Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निवृत्त समादेशक जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या जवानांकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार आणि बटालियनच्या निवृत्त समादेशकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी मुंबईतून अटक केली. खुशाल विठ्ठल सपकाळे (वय ५९, रा. मरोशी, भवानीनगर, प्लॉट क्रमांक झेड ३, डॅफोडिल्स बिल्डिंग, मरोळ, मुंबई) असे त्याचे नाव आहे. हजेरीत सूट, अर्जित रजा, साप्ताहिक सुट्टी आणि कामात सूट देण्यासाठी जवानांकडून सुमारे ४० हजाराची लाच मागितल्याचा ठपका त्याच्यावर आहे. विभागाचे पोलिस उपअधीक्षक गिरीष गोडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोर्टाने सपकाळेला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

गट मुख्यालय येथील क्रीडा स्पर्धेच्या निवडीसाठी खेळाडू जवानांना सरकारकडून दिला जाणारा आहारभत्त्याचे वाटप आणि सोसायटीकडून एक लाख रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी जवानांकडून ४० हजारांची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने त्याला अटक केली. यासंदर्भात गोडे म्हणाले, 'बटालियनने आयोजित केलेल्या आंतरकंपनी क्रीडा स्पर्धेच्या सरावावेळी सपकाळे खेळाडूंना त्रास देत असे. बंदोबस्तासाठी अन्य ठिकाणी पाठवण्याची धमकी देत असे. या प्रकरणी त्याच्याविरोधात एका सहायक फौजदारानेच १६ जुलै २०१८ रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार केलेल्या तपासात लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने सहायक समादेशक मनोहर गवळी, पोलिस निरीक्षक मधु सकट, सहायक फौजदार आनंदा पाटील, रमेश शिरगुप्पे, प्रमुख लिपिक राजकुमार जाधव, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण कोळी यांना अटक केली. शाहूपुरी पोलिसांत गुन्हाही दाखल केला होता.'

याप्रकरणात अटक केलेला सपकाळे हा सातवा संशयित आहे. त्याने २१ जवानांकडून प्रत्येकी ५ हजाराची लाच मागितली होती. ती प्रत्यक्ष न स्वीकारता सहायक फौजदार आनंदा पाटील, लिपिक जाधव यांच्यातर्फे तो रॉबर्ट (रा. समतानगर, कांदीवली) नावाच्या एजंटाच्या अकाउंटवर पैसे जमा करण्यास सांगत असे. काही जवानांनी संशयितांकडे पैसे दिले. सहाजणांनी पैसे देण्यास नकार दिला होता. तपासादरम्यान कॉन्स्टेबल कोळी, रॉबर्ट आणि तक्रारदारांचे फोनवरील संभाषण तपासण्यात आले. रॉबर्ट वापरत असलेला फोन, व्हॉटस्अॅपवरील मेसेज, बँक अकाउंटची चौकशी केली. त्यावेळी सपकाळेच्या पत्नीचा फोन रॉबर्ट वापरत असल्याचे उघड झाले. सपकाळे आणि रॉबर्टच्या मोबाइलचे लोकेशनही एकच असल्याचे स्पष्ट झाल्याचे गोडे यांनी सांगितले.

.. .. ..

व्हॉटस्अॅप, सीसीटीव्ही फुटेजची मदत

गोडे म्हणाले, 'लाच प्रकरणातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाइलमध्ये सपकाळे म्हणून पंटर रॉबर्टचाच नंबर आहे. संशयितांच्या सर्व व्यवहाराची माहिती व्हॉटस्अॅपमध्ये आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजही आहे. तक्रारदार आणि सपकाळेचे मोबाइलवरील संभाषण, त्याचा मोबाइल, दोन चारचाकी वाहने जप्त केली आहेत. मोबाइल संभाषण फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहे. त्याच्या आवाजाचा नमुनाही घेण्यात येणार आहे.'

.. .. ..

लाच स्वीकारूनच रवाना

लाच स्वीकारल्याच्या दिवशी सपकाळे मुंबईत असल्याचे जबाबात सांगतो. मात्र प्रत्यक्षात कार्यालयात लाच स्वीकारूनच तो मुंबईला रवाना झाला. त्याने जबाबावेळी दिशाभूल केली होती. त्यामुळे संशय बळावला. बदली मुंबईत झाल्यानंतर तो दुसऱ्या दिवसापासून दीर्घकालीन रजेवर गेला. जबाबासाठी त्याला तीन नोटिसा पाठविल्या, मात्र तो हजर राहिला नाही. तीन महिन्यांपूर्वीच तो निवृत्त झाला आहे.

.. ..

मालमत्तेची चौकशी

सपकाळेच्या मुंबईतील फ्लॅटची पथकाने झडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. बँक खातीही गोठवली असून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत त्यांच्या नावाने मालमत्ता आहे का, याची चौकशी सुरू आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामगारांचा पायी मोर्चा

$
0
0

कोल्हापूर : महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीन कंपन्यांमध्ये हजारो कंत्राटी कामगार गेले दहा ते पंधरा वर्षे किमान वेतनावर काम करत आहेत. कंत्राटदारांकडून कामगारांचे आर्थिक शोषण केले जाते. याप्रश्नी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे वीस फेब्रुवारीपासून पुणे ते मुंबई असा पायी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे येथील आयुक्त कार्यालयात निवेदन देऊन आंदोलानला सुरुवात होईल. संघर्ष मोर्चा २६ फेब्रुवारीला मंत्रालयावर पोहचणार आहे अशी माहिती कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद कुडतडकर, योगेश आयरे, विजय कांबळे, युवराज सोनार, मधुकर माळी आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलकापूरचा विजय विकासाची पोचपावती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

$
0
0

मलकापूरचा विजय विकासाची पोचपावती

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

म. टा. वृत्तसेवा, कराड

'देशात आणि राज्यातही खोटी आश्वासने दिली जात आहेत. त्यांनी लोकांना फसवणूक निवडणुका जिंकल्या. परंतु, पुढील लोकसभा निवडणुकीला काही दिवस उरल्याने सर्व आश्वासने हवेत विरून आपली फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मलकापूर निवडणुकीत ती चूक न करता येथील सुज्ञ मतदार, नागरिकांनी काँग्रेसला विजयी केले. त्यामुळे दिलेली आश्वासने व आपली स्वप्ने पूर्ण करणाऱ्यांच्या मागे मलकापूरची जनता असल्याचे या विजयातून स्पष्ट झाले आहे,' असा दावा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

नवनिर्मित मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या कॉँग्रेस नगरसेवकांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मंगळवारी सायंकाळी चव्हाण बोलत होते. या वेळी आमदार जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र प्रदेश काँगेसच्या महिला अध्यक्ष रजनी पवार, कोयना बँकेचे चेअरमन उदयसिंह पाटीलउंडाळकर, अँड. नगराध्यक्ष पदी निवडणूक निलम येडगे, माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, 'मलकापूरमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत झालेल्या विविध विकासकामांमुळे नागरिक, मतदारांनी काँग्रेसला मतदानाचा कौल दिला आहे. त्यात मलकापूरच्या महिलांचा मोठा वाटा आहे. मलकापुरात एकहाती सत्ता दिल्याबद्दल सर्व मतदार, नागरिकांचा आभारी असून, आता विकास चौपटीने वाढणार आहे. मी मलकापूरच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे.'

उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, 'देशासह राज्यात सत्तेचा वापर करून समाजाला नागवण्याचे काम प्रतिगामी विचाराच्या लोकांनी केले. मात्र, लोकशाहीत निवडणुका प्रबोधनाचे काम करण्यासाठी असतात, ही यशवंतराव चव्हाणसाहेबांची शिकवण आहे. ती टिकवण्याचे काम यशवंत विचाराचा वारसा चालवणाऱ्या लोकांनी जिवंत ठेवले आहे.' मनोहर शिंदे म्हणाले, 'मलकापुरात जनतेने विरोधकांना नाकारले असून, काँग्रेसला एकहाती सता दिल्याबद्दल मलकापूरच्या जनतेचा आभारी आहे.

विरोधकांनी केलेल्या आरोपांना मतदारांनीच थेट मतपेटीतून उत्तर दिल्याने मलकापूरची जनता विकासाच्या पाठीशी असल्याचे जनतेनेच दाखवून दिले आहे. पांडुरंगापुढे उभा राहून मलकापूरच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.' नगराध्यक्ष निलम येडगे यांनी सर्वांगिण विकासाची ग्वाही दिली. या वेळी आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आनंदराव पाटील, अॅड. राजाभाऊ पाटील-उंडाळकर, अजित पाटील-चिखलीकर, बंडानाना जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान, मलकापूरच्या नवनियुक्त नगराध्यक्ष निलम येडगे व सर्व नगरसेवक, नगरसेविकांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, मलकापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यालयापासून लक्षीनगर येथील सभास्थळापर्यंत विजयी रॅली काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला जामीन

$
0
0

माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला जामीन

सातारा

वाई हत्याकांड प्रकरणात सातारा जिल्हा न्यायालयाने माफीचा साक्षीदार ज्योती मांढरे हिला कौटुंबीक कारणास्तव बुधवारपासून २० फेब्रुवारीपर्यंत हंगामी जामीन अटी व शर्तीसह मंजूर केला आहे. अटकेनंतर ती प्रथमच बाहेर येणार आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तिला संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्त दिला जाणार आहे. दरम्यान, डॉ. संतोष पोळला नथमल भंडारीच्या खून प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीवर १३ रोजी सुनावणी होणार आहे.

ऑगस्ट २०१६मध्ये समोर आलेल्या वाई हत्याकांड प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यासह अवघा महाराष्ट्र हादरला होता. डॉक्टर म्हणून समाजात वावरणाऱ्या डॉ. संतोष पोळ याने सहा खून केल्याची कबुली दिली होती. मंगळवारी या प्रकरणाची नियमित सुनावणी होती. या साठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम, बचाव पक्षाचे अ‍ॅड. श्रीकांत हुडगीकर उपस्थित होते.

.......

पवनचक्की कंपन्यांकडे

६८ लाखांचा कर थकला

सातारा

सह्याद्रीच्या पठारासह सातारा जिल्ह्यातील विविध डोंगररांगावर अनेक कंपन्यांनी पवनचक्क्या उभारल्या आहेत. त्यांनी सरकारचा लाखो रुपयांचा कर थकीत ठेवला आहे. १२२ ग्रामपंचायतींचे या पवनचक्की कंपन्यांकडे सुमारे ६८ लाख ३९ हजार रुपये थकले आहेत. या बाबत संबंधित कंपन्यांना नोटिसाही बजावल्या असून, कर न भरल्यास पवनचक्या सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कंपन्यांनी वेळेत कर न भरल्याने ग्रामपंचायतींच्या विकासकामांवरही परिणाम झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारली पेटिंग कार्यशाळा शनिवारी

$
0
0

वारली पेंटिंग कार्यशाळा शनिवारी

कोल्हापूर टाइम्स टीम

'महाराष्ट्र टाइम्स'चा कल्चर क्लब आणि कलर १४ आर्ट गॅलरी यांच्यावतीने शनिवारी (ता. ९) वारली पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वारली चित्रकला शिकण्याची संधी कार्यशाळेत मिळणार आहे.

वारली चित्रकलेची ख्याती जगभर प्रसिद्ध असून त्याकडे सर्वजण आकर्षित होत आहेत. वारली अदिवासी जमातीच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीत भिंतीवर तांदळाच्या पांढऱ्या पिठाने साधे व सुबक आकार गेरुने रंगवण्याची ही कला आहे. वारली पेंटिंग वापर अनेक ठिकाणी केला जातो. ड्रेस, पर्स, बेडशिट, वॉल पेटिंग, टी कोस्टर इत्यादी गोष्टीत वारली चित्रकलेचा वापर होत आहे. ही कला शिकण्याची संधी कल्चर क्लब आणि १४ आर्ट गॅलरीने उपलब्ध करुन दिली आहे.

शनिवारी दुपारी दोन ते चार या कालावधीत राजारामपुरी दुसरी गल्ली येथील कलर १४ आर्ट गॅलरी येथे कार्यशाळा होणार आहे. कापडी पिशवीवर वारली पेटिंग कसे करायचे हे शिकवले जाणार आहे. त्यासाठी संयोजकांच्यावतीने साहित्य पुरवले जाणार आहे. कल्चर क्लब सदस्यांसाठी पाचशे रुपये तर अन्य वाचकांना ६०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कार्यशाळेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी ९९२२००८१६४ या क्रमांकाशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओरल क्वीझमध्ये उद्धव मगदूम प्रथम

$
0
0

कोल्हापूर : गोपाल कृष्ण गोखले कॉलेज व शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या संख्याशास्त्र विषयातील ओरल क्वीझ स्पर्धेत बीएस्सी भाग दोनच्या उद्धव मगदूम व बीएस्सी भाग तीनच्या वेदांती गांधीने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. पी. के. पाटील यांच्या हस्ते झाले. दोन विभागात झालेल्या स्पर्धेत बीएस्सी भाग दोनमध्ये प्रथमेश कुंभार व ऋतुजा वनजाळे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर बीएस्सी भाग तीनमध्ये विलास पाथरवट व गीतांजली पिसाळ यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. प्राचार्य डॉ. ए. बी. गडकरी, प्रा. डॉ. डी. एन. काशीद, डॉ. पी. आय. पाटील उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन प्रा. ए. एन. बसुगडे, प्रा. डॉ. एस. एस. देसाई, प्रा. डॉ. सी. आर. चौगले, प्रा. डॉ. एम. के. पोवार यांनी केले होते. डॉ. डी. एम. सकटे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पन्न शंभर कोटींनी घटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या २०१८-२०१९च्या आर्थिक वर्षामध्ये ४३५ कोटींचे महसुली उद्दिष्ट समोर ठेवले. पण, नवा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी असताना वसुली मात्र ३०० कोटींच्या पुढे जाणार नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. जमाखर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी प्रत्येक विभाग प्रयत्नांची शिकस्त करत असला तरी अर्थसंकल्पात १०० कोटींची तूट येईल असा अंदाज वर्तविला जात आहे. या तुटीचा परिणाम पुढील वर्षातील विकासकामांवर होईल असे संकेत आहेत.

शहराच्या विकासाच्या कागदावरील योजनांचा जमाखर्च मागील पानावरुन पुढे दाखविणाऱ्या महापालिकेचा स्वत:च्या उत्पन्नाचा गाडा ३०० कोटींचा टप्पा ओलांडू शकत नसल्याचे वास्तव गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने पुढे येत आहे. घरफाळा विभाग वगळता इतर इस्टेट, पाणीपुरवठा, परवाना, नगररचना या विभागासह सरकारी अनुदान मिळण्यास होत असलेला विलंब यामुळे महसुली तुटीमध्ये अधिकच भर पडते.

काळम्मावाडी थेट पाइपलाइन, नगरोत्थान, रंकाळा संवर्धन, अमृत योजना या रखडलेल्या योजनांसह या वर्षीचा अर्थसंकल्प १००० कोटींचा असेल अशी शक्यता आहे. यावर्षी महापालिकेने ४३५ कोटीचे महसुली उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी सहा फेब्रुवारीपर्यंत २२९ कोटींची वसुली झाली आहे. आता प्रयत्नांची शिकस्त केली तरी, उर्वरीत काळात ३०० कोटींचा टप्पा पार करताना प्रशासनाची दमछाक होणार आहे. त्यातच पुढील आर्थिक वर्षात रखडलेल्या योजना मार्गी लावताना ई-सेवा, भूमिगत विद्युत वाहिनी व एलईडी योजनेचा नव्याने समावेश होईल.

प्रत्यक्षात रखडलेल्या योजना पूर्ण करताना अर्थसंकल्पीय उद्दिष्टे कागदावर राहतील ही स्थिती यावर्षीही कायम राहील असे स्पष्ट संकेत आहेत. साडेचारशे कोटी रुपये खर्चाच्या थेट पाइपलाइन योजनेवर १५० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. अतिरिक्त खर्चाची तरतूद करताना महापालिकेला उत्पन्नवाढीच्या नव्या स्रोतांचा विचार करावा लागेल. पण, गेल्या पाच वर्षात एकदाही नवीन करवाढ केलेली नाही. परिणामी महापालिकेचे उत्पन्न गेल्या सहा वर्षांपासून ३०० कोटींवर गेलेले नाही. महापालिकेच्या उत्पन्नावर मर्यादा येत असल्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे.

अर्थसंकल्प २९ मार्चला ?

आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिन्यांचा अवधी असला, तरी आर्थिक वर्षात दिलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वच विभागांची धावपळ सुरू आहे. वसुलीसोबत पुढील आर्थिक नियोजनासाठी प्रत्येक विभागप्रमुख दररोज आढावा घेत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची बैठकांसाठी धावपळ उडाली आहे. २९ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता असून त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियोजन सुरू आहे.

विभाग उद्दिष्ट वसुली

घरफाळा ६९ कोटी २८ लाख ४३ कोटी ८७ लाख

नगररचना ५४ कोटी ९२ लाख ३० कोटी २ लाख

इस्टेट ३४ कोटी ३९ लाख ३ कोटी ९१ लाख

परवाना ५ कोटी १३ लाख २ कोटी ५१ लाख

पाणीपुरवाठा ५८ कोटी ९९ लाख ३७ कोटी १९ लाख

एकूण महसुली बजेट ४३६ कोटी २२९ कोटी ४३ लाख

लोगो - महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विवेकानंद’मध्ये नवनिर्मितीचे ‘स्पंदन’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवकालीन प्रसंगावर आधारित चित्रनिर्मिती, कोल्हापुरातील ऐतिहासिक व धार्मिक वास्तूंच्या हुबेहूब साकारलेल्या प्रतिकृती, आणि वैशिष्ट्यपूर्णरित्या होर्डिंग्जची उभारण्याची संकल्पना अशा वेगवेगळ्या कलाकृतींच्या नवनिर्मितीचे 'स्पंदन' विवेकानंद कॉलेजमध्ये पाहावयास मिळत आहे. कॉलेजच्या बी व्होक अँड कम्युनिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वर्गकाम आणि कलाकृतींचे वार्षिक प्रदर्शनाला बुधवारी प्रारंभ झाला. यामध्ये शंभरहून अधिक विद्यार्थख्यांचा सहभाग आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात आठ फेब्रुवारीअखेर प्रदर्शन खुले राहणार आहे.

विविध लोकसंस्कृतीची ओळख करुन देणारी फोटोग्राफी हे प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले आहे. बी व्होक अँड कम्युनिटी कॉलेजच्या ग्राफीक डिझाइन, अॅनिमेशन, फोटाग्राफी आणि फाऊंड्री विभागाच्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या विषयावरील कलाकृती मांडल्या आहेत. प्रदर्शनाच्या प्रारंभीच भारतीय कलेचा इतिहास लक्ष वेधून घेतो. अशोक स्तंभ, सिंधु संस्कृती, मुद्रा, यक्ष, यक्षिणीविषयक चित्रे आणि माहिती मांडली आहे. प्रथम वर्षाचे विद्यार्थी प्रतीक थोरावडे, विनायक मोरे, ओंकार इंगवले, कुलदीप जठार, ओंकार गोमसे यांनी कलर थिअर मांडली आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संकल्पना वापरुन कलाकृतींची निर्मिती केली आहे. रोहित कोचरे, निखिल मडकईकर, प्रकाश भोपळे, प्रतिक्षा गुरव, ओंकार जाधव, दत्ता फरांडे, जितेंद्र कुबडे या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. विविध माध्यमात चित्रे रेखाटताना विद्यार्थ्यांनी चित्रकलेचे कौशल्य दाखविले आहे.

शिवाय वारली पेटिंग्ज, लोगो डिझाइन, होर्डिग्जची वेगळ्या पद्धतीने उभारणी करण्याची संकल्पना मांडल्या आहेत. प्रदर्शनात व्यक्तीचित्रांचे स्वतंत्र दालन आहे. प्रियांका जमदाडे, प्रणाली पोळ, संदीप मोटे, सपना जाधव, सौरभ पाटील, किरण चौगुले आदींच्या कलाकृती आहेत. वाइल्ड लाइफ फोटोग्राफार रमण कुलकर्णी यांच्या हस्ते आणि व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या उपस्थितीत 'स्पंदन'चे उद्घाटन झाले.याप्रसंगी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस. वाय. होनगेकर, नोडल ऑफीसर प्रा. एस. बी. गायकवाड, प्रा. राहुल इंगवले, प्रा. सतीश उफळावीकर उपस्थित होते. दुपारच्या सत्रात व्यंगचित्रकार दुलंगे यांनी 'ग्राफीक डिझाइन, अॅनिमेशन व व्यंगचित्रे'विषयावर प्रात्यक्षिके दाखविले. फोटोग्राफर कुलकर्णी यांनी 'वाइल्ड लाइफ फोटोग्राफी'विषयी मार्गदर्शन केले.

वैविध्यपूर्ण विषयावरील फोटोग्राफी

विद्यार्थिनी श्रृती खुपिरेकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित वेगवेगळे प्रसंग रेखाटले आहेत. राजमाता जिजाऊ, शिवरायांची सवगंड्यासोबत शपथ, तलवारबाजीचा सराव, रायरेश्वर येथे घेतलेली स्वराज्याची शपथ, शाहिस्तेखान प्रकरण, आग्य्राहून सुटका, शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रसंगे उठावदार झाली आहेत. सकिना शेखने मोबाइल व्यसनावर आधारित कलाकृती, आकाश भोसलेची वीटभट्टी विषयावरील, अभिषेक पाटीलने मेंढपाळाचे जीवन व विक्रम देवणेंची आषाढवारी उलगडून दर्शविणारी फोटोग्राफी आकर्षित करणारी आहे. प्रणिल माळीने फोटोग्राफीतून वन्य जीवांचे दर्शन घडविले आहे. सम्मेद चिंचवाडे व अमित माने यांची अनुक्रमे वंचित व अपंगमती मुलांवर आधारित फोटाग्राफीतून वेगळ्या विश्व नजरेस पडते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हत्ती महल रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील सर्वात रहदारीचा एकमार्गी असलेल्या हत्तीमहल रोड, लुगळी ओळ, मटण मार्केट रस्त्याला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. त्याचबरोबर मटण व चिकन विक्रेत्यांच्या वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे या रस्त्यावरील वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून होणारा कानाडोळा यामुळे वाहनधारकांसोबत पादचाऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

माळकर तिकटी ते मिलन हॉटेल चौक हा एकमार्गी वाहतूक रस्ता आहे. या रस्त्यावरुन केएमटीची बस वाहतूक होते. माळकर तिकटीजवळ सहा सिटर रिक्षांच्या स्टॉपला शिस्त लावण्यात केएमटी आणि वाहतूक शाखेला अपयश आले असल्याने तेथे वाहतूक कोंडी असते. येथील दुकानदार, विक्रेत्यांनी थेट रस्ते व्यापले आहेत. दुकानदारांकडून कटलरी, कपड्यांसह अन्य वस्तू रस्त्यावरच मांडल्या जातात. हत्तीमहल ते मटण मार्केट परिसर हा जुना बाजार म्हणून ओळखला जातो. इथल्या विक्रेत्यांनी रस्त्यावर माल विक्री करत वाहतुकीला अडथळे आणले आहेत. हत्तीमहल इमारतीतील शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दगडी भिंतीजवळील दुकानगाळे कोर्टाने नियमित केले असली तरी गाळेधारकाकडून रस्त्यावरच वस्तू मांडल्या जातात. परिसरातील स्वच्छतागृहाचा मार्गही विक्रेत्यांनी अतिक्रमण करून अडवला आहे.

येथील गाळेधारकांनी दहा फुटी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. बहुसंख्य दुकानदारांनी तात्पुरते शेड उभारुन अतिक्रमण केले आहेत. मटण मार्केटमधील ग्राहकांसाठी बाहेर पार्किंगची व्यवस्था असताना तेथे मासेविक्रेत्यांची वाहने कायमच उभी असतात. त्यामुळे ग्राहकांना शाहू क्लॉथ मार्केटसमोर वाहने पार्क करावी लागतात. येथे सकाळी सहा वाजल्यापासूनच रात्री उशीरापर्यंत कोंबड्या वाहतुकीची वाहने थांबतात. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. खेकडे विक्रेत्यांना मटण व फिश मार्केटमध्ये प्रवेश नसल्याने ते रस्त्यावरच आपला व्यवसाय करतात. कसबा मशिदीजवळ खाद्यपदार्थाच्या गाड्या, वाहनांच्या पार्किंगमुळे बडी मशिदकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी जवळजवळ बंदच झाला आहे. गावठी कोंबडी विक्रेत्यांनी थेट रस्त्यावर खुराडी उभारुन अतिक्रमण केले आहे. हा रस्ता मोकळा केला तर बिंदू चौकाकडे ये-जा करण्यासाठी पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

नुसताच डंपर फिरतो

राजर्षी शाहू क्लॉथ मार्केट येथे अतिक्रमण निर्मूलन विभाग आहे. येथे विभागाचा डंपर उभा असतो. शहरात कारवाईवेळी जप्त केलेले साहित्य डंपरमधून नेले जाते. डंपरचा धसका घेऊन अनेक ठिकाणी विक्रेते रस्त्याच्या आत माल विक्रीला बसतात. याला मटण मार्केट परिसरातील दुकानदार व विक्रेते अपवाद आहेत. ते या विभागाला दाद देत नसल्याचे चित्र पहायला मिळते.

हत्तीमहल इमारतीत शिक्षण उपसंचालक कार्यालय आहे. कार्यालयात चार जिल्ह्यांतील कामानिमित्त येणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना वाहने लावण्यास जागा नाही. मटण व फिश मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मिळेल त्या जागेवर वाहने लावावी लागतात. महापालिकेने अतिक्रमणे हटवून आणि शहर वाहतूक शाखेने वाहनधारकांना शिस्त लावून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करुन द्यावा.

- अनिरुद्ध मंडले, स्थानिक नागरिक

कोंबडीबाजारामुळे दुर्गंध

मटण मार्केटसह परिसरात चिकन विक्रीची मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून कोंबड्या विक्री करणारी वाहने या रस्त्यावर असतात. येथे कोंबड्यांची पिसे, विष्ठेचा थर रस्त्यावर पसरला आहे. यातून अनारोग्याचा धोका आहे. यापूर्वी आरोग्य विभागाने कोंबड्या विक्री करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली होती. पण, अलिकडे कारवाईचा बडगा उगारला नसल्याने दिवसभर वाहने उभी असतात.

मटा भूमिका

कोंडी हटवायला हवी

हत्तीमहल परिसर या एकमार्गी रस्त्यावरुन जुन्या शहरातील नागरिकांना महानगरपालिकेजवळून लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरीकडे जाण्यासाठीचा पर्याय आहे. पण दुकानदार, विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणांनी हा रस्ता अरुंद झाला आहे. रविवारी आठवडी बाजारादिवशी रस्त्यांवर विक्रेत्यांना विक्री करण्यास परवानगी आहे. पण इथले विक्रेते आठवडाभर रस्त्यावरच वस्तू मांडून व्यवसाय करतात. अतिक्रमण निर्मूलन विभाग शाहू क्लॉथ मार्केटमध्ये असतानाही त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक नगरसेवक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्त्यांचा दबाव झुगारुन महानगरपालिकेने कारवाई केली पाहिजे. परिसरात कोंबडी विक्री करणारी वाहने रस्त्यावर उभी असतात. तसेच मटण मार्केटबाहेर मासे वाहतूक करणारी वाहने दिवस पार्क केली जातात. ग्राहकांना वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई करुन रस्ता खुला करुन दिला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारगेट, नाना पाटील नगरात एलइडी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरात एलइडी बल्ब बसवण्यापूर्वी प्रयोगिकतत्वार बाजारगेट व क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथे प्रथम एलइडी बल्ब कार्यन्वित करून सादरीकरण करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी ईईएसएल कंपनीला दिले. कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. स्थायी समिती सभागृहात बैठक झाली.

सभापती देशमुख म्हणाले, 'निधीअभावी कमी व्हॅटचे बल्ब अथवा ट्यूब बसवल्या आहेत. मात्र कंपनीच्या मनाप्रमाणे एलईडी बल्ब बसवून चालणार नाही. जागेची स्थिती व तेथील प्रकाशाची आवश्यकता याचा अभ्यास करुनच एलइडी बल्ब बसवावेत. बल्ब बसवण्यासाठी कंपनीने एक महिन्यानंतरही अद्याप सर्व्हेला सुरुवात केलेली नाही. सर्व्हे करुन दोन प्रभागांत बल्ब बसवा. त्यापैकी एका प्रभागाचे सादरीकरण करा,' असे आदेश देत कंपनीसोबतच्या करारामध्ये शहरातील उद्यानांचा समावेश करा, अशी सूचनाही त्यांनी केली.

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी कंपनीबरोबर करार झाला असून कंपनी सर्व्हे सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, 'कंपनीने नामवंत ब्रँडच्या कंपन्यांचे बल्ब बसवावेत. त्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर करू नये. उद्यानाबरोबर शाळा, भाजीमंडईमध्येही एलईडी बल्ब बसवा.'

कंपनीचे अभियंता हितेश पैयल म्हणाले, 'सर्व्हेचे काम एक महिन्यात पूर्ण करु. दोन प्रभागांचा आठ दिवसांत सर्व्हे करुन एलईडी बल्ब कार्यन्वित करताना प्रभागातील संबंधीत नगरेवकांना विश्वासात घेऊ.'

बैठकीस विरोधी पक्षनेता विलास वास्कर, शिक्षण सभापती अशोक जाधव, परिवहन सभापती राहुल चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा खेडकर, उपसभापती छाया पोवार, रिना कांबळे, माधवी गवंडी, शोभा कवाळे, राजसिंह शेळके, राजाराम गायवकवाड, संजय मोहिते, कमलाकर भोपळे, नगरसेविका पूजा नाईकनवरे, सविता भालकर, भाग्यश्री शेटके, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, कनिष्ठ अभियंता रोहन डावखरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारपासून डॉग शो

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कॅनाइन क्लब ऑफ कोल्हापूरच्यावतीने ओबिडीयन्स व ऑलब्रीड चॅम्पियनशीप डॉग शोचे शनिवारी (ता. ९) आयोजन केले आहे. मार्केट यार्डातील लोणार वसाहतीमध्ये गणेश लॉनवर सकाळी नऊ वाजता डॉग शोला सुरुवात होईल. शोमध्ये देशभरातील श्वानप्रेमी सहभागी होणार आहेत.

ओबिडीयन्स स्पर्धेसाठी श्वानाची आज्ञाधारकता पाहिल जाणार आहे. स्पर्धेत जमशेदपूर येथून टाटा स्टील कंपनीचे चार प्रशिक्षित श्वान सहभागी होणार आहेत. तर रविवारी (ता. १०) ऑलब्रीड चॅम्पियनशीप डॉग शो होईल. या विभागात देशांतून ३५ पेक्षा जास्त प्रजातींचे ३०० हून अधिक श्वान सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अफगाण हाउंड, वायर फॉक्स टेरीयर, बुलडॉग, बेल्जियम शेफर्ड, फ्रेंच बुलडॉग आदी प्रजातींच्या श्वानांचा समावेश असेल. परिक्षक म्हणून अर्जेटिनाचे फ्रान्सिस स्मिथ, कोलंबियाचे फॅबियन डाझा व दुसान ट्रॅवनीकर काम पहाणार आहेत. कोल्हापुरातील श्वानप्रेमींनी डॉग शोचा लाभ घ्यावा, असे आवाहन अॅड. प्रशांत पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचार न्यासतर्फे शंखध्वनी

$
0
0

कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक नेते आण्णा हजारे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासतर्फे रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद, बोंबमारो आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या निषेध केला. नारायण पोवार, डॉ. आनंद गुरव, डॉ. सुरेश पाटील, राजू माने, निलेश रेडेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीवरून केला अर्ध्या जगाचा प्रवास

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com
Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर:

'अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला', कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळींचा अर्थ रस्तेप्रवासात सार्थ ठरविण्याचे काम दोन प्रवासवेड्या अवलियांनी केले आहे. इंदोरचे अॅड. धर्मेंद्र जैन आणि मुंबईतील देवाशीष घोष या दोघांनी २७६ दिवसात दुचाकीवरून ३५ देशांमध्ये जाऊन ६८ हजार किलोमीटरचा प्रवास केला.

धर्मेंद्र जैन आणि देवाशीष घोष या दोघांनाही दुचाकीवरून प्रवास करण्याचा छंद आहे. देशातील बहुतांश राज्यांचा प्रवास त्यांनी हर्ले डेव्हिड्सन आणि बीएमडब्ल्यू या दुचाकींवरून केला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी मित्रांसह काश्मिर, भूतान आणि सिंगापूरचा प्रवास केल्यानंतर जगप्रवासाचा ध्यास घेतला. जैन आणि घोष या दोघांनीही वर्षभर जगप्रवासाची पूर्वतयारी केली. प्रवासाचा मार्ग निश्चित करून इंटरनेटवरून माहिती जमवली. १२ जून २०१७ मध्ये या दोघांनी मुंबईतून बीएमडब्ल्यू (जीएस १२०००) या दुचाकीवरून प्रवासाला सुरुवात केली. मुंबई, इंदोर, गुवाहाटी, मनिपूर, इम्फाल यांतर म्यानमारमध्ये प्रवेश केला. थायलंड, लाओस या देशांची भ्रमंती करून ते चीनमध्ये पोहोचले. चीनमध्ये बराच प्रवास केल्यानंतर त्यांनी मंगोलियात प्रवेश केला.

मंगोलियातील लोकसंस्कृती अनुभवल्यानंतर हे दुचाकीस्वार रशियामध्ये पोहोचले. रशियासह आसपासच्या देशांचा प्रवास करीत ते युरोप खंडात पोहोचले. यानंतर विमानाने ते अमेरिकेत पोहोचले, तर दुचाकीही विमानाने अमेरिकेत पोहोचवली. यानंतर त्यांनी मध्य अमेरिका व दक्षिण अमेरिकेतील देशांचा प्रवास केला. अखेरीस त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचा प्रवास केला. उन, वारा, पावसात त्यांनी वाळवंट, डोंगर, जंगल, समुद्र किनारा अशा विपरित स्थितीत ३५ देशांच्या सीमा ओलांडत तब्बल ६८ हजार किलोमीटरचा प्रवास केला. १८ मार्च २०१८ मध्ये दोघे अवलिये मुंबईत पोहोचले. जवळपास अर्ध्या जगाचा प्रवास करून आलेल्या दोन्ही रायडर्सचे नातेवाईकांसह मित्रांनी जोरदार स्वागत केले.

हर्ले रायडर्सच्या 'हायवे कट्टा' या उपक्रमानिमित्त धर्मेंद जैन गुरुवारी इंदोरहून दुचाकीवरून कोल्हापुरात आले होते. 'छत्रपती हॉग्ज ग्रुप'चे अध्यक्ष आदित्य घाटगे यांनी जैन यांचा विशेष सन्मान केला. यावेळी जैन यांनी जगप्रवासातील अनुभवांची माहिती दिली. 'बाईक रायडिंगसाठी भारत सर्वोत्कृष्ठ देश आहे. भारतीय संस्कृतीची माहिती परदेशातील रायडर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही बाईकवरून प्रवास केला. यातून आपल्या देशातील पर्यटनाला चालना मिळेल,' असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला.

अपघातातूनही सावरले
रशियातील प्रवासादरम्यान १४० स्पीडवर असलेली दुचाकी अचानक घसरून अपघात झाला. या अपघातात धर्मेंद्र जैन यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. आठवडाभर दोघांनाही तिथेच उपचार घ्यावे लागले. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आठवड्यानंतर दोघांनी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. या अपघाताने जगप्रवासाची मोहीम अर्ध्यावर सोडावी लागते की काय? अशी भीती नातेवाईकांना वाटत होती.
.. .. ..
चिन्यांनी केले स्वागत
'चीनमध्ये पोहोचण्यापूर्वी आमच्या मनात अनेक गैरसमज होते. प्रत्यक्षात मात्र चीनमधील लोकांनी मनापासून आमचे स्वागत केले. स्वत:हून फळे आणि खाद्यपदार्थ देऊन त्यांनी आमचा उत्साह वाढवला. ३५ देशांच्या प्रवासात दक्षिण अमेरिकेतील बोलिविया हा देश सर्वाधिक सुंदर, स्वच्छ आणि नियमांचे पालन करणारा आहे,' असे जैन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यमित्राकडून विवाहितेची छेड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोबाइल क्रमांक देत नसल्याच्या कारणावरून टाकाळा परिसरातील एका रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या आरोग्यमित्राने एका विवाहितेची छेड काढल्याने गोंधळ उडाला. या घटनेने संतप्त झालेले नातेवाईक आणि दौलतनगरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत रुग्णालयाची तोडफोड करण्याचा इशारा दिला. संबंधित आरोग्यमित्राच्या मंगळवार पेठेतील घरी आणि सीपीआरमधील जीवनदायी योजनेच्या कार्यालयात जाऊन नातेवाईकांनी चौकशी केली. अखेर मोठा जमाव आल्याने लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्यांची समजूत काढली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दौलतनगर येथील पीडित विवाहिता बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सासूसोबत टाकाळा परिसरातील एका खासगी रुग्णालयात गेली होती. तिचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. त्या ठिकाणी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या आरोग्यमित्राने त्यांना स्वत:हून बोलावून घेतले. त्या विवाहितेकडे मोबाइल नंबर देण्याची मागणी केली. तिने तो देण्यास नकार दिला. त्यावेळी त्याने नंबर देण्याची सातत्याने मागणी करुन जबरदस्ती केली. अचानक झालेल्या प्रकाराने विवाहिती घाबरली. तेथून उपचार न घेताच ती घरी आली. घडलेला हा प्रकार तिने पतीसह नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर दौलतनगर येथील ५० हून अधिक जणांचा जमाव थेट रुग्णालयात घुसला. त्या आरोग्यमित्राला हजर करा, अन्यथा रुग्णालयाची तोडफोड करण्याचा इशारा जमावाने दिल्याने रुग्णालयाच्या प्रशासनाची तारांबळ उडाली. हा प्रकार सुरु असताना आरोग्यमित्र पळून गेल्याने जमावाने अधिकच संतप्त झाला. या प्रकाराची माहिती समजताच काही आजी-माजी नगरसेवकांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने त्यांचे ऐकले नाही.

रुग्णालयातील व्यवस्थापक संबंधित आरोग्यमित्राला हजर करतो, असे सांगून नातेवाइकांना सीपीआरमध्ये घेऊन आला. जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांची त्यांनी भेट घेतली. योजनेच्या कार्यालयात चौकशी केली असता संबंधित आरोग्यमित्र नऊ वर्षांपासून काम करीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, योजनेचे सर्व अधिकारी, कर्मचारी कार्यालयात आले. त्यांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. भीतीने त्याने मोबाइल बंद ठेवला होता. नातेवाइकांचा संताप पाहून लक्ष्मीपुरी पोलिसांसह सीपीआरच्या सुरक्षारक्षकांना बोलाविण्यात आले. अखेर पोलिसांनी जमावाची समजूत काढून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगून घरी पाठविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

udayan raje bosle: ... आणि उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू आले

$
0
0

सातारा

आपल्या आक्रमक शैलीमुळे, तसेच विशिष्ट डायलॉगबाजीमुळे सतत चर्चेत राहणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आज मात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. आज ते एखाद्या डायलॉगमुळे चर्चेत आले नसून भावूक झालेल्या उदयराजेंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. उदयनराजे यांचा डोळे पुसतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उदयनराजे यांचा प्रशंसा करणारे गाणे ऐकल्यानंतर उदयनराजे भावूक झाले.

त्याचे झाले असे, की उदयनराजेंच्या चाहत्यांनी त्यांच्यावर एक गाणे तयार केले आहे. 'आले रे, आले रे, आले रे, आले रे, आले रे माझे राजे, आले रे उदयनराजे' असे या गाण्याचे बोल आहेत. उदयनराजे यांच्या कार्यकर्त्याने हे गाणे तयार केले असून, त्या कार्यकर्त्याने उदयनराजे यांना गाडीत बसल्या बसल्या हे ऐकवलं. गाणे ऐकण्यासाठी गाडीबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. हे गाणे ऐकताना उदयनराजे भावूक झाले. त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओत उदयनराजे आपल्या शर्टाचा वापर करत अश्रू पुसताना दिसत आहेत.

'माझ्यामुळे समाज आहे, समाजामुळे मी आहे' अशा उदयराजे यांच्या वाक्याने गाण्याची सुरुवात होते.

गाणे:

राष्ट्रात एक, हृदयाचा नेक,
नाद नाय राजेंचा करायचा
साताऱ्याचा शेर, मावळ्यांचा घेर
दम नाय कुणाचा लढायचा
राज्याची शान, गरिबांचा मान,
मोहोग झाला बघा बघ्यांचा
आले रे आले रे आले रे आले रे आले रे माझे राजे
आले रे आले रे आले रे आले रे आले रे उदयनराजे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवक अटकेत

$
0
0

आजरा : चिमणे (ता. आजरा) येथील आकाश विलास कांबळे (वय १९) याने अल्पवयीन मुलीला फोन वरून प्रत्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत संबंधित मुलीच्या नातेवाइकानी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण उलट त्यानेच त्यांना दमदाटी केल्याने आकाशविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक तयारी समन्वयाने करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आगामी लोकसभा निवडणूक मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आतापासून निवडणूक यंत्रणेतील अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे', अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील गुरूवारी निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, 'निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक त्या सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून द्याव्यात. केंद्रावर रॅम्प, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था अशा आठ प्रकारच्या सुविधा निर्माण कराव्यात. निवडणूक अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केंद्राची पाहणी करून सुविधांचा आढावा घ्यावा. निवडणुकीआधी आणि त्या दरम्यान कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. संवेदनशील मतदान केंद्रे, आचारसंहितेचे पालन, पुरेसा पोलिस फौजफाटा, होमगार्ड, एसआरपी, पुरेशा वाहनांसंबंधीचा अहवाल निवडणूक आयोगाकडे द्यावा.' बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी उपस्थित होते.

...

चौकट

मतदान केंद्रांची पहाणी

दक्षिण, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काही मतदान नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयास भेट देवून डॉ. म्हैसेकर यांनी पाहणी केली. व्हीव्हीएम, व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमाचीही त्यांनी माहिती घेतली. पन्हाळा मतदारसंघातील काही मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली.

000000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात वाढती गुंतवणूक

$
0
0

मटा सोशल कनेक्ट

एंट्रो...

तरुण पिढी टेक्नोसॅव्हीमध्ये ओव्हरस्मार्ट झाली असून, गुंतवणुकीत सजग बनली आहे. अभ्यास करून शेअर व म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा तरुणाईचा कल वाढला आहे, असे मत कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी 'मटा सोशल कनेक्ट'मध्ये व्यक्त केले. कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनची स्थापना २७ वर्षांपूर्वी झाली असून 'सेबी'ची मान्यता असलेली पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे. स्थापनेपासून सामान्य गुंतवणूकदार हा केंद्रबिंदू मानून संस्था कार्यरत आहे. संस्थेचे ६०० सभासद असून, त्यामध्ये डॉक्टर, ब्रोकर, सीए, वकील, नोकरदार सदस्य आहेत. विद्यार्थी, गुंतवणूकदार, सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सेबी, बीएसई, एनएसई, एमसीएक्स, सीडीएसएल, एनएसडील या संस्थांच्या वतीने वेळोवेळी मान्यवरांची व्याख्याने, चर्चासत्रांबरोबरच संस्थेच्यावतीने सामाजिक उपक्रमही राबवले जातात.

००००

म्युच्युअल फंडाकडे ओघ

संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात शेअर आणि म्युच्युअल फंडाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नोटाबंदीनंतर सोने व जमीन व्यवहारापेक्षा गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे वळले आहेत. सेबीच्या पारदर्शक व्यवहारामुळे शेअर बाजार म्हणजे सट्टा बाजार हा चुकीचा समज दूर होत असून, तरुण पिढी शेअर व म्युच्युअल फंडात अभ्यास करून गुंतवणूक करत आहे.

राजेंद्र शहा, अध्यक्ष, कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असो.

०००००

स्वत: अभ्यास करून गुंतवणूक करा

सेबीच्या मार्गदर्शनाखाली देशभरात ज्या २३ संस्था आहेत, त्यात कोल्हापूर इन्व्हेस्टर असोसिएशनचा समावेश आहे. सेबीने सर्व व्यवहार पारदर्शक केल्याने व्यवहारात फसवणूक होत नाही. गुंतवणूकदाराने ब्रोकरकडील ऑपरेटवर अवलंबून न राहता स्वत: अभ्यास करून गुंतवणूक करावी. व्यवहारानंतर एसएमएस, मेल येत असल्याने गुंतवणूकदारांना घरबसल्या माहिती मिळत आहे.

नितीन ओसवाल, उपाध्यक्ष

०००००

वर्षाला १५ टक्क्यांपर्यंत रिटर्न

म्युच्युअल फंडात मासिक पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. गेल्या १०-१५ वर्षांत म्युच्युअल आणि शेअर्समध्ये १० ते १५ टक्के गुंतवणूक वाढली आहे. वर्षाला १२ ते १५ टक्के रिटर्न मिळत असल्याने नोकरदार, व्यापारी, उद्योजक शेअर बाजाराकडे वळत आहेत. कोल्हापुरातील रत्नाकर बँक, मेनन पिस्टन, मेनन बेअरिंग, मोहिते उद्योगाचे शेअर्स बाजारात उपलब्ध आहेत.

राजीव शहा, सचिव

००००

घरबसल्या शेअर्सची माहिती

तरुण पिढीबरोबर नोकरदार म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. हे व्यवहार ऑनलाइन असल्याने घरात, कार्यालयातून व्यवहार करता येतात. तसेच डीमॅट खाते काढल्यावर शेअर्स करता येत असल्याने तरुणाईचा कल वाढू लागला आहे. मीडियातील अनेक चॅनेलवर गुंतवणूक कशी करावी यासाठी खास चॅनेल असल्याने घरबसल्या शेअरचे दर कळत असल्याने टेक्नोसॅव्ही तरुणाई शेअर्समध्ये रस घेत आहे.

संदीप अथणे, खजिनदार

०००००००

दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची

संस्थेच्यावतीने आम्ही दर आठवड्याला एकत्र येत असतो. यात तज्ज्ञ मंडळीही असतात. त्यांचा सल्ला घेऊन व स्वत: अभ्यास करून गुंतवणूकदार शेअर्स व म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. ही गुंतवणूक दीर्घ काळासाठी केली तर चांगले रिझल्ट मिळतात. कोल्हापुरात विमानतळाची सोय झाल्यावर इथल्या उद्योग, व्यवसायांना बरकत येऊन गुंतवणुकीला चांगले दिवस येऊ शकतात.

अशोक पोतनीस, संचालक

०००००

गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन

जादा व्याजाच्या आमिषापोटी अनेकजण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि मुद्दल व व्याजाला मुकतात. त्यांनी सुरक्षित गुंतवणूक करावी यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सेबीच्या अखत्यारीत असल्याने सुरक्षा गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहिले जाते. सर्वसामान्यांना शेअर बाजार व म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी यासाठी चर्चासत्रे, व्याख्यानांचे आयोजन केले जात आहे.

रवींद्र सबनीस, संचालक

००००००

गुंतवणुकीची शंभर टक्के हमी

भारतीय नागरिकांनी शेअर व म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक केली आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी परदेशी गुंतणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्यावर शेअर बाजार कोसळत होता. पण आता भारतीय लोक शेअर व म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याने भारत परकीय गुंतवणूकदारांवर अवलंबून राहत नाही हे भारताचे मोठे यश आहे. याचे सर्व श्रेय गुंतवणूकदारांचे आहेत.

मनीष झंवर, माजी अध्यक्ष

००००००

म्युच्युअलमध्ये परताव्याची हमी

बँकेत ठेवीला व्याजदर कमी असतो. जर एखादी बँक बुडाली तर फक्त दोन लाखाची गुंतवणूक सुरक्षित असते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास दहा ते बारा टक्के परतावा मिळतो. तसेच ब्रोकर जरी धोक्यात आला तरी १० लाखांपर्यंतची गुंतवणूक सुरक्षित राहते. म्युच्युअल आणि शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करता येते. तसेच अडीअडचणीवेळी गुंतवणूक काढून घेता येते व शेअर्स विक्री करून आपली गरज भागवता येते.

प्रवीण ओसवाल, ब्रोकर

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उषा नाईक यांना नृत्यकर्मी पुरस्कार

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठी सिनेसृष्टीत गेली अनेक वर्षे काम करत आहे. विविध प्रकारच्या भूमिका केल्या. नृत्यांगणापासून सुरू झालेला प्रवास मुख्य अभिनेत्री, चरित्र अभिनेत्रीपर्यत पोहचला. आज वयाची ६२ वर्षे पूर्ण झाली आहेत. कलाप्रवासाच्या या वळणावर कोल्हापुरातील नृत्य क्षेत्रातील युवा कलाकारांनी 'नृत्यकर्मी' पुरस्काराने माझा सन्मान केला. नातवांना आजीचे आणि आजीचे नातवांना फार कौतुक असते. माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. कोल्हापुरातील हा सत्कार म्हणजे नातवांकडून आजीचे कौतुक करण्यासारखे आहे. हा सन्मान सोहळा कायम स्मरणात राहील,'असे उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी काढले.

कोल्हापूर डान्स असोसिएशन या संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह रणजित जाधव अध्यक्षस्थानी होते. अभिनेता देवेंद्र चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. असोसिएशनतर्फे अभिनेत्री उषा नाईक यांना यंदाचा 'नृत्यकर्मी' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. उद्यमनगर येथील कृष्णा सांस्कृतिक सभागृह येथे कार्यक्रम झाला.

सत्काराला उत्तर देताना अभिनेत्री नाईक यांनी कला जीवनाचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, 'पूर्वी या क्षेत्रात काम भरपूर आणि कलाकार कमी होते. आता कलाकारांची संख्या वाढली आहे. काम मिळवणे आणि टिकून राहण्यासाठी परिश्रम, कष्टाची गरज आहे. लावणी हा नृत्यप्रकार शिकून येत नाही. तो आत्मसात करायला हवा, तरच त्यातील नजाकत, लावण्य रसिक प्रेक्षकापर्यंत पोहचविता येते.'

याप्रसंगी झंकार ऑर्केस्ट्राच्या सुतार बंधूंना 'स्नेह सन्मान'पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुभम सुतार यांनी प्रातिनिधीक स्वरुपात हा सत्कार स्वीकारला. नृत्यदिग्दर्शक सागर बगाडे यांनी मानपत्र वाचन केले. असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम भालकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राहुल पांडे, महेश बगाडे, चंद्रकांत पाटील, अविनाश गायकवाड, विणा देसाई, कॅमेरामन इम्तियाज बारगीर, डॉ. प्रविण कोडोलीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगा, १२०० रुपयांत आम्ही जगायचं कसं...?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सांगा साहेब, १२०० रुपयांत जगायचं कसं? तीस-चाळीस वर्षे काम केल्याने आम्हाला नोकरीत कायम करावे, मानधन नको, वेतन हवे,' यासह प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आरोग्य परिचरांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. महिन्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा? असा सवाल महिला कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला केला.

करवीर कामगार संघ व कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचर संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. जिल्हा परिषदेकडील आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या परिचर गेली तीस वर्षे अल्प मानधनावर काम करत आहेत. सरकारने, सात जानेवारी २०१७ रोजी आरोग्य परिचरांच्या मानधनात वाढ करण्याचा आदेश काढला, पण त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यासह परिचरांना सेवेत कायम करावे, किमान वेतन ६००० रुपये मिळावे, परिचरांच्या वारसांना सेवेत सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी शेकडो महिला कर्मचारी बुधवारी दुपारी रस्त्यावर उतरल्या.

कॉ. बाबा यादव, दिलीप पवार, अॅड. बाळासाहेब पोवार, सुशीला यादव, आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणेबाजी करत महिला कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. जिल्हा परिषदेशी संबंधित मागण्यांच्या पूर्ततेची ग्वाही दिली. तसेच राज्य सरकारशी संबंधित मागण्या आहेत त्या सरकारला कळवू असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images