Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इचलकरंजी ...

$
0
0

फोटो -

....................

इचलकरंजीत काँग्रेसचा सायकल मोर्चा

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पेट्रोल- डिझेल दरात सातत्याने होणाऱ्या वाढीच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने सायकल मोर्चा काढण्यात आला. तर कॉ. मलाबादे चौकात केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने पारदर्शक कारभाराच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळफेक करुन सर्वसामान्यांचे बजेटच कोलमडून टाकले आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांची लूट केली जात असल्याची टीका शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी यावेळी केली.

महागाईने त्रस्त जनता मेटाकुटीला आली असताना मागील दहा दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ करुन सर्वसामान्यांना जगणे मुश्किलीचे केले आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेची लूट करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात व दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली सायकल मोर्चा काढण्यात आला. राजर्षि शाहू महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कॉ. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गावरुन मोर्चा कॉ. मलाबादे चौकात आला. त्याठिकाणी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अहमद मुजावर, किरण कटके यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रकाश मोरे यांनी, सत्तेत येण्यापूर्वी भाजपकडून पेट्रोल, डिझेल दरवाढीसंदर्भात अनेक आंदोलने करण्यात आली. सर्वसामान्यांना महागाई कमी करण्याचे गोंडस गाजर दाखविले गेले. मात्र, सत्ता मिळताच प्रत्यक्षात काय झाले, याचे चित्र समोर आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून लूट सुरु असून सामान्य नागरिकांची लूटमार थांबणार कधी, असा सवाल केला.

या आंदोलनात अशोकराव सौंदत्तीकर, इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमृत भोसले, बाळासाहेब कलागते, सुनिल पाटील, संजय कांबळे, दीपक सुर्वे, महेश सातपुते, राजू बोंद्रे, महेश पाटील, महावीर केटकाळे, तौफिक मुजावर, रामदास कोळी, के. के. कांबळे, शेखर हळदकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, सेलप्रमुख सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राधिकरणातील बांधकामांना ‘खो’

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरणातील आणि विमानतळापासून २० कि.मी. अंतरातील बांधकामांसाठी विमानतळ विकास प्राधिकरणाचे 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) बंधनकारक केले आहे. एनओसी देताना खासगी कंपनीकडून लूट होत असल्याने आणि बांधकाम परवान्यासाठी प्राधिकरणाला एक हजार स्क्वेअर फुटांमागे ३० हजार रुपयांचे शुल्क जमा करावे लागत आहे. केवळ बांधकाम परवान्यासाठी एवढी रक्कम भरावी लागत असल्याने प्राधिकरणातील व विमानतळ परिसरातील बांधकामांना 'खो' बसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर महापालिका हद्दवाढीला पर्याय म्हणून कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरणाची स्थापनी केली. प्राधिकरणामध्ये ४२ गावांतील हद्दीमध्ये उजळाईवाडी येथील विमानतळाचाही समावेश आहे. प्रत्येक विमातळासाठी फ्युनेल झोन निश्चित केला जातो. त्यानुसार कोल्हापूर येथील विमानतळाचाही फ्युनेल झोन तयार केला आहे. या झोनमध्ये प्राधिकरणातील विमानतळापासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या गावांचा समावेश केला आहे. यामध्ये पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, नेर्ली, तामगाव, विकासवाडी, कणेरीवाडी, आदी गावांचा समावेश असून २० कि.मी. अंतरातील गावांतील रहिवाशांना बांधकाम परवाना देताना विमानतळ विकास प्राधिकरणाची एनओसी बंधनकारक केली आहे. त्याचबरोबर यापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे असणारे बांधकाम परवान्याचे अधिकार प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले आहेत. बदललेल्या नियमामुळे प्राधिकरणामध्ये व विमानतळाच्या फ्युनेल झोनमध्ये येणाऱ्या गावांतील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे.

विमानतळ प्राधिकरणाकडे एनओसीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर निर्धारित शुल्कापेक्षा जादा शुल्क आकारले जात आहे. एनओसी खासगी कंपनीकडे असल्याने याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे एका परवान्यासाठी सुमारे १५ हजार रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. तसेच प्राधिकरणाकडे बांधकाम परवाना गेल्याने एक हजार स्क्वेअर फुटाला ३० हजार रुपये शुल्क द्यावे लागते. त्याचबरोबर इंजिनीअरच्या प्लॅनसाठी पाच हजार असे सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचा खर्च बांधकाम परवान्यासाठी येत आहे. या अतिरिक्त शुल्कामुळे परिसरातील नव्या घराचे स्वप्न पाहत असलेल्या नागरिकांची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी ग्रामीण भागात बांधकाम परवाना घेताना उपविभागीय कार्यालयात सुमारे दहा हजार रुपये शुल्क जमा केल्यानंतर बांधकाम परवाना मिळत असे; पण हाच परवाना प्राधिकरणाकडे गेल्याने आणि त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाचीही एनओसी लागत असल्याने बांधकाम परवान्यासाठी तिप्पट ते चौप्पट खर्च येत आहे. या वाढीव शुल्कामुळे ग्रामीण भागातील नवीन बांधकामांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

...........

विमानतळ परिसरात 'फ्युनेल झोन' असतो. त्यामुळे बांधकामासाठी एनओसी सक्ती केली असेल; पण याबाबतची नियमावली अद्याप पाहिली नसून नियमावली पाहून सविस्तर माहिती देता येईल. यासाठी प्राधिकरणाची नियमावली पाहावी लागेल.

शिवराज पाटील, सीईओ, कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरण

००००

प्राधिकरणातील अनेक गावे विमानतळापासून २० कि.मी.वर असल्याने एनओसी बंधनकारक केली आहे. तसेच प्राधिकरण एक हजार स्क्वेअर फुटांसाठी ३० हजार रुपये नवीन परवान्यासाठी शुल्क आकारत आहे. नवीन बांधकाम परवान्यासाठी जादा रक्कम द्यावी लागत असल्याने परिसरातील बांधकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

उदय जाधव, माजी उपसरपंच, कळंबा

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर भूविकास कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

$
0
0

पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर

भूविकास कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भूविकास बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पालकमंत्री पाटील यांच्या गाडीसमोर आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. पालकमंत्री पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण समितीच्या बैठकीत आले असता, कर्मचाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अटकाव करत पालकमंत्री पाटील यांच्या गाडीला वाट मोकळी करुन दिली.

येथील भूविकास बँक कर्मचाऱ्यांचे १२ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. प्रत्येक दिवशी अभिनव पद्धतीने आंदोलन करत थकीत देणी व भूविकास बँकेच्या शेरी इनाम सत्ताप्रकार कमी करण्याची मागणी करत आहेत. फाटका संसार मांडून, सलाइन लावलेला प्रतिकात्मक कर्मचारी, प्रतिकात्मक तिरडी अशा विविध पद्धती वापरुनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा निघालेला नाही. आपल्या मागण्यांवर ठाम राहत कर्मचारी दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वेळेत आंदोलन करत आहेत.

बेमुदत धरणे आंदोलनात श्रीकांत कदम, बाबासो उत्तार, मिरासाहेब शेख, दिलीप घोडेस्वार, तुकाराम पाटील, गुरुनाथ पंडित, नारायण वायदंडे, गुणवंत इंगले, सुधीर पाटील, नंदकुमार पाटील, रावसो चौगले, श्रीपती कदम, प्रताप शिंदे आदी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवर्तन यात्रा समारोप

$
0
0

'जातीयवादी सरकारच्या

विरोधात एकजुटीने लढा द्या'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जातीयवादी धर्मांध सरकारच्या विरोधात एकजुटीने लढा दिला पाहिजे. निवडणुकीच्या काळापुरते लोटांगण घालणाऱ्यांपासून बहुजन समाजाने सावध राहण्याची गरज आहे. त्यासह ईव्हीएस मशीनमध्ये घोटाळा झाल्याचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ईव्हीएस मशीन ऐवजी मतपत्रिकांवर घ्यावी. सत्ता मिळविण्यासाठी हीच खरी वेळ असून आपली फसगत टाळा', असे आवाहन बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. बहुजन क्रांती मोर्चा परिवर्तन यात्राचा समारोप दसरा चौकात झाला. यावेळी ते बोलत होते.

मेश्राम म्हणाले, 'भीमा कोरेगांवची दंगल हा पूर्वनियोजित कट होता. यामधून संभाजी भिडेंना क्लिन चिट देण्यात आली. त्या विरोधात न्यायालयीन पातळीवर लढा सुरू असून जनतेतून उठाव केला जाणार आहे. या दंगलीसाठी कारणीभूत असलेल्यांचे ठोस पुरावे आहेत. या दंगलीतून काहींना बाहेर काढण्याचे षडयंत्रच सरकारने रचले आहे. एकहाती सत्ता मिळविण्याचा नवा फंडा म्हणून ईव्हीएस मशीन आणले आहे. या मशीनमध्ये फेरफार करता येऊ शकते, याचे पुरावे आहेत. त्याबाबत न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालयाने ईव्हीएस मशीनसोबत पेपर टेल मशीन जोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. त्यामुळे मुक्त, निपक्ष आणि पारदर्शीपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन निवडणूक आयोगाने केले पाहिजे. मतदारांनी या ईव्हीएस मशीन ऐवजी मतपत्रिकेची मागणी करण्याची गरज आहे. त्यासाठी परिवर्तन यात्रेतून जागृती केली जात आहे.' डॉ. पवन गायकवाड यांनी ईव्हीएम मशीनमध्ये होत असलेल्या फेरफाराची तांत्रिक माहिती दिली. याप्रसंगी बामसेफचे गौरव पणुरेकर, स्वाती काळे, संभाजी ब्रिगडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष बसवंत पाटील आदींची भाषणे झाली. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाच्या कोल्हापूर विभागातर्फे ६० हजार रूपयांचा निधी मेश्राम यांच्याकडे महिलांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरासमोरच महिलेच्या गळ्यातील चेन लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची जोंधळी मण्यांची माळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसडा मारून लांबवली. हा प्रकार शुक्रवारी (ता. २५) दुपारी अडीचच्या सुमारास वर्दळीच्या वांगी बोळात घडला. याबाबत दीपाली दिलीप गुळवणी (वय ६१, रा. वांगी बोळ) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली गुळवणी शुक्रवारी दुपारी घराबाहेर दारात उभ्या होत्या. अडीचच्या सुमारास निळ्या, पांढऱ्या पट्ट्यांचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची जिन्स पँट घातलेल्या स्कुटीवरील तरुणाने गुळवणी यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसडा मारून लांबवली. गुळवणी यांनी आरडाओरडा केला. मात्र, चोरटा भरधाव वेगाने निघून गेला. यानंतर गुळवणी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांना वांगी बोळातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यात चोरटा स्पष्ट दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रखरेदीत मदत करणाऱ्याचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जरगनगर येथे मित्राचा खून करणाऱ्या प्रतीक सरनाईक याच्याकडे अवैध दोन रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूल मिळाल्यानंतर पोलिसांनी शस्त्रतस्करीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून शस्त्र खरेदीसाठी प्रतीकला मदत करणाऱ्या पुण्यातील संशयिताचा शोध सुरू आहे. यासाठी पुणे पोलिसांची मदत घेतली जात आहे. लवकरच पथक वाराणसीला रवाना होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी दिली.

वर्चस्ववाद आणि पूर्ववैमनस्यातून मित्राचा खून करणाऱ्या हल्लेखोराकडे पोलिसांना दोन रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूल मिळाले आहे. सरनाईकने अवैधरित्या चार शस्त्रांची खरेदी केली होती. पुण्यातील एका व्यक्तीच्या मदतीने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून शस्त्रे खरेदी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. एकाच वेळी सरनाईककडे तीन शस्त्रे मिळाल्याने शस्त्र तस्करीचा संशय बळावला आहे. त्याने वाराणसीतून शस्त्रे खरेदी करून त्यांची विक्री कोल्हापूरसह परिसरात केल्याची चर्चा सुरू आहे. शस्त्रखरेदीसाठी सरनाईकला मदत करणाऱ्या पुण्यातील संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचा शोध लागताच करवीर पोलिसांचे पथक वाराणसीला रवाना होणार आहे, अशी माहिती निरीक्षक दिलीप जाधव यांनी दिली. दरम्यान, हल्लेखोर सरनाईकविरोधातील भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. प्रतीक पोवार आणि प्रतीक सरनाईक या दोघांशी संबंधित असलेले मित्र, नातेवाईक यांचे जबाब घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिझाइन अभावी पुलाचे काम थांबले

$
0
0

फोटो आहे

डिझाइनअभावी पुलाचे काम थांबले

सोमवारी लाइन आउट मिळण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील नवीन शिवाजी पुलाचे शुक्रवारी डिझाइन न मिळाल्याने संपूर्ण दिवस काम थांबले होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या चीफ इंजिनीअरकडून सोमवारी डिझाइनला मंजुरी मिळाल्यानंतर मंगळवारपासून कामाला गती येण्याची शक्यता आहे. पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर सर्व अत्याधुनिक यंत्रणा व मशिनरी दाखल झाल्या असल्या, तरी आज लाइन आउट होऊ न शकल्याने सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी थांबून होत्या.

नवीन पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी डिझाइन मिळाल्यानंतर लाइन आउट करण्यात येणार होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कोणत्याही क्षणी डिझाइन प्राप्त होण्याची शक्यता असल्याने येथे मोठ्या मशिनरी आणण्यात आल्या होत्या. मात्र डिझाइन न मिळाल्याने पुलाचे लाइन आउट करण्यात आली नाही. चौथा शनिवार व रविवार असल्याने आता हे डिझाइन सोमवारी प्रत्यक्षात मिळण्याची शक्यता आहे. पुलाचे डिझाइन महामार्ग विभागाचे वरिष्ठ चीफ इंजिनीअर यांच्याकडून मंजुरी मिळणार आहे. शुक्रवारी डिझाइन मंजुरी न मिळाल्याने लाइन आउटचे काम होऊ शकले नाही. त्यामुळे सोमवारी डिझाइनला मंजुरी मिळाली, तरी लाइन आउट होऊन प्रत्यक्ष कामाला मंगळवारी सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी पुलाच्या कामासाठी आणलेली सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी थांबून होती.

कोट

'शिवाजी पुलाच्या लाइन आउटचे डिझाइन शुक्रवारी मिळण्याची शक्यता होती. पुलाचे डिझाइन वरिष्ठ स्तरावरुन येणार असल्याने विलंब झाला. मात्र शनिवारी हे डिझाइन मिळेल. कोणत्याही परिस्थितीत पुलाचे काम थांबणार नाही.

आर. के. पोवार, निमंत्रक, कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com
gurubalmaliMT

कोल्हापूर:

दोन्ही काँग्रेससह जिल्ह्यातील शिवसेना, स्वाभिमानी, मनसे या सर्वच राजकीय पक्षांच्या तिजोरीत खडखडाट आहे. भाजपच्या खात्यात काही लाखांचा निधी आहे. विशेष म्हणजे राजकीय ताकद नसूनही भाकप मात्र निधीच्या बाबतीत श्रीमंत आहे. पक्षाकडे निधीच नसल्याने कार्यक्रमाला पदाधिकाऱ्यांना प्रत्येकवेळी उसणवारीच करावी लागते. सत्ताधारी आणि विरोधक हे सारेच सध्या बहुतांशी कार्यक्रम प्रायोजकांच्या खिशातूनच करत असल्याचे चित्र आहे.

गेल्या आठवड्यात देशातील विविध पक्षांच्या तिजोरीत असलेल्या निधीची आकडेवारी जाहीर झाली. त्यानुसार काँग्रेसची तिजोरी रिकामी होत असताना भाजपकडे मात्र निधीचा ओघ प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडे जिल्हा पातळीवर निधीची माहिती घेतली असता सर्वच पक्षांच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोणताही कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला तर पदाधिकाऱ्यांना प्रत्येकवेळी चिंता लागते खर्चाचीच. अनेकदा हा सारा खर्च अध्यक्षांना स्वत:च्याच खिशातून करण्याची वेळ येते. अध्यक्ष सक्षम नसेल तर उसणवारी करण्याशिवाय पर्याय राहत नाही. सध्या तरी जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे कार्यक्रम उसणवारीवरच सुरू असल्याचे दिसते.

अनेक वर्षे सत्तेवर असून जिल्ह्यातील काँग्रेसची तिजोरी रिकामीच आहे. सभासद नोंदणी जमा झाली की ती प्रदेशपातळीवर भरावी लागते. निधीसंकलनाचा कोणताच मार्ग नसल्याने मोक्याची जागा असूनही या पक्षाला सुसज्ज कार्यालय उभारता आले नाही. पक्षाला लागणारा खर्च पालकमंत्र्यांनी द्यावा अशा सूचना होत्या, पण पंधरा वर्षात पालकमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हाध्यक्ष आणि काही आमदारांनाच प्रत्येक कार्यक्रमाचा खर्च करावा लागत आहे. पक्षाचे बँकेत खाते असले तरी खात्यावर निधी नसल्याने प्रत्येक कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांनाच खिशात हात घालावा लागत असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी पक्षाची अवस्थाही काँग्रेसपेक्षा वेगळी नाही. पंधरा वर्षे राज्यात सत्ता, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक ताब्यात असूनही या पक्षाला स्वत:चे कार्यालय नाही. पार्किंगमध्ये कार्यालय असणाऱ्या या पक्षाचा कोणताही कार्यक्रम असेल तर उसनवारीच करावी लागते. पक्षाचे कार्यालय बांधण्याची केवळ चर्चा होते, पण पक्षाकडे निधीच नसल्याने चर्चेच्या पलिकडे काहीच होत नाही.

चार वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपकडे देखील फारसा निधी नाही. तरीही सभासद नोंदणीतून जमवलेले दहा लाख पक्षाच्या बँक खात्यावर आहेत. नागाळा पार्कात पक्षाने मोठी जागा खरेदी केली असून लवकरच तेथे पक्षाचे सर्व सुविधायुक्त कार्यालय सुरू होणार आहे. बिंदू चौकात सध्या पक्षाचे कार्यालय आहे. पूर्वी सत्ताच नसल्याने पक्षाची तिजोरी नेहमीच रिकामी असायची. किरकोळ कार्यक्रम करतानाही वर्गणी काढण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर येत होती. पण गेल्या दोन वर्षात पक्षाचे भव्यदिव्य कार्यक्रम होत आहेत, यातून पक्षाची अर्थिक स्थिती सुधारल्याचे लक्षात येते.

राज्यात सत्तेवर असूनही जिल्ह्यात शिवसेनेला पक्षाचे कार्यालय नाही. आमदार, शहरप्रमुख, जिल्हाप्रुमख यांच्या घरातून अथवा खासगी कार्यालयातूनच पक्षाचा कारभार चालतो. या पक्षाच्या बँक खात्यावर देखील रक्कम नाही. त्यामुळे पक्षाचा कोणताही कार्यक्रम ठरला की, शहरातील अनेकांच्या खिशाला कात्री लागते. वर्गणी मागून कार्यक्रम करण्याची पक्षाची स्टाइल जुनीच आहे, जी मनसेने देखील सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे देखील काहीच निधी नाही. कार्यक्रम अथवा आंदोलन करायचे ठरले की वर्गणी काढली जाते. निवडणुकीत देखील हाच फॉर्म्युला वापरला जातो.

चौकट

भाकपची आर्थिक 'श्रीमंती'

राजकीय ताकद कमी असली तरी भाकपची आर्थिक ताकद मात्र अतिशय चांगली आहे. पक्षाकडे पन्नास लाखांपेक्षा अधिक निधी आहे. विविध बँकेत ठेवेलेल्या ठेवीच्या व्याजावर या पक्षाचे वर्षभरातील कार्यक्रम होतात. सभासद वर्गणी व इतर माध्यमातून चांगला निधी मिळतो. या सर्व निधीचा वापर जनजागृती आणि चांगल्या कार्यक्रमांसाठीच होतो. अनाठायी खर्चाला फाटा दिला जात असल्याने निधी टिकून आहे.

..................

कोट

'काँग्रेस कमिटीकडे अतिशय मोक्याची जागा आहे. येथे सुसज्ज दोन मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव होता. पण निधीच नसल्याने तो बारगळला. तिजोरी रिकामी असल्याने प्रत्येक कार्यक्रम पदरमोड करूनच करावा लागतो.

पी.एन. पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

....

'राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांच्या नावाने बँकेत खाते उघडण्याची सक्ती आहे. त्यानुसार आमचेही खाते आहे. पण खात्यावर किरकोळ निधी आहे. हा निधी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

............

'भाजपने सभासद वर्गणीच्या माध्यमातून आठ ते दहा लाख पक्षनिधी जमा केला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात पक्षाच्या वतीने कार्यालय बांधण्यात येणार आहे. येत्या दिवाळीपासून कोल्हापुरात नागाळा पार्क येथे पक्षाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.

संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष, भाजप



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Fitness challenge: संभाजीराजेंचे फिटनेस चॅलेंज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन सोहळ्यात पायी रायगड चढण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री, अधिकारी आणि अभिनेते यांनाही रायगडावर पायी या आणि आपला 'फिटनेस' सिध्द करा असे आवाहन केल्याने याची चर्चा सुरू झाली आहे.

माहिती प्रसारण, युवा, क्रीडा खात्याचा कारभार पाहणारे केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड यांनी 'हम फिट तो इंडिया फिट' या हॅशटॅगने ' फिटनेस चॅलेंज ' सुरु केली. त्यांनी ह्रतिक रोशन, विराट कोहली, सायना नेहवाल यांना आव्हान देत त्यांचे फिटनेस व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करण्यास सांगितले. त्यापैकी विराट कोहलीने तर आपला फिटनेस व्हिडिओ पोस्ट केलाच पुढे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपली पत्नी तसेच महेंद्र धोनी यांना आव्हान दिले. ट्‌विटरवर खूपच सक्रीय असलेल्या नरेंद्र मोदींनी आपले योगा करतानाचे फोटो पोस्ट केले. त्यानंतर ही मोहीम आणि 'हम फिट तो इंडिया फिट'हे हॅशटॅग चॉंगलेच ट्रेंड झाले.

खासदार संभाजीराजेंनी देखील रायगड पायी चढण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षी सहा जून रोजी रायगडावर राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. खासदार संभाजीराजे त्यासाठी सक्रीय पुढाकार घेतात. यावेळी सोहळ्यासाठी त्यांनी स्वत:चा आणि शिवभक्तांचा पायी चालत रायगडावर जातानाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड, किरण रिजिजू, कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे, अभिनेता आमीर खान, अक्षयकुमार, अजय देवगण , रितेश देशमुख यांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पाच जून रोजी दुपारी तीन वाजता माझ्यासोबत किल्ले रायगडावर चला, असे त्यांनी सुचवले आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंत पंधराशेपेक्षा जास्त पायऱ्या चढत किमान अडीच तासांचा पायी प्रवास अनेकांच्यादृष्टीने आव्हान असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर काँग्रेस सत्तेवर येईलः चंद्रकांत पाटील

$
0
0

कोल्हापूर :

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटलेली नाही, तुटणार नाही. पण आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती झाली नाही तर काँग्रेस सहज विजयी होईल, अशी भीती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे. काँग्रेस जर सत्तेवर आली तर ती कशा प्रकारे राज्यकारभार करते हे साऱ्यांनाच ठाऊक आहे, असंही पाटील म्हणाले.

कोल्हापुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना युतीसाठी आम्ही अगतिक आहोत असे स्पष्ट करत महसूलमंत्री पाटील म्हणाले, ‘सर्वसामान्यांचे कल्याण आणि राज्य व देश हितासाठी भाजप शिवसेनेसोबत युती करायला तयार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सेना, भाजप स्वतंत्रपणे लढले म्हणून युती तुटणार नाही. गेल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुमारे ४०० निवडणुका झाल्या. कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई महापालिकेतही आम्ही वेगवेगळे लढलो. पण सरकारमध्ये आम्ही दोघे एकत्र आहोत. भाजप, सेनेची युती तुटणार नाही. तुटलेली नाही. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सेनेसोबत युती करायला भाजप तयार आहे. तरी त्यांना युती करायची नसेल तर इट्स ओके. त्याला आमची काही हरकत नाही.’असंही शेवटी पाटील म्हणाले.


'उध्दव ठाकरेंनी मैत्रीत चुकीचे राजकारण केले'

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर पाटील यांनी निशाणा साधला. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने कसलीही शहानिशा न करता लोकसभेची उमेदवारी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मैत्रीत चुकीचे राजकारण केले असा थेट आरोप त्यांनी केला.

पालघर पोटनिवडणुकीवरुन सेना, भाजपमध्ये कटुता निर्माण झाल्याचे महसूत्रलमंत्र्यांनी कबूल केले. तसेच सेनेने,श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून अर्ज माघारीची प्रक्रिया संपेपर्यंत गायब केले. उमेदवार वनगा यांच्या आईंनाही अर्ज माघारीच्या दिवशी गायब केले होते असा आरोपही महसूलमंत्र्यांनी केला. महसूलमंत्री पाटील म्हणाले, ‘खरे तर, दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्यानंतर लोकसभेची उमेदवारी त्यांच्या मुलाला की सुनेला द्यायची याविषयी चर्चा होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कसलीही शहानिशा न करता श्रीनिवास वनगांना सेनेची उमेदवारी दिली.वास्तविक उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे श्रीनिवास वनगा यांच्यावर काय अन्याय झाला याची विचारणा करायला हवी होती. अन्यायाचे परिमार्जन करायला हवे होते. दोन घरात भांडण झाल्यानंतर ते सोडविण्याची भूमिका असायला पाहिजे.

'घरदार-कारखाने विका पण एफआरपी द्या'

‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी गेल्या दोन वर्षात दोनदा एफआरपीत वाढ केली. ऊस साखर कारखानदारांवर एफआरपीनुसार दर देणे हे कायद्यानुसार बंधनकारक आहे. कारखानदारांनी घरदार विकावे, कारखान्याची विक्री काढावी पण ऊस उत्पादकांना कायद्यानुसार दर द्यायलाच हवा.’असा सज्जड दम महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भरला. साखरेचा किमान दर ठरविण्याबाबत केंद्रीय पातळीवर चर्चा सुरु आहे. शिवाय साखर दरा प्रश्नी मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर आणि मी अशा तिघांची २८ मे रोजी मुंबईत बैठक होणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ बृहत आराखडा...

$
0
0

बृहत आराखडा शैक्षणिक

विकासाच्या वाटचालीचा आरसा

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बृहत आराखडा शैक्षणिक विकासाच्या वाटचालीचा आरसा असतो. निश्चितपणे हे लक्ष्य आराखड्यात प्रतिबिंबित झाले पाहिजेत,' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ यांच्यासाठी २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीचा पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा झाला, यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, 'आजची कार्यशाळा बृहत आराखड्याच्या बाबतीत जागरूकता आणि कृती यांचे समन्वय करणारी ठरणार आहे. कृतिशील आराखडा तयार करण्यासाठी निश्चितपणे मार्गदर्शन लाभणार आहे. बृहत आराखड्यात मान्यताप्राप्त संस्था, विविध विद्याशाखा यांचा आंतर्भाव आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठे आपल्याकडे येत आहेत. ओघाने स्पर्धात्मक स्वरूपात वाढ होणार आहे. त्याअनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर येत आहे. बृहत आराखडा सर्वसमावेशक होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने जिल्हानिहाय समिती निर्माण केल्या आहेत. विद्यापीठ क्षेत्रातील भौगोलिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, या ठिकाणी लागणारे

मनुष्यबळ, शिक्षणात होणारे बदल या सर्वांचा विचार होऊन विद्यापीठाचा विद्यार्थी स्पर्धेत कोठेही कमी पडणार नाही, याची काळजी घेतली आहे. शास्त्र शाखेत बीएस्सी इकॉनॉमिक्स हा विषय घेऊन येत आहोत. म्युझियालॉजी, बीएस्सी रिसर्च मॅनेजमेंट हे विषय पुढे येत आहेत. सरकारनियुक्त समितीमुळे महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये बृहत आराखडा तयार करण्यासंदर्भात सुसूत्रता निर्माण होत आहे.'

कार्यशाळेस विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डॉ. बी. एन. जगताप, प्राचार्य अनिल राव, डॉ. मिलिंद सोहानी, विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, आदींसह शिवाजी विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठातील अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी स्वागत केले. अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती न झाल्यास काँग्रेसला फायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटलेली नाही, तुटणार नाही. पण आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत युती झाली झाली नाही तर काँग्रेस सहज विजयी होईल,'असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरुन भाजप, सेनेत कटुता निर्माण झाल्याचेही त्यांनी कबूल केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने कसलीही शहानिशा न करता उमेदवारी दिल्याचे सांगून पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी मैत्रीत चुकीचे राजकारण केले. सेनेने वनगा यांना उमेदवारी दाखल झाल्यापासून अर्ज माघारीची प्रक्रिया संपेपर्यंत गायब केले. त्यांच्या आईंनाही अर्ज माघारीच्या दिवशी गायब केले होते, असा आरोपही केला.

ते म्हणाले,' वास्तविक, ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे श्रीनिवास वनगा यांच्यावर काय अन्याय झाला याची विचारणा करायला हवी होती. वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी होती. अन्याय झाला असेल तर त्याचे परिमार्जन करायला हवे होते. दोन घरात भांडण झाल्यानंतर ते सोडविण्याची भूमिका असायला पाहिजे. वनगा कुटुंबाकडे चाळीस वर्षे आमदारकी आणि खासदारकी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदिवासी वनवासी आश्रमशाळेत शिकल्याचे वनगा सांगतात. मात्र ते जिथे शिकले तिथेच त्यांनी लाथ मारली. प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी असते ही भाजपची भूमिका आहे. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे पालघर पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. या पोटनिवडणुकीत पक्षावर झालेला आघात त्यांना सहन झालेला नाही. बारीकसारीक गोष्टीविषयी ते सजग आहेत.'

\Bयुती करायची नसेल तर इट्स ओके\B

राज्यात सेना, भाजपमध्ये प्रचंड कुरघोडी सुरु आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते सातत्याने स्वतंत्र लढण्याची घोषणा करत आहेत. तर दुसरीकडे भाजप, सेनेसोबत युती करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र आहे. या स्थितीवर महसूलमंत्री पाटील म्हणाले, 'युतीसाठी आम्ही अगतिक आहोत. सामान्य जनतेच्या कल्याणासाठी भाजप शिवसेनेसोबत युती करायला तयार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सेना, भाजप स्वतंत्रपणे लढले म्हणून युती तुटणार नाही. गेल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत विविध निवडणुकांत आम्ही वेगवेगळे लढलो. पण सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत. युती तुटणार नाही, तरीही त्यांना युती करायची नसेल तर इट्स ओके. त्याला आमची काही हरकत नाही.'

०००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा तासात चेन स्नॅचर अटकेत

$
0
0

फोटो आहे...

चोवीस तासांत चेन स्नॅचर गजाआड

कर्ज फेडण्यासाठी चोरी केल्याची दिली कबुली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वांगी बोळातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबविणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी २४ तासांत गजाआड केले. इंद्रजित विठ्ठल यादव (वय ३६, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील सोन्याची चेन आणि मोपेड असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कर्ज भागविण्यासाठी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली.

वांगी बोळात शुक्रवारी (ता. २५) दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने दीपाली दिलीप गुळवणी (वय ६१) यांच्या गळ्यातील जोंधळी मण्यांची सोन्याची माळ हिसडा मारून लांबवली होती. गुळवणी यांनी परिसरात चोरट्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. यानंतर त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली. जुना राजवाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू होता. चोरटा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होता. यावरून पोलिसांनी तो कोणत्या दिशेने गेला याची माहिती काढली. संशयिताचे फोटो आणि चित्रीकरण सोशल मीडियात वायरल केल्यानंतर त्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते यांना मिळाली. कपडे आणि दुचाकी यावरून तो प्रयाग चिखली येथील इंद्रजित यादव असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी शनिवारी सकाळी त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली.

इंद्रजित शरीराने धडधाकट असून, त्याचे शिक्षणही पदवीपर्यंत झाले आहे. घरची परिस्थितीही बरी आहे. आई, पत्नी आणि दोन मुलांसह तो प्रयाग चिखली येथे राहतो. काम मिळत नसल्याने खासगी सावकाराकडून घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी चेन स्नॅचिंग केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. मात्र, तो दिशाभूल करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

०००

सावकाराचीही होणार चौकशी

खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा सुरू होता. सावकाराचे पैसे भागविण्यासाठी चोरी केल्याची माहिती अटकेतील यादवने दिली आहे. त्यानुसार त्या खासगी सावकाराचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. शनिवारी दिवसभर त्याला पोलिस मुख्यालयात बसवून ठेवले होते. सावकाराच्या परवान्यासह संपूर्ण व्यवहारांची चौकशी केली जाणार असल्याचे निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रियांनी संघर्षशील बनावे

$
0
0

फोटो आहे..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देश व राज्यातील वर्तमान परिस्थितीत स्त्रियांची समानता अत्यंत धोक्यात आली असून, परिवर्तनवादी चळवळीमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. चळवळीच्या माध्यमातून स्त्रियांमधील संघर्षशील व्यक्तिमत्त्व तयार होऊन समानता प्राप्त होईल. यासाठी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सर्वांना सोबत घेऊन समाजातील मनुवादी प्रवृत्तीविरोधातील लढा यशस्वी होईल,' असे प्रतिपादन स्मिता पानसरे यांनी केले.

सम्यक प्रतिष्ठान संलग्न सन्मान महिला फाउंडेशनच्या वतीने धम्मसंगीती महिला पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते. शाहू स्मारक सभागृहात शनिवारी झालेल्या पुरस्कार गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुमन पुजारी होत्या.

भदन्त आर. आनंद, एस. संबोधी यांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका डॉ. गेल ऑम्वेट, स्मिता पानसरे, प्रा. करुणा मिणचेकर, मीनाक्षी गायकवाड व शोभा चाळके यांना महिला पुरस्कार देऊन गौरव केला.

पानसरे म्हणाल्या, 'परिवर्तनवादी चळवळीत कार्य करत असताना आपला शत्रू बलाढ्य असल्याची जाणीव कायम ठेवली पाहिजे. चळवळीत कार्य करणारे अनेकजण आपापल्या परीने चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. पण हेच सर्व एकत्र आल्यास चळवळींना व्यापक स्वरूप प्राप्त होईल. यासाठी एक विचारधारा असणाऱ्यांना एकत्र आणले पाहिजे.'

डॉ. गेल ऑम्वेट म्हणाल्या, 'विद्यार्थीदशेत असल्यापासून लोकशाही हक्क अन् स्त्रीमुक्तीच्या चळवळीकडे आकर्षित झाले. अमेरिकेपासून सुरू झालेला प्रवास व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळीपर्यंत सुरू होता. याच दरम्यान भारतात प्रवेश केल्यावर कार्ल मार्क्सबरोबर महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार व कार्याचा अभ्यास केला. '

भदन्त एस. संबोधी म्हणाले, 'धम्मसंगीतीची आवश्यकता बुद्धांच्या अस्तित्वातून जाणवू लागली. या जाणिवेतून सर्व भिक्खूंच्या महापरिषदेच्या माध्यमातून धम्मसंगीतीचे आयोजन केले. धम्मसंगीती झाली नसती, तर बुद्धांच्या विचारांचा प्रसारच झाला नसता.'

यावेळी पुरस्कारप्राप्त महिलांसह माजी आमदार राजीव आवळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. भारत पाटणकर, बन्सी सातपुते, सुशील कोल्हटकर, अनिल म्हमाणे, आदी उपस्थित होते. प्रा. चिंतामणी कांबळे यांनी प्रास्ताविक केले. साहिल शेख यांनी सूत्रसंचालन केले. सुरेखा भोसले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रियांनी संघर्षशील बनावे

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देश व राज्यातील वर्तमान परिस्थिमध्ये स्त्रियांचा समानता अत्यंत धोक्यात आली असून परिवर्तनवादी चळवळीमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. चळवळीच्या माध्यमातून स्त्रियांमधील संघर्षशील व्यक्तिमत्त्व तयार होऊन समानता प्राप्त होईल. यासाठी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सर्वांना सोबत घेऊन समाजातील मनुवादी प्रवृत्तीविरोधातील लढा यशस्वी होईल,' असे प्रतिपादन स्मिता पानसरे यांनी केले. सम्यक प्रतिष्ठान सलग्न सन्मान महिला फाउंडेशनच्यावतीने धम्मसंगिती महिला पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते. शाहू स्मारक सभागृहात शनिवारी झालेल्या पुरस्कार गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुमन पुजारी होत्या.

भदन्त आर. आनंद, भदन्त एस. संबोधी यांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका डॉ. गेल ऑम्वेट, स्मिता पानसरे, प्रा. करुणा मिणचेकर, मीनाक्षी गायकवाड व शोभा चाळके यांना महिला पुरस्कार देऊन गौरव केला.

पानसरे म्हणाल्या, 'परिवर्तनवादी चळवळीत कार्य करत असताना आपला शत्रू बलाढ्य असल्याची जाणीव कायम ठेवली पाहिजे. चळवळीमध्ये कार्य करणारे अनेकजण आपआपल्या परीने चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. पण हेच सर्व एकत्र आल्यास चळवळींना व्यापक स्वरुप प्राप्त होईल. यासाठी एक विचारधारा असणाऱ्यांना एकत्र आणले पाहिजे.'

डॉ. गेल ऑम्वेट म्हणाल्या, 'विद्यार्थी दशेत असल्यापासून लोकशाही हक्क अन् स्त्री मुक्तीच्या चळवळीकडे आकर्षित झाले. अमेरिकापासून सुरू झालेला प्रवास व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळीपर्यंत सुरू होता. याच दरम्यान भारतात प्रवेश केल्यावर कार्ल मार्क्सबरोबर महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार व कार्याचा अभ्यास केला. '

भदन्त एस. संबोधी म्हणाले, 'धम्मसंगीतीची आवश्यकता गौरत बुद्धांच्या अस्तित्वातून जाणवू लागली. या जाणिवेतून सर्व भिक्कूंच्या महापरिषदेच्या माध्यमातून धम्मसंगीतीची आयोजन केले. धम्मसंगीती झाली नसती, तर बुद्धांच्या विचारांचा प्रसारच झाला नसता.'

यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांसह माजी आमदार राजीव आवळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. भारत पाटणकर, बन्सी सातपुते, सुशील कोल्हटकर, अनिल म्हमाने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. चिंतामणी कांबळे यांनी केले. साहिल शेख यांनी सूत्रसंचालन केले, तर सुरेखा भोसले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रायगडावर स्वच्छता मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गराज रायगडावर खासदार संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड प्राधिकरणच्या वतीने गडावरील तसेच खोल दरीतील कचरा गिर्यारोहकांच्या मदतीने काढण्यात आला. ही मोहीम रविवारपर्यंत चालू राहणार आहे.

शनिवारी सकाळी तज्ञ गिर्यारोहकांच्या मदतीने किल्ले रायगडाच्या दरीतील प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात काढण्यात आला. या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी सहभाग घेतला असून सुमित अ‍ॅडव्हेंचर्स, मलाय अ‍ॅडव्हेंचर्स, ३२ एमएस मुंबई, हिल रायडर्स कोल्हापूर, शंभूराजे मर्दानी खेळ विकासमंच कोल्हापूर, कोल्हापूर माउंटेनिअरिंग अँड अ‍ॅडव्हेंचर फाऊंडेशन आदी संस्थांनी सहभाग घेतला. या मोहिमेसाठी शिवाजी विद्यापीठ यांचे मार्फत गिर्यारोहकांना लागणाऱ्या साहित्य पुरवठा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसई निकाल

$
0
0

फोटो आहेत...

सीबीएसई शाळांचा

निकाल १०० टक्के

बारावी परीक्षेत कोल्हापूर पब्लिक, विबग्योर, शांतिनिकेतन, घोडावतचे उज्ज्वल यश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या बारावीचा शनिवारी ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून, बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

आर. एल. तावडे फाउंडेशन संचलित कोल्हापूर पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला. विज्ञान शाखेतील पुलकित बन्सलने ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेतून संदेश कळकेने ९१ टक्के गुण मिळविले. त्यांना संस्थेचे अध्यक्ष किशोर तावडे, संस्थापिका शोभा तावडे, अंजली मेळवंकी यांचे मार्गदर्शन लाभले. विबग्योर हाय इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये सपना दर्शन गोधेजाने ८३ टक्के, आदिती अमर शेंडगेने ७९.६ टक्के, सूर्यकोटी विद्यासागर ठोमकेने ७१ टक्के गुण मिळविले. त्यांना प्राचार्य टी. बालन यांचे मार्गदर्शन लाभले. शांतिनिकेतन स्कूलचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला. यामध्ये विज्ञान विभागातून आर्यन सणसने ८२ टक्के, तर वाणिज्य विभागातून औदार्या देसाईने ८३.२ टक्केसह ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन डॉ. संजय डी. पाटील, संचालिका राजश्री काकडे, प्राचार्या जयश्री जाधव, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख श्रीपाद पाटील, उपप्राचार्या मनीषा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे सर्वच्या सर्व १९९ विद्यार्थी उत्तीण होऊन सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा राखली आहे. विज्ञान शाखेच्या शुभम पाटीलने ९५.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. सिवेश सिंगने ९४. ८० टक्के आणि श्रेयस बिरादारने ९२. २० टक्के गुण मिळवत अनुक्रमे क्रमांक मिळविले. कॉमर्स शाखेत भारत राजपुरोहितने ९५ टक्के, कृतिक बंगने ९४ टक्के, आयुषी केडियाने ९४ टक्के गुण मिळविले. त्यांना संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, स्कूलच्या संचालिका सस्मिता मोहंती, प्राचार्या एच. एम. नवीन यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुलासाठी लाइन आउट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कंत्राटदारांकडून शनिवारी कामासाठी लाइन आउट आखण्यात आली. पुलानजीकच्या हौदालगतच्या जागेचे सपाटीकरण पूर्ण झाले आहे. त्या परिसरात बांधकामाच्या अनुषंगाने रेखांकन केले.

या ठिकाणच्या बांधकामाबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून डिझाइन मागविले आहे. सोमवारपर्यंत डिझाइन उपलब्ध झाल्यास अबुटमेंटसाठी खोदाई केली जाईल. आसमास कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी एन. डी. लाड यांनी, 'पुलाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक मशिनरी उपलब्ध केली आहे. हौदालगत सपाटीकरण केलेल्या जागेवर शनिवारी लाइन आउट आखली आहे. बांधकाम विभागाकडून नव्याने डिझाइन मागविले आहे. सोमवारपर्यंत डिझाइन उपलब्ध होईल. पूर्वीच्या डिझाइनमध्ये बदल अपेक्षित आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाच्या कामाला पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आणि कोकणला जोडणाऱ्या पर्यायी शिवाजी पुलाचे काम वेळेत होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने पुढाकार घेऊन काम सुरू केल्याने निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनने कामाचे स्वागत केले. हे काम तातडीने पूर्ण होऊन वाहतूक पूर्ववत सुरू व्हावी यासाठी असोसिएशनने पुलाच्या कामाला पाठिंबा दिला आहे. ८० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर केवळ २० टक्के कामासाठी पुलाचे काम रखडल्याने सर्वपक्षीय कृती समितीने हे काम पूर्ण करण्यासाठी जनरेटा लावला होता. सर्वपक्षीय कृती समितीसह पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतल्याने निवृत्त पोलिस असोसिएशनने अधीक्षक मोहिते यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवछत्र कला महोत्सव स्थगित

$
0
0

शिवछत्र कला

महोत्सव स्थगित

स्टॉलधारकांचा संयोजकांशी वाद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आय एम एंटरटेनर संस्थेच्या वतीने शिवाजी स्टेडियम येथे सुरू असलेला शिवछत्र कला महोत्सव स्थगित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक साईप्रसाद बेकनाळकर यांनी पत्रकाद्वारे दिली. २४ ते २८ मे दरम्यान शिवाजी स्टेडियममध्ये या महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवाचे नियोजन विस्कळीत झाल्याने स्टॉलधारकांनी शनिवारी दुपारी संयोजकांशी वाद घालत धक्काबुक्की केली.

कोल्हापूरसह परिसरातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळावी यासाठी आय एम एंटरटेनर या संस्थेच्या वतीने शिवछत्र कला महोत्सवाचे आयोजन केले होते. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे ५१ फुटी शिल्प साकारले जाणार होते. मात्र, या शिल्पाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्याचबरोबर महोत्सवाचे नियोजनही योग्य पद्धतीने झाले नाही, त्यामुळे महोत्सवाकडे नागरिक फिरकलेच नाहीत. यावरून शनिवारी दुपारी स्टॉलधारक आणि संयोजकांमध्ये वाद झाला. स्टॉलधारकांनी संयोजकांना धारेवर धरत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. यानंतर संयोजकांनी कला महोत्सव स्थगित केला. ५१ फुटी शिवशिल्पाचे काम अपूर्ण असल्याने आणि पावसाच्या शक्यतेने महोत्सव स्थगित करीत असल्याचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. काही दिवसांनंतर महोत्सवाचे पुन्हा आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images