Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नवोपक्रम स्पर्धा

$
0
0

कोल्हापूर : राज्यातील पूर्व प्राथमिक स्तर ते उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांबरोबरच पर्यवेक्षकीय अधिकारी, विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती यांच्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०१८-१९ ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. स्पर्धेसाठी जास्तीत जास्त नवोपक्रम 'www.maa.ac.in/innovation 2018-19' या लिंकवर ३१ डिसेंबरपर्यंत जमा करावेत असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य आय.सी.शेख यांनी केले आहे. स्पर्धा पाच गटात होईल. पूर्वप्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या, सेविका व पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक, माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता यांच्यासाठी स्पर्धा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रतिज्ञा पत्रावर बहिष्कार

$
0
0

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका व मदतनिसांकडून भरुन घेतले जात असलेल्या लहान कुटुंब प्रतिज्ञा पत्र अंगणवाडी सेविकांनी भरुन घेऊ नये असे आवाहन जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केले आहे. हा फॉर्म सरकारी परिपत्रकाला सोडून आहे, तसेच अंगणवाडी सेविका मदतनीसांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे राज्यभर प्रतिज्ञापत्र भरण्यावर संघटनांनी बहिष्कार घातला आहे. सरकारने प्रथम आपला प्रतिज्ञापत्र नमुना दुरुस्त करावा. मगच संघटना याबाबत सहकार्याची भूमिका घेतील असे संघटनेच्या सुवर्णा तळेकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमनगरात नवा धान्य बाजार तयार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विक्रमनगर येथील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या नवीन धान्य बाजाराचे उद्घाटन आठ जानेवारीला करण्याचा निर्णय समितीचे संचालक व धान्य व्यापाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती बाबासाहेब लाड होते. नवीन धान्य बाजार सुरु करण्याबाबत आज गुरुवारी विक्रमनगरात धान्य बाजराच्या आवारात बैठक झाली. विक्रमनगरातील २० एकर जागेत २००७मध्ये २१३ धान्य व्यापाऱ्यांना प्लॉट दिले आहे. येथे २८ गाळे तयार असून बाजार समितीने ८० टक्के पायाभूत सुविधा पुरवल्या आहेत. सरंक्षक भिंतीची पडलेली तटबंदी दुरुस्त केली आहे.

बैठकीत व्यापाऱ्यांनी बाजार सुरू करण्यास सहमती दर्शवली. काही सूचनाही केल्या. डीपी रोड बंदिस्त करावा, बांधकामाला पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टाकी बांधावी, मार्केट यार्ड आणि धान्य बाजाराला जोडणारा ओव्हरब्रीज बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, प्रवेशद्वारास सर्व रस्ते दुरुस्त करावेत, पोलिस चौकीजवळ सीसीटीव्ही उभारण्यात यावेत, टेलिफोन आणि इंटरनेटची सोय करावी, प्रवेशद्वाराजवळ लोखंडी फाटक उभारावे, धान्य बाजाराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावावेत अशा मागण्या व्यापाऱ्यांनी केल्या आहेत.

यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष लाड म्हणाले, 'धान्य व्यापाऱ्यांनी बाजार आपला म्हणूनच विकसित करावा. बाजार समितीचे व्यापाऱ्यांना सर्वातोपरी सहाय्य राहील. समितीने वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधासाठी सव्वा कोटी रुपयांची कामे केली आहेत. सुरक्षतेसाठी बंदुकधारी सुरक्षारक्षकांची सोय केली आहे. पोलिस प्रशासनाने सर्वोतोपरी सहकार्य राहणार असल्याने सुरक्षिततेबाबत भीती बाळगू नये.'

संचालक नंदकुमार वळंजू म्हणाले, 'ज्या व्यापाऱ्यांनी अद्याप बांधकाम केलेले नाही, त्यांना तात्पुरते पत्र्याचे शेड बांधून देण्यासाठी बाजार समितीकडून परवानगी देण्यात येईल.'

लक्ष्मीपुरी, शाहूपुरीतील धान्य बाजार स्थलांतरीत करण्यासाठी शहर, जिल्ह्यात जनजागृती करण्याची सूचना व्यापाऱ्यांनी केली. व्यापाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी बाजार समितीने सवलती देण्याची सूचना नयन प्रसादे यांनी केली.

बैठकीला उपसभापती संगीता पाटील, परशुराम खुडे, कृष्णात पाटील, अमित कांबळे, सदानंद कोरगांवकर, नेताजी पाटील, नाथाजी पाटील, भगवान काटे, विलास साठे, दशरथ माने, शारदा पाटील, उत्तम धुमाळ, संजय जादाव, शशिकांत आडनाईक, उदयसिंग पाटील, आशालता पाटील, शेखर येडगे, बाबूराव खोत, संजय साने, अॅड. किरण पाटील उपस्थित होते. सचिव मोहन सालपे यांनी प्रास्ताविक केले.

पोलिसांकडून नाइट राऊंड

राजारामपुरी, शाहूपुरी पोलिसांकडून विक्रमनगरातील धान्य बाजारात नियमित गस्त घातली जात आहे. गेल्या महिनाभरात पोलिसांनी धान्य बाजारात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांना चोप दिला आहे. काही हुल्लडबाजांना राजारामपुरी पोलिसांनी अटक करुन कारवाई केली आहे. बाजार समितीने चार बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यू कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागात माजी विद्यार्थी मेळावा

$
0
0

कोल्हापूर : 'परीक्षेतील गुणांचा विचार न करता विद्यार्थी दशेत जिज्ञासा, कष्ट, जिद्द व खूप कष्ट करण्याची तयारी व सरावातील सातत्य या गुणांच्या आधारे स्वतला सिध्द करा' असे प्रतिपादन डॉ. संजय चराटी यांनी केले.

न्यू कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागातर्फे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होत. १९८४ मधील बीएस्सी वर्गाचे विद्यार्थी आणि आताच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संयुक्त मेळावा झाला. याप्रसंगी शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सध्याची शिक्षण पध्दती, विद्यार्थी व पालकांची शिक्षणाप्रती असणारी उदासिनता, भविष्यात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी तयारी याबाबत मार्गदर्शन केले. माजी प्राचार्य के. आर. यादव यांनी मार्गदर्शन केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख श्रीमती जे.एस.क्षिरसागर यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. एस.डी.बजागा यांनी करुन दिला. यशस्वी पाटील व ऐश्वर्या क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. निलेश भाट यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रेचा सन्मान ठेवा

$
0
0

कोल्हापूर : ओढयावरील रेणुका मंदिरात प्रशासनातर्फे गेली सात वर्षे अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून काळजी घेत आहे. भाविकांनी देवीला शनिवारी (ता. २९) आंबील यात्रेला पारंपरिक नैवेद्य देवून यात्रेचा सन्मान ठेवावा. देवीला शिद्याऐवजी नैवेद्य देण्याचे महात्म आहे असे पत्रक पुजारी सुनिल विलास मेढे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. दहीभात, आंबील, वडी भाकरी, वांग्याची भाजी, मेथीची भाजी, गाजर केळी, कांद्याची पात, लिंबू अशा भाज्या व फळे देवीला अर्पण करतात. त्याचबरोबर हिवाळ्यात नव्याने आलेले अन्न पदार्थ शरीराला उपयुक्त असतात. यात्रेनिमित्त भाविक नैवेद्याचा सहभोजन करतात. जमा झालेला नैवेद्य देवस्थान समिती प्रसाद म्हणून वाटप करते असे पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर विद्यापीठाचा १९ला दीक्षान्त समारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीक्षान्त समारंभ १९ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या दीक्षान्त मंडपात होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

या दीक्षान्त सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी सांगितले. यावेळी डॉ. सहस्रबुद्धे दीक्षान्त भाषण करणार आहेत. डॉ. सहस्रबुद्धे मूळचे कर्नाटकातील हुबळीचे असून, ते गेल्या ३५ वर्षांपासून अभियांत्रिकी, वैज्ञानिक क्षेत्रात कार्यरत असून शासनाच्या महत्त्वाच्या विविध पदांची जबाबदारी ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. प्रशासनाचाही दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ व वैज्ञानिक म्हणून ते परिचित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलकापूर नगरपरिषदेसाठी नव्या वर्षात धूमशान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड तालुक्यातील नवनिर्मित मलकापूर नगरपरिषदेसाठी नववर्षात निवडणूक धूमशान रंगणार आहे. नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होऊन 'क' वर्ग दर्जा मिळालेल्या मलकापूर नगरपरिषदेसाठी रविवारी, २७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर २८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यासंदर्भात गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे मलकापूर नगरपरिषदेचे धुमशान सुरू झाले आहे. मात्र, याबाबत २९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत.

मलकापूर नगरपरिषदेच्या मतदानाची तारीख राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या १९ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, जवळपास १८ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण पडले असून, नवनिर्मित मलकापूर नगरपरिषदेचा पहिला नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. तर पहिल्या नगराध्यक्ष पदासाठी अपेक्षित खुल्या प्रवर्गातील आरक्षण पडण्यासाठी इच्छुकांची निराशा झाली आहे. मात्र, निर्धारित आरक्षणाचा स्वीकार करून थेट लढतीसाठी काँग्रेस आणि भाजप सज्ज झाले आहेत. त्यामुळे थेट जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्षपदाचा मान कोणाला मिळणार, याकडे मतदार, नागरिकांसह तालुक्यातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

मलकापूर नगरपरिषदेसाठी २७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या कालावधीत मतदान घेण्यात येणार आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी २८ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. याबाबत सविस्तर निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल या शनिवारी, २९ डिसेंबर रोजी जाहीर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतोष पोळची सुनावणी ७ जानेवारीला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सहा जणांच्या हत्याकांडाचा आरोप असलेला वाईतील कथित डॉक्टर संतोष पोळची सुनावणी सात जानेवारी रोजी होणार आहे. वाई येथील अंगणवाडी सेविका मंगल जेधे यांचा खून झाल्यानंतर एका पाठोपाठ एक असे सहा खून डॉ. पोळने केल्याचे उघडकीस आले होते. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले होते. संतोष पोळ हा सध्या कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आहे. बुधवारी त्याच्यावर असलेल्या आरोपाची सुनावणी असल्याने त्याला कळंबा करागृहातून साताऱ्यात आणण्यात आले होते. न्यायालयासमोर त्याला हजर केल्यानंतर न्यायालयाने सुनावणी सात जानेवारी रोजी ठेवली. त्यानंतर पोळला पुन्हा पोलिस बंदोबस्तात कोल्हापूरला नेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चेकवर बनावट सही करुन ८६ हजारांची चोरी

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, कसबा बावडा,

शिरोली एमआयडीमधील जैन स्टील कंपनीचे महेंद्र सोहनमल जैन (वय ६२ वर्षे, प्रतिभानगर) यांच्या नावाच्या चेकवर बनावट सही करुन सुपरवायझरकडून एचडीएफसी बँकेतील ८६, ५०० रुपये चोरण्याचा प्रकार उघडकीस आला. महैंद्र जैन यांनी या चोरीप्रकरणी सुपरवायझर अमजद उस्मान मुल्लाच्या विरोधात शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून ३,४५,५०० रुपयेही बनावट सही करुन चोरण्याचा प्रयत्न झाला होता. पण वेळीच त्याचा सुगावा लागल्याने चोरीचा प्रयत्न असफल ठरला. एचडीएफसी बँकेत चेक वटवून पैसे काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संशयित मुल्लाने एक सप्टेंबर रोजी शिरोली एमआयडीसीमधील जैन स्टील कंपनीत मालकांच्या संमतीशिवाय चेकबुकमधील चेक चोरला व त्यावर बनावट सही करुन ८६,५०० रुपये काढले. याच पध्दतीने मुल्लाने १२ सप्टेंबर रोजी चेक चोरुन, त्यावर मालकाची बनावट सही करत ३,४५,००० रुपये काढण्यासाठी बँकेत चेक वटविण्यासाठी दिला होता असे फिर्यादित म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राफेलप्रकरणी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

'राफेल विमान खरेदी प्रकरणातील घोटाळा सर्वांत मोठा असून, ते लपविण्यासाठीच केंद्र सरकारकडून संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी दुर्लक्षित केली जात आहे. परंतु, या प्रकरणाची सखोल, पारदर्शक चौकशी करण्यासाठी 'जेपीसी' नियुक्त करावी. समितीसाठी काँग्रेस आग्रही राहणार असून, त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू,' असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी दिला.

राफेल प्रकरणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, अजित पाटील-चिखलीकर, राजेंद्र माने, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.

'राफेल विमानांची गुणवत्ता चांगली असून, गुणवत्तेबाबत काँग्रेसच्या मनात कोणतीही शंका नाही. परंतु, मुळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेसला राफेल विमाने नको असल्याचा भ्रामक प्रचार भाजपकडून काही माजी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सुरू आहे. 'यूपीए' सरकारने हवाई दलाशी चर्चा करून २०११ साली फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीशी १२६ विमानांच्या खरेदीचा करार केला होता. पैकी ३६ विमाने फ्लाइंग कंडिशनमध्ये खरेदी केली जाणार होती, तर उर्वरीत बेंगळुरूच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीत असेंम्बल करण्याचे करारामध्ये नमूद करण्यात आले. परंतु २०१४ साली केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दसॉल्टशी नवीन करार केला. त्यात काँग्रेसने ठरविलेला एका विमानाची किंमत ५२६ कोटीवरून १६०० कोटी करण्यात आली. म्हणजेच एका विमानामागे तब्बल १ हजार ७४ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. शिवाय आधीच्या करारामध्ये ३६ विमानांच्या खरेदीचा ठराव झाला असताना नवीन करारामध्ये तो आकडा १८ वर म्हणजे निम्याने कमी करण्यात आला. त्यामुळे विमानांच्या किमती वाढवण्याबाबतचा सविस्तर खुलासा सरकारने करण्याची गरज आहे,' अशी मागणी महाजन यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११७ ग्रा.पं. सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

हातकणंगले तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या आरक्षित जागांवर निवडणुका लढविलेल्या ३८१ सदस्यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्र संदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी सुनावणी झाली. दरम्यान, विहित मुदतीत ३७ सदस्यांनी जातपडताळणीची आवश्यक कागदपत्रेच जमा केलेली नाहीत, तर ८० सदस्यांनी मुदतीनंतर कागदपत्रे सादर केलेल्या ११७ सदस्यत्वावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर विजयी झालेल्या ३८१ सदस्यांना जात प्रमाणपत्राच्या पडताळणी संदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार प्रांताधिकारी समीर शिंगटे, हातकणंगले तहसीलदार सुधाकर भोसले यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. तालुक्यातील हालोंडी, तासगाव, मिणचे, नेज, बिरदेववाडी, दुर्गेवाडी, किणी, मनपाडळे, माणगांववाडी, जंगमवाडी, उदगांव, वडगांव, कुंभोज, कबनूर, माणगाव, चंदूर, लाटवडे, पाडळी, तिळवणी, खोची, रुई, नवेपारगांव, भेंडवडे, हातकणंगले, कोरोची, आळते, इंगळी व रेंदाळ, आदी ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवर, रुबेला लसीकरणात जिल्हा चौथा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत गुरुवारअखेर सात लाख २१ हजार लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. या मोहिमेत राज्यात कोल्हापूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिली. या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते काटकर बोलत होते.

जिल्ह्यात ३१ डिसेंबरअखेर आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचे योग्य नियोजन करून ही मोहीम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी काटकर यांनी केले. ते म्हणाले, 'जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणाविना वंचित राहणार नाही, यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. आवश्यकतेनुसार फिरती पथके तैनात करावीत. गावातील पदाधिकारी, सरपंच आणि यंत्रणेचे योगदान घ्यावे.'

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, 'लसीकरण मोहिमेसाठी संपूर्ण जिल्ह्यासाठी आठ हजार ४६० सत्रांचे नियोजन केले असून, यामध्ये आरोग्य विभागातील पाच हजारांहून अधिक अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. मोहीम संपेपर्यंत दवाखान्यातील लसीकरण सत्रे सुरूच राहतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.'

बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. ज्योती लांडगे, आरसीएच अधिकारी डॉ. अमोलकुमार माने, बालरोगतज्ज्ञ विभागाचे डॉ. एस. एस. सरवदे, जिल्हा माता बालअधिकारी डॉ. फारूख देसाई, उपशिक्षण अधिकारी व्ही. एस. ओतारी, विस्तार अधिकारी ए. एम. आकुर्डेकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. एन.डी.पाटील यांना प्राचार्य कणबरकर पुरस्कार

$
0
0

सिंगल फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य रा.कृ.कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन.डी.पाटील यांना जाहीर झाला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते येत्या बारा जानेवारीला पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, 'विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रा.कृ.कणबरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांची ठेव प्रदान केली आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्या समवेत झालेल्या सामंजस्य करारातून 'प्राचार्य आर.कृ.कणबरकर पुरस्कार'ची संयुक्त निर्मिती झाली. विद्यापीठाने यापूर्वी शास्त्रज्ञ व भारतरत्न डॉ.सी.एन.राव (२०१६), रयत शिक्षण संस्था (२०१७) व निर्माते दिग्दर्शक जब्बार पटेल (२०१८) यांना पुरस्कार दिला आहे. रोख १,५१,००० रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. '

पुरस्काराविषयी बोलताना ते म्हणाले, 'राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जडणघडणीत डॉ. पाटील यांचे महत्वाचे योगदान आहे. समाजकारणासाठी राजकारणाचा वापर करणाऱ्या ध्येयनिष्ठ विचारवंतांच्या फळीचे ते प्रतिनिधी आहेत. नैतिकता हा त्यांच्या प्रत्येक कार्याचा आणि आंदोलनाचा प्रमुख कणा आहे. त्या बळावर त्यांनी टोल हटाव आंदोलनापर्यंतची अनेक आंदोलने यशस्वी केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, शेतकरी, कष्टकरी, कामगारांची चळवळ, सीमाप्रश्नाचा लढा या साऱ्या चळवळींना नैतिक अधिष्ठान प्राप्त करुन दिले. विद्यापीठाची स्थापना व त्यानंतरच्या जडणघडणीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. विद्यापीठाने त्यांच्या योगदानाबद्दल २००६ मध्ये त्यांना विद्यापीठाची सर्वोच्च मानद पदवी डि.लिट देऊन गौरव केला आहे.'

पत्रकार परिषदेला प्रकुलगुरू डॉ.डी. टी.शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर, वित्त व लेखाअधिकारी व्ही.टी.पाटील, शैक्षणिक सल्लागार प्राचार्य डी.आर. मोरे, शोध समिती सदस्य डॉ. जे.एफ.पाटील, प्राचार्य बी.ए.खोत, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारती पाटील, उपकुलसचिव व्ही.एन.शिंदे, वैभव ढेरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत-रशियाचे ऋणानुबंध राजकीय संबंधांपलीकडचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारत आणि रशियाचे ऋणानुबंध हे राजकीय संबंधांच्या कितीतरी पुढे आहेत. व्यक्तीपेक्षा समूहाला, समाजाला दिलेले महत्व हा दोन्ही देशांच्या जनमानसाला जोडणारा प्रमुख धागा आहे,' असे प्रतिपादन रशियातील विचारवंत, सहकार चळवळीतील कार्यकर्ते आणि न्युक्लिअर फिजिसिस्ट वदिम लपीन यांनी केले. समाजवादी प्रबोधिनी शाखा आणि सत्यशोधक युवा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने, 'रशियाचे अंतरंग' या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या रशियन भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

शाहूपुरीतील भाई माधवरावजी बागल विद्यापीठात हा परिसंवाद झाला. परिसंवादात डॉ. पानसरे व रशियन अभ्यासक ईशाद वडगावकर यांनी दुभाषकाची भूमिका पार पाडली. समाजवादी प्रबोधिनीचे कोल्हापूर शाखाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर प्रमुख उपस्थित होते.

वदिम लपीन म्हणाले, 'भारतात येण्याची माझी ही तिसरी वेळ आहे. मी अनेक देशांत फिरलो असलो तरी, भारताची ओढ काही औरच आहे. भारतातील माणसं, त्यांची आपुलकी या गोष्टी मला विशेष भावतात. योगी अरविंद आणि जे. कृष्णमूर्ती यांचे साहित्य मी वाचले आहे. त्यांच्या साहित्याचं माझ्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. महात्मा गांधींचे विचारानेही मला नेहमी आकर्षित केले आहे. लिओ टॉल्स्टॉय - महात्मा गांधी यांचं वैचारिक नातंही भारत-रशियाचे ऋणानुबंध सांगणारं आहे. गेल्या दोन दिवसांत कोल्हापूरच्या माणसांनी भरभरून प्रेम दिले आहे. ईशादमुळे मला आपल्याशी बोलायची संधी मिळाली, त्यामुळे मी त्याचा आभारी आहे.'

अमित सासणे यांनी रशियातील सेंट पीटरच्या पुतळ्याप्रमाणे बनविल्या गेलेल्या महाराणी ताराराणींच्या पुतळ्याचा इतिहास सांगितला. उपस्थितांनी सोव्हिएत युनियनचा कालखंड आणि पतनानंतरचा कालखंड यांविषयी सामाजिक, आर्थिक, राजकीय अंगाने प्रश्न विचारले. रशियन मानसिकता, धार्मिकता, ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्च, सायबेरिया इत्यादींविषयी उपस्थितांमध्ये कुतूहल दिसून आले. वदिम लपीन यांनी उपस्थितांशी चर्चा केली. डॉ. पानसरे यांच्या हस्ते लपीन यांना शाहू महाराजांवरील 'राजर्षी' हा सचित्र ग्रंथ भेट देण्यात आला. रशियन साहत्यि, कला आणि संस्कृती यांचा आढावा घेत डॉ. पानसरे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

यावेळी खगोल अभ्यासक किरण गवळी, दत्तात्रय घुटूकडे, यश आंबोळे, वैभव राऊत, भारत जीवन, निखिल राऊत, मल्हार पानसरे यांच्यासह समाजवादी प्रबोधिनी व सत्यशोधक युवा परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. अमित सासणे यांनी स्वागत केले. निखिल कुंभार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पॅचअप’साठी प्रदेशाध्यक्षांची मध्यस्थी

$
0
0

दोन सिंगल फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यात पुन्हा समेट घडवण्यासाठी राज्यपातळीवरून प्रयत्न केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून जानेवारीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. बारा जानेवारीला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार कोल्हापुरात येणार असून त्यापूर्वी या हालचाली होण्याची शक्यता आहे.

लोकसभेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी जवळजवळ निश्चित आहे. समझोत्यानुसार कोल्हापूर राष्ट्रवादीला तर हातकणंगले 'स्वाभिमानी'ला सोडण्यात आले आहे. कोल्हापूरातून महाडिक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यांना पक्षातील विरोध मावळला असला तरी काँग्रेसमधील एका गटाचा विरोध कायम आहे. आमदार पाटील यांनी बोलणार नाही, पण भूमिका स्पष्ट आहे असे सांगून भविष्यकाळात काय करणार याचे संकेतच दिले आहेत. हा विरोध कायम राहिल्यास राष्ट्रवादीला ते जड जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला जिंकायची असेल तर गतनिवडणुकीप्रमाणे काँग्रेस एकदिलाने सोबत असणे आवश्यक आहे. याची जाणीव पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही आहे. यामुळेच त्यांच्या पुढाकाराने आता पॅचअपसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही सोबत घेण्यात येणार आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन पवारांनी मास्टर स्ट्रोक मारला आहे. वडिलच राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याने आमदार सतेज पाटील यांच्यावर मर्यादा येणार आहेत. पण प्रवेशाच्या प्रक्रियेत कुटुंबाला अंधारात ठेवल्याचा राग शांत करण्याबरोबरच त्यांनी राष्ट्रवादीला उघड विरोध करू नये यासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या निवडणुकीत हा प्रयत्न यशस्वी झाला. पण नंतर महाडिक गटाने विधानसभेत दगाबाजी केली. याचा राग अजूनही पाटील गटाला आहे. त्यामुळे आता समझोता नाही अशी भूमिका सातत्याने हा गट घेत आहे. पण हा विरोध राष्ट्रवादीला परवडणारा नसल्यानेच पॅचअपचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष यामध्ये पुढाकार घेणार आहेत. याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. आता या दोन्ही युवा नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. या पॅचअपला महाडिक गट तयार असला तरी सध्या पाटील गट मात्र त्या मनस्थितीत नाही. पण पक्षाने आदेश दिल्यास या गटाला नमती भूमिका घ्यावी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही प्रदेशाध्यक्षांच्या मध्यस्थीने हा वाद मिटावा अशी पक्षाच्या नेत्यांची अपेक्षा आहे. तसे न झाल्यास पवारांना यामध्ये लक्ष घालावे लागणार आहे. राजकीय वाटचालीसाठी त्यांना एक एक जागा महत्वाची आहे. त्यामुळे कोल्हापूरची जागा काहीही करून जिंकण्यासाठी ते प्रयत्न करतील. येत्या १२ जानेवारीला ते कोल्हापुरात येणार आहेत. तत्पूर्वी हा वाद मिटवण्यासाठी सध्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

.........

चौकट

हा असेल पर्याय

या पॅचअपसाठी दोन्ही नेत्यांना काही पर्याय देण्यात येणार असल्याचे समजते. त्यानुसार लोकसभेला धनंजय महाडिक यांना मदत केल्यानंतर कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील अथवा आमदार सतेज पाटील यांचा मार्ग मोकळा करण्याचा प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय विधानपरिषदेच्या मार्गातही पाटील यांच्या आड महाडिक गटाने येऊ नये असा शब्द घेतला जाईल. यामुळे खासदार महाडिक, अमल महाडिक, सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांची राजकीय वाटचाल सुकर होणार आहे.

..........

चौकट

शरद पवारांची सूचना

महाडिक यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीला आमदार पाटील यांचा उघड विरोध आहे. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील व आमदार पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही भेट कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी देखील पाटील यांनी महाडिक यांना विरोध करत प्रा. मंडलिकांचे नाव सुचवले. पण त्याला पी.एन. यांनी हरकत घेतली. ज्यांनी 'गोकुळ' च्या राजकारणात विरोध केला, त्यांना पाठिंबा नाही अशी भूमिका पी.एन. यांनी मांडली. आमदार पाटील यांनी यापुढे लोकसभा उमेदवारीबाबत उघडपणे काहीही बोलू नये, अशी सूचना यावेळी पवारांनी केली. त्यामुळे तेव्हापासून ते शांत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हातात कमळ, पदाची माळ कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात भाजपची सत्ता येणार म्हणून, तर काहींनी सत्ता आली म्हणून पद मिळेल या आशेने हातात कमळ घेतले; पण सरकारचा कालावधी संपत आला तरी महामंडळाचा दरवाजा उघडत नसल्याने सध्या इनकमिंग नेत्यांमधून नाराजीचा सूर आहे. वर्षानुवर्षे पक्षाचे काम करत असतानाही आता संधी असताना पद मिळत नसल्याने अनेकजण नेत्यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन महिन्यांत आचारसंहिता लागणार असल्याने या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

मध्यंतरीची साडेचार वर्षे वगळता राज्यात भाजप-सेनेची सत्ता नव्हती. त्यामुळे सत्तेबाहेर असलेले कार्यकर्ते केवळ आंदोलक म्हणूनच जबाबदारी पार पाडत होते. पण चार वर्षांपूर्वी मोदी लाट आली. या लाटेमुळे राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले. शिवसेनेला सोबत घेऊन राज्यात सत्तेचे कमळ फुलले. आंदोलने करून कंटाळलेल्या कार्यकर्त्यांना सत्तेची फळे चाखायला मिळणार म्हणून ते खूश झाले. त्यानुसार काहींना संधीदेखील मिळाली. बाबा देसाईंना गोकुळचे संचालकपद, महेश जाधव यांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे, तर हिंदुराव शेळकेंना वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले. भाजपमध्ये प्रवेश केलेले कागलच्या शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, योगेश जाधव, अनिल यादव यांनाही महत्त्वाची पदे मिळाली. काहींना जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकेत पदाधिकारी होता आले. शौमिका महाडिक जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्या, आशीष ढवळे महापालिकेत स्थायी समितीचे सभापती झाले, अलका स्वामी इचलकरंजीच्या, तर नीता माने जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा झाल्या. इतर अनेकांनाही काही ना काही लाभाचे पद मिळाले; पण अजूनही अनेकजण पदांच्या प्रतीक्षेत आहेत.

सत्ता येताच माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अॅड. संपतराव पवार, अशोक देसाई, विजय जाधव यांच्यासह काहींची नावे विविध पदांसाठी पाठवली गेली. पण चार वर्षे झाली तरी अजूनही यांना ना महामंडळ मिळाले ना कोणते महत्त्वाचे पद. राज्यात बाराशे पदांवर शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजप ७० टक्के, तर सेनेला ३० टक्के पदे देण्यात येणार आहेत. यादी तयार असूनही त्याची घोषणा होत नसल्याने दोन्ही पक्षांचे हे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. फेब्रुवारी महिन्याभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे त्यानंतर कोणतीच नियुक्ती होणार नाही. ऑक्टोबरमध्ये या सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. आता तातडीने महामंडळ मिळाल्यास आठ ते दहा महिने तरी काम करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे लवकरात लवकरात लवकर पदांची माळ गळ्यात पडावी यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे.

००००

चुयेकरांना प्रतीक्षा देवस्थानची

पदवीधर मतदारसंघातून माघार घेत माणिक पाटील-चुयेकर यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला. यामुळे पाटील यांचा विजय सुकर झाला. त्याची परतफेड म्हणून चुयेकरांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद देण्याचा शब्द दिला गेला. जून महिन्यात हे पद त्यांना मिळणार होते, तशा हालचालीही झाल्या. अंबाबाई व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद जाधव यांना आणि चुयेकरांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती देण्यावर चर्चा झाली. पण अचानक ही प्रक्रिया थंडावली. सहा महिने उलटले तरी अजूनही याबाबत पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही. यामुळे चुयेकर नाराज आहेत.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडकडेंच्या गायनानेउपस्थित मंत्रमुग्ध

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भालचंद्र चिकोडे वाचनालयाच्या वतीने आयोजित नवऊर्जा उत्सवात गुरुवारी प्रसिद्ध गायक अजित कडकडे आणि सहकलाकारांनी श्री दत्तावर आधारित भक्तिमय गीतांसह एकापेक्षा अनेक मराठी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सकाळच्या सत्रात महिलांच्या उपस्थितीत मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त श्रीसूक्त उत्साहात पार पडले.

सायंकाळी कडकडे यांच्या गायनाने ऊर्जा उत्सवाला भक्तिमय रूप आले. कडकडे यांच्या परब्रह्म सद्गुरू, दत्त दत्त नामाचा महिमा, अबीर गुलाल उधळीत रंग, शिर्डी माझे पंढरपूर, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गाण्यांसाठी रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात स्वयंम विशेष मुलांची शाळा , राजर्षी शाहू विद्यालय, मनपा शाळा क्रमांक आठ, चाटे हायस्कूल शाहूपुरी, स्मार्ट प्ले स्कूल या शाळांनी उत्सवास भेटी दिल्या.

दुपारी बाबा आमटे यांच्या शाळेतील विद्यार्थी कलाकारांनी स्वरानंदन कार्यक्रमातील प्रार्थना, कव्वाली त्याचबरोबर किशोर कुमार, महंमद रफी यांची गाणी तसेच अनेक मिमिक्री सादर केली. यावेळी अपंग हास्य कलाकार संभाजी भगवान जाधव, वृक्षमित्र प्रतीक बावडेकर, दिलीप पोलादे, हॉटेल व्यावसायिक कविता कडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, बी. बी. यादव, भाजप जिल्हाध्यक्ष, संदीप देसाई, चाटे शिक्षण समूहाचे भरत खराटे, महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल, पत्रकार संदीप राजगोळकर, राहुल देसाई, राहुल चिकोडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’मध्ये संचालक मंडळात फूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या राजीनामा प्रश्नावरुन संचालक मंडळात माजी आमदार महादेवराव महाडिक आणि पी.एन. पाटील अशी फूट पडली आहे. अध्यक्षांनी राजीनाम्यास नकार दिल्याने महाडिक व पी.एन. यांच्यात भविष्यात संघर्ष उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'गोकुळ'चे नेतृत्व महाडिक व पी.एन. पाटील यांच्याकडे असून दोन्ही गटाच्या सहमतीमुळे विश्वास पाटील हे गेली पावणेचार वर्षे अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. अध्यक्ष बदलावा ही मागणी होऊनही नेते मंडळींनी दुर्लक्ष केल्याने १२ संचालकांनी अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी बंडाचा पवित्रा घेतला. बंड करणाऱ्या संचालकांची नेतेमंडळींनी 'हजेरी' ही घेतली. अध्यक्षांविरोधात असंतोषाचे वारे वाहत असल्याचे लक्षात आल्यावर १४ डिसेंबर रोजी अध्यक्षांनी महाडिक यांच्याकडे राजीनामा दिला. हा राजीनामा महाडिक यांनी स्वत:जवळ ठेवून घेतला.

शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, असा निरोप घेऊन महाडिक यांचे जवळचे कार्यकर्ते रघू पाटील गोकुळच्या कार्यालयात आले. पण नेतेमंडळींना मी एक जानेवारीला राजीनामा देणार असल्याचे सांगितल्याचे कारण सांगत अध्यक्ष पाटील यांनी राजीनाम्यास नकार दिला. त्यामुळे बंड केलेल्या १२ संचालकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. बैठकीस पी.एन. पाटील गटाचे पाच संचालक उपस्थित राहिले. कोरमअभावी अध्यक्ष पाटील यांनी सभा तहकूब केली व ते एका विवाह समारंभाला निघून गेले. तसेच बैठकीला उपस्थित पी.एन. गटातील संचालक बाळासाहेब खाडे, पी.डी. धुंदरे, सत्यजित पाटील, उदय पाटील यांनीही कार्यालय सोडले. महाडिकांचा आदेश डावलून अध्यक्षांनी राजीनाम्यास नकार दिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नेतेमंडळी व संचालकांत फोनाफोनी झाली. पाटील यांच्या राजीनाम्याशिवाय सभा होणार नसल्याचे महाडिक गटाच्या १२ संचालकांनी स्पष्ट केले. अखेर शुक्रवारची तहकूब सभा चार जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षांनी एक जानेवारीनंतर राजीनामा देणार असल्याचे नेते व संचालकांना सांगितल्याचे समजते.

.............

मोठे आर्थिक व्यवहार

गोकुळमध्ये पुढील दोन ते चार महिन्यात मोठे आर्थिक व्यवहार होणार आहेत. या व्यवहारात आपल्या बाजूचा संचालक अध्यक्ष असावा यासाठी महाडिक व पी.एन. यांच्याकडून पडद्यामागून सुत्रे हलविली जात आहेत. गोकुळ हा आर्थिक स्त्रोत असल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी त्याचा फायदा होणार असल्याने पाटील यांच्या राजीनाम्यास विलंब होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

............

पी.एन. यांच्या वर्चस्वामुळे ज्येष्ठांत नाराजी

गोकुळमध्ये यापूर्वी फक्त महाडिक यांचे आदेश चालायचे. पण गेल्या पावणेचार वर्षात निर्णय प्रक्रियेत पी.एन. पाटील यांचा हस्तक्षेप वाढला आहे. त्याला महाडिक यांच्याकडून प्रतिसाद मिळत असल्याने ज्येष्ठ संचालकांत नाराजी वाढली आहे. मल्टिस्टेटचा ठराव मंजूर करताना अध्यक्ष पाटील यांच्याकडून घडलेल्या चुकांवर पी.एन. यांच्याकडून पांघरुन घालण्याचे प्रयत्न झाले तर त्यांच्या चुका निस्तरण्यासाठी महाडिक यांना विरोधकांचे उंबरे झिजवायला लागले, अशी भावना महाडिक गटातील संचालकात बळावली आहे. पी.एन. यांच्या वर्चस्वाला आळा बसण्यासाठी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीतून बंडाची ठिणगी पडली आहे.

...

बहुमत वाढवण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून प्रयत्न

१७ संचालकांपैकी आपल्या गटाकडे जास्त संचालक असावेत, यासाठी महाडिक व पी.एन. यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. पी.एन. यांच्याकडे हक्काचे पाच ते सहा संचालक असून आणखीन तीन ते चार संचालक आपल्या बाजूचे असावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर १२ संचालकांची वज्रमूठ कायम रहावी यासाठी महाडिक गटाकडून प्रयत्न होत आहेत. नेतेमंडळींतील संघर्षाचा फायदा विरोधकांना मिळू नये यासाठी अध्यक्षांचा राजीनामा घेऊन नवीन अध्यक्षाची निवड करावी तसेच संचालकांतील मतभेद उघड्यावर येऊ नयेत यासाठी प्रयत्न होण्याचे मत ज्येष्ठ संचालकांकडून व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी

$
0
0

हातकणंगले

पेठवडगाव (ता. हातकणंगले) शहरातील महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना नाहक त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे व वडगाव शहराध्यक्ष मयूर सणगर यांनी वडगाव पोलिसांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, वडगाव शहरात अनेक नामवंत महाविद्यालये आहेत. गेल्या काही वर्षात प्रांतवाद, जिल्हावादामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत नसलेले काही टवाळखोर तरुण महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांना नाहक त्रास देतात. यामध्ये मुलींची चेष्टा, टिंगलटवाळी, बाहेरील विद्यार्थ्यांना धमकावून पैसे, मोबाइल काढून घेणे आदी प्रकार सर्रास घडत आहेत. यास विरोध केल्यास त्या विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी भीतीने तक्रार देण्यास पुढे येत नाही. टवाळखोरांमुळे काही महाविद्यालये बदनाम होत आहेत. त्यांच्यावर कारवाई करून विद्यार्थ्यांत असलेली दहशत संपवावी.'

निवेदनावर मुंडे, सणगर, सागर पाटील, ओंकार कुंभार, दीपक माने, अनिकेत सणगर, सुजय दिंडे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटी नसल्याने प्रवाशांची अडचण

$
0
0

वाहतूक नियंत्रकाची उद्धट उत्तरे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटीचे वाहक, चालक नसल्याचा फटका नेहमीच प्रवाशांना बसतो. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी कागल,नागाव, भुये, वडगाव मार्गावरील प्रवाशांना आले. तासानंतरही केएमटी न आल्याने प्रवाशांनी शिवाजी पुतळा येथील वाहतूक नियंत्रकांची भेट घेतली. पण त्यांचे समाधान न करता नियंत्रकांनी उद्धट उत्तरे दिली. केएमटी फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असताना नियोजनाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या उत्तरामुळे केएमटीपासून प्रवासी दूर जाण्याची शक्यता आहे.

सकाळी १२९ पैकी ९८ बसेस मार्गस्थ होतात. पण दुपारी ड्युटी बदलल्यानंतर यातील सुमारे १५ ते १८ बसेस कमी होतात. परिणामी प्रवाशांना तासनतास केएमटीची वाट पाहावी लागते. शुक्रवारी सायंकाळी नागाव, जठारवाडी, वडगाव, कागल येथे जाणारे प्रवासी मध्यवर्ती बसस्थानकांवर थांबले होते. तास दोन तासांची प्रतीक्षा करुनही बस न आल्याने प्रवाशांनी शिवाजी पुतळा येथील वाहतूक नियंत्रकांचे कार्यालय गाठले. यामध्ये महिलांचाही समावेश होता. पण प्रवाशांचे समाधान न करता 'आम्ही पास काढण्यास सांगितले होते का, चालक नसल्यामुळे तीन शेड्युल्ड बंद पडली आहेत,' अशी उद्धट उत्तरे देण्यात आली. घरी जाण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी आलेल्या प्रवाशांचा मात्र अशा उत्तरांमुळे चांगलाच हिरमोड झाला. काही प्रवाशांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही फोन केला. मात्र तरीही केएमटी न आल्याने प्रवाशांनी अन्य मार्गांचा वापर करुन घरी जाणे पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images