Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंधरा दिवसांचा ‘इलेक्शन प्लॅन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची अवस्था पायाला भिंगरी बांधल्यासारखी झाली आहे. प्रत्यक्ष मतदानाला पंधरा दिवसांचा कालावधी उरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व शिवसेना-भाजपकडून प्रत्येक दिवसाचा 'इलेक्शन प्लॅन' तयार करण्यात आला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे, सभा, प्रचार फेऱ्यांवर भर दिला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ९२७ गावांचा समावेश आहे. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा भागातील वाड्या, वस्त्यांतील मतदारांपर्यंत पोहोचणे हे आव्हानच आहे. यावेळची निवडणूक आघाडी आणि युतीने प्रतिष्ठेची बनविली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार व खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यात थेट लढत आहे. दोन्ही उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत. रोज सतरा ते वीस गावांचा प्रचार दौरा पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. वाड्या-वस्त्यांचा दौरा असल्यास २८ ते ३० ठिकाणी पोहोचताना उमेदवारांना कसरत करावी लागत आहे.

प्रचाराच्या पहिल्या टप्प्प्यात दोन्ही उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटी, कार्यकर्त्यांशी चर्चा, मेळावे यावर भर दिला होता. महिला मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी महिला मेळावे घेतले. उमेदवारांनी मोटारसायकलीवरून संपर्क अभियान राबविले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, आरपीआय गवई गट, पीआरपीआय कवाडे गट यांच्यासह मित्रपक्षांची आघाडी आहे. आघाडीतील मित्रपक्षांतील प्रमुख पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाले आहेत. शिवसेना, भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांची युती आहे. युतीचे नेते प्रचारात सक्रिय आहेत.

तालुका नेत्यांसोबत दौरे

आता प्रचाराला वेग आल्यामुळे विधानसभा मतदारसंघनिहाय मोठ्या लोकवस्तीच्या गावात सभा घेतल्या जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी, आमदार, माजी आमदारांसोबत प्रचार दौरे सुरू आहेत. कोल्हापूर उत्तर, दक्षिण मतदारसंघ, कागल, करवीर, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, आजरा, चंदगड तालुक्यांतील प्रमुख नेतेमंडळी प्रचारात उतरली आहेत. यामुळे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघत आहे.

सकाळी सात वाजता दौऱ्याला प्रारंभ

मतदानासाठी पंधरा दिवसाचा कालावधी उरल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून प्रत्येक दिवसाच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. रोज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दौऱ्याला सुरुवात होते. पहिल्यांदा दिवसभरातील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा होते. ग्रामीण भागात दौरा असल्यास सकाळी नऊ वाजता प्रचाराचा श्रीफळ वाढविला जातो. प्रत्येक गावात अर्धा तास चर्चा, गाठीभेटी घेतल्या जातात. कार्यकर्त्यांच्या घरी नाष्टा करत पुढच्या गावातील प्रचाराचे नियोजन होते. सायंकाळी मोठ्या गावात सभा होतात. रात्री दहापर्यंत प्रचार करून पुन्हा संपर्क कार्यालय गाठतात. प्रमुख कार्यकर्त्यांसोबत दिवसभरातील प्रचाराचा आढावा घेतला जातो.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामकाजावर परिणाम, नागरिकांचे हेलपाटे

$
0
0

जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हा परिषदेतील २२५ हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. वर्ग एक ते चारमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे आचारसंहिता लागू झाल्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांची वर्दळही थंडावली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आस्थापना, सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालल्याण विभाग, प्रकल्प संचालक विभाग ही कार्यालये आहेत. ग्रामपंचायत, कृषी, समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण व महिला बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग तर थेट नागरिकांशी निगडीत आहेत. वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजना, सरकारी अनुदान यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून नागरिक मुख्यालयात धाव घेत असतात.

सध्या जिल्हा परिषदेच्या कुठल्याही विभागात गेल्यानंतर 'साहेब, निवडणूक कामाला गेले आहेत'असे उत्तर नागरिकांना ऐकावे लागत आहे. विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या कामाची जबाबदारी कनिष्ठांवर सोपवली आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे निर्णय प्रक्रिया, वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजनेसंबंधी कनिष्ठ अधिकारी जबाबदारी स्वीकारण्यास चालढकल करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

.....

सदस्य प्रचारात, वर्दळ रोडावली

जिल्हा परिषदेतील भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह स्थानिक आघाड्यांचे सदस्य प्रचारात सक्रिय होत आहेत. दुसरीकडे आचारसंहिता लागू झाल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यात प्रशासनाला अडचणी आहेत. यामुळे पदाधिकारी व सदस्यांची जिल्हा परिषदेतील वर्दळ कमी झाली आहे. आचारसंहितेत कोट्यवधी रुपयांची कामे अडकली आहेत. निविदा प्रक्रिया राबवूनही वर्क ऑर्डर न काढल्यामुळे विकासकामांना सुरूवात झालेली नाही.

........

कोट

'नागरिकांच्या कुठल्याही कामाची अडवणूक होऊ नये यासाठी सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेशी निगडीत एखाद्या महत्वाच्या विषयाची माहिती, निर्णय असल्यास निवडणूक कामातील कर्मचाऱ्यांना काही वेळासाठी बोलावून घेतले जाते. शिवाय आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस सहीच्या प्रकाराने ‘बांधकाम’पुन्हा चर्चेत

$
0
0

जि.प. लोगो

.................

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील विविध विभागातील खाबूगिरी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावर कहर म्हणजे बांधकाम विभागाच्या बिलावर कार्यकारी अभियंत्यांची बोगस सही करण्यापर्यंत काहींनी मजल मारली आहे. खुद्द कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांनीच हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. कार्यालय कर्मचारी, ठेकेदाराकडे यासंदर्भात विचारणा केली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित ठेकेदाराचे बिल थांबविण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग हा महत्वाचा विभाग आहे. जि.प. तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर, बिलांना मान्यता अशी महत्वाची कामे या विभागामार्फत केली जातात. खोतवाडी येथील तीन लाख रुपयांच्या गटारीच्या कामाचे बिल सहीसाठी सोमवारी कार्यकारी अभियंता बुरुड यांच्याकडे सादर करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यावर मेजरमेंट बुक एम.बी. व कामाचे बिल सहीसाठी त्यांच्याकडे सादर केले. त्यांनी मेजरमेंट बुकवर सही केली, त्यानंतर बिलावर सही करताना त्याठिकाणी दुसऱ्या कुणीतरी सही केल्याचा प्रकार त्यांच्यासमोर आला.

बिलावरील सही आपली नसल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी चौकशीला सुरुवात केली. ठेकेदाराला बोलावून घेतले, त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपण हा प्रकार केला नसल्याचे सांगितले. बिलावरील बोगस सहीची गांभीर्याने दखल घेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. मंगळवारी या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र अद्याप बिलावर बोगस सही कुणाची याचा उलगडा झालेला नाही. दरम्यान, बिलावर बोगस सही करण्याचा प्रकार गंभीर असून त्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना कळविणार असल्याचे बुरुड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण, स्वच्छ भारत अभियानवर फोकस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक शिक्षण, आरोग्य सुविधा, स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्राम स्वच्छतेविषयक उपक्रम आणि महिला व बालकल्याण यावर फोकस ठेवून काम करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी आढावा बैठकीत केल्या. जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांची त्यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी रँप, मतदान केंद्रावर व्हीलचेअर, शिवाय दिव्यांगांच्या सोयीसाठी घरापासून मतदान केंद्रापर्यंत वाहतूक व्यवस्था ग्रामपंचायत पातळीवर होणार आहे. या सुविधांच्या अनुषंगाने चर्चा झाली. दरम्यान, जि.प.च्या विविध योजनांत लोकसहभाग वाढविण्याचे ठरले. लोकसहभागातून विकास साधण्यासाठी 'सीएसआर कक्ष' स्थापन केला आहे. मोठमोठ्या कंपन्या, उद्योजक, कारखानदारांच्या 'सीएसआर' फंडातून लोकहिताच्या योजनांची अंमलबजावणी, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीत गेल्या आर्थिक वर्षातील विकासकामे, खर्च पडलेला निधीविषयी चर्चा झाली.

०००

पंचायत राज समितीच्या अहवालाची चर्चा

पंचायत राज समितीने सप्टेंबर २०१८ मध्ये जिल्हा परिषदेला भेट दिली होती. तीन दिवसांच्या पाहणीदरम्यान जि.प. मुख्यालयातील विविध विभाग, गेल्या काही वर्षांतील योजनांची अंमलबजावणी, पंचायत समित्यांच्या कामकाजाचे सादरीकरण झाले होते. योजनांच्या अंमलबजावणीत काही विभागाच्या त्रुटी आढळल्या होत्या. विभागप्रमुखांनी समितीच्या शिष्टमंडळासमोर विविध कामांची माहिती मांडली होती. समितीच्या दौऱ्यानंतर आठ महिन्यांनी तीन दिवसांच्या पाहणी दौऱ्याचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये काही विभागाच्या कामकाजातील त्रुटी, अधिकाऱ्यांनी मांडलेल्या म्हणण्याविषयी सदस्यांनी मते नोंदविली आहेत. जि.प.मध्ये या अहवालाची चर्चा रंगली आहे.

००००

लोहारांचा चौकशी अहवाल १८ च्या स्थायीत

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा १८ एप्रिलला होत आहे. या सभेत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाचा चौकशी अहवाल सादर होणार आहे. चौकशी समितीप्रमुख व शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे, सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, भगवान पाटील यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. स्थायीपुढे अहवाल सादर झाल्यानंतर प्रशासन राज्य सरकारकडे लोहार यांच्यावरील कारवाईसंदर्भात शिफारसी करणार आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांची गुरुवारी कागलमध्ये सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार हे गुरुवारी (ता.११) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार व खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी कागलमध्ये जाहीर सभा होणार आहे. पवार हे १५ दिवसांत दुसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते काँग्रेस आघाडीतील प्रमुख नेते मंडळीशी चर्चा करणार आहेत.

त्यादिवशी ते पुण्याहून हेलिकॉप्टरने कोल्हापुरात सायंकाळी सहा वाजता पोहचणार आहेत. सायंकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी त्यांचे कागलमध्ये आगमन होईल. सात ने नऊ या वेळेत सभा होणार आहे. त्यानंतर ते कोल्हापुरातील हॉटेल पंचशील येथे मुक्कामासाठी परतणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूर मतदारसंघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची केली आहे. पवार यांनी कोल्हापूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. पवार यांनी दोन एप्रिल रोजी कोल्हापुरात आघाडीतील विविध पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महामेळावा घेतला. खासदार महाडिक व हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांना निवडून देण्याचे आवाहन केले. दरम्यान कागल येथील सभेला आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६९ टक्के मुलांचा ओढा जि.प.शाळेकडे

$
0
0

गूड न्यूज .... लोगो वापरणे

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

तालुका पातळीवर इंग्लिश शाळांचे फुटलेले पेव, खासगी शाळांचे वाढते आव्हान यावर मात करत जिल्हा परिषदेतच्या शाळांनी ग्रामीण भागात अव्वल स्थान कायम टिकवले आहे. जिल्ह्यातील ६८.९९ टक्के मुलांचा ओढा हा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे असल्याचे प्रशासनाच्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. सर्व्हेक्षणात पहिली प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या २९४०८ मुलामुलींपैकी तब्बल २०२८९ मुलांनी पहिली प्रवेशासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. यामध्ये मुलांची संख्या १०२६१ तर मुलींची संख्या १००२८ इतकी आहे.

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शाळांची संख्या १९९४ इतकी आहे. यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी संख्या १,७१, ९०९ इतकी आहे. जिल्हा परिषदेच्या तब्बल ३०० हून अधिक शाळा यंदा शताब्दी महोत्सव साजरा करत आहेत. दरम्यान, सध्या महापालिका, पालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांसमोर खासगी शाळांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तालुका पातळीवर आणि मोठ्या लोकसंख्येच्या गावातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत आहेत. त्या शाळांकडे पालकांचा व मुलांचा ओढा असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जिल्हा परिषदेतील काही शाळेतील विशेषत: डोंगराळी व दुर्गम भागातील शाळांतील पटसंख्येवर परिणाम झाला आहे. शहरालगतच्या शाळांतील पटसंख्या घसरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने गेल्या काही वर्षांपासून शाळांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये पुढाकार घेतला. 'माझी शाळा समृद्ध शाळा'अभियान हाती घेतले. शाळा तिथे प्रयोगशाळा, डिजीटल संकल्पना, शिष्यवृत्ती परीक्षा पॅटर्न हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत. दरम्यान, येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळा प्रवेशासाठी जि.प.शाळेतील शिक्षकांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण भागातील मुलांचे सर्व्हेक्षण केले. जी मुले पहिलीच्या प्रवेशासाठी पात्र आहेत अशांची नोंद केली. शिवाय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या मुलांनी शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी प्रयत्न केले.

..................

सर्व्हेक्षणातील महत्वाच्या नोंदी

जिल्ह्यातील बाराही तालुक्यात सर्व्हेक्षण झाले आहे. यामध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी पात्र मुलांची संख्या १५३५४ तर मुलींची संख्या १४०५४ इतकी आढळली. त्यापैकी १०२६१ मुलांनी तर १००२८ मुलींनी गुढीपाडव्याला शाळेत प्रवेश निश्चित केला. गगनबावडा तालुक्यातील ५०७ मुलामुलींपैकी ४५५ प्रवेश निश्चित झाले. भुदरगड तालुक्यात जि.प.शाळेत प्रवेशाचा टक्का ८७.७० इतका आहे. त्यापाठोपाठ भुदरगडमध्ये ८७.७० टक्के, शाहूवाडीत ८६.४७ टक्के, राधानगरीत ८५.८९ टक्के, चंदगडमध्ये ८२.७३ टक्के, कागलमध्ये ७४.७४ इतकी टक्केवारी आहे.

...........

तालुकानिहाय प्रवेश

आजरा सर्व्हेक्षणानुसार पात्र विद्यार्थी, दाखल विद्यार्थी

आजरा ८८५ ५०७

भुदरगड १४३९ १२६२

चंदगड २०२१ १६७२

गडहिंग्लज १७५९ १०१५

गगनबावडा ५०७ ४५५

हातकणंगले ४३१० २०३५

कागल २८२३ २११०

करवीर ५२४६ ३१६६

पन्हाळा ३०४५ २१४१

राधानगरी २४४७ २१२५

शाहूवाडी १९३६ १६७४

शिरोळ २९६३ २१२७

एकूण २९४०८ २०२८९

.......

कोट

'शिक्षकांनी केलेले सर्व्हेक्षण व दाखल विद्यार्थ्यांवर नजर टाकली तर ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांनी जि.प.शाळांना पसंती दिली आहे. शिक्षकांचे गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक नवोपक्रम, माझी शाळा समृद्ध शाळा अभियान, डिजीटल शाळा संकल्पना, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचे हे फलित आहे. शाळा सुरु होईपर्यंत पटसंख्येत आणखी वाढ होईल.

आशा उबाळे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमी गव्याचा देऊळवाडीत मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

देऊळवाडी (ता. भुदरगड) येथील जंगलाती रामाचा माळ येथील ओढ्यात असणाऱ्या घळईमध्ये पाय घसरून पडल्याने जखमी झालेल्या गव्याचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला.

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास हा गवा पाण्याच्या शोधार्थ वनहद्दीतून जात असताना ओढ्यालगत असणाऱ्या घळईमध्ये पाय घसरल्याने त्याचा मागील पाय फॅक्चर झाला होता. यामुळे गव्याला कोणतीही हालचाल करता येत नव्हती. ग्रामस्थांनी वन विभागाला कळविल्यानंतर वन विभागाचे पथक सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकारी नाईक यांनी गव्यावर औषधोपचार केले. मात्र, गवा मृत्युमुखी पडला. यावेळी घटनास्थळी वनक्षेत्रपाल संदेश पाटील, वनपाल बी. एस. पाटील, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी वापरा जपून

$
0
0

लोगो : पाणी वाचवा

कोल्हापूर टाइम्स टीम

पाण्याशिवाय जीवन नाही. हे खरे आहे, पण आपण ह्या जीवनाचा आदर राखतो का? देशातील पाण्याचे स्रोत दुषित होत आहेत. एककीकडे पाणी प्रदूषणामध्ये वाढ होत असताना पाण्याचा अपव्यव ही मोठ्या प्रमाणात होतो. पाण्याचा अपव्यव आणि दुषित करण्याचे प्रमाण असेल वाढत गेल्यास भावी पिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. यासाठी शहरातील सुज्ञ नागरिकांनी पाण्याची नासाडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले पाहिजेत.

अनिर्बंध वाळू उपसा, नद्यांच्या पात्रात मानवी अडथळा करणे यातून आपण निसर्गाशी खेळ करत आहोत. परिणामी देशातील अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत, तर काही नद्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शेती कसण्यासाठी जमीन आहे, पण प्रदूषित पाण्यामुळे जमिनीची नापिकी वाढत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत असताना अनेकठिकाणी पाण्याचा बेसुमार वापर होत आहे. तर अनेकठिकाणी कारखान्यांतून होणारे प्रदूषण, नदीकिनिारी केली जाणारी धार्मिक कृत्ये, नदीपात्रात टाकला जाणारा कचरा, नागरी वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाण्यामुळे जलचर नष्ट होऊन एकप्रकारे निसर्गालाच आव्हान दिले जात आहे.

देशभरात अशी स्थिती असताना पाणी जिल्ह्यातील कोल्हापूर शहराचीही वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. दुथडी वाहणाऱ्या पंचगंगेतून शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असला, तरी पाणी वापरांबाबत नागरिकांमध्ये जलसाक्षरतेचा असलेला अभाव, वितरण नलिकांद्वारे बेसुमार वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शहरात वारंवार कृत्रीम टंचाई निर्माण होते. शहरातील ही टंचाई दूर करण्यासाठी शहरवासीयांनी पाणी जपून वापरले पाहिजे. कमीतकमी पाण्याचा वापर करुन दैनंदिन गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. त्यासाठी जनतेनेही सहभाग घेण्याची आवश्यकता आहे.

आवाहन

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने शहरातील सुमारे साडेसात लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी वृध्वनलिका, दाबनलिका आणि ‌वितरण नलिकांचा वापर केला जातो. पाण्याचा दाब कायम राहण्यासाठी ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहे. जुनी वितरण नलिका, एअर व्हॉल्व्हमध्ये झालेला बिघाड यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छ पाणी थेट गटारींमध्ये मिसळत आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. अशा गळतीच्या ठिकाणांचे फोटो आणि शंभर शब्दांची माहिती maruti.patil@timesgroup.com या ईमेल आयडीवर पाठवा. आपण पाठवलेला फोटो आणि वृत्ताला योग्य प्रसिद्धी देऊन दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू. तसेच पाणी गळती रोखण्यासाठी आणि पाण्या वाया जावू नये, यासाठी सूचना, उपायही पाठवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंकाळ्याच्या संरक्षक भिंतीला तडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळ्यांवरील पदपथ उद्यानसह अन्य सुशोभिकरणाची कामे सुरू असताना येथील अंबाई टँकजवळ असलेल्या संरक्षक भिंतीला प्रचंड तडे गेले असून भिंत एका बाजूला झुकली आहे. भिंत कोणत्याही क्षणी कोसळण्यासारख्या स्थितीमध्ये आहे.

रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच शाळांना सुटी पडल्याने लहान मुलांची व पालकांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच पर्यटकांचाही नेहमीच राबता असतो. मात्र रंकाळा पदपथाकडे शालिनी पॅलेसकडून अंबाई टँककडे जाताना टँकच्या पश्चिमेकडील बाजूस संरक्षक भिंत बांधली आहे. या भिंतीजवळूनच क्रशर चौकाकडे रस्ता जातो. रस्त्यावर लहान मुलांची खेळण्यासह खाद्य पदार्थांच्या स्टॉलच्या गाड्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते.

या वर्दळीच्या रस्त्यालगत असणाऱ्या संरक्षक भिंतीला मोठ्या भेगा पडल्या असून भिंत एका बाजूला झुकली आहे. दोन ते तीन ठिकाणी पडलेल्या भेगा आणि भिंत झुकल्यामुळे कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. भिंतीची वेळीच डागडुजी न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सुशाोभिकरणाच्या कामाची देखभाल करण्यासाठी अनेक अधिकारी नियमित भेट देतात. तसेच उद्यानांची जबाबदारी प्रत्येक अधिकाऱ्यांवर देण्यात आली असताना संरक्षक भिंतीला गेलेले तडे आणि झुकलेली भिंत अधिकाऱ्यांना दिसत नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. रंकाळा तलाव पर्यटकांचे नेहमीच आकर्षण असल्याने संरक्षक भिंतीचे काम त्वरीत करावे अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई यांनी केली आहे.

सायलेंट झोनमधून बिनदिक्कत वाहतूक

शालिनी पॅलेस ते क्रशर चौकपर्यंतचा रस्ता सायलेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. राजकपूर पुतळा ते जावळाचा गणपतीपर्यंतच्या रस्त्यावर ड्रेनेजलाइनचे काम सुरू असताना रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. त्याचवेळी फुलेवाडीकडून येणारी वाहतूक शालिनी पॅलेस मार्गे वळवण्यात आली. ड्रेनेजचे काम पूर्ण दोन वर्षे झाली, तरी सायलेंट झोनमधून जाणारी वाहतूक अद्याप बंद केलेले नाही. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत असताना, त्यामध्ये झुकलेल्या संरक्षक भिंतीची भर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी पाटीलचे यश

$
0
0

फोटो आहे...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षेत विद्या मंदिर हिरवडे खालसा शाळेच्या समृद्धी प्रकाश पाटील हिने यश मिळवले. १४४ गुणांसह तिने तालुक्यात १६ वा क्रमांक मिळवला. शाळा व्यवस्थापन समिती, सी. बी. पाटील हायस्कूल यांच्यावतीने मुख्याध्यापिका अनिता जाधव यांच्या हस्ते समृद्धी सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. समृद्धीला मीना संकेश्वरे, मुख्याध्यापक बी. एस. संकेश्वरे, केंद्रप्रमुख पी. एस. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य सरकारकडून २०१८-१९ अर्थसंकल्पातील महापालिकेला देण्यात येणाऱ्या २९ कोटी ३१ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर निधीनुसार करण्यात येणाऱ्या कामांचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवा, याबाबतचे पत्र सोमवारी जिल्हा नियोजन मंडळाने महापालिका प्रशासनाला पाठवले. महापालिकेकडून आलेला प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येणार असून निवडणुकीनंतर मंजूर निधी मिळण्यासाठी शक्यता आहे.

महापालिकेच्या २०१८-१९ अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित कामे निश्चित केली होती. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी २९ कोटी ३१ लाखाचा निधी मंजूर केला होता. यामध्ये मुलभूत सुविधांसाठी दहा कोटी, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत मंदिर परिसर विकासासाठी सात कोटी, नगरोत्थानमधील ड्रेनेजलाइनसाठी पाच कोटी ३१ लाख, टर्न टेबल लॅडरसाठी चार कोटी व अल्पसंख्याक समाज उन्नतीसाठी दहा लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात कामे मंजूर झालेली असली, तरी निधी मिळालेला नव्हता. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी निधी मंजूर झाला. त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक होते. मंजूर निधीनुसार कामांचा प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे. त्याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाने महापालिकेला प्रशासनाला पाठवले. निधी खर्च करण्याचे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे ठेवले असून जिल्हा प्रशासन फक्त त्यावर देखरेख ठेवणार आहे. त्यामुळे प्रशासकीय मान्यतेसाठी महापालिकेकडून पाठवलेला प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल. सरकारला प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मंजूर निधी वर्ग होणार असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेला निधी मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार जागृतीसाठी मानवी रांगोळी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सकाळची प्रसन्न वेळ, विविध शाळांचे रंगीबेरंगी ड्रेसमधील विद्यार्थी, मतदारांच्या प्रबोधनासाठी विद्यार्थ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सूचना आणि त्यातून साकारलेली भव्य मानवी रांगोळी असे उत्साही वातावरण गांधी मैदानावर होते. मतदारांनी मतदाना हक्क बजावावा यासाठी तयार केलेल्या मानवी रांगोळीमुळे मैदान रंगीबेरंगी बनले. 'देश का त्यौहार - २०१९' असा अक्षरांचा मोठा गोल तयार करत मतदार जागृती करण्यात आली. विद्यार्थी व उपस्थितांनी निवडणूक निर्भयपणे पार पाडण्याची शपथ घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानावेळी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा या उद्देशाने मंगळवारी शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मानवी रांगोळीने कोल्हापूरकरांना साद घातली. विद्यार्थ्यांच्या मानवी रांगोळीने मैदान निवडणूकमय झाले. विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचा एकसुरात नारा दिला. मानवी रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई म्हणाले, 'मानवी रांगोळीचा उपक्रम देशातील एक उल्लेखनिय उपक्रम असून प्रत्येक मतदाराने मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच पाहिजे, हा संदेश खऱ्या अर्थाने मतदारांपर्यंत पोहोचेल. गेल्या निवडणुकीत ७२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानावेळी ही टक्केवारी निश्चितपणे वाढेल. मतदानासाठी मिळालेली सुटी सार्थकी लावावी.'

महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'महापालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळीत सहभागी होऊन मतदान जागृतीचा संदेश शहरवासीयांपर्यंत यशस्वीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी रांगोळीच्या सादरीकरणातून मी मतदान करणार हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत सर्वच मतदारांनी आपला हक्क बजावून लोकशाहीच्या बळकटीकरणास सहाय्यभूत व्हावे.'

मानवी रांगोळीत शहरातील साडेसहा हजार विद्यार्थी सहभागी होते. अभियानात सहभागी संस्था, शाळा, शिक्षकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. 'मी मतदान करणार, तुम्हीपण करा' या सेल्फी पॉइंटवर जिल्हाधिकारी देसाई यांच्यासह उपस्थितींनी सेल्फी काढली. मी मतदान करणार अशी स्वाक्षरी मोहीम राबवून प्रतिज्ञा घेण्यात आली.

जिल्हाधिकारी देसाई यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. अभियानाला शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, रविकांत अडसूळ, मनपाचे मुख्य लेखा परिक्षक धनंजय आंधळे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील आदी उपस्थित होते. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांनी स्वागत केले. नायब तहसिलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले.

सहभागी शाळा

मानवी रांगोळीत पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, एम. एल. जी. हायस्कूल, इंदूमतीदेवी हायस्कूल, पी. बी. साळुंखे विद्या मंदिर, एस. एम. लोहिया हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल, इंदिरा गांधी हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल, नूतन आदर्श विद्यालय, नेहरुनगर विद्या मंदिर, वीर कक्कया विद्या मंदिर, कोल्हापूर इंग्लिश स्कूल, विकास विद्या मंदिर, राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलसह शहरातील अनेक शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे १५० कर्मचारी निवडणूक कामात

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कामासाठी महापालिकेच्या १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कामकाजामध्ये त्यांचा बहुतांशी वेळ जात असल्याने त्याचा काहीसा परिणाम महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर झाला आहे. धोरणात्मक निर्णय किंवा नवीन कामे होत नसल्याने महापालिका चौकात दैनंदिन हजेरी लावणाऱ्या नगरसेवकांचाही प्रचारामुळे राबता कमी झाला आहे.

मतदार नोंदणी, ओळखपत्रांमध्ये बदल व वाटप, रहिवासी पुराव्यात बदल अशा अनेक निवडणूक कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिकेच्या ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक शाखेकडे झाली आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पुन्हा ५० कर्मचारी वर्ग करण्यात आले. त्यामध्ये उपायुक्त, मुख्य लेखापरीक्षक, चार उपशहर अभियंता, कामगार अधिकारी व ३० कनिष्ठ अभियंता या प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश होता. जाहीर प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा महापालिकेचे २० कर्मचारी वर्ग केल्याने तब्बल १५० कर्मचारी निवडणूक कामकाजामध्ये व्यस्त आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना आचारसंहिता पथक, जाहीर प्रचाराला उपस्थिती, बाहेरील मतदारांना बॅलेट मतपत्रिका पाठवणे, एव्हीएम मशीनची तपासणी व प्रात्यक्षिके, मतदारजागृती अभियान आदी कामे करावी लागत आहेत. या सर्व कामकाजामध्ये अधिकारी कर्मचारी व्यस्त राहत असल्याने त्याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी दुपारपर्यंत निवडणूक शाखेचे कामकाज केल्यानंतर दुपारी आपल्या मुख्य हुद्याची जबाबदारी पार पाडताना दिसतात. अधिकारीच उपस्थित नसल्याने काहीवेळा अभ्यागतांना हेलपाटेही मारावे लागतात. निवडणूक काळात कोणतेही काम होणार नसल्याने अनेकजणांनी महापालिकेकडे येणे बंद केले असल्याने अनेकदा प्रशासकीय इमारतीमध्ये शुकशुकाट दिसून येतो.

प्रशासकीय पातळीवर शांतता दिसत असताना, नगरसेवकांचाही राबता अत्यंत कमी झाला आहे. अनेक नगरसेवक महापालिकेत नियमितपणे हजेरी लावतात. प्रभागातील नागरिकांच्या समस्या घेऊन येणारे नगरेसवक महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात दिसतात. पण जाहीर प्रचाराला सुरुवात झाल्यापासून नेहमी होणारे नगरसेवकांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. सर्वजण प्रचारात असल्याने अनेकांनी महापालिकेकडे पाठ फिरवली आहे. दर शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीला सदस्य उपस्थिती लावतात. पण बैठकीनंतर त्वरीत आपआपल्या प्रभागातील प्रचारांमध्ये सक्रीय होण्यासाठी निघून जातात. त्यामुळे गप्पा मारत उभा राहणाऱ्या नगरसेवकांचे दर्शन जवळपास दुरापास्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबासाहेबांच्या विचाराचा आधार वंचित आघाडीला नाहीकुमार सप्तर्षी यांची टीका

$
0
0

बाबासाहेबांच्या विचाराचा आधार

वंचित आघाडीला नाही

कुमार सप्तर्षी यांची टीका

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'वंचित बहुजन आघाडीला कोणाचा आशीर्वाद आहे हे माहित नाही. त्यातून त्यांना काय साध्य करायचे आहे हे ही समाजत नाही. मात्र ते गोंधळ करीत आहेत हे मात्र नक्की. या आघाडीला बाबासाहेबांच्या विचाराचा आधार दिसत नाही,' असे मत युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले. व्याख्यानासाठी मंगळवारी ते सोलापुरात आले होते. त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सप्तर्षी म्हणाले, 'बाबासाहेब आंबेडकर जाती निर्मूलनवादी होते. जोपर्यंत जात आहे, तोपर्यंत भारतीय समाजाला सुख नाही, असे ते म्हणत. आता मात्र त्यांचे नातू उमेदवारांच्या जाती सांगून अंधार युगाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. मनुस्मृती अजून लांब आहे वाटत असेल पण मनुस्मृतीच्या अलिकडेच आपण थांबला आहात, एवढाच फरक आहे. संविधानातील भूमिका पुढे न्यायची आहे, असे यावरून दिसत नाही. आम्हाला बाबासाहेबांविषयी आदर असल्यामुळेच हे बोलावे लागते. दलित दलितांच्या उरावर बसले तर ते चांगले नाही. जात निर्मूलनाचा एक भाग म्हणून प्रथम सर्व दलितांमध्ये एकी व्हावी. सर्व सवर्णांना मान्य असलेला नेता सोलापुरात काँग्रेस पक्षाकडे आहे. म्हणूनच ते मुख्यमंत्री झाले. त्याच्यावर पहिला आघात करायचा ही, भावना चांगली नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

$
0
0

अज्ञात वाहनाच्या

धडकेत एकाचा मृत्यू

कराड :

मलकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण मंगळवारी पहाटेच्या सुमारास रुग्णालयातून बाहेर येऊन चालत महामार्गावरुन जात असताना त्याला अज्ञात वाहनाची धडक बसली. पुणे-बेंगळुरू महामार्गावर अक्षता मंगल कार्यालयासमोर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दत्तात्रय रामचंद्र कोकाटे (वय ३०, रा. जयराम स्वामी, वडगाव, ता. खटाव, जिल्हा सातारा) यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

.......

प्रामाणिक कर वसुली करा

कराड :

तालुक्यातील ग्रामपंचायतीत पाणीपट्टी व घरपट्टी वार्षिक कर आकारणी करताना प्रामाणिकपणे वसुली करावी. तसेच चौदाव्या वित्त आयोगातील पडून असलेला निधी तत्काळ खर्च करावा, कोणत्याही परिस्थितीत वसुलीचे उद्दिष्ट्य लवकरात लवकर पूर्ण करावे व निवडणुकी दरम्यान मतदारांना उत्तम सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी केल्या आहेत.

...

एकास मारहाण

कराड :

कामथी (ता. कराड) येथे बेगरवस्तीजवळ कॅनालच्या पुलावरील रस्त्यावर मुरूम घेऊन निघालेल्या डंपरचा रस्ता का अडवला, असे विचारल्याच्या कारणावरून अकरा जणांनी एकास शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यासह दगडाने व लोखंडी रॉडने मारहाण केली. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या बाबत मारुती नारायण खंडागळे (वय ५३, रा. कामथी, ता. कराड) यांनी सोमवारी रात्री कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अकरा जणांवर कराड ग्रामीण गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उसाच्या शेतात आढळलेबिबट्याचे दोन बछडे

$
0
0

उसाच्या शेतात आढळले

बिबट्याचे दोन बछडे

कराड :

धोंडेवाडी (ता. कराड) येथील एका उसाच्या शेतात ऊसतोड कामगारांना ऊसतोडणी करताना बिबट्याचे दोन बछडे सापडले. त्यातील एक बछडा जिवंत असून, एक मृत अवस्थेत आढळला आहे. सदर घटनेही माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत बिबट्याच्या जिवंत बछड्याला वन विभागाने ताब्यात घेतले असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. मृत बछड्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून, भुकेमुळे सदर बछड्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

जयकर पाटील (रा. भैरवनाथनगर (काले) ता. कराड) यांच्या धोंडेवाडी गावाच फाट्यानजीक असलेल्या ऊसाच्या शेतात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ऊसतोड चालू असताना ऊसतोड कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले.

........

मन की नव्हे धन की बात

उदयनराजे भोसलेंचा आरोप

कराड :

काँग्रेस विचारधारनेने भारतात प्रगती झाली. देश महासत्ता होणार, असे वाटत असताना देशावर गेल्या पाच वर्षांपूर्वी एक भयानक संकट येऊन पोहोचले व देश पाच वर्षे मागे गेला. लोकशाहीची तत्वे मागे ठेऊन हुकूमशाहीच्या मार्गाने सत्ताधारी पक्षाची वाटचाल सुरू असल्याने येणाऱ्या पुढील काळात भावी पिढीला योग्य दिशा मिळण्यासाठी आघाडीला साथ द्या आणि लोकशाही टिकविण्यासाठी देशात सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

सातारा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीसह मित्र पक्षांच महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मंगळवारी कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनखाली चरेगाव येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. चरेगांवसह खालकरवाडी, भवानवाडी, शितळवाडी, कळंत्रेवाडी आदी गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत शेवटी प्रचारसभेचे आयोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग वाढवतो धावण्याचा वेग

$
0
0

निरोगी शरीरासाठी तंदुरुस्त शरीर आणि संतुलित मन हवं. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी योग्य आहार आणि व्यायामाची आवश्यकता असते. संतुलित मनासाठी योगसाधना, ध्यान यांचा उपयोग करता येतो. या सगळ्याचा प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग होऊ शकतो, हा विचार याचं सूत्र आहे.

..........

Akhilesh.Pandey@timesgroup.com

प्रकृती उत्तम राखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यायामामध्ये धावण्याचा व्यायाम महत्त्वपूर्ण मानला जातो; पण तुम्हाला हे माहीत आहे का, धावण्याबरोबर योगासनांचा आधार घेतला, तर ते शरीरासाठी अधिक उपयुक्त ठरतं. वेगानं धावण्यासाठी मजबूत स्नायूंची आवश्यकता असतेच, शिवाय शरीर लवचिकही असणंही गरजेचं असतं. योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढते. तज्ज्ञांच्या मते, शारीरिक आणि मानसिक नियंत्रण राखण्यासाठी योग मदत करतो. योगामुळे शरीराचं संतुलन कायम राहतं. शरीर आणि मनाच्या संतुलनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे धावण्याचा व्यायाम करणाऱ्यांनी प्रथम योगासनांचा सराव केल्यास धावण्याचा वेग वाढतोच, शिवाय दमछाकही कमी होते.

स्नायूंना मिळते शक्ती

योगतज्ज्ञ परमानंद अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगामुळे स्नायूंची ताकद वाढते. त्याचा फायदा धावताना मिळतो. त्याचबरोबर ज्यांना गुडघ्याचा आजार आहे, त्यांनाही योगामुळे फायदा मिळतो. योगामुळे धावणाऱ्यांच्या सांध्यामध्ये लवचिकता येते आणि ते अधिक क्षमतेनं काम करतात. धावणाऱ्यांसाठी काही विशेष योगासनं आहेत, मात्र नियमितपणे प्राणायाम केला, तर त्याचाही उपयोग होतो.

श्वसनक्षमतेत वाढ

दक्षिण मुंबईतील कैवल्यधाम योगकेंद्राचे संयुक्त संचालक रवी दीक्षित यांनी सांगितल्यानुसार, धावण्यासाठी श्वसनाचे प्रकार करावेत आणि उत्तरोत्तर त्याचा वेळ वाढवत न्यावा. प्राणायाम करताना साधारणत: श्वास घेणं आणि सोडणं यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं. सामान्यत: एक व्यक्ती रोज ५०० लीटर ऑक्सिजन घेतो. मात्र, संबंधित व्यक्ती नियमितपणे योग करत असेल आणि धावत असेल, तर श्वसनशक्तीत वाढत होते. धावताना श्वास योग्य प्रकारे घेणं आवश्यक असतं.

योगाचा फायदा कसा होतो?

आपण धावतो, तेव्हा शरीराची संपूर्ण उर्जा एकवटते. त्यामुळे शरीर आणि मनावर नियंत्रण असणं खूप आवश्यक असतं. हे योगामुळे शक्य होतं. रवी दीक्षित यांच्या मतानुसार, पर्वतासन, गोमुख, मंडुक, भुजंग चक्र आदी आसनांमुळे धावणाऱ्यांना फायदा होतो. पर्वतासनामुळे पाय आणि गुडघ्यांत ताकद येते. गोमुखासनामुळे जांघा, नितंब, हात आणि खांद्याच्या स्नायूंमध्ये ताकद येते. या आसनांव्यतिरिक्त अधोमुखासन, जानुशीर्षासन, बद्धकोनासन, सेतुबंधासन आदी आसनांचाही धावणाऱ्यांना फायदा होतो.

योगामुळे शरीराला मिळणाऱ्या ऑक्सिजनमध्ये तिप्पट वाढ होते. त्याचा कोणत्याही धावणाऱ्याला फायदा मिळतो. योगामुळे स्नायूंना ताकद आणि श्वासाच्या प्रक्रियेला बळ मिळते.

- रवी दीक्षित, कैवल्यधाम योग केंद्र

योग मानसिक ताकद वाढवतो. त्यामुळे तणाव आणि नैराश्यावर मात करता येते. शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचा उपयोग धावताना होतो.

- डॉ. हंसा योगेंद्र, द योग इन्स्टिट्यूट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

devendra fadnavis : पवारांची टीम गेली आता आमच्या टीमचं राज्यः CM

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

ज्या टीमचा कप्तानच मैदान सोडून पळून गेला त्याची टीम काय मॅच खेळणार. आता त्यांच्या टीमचे दिवस संपले. महाराष्ट्रात आणि देशात फक्त आमचीच टीम काम करेल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे आयोजित संकल्प मेळाव्यात कल्याणराव काळे यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक, लक्ष्मण ढोबळे, माढ्याचे उमेदवार रणजित निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व नेते उपस्थित होते. यावेळी काळे यांचेसह पंढरपूरचे माजी नगराध्यक्षा सुरेख पवार, दगडूशेठ घोडके आणि स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बब्रुवान रोंगे यांनी भाजपात प्रवेश केला.

आपल्याला भाजपात प्रवेश करण्यापूर्वी मोठा दबावाला सामोरे जावे लागल्याची भीती कल्याणराव काळे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी भाजपात प्रवेश करीत असल्याचे काळे यांनी सांगितले. याचाच धागा पकडत इतकी वर्षे दबावाचे सुरू असलेले राजकारण केंव्हाच संपले असून अनेक वर्षे त्यांचे रावणराज सुरू होते. आता रामराज्य आल्याचे सांगत जर तुम्हाला कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर रातोरात त्याच्या दबावाची काय परिस्थिती करतो ते पहा, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला. मॅच खेळायला आलेला कॅप्टनमधूनच पळून गेला. आता त्यांच्या टीमचे दिवस संपले. आता आमची टीम राज्य करणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना लगावला. आम्ही सगळ्यांनाच मदत केली आहे. यातील काही नेत्यांची नावे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या सगळ्यांना भाजप प्रवेशाचा दबाव टाकला असता तर आर्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोकळी झाली असती, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

हे सर्व काल्पनिक असून त्यांच्या सत्यतेशी आमचा संबंध नाही. हे केवळ मनोरंजनासाठी पाहायचे असेल तर आपल्या जबाबदारीवर पाहावे, अशी टीप आता टीव्हीवाल्यांना देण्याची वेळ येईल, अशी राहुल गांधी यांची खिल्ली मुख्यमंत्र्यांनी उडवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजेंसाठी कराडमध्ये पुन्हा मेळावा

$
0
0

उदयनराजेंसाठी कराडमध्ये पुन्हा मेळावा

कराड : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने सध्या चांगलीच गती घेतली आहे. महाआघाडीचे उमेदवार उदनराजे भोसले यांनी कराडवर चांगलेच लक्ष केंद्रीत केले आहे. या पूर्वी केवळ ८-१० दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानंतर आज, गुरुवारी पुन्हा दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन करणत आले आहे. सायंकाळी सहा वाजता पंकज लॉन येथे मेळावा होणार आहे.

.........

शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

कराड :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी सरसकट कर्जमाफी करून देशातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला होता. मात्र सध्याच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीमध्ये जाणीवपूर्वक जाचक अटी घातल्याने कर्जबाजारी झालेला शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिला आहे, अशी टीका कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ बुधवारी नागठाणे (ता. जि. सातारा) येथे आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, लालासाहेब पवार, चंद्रकांत जाधव, यशवंत साळुंखे, सातारा जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा साळुंखे आदी उपस्थित होते.

...............

पाकिस्तानची भाषा बोलणारे

पृथ्वीराज चव्हाण देशद्रोही

कराड :

'मोदी सरकारच्या कणखर नेतृत्वामुळे भारतीय जवानांनी बालाकोट येथे केलेल्या हवाई स्ट्राईकमध्ये शेकडो दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. देशाच्या सुरक्षेसाठी झालेला हा महत्वाचा सर्जिकल स्ट्राईक सर्व जगाने मान्य केला असतानाही, त्या बाबत पुरावा मागणारे आणि पाकिस्तानची भाषा बोलणारे काँग्रेसचे आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देशद्रोही आहेत,' अशी टीका डॉ. अतुल भोसले यांनी केली.

शिवसेना-भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी कराड दक्षिण मतदारसंघातील वारूंजी, कोळे, उंडाळे, रेठरे बुद्रुक, सैदापूर या जिल्हा परिषद गटांमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

देशाच्या संरक्षणाची आणि सार्वभौमत्वाची काळजी असणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीला निवडून देणार की, देशाच्या कामगिरीवर शंका घेणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला निवडून देणार? असा सवाल डॉ. भोसले यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरीत राष्ट्रवादीची पदयात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हलगीचा कडाडणारा आवाज, ढोलताशाचा गजर अशा जल्लोषी वातावरणात खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बुधवारी राजारामपुरीत पदयात्रा काढण्यात आली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्ष आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. खासदार महाडिकांनी पदयात्रेच्या माध्यमातून राजारामपुरीतील नागरिकांशी संवाद साधला.

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जनता बझार चौक येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी महापौर सुनील कदम, दीपक जाधव, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, सत्यजित कदम, राजसिंह शेळके, संदीप कवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा निघाली. राजारामपुरीतील सहाव्या गल्लीत एका मुस्लिम नागरिकाने अपार्टमेंटमधील गच्चीत घड्याळ उंचावून स्वागत केले.

राजारामपुरीतील प्रत्येक गल्लीतून पदयात्रा निघाली. या दरम्यान खासदार महाडिकांनी नागरिकांशी संवाद साधला. कोल्हापूरच्या विकासासाठी पुन्हा एकदा निवडून देण्याविषयी आवाहन केले. पदयात्रेत महिला आघाडीच्या शहराध्यक्षा जहिदा मुजावर, नितीन पाटील, आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, पीआरपीआयचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब पाटील, युवाशक्तीचे रहीम सनदी, इंद्रजित जाधव आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>