Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अवतार गिल, गार्गी पटेल अंगारकीत

$
0
0
कोल्हापूर चित्रनगरी येथे गेल्या २० मे रोजी मुहूर्त होऊन वेगाने चित्रीकरण होत असलेल्या अंगारकी या सिनेमात हिंदीतील अवतार गिल आणि गार्गी पटेल यांच्याही भूमिका आहेत.

गावरान आंब्याची चवच न्यारी

$
0
0
हापूस, पायरी, रायवळ या आंब्याची बाजारपेठेत जोरदार मागणी असतानाच शहरात गावठी आंब्याचे आगमन झाले आहे. ताराबाई रोड, कपिलतीर्थ मार्केटसह शहरात सर्व मंडईत स्थानिक शेतकरी आंबे विक्रीसाठी घेऊन आले आहेत.

'राज-उद्धव यांनी एकत्र यावं!'

$
0
0
रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनीही शिवसेना आणि मनसेच्या एकत्रीकरणाची हाक दिली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज-उद्धव या दोन्ही भावांनी एकत्र यावं,’ अशी अपेक्षा रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे.

लग्नाच्या मुहूर्तामुंळे महालक्ष्मी मंदिरात गर्दी

$
0
0
यावर्षीच्या उन्हाळ्यातील लग्न सराईतील सोमवारी अखेरचा मुहूर्त असल्याने एकाच मुहूर्तावर मोठ्या संख्येने विवाह झाले. दूपारनंतर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी नवदांम्पत्य व त्यांच्यासमवेत येणाऱ्या नातेवाईकांमुळे मंदिर परिसरात तुडूंब गर्दी झाली होती.

'शांतिनिकेतन' चा सलग ७ वर्षे १०० टक्के निकाल

$
0
0
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील अॅकादमीच्या शांतिनिकेतन स्कूलचा सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल सलग सातव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. यामध्ये आश सिन्हा हा विद्यार्थी ९७.२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. एकून ३७ विद्यार्थी मेरीटमध्ये तर ७० विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

सीनिअर कॉलेजची गुरूवारपासून प्रवेशप्रक्रिया

$
0
0
नुकताच बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. गुरूवारी (दि. ६) ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्कलिस्ट मिळतील. बारावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीनिअर कॉलेजची अभ्यासक्रम, विविध शाखा, अनुदानित तुकडी, विनाअनुदानित तुकडी, क्षमता आणि प्रवेश प्रक्रियेच्या टाइमटेबलसह अन्य तयारी पूर्ण झाली आहे.

ST कामगारांचे काळ्या फिती लावून काम

$
0
0
डबल ड्युटी आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेने सोमवारी काळ्या फिती लावून एस. टी. प्रशासनाचा निषेध केला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने हे आंदोलन केले.

एक्साइज इन्स्पेक्टर सावंतसह दोन्ही मुलांना अटक

$
0
0
हेमंत गायकवाड याच्या खूनप्रकरणी फरार असलेले एक्साइज इन्स्पेक्टर राजेंद्र आनंदा सावंत व त्याची दोन मुले धैर्यशील व अभिजीत यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली.

बावीस पोलिस अधिका-यांच्या बदल्या

$
0
0
जिल्ह्यातील तेरा पोलिस निरीक्षक व नऊ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जुना राजवाडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक यशवंत केडगे यांची बदली आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेला करण्यात आली आहे.

'सह्याद्री'वरही टोलमुक्तीचा निर्धार

$
0
0
कोल्हापुरचे श्रीमंत शाहू महाराज, दोन खासदार, पाच आमदार, डाव्या-उजव्या पक्षातील पदाधिकाऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने 'टोल आम्ही देणार नाही', 'कोल्हापूर टोल मुक्त करणार' असा निर्धार मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री (रस्ते) जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोरील बैठकीत व्यक्त केला.

गिरगावचा शेतकरी वीज कोसळून ठार

$
0
0
जिल्ह्यात वळवाने तिसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावली. गिरगाव येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर भाजली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

डांबराचा टँकर दरीत कोसळला

$
0
0
उंब्रज-पाटण मार्गावरील उरुल घाटात पाहिल्याच वळणावर डांबराने भरलेला टँकर चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे १५० फूट दरीत कोसळला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतात कोयनानगर येथील एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

व्यापारी लुटीतील दोघेजण फरार

$
0
0
पुणे-बंगळूरू रोडवर नागाव फाटा येथे रविवारी व्यापाऱ्याला बारा लाख रुपयांना लुटल्याप्रकरणी संशयित इम्रान रेहमान हकीम (रा. सदरबाजार) व रियाज शेख हे अद्याप फरारी आहेत. व्यापारी पांडूरंग विलास वाळके यांना चौघा संशयितांनी दिवसाढवळ्या मारहाण करुन लुटले.

टोल तरी द्या किंवा भरपाई द्या

$
0
0
टोलप्रश्नी सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबतची बैठकही निष्फळ ठरली. आम्ही टोल देणार नाही, असे टोलविरोधी कृती समितीने पुन्हा एकदा ठणकावले. त्यावर, 'टोल द्यायचा नसल्यास आयआरबीला नुकसानभरपाई द्यावी लागेल,' अशी भूमिका क्षीरसागर यांनी घेतली.

म्हातारी मेली आणि काळही सोकावतोय

$
0
0
न्याय मागण्याचे कायदेशीर ठिकाण म्हणजे पोलिस स्टेशन असे कायद्याला अभिप्रेत आहे.

बॉलिवुडचं पर्यावरणप्रेम

$
0
0
कलाकार संवेदनशील असतात असं म्हटलं जातं. पण, समाजात मिसळण्याचं, सद्यस्थितीतील प्रश्न मांडण्याचं धाडस करणारे अपवादात्मकच. यात नेहमी आमीर खानचं नाव घेतलं जातं. पण जरा इकडे-तिकडे पाहिलं तर आणखी खूप कलाकार असे दिसतात कि ते जाणिवपूर्वक आपल्या संवेदना जागृत ठेवताना आढळतात.

नक्षलवादावर देशपातळीवर उपाययोजना गरजेची

$
0
0
'नक्षलवादी देशाच्या वेगवेगळ्या राज्यांत कार्यरत असले तरी नक्षलींच्या दृष्टीने दंडाकारण्य हा एकच झोन आहे. त्यामुळे नक्षलवादावर देशपातळीवर उपाय योजना पाहिजे. नक्षलवादावर शस्त्र हेच उत्तर पुरेशे नाही. त्याला अनेक मार्गांनी उत्तर दिले पाहिजे.

'पंढरी वैभव चलचित्र' जळाले

$
0
0
पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिराच्यानजीक असलेल्या शिवाजी चौकातील तीन दुकानांना मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत वारकरी संप्रदायाचे आकर्षणाचे ठिकाण असलेले 'पंढरी वैभव चलचित्र' हे जुने दुकान जळून भस्मसात झाले.

'ग्रीन टॅक्स'मधून साडेपाच कोटी जमा

$
0
0
जुनी वाहने रस्त्यावर धावू नयेत, त्यांच्यामुळे प्रदूषण वाढू नये म्हणून सरकारने अशा वाहनांवर 'ग्रीन टॅक्स' लावण्याचा निर्णय घेतला. आठ वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांकडून 'पर्यावरण कर' या नावाने हा कर जमा केला जातो.

राजू शेट्टींनी सोबत यावे

$
0
0
'लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत वेगवेगळे झेंडे, संघटना घेऊन लढण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या निवडणुकीत राजू शेट्टींनी आमच्या सोबत यावे,' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना युतीसोबतयेण्याचे आवाहन केले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images