Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्हाधिकारी कार्यालयाला धोका

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत आग प्रतिबंधक आणि संभाव्य आपत्ती टाळणारी सिस्टीमच नाही. त्यामुळे या इमारतीत पुन्हा आगीसारखा प्रकार सहज घडू शकेल अशी स्थिती आहे.

कार्यकर्त्यांना पक्षाने ताकद द्यावी

$
0
0
‘शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला कार्यकर्त्यांनी ताकद दिली पण कार्यकर्त्यांना सक्षम करण्यात पक्ष कमी पडला,’ अशी खंत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष निरीक्षकांसमोर व्यक्त केली. पक्षाचा स्थानिक आमदार नसणे, विधान परिषद सदस्य नसणे, आणि तरुण कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी कोणताही कार्यक्रम नसणे यामुळे शहरात पक्षाला अनेक अडचणीतून जावे लागत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

अनागोंदीमुळे हुकली संधी

$
0
0
कोल्हापुरातील नियोजित शाहू स्मारकासाठी घेण्यात आलेल्या आराखडा स्पर्धेतील नियोजनात महापालिकेच्या गलथान कारभारामुळे कोल्हापूरच्या अशोक सुतार या कलाकाराचे मॉडेल पात्र ठरूनही परीक्षकांसमोर संभ्रमावस्था निर्माण झाल्याने शाहू स्मारक आराखड्याचे काम पुण्यातील कंपनीच्या हातात गेले.

रंकाळा प्रदूषणप्रश्नी भाजपचे धरणे

$
0
0
रंकाळा प्रदूषणप्रश्नी महापालिकेने ठोस कारवाई करावी ,या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी रंकाळा टॉवरवर धरणे धरली. दहा दिवसांत प्रदूषणासंदर्भात कारवाई केली जाईल, असे आश्वासन जलअभियंता मनिष पवार व उपअभियंता टी.के. पाटील यांनी दिले.

पुण्याच्या कंपनीचा आराखडा सर्वोत्तम

$
0
0
शाहू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या राजर्षी शाहूंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी पुण्याच्या डिझाइन कन्सल्टंट्स आर्किटेक्ट कंपनीने तयार केलेला आराखडा सर्वोत्तम ठरला आहे. महापालिकेच्या वतीने सर्वोत्कृष्ट आराखड्याचे सात लाख रुपयांचे पारितोषिक कंपनीस दिले जाणार आहे.

रस्त्याचे निकृष्ट काम बंद पाडले

$
0
0
सातारा नगरपालिकेमार्फत कुपर कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकानी काम बंद पडले. दरम्यान, नगरसेवक सुवर्णा पाटील, महेश जगताप यांनी काम चांगल्या दर्जाचे करण्याची सूचना अधिकारी व ठेकेदारास केली तर राजेंद्र चोरगे यांनी अभियंता साबळे यांना फैलावर घेतले.

ASI राजाराम मधे निलंबित

$
0
0
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक राजाराम मधे यांना जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी निलंबित केले. गुन्ह्यांची तपास प्रकरणे प्रलंबित ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

इस्लामपुरातील जमिनींचे वादग्रस्त व्यवहार रद्द करा

$
0
0
इस्लामपूरचे नगरसेवक, त्यांचे नातेवाईक आणि गाव पुढारी यांनी संगनमताने वतनी जमिनीची बेकायदा खरेदी-विक्री, गुंठेवारी नियमितीकरण करून सुमारे शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

श्याम बेनेगल यांना पेंटर पुरस्कार

$
0
0
कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत देण्यात येणारा कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना प्रदान करण्यात येणार आहे.

वीजजोडण्या पुन्हा जोडणारः पवार

$
0
0
‘शेतकऱ्यांच्या कृषिपंपांच्या तोडलेल्या वीजजोडण्या पुन्हा जोडल्या जातील आणि शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळेल,’ असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी पंढरपूर येथे बोलताना दिले.

पडसाद राजकारणावर

$
0
0
नववर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचेच पडसाद सरत्या वर्षातील अनेक राजकीय घडामोडींवर उमटले. तेच पडसाद लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीवेळीही उमटणार असल्याने राजकीयदृष्ट्या हे वर्ष महत्वाचे ठरले

मायनिंग

$
0
0
‘तिसरे बादशाह हम है!’ शत्रूघ्न सिन्हाचा अजरामर डायलॉग मायनिंग वर लिहायचे म्हटल्यावर मायनिंग,खाण, कालापत्थर असा प्रवास करत झपकन मनात आला.

गॅस सीलिंडरबाबत‌ संभ्रम दूर करा

$
0
0
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या सबसिडीबाबत सर्वस्तरावर विसंगत माहिती देण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाला आहे.

पक्ष्यांचा गाव

$
0
0
तलावभर व्यापून राहिलेले दाट धुके, बोचरा वारा, त्यातही हळूवार होणाऱ्या हालचाली, बारीक नजरेला पक्ष्यांची पडणारी सूरमारी, सूर्यकिरणांबरोबरच वाढत जाणारा पक्ष्यांचा किलबिलाट, कोवळ्या उन्हात शिकार करणारा किंगफिशर, सावजाच्या प्रतीक्षेतील बगळा, हेलिकॉप्टरप्रमाणे स्थिर राहणारा पाइड किंगफिशर असे विविध पक्षी पाहण्याची संधी महाराष्ट्र टाइम्समुळे रविवारी निसर्गप्रेमींना मिळाली.

नुकसानभरपाईसाठी तालुकास्तरीय समिती

$
0
0
वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर समिती नेमण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांनी दिली. चंदगड येथील वनविभागाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या वनअधिकारी व शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

शिवडाव विषबाधेतील आणखी एकाचा मृत्यू

$
0
0
शिवडाव (ता. भुदरगड) येथे मागील आठवड्यात जेवणातून विषबाधा झालेल्या कुटुंबातील महादेव बाबाजी पाटील (वय ४०) यांचा आज उपचारादरम्यान कोल्हापूर येथे सीपीआरमध्ये मृत्यू झाला. मागील आठवड्यात याच कुटुंबातील पाटील यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता.

कागलमध्ये सोयीच्या आघाड्या

$
0
0
कागल तालुक्यातील सावर्डे खुर्द,चौंडाळ,आणि सुरुपली येथील ग्रामपंचायतींसाठी आज चुरशीने शांततेत मतदान झाले. तिन्ही ग्रामपंचायतींसाठी खासदार मंडलिक संजयबाबा घाटगे, मंत्री मुश्रीफ,रणजित पाटील आणि विक्रमसिंह घाटगे असे सोयीनुसार एकत्र येवून आघाड्या केल्या.

पालिकेच्या सभेत गोंधळ

$
0
0
सभेपुढील विषयांसंदर्भात मागितलेली माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. या गोंधळात जनतेच्यावतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देणे म्हणजे नगरीचा अपमान आहे असे म्हणत नगरसेवक राजेश बोरगावे यांनी हातातील फाईल भिरकावली.

४ हजार संस्थांचे लेखापरीक्षण करा

$
0
0
जिल्ह्यात देण्यात आलेल्या पिकांच्या कर्जाची वसूली करण्यात यावी, तसेच चार हजार संस्थांचे लेखापरीक्षण प्रलंबित आहे. ते करण्यात यावे असे आदेश अप्पर निबंधक दिनेश ओऊळकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील बँका आणि संस्थांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठक घेण्यात आली.

विषय समित्यांवरून तापले राजकारण

$
0
0
विषय समित्यांच्या आज निवडी होणार असल्याने कारभारी नरगसेवकांची धावपळ सुरू आहे. पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असली तरी आपल्याला हवे ते पद पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images