Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सीपीआरमध्ये जन्मलेली ७६६ बालके कमी वजनाची

$
0
0

गेल्या आठ महिन्यांतील आकडेवारी, आहारातील दुर्लक्षाचा बाळाच्या वाढीवर परिणाम

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या सीपीआरमधील प्रसूती विभागात गेल्या आठ महिन्यात जन्मलेली ७६६ बालके कमी वजनाची असल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे. गरोदर मातांच्या आरोग्यासह आहाराकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे बालकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या सप्ताहात देशभरात आहाराविषयी जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. गरोदर मातांना रोजच्या आहारातून शरीरास आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची पूर्तता होणे आवश्यक असते. कारण त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होत असतो. अनेकदा महिलांच्या आहाराविषयी सजगता बाळगली जात नाही. मातेला सकस आहार मिळाल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढून इतर आजारांशी मुकाबला करण्याची तिच्या शरीराची शक्ती वाढत असते. प्रत्येक वयोगटानुसार आहाराच्या पद्धतीत बदल होत असतात. विशेषतः लहान मुले, गरोदर महिलांना सकस आहाराची नितांत आवश्यकता असते. गरोदर मातांच्या आहाराकडे दुर्लक्ष झाल्यास बाळाची वाढ पुरेशी होत नाही. त्यामुळे भविष्यात त्या बालकाला विविध आजारांसह व्यंगाला सामोरे जावे लागते. तसेच नैसर्गिक प्रसुतीत अडथळे निर्माण होतात. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गरोदर मातांच्या आरोग्याचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात.

..........

गैरसमजाचे प्रमाण अधिक

शहरासह विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये अनेक गैरसमज रुजलेले असतात. त्यामध्ये कॅल्शियम तसेच लोहाच्या गोळ्या गर्भवती मातेने घेतल्यास बाळाचे वजन वाढेल व सिझर करण्याची वेळ येते असे गैरसमज पसरवले जातात. त्यामुळे महिला अशा गोळ्यांकडे दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. मुख्यत: कॅल्शियम तसेच लोहाच्या गोळ्यांचा बाळावर कोणताही परिणाम होत नाही.

..........

कुटुंबीयासह महिलांनी घ्यावी विशेष काळजी

गरोदरपणात महिलांना लोहयुक्त आहार मिळेल याकडे कुटुंबियांनी लक्ष देणे गरजेचे असते. अजूनही ग्रामीण भागात पुरुषांच्या जेवणानंतर महिला जेवण करतात. गरोदरपणाच्या कालावधीत महिलांच्या आरोग्याकडे जास्तीचे लक्ष देणे गरजेचे असते. त्यांच्या आहारात पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, ड्रायफ्रूट, गुळ, शेंगा आदींचा समावेश असणे महत्वाचे ठरते. याबरोबरच डॉक्टरांकडून वेळोवेळी विविध तपासण्या करणे गरजेचे असते. कोल्हापूर जिल्ह्यात काविळीचे प्रमाण अधिक आढळते. त्यामुळे पाणी उकळून पिण्यावर महिलांनी भर देणे आवश्यक आहे.

............................

पॉईंटर

आहारातील दुर्लक्षाचा परिणाम

मुदतपूर्व प्रसुतीचा धोका

बाळाच्या वाढीवर परिणाम

कमी, तीव्र कमी वजनाचे बाळ

बाळाला शारीरिक व्यंगाची शक्यता

..........................

नैसर्गिक प्रसूती-३५२७

सीझर प्रसूती- १४१४

(सीपीआरमधील १ जाने. ते १ ऑगस्ट १८ ची आकडेवारी)

.......................

कोट

'सामान्यतः जन्मलेल्या बालकाचे वजन किमान अडीच ते तीन किलो हवे. यासाठी गरोदरपणात मातेच्या सत्वयुक्त आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते. आहाराकडे व आरोग्याच्या समस्येकडे झालेल्या दुर्लक्षामुळे बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. यासाठी कुटुंबीयांनी गैरसमज टाळून गरोदर मातांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. महिलांनी व्यसने तसेच तणाव टाळावा. जास्तीत जास्त आनंदी वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा.

डॉ. प्रज्ञा पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंकाळा संवर्धनासाठी आज निविदा

$
0
0

चार कोटी ८० लाख खर्चाच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता

रंकाळा फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत रंकाळा तलाव संवर्धनासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून चार कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला असून यापैकी ५० लाखांचा निधी महापालिकेस प्राप्त झाला आहे. रंकाळा टॉवर, संरक्षक कठड्यांसह इतर कामासाठी गुरुवारी एक कोटी दहा लाखांची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच रंकाळा संवर्धनाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण आहे.

दोन वर्षापूर्वी रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील बाजूच्या संरक्षक कठड्याला ३५ फूट लांबीचे भगदाड पडले होते. महापालिकेकडे निधीच नसल्याने दुरुस्तीचे काम रखडले होते. संरक्षक कठड्याचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ५० लाखाची तरतूद केली होती. त्यानंतर रंकाळा संवर्धनाचा विषय पुढे आला. संरक्षक कठड्याबरोबरच टॉवर परिसरासह अनेक ठिकाणी रंकाळयाची दुरवस्था झाली होती. परिणामी कोल्हापूरच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या रंकाळा तलावाचा संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला . त्यामुळे तातडीने काम हाती घेण्याचा निर्णय झाला. रंकाळ्याचे संवर्धन करुन पर्यटकांचे आकर्षण कायम राहण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत राज्य सरकारकडे चार कोटी ८० लाखाचा प्रस्ताव पाठवण्यात आला. प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यातील ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे कामाला सुरुवात होणार असतानाच उर्वरीत कामासाठी एक कोटी दहा लाखांची निविदा गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निविदा मंजूर झाल्यानंतर रंकाळा तलावाच्या सभोवतालची संरक्षक कठडा दुरुस्त करणे, रंकाळा टॉवर, संध्यामठ व धुण्याची चावी यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

...................

चौकट

पाणी प्रदूषण रोखण्याची गरज

रंकाळ्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने निधी मिळू लागला आहे. यातून रंकाळ्याचा मूळ ढाचा कायम राहील. पण रंकाळ्याचे सौंदर्य कायमपणे टिकवण्यासाठी तलावातील पाणी प्रदूषण रोखण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्ल्यू ग्रीन अल्गीचा प्रादुर्भाव वाढल्याने पाण्याला हिरवा रंग प्राप्त झाला आहे. रंकाळा संवर्धनाबरोबरच पाणी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

.................

असा होणार प्रस्तावित खर्च

रंकाळा संरक्षक कठड्याचे संवर्धन : एक कोटी दहा लाख

उतरत्या दगडी भिंतीची दुरुस्ती : दोन कोटी

रंकाळा टॉवरचे संवर्धन : एक कोटी

संध्यामठ संवर्धन : ७० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कस्तुरबा विद्यालयाची सुरक्षा ऐरणीवर

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने गगनबावडा येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही निवासी शाळा विविध समस्यांनी ग्रासली आहे. सध्या या ठिकाणी गृह विभागप्रमुख (रेक्टर) नाहीत. येथे कंत्राटी पद्धतीवरील व्यक्तीची नेमणूक करून वरिष्ठ अधिकारी आपल्या जबाबदारीपासून अलिप्त राहात आहेत. परिणामी येथील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेक्टरची नियुक्ती करावी यासाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

नागरिकांच्या शिष्टमंडळाने, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन विद्यालयाती दुरवस्था मांडली. विद्यालयासाठी आवश्यक सुविधा, रितसर नेमणुका झाल्या नाहीत तर प्रसंगी मोर्चे, आंदोलने काढले जातील असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असताना यापूर्वीचे अधिकारी त्यापासून पळ का काढत आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच याठिकाणी जिल्हा समन्वयक आम्रपाली देवेकर यांची रेक्टरपदी नियुक्ती करून इतरांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २००८ मध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही निवासी शाळा सुरू झाली. प्रारंभी महिला बचत गटाच्या जुन्या वास्तूत शाळा भरत होती. यावेळी मुलींची संख्या ३० होती. तत्कालीन रेक्टर श्रीमती गीता पाटील व इतर कंत्राटी शिक्षकांच्या प्रयत्नातून शाळेचा पट १००च्या पुढे पोहोचला. दरम्यानच्या काळात शाळेचे स्थलांतर नव्या वास्तूत झाले. सध्या या ठिकाणी बारावीच्या मुलीही वसतिगृहात राहात आहेत. दरम्यान, जुलै २०१६ मध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील मुलींना शेजारील परशुराम शिक्षण संस्थेत वर्ग केले आणि शाळा बंद झाली. फक्त मुलींसाठी निवासी व्यवस्थेपुरतेच वास्तू सीमित राहिली.

शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'जिल्हा समन्वयक आम्रपाली देवेकर यांनी शाळा आणि वसतिगृहाचे कामकाज कधीच समजून घेतले नाही. पूर्वीच्या शिक्षिका व कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रकार केला. कामातील अनियमिततेचे कारण पुढे करत कारवाईमुळे पूर्वीपासून कार्यरत शिक्षिकांना घरी जावे लागले. त्यानंतर रेक्टरपदी रूपाली संकपाळ व त्यांना सहायक म्हणून देवेकर यांची नियुक्ती झाली. मात्र, देवेकर शाळेकडे कधीच फिरकल्या नाहीत. दरम्यानच्या काळात संकपाळ यांनीही पद सोडले. तेव्हा त्यांनी कोणताही हिशेब सादर केला नाही. रिक्त रेक्टर प्रमुखपदावर अन्य शाळेतील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या विषय साधन व्यक्ती व अन्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेश जिल्हा परिषदेने घेतला. गेले वीस दिवस हे पद रिक्त आहे.'

शिष्टमंडळात नाथाजी पोवार, संभाजी पाटील, नवनाथ चौगुले, अजय पोवार, अनिल कोटकर, आदींचा समावेश होता.

००००

वॉर्डमन म्हणून दोघींची नियुक्ती केली होती. मात्र, भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसल्याचे कारण देत त्या रुजू झाल्या नाहीत. त्या ठिकाणी नव्याने नियुक्तीसंबंधी काय करता येईल याची माहिती घेतली जात आहे.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानीतील नाराजांचा रविवारी पेठवडगावात मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटेनेतील नाराज कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता.९) पेठवडगावमध्ये आयोजित केला आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते शिवाजी माने यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या मेळाव्यात बंडाचा झेंडा उगारण्यात येणार आहे. संघटनेत सन्मान मिळत नाही, अपमानित केले जात असल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांचा आहे.

माने यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. आंदोलनात सक्रिय राहून सामान्य कार्यकर्त्यांकडे खासदार शेट्टी दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांमधील नाराजीसंबंधी १४ जानेवारी २०१७ रोजी खासदार शेट्टी यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी दखल घेतली नसल्याचा माने यांचा आरोप आहे. त्यातूनच माने यांनी नाराजांना एकत्र करून मेळावा आयोजित केला आहे.

'स्वाभिमानी'तून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी झाली. त्यांच्यासोबत स्वाभिमीनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जातील, असे वाटत होते, पण तसे झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार शेट्टी यांना रोखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी भाजप करत आहेत. मंत्री खोत यांचा संपर्क वाढविण्याचा आदेश आहे. त्यातून ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जाऊन मेळावे घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत खासदार शेट्टी यांना रोखण्यासाठी पूर्ण ताकद भाजपने लावली आहे. त्यातूनच स्वाभिमानीतील नाराजांना गळ घातले जात आहे. नाराजांचा गट तयार करून खासदार शेट्टींविरोधात वातावरण तयार केले जात आहे. या संपूर्ण हालचालींवर खासदार शेट्टी बारीक लक्ष ठेवून आहेत. रविवारच्या मेळाव्यानंतर ते भूमिका मांडतील.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावडा येथे पाण्यासाठी रास्ता रोको

$
0
0

फोटो

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

येथे गेल्या पाच दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याच्या निषेधार्थ येथील धनगर गल्ली, अतिग्रे गल्ली, ठोंबरे गल्लीसह अन्य ठिकाणच्या महिलांनी मुख्य मार्गावर धनगर गल्लीसमोर दीड तास रास्ता रोको केला. यावेळी जलअभियंता सुरेश कुलकर्णी व उपजलअभियंता राजेंद्र हुजरे यांनी भेट देऊन नेहमीच्या शैलीत आश्वासन देत सुटका करून घेतली. यावेळी भागातील नगरसेविका माधुरी लाड यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

अलंकार हॉलसमोरील पाण्याच्या पाइपच्या झडपा खराब झाल्यामुळे शुक्रवारपासून सोमवारपर्यंत तेथील काम सुरू होते. त्यामुळे कसबा बावडा भागात पाणीपुरवठा अत्यंत कमी झाला होता. त्यामुळे त्याचे पडसाद बुधवारी सकाळी अकरा वाजता उमटले आणि महिलांनी स्वतः पुढाकार घेत रास्ता रोको केला. दीड तास रास्ता रोको केल्यामुळे रस्त्याच्या दोनही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आयुक्त आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. मात्र, जलअभियंता कुलकर्णी यांनी धनगर गल्ली येथे नवीन व्हॉल्व्ह बसवू, असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात अभिजित जाधव, संगीता धामणे, मंगल हराळे, सुजाता जाधव, शुभांगी पिंगळे, नीता ठोंबरे, सुवर्णा भाडळकर, कल्पना ठोंबरे, वैशाली ठोंबरे, अर्चना भाडळकर, अंजना चौगले, राजाक्का मगदूम, सुलोचना भाडळकर, ललिता माधव, कोमल सोनटक्के, आनुबाई करपे, कल्पना वावरे, छाया ठोंबरे, शांताबाई हराळे, आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूकप्रकरणी चौघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शिराळा

आरोग्य विभागात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून कोडोली (ता. पन्हाळा) येथील सहाजणांची २३ लाख ५० हजार घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. बजरंग रघुनाथ सुतार (रा. ऐतवडे खुर्द), युवराज माने (रा. कुरळप), अधिकराव ऊर्फ भोला मारुती पाटील (रा. ऐतवडे खुर्द), हेमंत हणमंत पाटील (रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद आनंदा दत्तात्रय भोसले (रा. कोडोली चावडी भाग) यांनी दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात लिपिक म्हणून नोकरी लावतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात या सर्वांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. संशयित आरोपींनी खोट्या सही-शिक्क्याची बनावट नियुक्तीपत्रे दिली. त्यावेळी संबंधितांकडून ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत २३ लाख ५० हजार रुपये कोडोली परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेतले होते. याबाबत मंगळवारी रात्री उशिरा कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्माकोल व्यवसायिकाला पाच हजारांचा दंड

$
0
0

नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरगुती गणपतीसमोरील सजावटीसाठी बंदी असूनही बाजारात राजरोसपणे थर्माकोल विक्री सुरु आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने बुधवारी दंडात्मक कारवाई केली. लक्ष्मीपुरी येथील गुरुनानक रेफ्रीजेशन फर्मच्या मालकाला थर्माकोल विक्रीबाबत पाच हजार रुपयांचा दंड करत थर्माकोल विक्रीवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले.

राज्य सरकारने २३ मार्च रोजी प्लास्टिक व थर्माकोल वापरांवर बंदी घातली. मात्र या निर्णयाची योग्यरितीने अंमलबजावणी होत नसल्याने शहरात आजही प्लास्टिक व थर्माकोलची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सध्या सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागलेले असताना, आरास तयार करण्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये लगबग सुरू आहे. सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर केला जात असल्याने विक्रीही जोरात सुरू आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या पिछाडीच्या बाजूसह शहरात अनेक ठिकाणी थर्माकोल विक्री सुरु असताना प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी विशेषत: थर्माकोल बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसत होते.

थर्माकोल विक्रीबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्यानंतर प्रशासनाने बुधवारी दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने थर्माकोल विक्रेत्याला पाच हजाराचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे मात्र शहरात थर्माकोल विक्री राजरोसपणे सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्यावतीने ही कारवाई कायम सुरु ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी महापालिकेने विविध सामाजिक संघटना व सार्वजनिक मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. यासाठी प्लास्टिकपासून बनवण्यात आलेल्या आणि महाप्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या पत्रावळी, द्रोण, ग्लास यांचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बैठकीनंतर चार दिवसांत याचा बोजवारा उडाल्याचे बुधवारी झालेल्या कारवाईतून स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवजड वाहतूक बंद करा

$
0
0

कोल्हापूर

रंकाळा पदपथाकडील रस्ता सायलेंट झोनमध्ये येत असताना या मार्गावर अवजड वाहतूक सुरू आहे. त्याचबरोबर खाद्य पदार्थांच्या स्टॉलमुळे येथील शांतता भंग पावत असून या मार्गावरील अवजड वाहतुकीसह घोडेस्वारी बंद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पोवार यांनी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे केली. आयुक्त चौधरी यांनी तातडाने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पंचायत राज’कडून झाडाझडती

$
0
0

फोटो..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचायत राज समितीच्या दौऱ्याचा पहिला दिवस जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची कसोटी पाहणारा ठरला. विविध विभागाच्या योजनांचा आढावा, कामकाजातील त्रुटीवरून समिती सदस्यांनी काही जणांची झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी समितीसमोर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनसह अन्य प्रकल्पांसाठी जादा निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेतील वर्ग एकच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असून त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणले. गुरुवारी सकाळी पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळांची तपासणी करण्यात येणार असून, समितीच्या तपासणीमुळे तालुकास्तरावर प्रशासन गतिमान झाले आहे.

पंचायत राज समितीमार्फत सकाळी अकरा ते सायंकाळपर्यंत समिती सभागृहात कामकाजांचा लेखाजोखा सुरू होता. समिती सभागृहात अधिकाऱ्यांची परीक्षा आणि सभागृहाबाहेर उपस्थित अन्य अधिकाऱ्यांची कधी कोणत्या विषयावरून समितीला सामोरे जावे लागणार यावरून घालमेल सुरू होती. २०१३-१४ च्या लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधांतील परिच्छेदासंर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची समितीसमोर साक्ष झाली. समितीचे प्रमुख सुधीर पारवे यांच्या नेतृत्वाखालील २८ आमदारांचा समितीत समावेश आहे. सकाळी दहा वाजता सर्किट हाउस येथे समितीसोबत जिल्ह्यातील आमदारांची अनौपचारिक चर्चा झाली. याप्रसंगी आमदार सुजित मिणचेकर यांनी समिती सदस्यांची भेट घेतली, तर शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी जिल्हा परिषदेत समिती सदस्यांची भेट घेतली.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण समिती अंबरीश घाटगे, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनी सर्किट हाउस येथे समिती सदस्यांशी भेट घेतली. 'जिल्ह्याचा कारभार अधिक गतिमान, योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारी गरजेचे आहेत. जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आहे, ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असणाऱ्या जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा कामकाजावर परिणाम होत असल्याचे अध्यक्षा महाडिक यांनी पंचायत राज समितीसमोर मांडले. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनसाठी निधीची गरज आहे. घरगुती स्तरावरील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पहिल्यांदा कचऱ्याचे वर्गीकरण, कचऱ्यापासून खत निर्मिती, वीजनिर्मिती प्रकल्पासाठी सरकारकडून निधी मिळाल्यास स्वच्छतेच्या कामाला गती येईल अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.

अंगणवाडी बांधकामावर चर्चा होऊन प्रतिइमारत सहा लाख रुपये खर्चाची मर्यादा आठ लाखांपर्यंत करावी, एका मक्तेदाराला किमान दहा अंगणवाड्या इमारतींचे बांधकाम दिल्यास अधिक संयुक्तिक ठरेल. तसेच भविष्यातील १५ वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित होते. सध्या प्रतिमाणसी ४० लिटर पाणीपुरवठा होतो. प्रतिदिन किमान ७० लिटर पाणीपुरवठा करावा. कृषी स्वावलंब योजनेंतर्गत विहीर बांधण्यासाठी ४० गुंठे क्षेत्राची अट कमी करुन २० गुंठे करणे आवश्यक आहे. समाजकल्याण विभागाकडील योजनांच्या कामांची प्रत्यक्ष निविदा व इतर प्रक्रिया ग्रामपंचायतीमार्फत न होता सर्व प्रक्रिया जिल्हा परिषदेमार्फत होणे क्रमप्राप्त आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा प्रश्न, पती-पत्नींच्या नोकरीच्या ठिकाणात ३० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असू नये अनुषंगाने चर्चा झाली.

००००

रिक्त पदांकडे वेधले लक्ष

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत रिक्त पदांचे प्रमाण मोठे आहे. शिक्षण विभागात अध्यापकांची ६२७८ पदे मंजूर असताना ५६८६ पदे कार्यरत आहेत. पदवीधर अध्यापकाच्या मंजूर पदांची संख्या १८४५ असताना १६६५ कार्यरत आहेत. मुख्याध्यापकाची ५२२ मंजूर पदांपैकी ३७८ कार्यरत आहेत. जिल्ह्यासाठी १५७ वैद्यकीय अधिकारी मंजूर आहेत. मात्र, ११२ पदे भरली आहेत. पशुधन पर्यवेक्षकची ९५ पदे मंजूर असताना ३६ पर्यवेक्षकच आहेत.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरकार्याला फाटा देतकेली शाळेला मदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गर्जन (ता. करवीर) येथील शेतकरी भूपाल दत्तात्रय भोसले यांनी मृत्यूपूर्वीच देहदान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार ७६ वर्षीय भूपाल भोसले यांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी त्यांचा देह कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द केला. ही घटना ताजी असतानाच भोसले कुटुंबीयांनी भूपाल भोसले यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपत त्यांच्या उत्तरकार्यासाठी येणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत पाच हजार रुपयांची देणगी गर्जन प्राथमिक शाळेस देऊन आणखी आदर्श पाऊल उचलले आहे.

'मरावे परी कीर्ती रूपी उरावे' उक्तीप्रमाणे भूपाल भोसले अनेक कार्यात पुढाकार घेत होते. यातूनच त्यांनी आपल्या मरणानंतर देहदान करण्याचा विचार व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार मुलगा विनायक, संदीप, भाऊ गजानन, पुतण्या सतीश, मुलगी व पत्नी यांनीही देहदान उपक्रमास कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता संमती दिली. अशाप्रकारे देहदान करण्याची परिसरातील ही पहिलीच घटना असल्यामुळे पंचक्रोशीत मोठी उत्सुकता लागून राहिली होती. देहदान उपक्रमास चालना देणाऱ्या या निर्णयामुळे भूपाल भोसले व त्यांच्या कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत लागले.

दिवंगत वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून कुटुंबीयांनीसुद्धा आपणही सामाजिक कार्यास काहीना काही हातभार लावला पाहिजे, सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे ही उदात्त भावना जोपासण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी उत्तरकार्यासाठी होणारा वायफळ खर्च टाळून हा पैसा सत्कारणी लागावा म्हणून विद्या मंदिर गर्जन शाळेला पाच हजार रुपयांची देणगी जिल्हा बँकेचे माजी संचालक केरबा देसाई यांच्या हस्ते मुख्याध्यापक एम. एन. लांबोरे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी भूपाल भोसले यांचा मुलगा संदीप व विनायक यांच्यासह शाळा समिती सदस्य विनायक देसाई, डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजचे एन. डी. देसाई, शिक्षक व नातेवाईक उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखो कार्यकर्तेच माझी दौलत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

गेली तीस-पस्तीस वर्षे समाजकारण आणि राजकारणात कार्यरत आहे. आतापर्यंत मी माणसे जोडण्याचेच काम केले आहे. काँग्रेसशिवाय कशाचाच विचार आमच्याजवळ ढुंकूनही येत नाही. मी कधीही विश्वासघाताचे राजकारण केले नाही. स्वार्थी राजकारण न करता आपुलकी जपल्यामुळेच माझ्या हाकेला लाखो कार्यकर्ते गोळा होतात. पी. एन. पाटील कधीही एकाकी पडू शकत नाही. करवीर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील माझे काँग्रेसचे लाखोहून अधिक कार्यकर्ते हीच माझी खरी दौलत आहे,' असे स्पष्टीकरण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील-सडोलीकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

पी. एन. पाटील म्हणाले, 'जिल्ह्यातील नेत्यांबरोबरच मुंबई, दिल्लीतील सर्व वरिष्ठ राजकीय नेत्यांबरोबर माझे सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माझ्या कामाची पोच म्हणूनच मला अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्यपदी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी पदाची संधी देण्यात आली. तसेच माझ्यावर १९ वर्षे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी विश्वासाने सोपविली. मी स्वत:हून जिल्हाध्यक्षपदाचा सहावेळा राजीनामा दिला, पण वरिष्ठ नेत्यांनी पुन:पुन्हा विश्वासाने माझ्यावरच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. त्यास पात्र राहून पक्षवाढीचे प्रामाणिकपणे काम केले, विनाकारण कोणत्याही नेत्यांवर टिप्पणी केली नाही.'

ते पुढे म्हणाले, '१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्यातील दिग्गज नेते काँग्रेस सोडून गेले, परंतु या कठीण काळात मी आव्हान म्हणून जिल्हाध्यक्षपद स्वीकारले आणि जिल्ह्यात काँग्रेस मजबूत केली. आमचे दैवत माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून या पुतळ्याचे उद्घाटन श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते तर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली केले. गांधी घराण्याशी असलेली एकनिष्ठता मी सांगण्यापेक्षा अनेक कार्यांतून दाखवून दिली आहे.'

राज्यातच नव्हे तर देशात सलग १९ वर्षे जिल्हाध्यक्ष हिमतीने सांभाळणारा मी गांधीनिष्ठ कार्यकर्ता आहे. गेली सलग २५ वर्षे राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दौडचे आयोजन करून राज्यपातळीवरील नेते या कार्यक्रमासाठी येतात. यादिवशी देश, राज्यपातळीवरील उत्कृष्ट पत्रकार, सामाजिक कार्कर्ते यांचा सन्मानचिन्ह व रोख एक लाख रुपये देऊन गौरव करण्याचे तसेच शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे व राजीव गांधींचे विचार व कार्य तरुणांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील, जिल्ह्यातील जनतेशी आपली नाळ घट्ट जळली आहे. त्याचबरोबर मुंबई व दिल्लीतील सर्व वरिष्ठ नेत्यांबरोबर निकटचे संबंध कायम असल्याचे पाटील यांनी सांगितले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरतीसाठी पदवीधारक रस्त्यावर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पदभरती रखडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीसह डीएड, बीएड पदवीधारक तरुणांचे करिअर धोक्यात आले आहे. सरकारने भरती त्वरित सुरू करावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातर्फे डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशनच्यावतीने बुधवारी, शिक्षक दिनी आंदोलन करण्यात आले.

सरकारचे शिक्षक भरतीकडे लक्ष वेधण्यासाठी पदवीधारक तरुणांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. पंचायत राज समितीचे प्रमुख आमदार सुधीर पारवे, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, विक्रम काळे, जि. प. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन असोसिएशनच्या भावना जाणून घेतल्या. 'शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासजी अनुदानित संस्थांमधील रिक्त पदे एकाचवेळी 'पवित्र' प्रणाालीच्या माध्यमातून भरावीत, आगामी शिक्षक भरती 'पवित्र' प्रणालीच्या माध्यमातून होत असताना केंद्रीय पद्धतीनेच ही प्रक्रिया राबवावी' आदी मागण्या करण्यात आल्या. संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र उदाळे, जिल्हाध्यक्ष सुयश उदाळे, सुशांत दरबारे, नामदेव पाटील, सतीश कुंभार, सचिन हिरोलीकर, अणदूरचे सरपंच दत्तात्रय गुरव आदींचा आंदोलनात समावेश होता.

दरम्यान, सरकारने शिक्षक भरतीचा कार्यक्रम जाहीर केला नाही. राज्यात १,७८,००० पदवीधारक बेरोजगार आहेत. यामध्ये डीएड, बीएड, एमएड पदवीधारकांचा समावेश आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या ५६०० आहे. बहुतांश शाळांमध्ये पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. शाहूवाडी, पन्हाळ्यासह अन्य तालुक्यांमध्ये शिक्षक नसल्याने अनेक शाळा बंद आहेत. सरकारने शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी राजेंद्र उदाळे यांनी केली. डिसेंबर २०१७ मध्ये ऑनलाइन पध्दतीने शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा झाली. मार्च २१८ मध्ये निकाल जाहीर झाला. मात्र अद्याप शिक्षक भरती रखडल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायलेंट झोनमधून बिनदिक्कत अवजड वाहतूक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रंकाळा पदपथ उद्यानाशेजारील क्रशर चौक ते शालिनी पॅलेस या मार्गावर अवजड वाहतुकीसाठी बंदी आहे. मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने येथील पर्यावरण धोक्यात आले आहे. याशिवाय, विरंगुळ्यासाठी येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांचा जीवही टांगणीला लागला आहे.

रंकाळा पदपथासमोरील मुख्य रस्त्यावर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, रस्त्याच्या मधूनच सुरू राहणारी घोडेस्वारी, छोट्या मोटारींतून मुलांची फिरस्ती यामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल बनत आहे. या परिसरात चालणेही जिकिरीचे बनत असताना भरधाव वाहनांची ये-जा सुरू असते. नुकत्याच झालेल्या अपघातात एका वाहनाने घोड्याला जोराची धडक दिली. त्यामुध्ये घोड्याचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतही या रस्त्यावर असे प्रकार सुरुच असल्याने प्रशासन येथे जीवितहानी होण्याची वाट पहातेय का? असा संतप्त सवाल उपस्थित उपस्थित होत आहे.

रंकाळा टॉवर ते राजकपूर पुतळा या रस्त्याचे काम सुरू असताना हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रस्त्याचे काम अनेक दिवस रेंगाळल्याने राधानगरीकडे जाणारी एसटी बस वाहतूक पदपथ उद्यानाशेजारील रस्त्यावरुन वळविण्यात आली होती. एसटीला प्रवेश दिल्यानंतर या मार्गावर अन्य अवजड वाहनांनी घुसखोरी केली. त्यापूर्वी या मार्गावरुन अवजड वाहतूक होऊ नये यासाठी इराणी खण येथे अडथळा निर्माण करण्यात आाला होता. एसटीला वाट मोकळी करण्यासाठी हे अडथळे काढण्यात आले. परिणामी सर्वच प्रकारची वाहतूक येथून सुरु झाली. नंतर रंकाळा टॉवर ते राजकपूर पुतळ्यापर्यंतचा रस्ता वाहतुकीस खुला झाला. त्यानंतरही पदपथ उद्यानाशेजारच्या मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने फिरायला येणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

रंकाळा तलावावर स्थानिक नागरिकांसह पर्यटक दररोज हजेरी लावतात. पर्यटकांच्या रोजच्या गर्दीमुळे तलावाला खाद्यपदार्थांच्या स्टॉलने वेढा घातला आहे. स्टॉलधारकांची गर्दी वाढत असताना बच्चेकंपनीसाठी घोडस्वारी, लहान मोटारींच्या फेऱ्या आदी खेळ सुरू झाले आहेत. त्याचबरोबर येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केली जातात. त्यामुळे सायंकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यातूनच रहदारी सुरू असते. त्यामुळे फिरायला येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. विशेषत: अवजड वाहनांमुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. मात्र प्रशासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. या दुर्लक्षातून छोटे अपघात होते आहेत. काही दिवसांपूर्वी एका घोड्याला अवजड वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात घोड्याला जीवाला मुकावे लागले. या घटनेला आठवडा उलटला तरी या मार्गावरुन अवजड वाहनांची वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे.

पूर्वी क्रशर चौक ते शालिनी पॅलेस मार्गावर अवजड वाहनांना बंदी होती. क्रशर चौक ते रंकाळा टॉवर रस्ता दुरुस्तीवेळी ती शिथिल करण्यात आली. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही आधीची सायलंट झोनमधील वाहतूक सुरुच आहे. सायलंट झोनमधील वाहतुकीला परवानगी कशी दिली? हा प्रश्न आहे. आता गर्दीच्या ठिकाणी सुरू असलेली घोडेस्वारी धोकादायक आहे. वाहनांच्या हॉर्नच्या आवाजाने घोडे बिथरण्याची, त्यातून अपघातांची शक्यता आहे. त्यामुळे घोडेस्वारीवर बंदी घालावी.

- सुरेश पोवार, सामाजिक कार्यकर्ते

पदपथ उद्यानाशेजारील रस्त्यावर अवजड वाहतूक सुरू आहे. रंकाळ्याच्या पूर्वेकडील रस्ता चांगला असल्यास या मार्गावरील वाहतूक निश्चितच बंद केली जाईल. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करू.

- अनिल गुजर, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक

मटा भूमिका

टाळूया अपघातांचा धोका

कोल्हापूरच्या सौंदर्यांत भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाला सध्या काही समस्यांनी वेढले आहे. तलावाचे सौंदर्य नजरेत साठवण्यासाठी आणि विरंगुळा म्हणून येथे दररोज पर्यटकांसह स्थानिक आबालवृद्धांची गर्दी असते. तलावावरील गर्दी कायम असल्याने येथे बाहेमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी बसण्याची सुविधा, पक्षी निरीक्षण केंद्र अशा अनेक सुविधा महानगरपालिकेने दिल्या आहेत. तलावामध्ये आणि परिसरात परदेशी आणि स्थानिक प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे तलावाची परताळ्याकडील बाजू असलेला परिसर सायलंट झोन म्हणून घोषीत केला आहे. मात्र याला हरताळ फासून या परिसरातून अवजड वाहतूक सुरू आहे. पदपथ उद्यान ते क्रशर चौक रस्त्यावर अवजड वाहतुकीला बंदी असताना त्याचे उल्लंघन होत आहे. ही वाहतूक रोखण्यात महानगरपालिका, शहर वाहतूक विभागाला अपयश आले आहे. परिणामी पदपथावर येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या अपघातात एका घोड्याला प्राण गमवावे लागले. अशा अपघातांच्या घटकांना अटकाव करण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा या रस्त्यावर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जर्मनी टोळीला तपासासाठी फिरविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

राम गरड खून प्रकरण आणि मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या जर्मनी टोळीतील सहाजणांना गुरुवारी पोलिसांनी तपासकामासाठी जयभीमनगर व परिसरात फिरविले. यावेळी सर्व संशयितांच्या घराची झडतीही घेण्यात आली.

जयभीमनगर येथील रामा गरड याचा पाठलाग करून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणी जर्मनी टोळीतील अल्पवयीन म्होरक्यासह संतोष ऊर्फ ऋष्या बाळू बाबर, आसिफ महंमद शेख, राजेश ऊर्फ लाज्या नामदेव चव्हाण, किरण ऊर्फ किया आप्पासाहेब वडर, सुहेल सिराज शेख, अक्षय बबन कल्ले या सहाजणांना अटक केली आहे. या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून, सहाजण सध्या पोलिस कोठडीत आहेत.

गरड खून प्रकरणातील तपासकामासाठी गुरुवारी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहाजणांना जयभीमनगर झोपडपट्टीसह खुनाची घटना घडलेल्या परिसरात फिरविले. तसेच सर्व संशयितांच्या घराची झाडाझडतीही घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांनी संगणक यंत्रणा सक्षम ठेवावी

$
0
0

अॅड. अभय नेवगी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'हॅकर्स हल्ल्यापासून सरंक्षण करण्यासाठी बँकांनी संगणक यंत्रणा सक्षम ठेवावी', असे प्रतिपादन सायबर फॉरेन्सिक कंपनीचे संस्थापक अॅड. अभय नेवगी यांनी केले. जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या वतीने आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.

अॅड.नेवगी म्हणाले, 'ग्राहकांच्या मागणी व गरजेनुसार बँकांनी नवीन युगात तंत्रज्ञानाचा जरुर वापर केला पाहिजे. तंत्रज्ञान व बँकाची यंत्रणा यातील कच्चे दुवे हॅकर्स शोधतात. त्याचा गैरफायदा घेऊन आर्थिक गुन्हे करतात. या गोष्टी बँकाना तत्काळ लक्षात येत नाही. पण ज्यावेळी हॅकर्सचा हल्ला लक्षात येतो तेव्हा बँकेवर नकळत दरोडा पडला असतो. या पार्श्वभूमीवर बँकांनी आपली यंत्रणा सक्षम व सतर्क ठेवली पाहिजे. तंत्रज्ञानायुक्त बँकिंग सेवा ग्राहकांना देण्यासाठी अनेक बाह्य कंपन्याबरोबर बँकांनी करार करावेत. या कंपन्याची यंत्रणा सक्षम असल्याची खात्री करुन घ्यावी. बँकांतील संगणक विभागातील अधिकाऱ्यांनी सतत जागरुक ठेऊन बँकिंग व्यवहारावर नियंत्रण व पर्यवेक्षण ठेवले पाहिजे.

इंडोइन्व्हेस्टिंग कंपनीचे संस्थापक कुणाल रस्तोगी यांनी बँकांचे उत्पन्न व नफा वाढीसाठी बँकातील शिल्लक पैशाची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारात कशी करावी, म्युच्युअल फंडस् व बाँडस्, सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करुन जादा उत्पन्न कसे मिळवावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पार्थेश शहा, प्रशांत मगदूम, विकास जाधव, सुजीत जाधव, सूर्यकांत पाटील, दत्तात्रय थोरावडे, दत्तात्रय राऊत, विश्वास चौगुले, विजया जाधव उपस्थित होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मांगलेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पं.स.च्या कामकाजाचा पंचनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कामातील अनियमितता, योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाई, मुदतीत निधी खर्च न होण्याच्या प्रकाराची पंचायत राज समितीने (पीआरसी)गंभीर दखल घेतली. गुरुवारी जिल्ह्यातील बाराही पंचायत समित्यांची तपासणी करत अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा जणू पंचनामा केला. काही ठिकाणी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कागदपत्रांची पूर्तता, माहितीची जुळवाजुळव करताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी 'पीआरसी'समोर ग्रामीण भागातील सोयी सुविधांबाबत तक्रारी मांडल्या. पंचायत राज समितीच्या दौऱ्याचा दुसरा दिवस जिल्ह्याच्या विविध भागात होता. जिल्ह्यातील बारा पंचायत समित्यांची तपासणी व आढावा बैठकीसाठी पीआरसीचे चार गट तयार केले. समितीच्या दिवसभराच्या तपासणी दौऱ्यात पंचायत समित्यांना भेटी देताना ग्रामपंचायती, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पाहणीवेळी अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

दरम्यान 'पीआरसी'ने जिल्हाभर दौरा करताना स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेतल्या. शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी 'पीआरसी' सदस्यांची भेट घेऊन चर्चा केली. जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, जिल्ह्यात पशुधन पर्यवेक्षक अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी, गटशिक्षण अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. ठिकठिकाणी मुख्याध्यापक, शिक्षकांची रिक्त पदे भरली नाहीत. यासह ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा, औषधांचा साठा याकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधले.

पीआरसी पथकप्रमुख सुधीर पारवे यांच्या नेतृत्वाखालील पथकात चौघा आमदार सदस्यांचा समावेश होता. या पथकाने गगनबावडा, राधानगरी, भुदरगड पंचायत समित्यांची तपासणी केली. आमदार दिलीप सोपल, आमदार सुरेश खाडे, राहुल बोंद्रे, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे यांच्या पथकाने करवीर, पन्हाळा, शाहूवाडी पंचायत समित्यांची तपासणी केली. समिती सदस्य भुदरगड येथे पंधरा मिनिटे थांबले. आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखालील समितीने हातकणंगले, कागल, शिरोळ तालुक्यांचा दौरा केला, तर आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागात पाहणी केली. कागदपत्रे आणि माहितीची जुळवाजुळव करताना अधिकाऱ्यांची कसरत सुरू होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. शिवदास यांच्यासह प्रत्येक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

कागदपत्रे सादर करा

आमदार दिलीप सोपल यांच्या पथकाने सकाळी पहिल्यांदा करवीर पंचायत समितीला भेट दिली. पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला. या दरम्यान शिक्षण विभागातील गणवेशासंदर्भात आवश्यक कागदपत्रांची मागणी समिती सदस्यांनी केली. मात्र, आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याचे सामोर आले. तेव्हा सदस्यांनी संबंधित कागदपत्रे गुरुवारी जिल्हा परिषदेत समितीसमोर सादर करावीत अशी सूचना केली.

००००

महिनाभरात चौकशीचे आदेश

दोन दिवसांच्या तपासणीदरम्यान शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा यांसह आठ विभागांतील काही योजनांच्या अंमलबजावणीध्ये हलगर्जीपणा, मुदतीत निधी खर्च न होणे आणि कामातील अनियमितता या बाबी समितीच्या निदर्शनास आल्या. त्यांनी प्रशासनाला या साऱ्या प्रकाराची चौकशी करून महिनाभरात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची सूचना केली. कामे रखडण्यामागील कारणमीमांसा स्पष्ट करण्याचेही आदेश दिल्याचे वृत्त आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जातपडताळणी’त अडवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील जातपडताळणी कार्यालयात पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी असतानाही संबंधितांना दाखले देताना अडवणूक होत आहे. प्रांताधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला काढताना संबंधित विद्यार्थी, पालकांची आधीच दमछाक झालेली असते. त्यात पडताळणी दाखला घेतानाही अडवणूक होत असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एकानंतर एक काढण्यात येणाऱ्या त्रुटींची पूर्तता करताना नको रे बाबा पडताळणीचा दाखला असे म्हणण्याची वेळ संबंधितांवर येते. या कार्यालयातील मंजूर पदेही भरली आहेत. अधिकाऱ्यांकडील अतिरक्त कार्यभार कमी झाला आहे. तरीही वेळेत दाखला मिळत नसल्याचे चित्र आहे.

नव्याने जातीचा दाखला काढण्यासाठी अनेक जुनी कागदपत्रे पुराव्यासाठी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. मराठा कुणबी दाखल्यासाठी १९५०, भटक्या जमातीसाठी १९६१, इतर मागास, विशेष मागास प्रवर्गासाठी १९६७ पूर्वीचा जातीचा उल्लेख असलेली कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. जातीचे जुने पुरावे असणारे संबंधित प्रांताधिकाऱ्यांकडून दाखला घेतात. अनेक अडचणींतून मिळालेला दाखला पडताळणी समितीकडून पडताळणी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गेल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याकडून उलटतपासणी केली जाते. अनेक त्रुटी काढत प्रस्ताव दाखल करून घ्यायला टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थी, पालकांत आहेत.

नोकरी, शिक्षणातील लाभ, निवडणुकीत विजयी उमेदवारास पद टिकवण्यासाठी पडताळणीचाच दाखला गरजेचा असतो. परंतु, ही प्रक्रिया किचकट आहे. प्रत्येक कागदपत्रांची छाननी करण्यासाठी आवश्यक तितके मनुष्यबळ नसते. एखाद्या दाखल्यावर तक्रार असल्यास सुनावणी होते. वादी, प्रतिवादीकडून त्रुटीसंबंधीचे कागद देण्यासाठी वेळ दिला जातो. त्यात सहा महिने निघून जातात. विजयी उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे वेळेत दाखला देता येत नाही. विद्यार्थ्यांना सरकारी लाभ घेता येत नाही. आरक्षित जागेतून प्रवेश मिळत नाहीत, अशा अडचणी असतात.

--

कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच भार

जिल्हानिहाय समिती स्थापन केल्याने आता केवळ जिल्हा कार्यक्षेत्र आहे. मात्र समितीच्या अध्यक्ष, सचिवांकडे सांगली जिल्ह्याचाही कार्यभार आहे. कार्यालयातील तब्बल १३ कर्मचारी कंत्राटी आहेत. एक सरकारी वाहन आहे. यामुळे एखाद्या प्रकरणात जाग्यावर जाऊन जातीसंबंधी वस्तूनिष्ठ अहवाल करताना अडचणी येतात. चुकीचे काम झाल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करता येत नाही.

------------

जुने कागदपत्रे नसणाऱ्यांसाठी...

भटकंती करून उपजिविका करणारे आणि ज्यांची पहिलीच पिढी शिक्षण घेत आहे, अशा कुटुंबांकडे लिखित स्वरूपात पुरावा मिळत नाही. खरोखर आरक्षित जातींमध्ये आहे, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची जुनी कागदोपत्री पुरावे नाहीत त्यांनाही जातीचा दाखला देण्याची तरतूद आहे. समाज कल्याण विभागच्या प्रशासनाकडील पोलिस निरीक्षकांकडून संबंधितांच्या गावी, घरी जाऊन माहिती घेतली जाते. अर्जदाराने उल्लेख केलेल्या जातीबाबतची वस्तूनिष्ठता तपासली जाते. सत्यता असल्यास दाखला दिला जातो. ही बाब प्रांताधिकारी कार्यालय किंवा समाज कल्याण प्रशासनाकडूनही स्पष्ट केली जात नाही. जुने पुरावे नसलेले अनेकजण दाखल्यापासून वंचित आहेत. त्यात सर्वाधिक धनगर, पिढ्यानपिढ्या भटकंती करणाऱ्या जातीतील लोकांचा सामावेश आहे.

-----

निर्धारित वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना दिल्या आहेत. त्रुटी असल्यास पहिल्या टप्यातच प्रस्तावधारकाचे समुपदेशन केले जाते. परिपूर्ण प्रस्तावाची छाननी केली जाते. त्रुटी आढळल्यास कळविले जाते. त्यानंतर समिती दाखला वैध ठरवते. यासाठी कोणत्याही एजंटाकडे जाण्याची गरज नाही. अडचण आल्यास अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा.

प्रशांत चव्हाण, उपायुक्त, जातपडताळणी

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या छेडछाडीवरून परस्परविरोधी फिर्यादी

$
0
0

इचलकरंजी : अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून शिवाजीनगर पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पीडित मुलीने संशयित चंद्रकांत दिलीप माने (वय २२, रा. गणेशनगर) याच्याविरोधात, तर चंद्रकांत माने याने छेड काढल्याचा जाब विचारत मारहाण केल्याप्रकरणी आकाश भोसले व सुमित हुक्कीरे यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. चंद्रकांत माने अल्पवयीन मुलीचा गेल्या आठ दिवसांपासून पाठलाग करीत होता. बुधवारी सायंकाळी मानेने गाडीवरून पाठलाग करत आपला विनयभंगाचा प्रयत्न केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे, तर मानेने दिलेल्या फिर्यादीत भोसले व हुक्किरे यांनी मुलीचा पाठलाग का करतोस, असा जाब विचारत शिवीगाळ करत मारहाण केल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्तर’मधून महेश जाधव भाजपचे उमेदवार

$
0
0

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीतील कसर भरुन काढत २०१९ च्या निवडणुकीत महेश जाधव भाजपचे आमदार होतील', असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची उमेदवारी घोषित करत पालकमंत्री पाटील यांनी त्यांना वाढदिवसाची भेट दिली.

देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांच्या वाढदिवासनिमित्त तटाकडील तालीम परिसरात गुरुवारी सकाळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी सायंकाळी तटाकडील तालीम परिसरातील सर्वपक्षीयांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कोल्हापूर शहरात भाजप टिकवणे व रुजवणे हे मोठे काम होते. प्र.द.गणपुले, सुभाष वोरा, बाबा देसाई यांनी शहरात पक्षाला ओळख दिली. पण पक्षाचा सर्व जातीधर्मात, तालमी, पेठा, गल्लीबोळात प्रसार करण्याचे काम महेश जाधव यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत झाले. शहरातील विविध प्रश्नांवर जाधव हे रस्त्यांवर उतरले. २०१४ च्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची अचानक युती तुटल्याने भाजपचे कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार म्हणून महेश जाधव यांची निवड झाली. प्रचाराला अवघे २० ते २२ दिवस मिळूनही भाजपाने मोठी मजल मारली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन अध्यक्षपदी जाधव यांना पक्षाने संधी दिल्यानंतर विविध उपक्रमाद्वारे शिवाजी पेठेसह शहरातील सर्व भागात पक्षाची बांधणी केली. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत मागील निवडणुकीची कसर भरुन काढताना महेश जाधव भाजपचे आमदार असतील व ते दोन ते तीन टर्म पूर्ण करतील.'

शिवसेनेचे आमदार सुजीत मिणचेकर यांनी महेश जाधव यांना शुभेच्छा देताना शिवसेना भाजपची युती होणार असल्याने आमदारपदासाठी तुम्हाला शुभेच्छा देताना मला मर्यादा येणार आहेत. पण ते शिवाजी पेठेचे नाव उंचावतील, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, महापालिका स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, भाजप गटनेते नगरसेवक विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेवक विजय खाडे, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजीत चव्हाण, सदाशिव शिर्के, निवासराव साळोखे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दूरध्वनीवरुन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात तिघे जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

विजापूर रोडवरील संभाजी तलावनजीक पत्रकार भवन चौकात गुरुवारी पहाटेच्या सुमारास भरधाव कंटेनरची डंपरला धडक बसून झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. कंटेनर रस्ता दुभाजकानंतर चौकातील हायमास्ट दिव्याला धडकल्याने दिवा खाली कोसळला. तसेच, अपघातग्रस्त वाहनांमधील ऑइल मोठ्या प्रमाणावर सांडल्याने तातडीने अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा मारून रस्ता स्वच्छ केला.

कंटेनर विजापूर रस्त्याच्या दिशेने वळत असताना विजापूर रोडहून सात रस्त्याच्या दिशेने निघालेल्या डंपरला धडकला. यानंतर तो रस्ता दुभाजकावर जाऊन आदळला आणि धडकेने दिवाही खाली कोसळला. बुधवारी याच चौकात ट्रकच्या धडकेने विद्युत खांब कोसळला होता. शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीचे परिणाम आणि त्या विरोधात रोष सुरू असतानाच पहाटे हा अपघात झाला आहे. कंटेनर आणि डंपरमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणालाही मोठी इजा झाली नाही. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images