Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूर मतदारसंघ...

$
0
0

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ

फोटो : राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम

युतीला रोखण्याचे प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेनेची चांगली ताकद, भाजपचा वाढलेला विस्तार आणि आमदार सतेज पाटील यांची थेट मदत यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठे मताधिक्क मिळवण्याचा प्रयत्न भाजप-शिवसेना युतीकडून सुरू आहे. पण ताराराणी आघाडी, महाडिक गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद वापरत युतीला रोखण्याचे प्रयत्न आघाडीकडून सुरू आहेत. दोन्ही उमेदवारांनी शहरावर लक्ष केंद्रित केल्याने उत्तर विधानसभा मतदारसंघाला विशेष महत्त्व आले आहे. सेना-भाजपबरोबर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मदत होणार आहे. याउलट भाजपच्या नगरसेवकांची छुपी मदत महाडिक यांना होत आहे. दोन्ही पक्षांतील काही नाराज नगरसेवक मात्र विरोधी उमेदवाराचा प्रचार करताना दिसत असल्याने उत्तर मतदारसंघात आघाडीच्या की युतीच्या उमेदवाराला मताधिक्क मिळणार याची कमालीची उत्सुकता लागली आहे. कसबा बावडा, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ व बुधवार पेठेवर निवडणुकीचे मताधिक्य अवलंबून राहणार आहे. यामुळेच दोन्ही गटांकडून हा भाग अधिक लक्ष्य करण्यात आला आहे.

०००००००

कागल मतदारसंघ

हसन मुश्रीफ, समरजित घाटगे

मताधिक्य रोखण्याचे आव्हान

कागल विधानसभा मतदारसंघात मंडलिक, राजे व घाटगे हे तीन गट एकत्र आल्याने युतीचे पारडे जड झाले आहे. यामुळे या मतदारसंघात आमदार हसन मुश्रीफ एकाकी पडल्याने आघाडीसमोर युतीचे मताधिक्य रोखण्याचे मोठे आव्हान उभे आहे. शरद पवारांची सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मदत, गोकुळचा वापर करत येथे मताधिक्य रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाडिक यांच्या निवडणुकीची सर्व सूत्रे आमदार मुश्रीफ यांच्या हातात असल्याने त्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गडहिंग्लजमधील जनता दलाची भूमिका अजूनही स्पष्ट झाल्याने आघाडी प्रतीक्षेत आहे. युतीच्या जमेच्या बाजू येथे जास्त आहेत, पण काहीही करून मताधिक्य रोखण्याची मोठी व्यूहरचचा आघाडीने केली आहे. त्यामध्ये कितपत यश येते, त्यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बारा बलुतेदार संघटनेचा महाडिकांना पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कर्तृत्वशून्य आणि नॉट रिचेबल उमेदवार विकासाच्या किंवा जनहिताच्या मुद्यावर बोलूच शकत नाही. त्यामुळे केवळ खोटी टीका करायची आणि नागरिकांची दिशाभूल करायची असा त्यांचा डाव आहे. पण हा डाव त्यांच्याच अंगलट येईल. कारण कोल्हापूरची जनता चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी राहते,' अशी टीका स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यावर नाव न घेता केली.

बिंदू चौक परिसरातील बारा बलुतेदार संघटनेच्यावतीने खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन केले होते. इब्राहिम खाटीक चौकात ही सभा झाली. संघटनेतर्फे महाडिक यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.

मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी म्हणाले,' सध्या देशात दबावतंत्राचा प्रचंड वापर होत आहे. विरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. शेतकरी आणि कष्टकरी माणसांच्या विरोधात सरकारची धोरणे आहेत. अशा परिस्थितीत देशात समतोल साधायचा असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता देण्याची गरज आहे.' नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'धर्मनिरपेक्ष पक्षांना सत्तेत आणण्यासाठी खासदार महाडिक यांच्यासारख्या कृतीशील व्यक्तीला निवडून देणे गरजेचे आहे.'

खासदार महाडिक म्हणाले, 'शिवाजी पुलाच्या बांधकामाला गती मिळावी म्हणून कायद्यात दुरुस्ती करुन घेतली. विमानसेवा सुरू झाल्याने तीन मोठ्या कंपन्या कोल्हापुरात आल्या. पेयजल योजनेसाठी ५७१ कोटी, विमानतळासाठी २७४ कोटी रुपयांचा निधी आणला. खासदार म्हणून प्रामाणिकपणाने काम केले. त्यामुळे कोल्हापूरची जनता पुन्हा निवडून देईल.' याप्रसंगी नगरसेवक ईश्वर परमार यांचेही भाषण झाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे, सामाजिक कार्यकर्ते जाफर मलबारी, इर्शाद थोडगे, नजीर थोडगे, रियाज सुभेदार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर मतदारसंघ : दक्षिणमध्ये युती-आघाडी धर्माचा विचका

$
0
0

दक्षिण मतदारसंघ

फोटो : अमल महाडिक, सतेज पाटील

युती-आघाडी धर्माचा विचका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ पक्षापेक्षा पाटील आणि महाडिक गटातील राजकारणामुळे चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या मतदारसंघात पुन्हा एकदा पडद्याआड हालचाली वेगावल्या आहेत. येथे युती आणि आघाडी धर्माचा विचका झाला आहे. काँग्रेसची मंडळी शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात, तर भाजपमधील महाडिक समर्थक राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर असे सर्रास चित्र पाहावयास मिळत आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना विरोध केला आहे. आमदार पाटील यांनी विरोधाची उघड भूमिका घेतल्यामुळे त्यांना मानणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य हे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिकांच्या प्रचारात आहेत. दुसरीकडे भाजपमधील महाडिक समर्थक युतीच्या प्रचारात कुठेच दिसत नाहीत. भाजपचे 'दक्षिण'चे आमदार अमल महाडिक यांची प्रचारात कोंडी झाली आहे. त्यांच्या जवळचे समर्थक आघाडी उमेदवाराच्या प्रचारात आहेत. मतदारसंघात शिवसेनेची ताकद मर्यादित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्बन बँकेचा १३४३ कोटींची व्यवसाय

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात १३४३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून बँकेला २१ कोटी ५३ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचे अध्यक्ष उमेश निगडे देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष कुत्ते यांनी संचालक मंडळाला याची माहिती दिली.

कोल्हापूर अर्बन बँकेत ८२७ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाली असून ५१६ कोटी रुपये कर्जांचे वाटप करण्यात आले आहे. ठेवीत ९.६४ टक्के वाढ झाली असून कर्जात १४.५८ टक्के वाढ झाली आहे. तर व्यवसायात १३८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कर्जदारांनी हप्ते भरुन सहकार्य केल्याने ढोबळ एनपीए ५.९९ टक्क्यांपर्यंत राहिला आहे. गेल्या तेरा वर्षांपासून निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राहिले आहे. स्वनिधी १३३ कोटी १९ लाख रुपयांपर्यंत आहे.

बँकेचे कार्यक्षेत्र राज्यात असून १९ शाखा आणि सात एटीएम मशिनद्वारे ग्राहकांना सेवा दिली जात आहे. बैठकीला उपाध्यक्ष राजन भोसले, संचालक नामदेवराव कांबळे, शिरीष कणेरकर, अॅड वाय. जी. साळोखे, शिवाजीराव कदम, सुभाष भांबुरे, जयसिंगराव माने, विश्वास काटकर, बाबासाहेब मांगुरे, मधुसुदन सावंत, अॅड रविंद्र धर्माधिकारी, सुमित्रा शिंदे, गीता जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजेंनी १७०० कोटींच्याविकासकामांचा खुलासा

$
0
0

उदयनराजेंनी १७०० कोटींच्या

विकासकामांचा खुलासा करावा

महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची मागणी

कराड

गेल्या दहा वर्षांत सातारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नसताना विद्यमान खासदार १७०० कोटी रुपयांचा विकास निधी वापरला असल्याचे सांगत आहेत. आता त्यांनी हा निधी कोठू आणला आणि नेमका कुठे वापरला हे जाहीर करावे. मोघम विधाने करुन त्यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, अशी मागणी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

नरेंद्र पाटील म्हणाले, उदयनराजे भोसले साताऱ्याचे खासदार असले तरी ते कायम पुण्यातच स्थायिक असतात. ते पाच वर्षांत आपल्या मतदारसंघात फिरकलेही नाहीत. मग विकासकामे राबवणे तर दूरच, उलट मी प्रत्येक महिन्यातून किमान एकदा तरी गावी असतो. विधान परिषदेच्या माध्यमातून मी जिल्ह्यात किती विकासकामे राबवली याचीही माहिती उदयनराजे भोसले यांनी मागवून घ्यावी. उदयनराजेंनी खासदार म्हणून काम करताना सातारा जिल्ह्याचा विकास, प्रगतीमध्ये नेमके काय योगदान दिले ते देखील जाहीर करावे.' दरम्यान, नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांनी सोमवारी तापोळा, महाबळेश्वर परिसरातील गावांत प्रचार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडी-प्रशासनात ‘मिलीभगत’ !

$
0
0

विद्यापीठाचा लोगो वापरावा...

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet : Appasaheb_MT

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस गेल्या काही महिन्यांपासून दुबार पदवी प्रमाणपत्राची छपाई, सहीचा घोळ, अधिकाऱ्यांतील कुरघोडीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास अशा प्रश्नांमुळे गाजत आहे. विद्यापीठाच्या लौकिकाला बाधा पोहोचत असताना विविध अधिकार मंडळांवर वर्चस्व गाजविणाऱ्या शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीची भूमिका मात्र गुलदस्त्यात राहिली आहे. प्रशासन आणि विकास आघाडी विविध प्रकरणांत एकमेकांना पूरक निर्णय घेतात. त्यांच्यामध्ये 'मिलीभगत'असल्यामुळे वादग्रस्त विषयात अधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत नसल्याची चर्चा कॅम्पसमध्ये वेगावली आहे.

दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीदरम्यान विद्यापीठ विकास आघाडीने विद्यार्थी केंद्रीभूत व विद्यापीठ हिताचा कारभार केला जाईल या अजेंड्याखाली विविध घटकांना सामावून घेतले. संस्थाचालक, प्राचार्य संघटना एकत्र आल्या. त्यांना विद्यापीठ विकास मंचची साथ मिळाली. धोरणात्मक अधिकार असलेल्या सिनेट, व्यवस्थापन परिषद व अधिसभेतही विकास आघाडीचा अंमल आहे. विद्यापीठाने कमकुवत कॉलेजना अनुदान, संशोधक विद्यार्थ्यांना अर्थसाह्य, प्राध्याकांना प्रोत्साहन, इनक्युबेशन सेंटरची स्थापना, शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण, निवास व भोजनाची मोफत सुविधा असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

मात्र, विद्यापीठाच्या सकारात्मक कामापेक्षा चुकीच्या कारभाराची ठळकपणे चर्चा रंगली आहे. दुबार प्रमाणपत्रावरून विद्यापीठाच्या अब्रूची लक्तरे निघत आहेत. वर्षभरानंतर चौकशी अहवाल खुला झाला नाही. या प्रकरणी कुलपती कार्यालयापर्यंत तक्रारी झाल्या. याप्रश्नी विकास आघाडीची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. उलट प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा खटाटोप काही मंडळी करत असल्याचे चित्र निर्माण झाले.

०००

दोघांचीही कुलपतींकडे धाव

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) कुलगुरूंवर मनमानीचा आरोप करत आंदोलन पुकारले. त्यांनी कुलपती कार्यालयाकडे विविध तक्रारी नोंदविल्या आहेत. दुसरीकडे 'सुटा'च्या आंदोलनामुळे विद्यापीठाची बदनामी होत असल्याचा आक्षेप विकास आघाडीतील काही सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी नोंदविला. शिवाय 'सुटा'च्या १२९ तक्रारींत प्राध्यापकांशी निगडित प्रश्न किती? असा मुद्दा उपस्थित केला आहे. व्यवस्थापन परिषद सदस्यांचे शिष्टमंडळ कुलपतींना भेटून 'सुटा'च्या भूमिकेला विरोध करणार असल्याचे वृत्त आहे.

०००

कोअर कमिटीची शनिवारी बैठक

विद्यापीठ विकास आघाडीने कोअर कमिटीची स्थापना केली आहे. कमिटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष भैय्या माने, कार्याध्यक्ष प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, सचिवपदी प्राचार्य एल. जी. जाधव आहेत. कमिटीत डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. आर. एस. आडसूळ, डॉ. डी. यू. पवार, अॅड. धैर्यशील पाटील, शंकरराव कुलकर्णी, केरबा चौगुले, चिमण डांगे, डॉ. प्रताप पाटील, आदींचा समावेश आहे. कोअर कमिटीची पदवी प्रमाणपत्र प्रश्नी शनिवारी (ता.१३) बैठक होणार आहे.

००००००

'विकास मंच'संभ्रमावस्थेत

अभाविप, सुप्टा, आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सेवक संघ, कास्ट्राईब महासंघ मिळून विद्यापीठ विकास मंचची स्थापना झाली. विद्यापीठाच्या निवडणुकीत विकास आघाडी आणि मंचने युती केली. 'मंच'चे प्रतिनिधी सिनेट, व्यवस्थापन परिषदेत प्रतिनिधित्व करतात. सध्या कोणती भूमिका घ्यायची, याप्रश्नी मंच संभ्रमावस्थेत आहे. काहीजण आघाडीसोबत आहेत, तर काहींनी चुकीच्या कामकाजाला विरोध नोंदवलाय. अभाविप संघटना आक्रमक झाली आहे. अहवालावरून ते कुलपतींकडे तक्रार करण्याच्या विचारात आहेत. मात्र, मंचमधील प्रमुख पदाधिकारी 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक निरीक्षकांची भेट

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक अलका श्रीवास्तव यांनी सोमवारी जिल्हास्तरीय मिडीया, संपर्क व्यवस्थापन व सोशल मिडीया कक्ष, जिल्हा संपर्क केंद्र, सुविधा केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी कामकाजाची पाहणी केली. 'मतदारांच्या सोयीसाठी १९५० टोल फ्री क्रमांक कार्यरत आहे. सीव्हीजील ॲपवर ३८ तक्रारी झाल्या आहेत', अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस प्रशासनालाच आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मटका, जुगार, गांजा विक्री, खासगी सावकारी अशा अवैध धंद्याना शहरात ऊत आला आहे. शहरात बोकाळलेल्या अवैध धंद्यांना अटकाव करण्यास जिल्हा पोलिस प्रशासनाला अपयश आले असतानाच सोमवारी परिविक्षाधीन आयपीएस पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनाच धक्काबुक्की करुन त्यांच्या सुरक्षारक्षकाचे रिव्हॉल्व्हर हिसकावून घेवून एकप्रकारे पोलिस प्रशासनालाच खुले आव्हान दिले. शहरात अवैध धंदे सुरू असताना पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत. शहरात खुलेआम मटका घेतला जात असताना पोलिस प्रशासन मात्र मटका बंद असल्याची वल्गना करत आहे. मटक्याप्रमाणे जुगार, बेटिंग, गांजा विक्री असे सर्रास काळे धंदे जोमात सुरू आहेत. अशा धंद्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने शहराच्या गल्लीबोळात खुलेआम हे व्यवसाय सुरू आहेत. पांजरपोळ येथे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका शमा मुल्ला यांचे पती सलीम यांच्या निवासस्थानी मटका सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना समजली. त्यांनी पथकासह येथे धाड टाकली. मटका घेणाऱ्या व खेळणाऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, एक संशयित आरोपीने शर्मा यांच्या सुरक्षारक्षकाचे रिव्हॉल्व्हर हिसकावून घेवून ते त्यांच्यावर रोखून पलायन केले. त्यानंतर पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी दाखल झाली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती शहरात पसरताच बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली.

मटक्यासारख्या व्यवसायात असणाऱ्या आणि उजळ माथ्याने फिरणाऱ्या व्हाइट कॉलरमधील काळ्या धंदेवाल्यांना राजकीय वरदहस्तही मिळत आहे. त्यामुळे शहरात दिवसेंदिवस अवैध व्यवसायांना बळकटी मिळत असून अनेकांनी आपले साम्राज्य उभा केले आहे. यातूनच सोमवारी पोलिसांच्या रिव्हॉल्व्हरपर्यंत हात पोहोचले असून एक प्रकारे पोलिसांनाच अवैध धंदेवाल्यांनी आव्हान दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेल्पलाइन.... पान २ साठी

$
0
0

जिल्हा परिषद...

शिक्षण विभाग (प्राथमिक) : २६५०७८१

शिक्षण विभाग (माध्यमिक) : २५४०४६८

ग्रामपंचायत विभाग : २६६८२२९

जिल्हा आरोग्य अधिकारी : २६५२३२७

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी : २६५२३३१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापूर’ साठी १५ उमेदवार रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूर मतदारसंघातून ७ जणांनी माघार घेतली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक, शिवसेना, भाजप आघाडीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह १५ जण रिंगणात राहिले. 'हातकणंगले' साठी स्वाभिमानी शेतकरी पक्षातून खासदार राजू शेट्टी, भाजप, शिवसेना आघाडीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासह तब्बल १७ जण रिंगणात राहिले. तीन उमेदवारांनी माघार घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत माघारीची प्रक्रिया झाली. त्यानंतर चिन्हाचे वाटप झाले. अपक्ष उमेदवार राजेंद्र कोळी आणि संदीप कोगले या दोन्ही उमेदवारांनी बॅट चिन्ह मागितले. चिठ्ठी टाकून कोगले यांना बॅट चिन्ह मिळाले. बाजीराव नाईक आणि राजेंद्र कोळी या दोन्ही उमेदवारांनी हेलिकॉप्टर चिन्हाची मागणी केली होती. चिठ्ठी टाकल्यानंतर नाईक यांना हे चिन्ह मिळाले. कोळी यांना किटली चिन्ह मिळाले. एका मतदान यंत्रावर १५ उमेदवार आणि १ नोटा अशी नावे बसतात. कोल्हापूरसाठी १६ उमेदवार रिंगणात राहिल्याने जादा मतदान यंत्राची आवश्यकता नाही.

..........

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व कंसात चिन्हे अशी : बहुजन समाज पार्टी - डी श्रीकांत (हत्ती), राष्ट्रवादी काँग्रेस - धनंजय महाडिक (घड्याळ), शिवसेना - संजय मंडलिक (धनुष्यबाण), वंचित बहुजन आघाडी- डॉ. अरूणा माळी (कप आणि बशी), बळीराजा पार्टी- किसन काटकर (जेवणाचे ताट), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी- दयानंद कांबळे (एअर कडिंशनर), बहुजन मुक्ती पार्टी- नागरत्ना सिध्दार्थ (खाट), अपक्ष उमेदवार - परेश भोसले (गॅस सिलिंडर), बाजीराव नाईक (हेलिकॉप्टर), अरविंद माने (पेनाची निब सात किरणांसह), मुश्ताक मुल्ला (शिट्टी), युवराज देसाई (कपाट), राजेंद्र कोळी (किटली), संदीप संकपाळ (अंगठी), संदीप कोगले (बॅट).

माघार उमेदवारांची नावे अशी : भरत पाटील, अरूंधती महाडिक, सुशांत दिगे, महेश कांबळे, यशवंत शेळके, वैशाली मंडलिक, सलिम बागवान.

.............

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रिंगणातील उमेदवार त्यांची चिन्हे अशी : शिवसेना- धैर्यशील माने (धनुष्यबाण), बीआरएसपी- डॉ. प्रशांत गंगावणे (एअर कंडिशनर), वंचित बहुजन आघाडी- अस्लम सय्यद (कपबशी), स्वाभिमानी शेतकरी पक्ष - राजू शेट्टी (बॅट), बहुजन महापार्टी- राजू मुजिकराव शेट्टी (शिट्टी), बहुजन समाज पक्ष- अजय कुरणे (हत्ती), बहुजन मुक्ती पार्टी- मदन सरदार (खाट), अपक्ष उमेदवार - रघुनाथ पाटील (किटली), विद्यासागर ऐतवडे (हेलिकॉप्टर), डॉ. नितीन भाट (संगणक), संग्रामसिंह गायकवाड (पेनड्राईव्ह), विजय चौगुले (हॉकी आणि बॉल), संजय अग्रवाल (ऑटोरिक्षा), महादेव जगदाळे (हिरा), किशोर पन्हाळकर (सीसीटीव्ही कॅमेरा), विश्वास कांबळे (गॅस सिलिंडर), आनंदराव सरनाईक (बॅटरी).

माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे अशी : महाराष्ट्र क्रांती पक्षाचे सुरेश पाटील, स्वाभिमानी पक्षाचे जालिंदर पाटील, चिदानंद चिडचाळे.

..........

कोट

'हातकणंगले'साठी १७ उमेदवार रिंगणात राहिल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे जोडावे लागतील. त्यासाठी आवश्यक जादाचे मतदान यंत्र उपलब्ध आहेत. एका मतदान यंत्रावर १६ उमेदवार आणि दुसऱ्या मतदान केंद्रावर एक उमेदवार व एक नोटा चिन्ह असेल.

नंकुमार काटकर, निवडणूक निर्णय अधिकारी, हातकणंगले मतदारसंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिस अधीक्षकावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पांजरपोळ परिसरातील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या परीक्षाविधीन सहायक पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी पोलिसांकडील पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच रोखल्याने खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका शमा मुल्ला यांच्यासह १३ संशयितांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस अधीक्षक शर्मा या सोमवारी रात्री आठच्या सुमारास सहा पोलिस कर्मचाऱ्यांसह पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेल्या होत्या. 'इंडियन ग्रुप' या इमारतीमागे असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून त्यांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. अड्डामालकाविषयी विचारले असता, तरुणांनी शमा मुल्ला यांचे पती सलीम मुल्ला याचा मटका अड्डा असल्याचे सांगितले. यानंतर शर्मा या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह जवळच असलेल्या मुल्ला यांच्या घरात गेल्या. पोलिस आल्याचे लक्षात येताच मुल्ला यांनी आरडाओरडा करून गोंधळ घातला. या प्रकाराने गल्लीतील नागरिकही जमा झाले. यातील काही तरुणांनी पोलिसांवर हल्ला चढवला. शर्मा यांच्या रक्षक कर्मचाऱ्याकडील पिस्तूल हिसकावून घेऊन ते शर्मा यांच्यावर रोखले. या प्रकाराने पोलिस घाबरले. मात्र, दहा ते पंधरा मिनिट गोंधळ सुरू असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. दरम्यान, पोलिसांकडून हिसकावलेले पिस्तूल घेऊन तरुणांनी पळ काढला.

सहायक अधीक्षक शर्मा यांनी मोबाइलवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देताच राजारामपुरी, एलसीबी, लक्ष्मीपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह १३ जणांना ताब्यात घेतले. अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी घटनास्थळी आले. यानंतर राजारामपुरी पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी संशयितांची चौकशी सुरू केली. पळून गेलेल्या संशयित हल्लेखोरांची धरपकड करण्यासाठी रात्रभर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. करवीरचे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी होता. शीघ्रकृती दलाची तुकडीही तैनात केली होती.

पोलिसांनी मुल्ला यांच्या घराची झडती घेतली. यानंतर वरच्या मजल्यावरील खोल्यांचे कुलूप तोडून तपासणी केली. या कारवाईत काही रोख रक्कम पोलिसांच्या हाती लागल्याची चर्चा सुरू होती. मात्र, पोलिसांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी घराचे दरवाजे बंद केले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. पिस्तूलासह हल्लेखोर सलीम मुल्ला पसार असून, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ हजार मतदार गुल?

$
0
0

Bhimgonda.Desai @timesgroup.com Tweet :bhimgondaMT कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठीच्या पुरवणी मतदारयादीतील पात्र २७ हजार ९३४ नवमतदारांचा शोध लागलेला नाही. ही यादी प्रसिध्द करण्याची मुदत संपून चार दिवस झाले, तरीही अधिकृतपणे वाढलेल्या मतदारांची संख्या अस्पष्ट आहे. यामुळे निवडणूक प्रशासनाने यापूर्वी प्रसिध्द केलेल्या मतदारसंख्येत पुरवणी मतदारयादीतील किती मतदार वाढले, हे अधिकृतपणे निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेले नाही. परिणामी मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असताना कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघासाठी अंतिम मतदार किती हे स्पष्ट झालेले नाही. निवडणूक प्रशासनाच्या दिरंगाईच्या कारभारामुळे नेमकी संख्या गुलदस्त्यातच राहिल्याचा आरोप होत आहे. लोकसभेसाठीची अंतिम मतदार यादी ३१ जानेवारीला प्रसिध्द झाली. त्यानंतर शेवटची संधी देण्यासाठी २५ मार्चपर्यंत पुरवणी मतदार यादीची प्रक्रिया राबवण्यात आली. ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज मतदान केंद्रनिहाय संकलित करण्यात आले. त्यात यादीत नाव समावेशासाठी ३१ हजार ४२८ जणांनी, नाव वगळण्यासाठी २१ हजार ५७१, पत्ता, नावात दुरूस्तीसाठी २१ हजार ३२९, स्थलांतरसाठी ७८२ जणांनी अर्ज केले. या अर्जावर निर्णय घेऊन ४ एप्रिलला यादी प्रसिध्द करण्याची मुदत होती. मुदत संपली तरीही जिल्हा निवडणूक प्रशासनाने 'पुरवणी यादी' प्रसिध्द केलेली नाही. त्यांच्याकडे नावासह पुरवणी मतदारयादी नाही. मूळ मतदार यादीत किती मतदार वाढले, याची नेमकी आकडेवारी नाही. निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन 'व्होटर सर्च'वरही सापडत नाही. निवडणूक प्रशासनाने सुरू केलेल्या हेल्पलाइनकडे विचारणा केल्यानंतर नावासंबंधी खात्री होत नाही, असा घोळ आहे. वाढलेली मतदारसंख्या, नावनिहाय यादीसंबंधी प्रशासन बेफिकीर असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईच्या कामकाजामुळे मतदार यादीच्यासंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉकटेल व आइस्क्रिम मेकिंग वर्कशॉप रविवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून, सरबताबरोबर आइस्क्रीम हवेहवेसे वाटते. घरच्या घरी मॉकटेल व आइस्क्रीम तयार करण्याची संधी मटाने उपलब्ध करून दिली आहे. उज्ज्वला कुकिंग क्लासेस व मटा कल्चर क्लबच्या वतीने रविवारी (ता.१४) मॉकटेल व आइस्क्रीम मेकिंग वर्कशॉपचे आयोजन केले आहे. स्टेशन रोडवरील 'चॅनेल बी'च्या कार्यालयाजवळील अविक कॉम्प्लेक्स येथील उज्ज्वला क्लासेसमध्ये दुपारी दोन ते चार या वेळेत वर्कशॉपचे आयोजन केले आहे.

मॉकटेलमध्ये वॉटरमेलॉन मार्गारिटा वर्जिन मोईतो, जमून लिची, मँगो मिऊल, लेमनग्रास जस्मिन आइस टी तयार करायला शिकवले जाणार आहे. आइस्क्रीममध्ये अर्धा लिटर व दोन लिटर दुधापासून व्हेनिला, चॉकलेट, बटरस्कॉच, पिस्ता या फ्लेवरसह नॅचरल आइस्क्रीम (मँगो, स्ट्रॉबेरी), फालुदा, कॉकटेल, फ्रूट सलाड तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. कार्यशाळेत उज्ज्वला देसाई प्रशिक्षण देणार आहेत. मटा कल्चर क्लबच्या सभासदांना २०० रुपये फी असून, सभासद नसल्यास ५०० रुपये फी आकारली जाणार आहे. या फीमध्ये कल्चर क्लबचे सभासदत्व देण्यात येईल. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी ९७६७८९०६२६ या क्रमांकावर आपले नाव एसएमएस अथवा व्हॉटस् अॅपवर सेंड करावे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराचे व्यासपीठ गाजवताहेत भाषणवीरांच्या तोफा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

प्रचाराच्या रणधुमाळीत मेळावे, कोपरा सभा, भेटीगाठी यांना रंगत आली असतानाच उमेदवार व पक्षाच्या प्रचाराचे व्यासपीठ गाजवण्याच्या कामात हुकमी भाषणवीरांच्या तोफाही बरसू लागल्या आहेत. उमेदवार किंवा पक्षाच्या नेत्यांच्या भाषणापूर्वी लोकांच्या गर्दीला खिळवून ठेवण्यासाठी युती,आघाडीसह डाव्यांनी आपल्या वक्त्यांची टीम तयार केली आहे. यामध्ये ज्येष्ठ व अनुभवी वक्त्यांसह महिला व युवकांची नवी फळीही सज्ज झाली आहे.

युतीकडे वक्त्यांची फौज

कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघातील युतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचाराची धुरा भाजप व शिवसेनेतील भाषणबाजांनी घेतली आहे. महिला मेळाव्यासाठी महिला वक्त्यांची टीम तयार करण्यात आली आहे तर युवा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी युतीतील युवक प्रचाराच्या व्यासपीठावर चौकार षटकार मारत आहेत. पक्षाच्या विकासकामांचा आढावा घेणारे तसेच विरोधी पक्षाच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी दोन्ही पक्षातील अनुभवी व अभ्यासू वक्ते व्यासपीठावर भाषणाचा किल्ला लढवत आहेत. युतीच्या प्रचारात सेनेच्या इतिहासाचा आढावा घेण्यासोबत शिवसैनिकांच्या धोरणांवर सडेतोड बोलण्यासाठी दीपक गौड यांना पर्याय नाही. तर उदय पोवार हिंदुत्ववादी मुद्दे प्रचारातून मांडत आहेत. सद्यस्थितीवर भाषणबाजी करण्यासाठी किशोर घाटगे यांच्याकडे जबाबदारी आहे. मंगल साळोखे. पूजा भोरे महिलांच्या प्रश्नांविषयी भाषणातून प्रभावी ठरत आहेत. रणजित जाधव, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, राजू काझी या युवकांनी सेनेच्या व्यासपीठाचा गड राखण्याची धुरा पेलली आहे.

भाजपची टीम

भारतीय जनता पक्षातील भाषणवीरांच्या ताफ्यात महेश जाधव, संदीप देसाई, राहुल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, आर. डी. पाटील, वैशाली पसारे, दिग्विजय कालेकर, अक्षय मोरे, गायत्री मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. मोदी व विकास यावर भाषणाची मांडणी हा भाजपच्या प्रचाराचा फोकस आहे.

आघाडीच्या ताफ्यात ८ वक्ते

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार धनंजय महाडिक व स्वाभिमानी संघटना पक्षाचे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आघाडीकडे आठ हजरजबाबी वक्त्यांची टीम आहे. यामध्ये प्रा. जयंत पाटील, प्रा. जालिंदर पाटील यांच्याकडे मुळातच असलेल्या संवाद व वक्तृत्व कौशल्याचा आघाडीने भाषणाच्या व्यासपीठासाठी प्रभावी वापर सुरू केला आहे. भाजपच्या फसव्या योजनांच्या आधारे मतदारांच्या प्रबोधनासाठी यांची व्याख्याने प्रचारदौऱ्यात गाजत आहेत. तर अजित पोवार आणि सागर कोंडेकर हे आक्रमक भाषणातून आघाडीच्या उमेदवारांकडे लक्ष वेधून घेत आहेत. शहराची इत्यंभूत माहिती असलेल्या नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह महिलांच्या प्रश्नावर झोत टाकणारे वक्तृत्व असलेल्या दीपा पाटील यांनीही आघाडीचे व्यासपीठ गाजवायला सुरूवात केली आहे. भारती पाटील, प्रियंका पाटील यांच्यासह अरूंधती महाडिक यांनी महिला मेळाव्यात केवळ वक्तृत्वाच्या बळावर महिला संपर्काची मोट बांधली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहीरनाम्यातून चळवळीला बळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

समाजातील उपेक्षित व वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या माणुसकीच्या लढाईला बळ देणारा वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आहे, असा मतप्रवाह जाहीरनामा प्रसिद्धीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात मांडण्यात आला. मंगळवारी शाहू स्मारक भवन कॉन्फरन्स सभागृहात झालेल्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी राजकीय विश्लेषक कपिल राजहंस होते.

'भारतीय संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा' अशी घोषणा करत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यातील मुद्द्यांवर झालेल्या चर्चेत अनिल म्हमाने, अॅड. इंद्रजित कांबळे, स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या प्रिया कांबळे, युवक चळवळीतील कार्यकर्ते राजवैभव रामचंद्र व प्रा. किरण भोसले यांनी विचार मांडले.

राजहंस म्हणाले, 'वंचितांचे संघटन ही काळाची गरज आहे. शाहू महाराजांनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना कार्यान्वित केल्या. कृती आराखडा तयार केला. मात्र शाहूंचे नाव घेणाऱ्या एकाही नेत्याने किंवा लोकप्रतिनिधींनी वंचितांपर्यंत सुविधांचे स्रोत पोहोचवण्यासाठी कृती आराखडा केलेला नाही. मानवी प्रतिष्ठेपासून, उत्पादनांच्या साधनांपासून व लाभांपासून, सत्तेतील अधिकारापासूनही वंचित असणाऱ्या घटकांना नागरिक म्हणून प्रत्येक अधिकार मिळाला पाहिजे, या सूत्रावर वंचित बहुजन आघाडीची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे या आघाडीच्या जाहीरनाम्यात वंचित समाजातील महिला, युवक, ज्येष्ठ, शेतकरी, मजूर या प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पूरक संकल्प करण्यात आले आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या कल्याणाचा आहे.'

अनिल म्हमाने म्हणाले, 'वंचित आघाडीने शेतकरी व कामगारांच्या हिताला या जाहीरनाम्यात महत्त्व दिले आहे.' अॅड. इंद्रजित कांबळे म्हणाले, 'वंचित व बहुजन घटकांना सामाजिक व आर्थिक न्याय देण्यासाठी पुढाकार घेणारा हा जाहीरनामा आहे.' प्रिया कांबळे म्हणाल्या, 'स्त्रीकेंद्री व स्त्रीवादी भूमिकांचा स्वीकार या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर आहे. दलित समाजातील स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कठोर कायदे करणे व स्त्री सुरक्षा कायद्याबाबत प्राधान्याने निर्णय घेण्याचा जाहीरनाम्यातील समावेश स्तुत्य आहे.'

राजवैभव म्हणाले, 'युवकांसमोरील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी या जाहीरनाम्यातील तरतुदी महत्त्वाच्या आहेत. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी योजनांची व्याप्ती वाढवण्यावर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.' प्रा. किरण भोसले म्हणाले, 'जाणतं राजकारण लयाला गेल्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या ध्येयातून हा जाहीरनामा केला आहे. आरोग्य, शिक्षण आणि विकासाच्या संधी ही त्रिसूत्री या जाहीरनाम्याचा पाया आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंबाबाई पुजारी कायम ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्ती कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत हक्कदार पुजाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण होईल, अशी कोणतीही प्रक्रिया देवस्थान व्यवस्थापनाने करू नये, असे आदेश वरिष्ठ जिल्हा दिवाणी न्यायालयाने मंगळवारी दिले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यातर्फे राबवलेल्या पगारी पुजारी नियुक्ती प्रक्रियेविरोधात हक्कदार पुजारी मंडळाने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिल्याची माहिती पुजाऱ्यांचे वकील अॅड. ओंकार गांधी यांनी दिली.

मंदिरात सरकारी पगारी पुजारी नेमण्याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाने नव्या कायद्याचा मसुदा मंजूर केला आहे. अद्याप या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. नव्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे राबवण्यात येणारी पगारी पुजारी नेमणुकीसाठीची मुलाखत प्रक्रीया बेकायदेशीर असून ती रद्द करावी, अशी याचिका हक्कदार पुजाऱ्यांच्यावतीने गजानन मुनिश्वर आणि अजिंक्य मुनिश्वर यांनी दाखल केली होती. यामध्ये देवस्थान समिती, विधी व न्याय खाते आणि महाराष्ट्र शासन यांना प्रतिवादी केले होते. मुनिश्वर यांच्यावतीने ॲड. ओंकार गांधी यांनी युक्तिवाद केला. तर देवस्थान समितीकडून ॲड. अमित बाडकर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर वरिष्ठ न्यायालय एम. एस. तोडकर यांनी अंबाबाई मंदिर कायदा प्रत्यक्ष अस्तित्वात येईपर्यंत सध्याच्या हक्कदार पुजाऱ्यांच्या मंदिरातील धार्मिक कामामध्ये अडथळा आणू नये, असा आदेश दिला.

.. ..

पगारी पुजारी कायद्याचा मसुदा मंजूर झाला असून पगारी पुजारी नेमण्याबाबतचे पत्र राज्याच्या विधी व न्याय खात्याकडूनच देवस्थान समितीला आले होते. या पत्रातील आदेशानुसारच पगारी पुजारी पदासाठी मुलाखत प्रक्रिया घेऊन अहवाल विधी खात्याकडे पाठवला होता. दिवाणी न्यायालयातील पुजाऱ्यांच्या याचिकेवर मंगळवारी दिलेल्या आदेशाची कोणतीही लेखी प्रत देवस्थान समितीला प्राप्त झालेली नाही. आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

विजय पोवार, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

..

अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी कायद्याच्या मसुद्यानुसार अंबाबाई मंदिर व्यवस्थापन या नव्या समितीलाच पगारी पुजारी नियुक्तीचे अधिकार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे देवस्थान समितीमार्फत पगारी पुजारी पदासाठी राबवलेली प्रक्रिया बेकायदेशीर होती. या मुद्याच्या आधारेच न्यायालयाने हा आदेश दिला आहे. त्यामुळे आता नव्या समितीची स्थापना होईपर्यंत हक्कदार पुजाऱ्यांना असलेले धार्मिक विधीचे अधिकार कायम राहतील.

गजानन मुनिश्वर, याचिकाकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदेविषयक छायाचित्र प्रदर्शनाचे आज उदघाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'न्याय आपल्या दारी' या विधी साक्षरता शिबिरातून राबविण्यात आलेल्या संकल्पनेवर आधारित न्याय या कायदेविषयक छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता.१०) प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ११ एप्रिलपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालय आणि दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, कलासाधना मंच या संस्थेतील विद्यार्थी, चित्रकार, प्राचार्य आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या प्रयत्नातून या प्रदर्शनातील कलाकृती मांडण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात स्त्री भ्रूणहत्या, न्याय आपल्या दारी, लोकअदालत, मध्यस्थी, लवाद, मोबाइल लोकअदालत, बाल न्यायालय, महिलांसाठी कायदे इत्यादी सामाजिक विषयावर शंभर डिजिटल छायाचित्रे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी तयार केली आहेत. ही छायाचित्रे कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयात कायमस्वरूपी लावण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयप्रभा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयप्रभा स्टुडिओ हा सरकार मान्यतेनुसार हेरिटेज ग्रेड थ्रीमध्ये समाविष्ट असल्यामुळे राज्य सरकार व कोल्हापूर महापालिका प्रशासनाना ही जागा ताब्यात घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत, असा युक्तिवाद अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे वकील अॅड. प्रकाश मोरे यांनी केला. भालजी पेंढारकरांनी उभारल्या जयप्रभा स्टुडीओची जागा खासगी बिल्डरला देण्याना निर्णय लता मंगेशकर यांनी २०१४ मध्ये घेतला होता. या विरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने, हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घेऊन त्याचा विकास करावा, अशी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी मंगळवारी न्यायाधीश ए. ए. भोसले यांच्या दिवाणी न्यायालयात झाली. दोन्ही पक्षांच्यावतीने वकीलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून २९ एप्रिल रोजी जयप्रभा स्टुडिओप्रकरणी अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

अॅड. मोरे म्हणाले, 'सध्याच्या जयप्रभा स्टुडिओच्या पावणेतीन एकर जागेत नव्याने इमारत बांधून व्यापारीकरण करू नये ही महामंडळाची मूळ मागणी आहे. १९९९ च्या शहर विकास योजनेअंतर्गत जयप्रभा स्टुडिओच्या एकूण जागेचे रहिवास व सिनेमा निर्मिती असे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यापैकी रहिवासासाठी आरक्षित असलेल्या जागेवर इमारत उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या उर्वरित पावणेतीन एकर जागेवर विकास आराखड्यानुसार चित्रपट निर्मितीसाठी आरक्षण आहे. या आधारे राज्य सरकार व महापालिका यांना जयप्रभा स्टुडिओची पावणेतीन एकर जागा ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. तसेच वारसाहक्क यादीत जयप्रभा स्टुडिओची जागा हेरिटेज ग्रेड ३ मध्ये समाविष्ट होत असून कोणत्याही न्यायालयात ही बाब प्रविष्ठ नाही. २००३ मध्ये हेरिटेज वास्तू प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दरम्यान अपूर्ण राहिलेली ही प्रक्रिया पूर्ण करण्यास २०१० ला सरकारमान्यता देण्यात आली. यामध्ये जयप्रभा स्टुडिओच्या जागेत असलेल्या इमारतींमध्ये थोडीफार दुरूस्ती करून सिनेमा निर्मितीसाठी पूरक लोकेशन्स तयार करता येतील असे नमूद केले आहे. यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे, असेही अधोरेखित केले आहे. हेरिटेज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारमान्यता प्रस्तावाला लता मंगेशकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात २०१५ ला आव्हान दिले होते, मात्र ते फेटाळण्यात आले. सर्वोच्च न्यायालयातही ही केस टिकली नाही. त्यामुळे हेरिटेज ग्रेड थ्रीमधील समावेशाच्या आधारे जयप्रभा स्टुडिओची सध्याची पावणेतीन एकर जागा राज्य सरकार व महापालिका यांच्याकडून ताब्यात घेण्यास अटकाव करता येत नाही.

........................

चौकट

सरकारला हक्क सांगता येणार नाही

दरम्यान, ५ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत लता मंगेशकर यांच्यावतीने ॲड. महादेवराव आडगुळे यांनी युक्तिवाद केला होता. यामध्ये जयप्रभा स्टुडिओ ही खासगी मालमत्ता आहे. या जागेचा वापर केवळ चित्रपटसृष्टीसाठी व्हावा ही अट १९८२ सालीच काढून टाकण्यात आली आहे. या जागेवर बागबगीचा व सांस्कृतिक केंद्राचे २००६ साली टाकण्यात आलेले आरक्षणही २००८ मध्ये उठवण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवर अन्य कोणत्याही व्यक्ती संस्था किंवा सरकारला आपला हक्क सांगता येणार नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलर उडविणाऱ्याखासदाराची गरज नाहीडॉ. अतुल भोसले यांची टीका

$
0
0

कॉलर उडविणाऱ्या

खासदाराची गरज नाही

डॉ. अतुल भोसले यांची टीका

म. टा. वृत्तसेवा, कराड

गेल्या दहा वर्षांत सातारा लोकसभा मतदारसंघाचा विकास ठप्प झाला आहे. खासदार निधीतून होऊ शकणारी शेकडो कामे रेंगाळली आहेत. परंतु, विद्यमान खासदार फक्त गाणी म्हणून आणि कॉलर उडवून लोकांचे मनोरंजन करीत आहेत. आता जनतेला अशा खासदाराची गरज नसून, आपले प्रश्‍न सोडविणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज असल्याची टीका भाजपचे प्रदशे चिटणीस अतुल भोसले यांनी करून मिशी व टोपीवाले महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केली.

मुंढे (ता. कराड) येथे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेना संपर्कप्रमुख गायकवाड आदी उपस्थित होते.

अतुल भोसले म्हणाले, 'लोकसभेची निवडणूक महत्वाची आहे. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेदद्र मोदींनी सर्वसामान्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम केले. ते शेतकऱ्यांचे भल करून देशाची प्रगती साधत आहेत. अल्प भूधारक शेतकऱ्यांना पंतप्रधान विकास सन्मान योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांची मदत त्यांनी दिली आहे. ते दूरदृष्टी असणारे पंतप्रधान आहेत. या सरकारचा सिंचनावर भर आहे. राज्यातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी अतिरिक्त निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मराठा समाजला आरक्षण देण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. न्यायालयात आरक्षण टिकण्याची भूमिका सरकारची होती, याचाच फायदा मराठा समाजातील तरुणांना नोकरीसाठी होणार आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार व राज्यात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या युतीचे सरकार आहे. यामुळे या लोकसभा मतदारसंघात नरेंद्र पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्यावे. जिल्हा परिषद, पंचायत समितीला आपण कमी पडलो ही चूक दुरूस्त करण्याची संधी आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे.'

छत्रपती शिवरायांच्या संग्राहलयाचा निधी पडून

सातारा येथे छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावरती एक संग्राहालय तयार केल जात आहे. या कामासाठी आलेला ५ कोटी रुपयांचा निधी अजून पडून आहे. या कामाला गती मिळाली नसल्याने संग्राहलय पूर्ण होऊ शकले नाही. विद्यमान खासदारांनी किमान ज्या राजांचा आपण वारसा सांगतो ते काम तरी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. यामुळे त्यांनी आधी संग्राहलय पूर्ण करावे व नंतर जिल्ह्याच्या विकासावर बोलावो. मी माझ्या वडिलांचे नाव सांगतो. माथाडी हे आमचे दैवत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी मी वाटेल ते करीन. तुम्ही जनतेच्या सात बाऱ्यावरील जय भवानी माता ट्रस्टचे शिक्क मारलेले उठवू शकला नाहीत, असा आरोप ही नरेंद्र पाटील यांनी केला.

येरवळेचे पालकत्व केवळ वाळू उपशासाठी

पंतप्रधान ग्राम दत्तक योजनेंतर्गत खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड तालुक्यातील येरवळे गाव दत्तक म्हणून घेतले होते. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी या पालकत्वाचा उपयोग गावाचा कायापालट करण्यासाठी न करता केवळ वाळू उपशासाठी केला आणि ग्रामस्थांना वाऱ्यांवर सोडले, अशी टीका शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

पुणे-बेंगळुरू महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) टोलनाक्यावर निवडणूक कामासाठी निघालेल्या पथकातील अधिकाऱ्यांना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोलसाठी अडवून धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल केशव कदम यांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, विजय शामराव शेवडे (रा. घुणकी) यास अटक केली असून, त्याचा सहकारी पसार झाला आहे.

घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : सोमवारी रात्री जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व इतर अधिकारी कार (एम.एच-०१-बी.टी-९०३२) मधून इस्लामपूरहून निवडणुकीचे काम आटोपून कोल्हापूरकडे येत असताना रात्री साडेअकराच्या सुमारास किणी टोलनाक्यावर लेन क्रमांक सातवरून जात असताना कारमधील अधिकाऱ्यांनी सरकारी ओळखपत्र दाखवून सोडण्याची विनंती केली. मात्र, येथे कार्यरत असलेल्या कर्मचारी विजय शेवडे व त्याच्या सहकाऱ्याने अधिकारी राहुल कदम यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली तसेच निवडणुकीच्या कामकाजासाठी जात असलेले सरकारी वाहन अडवून सरकारी कामकाजात अडथळा आणला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत राहुल शेवडेला अटक केली, तर दुसरा सहकारी फरारी झाला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, पोलिस नाईक संदीप पावलेकर करीत आहेत.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images