Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शाहूवाडी जवान

0
0

फोटो

.........

गोगवेच्या जवानाची

उत्तर प्रदेशात आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

गोगवे पैकी तळपवाडी (ता. शाहूवाडी) येथील राहुल गजानन तळप (वय २५) या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने बलरामपूर (उत्तर प्रदेश) मधील चिकनी मोहल्ला येथील यात्री निवासमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली. रविवारी (ता.२५) स्थानिक कोतवाली नगर पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

राहुल तळप हा सहा वर्षांपूर्वी सन २०१२ मध्ये केंद्रीय सुरक्षा दलातील एसएसबी युनिट नं. ५० मध्ये भरती झाला होता. सध्या तो उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे कार्यरत होता. दरम्यान, १७ जानेवारी २०१८ रोजी ३९ दिवसांची सुट्टी घेऊन तो गावी आला होता. यानंतर सुट्टी संपवून २५ फेब्रुवारी रोजी खात्यांतर्गत नियमानुसार बलरामपूर जिल्हा मुख्यालयामध्ये हजर राहणे आवश्यक असताना तो हजर झाला नव्हता. यावेळी सुट्टी शिल्लक असल्याचे सांगून जवान राहुल हा आपल्या गोगवे येथील घरीच राहिला होता. येथून तो १२ मार्चच्या दरम्यान कामावर हजर होण्यासाठी घरातून बाहेर पडल्याचे जवळच्या नातेवाईकाने सांगितले. शनिवारी (ता.१७) त्याने आपण कामावर पोहोचल्याचे सांगितल्यानंतर त्याचा भ्रमणध्वनीही बंद असल्याने कुटुंबियांशी त्याचा संपर्क होत नव्हता. नातेवाईकांनी केलेल्या चौकशीमध्ये शुक्रवारी (ता.२३) जवान राहुल याने स्वतःच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे एक हजार रुपये काढल्याचे आढळून आल्याने नातेवाईकांनाही दिलासा मिळाला होता. परंतु प्रत्यक्ष कामावर हजर न झालेल्या राहुलने बलरामपूर येथील यात्री निवासमध्ये आत्महत्या केल्याची माहिती एसएसबी मुख्यालयातून रविवारी सायंकाळी कुटुंबियांना देण्यात आली. जवान राहुल यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी मिलन, दोन वर्षांची मुलगी माहेश्वरी, आई, वडील आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीमाभागात अर्भक विक्रीचे रॅकेट

0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात तस्करी, गुंडगिरी यासह अर्भक विक्रीचेही रॅकेट सक्रीय आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इचलकरंजीत उघडकीस आलेल्या अर्भक विक्री प्रकरणाचे मूळ चिकोडी तालुक्यात असल्याचे समोर येत आहे. गेल्या आठ ते दहा वर्षात सीमाभागातील अनेक रुग्णालयात गर्भवती मातांच्या नोंदी संशयास्पद असल्याचे निरीक्षण कारा या संस्थेने नोंदवले आहे. याशिवाय गर्भलिंग निदान करणाऱ्या मोबाइल व्हॅनही खेड्यापाड्यात पोहोचल्याची वस्तुस्थिती आहे.

सीमाभागात दुर्गम ठिकाणी सरकारी यंत्रणा पोहचू शकत नाहीत. याचाच गैरफायदा घेऊन अवैध धंदे फोफावले आहेत. गुंडगिरी, चोरी, दरोडे, अपहण, खंडणी यासह गर्भलिंग निदान, गर्भपात आणि अर्भक विक्रीचाही गंभीर प्रकार या परिसरात सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गर्भवती महिलांना कर्नाटकात नेऊन त्यांची गर्भलिंग निदान चाचणी केली जाते. यासाठी मोबाइल गर्भलिंग निदान व्हॅनचा वापर होतो. अनेक डॉक्टर यात सहभागी आहेत. वर्षभरापूर्वीच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या संशयित डॉक्टरला पकडले होते. त्याने सीमाभागातील अनेक महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याची माहिती उघडकीस आली होती. या डॉक्टरांकडील सोनोग्राफी मशीन आणि गर्भपाताची औषधेही व्हाया कर्नाटक आल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. या गंभीर प्रकारानंतर इचलकरंजी येथे उघडकीस आलेल्या अर्भक विक्री प्रकरणाचे मूळही सीमाभागात असल्याचे समोर आले आहे.

इचलकरंजीतील डॉ. अरुण पाटील याने दोन अर्भकांची विक्री केल्याची माहिती दिल्लीतील कारा या संस्थेला मिळाली होती. या संस्थेच्या पथकाने सात एप्रिलला डॉ. पाटील याच्या रुग्णालयात छापा टाकला. डॉ. पाटील याने दोन अर्भकांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती यातून उघडकीस आली होती. डॉ. पाटील याने यातील एक अर्भक छत्तीसगड, तर दुसरे अर्भक मुंबईतील दाम्पत्याला विकले होते. पोलिसांनी डॉ. पाटील याला त्याच्या पत्नीसह अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करताना कारा संस्थेचे सदस्य सीमाभागातील चिक्कोडी तालुक्यात पोहोचले आहेत. चिक्कोडीपासून जवळच असलेल्या एका खेड्यातील कुलकर्णी नावाची व्यक्ती बालकांना दत्तक द्यायचे आहे, असा प्रचार करते. मुलासाठी पाच लाख आणि मुलीसाठी तीन लाख रुपये घेऊन बालके पुरविली जातात. यासाठी अल्पवयीन आणि गरीब मुलींना हेरून त्यांना पैशांचे आमिष दाखवले जाते. चार महिने त्यांना रुग्णालयात ठेवून मूल जन्माला आल्यानंतर आठवड्याभरात त्याची विक्री होते. या रॅकेटमधून सीमाभागात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू आहे, अशी माहिती काराचे सदस्य शिवानंद डंबल यांनी दिली आहे.

रुग्णालयांमध्ये संशयास्पद नोंदी

सीमाभागातील अनेक रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांच्या नोंदी संशयास्पद आहेत. सरकारी यंत्रणेकडे नोंदी होऊ नयेत, यासाठी रॅकेट कार्यरत आहे. कमिशन मिळत असल्याने सर्व व्यवहार गुपचूप होतात. पोलिसांच्या नजरेत येऊ नये, यासाठी रात्रीच्या अंधारात खेड्या-पाड्यात मोबाइल व्हॅनद्वारे गर्भलिंग निदान आणि गर्भपातही केले जातात. पैशांच्या हव्यासापोटी काही डॉक्टरच यात सहभागी असल्याने बिनबोभाट कारभार सुरू आहे.

ठोस कारवाईचा अभाव

पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक डॉक्टर गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी अडचणीत आले होते. यात काही नामांकित डॉक्टरांचाही समावेश होता. कारणे दाखवा नोटिसा आणि आर्थिक दंड यापलिकडे काहीच कारवाई झाली नाही. ठोस कारवाई होत नसल्याने गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारी यंत्रणा कार्यरत आहे. रुग्णालयांना कुलूप लागेल, अशी कारवाई होणे गरजेचे आहे. सीमाभागातील अनेक डॉक्टर हा गोरखधंदा करतात.

गर्भलिंग निदान आणि अर्भक विक्रीबाबत अजूनही सरकारी यंत्रणा गंभीर नाहीत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्याच्या सीमाभागात अनेक ठिकाणी हे गंभीर गुन्हे सुरू आहेत. अर्भक विक्रीच्या रॅकेटमधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

शिवानंद डंबल, सदस्य, कारा संस्था, दिल्ली

सीमाभागात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे प्रकार घडतात हे खरे आहे. कोल्हापूरसह सांगलीतील काही डॉक्टरांनी कर्नाटकच्या हद्दीत जाऊन गर्भपात केल्याचे उघडकीस आले आहे. हद्दीत बदल होत असल्याने कारवाई करण्यात अडचणी येतात. याचाच गैरफायदा अनेकजण घेतात.

प्रियदर्शनी चोरगे, अध्यक्ष, बालकल्याण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन

0
0

लोगो : वाट स्वच्छ आरोग्याची

पुढील वर्षापासून अंमलबजावणी, जि. प. शाळांतील ५ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थींनीना लाभ

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील ११९९ शाळांत शिकणाऱ्या ५ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थींना येत्या शैक्षणिक वर्षापासून मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. त्यासाठी जि. प. प्रशासनाने अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद केली आहे. त्याचा सर्वाधिक फायदा गरीब, सामान्य कुटुंबांतील मुलींना होणार आहे. वितरण व्यवस्था सुलभ होण्यासाठी संबंधित मुलीस पिवळे कार्ड दिले जाईल. महिला बचत गटातर्फे याचेवितरण होणार आहे. त्यासाठी बचत गटांची ऑनलाइन नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरमहा मासिक पाळीदरम्यान कार्ड दाखवल्यानंतर नॅपकिनचे पॅकेट विद्यार्थीनीसदिले जाणार आहे.

जिल्हा परिषदेतील विद्यार्थिनींना, ग्रामीण भागातील महिलांना अल्प दरात सॅनिटरी नॅपकिन देण्यासाठी अस्मिता योजनेची कार्यवाही सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी या योजनेचा प्रारंभ झाला. या योजनेतून ग्रामीण भागातील महिलांना २४० मि.मी. आकाराच्या आठ पॅड सॅनिटरी पॅकेट सवलतीची किंमत २४ रुपये, २८० मि. मी. आकाराचे नॅपकिनचे पॅकेट २९ रुपयांना देण्यात येणार आहे. जि. प. शाळांतील ११ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी पाच रुपयांस नॅपकिन देण्यात येणार आहे. मुलींना आठ पॅडच्या सॅनिटरी नॅपकिनसाठी पाच रूपयेही दरमहा मोजावे लागू नयेत, यासाठी जि. प. प्रशासनाने पुढाकार घेतला. त्यातून अर्थसंकल्प तयार करताना पदाधिकारी, प्रशासनाने अस्मिता योजनेतूनच मात्र मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पहिल्या टप्यात पाच लाखांची तरतूद केली.

जिल्ह्यात जि. प. च्या अखत्यारित ११९९ शाळा आहेत. त्यामध्ये ११ ते १९ वर्षे वयोगट म्हणजे ५ ते १२ वीपर्यंत शिकणाऱ्या २९ हजार २३७ मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन योजनेचा लाभ होणार आहे. त्यामध्ये शहरातील मेन राजाराम हायस्कूल,ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज शहरातील एम. आर. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, करवीर तालुक्यातील शिंगणापूर विद्यानिकेतन आणि गगनबावड्यातील शाळेतील मुली पात्र होणार आहेत.

------------------------

चौकट

किती विद्यार्थींना लाभ ?

मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळणाऱ्या विद्यार्थिनींची तालुकानिहाय संख्या अशी : कोल्हापूर : ३७५, करवीर : ४७३१, आजरा :१२७४, गगनबावडा : ९०२, भुदरगड : १७३६, चंदगड : २४५६, गडहिंग्लज : १७८८, हातकणंगले : ३२३४, कागल : २५८१, पन्हाळा : २७५८, राधानगरी : २३०६, शाहूवाडी : २५६८, शिरोळ : २५२८.

--------------------------

चौकट

महानगरपालिक हद्दीतील मुली वंचित

ग्रामीण भागासाठी अस्मिता योजना मर्यादित असल्याने महानगरपालिका, नगरपालिकेच्या अनुदानित, खाासगी शाळांतील विद्यार्थिंनीना लाभ होणार नाही. जि. प. प्रशासनाच्या नियंत्रणात शाळा नसल्याने मोफत सॅनिटरी नॅपकिन योजनेचाही फायदा त्यांना घेता येणार नाही. यामुळे शहरातील गरीब, सामान्य कुटुंबांतील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.

-----------

कोट

येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळांतील ५ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थींना मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. सॅनिटरी नॅपकिनचे विरतण अस्मिता योजनेतूनच केले जाईल.

डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रााइम

0
0

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जयसिंगपूर

कवठेसार ( ता. शिरोळ) येथे अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. अरुण नेमू नांद्रेकर असे त्याचे नाव आहे. संशयिताने शारिरीक संबंधाची मागणी केली तसेच बदनामी करण्याची धमकी दिली असे पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अरुण नांद्रेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक किरण दिडवाघ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडहिंग्लजला पर्यटन महोत्सवाचा फार्समटा

0
0

गडहिंग्लजला पर्यटन

महोत्सवाचा फार्स

म.टा.वृत्तसेवा,गडहिंग्लज

कोल्हापूर जिल्हा पर्यटन, सांस्कृतिक व कला महोत्सव तसेच मैत्रांगण बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गडहिंग्लज पर्यटन महोत्सवाला ढिसाळ नियोजनाचे गालबोट लागले. एकंदरीत बहुतांश पातळ्यांवर सपशेल फेल झालेल्या या महोत्सवाकडे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच नागरिकांनीही पाठ फिरवली. गडहिंग्लज, आजरा, चंदगड परिसर हा पर्यटनासाठी सर्वोतम आहे. कारण जैवविविधता, ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच सदाहरित जंगलांमुळे वर्षभर परिसर निसर्गरम्य वाटतो. येथील पर्यटन वाढावे यादृष्टीने विचार करून महोत्सवाचे नियोजन करण्यात आले. संयोजकांच्या म्हणण्यानुसार आठ लाख रुपये खर्चून आयोजित सरकारी पर्यटन महोत्सवात कशाचाच कशाला पायपोस नव्हता. नियोजनाचा अभाव, दर्जेदार कार्यक्रमांची अनुपलब्धता यामुळे महोत्सवाचा केवळ फार्स झाला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री विजयकुमार रावल, खासदार धनंजय महाडिक, खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह मान्यवरांचा पत्रिकेत उपस्थितांमध्ये नामोल्लेख होता. मात्र यातील लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनातील कोणीही उपस्थित नव्हते. नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे स्वागत करण्यात आले. शहराच्या मुख्य मार्गांवरून दिंडी महोत्सव

स्थळापर्यंत आली. दिंडीला शालेय विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती होती. मात्र महोत्सव स्थळावर हे चित्र दिसून आले नाही.

पाहिल्या सत्रात सुरेश करडे यांचा सनईचौघडा वादन तर बालव्याख्याती स्मिता पाटोळे हिचे 'समाजातील स्त्रीचे स्थान' यावर विचारमंथन झाले. निलेश अस्वले यांचा भावगीतांचा कार्यक्रम व त्यानंतर 'विच्छा माझी पुरी करा' हे नाटक पार पडले. तर वसिम सरकवास यांचे 'पर्यटन' विषयावर व्याख्यान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक बंदी

0
0

प्लास्टिकबंदीसाठी पथके

कोल्हापूर

प्लास्टिक व थर्माकॉलच्या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने पथके नेमली आहेत. सात दिवसात त्या पथकांकडे प्लास्टिक, थर्माकॉलच्या वस्तू जमा करायच्या आहेत. त्यानंतर ज्यांच्याकडे या वस्तू सापडतील, त्यांच्यावर दंड वा गुन्हा नोंद करण्याची कारवाई केली जाणार आहे, असे महापालिकेने कळवले आहे. या पथकांकडे नागरिक, व्यापारी, विविध संस्था, धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल्स, चित्रपटगृहे, औद्योगिक घटक, फेरीवाले, बस स्थानके, रेल्वे स्थानके व इतर सर्व घटक त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिक व थर्माकॉलपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तू जमा कराव्यात, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. त्यानंतर या वस्तू सापडल्यास संबंधितांवर दंड अथवा गुन्हा नोंद होण्याची कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कत्तलखाने बंद

0
0

कत्तलखाने उद्या बंद

कोल्हापूर

भगवान महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (ता.२९ ) महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरातील सर्व मटण, मांस व चिकन विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवावीत. यामध्ये कसूर झाल्यास संबंधित दुकान मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरंगाई देवी पालखी सोहळा तीन एप्रिल रोजी

0
0

फिरंगाई देवी पालखी

सोहळा तीन रोजी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फिरंगाई देवी पालखी सोहळा तीन एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता होणार आहे. यावर्षी डॉल्बीमुक्त पालखी सोहळा होणार असून एक हजार कार्यकर्त्यांना टी शर्ट वाटप करण्यात येणार आहे, असे पत्रक नगरसेविका तेजस्वीनी इंगवले यांनी प्रसिद्धीस दिले आहे. फिरंगाई देवी उत्सवाच्या दिवशी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सकाळी आठ वाजता अभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी प्रसाद वाटप होणार आहे. रात्री नऊ वाजता भागिरथी महिला मंडळाच्या संस्थापिका अध्यक्ष अरुंधती महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या खजानीस वैशाली क्षीरसागर, माजी नगरसेविका भारती पोवार यांच्या हस्ते पालखीचे पूजन होणार आहे. यावेळी स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बार काउन्सिलसाठी आज मतदान

0
0

बार काउन्सिलसाठी आज मतदान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलसाठी बुधवारी (ता. २८) दोन्ही राज्यात मतदान होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून नऊ उमेदवार या निवडणुकीत उतरले आहेत. शहरातील १९४२ मतदारांसह संपूर्ण जिल्ह्यातून ३०३३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात १३ ठिकाणी मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदानानंतर सर्व मतदान पेट्या मुंबईला पाठवल्या जाणार असून, निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दोन्ही राज्यातील १६४ उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. उमेदवारांनी गेली महिनाभर चुरशीने प्रचार केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. कोल्हापुरातून अॅड. शिवाजी राणे, विवेक घाटगे, किरण पाटील, संपतराव पवार, विनय कदम, विल्सन नाथन, व्ही. बी. चव्हाण, जी. एस. बलगुडे आणि इंद्रजित कांबळे निवडणूक रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस गटनेत्याकडून भाजप पदाधिकाऱ्याला शिवीगाळ

0
0

काँग्रेस गटनेत्याकडून

भाजप पदाधिकाऱ्याला शिवीगाळ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अमृत' योजनेंतर्गत सानेगुरुजी परिसरात टाकण्यात येणाऱ्या ड्रेनेज लाइनच्या कामाच्या उद्घाटनावरून मंगळवारी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी भाजपचे पदाधिकारी अमोल पालोजी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना शिविगाळ केली. देशमुख यांना कार्यक्रमाला निमंत्रित न करता भाजप-ताराराणी आघाडीने योजनेचे उद्घाटन केल्याने ते संतप्त झाले. शिष्टाचार पाळायचाच नसेल तर महापौरांनी पालकमंत्र्यांच्या दारात येऊन उद्घाटन केले तर चालेल का? असा सवालही त्यांनी विचारला.

'अमृत' योजनेतील ड्रेनेज लाइनच्या कामाचे मुख्य उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाजवळ पूर्वीच झाले आहे. त्यावेळी महापौरांसह काँग्रेस आघाडीचे व भाजप आघाडीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. सानेगुरुजी परिसरात पांडुरंग हॉटेल ते दीप्ती अपार्टमेंट रस्त्यावर ड्रेनेज लाइनचे काम सुरू आहे. त्या कामाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी स्थायी सभापती आशिष ढवळे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक किरण नकाते, भाजपचे कार्यकर्ते अमोल पालोजी, संजय सावंत, हेमंत आराध्ये यांच्या उपस्थितीत झाले. अमोल पालोजी हे स्थानिक नगरसेवक शारंगधर देशमुख यांचे विरोधक आहेत. त्यामुळे देशमुख यांना याबाबतची काहीच कल्पना देण्यात आली नाही. प्रभागातील कामाचे उद्घाटन परस्पर केल्याचे समजताच देशमुख तेथे पोहचले. त्यावेळी उद्घाटनाचा कार्यक्रम संपवून पदाधिकारी व काही कार्यकर्ते निघून गेले होते.

तिथे अमोल पालोजी, संजय सावंत, हेमंत आराध्ये उपस्थित होते. देशमुख यांनी पालोजी यांना 'प्रभागातील कामाचे उद्घाटन करण्याचा तुला काय अधिकार?' असे विचारत शिवीगाळ केली. तसेच स्थायी सभापती ढवळे यांच्याकडेही मोबाइलवरून विचारणा केली. स्थानिक नगरसेवकांना प्रभागातील कार्यक्रमाला बोलवण्याचा शिष्टाचार ठरलेला आहे. तो पाळायचाच नसेल तर भविष्यात महापौरांनी पालकमंत्र्यांच्या दारात येऊन उद्घाटन केले तर चालेल का? असा सूचक इशारा देशमुख यांनी यावेळी दिला. हा प्रकार काँग्रेस व भाजप आघाडीतील संघर्ष चिघळवण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा दिवसभर महापालिकेत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल विभागाची ९७ टक्के कर वसुली

0
0

वसुली, निधी

खर्चासाठी धावपळ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महसूल विभागाने ९७ टक्के कर वसुली केली असून जिल्हा नियोजन मंडळातील ९० टक्के निधी खर्च पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कर वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि निधी खर्च होण्यासंदर्भात युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे.

महसूल विभागाला ९३ कोटी, ६५ लाख रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. मंगळवारपर्यंत ९१ कोटी, ६६ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यंदा नदीतून वाळू उपसा करण्यास बंदी घातली असल्याने खनिज विभागाकडून १८ कोटी रुपयांची कमी वसुली झाल्याने महसूल विभागाने अन्य विभागातून वसुलीचे लक्ष्य गाठले. जमीन महसूल, गौण खनिज, करमणूक नजराणा यातून कर वसुली करण्यात आली. जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या नवीन नियमामुळे यंदा कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे. तसेच सरकारी जमिनींचा लिलावही करण्यात आला. पुढील तीन दिवसात १०० टक्क्याच्यावर वसुली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हा नियोजन मंडळाने विकास कामासाठी २४९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विकास कामांसाठी ९० टक्के रक्कम खर्ची पडली आहे. १०० टक्के रक्कम विकास कामांवर खर्च व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेड काढणाऱ्यास बेदम चोप

0
0

छेड काढणाऱ्यास

तरुणास बेदम चोप

महाद्वार रोड परिसरात घडला प्रकार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाद्वार रोड परिसरातील बाबुजमालकडे जाणाऱ्या मार्गावरील साडीच्या दुकानासमोर वारंवार येऊन अश्लील हावभाव करून छेड काढणाऱ्या तरुणाला मंगळवारी रात्री महिलेने चपलाने बदडले. प्रकाश धाडणकर (वय ३०) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी संशयिताला बेदम चोप देत जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने महिला आणि तरुणींच्या छेडछाडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाद्वार रोडवरील बाबुजमाल रोडवर एका महिलेचे साडीचे दुकान आहे. दुकानाच्या बोर्डवरील मोबाइल नंबर घेऊन त्यावर वारंवार फोन करून प्रकाश धाडणकर हा तरुण महिलेस त्रास देत होता. महिलेने या तरुणाचा मोबाइल नंबर ब्‍लॉक केल्यानंतर तो दुकानासमोर येऊन अश्लील हावभाव करीत होता. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास धाडणकर याने दुकानासमोर येऊन अश्वील हावभाव केले. तीनवेळा त्याने दुकानासमोरून फेऱ्या मारल्या. हा प्रकार महिलेच्या लक्षात येताच तिने धाडणकर याला चपलाने बदडण्यास सुरुवात केली. परिसरातील नागरिकांनीही धाडणकर याला बेदम चोप दिला. एका नागरिकाने पोलिसांना मोबाइलवरून घटनेची माहिती दिली. यानंतर काही वेळात घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दाडणकर याला ताब्यात घेतले. मारहाणीत त्याच्या अंगावरील कपडे फाटले होते. पंधरा वर्षांपूर्वी संबंधित महिला ज्या ठिकाणी राहत होती, त्याच परिसरात धाडणकर राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकाराने महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीर तहसीलदारांकडून शेंडा पार्क जागेचा अहवाल सादर

0
0

करवीर तहसीलदारांकडून शेंडा पार्क जागेचा अहवाल सादर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तहसीलदारांनी शेंडा पार्क जागेचा अहवाल आज मंगळवारी करवीर प्रातांधिकारी सचिन इथापे यांना सादर केला. शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा मुंबई हायकोर्टाचा कोल्हापुरातील खंडपीठासाठी आरक्षित करावी अशी मागणी खंडपीठ कृती समितीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे केली होती. त्यानुसार करवीर तहसीलदारांनी अहवाल दिला असून ३० एकर जागा उपलब्ध असल्याचा अहवाल दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत खंडपीठ कृती समितीची मुंबईत १५ मार्च रोजी चर्चा झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंडपीठासाठी जागा आरक्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी करवीर तहसीलदार उत्तम दिगे यांना शेंडा पार्कातील जागेची माहिती अभिप्रायासह देण्याचे आदेश दिले होते. जागेच्या अहवालासंदर्भात खंडपीठ कृती समितीने सोमवारी (२७) जिल्हाधिकारी सुभेदार यांची भेट घेतली. शेंडा पार्क जागेचा अहवाल आठ दिवसात सादर केला जाईल, असे आश्वासन सुभेदार यांनी दिले होते.

दरम्यान करवीरचे तहसीलदार दिगे यांनी रविवारी (२५) शेंडा पार्क येथे भेट देऊन अहवाल तयार केला. जागेचा अहवाल सोमवारी सायंकाळी करवीर प्रांताधिकार इथापे यांना देण्यात आला. त्यानंतर तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर होणार आहे. शेंडा पार्क येथे ३० एकर जागा उपलब्ध आहे. खंडपीठासाठी ७५ एकर जागेची मागणी केली असल्याने आणखीन ४० एकर जागेचे आवश्यकता आहे. पण खंडपीठासाठी नवीन नियमानुसार ४० एकर जागेची अट घालण्यात आली आहे. नव्या नियमानुसार शेंडा पार्कतील ३० एकर जागेसह आणखीन दहा एकर जागा खंडपीठासाठी हवी आहे. शेंडा पार्कची जागा आरक्षित झाल्यावर अन्य ठिकाणी जागा दहा एकर जागा शोधावी लागणार आहे. दरम्यान जागेची सर्व माहिती उपलब्ध झाल्यावर या जागेवर अन्य कार्यालयाने केलेल्या हरकती, प्रस्ताव यांची माहिती घेऊन अभिप्रायासह जिल्हाधिकारी राज्याच्या महसूल विभागाकडे शेंडा पार्क जागेची माहिती देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोतिबा ... जोड

0
0

दीडशे सुरक्षा रक्षक तैनात

पन्हाळा

'श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर शनिवारी ३१ मार्च होणाऱ्या दख्खनचा राजा जोतिबाच्या मुख्य यात्रेसाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जाधव म्हणाले, 'येत्या शनिवारी मुख्य यात्रेवेळी सुमारे सात ते आठ लाख भाविकांची उपस्थिती विचारात घेता भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिरामध्ये २८ सीसीटीव्ही कॅमेरे ,दोन डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसोबत देवस्थान समितीकडून १५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. श्रीं च्या दर्शनाकरिता उभ्या असलेल्या भाविकांचे उन्हापासून संरक्षण होण्याकरीता पश्चिम दरवाजा ते शिवाजी पुतळा या मार्गावर मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरातील दगडी फारशी गरम होवून पायाला चटके बसू नयेत म्हणून कुल कोट लावण्यात आला आहे. १४५ तयार शौचालये भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. तसेच ४० केएमटी बसेस मोफत सेवा पुरविण्यात येत असून पार्किंगच्या ठिकाणी प्रकाश व्यवस्थेकरीता ४५ हॅलोजन व प्रत्येक जनरेटरवर १० मेटल लॅम्प बसविण्यात येणार आहेत. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर,सदस्य प्रमोद पाटील,संगीता खाडे,बसगोंडा पाटील,शिवाजीराव जाधव,सुभाष वोरा, सचिव विजय पोवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठ बजेट बातमी

0
0

यंदाचे बजेट ३६१ कोटी

संशोधन, आधुनिकीकरणाला भरीव तरतूद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संशोधन प्रसार विद्यार्थ्यांना भरीव तरतूद, पुस्तके, जर्नल व ई डेटाबेससाठी एक कोटी ३० लाख, विविध अधिविभागाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण, प्रयोगशाळा उभारणी व बांधकाम घसारा निधीतून १८ कोटी उपलब्ध करून देण्याची महत्वाची तरतूद असलेले शिवाजी विद्यापीठाचे २०१८ -२०१९ या शैक्षणिक वर्षासाठी बजेट मंगळवारी सादर करण्यात आले. ३६१ कोटीच्या आर्थिक तरतूदींचा लेखाजोखा यावेळी मांडला. दरम्यान येत्या आर्थिक वर्षाच्या २ कोटी, ६५ लाख, १३ हजार इतक्या रकमेच्या तुटीच्या अंदाजपत्रकास अधिसभेने मंजुरी दिली.

संशोधक व विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी आर्थिक तरतुदीत वाढ करावी, दिव्यांगांसह खेळाडूंना सुविधा व भत्ते वाढ करावी, कंत्राटी सुरक्षारक्षकांसाठी असलेल्या आर्थिकबजेटमध्ये एक कोटी रुपयांची कपात करावी या प्रमुख सूचनांसह अनेक सूचना करण्यात आल्या. या सूचना विचारात घेऊन व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनुसार सुधारीत बजेटमध्ये समाविष्ट करण्यात येतील, असे आश्वासन बैठकीचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी यावेळी दिले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत अंदाजपत्रक सादर करण्यात आले. पेपरलेस संकल्पनेवर आधारित यंदाचे बजेट वेबबेस्ट प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन सादर करण्यात आले. यावेळी सदस्यांना लॅपटॉप सीडी स्वरुपात अंदाजपत्रकाची ऑनस्क्रीन प्रत देण्यात आली. या संकल्पनेचे सदस्यांनी स्वागत केले.

या अंदाजपत्रकात देखभाल अंदाजपत्रक, विकास अंदाजपत्रक, वेतन अंदाजपत्रक, एजन्सी, निलंबन अशा पाच विभागात आर्थिक तरतुदीची विभागणी केली आहे. याआधारे सदस्यांनी खर्च व शिल्लक या ताळमेळाबाबत प्रश्न उपस्थित केले. दरम्यान गतवर्षीचा अंदाजपत्रक प्रस्ताव प्राचार्य डॉ. सी. टी. कारंडे यांनी सादर केला. दरम्यान येत्या अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदींसंदर्भात उपस्थित करण्यात आलेले प्रश्न, सूचना यांना प्राचार्य कारंडे यांच्यासह प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांनी उत्तरे दिली. यावेळी सविस्तर चर्चा करून अधिसभेने अंदाजपत्रकास मंजुरी दिली.

अंदाजपत्रकातील ठळक वैशिष्ट्ये

येत्या वर्षातील अंदाजपत्रकात संशोधन प्रसार योजनेसाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे दरमहा पाच हजार रुपये याप्रमाणे सहा महिन्यांसाठी प्रति विद्यार्थी तीस हजार रुपये संशोधन कार्यासाठी देण्याचा प्रस्ताव आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच संशोधन गुणवत्ता वाढीच्यादृष्टीने सबस्क्रीब्शन ऑफ डेटाबेस यासाठी पंधरा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर अद्ययावत संगणक प्रणालीवर येत्या वर्षात सात लाख रूपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. पुस्तके, जर्नल व ई डेटाबेससाठी एक कोटी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध अधिविभागाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण, प्रयोगशाळा उभारणी व बांधकाम घसारा निधीतून १८ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संशोधन विकास निधीतून २३ कोटी, ८६ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावादाखल समाविष्ट करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण योजनांसाठी ५० लाख तर नॅक संस्थेकडून मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांना प्रमुख कॉलेजमधून सहाय्य करण्याची योजना करण्यात आली आहे. शिवपावन प्रेरणा साहस कॅम्पचे राज्यस्तरीय नियोजन करण्यासाठी आठ लाख रुपयांची तरतूद राष्ट्रीय सेवा योजनेतून करण्यात आली. सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेसाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अंदाजपत्रकात विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा, खेळाडूंसाठी भत्त्यात वाढ, कलाकार विद्यार्थ्यांना सुविधा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा यासाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याची सूचना सदस्यांनी मांडली. कुलगुरू, प्र-कुलगुरू कार्यालयातील संगणक बदलावर होणाऱ्या खर्चावर यावेळी सदस्यांनी आक्षेप घेतला. कंत्राटी सुरक्षारक्षकांसाठी तीन कोटी रुपयांच्या बजेटमध्ये एक कोटी रुपयांची कपात करण्याची सूचना मधुकर पाटील यांनी केली. यावेळी बोलताना कुलगुरू शिंदे म्हणाले, 'खेळाडू विद्यार्थ्यांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या आहारासाठी दोन लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी कल्याण निधीतून अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने एक लाख रुपयांची मदत देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.'

'सुटा'चा बहिष्कार व घोषणाबाजी

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) सादर करण्यात आलेल्या १८ प्रश्न व ७ ठरावांपैकी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी चारच प्रश्न अधिसभेसाठी मंजूर केले. उर्वरित नाकारलेल्या प्रश्न व ठरावांमुळे आपले गैरव्यवहार उघड होतील या भीतीने कुलगुरूंनी सुटातर्फे विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांसह ठरावांना नाकारल्याचा आरोप करत सुटाच्या सिनेट सदस्यांनी सभागृहाबाहेर निदर्शने व घोषणाबाजी करत अधिसभेवर बहिष्कार टाकला.

अधिसभेत प्रश्‍न आणि ठराव ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ 'सुटा'च्या अधिसभा सदस्यांनी मंगळवारी अधिसभेबाहेर निदर्शने केली. जोरदार घोषणाबाजी करत सदस्यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा निषेध नोंदवला. त्यानंतर विद्यापीठासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी प्रा. ए. बी. पाटील, प्रा. डॉ. एन. के. खंदारे, प्रा. डॉ. एम. डी. गुजर, प्रा. डॉ. आर. आर. थोरात, प्रा. डॉ. अरुण पाटील, प्रा. डॉ. इला जोगी आणि प्रा. डॉ. अलका निकम आदी सहभागी होते. यानंतर विद्यापीठासमोर सदस्यांनी धरणे आंदोलन केले. यात 'सुटा'चे जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर, सहकार्यवाहक प्रा. डॉ. सुभाष जाधव हे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंबाबाई रथोत्सव तयारी फोटो

0
0

चैत्रपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा साजरा होतो. यंदा १ एप्रिल रोजी हा सोहळा होणार आहे. त्यासाठी अंबाबाई मंदिराच्या उत्तर दरवाजानजीक असलेल्या चांदीच्या रथाची स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच सिं.

0
0

अपहरणाचा प्रयत्न

आजरा

येथील हैदरनगर येथे राहणाऱ्या कैफ वाहिद इंचनालकर (वय १०) या शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांच्या प्रसंगावधनामुळे हा प्रयत्न फसला. मोहसीन सलीम मोमीन (रा. राजोपाध्याय नगर, कोल्हापूर ) व सुशांत प्रकाश शिंदे (रा. बिडी कामगार चाळ, कोल्हापूर) यांनी अपहरणाचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये शिंदे पोलिचांच्या हाती लागला तर मोमीन फरार झाला. इंडिका कार (एमएच-०९, बीबी, ७३६०) मधून अपहरण करण्याचे त्यांचे नियोजन होते. यावेळी मुलास आईच्या फोनचे अमिष दाखविले गेले. मात्र आजऱ्यामधील जब्बार लमतुरे यांना ही बाब लक्षात आल्याने त्यांनी गाडी आडवी लावून शिंदे व मोमीन यांची कार अडविली. यावेळी नागरिकांनी अपहारणकर्त्यांना मारहाण केली व बालकाला वाचविले.

..............................

फोटो

दिपक शहा

कोल्हापूर

शाहूपुरी, पाच बंगला येथील दिपक सुमतीलाल शहा (वय ६३) यांचे निधन झाले . त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. अंत्ययात्रा बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता पाच बंगला येथून निघणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाज... आता कठोर अंमलबजावणीची गरज...प्लास्टिकमुक्तीचा निर्णय

0
0

आवाज

................

प्लास्टिकबंदीच्या कडक

अंमलबजवणीची गरज

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व कारवाईचे अधिकार प्रथमच जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, तहसीलदार,तलाठी यांना देण्यात आले आहेत. पाच ते २५ हजार रूपयांच्या दंडाची व कारावासाची तरतूद असलेल्या या निर्णयामुळे पहिल्या दिवसापासूनच शहरात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर अंकुश दिसत आहे. मॉलमध्ये कापडी पिशवीची किंमत १० ते २० रूपये झाल्यामुळे घरातूनच कापडी पिशवी नेणारे ग्राहक वाढले आहेत. या निर्णयाबाबत सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

कचऱ्याचे दुष्पपरिणाम कमी होतील

कोल्हापुरात प्लास्टिकच्या कचऱ्याने डोंगर गाठला आहे. याबाबत पर्यावरण अभ्यासक व संघटना वारंवार प्लास्टिकमुक्तीसाठी आवाहन करत होते. आता राज्य सरकारनेच प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे व शिक्षेची तरतूद केल्यामुळे उशीरा का असेना पण हा निर्णय अत्यंत चांगला आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याचे दुष्पपरिणाम या निर्णयामुळे कमी होतील.

प्रतीक बावडेकर, पर्यावरणप्रेमी

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

बदलाचे पाऊल टाकणारा निर्णय

गोरगरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंतच्या आयुष्यात कॅरी बॅग हा गेल्या काही वर्षातील अनिवार्य घटक झाला होता. या प्लास्टिकच्या बाटल्या, रॅपर व पिशव्यांचा वापर वाढल्यामुळे त्याचा कचराही वाढत होता. मात्र प्लास्टिक वापरू नका या आवाहनाला आजवर कुणीही गांभीर्याने घेतले नाही. आता कायदाच केल्यामुळे पर्यावरणाला लागलेली प्लास्टिकप्रदूषणाची कीड नष्ट होऊन बदलाचे पाऊल टाकणारा हा निर्णय आहे.

उज्ज्वला कर्नावट, गृहिणी

०००००००००००००००००००००००००००००००००००

आता जबाबदारी नागरिकांची

जेव्हा पर्यावरणाला धोका निर्माण होतो तेव्हा त्याचा सर्वाधिक फटका हा नागरिकांना बसतो. त्यामुळे प्लास्टिकबंदीचा निर्णय जरी राज्य सरकारने घेतला असला तरी त्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरणार आहे. जेव्हा एखादा चांगला निर्णय सरकारच्यावतीने घेतला जातो तेव्हा त्याच्या यशाची जबाबदारी नागरिकांची असते. प्लास्टिकमुक्तीच्या बाबतीत नागरिकांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे.

अविनाश माने, नोकरदार

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

स्वत:पासून सुरूवात करा

कापडी पिशवी नेहमी सोबत ठेवली तरी आपल्याला कॅरीबॅगची गरज पडणार नाही. याची सुरूवात प्रत्येकाने स्वत:पासून करण्याची गरज आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद झाला की, आपोआप उत्पादनही बंद होणार आहे. त्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर व उत्पादन वाढण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. अजूनही काहीजणांकडून प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी या निर्णयाचा आदर केला पाहिजे.

चंद्रकांत पेटकर, सराफ व्यापारी

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

सरकारचा अनुकरणीय निर्णय

प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे नदी, नाले, तलाव यांचे प्रदूषण वाढले होते. घरगुती कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा होता. यामुळे पर्यावरणाला प्रचंड धोका निर्माण झाला होता. काही दुकानदारांनी स्वताहून प्लास्टिकच्या पिशव्या देणे बंद केले होते. तर काही नागरिकांनीही कापडी पिशव्यांवर भर दिला होता. मात्र प्लास्टिक वापरावर कोणताही निर्बंध नसल्यामुळे हा प्रश्न गंभीर होता. मात्र राज्यसरकारने घेतलेला निर्णय योग्य असून अनुकरणीय आहे.

सतीश दिवटे, वृत्तपत्र विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटा निदर्शने फोटो

सरकारनियुक्त कंपनीकडूनच औषधे घ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील जिल्हा परिषदमधील औषध घोटाळ्याची दखल आरोग्य सहसंचालकानी घेतली आहे. त्यांनी यापुढील काळात आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणांची खरेदी सरकारने नियुक्त केलेल्या हापकिन बायोफार्मास्युटिकल्स या कंपनीकडून खरेदी करण्याची सूचना आरोग्य सहसंचालक डॉ. बी. डी. पवार यांनी सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. औषध खरेदीमधील घोटाळा टाळण्यासाठी सहसंचालकांचे हे पत्र महत्वपूर्ण ठरणार आहे.

आरोग्य विभागाने केलेल्या औषध खरेदीमधील घोटाळा महाराष्ट्र टाइम्सने उघडकीस आणला. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगले यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. अजूनही या प्रकरणातील दोषींना शोधून कारवाईची प्रक्रिया प्रलंबित आहे. मार्च अखेरची धांदल सुरू असल्याने या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. पहिल्या टप्यातील घोटाळ्याच्या चौकशी अहवाल, डॉ. पाटील, डॉ. चौगले यांनी नोटिसा दिलेल्या उत्तराची प्रत छाननीसाठी अर्थविभागाकडे पाठवला आहे. छाननीच्या अहवालाची विचारणा मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मुख्य वित्त लेखाधिकारी संजय राजमाने यांच्याकडे केली. मात्र त्यांनी अद्याप मार्च अखेरच्या कामकाजाची धावपळ सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे औषध घोटाळ्यातील पुढील कार्यवाही अद्याप सुरू झाली नाही.

दरम्यान, घोटाळ्याची दखल वरिष्ठ पातळीवरही घेतल्याने जि. प. आरोग्य यंत्रणा गतीमान झाली आहे. खरेदीमधील अनियमितता, गैरकारभार टाळण्यासाठी आरोग्य सहसंचालकांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यापुढील काळात आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे हापकिन कंपनीकडूनच घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आरसीचा आधार घेत मलिदा देणाऱ्या कंपन्यांकडून जादा दराने औषध खरेदी करणे, अनावश्यक औषध खरेदी करण्याला चाप लागला आहे. या आदेशानुसारच औषध खरेदीचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया आरोग्य प्रशासनाने सुरू केली आहे.

००००००००००००

हापकिन कंपनीकडूनच औषधे, वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याबाबच्या सूचना आरोग्य सहसंचालकांकडून आल्या आहेत. त्यानुसारच आता नव्याने औषध खरेदीची प्रक्रिया राबवण्याची सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images