Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महापालिका प्रभाग समित्यांची निवड १५ रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापती निवड सभा १५ एप्रिल रोजी होणार आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हा परिषदेचे सीईओ तथा पिठासन अधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी काढली. सभापतीपदासाठी गुरुवारी (ता. ११) अर्ज दाखल होणार आहेत.

महापालिकेच्या ताराराणी, गांधी मैदान, शिवाजी मार्केट व राजारामपुरी विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या प्रभाग समिती सभापतीपदाची मुदत संपली आहे. परिणामी विभागीय आयुक्तांनी नव्या सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन पिठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांची नियुक्ती केली. मित्तल यांनी शुक्रवारी सभापतींसह समिती सदस्यांना निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार गुरुवार दुपारी तीन ते पाच वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर १५ रोजी प्रथम प्रभाग समिती क्रमांक एकच्या सभापतींची सकाळी साडेअकरा वाजता निवड होईल. त्यानंतर २,३ व ४ क्रमांक प्रभाग समितींच्या सभापतींची निवड होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिस्तूल तस्कर मनीष नागोरीला कोल्हापुरात अटक

$
0
0

कोल्हापूर :

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात बेकायदेशीर पिस्तूल पुरविणारा आंतरराज्य पिस्तूल तस्कर तडीपार आरोपी मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या उर्फ राजू भाई याला पोलिसांनी पहाटे अटक केली.

रविवारी पहाटे हॉटेल स्कायलार्क येथे शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली. मन्या नागोरीची कारागृहातून पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर तो फरार होता. गेल्या चार दिवसांपूर्वी पोलिसांनी चंदगड येथून चार पिस्तूलासह काडतुसे जप्त केली होती. हा शस्त्रसाठादेखील त्यानेच पुरविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत असल्याची माहिती समोर येत आहे. मन्या नागोरीकडून आणखी काही शस्त्रे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. रविवारी दुपारी त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेतील पाइपलाइन वन विभागाच्या क्षेत्रातून टाकण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव वन विभागाने केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठवला. गेल्या चार वर्षांपासून परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेला यामुळे काहीसा दिलासा मिळाला. पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असली असल्याने योजनेतील मोठा अडथळा दूर होण्याची शक्यता आहे. पर्यावरण मंत्रालयाकडून आठड्यात मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी थेट पाइपलाइन योजनच्या कामाला २०१४ मध्ये सुरुवात झाली. अनेक अडथळे पार करत काम सुरू असताना वन विभागातून टाकण्यात येणाऱ्या पाइपलाइनची मंजुरीच घेण्यात आलेली नव्हती. परिणामी वन क्षेत्रातून जाणाऱ्या ७९० मीटर पाइपलाइनचे काम पूर्णपणे थांबले होते. पाइपलाइन जाणाऱ्या गावातून होणारा विरोध आणि वन विभागाची मंजुरी नसल्याने योजनेचे काम कासवगतीने सुरू होते. वन विभागाच्या परवानगीसाठी महापालिका प्रशासनाने २०१५ मध्ये प्रस्ताव पाठवला. पण त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. दोनवेळा प्रस्ताव परत आल्यानंतर पाठपुराव्याबाबत प्रशासनामध्ये शिथिलता आली होती.

मात्र आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या सुरू असलेल्या व रखडलेल्या योजनांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. सुटीदिवशी दोनवेळा थेट पाइपलाइन योजनेची पाहणी करत योजनेला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच वन विभागाकडे धूळखात पडलेल्या प्रस्तावाची पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. वन विभागाने दाखवलेल्या त्रुटी दूर करत नव्याने प्रस्ताव पाठवला. केवळ प्रस्ताव न पाठवता सातत्याने त्याचा पाठपुरावा ठेवला.महापालिकेच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवत वन विभागाने मंजुरीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला. १५ दिवसांत पर्यावरण विभागाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मात्र वनविभागाने पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव पाठवल्याने थेट पाइपलाइन योजनेतील मुख्य अडथळा दूर करण्यास महापालिका प्रशासनाला यश आले आहे.

वनविभागाने योजनेचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठवला आहे. आठवड्यात पर्यावरण विभागाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळेल. त्यानंतर वन क्षेत्रातील कामाला सुरुवात होईल.

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकटदिन सोहळा उत्साहात

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री स्वामी समर्थांचा अखंड जयघोष आणि दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे नामस्मरण करत शहरातील विविध मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा भक्तिमय वातारवणात आणि उत्साहात पार पडला. जलाभिषेक, महारुद्र हवन, स्वामीसुत विरचित प्रकटकांड आणि सायंकाळी पालखी सोहळा आदी धार्मिक विधी करत प्रकटदिन साजरा केला. प्रकटदिनाच्या निमित्त दर्शनासाठी भाविकांनी विविध मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

सकाळी कोटीतीर्थ, रुईकर कॉलनी, आर. के. नगर, संभाजीनगर, शिवाजी पेठ, मोहिते कॉलनी, अंबाबाई मंदिर परिसरासह विविध ठिकाणच्या मंदिरामध्ये जलाभिषेक स्वामींच्या मूर्तीवर जलाभिषेक घातल्यानंतर सोहळ्याला सुरुवात झाली. महारुद्र हवन आणि स्वामीसुत विरचित प्रकटकांड याचे वाचन करण्यात आले. यामुळे अनेकठिकाणी भक्तिमय वातावरण तयार झाले होते.

प्रकटदिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्यावतीने प्रज्ञापुरी येथे ३१ मार्च पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महिलांचे अथर्वशीर्ष, कीर्तन, प्रवचनातून श्री स्वामींचा जागर केला. रविवारी मोठ्या उत्साहात प्रकटदिन साजरा केला. पहाटे श्रींच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आल्यानंतर होमहवन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखी मार्गावर रेखाटलेली रांगोळी, फुलांनी सजवलेली पालखी, घोडे, बँड आणि समधुर भक्ती गीतांमध्ये सोहळा पार पडला. चव्हाण गल्ली, गणेश मंदिर, महाडिक कॉलनी, दत्त मंदिर मार्गे रात्री उशिरा पालखी प्रज्ञापुरी येथे दाखल झाली. पैजारवाडी येथेही भक्तीमय वातावरणात स्वामी समर्थ प्रकटदिन साजरा केला.

पालखी सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष नारायण बुधले, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, भाऊ घाडगे, जयसिंग जाधव, शिवाजी साळुंखे, प्रताप शिंदे, सतीश कणसे, रमेश काटकर, विजय पोवार, सुनील बंद्रे, बाबुराव पोवार, नगरसेवक सत्यजीत कदम, प्रवीण केसरकर आदी उपस्थित होते.

प्रा. मंडलिक,आमदार पाटील यांची उपस्थिती

प्रज्ञापुरी रुईकर कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्यावतीने प्रकटदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमासह रविवारी नेहमीप्रमाणे पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व पुत्र यशोवर्धन मंडलिक यांनी उपस्थिती लावली. मंडलिक पिता-पुत्र तेथून गेल्यानंतर काहीवेळात आमदार सतेज पाटील यांनी पालखी सोहळ्याला हजेरी लावली. पालखी सोहळ्याला दोघांनी लावलेली हजेरीची चर्चा रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी अर्ज माघार आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत सोमवार(ता. ८) पर्यंत आहे. अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्याने त्याचा मतांवर परिणाम होऊ नये म्हणून पडद्याआडच्या हालचाली वेगावल्या आहेत. अर्ज माघारीसाठी काही उमेदवारांना पद तसेच विविध ठिकाणी संधी देण्याचा शब्द दिला जात आहे. दोन्ही मतदारसंघांत मिळून ४२ उमेदवारांचे ६१ अर्ज शिल्लक आहेत. दरम्यान, माघारीनंतर लोकसभा निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

आघाडी आणि युतीने दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या असल्या तरी अपक्षांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्यामुळे लढती बहुरंगी होणार का, याविषयी उत्सुकता लागली आहे. सोमवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून, त्यानंतर चिन्हांचे वाटप होणार आहे. अर्ज छाननीच्या प्रक्रियेनंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २२ उमेदवारांचे ३३ अर्ज, तर हातकणंगले मतदारसंघात २० उमेदवारांचे २८ अर्ज शिल्लक आहेत. कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडी व मित्रपक्षांचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक व शिवसेना-भाजपचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक प्रमुख उमेदवार समजले जातात. त्या व्यतिरिक्त २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना-भाजपचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात प्रमुख लढत होईल असे चित्र आहे. त्याशिवाय अन्य पक्ष व अपक्ष म्हणून १८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करून लढत बहुरंगी होईल असे संकेत दिले आहेत. शेट्टींना काँग्रेस आघाडीचा पाठिंबा आहे. वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती, बहुजन समाज पक्ष यांच्यासह दोन्ही मतदारसंघांतून अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत.

००००

कारभारी सरसावले....

अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेऊन पाठिंबा द्यावा यासाठी कारभारी सरसावले आहेत. गेल्या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा फार गाजावाजा न करता दहा हजारांहून अधिक मते मिळवली होती. या मतांच्या विभागणीचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसू नये यासाठी उमेदवारांचे समर्थक वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून हालचाल करत आहेत. अर्ज माघार घ्यायला लावताना त्यांचा पाठिंबा आपल्याच उमेदवाराला मिळावा म्हणून प्रयत्नशील आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वार्तापत्र

$
0
0

द. म. वार्तापत्र ८ एप्रिल : विजय जाधव

००००

पातळी घसरलीच !

०००

निवडणुकीचे वातावरण तापत असून, त्याबरोबर प्रचाराची पातळीही घसरू लागली आहे. उमेदवार आणि नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे विकासाचे मूळ मुद्दे बाजूला पडत चालले आहेत.

०००

राजकारणात मतभेद असणे आणि मुद्द्यांना धरून वाद-प्रतिवाद करणे, तात्त्विक चर्चा हे लोकशाहीच्या जिवंतपणाचेच लक्षण आहे. लोकशाहीचे शुद्धिकरण व्हावे, लोकशाहीच्या अंतिम ध्येयाकडे जाण्यासाठीचे मार्ग प्रशस्त व्हावेत आणि अंतिमत: तळागाळातील सर्वसामान्य माणसाचे कल्याण व्हावे, समानतेचे तत्त्व अधिक भक्कम व्हावे, व्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षा विस्ताराव्यात, बंधुभावाला नवे धुमारे फुटावेत या प्रक्रियेतील निवडणुका हे एक परिणामकारक साधन. मात्र, ही लोकशाहीची पालखी ज्यांच्या खांद्यावर आहे, आणि ज्यांच्याकडे आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, या अपेक्षेने समाजाने डोळे लावले आहेत त्यांनीच उच्छाद मांडला तर? दुर्दैवाने या निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळत आहे. ते आणखी किती रंजक होते, एवढेच मतदानापर्यंत पाहावे लागणार आहे. देशपातळीवर यासाठी कामाला लागलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची संख्या अधिक असली तरी याबाबतीत अपवाद वगळता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आता संयम सोडला आहे. योगी आदित्यनाथांपासून साक्षी महाराजांपर्यंत आणि स्मृती इराणींपासून संबित पात्रांपर्यंत एक मोठी फौज भाजपात काम करते आहे, तशीच ती काँग्रेस, सपा, तृणमूल, टीआरएस, अकाली दल या पक्षांतही तितक्याच नेटाने काम करते आहे. राजकारणातील साधनशूचिता, संकेत आणि नैतिकता त्यांनी कधीच गुंडाळून ठेवली आहे. जातीपाती, लिंगभेद आणि चारित्र्याचे मुद्देही सारा विवेक गुंडाळून ठेवत खुलेआम चर्चेला आणले जात आहेत.

हे लोण फार फार मुंबईच्या खाली सरकणार नाही अशी अपेक्षा होती. पण, आता स्थानिक नेत्यांनीही ताळतंत्र सोडला आहे. एकमेकांना बघून घेण्याची, कपडे काढून घेण्याची आणि जाती-पातीचा उद्धार करण्याची भाषा सुरू केली आहे. या प्रकाराचे समर्थन कधीच करता येणार नाही. यावर समाजातून संतप्त प्रतिक्रिया येणे साहजिक आहे. यात आघाडीवर आहेत ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत. एकेकाळचे हे स्वाभिमानी मित्र आज एकमेकांवर तुटून पडले आहेत. त्यातच शेट्टी यांनी एका समाजाबद्दल केलेले वक्तव्य वादात सापडले आहे. 'सीमेवर लढायला आमची पोरे जातात, तेथे .….. यांची जात नाहीत,' असे म्हणत त्यांनी या समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. त्यावर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली तरी, एक मोठा वर्ग यामुळे दुखावला आहे. दुर्दैवाने यात दोन्ही बाजूंनी सैनिकांना ओढण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. देशासाठी लढणाऱ्या आणि सैन्यात कामगिरी बजावणाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, हे गंभीर आणि निषेधार्ह आहे.

केंद्रातील मोदी सरकारविरोधात शेतकरी आंदोलनाचे रणशिंग फुंकणारे आणि देशभरातील सव्वाशेहून अधिक शेतकरी संघटनांची मोट बांधणारे खासदार शेट्टी यावेळी महायुतीत नाहीत. ते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सहभागी झाले आहेत. यामुळे यावेळी त्यांना भाजपा आणि शिवसेनेशी एकाचवेळी लढावे लागत आहे. हे पक्ष त्यांच्यावर तुटून पडल्याने आणि त्यांना सदाभाऊ खोत यांची हूल मिळाल्याने या आरोप-प्रत्यारोपांनी कळस गाठला आहे. या राजकारणाचा केंद्रबिंदू असणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना खासदार शेट्टी यांनी पातळी सोडली. बिंदू चौकात चर्चेला येण्याचे आव्हान देताना खालच्या पातळीवर टीका केली. ती कोणालाच शोभणारी नाही. त्याला मंत्री पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकतर्फी वाटणारी हातकणंगलेची लढतही लक्षवेधीकडे चालली असल्याची ही नुसती झलक आहे. ऊस उत्पादक शेतकरी वर्ग स्वाभिमानीच्या पाठीशी आहे. या शेतकऱ्याला मता-मतांत फोडण्याचे काम सुरू आहे. भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतील सामना टिपेला पोहोचत चालला आहे. राष्ट्रवादीचे नेते पवार यांचे टार्गेट पंतप्रधान मोदी आणि भाजपा आहे. पवार यांनी गेल्या मंगळवारी कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि साताऱ्याची जागा आणण्याची जबाबदारी मंत्री पाटील यांच्यावर असल्याने तेही निकराने मैदानात उतरले आहेत. हातकणंगलेची जागा यामुळे प्रतिष्ठेची झाली आहे, स्वाभिमानी आणि भाजपसाठीही!

खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील वाक्‌युद्ध थंड होत असतानाच शेट्टी, खोत, मंत्री पाटील यांच्यात शाब्दिक धुमश्चक्री उडाली. ती कोठे जाऊन थांबते पाहावे लागेल. सहा महिन्यांपूर्वी पाटील यांच्यावर आगपाखड करणारे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आता त्यांची राजकीय समीकरणे चांगलीच जुळल्याने शांत झाले आहेत.

निवडणूक प्रचाराची पातळी अपेक्षेप्रमाणे घसरत चालली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा डागताना, उणी-दुणी काढताना नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पातळी सोडायला सुरुवात केली आहे. यात जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला फेकले जाण्याचा धोका अधिक. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा जाहीरनामा मांडणाऱ्या आणि त्याच्या पूर्तीचा कालबद्ध कार्यक्रम मागण्याचा अधिकार मतदारांना आहे. त्यावर या अखेरच्या टप्प्यात चर्चा झाली पाहिजे. कोल्हापूरचा पर्यटन विकास, नवे उद्योगधंदे, शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव, अखंडित विमानसेवा, मुंबईची रखडलेली विमानसेवा, बेरोजगारीवर ठोस उपाययोजना, पायाभूत सोयी-सुविधा आणि नागरीकरणाचे प्रश्न हा विकासाचा अजेंडा असला पाहिजे. बाकी नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे सामान्य मतदाराचे चांगलेच 'प्रबोधन' होत आहे. राजकारण्यांचा चेहरा समोर येतो आहे. त्यांचा बुरखा फाडण्याची जबाबदारी आणि कर्तव्य मतदारांचेच !

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारकी अनुकंपावरील नोकरी नव्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खासदारकी म्हणजे अनुकंपा तत्त्वावरील नोकरी अथवा जमिनीचा तुकडा नव्हे. जी वडिलांच्या नंतर मुलाला द्यावी. खासदारकीसाठी कर्तबगारी सिद्ध करावी लागते. अडीच वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत प्रा. संजय मंडलिक यांची जिल्हा परिषदेतील उपस्थिती केवळ पाच टक्के, तर माझी संसदेतील उपस्थिती तब्बल ७१ टक्के आहे. जे सदैव नॉट रिचेबल असतात त्यांना माझ्यासारख्या संसदरत्न पुरस्काराने सन्मानित खासदारावर टीका करण्याचा नैतिक अधिकार पोहोचत नाही,' अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी टीका केली.

खासदार महाडिक यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्कॉन लॉन येथे रविवारी युवा मेळावा झाला. महाडिक म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी आठ हजार कोटी रुपयांचा निधी आणला. निवडणुकीतील पंधरा दिवस तुम्ही मला साथ द्या, आयुष्यभर मी तुमच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन. सैनिकांनी पराक्रमाची शर्थ करून केलेल्या सर्जिकल स्टाईकचा आम्हालाही अभिमान आहे. पण भाजपने सर्जिकल स्ट्राईकचे राजकीय भांडवल करू नये. भाजपवाले नागरिकांचे मते आकर्षित करण्यासाठी निवडणुकीच्या कालावधीत ते पाकिस्तावर बॉम्बही टाकतील, त्यांच्या प्रचाराला भुलू नका.'

०००

चंद्रकांत पाटील हिशेबात राहा

सक्षणा सरगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. मोदी आणि शहांची जोडगोळी म्हणजे 'शोले'तील 'गब्बर व सांबा'आहेत, त्यांना सत्तेवरून हटविल्याशिवाय देशाला भवितव्य नाही, असे नमूद केले. ज्यांना स्वत:च्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते राम मंदिर बांधायला निघालेत, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, 'पालकमंत्री चंद्रकांत पाटील व शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी हिशेबात राहावे. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भलतेसलते आरोप करू नयेत. पालकमंत्र्यांनी कधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली नाही, त्यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही.' याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित पोवार, युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक, सागर कोंडेकर यांची भाषणे झाली.

००००

चुकीला माफी नाही

अभिनेता अंकुश चौधरी म्हणाले, 'महाडिक यांनी खासदार म्हणून संसदेत व मतदारसंघात प्रभावी कामगिरी केली आहे. विकासात्मक कामाला चालना देण्यासाठी त्यांना पुन्हा निवडून द्या. त्यांना निवडून दिले नाही तर पाच वर्षे चूक भोगावी लागेल आणि चुकीला माफी नसते.'

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

UPSC: प्रेरणा आईवडिलांचीच: पूज्य प्रियदर्शनी मुळे

$
0
0

Appasaheb.mali @timesgroup.com
AppasahebMT

कोल्हापूर:

'माझ्या जीवनात आईवडिलांचे स्थान खूप मोठे आहे. माझ्यासाठी ते दोघेही प्रेरणास्थान आहेत. अगदी लहानपणीच, शालेय जीवनातच त्यांच्यासारखं आपणही प्रशासकीय सेवेत करिअर करायचं, याचे बीज मनात रुजले आणि हे स्वप्न सत्यात उतरले. जे करायचे ठरविले होते ते साध्य केल्याचा क्षण माझ्या वाढदिवशी मी आणि आईबाबा तिघे एकत्र असताना अनुभवता आला. यासारखा सुवर्णक्षण आयुष्यात अन्य कुठला असू शकेल?' अशा शब्दांत पूज्य प्रियदर्शनी मुळे यांनी भावना व्यक्त केल्या.

पूज्य प्रियदर्शनी या माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे आणि दिल्लीतील आयकर विभागाच्या मुख्य आयुक्त साधना शंकर यांच्या कन्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत पूज्य प्रियदर्शनी देशात ११ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी परराष्ट्र सेवा विभागाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. ज्ञानेश्वर मुळे हे भारतीय परराष्ट्र मंत्रालयातून निवृत्त होऊन अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना त्यांच्या मुलीने परराष्ट्र सेवा विभागात यश मिळवले. ज्ञानेश्वर मुळे आणि कोल्हापूर यामध्ये एक वेगळे नाते आहे. शिरोळ तालुक्यातील अब्दुललाटसारख्या गावातून शिक्षणाची सुरुवात, कोल्हापुरात कॉलेज शिक्षण, पुढे प्रशासकीय सेवेत करिअर आणि वेगवेगळ्या देशात नोकरी, असा यशाचा चढता आलेख उंचावताना त्यांची कोल्हापूरशी नाळ कायम राहिली. पूज्य प्रियदर्शिनी यांची जडणघडण दिल्लीत झाली. त्यांचा जन्म, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही दिल्लीत झाले. श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून वाणिज्य विभागातून त्यांनी पदवी घेतली. कोलंबिया युनिव्हर्सिटी येथे मास्टर्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

यूपीएससी परीक्षेच्या तयारीसंदर्भात त्या सांगतात, 'भारतीय प्रशासकीय सेवेतच करिअर करायचे ही अगदी शालेय जीवनातच निश्चित केले. आई आणि वडिलांकडे पाहूनच माझी जडणघडण झाली. ते दोघेही उच्चपदस्थ. आपणही त्यांच्यासारखे अधिकारी व्हायचे, देशासाठी योगदान देण्याचा विचार लहानपणीच रुजला होता. यूपीएससी परीक्षेत यश मिळवायचे असेल तर नियमित अभ्यास, सकारात्मक वृत्ती आणि जिद्द आवश्यक आहे. या स्पर्धात्मक परीक्षेत उमेदवारांचा कस लागतो. यामुळे वाचनात वैविध्यता हवी. विषयांचा सखोल अभ्यास हवा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेनेची रंकाळा टॉवर परिसरात प्रचार फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेनेच्या वतीने रंकाळा टॉवर, गंगावेश परिसरात प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिवसैनिकांनी प्रचारफेरी काढली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या फेरीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, प्रवीण लिमकर, उदय निगडे, धनाजी कांरडे, ओंकार डकरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

'जय भवानी, जय शिवाजी'च्या गजरात रंकाळा टॉवर येथील जाऊळाच्या गणेश मंदिर परिसरातून फेरीस सुरुवात झाली. गंगावेश चौक, धोत्री गल्ली, दुधाळी परिसर, रंकाळा मार्केट स्पोर्टस् परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, 'जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता पर्यटनाचा विकास होण्याची गरज होती. पाच वर्षांत जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रा. मंडलिक हेच एकमेव पर्याय असून, शहरातील जनता त्यांच्या पाठीशी राहील.'

००००

आज शाहूपुरीत प्रचार फेरी

महायुतीच्या वतीने सोमवारी (ता.८) शाहूपुरी परिसरात प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. कुंभार गल्लीतील सुखसागर हॉटेल येथून प्रचार फेरीस सुरुवात होणार आहे. तसेच सायंकाळी सभांचे आयोजन केले आहे. सहा वाजता शनिवार पेठेतील मृत्युंजय तरुण मंडळ, सात वाजता बिंदू चौकात, आठ वाजता कसबा बावडा येथील जय भवानी गल्लीत, तर नऊ वाजता शाहूपुरी डी. डी. ग्रुप चौकात सभा होणार आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी वापरा जपून

$
0
0

लोगो : पाणी वाचवा

कोल्हापूर टाइम्स टीम

पाण्याशिवाय जीवन नाही. हे खरे आहे, पण आपण ह्या जीवनाचा आदर राखतो का? देशातील पाण्याचे स्रोत दुषित होत आहेत. एककीकडे पाणी प्रदूषणामध्ये वाढ होत असताना पाण्याचा अपव्यव ही मोठ्या प्रमाणात होतो. पाण्याचा अपव्यव आणि दुषित करण्याचे प्रमाण असेल वाढत गेल्यास भावी पिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. यासाठी शहरातील सुज्ञ नागरिकांनी पाण्याची नासाडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले पाहिजेत.

अनिर्बंध वाळू उपसा, नद्यांच्या पात्रात मानवी अडथळा करणे यातून आपण निसर्गाशी खेळ करत आहोत. परिणामी देशातील अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत, तर काही नद्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शेती कसण्यासाठी जमीन आहे, पण प्रदूषित पाण्यामुळे जमिनीची नापिकी वाढत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत असताना अनेकठिकाणी पाण्याचा बेसुमार वापर होत आहे. तर अनेकठिकाणी कारखान्यांतून होणारे प्रदूषण, नदीकिनिारी केली जाणारी धार्मिक कृत्ये, नदीपात्रात टाकला जाणारा कचरा, नागरी वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाण्यामुळे जलचर नष्ट होऊन एकप्रकारे निसर्गालाच आव्हान दिले जात आहे.

देशभरात अशी स्थिती असताना पाणी जिल्ह्यातील कोल्हापूर शहराचीही वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. दुथडी वाहणाऱ्या पंचगंगेतून शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असला, तरी पाणी वापरांबाबत नागरिकांमध्ये जलसाक्षरतेचा असलेला अभाव, वितरण नलिकांद्वारे बेसुमार वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शहरात वारंवार कृत्रीम टंचाई निर्माण होते. शहरातील ही टंचाई दूर करण्यासाठी शहरवासीयांनी पाणी जपून वापरले पाहिजे. कमीतकमी पाण्याचा वापर करुन दैनंदिन गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. त्यासाठी जनतेनेही सहभाग घेण्याची आवश्यकता आहे.

आवाहन

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने शहरातील सुमारे साडेसात लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी वृध्वनलिका, दाबनलिका आणि ‌वितरण नलिकांचा वापर केला जातो. पाण्याचा दाब कायम राहण्यासाठी ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहे. जुनी वितरण नलिका, एअर व्हॉल्व्हमध्ये झालेला बिघाड यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छ पाणी थेट गटारींमध्ये मिसळत आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. अशा गळतीच्या ठिकाणांचे फोटो आणि शंभर शब्दांची माहिती maruti.patil@timesgroup.com या ईमेल आयडीवर पाठवा. आपण पाठवलेला फोटो आणि वृत्ताला योग्य प्रसिद्धी देऊन दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू. तसेच पाणी गळती रोखण्यासाठी आणि पाण्या वाया जावू नये, यासाठी सूचना, उपायही पाठवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन ३

$
0
0

ज्ञानदेव देसाई गारगोटी : देसाईवाडी (ता. भुदरगड) येथील ज्ञानदेव देवबा देसाई (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ००००० केरबा कुरळे गारगोटी : येथील प्रगतशील शेतकरी केरबा दत्तात्रय कुरळे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ०००० चंद्रभागा पाटील कुडित्रे : वाशी (ता. करवीर) येथील चंद्रभागा अमृता पाटील यांचे निधन झाले. भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक भीमराव पाटील यांच्या त्या आई व विद्यमान संचालिका अनिता पाटील यांच्या सासू होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता.७) आहे. ०००० जनाबाई पाटील गारगोटी : कोनवडे (ता. भुदरगड) येथील जनाबाई महादेव पाटील (वय १०५) यांचे निधन झाले. निवृत्त मेजर विश्वास पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सतेज पाटील यांच्यावाढदिनी विविध उपक्रम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

आमदार सतेज पाटील यांच्या १२ एप्रिलला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस समितीच्या वतीने ड्रीम वर्ल्ड येथे नियोजन बैठक घेतली. यावेळी विविध उपक्रम राबवून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय समर्थकांनी घेतला. बैठकीस जिल्ह्यातील प्रमुख दोनशे ते तीनशे कार्यकर्ते उपस्थित होते.

संजय वाईकर यांनी १२ एप्रिलला बालकल्याण संकुलातील मुलांना गणवेश देण्याचे जाहीर केले. यावेळी विद्याधर गुरबे, आडूरचे बाबासाहेब पाटील, प्रा. निवास पाटील, कसबा वाळव्याचे दत्तात्रय पाटील, नगरसेवक प्रवीण केसरकर, शाहूवाडीचे करणसिंह गायकवाड, किरणसिंह पाटील, आदींनी वाढदिनी अपेक्षित अशीच भेट देणार असल्याचे सांगितले. बिद्री साखर कारखान्याचे संचालक विजयसिंह मोरे यांनी स्पर्धा परीक्षा आणि पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप सराव परीक्षा घ्याव्यात, अशी सूचना मांडली. राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. महादेव आडगुळे यांनी जंगी कुस्त्याचे मैदान यावर्षीही घेतले जावे अशी सूचना केली. गेल्या १२ वर्षांत ६० लाख विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यात आल्या. या वाढदिनी जास्तीत जास्त वह्यांचे संकलन करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी व्यक्त केला. उचगावचे माजी सरपंच मधुकर चव्हाण यांनी आमदार पाटील यांच्या वाढदिनी ४७ हजार वह्या देण्याचे जाहीर केले. उपमहापौर भूपाल शेटे यांनी कुष्ठरुग्णांना अन्नदान करण्याचे जाहीर केले. माजी महापौर मारुतराव कातवरे यांनी यावर्षीपासून जिल्ह्यात आदर्शवत अशा व्याख्यानमालेचा पायंडा पाडला जावा, तर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना वाढदिनी सत्काराचे आयोजन केले जावे, अशी सूचना सुजितसिंह देसाई यांनी मांडली.

बैठकीला धनराज घाटगे, सचिन घोरपडे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, माजी महापौर सागर चव्हाण, शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, राजू लाटकर, आदी उपस्थित होते. पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. महादेव नरके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भरत रसाळे यांनी प्रास्ताविक केले. सतीश बरगे यांनी सूत्रसंचालन केले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : कांता मसुटे

$
0
0

फोटो...

कांता मसुटे

कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) मसुटेमळा येथील कांता श्रीपाल मसुटे (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिरेकनरचे दरही 'जैसे थे'

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम राज्य सरकनारने सलग दुसऱ्या वर्षी मालमत्तेचे मूल्यांकन करणाऱ्या 'रेडिरेकनर'च्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळण्याबरोबर घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. महापालिकेच्या क्षेत्रातील प्रमुख विभागांतील खुल्या व निवासी क्षेत्रांतील रेडिरेकनरचा दर कायम राहिल्याने सरकारच्या महसूलात वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी रेडिरेकनरच्या दरांची सूची जाहीर होते. मात्र, यावर्षी दरसूची जाहीर होण्यासाठी दोन दिवसांचा विलंब झाला. परिणामी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी दस्त नोंदणी कोणत्या दराने होणार याबाबतची उत्सुकता होती. मंगळवारी दरसूची जाहीर होताना २०१७-१८चा दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रेडिरेकनरची दरसूची मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे मुद्रांक शुल्क, घरफाळा व अन्य विभागांना मालमत्तेच्या मूल्यांकनासाठी आधारभूत मानली जाते. तसेच महापालिकेचा बांधकामासाठी लागणारा परवाना आणि आयकर यामध्ये यातून महसुली वाढ होते. त्यामुळे या दरांकडे विशेषत: बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष लागलेले असते. नोटबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर बांधकाम क्षेत्राला मंदीच्या कालचक्रातून मार्गक्रमण करावे लागत होते. सद्यस्थितीत हे क्षेत्र हळुहळू पूर्वपदावर येत असताना रेडिरेकनरचे दर कायम ठेवून राज्य सरकारने दिलासाच दिला आहे. त्याचबरोबर नव्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. शहरातील प्रमुख भागातील दर (प्रती, चौ. मी.) भाग खुली जागा निवासी वापर गुजरी ते भाऊसिंगजी रोड ३४,५०० ३७,०६० ताराबाई रोड २४,३१० ३८,८०० बिनखांबी गणेश मंदिर ४२,३८० ४२,२५० केशवराव भोसले नाट्यगृह १३,१६० ३१,३८० बिंदू चौक ३७,४७० ४१,७४० टाउन हॉल ते शाहू पुतळा १०,९३० ३०,८४० बुधवार पेठ ११,१३० ३०,१७० भारती विद्यापीठ ८,६२० ३८,१०० मार्केट यार्ड ७,१०० ३६,९७० सिंचन भवन, हिंम्मतबहाद्दूर १८,५५० ४३,९८० जिल्हाधिकारी कार्यालय ३२,२४० ५१,००० राजारामपुरी ३७,७४० ४५,५७० शाहूपुरी व्यापारी पेठ ३५,७२० ४७,०२० दाभोळकर चौक ४८,३८० ५२,३५० प्रतिभानग परिसर १०,३४० १२,३३० कळंबा नाका ते वाशी नाका ३,४५० २९,४२० फुलेवाडी रिंगरोड ३,४५० २९,४२० संध्यामठ ते जुना वाशीनाका ११,४४० ३३,२१० बिनखांबी मंदिर ते निवृत्ती चौक २८,०५० ३६,७३० रंकाळा ते महाद्वार रोड ३०,३८० ४१,००० वरुणतीर्थ वेस-जिरगे तिकटी २८,४५० ३७,७९० शिवाजी पार्क २२,९९० ४२,६२० शाहू व शिवाजी स्टेडियम १०,४७० ३१,३८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : विमल वडेकर

$
0
0

फोटो...

विमल वडेकर

शाहूवाडी : सरुड (ता. शाहूवाडी) येथील विमल मधुकर वडेकर (वय ६३) यांचे निधन झाले. किराणा व्यापारी अनिल वडेकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.८) आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमण निर्मूलन मोहीम आजपासून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या दोन महिन्यांपासून थंडावलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सोमवारपासून (ता. ८) सुरुवात होणार आहे. अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्याच्या सूचना अतिक्रमण विभागाला देण्यात आल्या आहेत. मात्र, कारवाईला कोठून सुरुवात होणार याचा निर्णय आधी घेतला जाणार आहे.

डिसेंबर २०१८ पासून अतिक्रमण विभागाने शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम धडाक्यात सुरू केली. तीन महिने मोहीम राबवताना अनेक ठिकाणचे फूटपाथ व अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यात आले. तर बेकायदेशीर होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले. मात्र गेल्या दोन महिन्यापसून कारवाई थंडावली आहे. याबाबत शुक्रवारी (ता. ५) झालेल्या स्थायी समिती बैठकीत अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्याची सूचना सदस्यांनी केली होती. 'स्थायी'च्या सूचनेनंतर प्रशासनाने सोमवारपासून अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहिरी व लोकगीतांतून हातकणंगलेत मतदानजागृती

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

कोणत्याही निवडणुकीत अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनतेतून मतदानाबाबत नकारात्मक भावना निर्माण होऊन मतदानापेक्षा त्या मतदान सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी बाहेर जाणे पसंत करतात किंवा मतदानासाठी येत नाहीत. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. याची गंभीर दखल घेऊन मतदानाविषयी जनजागृती होण्यासाठी हातकणंगले निवडणूक प्रशासनाने अनोखा फंडा वापरला असून, तालुक्यातील अनेक गावांत पोवाडे व लोकगीतांतून मतदानाचे महत्त्व सांगितले जाणार आहे.

निवडणुकीत मतदानाची आकडेवारी कमी होत असल्याने निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन जिल्हास्तरावर प्रशासनाला मतदान वाढीसाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्याचे सक्त आदेश दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी, तहसीलदार सुधाकर भोसले, नायब तहसीलदार दिगंबर सानप, श्रीमती शोभा कोळी, आदींनी अनोखा फंडा वापरला आहे. मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाने शाहिरांमार्फत तालुक्यातील ३५ ते ४० गावांत पोवाडा व लोकगीतांतून प्रबोधन सुरू केले आहे. या अनोख्या उपक्रमांना जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

तालुक्यातील हुपरी, पेठवडगाव, घुणकी, हातकणंगले, कुंभोज, शिरोली, हेरले, अतिग्रे, रुकडी, रेंदाळ, रांगोळी आळते, वाठार, पारगाव, रुई, अंबप, टोप, आदींसह ३५ ते ४० गावांत मतदान जनजागृती पोवाडा व लोकगीतांचे सादरीकरण होणार आहे. याचे सर्वसामान्य जनतेतून कौतुक होत आहे.

००००

कोट...

मतदानाबाबत अनेक ठिकाणी जनतेतून उदासीनता दिसून येत असल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानाचे महत्त्व अधोरेखित व्हावे तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पोवाडा व लोकगीतांतून प्रबोधन करून जनजागृती करत आहोत. शाहिरांच्या या पथकांत दहाजणांचा समावेश असून, ही पथके दररोज तालुक्यातील चार ते सहा गावांत कार्यक्रम सादर करणार आहेत.

सुधाकर भोसले, तहसीलदार

००००

फोटो ओळी : हातकणंगले तालुक्यातील गावागावांत पोवाडा व लोकगीतांतून मतदानाबाबत जनजागृती करताना शाहिरी पथक.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाने केला वडिलांचा खून

$
0
0

मुलाने केला वडिलांचा खून

सातारा

किरकोळ कारणावरून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून केल्याची घटना तारगाव (ता. कोरेगाव) येथे घडली. पित्याचा खून करणाऱ्या आबाजी लक्ष्मण मोरे (वय ३०) या संशयिताला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हायस्कूलनजीक असलेल्या शेतात काढलेली ज्वारी मळण्यासाठी लक्ष्मण हणमंत मोरे (वय ६८) हे पत्नी मंगल व मुलगा आबाजी यांच्या समवेत गेले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ज्वारी मळायचे काम सुरू होते. चार पोती ज्वारी झाली. मळलेल्या ज्वारीतील एक पोते विकून पैसे मी घेणार, असे मुलगा आबाजी वारंवार म्हणत होता. सायंकाळ झाल्याने लगतचे शेतकरी निघून गेल्यानंतर शेतात वृद्ध लक्ष्मण व मंगल मोरे राहिले. आई-वडील दोघेच शेतात असल्याची खात्री पटल्यानंतर इराद्याला पेटलेल्या आबाजीने ज्वारी भरलेले एक पोते घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याला वडील लक्ष्मण मोरे यांनी विरोध केला. या वरून त्या दोघांत झटापट झाली. झटापटीत संतप्त झालेल्या आबाजीने वडिलांना मारायला सुरुवात केली. मुलगा नवऱ्याला मारहाण करीत असलेले पाहून पत्नी मंगल यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी आबाजीने आईचा गळा पकडून ढकलून दिले. यात त्यांचे स्वर यंत्र जोरात दबल्याने आवाज बसला. संतप्त आबाजीने वडिलांना मारत, फरपटत शेजारील वांग्याच्या शेतात नेऊन छातीवर बसून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. वृद्ध मंगल यांनी ही घटना रस्त्याने दुचाकीवरून घरी निघालेल्या शाशिकांत गुरव यांना सांगितली. गुरव यांनी तत्काळ शेजारील ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या मारहाणीत लक्ष्मण मोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. रहिमतपूर पोलिसांनी आबाजी मोरे याला अटक केली आहे.

..........

शेखर गोरेंचा

रणजितसिंहांना पाठिंबा

सातारा :

माण-खटाव तालुक्याचे युवा नेते शेखर गोरे यांना सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेकडे बहुमताचे संख्याबळ असूनही पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत येताना युवा पिढीने विचार करावा, अशी विनंती करून युवा नेते शेखर गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पाठींबा देत असल्याची घोषणा केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका प्रभाग समित्यांची निवड १५ रोजी

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापती निवड सभा १५ एप्रिल रोजी होणार आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हा परिषदेचे सीईओ तथा पिठासन अधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी काढली. सभापतीपदासाठी गुरुवारी (ता. ११) अर्ज दाखल होणार आहेत.

महापालिकेच्या ताराराणी, गांधी मैदान, शिवाजी मार्केट व राजारामपुरी विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या प्रभाग समिती सभापतीपदाची मुदत संपली आहे. परिणामी विभागीय आयुक्तांनी नव्या सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन पिठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांची नियुक्ती केली. मित्तल यांनी शुक्रवारी सभापतींसह समिती सदस्यांना निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार गुरुवार दुपारी तीन ते पाच वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर १५ रोजी प्रथम प्रभाग समिती क्रमांक एकच्या सभापतींची सकाळी साडेअकरा वाजता निवड होईल. त्यानंतर २,३ व ४ क्रमांक प्रभाग समितींच्या सभापतींची निवड होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र : विजय जाधव

$
0
0

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र

- विजय जाधव

०००००

सरळ लढती, तिरकस राजकारण!

०००००

ही निवडणूक भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी निर्णायक असेल. सांगली, सोलापूर राखण्याबरोबरच कोल्हापूर, सातारा, हातकणंगले, माढ्यात झुंजावे लागेल. राष्ट्रवादीसमोरसुद्धा हे आक्रमण परतवून लावण्याचे आव्हान आहे. सातारा, कोल्हापूरची जागा राखण्यासाठी पक्षाची कसोटी लागणार आहे. भाजप-सेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात सरळ सामना रंगणार आहे. अपेक्षेप्रमाणे सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का बसला!

०००००

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून दक्षिण महाराष्ट्रात तब्बल त्रेचाळीस दिवसांचा अवधी मिळाल्याने पक्ष, उमेदवारांना ऐनवेळच्या रणनीतीला चांगलाच वेळ मिळाला. निवडणुकीचे मैदान स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने याचा फायदा उठवत, चाचपणी करत अखेर उमेदवार जाहीर केले. अपवाद काँग्रेसचा आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचा. विरोधी काँग्रेस आघाडीपेक्षा खरी परीक्षा होती ती सत्ताधारी भाजप आघाडीचीच. केंद्रीय राजकारणाचे आणि त्यासाठीच्या नियोजनाचा भाग म्हणून सत्ताधारी आघाडीने 'जर-तर'च्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारीही ठेवली. यामुळेच युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारीही भाजपने घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी ती स्वीकारली आहे. यापैकी किती नव्या जागा घेणार आणि पक्षाला बळ पुरवणार, यावरच त्यांची राजकीय ताकद दिसून येणार असल्याने ते पहिल्या दिवसापासूनच कामाला लागले आहेत. निवडणूक यंत्रणा कामाला लावण्यात त्यांनी बरेच अंतर पार केले.

शरद पवार यांच्या शब्दाखातर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक अखेर पक्षातच राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपात येण्याचे निमंत्रणही त्यांनी नाकारले. त्यांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या भाजपला अखेरच्या क्षणी सेनेच्या उमेदवारासाठी प्रचार करण्याची वेळ आली. महाडिक आमचे उमेदवार असतील, असे सूचित करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना महाडिक यांनी अखेर राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतल्याने अडचणीचे झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी दक्ष राहत सर्व शक्यता गृहित धरून नियोजन केले. युतीची घोषणा झाल्याबरोबर लगेचच त्यांनी प्रचाराची सूत्रे हालवायला सुरुवात केली. महाडिक मित्र असले तरी मैत्रीपेक्षा युतीधर्म महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. फार मोठे सैन्य नसतानाही माहीतगार उमेदवार, सेनेचा काही भागावर असलेला प्रभाव आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाचा नेमका राजकीय लाभ उठवत त्यांनी मोर्चेबांधणी केली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही पहिल्या दिवसापासूनच महाडिकांविरोधात काम सुरू केल्याने सेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी तयार राजकीय पार्श्वभूमी मिळाली.

सतेज पाटील गट आक्रमक

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निर्णयाला सुरुंग लावत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांच्याविरोधात बंडाचे निषाण खांद्यावर घेतले. पाडापाडीच्या राजकारणाचा जुना राग मनात धरून त्यांनी यावेळी पक्ष खुंटीला टांगून उघड भूमिका घेतली. पक्षाच्या पातळीवर सुटका करून घेण्यासाठी सातारा, सांगलीची जबाबदारी घेतली असली तरी ते काय करत आहेत, हे लपून राहिलेले नाही. आघाडीच्या कोल्हापूरच्या बैठकीत त्यांची अनुपस्थिती जाणवणारी होती. डॉ. डी. वाय. पाटील यांना राष्ट्रवादीत आणण्याचे राजकारण झाले असले तरी त्यातून फारसे काही साध्य झाल्याचे दिसत नाही. सतेज पाटील यांनी आधीच विरोधाचा पवित्रा घेतल्याने आता पुढे काय, हा प्रश्न उरला नाही. सतेज पाटील यांच्या या नव्या भूमिकेने आघाडीचे नेते मात्र चिंतेत आहेत. त्यांची ही भूमिका सतेज यांना आगामी राजकारणासाठी अडचणीची ठरू शकेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे; पण ते आता कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नसावेत!

अजून बराच मोठा टप्पा असला तरी निवडणुकीचे राजकारण हळूहळू तापू लागले आहे. यात 'गोकुळ'चा मल्टिस्टेटचा विषय चर्चेत आला आहे. खुपिरेच्या सभेत ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांनी या निवडणुकीत धनंजय पडले तर खुपिऱ्याचे राजकारण तर संपेलच; पण महाडिक आणि गोकुळचे राजकारणही संपेल, असा निर्वाणीचा सूर काढत कार्यकर्त्यांना गाफील न राहण्याचा सल्ला दिला आहे. गोकुळच्या मल्टिस्टेट प्रकरणात झालेल्या सभेच्या राजकारणाचीही उजळणी घेतली आहे. त्यावेळी मल्टिस्टेटला विरोध करणाऱ्यांची फळी सांभाळणारे सेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना विधानसभेला पाडण्याचा विडाही त्यांनी उचलला आहे. यामुळे महाडिकविरोधी राजकारण आणखी टोकदार झाले आहे. यातून महाडिकसमर्थकांना स्थानिक पातळीवर बळ मिळाले असले तरी ही निवडणूक गोकुळची, विधानसभेची की लोकसभेची, असा प्रश्न विचारला जात आहे, तो रास्तच!

मोठा बॉम्ब कुठला?

यापूर्वी राजकीय चमत्काराची भाषा करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मोठा बॉम्ब फोडण्याचे सूतोवाच केले आहे. डॉ सुजय विखे-पाटील, डॉ. भारती पवार, रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यानंतर राज्यात आणखी कोण गळाला लागले? हे स्पष्ट झाले नसले तरी आता मोठा बॉम्ब कोणता, हे लवकरच स्पष्ट होईल. सांगलीतून भाजपने विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी दिली. अंतर्गत धुसफूस आणि काँग्रेसमधील बेदिली लक्षात घेता उमेदवार बदलाची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, तो धोका न पत्करता पक्षाने संजय पाटील यांच्यावरच विश्वास दाखविला. ही जागा परत मिळविण्याचे आव्हान चंद्रकांत पाटील यांच्यासमोर असेल.

खासदार महाडिक यांनी मंडलिक हेच विरोधी उमेदवार असणार हे गृहित धरून मोर्चेबांधणी केली असली तरी सतेज पाटील यांचा विरोध, भाजप-सेना युतीचा समोर असणारा उमेदवार यामुळे त्यांच्यासमोरचे आव्हान वाढले आहे. निवडणूक एकतर्फी होणार असे तयार झालेले दोन महिन्यांपूर्वीचे चित्र पालटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी सहभागी झाले आहेत. त्यांचा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगलाच प्रभाव आहे. यामुळे ते प्रचारात किती ताकदीने उतरतात, माजी आमदार महादेवराव महाडिक 'गोकुळ'वरून कोणता पवित्रा घेतात, 'भागिरथी'च्या महिला घरच्या राजकारणात आपल्या मताचा कसा वापर करतात, विकासाच्या स्थानिक प्रश्नांची चर्चा कशी होते, यावरच निवडणुकीचे वातावरण तापणार आहे. आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडेलच, लढती सरळ असल्या तरी राजकारण तिरकस आहे!

\Bविशेष :\B भाजप-शिवसेना महायुतीने कोल्हापुरातून निवडणूक प्रचाराची दणक्यात सुरुवात केली. सभेस झालेल्या गर्दीने महायुतीला बाळसे आले असले तरी ती मतांमध्ये परावर्तित करण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे. सांगलीत काँग्रेसच्या पोकळ बालेकिल्ल्यालाही दिवंगत वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांनी सर्व पदांचे राजीनामे देत हादरा दिला आहे. काँग्रेसच्या विसंवादी आणि पराभूत मानसिकतेच्या राजकारणाचे ते फलित म्हणावे लागेल!

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images