Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सीपीआरमध्ये तंबाखूविरोधी सप्ताह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक तंबाखू विरोधी सप्ताहाचा प्रारंभ राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

तंबाखू विरोधी जनजागृतीसाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीं व विद्यार्थींनींच्या मदतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी युवकांनी तंबाखू सेवनापासून स्वत:ला दूर ठेवावे व आपली आरोग्य संस्था व परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ दिली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमासारख्या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. थोरात यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व त्यामुळे होणारे तोटे यांवर माहिती दिली. कॅन्सर वॉरियर्स तज्ञ डॉ. प्रशांत लाड यांनी मौखिक आरोग्य व हृदयरोगचे तसेच तंबाखू सेवन विषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये तंबाखू दुष्परिणाम विरोधी पथनाटयाचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थितांना तंबाखू नियंत्रणाबाबतचे माहीती पत्रके वाटप करण्यात आले. डॉ. व्ही. पी. देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एफ. देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. पी. देशमुख, डॉ. प्रशांत लाड (कॅन्सर वॉरियर्स तज्ज्ञ) तसेच नर्सिंग कॉलेज प्राचार्या व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. सुरेश घोलप, समुपदेशक चारुशीला कणसे, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे, प्रियांका लिगंडे व ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्षाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थींनी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खोटी निवेदने देणाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0

खोटी निवेदने देणाऱ्यांवर कारवाई करा

कोल्हापूर : प्रशासन आणि समाजाची दिशाभूल करण्यासाठी खोटी निवदेन देणाऱ्या डाव्या व पुरोगामी संघटनांवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदुत्ववादी संघटनांनी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे, 'कोल्हापुरात बजरंग दलाच्या वतीने २१ ते २७ मे दरम्यान शौर्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी २७ मे रोजी पोलिसांची परवानगी घेऊन शस्त्रसंचलन केले. यात कोणत्याही प्रकारचा छुपा अजेंडा नव्हता. शस्त्रसंचलनात बोथट झालेले दाडपट्टे आणि नेमबाजीसाठी वापरली जाणारी एअरगण होती. मात्र, काही संघटनांनी यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे. शस्त्रसंचलन करून आम्ही कोणालाही धमकावत नाही अथवा दहशत माजवत नाही. तरीही काही संघटना विरोध करून द्वेष निर्माण करीत आहेत. खोटी निवेदने देणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी. शिष्टमंडळात संभाजीराव साळुंखे, श्रीकांत पोतणीस, बाबा पार्टे, किशोर घाटगे, महेश उरसाल, राजू जाधव, रणजित आयरेकर, प्रमोद सावंत, शशिकांत बिडकर, किरण पडवळ, दुर्गेश लिंग्रस, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'भिडेंवरील लक्ष हटविण्यासाठीच एल्गार परिषद टार्गेट'

$
0
0

पंढरपूर

कोरेगाव भीमा दंगलीतील आरोपी संभाजी भिडे यांच्यावरील लक्ष वळवण्यासाठीच सरकराने एल्गार परिषदेचा वाद निर्माण केला आहे, असा थेट आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी पंढरपुरात केला. भिडे आणि एकबोटे यांची नावे दंगलीत आल्यानेच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात झाला आहे, असे म्हणत, या सर्व प्रकरणाची स्कॉटलँड यार्ड पोलीसांकडून चौकशी करा अशी मागणी कवाडे यांनी केली आहे.

पुण्यातील एल्गार परिषदेसाठी नक्षलवाद्यांनी मदत केल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. कोरेगाव भीमा दंगलीतील आरोपी भिडे आणि एकबोटे यांच्यावरील लक्ष विचलित करण्यासाठीच एल्गार परिषदेचा मुद्दा पुढ आणण्यात आला आहे आणि हा सरकारचा डाव आहे. भिडे एकबोटे या सरकारपुरस्कृत हल्लेखोरानीच ही दंगल घडवली आहे अशा शब्दात आमदार कवाडे यानी सरकार, भिडे आणि एकबोटेंवर गंभीर आरोप केले आहेत.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या जीवाला आताच कसा धोका निर्माण झाला, एल्गार परिषदेनंतरच कसे वाटले की, यांचा जीव धोक्यात आहे असे प्रश्नही कवाडे यांनी उपस्थित केले आहेत. भिडे गुरूजींचे नाव आल्यानेच आता असे आरोप केले जात आहेत असे म्हणत, सरकार मध्ये हिंमत असेल तर त्यानी या सर्व प्रकरणाचा तपास स्कॉटलँड यार्ड पोलिसांकडून करावी अशी मागणी कवाडे यांनी केली.

आठवलेंवरही केली टीका

केंद्रीय राज्यमंत्री आठवलेचीं ऐक्याची हाक स्वतःच्या स्वार्थासाठी असते. जेव्हा ते संकटात असतात तेव्हा त्यांना ऐक्य आठवते. एकदा का आपले भले झाले की मग ते ऐक्य चुलीत घालतात, अशी कठोर टीका कवाडे यानी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रानेच रचला अपहरणाचा कट

$
0
0

मित्रानेच रचला अपहरणाचा कट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कन्सलटन्सीच्या कामात झालेल्या वादातून विजय कांबळे याला त्रास देण्यासाठी मित्र मारुती कांबळे यानेच अपहरण आणि खंडणी उकळण्याचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. काही महिन्यांपूर्वी एकत्र काम करणारा मित्रच वैरी बनल्याने विजय कांबळे यालाही धक्का बसला. मारुती कांबळे याच्या कटकारस्थानाने कुख्यात गुंड योगेश राणे पोलिसांच्या हाती लागला. या टोळीचे आणखी काही कारनामे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मारुती कांबळे याच्या सांगण्यावरून आकाश आगलावे आणि योगेश राणे यांनी सात ते आठ जणांकडून ३० एप्रिलला कळंब्यातील साई मंदिरापासून विजय कांबळे याचे अपहरण केले. 'तू अनेकांना कर्ज मंजूर करून मोठे कमिशन मिळवतोस. आम्हाला आत्ताच २५ लाख रुपये दे. नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी देऊन त्यांना स्टीलच्या पाइपने बेदम मारहाण केली. यानंतर आयटीआय कॉलेज, पाचगाव रोड, आर. के. नगर, भारती विद्यापीठ, चित्रनगरी, गोकुळ शिरगाव, फाइव्हस्टार एमआयडीसीत फिरवले. पुन्हा त्याच मार्गाने येऊन ते कळंबा जेलच्या बाजूस थांबले. दरम्यान, अपहृत विजय यांना त्यांच्या मोबाइलवरून घरी फोन करण्यास सांगितले. यावरून घरात असलेली रक्कम आणि सोन्याचे दागिने मागवून घेतले. पाच हजार रुपये रोख आणि दागिने मिळाल्यानंतर त्यांनी गुजरीतील एका सराफाकडे ७८ हजार, ५०० रुपयांना दागिन्यांची विक्री केली. सुमारे लाखाचा मुद्देमाल मिळाल्यानंतर विजय यास सोडून दिले.

पोलिसांनी गुन्ह्यातील इनोव्हावरून संशयितांचा शोध लावला. सुरुवातीला इनोव्हाचा मालक योगेश राणे याच्यापर्यंत पोलिस पोहोचले. यानंतर आकाश आगलावे आणि मारुती कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहरण आणि खंडणीचा कट अपहृत विजय यांच्या मित्राने म्हणजे मारुती कांबळे यानेच रचल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले.

कारवाईस विलंब

विजय कांबळे यांच्या अपहरणाचा गुन्हा ३० एप्रिलला घडला. यानंतर कांबळे यांनी तातडीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यास मात्र पोलिसांना सव्वा महिना लागला. या गुन्ह्यातील केवळ तीनच संशयित अटकेत आहेत. अद्याप पाच संशयित मोकाट आहेत. कारवाईस झालेल्या विलंबाबत मात्र पोलिसांनी मौन बाळगले. राणे याची काही पोलिसांशी विशेष जवळीक आहे.

राणे कुख्यात गुंड

पोलिसांनी अटक केलेला योगेश राणे हा रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. त्याच्यावर खंडणी, मारामारी, अपहरण, फसवणूक, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे असे १३ गुन्हे दाखल आहेत. शाहूपुरी, जुना राजवाडा, हातकणंगले, भुदरगड तसेच सातारा जिल्ह्यातील कराड पोलिस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. वाळू तस्करीतही त्याचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन अंध मित्रांची गरुडझेप

$
0
0

राहुल मगदूम, कसबा बावडा

भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूलमधील तीन अंध मुलांनी दहावीच्या परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून 'हम भी कुछ कम नहीं' दाखवून दिले. यामध्ये विनायक विलास पाटीलने ८३ टक्के,विजय लाखेने ७५ टक्के, तर सिद्धराज पाटीलने ७२ टक्के गुण मिळविले. या तीन अंध मुलांनी मिळवलेले हे यश म्हणजे डोळस मुलांना प्रेरणादायीच आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम असणाऱ्या अशा दुर्गमानवाड येथील अंध असणाऱ्या विनायकचे वडीलही अंध आहेत. त्याचबरोबर भाऊही अंध असून, तो अपंग आहे. नाममात्र शेतीवर उदरनिर्वाह चालतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने यश संपादन केले. आठवीमध्ये त्याने आपल्या दोन अंध मित्रांसोबत विद्यापीठ हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. वर्गात होणाऱ्या विविध विषयांच्या तासाला जे काही शिकवले जात असे ते लक्षपूर्वक ऐकण्यावर तो भर द्यायचा. मिरजकर तिकटी येथील ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळा येथील वसतिगृहात तो राहतो. ब्रेल लिपीतील पुस्तकाबरोबरच अंधांसाठी असणाऱ्या मुंबईतील संस्थेच्या वतीने ऑडिओ कॅसेटमधील अभ्यासक्रम त्यांनी मोबाइलमधील मेमरी कार्डवर घेऊन तो फक्त ऐकत होता. त्याला दहावीनंतर शिवाजी विद्यापीठात तबलावादनात डिप्लोमा करायचा असून, अकरावीसाठी प्रवेश घ्यायचा आहे. .

मूळचा सावंतवाडी येथील असणारा विजय जितेंद्र लाखे हासुद्धा अंध असून, त्याला वडील नसून आई धुणीभांडी करते, तर दोन भावांपैकी एक गवंडी व एक दुकानात काम करतो. त्याचीही परिस्थिती अत्यंत बेताची आहे. हे दोघेही मिरजकर तिकटी येथील ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळा येथील वसतिगृहात राहतात.

कसबा बीड येथील अंध असणाऱ्या सिद्धराज पाटीलला ७२ टक्के गुण मिळाले. सिद्धराज हा दोन्ही मित्रांना नेहमीच मदत करतो. त्याला संगीतकार मदन मोहन यांच्या स्मरणार्थ घेलेल्या स्पर्धेत तीन हजारांचे बक्षीस मिळाले. बक्षीस स्वीकारताच त्यातील रकमेतून विनायक व विजय या दोन अंध मित्रांची दहावीची फी भरणार असल्याचे सिद्धराज याने जाहीर करून स्वतःसोबत त्यांचीही फी भरली. सिद्धराजने मित्रांची फी भरून मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

भविष्यात शिक्षणासह

वसतिगृहाचा प्रश्न

सिद्धराजने बक्षिसांच्या मिळालेल्या तीन हजार रकमेतून आपल्या अंध असणाऱ्या दोघा गरीब मित्रांची दहावीची फी भरली. याबद्धल महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना विनायक पाटील अत्यंत भावुक होऊन म्हणाला, 'घरची परिस्थिती बेताची असल्याने फीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पण मित्र सिद्धराजने फी भरल्यावर समाधान वाटले, पण आता पुढचे शिक्षण घेताना वसतिगृहाचा मोठा प्रश्नच समोर आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंढे यांचा दौरा अचानक रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे येणार म्हणून सुट्टी असतानाही जिल्हा परिषदेचे अनेक पदाधिकारी, अधिकारी सदस्य सकाळी सकाळी आवारात पोहचले, मुंडेच्या स्वागताचा दारात फलकही लावला. स्वागताची सारी तयारी पूर्ण झाली, अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप आला. रात्रभर तयारी केल्यानंतरही मंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने तयारीवर पाणी फिरले.

विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मुंडे शनिवारी कोल्हापुरात येणार होत्या. या दौऱ्यात त्या सकाळी जिल्हा परिषदेला भेट देवून आढावा बैठक घेणार होत्या. शुक्रवारी त्यांचा दौरा निश्चित झाला. त्यामुळे रात्री सर्वांना निरोप देण्यात आले. मंत्री येणार असल्याने जिल्हा परिषदेने त्यांच्या हस्ते सौरऊर्जा यंत्रणेचे उद्घाटन करण्याचे ठरवले. रात्री उशिरापर्यंत थांबून सादरीकरणासाठी बुकलेटही तयार करण्यात आली. त्यांची पहिलीच जिल्हा परिषद भेट असल्याने जिल्हा परिषदेच्या अडचणी आणि मागण्यांचे निवेदन तयार करण्याचे ठरले. त्यानुसार निवेदने तयार करण्यात आली.

सुट्टी असतानाही सकाळी सर्वच अधिकारी, पदाधिकारी काही विभागप्रमुख सकाळीच कार्यालयात आले. पण काही वेळेतच मंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप मिळाला. आणि केलेल्या तयारीबरोबरच उत्साहावरही पाणी फिरले. दरम्यान, अधिकारी आल्याचा फायदा घेतमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आढावा बैठक घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधनाने मोडले कंबरडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याचे सांगितले जाते. मात्र केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात येणाऱ्या मूळ इंधनाची किंमतही कमी आहे. राज्य सरकारकडे पेट्रोलची मूळ किंमत ५९ रुपये आणि डिझेलची मूळ किंमत ५७ रुपये ४० पैसे आहे. या मूळ किंमतीत विविध प्रकारचे कर लागू केल्याने पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर ८६ रुपये २१ पैसे आणि डिझेलचा प्रति लिटरचा दर ७२ रुपये ७१ पैसे झाला आहे. स्थानिक विक्रीकरासह विशेष कराच्या नावाखाली चार रुपयांची आकारणी केली जात आहे. इंधनचा जीएसटीत समावेश करून 'एक देश एक कर' झाल्यास ग्राहकांना दिलासा मिळू शकेल.

०००

पेट्रोलियम कंपन्या

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपी)

हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपी)

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसी)

००

२५४

पेट्रोल पंप संख्या

१२

शहरातील पंप

१० हजार (अंदाजे)

कर्मचारी संख्या

३० हजार लिटर

प्रत्येक पंपाचा दररोजची विक्री

१२ हजार लिटर

टँकरमध्ये इंधनाची क्षमता

१० लाख रुपये

१२ हजार लिटरचा खर्च

हजारवाडीतून हिंदुस्थान पेट्रोलियमची वाहतूक

मिरज येथील डेपोतून बीपीसी, आयओसी

००

पेट्रोलवरील कर

मूळ किंमत : ५९ रुपये

२५ टक्के टॅक्स : १४ रुपये ७५ पैसे

\B०००००

सेस (९ रुपये)

\Bविशेष कर ३ रुपये

महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन ३ रुपये

शिक्षण कर १ रुपया

स्वच्छ भारत अभियान १ रुपया

कृषी कल्याण अभियान १ रुपया

----

लायसन्स शुल्क: ४८ पैसे

वितरकांचे कमिशन: ३ रुपये

पेट्रोलची किंमत: ८६ रूपये

००

डिझेल

मूळ किंमत: ५७ रूपये ४० पैसे

२१ टक्के टॅक्स

१२ रूपये ५ पैसे

सेस : १ रूपये

लायसन्स शुल्क : ४० पैसे

कमिशन २ रुपये

डिझेलची किंमत: ७२ रूपये

०००

पेट्रोल डिझेल दराचा वाढता दर

पेट्रोल डिझेल

२२ मे २०१५ : ७२ रूपये ६६ पैसे ५८ रूपये ७२ पैसे

२२ मे २०१६ : ६४ रूपये ३८ पैसे ५५ रूपये ५३ पैसे

२२ मे २०१७ : ७५ रूपये ७७ पैसे ५९ रुपये ४३ पैसे

२२ मे २०१८ : ८४ रूपये ७२ पैसे ७१ रूपये ४४ पैसे

३१ मे २०१८: ८६ रूपये २१ पैसे ७२ रूपये ७१ पैसे

०००

पेट्रोल पंपावर ग्राहकांना सुविधा

हवा

स्वच्छतागृह

पिण्याचे स्वच्छ पाणी

इंधनाची पावती

तक्रार बुक

कंपनीचे टोल क्रमांक

पेट्रो कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्ड

००

कर्नाटकात इंधन स्वस्त

दोन वर्षांत क्रूड अडीचपट महाग झाले. सध्या ७३.५ डॉलर असा दर आहे. सरकारने अबकारी शुल्क ऑक्टोबर २०१७ मध्ये पेट्रोल-डिझेलवर शुल्क प्रत्येकी दोन रुपयांनी कमी केले होते. केंद्राने राज्यांना व्हॅट कपात सांगितली. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेशने व्हॅट कपात केली होती. मात्र पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे सांगत इंधनाचे दर दररोज बदलत आहे. कर्नाटकने प्रवेश शुल्क रद्द केल्याने महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकात प्रतिलिटर इंधन स्वस्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ बंद शाळांबाबत पुनर्विचार

$
0
0

शिक्षणमंत्री तावडे यांची शिक्षण वाचवा कृती समितीला ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळांबाबत वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला जाईल. पटसंख्येअभावी बंद केलेल्या १३ प्राथमिक शाळांबाबत पुनर्विचार केला जाईल. अहवाल तयार करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीत शिक्षण खात्यातील अधिकारी व शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल.' अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी शिक्षण वाचवा कृती समितीच्या सदस्यांना दिली. तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या शाळेशेजारी कंपन्यांना शाळा काढण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कमी पटसंख्येअभावी राज्यातील १३०० शाळा बंद करून या शाळांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात जिल्ह्यात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने आंदोलन छेडले होते. 'आंदोलन छेडणाऱ्यांनी बिंदू चौकात येऊन चर्चा करावी', असे आव्हान शिक्षणमंत्री तावडे यांनी दिले होते. हे आव्हान स्वीकारुन समितीने बिंदू चौकात चर्चेस येण्यासंबधी तावडे यांना ई मेलने निमंत्रण दिले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री तावडे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत खुली चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले होते.

शनिवारी तावडे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता रेसिडन्सी क्लबमधील बंद सभागृहात कडेकोट बंदोबस्तात त्यांनी कृती समितीशी सुमारे दोन तास चर्चा केली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी प्रा. एन. डी. पाटील, आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. कृती समितीचे सदस्य अशोक पोवार, प्रभाकर आरडे, शिक्षक नेते सुधाकर सावंत, राजेश वरक, एस. डी. लाड, भरत रसाळे, अशोक पोवार, बाबासाहेब देवकर, चंद्रकांत यादव, योगेश फोंडे यांनी तावडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सर्व प्रश्नांवर तावडे यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, 'कोल्हापूर जिल्ह्यात कमी पटसंख्या अभावी ३४ शाळांचे समायोजन केले आहे. ३४ पैकी १३ शाळांबाबत समितीने आक्षेप घेतला असून त्यासाठी या शाळांची परत पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण खात्याचे अधिकारी व समितीचे सदस्य एकत्रित शाळांना भेट देऊन वस्तुनिष्ठ अहवाल देतील. त्यानंतर १३ शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल.'

राज्यात शिक्षणावर ५७ हजार कोटी रुपये खर्च होत आहे. हा खर्च वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शिक्षणावर सहा टक्के खर्च करावा, असे कोठारी आयोगाने सांगितले असतानाही २.३ टक्के खर्च होत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले. बैठकीला सुभाष देसाई, लाला गायकवाड, किशोर घाटगे, गणी आजरेकर, अजित सासने आदी उपस्थित होते.

समितीने कमी पटसंख्येबाबत आंदोलन केले होते. या आंदोलकांशी संवाद करण्याची तयारी तावडे यांनी दर्शवली होती. त्यानुसार संवाद साधला जाईल. भविष्यात त्यांच्यासमवेत बैठकाही होती. काही प्रश्न निकालात निघतील. त्यानंतर समिती पुढील निर्णय घेईल.

प्रा. एन.डी. पाटील.

००००००

खुली चर्चा बंद खोलीत

शिक्षणमंत्री तावडे यांच्यासमवेत कृती समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रेसिडन्सी क्लब येथे बैठकीवेळी पितळी गणपती व रमणमळा पोस्ट ऑफिस हा रस्ता बंद करण्यात आला होता. रेसिडन्सी क्लबवर चार ठिकाणी चौकशी करून सर्वांना सोडले जात होते. समितीबरोबर खुल्या चर्चेठिकाणी केवळ कृती समितीच्या सदस्यांना आत सोडले होते. तसेच साध्या वेषातील पोलिस बैठकीत बसवण्यात आले होते. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निरीक्षक तानाजी सावंत, संजय मोरे हे बंदोबस्तावर लक्ष ठेऊन होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लंकेश खुनातील संशयितांची चौकशी करा

$
0
0

लंकेश खुनातील संशयितांची चौकशी करा

भाकपची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातून सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या काही संशयितांना अटक केली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी आणि सीबीआयने लंकेश खुनातील संशयितांची चौकशी करावी,' अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने केली आहे. पानसरे कुटुंबीयांच्या सहीचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी हिंदू युवा वाहिनीचा कार्यकर्ता के. टी. नवीनकुमार याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीत महाराष्ट्रातील काही संघटनांमधील संशयितांची नावे समोर आली आहेत. यानुसार कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातून पाच संशयितांना अटक केली. नवीनकुमार याच्या सांगण्यानुसार काही संशयित सनातन संस्थेशी संबंधित आहेत. पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्येचा तपासही सनातन संस्थेच्या साधकांभोवतीच सुरू आहे, त्यामुळे एसआयटी आणि सीबीआयने गौरी लंकेश हत्येत अटक केलेल्या संशयितांची चौकशी करावी,' अशी आग्रही मागणी पानसरे कुटुंबीय आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने केली जात आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 'नवीनकुमार या संशयिताने कर्नाटक पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात सनातन संस्थेचे नाव घेतले आहे. मात्र, पोलिसांनी या संस्थेच्या नावाचा उल्लेख आरोपपत्रात केलेला नाही. आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव घालावे, त्याचबरोबर अटकेतील संशयितांची पानसरे आणि दाभोलकर हत्येप्रकरणी चौकशी करावी. राज्यात भाजपचे सरकार असल्याने तपास यंत्रणांकडून लंकेश हत्येतील संशयितांची चौकशी केली जात नाही,' असा आरोपही भाकपने केला आहे. प्रसिद्धीपत्रकावर उमा पानसरे आणि स्मिता पानसरे यांच्या स्वाक्षरी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधन केंद्र म्हणजे पांढरे हत्ती

$
0
0

फोटो ओळ...

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

'देशातील शेतकरी अर्धपोटी असल्याने तो क्रांती करू लागला आहे. विध्वंसक वृत्तीला विधायक विचाराचे वळण दिल्यास चळवळीचा वारसा पुढे चालविला जाईल. तळागाळातील लोकांचे प्रश्‍न तळमळीने सोडविल्याने चळवळीचे सामर्थ्य वाढेल. शेतकऱ्यांचा संघर्ष अनादिकाळापासून सुरू असून, प्रश्‍न व समस्या तशाच आहेत. शेतकऱ्यांना स्वत:च्या अस्तित्वाबद्दल झालेली जाणीव व त्यातून अन्यायाबद्दल होत असलेला उठाव हे शेतकरी चळवळीचे सर्वांत मोठे यश आहे. सरकारी संशोधन केंद्रे म्हणजे सरकारने पोसलेले पांढरे हत्ती आहेत,' अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.

आंबा येथील वनविसावा रिसॉर्टमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व पक्षाच्या अभ्यास शिबिरात ते बोलत होते. अभ्यास शिबिराच्या दुपारच्या सत्रात 'स्वाभिमानी पक्षाची राजकीय वाटचाल व ध्येय धोरणे' या विषयावर प्रा. जालंदर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. सायंकाळच्या सत्रात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने देशातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव या कायद्यावर अ‍ॅड. जयकुमार पोमाजे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, भगवान काटे, सावकर मादनाईक, आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. शाहूवाडी तालुकाध्यक्ष वसंत पाटील यांनी स्वागत केले. युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे यांनी प्रास्ताविक केले. शिबीरासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटबॉलपटूचे ३५ टक्के झिंदाबाद

$
0
0

(फोटो आहे)

फुटबॉलपटूला मिळाले

सर्व विषयात ३५ गुण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुटबॉलवेड्या कोल्हापूरमध्ये एका फुटबॉल खेळाडूने दहावीच्या परीक्षेत सर्व विषयात ३५ गुण मिळवून अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. संकेत बापुसाहेब पाटील असे या विक्रमविराचे नाव आहे. संकेत मंगळवार पेठेत राहत असून, दिलबहार तालमीच्या १७ वर्षांखालील संघाचा तो खेळाडू आहे.

संकेत पाटील याचे घर मंगळवार पेठेत शाहू स्टेडियमपासून जवळच आहे. विद्यापीठ हायस्कूलचा हा विद्यार्थी अभ्यासात जेमतेमच आहे. फुटबॉलचे सामने पाहता-पाहता त्याला खेळाची आवड जडली. अभ्यासापेक्षा खेळाच त्याची बुद्धी चांगली चालते, त्यामुळे दिलबहार तालमीच्या १७ वर्षाखालील फुटबॉल संघात त्याला स्थान मिळाले. शाळेत कमी आणि मैदानावर अधिक वेळ असणाऱ्या संकेतचा दहावीचा निकाल आला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याला सर्वच विषयांत ३५ गुण मिळाले आहेत. ५०० पैकी १७५ गुण मिळवून ३५ टक्क्याने तो पास झाला. फुटबॉलच्या मैदानात कौशल्य दाखवणाऱ्या संकेतला दहावीच्या परीक्षेत मात्र जेमतेम ३५ टक्केच कौशल्य दाखवता आल्याने शहरात संकेतच्या ३५ टक्के झिंदाबादची खुमासदार चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांना आर्थिक शिस्त नाही

$
0
0

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रेड्डी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सध्या काही सरकारी बँकातही घोटाळे उघडकीस आले आहेत.बँकेत आर्थिक घोटाळे करणाऱ्यांना केवळ शिक्षा करून चालणार नसून आर्थिक दंड ठोठावला पाहिजे. अलिकडे सार्वजनिक, खासगी क्षेत्रातील बँकांत आर्थिक शिस्त राहिली नाही,' अशी टीका भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या बँक ऑफ इंडिया अध्यासनातर्फे 'बँकाची सुरक्षितता' आयोजित विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.

डॉ. वाय. व्ही. रेड्डी म्हणाले, 'सरकारी, खासगी बँकांत घोटाळे झाल्यास त्याची चौकशी सुरू केली जाते. अनेक प्रकारच्या समिती नेमल्या जातात. घोटाळ्याचे प्रकरण आरबीआयपर्यंत जाते. त्यांना शाखा विस्तार, भरती बंदी, कर्जवाटप आणि ठेवी घेण्यास बंदी घातली जाते. मात्र मूळ घोटाळे करणारे मात्र नामानिराळे राहतात. घोटाळ्यात बँकेतील काही कर्मचारी, अधिकारी सहभागी असू शकतात. या घोटाळा बहाद्दारांना केवळ शिक्षा करून चालणार नाही. त्यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला पाहिजे. भांडवल पर्याप्त उपलब्ध असल्याने सरकारी बँका सक्षम आहे. मात्र खासगी, नागरी क्षेत्रातील बँकांत घोटाळ्याचे प्रमाणही वाढले आहे. काही बँकांची धोरणे नियोजनशून्य असल्याने ग्राहकांच्या ठेवींचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकांत आत्मविश्वास, पारदर्शी आणि ग्राहकांभिमुख सेवा दिल्यास अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी येणार आहे. सध्या कोणत्याही बँकांत ठेवी शंभर टक्के सुरक्षित आहेत, असे ठामपणे सांगता येणार नाही. गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी चौकसपणे राहिले पाहिजे. म्युच्युअल फंडासह बँकांतील विविध योजनांतील गुंतवणुकीत जोखीम असून फायदाही आहे. मात्र गुंतवणूक करताना विचारपूर्वक करण्याची गरज आहे. निश्चित ठोस धोरण नसल्याने अनेक बँका अडचणीत आल्या. काही बँकांचे सक्षम धोरण आहे, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. बँकांनी ग्राहकांचा विश्वास अधिकाधिक संपादन करण्यासाठी ग्राहकांना विश्वासात घेण्याची गरज आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी कोल्हापूरची अर्थव्यवस्था आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गर्व्हनर उषा थोरात, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अध्यासनाचे समन्वयक डॉ. व्ही. बी. ककडे उपस्थित होते. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, नागरी बँक्स असोसिएशनचे किरण कर्नांड, सायबरच्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची डॉ. रेड्डी यांनी उत्तरे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलन स्थगित

$
0
0

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर रविवारी (ता. १०) घोषित करण्यात आलेले आत्मदहन आंदोलन भूविकास बँक ज्येष्ठ कर्मचारी संघटनेने स्थगित केले आहे. पालकमंत्री पाटील यांचा रविवारी वाढदिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पत्रक संघटनेने प्रसिद्धीस दिले आहे. भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर कोणतेच लाभ मिळाले नसल्याने ते सरकारकडे दाद मागत आहेत. संघटनेच्यावतीने गेले २७ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. २०८ कुटुंबांची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी श्रीकांत कदम, रावसाहेब चौगुले, नंदकुमार पाटील, भारत पाटील यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनास दहा हजार कार्यकर्ते जाणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी कॉँग्रेसचा २० वा वर्धापनदिन आणि हल्लाबोल आंदोलनाची सांगता रविवारी (ता. १०) पुण्यातील शिंदे हायस्कूलच्या पटांगणात होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून १० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा काही कार्यकर्ते पुण्याला रवाना झाले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'राष्ट्रवादीचा रविवारी २० वा वर्धापनदिन आहे. पुण्यातील शिंदे हायस्कूलच्या पटांगणात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात हल्लाबोल आंदोलनाची सांगताही होणार आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनांचा भांडाफोड या आंदोलनाने केला आहे. आंदोलनाची सांगता आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा २० वा वर्धापनदिन हा योग एकत्रित आला आहे. जिल्ह्यातून किमान १० हजार कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी पुण्याला जाणार आहेत.'

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. तालुका अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते नियोजित कार्यक्रम पार पाडतील. याशिवाय पुण्यातील कार्यक्रमालाही मोठी उपस्थिती असेल.' ताराबाई पार्कातील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या बैठकीस माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, आर. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर यांच्यासह संगीता खाडे, मधुकर जांभळे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरण करून खंडणी उकळणारे तिघे अटकेत

$
0
0

तीन सिंगल फोटो

...................

अपहरण करून खंडणी उकळणारे तिघे अटकेत

गुंड योगेश राणे टोळीचे कृत्य

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कन्सलटन्सीचे काम करणाऱ्या व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडे २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. ३० एप्रिलला कळंब्यातील साई मंदिरापासून विजय निवृत्ती कांबळे (वय ३८, रा. निगवे खालसा, ता. करवीर) यांचे अपहरण झाले होते. विशेष म्हणजे कांबळे याच्या गावातील मित्रानेच कोल्हापुरातील कुख्यात गुंडाला माहिती देऊन अपहरण आणि खंडणीचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले.

जुना राजवाडा पोलिसांनी याप्रकरणी अपहरणकर्ते गुंड योगेश बाळासो राणे (३४, रा. शाहूपुरी, ५ वी गल्ली), आकाश आनंदा आगलावे (२५, मु. न्हाव्याचीवाडी, पो. शेळोली, ता. भुदरगड) आणि मारुती मधुकर कांबळे (२९, रा. निगवे खालसा, ता. करवीर) या तिघांना अटक केली.

करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील विजय कांबळे हे बँकांकडून कर्ज प्रकरणे मंजूर करून देण्याचे काम करतात. गावातील मित्र मारुती कांबळे हादेखील त्यांच्यासोबत काम करीत होता. मारुती कांबळे याचा कोल्हापुरातील काही कुख्यात गुडांशी संपर्क आहे. 'विजय कांबळे याच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्याचे अपहरण केले तर २५ लाखांची खंडणी उकळता येईल,' अशी माहिती मारुती कांबळेने आकाश आगलावे याला दिली. यानंतर कांबळे, आगलावे आणि योगेश राणे यांनी मित्रांच्या मदतीने विजय कांबळे यांचे अपहरण करण्याचा कट रचला. ३० एप्रिलला त्यांच्या मोबाइलवर फोन केला. 'भावाच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याने आम्हाला कर्ज मंजूर करून द्या. तुमचे असेल ते कमिशन घ्या,' असे सांगत विजय कांबळे यांना कळंब्यातील साई मंदिराजवळ भेटण्यासाठी बोलवले. त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सात ते आठजण कांबळेंना भेटले. बोलत-बोलत त्यांना इनोव्हा कारमध्ये बसवले. यानंतर त्यांनी कांबळेंना दमदाटी करण्यास सुरुवात केली.

'तू अनेकांना कर्ज मंजूर करून मोठे कमिशन मिळवतोस. आम्हाला आत्ताच २५ लाख रुपये दे. नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी देऊन त्यांना स्टीलच्या पाइपने बेदम मारहाण केली. यानंतर आयटीआय कॉलेज, पाचगाव रोड, आर.के. नगर, भारती विद्यापीठ, चित्रनगरी, गोकुळ शिरगाव, फाईव्हस्टार एमआयडीसीत फिरवले. पुन्हा त्याच मार्गाने येऊन ते कळंबा जेलच्या बाजूस थांबले. दरम्यान, अपहृत विजय यांना त्यांच्या मोबाइलवरून घरी फोन करण्यास सांगितले. यावरून घरात असलेली रक्कम आणि सोन्याचे दागिने मागवून घेतले. ५ हजार रुपये रोख आणि दागिने मिळाल्यानंतर त्यांनी गुजरीतील एका सराफाकडे ७८ हजार ५०० रुपयांना दागिन्यांची विक्री केली. सायबर चौकात एका एटीएम सेंटरमधून त्याला पैसे काढण्यासाठी दमदाटी केली. सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल मिळाल्यानंतर गुंडानी रात्री साडेअकराच्या सुमारास विजय कांबळे यांना सोडून दिले.

विजय कांबळे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांकडून संशयित अपहरणकर्ते आणि इनोव्हाचा शोध सुरू होता. गुन्ह्यातील कार शाहूपुरीतील सराईत गुंड योगेश राणे याची असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयित राणे याच्यासह मारुती कांबळे आणि आकाश आगलावे या तिघांना शुक्रवारी (ता. ८) अटक केली. मारुती कांबळे आणि विजय कांबळे हे दोघे एकत्र कन्सलटन्सीचे काम करीत होते. काही कारणावरून दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर दोघे स्वतंत्र काम करू लागले. या रागातून मारुती याने विजयला त्रास देण्यासाठी अपहरण आणि खंडणीचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अन्य पाच संशयितांचा शोध सुरू आहे. तीन संशयितांना कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल गुजर, पोलिस नाईक समीर मुल्ला, अमर आडुळकर, सचिन देसाई, हवालदार राजाराम पाटील, आदींच्या पथकाने अपहरणकर्त्यांना अटक केली.

चौकट

राणे कुख्यात गुंड

पोलिसांनी अटक केलेला योगेश राणे हा रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. त्याच्यावर खंडणी, मारामारी, अपहरण, फसवणूक, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे असे १३ गुन्हे दाखल आहेत. शाहूपुरी, जुना राजवाडा, हातकणंगले, भुदरगड तसेच सातारा जिल्ह्यातील कराड पोलिस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. वाळू तस्करीतही त्याचा सहभाग होता.

................

चौकट

कारवाईस विलंब

विजय कांबळे यांच्या अपहरणाचा गुन्हा ३० एप्रिलला घडला. यानंतर कांबळे यांनी तातडीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यास मात्र पोलिसांना सव्वा महिना लागला. या गुन्ह्यातील केवळ तीनच संशयित अटकेत आहेत. अद्याप पाच संशयित मोकाट आहेत. कारवाईस झालेल्या विलंबाबत मात्र पोलिसांनी मौन बाळगले. राणे याची काही पोलिसांशी विशेष जवळीक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आसामाच्या अध्यक्षपदी राजीव परुळेकर

$
0
0

उपाध्यक्षपदी महादेव शिंदे, सचिवपदी विवेक मंद्रूपकर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली, सातारासह दक्षिण महाराष्ट्रात वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व विविध प्रकारे जाहिरात सेवा देणाऱ्या एजन्सीज आणि जाहिरातपूरक सेवा देणाऱ्या एजन्सीज यांची शिखर संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्या अॅडव्हटायझिंग अॅण्ड मीडिया असोसिएशन (आसमा) या संस्थेच्या अध्यक्षपदी राजीव परुळेकर(जेनेसिस), तर उपाध्यक्षपदी महादेव शिंदे(कॉम्पार्ट डिझाइन) यांची निवड करण्यात आली. सचिवपदी विवेक मंद्रुपकर (ग्रॅव्हिटी) खजानीसपदी सुनील बासराणी (आयमॅक्स अॅडव्हर्टायझर्स) यांची निवड झाली.

याचवेळी संस्थेचे संचालक म्हणून राजाराम शिंदे (अलंकार पब्लिसिटी) पी. एस. कुलकर्णी (जयेंद्र पब्लिसिटी) सुहास लुकतुके (लुकतुके पब्लिसिटी) संजय रणदिवे (संज्योती ग्राफिक्स) अभय मिराशी (अभय पब्लिसिटी), अनिरुद्ध गुमास्ते (एम. एम. क्रिएशन), अविनाश पेंढारकर (विश्व अॅडव्हर्टायझिंग), सुनील भणगे (इम्प्रेशन पब्लिसिटी), सुहास कोगूळकर (झूम ऍडव्हर्टायझिंग), प्रशांत बुचडे (स्नेहल पब्लिसिटी), संतराम चौगुले (मॉडिफाईड डिझाइन) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सदर निवडी या मावळते अध्यक्ष संजय रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोध करण्यात आल्या.

नूतन अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी सर्व माध्यमांचे सहकार्य व सभासदांचा विश्वास आणि समर्थनामुळे आसमा यशोशिखरावर असून भविष्यात जाहिरात व्यवसाय येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. जाहिरात व्यवसायाशी निगडित सर्वासाठी व्यवसायवृद्धी व आधुनिक तंत्राचा अवलंब यासाठी विविध अभ्यासस्वर्ग, अभ्यास सहली, प्रात्याक्षिक यांचे आयोजन करण्याचे मनोगत व्यक्त केले. सचिव विवेक मंद्रुपकर यांनी आभार प्रदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेंबलाईवाडीत मारामारी

$
0
0

टेंबलाईवाडीत मारामारी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घराच्या वास्तुशांतीची निमंत्रण पत्रिका फेकून दिल्याचा जाब विचारल्याने चौघांनी एकास मारहाण केली. या मारामारीत संदीप वसंत कांबळे (वय ३९, टेंबलाईवाडी, कोल्हापूर) हे जखमी झाले. टेंबलाईवाडीत गुरुवारी (ता. ७) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी संदीप कांबळे यांच्या फिर्यादीनुसार विक्रम शिवाजी पुजारी, शिवाजी परशुराम कांबळे, नकुशा शिवाजी कांबळे, शिवाजी विक्रम पुजारी (सर्व रा. टेंबलाईवाडी) यांच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रिक्षाचालकांमध्ये मारामारी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रिक्षात प्रवासी घेण्याच्या वादातून दोन रिक्षाचालकांमध्ये मारामारी झाली. नागाळा पार्कातील पितळी गणपती परिसरात शुक्रवारी (ता. ८) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. यात किरण शिवाजी सावंत (वय ५५, रा. पंचरत्न कॉलनी, कसबा बावडा) हे जखमी झाले. सावंत हे मध्येच प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकाला जाब विचारत होते. यावेळी त्या रिक्षाचालकाने ढकलून दिल्याने सावंत जमिनीवर पडले. यावेळी सावंत यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सावंत यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटी बसमधून पडून तरुणी गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटी बसमधून खाली उतरताना पडल्याने कॉलेज तरुणी गंभीर जखमी झाली. शनिवारी (ता. ९) दुपारी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उचगावजवळील पसरिचानगर येथे हा अपघात घडला. गायत्री प्रदीप कलकुटगी (वय १८, रा. उजळाईवाडी, ता. करवीर) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, 'उजळाईवाडीत राहणारी गायत्री कलकुटगी ही शहाजी कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. गायत्री शनिवारी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. कॉलेज व शिकवणी संपल्यानंतर गायत्री सायंकाळी चारच्या सुमारास बोंद्रेनगर ते कागल बसमधून घरी जात होती. पसरिचानगर येथे घाईगडबडीने बस थांबण्यापूर्वीच ती उतरण्याचा प्रयत्न करीत होती. तोल जाऊन डोक्यावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली. जमाल मुल्ला यांनी त्यांच्या कारमधून बेशुद्धावस्थेत गायत्रीला सीपीआरमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच तिच्या नातेवाइकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पगारवाढ अमान्य असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संप दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. कोल्हापूर बसस्थानकात शिवशाही वगळता साधी एसटी धावली नाही. दोन दिवसांत एसटीचे ६० लाखांहून अधिक नुकसान झाले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने वडापला अधिकृत परवानगी दिली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहनांची रांग लागली होती. शिरोली फाटा परिसरात कोल्हापूर-पुणे शिवशाहीवर अज्ञाताने गाडीवर दगड मारून काच फोडल्याची घटना घडली. कोल्हापूर विभागात सुमारे अडीच हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. सीबीएस, संभाजीनगर, रंकाळा बसस्थानकात शुकशुकाट होता.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून संपाची सुरुवात झाली. ऐनवेळी गैरसोय होऊ नये, म्हणून अनेकांनी वाहतूक व्यवस्था सुरू असल्याची खात्री मध्यवर्ती बसस्थानकात केली. दुपारपर्यंत आठ ते दहा शिवशाही आणि काही साधी बस सोडण्यात आल्या. दिवसभरात ७० टक्क्यांहून अधिक वाहतूक व्यवस्था जिल्ह्यात कोलमडली. शिरोली फाटा येथे काही अज्ञात व्यक्तीने कोल्हापूर- पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही गाडीवर दगड मारून गाडीची काच फोडली. ही घटना विभागीय कार्यालयाला कळताच त्यांनी प्रवाशांना पर्यायी गाडीची व्यवस्था करून दिली. दगडफेकीच्या प्रकारमुळे प्रवाशी मात्र भयभयीत झाले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अघोषित पुकारलेल्या संपात उत्स्फूर्तपणे कर्मचारी सहभागी झाले. काम बंद आंदोलनात दोन हजार ८६५ कर्मचारी सहभागी झाले. जिल्ह्यात एसटीत प्रशासकीय, कार्यशाळा, चालक व वाहक असे एकूण ४ हजार ८४४ कर्मचारी कार्यरत आहेत. काहीजण साप्ताहिक सुटी, दौरा, अधिकृत रजेवर आहेत. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळानुसारच चालक आणि वाहकांना ड्युटी देण्याचे काम सुरू होते. कोल्हापूर विभागामार्फत कोल्हापूर-पुणे या मार्गावरील दर अर्ध्या तासाने शिवशाही बसगाडी सोडण्यात आली. दुपारी बारा वाजेपर्यंत ५० एसटी सोडण्यात आल्याचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी सांगितले.

दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आरटीओने शनिवारी वडापला अधिकृत पर्याय उपलब्ध करून दिला. सीबीएस बाहेर काळी-पिवळी टॅक्सीतून प्रवाशांना सोडण्याची व्यवस्था पहाटेपासून सुरू राहिली. कोणतीही घोषणाबाजी आणि नुकसान न करता कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपाचा फटका मात्र प्रवाशांना बसत आहे. अनेक प्रवासी मध्यवर्ती बसस्थानकात आले. मात्र त्यांना एसटीची सुविधा उपलब्ध झाली नाही. पर्यायी वडाप व्यवस्था असली तरी मनमानी पद्धतीने दर आकारणी करण्यात आली. निपाणीसाठी १०० रुपये, इचलकरंजीसाठी ५० रुपये आकारण्यात आले. कोल्हापूर सांगली मार्गावरही खासगी वाहनांनी १०० ते १५० रुपये आकारले. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शनिवारी प्रभारी आरटीओ अजित शिंदे यांनी बसस्थानकाला भेट दिली. खासगी वाहने बसस्थानकाबाहेर लावून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली. मात्र आरटीओ गेल्यानंतर मनमानी पद्दतीने भाडेदर आकारणीची सुरूवात झाली.

००००

सर्व वाहनांना वाहतुकीची परवानगी

सर्व प्रवासी बसेस, स्कूल बसेस, मालवाहतूक करणारी वाहने, कंपन्यांच्या बसेस यांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. काळ्या पिवळ्या टॅक्सी व अन्य खासगी प्रवासी वाहनांतून प्रवाशांना वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. आरटीओकडून सर्वोतोपरी प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

सुभाष देसाई, मोटर वाहन निरीक्षक

०००

संभाजीनगरात भोजनव्यवस्था

संभाजीनगर आगार येथून काही एसटी सोडण्यात आल्या. या ठिकाणी अन्य आगारातील एसटीतून चालक आणि वाहक दाखल झाले. त्यांच्या भोजनाची व्यवस्था संभाजीनगरातील कर्मचाऱ्यांनी केली. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांना भोजन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ शिरगावजवळ टेम्पो उलटून शेळ्या ठार

$
0
0

(फोटो आहे)

कोल्हापूर : पुणे-बेंगळूरू महामार्गावर गोकुळ शिरगावजवळील मयूर पेट्रोल पंप येथे भरधाव टेम्पो उलटून झालेल्या अपघातात १५ शेळ्या-मेंढ्या ठार झाल्या. शनिवारी (ता. ९) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. शेळ्या मेल्याने दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक नियाज पाशा हे कर्नाटकात शेळ्या-मेंढ्या नेऊन विकण्याचा व्यवसाय करतात. शनिवारी पुण्यातून २५ शेळ्या-मेंढ्या घेऊन ते कर्नाटकात निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर मयूर पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर भरधाव टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्ता दुभाजकावर आदळून उलटला. यावेळी यातील मेंढ्या एकमेकांवर कोसळल्या. काही शेळ्या टेम्पोखाली सापडून ठार झाल्या. रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी मदत करीत काही मेंढ्या टेम्पोतून बाहेर काढल्याने शेळ्यांची जीवितहानी कमी झाली. बघ्यांनी गर्दी केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा केला असून, रात्री उशिरापर्यंत गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images