Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नववर्षाच्या स्वागताला महाबेश्वर फुल्ल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरात पर्यटकांची गर्दी झाली आहे. गेले चार दिवस महाबळेश्वर परिसरात थंडीचा कडाका वाढला असला तरी पर्यटकांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झालेला नाही. सोमवारी सकाळी वेण्णा लेक येथील धक्क्याच्या परिसरात हिमकण गोठल्यामुळे हिमाचे आच्छादन तयार झाले होते.

या ठिकाणी हिमकण पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. महाबळेश्वरचे तापमान अधिकृत तापमान १० .५ अंश इतके नोंदवले गेले आहे. मागील चार दिवस ९.६ अंश, १०.२ अंश, १०.९ अंश अशी नोंद होती. सध्या बाजारपेठेत आणि विविध पॉइंटवर स्थल दर्शनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह सध्या अविनाश भोसले यांच्या फोर ओक्स बंगल्यात नववर्ष स्वागतासाठी आलेले आहेत. बाजारपेठ विविध आकर्षक सजावट व विद्युत रोषणाईने सजला आहे. पुढील आठवड्यातही गर्दी कायम राहण्याचा अंदाज व्यावसायिक व्यक्त करत आहेत. हाडे गोठवणाऱ्या थंडीतही ज्यूस, आइस्क्रीम, कॉफीचा आस्वाद घेत बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत गर्दी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जात धुडकावत होतेय शुभमंगल,५ वर्षांत १२४६ विवाह

$
0
0


कोल्हापूर :


जिल्ह्यात गेल्या साडेपाच वर्षांत जातीच्या भिंती तोडून १२४६ जोडप्यांनी आतंरजातीय विवाह केल्याची नोंद समाजकल्याण विभागाकडे आहे. प्रत्यक्षात नोंद नसलेल्यांची संख्या यापेक्षाही अधिक आहे. दरवर्षी जात धुडकावून विवाहबंधनात अडकणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पुरोगामी जिल्ह्यात असे सकारात्मक चित्र निर्माण होत आहे.

गेल्या दशकभरात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींची संख्या लक्षणीय आहे. परिणामी मुलांप्रमाणे मुलींही कुटुंबाहेर राहून विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करीत आहेत. मुले-मुली आपल्या पसंतीनुसार जीवनसाथी निवडत आहेत. परिणामी एकेकाळची केवळ स्वजातीतील, कुळातील मुलगा-मुलीसोबत लग्न करण्याची प्रथा मागे पडत आहे. समाजात झपाट्याने बदल होत आहेत. प्रेमविवाहाला कुटुंब, समाजाकडूनही मान्यता मिळत आहे. त्यामुळे शहरासह खेड्यांतही आंतरजातीय प्रेमविवाहसुद्धा अरेंज मॅरेज करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. जात न पाहता एकमेकांच्या संमतीने लग्न होत आहेत.

मुलींची संख्या कमी असलेल्या समाजातील वधू-वरांच्या पालकांची मानसिकताही आतंरजातीय विवाहाकडे झुकते आहे. पोटजातीचा हट्ट सोडला जात आहे. त्यामुळे अरेंज मॅरेजही आतंरजातीय होताना दिसत आहेत. जातींमधील उतरंड कमी होण्यासाठी सरकार आंतरजातीय विवाह करणाऱ्या पात्र जोडप्यांना केंद्र, राज्य सरकारकडून एकूण ५० हजारांचे अनुदान देते. खुल्या प्रवर्गातील वधूने अनुसूचित, जमाती, भटक्या विमुक्त जातीमध्ये लग्न करणे किंवा आंतरप्रवर्गातील वधू, वरांनी लग्न केल्यास अनुदानासाठी अर्ज करता येते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे विहित नमुन्यातील भरलेला अर्ज, त्यासोबत विवाह नोंदणी आणि रहिवासी दाखला, दोन प्रतिष्ठीत व्यक्तींची शिफारस, लग्नपत्रिका, शंभर रुपयांवर प्रतिज्ञापत्र, आधार किंवा पॅनकार्ड देणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने आंतरजातीय विवाह करूनही अनेकजण याकडे पाठ फिरवतात. त्यामुळे लाभार्थी जोडप्यांची संख्या कागदावर कमी दिसते. प्रत्यक्षात जातींची बंधने तोडून लग्न करण्याकडे कल वाढला आहे. गेल्या साडेपाच वर्षातील लाभार्थी जोडप्यांच्या सरासरी संख्येवरूनही हे अधोरेखीत होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या मुलाखतींना इच्छुकांचा प्रतिसाद

$
0
0

भाजपच्या मुलाखतींना इच्छुकांचा प्रतिसाद

कराड :

मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. येत्या २७ जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे रणांगण चांगलेच तापू लागले आहे. भारतीय जनता पार्टीने सोमवारी मलकापूर नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष पदासह २० जागांसाठी ११९ जणांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या चौदा बैलांची सुटका

$
0
0

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या चौदा बैलांची सुटका

कराड :

कर्नाटकातील संकेश्वर येथील कत्तलखान्यात चौदा बैल घेऊन जाणारा ट्रक रविवारी, ३० रोजी उंब्रज येथे गोरक्षकांनी पकडला. त्यांनी ट्रकसह संबंधित बैल पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पोलिसांनी बैलांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. रविवारी उशीरा या बाबतची फिर्याद हिंदू एकता आंदोलनचे कराड उत्तरचे अध्यक्ष महेश जयवंत जाधव (रा. उंब्रज, ता. कराड) यांनी पोलिसांत दिली आहे.

गोरक्षणाचे काम करणारे शिवशंकर राजेंद्र स्वामी यांना रविवारी पुण्यावरून कोल्हापूरला जात असताना एका ट्रकमधून (एम. एच ११ बी. के २००२) काही बैलांची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. त्यांनी या बाबतची खातरजमा केल्यानंतर उंब्रज येथील महेश जाधव यांना फोन केला. जाधव यांनी आपल्या सहकार्यांसह संशयित ट्रक उंब्रजच्या तारळी पुलावर थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक चालकाने ट्रक थांबवला नाही. गोरक्षकांनी पाठलाग करून संबंधित ट्रक उंब्रज येथील बसस्थानकासमोर थांबवला. ट्रकमध्ये १४ बैल दाटीवाटीने भरण्यात आले होते. पोलिसांनी ट्रक चालक जुबेर इस्माईल बेपारी, तौसिक मुनिर कुरेशी (दोन्ही रा. सदरबझार, सातारा) व नाना किसन मोहिते (रा. नागठाणे, ता. जि. सातारा) यांना अटक केली आहे. या बाबत उंब्रज पोलिसांत महेश जयवंत जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

.......

.....

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कराड :

सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार बलात्कार-अत्याचार करणाऱ्या एका युवकाविरुद्ध पिडीत मुलीने रहिमतपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी त्वरीत पोक्सो अंतर्गत कारवाई करीत अजय बाळासाहेब नेटके या युवकाला अटक करून सातारा येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला एक जानेवारीअखेर पोलिस कोठडी ठोठावली.

पीडित मुलीच्या घराशेजारीच अजय बाळासाहेब नेटके हा युवक वास्तव्यास आहे. त्या मुळे दोघांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तो सतत भेटत असताना तिला लग्नाचे अमिष दाखवून तिचा गैरफायदा घेत असे. त्या युवकाने पीडित अल्पवयीन मुलीवर जून २०१६ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत सातारा व रहिमतपूर या परिसरात अनेक वेळा बलात्कार, अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच युवकाची आजी सीताबाई साठे यांनाही या प्रकरणाची संपूर्ण माहिती असतानाही तिने माझ्यावर वारंवार दबाव टाकून तसेच लग्नाचे आमिष दाखवून व भूलथापा देऊन माझी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

............

रिव्हॉलव्हरसह तिघांना अटक

मिरज :

मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाने ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचे कारवाई करताना शास्त्री चौक येथे मद्याधुंद अवस्थेत स्कॉर्पिओ चालवताना सुरेश आण्णाप्पा आवटी (वय ४५. रा. सौदी ता. अथणी जि. बेळगाव) याला ताब्यात घेउâन झडती घेतली. त्याच्याकडून देशी बनावटीचे बेकायदा रिव्हॉलव्हर जप्त केले. पथकाने वाहनातील अन्य दोघांसह स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरâणाई मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करूâन वाहन चालवितात. म्हणून मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेने ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह खाली कारवाईची मोहिम सुरुâ केली आहे. केए २५, एन ९७९१ या कर्नाटक क्रâमांकाची एक स्कॉर्पिओ भरधाव वेगाने शास्त्री चौकाच्या दिशेने येत होती. पथकाने गाडी अडवून वाहनधारकाची तपासणी केली असता, सुरेश अण्णाप्पा आवटी हा चालक मद्याधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याने कंबरेच्या मागच्या बाजूला रिव्हॉल्व्हर लावल्याचे आढळून आले. त्याने रिव्हॉल्व्हरबाबत पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी सुरेश आवटीसह वाहनातील सदाशिव मुरगाप्पा पदनामावर ( वय ४० रा. कटगिरी ता. अथणी) व सुभाष लक्ष्मण मन्न्नापगोळ (वय ३८ रा. तेलसंग ता. अथणी ) या दोघांना अटक केली.

.......

भावजयीने अनैतिक संबंध तोडल्याच्या रागातून पांडुरंगने रविवारी रात्री संजय सोनलकरला बरोबर घेऊन रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या भावाचे घर गाठले. घरी सुनीता एकटीच होती. दिराचा इरादा तिच्या लक्षात आल्याने तिने घराबाहेर धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सोनलकरने तिला पकडून घरात ढकलले आणि पांडुरंगने सुनीतावर चाकूने हल्ला केला. यामध्ये सुनीता यांचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतरच दोघेही हल्लेखोर पसार झाले. दरम्यानच्या काळात सुनीताचे पती बयाजी लोखंडे हे घरी आल्यानंतर खुनाची ही घटना उघडकीस आली. त्या नंतर बयाजी यांनी त्वरीत जत पोलिसांत धाव घेऊन पत्नीच्या खुनाची माहिती. पोलिसांनी संशयित पांडुरंग लोखंडे आणि संजय सोनलकर या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५० कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची टांगती तलवार

$
0
0

विद्यापीठाचा लोगो वापरावा...

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नियमांना फाटा देत पदनाम बदलून वेतनश्रेणी लागू करण्याच्या प्रकाराला जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस राज्य वेतन सुधारण समितीने केली आहे. समितीच्या या शिफारसीवर राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठातील ४५० कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठात सध्या पदनाम बदल व वेतनश्रेणीचा प्रश्न गाजत आहे. विद्यापीठातील अनेक कर्मचारी ते मंत्रालयातील काही अधिकारी, कर्मचारी यामध्ये सामील असण्याची शक्यता आहे.राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या मान्यतेशिवाय वेतनश्रेणीत बदल केल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. तर नियमबाह्यरित्या वेतनश्रेण्या लागू केल्यामुळे सरकारचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष राज्य वेतन सुधारणा समितीने काढला आहे.

राज्य वेतन सुधारणा समितीचे अध्यक्ष के.पी.बक्षी यांच्या नेतृत्वाखालील समितीने राज्य सरकारला यासंदर्भात शिफारसी केल्या आहेत. दुसरीकडे राज्य सरकारने यापूर्वीच संबंधित कर्मचाऱ्यांची पदनामे रद्द व वेतनश्रेणी वसूल करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती प्रत्येक विद्यापीठात जाऊन संबंधित पदनाम प्रकरणांची पडताळणी करणार आहे. विद्यापीठातील सुमारे ४५० कर्मचाऱ्यांनी पदनाम बदल करुन वेतनश्रेणी घेतल्याची चर्चा आहे.

सरकारच्या वेतनश्रेणी वसूल करण्याच्या निर्णयावर विद्यापीठ सेवक संघ कायदेशीर दाद मागण्याच्या विचारात आहे. दुसरीकडे वेतन सुधारणा समितीने वेतनश्रेणी प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली आहे. त्या कारवाईच्या कचाट्यात आपणही सापडू शकतो या भितीने कर्मचारी धास्तावले आहेत. यासंदर्भात विद्यापीठाकडे संपर्क साधल्यावर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अद्याप सरकारकडून कसल्याही स्वरुपाची माहिती मागवली नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’चा आज मोर्चा

$
0
0

कोल्हापूर

उसाला एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी आज, मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयावर निघणार आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा दुपारी दोन वाजता दसरा चौकातून निघेल. आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर, सहसंचालक कार्यालयावर मोर्चा धडकेल. मोर्चात कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ' स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी केले.

-------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवती भवती....

$
0
0

कार्यकारिणी जिल्ह्याची ना, मग ...

पक्षाची कार्यकारिणी, पदाधिकारी निवडी म्हटल्या की नेत्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना संधी असे जणू समीकरण बनले आहे. जवळच्या कार्यकर्त्यांची कुठे ना कुठे वर्णी लावली जाते. नुकतीच एका पक्षाच्या जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली. जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत कार्यकारिणी जाहीर केली. त्याचवेळी त्यांचा मोबाइल खणाणला. पलीकडून, एका ठराविक कार्यकर्त्याचा कार्यकारिणीत समावेश करा असे सुचवले. त्यावर अध्यक्षांनी 'ही शहराची नव्हे, जिल्ह्याची कार्यकारिणी आहे' असे उत्तर दिले. त्यावर नियमातील पळवाटा शोधत पलीकडून पर्याय सुचविला. 'कार्यकारिणी जिल्ह्याची आहे ना,तो कार्यकर्ता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील आहे. मग दक्षिणेत समाविष्ट असल्याने जिल्ह्याच्या कार्यकारिणीत समावेश करायला काहीच हरकत नाही,'असे सांगितले. त्यामुळे ऐनवेळी एका माजी नगरसेवकाचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश झाला. पण या माजी नगरसेवकाची नेमक्या कोणत्या गटातून वर्णी लागली, याची चर्चा मात्र चांगलीच रंगली.

आप्पासाहेब माळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्रिवेणी’त बहरली काव्य-गीतमैफल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

सायंकाळची हलकेच बोचणारी पण हिवाळी कपड्यांमुळे अधिकच उबदार बनलेली थंडी आणखीनच हवीहवीशी बनली ती नायगावकरांच्या मिश्किल संवादाने, म्हात्रेंच्या खुसखुशीत टिप्पणी आणि सुरेल काव्य सादरीकरणाने अनु दत्तप्रसाद जोग यांच्या तजेलदार गझल गायनाने. एकेक कविता, एकेक प्रसंग, काही चुटके आणि तितक्याच तोलामोलाच्या बहारदार सुत्रसंचलनाने बेहद्द खुशीच्या वातावरणात प्रत्येक जण फक्त 'व्वा, क्या बात है' अशीच दाद देत होता. केवळ काव्य रसिकच नव्हेत, तर गेल्या काही दिवसात संमेलन आयोजनाच्या तणावाने त्रासलेल्या कार्यकर्त्यांचीही मने उल्हसित झाली ती 'कवितांच्या गावा जावे' आणि 'प्रतिभासंगम' या गीत, काव्य आणि अभिवाचनपर कार्यक्रमामुळे.

काव्यवाचनाची चांगली परंपरा 'मराठी' प्रांतात आहे. अगदी 'रविकिरण मंडळ'पासून पुलंनी 'ट्रिपल इंजेक्शन' म्हणून संबोधलेल्या बापट, विंदा आणि पाडगावकर या त्रयींपर्यंतची ही परंपरा. पण आता अशोक नायगावकर आणि अरुण म्हात्रे सारखे कविगण ती समर्थपणे चालवीत आहेत. याचाच प्रत्यय उत्तूर (ता. आजरा) येथील 'कवितेच्या गावा जावे' आणि 'प्रतिभासंगम'मध्ये रंगून गेलेल्या मैफिलीमुळे. निमित्त होते 'त्रिवेणी' साहित्य संमेलन.

नायगावकर जीवनातील विसंगती नेमकेपणे टिपतात आणि आपल्या मिश्किल शैलीत ती मनात उतरवतात. तर म्हात्रे यांचा पिंड मनस्वी रोमँटिक. या जोडगोळीला साथ होती आश्वासक जोग या गझलकाराची. 'हळुवार म्हणजे कुणीतरी म्हणाले, हळू केलेला वार, असे हे सगळे विचित्र असते बाबा' अशा विनोदी शैलीत नायगावकर यांनी सादर केलेल्या 'शाकाहार' कवितेने जितके हसविले, त्यापेक्षा वर्तमान किती क्रूर आणि निर्दयी आहे, याचे भान जागविले. 'फोडणीला टाकलेला कडीपत्ता म्हणजे तडफडणारी फुलपाखरे, वस्त्र उतरवली जाणारी केळी, संत्री, मोसंबी, आणि कलिंगडाच्या पोटात दिवसाढवळ्या खुपसला जाणारा सुरा तोही पोलिसांदेखत….'अशा कित्येक प्रतिमानी जितके पोट धरून हसविले तितकेच आत्ममग्न केले.

'त्याच्या कृतार्थ डोळ्यात,

झुले उंच माझा झोका' या मालिका शिर्षकगीताच्या सुश्राव्य गायनाने रसिकांची मने झुलायचीच उरली. तर त्यांनीच सादर केलेल्या प्रदीप निफाडकर यांच्या 'माझी मुलगी' या कवितेने मैफल आणखीनच भरावला. या जोडीबरोबरच दत्तप्रसाद जोग या गोमंतकीय कवींच्या 'फ्रेश' गझलांनी मैफल रंग आणखीन खुलला. या मैफलीत अगदी आकस्मिकतेने सादर केलेल्या नारायण सुर्वे, विठ्ठल वाघ, पाडगांवकर, विंदा आदी प्रख्यात कवींच्या काव्यसादरीकरणाच्या नकलानी मैफलीला वेगळीच फोडणी मिळाली.

'प्रतिभासंगम'ने सांगता

गदिमा, पुल आणि सुधीर फडके या त्रयींच्या जन्मशताब्दी निमित्ताने 'प्रतिभासंगम'ने संमेलन सांगता झालंय. प्रा. श्रीकांत नाईक यांची संकल्पनेतील हा स्मृती जगविणारा कार्यक्रम कोल्हापूरच्या कलाकारांनी रंगविला आणि अवघ्या उत्तूरवासियांची मने जिंकली.

फोटो : सतीश डिजिटल्स, उत्तुर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सोशल मीडियाकडून पुस्तकाकडे वळा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल मीडियाच्या जाळ्यात नव्या पिढीबरोबरच माणूस गुंतला आहे. साहित्याचे मूल्य कमी होत आहे. त्यामुळे दिशा देणारी, संस्कृतीची शिकवण देणारी पुस्तके देऊन सोशल मीडियाच्या भुतापासून समाजाला वाचविणे गरजेचे आहे. साहित्यिकांनी ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे साहित्य लेखन करावे,' असे प्रतिपादन गणपतराव कणसे यांनी केले. शिरढोण (ता. शिरोळ) येथे श्री साहित्य परिषद बहुद्देशीय संस्था व जयसिंगपूरच्या कवितासागर साहित्य अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या संवाद ग्रामीण साहित्य संमेलनात ते बोलत होते. शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे प्रमुख उपस्थित होते.

कल्लेश्वर मंदिरातील दिवंगत भगवानराव घाटगे साहित्य नगरीत माधवराव घाटगे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनास प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांचे झांज पथक व शोभयात्रेने ग्रंथदिंडीची शान वाढली. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष गणपतराव कणसे यांनी केले. सुरेश कोरे, सदाशिव आंबी, वंदना कांबळे, वामन काळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्य परिषद संचालिका सुनंदा कुलकर्णी, विश्वास बालिघाटे यांनी साहित्य संमेलनाचा हेतू विषद केला. प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांचे व्याख्यान झाले. आमदार उल्हास पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक अनिल यादव यांनी मनोगत व्यक्त केले.

दुपारच्या सत्रात साहित्यिक व्यंकटेश जंबगी यांचे कथाकथन झाले. त्यांच्या संवेदनशील व विनोदी कथेने श्रोत्यांना खिळवून ठेवले. साहित्यिक किसनराव कुराडे उपस्थित होते. सायंकाळच्या सत्रात मनोहर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन पार पडले. संमेलनात माणिक नागावे, शिवाजी गायकवाड, सच्चीदानंद आवटी, मनीषा वराळे, मेघा उळगड्डे, संजय तकडे यांच्यासह नवोदित कवींनी कविता सादर केल्या. सरपंच बिलकीश मुजावर यांनी स्वागत केले. दिलीप कोळी यांनी प्रास्ताविक केले. दीपाली भोसले व डॉ. कुमार पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो

शिरढोण येथे ग्रंथदिंडीने पाचव्या संवाद ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरूवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून महिला ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

भावाच्या विवाह सोहळ्यासाठी नृसिंहवाडीकडे त्याच्याच मोपेडवरून जाताना ट्रॅक्टरने धडक दिल्याने महिला ठार झाली. शिरोळ- नृसिंहवाडी मार्गावरील तारा पेट्रोल पंपाजवळ दुपारी सव्वा वाजता ही दुर्घटना घडली. स्वाती लक्ष्मण पाटील (वय ३२, रा. नागाव कवठे, ता. तासगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातात त्यांचा भाऊ सचिन तानाजी पवार (रा. मणेराजुरी, ता.तासगाव) हा जखमी झाला.

याबाबत शिरोळ पोलिसांनी सांगितले की, सचिनच्या लग्नासाठी त्याच्याच अ‍ॅक्टीव्हा मोपेडवरून (एमएच १० सीपी १६४१) स्वाती पाटील या नृसिंहवाडीकडे जात होत्या. तारा पेट्रोल पंपाजवळ लघुशंकेसाठी मोपेड थांबवित असताना पाठीमागून येणार्‍या ट्रॅक्टरने धडक दिली. यावेळी स्वाती रस्त्याच्या उजव्या बाजूला पडल्या. उसाने भरलेल्या ट्रॉलीचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांनी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पलायन केले. अपघाताची वर्दी सचिन पवार यांनी शिरोळ पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला. शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ ला हायवेवर चक्काजाम

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कृषिपंपांच्या अन्यायी वीज दरवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास २१ जानेवारीला राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आला. राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन.डी.पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली. राज्यातील ४२ लाख कृषिपंपांशी निगडीत हा प्रश्न आहे. सरकारने गांभीर्याने दखल घेत कृषिपंप वीजदर सवलतीचा तत्काळ आदेश काढावा असेही पाटील यांनी राज्यकर्त्यांनी ठणकावले.

पंचगंगा नदी पुलावर २१ जानेवारीला सकाळी ११ वाजता आंदोलन होणार असून यामध्ये सर्वपक्षीय आमदार, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर चर्चा होवूनही वीजदर सवलतीचा निर्णय झाला नाही. अद्यापही पाणी पुरवठा संस्थांना वाढीव दरानेच वीज बिले येत आहेत. महावितरणकडून बिलांच्या वसुलीसाठी संस्थांना नोटीसा पाठवून वीज कनेक्शन तोडण्याची धमकी दिली जात आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी दिला.

खासदार राजू शेट्टी यांनी २१ जानेवारीच्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे सांगितले. मार्च ते सप्टेंबर या कालावधीत विविध पातळीवर राज्यकर्त्यांसोबत चर्चा झाल्या. शेतकऱ्यांच्या हिताच्या लढ्यासाठी प्रा. एन.डी.पाटील यांनी दोनवेळा मुंबई दौरा केला. चर्चा, बैठका होऊनही सरकार त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आमदार सतेज पाटील म्हणाले, 'राज्यातील व्यक्तिगत कृषि पंपधारकांच्या वीजदरवाढीचा मोठा प्रश्न आहे. मे २०१५ मध्ये ७२ पैसे प्रति युनिट असेला कृषीपंपाचा वीजदर हा एप्रिल २०१८ मध्ये दोन रुपये ३० पैसेपर्यंत वाढला. या अन्यायी वीज दरवाढीविरोधात आंदोलनात सर्वपक्षीयांचा समावेश राहील.' पत्रकार बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर, क्रांती कारखान्याचे चेअरमन अरुण लाड, राजारामबापू कारखान्याचे चेअरमन पी.आर.पाटील, इरिगेशन फेडरेशनचे आर.जी.तांबे, बाबासाहेब पाटील भुयेकर, विक्रांत पाटील किणीकर, चंद्रकांत पाटील पाडळीकर आदी उपस्थित होते.

.........

आजी-माजी आमदारांचा आंदोलनाला पाठिंबा

रास्ता रोको आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, सुजित मिणचेकर, बाळासाहेब पाटील, शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार विनय कोरे, संजय घाटगे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच रास्ता रोको आंदोलनातही सर्व नेते सहभागी होणार आहेत.

.................

बावनकुळे केवळ नामधारी

वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, 'राज्य विद्युत नियामक आयोगाने गेल्या तीन वर्षात चारवेळा शेतीपंप व वीजदरवाढ केली. मुख्यमंत्री फडणवीस व उर्जामंत्री बावनकुळे यांच्यासोबत चर्चा करुनही सकारात्मक निर्णय होत नाही. उर्जामंत्री बावनकुळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक आहेत. यामुळे मुख्यमंत्रीही याप्रश्नी काही करताना दिसत नाहीत. उर्जाखात्याचा कारभार हा महाराष्ट्र विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक व समीर गडकरी चालवित आहेत. मंत्री बावनकुळे हे केवळ नामधारी आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्शिवाद मलाच मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यात मोठे महाभारत घडले. देवच चोरीला गेला. मात्र, त्या देवाचा आर्शिवाद मलाच मिळणार आहे,' अशी टोलेबाजी शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केली. सोमवारी तपोवन मैदानातील सतेज कृषी प्रदर्शनाच्या सांगता कार्यक्रमात माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांनी स्वीकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाच्या अनुषंगाने त्यांनी ही टिपणी केली. तर 'आमदार सतेज पाटील यांनी एकेकाळी पाच झेंडे हाती घेतले. आता त्यांच्या घरात घड्याळही आले आहे. त्यामुळे भविष्यात त्यांनी शिवधनुष्यही उचलावे', असे अनपेक्षित आवाहन शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी करताच उपस्थिताच्या भुवया उंचावल्या.

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'गेल्यावेळी जिल्हा परिषद सदस्य असताना मला अचानक शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी दिली. त्यावेळी आमदार पाटील विरोधी पक्षातील मंत्री होते. त्यावेळी त्यांना मी तलवारीच्या उलट्या बाजूला मारा, वळ उठेल, असे विनंती केली. मात्र, त्यांनी धार असलेल्या बाजूने तलावर मारून मानच तोडली. आता ते तसे करणार नाहीत,' असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

प्रा. मंडलिक म्हणाले, 'कृषी प्रदर्शनाला आमदार पाटील यांनी सर्वपक्षांच्या लोकांना निमंत्रण दिले. म्हणून आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये पाटील यांनीच सर्वांचे नेतृत्व

करावे. कारखानदार म्हणून सरकारने आमची आई जेऊ घालेना अन बाप भीक मागू देईना अशी अवस्था केली आहे. साखरेचे दर कमी झाल्याने एफआरपी देणे शक्य झाले नाही, याचा खेद वाटतो.'

आमदार नरके म्हणाले, 'आमदार हसन मुश्रीफ म्हणतात की, विरोधकांनी एकत्र येऊन सत्ता संपादीत करूया. निष्ठेने राहूया. मात्र, आम्ही अडचणीत असताना ते सोबत राहत नाहीत. एकाकी पाडतात. आमचा कडीपत्यासारखा वापर करतात. असे असले तरी मी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून संघर्ष शिकलो आहे. खासदार राजू शेट्टी यांचा आदर्श घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत माझ्याविरोधात सगळे असले तरी मीच यशस्वी होतो. आमदार पाटील हे सर्वांनी हातात हात घालून काम करूया असे म्हणतात. आम्ही त्यांच्यासोबत राहतो. त्यांनीही आमच्या पाठिशी रहावे. वयाने लहान असले तरी त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. त्यांना राजकारणातील आदर्श पारितोषिक दिले पाहिजे.'

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी शेतीच्या धोरणांबाबत व्यासपीठावरील आमदार, खासदारांची चांगलीच कानउघाडणी केली. 'शेतमालातून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबण्यासाठी सरकारी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी विद्यमान आमदार, खासदारांनी काय केले?, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. '१४ दिवसांत एफआरपी देण्याचा कायदा आहे. प्रत्यक्षात ऊस जाऊन ५३ दिवस झाले तरी कारखान्यांनी पैसे दिले नाहीत. आता शेतकऱ्यांच्या बाजूने कायदा का राहत नाही? तो मसणात गेला का? सरकारमध्ये असलेल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे काय करतात? गटशेती करणाऱ्यांना १ कोटी कर्जाचे आश्वासन देणारे पालकमंत्री एफआरपी देण्यासाठी आर्थिक मदत करू शकत नाहीत' अशी टीका त्यांनी केली. तर कृषी प्रदर्शन आयोजित करून शेतीला बाजारपेठ मिळवून दिल्याबद्दल शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबीटकर यांनी आमदार पाटील यांचे कौतुक केले.

९ कोटींचा रेडा अन्...

'सतेज कृषी प्रदर्शनात ९ कोटींची उलाढाल होते. दुसऱ्या कृषी प्रदर्शनात ९ कोटींचा रेडा दाखवून गर्दी जमवली गेली,' असा टोला प्रा. संजय मंडलिक यांनी भीमा कृषी प्रदर्शनाचा उल्लेख न करता लगावला. यावेळीही उपस्थितांत हास्याची खसखस पिकली.

चांगले मित्र...

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मंडलिक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याच राजकीय संदर्भातून सर्वच वक्त्यांनी राजकीय चिमटे काढले. भाषणात 'मंडलिक यांचे चांगले मित्र सतेज पाटील' असा उल्लेख आमदार नरके यांनी करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षाला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी

$
0
0

३२ प्रकारच्या देशी, विदेशी फुलांची सजावट

पंढरपूर

विठुरायाच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो पर्यटक आणि भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे. मंदिर समितीने देखील विठ्ठल मंदिरात या भाविकांच्या स्वागतासाठी आकर्षक फुलांची सजावट केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात विठुरायाच्या दर्शनाने करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून सुरु झाली आहे.

नवीन वर्षात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विठुराया ताकद आणि शक्ती देतो, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. यामुळे दरवर्षी नवीन वर्षाला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर समितीने यंदा ३२ प्रकारच्या देशी आणि विदेशी फुलांनी विठ्ठल मंदिराची सजावट केली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषद प्रशासनाने केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षकांमधून तेरा जणांची शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी पदोन्नतीचे आदेश काढले.

पदोन्नती मिळालेल्यांमध्ये रेहाना पटेल यांची शिरोळ, भरमू संतू साठे यांची आजरा, मारुती बाजीराव पाटील यांची कागल, रावसाहेब गुंडा तांदळे यांची हातकणंगले, मारुती देवबा पाटील यांची पन्हाळा तालुक्याच्या शिक्षण विस्तार अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. भारती पांडूरंग शिंदे (भुदरगड), एकनाथ ज्ञानदेव पाटील (करवीर), नामदेव बाळू कल्याणकर (राधानगरी), पांडूरंग श्रीकांत उत्तूरकर (गडहिंग्लज), तारामती हरी गायकवाड (राधानगरी), हनुमंत कृष्णा कासार (भुदरगड) आणि चंद्रकांत ज्ञानदेव कडवेकर (पन्हाळा) यांना तालुका शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिली संपाची नोटीस

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी आठ ते नऊ जानेवारी रोजी देशव्यापी सावित्रक संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील दहा हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे नेते, कॉम्रेड आप्पा पाटील यांनी ही माहिती दिली. युनियनतर्फे जिल्हा परिषद प्रशासनाला त्यांनी संपातील सहभागाबाबतची नोटीस दिली.

युनियनच्या शिष्टमंडळाने महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांना निवेदन दिले. जिल्ह्यात पाच हजार अंगणवाडी सेविका तर पाच हजार मदतनीस आहेत. मंगळवारी (ता. ८ जानेवारी) अंगणवाडी कर्मचारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार आहेत. ११ मागण्यांचे निवेदनही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, कमीत कमी १८००० रुपये किमान वेतन मिळावे, सहा हजार पेन्शनसह सर्व सामाजिक सुरक्षा लागू करावी, केंद्राने जाहीर केलेली मानधनवाढ तातडीने राज्यात लागू करावी या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी संघटना प्रयत्नशील आहे. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वर्षातून पंधरा दिवसांची आजारपणाची पगारी रजा मंजूर करावी, सेविकाव मदतनिसांच्या सर्व रिक्त जागा तातडीने भराव्यात आदी प्रमुख मागण्या आहेत. चर्चेत कॉम्रेड जयश्री पाटील, सरिता कंदले, अर्चना पाटील, सुलोचना मंडपे, शोभा भंडारे, सुनंदा कुऱ्हाडे, विद्या कांबळे, संगीता मोरे, सुरेखा कोरे, पद्मा चौगुले आदींनी सहभाग घेतला.

सर्व अंगणवाड्या बंद

दोन दिवसांच्या संपावेळी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद राहतील. आहार वाटप, गृहभेटीसह कोणत्याही प्रकारचे कामकाज केले जाणार नाही. संपाच्या कालावधीतील संयुक्त मोर्चे, निदर्शेने यामध्ये अंगणवाडी सेविका,मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभाग होतील असे युनियनने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१९ अनधिकृत केबिनवर हातोडा

$
0
0

राजरामपुरीतील जाहिरात फलक हटवले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने सलग आठव्या दिवशी शहरात अतिक्रमण निर्मू्लन मोहीम राबवली. राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य मार्गावर राबवलेल्या मोहिमेमध्ये जाहिरात फलक, होर्डिंग्जबरोबरच अनधिकृत फळविक्रेत्यांनाही हटवण्यात आले. विद्यापीठ ते शासकीय तंत्रनिकेतन रस्त्यावरील १९ अनधिकृत केबिनवर कारवाई करण्यात आली.

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली कारवाईचा धडाका मंगळवारीही महापालिकेने कायम ठेवला. राजारामपुरी विभागीय कार्यालयातंर्गत शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली. प्रथमत: राजारामपुरी व्यापारी पेठेत कारवाई करताना अनधिकृत जाहिरात फलक हटवण्यात आले. तर दुकानाबाहेर ठेवलेल्या स्टँडी ताब्यात घेण्यात आल्या. पथकांनी राजारामपुरी बस रुट ते सायबर कॉलेज व विद्यापीठ पोस्ट ऑफिसपर्यंत कारवाई केली. शाहू जकात नाक्यापासून शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजपर्यंतही कारवाई केली. त्यानंतर पथकाने पांजरपोळ परिसरातही कारवाई केली.

दिवसभराच्या कारवाईत पथकाने १९ अनधिकृत केबिन, दहा डिजिटल बोर्ड, ३० जाहिरात फलक काढून ताब्यात घेतले. ठिकठिकाणी राबवललेल्या कारवाईत फूटपाथवर अनधिकृत फळ विक्री व्यवसाय करणाऱ्या २० फेरीवाल्यांना हटवण्यात आले. उपशहर अभियंता आर. के. जाधव, अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार, कनिष्ठ अभियंता मिलिंद चव्हाण, रावसो चव्हाण, पद्मल पाटील यांच्यासह अतिक्रमण, विद्युत व पवडी विभागाचे कर्मचारी कारवाईत सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टस्करचा पळसंबे परिसरात धुमाकूळ

$
0
0

फोटो..

म. टा. वृतसेवा, गगनबावडा

पळसंबे (ता. गगनबावडा) परिसरात तळ ठोकलेल्या टस्कर हत्तीने वरेकर मळा परिसरात धुमाकूळ घालून ऊस व केळीबागेचे नुकसान केले. त्याने मंगळवारी पुन्हा कोदे परिसराकडे मोर्चा वळविला आहे.

टस्करचे गेले आठ दिवस असळज, पळसंबे, पडवळवाडी, खोकुर्ले येथे वास्तव्य आहे. दिवसभर जंगलात राहून रात्री तो शेतवडीत उतरून पिकांचे नुकसान करत आहे. त्याने गेले काही दिवस वरेकर मळा परिसरात ठाण मांडून पिकांचे मुकसान केले आहे. त्याने माजी महापौर प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण व मंगल प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील केळीबाग भुईसपाट केली. तसेच नारळीच्या झाडांचे नुकसान केले. पाण्याच्या पाइप सोंडेत पकडून भिरकावून दिल्या. तसेच गणी मुल्लाणी, प्रकाश वरेकर, कृष्णा वरेकर, पांडुरंग वरेकर, धोंडिबा वरेकर, विष्णू वरेकर, संभाजी वरेकर यांच्या ऊसशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

परिक्षेत्र वनअधिकारी सुधीर सोनवले, वनपाल एस. एम. शेवडे, वनरक्षक पी. एम. बुवा, रूकेश मुल्लाणी, विश्वास पाटील यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. टस्करने केलेल्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी धास्तावला असून, साखर कारखान्यांनी प्राधान्याने ऊसतोड द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री टस्करने कुंभी नदी पार करून गगनबावडा रस्ता ओलांडून पुन्हा कोदे जंगलात प्रवेश केला. रात्री त्याने कुशापा डाकवे, परशराम पाटील, भाऊसाहेब पाटील यांच्या ऊसपिकाचे नुकसान केले. मंगळवारी दिवसभर तो कोदे जंगलातच होता. वन विभागाने टस्करला प्रशिक्षित माहूत आणून नैसर्गिक अधिवासात पाठवावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वोदय सोसायटीचा उद्या शतकमहोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

कोडोली (ता. पन्हाळा) येथील सर्वोदय विकास सेवा सोसायटीच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त ३ व ४ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव कुलकर्णी यानी दिली.

गुरुवारी (ता. ३) सर्वोदय सोसायटी व इफको खत कंपनीच्या वतीने सकाळी १०.३० वाजता ऊसपीक परिसंवाद संस्थेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये होणार आहे. कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पांडुरंग मोहिते यांचे 'हुमनी कीड व्यवस्थापन'वर, क्रांती सह साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांचे 'ऊस लागवड तंत्रज्ञान'वर, इफकोचे व्यवस्थापक डॉ. एम. एस. पोवार यांचे 'इफको उत्पादने' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४.३० वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, डॉ. मनस्वी वरेकर यांचे 'स्त्रियांचे आरोग्य व विकार' याविषयी व्याख्यान, पारंपरिक झिम्मा-फुगडी कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी शांतादेवी डी. पाटील, व संयोगीताराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत.

डॉ. डी. वाय.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शतक महोत्सवी स्मरणिका प्रकाशन, गोकुळचे जेष्ठ संचालक अरूण नरके यांच्या हस्ते बक्षिस वितरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानोळीत हातभट्टीवर छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

दानोळी (ता. शिरोळ) येथे हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांच्या पथकाने दोन लाख ११ हजार रुपये किमतीची १२२० लिटर तयार दारू आणि ७५०० लिटर कच्चे रसायन नष्ट केले. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. याबाबत मिळालेली अधीक माहिती अशी, दानोळी येथील उमाजीनगरमध्ये गावठी हातभट्टी दारुविक्री सुरू असल्याची माहिती कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास मिळाली होती. राजेंद्र सानप व सचिन पंडित या पोलिस अधिकाऱ्यांचे पथक आणि जयसिंगपूरचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या संयुक्त पथकाने दानोळी येथे हातभट्टीवर छापा टाकला. त्यावेळी नामदेव धोंडिराम चव्हाण यांच्या घराजवळ गावठी हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. पथकाने कारवाईत दारू नष्ट केली. प्रकाश शामराव माने व रमेश आप्पासाहेब माने यांना अटक केली. उर्वरित नामदेव चव्हाण, तानाजी मंडले, बबन माने फरारी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या अनेक वर्षांपासून वादात अडकलेला कसबा बावडा येथील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प मंगळवारी (ता.१) मार्गी लागला. कोल्हापूर ग्रीन एनर्जी कंपनीतर्फे पहिल्याच दिवशी २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली. टप्प्याटप्प्याने वीज निर्मितीला सुरुवात होणार असून लवकरच हा प्रश्न निकालात निघेल. मुंबई येथील आयआयटी कंपनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करुन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना अहवाल सादर करणार आहे.

शहरात दररोज १७० टन ओला व सुका कचरा तयार होतो. दैनंदिन कचरा टाकण्यास जागाच उपलब्ध नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याची घोषणा केली. पाच वर्षांपूर्वी प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरु होते. कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर निर्माण होणारा रिफ्युज डिरॉयड फ्युअल (आरडीएफ) हा ज्वलनशील पदार्थ घेण्यास ग्राहक मिळत नसल्याने प्रकल्पाला विलंब होत होता. प्रकल्पाला विलंब लागण्यानंतर प्रशासनाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कंपनीने प्रकल्प सुरू करण्याची ग्वाही देत ३१ डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत घेतली. मुदतीत प्रकल्प सुरू न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला होता. कंपनीने आरडीएफसाठी ग्राहक मिळत नसल्याने प्रकल्पामध्ये तांत्रिक बदल केले. त्यामुळे मंगळवारपासून प्रकल्पाला सुरुवात झाली.

प्रथम प्रकल्पात कचऱ्यापासून थेट वीज निर्मिती केली जाणार होती. पण सद्य:स्थितीत ३० टन ओला कचरा बायोगॅस प्लॅटमध्ये प्रक्रिया करुन प्रकल्प कार्यन्वित केला आहे. प्रकल्पामध्ये रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर थेट प्रक्रिया केली जाणार असल्याने नागरिकांची कचऱ्याच्या समस्येतून सुटका होण्याची आशा बळावली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झाल्यानंतर २०० टन कचऱ्यापासून बायोगॅसमधून २४० किलो वॅट वीजनिर्मिती होईल. निर्माण झालेली वीज प्रकल्पासाठी वापरता येणार आहे.

कचरा प्रकल्पावर गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्या ढीग जमा झाला आहे. कचरा विघटन करुन तयार होणारे इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी दोन ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने खण विकसित केली. पण अद्याप हे प्रकल्प मार्गी लागलेले नाहीत. त्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना कचऱ्याचे कॅपिंगही करण्यात येणार आहे. कॅपिंगसाठी नऊ लाखांचा निधी प्राप्त झाला असून आठवड्यात निविदा काढली जाणार असल्याने महापालिकेच्या सुत्रांनी सांगितले.

............

लाखोंच्या खर्चावर आयुक्तांची नजर

एक टन कचऱ्याचे विघटन करण्यासाठी महापालिका कंपनीला ३०८ रुपये देणार आहे. तर कचरा संकलित करण्यासाठी प्रतिटन ३०० रुपये खर्च येत आहे. त्यामुळे एक टन कचऱ्याच्या विघटनासाठी ६०८ रुपये खर्च येईल. शहरात संकलित होणाऱ्या दैनंदिन १७० कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये खर्च येणार असल्याने कचऱ्याच्या वजनावर आयुक्तांचे विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी इंटरनेट लिंकद्वारे प्रकल्पात येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या व केल्या जाणाऱ्या वजनावर त्यांचा वॉच राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images