Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कराड जनता बँकेत ठेवीदारांचा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दि कराड जनता सहकारी बँकेत ठेवींची मुदत संपूनही ठेवी परत मिळालेल्या नाहीत. यामुळे संतप्त ठेवीदारांनी मंगळवारी (ता. १५) बँकेच्या माळकर तिकटी येथील कार्यालयात गोंधळ घातला. बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील यांना घेराओ घालत ठेवी परत करण्याची मागणी केली. १५ ऑगस्टपर्यंत ठेवी परत करण्याचे आश्वासन अध्यक्ष पाटील यांनी दिले असून, आश्वासन न पाळल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला.

दि कराड जनता सरकारी बँकेच्या राज्यभरात २९ शाखा आहेत. जवळपास ६० कोटींहून अधिक रकमेची बँकेची मालमत्ता आहे. कर्जाच्या प्रमाणात वसुली होत नसल्याने रिझर्व्ह बँकेन दि कराड जनता बँकेवर निर्बंध घातले आहेत. किमान कर्जांची वसुली केल्याशिवाय ठेवीदारांच्या ठेवी परत न करण्याच्या सूचना असल्याने मुदत संपलेल्या ठेवीदारांच्याही ठेवी अडकल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सहा महिन्यात ठेवी देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची मुदत संपूनही ठेवी परत मिळत नसल्याने संतप्त ठेवीदारांनी मंगळवारी बँकेच्या माळकर तिकटी येथील कार्यालयात गोंधळ घातला. १५ ऑगस्टपर्यंत सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे आश्वासन अध्यक्ष पाटील यांनी दिल्यानंतर ठेवीदार शांत झाले. मुदतीत ठेवी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपचा आत्मविश्वास वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वात अधिक जागा भाजपला मिळाल्या. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसते. पुढील लोकसभा निवडणुकीची झलक आहे. भाजपने बुथ पातळीवर बांधणी केल्यामुळेच चांगले यश मिळाल्याची प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. याउलट विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपचा विजय तांत्रिक आहे. नैतिकदृष्या काँग्रेसचाच विजय आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

दक्षिण भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या कर्नाटक काँग्रेसच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी भाजपने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली. बुथ पातळी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सभा घेत प्रभावीपणे प्रचार केला. त्या तुलनेत काँग्रेस पक्ष मागे राहिला. पाच वर्षात समाजातील तळागाळापर्यंत योजना पोहचवल्या. मात्र काँग्रेसला निवडणुकीत त्याचा फायदा उठवता आला नसल्याचेही निकालावरून स्पष्ट झाले. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यापार्श्वभूमीवर कर्नाटकात भाजपला यश मिळाल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला.

कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विकासाच्या मुद्यावर प्रचार केल्याने तेथे यश मिळाले. भाजपने बुथपातळीवर चांगले नेटवर्क केले होते. त्याचाही फायदा निवडणुकीत झाला. माझ्यावर सौंदत्ती विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्या मतदारसंघात काही दिवस प्रचारासाठी गेलो होतो. तेथे भाजपचे आमदार पुन्हा निवडून आल्याचे समाधान आहे.

संदीप देसाई, अध्यक्ष, महानगर

------

कर्नाटकात प्रत्येक पाच वर्षांनी सत्तातंर होते. त्यानुसार यावेळी काँग्रेस सरकारने चांगले काम करूनही कमी जागा मिळाल्या. लोकशाहीत जनतेचा कौल अंतिम आहे. तो आम्ही मान्य करतो. काँग्रेस आणि जनता दल एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यालाही यश येईल, असे वाटते. असे झाल्यास भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही.

ए. वाय. पाटील, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कर्नाटकात भाजपने केवळ तांत्रिक विजय मिळविला आहे. तेथे नैतिक विजय काँग्रेसचाच आहे. एकूण मतामध्ये काँग्रेसला अधिक टक्के मते मिळाली. त्यावरून मतदारांच्या मनात काँग्रेस घट्ट असल्याचे स्पष्ट होते. तांत्रिकदृष्या पराभव कशामुळे झाला त्याचे आत्मपरीक्षण येत्या काळात होईल. त्यादृष्टीने तेथील नेते पक्षांची बांधणी करतील़

सतेज पाटील, आमदार, काँग्रेस

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमा भागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी अनेक वर्षांपासून धडपडत आहेत. दरम्यान, विधानसभेच्या तोंडावर एकीकरण समितीमध्ये फुट पडली. विस्कळीतपणा आला. मराठी विरुद्ध मराठी अशी लढत झाली. त्याचा फायदा राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना झाला. म. ए. समितीच्या उमेदवारांचा पराभव सीमाप्रश्नाच्या चळवळीला धक्का पोहचणारा ठरला. त्याची अधिक काळजी वाटते.

प्रकाश आबिटकर, आमदार, शिवसेना

कर्नाटकात काँग्रेस, जनता दल पक्ष एकत्र आले असते तर चांगले यश मिळाले असते. भाजपला इतक्या जागा मिळाल्या नसत्या. पाच वर्षे काँग्रेस सत्तेवर असल्याने काही मतदारात नाराजी असते. भाजपने पूर्ण ताकदीनीशी निवडणूक लढवली. यामुळेच काँग्रेसला कमी जागा मिळाल्या. या निकालाचा बोध महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष पक्षांनी घ्यावा असे वाटते.

हसन मुश्रीफ, आमदार, राष्ट्रवादी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवड २४ तारखेला

$
0
0

महापौरपदाची निवडणूक २४ ला

हालचाली गतिमान होणार, असंतुष्ट नगरसेवकांसाठी फिल्डींग

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष ताराराणी आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महापौरपदासाठी येत्या २४ मे रोजी निवडणूक होण्याची शक्यता आहे. येत्या अडीच वर्षासाठी महापौरपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित आहे. ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित महापौरपदाची मुदत १५ मे रोजी संपल्याने महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे महापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम निश्चित करुन मिळावा यासाठी मंगळवारी मार्गदर्शन मागविले.

प्रशासकीय पातळीवर नव्या महापौरपदाच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरु झाली. तर दुसरीकडे राजकीय हालचाली गतिमान झाल्या. सर्वसाधारण महिलासाठी महापौरपद आरक्षित असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील असंतुष्ट नगरसेवकांसाठी फिल्डींग लावली जात आहे. काँग्रेस व भाजप आघाडीला असंतुष्ट नगरसेवकांचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे. आघाड्यांकडून, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सदस्यांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन आहे. भाजप, ताराराणी आघाडीकडून नगरसेविका जयश्री जाधव, सविता भालकर, स्मिता माने, तेजस्विनी इंगवले, भाग्यश्री शेटके यांची नावे महापौरपदाच्या शर्यतीत आहेत.

दरम्यान नव्या महापौरपदाच्या निवडीच्या अनुषंगाने नगरसचिव कार्यालयाकडून मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले. मेलव्दारे विभागीय आयुक्त कार्यालयांना माहिती सादर केली तसेच पत्रही पाठविले. महापौरपदाचा निवडणूक येत्या दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. २१ किंवा २२ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी असणार आहे. तर प्रत्यक्ष महापौरपदाच्या निवडीसाठी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया आहे. सध्याचे सभागृह अस्तित्वात येऊन अडीच वर्षाचा कालावधी झाला. पहिल्या अडीच वर्षासाठी महापौरपदइतर मागासवर्गीय महिलासाठी आरक्षित होते. ओबीसी महिलासाठी आरक्षित महापौरपदाची मुदत १५ मे रोजी संपली. त्यानुसार महापौर स्वाती यवलुजे यांच्या महापौरपदाचा कालावधीही संपला.

........

काँग्रेस, राष्ट्रवादीची २० तारखेला बैठक

महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नगरसेवकांची २० मे रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत नगरसेवकांची मते आजमावून घेतली जातील. सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका शोभा बोद्रे, इंदूमती माने, उमा बनछोडे, निलोफर आजरेकर, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम यांच्या नावाची चर्चा आहे.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवकर पाणंदमध्ये पूर्ववैमनस्यातून तोडफोड

$
0
0

(फोटो आहे)

देवकर पाणंदमध्ये

पूर्ववैमनस्यातून तोडफोड

प्रॉपर्टी कन्सलटन्सीच्या कार्यालयावर फेकल्या बाटल्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक वादातून देवकर पाणंद येथे सलग दुसऱ्या दिवशी तोडफोडीचा प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी प्रॉपर्टी कन्सलटंट सूरज साखरे यांच्या नारायणी प्रॉपर्टी कन्सलटन्सी या कार्यालयावर बिअरच्या रिकाम्या बाटल्या फेकून तोडफोड केली. सलग दुसऱ्या दिवशी परिसरात तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवकर पाणंद येथील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या खरेदी-विक्रीवरून बांधकाम व्यावसायिक धीरज साखळकर आणि प्रॉपर्टी कन्सलटंट सूरज साखरेंसह त्यांचे सासरे राजेंद्र कासेगावकर यांच्यात वाद सुरू आहे. आर्थिक वादातून सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास तीन हल्लेखोरांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमधील पाच वाहनांची तोडफोड केली होती. याबाबत कासेगावकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रविवार पेठेतील तिघांवर गुन्हा दाखल आहे. मंगळवारी दुपारी पुन्हा जलदर्शन कॉलनीतील साखरे यांच्या कार्यालयावर दोघांनी बिअरच्या रिकाम्या बाटल्या फेकून तोडफोड केली. परिसरातील लोक जमा होताच हल्लेखोरांनी पळ काढला. यावेळी कार्यालय बंद असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. साखरे यांनी याबाबतची माहिती जुना राजवाडा पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नाही.

दरम्यान, हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे. सलग दोन दिवस झालेल्या हल्ल्याच्या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. यापूर्वी साखरे याच्यावरदेखील दमदाटी आणि मारहाणीचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे. याबाबत वेळीच दक्षता घेऊन पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघ युवराज पाटील अपात्र प्रकरण

$
0
0

सहकार कायद्यानुसार

कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांचे संचालकपद अपात्र ठरवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी सुनावणीमध्ये तक्रारदारांनी सहकार कायदा '७८' नुसार कारवाई करण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. या अर्जाचे अवलोकन करुन तक्रारदारांना नवीन तारीख देणार असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.

भूविकास बँकेच्या थकीत कर्जाला सहकर्जदार असल्याने संघाचे अध्यक्ष पाटील यांचे संचालकपद अपात्र ठरवण्याची मागणी तक्रारदार सुरेश देसाई यांनी केली होती. तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक व विभागीय निबंधकांनी अपात्र ठरवले होते. विभागीय निबंधकांच्या निकालाविरोधात पाटील यांनी हायकोर्टात धाव घेवून म्हणने मांडण्याची संधी दिली नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर कोर्टाने पुन्हा जिल्हा उपनिबंधकांना सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुनावणी सुरू असतान तक्रारदारांनी सहकार कलम ७३ ऐवजी कलम ७८ नुसार सुनावणी घेण्याची अर्जाद्वारे मागणी केली होती. यावेळी जिल्हा उपनिबंधकांनी अर्जाचे अवलोकन करुन पुढील सुनावणीची तारीख देण्याचे स्पष्ट केले. पाटील यांच्यावतीने मूळ तक्रार अर्जावर पुढील सुनावणी दरम्यान म्हणने मांडण्याची विनंती केली. तक्रारदारांच्यावतीने अॅड. उत्कर्ष साळोखे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार महाडिक यांची शहरात फिरती

$
0
0

फोटो

.....................

अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा

अमल महाडिकांच्या अधिकाऱ्यांना सूचना, शहरात विविध ठिकाणी फिरती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारकडून निधी मिळूनही शहरातील विविध प्रभागातील विकासकामे अपूर्ण स्थितीत का, अशी विचारणा आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे केली. अपूर्ण स्थितीतील कामे तत्काळ पूर्ण करावीत, खराब पाइलाइनची दुरुस्ती कराव्यात अशा सूचनाही केल्या. आयुक्त अभिजित चौधरी, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी यांच्यासह नगरसेवक व अधिकाऱ्यांसोबत शहरातील विविध भागात फिरती केली. याप्रसंगी शहरातील रस्त्यावरील पथदिव्यासाठी आमदार फंडातून निधी देण्याची ग्वाही दिली.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात शहरातील विविध प्रभागांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून शहरातील विकास कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. मात्र अनेक कामे अर्धवट स्थितीत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न गाजत आहे. खराब पाइपलाइनमुळे पाणी गळतीची मोठी समस्या आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महाडिकांनी मंगळवारी विकासकामांचा आढावा घेतला. कळंबा ते फुलेवाडी रिंगरोड, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, बुध्द गार्डन येथील केएमटी वर्कशॉप, रंकाळा तलाव पदपथची पाहणी केली. रंकाळा तलाव पदपथ उद्यानाचे कोल्हापुरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून सुशोभिकरण करण्याच्या सूचना केली.

कळंबा ते फुलेवाडी रिंगरोडवरील पाइपलाइनला गळती आहे. गळतीमुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असून प्रशासनाने तत्काळ गळती काढाव्यात अशा सूचना केल्या. राजोपाध्येनगरातील भाजी मंडईची पाहणी करुन सुविधा जाणून घेतल्या. आवश्यक सुविधासाठी निधी दिला जाईल, असे स्पष्ट केले. बुध्द गार्डन येथील केएमटी वर्कशॉपला भेट देत अडचणी जाणून घेतल्या. वर्कशॉपची सद्यस्थिती, आवश्यक सुधारणा या अनुषंगाने अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. शहरातील विविध मार्गावरील पथदिव्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन पथदिव्यांसाठी आमदार फंडातून निधी देण्याची तयारी आमदार महाडिक यांनी दर्शविली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्य अधिकारी दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, सुहास देशपांडे आदी उपस्थित होते.

..............................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवा बनावटीचे मद्य जप्त

$
0
0

(फोटो आहे)

गोवा बनावटीचे मद्य जप्त

राज्य उत्पादन शुल्कची शिवाजी पेठेत कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शिवाजी पेठेत गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक करणारी ओमनी व्हॅन पकडली. व्हॅनचा चालक फरार झाला असून, पथकाने व्हॅनमधील मद्यासह २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (ता. १५) सकाळी अकराच्या सुमारास करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी गस्त वाढवली आहे. मंगळवारी शहरात एका वाहनातून गोव बनावटीचे मद्य पोहोचणार असल्याची माहिती अधीक्षक पाटील यांना मिळाली होती. यानुसार शिवाजी पेठ परिसरात भरारी पथकाकडून गस्त सुरू होती. सकाळी अकराच्या सुमारास पद्माराजे गार्डनशेजारी रंकाळा रोडवर पथकाला संशयित व्हॅन (एम. एच. ०६ ए.एन. ७८८३) आढळली. पथकाने व्हॅन अडवून तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्या असल्याचे लक्षात आले. दरम्यान, तपासणी सुरू करताच व्हॅनच्या चालकाने पळ काढला. पथकाने व्हॅन जप्त करून उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणली. मद्य आणि व्हॅन असा २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला असून, कारचालकावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक संजय जाधव, अभिनंदन कांबळे, प्रवीण शेलार, इम्रान गडकरी, मुकेश लाडके, गणेश सानप आदींनी ही कारवाई केली. जप्त केलेल्या व्हॅनच्या मालकाचा शोध सुरू आहे. हे मद्य कोणाला पोहोचवले जाणार होते, याची माहिती घेऊन गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारे रॅकेट उद्धवस्त केले जाईल, अशी माहिती अधीक्षक पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएसकेंच्या १२४ मालमत्ता सील, गुंतवणूकदारांना दिलासा

$
0
0

गुंतवणूकदारांची देणी भागवणार

१२४ मालमत्तांसह २७१ बँक खाती सील

४६ वाहने जप्त

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांचे ४०० कोटी रुपये थकवल्याने राज्य सरकारने डीएसके ग्रुपच्या मालमत्ता सील करण्याचे आदेश दिले होते. यानुसार पोलिसांनी पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील १५०० कोटींच्या १२४ मालमत्ता सील केल्या आहेत. याशिवाय २७१ बँक खातीही गोठवली असून, ४६ वाहने जप्त केली आहेत. १५०० कोटी रुपयांची मालमत्ता सील असल्याने याचा लिलाव करून गुंतवणूकदारांची देणी भागवली जातील, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

डीएसके ग्रुपने गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीच्या रकमा वेळेत परत न केल्याने कोल्हापूरसह पुणे आणि मुंबईत गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २०० हून अधिक गुंतवणूकदारांची शंभर कोटींची फसवणूक झाली आहे. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू आहे. दरम्यान, राज्य सरकारने ५ मे रोजी अधिसूचना जारी करून डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या व्यावसायिक ग्रुपच्या सर्व मालमत्ता, बँक खाती सील करण्याचे आदेश दिले होते. यानुसार पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी यांच्या नावे असलेल्या वैयक्तिक आणि त्यांच्या कंपनीच्या मालमत्ता सील केल्या. यात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १२१ मालमत्तांचा समावेश आहे. यासह २७१ बँक खातीदेखील पोलिसांनी सील केली आहेत. ही सर्व मालमत्ता सुमारे १५०० कोटी रुपयांची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सरकारच्या अधिसूचनेमुळे जप्त केलेल्या मालमत्तेचा परस्पर कोणत्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही. गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीपेक्षा चार पट अधिक मालमत्ता जप्त केली आहे. डीएसके ग्रुपने स्वत:हून मालमत्तांची विक्री करून गुंतवणूकदारांची देणी भागवण्याचा सल्ला यापूर्वीच पोलिसांनी दिला होता. खरेदीदारांनी उत्सुकता दाखवली नसल्याने विक्री होऊ शकली नाही, असे कारण डी. एस. कुलकर्णी यांनी सांगितले होते. यापुढे डीएसकेंच्या मालमत्तांचा लिलाव करून गुंतवणूकदारांच्या रकमा देण्याचा पर्याय शिल्लक आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम मिळण्याची शक्यता वाढली आहे.

४६ वाहने जप्त

डीएसके यांच्या पुण्यातील घरासह विविध कार्यालयांमधून पोलिसांनी ४६ वाहने जप्त केली. यात बीएमडब्ल्यू, ऑडी, पोर्शे, लँडक्रूझर, फोर्चुनर, इनोव्हा अशा महागड्या गाड्यांचाही समावेश आहे. हेमंती कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, शिरिष कुलकर्णी, अश्विनी देशपांडे, सुषमा तिखे आणि डीएसके मोटर्सच्या नावे या वाहनांची खरेदी केली आहे.

सील मालमत्ता

मालमत्ता - १२१

बँक खाती - २७१

वाहने - ४६

एकूण जप्त मालमत्ता - १५०० कोटी रुपयांची

गुंतवणूकदारांची थकीत रक्कम - ४०० कोटी

मालमत्तांची ठिकाणे

फुरसुंगी, नावली, पेरणे, बाणेर (पुणे), मालगाव, मिरज (जि. सांगली), महाबळेश्वर आणि रत्नागिरी

या गुन्ह्यातील आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची चौकशी संपल्यानंतर संशयितांचा ताबा घेऊन कोल्हापुरातील तक्रारींबाबत चौकशी केली जाईल. दरम्यान, डीएसके ग्रुपच्या सर्वच मालमत्ता सील झाल्याने त्यांचे परस्पर व्यवहार होणार नाहीत. पुढील तपासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे.
- राजेंद्र शेडे, उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘महानंदा’चा पावडर करण्यास नकार

$
0
0

पान ६ मेन

दूध पावडर फाइल फोटो

.....................

'महानंदा'चा पावडर करण्यास नकार

दूध विभागाच्या नियंत्रकांना परत पाठवले

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

राज्य सरकारने अतिरिक्त दुधापासून सहकारी व खासगी दूध संघांनी पावडर निर्मितीसाठी प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. अपुरे अनुदान व यातून संघाचा तोटा भरुन निघणार नसल्याने बहुतेक संघांनी दूध पावडर तयार करण्यास नकार दिला आहे. राज्यातील दूध संघाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाने (महानंदा) पावडर करण्यास नकार दिला आहे. सरकारच्या निर्णयाची माहिती व दूध पावडर प्लांटला भेटी देण्यास गेलेल्या दुग्ध आयुक्तालयातील नियंत्रक अधिकाऱ्यांना पावडर करण्याचा असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगत परत पाठवून दिले आहे. संघ तोटात जावून पावडर निर्मिती करणार नसल्याने उत्पादकांना जादा दर देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचा यामुळे फज्जा उडण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी झालेल्या शेतकरी संपानंतर दुधाच्या दरात वाढ केली. पण या निर्णयाची अंमलबजावणी जेमतेम काही दिवस केल्यानंतर सहकारी दूध संस्थांनी दूधदर कपातीचा निर्णय घेतला. दर कपातीच्या निर्णयामुळे उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चामध्ये पुन्हा दूध दरवाढीची मागणी केली होती. दरवाढीचे आश्वासनही राज्य सरकारने दिले. आश्वासनाची अंमलबजावणी होत नसल्याने फुकट दूध वाटप करुन उत्पादकांनी आंदोलन केले.

आंदोलनानंतर उत्पादकांना दर देता यावा आणि अतिरिक्त दूध उत्पादनाचा प्रश्न निकालात काढण्यासाठी पावडर निर्मितीसाठी प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. एकूण संकलनाच्या २० टक्के दुधापासून पावडर निर्मितीची सक्ती करताना केवळ एक महिन्यासाठी अनुदान देण्याची घोषणा केली. घोषणेनंतर राज्यातील २७ पावडर प्लांटवर प्रत्येकी दोन नियंत्रक अधिकाऱ्यांची दुग्ध आयुक्तालयाने नेमणूक केली. या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच पावडर तयार होणार असून त्याचा दर आठवड्याला अहवाल तयार करण्यात येणार होता. यासाठी राज्यातील पावडर प्लांटला नियंत्रक भेटी देत असून अनेक ठिकाणी प्लांटची पाहणी करताना दूध पावडर तयार करण्यास इच्छूक नसल्याचे संघाकडून सांगितले जात आहे. अशीच भेट नुकतीच महानंदाच्या प्लांटला नियंत्रकांनी दिली, यावेळी दूध पावडर तयार करण्याचा असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगत परत पाठवून दिले. पावडर तयार करण्यासाठी लिटरमागे दहा रुपयांचा तोटा होत असल्याने तुटपुंज्या अनुदानासाठी पावडर तयार करुन अधिक तोटा करण्याचा मनस्थितीत सहकारी संघ नसल्याचे महानंदाच्या निर्णयावरुन स्पष्ट होत आहे. यामुळे दूध उत्पादकांना अनुदानाच्या माध्यमातून जादा दर देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला हरताळ फासला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

............

चौकट

गोकुळच्या दूध संकलनात घट

सध्या पुष्ट काळ सुरू असल्यामुळे गायीच्या दूध संकलनात एक लाख लिटरने घट झाली आहे. तसेच एक लिटर पावडर तयार करण्यासाठी संघाला दहा रुपये ७० पैसे तोटा होत असून एक हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. त्यामुळे दूध पावडर तयार करुन तोटा होणार आहे. पावडर तयार करण्यासाठी अनुदान देण्याऐवजी शिल्लक पावडरला अनुदान देण्याची आवश्यकता असल्याचे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले.

............

चौकट

राज्यातील दूध संस्थावरील दृष्टीक्षेप

१३,४३५

प्राथमिक संस्था

४६

तालुकास्तरीय दूध संघ

२१

जिल्हा दूध संघ

शिखर संस्था

२७

दूध पावरड प्लांट

....................

कोट

'दूध उत्पादन सध्या जेमतेम सुरू आहे. सरकारने दूध पावडरीसाठी अनुदान जाहीर केलेले असले तरी, पावडर निर्मितीचा अद्याप निर्णय झालेला नाही. दोन दिवसांत बैठक होऊन निर्णय घेतला जाईल.

घन:श्याम मंगळे, कार्यकारी संचालक, महानंदा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ मे रोजीपरिवर्तन यात्रा

$
0
0

कोल्हापूर : येथील बहुजन क्रांती मोर्चातर्फे २५ मे रोजी परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा समन्वयक मनोहर चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. नागपूर येथून २४ एप्रिल रोजी परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे २५ रोजी येणार आहे. भोगावती साळवण, कळे मार्गे यात्रा येईल. दुपारी ३ वाजता पन्हाळा येथे सभा होईल. तेथून कोतोली, वडणगे, कसबा बावडा मार्गे दसरा चौकात यात्रा येईल. तेथे सायंकाळी साडे सहा वाजता जाहीर सभेला प्रारंभ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूविकास’च्या कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्मचाऱ्यांची देय रक्कम परत मिळावी या मागणीसाठी भू विकास बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडाला काळ्या फिती बांधून ठिय्या आंदोलन केले . सोमवारी (ता. १४)ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी 'फाटका संसार' मांडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला होता.

भू विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची देणी देण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण भू विकास बँक ज्येष्ठ कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांची रक्कम परत मिळावी, या मागणीसाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशी तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन केले. आंदोलनस्थळी पालकमंत्री पाटील यांच्या निषेधाचे फलक लावण्यात आले होते. पालकमंत्री पाटील यांनी यापुर्वी कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. भूविकास बँकेच्या मालमत्तेची विक्री करुन कर्मचाऱ्यांची देणी देण्याचा निर्णय मंत्री गटाने घेतला आहे. पण जमीन व्यवहारात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने मालमत्तेची विक्री झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची देणी रखडली आहेत. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांची रक्कम देण्यात आलेली नाही. काही कर्मचारी मयत झाले आहेत काही कर्मचारी अनेक व्याधींनी व्यस्त आहेत. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पालकमंत्री पाटील यांनी बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलन केले जात आहे. आंदोलनात श्रीकांत कदम, रावसाहेब चौगुले, भारत विष्णुपंत पाटील, नंदकुमार रामराव पाटील यांच्यासह निवृत्त कर्मचारी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूतन विद्यालयाचे यश

$
0
0

कोल्हापूर: मंगळवार पेठ येथील नूतन मराठी विद्यालय ब्रँच नं. १ च्या विद्यार्थ्यांनी इंडियन टलेंट सर्च परीक्षेत यश मिळवले. गुणवत्ता यादीत इयत्ता पहिलीतील वेदांत मिरजकर राज्यात ९ वा, नियती चोडणकर जिल्ह्यात पहिली, आदिती जोशी सहावी तर सृष्टी मगदूम सातवी आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा इम्पॅक्ट - गांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरू

$
0
0

मटा इम्पॅक्ट - लोगो वापरावा

फोटो

....................

गांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरू

दोन किलो गांजा जप्त, कागल एमआयडीसीत गांजा विक्रेत्यासह अवैध दारू विक्रेत्यास अटक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासह जिल्ह्यात राजरोस गांजा विक्री सुरू असल्याची वस्तुस्थिती 'महाराष्ट्र टाइम्स'ने मांडली होती. याची दखल घेऊन पोलिसांनी गांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली. कागल एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह गोकुळ शिरगाव पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी दोन किलो गांजासह ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आकाश राजू माटुंगे आणि राजू अनारसिंग माटुंगे (दोघेही रा. हलसवडे) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरू असताना पोलिसांकडून मात्र केवळ गांजा ओढणाऱ्यांवरच कारवाई केली जात होती. गेल्या अडीच महिन्यात पोलिसांनी ३९ जणांवर कारवाई केली. या दरम्यान एकही गांजा विक्रेता पोलिसांच्या हाती लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. 'महाराष्ट्र टाइम्स'ने गांजा विक्रेत्यांच्या रॅकेटची माहिती प्रसिद्ध करून राजरोस विक्रीची वस्तुस्थिती समोर आणली होती. पोलिसांनी याची दखल घेऊन तातडीने गांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांना कागल एमआयडीसी परिसरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या मदतीने कागल एमआयडीसी परिसरात छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत आकाश माटुंगे आणि राजू माटुंगे या दोघांना पोलिसांनी अटक केली.

दोन्ही संशयितांकडे दोन किलो गांजा मिळाला. याशिवाय त्यांच्या हलसवडे येथील घरातून देशी, विदेशी आणि गावठी दारू असा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांना अटक करून त्यांच्यावर अवैध अंमली पदार्थ बाळगणे आणि विक्री करण्याचे गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते, उपनिरीक्षक राजेंद्र सानप, युवराज आठरे, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज खाडे यांच्यासह इकबाल महात, सुनील कवळेकर, ओंकार परब, नरसिंग कांबळे, संदीप कुंभार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनातील कर्मचाऱ्यांवरदोन दिवसानंतर कारवाई

$
0
0

म़ टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येत्या ४८ तासात कामावर हजर व्हा, अन्यथा सेवा समाप्ती केली जाईल, अशी आरोग्य उपसंचालकांनी दिलेली मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील काम बंद आंदोलनात सहभागी कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांना नोटीस देण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार आरोग्य अधिकारी उषादेवी कुंभार यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दोन दिवसांत कामावर रूजू न झाल्यास संबंधितांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. खेमनार यांनी दिली.

कंत्राटी आरोग्य, कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन करून येथील जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी ठिय्या आंदोलन मागे घेतले. त्याऐवजी तालुका पातळीवर आंदोलन सुरू केले. मागण्यांसंबंधी सरकारशी संपर्क सुरू आहे. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघातर्फे १८ मेपासून नाशिकपासून मुंबई आझाद मैदानापर्यंत लाँगमार्च काढण्यात येणार आहे.

--------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदल्या लटकल्या

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. मात्र सलग दुसऱ्या दिवशी बदलीचे पोर्टल ओपन झाले नाही. तांत्रिक व्यत्यय आला. त्यामुळे जिल्हातर्गंत सुगम, दुर्गम, पती, पत्नी एकत्रिकरण, ५३ वर्षावरील शिक्षकांच्या बदल्या लटकल्या. बदलीचे ऑनलाईन आदेश घेण्यासाठी मंगळवारीही संबंधित शिक्षकांनी जि. प. आवारात गर्दी केली होती. मात्र पोर्टल ओपन न झाल्याने त्यांना बदलीचा आदेश न घेताच परतावे लागले.

---------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी संघ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

$
0
0

शेतकरी संघ कर्मचाऱ्यांच्या

महागाई भत्त्यात वाढ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा प्रश्न शुक्रवारी निकालात निघाला. संघ आणि युनियनमध्ये झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांना एप्रिल २०१८ पासून १,२०० महागाई भत्ता देण्याबरोबरच बंद झालेली वैद्यकीय मदत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी संघ आर्थिक अरिष्टात सापडल्यानंतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या इतर भत्त्यांना कात्री लागली होती. गेल्या दोन आर्थिक वर्षामध्ये शेतकरी संघाची आर्थिक स्थिती सुधारत असून २०१७-१८ च्या आर्थिक वर्षात संघाला सुमारे दीड कोटीचा फायदा झाला आहे. संघ फायद्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या इतर भत्यांचा प्रश्न निकालात निघण्याची शक्यता निर्माण झाली होती.

महागाई भत्याची फरक रक्कम मोठी असल्याने संघाच्या जिल्हा सहकारी नोकर युनियनने १९ मार्च रोजी संघाला पत्र देवून गोठवलेल्या महागाई भत्ता पूर्ववत करण्याची मागणी केली होती. यानुसार शुक्रवारी (ता.११) संघ व्यवस्थापन व युनियनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महागाई भत्यासह इतर प्रश्नावर चर्चा झाली. बैठकीत कर्मचाऱ्यांना एप्रिल २०१८ पासून १,२०० रुपये महागाई भत्त्यासह वैद्यकीय मदत व शैक्षणिक भत्ता दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, संचालक व्यंकाप्पा भोसले, जी. जी. पाटील, अमरसिंह माने, यशवंत पाटील, व्यवस्थापक आप्पासो निर्मळ तर युनियनचे जनरल सेक्रेटरी दिलीप पवार, दीपक निंबाळकर, उमेश पानसरे, आनंद देसाई, अशोक सरदेसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता- लक्ष्मी यवलुजे

$
0
0

लक्ष्मी यवलुजे

कोल्हापूर

आर.के. नगर येथील लक्ष्मी गणपतराव यवलुजे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, नातसून असा परिवार आहे.

...............

राधिका बकरे

कोल्हापूर

सानेगुरुजी वसाहत येथील राधिका अनिल बकरे (वय ५५) यांचे निधन झाले. मनोज कॅटरर्सचे अनिल बकरे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती,मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

...................

सदाशिव देसाई

गारगोटी

म्हसवे (ता. भुदरगड) येथील माजी विस्तार अधिकारी सदाशिव दादासो देसाई (वय ६०) यांचे निधन झाले. आचार्य जावडेकर महाविद्यालयाच्या प्रा. प्रतिभा देसाई निंबाळकर यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटक विजयाचा कोल्हापूरात जल्लोष

$
0
0

कर्नाटक विजयाचा कोल्हापुरात जल्लोष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप व काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालामध्ये भाजपने सर्वाधिक जागा पटकावल्यानंतर कोल्हापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात एकच जल्लोष केला. एकमेंकाना साखर-पेढे भरवत कार्यकर्त्यांनी फुगडीचा फेर धरत आनंद व्यक्त केला. 'भाजपचा विजय असो' 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय असो,' अशी घोषणा देत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

कर्नाटक विधानसभेची निवडणूक भाजप व काँग्रेस पक्षाने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मंगळवारी निकाल जाहीर होणार असल्याने येथील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सकाळी आठ वाजल्यापासून भाजप सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होताच, कार्यकर्त्यांनी जल्लोषाचे नियोजन करण्यास सुरुवात केली. शंभर जागांचा आकडा पार केल्यानंतर येथील प्रमुख कार्यकर्ते शिवाजी चौकात दाखल झाले. ढोल-ताशांचा गजर आणि गगनभेदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी पक्षाचा ध्वज हातात घेवून नृत्य करण्यास सुरुवात केली. नृत्यामध्ये ज्येष्ठही सहभागी झाल्याने उत्साहाला अधिक उधाण आले.

एकमेंकाना साखर-पेढे भरवून आनंद साजरा करताना महिला व पुरुषांनी फुगडीचा फेर धरला. एकमेंकांना अलिंगन देत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. येथील अनेक कार्यकर्ते सीमा भागातील मतदारसंघात प्रचाराला गेले होते. या मतदारसंघातील काही जागांवर विजय मिळवल्याने कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला अधिक उधाण आले होते. सुमारे पाऊण तास कार्यकर्ते आनंद साजरा करत होते.

विजयी जल्लोषात महानगर अध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अॅड. संपतराव पवार, सुरेश जरग, आशोक देसाई, श्रीमंत आराध्ये, संतोष माळी, विवेक कुलकर्णी, गणेश देसाई, अक्षय मोरे, दिग्विजय कालेकर, भारती जोशी, प्रमोदिनी हार्डीकर, वैशाली पसारे, गायत्री राऊत, विजयमाला जाधव, नजीर देसाई, तौफिक बागवान, डॉ. सदानंद राजवर्धन आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काव्य आणि कलेमुळे आनंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मानवी जीवनाचे दर्शन कवितेतून होत असते. शासकीय क्षेत्रात काम करताना फायली वाचण्यापेक्षा फायलीमागचा माणूस वाचण्याचा प्रयत्न करत असतो. कविता आणि कलेचा संगम झाल्यास आयुष्य आनंदी व्हायला मदत होते,' असे मत परराष्ट्र मंत्रालयातील सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले.

कवयित्री वैष्णवी अंदूरकर यांच्या 'काव्यत्रयी,' संग्रहातील कविता अनेकांच्या जगण्याचे प्रेरणास्त्रोत बनतील, असेही मुळे म्हणाले. काव्यसंग्रहाच्या प्रकाशन मुळे यांच्याहस्ते गडमुडशिंगी येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, विक्रम भागवत, ज्योती कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते.

मुळे म्हणाले, 'साधेपणातील श्रीमंती कवितेतून दिसते. काव्यत्रयी या संग्रहात असलेल्या कविता जीवनाकडे तटस्थतेने पाहायला शिकवतात. काव्याचा जीवनाच्या सर्वच अंगांशी संबंध येतो. पारदर्शकतेचा सरकारी अधिकाऱ्याच्या स्थैर्यावर परिणाम होत असतो. तरीही कवीमनाची माणसे चांगले काम उभे करू शकतात. आजकाल छोट्या गावात कविता शिल्लक राहिली आहे. नवनिर्मितीचा विचार केवळ कवीच करू शकतो. ज्यांची मुळे मातीशी घट्ट आहेत तेच आकाशात उंच झेप घेऊ शकतात.'

ज्येष्ठ कवी अशोक बागवे म्हणाले, 'मंत्र, तंत्र आणि यंत्राचा अविष्कार म्हणजे कविता असते. हृदयावर कोरलेली कविता कायमची लक्षात राहते. साहित्याचा पहिला उद्गार वेदनेतून होत असतो. जिथे वेदना असते तिथे संवेदना असते. कवितेला कुठलेही 'लेबल' लावता कामा नये. कवी हा विनम्र आणि पाण्यासारखा असतो. कविता म्हणजे आंधळ्याच्या हातातील कंदील आहे.'

कार्यक्रमास व्यंकटेश अंदूरकर, शुभम अंदूरकर, अमृता अंदूरकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३६ हजार पदे

$
0
0

राज्य सरकार भरणार

रिक्त ३६ हजार पदे

म. टा. विशेष प्रतिनिधी

राज्याच्या प्रशासनातील ७२ हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पात केली होती, या ७२ हजार रिक्त पदांपैकी ३६ हजार पदांची नोकरभरती करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी मान्यता दिली. राज्यातील कृषी व ग्रामविकास विभागामार्फत शेतकऱ्यांना अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्यासाठी तातडीने ही नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबर गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, सार्वजनिक आरोग्य आदी विभागांतही ही नोकरभरती होणार आहे.

गेल्या २० वर्षांत राज्याच्या प्रशासनात नोकरभरती बंद होती. नोकरभरतीसाठी झिरो बजेट लावण्यात आले होते. उलट गेल्या वर्षात सरकारी पदे भरण्याऐवजी पदे रद्द करण्याचे निर्णय घेतले गेले. मात्र, विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या प्रशासनातल्या विविध विभागांची ७२ हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा केली. या नोकरभरतीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आता घेतला आहे. ही नोकरभरती दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. ३६ हजार पदे भरण्यास बुधवारी मान्यता दिली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ३६ हजार पदे भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नोकर भरती करताना राज्याच्या ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांतील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येतील. राज्यातील शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकार सर्व पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. शेतीच्या शाश्वत विकासासह शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने विविध महत्त्वाकांक्षी योजना, अभियान आणि उपक्रमांची गतीने अंमलबजावणी सुरू केली आहे; परंतु सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी अपुऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमुळे होत नाही, या निर्णयांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. ग्रामीण भागातील विविध पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत असल्याने कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात भरती करण्यात येणाऱ्या ३६ हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील ११ हजार ५ पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील १० हजार ५६८ पदे, गृह विभागातील ७ हजार १११ पदे, कृषी विभागातील २ हजार ५७२ पदे, पशुसंवर्धन विभागातील १ हजार ४७ पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ पदे, जलसंपदा विभागातील ८२७ पदे, जलसंधारण विभागातील ४२३पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील ९० या पदांसह नगरविकास विभागातील १ हजार ६६४ पदांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे बळकटीकरण होणार असून त्यासोबतच युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील.

..............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images