Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लोककला सर्वांत प्रभावी माध्यम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यात लोककला आणि लोककलावंतच प्रभावी भूमिका बजावू शकतात. लोककलावंत हे शासन आणि जनता यांच्यातील संवादसेतू आहेत,' असे मत विविध वक्त्यांनी गुरुवारी सोलापुरात मांडले.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी सोलापुरात 'स्वच्छ भारत मिशन' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. क्षेत्रीय प्रचार कार्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड आणि सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेस राज्यात विविध जिल्ह्यांत काम करणाऱ्या कलापथकांचे प्रमुख आणि कलाकार सहभागी झाले होते.

'आपल्या देशातील बहुसंख्य लोक अद्याप ग्रामीण भागात राहतात. त्यांचे प्रबोधन करायचे असेल, तर त्यांच्या भाषेत समजावून सांगितले पाहिजे. हे काम कोणत्याही माध्यमापेक्षा लोककलावंत चांगल्या प्रकारे करू शकतात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कलावंतांनी चांगली जाणीवजागृती केली आहे,' असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. 'लोककलावंत लोकांना त्यांच्या भाषेत सांगतात. त्यामुळे लोकांना कलावंताबाबत आपलेपणा वाटतो. त्यामुळे कलावंत प्रभावी जनजागृती करू शकतात. लोककलावंत लोकांच्या वागण्यात बदल घडवून आणू शकतात,' असे मत राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केले. तर, 'कलावंतांनी यापूर्वी शासनाच्या विविध योजना यशस्वी करण्यासाठी खूप चांगले योगदान दिले आहे. स्वच्छ भारत अभियानातही कलावंतांनी चांगले काम करावे,' असे आवाहन ढेंगळे पाटील यांनी केले.

या वेळी नेहरू युवा केंद्राचे प्रमोद हिंगे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, क्षेत्रिय प्रचार अधिकारी मनोज सोनोने, माधव जायभाये, प्रशासन अधिकारी सुनील डहाके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्टाद्वारे दिलेला तलाक फॅमिली कोर्टाने फेटाळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

पोस्टाद्वारे पतीने पत्नीला दिलेला तलाक अवैध ठरवत कौटुंबिक न्यायालयाने तलाक अर्ज नुकताच फेटाळून लावला. सोलापुरातील अफसाना यांचा विवाह सरफराज अहमद पटेल यांच्यासोबत २६ जून २०११ रोजी झाला होता. त्यानंतर पतीने त्यांना पोस्टाने पत्र देऊन तलाक दिला. या निर्णयाविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात आव्हान देऊन दावा दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी हा निकाल दिला.

२६ जून २०११ रोजी अफसना यांचा विवाह सरफराज यांच्यासोबत झाला. मूळचे सोलापुरात राहणारे सरफराज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेंबेवाडी येथे शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहेत. अफसाना यांना सासरी भांडण करून माहेरी पाठवून दिले. १८ एप्रिल २०१४ पासून तीन वेळा पोस्टाने तलाकनामा पाठवून दिला. या तलाकनामा विरुद्ध २५ मार्च २०१५ रोजी कौटुंबिक न्यायालयात अफसाना यांनी दावा दाखल केला होता. याबाबत चौकशी होऊन कौटुंबिक न्यायालयाने हा दावा मान्य करून तलाक अर्ज फेटाळला. अफसाना व सरफराज यांचा विवाह योग्य असून, पतीने दिलेला तलाक हा बेकायदा असल्याचे मत नोंदवले. अफसाना यांच्यातर्फे अॅड. शिरीष जगताप आणि सरफराज यांच्यातर्फे अॅड. मोहम्मद सलीम खतीब यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर, पुण्यातील दरोडेखोरांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात दरोडे घालून धुमाकूळ माजवणाऱ्या दोघा सराईत दरोडेखोरांना पिस्तुल आणि दहा जिवंत काडतुसासह सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दिनेश रवींद्र क्षीरसागर (वय २४, रा. मंगळवेढा तालीम सोलापूर), सचिन उत्तम महाजन (वय २४, सुरतवड, ता. इंदापूर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. सोलापूर शहर परिसरातील गुन्ह्यामध्ये हव्या असलेल्या गुन्हेगारांची माहिती काढण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांची तपासणी करण्यास सांगितले. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अजित कुंभार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका जबरी चोरीचा तपास करीत असताना त्यांना एक सराईत गुन्हेगार ७० फूट रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार त्यांनी सापळा लावला. दिनेश क्षीरसागर तिथे दिसून आला असता, त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्यासोबतच सचिन महाजन असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सचिनलाही अटक केली. त्या दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि दहा जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यातील १६ हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, दिनेशने सोलापूर शहरातील एमआयडीसी आणि सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन दरोडे घातले होते. तर, या दोघा सराईत दरोडेखोरांनी मिळून पुणे जिल्ह्यातील यवत, वालचंदनगर या परिसरात दरोडे घातले होते. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात गुन्हे करून हे दोघेजण फरार होते. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टाद्वारे दिलेला तलाक फॅमिली कोर्टाने फेटाळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

पोस्टाद्वारे पतीने पत्नीला दिलेला तलाक अवैध ठरवत कौटुंबिक न्यायालयाने तलाक अर्ज नुकताच फेटाळून लावला. सोलापुरातील अफसाना यांचा विवाह सरफराज अहमद पटेल यांच्यासोबत २६ जून २०११ रोजी झाला होता. त्यानंतर पतीने त्यांना पोस्टाने पत्र देऊन तलाक दिला. या निर्णयाविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात आव्हान देऊन दावा दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी हा निकाल दिला.

२६ जून २०११ रोजी अफसना यांचा विवाह सरफराज यांच्यासोबत झाला. मूळचे सोलापुरात राहणारे सरफराज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेंबेवाडी येथे शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहेत. अफसाना यांना सासरी भांडण करून माहेरी पाठवून दिले. १८ एप्रिल २०१४ पासून तीन वेळा पोस्टाने तलाकनामा पाठवून दिला. या तलाकनामा विरुद्ध २५ मार्च २०१५ रोजी कौटुंबिक न्यायालयात अफसाना यांनी दावा दाखल केला होता. याबाबत चौकशी होऊन कौटुंबिक न्यायालयाने हा दावा मान्य करून तलाक अर्ज फेटाळला. अफसाना व सरफराज यांचा विवाह योग्य असून, पतीने दिलेला तलाक हा बेकायदा असल्याचे मत नोंदवले. अफसाना यांच्यातर्फे अॅड. शिरीष जगताप आणि सरफराज यांच्यातर्फे अॅड. मोहम्मद सलीम खतीब यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पोलिसाने वाचविले बाळाचे प्राण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर मध्य रेल्वे विभागाच्या दौंड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर एका निर्दयी माता-पित्यांनी आपल्या एक महिन्याच्या गोंडस मुलाला बुधवारी मध्यरात्री रुळाजवळ फेकून दिले होते. परंतु, एका पोलिसामुळे त्या बाळाला जीवदान मिळाल्याने 'देव तारी त्याला कोण मारी'ची प्रचिती आली आहे.

गुरुवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिस विनीत कुमार हे कुर्डुवाडी ते दौंड मार्गावर ड्युटी करीत होते. तेव्हा दौंड रेल्वे स्थानकाजवळ अंधारातून बाळ रडण्याचा आवाज येऊ लागला. ज्या दिशेने आवाज येत होता, त्या दिशेला जाऊन विनीत यांनी कोण रडत आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना रुळावर फेकलेल्या एका प्लास्टिक पिशवीतून बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे दिसून आले. निर्दयी माता-पित्यांनी त्या बाळाला एका कापडामध्ये गुंडाळून प्लास्टिक पिशवीत ठेवून रुळाजवळील रेल्वे खांबाजवळ फेकून दिले होते. विनीत कुमार यांनी लगेचच बाळाला कुशीत घेतले. काही मिनिटांतच बाळाचे रडणे थांबले आणि ते बाळ विनीत कुमार यांच्या कुशीत झोपी गेले. विनीत कुमार यांनी तातडीने बाळाला दौंड येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. तेथील डॉक्टरांनी बाळाची तपासणी करून बाळ सुखरूप असल्याची खात्री केली. विनीत कुमार यांनी त्या बाळाला गुरुवारी सकाळी लोहमार्ग पोलिसांकडे सोपविले. लोहमार्ग पोलिसांनी पुढील उपचारासाठी बाळाला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले व दिवसभर कोर्टाचे कामकाज पूर्ण केले. कोर्टाच्या आदेशानुसार त्या बाळास सुखरूप ठिकाणी ठेवले जाणार असल्याची माहिती दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार ए. के. मोतेवार यांनी दिली. पोलिसांकडून बाळाला कोणी फेकून दिले, त्याचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे सुविधा फास्ट ट्रॅकवर

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : कोल्हापुरात रेल्वेचा प्रवास आणि सुविधा यांचे नाते तसे दूरचेच होते. मात्र, गेल्या दोन वर्षात राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचा कायापालट होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रॅम्प, उड्डानपूल, सरकता जिना यासह विश्रामगृहाचीही निर्मिती होत आहे. शाहूपुरी मंडईच्या बाजुला नवीन तिकीटगृह बांधले जाणार आहे, त्यामुळे राजारामपुरी, शाहूपुरीकडून येणाऱ्या प्रवाशांना तिकीट घेऊनच रेल्वे स्थानकात पोहोचता येईल. शिवाय कोल्हापूर - पुणे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामालाही गती आल्याने रेल्वेच्या सुविधा 'फास्ट ट्रॅक'वर येत आहेत.

दक्षिण महाराष्ट्रातील शेवटचे रेल्वे स्थानक असलेल्या राजर्षी शाहू महाराज टर्मिनसचा कोल्हापूरसह आसपासच्या परिसराचा विकास साधण्यात मोठा वाटा आहे. या स्टेशनवरून प्रवाशांसह मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. कोल्हापूर-वैभववाडी या मार्गामुळे आता कोकणही जोडले जाणार आहे. पुणे ते कोल्हापूर या मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. विद्युतीकरणाच्या कामाला गती मिळाली असून, पोल उभे करण्यासाठी फाउंडेशन तयार केले जात आहे. डिसेंबर अखेर पोल उभारणीचे काम पूर्ण होईल. कोल्हापूर रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या आणि रेल्वे स्थानकात येणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढल्याने प्लॅटफॉर्मचीही संख्या वाढली. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सुरू असलेला पाठपुरावादेखील रेल्वे स्थानकाच्या विकासाला उपयुक्त ठरत आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा रेल्वेसह कोल्हापूरच्याही हिताच्या ठरणार आहेत.

रॅम्पमुळे सर्व प्लॅटफॉर्म जोडले

रेल्वे गाड्यांची आवक-जावक वाढल्याने प्लॅटफॉर्मची संख्या वाढली. मात्र, प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवाशांना पुरेशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. पायऱ्यांचा उड्डानपूल असल्याने दिव्यांग व्यक्तींना तीन, चार नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जाता येत नव्हते, त्यामु‌ळे सर्व प्लॅटफॉर्मना जोडणारा रॅम्प तयार करण्यात आला आहे. हा रॅम्प दिव्यांगांसह सर्वच प्रवाशांना सोयीचा ठरणार आहे. प्रवाशांना उन आणि पावसाचा त्रास होऊ नये, यासाठी रॅम्पवर पत्रे घातले आहेत. शाहूपुरी मंडईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना रॅम्पमुळे थेट एक नंबर प्लॅटफॉर्मवर जाता येते, तर एक नंबर प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना शाहूपुरी, राजारामपुरी परिसरात जाणेही सोयीचे बनले आहे. रॅम्पमुळे सर्व प्लॅटफॉर्मचा वापर वाढणार आहे.

शाहूपुरी मंडईजवळ नवीन तिकीटगृह

रेल्वे स्थानकात सध्या एकच तिकीटगृह आहे. सर्वच प्रवाशांना स्टेशन रोडवरून रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीत जाऊन तिकीट घ्यावे लागते. रेल्वे फाटककडून येणारे प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरूनच तिकीट काढण्यासाठी जातात. या प्रवाशांकडे तिकीट नसल्याने रेल्वेचे तिकीट तपासणीस अशा प्रवाशांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी शाहूपुरी मंडईच्या बाजुला नवीन तिकीटगृह तयार होणार आहे. शाहूपुरी, राजारामपुरीच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना परिखपूल किंवा व्हिनस कॉर्नरकडून स्टेशनला जावे लागत होते. या प्रवाशांना नवीन तिकीटगृहात तिकीट घेऊन रॅम्पवरून थेट स्टेशनमध्ये पोहोचणे शक्य झाले आहे. या सोयीमुळे प्रवाशांच्या वेळेचीही बचत होईल.

सरकत्या जिन्याचे काम अंतिम टप्प्यात

रेल्वे स्थानकातून शाहूपुरी मंडईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना सरकत्या जिन्यावरून उतरण्याची सोय होणार आहे. रॅम्पवरून आल्यानंतर प्रवासी थेट सरकत्या जिन्यावरून पुढे मंडईच्या दिशेने बाहेर पडतील. रेल्वे स्थानकात हा पहिलाच सरकता जिना बसवला जात आहे. फाउंडेशनचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सरकते जिने रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात मिळाले आहे. विद्युत मोटर बसवण्यासाठी जागा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पंधरा ते वीस दिवसात हे काम पूर्ण होईल, असा विश्वास ठेकेदारांनी व्यक्त केला. सरकत्या जिन्यामुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे, त्याचबरोबर प्रवाशांना रेल्वे स्थानकातून गतीने बाहेर पडता येईल.

प्रवाशांसाठी विश्रामगृह

रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांना काही काळ थांबायचे असल्यास त्यांच्यासाठी विश्रामगृहाची निर्मिती केली जात आहे. लवकरच विश्रामगृहाचे काम पूर्ण होणार आहे. या ठिकाणी प्रवाशांना थांबता येईल. स्वच्छतागृह आणि अंघोळीची व्यवस्था असल्याने पर्यटकांसह भाविकांची सोय होणार आहे. सध्या तिरुपती, शिर्डी येथून रेल्वेने येणारे भाविक शहरात हॉटेल्स, लॉजचा शोध घेतात. काही काळासाठी त्यांना हजार रुपये मोजावे लागतात. अशा प्रवाशांना माफक पैसे खर्चुन विश्रामगृहात थांबता येणार आहे. सध्या विश्रामगृहाच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. येणाऱ्या पंधरा दिवसात काम पूर्ण होईल. यानंतर हे विश्रामगृह वापरासाठी खुले होणार आहे. याशिवाय तीन नंबर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचेही काम सुरू आहे. १०० मीटर लांबी वाढल्याने १८ डब्यांची गाडी या प्लॅटफॉर्मवर लावणे शक्य होणार आहे.

ओव्हरब्रीजसह पार्किंग सुविधा आवश्यक

परिख पुलाजवळ रेल्वे फाटक येथे रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी ओव्हरब्रीजची गरज आहे. याला मान्यता मिळाली असून ओव्हरब्रीजही तयार आहे. ओव्हरब्रीज बसवण्याचे काम महापालिकेकडे आहे. यासाठी मोठ्या क्षमतेच्या दोन क्रेनची गरज आहे. या क्रेन कोल्हापुरात उपलब्ध नसल्याने ओव्हरब्रीजचे काम रखडले आहे. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांसाठी तातडीने ओव्हरब्रीज तयार होणे गरजेचे आहे. याशिवाय रेल्वे स्टेशनसमोर पार्किंगला अद्याप शिस्त नाही. रेल्वे येताच बेशिस्त रिक्षाचालकांमुळे कोंडी निर्माण होते. याशिवाय शाहूपुरी मंडईच्या बाजुला नव्याने तिकीटगृह होणार असल्याने त्याही बाजुला प्रवाशांची वर्दळ वाढणार आहे. या परिसरात पार्किंगची सुविधा तयार करणे गरजेचे आहे.

सुरू कामांसाठी आर्थिक तरतूद

९४ लाख

प्लॅटफॉर्म वाढवणे

१ कोटी २७ लाख

फ्लॅटफॉर्म शेड व सुविधा

२ कोटी ५० लाख

रॅम्प व सरकता जिना

९० लाख

अद्ययावत विश्रामगृह

रेल्वे गाड्यांची दैनंदिन आवक-जावक

येणाऱ्या गाड्या - ११

जाणाऱ्या गाड्या - १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधत्वावर मात करत विस्तारले समाजकार्य क्षितिज

$
0
0

sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरमध्ये उंच झेप घेण्याच्या एका टप्प्यावर त्याला अचानक अंधत्वाला सामोरे जावे लागले. सव्वीसाव्या वर्षी आलेल्या अंधत्वामुळे तो काहीकाळ नाऊमेद झाला. या काळात त्याला मित्राने हेलन केलर यांचे जीवन चरित्र वाचून दाखवले. त्यातून प्रेरणा घेत विक्रांत गायकवाड या तरुणाने ग्रामीण भागात महिलांसाठी सामाजिक कार्याचे क्षिजित विस्तारले आहे.

पन्हाळा तालुक्यातील देवाळे येथील विक्रांतला एके दिवशी क्रिकेट खेळताना चेंडू पकडताना अडचण जाणवू लागली. अचानक दृष्टी धूसर झाल्याने नेत्ररोग तज्ज्ञांकडे डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्याला डोळ्यांचा ग्लाकोमा नावाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक अडचण व योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाअभावी त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी कायमची गेली. त्याने उजव्या डोळ्याची पाहण्याची क्षमता ९४ टक्के गमावली आहे. त्याच्यावर जालना येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. पण उपचारासाठी विलंब झाल्याने फारसे काही करता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर तो खूप निराश व नाउमेद झाला. त्याने कित्येक महिने नैराश्यात काढले. नंतर अंधांसाठी आदर्श असलेल्या हेलन केलरच्या आत्मचरित्रामुळे त्याला नव्याने आयुष्याला सुरुवात करण्याचे बळ मिळाले.

दृष्टी गेल्याने विक्रांतला सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्याने गावातील २० महिलांना एकत्र करून नक्षत्र महिला सामाजिक संस्थेची सुरुवात केली. या संस्थेच्या माध्यमातून आठवडी बाजारात महिलांनी बनविलेल्या गृहपयोगी वस्तूंची विक्री करण्यात येते. या उपक्रमामुळे महिलांना आत्मविश्वास मिळून त्यांच्यातील विक्रीकौशल्य वाढण्यास मदत झाली. गेल्यावर्षी त्याने महिलांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यात ३१ महिलांनी रक्तदान केले. जवळपास ४६ बाटल्या रक्त संकलन उपक्रमातून झाले.

लघू उद्योग उभारणीचा संकल्प

आगामी काळात महिलांसाठी गृहपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ निर्मितीचा लघू उद्योग उभारण्याचा विक्रांतचा प्रयत्न आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने फिरता कक्ष उभा करण्यात येणार आहे. जो गावोगावी जाऊन महिलांमध्ये जाणीवजागृतीचे काम करेल. त्याचबरोबर महिलांविषयक शासनाच्या सर्व योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी तो प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातील कौटुंबिक हिंसाचाराला दारू हा घटक जबाबदार असल्याने दारूबंदीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संस्थेच्या माध्यमातून पन्हाळा तालुका व्यसनमुक्त करण्याचा निर्धार त्याने केला आहे. महिलांना न्यायविषयक हक्कांची जाणीव व्हावी, यादृष्टीने श्रम व रोजगार मंत्रालायाच्या श्रमिक शिक्षण बोर्डाकडूनही त्याला सहाय्य मिळते आहे. त्यामध्ये गावोगावी जाऊन व्याख्यानांच्या माध्यमातून महिलांचे प्रबोधन केले जाते. दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी वृक्षलागवडीचा संकल्पदेखील महिलांनी केला आहे.

अनेकदा आयुष्यात अचानक अपघातांना सामोरे जावे लागते. त्यावेळी तरुणांनी निराश न होता नव्याने सुरुवात करावी. संकटे, अडचणी आपली परीक्षा पाहत असतात. आजच्या युवा पिढीने आत्मविश्वासाने, धैर्याने जीवनाला सामोरे जावे. कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करणे शक्य असल्याचा मोठा धडा मी दृष्टी गमावल्यानंतर शिकलो.

- विक्रांत गायकवाड, अध्यक्ष, नक्षत्र महिला संस्था देवाळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज वितरणकंपनीचे आवाहन

$
0
0

कोल्हापूर : गणेशोत्सव काळात तात्पुरती वीज संच जोडणी सरकारमान्य विद्युत ठेकेदाराकडूनच करून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी अशा ठेकेदाराशी संपर्क साधावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे निरीक्षक वि. वि. बिरादार यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जि. प.वर मेहेरनजर, महापालिकेसोबत दुजाभाव

$
0
0

\B

लोगो - साहित्य, संस्कृती

\B

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet@Appasaheb_MT

कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये साहित्यविषक गोडी लागावी, संस्कार कथा, वैज्ञानिक गोष्टीव्दारे संस्कारक्षम मने घडावीत असा उद्देश ठेवून राज्य सरकारकडून जिल्हा परिषद शाळांना 'किशोर' मासिक अंक उपलब्ध केले जातात. यंदा तर सरकारने, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील ६१,५५७ शाळांना किशोर अंक देण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यासाठी साहित्यविषयक उपक्रमांना चालना देताना राज्य सरकारला महापालिका व नगरपालिका शाळांचा विसर पडला आहे. काही शिक्षण संस्था व संघटनांनी, शिक्षण संचालकांना भेटून हा विषय त्यांच्यासमोर मांडणार आहेत.

दरम्यान महापालिका आणि नगरपालिकेच्या शाळेतही 'किशोर' मासिक उपलब्ध करुन दिल्यास मनोरंजनातून ज्ञानसंवर्धन या संकल्पनेला व्यापक रुप लाभेल अशा भावना या क्षेत्राच्या आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी विविध पातळीवर प्रयत्नशील आहे. मंडळाने, शालेय मुलांचे संस्कारक्षम वय लक्षात घेऊन साहित्यिक उपक्रम सुरू केले आहेत. बालभारतीने, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर १९७१ पासून आठ ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांसाठी किशोर मासिक सुरू केले आहे. मराठीतील नामवंत लेखक, कवींनी किशोरसाठी लिखाण केले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, नवनवे शोध, संस्कारकथा, प्रवासवर्णन, व्यक्तीचित्रांनी त्यामध्ये समावेश असतो.

सन २००१मधील यादीनुसार सध्या जिल्हा परिषदेच्या ५३,५८५ प्राथमिक शाळांना किशोर अंकाचा पुरवठा करण्यात येत आहे. २००१ नंतर नव्याने सुरु असलेल्य शाळांच समावेश नसल्यामुळे त्यांना किशोर मासिक उपलब्ध होत नव्हता. त्या शाळा या योजनेपासून वंचित आहेत. अशा वंचित शाळांना किशोर मासिकाचा पुरवठा व्हावा म्हणून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू होते. सरकारने या वर्षापासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना 'किशोर'मासिक अंकाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बाब सरकारच्या विचाराधीन होती. त्यानुसार २०१८-२०१९ या आर्थिक वर्षापासून ६१,६५७ जिल्हा परिषद शाळांना किशोर अंक वितरीत करण्यासाठी दरवर्षी ४९,३,५६० इतका निधी वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सरकारने या योजनेत महापालिका व नगरपालिका शाळांचा समावेश करावा यासाठी काही शैक्षिणक संस्था, संघटना प्रयत्नशील होत्या. त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी किशोर हे अत्यंत दर्जेदार मासिक आहे. शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठी उपयुक्त माहिती मासिकात असते. मुलांच्या अवांतर वाचनासाठी किशोर मासिक उपयुक्त आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्हा परिषदेप्रमाणे महापालिका व नगरपालिका शाळांनाही अंक द्यावते.

- विनोदकुमार भोंग, शिक्षक, महापालिका शाळा

जिल्हा परिषदेप्रमाणे महापालिका आणि नगरपालिका सुध्दा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना 'किशोर'सारखे दर्जेदार मासिक उपलब्ध झाले पाहिजे. सरकारने त्यासाठी निधीची तरतूद करावी. यासाठी शिक्षण विभागांशी पाठपुरावा सुरू आहे.

- राजेंद्र कांबळे, राज्य महासचिव, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर, पुण्यातील दरोडेखोरांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात दरोडे घालून धुमाकूळ माजवणाऱ्या दोघा सराईत दरोडेखोरांना पिस्तुल आणि दहा जिवंत काडतुसासह सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दिनेश रवींद्र क्षीरसागर (वय २४, रा. मंगळवेढा तालीम सोलापूर), सचिन उत्तम महाजन (वय २४, सुरतवड, ता. इंदापूर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. सोलापूर शहर परिसरातील गुन्ह्यामध्ये हव्या असलेल्या गुन्हेगारांची माहिती काढण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांची तपासणी करण्यास सांगितले. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अजित कुंभार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका जबरी चोरीचा तपास करीत असताना त्यांना एक सराईत गुन्हेगार ७० फूट रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार त्यांनी सापळा लावला. दिनेश क्षीरसागर तिथे दिसून आला असता, त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्यासोबतच सचिन महाजन असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सचिनलाही अटक केली. त्या दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि दहा जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यातील १६ हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, दिनेशने सोलापूर शहरातील एमआयडीसी आणि सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन दरोडे घातले होते. तर, या दोघा सराईत दरोडेखोरांनी मिळून पुणे जिल्ह्यातील यवत, वालचंदनगर या परिसरात दरोडे घातले होते. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात गुन्हे करून हे दोघेजण फरार होते. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात तिघे जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

विजापूर रोडवरील संभाजी तलावनजीक पत्रकार भवन चौकात गुरुवारी पहाटेच्या सुमारास भरधाव कंटेनरची डंपरला धडक बसून झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. कंटेनर रस्ता दुभाजकानंतर चौकातील हायमास्ट दिव्याला धडकल्याने दिवा खाली कोसळला. तसेच, अपघातग्रस्त वाहनांमधील ऑइल मोठ्या प्रमाणावर सांडल्याने तातडीने अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा मारून रस्ता स्वच्छ केला.

कंटेनर विजापूर रस्त्याच्या दिशेने वळत असताना विजापूर रोडहून सात रस्त्याच्या दिशेने निघालेल्या डंपरला धडकला. यानंतर तो रस्ता दुभाजकावर जाऊन आदळला आणि धडकेने दिवाही खाली कोसळला. बुधवारी याच चौकात ट्रकच्या धडकेने विद्युत खांब कोसळला होता. शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीचे परिणाम आणि त्या विरोधात रोष सुरू असतानाच पहाटे हा अपघात झाला आहे. कंटेनर आणि डंपरमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणालाही मोठी इजा झाली नाही. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळांना अंध कलाकारांची साद

$
0
0

वसतीगृहातील मदतीसाठी कार्यक्रम ठेवण्याचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील अंध कलाकारांच्या नवरंग वाद्यवृंद शिवा हिरो बेंजो पार्टीतर्फ लावणी, मराठी भावगीते, भक्ती गीत, हिंदी, मराठी गाणी सादर केली जातात. त्यातून मिळणारे पैसे अंध मुलामुलींच्या निवासी वसतीगृहासाठी वापरली जाते. अंध विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी गणेशोत्सव काळात अधिकाधिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित करावा, अशी साद अंध युवक मंचचे अध्यक्ष संजये ढेंगे, अजय वणकुद्रे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत घातली.

ते म्हणाले, 'करवीर तालुक्यातील हणबरवाडीतील अंध युवक मंचतर्फे राजोपाध्येनगरमधील अंध मुलामुलींचे निवासी वसतिगृह चालवले जाते. वसतिगृहात महाराष्ट्रातील गरजू अंध मुले, मुली मोफत निवास, शिक्षणाची सोय केली जाते. सरकारकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेली आर्थिक मदत वापरली जाते. मात्र मदतीत सातत्य राहत नाही. परिणामी आर्थिक ओढाताण होते. यामुळे वसतीगृहाच्या अंध विद्यार्थी कलाकारांच्या गाण्यांचा कार्यक्रम वर्षभर विविध ठिकाणी केले जातात. कार्यक्रमात १७ अंध कलाकार दृष्टी असणाऱ्यांनाही लाजवेल अशी गाणी गातात, वाद्य वाजवतात. असा कार्यक्रम सादर करण्याची संधी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी द्यावी. त्यातून वसतीगृहातील अंध विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल. '

--------------

आईवर गायिले गाणं

मूळची पालघरची आणि वसतीगृहात राहून शिकत असलेली पूनम गुंजारा हिने पत्रकार परिषदेत आईवरील कविता सादर करून लक्ष वेधले. समोरच्या श्रोत्यांची दाद दृष्टीने दिसत नसतानाही तिने गाणे गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजर्षी शाहूंची अर्थनीती’वर ग्रंथ निर्मिती

$
0
0

फोटो आहे...

.......................

'राजर्षी शाहूंची अर्थनीती'वर ग्रंथ निर्मिती

प्राचार्य जे. के. पवार संपादित ग्रंथांचे बुधवारी प्रकाशन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक क्षेत्रातील विचारकार्य जितके क्रांतिकारी तितकेच आर्थिक क्षेत्रातील कामही पथदर्शक आहे. त्यांनी सामाजिक व आर्थिक परिवर्तन यांना एकत्र आणून नागरिकांच्या कल्याणाचे ध्येय उराशी बाळगले होते. त्यांच्या आर्थिक विचार व कार्यावर प्राचार्य जे. के. पवार यांनी 'राजर्षी शाहूंची अर्थनीती' या ग्रंथांची निर्मिती केली आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.१२) ग्रंथांचा प्रकाशन होणार आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता प्रकाशन होणार आहे. या ग्रंथांची वैशिष्ट्ये सांगताना प्राचार्य पवार म्हणाले, 'राजर्षी शाहूंची अर्थनीती'मध्ये १६ अर्थतज्ज्ञ व संशोधकांचे लेख आहेत. राजर्षींची अर्थनीती स्पष्ट करणारे एकूण ७६ आदेश, जाहीरनामे व हुकूमनामे आहेत. सहा भाषणे व पाच आठवणींचा समावेश आहे. महाराजांच्या अर्थनीतीमागे उत्पन्न व संपत्तीच्या बाबतीतील विषमता नष्ट करणे, किमान वेतन व रोजगाराची हमी, खासगी क्षेत्रातील सर्वोत्तम बाबींचा समाजास उपयोग व्हावा ह उद्देश होता. ४०० पानांच्या ग्रंथात माजी कुलगुरू डॉ. व्ही.बी.घुगे, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. रमेश जाधव, डॉ. अनिल पडोशी, डॉ. एम.एन. शिंदे, डॉ. पी. ए. कोळी, डॉ. विजय ककडे आदींच्या लेखांचा समावेश आहे.' याप्रसंगी प्रकाशक पद्मजा पवार, प्राचार्य दिग्विजय पवार, प्रा. डॉ. एम. के. कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टाद्वारे दिलेला तलाक फॅमिली कोर्टाने फेटाळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

पोस्टाद्वारे पतीने पत्नीला दिलेला तलाक अवैध ठरवत कौटुंबिक न्यायालयाने तलाक अर्ज नुकताच फेटाळून लावला. सोलापुरातील अफसाना यांचा विवाह सरफराज अहमद पटेल यांच्यासोबत २६ जून २०११ रोजी झाला होता. त्यानंतर पतीने त्यांना पोस्टाने पत्र देऊन तलाक दिला. या निर्णयाविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात आव्हान देऊन दावा दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी हा निकाल दिला.

२६ जून २०११ रोजी अफसना यांचा विवाह सरफराज यांच्यासोबत झाला. मूळचे सोलापुरात राहणारे सरफराज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेंबेवाडी येथे शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहेत. अफसाना यांना सासरी भांडण करून माहेरी पाठवून दिले. १८ एप्रिल २०१४ पासून तीन वेळा पोस्टाने तलाकनामा पाठवून दिला. या तलाकनामा विरुद्ध २५ मार्च २०१५ रोजी कौटुंबिक न्यायालयात अफसाना यांनी दावा दाखल केला होता. याबाबत चौकशी होऊन कौटुंबिक न्यायालयाने हा दावा मान्य करून तलाक अर्ज फेटाळला. अफसाना व सरफराज यांचा विवाह योग्य असून, पतीने दिलेला तलाक हा बेकायदा असल्याचे मत नोंदवले. अफसाना यांच्यातर्फे अॅड. शिरीष जगताप आणि सरफराज यांच्यातर्फे अॅड. मोहम्मद सलीम खतीब यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

उजनी धरण तुडुंब भरल्यानंतर आता धरणातून सीना माढा उपसा सिंचन योजनांना पाणी सोडण्यात येत असून, राजकीय हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांची मनमानी यामुळे गेला महिनाभर अनेक गावांना पाणीच मिळाले नाही. शिवाय, पाण्याची मागणी केले असता, निंबाळकर नावाच्या अभियंत्याने दारू पिऊन शेतकऱ्यांना उद्दाम भाषेत उत्तर दिल्याने आक्रमक झालेल्या शिंदेवाडी व इतर गावातील शेतकऱ्यांनी गुरुवारी माढा कुर्डुवाडी रस्त्यावर 'रास्ता रोको' आंदोलन केले.

अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून पाणी दिले जात नाही. शिवाय, अभियंत्याने दारू पिऊन उद्दाम भाषेत उत्तरे देत असल्याची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये, 'तुम्हाला पाणी हवे असेल, तर वरून फोन आणा. थेट तालुक्याच्या नेत्याकडे जा,' असे सांगत असल्याचे समोर आले आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतरही 'आपले कोणी वाकडे करू शकत नाही. फार तर माझी बदली होईल. तुम्हाला कुठे जायचे आहे, तिथे जा. तक्रारी करा,' अशा भाषेत उत्तर मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी माढा - कुर्डुवाडी रस्त्यावर 'रास्ता रोको' आंदोलन केले. आंदोलनस्थळावर जलसंपदा विभागाचे अधिकारी येत नसल्याने आंदोलकांनी रस्ता अडवून धरला. मात्र, या 'रास्ता रोको'त चक्क माढा तहसीलदार सदाशिव पडदुणे हेदेखील अडकल्यानंतर अधिकारी आंदोलनस्थळी आले आणि हा रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेत्रदान पंधरवडानिमित्त घोषवाक्य स्पर्धा

$
0
0

कोल्हापूर : सायबरमधील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग व जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीतर्फे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे पोस्टर प्रदर्शन व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नेत्रदान पंधरवडानिमित्त आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन 'सायबर'चे संचालक डॉ. एम. एम. अली यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. एस. के. अजेटराव यांचे नेत्रदानविषयी व्याख्यान झाले. अजेटराव यांनी 'नेत्रदान ही समाजातील उत्कृष्ट परंपरा बनावी' असे मत व्यक्त केले. समुपदेशिका अनुप्रिता घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी समाजकार्य विभागप्रमुख डॉ. एस.व्ही.शिरोळ, कार्यक्रम समन्वयक डॉ. के. एन. रानभरे, डॉ. के. प्रदीपकुमार, डॉ. पी.एस. रणदिवे, डॉ. एस. एस. आपटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. डी. एन. वळवी यांनी केले. वैभव कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.एस.पी. रजपूत यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नमामि’साठी पंचगंगेचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी भरीव निधी मिळण्यासाठी येथील प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाने प्रस्ताव तयार केला आहे. तो प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव सरकारकडे गेल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

देशातील सर्वाधिक नदी प्रदूषणात पंचगंगा नदीचाही सामावेश आहे. प्रदूषणमुक्तीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी केंद्र, राज्य सरकारकडून निधी मिळालेला नाही. दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी, औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी रोखण्यात अपयश आले. परिणामी प्रदूषणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट झाला आहे. तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्या कुचकामी ठरल्या आहेत.

भरीव निधीसाठी केंद्र सरकारच्या नमामि योजनेतून प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावात शहरातील ११२ तर इचलकरंजीतील ११० किलोमीटरचे अंतर्गत नाले पूर्ण करणे, पंचगंगा नदी घाटावर गौरी, गणपती विसर्जनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे, नदीकाठावरील गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, आवश्यक त्या ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारणे अशा कामांचा सामावेश आहे.

-------------------

नमामि पंचगंगेचा प्रस्ताव तयार केला आहे. तो विभागीय आयुक्तांकडे पाठविला. तेथून सरकारकडे जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल. - प्रशांत गायकवाड, उपअधिकारी, प्रादेशिक प्रदूषण नियंत्र मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय संन्यास घेणार नाही, पाटलांचं घुमजाव

$
0
0

कोल्हापूर:

'यापुढे कोणतीही लोकसभा, विधानसभा किंवा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार नाही,' अशी घोषणा करून चोवीस तासही उलटले नाही तोच राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव केलं आहे. 'राजकीय संन्यास घेणार नाही', असं स्पष्ट करतानाच माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा खुलासाही पाटील यांनी केला.

कोल्हापुरात गुरुवारी जिल्हा पोलिस दलातर्फे गणराया अॅवॉर्ड वितरण समारंभ पार पडला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्या संदर्भातील बातम्या छापून आल्यानंतर पाटील यांनी हा खुलासा केला. 'कोल्हापुरात गेल्यावर्षी मी डॉल्बीच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे कोल्हापुरात डॉल्बी लागला नव्हता. त्याचा उल्लेख करताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाटील यांनी गणेश मंडळांचा विरोध पत्करल्यानं मंडळांमध्ये नाराजी आहे, असं कालच्या कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यावर डॉल्बीला विरोध हा काही माझा पर्सनल अजेंडा नव्हता. त्या मुद्द्यावर मला काही निवडणूक लढवायची नाही. माझी काही सामाजिक भूमिका आहे, त्यामुळेच मी विरोध केला, असं मी या भाषणात बोललो. निवडणूक लढवायची नाही, हे वाक्य वेगळ्या संदर्भानं आलं होतं. मात्र त्याचा विपरीत अर्थ काढण्यात आला', असं पाटील यांनी सांगितलं.

'राजकीय संन्यास घेणं हे आमच्या हातात नसतं. भाजपमध्ये वेगळी शिस्त आहे. पक्ष सांगेल तेच करावं लागतं. आम्ही निवडणूक लढवायची की नाही हे पक्षाच्या हातात असतं, त्यामुळे निवडणूक न लढवण्याचा प्रश्नच येत नाही', असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर रेल्वे स्थानक मॉडेल स्थानक म्हणून विकसित करावे. शताब्दी एक्स्प्रेसच्या धर्तीवर कोल्हापूर-पुणे मार्गावर एक्सप्रेस रेल्वे सुरू करावी, पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण तातडीने पूर्ण करावे, त्याचबरोबर लोकांच्या भावना लक्षात घेऊन इचलकरंजी मार्गाचा फेरविचार करावा,' अशा मागण्या खासदारांनी बैठकीत केल्या आहेत. मध्य रेल्वेचे अधिकारी आणि खासदारांची बैठक शुक्रवारी (ता. ७) पुणे येथे झाली.

बैठकीत खासदार महाडिक यांनी प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या सद्यस्थितीची विचारणा केली. या मार्गाचे काम आयपीआरसीएल या कंपनीकडून होणार असून, ही कंपनी सध्या नव्या रेल्वे मार्गाचा अभ्यास करीत असल्याचे रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानक मॉडेल स्टेशनच्या रुपात विकसित केले जावे ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर कोल्हापूर स्थानकाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. कोल्हापुरातील गुड्स यार्डमध्ये येणारा माल उतरवण्यासाठी खूप वेळ जातो. परिणामी कोल्हापुरातून साखर पाठवताना विलंब होतो. त्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात आणि प्लॅटफॉम क्रमांक तीन व चारसाठी शेड उभे करावे, अशी सूचना त्यांनी केली. कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम नोव्हेंबर २०२२अखेर तर दुहेरीकरणाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

खासदार संभाजीराजे यांनी सचिव योगेश दातार यांच्याकडून निवेदन पाठवले. या निवेदनातून त्यांनी शताब्दी एक्सप्रेसच्या धर्तीवर कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय कोल्हापूर भागातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी कराड-कोल्हापूर-बेळगावी अशी नवी रेल्वे लाईन सुरू करण्यात यावी. हा मार्ग कोकणातील वैभववाडी विभागाला जोडण्यात यावा. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळावी. कोल्हापूरहून आठवड्यातून तीनदा मिरज, उस्मानाबाद, लातूर आणि उदगीरमार्गे बिदरला जाणाऱ्या रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी निवेदनातून केली आहे.

बैठकीसाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा, खासदार धनंजय महाडिक, संजय पाटील, खासदार उदयनराजे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इचलकरंजी रेल्वे मार्गास विरोध

इचलकरंजी येथील रेल्वे मार्गास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस पोलिस बंदोबस्तात या मार्गाचा सर्व्हे करण्यात आला. रेल्वे मार्गासाठी शेतजमीनीचे संपादन होणार असल्याने शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनीही या मार्गाला विरोध केला. शुक्रवारी बैठकीत खासदार राजू शेट्टी यांच्यावतीने स्वस्तिक पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. खासदार महाडिक यांनीदेखील लोकभावनेचा आदर करून इचलकरंजी येथील रेल्वे मार्गाचा पेरविचार करावा, असे मत मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ सप्टेंबरअखेर प्रतिबंधात्मक आदेश

$
0
0

कोल्हापूर : गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणूकप्रसंगी विविध गणेशोत्सव मंडळांकडून उच्च ध्वनीयंत्रणा लावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळी मंडळांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्ष, संघटना नेते, कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासनात संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कायदा, सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी कोल्हापूर फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार १३ ते २४ सप्टेंबर या कालावधीत शहर आणि जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी जारी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images