Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टॉकटाईम- रक्तदाब दिन

$
0
0

आरोग्याबाबत सजग राहा, रक्तदाब टाळा

०००००

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांतील संख्येत अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पूर्वी पन्नाशीनंतर आढळणारा हा विकार आता पंचविशीत आला आहे. तरुण पिढीतील रक्तदाबाचे प्रमाण लक्षणीयरीत्या असून, त्याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. आज जागतिक रक्तदाब दिन. यानिमित्त (वर्ल्ड हायपरटेन्शन डे) डॉ. प्रल्हाद केळवकर यांच्याशी सचिन पाटील यांनी साधलेला संवाद.

००००

कोणत्या वयोगटात रक्तदाबाचे प्रमाण अधिक आहे?

पूर्वी रक्तदाब पन्नाशीनंतर जाणवायचा, पण आता बदलत्या जीवनशैलीमुळे १९ वर्षांच्या तरुणांतसुद्धा तो आढळतो. अनेकदा आपल्याला ब्लडप्रेशरची समस्या आहे याची जाणीवही कित्येकांना नसते. उच्च रक्तदाबात जाणवणारी लक्षणे इतर रोगांसारखी आढळल्याने त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. गेल्या १० वर्षांत रक्तदाबातील वयाचा आलेख खाली घसरतो आहे. अगदी तिशीच्या आतील रुग्णांची संख्या मोठी आहे. काही तरुण या वयात मला कसा काय रक्तदाब? असा प्रश्न उपस्थित करतात, पण आता ही वस्तुस्थिती बनली आहे आणि ती स्वीकारून पुढे जाणे गरजेचे आहे.

तरुणांमध्ये रक्तदाब वाढण्यामागील कारणे काय आहेत?

सध्याचे युग स्पर्धात्मक आहे. प्रत्येकाला प्रचंड यश, पैसा, प्रसिद्धी मिळवायची आहे. यासाठी आजची पिढी धडपडताना दिसते. अपेक्षापूर्ती झाली नाही किंवा नोकरीतील टार्गेट्स पूर्ण झाले नाही की मग त्यातून ताणतणाव जन्म घेतो. हायपरटेन्शनसाठी कारणीभूत असणाऱ्या इतर घटकांत मिठाचे उच्च प्रमाण, अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन, स्थूलता, शरीराला हालचाली नसणे, कॉलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण, आहारातील अनियमितता, जंक आणि फास्टफूडचे अवाजवी आकर्षण आणि चायनीजसारख्या पदार्थांचे सेवन यामुळे या आजाराच्या रुग्णांत वाढ होत आहे. रक्तदाबाला अनुवंशिकता हेही एक महत्त्वाचे कारण आहे.

रक्तदाबाचा शरीरावर काय परिणाम होतो ?

रक्तदाब शरीरातील महत्त्वाच्या अवयवांची हानी करतो. त्याचा हृदयावर मोठा परिणाम होतो. याशिवाय मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार होणे, पक्षाघाताचा झटका येणे असे धोके संभवतात. हृदयाचा आकार वाढतो, त्याबरोबर डोळ्यांवरही दीर्घकाळ परिणाम जाणवतो. अतिउच्च रक्तदाबामुळे किडनीवर परिणाम होऊन युरिनची मात्रा कमी झाल्याने किडनी निकामी होण्याचे प्रकार घडतात. मेंदूत रक्तस्राव होऊन लकवा मारणे असे प्रकार घडतात.

रक्तदाबावर मात करण्यासाठी काय काळजी घ्यावी तसेच कोणत्या उपाययोजना कराव्यात?

रक्तदाब टाळण्यासाठी किंवा निदान झाल्यानंतर आपल्या रोजच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करणे गरजचे असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वजन बीएमआयप्रमाणे असावे. वजन जास्त असेल तर ते कमी कमी करणे गरजेचे आहे. तसेच धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्चरक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. तंबाखूजन्य पदार्थांत 'निकोटिन' व 'कार्बन मोनॉक्साइड' ही विषारी द्रव्ये असतात, यामुळे रक्तवाहिन्या कठीण होण्याचा संभव असतो. यासाठी अशा पदार्थांचे सेवन प्रयत्नपूर्वक टाळावे. तसेच मद्यपान करणाऱ्यांतही उच्च रक्तदाब आढळतो. आहारात जाणीवपूर्वक मिठाचा अतिरेक टाळावा. योगसाधना, ध्यानधारणा, सकारात्मक विचार करावेत. आजकाल तरुणांनी वजने उचलल्याने ब्लडप्रेशर वाढल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे व्यायामाचा अतिरेक टाळल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येणे शक्य आहे.

जागतिक रक्तदाब दिनानिमित्त तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल?

ब्लडप्रेशरपासून स्वत:ला वाचविण्यासाठी तरुणांनी आपल्या आरोग्याबाबत सजग आणि जागरूक राहणे गरजेचे आहे. नियमित ध्यान, व्यायाम, सकस आहार आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याविषयी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. प्रत्येकाने वेळेचे व्यवस्थापन योग्यरीत्या केल्यास ताणतणावाची तीव्रता कमी करणे शक्य आहे. यश मिळवण्यासाठी धडपडताना कष्टाबरोबर क्षमतेकडे लक्ष द्यावे, त्यामुळे अनावश्यक येणारे मानसिक दडपण टाळता येईल. आयुष्य सुंदर करायचे झाल्यास आरोग्यही सुंदर राहणे गरजेचे आहे.

सचिन पाटील

फोटो टाकला आहे

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरकेनगरात चेन स्चॅचिंग

$
0
0

आर.के. नगर

परिसरात चेन स्नॅचिंग

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर.के. नगर येथे सहजीवन सोसायटीत संध्याकाळी सहाच्या सुमारास चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि चेन असा ३६ हजार रुपयांचा ऐवज हिसडा मारून लांबवला. याबाबत कुसुम विठ्ठल साळवी (वय ७१, रा. द्वारकानगर, पाचगाव) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. साळवी या दुपारी आर.के. नगर परिसरातील सहजीवन सोसायटीत भजनासाठी गेल्या होत्या. भजन संपल्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास त्या घरी परत निघाल्या. यावेळी सहजीवन सोसायटीत वाटेत समोरून दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी पाठीमागे बसलेल्या तरुणाने साळवी यांच्या गळ्यातील सोन्याचे १० ग्रॅमचे मंगळसूत्र आणि आठ ग्रॅमची सोन्याची चेन हिसडा मारून लांबवली. या घटनेनंतर साळवी यांनी आरडाओरडा केला, मात्र चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिरूपतीला रोज विमानसेवा

$
0
0

शुभवार्ता ... लोगो

फाइल फोटो

............

तिरूपतीला कोल्हापूरातून रोज विमानसेवा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई कोल्हापूर विमानसेवा सुरळित झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यापासून कोल्हापुरातून रोज तिरूपतीला विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेतंर्गत ही सेवा सुरू होणार असल्याने भाविकांना कमी खर्चात प्रवासाची संधी मिळणार आहे. तिरूपतीला जाणाऱ्या आणि तेथून कोल्हापूरच्या अंबाबाईला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरातून मुंबईला विमानसेवा सुरू होण्यासाठी सहा वर्षे प्रयत्न सुरू होते. त्याला यश आले आणि ही विमानसेवा सुरू झाली. गेले महिनाभर ही सेवा अतिशय सुरळित सुरू आहे. यामुळे पुढचा टप्पा म्हणून वीस जूनपासून कोल्हापूर विमानतळावरून आणखी तीन ठिकाणी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामध्ये तिरूपती, बंगळुरू व हैद्राबाद या तीन शहरांचा समावेश आहे. मुंबईला आठवड्यातून तीनवेळाच विमानसेवा आहे. पण या तीन शहरांना रोज विमानसेवा असल्याने प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.

इंडिगो, अलायन्स एअर या विमानकंपन्या ही सेवा देणार आहेत. तिरूपतीला २७९९ , बंगळूरू २५७० तर हैद्राबादला २०९९ रूपये याप्रमाणे तिकीट आकारण्यात येणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसात तिकीट बुकींग सुरू होण्याची शक्यता आहे. तिरूपतीला गेलेले बहुतांशी भाविक अलिकडे कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी येत आहेत. यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळणार असल्यानेच ही सेवा आठवड्यातून सात दिवस सुरू ठेवण्यात येणार आहे.

हैद्राबाद, मुंबई व बंगळुरू या तीन प्रमुख शहरांना कोल्हापूर विमानसेवा सुरू होणार असल्याने कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. ७० आसन क्षमता असणारे विमान या सेवेसाठी वापरण्यात येणार असल्याचे विमान कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. यामुळे हे विमान १८ आसन क्षमतेचे असणार की ७० आसन क्षमतेचे याबाबत उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोंद्रेनगरात चोरट्यांची दहशत

$
0
0

बोंद्रेनगरात बुलेटसह

दोन लाखांचा ऐवज लंपास

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

बोंद्रेनगर येथे बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व दारात उभी केलेली बुलेट असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याच परिसरात चोरट्यांनी आणखी एक घरफोडी केली, मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. याबाबत सूरज चंद्रकांत नाझरे (वय ३२, रा. बोंद्रेनगर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. एकाच रात्रीत दोन ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमु‌ळे बोंद्रेनगर परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटिंगचे काम करणारे सूरज चंद्रकांत नाझरे हे बोंद्रेनगर शेवट बसस्टॉप येथील घरात आई, वडील पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. मुलांना सुटी असल्याने नाझरे हे ९ मेपासून पत्नी आणि मुलांसह बाहेरगावी गेले होते, तर आई-वडील चंद्रे (ता. करवीर) येथे मुलीकडे गेले आहेत. बुधवारी सकाळी शेजारी राहणारे आशिष देसाई यांना नाझरे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. नाझरे कुटुंबीय परत आले असतील, असे समजून देसाई यांनी हाक मारली, मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. देसाई यांनी गेटच्या आत जाऊन पाहिले असता, नाझरे यांच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटल्याचे दिसले. चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी तातडीने सूरज नाझरे यांच्या मोबाइलवर संपर्क करून घटनेची माहिती दिली.

सूरज नाझरे दुपारी कोल्हापुरात पोहोचले. घरात प्रवेश केला असता, चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांमधील साहित्य विस्कटल्याचे दिसले. कपाट उचकटून त्यातील ३० हजारांची रोकड आणि सोन्याची अंगठी, चांदीची गणपतीची मूर्ती असा मुद्देमाल लंपास केला होता. चोरट्यांनी वरच्या खोलीतील बुलेटची किल्ली घेऊन बुलेटसह पोबारा केल्याचे लक्षात आले. त्यांनी चार महिन्यांपूर्वीच नवीन बुलेटची खरेदी केली होती. देसाई यांनी मोबाइलवरून जुना राजवाजडा पोलिसांना घटनेची मोहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, याच परिसरातील मधुकर पांडुरंग पाटील यांच्या घरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, पाटील कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. मधुकर पाटील सैन्यदलात कार्यरत आहेत. बोंद्रे नगरात त्यांची पत्नी मुलांसह राहते. चार दिवसांपूर्वी त्या मुलासह माहेरी गेल्या होत्या. जाताना त्यांनी आपले सर्व दागिने सोबत नेल्याने किंमती ऐवज चोरट्यांच्या हाती लागला नाही. बुधवारी सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र संचालकांच्या जागी दोन स्वीकृत संचालक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भूविकास बँकेचे थकबाकीदार असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी शेतकरी सहकारी संघाच्या एम. एम. पाटील व मानसिंग पाटील या दोघांचे संचालकपद अपात्र ठरवले होते. अपात्र ठरल्यापासून रिक्त असलेल्या संचालकपदावर स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती करण्याचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला. ठरावानुसार एम. एम. पाटील यांच्या स्नुषा सुरेखा रणजित पाटील, तर मानसिंग पाटील यांच्या पत्नी अपर्णा पाटील यांची नियुक्ती केली आहे. मात्र, स्वीकृत संचालक घेताना सहकार निवडणूक प्राधिकरणाची परवानगी घेतली नसल्याने या नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय बँकेचे (भूविकास) थकीत कर्जदार असल्याने संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्यासह एम. एम. पाटील व मानसिंग पाटील यांचे संचालकपद अपात्र ठरविण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. जिल्हा उपनिबंधकांनी दोन्ही संचालकांना अपात्र ठरवले होते. अपात्रतेच्या कारवाईनंतर दोन्ही संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दोन्ही संचालकांच्या राजीनाम्यासह संचालक दिलीप पाटील यांच्या निधनामुळे संघाच्या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी अपात्र संचालकांच्या जागांवर स्वीकृत संचालक घेण्याचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला, पण दिलीप पाटील यांची जागा रिक्त ठेवण्यात आली आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार एम. एम. पाटील (दिघवडे) यांच्याऐवजी त्यांच्या स्नुषा सुरेखा पाटील, तर मानसिंग पाटील (कसबा तारळे) यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी अपर्णा पाटील यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ही दोन नावे नियुक्तीनंतर सहकार विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. पण स्वीकृत संचालक नियुक्तीसाठी सहकार कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही. तसेच नियुक्तीपूर्वी सहकार निवडणूक प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. प्राधिकरणाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील स्वीकृत संचालकांची नियुक्ती होते. पण अशी कोणतीही प्रक्रिया स्वीकृत संचालक नियुक्तीवेळी पार पाडली गेली नसल्याने या नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. याबाबत संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्याशी दिवसभर संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन्य प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी नाकाबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वन्य प्राण्यांची शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी वनविभागासह पोलिस एकत्रित प्रयत्न करणार आहेत. आंबा, तिलारी आणि पाटगाव परिसरात संयुक्त गस्तीसह नाकाबंदीही केली जाणार आहे. याशिवाय वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आंबा ते विशाळगड या मार्गावरील रात्रीची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पोलिस अधीक्षक कार्यालयात बुधवारी पोलिस व वन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी २०१६ मध्ये व्याघ्र कक्ष समितीची स्थापना झाली आहे. जिल्हा, परिक्षेत्र आणि राज्य पातळीवरील या समित्यांच्या माध्यमातून वन्य जिवांच्या सुरक्षेसह अवैध शिकार आणि तस्करी रोखण्याचे काम केले जाते. बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी अधीक्षक संजय मोहिते, अपर अधीक्षक तिरूपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते, उपवन संरक्षक प्रभुनाथ शुक्ल यांच्यासह अनिल पाटील, रमण कुलकर्णी, आदी उपस्थित होते. बैठकीतील माहिती देताना अधीक्षक मोहिते म्हणाले, 'जिल्ह्यात हत्ती व गव्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. वन्य प्राणी व माणसांमध्ये संघर्ष वाढू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आंबा ते विशाळगड या मार्गावर घनदाट जंगल असल्याने रात्रीच्या वेळी सरपटणारे प्राणी रस्त्यावर येतात. अनेक जंगली प्राण्यांचाही रस्त्यावर वावर वाढतो. अशा वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी आंबा ते विशाळगड मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. यामुळे चोरटी शिकार रोखण्यासही मदत होईल. आंबा, तिलारी आणि पाटगाव परिसरात चोरट्या शिकारींच्या घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी वन विभाग आणि पोलिसांकडून संयुक्त गस्त घालण्यासह नाकाबंदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.'

वन विभागातील अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या समन्वयासाठी लवकरच संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. जंगलात कार्यरत असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्य प्राण्यांची अवैध शिकार होत असल्यास नागरिकांनी स्थानिक पोलिसांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून पंचगंगा प्रदूषणमुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रदूषणाचा हा विळखा दूर करण्यासाठी सामाजिक संस्था, लोकसहभाग आणि प्रबोधनाच्या माध्यमातून पंचगंगा प्रदूषणमुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी प्रयाग चिखली ते नृसिंहवाडीपर्यंत गंगा आणि नर्मदा नदीच्या धर्तीवर 'नमामी पंचगंगे' उपक्रम हाती घेतला आहे. गुरुवारी (ता. २४) पंचगंगा घाटावर सार्यास्तानंतर आरती करुन या उपक्रमाची सुरुवात होणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार बैठकीत दिली.

आमदार महाडिक म्हणाले, 'गेल्या काही दिवसांत पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांना व्यापक स्वरुप देवून नियोजनबद्ध उपक्रम राबवला गेल्यास प्रदूषण आटोक्यात येईल. ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ज्ञ प्रा. मधुकर बाचुळकर, उमाकांत राणिंगा, अॅड. प्रसन्न मालेकर आदींचा यामध्ये सहभाग असून गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या अभ्यासातून ही संकल्पना अस्तित्वात येत आहे.'

नदी काठावर अनेक पुण्यक्षेत्रे वसली आहेत. उपक्रमातून या क्षेत्रांच्या दर्शनाबरोबर इतिहास व सहवास जाणून घेता येईल. नदीच्या उगम ते संगमापर्यंत अनेक महत्त्वाची क्षेत्रे असून त्याचा अभ्यास करता येणार आहे. नदी जीवनदायी असल्याने नदीकाठावरील गावातील नागरिकांचे प्रबोधन करण्यात येईल. यासाठी धार्मिक व सामाजिक जाणिवेतून कार्यरत असणाऱ्या संस्थांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. पूजा, परंपरा, परिक्रमा, पर्यावरण व पर्यटन या पाच विचारप्रवाहांच्या माध्यमातून पंचगंगेला नवसंजीवनी मिळेल. उपक्रमासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात येणार असून सरकार व लोकसहभागातून निधी उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाला २४ मेपासून सुरुवात होईल, असे आमदार महाडिक यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, उमाकांत राणिंगा, अॅड. प्रसन्न मालेकर, शशी कुंभोजकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवारपासून रोजे

$
0
0

रमजान रोजे उद्यापासून

कोल्हापूर

मुंबई , बंगळूरू, लखनौ, दिल्ली, देवबंद, रत्नागिरी या ठिकाणाहून चंद्रदर्शनाची साक्ष न मिळाल्याने शुक्रवारी (ता.१८) रमजान रोजे सुरु होत असल्याचा निर्णय उलमा कमिटीचे अध्यक्ष मन्सूर आलम कासमी यांनी बैठकीत जाहीर केला. मुस्लीम बोर्डिंग कार्यालयात हिलाल कमिटीची(चांद कमिटी) बैठक पार पडली. बैठकीस नाझिम पठाण, वशिर नायकवडी, मुफ्ती ताहीर बागवान, राहमतुल्ला कोकणे, आमीन अथणीकर, अब्दुल राझिक, इरफान कासमी, अब्दुल रऊफ, अब्दुलसलाम कासमी, वाहिद सिद्दिकी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फसवणुकीतील दोघांना अटक

$
0
0

'झीप कॉईन' फसवणूक

प्रकरणातील दोघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

झीप कॉईनच्या माध्यमातून दर महिन्याला १५ टक्के लाभांश देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील माय-लेकास पोलिसांनी अटक केली. पद्मा राजेंद्र नेर्लेकर (वय ३६) आणि बालाजी राजेंद्र नेर्लेकर (१९, दोघेही रा. हुपरी, ता. हातकणंगले) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. कोर्टात हजर केले असता दोघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली.

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपअधीक्षक राजेंद्र शेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, झीप कॉईन फसवणुकीतील चौघांना पंधरा दिवसांपूर्वी अटक केली होती. या गुन्ह्यातील दोघे पसार होते. पोलिसांनी संशयितांच्या अटकेसाठी हुपरीसह त्यांच्या नातेवाइकांच्या घरांवर शॅडो वॉच ठेवला होता. मंगळवारी संध्याकाळी संशयित माय-लेक पद्मा नेर्लेकर आणि बालाजी नेर्लेकर हे दोघे कोल्हापुरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून नेर्लेकर माय-लेकास अटक केली. कोर्टात हजर केले असता दोघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली. झीप कॉईन या क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीत या दोघांचाही सहभाग असल्याने त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार राजेंद्र नेर्लेकर, अनिल नेर्लेकर यांच्यासह संजय कुंभार आणि पुण्यातील बालाजी गणगे या चौघांना यापूर्वीच अटक झाली आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. झीप कॉईनमधून फसवणूक झाल्याच्या १५ तक्रारी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दाखल झाल्या आहेत. याची व्याप्ती वाढण्याची शक्यता तपास अधिकारी राजेंद्र शेडे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शामकुमार चव्हाण यांना पीएचडी

$
0
0

शामकुमार चव्हाण यांना पीएचडी

photo 15 may sbchavan

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभागातील सहायक प्राध्यापक शामकुमार भीमराव चव्हाण यांना शिवाजी विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगमधील पीएचडी जाहीर झाली. 'फॉल्ट डायग्नोस्टिक्स टॉलरन्ट टेक्निक्स फॉर फुल ब्रिज डी.सी. कॉन्व्हर्टर्स अप्लाइड टू फोटोवोल्टिक अॅप्लिकेशन्स' या विषयावरील प्रबंध सादर केला होता. त्यांनी त्यांच्या संशोधनावर दोन पेटंट्सची नोंदणी भारतीय पेटंट कार्यालयात केली आहे. पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान परिषदेत सर्वोत्कृष्ट शोधनिबंधासाठी सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक गौरवण्यात आले. त्यांना केआयटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील डॉ. महेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. जे. एस. बागी, माजी संचालक डॉ. जी. एस. कुलकर्णी, आदींचे प्रोत्साहन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमा चळवळीला धक्का - आवाज

$
0
0

आवाज

....................

मए समितीमधील बेकीमुळे

सीमा चळवळीला धक्का

सीमा भागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी पाच दशकाहून अधिक काळ धडपडत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे. एकीकरण समिती अभेद्य राहावी, अशी मराठी भाषिकांची तीव्र इच्छा आहे. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत समितीचेच उमेदवार एकमेकांविरोधात लढले. मराठी विरूध्द मराठी असे चित्र निर्माण झाले. परिणामी गेल्यावेळी निवडून आलेल्या दोन जागाही गमवाव्या लागल्या. समितीमधील बेकीमुळे सीमा चळवळीला धक्का पोहचला, अशा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

-----------------------

फूट टाळायला हवी होती

कारवार, बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होण्याचे स्वप्न पाहण्यासाठी एकीकरण समिती सीमाप्रश्नाचा पाठपुरावा करीत आहे. कर्नाटक सरकारची दडपशाही झुगारून सीमा चळवळीत मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी होत आहेत. यामुळेच दीर्घकाळ चळवळ सुरू आहे. त्याला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य होऊ नये, अशी मराठी भाषिकांची इच्छा आहे. लोकभावनेचा विचार करून एकीकरण समितीच्या नेत्यांनी फूट टाळायला हवी होती. समितीत एकी राहिली असती तर कर्नाटक विधानसभेत मराठी भाषिकास नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती.

सूर्यकांत बच्चे, नोकरदार

--------------------

मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे

सीमाप्रश्नाच्या चळवळीला ताकद मिळण्यासाठी आमदार निवडून येणे आवश्यक होते. गेल्यावेळी एकी राहिल्याने खानापूर, बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात समितीचे आमदार होते. यामुळे चळवळीला बळकटी आली होती. यावेळी सीमाभागात चांगले वातावरण होते. समितीमधील नेत्यांनी आपआपसातील मतभेद बाजूला ठेवून सीमा चळवळीसाठी एकत्र येणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. एका गटाने बंडखोरी केली. यामुळे मध्यवर्ती एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव झाला.

बाळगोंडा पाटील, प्रगतशील शेतकरी

--------------------

सीमालढ्याला बळ द्या

सीमा भागातील मराठी भाषिकांवर संधी मिळेल त्यावेळी कर्नाटक सरकारने अन्याय केला. कन्नड सक्ती लादली. आता समितीचे आमदार नसल्याने सीमाभागात कर्नाटक सरकारचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या घडामोडी विसरून पुन्हा एकदा समितीमधील नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सीमालढ्याला बळ देण्यासाठी मतभेद बाजू ठेवून सक्रिय झाल्यास मराठी भाषिकांची ताकद वाढणार आहे. मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करणे सोपे होणार आहे.

अजय हारूगले, व्यावसायिक

-------------------

मतभेद,महत्वकांक्षा बाजूला ठेवा

शिवसेना अनेक वर्षापासून सीमाभागाच्या पाठिशी आहे. या निवडणुकीतही शिवसेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे समितीने आपल्यातील मतभेद व महत्वकांक्षा बाजूला ठेवून एकी कायम ठेवणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. फूट पडल्याने मराठी भाषिक मतांची विभागणी झाली. त्याचा फायदा राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना झाला. यापुढील काळात समितीने एकसंघ राहून सीमालढ्याच्या चळवळीला गती देणे गरजेचे आहे.

अभिजित बुकशेट, व्यावसायिक

----------------------------------------

बंडखोरांनी आत्मचिंतन करावे

भौगोलिक संलगता आणि भाषेमुळे सीमाभागातील मराठी भाषिक कर्नाटकच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रात येण्यासाठी आतुर झाले आहेत. पदमोड करून चळवळीत सक्रिय आहेत. यामुळे सीमाभागातील सर्वसामान्य लोकांना एकीकरण समिती एकत्र राहवी, असे वाटते. मात्र काही अतिमहत्वाकांक्षी लोकांमुळे दुही माजली. एकी राहिली असती तर सीमाभागात तीन आमदार निवडून आले असते. यापुढील काळात बंडखोरी केलेल्यांनी आत्मचिंतन करावे़

सुप्रिया पाटील, गृहीणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर बनतेय रक्तदाबाची राजधानी

$
0
0

sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

यांत्रिकीकरणाने जगण्याची गती वाढली, काळाबरोबर अपडेट राहण्याच्या प्रयत्नात तरुणाईच्या जगण्याच्या सवयीही बदलल्या. मात्र नवी आव्हाने पेलण्याबरोबरच स्पर्धेतील अस्तित्व टिकवताना तरुणांना आरोग्याच्या समस्यांचा सामनाही करावा लागत आहे. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या ३९ हजार ८२३ आहे. अर्थात ही आकडेवारी गेल्या वर्षभरातील असली तरी त्यात होणारी वाढ चिंताजनक आहे. विशेष म्हणजे यात तिशीच्या आतील तरुणांची संख्या लक्षणीय आहे. पन्नाशीनंतर जाणवणारा रक्तदाब आता पंचविशीतच गाठू लागला आहे. संपूर्ण जिल्ह्यातच रक्तदाबाने विळखा घट्ट करायला सुरूवात केली आहे.

कामाचे लांबणारे तास, वाढता तणाव, व्यसनाधीनता यांसारख्या जीवनशैलीमुळे तरुण पिढीत उच्च रक्तदाब वाढत आहे. २५ ते २७ वयोगटात हे प्रमाण चिंताजनकरित्या वाढू लागले आहे. सेवाक्षेत्रात वाढलेल्या संधींमुळे शहरातील तरुण त्याकडे आकर्षित झाले. कमी वयात जास्त पैसा मिळवण्याच्या आशेने जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. गलेलठ्ठ पगाराची नोकरी, मोठे घर, गाडी बंगला, परदेशवारी आणि हे सर्व अल्पावधीत मिळायला हवे या अपेक्षेमुळे ताणतणावात वाढ होते. तंत्रज्ञानाच्या अपरिहार्यतेतून संगणकासमोर तासन‌्तास काम, सोशल मीडियाच्या वापराचा अतिरेक आणि जोडली अवास्तव जागरण याचा परिणाम प्रकृतीवर होत आहे. फॅशन म्हणून जडलेले व्यसन, जंक आणि फास्ट फूडचा अतिरेक आहारातील अनियमितता यामुळे मानसिक आरोग्यही बिघडत आहे. त्याचे पर्यवसान रक्तदाबात होत आहे. नोकरी आणि आयुष्यात ठरवलेले टार्गेट्स पूर्ण न करता आल्याने अपेक्षांच्या वाढलेल्या ओझ्यामुळे उच्च रक्तदाब डोके वर काढतो आहे.

नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंध अशा विविध बाबींना सामोरे जाताना निर्माण होणारा तणाव कमी करण्यासाठी वेळ, तणाव आणि नात्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. योग्य आहार, पुरेशी झोप आणि त्याला व्यायामाची जोड दिल्यास उच्च रक्तदाबावर मात करणे सहज शक्य आहे. हायपरटेन्शनवर वेळीच औषधोपचार घेतल्यास नियंत्रण मिळवणे शक्य होते. त्यातून आरोग्याची भविष्यातील गुंतागुंत टाळता येते.

उच्च रक्तदाबाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मानसिक संघर्ष आणि स्वत:शी व वेळेशी चाललेली स्पर्धा तरुणाईच्या आरोग्याला घातक ठरत आहे. सीपीआरकडे नोंद झालेल्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण ३३.२ टक्के आहे आणि यातील तरुणांची संख्या लक्षणीय आहे. सध्या सातारा जिल्हा हायपरटेन्शनच्या बाबतीत आघाडीवर असला तरी कोल्हापूरचे वाढणारे प्रमाणही चिंताजनक आहे. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी समतोल आहार, योगासने, व्यायाम आणि डॉक्टरांची वेळेत मदत घेतली पाहिजे.

डॉ. अक्षय बाफना, हृदयरोग विभाग प्रमुख

सीपीआर हॉस्पिटल

ृृृृृृृृृृृृृृृृृृृ

उच्च रक्तदाब प्रमाण

३५ ते ४० टक्के

शहर

१८ ते २० टक्के

ग्रामीण

१८ ते ३९ वयोगट

२० टक्क्यांपेक्षा अधिक तरुण रक्तदाबाचे शिकार

४० ते ५० वयोगट

मधुमेह असणाऱ्यांना रक्तदाबाचा अधिक धोका

उच्च रक्तदाबात पुरुष आघाडीवर २७.९ टक्के तर महिलांचे प्रमाण २२.८ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा पतआराखडा

$
0
0

· कृषी व संलग्न सेवांसाठी ३९३२ कोटी

वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे प्रकाशन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्याच्या २०१८-१९ साठी नवीन वर्षाचा एकूण अकरा हजार २८२ कोटी रूपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा बनविण्यात आला आहे. यावर्षी कृषी कर्जाचे उद्दिष्ट २३१५ कोटी रूपये असून सर्व बँकांनी मिळून ही उद्दिष्टपूर्ती करावी,' असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.

बँक ऑफ इंडिया या जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने जिल्ह्यासाठी करण्यात आलेल्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, ' जिल्ह्यासाठी यावर्षी करण्यात आलेल्या ११ हजार २८२ कोटीच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये प्राथमिक क्षेत्रासाठी ७६४८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.' गेल्या वर्षीपेक्षा एकूण बारा टक्क्यांनी या पतपुरठा आराखड्यात अग्रणी बँकेमार्फत वाढ करण्यात आली असल्याची माहिती बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने यांनी दिली. नाबार्डने दिलेल्या विशेष सूचनेनुसार आराखड्यात वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिश जगताप,जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे, ,नाबार्डचे कोल्हापूरचे सहाय्यक प्रबंधक नंदू नाईक, कोल्हापूर मध्यवर्ती बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक किशोर कुमार यांच्यासह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायनान्स कंपनीची फसवणूक

$
0
0

फायनान्स कंपनीची फसवणूक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बजाज फायनान्स कंपनीकडील कागदपत्रांचा गैरवापर करून परस्पर त्यांच्या नावावर कर्ज मंजूर करून कंपनीची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कंपनीच्या मॅनेजरने दोघांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सुनील रमेश येंडे (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) आणि प्रवीण उर्फ बबलू हिंदुराव साबळे (संभाजीनगर, कोल्हापूर) या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाज फायनान्स कंपनीचे लक्ष्मीपुरीत कार्यालय आहे. या कार्यालयातील ग्राहकांच्या कागदपत्रांचा वापर करून दोघांनी ग्राहकांच्या नावे कर्जप्रकरणे मंजूर करून घेतली होती. याशिवाय कर्जदारांना दिल्या जाणाऱ्या एलईडी टीव्ही, होम थिएटर, मोबाईल अशा वस्तूही स्वत:च वापरून कंपनीची तीन लाखांची फसवणूक केली. ऑगस्ट २०१७ पासून जानेवारी २०१८ या कालावधीत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीचे कोल्हापुरातील मॅनेजर सुनील कृष्णा पाटील (३२, रा. आडकूर, ता. चंदगड) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानुसार पोलिसांनी सुनील येंडे आणि प्रवीण उर्फ बबलू साबळे या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वृत्त

$
0
0

फोटो आहे.

निधन

प्रकाश गवस

कोल्हापूर

युको बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश शांताराम गवस यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी सकाळी आहे.

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२७२ पोलिसांच्या प्रशासकीय बदल्या

$
0
0

२७२ पोलिसांच्या प्रशासकीय बदल्या

विनंती बदल्यांचेही आठवड्यात आदेश, १७ पोलिसांना मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस दलात एकाच ठिकाणी पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या २७२ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री अधीक्षक संजय मोहिते यांनी जारी केले. यामध्ये सहायक फौजदार, हवालदार, नाईक आणि कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. विनंती बदल्यांचीही प्रक्रिया सुरू असून, आठवड्यात विनंती बदल्यांचे आदेश निघणार आहेत. दरम्यान, प्रशासकीय बदल्यांमध्ये १७ पोलिसांना आहे त्याच ठिकाणी एका वर्षाची मुदतवाढ मिळाली.

पोलिस दलात सध्या बदल्यांची धांदल सुरू आहे. एकाच पोलिस ठाण्यात पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या २७२ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी अधीक्षकांनी जारी केले. यात २९ सहायक फौजदार, ८५ हवालदार, ८० पोलिस नाईक आणि ७८ पोलिस कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. बदल्यांबाबत आठवडाभर पोलिस दलात प्रचंड उत्सुकता होती. सोयीची पोलिस ठाणी मिळवण्यासाठी अनेकांकडून फिल्डिंगही लावली जात होती. मात्र, पोलिस दलातील सेवा, उर्वरित कार्यकाल आणि रिकाम्या जागा यानुसार अधीक्षकांनी बदल्यांचे आदेश काढले. बहुतांश पोलिसांना पसंतीक्रमानुसार पोलिस ठाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. यातूनही काही पोलिसांना त्यांनी दिलेल्या पसंतीशिवाय अन्य पोलिस ठाण्यात जावे लागले.

'आठवड्याभरात विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होईल. विनंती बदल्यांसाठी ३३२ अर्ज आले आहेत. विनंती अर्ज केलेल्या पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी व्हिडिओ कॉलिंगचा आधार घेतला जात आहे. ३३२ पोलिसांना मुख्यालयात बोलवून कामाचा खोळंबा करीत वेळ घालवण्यापेक्षा व्हिडिओ कॉलवर त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू आहे. अजून आठवडाभर ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. यानंतर विनंती बदल्यांचे आदेश जारी केले जातील', अशी माहिती अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

.............

चौकट

गॅझेटचे काम महिलांच्या हाती

बदली प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी अधीक्षक मोहिते यांनी आस्थापना विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांना हटवले आहे. या विभागाचा कारभार महिला अधिकाऱ्यांच्या हाती सोपवला असून, यंदा पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांनी संपूर्ण गॅझेट तयार केले. प्रमुख लिपिक पुष्पलता कदम, लिपिक उज्ज्वला यादव, लिपिक उत्तम झेंडे, बाबूराव पाटील, उज्ज्वला जाधव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी गॅझेट तयार केले. पोलिस दलात पहिल्यांदाच ही जबाबदारी महिलांना मिळाली आणि त्यांनी ती पारदर्शकपणे पार पाडल्याचा दावा केला आहे.

..........

चौकट

विमानतळ आवडीचे, तर शाहूपुरी नावडीचे

कामाचा ताण कमी असलेली ठाणी मिळवण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू असते. प्रशासकीय बदल्यांसह विनंती बदल्यांमध्ये बहुतांश पोलिसांनी विमानतळ पोलिस चौकीसाठी प्राधान्य दिले. याशिवाय शहराच्या आसपास असलेले गांधीनगर, गोकुळ शिरगाव, शिरोली एमआयडीसी ही पोलिस ठाणीही आवडीची ठरली आहेत. नावडीच्या पोलिस ठाण्यात शाहूपुरी आघाडीवर आहे. बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने, व्हीआयपी दौरे यामुळे शाहूपुरी पोलिस ठाण्यात काम करण्यास पोलिस उत्सुक नाहीत.

..............

चौकट -

प्रशासकीय बदल्या - २७२

सहायक उपनिरीक्षक - २९

हवालदार - ८५

पोलिस नाईक - ८०

कॉन्स्टेबल - ७८

विनंती बदल्या - ३३२

सहायक उपनिरीक्षक - ३२

हवालदार - ८६

पोलिस नाईक - ७०

कॉन्स्टेबल - १४४

...........................

कोट

'सोयीनुसार बदलीचे ठिकाण मिळाल्यास काम करण्याचा उत्साह वाढतो. यानुसार बहुतांश पोलिसांना त्यांच्या पसंतीनुसार ठाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी एकाच परिसरात सातत्याने काम केले, त्यांना अन्य पोलिस ठाण्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. पारदर्शकतेमुळे बदली प्रक्रियेत त्रुटी राहण्याची शक्यता फारच कमी आहे. लवकरच बदलीच्या ठिकाणी पोलिस हजर होतील.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा लाखांची लेन्स चोरणारा चोरटा अटकेत

$
0
0

(फोटो आहे)

चित्रपट महामंडळाच्या कर्मचाऱ्यानेच

चोरली दहा लाखांची लेन्स

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भवानी मंडप येथे चित्रीकरण सुरू असताना दहा लाख रुपयांची लेन्स चोरणाऱ्या चोरट्यास जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (ता. १६) अटक केली. सुयोग धोंडिराम माने (वय २४, रा. समता कॉलनी, मोरेवाडी) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. हा चोरटा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे निर्मिती सहायक म्हणून काम करतो.

मुंबईतील सुभाष सकरू काळे हे चित्रपट व्यावसायिक असून, ते चित्रीकरणासाठी लागणारे साहित्य भाड्याने देतात. मुंबईतील एक संस्था कोल्हापुरात 'स्कूल, कॉलेज आणि लाइफ' या चित्रपटाचे शुटिंग करीत आहे. काळे यांनी या संस्थेला कॅमेरे आणि चित्रीकरणाचे साहित्य पुरवले आहे. ७ ते ८ मे दरम्यान भवानी मंडप येथे चित्रीकरण सुरू असताना अज्ञाताने काळे यांच्या साहित्यातील दहा लाखांची कॅमेरा लेन्स लांबवली होती. काळे यांनी याबाबत १२ मे रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून या चोरीचा तपास सुरू होता. चोरीची लेन्स बारामतीहून कोल्हापूरला येणाऱ्या एसटी बसमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार मध्यवर्ती बसस्थानकात संशयित बसची झडती घेतली असता पोलिसांना १३ मे रोजी लेन्स मिळाली. मात्र, चोरटा पळून गेला होता. गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार चिंटू खोत आणि पोलिस नाईक सचिन देसाई यांनी सुयोग माने या संशयिताला अटक करून त्याची अधिक चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. चोरलेली लेन्स विकण्यासाठी तो ग्राहकाच्या शोधात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोप खणीची याचिका फेटाळली

$
0
0

दहा वर्षांपासून सुरु असलेला वाद संपुष्टात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर राहिलेले इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी टोप येथील खणीचा वापर लँडफिल साइट म्हणून केला जाऊ नये, अशी टोप ग्रामपंचायतीची याचिका बुधवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळली. टोप ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आलेले सर्व युक्तीवाद फेटाळत सुप्रीम कोर्टाने महापालिकेला दिलासा दिला. यामुळे टोप येथील खणीबाबत दहा वर्षांपासून सुरु असलेला वाद संपुष्टात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती मदन लोकूर, न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला.

शहरामध्ये निर्माण होत असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर निर्माण होणारे इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने २००८ साली टोप येथील खणीची जागा महापालिकेला दिली होती. ती जागा ताब्यात घेण्यास गेल्यानंतर टोप ग्रामस्थांनी विरोध केला होता. ग्रामस्थांकडून जोरदार विरोध झाल्यानंतर महापालिकेने पुढील कार्यवाही थांबवली होती. त्याच दरम्यान जिल्हा कोर्टामध्ये टोप ग्रामपंचायतीने धाव घेतली. जवळपास तीन वर्षे सुनावणी सुरु होती. त्यामध्ये निर्णय होत नसल्याने २०१४ मध्ये महापालिकेनेच पुणे येथील राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे धाव घेतली होती. टोपचा निकाल लागेपर्यंत शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी टाकाळा येथील खणीमध्ये जवळपास सहा कोटी खर्च करून नवीन लँडफिल साइट विकसित करण्याचे ठरवले होते. ही जागा छोटी असल्याने महापालिकेने टोप खणीसाठी पाठपुरावा चालवला होता. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी टोपमधील खण लँडफिल साइट म्हणून वापरण्यास कोणतीही अडचण नसल्याचा निर्वाळा राष्ट्रीय हरित लवादने दिला होता. टोप ग्रामपंचायतीने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.

टोप ग्रामपंचायतीने सात ऑक्टोबर २०१५ रोजी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. टोप खणीचा वापर लँडफिल साइटसाठी केला जाऊ नये अशी मागणी त्या याचिकेत केली होती. त्यावर सुनावणी झाल्या. बुधवारी न्यायमूर्ती लोकूर व सिन्हा यांच्या खंडपीठाने टोप ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आलेले सर्व युक्तीवाद फेटाळले व ग्रामपंचायतीची याचिका फेटाळल्याचा निर्णयही दिल्याचे सुप्रीम कोर्टातील महापालिकेचे वकील विनय नवरे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' शी बोलताना सांगितले. सध्या टाकाळा येथील खणीमध्ये लँडफिल साइट विकसीत केली आहे. लाइन बाजार येथील प्रक्रिया प्रकल्पावर साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरातील इनर्ट मटेरियल तिथे टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.

.....

कोट

'सध्या टोप खणीचा कागदोपत्री ताबा महापालिकेकडे आहे. राष्ट्रीय हरित लवादाने लँडफिल साइटबाबत महापालिकेच्याबाजूने निकाल देताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटीनुसार त्या साइटचा शास्त्रशुद्ध विकास करावा, असे सांगितले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महापालिकेला या जागेवर लँडफिल साइट विकसीत करण्याची प्रक्रिया राबवता येईल.

विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक

.......

२५ वर्षांची तजवीज

टाकाळा येथे इनर्ट मटेरियल हलवले जाणार आहे. मात्र, ही जागा तीन एकरच्या आसपास आहे. शहरात दररोज २०० टन कचरा निर्माण होत आहे. त्यामुळे या जागेचा वापर फार काळ करता येणार नाही. महापालिकेकडे दुसरे लँडफिल साइट नाही. टोप खणीची जागा मिळाल्यामुळे पुढील २५ वर्षांचा प्रश्न सुटणार आहे.

.....

टोप खणीचे क्षेत्र

१६.५० एकर

...

टाकाळा खणीचे क्षेत्र

तीन एकरच्या आसपास

....

टोपची जागा देण्याचा निर्णय

२००८

.....

सुप्रीम कोर्टात टोप ग्रामपंचायतीचे आव्हान

७ ऑक्टोबर २०१५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉर्पोरेटचे शेतीवर मोठे संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'उत्पादन खर्चाच्या तीन ते चारपटीने शेतीमालाची विक्री करून गल्लेलठ्ठ कमिशन मिळवले जात आहे. कमिशनमधून मिळालेला सर्व पैसा कॉर्पोरेट उद्योगाकडे जात असून, याला सर्वस्वी सरकारचे धोरण कारणीभूत आहे. याच कॉर्पोरेट उद्योगातील नीरव मोदी, विजय मल्ल्या, आदी सर्वाधिक लाभ उठवत आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजुरांचे जगणे मुश्कील झाले आहे. कॉर्पोरेट उद्योगाने निर्माण केलेले कृषीवरील संकट सर्वांत मोठे आहे. हे संकट दूर करण्यासाठी हमीभाव, जमीन सुधारणा, समन्यायी पाणीवाटप धोरण आवश्यक आहे,' असे मत ज्येष्ठ अभ्यासक पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.

संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित 'भारतीय शेतीव्यवस्थेचे अरिष्ट' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनच्या मिनी सभागृहात व्याख्यान झाले. साईनाथ म्हणाले, '२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करत दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सत्तेवर आल्यानंतर मात्र सरकारने २०१५ मध्ये कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करत या अहवालाची अंमलबजावणी केल्यास त्याचा मार्केटवर दूरगामी परिणाम होणार असल्याचे सांगितले. सध्याच्या सरकारला शेतकरी, शेतमजूर यांच्यापेक्षा मार्केटची अधिक काळजी वाटत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.'

इन्कम टॅक्स रेडीरेकनरचा हवाला देत ते म्हणाले, '१९७३ मध्ये एक क्विंटल कापसाची विक्री केल्यानंतर १२ ग्रॅम सोने खरेदी केले जात होते, पण सध्याच्या कापसाच्या दरात एक ते दोन ग्रॅम सोने शेतकरी खरेदी करू शकत नाही. शेतकऱ्यांची एकीकडे दयनीय अवस्था असताना दरवर्षी होणाऱ्या 'फोर्ब्स'च्या यादीत भारतीय अरबपतींची संख्या वाढत आहे. १९९१ मध्ये या यादीत एकही भारतीय नसताना २०१८ मध्ये १३१ कोटी लोकसंख्येपैकी १२१ अरबपतींचा समावेश आहे. सर्व अरबपती कॉर्पोरेट उद्योगाशी संबंधित आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून एकीकडे ठराविकांचे उत्पन्न वाढत असताना देशातील शेतकरी, शेतमजूर अधिक गरीब होत आहे.'

ते पुढे म्हणाले, 'भारताची कृषिप्रधान अशी ओळख असली, तरी प्रत्यक्ष शेती कसणाऱ्या नागरिकांची संख्या ७.८ टक्के आहे. शेतीवर आधारित नागरिकांची संख्या मोठी आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह यावर अवलंबून असणारे सर्वच घटक संकटात आले आहेत. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. मात्र, हे प्रमाण लपवण्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या सर्व संस्था सरकारने बंद करून महसूल विभागाकडे जबाबदारी दिली आहे. आत्महत्या झालेल्या कुटुंबांना मदत मिळू नये यासाठी हा आकडा जाणीवपूर्वक लपवला जात आहे. राष्ट्रीयस्तरावर दोनवेळा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. पण दरवर्षी कॉर्पोरेट उद्योगांना पाच लाख ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. यातून कृषी क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी हमीभाव, जमीन सुधारणा, समन्यायी पाणीवाटप, आदींचा वापर करण्याची आवश्यकता आहे.'

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील, बँक एम्प्लॉइज युनियनचे दिलीप लोखंडे, आनंदराव पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्यांना कारवाईचा झटका

$
0
0

पान ३ मेन

.................

महापालिकेचा लोगो वापरावा....

बड्या अधिकाऱ्यांना कारवाईचा झटका

शहर अभियंता, उपअभियंत्यासह वर्कशॉप अधीक्षकांची वेतनवाढ रोखली

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@appasaheb_MT

कोल्हापूर

दफ्तर दिरंगाई, मुदतीत प्रस्ताव सादर न करणे आणि आयुक्तांच्या परवानगीशिवाय परस्पर टेंडर काढल्यामुळे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांना आयुक्त अभिजित चौधरी यांनी कारवाईचा झटका दिला. शहर अभियंता, उपशहर अभियंता, वर्कशॉप अधीक्षकांसह पाचजणांची वेतनवाढ रोखली. तर प्रॉव्हीडंड फंड विभाग अधीक्षक उमाकांत कांबळे व कनिष्ठ अभियंता बाबूराव दबडे यांची विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. वर्कशॉप प्रमुख रावसाहेब चव्हाण यांच्यावर दंडात्मक पाठोपाठ वेतनवाढ रोखण्याची कारवाई प्रस्तावित केली आहे.

आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या एक ते दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे. यामध्ये शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, राजारामपुरी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता आर.के. जाधव यांचा समावेश आहे. शहर अभियंता सरनोबत यांनी आयुक्तांच्या परवानगीविना परस्पर २५ लाख रुपयांच्या वस्तूच्या खरेदीचे टेंडर काढले. त्या संदर्भात कसलीही माहिती आयुक्त कार्यालयाला कळविली नाही. परस्पर निर्णय घेणाऱ्या शहर अभियंत्याला आयुक्तांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. आर. के. जाधव यांना कब्जेपट्टी प्रकरणी कामात हलगर्जीपणा भोवला.

फुलारी यापूर्वी नगररचना विभागात कार्यरत होते. बांधकाम परवाना फाइलचे काम रखडले म्हणून एका नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी होऊन फुलारी यांची एक वेतनवाढ तीन वर्षे रोखली. महापालिकेतील दोघा अधिकाऱ्यांनी एका पदाधिकाऱ्याच्या प्रभागातील विकासकामाचे दोनदा अंदाजपत्रक तयार केले. या प्रकाराला जबाबदार धरुन एकावर वेतनवाढीची तर दुसऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशीचे आदेश आहेत. वर्कशॉप अधीक्षक रावसाहेब चव्हाण यांना गेल्या वर्षभरात तीन वेळेला पंधरा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई झाली. यापूर्वी ते उपशहर रचनाकार असताना एका फायलीवरुन त्यांच्यावर पुन्हा वेतनवाढ रोखण्याबाबतची कार्यवाही प्रस्तावित आहे. एका डॉक्टराच्या स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावाची मुदतीत कार्यवाही केली नाही म्हणून उमाकांत कांबळे यांची खातेनिहाय चौकशी होणार आहे.

......

आठजणांना बडतर्फीबाबत नोटीस

गेली तीन ते चार वर्षे सातत्याने गैरहजर असलेल्या आठ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ का करु नये अशी नोटीस बजावली. त्यांना म्हणणे सादर करण्याची सात दिवसाची मुदत दिली आहे. यामध्ये मुकादम संजय पाटील, पवडी विभागातील पिंटू भालकर, झाडू कामगार संतोष इंगवले, रंजना सोनूर, अंजना हेगडे, अशोक लांडे, दिपक कांबळे, शिपाई मनोज तोरस्कर यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी झाली असून त्यामध्ये ते दोषी आढळले आहेत.

................

वर्षभरात १०२ कर्मचाऱ्यांवर कारवाई

कामचुकारपणा, सातत्याने गैरहजरीवरुन एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ अखेर या कालावधीत १०२ कर्मचाऱ्यांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई झाली. एक वर्षापासून तीन वर्षापर्यंत या वेतनवाढी रोखल्या आहेत. यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्याशिवाय पवडी, अस्थापना, अग्निशमन विभागातील कर्मचारी आहेत. शिपाई, झाडू कामगार, कनिष्ठ लिपिकांचा समावेश आहे. एक्स रे फिल्म खरेदी विना मंजुरी केली म्हणून तत्कालिन प्रभारी आरोग्य अधिकारी अरुण वाडेकर व कर्मचारी विजय कामिरे यांची वेतनवाढ दोन वर्षे करु नये असे आदेश आहेत.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images