Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उसदराचा प्रश्न सोडवा; अन्यथा रस्त्यावर

$
0
0
साखर कारखाने सुरु नसल्याने जिल्ह्यातील २९ हजार हंगामी कामगारांची रोजीरोटी बंद आहे. या उद्योगावर आधारीत ऊसतोड मजूर, छोटेमोठे व्यावसायिकही अरिष्टात सापडले आहेत.

‘यंत्रमाग कामगारांना घरे द्या’

$
0
0
वस्त्रोद्योगामधील कामगारांना घरकुले बांधून द्यावीत.

दिमाख आणि दरारा

$
0
0
डॉबरमॅन आणि लॅब्रेडोरचा दिमाख, रॉटव्हिलरचा दरारा, मिनिएचर पिन्शचर आणि पगचा नाजूकपणा कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेत होती. एखाद्या सौंदर्य स्पर्धेत ज्याप्रमाणे वेगवेगळे राउंड असतात.

आंदोलकांनी सोलापुरात ३ ट्रक जाळले

$
0
0
ऊसदराचा पहिला हप्ता तीन हजार रुपये मिळवा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी सुरू केलेले आंदोलन सोलापूर जिल्ह्यात चिघळू लागले आहे. शनिवारी रात्री पंढरपूर, करमाळा आणि मंगळवेढा या तालुक्यांतील विविध घटनेत तीन ट्रक जाण्यात आले.

कृषी धोरण विभागनिहाय

$
0
0
राज्यातील विविध विभागातील हवामान, प्रदेश, भौगोलिक रचना, पीकपाणी या साऱ्या घटकांचा अभ्यास करून विभागनिहाय कृषी धोरण आखण्यात येणार आहे.

कळंबा फिल्टर हाउसजवळ जलवाहिनीला गळती

$
0
0
कळंबा फिल्टर हाऊसजवळून पाण्याच्या खजिना टाकीकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने महापालिकेला रस्ते प्रकल्पाचा फुटपाथ व अखंड गटार काढावी लागली.

दलित नेत्यांपेक्षा जनऐक्याला महत्त्व

$
0
0
दलित नेत्यांच्या ऐक्याचा विषय मी सोडून दिला असून आता बहुजन समाजाचे ऐक्य आरपीआयच्या माध्यमातून सुरु आहे.

आघाडी सरकारची माती करू

$
0
0
कोल्हापूरकरांनी कायम साथ दिल्यामुळे महायुतीच्या माध्यमातून २०१४ साली आघाडी सरकारची माती करू, असा विश्वास रिपाइं नेते माजी खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

डोक्यात खोरे मारल्याने कामगार ठार

$
0
0
किरकोळ कारणावरून दोन स्लॅब कामगारांत झालेल्या वादावादीत डोक्यात खोरे मारल्याने दत्तात्रय रामचंद्र पाटील (वय ५५) हे जागीच ठार झाले. पेठवडगांव (ता.हातकणंगले) येथे ही घटना घटना घडली.

आज कराडमध्ये राडा

$
0
0
उसदराप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या प्रश्नी उद्या (सोमवार) यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी प्रीतीसंगम आणि कराड शहरात आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.

कोट्यवधींच्या योजना लटकलेल्याच

$
0
0
राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतंर्गत रंकाळा संवर्धनासाठी मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना अजूनही लटकलेल्याच आहेत. जुन्या समस्या अजून हद्दपार झालेल्या नसताना दररोज नवनव्या समस्या उभ्या ठाकल्या जात आहेत.

७ डिसेंबरला टोलप्रश्नी महाठिय्या

$
0
0
टोलविरोधी आंदोलनाने अंतिम टप्पा गाठलेला आहे. कोल्हापूरची जनता महत्वाची की आयआरबी महत्वाची हे सरकारने निश्चित करण्याची वेळ आली आहे.

महायुतीची सत्ता आल्यास टोल रद्द

$
0
0
‘राज्यातील आघाडी सरकारची सत्ता उलथवून टाकण्याचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी महायुती एकत्र आली आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रातही सत्ताबदल अटळ आहे,’ अशी अपेक्षा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

मॅरेजचा स्टेज शो

$
0
0
तुळशीचे लग्न लागले की विवाहमुहूर्तांचे सनईचौघडे वाजायला लागतात. सध्या हेच वातावरण आहे. ज्यांच्या घरात यंदा कर्तव्य आहे त्यांची मोहीम वेगाने सुरू झाली आहे. अॅरेंज मॅरेज करणाऱ्यांसाठी मग वर किंवा वधू संशोधनासाठी लगबग सुरू होते. मॅरेज ब्युरोंनी हे काम सोपे केले आहे. अपेक्षांप्रमाणे स्थळ सुचवण्यासाठी मॅरेजब्युरो लग्नाळूंच्या पालकांचे मदतनीस झाले आहेत. प्रत्येक समाजाच्या अशा मॅरेजब्युरोज आहेत. उपवर व उपवधूंसह त्यांच्या पालकांना एकत्र आणण्यासाठी आणि जोडीदार निवडीचा प्रवास सुखकर होण्यासाठी वधूवर मेळाव्यांचीही संख्या वाढतेय. एक वेगळे स्टेज या निमित्ताने तयार झाले आहे. ​यामधून किती लग्नं ठरतात किंवा मुलामुलींच्या पालकांची एकमेकांशी ओळख होते हा भाग निराळा, पण सध्याच्या झटपट युगात मॅरेजचा हा नवा ‘स्टेज’शो किती परिणामकारक ठरतोय हा संशोधनाचा विषय आहे.

आकाशवाणीवर सुधीर पोटेंचे गायन

$
0
0
कोल्हापूर : उदयपूर येथे झालेल्या ​अखिल भारतीय आकाशवाणी संगीत संमेलनात कोल्हापुरातील प्रख्यात शास्त्रीय गायक सुधीर पोटे यांनी आपल्या शास्त्रशुध्द गायकीने रसिकांना मुग्ध केले.

केएमटीचे ४० टक्के प्रवासी एसटीकडे

$
0
0
लाँग रुटचे प्रवासी घेण्याच्या प्रयत्नात शहरातंर्गत असलेल्या तीन स्टेजच्या तिकिट दरात केएमटीने केलेल्या मोठ्या वाढीचा फायदा एसटी उठवत आहे. एसटीची पहिली स्टेज सहा किलोमीटरची आहे. त्या अंतरात केएमटीच्या तीन स्टेज होत असल्याने केएमटी प्रवासासाठी तब्बल दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. पहिल्या स्टेजमधील ४० टक्क्यापर्यंतचे प्रवाशी त्यामुळे एसटी वा वडापकडे वळले आहेत. त्यामुळे एसटीनेही शहराच्या हद्दीवरुन स्टँडकडे येणाऱ्या प्रवाशांना घेण्यास सुरुवात केली आहे.

लोक बिरादरीच्या प्रकल्पांचे छायाचित्र प्रदर्शन

$
0
0
हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेली ४० वर्षे अखंड राबून उभी केलेली लोक बिरादरी प्रकल्पातील ही अनोखी दुनिया कोल्हापूरकरांसाठी खुली होत आहे. लोक बिरादरीच्या प्रकल्पांचे छायाचित्र प्रदर्शन १ ते ३ डिसेंबरदरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहातील बाबूराव पेंढारकर कलादालन येथे सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन खुले असणार आहे.

शिक्षकांनी कृतिशील बनायला हवे

$
0
0
‘सृजन आणि प्रलय शिक्षकाच्याच हृदयात जन्म घेतात,’ असे चाणक्य विष्णुगुप्ताने म्हटले आहे. शैक्षणिक धोरण ठरविणे, त्याची अंमलबजावणी करणे, अनुदान देणे या संदर्भातील धोरण प्रक्रियेमध्ये राजकीय नेते दबावगट आणि अधिकारी यांचाच सहभाग असतो आणि या तिघांपैकी कुणीही प्रत्यक्ष शाळेतील, समाजातील स्थिती पाहिलेली नसते. किंवा शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केलेला नसतो. जोपर्यंत राजकारण्यांमध्ये थोडीशी सद्विवेकबुद्धी अस्तित्वात होती, अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराची थोडीथोडी लाज वाटत होती आणि शिक्षणाला व्यापार म्हणून अधिकृत मान्यता मिळाली नव्हती तोपर्यंत मान्यवर शिक्षणतज्ज्ञांचे आयोग नेमले जात त्यावर शिक्षक समुदायामध्ये आणि समाजातील सुशिक्षित वर्गामध्ये कडाक्याच्या चर्चा होत आणि त्यातून धोरण तावून सुलाखून निघे. अर्थातच तेव्हाही सरकार आणि उच्च अधिकारी त्यामध्ये मोडतोड करीत असत. परंतु हे नुकसान जीवघेणे नसे. १९९० नंतर उदारीकरणाच्या काळात शिक्षण ही वस्तू आहे.

समाज विकासासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा

$
0
0
‘समाजाचा विकास करायचा असेल तर अंतर्गत हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी युवावर्गाने पुढाकार घ्यावा’ असे आवाहन मुंबईतील प्रसिध्द उद्योगपती शंकरराव बोरकर यांनी केले.

महाबँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी शिबिर

$
0
0
महाबँक रिटायरीज असोसिएशन संघटनेच्यावतीने बँक ऑफ महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी १ डिसेंबर रोजी आरोग्य शिबिर होणार आहे. कॉम्रेड लक्ष्मण वैद्य प्रतिष्ठान व आधार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केल्याची माहिती संघटनेचे अरूण राजाज्ञा यांनी दिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images