Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोनेलुटीचे ‘चोर-पोलिस’

$
0
0
पोलिस असल्याचे भासवून दोन-चार तरुणांच्या टोळक्याने शहरात सोमवारी तीन ज्येष्ठ महिलांचे दागिने लंपास केले. एका पोलिस अधिकाऱ्याच्या आईने चोरट्यांना शिव्या हासडून पिटाळून लावले. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तातडीने शहराची नाकाबंदी केली.

सांडपाणी अधिभार रद्द करा

$
0
0
पाणीबिलापेक्षाही सांडपाणी अधिभाराची रक्कम मोठी असल्याने नगरसेवकांनी सोमवारी सभागृहात मोठा गोंधळ घालत अधिभार रद्द करण्याची जोरदार मागणी केली. त्यापध्दतीची बिले सादर केल्यानंतर ती दुरुस्त करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. यासाठी १५ दिवस तक्रार निवारण केंद्र उभे केले जाणार आहे.

विद्यापीठाचे ‘मिशन आयसीटी’

$
0
0
अध्यापन आणि अध्ययन ही केवळ क्लासरूम पुरतीच मर्यादित प्रक्रिया नाही. सध्याच्या काळात ही शैक्षणिक प्रक्रिया ‘२४ x ७’ सुरू असावे याकरिता शिवाजी विद्यापीठ इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा अवलंब करणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, असाइन्मेंट, प्रश्नसंच, प्रोजेक्टसंदर्भात ऑनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे.

आम आदमी पार्टीतर्फे समन्वय समिती

$
0
0
जिल्ह्यातील सर्वच १२ तालुके आणि प्रत्येकी १२ तालुक्यातील सर्वच राजकीय परिस्थितीचा अभ्यासपूर्ण आणि पारदर्शी ‍विश्लेषण करीत येणाऱ्या निवडणुकीत पक्ष संघटनेचे सर्वव्यापी धोरण ठरविण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर राजकीय, अभ्यासक समिती स्थापन करण्यात येणार आहे

‘वृद्धत्व सकारात्मक करा’

$
0
0
‘वृद्धत्व समाधानी, सकारात्मक करा’, असे मत प्राचार्य य. ना. कदम यांनी व्यक्त केले. पुणे येथील आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्र आणि राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने सारस्वत बोर्डिंग येथे दीर्घायु प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून वाचवले कासवाचे प्राण

$
0
0
कसबा बावड्यातील नदीच्या काठावर दोन भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या एका दुर्मिळ कासवाला जीवदान देण्याचे काम के. डी. हराळे या युवकाने केले. हराळे हे शेतात गेले असताना, दोन भटकी कुत्री कासवावर तूटून पडली होती.

दोन वर्षानंतर विजेत्यांच्या सत्कार

$
0
0
​शिवाजी विद्यापीठाने गेल्यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमांची खैरात केली. वर्षभरात विद्यार्थ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक स्पर्धांची व्यासपीठ ​निर्माण केले. यात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी अॅथलेटिक्स आणि क्रिकेट स्पर्धाही घेतल्या.

धर्मनिरपेक्ष विचारांचा अंमल हवा

$
0
0
‘देशातील राजकीय परिस्थिती धर्मनिरपेक्षाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वंच समाजातील धर्मनिरपेक्ष, राष्ट्रवादी जनतेने विचार करणे गरजेचे आहे’, असे मत परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते हुमायून मुरसल यांनी व्यक्त केले.

‘विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरांची गरज’

$
0
0
​‘विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा व राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरांची गरज आहे,’ असे प्रतिपादन सांगरुळ ​शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जयंत आसगावकर यांनी केले.

खराब रस्त्यांच्या निषेधार्थ सेनेचे शंखध्वनी आंदोलन

$
0
0
खराब रस्त्यांच्या निषेधार्थ शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमवारी ‘बोंब मारो’ आंदोलन केले. टेंबलाई मंदिर ते बीएसएनएल टॉवर या चौकापर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती करावी यासाठी सेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

प्रवासी तक्रारींचा उडाला फज्जा

$
0
0
एसटीच्या अभिनव उपक्रमांच्या दुसऱ्या दिवशी प्रवाशांच्या तक्रारींचा फज्जा उडाला. दुपारी तीन वाजताही कोल्हापूर आगारात प्रवाशांच्या माहितीसाठी फलकावर नोटीस लावण्याचे काम सुरु राहिले. प्रबोधनात कोल्हापूर आगारात दुसऱ्या दिवशीही मागे पडला.

एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवा

$
0
0
राज्यातील दीड हजार एसटी अधिकाऱ्यांवर खटले दाखल करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी बैठकीत दिला.

बाजार समिती संचालकांचे धाबे दणाणले

$
0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी भ्रष्टाचाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी १९८७ पासून कार्यरत असलेल्या सर्व आजी-माजी संचालकांसह सचिवांनाही चौकशीची नोटीस बजावली आहे.

पावनगडावरील मंदिरांच्या नावांचा शोध

$
0
0
पन्हाळ्याजवळील पावनगडासंदर्भात युवा संशोधक अमित आडसुळे यांनी कागदपत्रे शोधून काढल्याने पावनगडावरील मंदिरांची नावे, तुपाची विहीर, राजवाडा आणि दरवाजांची माहिती उजेडात आली आहे.

१०८ मेडिकल लायसेन्स सरंडर

$
0
0
पानपट्टीच्या दुकानासारखी मेडिकल दुकाने चालवणाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यातील १०८ दुकानांनी व्यवसाय बंद करत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाला रितसर कळवले आहे.

जयंत पवार यांना ‘श्रम गौरव’ पुरस्कार

$
0
0
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने दिला जाणारा कामगारमहर्षी गं. द. आंबेकर स्मृती श्रम गौरव पुरस्कारासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे (मुंबई) सहसंपादक जयंत पवार, महावितरणचे माजी जनसंपर्क अधिकारी हिंदुराव पाटील, शाहीर यशवंत पवार, भालचंद्र पाटील, जयंत कारंडे यांची निवड करण्यात आली आहे,

ग्रामीण भागातून ‘एमबीबीएस’ गायब

$
0
0
एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर ग्रामीण भागात किमान एक वर्ष नोकरी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना राज्याच्या विविध ठिकाणी नेमणुका देऊनही त्याठिकाणी हजर न होण्याचे डॉक्टरांचे प्रमाण ९९ टक्के आहे.

‘HCL’ने स्वतःच ठोकले टाळे

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत संगनकाद्वारे विविध प्रकारचे ३२२ दाखले देण्याचा ठेका घेतलेल्या बहुचर्चित एचसीएल इन्फोटेक कंपनीने आपले काम बंद केल्यानंतर मंगळवारपासून मॅन्युअलपद्धतीने दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. ठेकेदाराने काम थांविल्याने महापालिकेची महिन्याला सुमारे एक कोटी रुपयांची बचत होणार आहे.

लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक डौले रंगेहाथ

$
0
0
मुलीला बेपत्ता केल्याच्या प्रकरणात सहभाग असल्याचा गुन्हा दाखल करण्याची भिती घालून वीस हजार रुपयांची लाच घेताना सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील पोलिस उपनिरीक्षक सतीश डौले (वय २४) यांना मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले.

साता-यात कारखान्यांकडून पहिली उचल २००० रुपये

$
0
0
जिल्ह्यातील साखर कारखाने पहिली उचल २००० रुपये तर एकूण दर २२५० रुपये देण्यास तयार झाले आहेत. त्यासाठीही त्यांनी दोन टप्पे केले आहेत. यापैकी उर्वरित २५० रुपये केंद्र आणि राज्याची मदत आल्यानंतर देण्याचा निर्णय झाला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>