Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

Udayanraje Bhosale: महिन्याभरात माझं लग्न आहे; अक्षता टाका: उदयनराजे

$
0
0

सातारा:

'येत्या महिन्याभरात माझं लग्न आहे. अक्षता टाकायला विसरू नका,' अशा हटके अंदाजात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मतदारांना साद घातली.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. उदयनराजे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं भाजपप्रवेशाचे संकेतही देऊन टाकले. लोकसभेच्या निवडणुका एका महिन्यावर आल्या असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं साताऱ्याच्या जागेची उमेदवारी निश्चित केलेली नाही. त्यामुळं उदयनराजे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम आहे.

उदयनराजे यांनी मात्र युती सरकारच्या निर्णयांचं कौतुक करत आपल्याला सर्व दरवाजे खुले असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. 'आतापर्यंच्या सरकारांनी घोषणा खूप केल्या. पण अंमलबजावणी काहीच नव्हती. तुम्ही व तुमच्या सहकाऱ्यांनी जे निर्णय घेतले, तसे आतापर्यंत झाले नव्हते,' असं उदयनराजे मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले. 'येत्या महिन्याभरात माझं लग्न आहे आणि चार-दोन महिन्यानंतर या सर्वांचं (मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे यांच्याकडं पाहत) लग्न आहे. अक्षता टाकायचं काम करा. एकदम टाकू नका. नाहीतर म्हणाल, तुम्ही सांगितलं म्हणून टाकल्या. आता संपल्या. तसलं काही करू नका,' असं उदयनराजे म्हणताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यायी शिवाजी पुलाचे काम थांबवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या झालेल्या कामाचे बिल देण्यास राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. म्हणून उर्वरित काम थांबवण्याचा निर्णय मंगळवारी ठेकेदार आसमास कंपनीचे प्रतिनिधी एन. डी. लाड यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा काम रेंगाळण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यायी शिवाजी पुलाचे काम रेंगाळले होते. पुलाचे उर्वरीत काम करण्याच्या ठिकाणची मालकी केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे असल्याने कामात आडकाठी आली होती. त्यामुळे या पुलाचे काम पूर्ण व्हावे यासाठी आंदोलन झाले. लोकलढ्याच्या रेट्यामुळे नंतर काम सुरू झाले. ठेकेदाराने गतीने काम करून पुलाच्या पिलर टाकण्याचे काम पूर्ण केले. त्यावर स्लॅब टाकण्याच्या कामाचीही तयारी केली आहे. आतापर्यंत या कामासाठी एक कोटीवर खर्च करण्यात आला आहे. मात्र, कामावर देखरेख करणारे उपअभियंता संपत आबदार अडवणुकीची भूमिका घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत केवळ ९ लाखांचे बिल दिले आहे. उर्वरित बिल जाणीवपूर्वक दिले जात नाही, असे लाड यांचे म्हणणे आहे. परिणामी काम थांबवण्याचा निर्णय ठेकेदाराने घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळ तालुक्यातदोघांची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यात धरणगुत्ती येथे उद्योजकाने, तर टाकवडे येथे शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. विलासराव अमृतराव मोकाशी (वय ६०) व काकासाहेब शंकर पाटील (वय ४५) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद शिरोळ पोलिस ठाण्यात झाली आहे.

टाकवडे येथे काकासाहेब पाटील यांचा मृतदेह भंडारखाना शेताजवळ आढळला. सदाशिव पाटील यांनी पोलिसांना घटनेची वर्दी दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. धरणगुत्ती येथे विलासराव मोकाशी यांचा मृतदेह नातेवाइकांच्या शेतातील गोठ्यात आढळला. या घटनेची वर्दी मुलगा विशालने दिली. मोकाशी यांचा धरणगुत्ती येथे मळा भागात खताचा कारखाना आहे. पाटील व मोकाशी यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेड झोनप्रश्नी अहवाल द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील रेड झोनबाबत पंधरा दिवसांत तांत्रिक आणि शास्त्रीय अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. तेरा वर्षापूर्वी निश्चित केलेली सध्याची पूररेषा अशास्त्रीय असल्याचे मत पाटबंधारे खात्याने नुकतेच नोंदवल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावल्याचे समजते.

कोल्हापूर शहरात १९८४, १९८९ व २००५ साली आलेल्या महापुराचा आधार घेत पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित केली. त्यानुसार शहर विकास आराखडा तयार करण्यात आला. पण ही पूररेषा अशास्त्रीय असल्याचे सांगत नव्याने पूररेषा निश्चित होईपर्यंत या क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे पत्र पंचगंगा पाटबंधारे उपविभागाने नुकतेच महापालिकेला पाठवले. याबाबतचे वृत्त 'मटा'ने मंगळवारच्या अंकात दिले. यामुळे बांधकाम व्यावसायिकांत खळबळ उडाली. कारण या निर्णयामुळे पाचशे एकरांवरील बांधकामांवर निर्बंध येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेतली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह पाटबंधारे खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत कोल्हापूरच्या पूररेषेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्याची पूररेषा अशास्त्रीय असल्याचे मत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. नव्याने पूररेषा ठरवण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्यात असल्याचेही सांगण्यात आले.

यापूर्वी आलेल्या तीन महापुराचा आधार घेत लाल व निळी पूररेषा ठरवण्यात आली. त्यानुसार बांधकाम परवाना दिला जात होता. पण तेरा वर्षानंतर अचानक ही पूरपातळी अशास्त्रीय कशी झाली? असा सवाल काही मंत्र्यांनी केला. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर मंत्र्यांनी ताशेरे ओढल्याचेही समजते. पंधरा दिवसांत या पूररेषेबाबत तांत्रिक व शास्त्रीय अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यामुळे पुढील महिन्यात नवी पूररेषा ठरण्याची चिन्हे आहेत.

.. .. .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रेड वेतनात सुधारणा करा

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रेड वेतनात सुधारणा करावी, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येथील महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपिकसंवर्गीय हक्क परिषदतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकरी संजय शिंदे यांना देण्यात आले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.

सरकारी, निमसरकारी विभागातील लिपिकांना समान काम, समान वेतन मिळावे, ग्रामपंचायत ते मंत्रालयातील लिपिकापर्यंतचे पदनाम एकसमान असावे, जुनी पेन्शन योजना सुरू करावी, लिपिकांची पदे कंत्राटी पद्धतीने न भरता कायमस्वरूपी तत्त्वावर नियुक्त करावी, सातवा वेतन आयोगातील फरक रोखीने द्यावा, अर्जित रजा साठवण्याची मर्यादा रद्द करावी, या मागण्यांसाठी दुपारी बारा वाजता परिषदेतर्फे टाउन हॉलपासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मागण्यांचे फलक हातात घेऊन आणि घोषणाबाजी करून लक्ष वेधण्यात आले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर तेथे लिपिकांनी ठिय्या मारला. परिषदेचे जिल्हाध्यक्ष बी.डी. लोखंडे, व्ही. डी. कांबळे, दादा लाड यांची भाषणे झाली. यावेळी शशिकांत सणगर, एस. व्ही. सम्राट यांच्यासह सरकारी, निमसरकारी संस्थांतील लिपिक उपस्थित होते. दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणानंतर जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी अमोल कुरणे, चंद्रकांत काळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळ्यांचे भाडे सीओ, इस्टेटकडून वसूल करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पिछाडीस असलेल्या सुमारे २८ दुकानगाळ्यांचे प्रत्येकी दरमहा तीन हजार रुपयांप्रमाणे गेल्या दहा वर्षांतील १२० महिन्यांचे सुमारे एक कोटी ८० हजार रुपयांची रक्कम मुख्याधिकारी व इस्टेट विभागप्रमुखांच्या पगारातून वसूल करण्याची मागणी न्याय निवाडा लोकनेता फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

नगरपरिषदेच्या मालकीचे शहरातील विविध भागात दुकानगाळे आहेत. त्यापैकी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या मागील बाजूस २८ दुकानगाळे असून, त्यांच्या भाड्यासंदर्भात न्याय निवाडा लोकनेता फाउंडेशनने एप्रिल २०१८ मध्ये माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली होती. त्यावर प्रशासनाने पत्राद्वारे मे २०१८ मध्ये दिलेल्या माहितीमध्ये या गाळ्यांचे भाडे नगरपरिषदेकडे जमा होत नसल्याचे सांगिल्याने नगरपरिषदेतील आंधळा कारभार उजेडात आला आहे.

येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या मागे नगरपरिषदेच्या मालकीचे २८ दुकानगाळे आहेत. मात्र, ते नेमके कोणी घेतले व कोण वापरतो हे गुलदस्त्यातच असून, त्याची माहिती नगरपरिषदेकडेही उपलब्ध नाही. यासंदर्भात न्याय निवाडा लोकनेता फाउंडेशनने माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली होती. त्यावर नगरपरिषदेने दिलेल्या माहितीने पितळ उघड पडले आहे. याबाबत चौकशीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यामध्ये या दुकानगाळ्यांचे भाडे नगरपरिषदेची एक व्यक्ती येऊन घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. हे गाळे गेल्या दहा वर्षांपासून अस्तित्वात असून, प्रत्येकी तीन हजार रुपयांप्रमाणे विनापावती हे भाडे वसूल केले जात आहे. मासिक भाडे ८४ हजार रुपये होते. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सुमारे एक कोटी ८० हजार रुपयांचे नगरपरिषदेचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मुख्याधिकारी व इस्टेट खातेप्रमुख यांना जबाबदार धरुन ही रक्कम त्यांच्या पगारातून वसुल करुन त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी कारवाई न झाल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्किटेक्ट्सतर्फे आजपासून कार्यशाळा

$
0
0

कोल्हापूर : असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्स व ग्रीहा कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक इमारतीसाठी हरित मूल्यांकन प्रणाली संदर्भात बुधवार (ता.२३) ते शुक्रवार (ता.२५) या कालावधीत कार्यशाळा आयोजित केली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक आर. एस. महाजन यांच्या हस्ते बुधवारी सकाळी दहा वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवसीय कार्यशाळेत पर्यावरणपूरक इमारतीसंदर्भात चर्चा होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हॉटेल पॅव्हेलियन येथे कार्यशाळा होत आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद कृषी प्रदर्शनआठ फेब्रुवारीपासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपूर येथे ८ फेब्रुवारीपासून सहकाररत्न दिवंगत शामराव पाटील-यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील व शुअरशॉट इव्हेंटचे संदीप गिड्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या सहकार्याने शरद साखर कारखाना व शरद कृषी महाविद्यालयाच्या वतीने प्रदर्शन होणार आहे. जयसिंगपूर येथील हेरवाडे कॉलनीलगतच्या शिंदे मळा येथे ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत प्रदर्शन होणार असून प्रदर्शनात शेतीसाठी लागणारी औजारे, बी-बियाणे, खते व जंतुनाशके, जलसिंचनाच्या पद्धती, ठिबकसिंचन, टिश्युकल्चर, कृषी व्यवस्थापक, शेती अर्थ पुरवठा, बँकिंग इन्श्युरन्स, मार्केटिंग व्यवस्थापन, रोपवाटिका (नर्सरी), पाणी व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा, आदींबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. प्रदर्शनादरम्यान ९ फेब्रुवारी रोजी तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. जातिवंत जनावरे, ऊसपीक व इतर पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव, खिचडी महोत्सव व डॉग शो स्पर्धेचेही आयोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


होय...आमच्यावर दप्तराचे ओझे

$
0
0

६४ टक्के मुलांचे म्हणणे

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : शालेय विद्यार्थ्यांवर दप्तराचे ओझे कमी होण्यासाठी डॉ. डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी डॉ. रचना पावस्कर हिने सरकारी व खासगी प्राथमिक शाळेतील ८८६ विद्यार्थ्यांवर केलेल्या संशोधनात ६४ टक्के विद्यार्थ्यांनी 'होय..! आम्हांला दप्तराच्या ओझ्याचा त्रास होतो' असे म्हटले आहे. तिने केलेले संशोधन प्रतिष्ठित इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेडिकल सायन्स अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च (आयजेएमएसआयआर) मध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनात विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दप्तराच्या ओझ्याचा परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांच्यावर दप्तराचे ओझे होत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक विकासावर होत असतो. त्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या सर्व बाबी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणाबाबत वेळोवेळी आदेश काढत राज्य सरकार आणि शिक्षण संस्था यांना विद्यार्थ्यांचे पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सुनावले आहे. त्यानुसार पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन दीड किलो, तीसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन दोन ते तीन किलो आणि सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साडेचार किलो असावे अशी वजनाची मर्यादा निश्चित करण्यात आली. मात्र सक्त आदेश असूनही अंमलबजावणी झालेली दिसत नाही.

दप्तराच्या ओझ्याचा शरीरावर होणारा परिणाम

सहा ते दहा वयोगटातील मुलांवर दप्तराच्या वजनाचे शरीरावर होणारे परिणाम यावर डॉ. पावसकर हिने प्रदीर्घ संशोधन केले. यामध्ये शहरातील पाच शाळांमधील ८८६ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ८२६ मुलं दहा टक्के पेक्षा जास्त वजन पाठीवरून वाहत होती. यामधील ५७६ मुलांना मान व खांदे दुखीचा त्रास आढळला. सायकलने शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मान व खांदेदुखीचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले. याचे मुख्य कारण म्हणजे मुले दप्तराचे ओझे पाठीवर घेऊन सायकल चालवत होती. ४२.२ टक्के मुलांना खांदेदुखी व ते २३.९ टक्के मुलांना मानदुखीचा त्रास आढळला. हे सर्वेक्षण शाळेमध्ये प्रत्यक्ष जाऊन विविध प्रश्नावलीच्या माध्यमातून करण्यात आले. मराठी शाळांपेक्षा सीबीएससी पॅटर्न असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांवर दप्तरांचे ओझे अधिक आहे.

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी

शाळेत गृहपाठ करून घ्या

वेळापत्रकानुसार दप्तर भरणे

शाळेत स्वच्छ पाणी देणे

अतिरिक्त वह्या, पुस्तके आणण्याची सक्ती करू नये.

शहरातील शाळांमधील विद्यार्थी शासकडून वयोगटानुसार ठरवलेल्या वजनापेक्षा अधिक भार आपल्या पाठीवर वाहत आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे. याकडे गांभीर्याने न

पाहिल्यास मुलांमध्ये मानेचे, पाठीचे, खांद्यांचे विकार बळावू शकतात. शिक्षक आणि पालक यांनी समन्वयाने या समस्येवर विचार करून मुलांवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

डॉ. रचना पावसकर, संशोधक विद्यार्थिनी

पाठ दुखते आहे, अशी तक्रार घेऊन अनेक विद्यार्थी पालकांसोबत उपचारासाठी येतात. मुलांवर पाठीचे ओझे कायम राहिल्यास 'कायफोसिस' हा पाठीच्या मणक्याचा आजार बळावू शकतो. यामध्ये मणका पुढे झुकतो. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पालक आणि शाळा प्रशासनाने पुढे यावे.

डॉ. राजीव नेगांधी, बाल अस्थिरोग तज्ज्ञ

दप्तराचे ओझे

वह्या: २७ टक्के

पुस्तके: ५५ टक्के

इतर साहित्य: १८ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष देईल ती जबाबदारी पेलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेंतर्गत २८ जानेवारी रोजी कोल्हापुरात होणारी सभा यशस्वी करण्याचा संकल्प मंगळवारी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत करण्यात आला. मुस्कान लॉनवर होणाऱ्या सभेला दहा हजार नागरिक उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले. दरम्यान सभेच्या यशस्वितेसाठी पक्षाकडून ज्या जबाबदारी दिल्या जातील, त्या पूर्ण करण्यासाठी मी समर्थ आहे' अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी बैठकीत दिली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा सोमवारी कोल्हापुरात दाखल होत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात चार सभा होणार आहेत. शहरात मुस्कान लॉनवर सायंकाळी पाच वाजता परिवर्तन सभा होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी पक्षाच्या जिल्हा कार्यालयातील बैठकीवेळी सलग तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्काराबद्दल खासदार महाडिक यांचा जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघ, करवीर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार महाडिक म्हणाले, 'सध्याच्या सरकारच्या कामकाजाविषयी नागरिकांत असंतोष आहे. पक्षाने परिवर्तनाचा संकल्प करत राज्यभर निर्धार यात्रा सुरू केली आहे. या निमित्ताने पक्षातील नेते दौऱ्यावर येत आहेत. परिवर्तन यात्रेच्या यशस्वितेत प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे.'

चर्चेत महापौर सरिता मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे आदींनी सहभाग घेतला. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बाजार समिती उपसभापती संगीता पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील, संचालक नेताजी पाटील, माजी नगरसेवक अनिल कदम, सुनील देसाई, जयकुमार शिंदे, जहिदा मुजावर, मधुकर जांभळे, आप्पासाहेब धनवडे आदी उपस्थित होते.

दोन्ही खासदार राष्ट्रवादी आघाडीचे

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, 'भाजप सरकारच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कारभाराला समाजातील सर्वच घटक वैतागले आहेत. सरकारवर नागरिकांचा रोष आहे. निवडणुकीत सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे असतील. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू स्टेडियमची मालकी सरकारकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागेचे मूळ प्रयोजन बदलून नियम आणि अटींचा भंग केल्याप्रकरणी छत्रपती शाहू स्टेडियमसह ७ एकर ३८ गुंठे जमिनीची मालकी सरकारकडे घेण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनची (केएसए) मालकी संपुष्टात आली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी हा आदेश दिला. या आदेशावरून मालमत्तापत्रकी 'महाराष्ट्र शासन' अशी नोंदही करण्यात झाली. जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया महसूल प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, हा निर्णय चुकीचा असून त्याचा पुनर्विचार करण्याची मागणी 'केएसए'ने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या रि.स.नं. ६६६ मधील ७ एकर ३८ गुंठे जमीन १९७७ पासून जिल्हा प्रशासनाने केएसएला नाममात्र १ रूपये भाड्याने कायम भाडेतत्त्वावर दिली. त्यावेळी मैदानाची जागा खेळासाठीच वापरावी आणि सर्व जमीन सरकारच्या परवानगीशिवाय वापरू नये, विकसीत करू नये किंवा खरेदी-विक्रीचे कोणतेही व्यवहार करू नयेत, अशा अटी घालण्यात आल्या. मात्र सध्या या जागेवर शाहू स्टेडियमसह विविध मिळकतींचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय खरेदी विक्री व्यवहारही झाले आहेत. यावर आक्षेप घेत प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी दोन वर्षांपूर्वी करवीर प्रांताधिकाऱ्यांकडे केली.

प्रांताधिकाऱ्यांनी केएसएसह येथील सर्व मिळकतधारक व्यक्ती आणि संस्थांना नोटिसा दिल्या. मात्र कुणीही नोटिसीला लेखी उत्तर दिले नाही. त्यानंतर वस्तूनिष्ठ पंचनामा करण्यात आला. ज्यांना जमीन दिली त्यांनी सरकारकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भाड्याने दुसऱ्यांना दिली आणि शर्तभंग केला, असे पंचनाम्यात समोर आले. भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षकांनीही जमीनसंबंधी दिलेल्या चौकशी अहवालात म्हटले आहे की, ७ एकर ३८ गुंठे जमिनीवर असलेल्या रावणेश्वर तलावात भराव टाकला आहे. तिथे प्लॉट पाडतील अशी शक्यता आहे. केएसएला जमीन भाडेकराराने दिली आहे. मात्र त्यांनी शर्तभंग केला आहे.

दरम्यान जमीन 'केएसए'ची असूनही सुनावणी प्रक्रियेत संस्थेने योग्य कागदपत्रे सादर न केल्याने ती सरकारच्या मालकीची करण्यात आली. हा निकाल आल्यानंतर पदाधिकारी खडबडून जागे झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी 'केएसए'ने केली आहे.

-- --

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानगाळ्यांच्या मालकीचा प्रश्नच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहू स्टेडियमच्या जमिनीची मालकी कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनकडून (केएसए) राज्य सरकारकडे हस्तांतरीत झाल्यामुळे नव्याने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मैदानाच्या दैनंदिन देखभाल, सामन्यांसह खासगी विकसकाकडून बांधण्यात आलेले दुकानगाळे आणि ते विकत घेतलेल्यांच्या मालकीचाही प्रश्न निर्माण होणार आहे. परिणामी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेतल्यानंतर गाळेधारकांच्या व्यवहारांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तत्कालीन जिल्हा प्रशासनाने १९७४मध्ये स्टेडियमच्या जागेसह ७ एकर ३८ गुंठे जमीन केएसएला एक रुपये भाड्याने देण्यात आली होती. केएसएने माजी महापौर दीपक जाधव यांच्या करण असोसिएट्सला काही जमिनींवर दुकानगाळे बांधण्यासाठी ठेका दिला. त्यांनी तीन मजली इमारत बांधून १८७ दुकानगाळे बांधले. त्यांनी ते पूजाप्रिया डेव्हलपर्स आणि केएसएकडे हस्तांतर केले. यातील दर्शनी भागातील दुकानगाळ्यांची विक्री झाली. त्यामुळे केएसएने अटींचा भंग केल्याची तक्रार दिलीप देसाई यांनी केली. त्याची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर झाली. या प्रकरणी करवीर प्रांताधिकारी, जिल्हा भूमी अभिलेखकडून अहवाल सादर करण्यात आला.

दरम्यान, याप्रकरणी सुनावणीत 'केएसए'नेही खुलासा केला. त्यात म्हटले आहे की, स्वातंत्र्यपूर्वकाळापासून म्हणजे १९३९पासून या जमिनी कोल्हापूर संस्थानच्या मालकीच्या होत्या. मालमत्तापत्रकी 'हुजूर खाजगी रावणेश्वर तलाव' अशी नोंद आहे. १९४२पासून या मिळकती केएसएकडे आहेत. त्या पूर्वीपासून कोल्हापूर संस्थानच्या खाजगी मालकीच्या होत्या. संस्थाने खालसा झाल्यानंतर मिळकती संस्थानिकांच्या खासगी म्हणून कायम राहिल्या. त्यात महाराष्ट्र सरकारचा कोणताही संबंध नाही.

दरम्यान, दोन्ही बाजूंकडील अहवालांचा अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांनी निष्कर्ष नोंदवले. जमीन खासगी मालकीची असल्याचे केएसएचे म्हणणे असले तरी याबाबत सबळ पुरावे दिलेले नाहीत. 'गर्व्हर्न्मेंट ऑफ बाँम्बे पॉलिटिकल अँड सर्व्हिस डिपार्टमेंट'मध्ये नमुद खासगी मिळकत, शेरी इनाम जमिनीच्या यादीत केएसएकडील जमिनीची नोंद नाही. याचा अर्थ ती मिळकत, जमीन सरकार मालकीची आहे. केएसएकडील जमीन सरकारी हक्कात घेण्याचा आदेश या निकालावेळी ४ जानेवारी २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जमिनीची कब्जेपट्टी करून मिळकत पत्रकावर महाराष्ट्र शासन अशी नोंद करून अहवाल भूमी अभिलेख अधिकांनी पाठवावा, जमीन व त्यावरील मिळकतीची पुढील देखभाल, दुरुस्तीसाठी रितसर कब्जेपट्टी नगरभूमापन अधिकाऱ्यांकडून घ्यावी, कब्जापट्टीसह ताबा घेऊन कामकाज करावे, असा आदेश जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांनाही त्यांनी दिला आहे.

विभागीय आयुक्तांकडे कॅव्हेट

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाविरोधात प्रतिवादी हे पुणे येथील विभागीय आयुक्तांकडे आव्हान याचिका दाखल करतील. अशावेळी एकतर्फी निर्णय होऊ नये, म्हणून तक्रारदार दिलीप देसाई यांनी कॅव्हेट दाखल केले आहे.

स्टेडियमकडील जमीन सरकारी मालकी अशी नोंद केली आहे. याचा प्रत्यक्ष ताबा घेण्याचे आदेश तहसीलदारांना दिले जातील. ते पुढील कार्यवाही करतील. यापुढील काळात स्टेडियमवरील क्रीडा स्पर्धा व इतर उपक्रमासंबंधी कोणाशी पत्रव्यवहार करावा लागेल, यासंबंधी विचार करावा लागेल.

- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

शाहू स्टेडियमसंबंधीचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय एकतर्फी आहे. केएसएला म्हणणे मांडण्याची संधी मिळालेली नाही. कोणी विचारणाही केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात दाद मागणार आहोत.

- माणिक मंडलिक, सचिव, केएसए

केएसएने अटी, शर्तींचा भंग केल्याचे सुनावणीत स्पष्ट झाले आहे. केएसएने परस्पर दुकानगाळे बेकायदेशीरपणे काढले, विकले आहेत. सर्व व्यवहार चुकीचे झाले आहेत. त्यामुळे शाहू स्टेडियमसह ७ एकर ३८ गुंठ्यावरील मिळकतीची मालकी सरकारची झाली आहे. त्याचा ताबा त्वरित घ्यावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- दिलीप देसाई, अध्यक्ष, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॉयल स्टार क्लबमध्ये अडकले ३०० कोटी रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मिराह ग्रुप ऑफ कंपनीच्या रॉयल ट्विंकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स लि. कंपनीने कोल्हापूर जिल्ह्यातील तीनशे कोटी रुपये अडकले आहेत. हॉलिडे प्लॅन्स या नावाने जादा व्याजाचे अमिष दाखवून ठेवी घेतल्यानंतर कंपनीने कार्यालय बंद केले. दरम्यान, ही रक्कम मिळावी यासाठी कंपनीच्या एजंटांनी सिट्रस वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली असून त्यांना न्यायालयीन लढा सुरू आहे.

मिराह ग्रुप ऑफ कंपनीने देशभरात काही पोटकंपन्या सुरू केल्या. जादा व्याजाचे अमिष दाखवल्याने गुंतवणुकदारांनी त्यामध्ये साडेसात हजार कोटींची गुंतवणूक केली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पंचवीस हजारांवर लोकांनी तीनशे कोटींपेक्षा अधिक रक्कम कंपनीत गुंतवली. पण, रक्कम परत देण्यास टाळाटाळ सुरू झाली. कंपनीचे शाहूपुरी येथे कार्यालय होते. दोन वर्षापूर्वी ते बंद झाले. ही कंपनी दिवाळखोरीत काढावी म्हणून संचालकांनी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे गुंतवणुकदार हवालदिल दिले.

दरम्यान, ही रक्कम गुंतवणूकदारांना परत मिळावी यासाठी सिट्रस वेल्फेअर सोसायटीची स्थापना करण्यात आली. यामार्फत दोन वर्षे न्यायालयात लढा सुरू आहे. गुंतवणुकदारांनी कंपनी दिवाळखोरीत काढण्यास न्यायालयाकडून मनाई मिळवली आहे. कंपनीची मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत द्यावी यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तन्वी दळवीचे यश

$
0
0

कोल्हापूर: टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणेतर्फे घेतलेल्या इंग्रजी इंटरमिजिएट परीक्षेत येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमधील तन्वी विजय दळवीने प्रथम क्रमांक मिळवला. या परीक्षेला महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात. मुख्याध्यापिका राधिका मंद्रुपकर, पर्यवेक्षिका संध्या चौगले, व्ही. बी. पाटील, शिक्षिका एस. एस. कुलकर्णी, एस. ए. रणवरे यांचे मार्गदर्शन लाभले. यानिमित्त बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत यांच्या हस्ते मानचिन्ह व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. तन्वी सध्या सातवीच्या वर्गात शिकत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौलत देसाईंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेली वीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षण प्रसारक मंडळाचे कौन्सिल मेंबर दौलत देसाई यांनी मंगळवारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात दावेदारी केली. दरम्यान, आमदार पाटील यांनी, देसाई यांना पक्षात योग्य स्थान देत त्यांना बळ दिले जाईल, अशी ग्वाही दिली.

न्यू शाहूपुरी बेकर गल्ली येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, महापालिका सभागृह नेता दिलीप पोवार, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील प्रमुख उपस्थित होते.

देसाई यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल आमदार पाटील म्हणाले, 'देसाई घराण्यातील काँग्रेसचे माजी आमदार एम. आर. देसाई, दत्ता बाळ, दिलीप देसाई, कुमार देसाई यांनी समाजासाठी योगदान दिले आहे. आध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक वारसा असलेल्या दौलत देसाई यांनी सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. काँग्रेसने तीन राज्यांत घवघवीत यश मिळवले असून, पक्षाचे नेते राहुल गांधी सध्या विरोधी पक्षाची भूमिका जोरदारपणे मांडत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, देसाईंसारख्या तरुण कार्यकर्त्याचे पक्षात स्वागत करण्यात मला आनंद होत आहे. योग्य सन्मान राखून पक्ष त्यांना बळ देईल.'

पक्ष प्रवेशानंतर देसाई म्हणाले, 'गेली वीस वर्षे मी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने राजकारणात उतरण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला होता; पण आमदार पाटील यांची भक्कम साथ असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 'कोल्हापूर उत्तर'मध्ये आजी-माजी नगरसेवक व युवक कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही.'

प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'मुश्रीफ व कोरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आमची वाटचाल सुरू असून, त्यांचे देसाई घराण्याशी चांगले संबंध आहेत. नेत्यांच्या आदेशानुसार आम्ही देसाई यांच्या पाठीशी राहू.'

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी देसाई-मोरे, अजित मोरे, रूपाली देसाई, प्रतिमा पाटील, गोव्यातील उद्योगपती संजय साळगावकर, माजी महापौर राजू शिंगाडे तसेच आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.

०००

फोटो कॅप्शन :

दौलत देसाई यांच्या काँग्रेस पक्षप्रवेश कार्यक्रमात डावीकडून रूपाली देसाई, मंजिरी देसाई-मोरे, प्रतिमा पाटील, जयकुमार देसाई, अजित मोरे, आमदार सतेज पाटील, दौलत देसाई, प्रा. जयंत पाटील.

००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजारास कंटाळून महिलेची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृतसेवा, गगनबावडा

आजाराला कंटाळून रोशन गुलाब डांगे (वय ६३, रा. गगनबावडा) हिने भुईबावडा घाटात दरीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबतची नोंद वैभववाडी पोलिस ठाण्यात झाली आहे. मृत रोशन २० जानेवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाइकांनी गगनबावडा पोलिस ठाण्यात दिली होती. नातेवाइकांनी भुईबावडा घाट परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला असता गगनबावड्यापासून दोन कि.मी.वर घाटात रोशन यांचे चप्पल आढळून आले. अधिक तपास केला असता खोल दरीत मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोल्हापुरातील रेस्क्यू टीमला पाचारण केले होते. रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठजणांवर गुन्हा

$
0
0

गडहिंग्लज : गडहिंग्लज-कडगाव रस्त्यावर लिंगनूर माळ येथे दारूविक्रीचा परवाना रद्द झालेला असतानाही विदेशी दारूविक्री करणाऱ्या हॉटेल वैभवच्या मालकासह आठजणांवर गडहिंग्लज पोलिसांत दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेलमालक सुनील माळवे यांच्यासह दारू पिणारे शिवाजी चव्हाण, रमेश खांडेकर, अमित धावणे, दत्तात्रय कुरळे, संजय कुणाचे (सर्व रा. लिंगनूर) व अरुण पाटील, अविनाश पाटील (दोघेही रा. बेकनाळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अटक करून सर्वांची जामिनावर मुक्तता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रवितेज महोत्सव शनिवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रवितेज महोत्सवाच्या निमित्ताने सिद्धाळा गार्डन येथे २६ व २७ जानेवारीला विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे उद्घाटन महापौर सरिता मोरे व वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात लहान मुलांसाठी फनी गेम, सांस्कृतिक स्पर्धा, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री याबरोबरच खाद्यपदार्थांची मेजवाणी असणार आहे. महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार असून, मराठी व हिंदी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ जानेवारीला रात्री आठ वाजता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफ चुकवला; कंपन्याकडून ४.५ कोटींची वसुली

$
0
0

Satisg.ghatage@timesgroup.com

Tweet@SatishgMT

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील दोन हजार कंपन्यांवर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारल्यानंतर संबंधित कंपन्यांनी साडेचार कोटींची रक्कम जमा केली. या कंपन्यांनी १२ कोटी ५६ लाख एवढी पीएफ रक्कम प्रॉव्हिडंट फंड खात्यात भरलीच नव्हती.

कोल्हापूर विभागात कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, सहकारी, खासगी संस्था आणि कारखान्यातील तीन लाख १४ हजार कर्मचारी पीएफ खातेदार आहेत. त्यापोटी दरमहा ४७ कोटी तर वर्षाला अंदाजे ५६४ कोटी रुपये जमा होतात. कमीत कमी २० कर्मचारी असलेल्या संस्थांसाठी पीएफ जमा करण्याचे बंधन आहे. मालक आणि कर्मचारी यांच्यात प्रत्येकी प्रत्येकी पन्नास टक्के पीएफची रक्कम असते. विभागात दहा हजार संस्थांची पीएफ ऑफिसकडे नोंदणी आहे. पैकी दोन हजार कंपन्यांनी २०१८ या वर्षात १२ कोटी ५६ लाख रुपये पीएफ भरला नव्हता. या कंपन्यांनी पीएफ रक्कमही कापून घेतली आहे. पण ती पीएफ खात्यावर भरली नाही. त्यासाठी नोटिसाही पाठवल्या होत्या. साखर उद्योग अडचणीत असल्याने कारखानदारांनी पीएफ भरला नव्हता. त्यामुळे कारखान्यांसाठी मुदतवाढ मिळाली.

तथापि, नोटिसा देऊनही ज्या संस्था दाद देत नव्हत्या त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. ४२ संस्थांविरोधात फौजदारी दाखल करण्यात आली. त्यांपैकी पाच संस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भविष्य निर्वाह कार्यालयाने उगारलेल्या या बडग्यामुळे अनेक संस्थांनी पीएफची रक्कम भरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत साडेचार कोटींची रक्कम जमा झाली आहे. पुढच्या दीड महिन्यात शिल्लक आठ कोटी रुपये वसुलीसाठी कारवाईचा वेग वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पीएफधारकांना घरपोच सेवा देण्याचे प्रयत्न सुरु असताना अनेक कंपन्या पीएफधारकाच्या खात्यावर रक्कम भरत नाहीत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. या कारवाईमुळे साडेचार कोटी रुपये वसूल झाले.

- सौरभ प्रसाद, आयुक्त, पीएफ कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवर्डे आंदोलन उद्या ‘चित्री’च्या पाण्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्यातील देवर्डे गावठाणवाढ बेमुदत आंदोलन २४ जानेवारीला चित्रीच्या पाण्यात, तर २५ पासून आजरा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात येणार आहे. देवर्डे येथील माळरानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा अकरावा दिवस सुरू असतानाही प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याने आंदोलनाबाबत हा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे.

देवर्डे येथे शास्त्रीय व कायदेशीरित्या परिपूर्ण गावठाणवाढ प्रक्रिया ताबडतोब होण्यासाठी या बेमुदत आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शासन आणि प्रशासन जोपर्यंत हा प्रश्न कायदेशीर व शास्त्रीय पद्धतीने मार्गी लावत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनाचे नेते संग्राम सावंत यांनी व्यक्त केला.

गेली दहा वर्षे देवर्डे गावठाणवाढ प्रश्नासाठी संघर्ष सुरू आहे. परिसरात हत्ती आणि गव्यांचा त्रास आहे. शिवाय उघड्या माळरानावर थंडीचा मुकाबला आंदोलकांना करावा लागतो आहे. तरीही आंदोलक ढळलेले नाहीत. मात्र प्रशासन आणि शासनाची संवेदनशीलता हरवली आहे. त्यामुळे याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नसल्याने बेमुदत आंदोलनाची जागा बदलण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी 'चित्री' नदीच्या पात्रात एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन होईल. त्यानंतर शुक्रवारपासून आजरा तहसील आवारात आंदोलन बेमुदत सुरू राहणार आहे. आंदोलनात जिल्हा संघटक मारुती कांबळे, संगीता बुरुड, शकुंतला बागडी, संजय सोले, संगीता सुतार, रामा कांबळे, राजेंद्र देशमुख, केरबा बागडी, प्रभाकर कांबळे आदी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images