Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शेट्टींच्या आंदोलनाचा उपयोग काय?

$
0
0
सातारा जिल्ह्यात एकूण ऊसदर २२५० आणि पहिली उचल २००० रुपये देण्यात येणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा उपयोग काय?, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे.

हालेवाडी सरपंचांवरील अविश्वास ठराव बारगळला

$
0
0
हालेवाडी (ता. आजरा) येथील सरपंच शोभा जाधव यांच्यावरील अविश्वास ठराव गणसंख्याअभावी बारगळला. ठराव दाखल केलेले सदस्य किशोर येजरे अनुपस्थित राहिल्यामुळे ठराव संमत होऊ शकला नाही. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार उज्वला सोरटे होत्या.

उता-यात ‘हमीदवाडा’ प्रथम

$
0
0
गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये उताऱ्यात हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना अव्वल स्थानावर तर गाळप करण्यात हुपरीच्या पंचगंगा साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.

इचलकरंजीत २ चोरटे जेरबंद

$
0
0
बँकेत पैसे भरण्याची स्लीप भरून देण्याचा बहाणा करुन ३७ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दोघा परप्रांतीयांना पाठलाग करुन पकडण्यात यश आले.

भुदरगड पं. स. उपसभापतींचा राजीनामा

$
0
0
भुदरगड पंचायत समितीचे उपसभापती शिवाजी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा सभापती वैशाली घोरपडे यांच्यकडे सादर केला. पक्षाच्या आदेशानुसार आपण राजीनामा दिल्याचे देसाई यांनी सांगितले.

‘रेणुका’वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार

$
0
0
येथील रेणुका शुगर्सने बिले थकविल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी जयकुमार कोले होते.

राजकारण झेडपीचे... पडसाद महापालिकेत!

$
0
0
जिल्हा परिषद अध्यक्षासह इतर पदाधिकारी निवडीत काँग्रेस नेत्यांमध्येच कुरघोडीचे राजकारण झाले. त्याचा फटका त्यांच्या वारसदार व समर्थकांना बसला. तोच राग नेत्यांनी महापालिकेत स्थायी समिती निवडणुकीत काढला.

‘मोक्का’ लावलेल्या आठजणांना कोठडी

$
0
0
‘मोक्का’ लावलेल्या दहा आरोपींपैकी आठजणांना न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. करवीर डीवायएसपी विठ्ठल पवार यांनी कळंबा कारागृहातून सोमवारी ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील पिस्तूल तस्कर मनीष नागोरी पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.

वृद्धांना लुटणा-या तोतया पोलिसांची रेखाचित्रे प्रसिद्ध

$
0
0
पोलिस असल्याचे भासवून वृद्ध महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या दोघा संशयितांची शाहूपुरी पोलिसांनी रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. सोमवारी चोरट्यांनी दोन वृध्दांचे १६ तोळे दागिने लंपास केले होते.

प्रवाशाला लुटणा-या रिक्षाचालकासह तिघे अटकेत

$
0
0
प्रवाशाला मारहाण करून एक हजार रुपये व मोबाइल लुटणाऱ्या रिक्षाचालकासह तिघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजता बापट कॅम्प येथे घडली. याबाबत गजानन जगन्नाथ काळे (रा. दरेगाव, सिंधखेड राजा, बुलडाणा) यांनी फिर्याद दिली.

ई-मीटर तक्रारीसंबंधी टोल फ्री क्रमांक सुरू

$
0
0
तीन आसनी ऑटो रिक्षाचालकांच्या ई-मीटरसह अन्य तक्रारासाठी टोल फ्री क्रमांकाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार असून तक्रारीचे निरसनही तत्काळ केले जाणार असल्याची माहिती आरटीओ लक्ष्मण दराडे यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्समधून रिक्षाचालकांची हेराफेरी वृत्तमालिकेच्या माध्यमातून उघड केली होती.

प्राध्यापकांनी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करावे

$
0
0
‘सध्याच्या आधुनिक युगात प्राध्यापकांनी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा अध्यापनात वापर करावा, जेणेकरून स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकाव धरतील. वैचारिक देवाणघेवाणीतून नवीन गोष्टी शिकता येतात,’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी केले.

जिल्हा परिषदेची सभा वादळी होण्याची शक्यता

$
0
0
माहिती तंत्रज्ञानाची विषयाची फी चारपट वाढविणे आणि आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या पाठांऐवजी शिक्षक पुरस्कारासाठी १ लाखाची तरतूद वर्ग करणे आदी विषयांवर जिल्हा परिषदेची बुधवारची सभा वादळी होण्याची शक्यता आहे.

फिल्म फेस्टिव्हलचा पडदा उद्या उघडणार

$
0
0
‘अनुभवा सिनेमाचे जग आणि जगातील सिनेमा’ असे ब्रीदवाक्य असलेल्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. २६ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात विविध भाषांतील ३६​ चित्रपटांसह १० लघुपट व माहितीपट पाहण्याची पर्वणी मिळणार असल्याची माहिती दिलीप बापट व चंद्रकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ई-वखार पावतीवर शेतक-यांना कर्जाची सोय

$
0
0
‘राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये शेतमाल ठेवलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी राज्य वखार महामंडळाच्यावतीने कोल्हापूर विभागात शेतमाल तारण व ई-वखार पावती योजनेंतर्गत ई-वखार पावतीवर शेतकऱ्यांना कर्जाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे,’ अशी माहिती कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक डॉ. एन. टी. शिसोदे यांनी दिली.

जिल्हाधिका-यांविरोधात हरित लवादाचे वॉरंट

$
0
0
चंदगडच्या ‘एव्हीएच’ प्रकल्पासंदर्भातील सुनावणीस गैरहजर राहिल्याबद्दल जिल्हाधिकारी राजाराम माने, एमआयडीसी व केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाविरोधात वीस हजार रुपये दंडाचे जामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादाचे न्यायाधीश व्ही. आर. किंगावकर यांनी दिला.

समर्थक असल्याने माझा पत्ता कापला

$
0
0
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका करत काँग्रेसचे नगरसेवक रणजित परमार यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याकडे दिला.

धनाजी गुरव यांना पुरस्कार

$
0
0
श्रमिक-कष्टकरी चळवळीतील कार्यकर्ते धनाजी गुरव यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘असंघटित कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रोख पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रयत शिक्षण संस्थेला सामाजिक कार्य विभागातील पुरस्कार जाहीर झाला.

‘दौलत’ दोन दिवसांत सुरू

$
0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील गेले दोन हंगाम बंद असलेला दौलत कारखाना येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या खुल्या निविदा प्रक्रियेत कोल्हापूरच्या केशव शुगर्स या कंपनीने १७० कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्यानंतर हा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला.

जलसमाधी घेणाऱ्यांना रोखले

$
0
0
दलित समाजातील विस्थापितांच्या जागेवर अतिक्रमण झाल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांचा सामूहिक जलसमाधी घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी मंगळवारी रोखला. यावेळी आंदोलकांना ताब्यात घेऊन सायंकाळी त्यांची सुटका केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images