Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

३१ जानेवारीची डेडलाइन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कृषीपंपाचे वीजदर आणि इतर मागण्याबाबत सरकारने ३१ जानेवारीपर्यंत अध्यादेश काढण्याचे लेखी पत्र दिले आहे. तोपर्यंत अंमलबजावणीची वाट पाहू. अध्यादेश लागू करण्यात सरकारकडून दगाफटका झाल्यास एक फेब्रुवारीला हजारो शेतकऱ्यांसह पुन्हा राष्ट्रीय महामार्ग रोखू,' असा इशारा महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सोमवारी दिला.

वीज दरवाढ रद्द केल्याबाबतचे पत्र सरकार जोपर्यंत देणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरुन हलणार नाही, असा इशारा देत डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी पंचगंगा नदीवरील पुलावर आंदोलन सुरू केले. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. कृषीपंपधारकांच्या सर्व मागण्या मान्य असल्याच्या आशयाचे मुख्यमंत्र्यांचे पत्र त्यांनी प्रा. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यामुळे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली.

या पत्रानुसार, राज्यातील उच्च व लघु वीज दाब पाणी पुरवठा संस्थांना एक नोव्हेंबर २०१६ ते एक मार्च २०२० पर्यंत प्रति युनिट १.१६ रुपये प्रमाणे बिलाची आकारणी होईल. तसेच ४१ लाख कृषीपंपधारकांच्या बिलातही दुरुस्ती करु. शिवाय १.१६ रुपये प्रमाणे वीज आकारणीने तयार होणारी १३९ कोटींची थकबाकी सरकार महावितरण कंपनीला देईल. या संदर्भात ३१ जानेवारीपूर्वी अध्यादेश काढण्यात येणार आहे.

'एनडीं'च्या विजयाच्या घोषणा, पालकमंत्र्यांचे अभिनंदन

आंदोलनाला यश मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी एन. डी. पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. पालकमंत्री मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांचे पत्र घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाल्यावर त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

.. .. ..

...कोल्हापूर टाइम्स... १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समता सागर महाराजांचे निर्वाण

0
0

समता सागर महाराजांचे निर्वाण

मिरज : म्हैसाळ येथील १००८ भगवान महावीरव्रती आश्रमात १०८ समता सागर महाराजांचे निर्वाण (समाधी) झाले. त्यांनी ९ जानेवारी रोजी १०८ समुद्रसेन महाराजांकडून यम सल्लेखना स्वीकारली होती.

आचार्य वर्धमान सागर महाराज, सुखसागर महाराज, प्रशम सागर महाराज व इतर साधूंच्या सानिध्यात समता सागर महाराजांनी यम सल्लेखना व्रत सुरू केले होते. समता सागर महाराज हे पूर्वाश्रमीचे प्रा. जे. डी. पाटील होत. त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील बेडकीहाळ असून देवचंद कॉलेजमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. ३ डिसेंबर २००८मध्ये त्यांनी १०८ आचार्य सन्मती सागर महाराजांकडून दिक्षा घेतली. त्यांनी जैन धर्म रुपरेषा, त्रिलोक मंगल भगवान महावीर, गोम्मट चरित्र, जैन धर्म परिचय, जेम्स अँड डायमंड्स, जैन सरस्वती, भारतीय पर्व व व्रत विधान, प्रथमचार्य शांतीसागर महाराज व णमोकार बोध असे विपुल साहित्य लेखन केले. कर्नाटक, आंध्र व ओरिसा या राज्यांत अनेक व्याख्याने त्यांनी दिली होती. बाहुबली, सांगाव, निमशिरगाव, म्हैसाळ, कोथळी, इनाम धामणी, खोची व समडोळी येथे त्यांनी चातुर्मास केले. सोमवारी म्हैसाळमध्ये रक्षा विसर्जन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक

0
0

कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या नियोजनसाठी शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी बैठक होत आहे. ताराबाई पार्क येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, कार्याध्यक्ष राजाध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा २८ जानेवारी रोजी जिल्ह्यात दाखल होणार आहे.

...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सातबारा’च्या ८ कोटींवर ढपला

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : सातबारा आणि आठ 'अ'साठी आकारण्यात येणारी रक्कम महसूलच्या तिजोरीत गेलीच नाही. गेल्या पाच वर्षांत उताऱ्यांसाठी अधिकृतपणे आकारण्यात आलेल्या रकमेपैकी एक रुपयाही जमा झाला नसल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. प्रत्येक उताऱ्यासाठी किमान १५ रुपये ही रक्कम गृहित धरली तर पाच वर्षांचा हा आकडा ८ कोटी ३ लाखांपर्यंत जातो. गेल्या पाच वर्षांत तलाठ्यांकडून आकारण्यात आलेल्या शुल्कापोटीचे सुमारे ८ कोटी ३ लाखांचे नेमके काय झाले, यासंबंधी जिल्हा महसूल प्रशासनही अनभिज्ञ आहे. त्यामुळे हे पैसे महसूल प्रशासनातील साखळीनेच ढापल्याचे आरोप होत आहे.

जिल्हा नियोजन समितीकडून ऑनलाइन उतारे देण्यासाठी तलाठ्यांना आर्थिक मदत केली आहे. तलाठ्यांनी स्वत:च्या लॅपटॉप आणि प्रिंटरवरून प्रिंट काढून सही दिल्यास १८ मार्च २०१४ च्या महसूल, वन विभागाच्या आदेशानुसार केवळ सातबारा, उताऱ्यास १५ रूपये शुल्क आकारण्यास मुभा आहे. यानुसार घेतलेल्या १५ रूपयांतील ५ रूपये जमीन महसूल विभागाकडे तर उर्वरित दहा रूपये संगणक, प्रिंटर देखभाल, दुरूस्ती आणि विजेवरील खर्चासाठी देणे अपेक्षित आहे. मात्र त्याचा हिशेब तलाठ्यांनी ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अपवाद वगळता बहुतांश तलाठ्यांनी हिशेब ठेवलेला नाही. पाच रूपयांप्रमाणे होणारी रक्कम वेळोवेळी महसूलकडे भरलेली नसल्याचे उघड झाले. मार्च २०१४ ते डिसेंबर २०१८ अखेर १० लाख उताऱ्यांची १५ रूपयांप्रमाणे ही रक्कम ८ कोटी ३ लाख रूपये होते. पाच रुपयांप्रमाणे २ कोटी ६७ लाख एवढी रक्कम सरकारच्या तिजोरीत जाणे अपेक्षित होते. उर्वरित १० रूपयांनुसारी होणाऱ्या ५ कोटी ३५ लाखांच्या हिशेबाती गोलमाल आहे. त्यामुळे पाच वर्षांत ८ कोटींवर ढपला मारल्याचा संशय बळावला आहे. तलाठ्यांकडून या रकमेचा हिशेब ठेवला जातोय की नाही याकडे वरिष्ठांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. किंबहुना, त्यांना 'अभय' दिल्याच्याच तक्रारी आहेत.

- -- -

सातबारा, आठ 'अ' देण्यासाठी तलाठी कमीत कमी ४० ते ५० रूपये घेतात. ते न दिल्यास अडवणूक होते. सर्व्हर डाउनचे कारण सांगून हेलपाटे मारायला लावले जातात. तलाठी पैसे घेतल्याची वरिष्ठाकडे तक्रार केल्यास दखलही घेतली जात नाही. एवढ्या कमी रकमेची तक्रारीची चौकशी काय करायची, अशी कुचेष्टाही वरिष्ठांकडून केली जाते.

बंडू पाटील, शेतकरी

- --

तलाठ्यांकडून या उताऱ्यांसाठी आकारण्यात आलेल्या शुल्काची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात किती तलाठ्यांकडून शुल्क आकारले, त्यातील किती पैसे महसुली खात्यात भरले याची नेमकी आकडेवारी जिल्हास्तरावर उपलब्ध नाही. यासंबंधी सविस्तर विचारणा सर्व प्रांताधिकाऱ्यांकडे केली जाईल.

अरविंद लाटकर, उपजिल्हाधिकारी, महसूल

-- --

१२३४

जिल्ह्यातील महसुली गावे

.. ..

१० लाख ७० हजार

एकूण सातबारा संख्या

.. ..

३९२

कार्यरत तलाठी

.. ..

सुमारे ८ कोटी ३ लाख

पाच वर्षांत उताऱ्यांसाठी घेतलेले पैसे

-- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळसंबेत मुलाकडून सावत्र आईचा खून

0
0

म. टा. वृत्तसेवा, गगनबावडा

घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात मुलाने रागाच्या भरात सावत्र आईचा कोयत्याने घाव घालून खून केल्याची घटना पळसंबे ( ता. गगनबावडा) येथे घडली. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. प्रगती पांडूरंग माने (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. तर संशयित आरोपी रवींद्र पांडुरंग माने (वय ४१) हा खुनाच्या घटनेनंतर स्वतःहून गगनबावडा पोलिस ठाण्यात हजर झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, संशयित रवींद्र माने याचे वडील पांडूरंग माने यांनी पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर प्रगती हिच्याशी लग्न केले. तिच्यासमवेत ते नोकरीनिमित मुंबईत स्वतःच्या मालकीच्या खोलीत राहत होते. पांडुरंग माने यांच्या मृत्यूनंतर प्रगती यांनी ती खोली परस्पर विकली. त्याचे सर्व पैसे स्वतःच घेतले. आपल्याकडील दागिने व भांडी त्यांनी परस्पर नातेवाईकांना दिली. पळसंबे येथील घरातील भांडीसुद्धा त्या आपल्या माहेरी रत्नागिरी येथे घेऊन गेल्या. आपल्या वाटणीचे शेतही त्यांनी दुसऱ्यांना कसण्यास दिले. प्रगती आणि त्यांचे नातेवाईक सावत्र मुलगा रवींद्र याला वारंवार ठार मारण्याची धमकी देत होते.

पतीच्या निधनानंतर प्रगती माहेरी रत्नागिरीतच राहात होत्या. कधीतरी त्या पळसंबे येथे येत होत्या. सोमवारी सकाळी प्रगती या रत्नागिरीहून गावी आल्या. त्यांचा मिळकतीवरून सावत्र मुलगा रवींद्र याच्याशी वाद झाला. यावेळी रवींद्रने रागाच्या भरात प्रगती यांच्या गळ्यावर कोयत्याचा वार केला. खोलवर घाव झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन प्रगती यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रवींद्र स्वतःहून गगनबावडा पोलिस ठाण्यात हजर झाला. प्रगती यांच्या माहेरचे नातेवाईक हजर नसल्याने उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव सूर्यवंशी तपास करीत आहेत.

फोटो : संशयित रवींद्र माने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीची मोटरसायकल जप्त

0
0

चोरीची मोटरसायकल जप्त

गगनबावडा : आकुर्डे ( ता. पन्हाळा ) येथील ऋषिकेश संजय गुरव यांच्याकडील चोरीची मोटरसायकल कळे पोलिसांनी सापळा रचून जप्त केली. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मोटरसायल चोरीचा गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यातील स्प्लेंडर मोटरसायकल आकुर्डे येथे असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ऋषीकेश संजय गुरव यांच्या ताब्यातील स्प्लेंडर ( एमएच ०९ बीएल ३९५४ ) जप्त केली. चौकशीत त्याने धीरज सर्जेराव जाधव ( रा. पुशिरे ) यांच्याकडून गाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. दोघांनाही मोटरसायकलसह ताब्यात घेऊन तपासासाठी जुना राजवाडा पोलीसांकडे पाठविले. डीवायएसपी आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांनी ही कारवाई केली. हेड कॉन्स्टेबल विलास तानुगडे, चौरे, घाटगे, डामसे यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य हॉकी संघाचीसमीक्षा शेगुणशी कर्णधार

0
0

गडहिंग्लज : नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरा देवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलची हॉकी खेळाडू समीक्षा सुरेश शेगुणशी हिची राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धा हरियाणा येथे होणार आहेत. शेगुणशी हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात दुसऱ्यांदा निवड झाली आहे. तिला क्रीडाशिक्षक रमेश चौगुले, मनोहर मांगले यांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष कल्लाप्पा नडगदल्ली, सचिव नानापा माळगी, विनोद नाईकवाडी व प्राचार्य टी. एम. राजाराम, पर्यवेक्षक जी. आर. चोथे यांचे प्रोत्साहन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेंदाळला चोरीत तीन लाखांचे दागिने लंपास

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील मानेनगर वसाहतीतील चांदी व्यवसायिक सचिन सुरेश कोरडे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा किलो चांदी, साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, रोख दहा हजार रुपये असा एकूण सुमारे २ लाख ४१ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. घराभोवती बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर मशीनही पळवून नेल्याचे आढळून आले. याची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती समजूनही दुपारपर्यंत घटनास्थळी पोलिस फिरकले नव्हते.

घटनास्थळ आणि पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, व्यावसायिक सचिन कोरडे हे मानेनगर वसाहतीमध्ये कुंटुंबीयांसह राहतात. त्यांचा हुपरीतील यशवंतनगरमध्ये चांदीचे दागिने तयार करण्याचा व्यवसाय आहे. चार दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह मूळ गावी नानीबाई चिखली (ता. कागल) येथे गेले होते. संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री बंद घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. बेडरूममधील तिजोरीतील दहा किलो चांदी व साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये असा २ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी किचनमधील चटणीची बरणी, तांदळाचा डबा, बेडरुम व हॉलमधील साहित्य विस्कटून टाकत शोधाशोध केल्याचे निदर्शनास आले.

कोरडे यांच्या कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून अज्ञात व्यक्तींकडून बाथरूममध्ये फटाके लावणे, दारात कचरा टाकणे, गेटची तोडफोड असा जाणुनबुजून मानसिक त्रास देण्यात येत आहे. याबाबत त्यांनी हुपरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याचा तपास अपुरा आहे. त्यामुळे कोरडे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. चोरट्यांनी कॅमेरे व डीव्हीआर मशीन पळवून नेले आहेत. त्यामुळे चोरटे माहितगार असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज दरवाढीविरोधात एल्गार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कृषी पंपाच्या अन्यायी वीज दरवाढीच्या विरोधात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी राष्ट्रीय महामार्गावर उतरले. सरकार वीज दरवाढ रद्द करण्याचा निर्णय घेईपर्यंत रस्त्यावरुन हलायचे नाही, असे आवाहन करत सरकारलाही अल्टिमेटम दिला. या आंदोलनात सर्वपक्षीय आमदार व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शेतकरी कामगार पक्षासह सरकारचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी कृषी पंपाच्या वीज दरवाढीवरुन सरकारला घरचा आहेर दिला. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलानजीक तब्बल अडीच तास झालेल्या सभेत सर्व पक्षीय आमदार, पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन आयोजित केले होते. आंदोलनापूर्वी आयोजित सभेत शेती पंपाच्या वीज बिलातील पोकळ थकबाकीवरून सव

च नेत्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. पंचगंगा पुलाच्या उत्तरेस रस्त्याबाजूला ट्रॉलीमध्ये व्यासपीठ उभारले होते.

\Bमस्तवालपणा कराल तर ४६० करंट देऊ

\Bखासदार राजू शेट्टी म्हणाले 'राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी.पाटील यांना वयाच्या ९२ व्या वर्षी आंदोलन करावे लागते याची सरकारला लाज वाटली पाहिजे. त्यांना फसवाल तर राज्यकर्त्यांना किंमत चुकवावी लागेल. मुळात त्यांच्यासारख्या ऋषीतुल्य माणसाला फसवण्याइतकी मस्ती सरकारला कुठून आली? त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारने मस्तवालपणा चालू ठेवला तर ४६० चा करंट देऊ. शेतकऱ्यांवर नक्षलवादी व्हायची वेळ आणू नका. शेतकरी एकदा खवळला तर सरकारच्या बापालाही ऐकणार नाही.'

\B

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चाड नाही

\Bखासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'सरकारने अडचणीत आलेल्या स्टील उद्योगाला पाच हजार कोटी, सिमेंट उद्योगाला २५०० कोटी, बँकांना दहा हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले. मात्र सर्वांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करते. गेल्या साडे चार वर्षांच्या कालावधीत २४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यात ९३०० शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सरकारला गांभीर्य नाही.' आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 'केंद्र आणि राज्यातील सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला नाही. सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी महामार्ग रोखून धरुया. एन. डी. पाटील यांच्या आंदोलनाची धार माहीत आहे. सरकारने त्यांची फसवणूक करू नये.'

\B

सरकारने शिवाजी महाराज, आंबेडकरांना फसवले

\Bकाँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, 'भाजप सरकारने साडेचार वर्षांत केवळ आश्वासने दिली. सरकारने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज व इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक साकारण्याची घोषणेचे पालन केले नाही. सध्याच्या राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराज व आंबेडकरांना फसवले ते शेतकऱ्यांना काय न्याय देणार? हे सरकार फसवं आहे. खोटी आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचा व शेतकऱ्यांना आश्वासनाचे गाजर दाखविण्याचा उद्योग केला. यामुळे आता आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार आहे.'वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार राजीव आवळे, संपतराव पवार-पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील, हुतात्मा कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी, क्रांती कारखान्याचे चेअरमन अरुण लाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धैर्यशील माने, वाळव्याचे रवींद्र बोरडे, मानाजी भोसले यांची भाषणे झाली. आमदार उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, भगवान काटे, बाबासाहेब देवकर आदी उपस्थित होते. विक्रांत पाटील यांनी आंदोलनाची भूमिका विषद केली. रणजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

शिवसेनेचा घरचा आहेर

शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील व आमदार सुजित मिणचेकर यांनी वीज दरवाढीवरुन सरकारवर सडकून टीका केली. वीज दरवाढीच्या प्रश्नी शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घ्यायला हवी. सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायची ही पक्षाची भूमिका असल्याचे सांगत सरकारला घरचा आहेर दिला. माजी आमदार संजय घाटगे यांनी शेतकरी शेती करतो ही चूक केली आहे का? डॉ. एन. डी. पाटील व खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत,' असेही ते म्हणाले.

..................................

प्रमुख मागण्या

सर्व कृषी पंपधारकांची मीटर रिडींग न घेता जादा दिलेल्या बिलांच्या दुरुस्त्या कराव्यात

दुरुस्त केलेल्या वीज बिलांना कृषी संजीवनी जाहीर करावी

सर्व कृषी पंपधारकांना नवीन वीज दर सवलतीने ठरावावेत

सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या नावावरील पोकळ व दंडीत सरकारी पाणीपट्टीची आकारणी रद्द करावी

कृषी पंप शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा १२ तास वीज पुरवठा करावा

वीज दरवाढ रद्द करण्यासाठी ३४०० कोटी रुपयांचे अनुदान मिळावे

गुऱ्हाळघरांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करावा.

......................

पंचगंगा पूल परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने प्रचंड बंदोबस्त लावला होता. यामुळे पंचगंगा नदी पूल परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दोन वेळा भेट दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाडगे यांच्यासह सात उप अधीक्षक, ४० पोलिस निरीक्षक यांच्यासह ४५० पोलिस कर्मचारी, एसआरपीच्या तीन कंपन्या मिळून ७५० कर्मचारी बंदोबस्तासाठी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

0
0

गळती काढण्यास सुरुवात, टँकरच्या ४५ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची गळती काढण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली. गळतीमुळे सोमवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाला. तर अनेकठिकाणी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. पाणी न आलेल्या भागात महापालिका टँकरच्या ४५ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. मंगळवारपर्यंत दुरुस्तीपर्यंत काम सुरू राहणार आहे.

बालिंगा पंपिंग हाऊस व पाटणकर हायस्कूल येथील अनुक्रमे ६०० व ४०० मी. मी. व्यासाच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. दोन्ही मुख्य जलवाहिन्या असल्यामुळे ए, सी, डी व ई वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. पाटणकर हायस्कूल येथील गळतीच्या कामाला सकाळपासून सुरुवात झाली. जेसीबी मशिनद्वारे खोदाई करुन संपूर्ण जलवाहिनीला वेल्डिंग करण्यात आले. दिवसभर दहा कर्मचारी गळती दूर करण्याचे काम करत होते. येथील ५० टक्के काम पूर्ण झाले.

तर बालिंगा पंपिंग हाऊस येथील ४० टक्के दुरुस्ती पूर्ण झाली. येथील जलवाहिनीवर व्हॉल्व बसवण्यात येणार असल्याने कामाला वेळ लागत आहे. तरीही मंगळवारी सायंकाळपर्यंत गळतीचे काम पूर्ण करण्याचा निर्धार शहर पाणीपुरवठा विभागाने केला आहे. दरम्यान, दुरुस्तीकामामुळे शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद ठेवला. पाणीपुरवठा न झालेल्या भागात कळंबा व कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. कळंबा येथून २२ तर कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून टँकरच्या ४५ फेऱ्या झाला. त्यामुळे टँकरभोवती नागरिकांच्या गर्दी होत होती. तर अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सोमवारी अनेक प्रभागाना भेट देऊन पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचे स्मरणपत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, यासाठी तत्काळ सभा घेण्यासंबंधी विनंती करणारे स्मरणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती नरेंद्र पाटील यांना पाठवले आहे. कोल्हापुरात खंडपीठ कृती समितीच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्मरणपत्र दिल्याचे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बार असोसिएशनला दिले. त्यामुळे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

खंडपीठासाठी याआधी सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मुख्य न्यायमूर्तींना १७ जुलै २०१५ आणि २८ फेब्रुवारी २०१८ रोजी पत्र पाठवले आहे. त्याचे स्मरण या पत्रात दिले आहे.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात खंडपीठ स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यासाठी राज्य विधी मंडळात सातत्याने मुद्दा उपस्थित केला जात होता. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, बार असोसिएशनकडून पाठपुरावा होत आहे. या सर्व कारणांचा विचार करुन यासंदर्भात तत्काळ सभा घेऊन जलद गतीने खंडपीठाचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी १९ जानेवारीला मुख्य न्यायमूर्तींना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

हे पत्र पालकमंत्र्यांनी सोमवारी जिल्हा बार असोसिएशनला दिले. त्यानंतर बार असोसिएशन आणि सर्वपक्षीय कृती समितीने तातडीने बैठक घेऊन माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राने खंडपीठ स्थापनेची ५० टक्के लढाई जिंकल्याची प्रतिक्रिया खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा बार सओसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिली. ते म्हणाले, 'सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार आणि लोकप्रतिनिधींनी आंदोलनाद्वारे आवाज उठवला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्मरणपत्र पाठवले. यापुढे मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊन बैठक घेण्यासाठी वेळ घेणार आहोत.'

यावेळी महापौर सरिता मोरे यांनी खंडपीठ स्थापन होईपर्यंत लढा सुरु राहील, असे स्पष्ट केले. महापालिकेकडून जागा हस्तातंरासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उपमहापौर भूपाल शेटे यांनी दिले.

अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, 'या आधीच्या मुख्यमंत्र्यांनीही हायकोर्टाला पत्र दिले आहे. मात्र पत्र देऊन जबाबदारी संपते, असे म्हणता येणार नाही. पत्र देऊनही यंत्रणा गतिमान होत नसल्याचा अनुभव लक्षात घेऊन मुख्यमंत्रंनी खंडपीठासाठी पाठपुरावा करावा.'

कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. विवेक घाटगे यांनी तर आभार अॅड. प्रशांत मोरे यांनी मानले. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंदराव जाधव, सचिव सुशांत गुडाळकर, सदस्य स्वाती तानवडे, दीपाली पोवार, सुजय मुळे, ओंकार देशपांडे, जयदीप कदम, युवराज शेळके, अमोल नाईक, अभिषेक देवरे आदी उपस्थित होते.

.. .. ..

पत्राबाबत संदिग्धता

.. .. ..

कोल्हापूरलाच खंडपीठ स्थापन करावे, असा थेट उल्लेख असलेले पत्र न देता मुख्यमंत्र्यांनी १९ जुलै २०१५ आणि २८ फेब्रुवारी २०१८ च्या पत्राकडे लक्ष वेधतो, असा उल्लेख केला आहे. २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ ठराव न करता सर्किट बेंच स्थापनेबाबत वैयक्तिक पत्र पाठवले होते. २०१८ मध्ये विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्राद्वारे मंत्रिमंडळाचा ठराव पाठवला. कोल्हापुरात हायकोर्टाचे सर्किट बेंच व्हावे तसेच पुण्याचाही विचार व्हावा, असा उल्लेखही यात होता. खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे असा मंत्रिमंडळाचा वेगळा ठराव करुन तो मुख्य न्यायमूर्तींना पाठवला असता तर सर्किट बेंचच्या मागणीला फाटे फुटले नसते, असे मतही वकील, पक्षकारांतून व्यक्त होत आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भक्तिसेवे’च्या विद्यार्थ्यांची मायेची ऊब

0
0

लोगो : आम्ही झालो पालक

फोटो आहे.

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, जुन्या आठवणींत रमावे आणि मैत्रीचे बंध घट्ट करून पुन्हा भेटण्याचे आश्वासन घ्यावे असे काहींसे माजी विद्यार्थी मेळाव्याचे स्वरुप असते. यातून रचनात्मक व सामाजिक कार्याची मुहूर्त मेढ रोवली जात आहे. अशीच सुरुवात भवानी मंडप येथील भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूलच्या १९९१ च्या माजी विद्यार्थ्यांनी केली आहे. अंध मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च करण्याबरोबर फिरस्त्यांना ब्लँकेट वाटप करुन मायेची ऊबही देत आहेत.

दीक्षित गुरुजींनी भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूलची स्थापना केली. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या हायस्कूलमधून अनेक विद्यार्थी घडले. विशेषत: प्रशासकीय क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अत्यंत नावजलेल्या हायस्कूलशी अनेक विद्यार्थ्यांनी आपले ऋणानुबंध कायम ठेवले आहे. दरवर्षी हायस्कूलमध्ये साजऱ्या होणाऱ्या केळवकर दिनानिमित्त अनेक आजी-माजी विद्यार्थी हजेरी लावतात,आणि पुन्हा एकदा हायस्कूलची प्रार्थना आणि राष्ट्रगीतासाठी रांगेत उभा राहतात. चार वर्षापूर्वी असेच जुने सवंगडी जमा झाले आणि काहीतरी सामजिक कार्य करण्याचा ध्यास घेतला. पण एक-दोन वर्षे केवळ सवंगडी जमावण्यातच वेळ गेला. गतवर्षी मात्र त्यांच्या कार्याला मूर्त स्वरुप प्राप्त झाले.

अंध हुशार मुलांना केवळ आर्थिक स्थिती हालाकीची असल्यामुळे शिक्षणाापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी त्यांनी तीन मुलांना सर्व शैक्षणिक खर्चाबरोबरच निवास व भोजनाची व्यवस्था केली. तर रस्त्यावर थंडीने कुडकुडणाऱ्या सुमारे ५० फिरस्त्यांना ब्लँकेट वाटप करुन मायेची ऊबही दिली. तर शिये येथील 'करुणालय' संस्थेला भेट म्हणून पाच हजाराचा धनादेशही दिला. शिवाजी विद्यापीठातील संगीतशास्त्र विभागातील मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्चाला हातभार लावला.

आपआपल्या क्षेत्रात सर्वच जण यशाच्या शिखरावर असल्याने आपल्यासह मुलांचाही वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जात होता. पण अशा उपक्रमासाठी मदत करण्यासाठी वाढदिवसावर होणार खर्च टाळून निधी उभा करण्यात आला. त्यासाठी बँकेत स्वतंत्र खातेही उघडण्यात आले. एक ते दोन महिन्यात या माजी विद्यार्थ्यांची हमखास सभा भरते. आणि सभेतून पुढील सामाजिक कामाची दिशा ठरवली जाते.

माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमात डॉ. असीफ सौदागर, करवीरचे पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप टिपुगडे, सांगलीच्या नगरसेविका स्वती बेळवलकर, विशाल माणगावे, आरिफ मणेर, सुधीर कोटावळे, राहुल मगदूम, चंद्रकांत नासिपुडे, संगीता साडविलकर, शुंभागी भोसले आदींचा नेहमी सहभाग असतो. माजी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष अॅड. धनंजय पठाडे व मुख्याध्यापक भीमराव कुंभार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

मुलांना मिळणार गोड भेट

भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूलच्यावतीने दरवर्षी १९ जानेवारी डॉ. केळवकर दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून या माजी विद्यार्थ्यांनी अंध मुलांचा आर्थिक खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरच सर्व विद्यार्थ्यांच्या बैठकीचे नियोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भालकर यांचे स्मारक उभारण्याची मागणु

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकरांचे रंकाळा पदपथ उद्यान येथे स्मारक उभा करावे,' अशी मागणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने महापालिका प्रशासन व महापौर सरिता मोरे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी शालिनी सिनेटोनच्या जागेत टाकण्यात येत असलेल्या मुरुमाबाबत प्रशासनाकडे शिष्टमंडळाने विचारणा केली. मोरे यांनी सिनेटोनच्या जागेची सोमवारी (ता. २८) संयुक्त पाहणी करण्याचे आदेश दिले.

ज्येष्ठ दिग्दर्शक भालकर यांचे नुकतेच निधन झाले. भालकर यांनी चित्रपटसृष्टी आणि रंकाळा विकासासाठी विशेष योगदान दिले. त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी स्मारक उभारणी करण्याची आवश्यकता आहे. रंकळा पदपथ उद्यान येथील व्यासपीठाची जागा उत्कृष्ट असल्याचे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले. तसेच शालिनी सिनेटोनच्या जागेवर मुरुम टाकत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी महापौर मोरे यांनी भालकरांच्या स्मारकांसाठी सभेत ठराव करण्याची आवश्यकता व्यक्त करत सिनेटोनच्या जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालिनी सिनेटोनप्रश्नी सरकारला अहवाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालिनी सिनेटोनच्या जागेवर विकसकाला बांधकाम परवानगी देणाऱ्या नगरविकास राज्यमंत्री यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. स्थगिती देताना नगरविकास विभगाने मागविलेल्या अभिप्रायावर महापालिकेने आपला अहवाल सादर केला. सिनेटोनची जागा ऐतिहासिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव कायम ठेवावा, अशी मागणी अहवालात प्रशासनाने केली आहे.

शालिनी सिनेटोनच्या जागेचा ऐतिहासिक वारसास्थळात समावेश करावा असा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठवला होता. याबाबतचा निर्णय प्रलंबित असताना नगरविकास राज्यमंत्री रणजितसिंह पाटील यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये सिनेटोनच्या आरक्षित जागेवर विकसकाला बांधकाम परवानगी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी करून त्याबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेशही दिले होते. राज्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे शहरात विशेषत: चित्रपट व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्याविरोधात आंदोलनाची घोषणा केली. मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विकसकाला परवानगी देण्याच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा या मागणीचे निवेदन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही चित्रपट महामंडळाने निवेदन दिले होते. पवार यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ डिसेंबर रोजी राज्यमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याची घोषणा केली. तसेच नगरविकास विभागाने महापालिकेला अभिप्राय देण्याची सूचना केली होती.

'कोल्हापूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील मौजे करवीर येथील रिसनं ११०४ जागेच्या मंजूर रेखांकनातील भूखंड क्रमांक ५ व ६ या जागेवरील विकास परवानगी महानगरपालिकेने ३१ जून २०१७ रोजी नाकारल्याने संबंधित जमीन मालकाने ६ जून २०१७ला महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६चे कलम-४७ अन्वये नगरविकास राज्यमंत्र्यांकडे जागा विकसित करण्याची परवानगी मागितली होती. मागणीनंतर राज्यमंत्र्यांनी जागा विकसित करण्यास परवानगी दिली. नगरविकास विभागाने या निर्णयाला स्थगिती देताना मागवलेल्या अभिप्रायानुसार अहवाल सादर केला. अहवालात शालिनी सिनेटोनचा ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये समावेश करावा असे नमूद केले आहे,' अशी माहिती उपशहर रचनाकार एन. एस. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सांगेल तिथून लढणारसुभाष देशमुख यांची माहिती

0
0

भाजप सांगेल तिथून लढणार

सुभाष देशमुख यांची माहिती

सोलापूर :

'आता भारतीय जनता पार्टी जिथे सांगेल तिथे आपण लढणार आहोत. मी मागणार नाही, नाही म्हणणार नाही. मात्र, लढ म्हणतील तेथून लढणार,' असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीर केले आहे. एक प्रकारे त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. मार्डी येथील हुरडा पार्टीनंतर माध्यमाच्या प्रतिनिधींशी देशमुख बोलत होते.

देशमुख म्हणाले, 'मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. १९९८ साली राजकारणात आलो आहे. १९९८साली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला उभारलो. त्या नंतर पुन्हा सोलापूर लोकसभेला भाजपने संधी दिली. सोलापूर लोकसभेला उभारलो. तो मतदारसंघ राखीव झाला. त्या नंतर २००९साली माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविली आणि दणदणीत पराभव पत्करावा लागला. तेथून परत तुळजापूरला आलो तेथेही पराभव झाला. २०१४ला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विजयी झालो. आता पक्ष सांगेल तिथून लढणार आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी क्लस्टर केले आहे. सोलापूर लोकसभेचे प्रभारी खासदार अमर साबळे आहेत तर माढा लोकसभा मतदार संघाचे प्रभारी अविनाश कोळी आहेत. प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रवास केला आहे आणि आजही करतोय. माढा लोकसभा मतदारसंघात क्लस्टर प्रमुख म्हणून माझी जबाबदारी मी पार पडत आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचेच खासदार असतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यात ५५९ कोटींची एफआरपी थकीत

0
0

साताऱ्यात ५५९ कोटींची एफआरपी थकीत

सातारा

राज्यात गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही उसाचे पूर्ण पैसे जमा झाले नाहीत. साताऱ्यातील एकाही कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्रात आज घडीला कारखानदारांकडे शेतकऱ्यांची तब्बल ४११४ कोटी रुपये देणी आहेत. फक्त सातारा जिल्ह्यात अजून सुमारे ५५९ कोटी २३ लाख ४३ हजार रुपयांची एफआरपी थकीत आहे. सातारा जिल्ह्यात १४ कारखान्यांकडून ३४ लाख ८ हजार ८७३ टन उसाचे गाळप झाले आहे. या गाळपाचे एकूण ९५४ कोटी ४८ लाख ४४ हजार रुपये बिल होत असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर ३९५ कोटी २५ लाख १ हजार रुपये पडले आहे. तर अजूनही ५५९ कोटी २३ लाख ४३ हजार रुपये अजूनही कारखानदारांनी दिलेली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघ अपहारप्रकरणी तिघांवर फौजदारी कारवाई?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी संघाच्या शिरोळ शाखेतील ३७ लाखांच्या अपहारप्रकरणी प्रमुख संशयित शाखाधिकारी अमर गुरव, निरीक्षक शहाजी जाधव, प्रकाश काळे यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ, तपासणी प्रमुख दीपक देसाई यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात येणार आहे.

अपहारप्रकरणी ऑडिटर सी. जी. चौगुले यांच्याकडून शिरोळ शाखेतील व्यवहाराची फेरतपासणी करण्यात येत आहे. गेले तीन दिवस अपहारासंबधीची कागदपत्रे तयार करुन पुरावे जमा केले आहेत. मंगळवारी (ता.२२) चौगुले यांच्याकडून फेर तपासणीचे काम पूर्ण होणार असून अपहाराचा अहवाल पूर्ण होणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नवीन सहकारी कायद्यानुसार जिल्हा निबंधकांची परवानगी घेऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहे. प्रथमदर्शनी अपहारप्रकरणी गुरव, जाधव, काळे दोषी आढळल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

अपहारातील मुख्य संशयित गुरव याने मिश्र खत तसेच साबणासह अन्य पदार्थांची परस्पर विक्री करुन ३७ लाख ७२ हजार २७२ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी संशयित शाखाधिकारी गुरव, तपासणी प्रमुख देसाई, निरीक्षक जाधव आणि काळे, मुख्य व्यवस्थापक निर्मळ यांना यापूर्वीच प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तुमच्या गमजा फार काळ चालणार नाहीत’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतीय जनता पक्षाचे सरकार हे फसवे आहे. एफआरपीप्रश्नी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक कायम राहिल्यास सरकारसह साखर कारखानदारांनाही सोडणार नाही. तुमच्या गमजा फार दिवस चालणार नाहीत' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दिला. बूथप्रमुखांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात एफआरपी थकीत नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरही शेट्टी यांनी हल्ला चढविला. 'मोदी हे एक नंबरचे थापाडे आहेत. त्यांचे मंत्री किती थापा मारतील याचा अंदाज करा. या राज्यकर्त्यांना आम्ही सोडणार नाही' असा दम त्यांनी दिला.

कोल्हापुरातील वीज दर आंदोलनप्रसंगी खासदार शेट्टी यांनी कारखानदारांच्या उपस्थितीतच संबंधितांना ठणकावले. शेट्टी म्हणाले, 'सरकार प्रत्येकवेळी बैठका, चर्चेचा फार्स निर्माण करते. शेतकरी हिताचा निर्णय घेत नाही. सध्या साखर कारखानदारांकडे हजारो कोटी रुपयांची एफआरपीची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून कसलीही तरतूद होत नाही. मात्र, पंतप्रधान खोटी आकडेवारी सांगून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. शेतकरी खत, युरिया, बियाणे चोरी करून आणत नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. एकरकमी एफआरपीचा अभाव आहे. शेतकऱ्यांचा संयम सुटत आहे. सरकारच्या यंत्रणाही नागरिकांना लुबाडत आहेत. भीक नको, पण कुत्रे आवर अशी त्यांची स्थिती बनली आहे. शेतकऱ्यांना अडवणुकीचे धोरण कायम राहिले तर अद्दल घडवली जाईल. त्यासाठी सरकारने माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करावेत. यापूर्वी दरोडा, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात हस्तक्षेप असे वेगवेगळे ४५ गुन्हे दाखल झाले आहेत. शेतकरी हितासाठी मी त्या गुन्ह्यांना घाबरत नाही. साखर कारखानदारांनी शेतकरी हितासाठी आमच्यासोबत यावे, अन्यथा त्यांनाही सोडणार नाही.'

जागा हडपण्यासाठी खटाटोप

'वीजबिलांची दुरुस्ती नाही, वाढीव वीजवापर दाखवायचा, २५ हजार कोटी रुपयांची थकबाकी दाखवायची आणि सबसिडी उचलण्याचा उद्योग महावितरणकडून सुरू आहे. हिशेब करायचा नाही आणि पोकळ थकबाकी दाखवायची हे चालणार नाही. सरकारचा एमएसईबीच्या मालकीच्या रिकाम्या जागा अंबानी आणि अदानी यांच्या घशात घालण्याचा खटाटोप सुरू आहे' असा आरोप खासदार शेट्टी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत अश्विनी बिद्रेंची वर्ध्याला बदली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असूनही त्यांची ठाणे येथून वर्ध्याला बदली झाल्याचा आदेश पोलिस प्रशासनाने काढला. विशेष म्हणजे बिद्रे हजर नसतानाही त्यांना ठाण्यातून कार्यमुक्त करून त्यांची कागदपत्रे वर्ध्याला पाठवण्यात आली. संशयित अभय कुरुंदकर याला वाचवण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संगनमताने बदलीचा आदेश काढल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अश्विनी बिद्रे या ठाणे ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जुलै २०१६ पासून बेपत्ता झाल्या. याबाबत बिद्रे कुटुंबीयांनी ठाणे येथे अपहरणाचा गुन्हाही दाखल केला. जानेवारी २०१७ मध्ये बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून संशयित पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याची चौकशी करण्याची विनंती केली. ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी १७ जानेवारी २०१७ मध्ये कुरुंदकर याच्या चौकशीसाठी समिती नेमली. ३१ जानेवारी २०१७ मध्ये कुरुंदकर याच्यावर अश्विनी बिद्रे यांचे अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.

या सर्व घडामोडींनंतर नागरी हक्क संरक्षणचे विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खलिद यांनी ३१ एप्रिल २०१७ रोजी अश्विनी बिद्रे यांची ठाण्याहून वर्धा येथे बदली केल्याचा आदेश काढला. प्रसार माध्यमांसह पोलिस दलातही बिद्रे यांचे अपहरण आणि खून प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असतानाही बिद्रे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. यापुढे जाऊन ५ जून २०१७ रोजी बिद्रे यांना ठाणे येथून कार्यमुक्तही करण्यात आले. त्यांचे सेवापुस्तक व अनुषंगिक सर्व कागदपत्रे वर्धा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवल्याचा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे. प्रत्यक्षात उपस्थित नसताना अश्विनी बिद्रे यांची बदली करून कार्यमुक्त केलेच कसे, असा सवाल बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.



बेपत्ता अधिकाऱ्याची बदली, संशयितास पुरस्कार
अश्विनी बिद्रे बेपत्ता असूनही वरिष्ठांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढला. त्यांना कार्यमुक्त करून कागदपत्रही बदलीच्या ठिकाणी पाठवली. याउलट संशयित अभय कुरुंदकर याच्याविरोधात जानेवारी २०१७ मध्ये तक्रार दाखल झाली. त्याच्या शिस्तभंगाची चौकशी करण्यासाठी समितीही नेमली. यानंतर २५ जानेवारी २०१७ रोजी त्याला राष्ट्रपती पदक जाहीर झाले. या अजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

'अश्विनीच्या बदलीचे एकही पत्र आम्हाला मिळाले नाही. जाणीवपूर्वक पोलिसांनी ही माहिती आमच्यापासून दडवून ठेवली. मुलीच्या नावाची वारस नोंद करताना माहिती अधिकारात घेतलेल्या कागदपत्रांवरून हा गंभीर प्रकार उघडकीस आला. यावरून वरिष्ठांकडून संशयितास मदत होत असल्याचे स्पष्ट होते. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसह पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली आहे.'
-राजू गोरे, बिद्रे यांचे पती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरावर झेंडा, दारावर फलक, भिंतीवर कमळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कार्यकर्त्याच्या घरावर पक्षाचा झेंडा, दारावर पक्षाचा फलक आणि भिंतीवर कमळ चिन्ह दिसले पाहिजे, मतदारांना सतत कमळ दिसेल अशी व्यवस्था करा, असा आदेश देत भारतीय जनता पक्षाने राज्यभर वातावरण निर्मिती सुरू केली आहे. बूथ मंडल अध्यक्षांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपर्क मोहीम सुरू केल्याने लोकसभेसाठी पक्षाची जोरदार तयारी सुरू झाल्याचे जाणवत आहे.

येत्या मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात एप्रिलमध्ये मतदान प्रक्रिया होणार हे जवळपास निश्चित आहे. यामुळे सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेसह सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे. यामध्ये सध्या भाजपने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यात पक्षाची हवा निर्माण करण्याचा उद्देश आहे. मतदारांना सतत डोळ्यासमोर कमळ दिसायला हवे, असे नियोजन करण्यात आले आहे.

भाजप कार्यकर्त्याला घरावर पक्षाचा झेंडा आणि दारावर पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असलेला फलक लावण्याची सक्ती केली आहे. विधानसभा मतदार संघात कमीत कमी पाच हजार ठिकाणी कमळ चिन्ह दिसेल, अशी व्यवस्था करावी, असे आदेश दिल्याने सध्या बहुतांशी सार्वजनिक भिंतींवर हे चिन्ह दिसत आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पक्षाच्या कामाची माहिती द्यावी, हे सांगतानाच प्रत्येक मंडल व बूथ प्रमुखाला तेवीस कामे दिली आहेत. या कामाचा वरिष्ठ पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी हेही प्रत्येक लोकसभा मतदार संघातील बूथप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रत्येक मतदार संघात बैठका सुरू आहेत. प्रवक्ते केशव उपाध्ये राफेल व्यवहार किती पारदर्शी आहे, ते सांगत आहेत.

काँग्रेस शिवसेनाही सक्रिय
भाजपने अशी जोरदार तयारी सुरू केली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्षही सक्रीय झाले आहेत. राष्ट्रवादीने परिवर्तन यात्रेच्या तर काँग्रेसने प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या वतीने मंत्री दिवाकर रावते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. लोकसभा निवडणुकांचे वातावरण यानिमित्ताने तापू लागल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images