Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डी.वाय.मुळे लोकसभेच्या उमेदवाराला ताकद मिळणार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराला निश्चित ताकद मिळणार आहे. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर व्यूहरचना सुरू आहे' अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाध्यक्ष पाटील यांनी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारिणी बुधवारी जाहीर केली. यात ९१ जणांचा समावेश आहे. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, साखर कारखान्याच्या संचालकांना स्थान दिले आहे. अध्यक्ष, दोन कार्याध्यक्ष, दहा उपाध्यक्ष आणि दहा सरचिटणीस, अकरा चिटणीस, खजिनदार आणि तेरा संघटक सचिवांचा यात समावेश आहे. बारा तालुकाध्यक्ष, नऊ शहराध्यक्षांच्या निवडीही जाहीर केल्या. २०१८ ते २०२० या कालावधीसाठी या नियुक्त्या आहेत.

जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, 'डॉ. पाटील हे वर्षभर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात वर्षभर होते, अशी माहिती पवार यांनीच दिली आहे. पवार हे पंतप्रधान व्हावेत ही भूमिका डी. वाय. पाटील यांनी मांडली आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श दोन्ही काँग्रेसमधील नेते, कार्यकर्त्यांनी घ्यावा. त्यांनी पक्षात प्रवेश केला त्यादिवशी त्यांचे स्वागत केले आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद निश्चितचवाढणार आहे. पक्ष बांधणीसाठी त्याचा उपयोग होईल. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकायच्या अशी आखणी सुरू आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने पक्ष कार्य करावे.'

पत्रकार परिषदेला जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, 'युवक'चे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, डी. के. पाटील सुळंबी उपस्थित होते.

राजेंद्र पाटील कार्याध्यक्षपदी, जिल्ह्यात दहा उपाध्यक्ष, बारा तालुकाध्यक्ष

जिल्हा कार्याध्यक्ष : राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल साळोखे. उपाध्यक्ष : जिल्हा परिषद सदस्य जयवंत शिंपी (आजरा), विजय बोरगे (पिशवी), नगरसेविका माधुरी सातपुते (इचकरंजी), गणपतराव फराकटे (बोरवडे), मधुकर देसाई (म्हसवे), इक्बाल सौदागर (अकिवाट), दिपक पाटील (गडहिंग्लज), उमेश भोईटे (पालकरवाडी), निवास ढोले (आळते).

खजिनदार : शामराव पाटील (बाळेघोल).

तालुकाध्यक्ष : मारुती पाटील (चंदगड), रामाप्पा करीगार (गडहिंग्लज), मुकुंद देसाई (आजरा), विश्वनाथ कुंभार (भुदरगड), आप्पासाहेब धनवडे (करवीर), दाजी पाटील (पन्हाळा), प्रकाश पाटील (गगनबावडा), दशरथ पिष्टे (हातकणंगले), प्रकाश पाटील (शिरोळ), प्रा. किसन चौगुले (राधानगरी), शिवानंद माळी (कागल) आणि पंडितराव शेळके (शाहूवाडी).

माजी नगरसेवक अमोल माने (कोल्हापूर दक्षिण संघटक सचिव)

विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय निवडी घोषित केल्या आहेत. यामध्ये बी. एन. पाटील (चंदगड), वसंतराव धुरे (कागल), पंडीतराव केणे (राधानगरी), उदय पाटील (दक्षिण कोल्हापूर), सुनील साळोखे (करवीर), संतोष धुमाळ (शाहूवाडी), संभाजी पवार (हातकणंगले), रवींद्र माने (इचवकरंजी) आणि नगराध्यक्ष अमरसिंह माने (शिरोळ) .

शहराध्यक्ष : विठ्ठल भमानगोळ (गडहिंग्लज), रणजित सूर्यवंशी (मुरगूड), संजय चितारी (कागल), सखाराम काशीद (पन्हाळा), प्रकाश पाटील (मलकापूर), फिरोज बागवान (पेठवडगाव), प्रकाश पाटील (इचलकरंजी), असलम सिकंदर फरास (जयसिंगपूर) तर जिन्नाप्पा पोवार (कुरुंदवाड) .

डी. वाय. पाटील हे कायम निमंत्रित सदस्य

पक्षात नुकतेच प्रवेश केलेले डॉ. डी. वाय. पाटील यांचा कायम निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे. यामध्ये पक्षाचे जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी आमदार, प्रदेश संघटनेवर प्रतिनिधीत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय अण्णासाहेब क्वाणे व प्रविता शिवाजी सालपे यांचा समाावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राधानगरी-भुदरगडमधून उमेदवारी मागणार

$
0
0

फोटो सिंगल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राधानगरी- भुदरगड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींकडे उमेदवारीची रितसर मागणी करणार आहे. या संदर्भात पक्षाची नेतेमंडळी जो आदेश देतील, निर्णय घेतील तो आपल्यासाठी अंतिम असेल,' असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी सांगितले.

राधानगरी- भुदरगड मतदारसंघातून उमेदवारीसाठी माजी आमदार के. पी.पाटील व जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. दोघांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळणार म्हणून मतदारसंघात भेटीगाठी, दौरे सुरू केले आहेत. जिल्हाध्यक्ष पाटील यांनी बुधवारी ताराबाई पार्क येथील पक्ष कार्यालयात जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.

पाटील म्हणाले, 'जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे. नजीकच्या काळात पक्ष बळकट करण्यासाठी आणखी काही कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत सामावून घेऊ. पक्षातील काही कार्यकर्ते, नेते मंडळीत मतभेद, मतमतांतरे असली तरी ते काही क्षणापुरते असतात. ज्या ठिकाणी मतभेद आहेत, तेथे नेतेमंडळी चर्चा करुन वाद मिटवतील. यामुळे सगळेजण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतभेद बाजूला सारुन पक्षासाठी काम करतील. लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी नेतेमंडळी जे उमेदवार देतील ते नक्कीच यशस्वी ठरतील. '

राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील उमेदवारीच्या प्रश्नावर ते म्हणाले, 'विधानसभा निवडणूक लढविण्याचा विचार कायम आहे. पक्ष नेतृत्वाकडे रितसर उमेदवारीची मागणी करणार आहे. विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगणार आहे. मात्र माझ्यापेक्षा पक्ष मोठा आहे. पक्षासाठी शांतपणे, संयमाने काम करायचे ही माझ्या कामाची पध्दत आहे. नेते मंडळी त्या कामाची दखल घेतील. उमेदवारीसंदर्भात पक्ष नेतृत्वाचा आदेश आपल्यासाठी अंतिम राहील. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'कला महोत्सवामुळे ‘ब्रँड कोल्हापूर’ला बळकटी'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सृजनांचा धांडोळा घेणाऱ्या व कलाविषयक अभिरूची उंचावणाऱ्या कला महोत्सवामुळे 'ब्रॅँड कोल्हापूर' संकल्पनेला बळकटी लाभली. भविष्यात या महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होईल,' असा आशावाद आमदार सतेज पाटील यांनी कला महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात व्यक्त केला. 'कोल्हापूर हॅश टॅग' आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी दरवर्षी महोत्सव भरविला जाईल. शिवाय कोल्हापुरात महापालिकेच्या माध्यमातून अद्ययावत सांस्कृतिक गॅलरीची उभारणी करू, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

कोल्हापूर आर्ट फाउंडेशनतर्फे दसरा चौक मैदानावर २२ ते २६ डिसेंबरअखेर कला महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याचा समारोप बुधवारी झाला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महोत्सवानिमित्त आयोजित चित्रकला व छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्यांना मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविले. याप्रसंगी 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक विजय जाधव, ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, श्रीराम पवार, प्रकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार प्राचार्य डी. आर. मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, प्रतिमा सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. टाउन हॉल येथील वस्तुसंग्रहालयावर आधारित माहितीपत्रिकेचे प्रकाशन झाले.

कुलगुरू शिंदे म्हणाले, 'कला महोत्सव कोल्हापूरच्या कला परंपरेचा संपन्न वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचविण्याचे कला महोत्सव उत्कृष्ट माध्यम आहे. महोत्सवातील चित्रे, शिल्पे आणि काष्ठशिल्पांच्या सुंदर अशा कलाकृतीने कलेचा चंद्र निर्माण झाला आहे. कलेच्या या चंद्र प्रकाशाने कोल्हापूरचे विश्व उजळून निघेल.'

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'कोल्हापूरच्या कलावंतांना आणि त्यांच्या कलाकृतींना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान प्राप्त करून देण्याचा हा प्रयत्न आहे. येत्या सहा महिन्यांत मुंबईतील नेहरू आर्ट गॅलरीत कोल्हापुरातील १५० कलाकारांच्या चित्र-शिल्पाकृतींचे प्रदर्शन भरविण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या शहरात केशवराव भोसले नाट्यगृह एकमेव थिएटर आहे. कलाकारांसाठी शहरात आणखी एक अद्ययावत सांस्कृतिक गॅलरी उभारू. जगभरातील संशोधन, नव विचारांचे आदान प्रदान होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने दरवर्षी एका नोबेल पुरस्कार विजेत्याला आमंत्रित करावे. त्यांचा प्रवास खर्च डी.वाय.पाटील ग्रुप करेल.'

याप्रसंगी चित्रकार संजीव संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. अनंत खासबागदार यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत जाधव यांनी स्वागत केले. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य अजेय दळवी यांनी आभार मानले.

००००

अमित गद्रे यांच्या छायाचित्राला पुरस्कार

महोत्सव कालावधीत चित्रकला आणि छायाचित्र स्पर्धा भरविल्या होत्या. छायाचित्र स्पर्धेत 'महाराष्ट्र टाइम्स'चे छायाचित्रकार अमित गद्रे यांच्या छायाचित्राला पुरस्कार मिळाले. तसेच तानाजी पाटील, प्रकाश पाटील, सायली पाटील, राहुल आमटे या विजेत्यांचा सन्मान झाला.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते डांबरीकरणामध्ये आता प्लास्टिकचा वापर

$
0
0

जिल्हा परिषदेतर्फे तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लास्टिक मटेरियलच वापर करण्यात येणार आहे. इंडिनय रोड काँग्रेसने रस्ता बांधकामामध्ये आठ ते दहा टक्के वापर करण्याविषयी सुचविले आहे. यामुळे प्लास्टिकचे निर्मूलन होईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले. प्लास्टिकचे पावडर तयार करण्यात येणार आहे. रस्त्याचे खडीकरण झाल्यावर त्यावर पावडर टाकून डांबरीकरण करण्यात येईल. प्लास्टिक वापरामुळे रस्ते टिकावू बनतात. जिल्ह्यात नजीकच्या काळात या पॅटर्नचा वापर केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएम चषक व्हॉलिबॉल स्पर्धेत संग्रामराजे स्पोर्टस प्रथम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित कला व क्रीडा महोत्सवांतर्गत राधानगरी, भुदरगड, आजरा मतदारसंघातील व्हॉलिबॉल स्पर्धेतून महाराष्ट्राला नामवंत खेळाडू मिळतील,' असे प्रतिपादन भाजपचे भुदरगड तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले.

गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या पटांगणावर सीएम चषक व्हॉलिबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन युवक नेते राहुल देसाई यांच्या हस्ते झाले. मैदान पूजन प्रवीणसिंह सावंत यांचे हस्ते तर नेटचे पूजन मौनी विद्यापीठाचे सदस्य अलकेश कांदळकर यांच्या हस्ते झाले.

व्हॉलिबॉल स्पर्धेत राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील २० संघानी सहभाग नोंदवला होता. गारगोटीच्या संग्रामराजे स्पोर्टसने प्रथम, झिब्बा स्पोर्टसे द्वितीय, तर राधानगरीच्या कासारवाडा स्पोर्टसने तृतीय, तर गारगोटीच्या गोमाता स्पोर्टसने चौथा क्रमांक पटकावला. कोजिमाशिचे माजी चेअरमन प्रा. हिंदुराव पाटील, गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, भाजप गारगोटी शहराध्यक्ष राहुल चौगले, ग्रा. पं. सदस्य प्रकाश वास्कर, मुदाळचे उपसरपंच नारायण पाटील, बजरंग कुरळे, नामदेव चौगले अनंत डोंगरकर, आदी उपस्थित होते. भुदरगड तालुका व्हॉलिबॉल असोसिएशनने स्पर्धेचे संयोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरशैव वधू वर मेळाव्यास प्रतिसाद

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'धकाधकीच्या व धावपळीच्या युगामध्ये वेळ, श्रम व पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी वधू वर मेळाव्याची नितांत गरज आहे. बदलत्या जगाबरोबर आपली मानसिकता बदलण्याची गरज असून समाजाचे नक्कीच विचार करावा'असे प्रतिपादन वीरशैव को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष राजेंद्र शेटे यांनी व्यक्त केले. वीरशैव वधू वर सूचक मंडळातर्फे आयोजित वीरशैव लिंगायत समाज वधू-वर-पालक परिचय मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

मेळाव्यात इच्छुक २१५ वधू व १३५ वरांनी व्यासपीठावर मुलाखती दिल्या. मेळाव्यात समाजातील मान्यवर व्यक्तींचा सत्कार झाला. यामध्ये भाऊसाहेब पर्वते, राहूल नष्टे, केतन तवटे, चंद्रकांत सांगावकर, रंजना तवटे, राजू वाली, सुभाष चौगले, गणेश सन्नकी, धर्मेंद्र नष्टे, गजानन सावर्डेकर, अनिल भुसके, सदुर्शन कापसे, राजेंद्र कोरे, बबन कापसे, बाळासाहेब सन्नकी, बापूसाहेब कदम, भरमा कापसे आदींचा सत्कार झाला. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, नानासाहेब नष्टे, डॉ. गिरीष कोरे यांची भाषणे झाली. समितीचे अध्यक्ष रमेश नडगदली यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष शंकरराव कदम यांनी प्रास्ताविक केले. अनिल सोलापुरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरशाळेत रमली मुले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ऊसतोडणी मंजुराच्या मुलांसाठी ठिकठिकाणी साखर शाळा सुरू केल्या आहेत. 'अवनि' स्थलांतरित विकास प्रकल्पातंर्गत वीटभट्टी व साखर शाळेत तीन ते पाच वयोगटातील २६५ बालके शिकत आहेत. कोणत्याही प्रकारचे अनुदान नसताना 'अवनि' संस्था गेली अनेक वर्षे साखर शाळा चालवित आहे. आतापर्यंत ९२०० मुलांना या शाळेचा लाभ घेतल्याचा संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

बीड, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, विजापूर या भागातील वीटभट्टी व ऊसतोडणी मजुरांच्या टोळया कोल्हापूर परिसरात आल्या आहेत. मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी 'अवनि' संस्थेने दोनवडे, वाकरे, खुपीरे, जाधववाडी, सरनोबतवाडी येथे शाळा सुरू केल्या आहेत. तसेच कुंभी कारखाना, राजाराम कारखाना, पंचगंगा साखर कारखाना परिसरात शाळा आहेत. यामध्ये तीन ते पाच वयोगटातील २६५ मुले शिकत आहेत. शिवाय संस्थेमार्फत सहा ते चौदा वयोगटातील २४० बालकांना नजीकच्या प्राथमिक शाळेत दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संस्थेने म्हटले आहे. सांगली व कराड येथे १८ ठिकाणी शाळा असून २१० बालके शिक्षण घेत आहेत. २०१८-१९ या वर्षामध्य हंगामी स्थलांतरित तीन ते चौदा वयोगटातील ८७० बालकांना शाळेच्या प्रवाहात सामील व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक साताप्पा मोहिते यांनी दिली.

दरम्यान संस्थेच्या प्रमुख अनुराधा भोसले म्हणाल्या, 'हंगामी स्थलांतरित वीटभट्टी व ऊसतोड कामगारांच्या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. साखर शाळेतील मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम होतात. सहलीचे आयोजन केले जाते. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बाल आनंद मेळावा भरविला जातो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. पवार यांना पीएच.डी.

$
0
0

कोल्हापूर : येथील न्यू कॉलेजमधील प्रा. विक्रमसिंह सुभाषराव पवार-पाटील यांनी सादर केलेल्या भूगोल विषयातील प्रबंधास शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली. त्यांना प्रा. डॉ. के. ए. माळी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन डी. बी. पाटील, विद्यापीठातील भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर, प्रा. डॉ. संभाजी शिंदे, प्रा. डॉ. डी. एच. पवार, प्रा. आर. बी. भास्कर यांनी त्यांना प्रोत्साहित केले. प्रा. पवार हे सडोली खालसा येथील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुभम जाधवची निवड

$
0
0

गारगोटी : राजस्थान येथील गंगानगर येथे होणाऱ्या ऑल इंडिया वेस्ट झोन स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या व्हॉलिबॉल संघात कर्मवीर हिरे महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम शरद जाधव याची निवड झाली आहे. तो बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. शुभमने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपली कामगिरी दाखविली आहे. त्याला संचालक डॉ. आर. डी. बेलेकर, प्राचार्य जी. एस. म्हांगोरे, प्रशिक्षक सचिन चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायत सशक्तीकरणपुरस्कारासाठी पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देश पातळीवरील पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात सर्वाधिक गुण मिळाले आहेत. आता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी २७ किंवा २८ डिसेंबर रोजी तपासणी होणार आहे. राज्यस्तरीय समिती अंतर्गत कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही तपासणी होईल. त्या तपासणीच्या आधारे राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या जिल्हा परिषदेची घोषणा होणार आहे.

पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी झालेल्या प्राथमिक टप्प्यातील तपासणीत कोल्हापूर जिल्हा परिषदेला सर्वाधिक ६३ गुण मिळाले आहेत. भंडारा जिल्हा परिषदेला ६१, नागपूर जिल्हा परिषदला ५९, सातारा जिल्हा परिषदेला ५८, अहमदनगर व गडचिरोली जिल्हा परिषदेला प्रत्येकी ५७ गुण मिळाले आहेत. पंचायत समिती गटात गडहिंग्लज पंचायत समितीला ७९ गुण मिळाले आहेत. तर नानाजी देशमुख राष्ट्रीय ग्रामसभा पुरस्कारातंर्गत राज्यातील ३५ ग्रामपंचायतीची तपासणी होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाच्या तपासणीनंतर पंचायत राज संस्थांची अंतिम निवड करुन प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावयाचे आहेत. राज्य निवड समितीची बैठक २९ डिसेंबर रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेसाठी भारिप निर्णायक ठरेल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'भारिप बहुजन महासंघाची रणनीती स्वाभिमानी सत्ता देण्याची असून यासाठी शिरोळ तालुका सज्ज झाला आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ निर्णायक ठरेल,' असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले. जयसिंगपूर येथे भारिप बहुजन महासंघाच्या युवा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, 'कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर विस्कळीत झालेल्या समाजाला आधार देण्याऐवजी आमच्यावरच टीका करण्याचे काम इतरांनी केले. समाजाचे मातृत्व आंबेडकर परिवाराने स्वीकारले आहे. धनगर व अन्य बहुजन समाज आजपर्यंत सत्तेपासून वंचित राहिला आहे. त्याला सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.'

तमदलगे, निमशिरगाव व आगर येथे भारिप बहुजन महासंघाच्या शाखांचे उद्घाटन आंबेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रबोधनपर गीताने झाली. भारिप बहुजन महासंघामध्ये प्रवेश केलेल्या सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस. पी. दीक्षित, कोल्हापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. इंद्रजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश कांबळे यांनी स्वागत केले. विश्‍वजित कांबळे यांनी प्रास्ताविक केले. अमित वाघवेकर यांनी प्रतिज्ञावाचन केले. भीमराव तांबे यांनी आभार मानले. मेळाव्यास माजी जिल्हाध्यक्ष दिगंबर सकट, सांगलीचे निमंत्रक डॉ. विवेक गुरव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रियाताई कांबळे, तालुकाध्यक्ष सतीश कुरणे उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत संप्रदाय हाच समाजव्यवस्थेचा कणा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'आपल्यामुळे कोणी सुखी झाला नाही तरी चालेल, पण कोणी दुखी होता कामा नये अशी भावना संतांची असते. भारतीय संत संप्रदाय हाच भक्कम समाजव्यवस्थेचा कणा आहे' असे प्रतिपादन लेखक सागर वातकर यांनी केले. उचगाव येथील छत्रपती शिवाजीनगरात त्रिमूर्ती भक्त मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 'माणूस शोधायचा आहे' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

वातकर म्हणाले, 'वेदनेवर घातलेली प्रेमाची फुंकर हीच खरी माणुसकी आहे.समाजव्यवस्थेत नितीमत्ता टिकवायची असेल तर संतांच्या विचारांची कास धरली पाहिजे. समाज उन्नतीचा मार्ग प्रत्येकाला कळायला हवा.'

मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कदम, उपाध्यक्ष जयप्रकाश वर्दम, रविंद्र पाटील, अजित माने, ग्रामपंचायत सदस्य सचिन गाताडे, संध्या कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाखल्यांसाठी एक खिडकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर भुदरगड तालुक्यात मराठा तरुण दाखल्यासाठी तहसील कार्यालयात तसेच विविध ग्रामपंचायतींमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी गारगोटी ग्रामपंचायतीने एक खिडकी योजना सुरू केली आहे. रहिवाशी, हयातीचा, जातीचा दाखला, घर उतारा आदी दाखले देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वनिधी’तून घनकचरा प्रकल्प नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक साहित्य खरेदी व त्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीवरून स्थायी समिती सभेत पडसाद उमटले. प्रकल्प अहवाल तयार नसताना इस्टिमेट मंजुरीची घाई कशासाठी केली? असा सवाल सदस्य राहुल आवाडे यांनी उपस्थित केला. तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून घनकचरा प्रकल्प व्यवस्थापन राबविण्यापेक्षा सरकारकडून निधी उपलब्ध करावा, अशी सूचना केली.

जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आजरा येथे बुधवारी स्थायी समितीची सभा झाली. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वनिधीतून एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये प्लास्टिक व क्रशिंग मशिनसाठी दहा लाख, बायोगॅस युनिटसाठी ४५ लाख, मिक्सिंग प्लँटसाठी ३० लाख व अन्य प्रकारच्या मशिन खरेदीसाठी १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. २९ नोव्हेंबरच्या स्थायी समिती सभेत एक कोटीच्या खर्चाला मंजुरी दिली. वेंगुर्ला पॅटर्नवर हा प्रकल्प होणार आहे. मात्र, या प्रकल्पाला भेट देण्याअगोदर मंजुरी का दिली? घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणीचा कसलाही प्रकल्प आराखडा तयार नाही. शिवाय नियमांना डावलून प्रक्रिया राबविणार असाल तर त्याला आपला विरोध नोंदवावा, असे त्यांनी नमूद केले. यावेळी विविध योजनांविषयी चर्चा झाली. यामध्ये उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, जयवंत शिंपी, अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर, कल्लाप्पाण्णा भोगण, आदींनी सहभाग घेतला.

००००

मतभेद बाजूला ठेवून स्वागत केले असते

आजरा येथील जिल्हा परिषद सदस्य जयवंत शिंपी म्हणाले, 'आजरा येथे स्थायी समिती सभा आयोजित करत असल्याचे प्रशासनाने अगोदर कल्पना द्यायला हवी होती. पदाधिकारी व अधिकारी एकत्रित असल्यामुळे त्यांच्यासमोर तालुक्यातील प्रश्नांच्या सोडवणुकीला चालना मिळाली असती. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांसोबत विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करणे शक्य होते. पहिल्यांदाच सर्व पदाधिकारी आजऱ्यात येणार असल्याने पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांचा सत्कार, स्वागत केले असते.'

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ अध्यक्षांचा राजीनामा लांबणीवर

$
0
0

आजच्या बैठकीत विषयपत्रिकेवर ठरावच नाही

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) आज शुक्रवारी (ता. २८) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषयपत्रिकेवर राजीनामा ठराव नसल्याने अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंड करणाऱ्या संचालकांपुढे नेते मंडळी झुकली, असा संदेश जाऊ नये यासाठी नेत्यांनी राजीनामा स्वत:च्या कस्टडीत ठेवल्याची चर्चा आहे.

'गोकुळ'चे अध्यक्ष पाटील हे पावणेचार वर्षे पदावर असल्याने त्यांच्याऐवजी नवीन व्यक्तीला संधी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ संचालकांनी सर्वसाधारण सभेनंततर गोकुळचे नेते महादेवराव महाडिक व पी.एन. पाटील यांच्याकडे केली होती. पण नेतेमंडळींनी ज्येष्ठांच्या मागणीकडे कानाडोळा केला. त्यानंतर पाटील यांना अध्यक्षपदावरून हटवा या मागणीसाठी गोकुळच्या १२ संचालकांनी बंडाचा पवित्रा घेतला. त्यामुळे नेतेमंडळी हडबडून गेली. १४ डिसेंबरला संचालकांच्या सभेपूर्वी नेत्यांनी सर्व संचालकांना फैलावर घेतले होते. गोकुळमध्ये बंड चालणार नाही, असा सज्जड दम देत नेतेमंडळींनी वेळ आल्यावर आम्ही निर्णय घेऊ, असेही स्पष्ट केले होते.

एकीकडे संचालकांना नेत्यांनी दम दिला, त्याच दिवशी सभा सपंल्यानंतर अध्यक्ष पाटील यांनी महाडिक यांच्याकडे राजीनामा दिला. तसेच त्यांनी अध्यक्षांचे वाहन वापरणेही बंद केले. त्यामुळे अध्यक्षांचा राजीनामा निश्चित होणार असा दावा ज्येष्ठ संचालक छातीठोकपणे करत होते. पण शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या विषय पत्रिकेवर राजीनाम्याचा विषय नसल्याने तो लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार महाडिक सभा सुरु होण्यापूर्वी ऐनवेळी राजीनाम्याचा ठराव विषयपत्रिकेवर आणतील, असा दावा केला जात आहे. पण ऐनवेळी असा ठराव विषयपत्रिकेवर आणता येत नाही, असे काही संचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अध्यक्ष पाटील यांना एक महिन्यासाठी जीवदान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अध्यक्ष बदलणार हे निश्चित असले तरी शुक्रवारच्या सभेत राजीनामा मंजूर होणार नाही, असे नेते मंडळींच्या समर्थकांचे म्हणणे आहे. भविष्यात बंडाचा पवित्रा घेतल्यावर राजीनामा मंजूर होतो ही प्रथा पडू नये याची काळजी नेतेमंडळी घेत आहेत. जानेवारी महिन्यात अध्यक्षांचा राजीनामा होण्याची अटकळ बांधली आहे. पण जर नेत्यांनी ठरवले तर शुक्रवारच्या बैठकीतही राजीनामा मंजूर होऊ शकतो. पण ही शक्यता फारच कमी आहे.

...............

चौकट

राजीनामा पुढे ढकलण्याच्या हालचाली

अध्यक्ष पाटील यांचा राजीनामा आणखीन दोन महिने थांबविण्यासाठी हालचाली सुरु आहेत. आचारसंहिता लागल्यानंतर राजीनामा घेण्यास अडचणी येऊ शकतात. आचारसंहितेचे कारण सांगून पाटील यांनाच या पदावर कायम ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता १२ संचालकांना नाराज करणे नेते मंडळींना शक्य नसल्याने राजीनामा मंजूर करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा दावा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरस्कारांसाठी फेरतपासणी अन् अधिकाऱ्यांची धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराच्या फेर तपासणीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत गुरुवारी धांदल सुरू होती. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाकडून दिवसभर पडताळणी झाली. पथकाला आवश्यक कागदपत्रे, योजनांची अंमलबजावणी संबंधातील माहितीचे सादरीकरणाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती.

पंचायत राज सशक्तीकरणअंतर्गत 'नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार' आणि 'ग्रामपंचायत विकास आराखडा' पुरस्कारात अव्वल स्थानी असलेल्या पंचायत राज संस्थांची तपासणी झाली. यामध्ये गडहिंग्लज पंचायत समिती व म्हसवे, खानापूर आणि कुशिरे तर्फ ठाणे या ग्रामपंचायतींची तपासणी झाली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासणी केली. तपासणी पथकात दहा अधिकाऱ्यांचा समावेश होता. पथकाची तीन गटांत विभागणी करून जिल्हा परिषद व अन्यत्र तपासणी मोहीम राबवली.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सकाळी पथकाचे स्वागत केले. तत्पूर्वी सीईओ मित्तल यांनी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. सकाळी ११.१५ वाजल्यापासून प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली. समिती सभागृहात अधिकाऱ्यांकडून विविध योजनांचा आढावा घेतला. गडहिंग्लज पंचायत समितीसह अन्य तीन ग्रामपंचायतींची फेरतपासणी झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तपासणीचे काम सुरू होते.

पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत राज सशक्तीकरण पुरस्काराच्या प्राथमिक फेरीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद ६३ गुण मिळवून प्रथम क्रमांकावर राहिली. गुरुवारी झालेल्या फेरतपासणीनंतरचा अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत केंद्राकडे सादर होणार आहे. राज्यस्तरीय समितीची शनिवारी (ता. २९) मुंबईत बैठक होणार आहे. राज्याच्या अहवालानंतर केंद्राकडून अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या हस्ते एन.डीं.च्या सत्काराचा पहिल्यांदाच योग

$
0
0

पवारांच्या हस्ते एन.डीं.च्या

सत्काराचा पहिल्यांदाच योग

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले,' शरद पवार आणि एन.डी.पाटील ही महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील दोन मोठी व्यक्तिमत्वे आहेत. पवार यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्याचा योग विद्यापीठाच्या माध्यमातून पहिल्यांदाच जुळून आला आहे. यामुळे हा कार्यक्रम सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासाठी खूप महत्वाचा ठरणारा आहे. या कार्यक्रमाविषयी मलाही कमालीची उत्सुकता लागून राहिलीय.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० कॉलेजमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे

$
0
0

विद्यापीठाचा लोगो ...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात प्रायोगिक तत्वावर प्लास्टिकचा वापर करुन रस्ता निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी प्लास्टिक, मुरुम व अन्य घटकांचा वापर केला आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ७०० मीटरचा रस्ता होणार आहे. तसेच लोकसहभाग व सीएसआर फंडातून तीन जिल्ह्यातील ५० कॉलेजमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह बांधणी प्रस्तावित आहे.

विद्यापीठात पहिल्यांदाच प्लास्टिकचा अवलंब करुन रस्ता बांधणी होत आहे. रसायनशास्त्र विभाग ते सिंथेटिक ट्रॅकपर्यंतपर्यंतचा मार्ग निश्चित केला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत हा रस्ता पूर्ण होईल. 'शिवमार्ग' या नावांनी रस्ता तयार होत आहे. प्लास्टिकचा वापर केल्यामुळे जवळपास २५ टक्के खर्चात बचत होणार आहे. कंत्राटदारामार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. सिंथेटिक ट्रॅकच्या आतील मोकळ्या जागेचाही खेळासाठी वापर करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवरुन सुरू असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.

जुन्या राष्ट्रीय महामार्गामुळे विद्यापीठाचा परिसर दोन भागात विखुरला आहे. विद्यापीठासमोरील रस्त्याच्या पलीकडील भागात नॅनो टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान विभाग, शिक्षणशास्त्र विभाग, प्रौढ व निरंतर शिक्षणशास्त्र विभाग आहेत. त्याशिवाय त्या परिसरात विद्यापीठाचे काही नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भुयारी मार्ग होणार आहे. या कामासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. विद्यापीठासह कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्न कॉलेजचा लोकसहभाग व सीएसआर फंडातून विकास व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात तीन जिल्ह्यातील सुमारे ५० कॉलेजमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी आवश्यक निधी जमविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील जवळपास १००० मुलींना मोफत बस प्रवास सुविधा देण्यात येणार आहे.

........

विद्यापीठात आज आविष्कार संशोधन स्पर्धा

विद्यापीठांतर्गत जिल्हास्तरीय, पदव्युत्तर व मध्यवर्ती स्तरावरील संशोधन स्पर्धेचे शुक्रवारी आयोजन केले केले आहे. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात या स्पर्धा होणार आहेत. सहा गटात स्पर्धा होणार आहे. पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग राहील. सकाळी ११ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. पहिल्या गटात यामध्ये मानव्यशास्त्र, भाषा , ललितकला व शिक्षणशास्त्रचा समावेश आहे. याशिवाय वाणिज्य व कायदा, मूलभूत विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषधशास्त्र अशा सहा विषयांत स्पर्धा होईल, अशी माहिती प्रकुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के यांनी दिली.आविष्कार संशोधन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरणार आहे.

............

मूक व कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा

शिवाजी विद्यापीठ व मूक कर्णबधीर विद्यार्थी असोसिएशनतर्फे शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. विद्यापीठातील मैदानावर सकाळपासून स्पर्धेला सुरुवात होईल. यामध्ये जवळपास २०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कठापूरकर यांना पन्नालाल घोष पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कधी शांत तर कधी गंभीर तरल भावना प्रकट करणारे बासरीचे सूर अशा उत्साही वातावरणात तबला आणि बासरीच्या जुगलबंदीने साकारलेला अभिजात संगीतातील गोडवा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त होते पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलन व स्मृती गौरव पुरस्काराचे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात यंदाचा पंडित पन्नालाल घोष स्मृती गौरव पुरस्कार तरुण बासरीवादक वरद कठापूरकर यांना केवलसिंग राजपूत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. बासरीवादक सचिन जगताप यावेळी प्रमुख उपस्थित होते.

पुरस्कार प्रदानासह बासरी वादनाचा सुरेल कार्यक्रम रंगला. शास्त्रीय बासरी वादनाबरोबरच मराठी, हिंदी सिनेमातील गीतांवर आधारित बासरी वादनाच्या माध्यमातून रसिकांना स्वरविश्वाची सुरेल मैफल अनुभवता आली. राग पूरिया कल्याण, रूपक तालच्या सादरीकरणाने वातावरणात रंगत आली. चित्रपटातील 'मोगरा फुलला', 'राधा ही बावरी' या गाण्यांवर सादर केलेली बासरी रसिकांचे मन मोहून टाकणारी होती. 'झाल्या तिनी सांजा', 'आपकी नजरोंने', 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या' या गीतांवर केलेल्या बासरी वादनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता विघ्नेश जोशी यांनी केले. त्यांना की बोर्ड साथ ओमकार देवस्कर, तबलासाथ प्रशांत देसाई, ढोलकीसाथ धीरज वाकरे तर संजय साळुंखे यांनी अॅक्टोपॅड साथ केली.

फोटो - अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’ आजारी घोषित करून प्रशासक नेमावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दौलत सहकारी साखर कारखाना आजारी घोषित करून त्यावर प्रशासक नेमावा, अशी मागणी दौलत सहकारी साखर कारखाना शेतकरी, सभासद व कामगार बचाव कृती समितीने केली. समितीच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांना समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, बंद व आजारी साखर कारखान्यांना काही निकषांना अधीन राहून मदत करता येते. तीन वर्षांत तोट्यात असणारे कारखाने, मागील तीन वर्षांत कारखान्याच्या क्षमतेपेक्षा ६० टक्क्यांपेक्षा कमी गाळत, तीन हंगामांपैकी एक हंगाम बंद असणारे कारखाने मदतीसाठी पात्र ठरतात. त्यासाठी सरकारने समिती नियुक्ती केली आहे. समितीने सखोल अभ्यास करून दौलत कारखाना या निकषास पात्र ठरत असल्याची शिफारस करावी. दौलत कारखाना आजारी व बंद आहे. त्यामुळे राज्य सरकारने कारखाना आजारी घोषित करावा, कारखान्याची केंद्र व राज्य सरकारची कर्जे माफ करावीत, कारखान्यावर प्रशासक नेमावा, कारखान्याचे जिल्हा बँकेचे कर्ज पुढील दहा वर्षे पुनर्गठणाचे आदेश द्यावेत, शेतकरी व कामगारांची देणी त्वरित द्यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, समितीचे अध्यक्ष अॅड संतोष माळवीकर, प्रा. एन. एस. पाटील, प्रदीप पवार, अनिल होडगे, प्रकाश पाटील, संभाजी भोकरे, उत्तम पाटील आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images