Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ऊस दरावरून सांगलीत तोडफोड

$
0
0
ऊसदराबाबतची मुंबईतील बैठक निष्फळ झाल्याचे समजताच सांगली आणि परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गनिमी काव्याने आंदोलन करीत शनिवारी एसटीला लक्ष केले.

सोलापुरात ३ ट्रक जाळले!

$
0
0
ऊस दराचा पहिला हप्ता ३ हजार रुपये मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी सुरू केलेल्या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यात हिंसक वळण लागले आहे. पंढरपूर, करमाळा आणि मंगळवेढा या तालुक्यात आंदोलकांनी आज पहाटे बगास घेऊन जाणारे ३ ट्रक जाळून टाकले. याप्रकरणी पंढरपूर पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

तासगावजवळ एसटीला अपघात

$
0
0
कवठे महांकाळहून पुण्याला चाललेल्या एसटी बसला चिंचनी रस्त्यावर आज (रविवारी) सकाळी नऊच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात तीनजण ठार झाले.

बेदाण्याचे पैसे २३ दिवसांत मिळणार

$
0
0
बेदाण्याच्या सौद्यानंतर २३ दिवसांत पैसे चुकते करावेत, असा निर्णय पणन संचालक दीपक तावरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बेदाणा व्यापारी व उत्पादक यांच्या बैठकीत झाला.

वेगळा विदर्भ नको

$
0
0
‘अनेकांशी तीन दिवसांत जुळलेले मैत्र कायम ठेवा. आपल्या भाषेचा मान व ताकद कमी होऊ नये यासाठी प्रयत्न करा. वेगळा विदर्भ निर्माण होऊ नये यासाठी आपल्यातील प्रेमाचा, स्नेहाचा धागा कायम ठेवा.

एसटी बस झाडावर आदळली : ३ ठार, २४ जखमी

$
0
0
तासगाव तालुक्यातील चिंचणीनजीक रविवारी एसटी बस झाडाला धडकून अपघात झाला. अपघातात एका दाम्पत्यासह तीन जण जागीच ठार झाले. तर २४ जखमी प्रवाशांना सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोरेंच्या नाकर्तेपणामुळे विकास खुंटला

$
0
0
पैशाच्या जोरावर आमदारकी भोगणाऱ्या आमदार विनय कोरे यांना चार वर्षे संधी देवूनही त्यांच्या नाकर्तेपणामुळे शाहूवाडी व पन्हाळा तालुक्याचा विकास खुंटला असल्याची टीका माजी आमदार सत्यजित पाटील यांनी केली.

‘सरकारी योजना खासगी मालकीच्या नव्हेत’

$
0
0
सरकारी योजनांवर गरीबांचाच हक्क असून सर्वसामान्यांसाठीच्या योजना ह्या कोणाच्या खासगी मालकीच्या नाहीत; त्या सरकारच्या आहेत. त्या मी केल्या म्हणून कोणी डांगोरा पिटण्याची गरज नाही.

पुरातन भांडी विक्री : कागलमध्ये २ अटकेत

$
0
0
पुरातन भांडी घेऊन जात असल्याच्या संशयावरुन जाणाऱ्या कर्नाटकातील दोघांना कागल पोलिसांनी अटक केली. राजन रघुवरम किलमलईल (वय ३५) व राजेश देवदास नायर (वय ३८) (दोघे रा. अंबिकानगर, गवळीवाडा, मार्केट एरिया, ता. हल्याळ (उत्तर कनडा) जि. कारवार) अशी त्यांची नावे आहेत.

उदगाव येथे एसटीवर दगडफेक

$
0
0
ऊस दरप्रश्नी तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उदगांव (ता.शिरोळ) येथे एसटीवर दगडफेक केली. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी दोघाजणांना अटक केली आहे.

पाणीपट्टी वीजबील विरोधात आंदोलन

$
0
0
नुकत्याच वाढवण्यात आलेल्या पाणीपट्टीसह वाढलेल्या वीजेच्या दरांविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागलच्या सहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

अभयारण्यग्रस्तांना वन कर्मचा-यांची मारहाण

$
0
0
अभयारण्यात वास्तव्यास असल्याच्या कारणावरुन चांदोली अभयारण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोनार्ली पेकी धनगरवाडयावरील कोंडीबा साऊ पाटणे (वय ८०) या वृध्दास मारहाण केल्याची तक्रार त्याचा मुलगा जयराम पाटणे याने पोलिसांत तक्रार दिली आहे.

सीमाभागाची सांस्कृतिक हानी

$
0
0
जीवनातील वास्तव हे साहित्यातून समाजापुढे आणले जाते, मराठीचा अभिमान बाळगून त्याचे संवर्धन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. कारदगासारख्या गावाने १८ वर्ष सातत्याने मराठीची जोपासणा करून सीमाभागात त्याचा जागर केला आहे.

अखेर कांदा उतरला

$
0
0
आंध्रप्रदेशातील किनारपट्टीवर आलेल्या वादळामुळे त्या भागातील कांद्याची मागणी कमी झाली असून त्यामुळे देशाच्या उर्वरती भागात कांद्याचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे दर कमी होत असल्याचे बाजार समितीमधील फळ विभागाचे इन्चार्ज दिलीप राऊत यांनी सांगितले.

सशक्त अभिनय चकचकीत मांडणी

$
0
0
‘स्टेलमेट’ ही बुद्धिबळातली एक कोंडी असते. प्रतिस्पर्ध्यांना या विशिष्ट परिस्थितीत आपली सोंगटी हलवताही येत नाही आणि डावही जिंकता येत नाही. दुसऱ्या शब्दात ‘स्टेलमेट’ म्हणजेच शह नसलेल्या बुद्धीबळाचा डाव.

आरएफआयडी रीडर

$
0
0
‘त्या माणसाच्या इतक्या साऱ्या सामानात नेमकी तीच वस्तू त्याने पैसे न देता घेतली आहे, हे त्या गार्डला कसे कळले ?’ एक आठ नऊ वर्षाची छोटी मुलगी आईला विचारत होती. एका मोठ्या डिपार्टमेंट स्टोअरच्या दारात त्या मायलेकी त्या गार्डची करामत पाहत होत्या.

शाळा वाचविण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न हवेत

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा वाचवण्यासाठी स्वयंअर्थसहायीत शाळांविरोधात राज्यातील शिक्षकांनी संघट‌ित होवून लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रसाद पाटील यांनी केले.

डेंजरस ट्रॅक

$
0
0
धावती रेल्वे पकडून एका प्रवाशाला कोल्हापूर रेल्वेस्थानकात आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. कोल्हापूर रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मची कमी उंची आणि काही प्रवाशांचा ओव्हरस्मार्टपणाही अपघाताला निमंत्रण देत आहे.

अकरा लाखांवर पर्यटकांची भेट

$
0
0
महालक्ष्मी मंदिरासह जोतिबा, पन्हाळा आणि गगनबावडा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. यंदाच्या दिवाळी सुटीत कोल्हापुरात तब्ब्ल ११ लाख २० हजार पर्यटकांची भेट दिली आहे.

कागल तालुक्यातील गु-हाळघरे बंद

$
0
0
ऊस दरासाठी कागल तालुक्यातील बाचणी,केंबळी,आणि बेलवळे परिसरातील गु ऱ्हाळघरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी बंद पाडली. परिसरात मोटरसायकलवरून कार्यकर्त्यांनी परिसरात फेरी मारली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images