Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

७० टन निर्माल्यातून होणार खत

$
0
0
सामाजिक संस्था, संघटना तसेच प्रसारमाध्यमांनी केलेल्या आवाहनानुसार शहरवासीयांनी घरगुती गणेशमूर्ती व निर्माल्य दान उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने कोल्हापुरात खऱ्या अर्थाने यावर्षी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

३६८ वर्षांपूर्वीचे गणपती

$
0
0
कोल्हापूरच्या ऐतिहासिक, संस्थानकालीन आणि आधुनिक स्थित्यंतरांचे साक्षीदार असलेल्या दोन अतिशय दुर्मिळ गणेशमूर्ती येथील देवगिरी यादवांच्या मुख्य वाड्याच्या चौकटीवर आजही विराजमान आहेत.

अतिउत्साहाच्या नादात पायावर कुऱ्हाड

$
0
0
कोल्हापुरची जागा कोणाला, राष्ट्रवादीचा हक्क नेमका कोणत्या जागेवर... याचा पत्ता ना कोणत्या नेत्याला आहे ना इच्छुकांना. तरीही अनेक अतिउत्साही नेते घोषणाबाजी करत आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

देखाव्यांची परंपरा कायम

$
0
0
शहर परिसरासह उपनगरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे खुले झाले आहेत. तांत्रिक आणि सजीव देखाव्यांची परंपरा यंदाही कायम आहे. शाहूपुरीत सजीव, तांत्रिक देखावे शाहुपूरी, व्हीनस कॉर्नर परिसरातील बहुतांश सजीव आणि तांत्रिक देखावे शनिवारपासून खुले झाले आहेत.

‘श्री’फळाचा दर वधारला

$
0
0
सध्याच्या गणेशोत्सवामुळे नारळाच्या विक्रीसह किंमतीत वाढ झाली आहे. नारळाच्या किंमतीत दोन ते तीन रूपयांची वाढ झाली आहे. आवक वाढल्याने हिर‍व्या मिरचीचा दर निम्म्यावर आला असून शेंगदाण्याच्या दरामध्ये १० रूपयांची घट झाली आहे.

ईआरपी आणि कर्ताकरविता

$
0
0
‘खरे आहे, एकट्याने हे सगळे उभे करताना कमीत कमी कागदी घोडे नाचतील अशा सिस्टम्स सेट करण्याकडे आपला कल असतो. कारण मग या डॉक्यूमेंटेशनमध्येच गुंतून पडू आणि इतर महत्त्वाच्या कामाला वेळ देता येणार नाही असे वाटत असते.’

आम्ही जपतो सामाजिक बांधिलकी

$
0
0
आमच्या मंडळाची स्थापना २५ वर्षांपूर्वी झाली, गणेशोत्सव साजरा करायचा असे ठरले. पहिल्या वर्षी गल्लीत गणपती स्थापना केली. या ठिकाणी शेजारीच तलाव होता, त्यात दलदल, जलपर्णी यामुळे मोठी अस्वच्छता निर्माण झाली होती.

केआयटीचा रोबो आयआयटीत प्रथम

$
0
0
कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रोबोला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी, गुवाहाटी) रोबोझेस्ट या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. ट्रॅक रोबो प्रकारातील हा रोबो आहे.

रंकाळ्याचा अर्धवट रस्ता

$
0
0
रंकाळा हे कोल्हापुरातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या पर्यटनस्थळाचे नामोनिशान मिटवून टाकायचे अशी शंका यावी इतकी बेपर्वाई महानगरपालिका करत आहे. रंकाळा टॉवरकडून क्रशर चौकाकडे जाणारा आणि पर्यटकांनी फुलणारा रस्ता गेल्या पाच वर्षांपासून खोदून ठेवला आहे.

माझ्यासाठी तो सुखकर्ता दुःखहर्ताच!

$
0
0
गणेशोत्सव हा असा एक उत्सव आहे, ज्याची मी आतुरतेनं वाट पाहात असतो. अगदी लहान असल्यापासून. त्यामुळे या उत्सवाच्या माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. लहान असताना आम्ही पिंपरीमध्ये राहायचो.

शाहूपुरीच्या हद्दवाढीस पाठिंबा

$
0
0
शाहूपुरीस कोणीतरी वाली असावा, या भूमिकेतून १२ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली. परंतु, ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यावर मर्यादा असल्याचे प्रत्यक्ष काम करताना दिसून आले.

पायाभूत सुविधांअभावी ‘पर्यटन’ला ब्रेक

$
0
0
जिल्ह्यातील अनेक पर्यटन, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आणि अभयारण्य असूनही केवळ पायाभूत सुविधा नसल्यामुळे पर्यटनला मोठा ब्रेक लागला आहे.

साताऱ्यात रोडरोमियोंवर कारवाई

$
0
0
सातारा शहरात वाढत असलेल्या रोडरोमियोंगिरीवर वाहतूक शाखेने कारवाई करत २० जणांची धरपकड केली त्यांच्यावर कारवाई करत तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला.

सभासद मालक; संचालक केवळ विश्वस्त

$
0
0
सहकार क्षेत्रातील येणाऱ्या बदलांना सहकारातील सर्वांनीच सामोरे जाण्याची गरज आहे. सभासद हेच मालक असून, संचालक केवळ विश्वस्त आहेत याचे भान ठेवण्याची गरज आहे.

राज्यातील २.५ हजार सावकारांवर कारवाई

$
0
0
राज्यात आतापर्यंत अडीच हजार सावकारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ‘सावकारांनी ज्या कर्जदारांच्या मालमत्ता हडप केल्या आहेत, त्या संबधितांना परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

ब्रँड अॅम्बेसिडरचा निर्णय लांबणीवर?

$
0
0
महाबळेश्वर या पर्यटनस्थळी गुजरातबरोबर इतर राज्यातील पर्यटक यावेत यासाठी पालिकेने ब्रँड अॅम्बेसिडर नेमण्याचा निर्णय घेतला. ब्रँड अॅम्बेसिडरच्या शर्यतीत मराठातील चार दिग्गज अभिनेते होते.

मिरजेतील चोरीची कबुली

$
0
0
मिरज येथील वैद्यकीय सरकारी महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. कल्पना सुल्ह्यान यांच्या मिरजेतील शिवाजी रस्त्यावरील बंगल्यात दोन आठवड्यांपूर्वी चोरी झाली होती.

आटपाडी, जतला झोडपले

$
0
0
गेल्या तीन दिवसांत सांगली-मिरजेसह संपूर्ण सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. कायम दुष्काळी आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, जत तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला आहे.

पावसाने लाखोंचे नुकसान

$
0
0
मागील तीन दिवसांपासून निपाणी परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी मध्यरात्री बोरगाव (ता. चिकोडी) येथे वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यात सुरेश बेडकीहाळे वय-४५) यांच्या घरावर विद्युत खांब पडल्याने सुरेश जागीच ठार झाले.

कागलमध्ये थेट भाजीपाला विक्री केंद्र सुरू

$
0
0
शेतातून काढलेला ताजा टवटवीत भाजीपाला थेट ग्राहकाला उपलब्ध करुन देण्यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री केंद्र’ कागल येथे जयसिंगराव पार्क वसाहतीत सुरु करण्यात आले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images