Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोलापूर- मर्शिया करार

0
0

सोलापूर : शाश्‍वत शहरी विकास योजनेंतर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मर्शिया या शहरादरम्यान गुरुवारी सामंजस्य करार झाला. 'आययूसी'चे प्रकल्प संचालक पिअर रॉबर्टो रिमिटी आणि आशीष वर्मा यांनी तर महापालिकेतर्फे महापौर शोभा बनशेट्टी व आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

युरोपियन युनियनने आशिया आणि उत्तर-दक्षिण अमेरिकेतील शहर आणि भागीदार शहरातील शाश्‍वत शहरी विकासावर सहकार्य वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय शहरी सहकारिता कार्यक्रम विकसित केला आहे. या करारांतर्गत स्थानिक नेत्यांना विकास समस्यांना हाताळण्यावर नवीन दृष्टीकोन ठेवून संपर्क साधता येणार आहे. आंतरराष्ट्रीय शहरी सहकार्य कार्यक्रमांतर्गत शहरांच्या जोडीला पुढाकार घेण्यासाठी मलेशियातील क्वालालंपूरमधील फोरममध्ये सुरुवात करण्यात आली आहे.

करारातील मुद्दे

हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण, सांडपाणी, उर्जा व्यवस्थापन आणि कार्यक्षमता.

ऐतिहासिक वारसा क्षेत्र, मनोरंजनासाठी तसेच संवर्धनासाठी हिरव्या, पर्यावरणीय भागाचा विकास.

टिकाऊ गृहनिर्माण, पायाभूत सुविधांसाठी खासगी-सार्वजनिक भागिदारी.

शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी उपाययोजना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमीरला मानपत्र देण्याचा प्रस्ताव

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

लोकचळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी अभिनेता आमीर खान यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या पाणी बचतीच्या उपक्रमाची दखल घेत सोलापूर महापालिकेतर्फे आमीरला मानपत्र देण्याचा प्रस्ताव २५ मे रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत देण्यात आला आहे.

अभिनेता आमीर खानने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील शेकडो गावांसाठी जलमित्र म्हणून नोंदणी सुरू केली आहे. या माध्यमातून सुरू केलेल्या वॉटरकप उपक्रमास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातही गेली दोन वर्षे ही चळवळ वेगाने वाढत आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमीर खान यांनी पत्नीसह श्रमदानात सहभाग नोंदविला. याची प्रेरणा घेत गावातील आबालवृद्धांनी सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात श्रमदान करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी तळी तयार केली आहेत. समाजातील प्रत्येक स्तर व तरुणाईला विधायक कार्यासाठी सोबत घेऊन त्यांनी केलेले काम देशाला प्रेरणादायी ठरले आहे. या कार्याची दखल घेत महापालिकेतर्फे मानपत्र देऊन आमीर खान यांचा यथोचित गौरव करण्याचा प्रस्ताव रवी कैय्यावाले, अंबिका पाटील, विनायक वीटकर यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरनाईककडून दोन रिव्हॉल्व्हर जप्त

0
0

(फोटो आहे)

पॉइन्टर्स...

सहा जिवंत काडतुसेही मिळाली

पाचगाव-कंदलगाव मार्गावर ओढ्यात पुरून ठेवली होती शस्त्रे

सरनाईककडून एकूण चार रिव्हॉल्वर जप्त

तस्करीच्या तपासासाठी पोलिस वाराणसीला जाणार

एक लाखात दोन पिस्तूल, दोन रिव्हॉल्व्हरची खरेदी

००००

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जरगनगर येथे रविवारी (ता. २०) रात्री प्रतीक पोवार या तरुणाचा डोक्यात गोळी घालून खून करणारा प्रतीक सरनाईक याच्याकडून पोलिसांनी आणखी दोन रिव्हॉल्व्हरसह सहा जिवंत काडतुसे जप्त केली. चार वर्षांपूर्वी त्याने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून दोन पिस्तूल आणि दोन रिव्हॉल्व्हर खरेदी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. सरनाईक शस्त्रांची खरेदी-विक्री करीत असल्याचा संशय असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून प्रतीक सरनाईकने रविवारी रात्री प्रतीक पोवारच्या डोक्यात गोळी घालून खून केला होता. यानंतर पळून गेलेल्या सरनाईकला पोलिसांनी उचगाव परिसरात पकडले होते. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली होती. सरनाईककडे आणखी शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार अधिक तपास करताना त्याच्याकडून आणखी दोन रिव्हॉल्व्हर आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात करवीर पोलिसांना यश आले. पाचगाव ते कंदलगाव मार्गावरील ओढ्यात पुलाखाली जमिनीत दोन फूट खड्ड्यात पुरून ठेवलेली रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे पोलिसांनी गुरुवारी सकाळी हस्तगत केली. याची किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे.

जप्त केलेली शस्त्रे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून खरेदी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. चार वर्षांपूर्वी पुणे आणि मुंबईतील व्यक्तींच्या ओळखीने वाराणसीतून एक लाख रुपयांना दोन पिस्तूल आणि दोन रिव्हॉल्व्हरची त्याने खरेदी केली होती. यातील एक पिस्तूल २०१६ मध्ये इचलकरंजीत पोलिसांनी जप्त केले. त्यावेळी सरनाईकवर बेकायदा पिस्तूल बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्याच्याकडील इतर शस्त्रांची माहिती काढण्यात पोलिसांना अपयश आले होते. एकाचवेळी त्याच्याकडे तीन शस्त्रे आणि जिवंत काडतुसे मिळाल्याने शस्त्र तस्करीच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. मुंबईतील व्यक्तीच्या माध्यमातून वाराणसीतून शस्त्रे खरेदी केल्याची माहिती त्याने दिली आहे. याची खात्री करण्यासाठी आणि बेकायदा शस्त्र खरेदी-विक्रीचे रॅकेट शोधण्यासाठी करवीर पोलिसांचे पथक वाराणसीला जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

०००

मित्रांशी वादानंतर शस्त्रखरेदी

शांतादुर्गा कॉलनीतील तरुण मंडळात प्रतीक सरनाईकचा सहभाग होता. चार वर्षांपूर्वी त्याचा मंडळातील कार्यकर्ते रणजित गवळी, गौरव वडेर, प्रतीक पोवार यांच्याशी वाद झाला. मंडळातील वादानंतर मित्रांनी मारहाण केल्याने याचा बदला घेण्यासाठी शस्त्रांची खरेदी केली, अशी माहिती सरनाईकने पोलिसांना दिली. खरेदी केलेली शस्त्रे आणि काडतुसे त्याने पाचगाव-कंदलगाव मार्गावर ओढ्याच्या पुलाखाली पुरून ठेवली होती. तेथे तो मित्रांसह अनेकदा दारू पिण्यासाठी बसत असे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबा झाला स्वस्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एक ते दीड हजार रूपयांच्या घरात असलेल्या आंबा पेटीचा दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. रत्नागिरी हापूस, देवगड, कर्नाटक हापूस स्वस्त झाला असून देवगड हापूसचा दर २०० रूपये डझन असा झाला आहे. तर रत्नागिरी हापूसच्या ५ ते ६ डझन पेटीचा दर ५०० ते ८०० रूपये झाला आहे. रत्नागिरी, देवगड आणि कर्नाटकातून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने आंबा स्वस्त झाला आहे.

गेल्या महिन्यात आंबा पेटीचा एक ते दीड हजार रूपयांच्या घरात होता. या आठवड्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारपेठेत दररोज दहा हजार बॉक्सची आवक होत आहे. यामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड, कर्नाटक हापूस आणि लालबाग आंब्याची मोठी आवक झाली आहे. पर्यायाने आंबा पेटी दरात घसरण झाली आहे. देवगड हापूसचे २० ते ३० नग २०० ते ४०० रूपयांपर्यंत विक्री केले जात आहेत. रत्नागिरी पायरी १०० रूपये प्रति डझनचा दर झाला आहे. परराज्यातील आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने रत्नागिरी, देवगड, मालवणच्या हापूस आंब्याच्या पेटीच्या दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत ७०० ते ८०० रूपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे एक डझन आंब्याचा दर १०० रूपयांपासून ते २०० रूपयांपर्यंत कमी झाला आहे. अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा उत्पादन कमी झाले होते. परिणामी प्रचंड दरामुळे हा कोकणाचा राजा सामान्यांच्या आवाक्याबाहेर होता. रत्नागिरी हापूसची पेटी ८०० ते २००० रुपयापर्यंत होती तर रत्नागिरी पायरीची पेटी ७०० ते १२०० रुपयांना उपलब्ध होत होती. देवगड हापूस पेटी मात्र ९०० ते २२०० रुपये इतक्या सर्वात जास्त दरात उपलब्ध होती. आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने फळांच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे बाजारपेठांसह उपनगरातही टेम्पोतून आंबा पेटीची विक्री होत आहे. सध्या बाजारपेठेत कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ व गुजरातमधील आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्याचे दर १०० ते ४०० रुपयांपर्यंत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रतस्करीचे वाराणसी कनेक्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भरवस्तीत वर्दळीच्या रस्त्यावर मित्राच्या डोक्यात गोळी घालून खून करणाऱ्या हल्लेखोराकडून पोलिसांनी दोन रिव्हॉल्व्हरसह सहा जिवंत काडतुसे जप्त केली. हल्लेखोर प्रतीक सरनाईक याने चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून दोन पिस्तूल आणि दोन रिव्हॉल्व्हर खरेदी केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. सरनाईककडे मिळालेल्या बेकायदा शस्त्रांमुळे शस्त्रतस्करीचे वाराणसी व्हाया पुणे कनेक्शन समोर आले आहे, तसेच अवैध शस्त्रे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

प्रतीक पोवार या मित्राच्या डोक्यात गोळी घालून खून करणारा हल्लेखोर प्रतीक सरनाईक हा आई आणि लहान भावासह पाचगावातील शांतादुर्गा कॉलनीत राहतो. त्याचे वडील महापालिकेत वर्कशॉपमध्ये नोकरीस होते. दीड वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. आई आणि भावाशी पटत नसल्याने प्रतीक पुण्यात कार ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याला महिन्याला १५ हजार पगार होता. दोन ते तीन महिन्यांतून तो आठवडाभरासाठी घरी येत असे. शांतादुर्गा कॉलनीत चार वर्षांपूर्वी त्याचा रणजित गवळी आणि इतर मित्रांशी वाद झाला होता. त्यावेळी मारहाण करणाऱ्या मित्रांचा बदला घेण्याचा विचार त्याच्या मनात सतत होता. यासाठीच त्याने पुण्यातील एका व्यक्तीच्या ओळखीने एक लाख रुपयांत दोन पिस्तूल आणि दोन रिव्हॉल्व्हर खरेदी केली. यात मुंबईतील एकाने मदत केली.

सप्टेंबर २०१६ मध्ये त्याने इचलकरंजीत दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला होता. तेव्हा शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून पिस्तूल जप्त केले होते. त्याचवेळी शस्त्रखरेदीची कसून चौकशी झाली असती, तर कदाचित त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसला असता. प्रतीक पोवारच्या खुनानंतर सरनाईककडे तीन शस्त्रे आणि जिवंत काडतुसे मिळाल्याने शस्त्रतस्करीचा संशय बळावला आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी चार-चार पिस्तूल खरेदी करण्याची गरज काय? इतके दिवस त्याने शस्त्रे कुठे लपवली होती? त्याच्याकडील शस्त्रांची माहिती आणखी कोणाला होती? तो खरेच पुण्यात कार ड्रायव्हर म्हणून काम करीत होता काय? त्याचा पुणे आणि मुंबईत कोणाशी संबंध होता? अशा अनेक प्रशांच्या उत्तरांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

वाराणसीत अवघ्या दहा-वीस हजारांत पिस्तूल विकत मिळते. याच पिस्तुलाची कोल्हापुरात किमान ५० हजार रुपयांना विक्री होते. यामुळे शस्त्रतस्करी आणि अवैध विक्रीचा प्रकार कोल्हापुरात सुरू असल्याचे समोर येत आहे. सरनाईकने गेल्या चार वर्षांत पुण्यातील ओळखीचा वापर करून वाराणसीतून शस्त्रे खरेदी करून त्यांची कोल्हापूरसह आसपास विक्री केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. शहरातील एका कुख्यात टोळीशीही त्याचे लागेबांधे आहेत. यातून शस्त्रांची विक्री केल्याचा संशय आहे. सरनाईकची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी शस्त्र तस्करीच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. यासाठी पोलिसांचे एक पथक वाराणसीलाही जाणार आहे. त्याच्याकडे आणखी काही शस्त्रे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

००००

बेकायदा शस्त्रे शोधण्याचे आव्हान

अवघ्या दहा ते वीस हजारांत सहज पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर मिळत असल्याने गुन्हेगारी टोळ्यांकडे अवैध शस्त्रांची कमतरता नाही. लूटमार, खंडणी, दमदाटी यासाठी गुन्हेगारांकडून अशा शस्त्रांचा वापर होतो. प्रतीक सरनाईकच्या चौकशीतून अवैध शस्त्रांची सहज उलब्धता समोर आली आहे. अशी बेकायदेशीर शस्त्रे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यात अपयश आल्यास गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याचा धोका आहे.

००००

मुंबईतील टोळ्यांशी संबंध

प्रतीक सरनाईकचा मुंबईतील काही व्यक्तींशीही संबंध होता. शस्त्र खरेदीसाठी त्यांच्या ओळखीचा वापर केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. मुंबईतील त्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. यापूर्वी कोल्हापुरातील काही गुंडांचा मुंबईतील गुन्हेगारी टो‌‌ळ्यांमधील सहभाग समोर आला आहे. सरनाईकचा गुन्हेगारी टोळ्यांसी संबंध आहे? काय याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

००००

जप्त केलेली शस्त्रे

१ पिस्तूल, २ रिव्हॉल्व्हर, ९ जिवंत काडतुसे करवीर पोलिसांनी जप्त.

१ पिस्तूल २०१६ मध्येच इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांकडून जप्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन

0
0

इंद्रजित सावंत यांना

धमकीचा फोन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांना शुक्रवारी (ता. २५) संध्याकाळी धमकीचा फोन आला. 'तुला मस्ती आली आहे काय? सगळे बाजूला राहतील, तुला बघून घेईन,' असे म्हणत शिवीगाळ केली. डी. के. म्हणजे दत्तात्रय खाडे याने धमकावल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत हे शुक्रवारी संध्याकाळी शाहू स्मारक भवन येथे थांबले होते. यावेळी त्यांच्या मोबाइलवर फोन आला. काही सेकंदात हा कॉल कट झाला. यानंतर सावंत राजारामपुरीकडे निघाले होते. यावेळी त्याच नंबरवरून दोनवेळा मिस्डकॉल पडले होते. सावंत यांनी त्या नंबरवर पुन्हा फोन केल्यानंतर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने सावंत यांना धमकावले. 'मी डी. के. बोलतोय. तुला मस्ती आली आहे काय? सगळे बाजूला राहतील, तुला बघून घेईन. तुझी नाटकं बंद कर,' असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. सुमारे दीड मिनिटे तो सावंत यांना शिवीगाळ करून धमकावत होता. सावंत यांनी हा कॉल रेकॉर्ड केला. यापूर्वीही अनेकदा निनावी धमकावणीचे फोन आल्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन सावंत यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मोबाइलवरून धमकावल्याबद्दल त्यांनी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार अर्ज दिला.

निरीक्षक सावंत यांनी तातडीने आलेल्या मोबाइल नंबरवर फोन केला असता, दत्तात्रय खाडे याचा मोबाइल नंबर असल्याचे स्पष्ट झाले. धमकावणीबद्दल विचारणा केल्यानंतर त्याने नजरचुकीने इंद्रजित सावंत यांना फोन लागल्याचे सांगितले. इंद्रजित पाटील यांना फोन करायचा होता. मात्र, इंद्रजित सावंत यांना लागल्याचे त्याने सांगितले. याबाबत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला शनिवारी पोलिस ठाण्यात बोलावले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री कार्यक्रम

0
0

नवीन विश्रामधामचे

आज उद्घाटन

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन विश्रामधाम इमारतीचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.२६) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. कार्यक्रमास खासदार सर्वश्री संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, सर्वश्री आमदार सतेज पाटील, दत्तात्रय सावंत, हसन मुश्रीफ, सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, श्रीमती संध्यादेवी कुपेकर, अमल महाडिक, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील आदींसह जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार उपस्थित राहणार आहेत.

00000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रेडिट कार्डच्या थकीत रकमेपैकी २५ हजार रुपये बँकेत भरूनही पावती न मिळाल्याने रत्नाकर बँकेतील कर्मचारी सुप्रिया पाठक व शीतल (दोघीही रा. मुंबई) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत श्रेयस संजय पोतदार (वय ३२, रा. बेलबाग, मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस पोतदार सराफ व्यावसायिक आहेत. त्यांचे रत्नाकर बँकेत खाते आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांनी क्रेडिट कार्ड घेतले होते. कार्डची व्यवहार क्षमता एक लाख ८९ हजार रुपये होती. कार्डवर एक लाख २२ हजार रुपये थकीत असल्याने ही रक्कम तातडीने बँकेत भरावी यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून पोतदार यांच्याकडे तगादा सुरू होता. रत्नाकर बँकेच्या गोरेगाव ईस्ट, मुंबई शाखेतील रिकव्हरी विभागातील सुप्रिया पाठक यांनी २४ ते २७ एप्रिलदरम्यान पोतदार यांच्या मोबाइलवर फोन करून थकीत रक्कम भरण्यासाठी दमदाटी केली. याशिवाय पोतदार यांची पत्नी आणि मित्रालाही फोन केला. पैसे न भरल्यास बदनामी करण्याची धमकीही त्यांनी दिली.

सुप्रिया पाठक यांच्या सांगण्यानुसार पोतदार यांनी २७ एप्रिलला राजारामपुरी आठव्या गल्लीतील रत्नाकर बँकेच्या शाखेत कर्मचारी पृथ्वीराज देसाई यांच्याकडे २५ हजार रुपये भरले. पोतदार यांनी पावती मागितली. मात्र, देसाई यांनी ती दिली नाही. याबाबत पोतदार यांनी पाठक यांना फोन करून पावतीची मागणी केली. त्यांनी ऑनलाइन पावती देणार असल्याचे सांगितले. मात्र, अद्याप पावती मिळाली नसल्याने त्यांनी फसवणुकीची फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी बँकेच्या मुंबईतील दोन कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालन पाटीलकोल्हापूर कळंबा रोडवरील हडको कॉलनी

0
0

मालन पाटील

कोल्हापूर

कळंबा रोडवरील हडको कॉलनी येथील मालन बाबासाहेब पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी(ता.२७) सकाळी आहे.

............

सोनाबाई पाटील

कोल्हापूर

करवीर तालुक्यातील हळदी येथील सोनाबाई गंगाराम पाटील (वय १०५)यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२७) सकाळी आहे.

...................

रत्नाकर सुर्यवंशी

कोल्हापूर

राजारामपुरी येथील रत्नाकर गोविंद सुर्यवंशी (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२७) सकाळी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ गावांना टीडीआर, वाढीव एफएसआय

0
0

प्राधिकरण समितीच्या बैठकीत 'ड' वर्ग महापालिकेची विकास नियमावली लागू करण्याचा ठराव

फोटो आहे.....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला पर्याय म्हणून कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरण घोषित करण्यात आले. नागपूर, पुणे, मुंबईनंतर कोल्हापूरला प्राधिकरण मिळाले आहे. प्राधिकरणातील ४२ गावांना टीडीआर लागू व वाढीव एफएसआय मिळवून देण्यासाठी 'ड' वर्ग महापालिकेला लागू असणारी विकास नियमावली कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरणाला लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा ठराव कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरण समितीच्या बैठकीत झाला. त्याप्रमाणे तसा प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरणाच्या हद्दीत येणाऱ्या गावांच्या संतुलित विकासासाठी समिती स्थापन केली आहे. समितीची शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री पाटील होते. मंत्री पाटील म्हणाले, 'हद्दवाढीला पर्याय म्हणून प्राधिकरणाची स्थापना झाली. प्राधिकरणामुळे महापालिका हद्दवाढीचा विषय संपुष्टात आला आहे. त्यामुळे 'ड' वर्ग महापालिकेला लागू असणारी विकास नियमावली प्राधिकरणाला लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही नियमावली लागू झाल्यास ग्रामपंचायत व सरपंचांच्या अधिकारांवर कोणतीही गदा येणार नाही. या नियमावलीमुळे महापालिका ज्याप्रमाणे टीडीआर व एफएसआय देते, त्याचप्रमाणे ४२ गावांना टीडाआर लागू होऊन वाढीव एफएसआय मिळेल. सध्या गावठाणांबाहेरील विकास अनियंत्रित व विस्कळीतपणे सुरू आहे. तो एकत्रित करण्यासाठी नियमावली लागू करण्यात येईल. विकासाची संकल्पना समजावून सांगण्यासाठी ६ जूनला ४२ गावांतील सरपंचांचा मार्गदर्शन वर्ग होणार आहे.'

पाटील पुढे म्हणाले, 'प्राधिकरणाच्या हद्दीतील ४२ गावांना पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, मध्यवर्ती हॉस्पिटल, आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासाचा एकत्रित आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. कोल्हापूर महापालिकेच्या अखत्यारीत नसलेल्या बाबी पूर्ण करून देणार असून, प्राधिकरणातील गावांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही.'

बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार सतेज पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, हातकणंगले तालुका पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी, करवीर तालुका पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप, आदी उपस्थित होते.

............................

पॉइंटर...

ग्रामस्थांना वाढीव एफएसआय मिळेल

उपनगर व प्राधिकरणातील गावांत ५० बेडचे हॉस्पिटल

सहा जूनला सरपंच मार्गदर्शन वर्ग

ग्रामपंचायतींची स्वायत्तता अबाधित

सरपंचांचे अधिकार कायम

................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ गावांना टीडीआर, वाढीव एफएसआय

0
0

प्राधिकरण समितीच्या बैठकीत 'ड' वर्ग महापालिकेची विकास नियमावली लागू करण्याचा ठराव

फोटो आहे.....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला पर्याय म्हणून कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरण घोषित करण्यात आले. नागपूर, पुणे, मुंबईनंतर कोल्हापूरला प्राधिकरण मिळाले आहे. प्राधिकरणातील ४२ गावांना टीडीआर लागू व वाढीव एफएसआय मिळवून देण्यासाठी 'ड' वर्ग महापालिकेला लागू असणारी विकास नियमावली कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरणाला लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा ठराव कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरण समितीच्या बैठकीत झाला. त्याप्रमाणे तसा प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरणाच्या हद्दीत येणाऱ्या गावांच्या संतुलित विकासासाठी समिती स्थापन केली आहे. समितीची शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री पाटील होते. मंत्री पाटील म्हणाले, 'हद्दवाढीला पर्याय म्हणून प्राधिकरणाची स्थापना झाली. प्राधिकरणामुळे महापालिका हद्दवाढीचा विषय संपुष्टात आला आहे. त्यामुळे 'ड' वर्ग महापालिकेला लागू असणारी विकास नियमावली प्राधिकरणाला लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही नियमावली लागू झाल्यास ग्रामपंचायत व सरपंचांच्या अधिकारांवर कोणतीही गदा येणार नाही. या नियमावलीमुळे महापालिका ज्याप्रमाणे टीडीआर व एफएसआय देते, त्याचप्रमाणे ४२ गावांना टीडाआर लागू होऊन वाढीव एफएसआय मिळेल. सध्या गावठाणांबाहेरील विकास अनियंत्रित व विस्कळीतपणे सुरू आहे. तो एकत्रित करण्यासाठी नियमावली लागू करण्यात येईल. विकासाची संकल्पना समजावून सांगण्यासाठी ६ जूनला ४२ गावांतील सरपंचांचा मार्गदर्शन वर्ग होणार आहे.'

पाटील पुढे म्हणाले, 'प्राधिकरणाच्या हद्दीतील ४२ गावांना पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, मध्यवर्ती हॉस्पिटल, आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासाचा एकत्रित आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. कोल्हापूर महापालिकेच्या अखत्यारीत नसलेल्या बाबी पूर्ण करून देणार असून, प्राधिकरणातील गावांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही.'

बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार सतेज पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, हातकणंगले तालुका पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी, करवीर तालुका पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप, आदी उपस्थित होते.

............................

पॉइंटर...

ग्रामस्थांना वाढीव एफएसआय मिळेल

उपनगर व प्राधिकरणातील गावांत ५० बेडचे हॉस्पिटल

सहा जूनला सरपंच मार्गदर्शन वर्ग

ग्रामपंचायतींची स्वायत्तता अबाधित

सरपंचांचे अधिकार कायम

................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोप खणीत महाराजांचा पुतळा

0
0

टोपच्या खणीत बसविलेला

राष्ट्रपुरुषाचा पुतळा हटविला

म.टा.वृत्तसेवा, कसबा बावडा,

कोल्हापूर शहरातील कचरा टोप खणीत टाकला जाऊ नये म्हणून गुरुवारी रात्री काही अज्ञातांनी खणीत राष्ट्रपुरुषांचा पुतळा उभारला. ही गंभीर बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच शुक्रवारी तो पुतळा व त्याचा चबुतराही खणीतून हटविण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी शिरोली पोलिसांनी अज्ञातांवर राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टोप खणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर टोप पंचक्रोशीतील गावांनी खणीत कचरा टाकू देणार नाही म्हणून आंदोलन उभा केले आहे. गावोगावी बैठका घेऊन यासाठी एकत्रितपणे तीव्र विरोध करण्याचे जाहीर केले. वडार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मरण पत्करू, पण खण देणार नाही. हजारो डंपरसह महापालिकेला घेराव घालू, असा इशारा दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन दिला होता. गुरुवारी रात्री टोप ग्रामपंचायतचे सदस्य मुंबईत मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना निवेदन देण्यासाठी गेले आहेत. दरम्यान, रात्री टोपच्या खणीत राष्ट्रपुरुषांचा पुतळा बसवल्याचे समजल्यावर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी खणीभोवती बंदोबस्त लावला. वरिष्ठांना कल्पना दिल्यानंतर खणीच्या परिसरात सीआरपीएफ तसेच गांधीनगर, गोकुळ शिरगावचा पोलिस फौजफाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाला. नागरिकांनीही गर्दी केली होती.

दहा फूट सिमेंटच्या विटांचे बांधकाम करून चबुतरा उभा केला होता. त्यावर राष्ट्रपुरुषांचा अंदाजे पाच फूट उंचीचा घोड्यावरील पुतळा उभारण्यात आला होता. पुतळ्याच्या मागे पंधरा फुटाचा लोखंडी पाइप लावून ध्वजही लावण्यात आला होता. पोलिसांनी पूजा करून पुतळा हलविला व नंतर चबुतरा जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकला. यावेळी करवीरचे उपअधीक्षक सुरज गुरव, तहसीलदार वैशाली राजमाने,शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, गांधीनगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण उपस्थित होते.

दरम्यान, बंगळूरू पुणे महामार्गालगत असलेल्या दगडाच्या खणीमध्ये पावसाचे पाणी साचते, मृत जनावरे टाकली जातात हे माहिती असतानासुध्दा या ठिकाणी अज्ञात लोकांनी चबुतरा बांधून त्यावर राष्ट्रपुरुषांचा पुतळा बसवून भावना दुखावल्या. लोकांमध्ये,समाजामध्ये तेढ निर्माण केली . त्याबद्दल अज्ञातांविरुध्द कलम १५३(अ) व २९५ अन्वये सरकारच्यावतीने फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार यादी पुनरिक्षण

0
0

कोल्हापूर : निवडणूक आयोगाने छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांनी आपली नावे मतदार यादीत असल्याची खात्री करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केले. नागरिकांनी नमुना क्रमांक ६,७ आणि ८ चे अर्ज आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे किंवा संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालय (निवडणूक शाखा) येथे कागदपत्रासह सादर करावा. आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळावरही ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. रंगीत छायाचित्र, वय व पत्त्याच्या पुराव्यासंबंधी अधिकृत कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी काटकर यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडावरून पडून मृत्यू

0
0

झाडावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर : आंबे काढताना झाडावरून पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शंकर मारुती सुतार (वय ५०, रा. उजत, ता. शाहूवाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सुतार १६ मे रोजी शेतातील झाडाचे आंबे काढण्यासाठी गेले होते. आंबे काढत असताना ते झाडावरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गुरुवारी (ता.२४) रात्री त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

सर्पदंशाने वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर : शेतात काम करताना सर्पदंश झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महादेव परशू कोळी (वय ६०, रा. शेणगाव, ता. भुदरगड) असे त्यांचे नाव आहे. कोळी यांनी १७ मे रोजी सायंकाळी सर्पदंश झाला होता. त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा शुक्रवारी (ता.२५) सकाळी नऊच्या सुमारास मृत्यू झाला.

मारहाणीत तिघे जखमी

कोल्हापूर : जागेच्या कारणावरून वाद झाल्यानंतर सातार्डे (ता. पन्हाळा) येथे तिघांना काठीने मारहाण झाली. यात रामचंद्र प्रकाश कांबळे (वय २७), नागेश प्रकाश कांबळे (२३) आणि अनिता प्रकाश कांबळे (४०, रा. सातार्डे) जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. गुरुवारी (ता. २४) सायंकाळी मारहाणीचा प्रकार घडला.

पादचारी तरुण जखमी

कोल्हापूर : तावडे हॉटेल येथे अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने पादचारी तरुण जखमी झाला. सचिन यशवंत चव्हाण (वय २८, रा. उंब्रज, ता. कराड) असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २४) रात्री घडली. जखमी चव्हाणला तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारानंतर त्याची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गटारीत पडल्याने बालक जखमी

कोल्हापूर : पिरवाडी (ता. करवीर) येथे खेळताना गटारीत पडल्याने बालक जखमी झाले. स्वयंभू सागर सातपुते (वय ४ वर्षे, मूळ रा. राजेंद्रनगर) जखमी झाला. गुरुवारी (ता. २४) सायंकाळी ही घटना घडली. स्वयंभूला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले आहे. तो आईसोबत मामाच्या गावी पिरवाडी येथे गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करु, अशी ग्वाही पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा विद्या भवनमध्ये झाली. याप्रसंगी वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांऐवजी लेखाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्याचे ठरले.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. सहविचार सभेत विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मान्यता त्वरित देणे, ३० जूनपूर्वीं शिक्षक कर्मचाऱ्यांना पीएफ अकाउंट नंबर देण्याबाबत चर्चा झाली. तसेच सर्व प्रस्तावाची तपासणी यादी एक जून २०१८ पूर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व वैद्यकीय बिलांना तत्काळ मंजुरी देण्याविषयी चर्चा झाली. एकाच जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली मान्यतेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाची गरज नाही असे सभेत ठरले. यावेळी शिक्षक संघटनेचे नेते दादा लाड, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हाईस चेअरमन बी. आर. बुगडे, सचिव दत्ता पाटील, शिक्षणाधिकारी किरण लोहार, महेश चोथे, महेश जोशी, अशोक कडूस आणि शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेर्लेकरचा ताबा पुणे पोलिसांकडे

0
0

आंध्रप्रदेशातही फसवणुकीचा गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

झीप कॉइनचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा सूत्रधार राजेंद्र नेर्लेकर याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर पुण्यात ३९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, नेर्लेकरने आंध्रप्रदेशातही फसवणूक केल्याने तेथील पोलिसांनी त्याचा ताबा मिळवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

हुपरी येथील राजेंद्र नेर्लेकर याने कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांना दरमहा १५ टक्के लाभांश देण्याचे आमिष दाखवले. झीप कॉइनमध्ये गुंतवणूक केल्याचे दाखवून त्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. टोळीचा मुख्य सूत्रधार नेर्लेकरच्या चौकशीत फसवणुकीचे अनेक कारनामे समोर येत आहेत. त्याने पुण्यातील एका व्यावसायिकाला चांदीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ३९ लाखांची फस‌वणूक केली आहे. याबाबत पुण्यात गुन्हा दाखल झाल्याने पुणे पोलिसांनी नेर्लेकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

बिग ड्रीम संस्था सुरू करून अनेकांना गंडा घालणाऱ्या नेर्लेकरवर कोल्हापूर आणि पुण्यापाठोपाठ कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातही गुन्हे दाखल झाले आहेत. सीमाभागात त्याने शेळी-मेंढीपालन व्यवसायासाठी कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक केली, तर आंध्रप्रदेशातही शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. करनूल जिल्ह्यातील नंद्याळ टाउन पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याने करनूल पोलिसांनी नेर्लेकरचा ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोल्हापूर जिल्हा कोर्टात अर्ज सादर केला. पुणे पोलिसांची चौकशी पूर्ण होताच नेर्लेकर आंध्रप्रदेश पोलिसांच्या ताब्यात जाणार आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासात नेर्लेकरचे अनेक कारनामे समोर आले आहेत. पुण्यातील बालाजी गणगेकडून त्याने झीप कॉइनच्या वेबसाइटचे तांत्रिक काम करून घेतले. त्यासाठी त्याला दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात मात्र नेर्लेकरने काम करवून घेऊन त्याला केवळ २५ हजार रुपये दिले. वेबसाइट तयार केल्याने गणगेही या गुन्ह्यात आरोपी आहे. जवळच्या अनेक नातेवाइकांनाही त्याने गंडा घातल्याची माहिती तपास अधिकारी उपअधीक्षक राजेंद्र शेडे यांनी दिली.

००००

नेर्लेकरवर १३ गुन्हे

राजेंद्र नेर्लेकर हाच झीप कॉइन फस‌वणुकीचा मुख्य सूत्रधार आहे. भाऊ, पत्नी, मुलगा यांना सोबत घेऊन त्याने बिग ड्रीम ही संस्था स्थापन केली होती. त्याच्याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात चेक बाउन्स झाल्याचे ७, मारहाण तसेच धमकावण्याचे २ आणि फसवणुकीचा १ असे १० गुन्हे नोंद आहेत. याशिवाय पुणे, बेळगाव आणि करनूल येथे फसवणुकीचे ३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एकूण १३ गुन्हे नोंद असल्याने फसवणुकीच्या रकमेची व्याप्ती वाढणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकृतीबंधाच्या सीमा ओलांडा

0
0

आकृतीबंधाच्या सीमा ओलांडा

दमसासच्या ग्रंथ पुरस्कार वितरण समारंभात डॉ. गोपाळ गुरु यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठी भाषेत दर्जेदार साहित्यिक आहेत, मात्र साहित्यिकांनी आता आकृतीबंधाच्या सीमारेषा ओलांडण्याची गरज आहे. साहित्यिकाच्या आत्मपरीक्षणामुळेच हे शक्य आहे. साहित्यिकाचे आत्मभान वाढवण्यासाठी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे काम महत्त्वाचे आहे,' असे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी व्यक्त केले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या ग्रंथ पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनमध्ये शुक्रवारी (ता. २५) पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी पी. विठ्ठल आणि अरुण इंगवले यांना राज्यस्तरीय काव्य पुरस्काराने तसेच विविध २७ साहित्यकृतींना पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक संजय मोहिते होते.

यावेळी बोलताना डॉ. गुरू म्हणाले, 'सामाजिक भान असल्याशिवाय कसदार साहित्य निर्मिती होत नाही. लेखकांचा अनेकांशी संवाद असावा, त्याचबरोबर त्याच्या साहित्याचे योग्य समीक्षणही व्हावे. मराठी भाषेतील लेखकांवर प्रस्थापित साहित्यिकांचा मोठा प्रभाव होता. गेल्या काही पिढ्या यातून बाहेर पडल्या नाहीत. नव्या लेखकांनी आता आकृतीबंधाच्या सीमारेषा ओलांडाव्यात. मराठीतील उत्तम साहित्याचा अन्य भाषांत अनुवाद करणे ही आजच्या काळाची गरज आहे. दमसासने यासाठी काम करावे.'

ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. आनंद पाटील यांनी ग्रंथ परीक्षणाचे निकष सांगितले. नवे लेखक प्रस्थापित साहित्याची झूल झुगारून लिहीत आहेत, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. लेखकाला लोकल असूनही ग्लोबल होता आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पोलिस अधीक्षक मोहिते यांनी अलिकडच्या साहित्याच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे मराठी पुस्तकांचा खप कमी होत असल्याबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली जाते. मात्र, जगभरात इंग्रजी पुस्तकांचा खप अधिक आहे आणि ते लोक इंटरनेटचाही वापर मोठ्या प्रमाणात करतात. दर्जेदार साहित्याला वाचक आहेत. साहित्य दर्जेदार असेल तर वाचक ते स्वीकारतात.'

दमसासचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी प्रस्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. 'लेखकांना प्रोत्साहन देण्यासह नवीन पिढी लिहिती व्हावी यासाठीही दमसासचे काम सुरू आहे. यातूनच 'गौतमच्या कविता' हा बाल साहित्यिकाचा कविता संग्रह साकारला. साहित्याचा गांभीर्याने विचार करणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासह चिकित्सक वाचक घडवण्याचाही प्रयत्न दमसासकडून सुरू आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन गोवा आणि उत्तर कर्नाटकातील साहित्यिकांच्याही कलाकृतींचा विचार दमसासमध्ये होतो.'

यावेळी पुरस्कारप्राप्त कवी पी. विठ्ठल, अरुण इंगवले यांच्यासह दत्ता मोरसे, अशोक जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. दमसासचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम, कार्यवाह गोविंद पाटील, गौरी भोगले, भीमराव धुळुबुळू, श्याम कुरळे, दि. बा. पाटील,आदी उपस्थित होते.

०००००००००

चौकट - पुरस्कारप्राप्त साहित्यिक

धम्मपाल रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार

अरुण इंगवले (आबूट घेऱ्यातला सूर्य)

पी. विठ्ठल (शून्य एक मी)

दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार

दत्ता मोरसे (झुंड), अशोक जाधव (भंगार), श्रीकांत पाटील (लिहू आनंदे), यशवंत माळी (किराळ), सतीश सोळांकूरकर (रुजवात), सुहास पंडित (शब्द माझ्या सोबतीला), रा. अ. गुरव (शाळेतल्या गोष्टी)

विशेष पुरस्कार

नवनाथ गोरे (फेसाटी), अर्जुन व्हटकर (मुक्या जंगलाची गर्जना), रवींद्र गुरव (सावट), अनुराधा खांडेकर (आर्त प्रीत), केशव हेरले (छत्रपती राजाराम महाराज), रुपा शहा (लेखा जोखा), बा. ना. धांडोरे (नागवंश), कोल्हापूरचा टोल लढा (विश्वास पाटील), भीमराव कुंभार (मी भीमराव कुंभार बोलतोय), रावसाहेब पुजारी (कोल्हापूर पर्यटन), मोहन लोंढे (मांग संस्कृती आणि भाषा), शिवाजी देसाई (एकसंध होताना), शरद गायकवाड (शंकर भाऊ साठे), प्रतीक पाटील (ऑफिशिअल सिक्रेट), सुभाष कोरे (कर्मयोगी डॉ. एस. एस. घाळी), गौतमच्या कविता (गौतम पाटील), उर्मिला शहा (घायाळ आभाळ), प्रल्हाद कुलकर्णी (साहित्याचे पश्चिमरंग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चुकीच्या धोरणामुळे विकासकामे ठप्प’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण, नगरविकास आणि जलसंपदा विभागामार्फत होणारी विकास कामे पूर्णत ठप्प झाली आहेत. यामुळे बांधकाम आणि रस्ते कामांवर अवलंबून असलेल्या सुमारे दोन कोटी लोकांचा रोजगार बुडाला आहे. विकास कामाच्या अंदाजपत्रकांत मोठी घसरण झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात गेल्या चार वर्षांतील विविध विभागाच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला आहे.

'सरकारचे कुठलेही शाश्वत धोरण गेल्या चार वर्षांत दिसत नाही. राज्यातील २८ ते ३० जिल्हा परिषदेमध्ये स्थापत्य विभागाशी निगडीत बजेट हे अंदाजे ३५०० ते ४००० कोटी रुपयांचे होते. परंतु यामध्ये प्रचंड प्रमाणात घसरण होऊन ६०० ते ७५० कोटी रुपयांवर आले. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बजेट ११ ते १२ हजार कोटी होते आता ४५०० ते ६००० कोटी एवढ्या प्रमाणात खाली घसरले. राज्यातील सर्व महापालिकेकडून होणारी भांडवली कामे पूर्ण बंद आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत. जलसंपदा व जलसंधारणच्या कामाला निधी नाही आणि जलसंधारणच्या ज्या कामास निधी आहे, त्याचे कुठेही मूल्यमापन व उपयोग नाही.' महासंघाचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले व महासचिव सुनील नागराळे यांनी याबाबत पत्रक काढले आहे.

..............

अडीच टक्क्याच्या हिशेबाने खासगी कंपन्यांना काम

राज्यातील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. सरकारी निवासस्थाने व इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीची व्यवस्था झाली नाही. सुशिक्षित बेरोजगारांना जेसीबी, पोकलँड व इतर मशिनरी खरेदीसाठी कर्ज देणार अशी सरकारने घोषणा केली पण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही. जीएसटीबाबत उचित धोरण आजवर घेतलेले नाही. राज्यातील सर्व विभागाच्या रस्त्यांची अंदाजे ९५०० ते १० हजार कोटी रुपयांची अंदाजपत्रके तयार करण्याचे काम ई निविदा सोडून काही सल्लागार कंपन्यांना अडीच टक्क्याच्या हिशोबाने बहाल करण्यात आले. याची अंदाजित रक्कम ३०० कोटींपर्यंत होते. वास्तविक ही कामे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झाली असती. पण जाणूनबुजून खासगी एजन्सीला काम सोपविले असून त्यामागे आर्थिक देवाणघेवाण हाच मुख्य उद्देश आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

0
0

sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

या आजारात रुग्णाच्या वाट्याला वेदनामय आयुष्य येते. सांधे, खांदे, गुडघे अशा ठिकाणी अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाला तर भयंकर वेदना सुरू होतात. मेंदूतील रक्तस्त्रावाने जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. शरीरातील रक्त गोठवण्याची नैसर्गिक क्रिया होत नसल्याने असा अंतहिन वेदनांचा अनुभव हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना येतो. कोल्हापुरातील हिमोफेलिया सोसायटी चॅप्टर संस्थेने १ ते १५ वयोगटातील हिमोफेलियाग्रस्त १६ मुलांना मोफत औषधोपचार देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. सध्या सोसायटीकडे नोंद झालेल्या रुग्णांची संख्या ३६९ आहे. सोसायटीच्या माध्यमातून या रुग्णांसाठी मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिले जातात.

काय आहे हिमोफेलिया?

हिमोफेलिया आजारात रुग्णाच्या शरीरात रक्त गोठवण्याची नैसर्गिक प्रक्रिया होत नाही. मानवी शरीरातील लिव्हरमध्ये रक्त गोठवण्याचे १४ घटक असतात. यांपैकी एका घटकाचे काम नैसर्गिकरित्या होत नसेल तर शरीरातील जॉइंटचे अवयव असलेल्या ठिकाणी अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हा अनुवंशिक आजार असून, तो आईपासून बाळाकडे संक्रमित होतो.

कोल्हापूर हिमोफेलिया सोसायटीचे काम

हिमोफेलियाग्रस्त आढळल्यास त्याची नोंद करून त्याला सोसायटीच्या माध्यमातून आजीवन सदस्यत्व दिले जाते. त्याला मिळालेल्या ओळखपत्राच्या आधारे तो रुग्ण देशातील कुठल्याही हिमोफेलिया सोसायटी चॅप्टरच्या संस्थेत उपचार घेऊ शकतो. देशभरात अशा ९१ सोसायटी आहेत. हा आजार अनुवांशिक असून लहान मुलात तो जास्त प्रमाणात आढळतो. अनेकदा शस्त्रक्रिया करताना त्याचे निदान होते. सोसायटीच्या माध्यमातून उपचारासाठी लागणारे फॅक्टर अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले जातात. त्याचबरोबर आजाराबाबत जनजागृती आणि सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न केले जातात. सोसायटीकडे कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच बेळगाव व सीमाभागातील रुग्ण उपचारासाठी येतात.

असे होतात औषधोपचार

रुग्णाला होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी फॅक्टर दिले जातात. यात आठ, नऊ, सहा असे प्रकार आहेत. यात औषधाचे डोस युनिटप्रमाणे दिले जाते. सोसायटीमार्फत प्राथमिक उपचार केले जातात. तसेच रक्तस्त्राव व वेदना थांबण्यासाठी गोळ्या पुरवल्या जातात. तसेच संभाव्य धोके टाळण्यासाठी मार्गर्शन केले जाते.

खर्चिक उपचार

या आजारातील उपचार काही प्रमाणात खर्चिक आहेत. सरकारी रुग्णालयात मोफत औषधोपचार करण्याची सोय असते. पण, सध्या सीपीआरमध्ये यावरील उपचारासाठी लागणारे फॅक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना सातारा व रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागतो. उपचारासाठी लागणाऱ्या औषधांच्या किमती ३३०० ते ४ हजारापर्यंत असतात.

कोट:::

हिमोफेलिया आजाराबाबत जागृती होत आहे. वर्ल्ड हिमोफेलिया फेडरेशनच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचारपद्धती आणि अत्यल्प दरात औषधोपचार पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या आजाराबाबत जागरुकता वाढवण्यासाठी तरुण पिढीने सक्रीय सहभागी व्हावे.

डॉ. ए. डी. मांजरेकर, निवृत्त शल्यचिकित्सक, अध्यक्ष, हिमोफेलिया सोसायटी कोल्हापूर

माझा मुलगा सिद्धेश आठ वर्षाचा आहे. त्याला हिमोफेलिया निदान झाल्यानंतर आम्ही चिंतेत होतो. पण, हिमोफेलिया सोसायटीच्या माध्यमातून पुण्या-मुंबईसारखे उपचार मिळाल्याने आता मुलगा रोज खेळू शकतो. दर आठवड्याला आम्ही उपचारासाठी कोल्हापूरला येतो. चांगल्याप्रकारे उपचार उपलब्ध झाले आहेत.

राहुल कदम पालक, तासगाव

०००००००००००००००००००

फोटो- डेस्कला टाकले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चटकमटक पानासाठी......

0
0

रमजानच्या महिन्यात

पदार्थांची रेलचेल

sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

मुस्लीम बांधवांचा अत्यंत महत्वाचा सण रमजान महिना सध्या सुरू आहे. या महिन्यात अनेक जिव्हाळ्याची माणसे यानिमित्ताने एकत्र येत गाठीभेटी घेतात. एकमेकांच्या सहवासात यानिमित्ताने जुन्या आठवणीना उजाळा दिला जातो. भूतकाळातील आठवणींचा गोफ बांधताना सोबतीला अनेक चटकदार पदार्थांची मेजवानी देखील असते. यानिमित्ताने घरात अनेक पदार्थ आवर्जून बनवले जातात. त्यात काही व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांची रेलचेल असते. अनेक भरगच्च मेन्यूची जोड असलेल्याने मोठ्या प्रमाणात सर्वांची पेटपूजा होते. यात खास खेकडा भजी, मालपुवा आणि सगळ्यात प्रत्येकाच्या आवडीचा शिरखुर्मा हमखास बनतो. दालचा, खिचडा, कटलेट आणि हलीम असे नॉनव्हेजचे प्रकारही चाखायला मिळतात आणि त्याजोडीला लज्जत वाढवायला मटन कबाब असतेच.

भारतीय परंपरेत अनेक सणवार असले तरी त्याचा हेतू सगळ्यांनी एकत्र येत गुजगोष्टी करायच्या हा हेतू असतो. दिवाळी असो ख्रिसमस किंवा रमजान ईद प्रत्येक सणाचा खास असा पदार्थ आणि मेन्यू ठरलेला असतो. रमजान सणात तर शेवयाची खीर आणि आवडता शिरखुर्मा सर्वांच्या आवडीचा मेन्यू असतो. काजू, पिस्ता, बदाम, बेदाणे, अक्रोड याचा समावेश असलेली शेवयाची खीर मन तृप्त करते. साजूक तुपातल्या शेवया तर तब्ब्येतीला आवश्यक असतात अशा गोष्टी घरातून आवर्जून ऐकायला मिळतात. त्याबरोबर खेकडा भजी तर पोट भरून खाल्ली जातात. रमझानला नॉनव्हेज पदार्थ असतात; त्यात महत्त्वाचा म्हणजे मटन कबाब. त्याचबरोबर मटण, चिकन दालचा, मटण खिचडा, गोश्त हैदराबादी, कटलेट ते ऑम्लेटपर्यंतचे पदार्थ येतात. दम बिर्याणी, मटण केशर बिर्याणी असे बिर्याणीचे प्रकारही असतात. मटण दालचा हा सर्वसामान्यपणे प्रत्येक घरी बनत असतो. मटण कबाब हा त्यातीलच एक जिभेला आस्वाद देणारा पदार्थ असतो.

मटण कबाब

घरातील ४ ते ५ लोकांसाठी

साहित्य

५०० ग्रॅम मटन खिमा, २०० ग्रॅम फुटाणा डाळ, एक मोठा कांदा, ४ मोठी वेलची, ६ काळी मिरी, लसून पाकळ्या

१६, एक छोटा चमचा जीरा, थोडी दालचिनी, अंदाजे बारीक चिरलेली हिरवी मिरची( आवश्यकतेनुसार), बारीक चिरलेला कांदा व आलं, कोथिंबीर व मीठ गरजेनुसार व खाद्यतेल.

कृती

खिमा स्वच्छ धुवून त्यात तीन कप पाणी घालावे व तो वाफवून घ्यावा. नंतर पाणी काढून त्यात फुटाणे डाळ, लसून, कांदा टाकून दहा मिनिटे बारीक गॅसवर शिजू द्या. त्यानंतर दालचिनी, वेलची, जिरे काळी मिरी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथंबीर, कांदा, आले चवीपुरतेव मीठ एकत्र करून घट्ट मळून घ्यावे. या मिश्रणाचे छोटे- छोटे गोळे हातावर घेऊन गरज वाटल्यास थोडेसे तेल हातावर घेऊन चपटे गोळे करा. त्यानंतर त्याला गरम तेलात मध्यम गॅसवर खरपूस तळावे. तयार झालेल्या मटण कबाब सोबतपुदिना चटणीही घेऊ शकता त्यामुळे लज्जत वाढते. तसेच ब्रेडबरोबर घेतल्यास त्याचा आस्वाद वाढतो.

लझीना तुरुप, सोमवार पेठ कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images