यावेळी परिख यांनी 'मटा' राबवत असलेला हा उपक्रम खूप महत्वाचा असून मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटकांनी सहाय्य करण्याची गरज आहे, असे सांगितले. साहित्य सुपुर्द करण्याप्रसंगी झोनल कोऑर्डिनेटर हरिष शेठ, पर्यावरण जॉईंट हेड रोहित पारेख, दिलीप गुंदेशा, अनुप कटारिया, करिष्मा कटारिया, राजेश शहा, महावीर शहा, उमेद परमार, अतुल शहा, मनोज शहा, अशोक जैन, शशिकांत दोशी, अशोक गरगट्टे, अशोक वणकुद्रे यांच्यासह ग्रुपचे सर्व सदस्य व महिला सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संधीचे सोने करणाऱ्या महाडिकांना पाठबळ द्या

श्रेयवाद रंगला, मूळ प्रश्न ‘जैसे थे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि जिल्ह्याच्या विकासाशी निगडीत विविध प्रश्नांवर पाच वर्षे सातत्याने आंदोलने झाली. शहर बंद ठेवून लाखोंचे मोर्चे निघाले. विविध संस्था, संघटना आणि लोकप्रतिनिधींनी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. मात्र या कालावधीतही प्रश्न आ वासून उभे आहेत. खंडपीठ, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, प्राधिकरणप्रश्नी संघर्ष कायम आहे. निवडणुकीच्या धामधुमीत या प्रश्नांची चर्चा दोन्ही बाजूने होते, मात्र प्रत्यक्षात कार्यवाही कधी होणार हे कुणीही छातीठोकपणे सांगत नाही. शहराशी निगडीत प्रश्नांवरुन श्रेयवादाचे राजकारण रंगले, मात्र मूळ प्रश्न तिथेच राहिले.

......

आरक्षणाचा घोळ कायम

राज्यमंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ, अशी ग्वाही भाजपच्या नेत्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी दिली होती. विधानसभा निवडणूक होऊन साडेचार वर्षांचा कालावधी उलटला. अजूनही धनगर समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर ५८ मोर्चे निघाले. सरकारने कमिटी नेमली, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मागिवला. शेवटी एसईबीसी प्रवर्गांतर्गत दहा टक्के आरक्षण जाहीर केले. मात्र हे आरक्षण कोर्टात टिकेल याबद्दल कुणीही शाश्वती देत नाही. या पद्धतीने धनगर व मराठा आरक्षणाचा घोळ कायम असल्याची टीका आता विरोधक करत आहेत.

.........

खंडपीठाचा निकाल मिळेना

कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात खंडपीठ स्थापण्यासाठी कित्येक वर्षे लढा सुरू आहे. खंडपीठासाठी बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली साखळी आंदोलन झाले. जेलभरो व धरणे आंदोलन, मोर्चा, मुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठका झाल्या. पण कोल्हापूरसाठी खंडपीठ स्थापण्याला मुहूर्त काही मिळेना. सध्या सत्तेत असणारी मंडळी विरोधी बाकावर असताना कोल्हापूरच्या विकासाच्या छातीठोक गप्पा मारायचे. सत्तेत आल्यानंतर आश्वासनांवर आश्वासनांची अनुभूती नागरिक घेत आहेत. त्यांच्यावरील टीकेला सत्ताधारी मंडळी मागील पंधरा वर्षात काय झाले, असे प्रत्युत्तर देत जबाबदारी झटकताना दिसत आहेत.

.........

'प्राधिकरण' चे कार्य कार्यालयापुरतेच

कोल्हापूर शहर व आसपासच्या ४२ गावांच्या समतोल विकासासाठी कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणची स्थापना झाली. प्राधिकरणचे कार्यालय सुरू केले. पण कार्यालयाकडे मुबलक स्वरुपात मनुष्यबळाची उपलब्धता नाही. प्राधिकरणात समाविष्ठ गावांच्या विकासासाठी निधीचा पुरवठा नाही. यामुळे प्राधिकरणचे अस्तित्व हे केवळ 'कार्यालया'पुरते सिमित राहिले आहे. प्राधिकरणात करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील गावांचा समावेश आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला पर्याय म्हणून 'प्राधिकरण'चा पर्याय मांडला होता. मात्र कृतीशील कार्यक्रमाचा अभाव, निधीची वानवा यामुळे 'प्राधिकरण'च्या माध्यमातून होणाऱ्या कामांना चालना मिळाली नाही.

.........................

'तीर्थक्षेत्र'आराखड्याला मुहूर्त लाभेना

करवीर निवासिनी अंबाबाईची ख्याती सर्वदूर आहे. दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला गर्दी करतात. तीर्थक्षेत्र विकासासाठी २५५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. सरकारने निधीची घोषणा केली. महापालिकेने ८७ कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा सरकारकडे सादर केला. मात्र तीर्थक्षेत्र आराखड्याच्या विकासकामांचा नारळ काही फुटला नाही. तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार ठरेल अशा घोषणा राज्यकर्त्यांनी केल्या. आराखड्यात दर्शन मंडप, भक्त निवास, बहुमजली पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक, भाविकांसाठी सुविधा प्रस्तावित आहेत. मात्र आराखड्यातील विकास कामे मूर्त रुपात कधी साकारणार याबद्दल कुणी खात्रीशीर सांगायला तयार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिलला होणाऱ्या मतदानादिवशी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी अधिक दक्षतेने आणि कार्यक्षमतेने पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराबाई सभागृहात आयोजित अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रनिहाय कृती आराखडा तयार करावा. मतदान प्रक्रिया गांभीर्याने राबवावी.' जिल्हा सूचना आणि विज्ञान अधिकारी चंद्रकात मुगळी यांनी मतदानादिवशी अधिकाऱ्यांनी ऑनालाइन पीडीएमएस यंत्रणेवर दर दोन तासांनी कशी मतदानाची आकडेवारी भरायची यासंबंधी मार्गदर्शन केले. लॅपटॉपवर माहिती भरण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. दिवसभरात तीन सत्रांत प्रशिक्षण झाले. अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी, विजया पांगारकर, अमित माळी आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन दिवसांत हलवणार पालकमंत्री सूत्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारांची जबाबदारी असलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील १८ ते २० एप्रिल या कालावधीत सलग तीन दिवस कोल्हापुरात मुक्कामी असून प्रचाराची सूत्रे हलवणार आहेत.

पालकमंत्र्यांना दहा मतदार संघाची जबाबदारी दिल्याने ते जिल्ह्यात कमी व अन्य मतदार संघात जास्त वेळ कार्यरत आहेत. प्रचार संपवून पालकमंत्री मुक्कामाला कोल्हापुरात येण्याचा प्रयत्न करतात. कोल्हापुरात असताना पाच ते सहा गावात प्रचार करून पुन्हा अन्य जिल्ह्यात प्रचाराला जातात. पण महायुतीचा प्रचार करण्याठी तीन दिवस कोल्हापुरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या साडेचार वर्षात पालकमंत्र्यांनी भाजपचा विस्तार केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू भाजपचे आमदार अमल महाडिक प्रचारापासून अलिप्त आहेत. भाजपचे काही पदाधिकारी राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे. कोल्हापुरात प्रचार करताना पालकमंत्र्यांनी थेट खासदार महाडिक यांच्यावर टीका करण्यास सुरू केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार सलग दोन वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी महाडिक यांच्या पॅचअपचे काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सलग तीन दिवस कोल्हापूर आणि हातकणंगलेत प्रचार करणार आहेत.

पालकमंत्र्यांनी गेल्या साडेचार वर्षात शहरासह जिल्ह्यातील अनेक मंडळे, तालमी व संस्थांना मदतीचा हात पुढे केला आहे. या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेणार आहेत. तसेच व्यापारी, उद्योजकांची भेट घेऊन ग्रास रुटवर प्रचार करणार आहेत. तीन दिवसात प्रचाराची दिशा महायुतीच्या बाजूने वळवण्यासाठी पालकमंत्र्याकडून प्रयत्न केल्याने भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागात ११६० कोटी एफआरपी थकीत

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : निवडणूक प्रचाराचा ज्वर चढला असताना कोल्हापूर विभागातील साखर हंगाम संपला असून, अद्याप ११६० कोटी ८१ लाख रुपयांची एफआरपी थकीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ कारखान्यांकडून ७०१ कोटी १५ लाख रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. हेमरस आणि संताजी घोरपडे या साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. बहुतांश कारखान्यांनी ७५ टक्के एफआरपी दिली असली तर पूर्ण एफआरपी न मिळाल्याने शेतकरीवर्गाला आर्थिक चणचण भासू लागली आहे.

कोल्हापूर विभागात २६ सहकारी, १२ खासगी असे ३८ कारखाने आहेत. चार महिन्यांत २१५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप, तर २६६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात सर्वांत जास्त साखर उतारा १२.३८ टक्के कोल्हापूर विभागात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १५ सहकारी, तर सात खासगी साखर कारखाने आहेत. जिल्ह्यातील साखर हंगाम संपला असला तरी कारखान्यांकडून एकरकमी एफआरपी जमा झालेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळलेले साखरेचे दर आणि देशांतर्गत साखरेचा उठाव न झाल्याने एकरकमी एफआरपी देण्यात हंगामाच्या सुरुवातीपासून कारखान्यांना अडचणी आल्या. १५ जानेवारी २०१९ पर्यंत गाळप झालेल्या उसाची एफआरपी कारखान्यांनी दिली नव्हती. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडून प्रतिटन उसाचा पहिला हप्ता २३०० रुपये जमा केला.

एकरकमी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना ५०० रुपये कमी पडत होते. ही रक्कम सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी कारखानदारांनी केली होती. तसेच साखरेचा दर प्रतिक्विंटल २९०० रुपयांवरून ३५०० रुपये करावा, अशीही मागणी केली होती. केंद्र सरकारने साखरेचा दर प्रतिटन ३१०० रुपये केल्याने कारखानदारांना थोडासा दिलासा मिळाला, पण ज्या कारखान्यांची एफआरपी कमी होती, त्यांनी कमी दरात साखर विक्री केल्याने अनेक कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडले.

साखर कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी कमी पडणाऱ्या रकमेसाठी बँकांनी कर्ज द्यावे, असे आदेश केंद्र सरकारने दिले असून, कर्जाच्या रकमेचे व्याज भरण्याची सरकारने तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर कारखान्यांनी किमान २५ टक्के एफआरपीची रक्कम जमा करण्याची अट घालण्यात आली. विभागातील बहुतांश कारखान्यांनी २५ टक्क्यांपेक्षा जास्त एफआरपी दिल्याने कारखान्यांना कर्ज देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोल्हापूर विभागातील ३८ कारखान्यांनी ४९२३ कोटी रुपये उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. अद्याप ११६० कोटी रुपये एफआरपी थकीत झाली आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या रकमेतून विकास सेवा संस्था, बँकांनी कर्जाचे हप्ते जमा वजा करून शिल्लक रक्कम शेतकऱ्यांना दिली. शिल्लक प्रतिटन ५०० ते ७०० रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. ही रक्कम लवकर जमा झाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयोगी ठरणार आहे. पावसाळ्यास अवघा दीड महिना शिल्लक राहिला असल्याने शिल्लक एफआरपी जमा करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

०००००००

जिल्ह्यातील एफआरपीचा आलेख (कोटीमध्ये)

कारखाना दिलेली एफआरपी शिल्लक एफआरपी

आजरा ७२.०० १५.४६

भोगावती ८८.५० २५.८१

राजाराम ११२.७८ ४.३९

शाहू कागल १९८.०० ३३.००

दत्त शिरोळ ३०७.२४ ३७.४३

दूधगंगा १५५.३८ ३०.८१

नलवडे ६६.१४ १०.८२

जवाहर ४२१.२४ ९१.१४

मंडलिक ११२.५८ २३.०७

कुंभी ११९.७३ ३९.४३

पंचगंगा १४०.३९ ६५.४१

शरद १५७.९६ १८.९३

वारणा ११२.४२ १४९.२२

गायकवाड ५८.७१ १०.४३

डी.वाय.पाटील ७१.८८ १५.२४

दालमिया २२५.६१ ४२.३५

गुरुदत्त १६१.६६ ६२.०२

इको केन ४५.७४ ९.९७

हेमरस १९०.०० ००००

महाडिक ४८.७१ १०.७०

घोरपडे १८४.७९ ००००

इंदिरा ५७.८९ ५.३५

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकवर्गणीतून ७५ लाख जमले कसे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एक वोट, एक नोट' म्हणून काहीजण प्रचार करत आहेत. मग लोकांकडून जमा केलेल्या डब्यात ७५ लाख रुपये कसे आले? एक माजी उपसरपंचाच्या घरात ७५ लाख रुपये कसा ठेऊ शकतो? असा प्रश्न कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थित करत खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी महायुतीला दिलेल्या जाहीर पाठिंब्यानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते.

भ्रष्ट साखर कारखानदार, धरणामध्ये पैसे खाणारे, बँका बुडवणाऱ्यांना शोधून काढून तुरुंगात डांबणार अशी घोषणा करणारे खासदार राजू शेट्टी स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व आहे, असे स्वत:ला म्हणवून घेतात. पण आज लोकसभा निवडणुकीतील प्रचार पत्रकावर शेट्टी यांच्यावर यापूर्वी टीका करणाऱ्या अस्वच्छ लोकांचे फोटो कसे काय लावले? काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करणारे शेट्टी हे गटारगंगेला मिळाले आहेत. पण मुळातच ते गटारगंगा होती हे आज समजले आहे. बहुजन समाजातील नेत्यांच्या विरोधात शेट्टी यांनी आंदोलन केली. ऐन दिवाळीत तत्कालिन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर आंदोलनाला बसले. माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्वाभिमानीच्या आंदोलनाचा 'कार्यक्रम करा' असा आदेश दिला होता. ज्यांनी शेतकरी संघटनेवर वार केले, लाठीमार केला. गोळीबार केला त्या सर्वांना घेऊन शेट्टी प्रचार करत आहेत. या निवडणुकीत शेट्टी यांचा खरा चेहरा समोर आणणार आहे.'

बहुजन समाजातील स्वाभिमानीतील नेते पक्ष सोडून जात आहेत याकडे लक्ष वेधताना मंत्री खोत म्हणाले, 'आमदार उल्हास पाटील, शिवाजीराव माने, धनवडे, प्रल्हाद इंगवले सोडून गेले. माझ्याविरोधात शेट्टी यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. आता संघटना सोडून जाणाऱ्या नेत्यावर शेट्टी चौकशी समिती लावणार का याची वाट पहात आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांबरोबर मी कधीच बसणार नाही. वेळ आली तर राजीनामा देऊ, अशी घोषणा शेट्टी यांनी केली होती. पण राजीनामा न देता भ्रष्टाचारी नेत्यासमवेत ते बसले आहेत.'

यावेळी पाशा पटेल म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी सुरू केली आहे याबद्दल स्वत: स्वामिनाथन यांनी समाधान व्यक्त केले आहे. २००४ मध्ये राजनाथ सिंह आयोगाने या आयोगाची स्थापना केली होती. पण यूपीए सरकारने १० वर्षे दुर्लक्ष केले. त्यानंतर मोदी यांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. पण हे लोकांना सांगण्यास कमी पडलो आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजेंचा आज रोड शो

$
0
0

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (ता. १९) राजारामपुरीत रोड शोचे आयोजन केले आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार महाडिक हे मोटारसायकलवरुन या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. राजारामपुरी जनता बझार चौक येथून सकाळी नऊ वाजता रोड शोला प्रारंभ होणार आहे. सकाळी नऊ ते ११ या वेळेत होणाऱ्या या प्रचारफेरीत ते नागरिकांशी संवादही साधणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समितीसभा तहकूब

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी तहकूब करण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व समिती सदस्य सभेसाठी अनुपस्थित राहिले. यामुळे सभा तहकूब करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य सध्या प्रचारात सक्रिय आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा सभा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकाळ्यापाकाळ्याजोड...

$
0
0

संपूर्ण देशभरात महाआघाडी एका विचाराने उतरली आहे. मात्र काहीजण निव्वळ व्यक्तिद्वेषातून वेगळी भूमिका घेत आहेत. भाजप, शिवसेनेच्या भूलथापांना बळी पडू नका, विकासक्षम उमेदवाराला पाठबळ द्या.

आमदार हसन मुश्रीफ

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोडावत विद्यापीठात फार्मसीला मान्यता

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठात डी. फार्मसी व बी. फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. याआधी विद्यापीठास अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत डी. फार्मसीसाठी ६०, तर बी. फार्मसीसाठी ६० जागा उपलब्ध असणार असल्याची माहिती संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.

डी. फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता १२ वी सायन्स उत्तीर्ण, तर बी. फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता १२ वी सायन्स पीसीबी किंवा पीसीएम विषय घेऊन मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ टक्के, तर खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के गुणांसह राज्य सरकारची सीईटी परीक्षा दिलेली असावी तसेच बी. फार्मसी प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारची सीईटी परीक्षा दिलेली नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेश कार्यालयाशी संपर्क साधावा. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागरिकांत चर्चा, कार्यकर्त्यांत ईर्षा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर शहरालगतचे गाव आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पाचगावमध्ये लोकसभा निवडणुकीचा फिव्हर जाणवू लागला आहे. गावात पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण जास्त आहे. आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक अशा दोन गटात कार्यकर्ते विखुरले आहेत. नागरिकांत उमेदवारांची चर्चा आणि कार्यकर्त्यांत निवडणुकीची ईर्षा पाहावयास मिळत आहे. काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेनेच्या प्रचारात आणि महाडिक समर्थक राष्ट्रवादीच्या प्रचारात असे चित्र निर्माण झाले आहे. भाजपाचे काही सदस्य महाडिक यांच्या प्रचारात आढळतात.

पाचगाव गावठाण आणि जवळपास ६५ कॉलन्यांचा समावेश आहे. प्रचाराच्या रिक्षा, समर्थकांच्या पदयात्रेमुळे वातावरण निर्मितीत भर पडत आहे. पाचगाव हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव. येथे पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक गटात टोकाची ईर्षा आहे. ग्रामपंचायतीवर सध्या सतेज पाटील गटाची सत्ता आहे. पाचगावमध्ये तब्बल १९ हजार मतदार आहे.

शांतीनगर, पंचशील कॉलनी, भोगम कॉलनी, पोवार कॉलनी, मराठा कॉलनी, द्रौपदीनगर, गाडगीळ कॉलनी, संचयनी पार्क, दत्तनगर, शिक्षक कॉलनी, अमृतनगर, रेणुकानगर, श्री कॉलनी या कॉलन्यामध्ये फेरफटका मारल्यावर नागरिकांत निवडणुकीची चर्चा ऐकावयास मिळते. शहरालगतचा परिसर असल्यामुळे नागरी सुविधांकडे लोक लक्ष देत आहेत. पाचगावमध्ये काँग्रेसचे आमदार पाटील यांना मानणारे काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात आहेत. सरपंच व पाटील गटाच्या समर्थक सदस्यांनी मंडलिक यांच्यासोबत प्रचारफेरी काढली. पदयात्रा, पक्षाच्या चिन्हाची पत्रके वितरित केली आहेत. त्यांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची साथ मिळत आहे. महाडिक समर्थक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. आजी, माजी ग्रामपंचायत सदस्य खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. नागरिकांच्या भेटीगाठी, पदयात्रेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. महाडिकांनी पाचगाव दौरा करुन नागरिकांशी संवाद साधला आहे. प्रमुख कार्यर्त्यांसोबत चर्चा करुन यंत्रणा गतीमान केली आहे.

पाणीप्रश्न महत्वाचा

निवडणूक कोणतीही असो, पाचगावमध्ये प्रत्येक वेळी पाणी प्रश्न महत्वाचा ठरला आहे. शहरालगतची वस्ती म्हणून नागरिकीकरण वाढत आहे. मात्र नवीन कॉलन्यामध्ये रस्ते व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजनाचा अभाव आढळतो. पाचगावमधील नवीन कॉलनीत चार-पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो. एकदा कळंबा तलाव येथून तर एकदा दूधगंगा नदीतून पाणी उपसा करुन गावात पाणी पुरवठ्याचे नियोजन आहे. उपसा होणाऱ्या पाणी वितरणाचे योग्य नियोजन होत नसल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. यामुळे अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे.

प्रा. मंडलिकांच्या प्रचारातील मंडळी

सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रवीण कुंभार, सदस्य धनाजी सुर्वे, प्रकाश गाडगीळ, सुशांत शेटगे, संग्राम पोवाळकर, विष्णू डवरी, संदीप गाडगीळ, सुधीर खडके, किरण चिले, अनिल जाधव, शिवाजी दळवी, कोअर कमिटीचे प्रमुख नारायण गाडगीळ, उपाध्यक्ष संजय पाटील आदी.

खासदार महाडिकांच्या प्रचारातील मंडळी

ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भिकाजी गाडगीळ, मनिषा पाटील, अमर कारंडे, संभाजी शिंदे, संदीप कांबळे, माजी सरपंच शोभा भालकर,माजी उपसरपंच प्रकाश गाडगीळ, सदस्या शितल गवळी, सुनील गायकवाड, विक्रम शिंदे, आनंदा पवार, नेताजी महाडिक, सागर गाडगीळ, सचिन पाटील, सुनील घोरपडे आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समोरासमोर येऊन चर्चा करा उदयनराजेंचे विरोधकांना आव्हान

$
0
0

समोरासमोर येऊन चर्चा करा

उदयनराजेंचे विरोधकांना आव्हान

सातारा :

'विरोधातील उमेदवार केवळ मिशांना पिळ देत आहेत. माझ्यावर खोटे आरोप करण्यापेक्षा हिम्मत असेल तर एका व्यासपीठावर समोरासमोर येऊन विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करावी. जनतेसाठी झटलो असे ते म्हणतात. मात्र झटलो म्हणजे काय हे त्यांनी एकदा स्पष्ट करावे,' असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

उदयनराजेंनी कराड तालुक्यात ओगलेवाडी, कोपर्डे हवेली येथे प्रचार केला, त्यावेळी ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, 'मी कायम लोकहिताच्या बाजूने आवाज उठवतो त्यामुळे मी स्वाभिमानाने कॉलर उडवतो. मी आजवर काय कामे केली? असे विरोधक प्रश्न विचारतात. त्यांना मी सांगू इच्छितो की, अहो तुमच्या गावातच मी कित्येक विकासकामे केली आहेत. ती उघड्या डोळ्यांनी पहा.'

उद्धव ठाकरे

यांची कराडमध्ये उद्या सभा

कराड : रविवारी दुपारी तीन वाजता कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पेठेत महायुतीची रॅली

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भाजप शिवसेना युतीने शिवाजी पेठेत प्रचार रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आमदार राजेश क्षीरसागर, प्रा. संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीत शिवाजी पेठेतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार क्षीरसागर म्हणाले, 'कोल्हापूर स्वाभिमानी बाणा जपणारा जिल्हा आहे. शिवाजी पेठेतील स्वाभिमानी जनतेची अनेक उदाहरणे आहेत. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या धनशक्तीस गारद करण्यासाठी जनतेने कंबर कसली आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढ्यात शिवाजी पेठेची जनशक्ती युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहील.'

उभा मारुती चौकातून रॅलीस सुरुवात झाली. साकोली कॉर्नर, तटाकडील तालीम, निवृत्ती चौक, गांधी मैदान, फिरंगाई मंदिर, आठ नंबर शाळा, जुना वाशी नाका, खंडोबा तालीम, झुंजार क्लब येथे रॅली काढण्यात आली. प्रा. मंडलिकांना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले.

रॅलीत शहर प्रमुख रविकिरण इंगवले, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी महापौर विलासराव सासने, अशोकराव जाधव, माजी नगरसेविका भारती पोवार, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक मंगल साळोखे, दीपक गौड यांच्यासह शिवाजी पेठेतील तालीम संस्था, मंडळांचे पदाधिकारी व भागातील नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षिण सोलापुरात भीषण पाणी टंचाई

$
0
0

दक्षिण सोलापुरात भीषण पाणी टंचाई

सोलापूर

दक्षिण सोलापुरातील कसेगावात पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. सोलापूर शहरापासून केवळ १८ कि. मी. अंतरावर असलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावमध्ये बागायती शेती आहे. शेतातील विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. पाण्याअभावी बागा जळून चालल्या आहेत. पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली आहे. गावातील तलाव ही कोरडा आहे. विठ्ठल मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीवर गावकरी जीव धोक्यात घालून घागरभर पाणी शेंदत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींना हुकूमशहा व्हायचेय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नोटबंदीबरोबर सीबीआय संचालक व रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची प्रथम नियुक्ती व नंतर मंजुरी असे 'हम करे सो कायदा'प्रमाणे घेतलेले निर्णय पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा हुकूमशहा बनायचे आहे,' असा जोरदार हल्लाबोल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. ६० महिन्यात मोदींनी देशाचा बट्याबोळ केला आहे, अशी कडवट टीकाही त्यांनी केली.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी जवाहरनगर चौकात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार व स्थानिक काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, 'अर्थमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्ष नेता व पंतप्रधान यांच्या सह्यांशिवाय सीबीआय संचालक व रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची नियुक्ती करता येत नाही. पण, मोदी यांनी ती पद्धत मोडीत काढून प्रथम आदेश व नंतर मंजुरी, सह्या अशी एकतंत्री पद्धत अवलंबली आहे. घटना, मंत्रिमंडळ बाजूला ठेवून सर्व सत्ता हातात एकवटण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. यातून त्यांना देशाचा हुकूमशहा बनायचे असल्याचे दिसून येते. रशियामध्ये ज्यांनी मदत केली, त्यांना पुतीन यांनी ज्या प्रकारे एक तर घरी बसवले किंवा खून केला त्याचप्रकारे मोदी यांची वाटचाल सुरू आहे. २००२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर गोध्रा हत्याकांडाचा ठपका ठेवत राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस व इतर पक्षांनी केली होती. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी पाठराखण करत त्यांना वाचवले. त्याच अडवाणींना पाच वर्षांत बोलू दिले नाही. आता उमेदवारीही दिली नाही. मुरली मनोहर जोशी यांनाही बाजूला केले. यातून पुतीन यांच्यासारखीच त्यांची वाटचाल दिसते.'

... .. .. .. ... ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images