Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विद्यापीठ खुलासा...

$
0
0

पान ५ अॅंकर

.....................

विद्यापीठ ... लोगो

विद्यापीठाचा कार्यभार सक्षम व सुरळीत

कुलसचिव नांदवडेकर यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कुलपती कार्यालयाकडून कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाची अतिरिक्त जबाबदारी ही एका अतिविशिष्ट आणि अतिगंभीर परिस्थितीमध्ये सोपवली आहे. कुलपती कार्यालयाच्या सूचनेनुसार डॉ.शिंदे हे मुंबई तसेच शिवाजी विद्यापीठाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठातील कामकाज सुरळितपणे सुरू असून नियमित कामकाजातील कोणतेही प्रस्ताव प्रलंबित नाहीत,असा दावा शिवाजी विद्यापीठाचेकुलसचिव विलास नांदवडेकर यांनी मंगळवारी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला.

'महाराष्ट्र टाइम्स'ने १५ व २२ मार्च रोजी अनुक्रमे 'कुलगुरु मुंबईत पूर्णवेळ आणि विद्यापीठात प्रभारी'व 'चाळीस लाखांची उधळपट्टी'असे वृत्त प्रसिध्द केले होते. त्या संदर्भात खुलासा करताना कुलसचिव नांदवडेकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 'मुंबई विद्यापीठातील सारे वरिष्ठ अधिकारी प्रभारी आहेत. त्यामुळे दिलेल्या जबाबदारीनुसार तेथील कारभारावर डॉ.शिंदे यांनी अधिक लक्ष देणे आवश्यक ठरते. याचा अर्थ त्यांचे शिवाजी विद्यापीठाकडे दुर्लक्ष होते असे म्हणणे अन्यायकारक आहे. तसे असते तर कुलपती कार्यालयाकडून विचारणा झाली असती. शिवाजी विद्यापीठातील महत्त्वाच्या बैठका, कार्यक्रम, उपक्रमांना ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करतात.'विद्यापीठाच्या कामकाजाचे योग्य पध्दतीने विक्रेंदीकरण केले आहे. त्यामुळे कुलगुरु नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजात शिथिलता येत नाही. ते नसल्यामुळे फायली, प्रस्तावांचा निपटारा होत नाही असे नाही. प्र-कुलगुरु अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. बरीच प्रकरणेही कुलसचिव, परीक्षा संचालक व वित्त लेखाधिकाऱ्यांच्या पातळीवर निकाली काढली जातात. अधिविभागीय स्तरावरील निर्णयाचे बहुतेक अधिकार अधिविभाग प्रमुखांना दिले आहेत. त्यांच्या स्तरावरील कोणताही प्रस्ताव प्रलंबित राहण्याचा प्रश्न उदभवत नाही. प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, विद्यापीठातील अभ्यास मंडळाचे काम सुरळीत सुरूआहे. २०१८ १९ या वर्षांपासून सीबीसीएस लागू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. याबाबत कॉलेजस्तरावर कार्यशाळा घेण्याची तयारी सुरु आहे. बीएस्सी, बीकॉम, बीए या अभ्यासक्रमाची पुनर्रचना, नियमावलीचे मसुदे तयार करुन त्यासाठी येत्या विद्या परिषदेच्या बैठकीत अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात येत आहेत. कुलगुरु विद्यापीठात असताना विद्यापीठ तसेच विद्यापीठाबाहेरील सर्व संबंधित घटकांशी सातत्याने संवाद साधण्यावर भर देत असतात. आवश्यक त्या सूचना प्रशासनाला करीत असतात.

चौकट

निवासस्थानाशेजारी कार्यालय अत्यावश्यक

कुलगुरुंच्या निवासस्थानाशेजारी कार्यालय ही एक आवश्यक बाब असते. सुट्टीच्या दिवशी अथवा कार्यालयीन वेळेनंतर अनेक अभ्यागत येत असतात. अशावेळी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी निवासस्थानाशेजारी कार्यालय आवश्यक आहे. राज्यातील बहुतेक विद्यापीठांमध्ये अशा प्रकारची कार्यालये आहेत. शिवाजी विद्यापीठात यापूर्वीच अशा प्रकारची सुविधा निर्माण होणे आवश्यक होते. यापूर्वी कुलगुरुंसाठी संपूर्ण नव्याच निवासस्थानाचा प्रस्ताव मंजूर झाला होता. तथापि नवीन निवासस्थानाऐवजी सध्याच्याच निवासस्थानी आवश्यक त्या सुविधांची निर्मिती करुन अनावश्यक खर्च वाचवावा असे कुलगुरुंनी सांगितले होते. त्यानुसार निवासस्थानाशेजारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. कुलगुरु शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध अधिकार मंडळांची आणि तांत्रिक समितीची रितसर मान्यता घेऊन योजनेला मूर्त स्वरुप दिले. विद्यापीठाचा वाढता व्याप लक्षात घेता केवळ विद्यमान कुलगुरुंच्यासाठीच नव्हे तर, या पुढील कालावधीत विद्यापीठास लाभणाऱ्या कुलगुरुंसाठी महत्वाची सुविधा विद्यापीठात निर्माण झाल्याचे पत्रकांत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार हसन मुश्रीफ वाढदिवस कार्यक्रम

$
0
0

मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त

विविध कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील शास्त्रीनगरच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. तसेच मंगळवार पेठेतील बालसंकुलामध्ये कडधान्याची मदत करण्यात आली. यावेळी अनाथ मुलांना फळे वाटप करण्यात आली. शहरातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. मिरजकर तिकटी येथील अंध शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन वाटप करण्यात आले.

या विविध कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आर.के.पोवार, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, माजी महापौर हसीना फरास, आदिल फरास, काकासो पाटील, अनिल कदम, शमा मुल्ला, लालासो जगताप, सुहास साळोखे, जहिदा मुजावर, पद्मजा तिवले, विनायक फाळके, जहाँगीर आत्तार, सुनील जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काम बंद आंदोलन मागे

$
0
0

कोल्हापूर : विविध मागण्यासाठी माथाडी कामगारांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला. माथाडी बोर्ड एकत्रीकरणास स्थगिती देण्यासंबंधी सकारात्मक चर्चा आणि माथाडी कामगारांना पेन्शन सुरू करण्याचे आश्वासन सरकारकडून मिळाल्याने हा निर्णय घेतला. कृषी उत्पन्न बाजार समिती, लक्ष्मीपुरी धान्य बाजारातील हमाल या आंदोलनात सहभागी होणार होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. मध्ये उद्या बळीराजा पुरस्कार वितरण

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे बळीराजा, आदर्श गोठा पशुपालक पुरस्काराचे वितरण गुरूवारी होणार आहे. जि. प. च्या सभागृहात सकाळी ११ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वितरण होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक असतील. कार्यक्रमात विविध पिकांत विक्रमी उत्पादन घेतलेले ३५ शेतकरी, आदर्श गोठा तयार केलेले शेतकरी, आयएसओ मानांकनप्राप्त पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे.

----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण ...

$
0
0

गारगोटीतील 'आयसीआर' च्या

विद्यार्थ्यास बेदम मारहाण

तीन विद्याथी कॉलेजमधून निलंबित

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

येथील आयसीआरई या इंजिनियरिंग कॉलेजमधील एका विद्यार्थ्यास किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची क्लिप व्हायरल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मारहाण करणाऱ्या तिघांवर भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रशासनाने या तिघांना कॉलेजमधून काढून टाकले आहे.

चांदेवाडी (ता.आजरा) येथील विद्यार्थी संग्राम जयसिंग कोंडूस्कर हा गारगोटीतील आयसीआरई कॉलेजमध्ये सिव्हीलच्या प्रथम वर्षात शिकत आहे. त्याचे सबमिशन ॠषीकेश राजिगरे, नमित सुर्यवंशी व नितीन सुतार यांनी काढून घेवून वेळेत परत केले नाही. त्यामुळे याबाबत संग्राम याने विचारणा केल्याचा राग मनात धरून संग्राम रहात असलेल्या ठिकाणी जाऊन या तिघांनी त्याला पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच पायावर दारूची बाटली मारली. या मारहाणीत संग्राम याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या अंगावर मारहाणीचे व्रण उटले आहेत. मारहाणीची घटना मोबाइलवर चित्रित करून सर्वत्र व्हायरल केली. त्यामुळे शिक्षण विश्वात एकच खळबळ माजली आहे. मारहाण करणाऱ्या तिघांवर भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आयसीआरई कॉलेजने मारहाण करणाऱ्या तिघांना कॉलेजमधून काढून टाकल्याचे संचालक डॉ.आर.डी.बेलेकर, प्राचार्य ए.पी.कदम यांनी सांगितले. तर बेशिस्त वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक शिस्तीचा अंमल केला जाईल, असेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाची २८३ कोटींची वसुली

$
0
0

२८३ कोटींची वसुली

महापालिकेच्या उद्दिष्टात ८० कोटींच्या तुटीची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक वर्ष संपण्यास अवघे चार दिवस राहिले असल्याने महापालिका प्रशासनाने जमेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जोरदार मोहीम सुरू आहे. गेल्या मार्चमध्ये सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये ३९७ कोटींच्या जमेचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत प्रशासनाला २८३ कोटींपर्यंतच मजल मारता आली आहे. उर्वरित चार दिवसांत ३० कोटींच्या आसपास महसूल जमा होईल, अशी प्रशासनाची आशा आहे. यामुळे किमान ८० कोटीच्या आसपास तूट येणार असल्याचा अंदाज आहे.

महापालिका प्रशासनाकडून सादर केल्या जाणाऱ्या बजेटमध्ये नगरसेवक वाढ करत असतात. सध्याच्या बजेटमध्ये प्रशासनाने ३३५ कोटी रुपयांची जमा अपेक्षित धरली होती. त्यावेळी सर्वसाधारण सभेने त्या जमेमध्ये वाढ करत ३९७ कोटी रुपयांची जमा अपेक्षित धरली. पण वर्ष संपण्यास केवळ चार दिवस राहिलेले असताना जमेचा आकडा २८४ कोटींवर पोहचला आहे. बजेटमधील नियोजनाप्रमाणे अजून ११३ कोटी रुपयांची जमा अपेक्षित आहे. शेवटच्या टप्प्यात घरफाळा विभाग, पाणीपुरवठा, मुद्रांक शुल्क तसेच सरकारच्या विविध विभागांकडून होणारी जमा यावरच भिस्त आहे. या सर्वांमधून ३० कोटीच्या आसपास महसूल जमा होईल, अशी शक्यता आहे.

सध्या एलबीटी विभागाची १०७ टक्के, घरफाळा विभागाची ७० टक्के, पाणीपुरवठा विभागाची ६४ टक्के, परवाना विभागाची ५७ टक्के, नगररचना विभागाची ५६ टक्के, इस्टेट विभागाची १२ टक्के वसुली झाली आहे. या विभागावर महापालिकेच्या उत्पन्नाची मोठी भिस्त असते. नगररचना विभागाकडून ४५ कोटी ७५ लाख रुपयांची जमा अपेक्षित असताना १९ कोटी रुपयांची जमा झाली आहे. तर इस्टेट विभागाकडून ३३ कोटी ५८ लाख रुपयांची जमा आवश्यक असताना केवळ ४ कोटी २१ लाख रुपयांची जमा झाली आहे. ड वर्ग नियमावलीमुळे नवीन बांधकामांच्या मंजुरीची प्रकरणे कमी झाली आहेत. त्यामुळे नगररचना विभागाची वसुली घटल्याचे दिसते. तर रेडीरेकनरनुसार भाडेआकारणीच्या वादामुळे इस्टेट विभागाची वसुलीही कमी झाली आहे. प्रशासन बजेटमधील जमेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करत आहे. किमान ३३५ कोटी रुपयांच्या मूळ उद्दिष्टापर्यंत पोहचण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांची कारवाईला बगल

$
0
0

मुख्यमंत्र्यांची कारवाईला बगल

बिद्रे-गोरे कुटुंबीयांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा खून करणारा संशयित आरोपी निलंबित पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याची मागणी बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी केली होती. याशिवाय तपास अधिकारीपदी एसीपी संगीता अल्फान्सो यांची नेमणूक करावी, खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात उत्तर देताना बगल दिल्याचा आरोप बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी केला आहे.

अश्विनी बिद्रे खून प्रकरणावरून अधिवेशन तापले होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी बिद्रे यांच्या खुनाचा तपास करण्यात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप अधिवेशनात केला होता. याशिवाय खुनाचा तपास करण्यासाठी एसीपी संगीता अल्फान्सो यांची पूर्णवेळ नेमणूक करावी. संशयित आरोपी कुरुंदकर याला पोलिस खात्यातून बडतर्फ करावे. त्याला दिलेले पोलिस पदक काढून घ्यावे. खटल्याच्या कामकाजासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना सहआरोपी करावे. अभय कुरुंदकर याचा भाऊ पोलिस निरीक्षक संजय कुरुंदकर याची गडचिरोली येथे बदली करावी, आदी मागण्या बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. आमदार अजित पवार यांनीदेखील अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून बिद्रे-गोरे कुटुंबीयांच्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरला होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत बुधवारी अधिवेशनात उत्तर दिले. उत्तर देताना गुन्ह्याचा तपास, संशयितांवरील कारवाईबद्दल बोलण्याऐवजी त्यांनी अश्विनी बिद्रे सहा महिने बेपत्ता होत्या यावर लक्ष वेधले. त्या बेपत्ता असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी का दखल घेतली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मूळ मागण्या आणि तपासाला बगल दिल्याचा आरोप बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत सोशल मीडियातून मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी मागण्यांचा पुनर्विचार करून संशयित कुरुंदकर याला तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी अश्विनीचे पती राजू गोरे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाला विहिरीत ढकलून मातेची आत्महत्या, मातेवर गुन्हा दाखल

$
0
0

मुलाला विहिरीत

ढकलून मातेची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नैराश्यातून सात वर्षाच्या मुलाला विहिरीत ढकलून स्वत: विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या मातेच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २७) गुन्हा दाखल झाला. हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे धरणावरील विहिरीत ११ फेब्रुवारीला हा प्रकार घडला होता. याबाबत प्रियांका उमेश माने (वय २६, रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) या महिलेवर मुलाचा खून आणि स्वत: आत्महत्या केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

कासारवाडी येथील धरणाच्या विहिरीत ११ फेब्रुवारीला एका महिलेसह सात वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता, तो मृतदेह उमा माने आणि तिचा सात वर्षीय मुलगा पार्थ या दोघांचा असल्याचे उघडकीस आले होते. उमा यांच्या पतीचा सात वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यानंतर ती मुलासह माहेरी कासारवाडी येथे राहत होती. नैराश्यातून तिचा स्वभाव एककल्ली बनला होता. यातूनच ती मुलाला घेऊन धरणावरील विहिरीकडे गेली. आधी मुलाला विहिरीत ढकलून दिल्यानंतर तिने स्वत: विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या तपासात मातेनेच मुलाला विहिरीत ढकलून मारल्याचे निष्पन्न झाल्याने उमा माने हिच्यावर खून आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बार काउन्सिलसाठी मतदान

$
0
0

बार काउन्सिलसाठी

जिल्ह्यातून २४८४ मतदान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील ३०३३ मतदारांपैकी २४८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बारा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सर्व मतपेट्या सीलबंद करून मुंबईला पाठवल्या जाणार आहेत. १५ मे पर्यंत निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यात असल्याने आता सर्वांनाच मतमोजणीची उत्सुकता लागली आहे.

तब्बल सात वर्षांनंतर महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलची निवडणूक प्रक्रिया पार पडली. २५ संचालकांच्या निवडीसाठी दोन्ही राज्यात ही निवडणूक अतिशय चुरशीने लढली गेली. दोन्ही राज्यातून १६४ उमेदवार रिंगणात होते. कोल्हापूरसह आसपासच्या सहा जिल्ह्यातून १७ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यात कोल्हापूर जिल्ह्यातील ९ उमेदवारांचा समावेश होता. बुधवारी जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यात शहरातील १५१५ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात ३०३३ मतदारांपैकी २४८४ मतदारांनी मतदान केले. मतपत्रिकांवर १६४ उमेदवारांची नावे असल्याने आणि पसंतीक्रमाने मतदान करण्याची प्रक्रिया असल्याने मतदानासाठी वेळ लागत होता. मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरा सर्व मतदान केंद्रांवरील सीलबंद मतपेट्या कसबा बावडा येथील मुख्य न्यायसंकुलात पोहोचल्या. गुरुवारी या मतपेट्या मुंबईला पाठवल्या जाणार आहेत.

जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवाजी राणे, विवेक घाडगे, यांच्यासह संपतराव पोवार किरण पाटील आदी उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी धावपळ केली. उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनीही मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. कसबा बावडा येथे न्यायसंकुलातील मतदान केंद्रावर दोन्ही बाजूने थांबलेले उमेदवार मतदारांचे स्वागत करीत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वच मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता. ७५ कर्मचाऱ्यांनी दिवसभरात १२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडली. मुंबईत टप्प्याटप्प्याने मतमोजणी होणार आहे. १५ मे पर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता उमेदवारांसह मतदारांनाही मतमोजणीची उत्सुकता लागली आहे.

चौकट

सीमाभागातील शंभर मतदार

महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सभासद असलेले शंभराहून अधिक सदस्य बेळगाव जिल्ह्यात राहतात. कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोव्यातील सनद त्यांच्याकडे आहे, त्यामुळे सीमाभागातही बार काउन्सिल निवडणुकीची जोरदार चर्चा होती. बुधवारी सीमाभागातील ७५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक - जुन्या नोटांचा ताळेबंदात समावेश करा

$
0
0

जुन्या नोटांचा ताळेबंदात समावेश करा

जिल्हा बँकांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश, बँकांना दिलासा

जिल्हा बँक लोगो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदी निर्णयाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा बँकांमध्ये जमा झालेल्या नोटा स्वीकारण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता. याविरोधात जिल्हा बँकांनी दाखल केलेली याचिका बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निकालात काढताना जमा झालेल्या सर्व रकमेचा समावेश ताळेबंदात करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती ए. के. सिक्री व न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी दिलेल्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्हा बँकांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५०० व एक हजार रुपये मूल्यांच्या नोटांपोटी २७९ कोटी ७८ लाख रुपये जमा झाले होते. यापैकी २५४ कोटी ५० लाख रुपये मूल्याच्या नोटा सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्या होत्या. मात्र नोटाबंदीच्या पहिल्या दिवशी आठ नोव्हेंबर २०१६ रोजी जमा झालेल्या २५ कोटी २७ लाख रुपये स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच नाबार्डने ३० जानेवारी २०१८ रोजी शिल्लक राहिलेल्या नोटा बँकेच्या ताळेबंदाला 'लॉस असेट'मध्ये दाखविण्याच्या सूचना पत्रांद्वारे केल्या होत्या. याविरोधात कोल्हापूर, पुणे, नाशिक व नगर जिल्हा बँकेने सुप्रीम कोर्टात नाबार्डच्या पत्राला स्थगिती देण्याची याचिका दाखल केली होती.

याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती सिक्री व भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीत जिल्हा बँकांनी ३१ मार्च २०१८ च्या ताळेबंदामध्ये समावेश करावा, असे आदेश खंडपीठाने दिले. तसेच दोन आठड्यात नाबार्डने याबद्दलचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेशही दिले. कोल्हापूर, नाशिक जिल्हा बँकेच्यावतीने वरिष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, गोपाल सुब्रमण्यम, हरीन रावळ, अॅड. शिवाजीराव जाधव यांनी काम पाहिले. तर पुणे व नगर जिल्हा बँकेच्यावतीने वरिष्ठ विधिज्ञ पराग त्रिपाटी, अॅड. आडसुरे यांनी, तर रिझर्व्ह बँकेच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ नरसिंह आणि नाबार्डच्यावतीने पी. के. जैन यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावड्यात एकावर धारधार हत्याराने खुनी हल्ला

$
0
0

फोटो आहे.

बावड्यात एकावर खुनी हल्ला

कसबा बावडा

कसबा बावडा येथे शिये रोडवरील एका हॉटेलसमोर डॉ. विनय मुरारीलाल रतन (वय ५४, फिल्मसीटी रोड, गोरगाव पूर्व, मुंबई) यांच्यावर अज्ञात दोघांनी धारदार हत्याराने खुनी हल्ला केला. ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, खाणकाम व्यवसायातील आर्थिक कारणावरून माझ्यावर हल्ला झाला असावा, अशी शक्यता त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

डॉ. रतन यांनी सांगितले की, 'खाणकाम उत्खननाचे ठेके मी घेतो. गगनबावडा तालुक्यातील साखरी येथील मायनिंग उत्खननाच्या ठिकाणची काही कामे मी केली आहेत. त्याचा मोबदला मायनिंग उत्खननाचा ठेका घेतलेल्यांकडून मिळायचा होता. देय रक्कम मिळण्यासाठी मी प्रयत्नशील होतो. त्याच्या कामानिमित्तच मुंबईहून कोल्हापुरला आलो आहे. कसबा बावड्यातील एका हॉटेलमध्ये मी आणि मुलगा जेवणासाठी थांबलो होतो. गाडीतून उतरून बाहेर थांबलो असता अज्ञात दोघेजण अचानक तेथे आले. त्यांनी गाडी कोणाची तसेच माझे नाव विचारले, नाव सांगितल्यानंतर त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी हत्याराने माझ्या पाठीत हल्ला करून ते पळून गेले.

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक बंदीसाठी महापालिका सरसावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारने घातलेल्या बंदीनंतर महापालिकेने प्लास्टिक व थर्माकॉलच्या वस्तू जप्त करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने बुधवारी दिवसभरात प्लास्टिक पिशव्या, ग्लास, चमचे यांच्याबरोबरच थर्माकॉलच्या डिश, ग्लास अशा जवळपास दोन डंपर वस्तू जप्त केल्या. ' ज्यांच्याकडे या वस्तू आहेत, त्या पुनर्वापराकरिता देण्यासाठी संबंधितांना महिन्याची मुदत आहे. त्यामुळे दंड वा गुन्हा दाखल करण्याची कारवाई २४ एप्रिलनंतरच केली जाईल,' असे महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.

महापालिकेच्यावतीने सध्या नागरिकांचे तसेच विक्रेत्यांचे, व्यापाऱ्यांचे प्रबोधन केले जात आहे. ज्यांच्याकडे प्लास्टिक पिशव्या वा अन्य वस्तू आहेत. त्या जमा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी चार पथके नियुक्त केली आहेत. प्रत्येक पथकात पाच आरोग्य निरीक्षक, १६ कर्मचारी आहेत. ज्यांच्याकडे बंदी असलेल्या वस्तू आहेत, त्यांच्याकडून त्या जप्त करण्याचे काम ही पथके करत आहेत. बुधवारी या पथकांनी महाद्वार रोड, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, पानलाइन, मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी या परिसरातून दोन डंपर प्लास्टिक व थर्माकॉलच्या विविध प्रकारच्या वस्तू जप्त केल्या. सध्या संबंधितांवर कारवाई केली जात नाही. पण २४ एप्रिलनंतर अशा वस्तू ज्यांच्याकडे आढळतील, त्यांच्यावर दंडाची व गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. एक महिन्यानंतर कारवाई केली जात असताना पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार, दुसऱ्या गुन्ह्यासाठी दहा हजार दंड करण्यात येणार आहे. त्यानंतर गुन्हाही दाखल करण्यात येऊ शकतो. जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठी, आयुक्तांपासून आरोग्य निरीक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ते ग्रामसेवक, पोलिस निरीक्षक, आरटीओतील निरीक्षक यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत. ज्या कंपन्या प्लास्टिकच्या बाटल्या विक्री करतात, त्यांनीच त्या परत घेण्याचीही व्यवस्था करायची आहे. बाटल्या परत घेण्यासाठी एक लिटरवरील बाटल्यांसाठी एक रुपया तर अर्धा लिटरच्या बाटल्यांसाठी दोन रुपये द्यायचे आहेत. तसेच संबंधित कंपन्यांनी संकलन केंद्र सुरु करायची आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२ एप्रिलपासून डॉक्टरांचा संप

$
0
0

डॉक्टरांचा संप

कोल्हापूर : नॅशनल मेडिकल आयोग विधेयकास विरोध करण्यासाठी देशातील डॉक्टर २ एप्रिलपासून संपावर जाणार आहेत. संप काळात रूग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेल्या निवेदनातून करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर बाबूराव कदम, स्वप्निल पाटोळे, संग्राम माने, मधुकर हरेल, राजेंद्र कोतमिरे आदींची सह्या आहेत.

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राइम

$
0
0

फसवणूकप्रकरणी

१३ जणांविरोधात गुन्हा

जयसिंगपूर

खोटे दस्तऐवज तयार करून व बनावट चेक देवून २६ लाख ८० हजार ८३० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी १३ जणांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुमन बळवंत शिराळे (वय ७५, रा. शंकरनगर, संभाजीपूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी १३ जणांपैकी जगन्नाथ शिवराम कांबळे याला अटक केली. त्यास प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.

जगन्नाथ शिवराम कांबळे, राहुल गजानन मोरे, श्रावण तुकाराम वीरभक्त, सीमा श्रावण वीरभक्त, राजश्री लक्ष्मण पाटील, श्रीमती सोनाबाई बाबासो कुरबे, गौतम श्रीपती वाघवेकर, चंपा गणपती काळे, आरती जगन्नाथ कांबळे, मनीषा संजय कांबळे, श्रीकांत विठ्ठल भोसले (सर्व रा. जयसिंगपूर), सुनंदा बाळासाहेब कांबळे (रा.सदलगा ता.चिक्कोडी), शरद पिराजी कांबळे (रा.हालोंडी, ता.हातकणंगले) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

यातील संशयित प्लॉट व जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करतात. फिर्यादी सुमन शिराळे यांना प्लॉटची खोटी कागदपत्रे देवून त्याची नोटरी व अन्य दस्त करण्यात आले. त्याच्या मोबदल्यात शिराळे यांनी सन २०१५ ते ऑक्टोंबर २०१६ या कालावधीत वेळोवेळी २७ लाख ८० हजार ८३० रूपये दिले. त्यातील श्रीकांत भोसले यांनी एक लाख रूपये चेकद्वारे परत दिले आहेत. त्यामुळे २६ लाख ८०,८३० रूपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद शिराळे यांनी दिली आहे.

संशयितांनी संगनमताने सर्व खोटे दस्तऐवज तयार केले. यामध्ये रोख रक्कम मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोटरीमध्ये बदल करून संबंधीत बँकेत पुरेशी रक्कम नसताना चेक देवून फसवणूक केली आहे. पती बळवंत शिराळे (वय ८०) यांच्या भोळसट स्वभावाचा गैरफायदा संशयितांनी कोऱ्या स्टँपवर सह्या घेतल्या व फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

--------------------------------------------------------------------------

एकास कोठडी

जयसिंगपूर

दानोळी (ता.शिरोळ) येथील वाटमारी गुन्ह्यातील रोहित राजेंद्र कार्वेकर (वय २५, रा.दानोळी) याला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दानोळी परिसरात जबरी वाटमारी गुन्ह्यात रमजान महंमद गडकरी, सिध्दार्थ राजेंद्र कांबळे, रोहित राजेंद्र कार्वेकर असे तिघे आरोपी पोलिसांना चकवा देवून फरारी होते. यापूर्वी रमजान गडकरी, सिध्दार्थ कांबळे या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र दीड महिन्यापासून फरारी असलेला रोहित कार्वेकर याला मंगळवारी निमशिरगांव (ता. शिरोळ) येथील मराठी शाळेजवळ अटक करण्यात आली.

---------------------------

खासगी सावकारास कोठडी

जयसिंगपूर

चिपरी (ता.शिरोळ) येथील शिवाजी बेडगे यास सावकारकीप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता त्यास तीन दिवसाची पोलिस कोठडीचे आदेश देण्यात आले. मनोज चंद्रकांत माने (वय ३५, रा.चिपरी) याने सलून व कॉस्मॅटिक व्यवसायासाठी संशयीत शिवाजी बेडगे याच्याकडून पाच लाख १० हजार रुपये व्याजाने घेतले होते. व्याजापोटी बेडगे याला १५ लाख ९७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम दिली होती. व्याजापोटी इतकी रक्कम देवूनही आणखी चार लाख २५ हजार रुपयासाठी बेडगे याच्याकडून तगादा सुरु होता. शिवाय माने व त्याचा नातेवाईक अनिल संकपाळ यांना पेटवून ठार मारण्याची धमकीही बेडगे याने दिली होती. या त्रासाला कंटाळून माने याने मंगळवारी जयसिंगपूर पोलिसांत बेडगे याच्याविरोधात तक्रार दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चकोते दुकॉलमी ...

$
0
0

फोटो

...........

चकोते इंग्लिश स्कूलला

सीबीएसई बोर्डाची संलग्नता

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

केंद्रीय बोर्ड माध्यमिक शिक्षण विभाग, दिल्ली यांच्याकडून कै. गणपती आण्णा चकोते चॅरीटेबल ट्रस्ट संचलित, धरणगुत्ती (ता.शिरोळ) येथील आण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूलला संलग्नता देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नववीपासूनचे शिक्षणाचे दालन प्राप्त झाले आहे.

संलग्नता मिळाल्याबद्दल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पेढे व मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. शाळेचे पालक व हितचिंतक यांनी चकोते स्कूलचे मॅनेजमेंट, प्रिन्सिपल व सर्वस्टाफ यांचे अभिनंदन केले. यावेळी स्कूलचे चेअरमन आण्णासाहेब चकोते म्हणाले, 'सीबीएसई बोर्डाकडून चकोते स्कूलला ११३०७४६ हा संलग्नता क्रमांक प्राप्त झाला आहे. चकोते स्कूलची स्थापना सन २०१३ साली झाली असून सध्या नर्सरी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. सुमारे ७८० विद्याथ्यांसह ५० उच्चशिक्षित, अनुभवी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. सायन्स लॅब, मॅथ्स लॅब, ३५०० ग्रंथसंपदा असलेली लायब्ररी, खेळाचे मैदान, डिजीटल क्लासरूम, ए.व्ही. रूम, आर.ओे. सिस्टीम, स्वीमिंग पूल, पर्यावरणपूरक कॅम्पस, आंनदी व सुरक्षित वातावरण अशाअत्याधुनिक सुविधायुंक्त अशी भव्य इमारत उपलब्ध आहे. आता सीबीएसई बोर्डाची संलग्नता मिळाल्याने पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. यावेळी स्कूलचे प्रिन्सिपल आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नव्या शैक्षणिक बदलांच्या आव्हानांना सामोरे जाणे आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आजची शिक्षण व्यवस्था झपाट्याने बदलत आहे. या नव्या शैक्षणिक बदलांच्या आव्हानांना आपण सामोरे गेले पाहिजे. खेड्यापाड्यातील शाळा, कॉलेजिअसचा विकास व्हायला पाहिजे.'असे प्रतिपादन विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.

संस्थेच्या विभागीय मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. संस्थेचे सहसचिव प्राचार्य पी. एस. चव्हाण यांनी कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव या जिल्ह्यातील संस्थेच्या कामकाजाचा आढावा व अहवाल वाचन केले. प्राचार्य आर. आर. कुंभार यांनी सांगली विभागाच्या कामकाजाचा आढावा सादर केला. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला ९ जून २०१८ पासून सुरुवात होत आहे. प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोणकोणते शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहेत, याविषयी माहिती दिली.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, 'गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे हा विचार शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी समाजात रुजविला. त्यांचे तत्त्वज्ञान, विचार व शैक्षणिक कार्य समाजापर्यंत पोहचविणे हीच बापूजींना आदरांजली ठरेल. आजच्या युगात शेती, व्यवसाय, व्यापार उद्योग त्याचबरोबर तांत्रिक शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. शिक्षणाच्या या नव्या बदलांना सर्वांनी सामोरे गेले पाहिजे.'

संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे म्हणाल्या, 'विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्य उंचावण्यासाठी प्रत्येकाने संस्थेच्या ध्येयधोरण व विचारसरणीनुसार काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना त्याग, सेवा, समर्पण भावना महत्त्वाची आहे.'

शाहीर कुंतीनाथ करके, प्रा. नामदेवराव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, साहित्यिक गंगाधर पानतावणे, माजी प्राचार्य एच .टी .पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्राचार्य एस. वाय. होनगेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डी. ए. देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता

$
0
0

डी.एस.पाटील

कोल्हापूर

येथील विक्रम एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी, कायदेतज्ज्ञ अॅड. दत्तात्रय शंकरराव पाटील उर्फ डी.एस.पाटील (वय ८३) यांचे तांबवे (ता. कराड) या मूळगावी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, तीन बहिणी,भावजयी, पुतणे असा परिवार आहे. पाटील यांनी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू बोर्डिंगमध्ये वास्तव्य करून कायद्याची पदवी घेतली होती.

--------------

सावित्रीबाई दळवी

कोल्हापूर

कोष्टी गल्ली, मंगळवार पेठ येथील श्रीमती सावित्रीबाई सदाशिवराव दळवी (वय ९२ ) यांचे निधन झाले. रिटायर्ड मॅजिस्ट्रेट कै .सदाशिवराव दळवी यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुले,मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.२९ ) सकाळी ९वाजता आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी विधेयक...प्रतिक्रिया व जोड मजकूर

$
0
0

प्रतक्रिया....

००००००००००००

या लढ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, असे आम्ही मानतो. शाहू महाराजांनी काढलेल्या वटहुकूमातही पुजा-यांना सेवकाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पुजा-यांची मक्तेदारी मोडीत काढणे गरजेचे होते. या विधेयकामुळे ही गोष्ट साध्य होणार आहे. विधेयक काढले असले तरी सरकारी पुजारी नियुक्तीचा कायदा होईपर्यंत समितीतर्फे पाठपुरावा करू.

संजय पवार, प्रवक्ते, पुजारी हटाओ संघर्ष समिती

०००००००००००००००

सरकारी पगारी पुजारी विधेयक मंजुरीचा अंतिम टप्पा अर्थातच कायद्यामध्ये रूपांतरण असा आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या उत्पन्नात वाढ होणार असल्यामुळे या उत्पन्नाचा उपयोग भाविकांच्या सुविधांसाठी व समाजोपयोगी कार्यासाठी करता येणार आहे. विधेयक मंजूर होणे ही कायद्याच्यादृष्टीने सकारात्मक पायरी असून, यामुळे देवस्थान समितीची जबाबदारी वाढली आहे.

महेश जाधव, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

०००००००००००००००००००००००००००००००००

पुजारी हटवा हा लढा एका प्रवृत्तीविरोधात होता. शाहू महाराजांनी त्यांच्या वटहुकूमाच्या माध्यमातून पुजारी हे सेवक असल्याचे नोंदवून ठेवले आहे. त्यामुळे देवीच्या ऐवजावर त्यांचा अधिकार नसताना इतकी वर्षे त्यांनी अधिकारशाही ठेवली होती. त्यामुळे पुजारी हटवून सरकारी पुजारी नियुक्तीचे विधेयक मंजूर होणार याबाबत खात्री होती.

प्रा. जयंत पाटील, सदस्य, पुजारी हटाओ संघर्ष समिती

००००००००००००००००००००००००००००००००००

अंबाबाईचे 'महालक्ष्मी' असे चुकीचे नामकरण करण्यापासून ते रासायनिक संवर्धनाताही आपल्या चुका लपवण्याचे काम परंपरागत पुजाऱ्यांनी केले आहे. त्यात देवीच्या पारंपरिक पेहरावातही बदल करण्याचा मनमानी कारभार पुजाऱ्यांनी केला. पुजाऱ्यांचा हा कारभार खपवून घेतला जाणार नाही या उद्देशाने पुजारी हटाओ हे जनआंदोलन उभारले. या आंदोलनाला पहिल्या टप्प्यात यश आले असले तरी प्रत्यक्ष कायदा होण्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

वसंत मुळीक, सदस्य, पुजारी हटाओ संघर्ष समिती

००००००००००००००००००००००००००००००००

पुजाऱ्यांनी देवीला घागरा-चोली पेहराव परिधान केला. त्यावरून पुजारी हटाओ आंदोलनला सुरुवात झाली व सरकारी पुजारी नेमण्याची मागणी केली. आता हे विधेयक मंजूर होत असताना हा कायदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या अखत्यारित असलेल्या साडेतीन हजार मंदिरांत अमलात आणण्याचा विचार सरकारकडून मांडला जात आहे. मात्र, आमच्या मागणीनुसार हा कायदा केवळ अंबाबाई मंदिरापुरताच झाला पाहिजे.

आर. के. पोवार, सदस्य, पुजारी हटाओ संघर्ष समिती

००००००००००००००००००००००००००००००००००

पहिली याचिका माने व मेथेंकडून

जानेवारी २०१७ मध्ये माजी स्थायी सभापती निशिकांत मेथे व चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या मनमानीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये पुजारी हटवून सरकारी पगारी पुजारी नियुक्त करावेत अशी मागणी केली आहे. या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे. याचिका दाखल करून सहा महिने होत असतानाच ठाणेकर यांच्याकडून देवीला घागरा-चोली पेहराव परिधान करण्याचा प्रकार घडल्यानंतर त्याविरोधात उभारलेल्या आंदोलनातही पुजारी हटाओ मागणी केली. त्यामुळे मेथे व माने यांच्या याचिकेमुळे उघड झालेला पुजाऱ्यांचा मनमानी कारभार सरकारी पुजारी नियुक्तीच्या विधेयक मंजुरीमुळे संपुष्टात येण्याचे संकेत निर्माण झाले आहेत.

कायदा झाल्यास काय होणार

सध्या पंढरपूर, शिर्डी येथील मंदिरांत सरकारी पगारी पुजारी नियुक्त आहेत. आता कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्याबाबत विधानसभेत विधेयक मंजूर झाले आहे. भविष्यात हा कायदा म्हणून अमलात आल्यास या कायद्याच्या कक्षेत कोणते बदल होतील याविषयीचे वेध लागले आहेत. हा कायदा झाल्यास सर्वप्रथम अंबाबाईला भाविकांकडून देणगीदाखल अर्पण होणारी रोख रक्कम, दागिने यावर देवस्थानची मालकी राहणार आहे. सरकारकडून मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त पुजाऱ्यांचा देवीला भाविकांकडून येणाऱ्या देणगीवर कोणताही अधिकार राहणार नाही. यामुळे देवस्थानचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. या उत्पन्नाचा निधी म्हणून समाजाच्या उपयोगासाठी तसेच भाविकांना सुविधा देण्यासाठी वापर करता येणार आहे. तसेच वैदिक स्कूलमधील प्रशिक्षक पुरोहितांना सरकारी पुजारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. मंदिर व्यवस्थापन व पौरोहित्यामध्ये पारदर्शकता येण्यास या कायद्यामुळे मदत होणार आहे.

०००००००००००००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी नियुक्त...महिला चौकट व बाबुराव ठाणेकर प्रतिक्रिया

$
0
0

महिलांचा सन्मान करणारा निर्णय

अंबाबाई मंदिरात महिला भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळावा यासाठी गेल्या पाच वर्षांत अनेक आंदोलने झाली. महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देऊ नये असा सूर आजही कायम आहे. मात्र, सरकारी पुजारी विधेयकामध्ये महिला पुजाऱ्यांना ५० टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा समाविष्ट केला आहे. त्यामुळे महिलांना समान स्थान देत सन्मान करणारा हा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया कोल्हापुरातील महिलावर्गातून व्यक्त केली जात आहे.

०००००००००००००००००००००००००००

प्रतिक्रिया...

अंबाबाईचे पौरोहित्य करण्याच्या आमच्या परंपरागत अधिकारावर गदा आणणारा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या याबाबत केवळ विधेयक मंजूर झाले आहे. अद्याप कायदा झालेला नाही. त्यामुळे या विधेयकातील मसुद्याचा अभ्यास करून न्यायालयीन लढा देण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी कायदेशीर आव्हान देणार आहोत.

बाबूराव ठाणेकर, अध्यक्ष, अंबाबाई मंदिर पुजारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी नियुक्ती...पान दोन इंट्रो

$
0
0

आता प्रतीक्षा राज्यपालांच्या स्वाक्षरीची

पुजारी हटाओ संघर्ष समितीचा लढा विधानसभेसह विधानपरिषदेत यशस्वी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंढरपूर व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नियुक्त करावेत, अशी मागणी गेल्या दहा महिन्यांपासून पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे करण्यात आली होती. या आंदोलनाला बुधवारी विधानसभेसह विधानपरिषदेतील मंजुरीने यश आले. आता प्रत्यक्ष कायदा होण्याच्यादृष्टीने प्रक्रियेला वेग येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा म्हणून संमत होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

परंपरागत पुजाऱ्यांनी अंबाबाईला घागरा-चोली पेहराव परिधान करून मनमानी कारभार केल्याबद्दल पुजाऱ्यांबाबत असंतोषाची ठिणगी पडली होती. राजर्षी शाहू महाराजांनीही आपल्या वटहुकूमात पुजारी हा केवळ नोकर आहे असे नमूद केले असताना पुजाऱ्यांनी अंबाबाईवर मालकी हक्क सांगू नये, या मुद्द्यावरून आंदोलनाला धार आली होती. त्यामुळे पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा करावा यासाठी पुजारी हटाओ संघर्ष समितीने दहा महिन्यांपासून सरकार स्तरावर पाठपुरावा केला होता. जानेवारी महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्चपूर्वी सरकारी पुजारी विधेयकाबाबत अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे विधानसभेत मांडण्यात येणाऱ्या या विधेयकाच्या मंजुरीबाबत प्रचंड उत्सुकता होती.

दरम्यान, विधानसभा व विधानपरिषदेत सरकारी पुजारी नियुक्तीचे विधेयक मंजूर झाल्यामुळे आता राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा म्हणून संमत होण्याचा मार्ग सुकर झाल्याचा आनंदोत्सव कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात साजरा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images