Quantcast
Are you the publisher? Claim or contact us about this channel


Embed this content in your HTML

Search

Report adult content:

click to rate:

Account: (login)

More Channels


Showcase


Channel Catalog


Articles on this Page

(showing articles 1 to 20 of 34981)
(showing articles 1 to 20 of 34981)


Channel Description:

News from India by India number one website

(Page 1) | 2 | 3 | .... | 1750 | newer

  0 0

  पंचगंगा नदीच्या प्रदूषणाने कोल्हापूरकरांचे आरोग्य धोक्यात आले असताना त्याच प्रदूषणाचा दाखला देत शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी गटबाजीमुळे शिवसेनेच्या बिघडलेल्या आरोग्यावर बोट ठेवले आहे. येथे जाहीर पत्रकार परिषदेतच त्यांनी शिवसेनेत पंचगंगेप्रमाणेच प्रदूषण वाढल्याची कबूली दिली.

  0 0

  एखाद्या आंदोलनात लाठीचार्ज केला तर पोलिसांमुळे वातावरण बिघडलं असा आरोप होतो. नुसती बघ्याची भूमिका घ्यावी तर पोलिसांसमोर तोडफोड सुरू असल्याचे चित्र निर्माण केले जाते. दोन्हीही घटनांमध्ये पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.

  0 0

  शिंगणापूर ते कसबा बावडा या पाइपलाइनवरील एअर व्हॉल्व्ह व कसबा बावडा जलशुध्दीकरण केंद्राची दुरूस्ती शनिवारी पूर्ण झाली. त्यामुळे रविवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. आजही रात्री उशीरा काही भागात पाण्याचा पुरवठा झाला.

  0 0

  'जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने कर्नाटकात सत्तारूढ भाजपची अवस्था दयनीय झाली. महाराष्ट्रात जर कॉग्रेसचे मंत्री, लोकप्रतिनिधी असेच वागणार असतील तर त्यांचाही सुफडासाफ होईल' असा घणाघात आरोप माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी शनिवारी काँग्रेसच्या बैठकीत केला.

  0 0

  कळंबा तलाव पाणलोट क्षेत्रातील बेकायदा बांधकामांना अतिरिक्त जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी स्थगिती दिली. या संदर्भात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

  0 0

  भाडेतत्त्वावर दिलेल्या तीन इमारतींच्या भाड्यापोटी १८ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी ​किंवा मुदतवाढ मि‍ळावी, हा जनता बझारचा प्रस्ताव नाकारण्यात यावा, असा प्रशासनाने दिलेला प्रस्ताव शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

  0 0

  शिवाजी विद्यापीठाने शनिवारी काही शिक्षणशास्त्र महाविद्यालयांचा पदविका अभ्यासक्रमाचा (बी. एड) निकाल राखून ठेवला. शनिवारी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कॉलेजांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने निकाल राखून ठेवण्यात आल्याचे समजल्याने दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था होते.

  0 0

  पिंटू मिसाळ खूनप्रकरणातून लक्षतीर्थ वसाहत येथे तरुणांच्या गटाने केलेल्या तलवार हल्ल्यात दोघे जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. संशयितांना अटक करण्यास आलेल्या पोलिसांशी झटापट झाल्याने हेड कॉन्स्टेबल वसंत पन्हाळकर जखमी झाले.

  0 0

  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शाही दर्शनासाठी शनिवारी शिर्डीत साईबाबांचे मंदिर व परिसर सव्वा दोन तास निर्मनुष्य करण्यात आला. दर्शनास मज्जाव केल्याने हजारो भाविकांना त्याचा फटका बसला. लहान मुले, म्हातारी माणसे, महिला यांची दर्शनासाठी प्रचंड हाल झाले.

  0 0

  कर्नाटक सरकारने एक जूनपासून गुटखाबंदी आदेश जारी केला आहे. तरीही शनिवारी चोरीस गेलेला पाच लाखाचा गुटखा आणि पानटपरींवर शिल्लक असणारा गुटखा याबाबत कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही.

  0 0

  ब्रिटिश काळापासून सुरू असणाऱ्या न्यायव्यवस्थेत घटनेनुसार नवनवीन कायदे आले. पण तरीही लोकाना खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही. त्यासाठी भारतीय न्यायव्यवस्था बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध वकील असिम सरोदे यानी केले.

  0 0

  नगरविकास आघाडीचे नगरसेवक सचिन अशोक सारस (वय ३३ रा. मंगळवार पेठ) यांनी युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लग्न करण्यास टाळाटाळ केली. पालिका निवडणुकीत साडेतीन लाख रुपये आणि नऊ तोळे सोने फसवून घेतल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आला आहे.

  0 0

  बारामती तालुक्यातील सोनगाव येथील रविवारी कऱ्हा नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघींचा बुडून मृत्यू झाला. या दोघी मूळच्या सोलापूरच्या असून त्या नातेवाइकांकडे आल्या होत्या.

  0 0

  वाघाचे कातडे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या साईराज मच्छिंद्र सातपुते (वय २१), अमित भगवान नाळे (वय २३ दोघेही रा. सांगरूळ) व अमित विठोबा सूर्यवंशी (२१ रा. शुक्रवार पेठ) या संशयितांना न्यायालयाने रविवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

  0 0

  सांगली येथे कृष्णा नदीचे पात्र नेहमी दूषित करणाऱ्या शेरीनाला निर्मूलन योजनेचे काम अजूनही रखडले आहे. गेले वर्षभर मंत्री, महापालिका प्रशासनाकडून याबाबत अनेक घोषणा केल्या गेल्या पण शेरी नाल्याचा प्रश्न काही सुटला नाही.

  0 0

  मालाची खरेदी करण्यासाठी मोटारसायकलवरून निघालेल्या व्यापाऱ्याला १२ लाख रुपयांना लुटण्याचा प्रकार नागाव फाटा येथे रविवारी दुपारी घडला. याप्रकरणी पांडूरंग विलास वाळके (रा. निगवे दुमाला) यांनी शिरोली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

  0 0

  सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर महेश शहा यांच्या विरुद्ध शनिवारी विश्रामबाग पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील २० वर्षीय विवाहितेने शनिवारी डॉ. शहा यांच्याविरुद्ध तपासणीच्या नावाखाली आपला विनयभंग केल्याची फिर्याद दिली आहे.

  0 0

  ब्रेनट्यूमरच्या आजाराशी झुंज देणारी अवघ्या आठ वर्षाची सिध्दी मुरलीधर भोसले अखेर गेली आणि गेल्या आठ- पंधरा दिवसांपासून तिच्यावरील उपचाराच्या मदतीसाठी धावलेले हात हतबल झाले.

  0 0

  कधी कडाक्याचे उन्ह तर कधी वळवाचा पाऊस अशा वातावरणाचा परिणाम थेट पालेभाज्यावर झाल्याने पालेभाज्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. या आठवड्यात पालेभाज्या व फळभाज्यांचे दराने उच्चांक गाठला होता.

  0 0

  हॉस्पिटलबाहेर असतानाही डॉक्टरना अॅडमिट पेशंटची स्थिती आणि हॉस्पिटलमधील स्टाफचे अपडेट मिळवता येतील, असे मोबाइल अॅप कोल्हापूरच्या मनोरमा इन्फोसिसने तयार केले आहे. त्यामुळे हॉस्पिटलबाहेर असतानाही डॉक्टरांना पेशंटवर उपचार करणे किंवा कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देणे शक्य होणार आहे.

(Page 1) | 2 | 3 | .... | 1750 | newer