Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पर्यटनस्थळांचा बदलणार ‘लुक’

$
0
0

Bhimgonda.Desai
@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गंत जिल्ह्यातील १० पर्यटनस्थळांना निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्यातील कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ठेकेदार निश्चितीनंतर प्रत्यक्ष कामांना सुरूवात होणार आहे. त्यानंतर त्यांचा लूक बदणार आहेत.

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर महत्वाचे केंद्र आहे. दरवर्षी येथे विविध राज्यांसह देश, विदेशातून पर्यटक येतात. मात्र त्यांना पर्यटनाच्या ठिकाणी चांगल्या, सेवा सुविधा मिळत नाहीत. पर्यटन स्थळांचीही दुरावस्था झाली आहे. त्यांचा विकास करून देशपातळीवरील पर्यटनाच्या नकाशावर कोल्हापूरचा नाव लौकीक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या जिल्ह्यातील १० स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे.

शहरातील पंचगंगा घाट विकास संवर्धनासाठी ४ कोटी ७८ लाख रुपये, राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस, वस्तूसंग्रहालयासाठी २ कोटी रुपये, किल्ले पन्हाळगडावरील लाइट अँड साऊंड शोसाठी ४ कोटी ५० लाख रुपये, डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या माणगाव (ता. हातकणंगले) येथील स्थळाच्या विकासासाठी २ कोटी रुपये, मौजे पट्टणकोडोलीत भक्त निवास बांधकामासाठी ५२ लाख ८७ हजार रुपये, कलानंदीगड (ता. चंदगड) येथील परिसरातील विकासासाठी १ कोटी ९३ लाख रुपये, खानापूर (ता. भुदरगड) येथील तळेमाऊली मंदिर परिसरातील विकासासाठी १ कोटी ६८ लाख रुपये, किल्ले सामानगड (ता. गडहिंग्लज) येथील विकासासाठी ५० लाख रुपये, मौजे बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) येथील काळभैरव म‌ंदिर परिसरचा विकासासाठी ३९ लाख, श्री क्षेत्र जोतिबा वाडी रत्नागिरीसाठी (जोतिबा) २५ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. सर्वाधिक निधी जोतिबा डोंगरावरील विकासकामांसाठी मिळाला आहे.

दरम्यान, पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तयार केलेला आराखडा मुख्यमंत्री (सीएम) देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अमिन सैनी यांनी सादर केला. त्यानंतर निधी मंजूर झाला. यामुळे निधी मागण्याची संधी स्थानिक आमदार, खासदारांना मिळालेली नाही. मंजूर निधीतून महत्वाच्या कामांची निवडही ‘सीएम’ कार्यालयाकडूनच झाल्याचे समजते.

पालकमंत्र्यांच्या गावीही

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव भुदरगड तालुक्यातील खानापूर. त्यांच्या मूळ गावातील तळेमाऊली मंदीर विकासासाठी १ कोटी ९३ लाख रुपये मंजूर झाला आहे. इतका मोठा निधी मिळणार असल्याने मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे.


कलानंदीगड : रस्ता, संरक्षक ‌भिंत बांधणे.
किल्ले सामानगड : जोड व अतर्गंत रस्ते, संरक्षक भिंत, माहिती फलक.
जोतिबा : दर्शन मंडप, सेंट्रल प्लाझा, पार्किंग, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प.
पंचगंगा घाट : जमीन सुधारणा, प्रवेशद्वार, बागबगिचा, नविन घाट बांधणे, जुन्या घाटाचे संवर्धन.
तळेमाऊली मंदिर : सभामंडप, पार्किंग, आरसीसी गटर्स, पाणी पुरवठा, पाऊस पाणी व्यवस्थापन.
काळभैरव मंदिर : पालखी मार्ग, हडलगे मंदिर ते काळभैरव मंदिरापर्यंतचा रस्ता, मंदिरापर्यंत आरसीसी गटर्स, संरक्षक भिंत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंदिर परिसराची अतिक्रमणाने कोंडी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

श्री अंबाबाई मंदिर परिसराचे प्राचीन सौंदर्य दिवसेंदिवस झाकोळून जात आहे. ओवऱ्या आणि अन्य ठिकाणच्या दुकानदारांनी विक्रीचे साहित्य मोठ्या प्रमाणात दुकानाबाहेरच ठेवल्याने मंदिर परिसराची प्रचंड कोंडी होत आहे. भाविकांना मंदिर परिसरात शांतपणे फिरताही येत नाही, अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मंदिर आणि परिसरात थाटलेल्या दुकानदारीमुळे भाविक व पर्यटकांना मोठा अडसर ठरत आहे. सर्व दुकानदारांनी पत्रे मारुन केलेले अतिक्रमण, पूजेच्या साहित्यासाठी बाहेर ठेवलेले टेबल, दागिन्यांसाठी लावलेल्या लोखंडी पाइप, यामुळे गर्दीच्या काळात या अतिक्रमणांची मोठी अडचण होत आहे. मंदिर परिसर कटलरी, इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानांच्या अतिक्रमणाने काबीज केला आहे.

मंदिराच्या चारही बाजूने दुकानदार आणि विक्रेत्यांची अतिक्रमणे वाढत आहेत. ती तातडीने हट‌वण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे. महाद्वार, घाटी दरवाजा, अतिबलेश्वर प्रवेशद्वार आणि सरलष्कर भवनसमोरील मार्गाने मंदिरात येताना भाविकांना या अतिक्रमणांचा अडथळा पार करूनच यावे लागते. यावर होणारी कारवाई अत्यंत जुजबी असते. शिवाय अतिक्रमणे हटवण्यात सातत्याचा अभावही जाणवतो आहे. त्यामुळेच हा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.

श्री अंबाबाई मंदिराला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याच्या प्रक्रियेला मंदिर परिसरातील ओवऱ्यातील २४ दुकानदारांनी हरकती घेतल्या आहेत. त्यामुळे मंदिर राज्य संरक्षित स्मारकाचा मार्ग थोडा खडतर झाला आहे. पण, भाविकांचा ओघ लक्षात घेता मंदिर सुरक्षेच्यादृष्टीने दुकानांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि मंदिर राज्य संरक्षित स्मारक होण्याच्या प्रक्रियेमुळे मंदिर परिसरातील दुकानदारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चर्चेत आला आहे. मात्र गेल्या आठ ते दहा वर्षांत श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भाविकांचा ओघही प्रचंड वाढला. दर्शन घेतल्यानंतर भाविक काही काळ विश्रांतीसाठी येथे बसतात. त्यासाठी ओवऱ्या रिकाम्या असणे गरजेचे आहे. मंदिर सुरक्षेच्यादृष्टीने सुधारित अंबाबाई तीर्थक्षेत्र आरखड्यात मंदिराच्या आतील सर्वच दुकानांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा निर्णय मंदिर सुरक्षेच्यादृष्टीने आणि भाविकांची संख्या लक्षात योग्यच आहे. सर्वसामान्य भाविकांचीही अशीच भावना आहे. तुळजा भवानी मंदिर असो किंवा जोतिबा मंदिर, या दोन्ही ठिकाणच्या ओवऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र अंबाबाई मंदिरात गेले अनेक वर्षे या ओवऱ्या दुकानदारांना भाड्याने दिल्या गेल्या आहेत.

मध्यंतरी पोलिस महासंचालकांनी मंदिरास भेट दिल्यानंतर मंदिर सुरक्षेच्यादृष्टीने दुकानाचे पुनर्वसन करुन सुरक्षेच्यादृष्टीने पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्यात दर्शन मंडप परिसरात या दुकानदारांचे पुनवर्स करण्याचे विचाराधीन आहेत. त्यामुळे दुकानदारांनीही दरवेळेला न्यायालयाची पायरी न चढता चर्चेने सुवर्णमध्य काढल्यास मंदिराचा विकास होऊन भाविकांना चांगल्या सुविधा देता येऊ शकतील.

.................

हे होणे गरजेचे

भाविकांना विश्रांतीसाठी ओवऱ्या रिकाम्या कराव्यात

मंदिर परिसरातील सर्वच दुकानदारांचे पुनर्वसन व्हावे

दुकानदारांनी सुरक्षा आणि गर्दीचा विचार करुन सकारात्मक भूमिका घ्यावी

महापालिकेनेही दुकानदारांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे

भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा पुरवाव्यात

.................


भाडेवाढीविरोधात दुकानदार न्यायालयात

पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन देवस्थान समितीने तीन वर्षांपूर्वी ओवऱ्यामधील दुकानदारांकडून २ लाख रुपये अनामत आणि दरमहा १० ते १२ हजार रुपये भाडे वाढविण्याबाबत सांगण्यात आले. यावेळी मंदिर परिसरातील सर्व दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली. गेल्या तीन वर्षांपासून सुनावणी सुरु आहे. सध्या या परिसरातील

दुकानदार दरमहा पाचशे रुपये भाडे न्यायालयात भरत आहेत.

००००००००

पूजेच्या साहित्यापेक्षा दागिन्यांची विक्री जास्त

पूर्वी मंदिर परिसरात भाविकांना पूजेचे साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून नारळ, पेढ्याचा प्रसाद आणि देवीच्या ओटीच्या साहित्यांची दुकाने सुरू झाली. ती वाढत वाढत आता त्याची संख्या वीसवर झाली आहे. मात्र सध्या या दुकानांकडे पाहिले तर पूजेचे साहित्य कमी आणि दागिन्यांची विक्री जास्त होते, असे चित्र आहे. शिवाय मंदिरातच लॉटरीचे दोन स्टॉलही मांडण्यात आले आहेत.

.............

गेल्या गुरुवारी मुंबईत पुरातत्त्व विभागाची हरकतींसंदर्भात सुनावणी झाली. यादरम्यान त्यांनी म्हणणे मांडण्यासाठी ८ दिवसांची मुदत दिली आहे. कायदेशीर सल्ला घेऊन बैठकीतून निर्णय घेण्यात येणार आहे.

वैभव मेवेकरी, दुकानदार, अंबाबाई मंदिर

..........

अंबाबाई तीर्थक्षेत्र आरखड्याचे काम सुरू झाल्यानंतर या आराखड्याप्रमाणे मंदिराच्या आतील दुकानदारांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. मंदिरातील सर्वच दुकानदारांचे मंदिराबाहेर पुनर्वसन करण्यात येणार आहे.

नेत्रदीप सरनोबत, शहरअभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार महाडिक देशात ‘टॉप’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशातील खासदारांच्या वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन करणाऱ्या पीआरएस इंडिया (पार्लमेंटरी रेटिंग सिस्टिम) संस्थेच्या पाहणीमध्ये संसदेमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारे म्हणून खासदार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. महाडिक यांनी सर्वाधिक ७०४ प्रश्न विचारले आहेत. ‘तीन वर्षात टॉप टेनपासून टॉप वन खासदार असा टप्पा गाठला असून कोल्हापूरला हा प्रथमच बहुमान मिळाला आहे. माझ्याबरोबर कोल्हापूरकरांसाठी हा आनंदाचा क्षण आहे,’ असे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पीआरएस इंडिया या संस्थेच्यावतीने खासदार, आमदारांच्या कामकाजाचे प्रश्न विचारण्याबरोबरच चर्चेतील सहभाग, उपस्थिती या साऱ्यांचे मूल्यमापन केले जाते. त्यानुसार लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षात केलेल्या मूल्यमापनामध्ये खासदार धनंजय महाडिक यांचा टॉप टेन खासदारांमध्ये सहभाग झाला होता. दुसऱ्या वर्षातील अहवालात त्यांनी दुसरा क्रमांक पटकावून टॉप थ्रीमध्ये मुसंडी मारली. संस्थेने यावर्षीच्या केलेल्या मूल्यमापनाचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे.

त्याबाबतची माहिती देताना खासदार महाडिक म्हणाले, या वर्षभरात ७०४ प्रश्न विचारले. तारांकित, अतारांकित तसेच विविध माध्यमातून हे प्रश्न विचारले आहेत. यासाठी मी स्वतः अभ्यास करुन विविध ठिकाणचे प्रश्न मांडले. प्रश्न मांडल्याशिवाय ते सुटणार नसल्याने जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित करण्याच्या जिद्दीने काम केले. यासाठी सतत भेटत असणाऱ्या जनतेचे प्रश्न विचारण्याबरोबरच कुटुंबातील सदस्यांनी प्रश्न उपस्थित करण्यासाठी साथ दिली. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या माध्यमातून बोलण्याची संधी दिली. कोल्हापूरला हा प्रथमच बहुमान मिळाला असल्याने साऱ्यांच्याच आनंदाचा हा क्षण आहे. मी स्पर्धा म्हणून याकडे पहात नसून जास्तीत जास्त प्रश्न संसदेच्या पटलावर यावेत, त्यांची सोडवणूक व्हावी हा उद्देश आहे. यापुढेही हे काम असेच करत राहणार आहे.

खासदार महाडिक म्हणाले, ‘कोकण रेल्वेच्या मार्गाच्या मंजुरीचे पुर्णपणे श्रेय मीच घेणार आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहिलो. रेल्वे मंत्री सुरेश प्रभु झाल्यानंतर त्यांच्याकडे पाठपुरावा करुन हा मार्ग मंजूर करुन घेतला. शिवाजी पुलाच्या कामासाठी पुरातत्व विभागाचा कायदा बदलण्याची आवश्यकता होती. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीसमोर आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल.’ यावेळी अरुंधती महाडिक उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ निराधारांना मिळाला ‘आधार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील आधार निवासी शाळेतील बेघर झालेल्या ३८ अनाथ मुलांना राज्यभरातील वसतिगृहांमध्ये आधार मिळाला आहे. त्या-त्या वसतिगृहात पालकत्व स्वीकारले गेल्याने या मुलांच्या जीवनातील अडचणी दूर झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण प्रशासनाने पालकत्व मिळवून दिले आहे. सर्वांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाल्याने त्यांच्या पालन, पोषण, ‌शिक्षणाचा प्रश्न निकालात निघाला आहे.

आधार वसतिगृहात ४१ ‌विद्यार्थी होते. सर्व मुले मूकबधीर, अस्थिव्यंग, मतिमंद अशी होती. दरम्यान, वसतिगृहातील गांधी या १५ वर्षाच्या मतिमंद मुलीचा ५ नोव्हेंबर २०१६ रोजी कुपोषणाने मृत्यू झाला. त्यानंतर वसतिगृहातील व्यवस्थापनातील गलथानपणा चव्हाट्यावर आला. प्रशासनाने चौकशी केल्यानंतर प्रेरणा, झेबी नावाच्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यानंतर आधार वसतिगृहाच्या अध्यक्षाला अटक झाली. तेथील ३८ विद्यार्थी निराधार झाले.

राज्यभरातील सर्व निवासी शाळेची माहिती घेऊन दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे सातारा, सोलापूर, कोल्हापूर, गडहिंग्लज, कागल, मुंबई, ठाणे येथील चांगल्या निवासी शाळेत दाखल करण्यात आले. फति‌मा या अपंग मुलीवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. तिची प्रकृती चांगली झाल्यानंतर तिला सातारा येथील स्नेहनिकेतन एकात्मिक बालगृहात दाखल करण्यात आले. सर्वच मुलांना पालकत्व मिळवून देण्यात ‌समाजकल्याण विभागाला यश आले. मात्र सरकारच्या नियमांप्रमाणे वेळोवेळी वसतिहगृहाची तपासणी न केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रलंबित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमाभागात वाढली केंद्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल तालुल्यातील पिराचीवाडी आणि सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ (ता. मिरज) येथील गर्भलिंग चाचणी, बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही आरोग्य विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलमधील गर्भपाताचे धक्कादायक प्रकरण बाहेर आल्यावर सीमाभागातील बेकायदेशीर गर्भपात केंद्रांवर कधी कारवाई होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रबोधन, जनजागृती व कडक कायदे करूनही ‘वंशाला दिवा पाहिजे’ या भावनेपोटी प्रसूतीबाबतच्या उपचारास आलेल्या कुटुंबाला शॉर्टकर्ट दाखवण्यात वैद्यकीय क्षेत्रातील काहीजण अग्रेसर आहेत. वैद्यकीय क्षेत्र हे सेवेचे असतानाही सेवेऐवजी ‘मेवा’ मिळविण्यासाठी ‘मागणी तसा पुरवठा’ यानुसार जिल्ह्यातील अनेक डॉक्टर गर्भलिंग चिकीत्सा करत आहेत. एकाद्या महिलेल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेला स्त्री गर्भ राहिल्याचे गर्भलिंग चिकीत्सेत निश्चित झाल्यावर गर्भपात करण्यासाठी काही डॉक्टरच आघाडीवर आहेत.

गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात गर्भलिंग चिकीत्सा करणाऱ्या केंद्रावर छापे पडले आहेत. त्यात सामाजिक संघटना, महिला कार्यकर्त्यांचा दबाव महत्वाचा ठरला आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी कोणतीच कारवाई करत नाहीत. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना तीन महिन्यांत प्रत्यक्ष भेट देऊन ४५ प्रसूतीगृहे तपासणाची सक्ती असताना ती कागदोपत्रीच तपासली जात आहेत. जिल्हा शल्यचिकीत्सक व आरोग्याधिकाऱ्यांना सरप्राइज व्हिजिट देण्याचे निर्देश असताना वैद्यकीय व्यवसायातील ‘व्यवसाय बंधू अथवा भगिनी’ म्हणून बेकायदेशीर गर्भलिंग चाचण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोल्हापूर शहर व तालुक्याच्या ठिकाणी कारवाई होत असल्याचे लक्षात आल्यावर सीमाभागात गर्भलिंग चिकीत्सा केंद्र सुरू आहेत. गेल्या महिन्यात कागल तालुक्यातील पिराचीवाडीतील घटना समोर आली आहे. अशीच स्थिती सीमाभागातील आडवळणाच्या गावांत दिसून येत आहे. कोल्हापूरातील महिला निपाणी भागात तर निपाणी भागातील महिला कोल्हापुरात पाठवून गर्भपात करण्याचा अदान-प्रदानाचा कार्यक्रमही काही डॉक्टर करत आहेत. दीड वर्षापूवी जुना राजवाडा पोलिसांनी जुना वाशी नाका येथे अलिशान कारमधील सोनोग्राफी मशिन जप्त केले होते. जुनी मशिन दुरुस्त करून आडवाटेत गर्भलिंग चिकीत्सा केली आहे. काही महाभागांनी तर मोबाइल व्हॅन तयार केल्या आहेत. ऑनलाइन वेबसाइट्सद्वारे चिनी बनावटीचे सोनोग्राफी मशिन मिळू शकते. या सर्वांचा वापर करून सीमाभागातील कागल, गडहिंग्लच, चंदगड, आजरा, गारगोटी परिसरात गर्भलिंग निवादन व गर्भपात केंद्रे सुरु झाली आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.


शहर... तालुका... सीमाभाग

पंधरा ते वीस वर्षापूर्वी शहरातील बहुतांशी सोनोग्राफी केंद्रावर गर्भलिंग चाचणी केली जात होती. महिला संघटनांनी बड्या डॉक्टरांच्यावर छापे टाकल्यानंतर शहरातील केंद्र तालुक्याच्या ठिकाणी हलवण्यात आले. शहरातील काही डॉक्टर कागल, भोगावती या ठिकाणी महिलांना तपासणीसाठी पाठवत असत. कोल्हापूर व कागल हे लिकिंगवर कारवाई झाल्यानंतर ग्रामिण भागात गर्भलिंग चाचणी सर्रास सुरू झाली. हॉस्पिटलमधील कंपाऊंडरनी जुनी सोनोग्राफी मशिन विकत घेऊन मोबाईल व्हॅन तयार केल्या. निर्जन वस्तीत अथवा ग्रामिण भागात हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग चाचणी व गर्भपात केंद्रे सुरू झाली. कूर (ता. भुदरगड) येथे महसूल विभागाने धाड टाकल्यावर ग्रामिण भागातील भयानक वास्तव समोर आले. त्यानंतर ही केंद्रे थेट सीमाभागात गेली. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील निपाणी, कागल, गडहिंग्लज या ठिकाणी गर्भलिंग चाचणी मोकाटपणे सुरू असून आरोग्य विभागाने गांभीर्याने छापे न टाकल्यास जिल्ह्यातील मुलींचा जननदर झपाट्याने खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅकेटमध्ये आणखी पाच डॉक्टर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे हा आपल्या अलिशान हॉस्पिटलच्या तळघरात गर्भपात करत असल्याची बाब समोर आली आहे. अन्य पाच डॉक्टरांचीही त्या ठिकाणी ये-जा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस त्यांचा शोध धेत आहेत. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील गर्भाची हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये विल्हेवाट लावली जात होती. त्याची दुर्गंधी येऊ नये, म्हणून अ‍ॅसिडचाही वापर केला जात असल्याचे समजताच पोलिसांनी सोमवारी टॉयलेटच्या टाक्या उघडून शोध घेतला. रविवारी सापडलेल्या १९ कॅरीबॅगमधील भ्रूणांची डीएनए चाचणी करुन ते स्त्रीभ्रूण होते की पुरुषभ्रूण याची पडताळणी करण्यात येत आहे. या प्रकरणाची व्याप्ती अन्य राज्यापर्यंतही जाऊ शकतो, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांना दिली.

डॉ. खिद्रापुरेचे कारनामे चव्हाट्यावर आल्यानंतर राज्यभर खळबळ माजली. अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक शिंदे, डॉक्टरांची समिती आणि अन्न, औषध प्रशासानचे सहायक आयुक्त कोडगिरे यांनी सोमवारी संयुक्तपणे हॉस्पिटलमध्ये कसून तपास केला. खिद्रापुरे आणि त्याची पत्नी या दोघांकडेही होमिओपॅथी पदवी आहे. परंतु, हॉस्पिटलमध्ये सर्व औषधे, इंजेक्शन्स अॅलोपथीची आढळली. हॉस्पिटलच्या तळघरात तीन पद्धतीने तयार केलेल्या खोल्या आढळल्या. त्यात गर्भपातासाठी आणलेल्या रुग्णाला ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, ऑपरेशन थिएटर, ऑपरेशन टेबल, प्रसुती गृह, प्रसूती टेबल, गर्भपात किंवा गर्भाशय काढतानाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे गाउन, सिम्स स्पॅक्युलम, अ‍ॅबडॉमीनल रिटॅक्टर, स्पंज होल्डर, सिझर अशी अन्य साधने आणि औषधांचा साठाही सापडला.

सोलापूर, शिराळा, कोल्हापूर यासह अनेक ठिकाणचे पत्ते नमूद असलेल्या गर्भवतींच्या फाईल्स तपास पथकाच्या हाती लागल्या आहेत.

पोलिस अधीक्षक शिंदे यांनी सांगितले की, तपासणीत डॉ. खिद्रापुरेविरोधात सबळ पुरावे हाती लागले आहेत. त्याआधारे संबधितांकडे चौकशी करण्यात येईल. २००९ पासून हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होत असल्याचे धागे सापडले आहेत. काही डॉक्टर्स तेथे येत जात होते. त्यांचाही शोध सुरु आहे.

स्वतंत्र चौकशी कमिटी

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले की, माझ्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही.आर. जाधव, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. बी. एस. गिरीगोसावी, स्त्रीरोग तज्ञ अशोक शिंदे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय सावंत यांची कमिटी प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करीत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनीही त्या ठिकाणाला भेट दिली आहे. प्राथमिक चौकशीत डॉ. खिद्रापुरे बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय कायद्यानुसार त्याच्याविरोधात वेगळे गुन्हे दाखल करण्यात येतील.

डॉ. खिद्रापुरेकडे लिंगनिदान कुठे आणि कुणी केले याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात ८१ ठिकाणी सोनोग्राफी मशीन्स आहेत. त्या मशीन्सची दर तीन महिन्यांनी तपासणी होते. परंतु, नेमक्या कोणत्या ठिकाणी लिंगनिदान केले याची माहिती मिळणे आवश्यक आहे.

खिद्रापुरेविरोधातील पूर्वीची तक्रार बेदखल

डॉ. खिद्रापुरे याचा गर्भपातांचा गोरखधंदा चव्हाट्यावर आल्यानंतर त्याच्या कारनाम्यांची माहिती हळूहळू पुढे येऊ लागली आहे. २०१४ मध्ये त्याच्याविरोधात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्ऱ्यांनी आरोग्य खात्याला चौकशीचे आदेश दिले होते. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी चौकशी करुन तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांना अहवालही दिला आहे. परंतु त्या अहवालाचे पुढे काय झाले, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

खिद्रापुरे दाम्पत्य अद्याप फरार

होमिओपॅथीची पदवी असलेला डॉ. खिद्रापुरे पत्नीसह पसार झाला आहे. त्याच्या पत्नीकडेही होमिओपॅथीचीच पदवी आहे. दोघेही पसार झाल्याने कर्मचारी, त्यांना मदत करणारे एजंटही गायब आहेत. त्यांच्या घराला कुलूप आणि हॉस्पिटल वाऱ्यावर अशी स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भपात रॅकेटचा सूत्रधार खिद्रापुरेला अटक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

बेकायदा गर्भपात करून तब्बल १९ स्त्री भ्रूणांची हत्या करणारा, सांगलीतील गर्भपात रॅकेटचा प्रमुख सूत्रधार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. सांगलीसह संपुर्ण राज्यात पाच तास शोध मोहिम हाती घेतल्यानंतर सांगली पोलिसांनी त्याला बेळगाव येथून मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.

सांगलीत गर्भपातादरम्यान स्वाती जमदाडे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान म्हैसाळ गावातील डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात करण्यात येत असल्याचं उघड झालं. स्वाती जमदाडेचा मृत्यू देखील म्हैसाळमधील याच भारती हॉस्पिटलमध्ये झाला होता. हॉस्पिटलजवळच्या परिसरात पोलिसांनी तपास केला असता त्यांना १९ मृत अर्भकं सापडली. खिद्रापुरे बीएचएमएस असून मूळचा शिरोळ मधील नरवाडचा रहिवासी आहे. मागील १० वर्षांपासून त्याचं म्हैसाळमध्ये हॉस्पिटल आहे. अनेक वर्षांपासून तो नियमबाह्य पद्धतीनं गर्भपात करत असल्याचा आरोप आहे. या व्यवसायात त्याची पत्नी देखील सहभागी असल्याची शक्यता आहे.

टॉयलेटच्या टाक्यांचा शोध घेतला

दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील गर्भाची हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये विल्हेवाट लावली जात होती. त्याची दुर्गंधी येऊ नये, म्हणून अ‍ॅसिडचाही वापर केला जात असल्याचे समजताच पोलिसांनी सोमवारी टॉयलेटच्या टाक्या उघडून शोध घेतला. रविवारी सापडलेल्या १९ कॅरीबॅगमधील भ्रूणांची डीएनए चाचणी करुन ते स्त्रीभ्रूण होते की पुरुषभ्रूण याची पडताळणी करण्यात येत आहे. या प्रकरणाची व्याप्ती अन्य राज्यापर्यंतही जाऊ शकते, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांना दिली.

गर्भपातासाठी तळघरात तीन खोल्या

डॉ. खिद्रापुरेचे कारनामे चव्हाट्यावर आल्यानंतर राज्यभर खळबळ माजली. अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक शिंदे, डॉक्टरांची समिती आणि अन्न, औषध प्रशासानचे सहायक आयुक्त कोडगिरे यांनी सोमवारी संयुक्तपणे हॉस्पिटलमध्ये कसून तपास केला. खिद्रापुरे आणि त्याची पत्नी या दोघांकडेही होमिओपॅथी पदवी आहे. परंतु, हॉस्पिटलमध्ये सर्व औषधे, इंजेक्शन्स अॅलोपथीची आढळली. हॉस्पिटलच्या तळघरात तीन पद्धतीने तयार केलेल्या खोल्या आढळल्या. त्यात गर्भपातासाठी आणलेल्या रुग्णाला ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, ऑपरेशन थिएटर, ऑपरेशन टेबल, प्रसुती गृह, प्रसूती टेबल, गर्भपात किंवा गर्भाशय काढतानाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे गाउन, सिम्स स्पॅक्युलम, अ‍ॅबडॉमीनल रिटॅक्टर, स्पंज होल्डर, सिझर अशी अन्य साधने आणि औषधांचा साठाही सापडला.

सोलापूर, शिराळा, कोल्हापूर यासह अनेक ठिकाणचे पत्ते नमूद असलेल्या गर्भवतींच्या फाईल्स तपास पथकाच्या हाती लागल्या आहेत. पोलिस अधीक्षक शिंदे यांनी सांगितले की, तपासणीत डॉ. खिद्रापुरेविरोधात सबळ पुरावे हाती लागले आहेत. त्याआधारे संबधितांकडे चौकशी करण्यात येईल. २००९ पासून हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होत असल्याचे धागे सापडले आहेत. काही डॉक्टर्स तेथे येत जात होते. त्यांचाही शोध सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेत आवाज महाराष्ट्राचा

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com

Tweet : @gurubalmaliMT

कोल्हापूर ः अडीच वर्षांत राज्यातील खासदारांनी महाराष्ट्राचा आवाज लोकसभेत चांगलाच घुमवला आहे. ‘टॉप टेन’ मध्ये राज्यातील तब्बल नऊ खासदार आहेत. लोकसभेतील उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि चर्चेतील सहभाग याचा आढावा घेत पीआरएस संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात खासदारांचा लेखा​जोखा मांडला आहे. राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेच्या खासदारांनीही आपला आवाज दिल्लीत पोहचवला आहे.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-मित्रपक्षाचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. या अडीच वर्षांतील संसद अधिवेशनात खासदारांनी सरकारला अनेकदा धारेवर धरले. तरीही विरोधी पक्ष म्हणून काँग्रेससह इतर कोणत्याही पक्षाची भूमिका प्रभावी दिसली नाही. पण राज्यातील खासदारांनी लोकसभेत चांगलाच आवाज उठवला. पार्लमेंटरी रेटिंग सिस्टम (पीआरएस)च्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत मराठी खासदारांनी विविध प्रश्नावर चांगली चर्चा घडवून आणली. राज्याच्या आणि विशेषतः कोल्हापूरच्यादृष्टी​ने कौतुकाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांची देशात टॉप वन खासदार म्हणून नोंद झाली आहे. तर सुप्रिया सुळे टॉप टू ठरल्या आहेत. टॉप टेनमध्ये तब्बल नऊ खासदार महाराष्ट्रातील आहेत ही विशेष आनंदाची बाब आहे.

७०४ प्रश्न विचारत टॉप वनवर पोहचलेल्या म​हाडिक यांच्यापाठोपाठ टॉप टू असणाऱ्या सुळे यांनी ७०३ प्रश्न विचारले आहेत. २९ वेळा चर्चेत सहभागी झालेल्या सुळे यांची सभागृहातील उपस्थितीही अत्यंत चांगली म्हणजे ९५ टक्के आहे. मावळ मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले श्रीरंग भर्णे टॉप थ्रीमध्ये असून सेनेचेच शिवाजीराव आढळराव-पाटील त्यांच्या पाठोपाठ आहेत. राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील चार खासदार असून, तीन खासदार टॉप टेनमध्ये आहेत. एकीकडे हे तीन खासदार संसद गाजवत असताना चौथे खासदार उदयनराजे भोसले यांनी अडीच वर्षांत एकही प्र्रश्न विचारला नाही. चर्चेत भाग घेतलेला नाही.

राष्ट्रवादीच्या बरोबरीने शिवसेनेच्या खासदारांची प्रगतीही अतिशय चांगली आहे. टॉप टेनमध्ये सेनेचे श्रीरंग भर्णे, शिवाजीराव पाटील, आनंदराव आडसूळ व गजानन कीर्तीकर यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या दोन खासदारांपैकी राजीव सातव हेही टॉप टेनमध्ये आहेत. त्यांनी ६७६ प्रश्न विचारले. सत्तेवर असलेल्या भाजपच्या एकमेव खासदार हीना गावित यांचा चर्चेत सहभाग दिसतो. टॉप टेनमध्ये उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव या राज्याबाहेरील एकमेव खासदारांचा समावेश आहे. दहा ते वीस क्रमांकामध्ये देखील राज्याचे खासदार आघाडीवर आहेत. यामध्ये विनायक राऊत, राहुल शेवाळे, अशोकराव चव्हाण, सुनील गायकवाड, श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. १ जून २०१४ ते ९ फेब्रुवारी २०१७ या काळातील कामाचा हा लेखाजोखा आहे. जिल्हा राज्य ते केंद्रीय पातळीवरील प्रश्नांचा यामध्ये समावेश आहे.



खासदार पक्ष प्रश्न चर्चेतील सहभाग उपस्थिती

धनं​जय महाडिक राष्ट्रवादी ७०४ २९ ६९

सुप्रिया सुळे राष्ट्रवादी ७०३ ५६ ९५

श्रीरंग भर्णे शिवसेना ६९५ १९५ ९२

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना ६७८ १८ ६५

विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी ६७८ ० ६५

राजीव सातव काँग्रेस ६७६ ० ८०

धर्मेंद्र यादव समाजवादी पक्ष ६५२ ४३ ८२

आनंदराव अडसूळ शिवसेना ६४१ ३६ ८७

गजानन किर्तीकर शिवसेना ६४१ ५३ ८०

हीना गावित भाजप ६१८ ७९ ७९

……………………


राजू शेट्टी २८२ ३० ७५

संजयकाका पाटील १३६ ७ ५७

उदयनराजे भोसले ० ० २९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खिद्रापुरेसह आरोपींवर कडक कारवाई करूगृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही

$
0
0

दोषींवर कडक कारवाई

गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, मिरज

‘डॉ. खिद्रापुरेच्या भ्रूणहत्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,’ अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. म्हैसाळ येथील खिद्रापुरेच्या हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

सांगली जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या भ्रूणहत्या प्रकरणाचे विधिमंडळात पहिल्याच दिवशी संतप्त पडसाद उमटल्याने गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत म्हैसाळकडे धाव घेतली. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास केसरकर म्हैसाळमध्ये दाखल झाले. सदर हॉस्पिटलची त्यांनी पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणी दोषी असलेल्या डॉ. खिद्रापुरे यांच्यासह सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल. यातून कोणीही सुटणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही केसरकर म्हणाले.

चौकशी समितीत बदल करू

खिद्रापुरे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीतील वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती केल्याबाबत विचारणा केली असता या संबंधी योग्य ती काळजी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून समितीत बदल करण्यात येईल, असेही केसरकर म्हणाले.
म्हैसाळ कडकडीत बंद

मिरज

म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भलिंग निदान आणि भ्रूणहत्या प्रकरणी म्हैसाळकरानी मंगळवारी कडकडीत बंद पाळला. या प्रकरणातील प्रमुख संशयित खिद्रापुरेसह सहभागी अन्य आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील स्वाती प्रविण शिंदे, या विवाहितेचा म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापूरे याच्या दवाखान्यात बेकायदा गर्भपात करीत असताना अती रक्तस्रावाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतरच्या अधिक तपासात समोर आलेल्या करनाम्याने म्हैसाळकर व्यथित झाले आहेत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या निंदनीय कृत्याचा निषेध करण्यासाठी म्हैसाळकरानी आपले सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवून आपला संताप व्यक्त केला. व्यापारी असोसिएशन, शिवसेना, शिवप्रतिष्ठान, सकल मराठा मंडळ यांच्यासह इतर प्रमुख संघटना आणि संस्थानी आपले व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
खिद्रापुरेच्या चौकशीचा फार्स

मिरज

डॉ. खिद्रापुरे याच्या या काळ्या कृत्याविरुद्ध २०१६मध्ये निनावी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी एक समितीही नेमून चौकशीचे आदेश दिले होते. पण, या समितीने चौकशीचा केवळ फार्स पूर्ण केल्याचे समोर येत आहे.

चौकशी समितीने असे कृत्य करीत नसल्याचे डॉ. खिद्रापुरे याने लिहून दिले होते. चौकशी समितीनेही डोळे झाकून त्याच्या या खुलाशावर विश्वास ठेवून चौकशी बंद केली होती. त्याचवेळी आपले कर्तव्य पार पाडण्याचे काम या समितीने गांभीर्याने केले असते तर आज एका महिलेचा बळीही गेला नसता. दरम्यानच्या काळातील भ्रूणहत्याही टळल्या असत्या. आता नव्याने नेमलेल्या चौकशी समितीत यातीलच एक डॉक्टर चौकशी समितीचा सचिव असल्याचे समजते. त्यामुळे या चौकशीबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

भ्रूणहत्या प्रकरणात खिद्रापुरेसह आणखी किती जणांचा सहभाग आहे, हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिस आणि आरोग्य विभागापुढे आहे. गेल्या १२-१३ वर्षांपासून म्हैसाळ येथे भरती हॉस्पिटल नावाने डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याने आपला व्यवसाय सुरू केला. व्यवसायाचा जम बसल्यावर दोन-तीन वर्षांतच म्हणजे सुमारे आठ-नऊ वर्षांपासून कायदा धाब्यावर बसवून गर्भलिंग चाचणी आणि बेकायदा गर्भपात करण्याचा उद्योग त्याने सुरू केल्याचे पुढे येत आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह-कर्नाटकातून पेशंट

मुलगी नको-मुलगाच हवा, या हट्टाने वेडी झालेली अनेक जोडपी मिरज-सांगली-सोलापूर-कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातून डॉ. खिद्रापुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये येत असल्याची चर्चा आहे. तसेच हा उद्योग वाढविण्यासाठी डॉ. खिद्रापुरे याने काही शहरांमध्ये दलाल नेमल्याचीही कुजबुज आहे. या व्यवसायातून खिद्रापुरे याने अमाप संपत्ती मिळविली असून, तीन मजली टोलेजंग हॉस्पिटलची इमारत बांधली आहे. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक, महागडी यंत्रसामुग्री बसविली आहे. हॉस्पिटल सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व सरकारी परवानग्या व प्रमाणपत्रे न घेताच हा व्यवसाय बिनधास्तपणे गेली अनेक वर्षे डॉ. खिद्रापुरे करीत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ बीएचएमएस असताना राजरोस शस्त्रक्रिया व गर्भपात करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिचारकांच्या घरावर सैनिक पत्नींचा मोर्चा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या कुटुंबियांबाबत काढलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ करण्यासाठी सैनिक पत्नी आणि माजी सैनिकांनी परिचारकांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. या मोर्च्यात कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सैनिक पत्नी आणि माजी सैनिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

सोमवारी रात्रीपासून शेकडोंच्या संख्येने माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय पंढरपूरमध्ये निषेध मोर्चासाठी दाखल होत होते. त्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. मंगळवारपी सकाळी अकरा वाजता शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. परिचारकांच्या आमदारकीचा राजीनामा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा घोषणा देत हा मोर्चा प्रदक्षिणा मार्गावरून आमदार परिचारक यांच्या घराकडे मार्गस्थ झाला. आंदोलक घराकडे गेले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा मोर्चा महाद्वार चौकात रोखून धरला. मोर्चा रोखल्यावरून पोलिस आणि आंदोलकांत तणाव निर्माण झाला होता. शेवटी आंदोलकांनी या चौकात सभा घेऊन आमदार परिचारक यांचा जाहीर निषेध करून नायब तहसीलदार सीमा सोनावणे यांना निवेदन दिले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. किरवले खूनप्रकरणी ४० जणांचे जबाब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी ४० जणांचे जबाब नोंदवले. यात किरवले यांच्या पत्नी कल्पना यांचाही समावेश आहे. पोलिसांनी राजेंद्रनगरातील अरिहंत पार्क परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. त्याचीही पाहणी सरू आहे. गुन्ह्याबाबत संशयित आरोपी प्रीतम पाटील याच्या चौकशीचे कामही सुरू आहे.

प्रा. किरवले यांची शुक्रवारी (ता. ३) त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने संशयित आरोपी प्रीतम पाटीलला अटक केली. त्याचबरोबर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणारी त्याची आई मंगला पाटील यांनाही अटक केली. घरखरेदीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी इतरही कारणांचा शोध सुरू आहे. यासाठी पोलिसांनी मंगळवारी डॉ. किरवले यांच्या पत्नी कल्पना यांच्यासह ४० जणांचे जबाब नोंदवले. त्यांचा जबाब अडीच तास सुरू होता. दरम्यान, किरवले यांच्या हत्येनंतर हल्लेखोर कोणत्या मार्गाने फरार झाला. त्याच्यासोबत आणखी कोण होते याची माहिती घेण्यासाठी राजेंद्रनगर, प्रतिभानगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

माहिती देण्याचे आवाहन

डॉ. किरवले यांच्या हत्येसंदर्भात कोणाकडे काही माहिती असल्यास तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक भरतकुमार राणे यांच्याकडे किंवा पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुटुंबीयांना पोलिस संरक्षण द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. वैयक्तिक कारणांसह सामाजिक दृष्टिकोनातूनही पोलिसांनी याचा तपास करावा. तपासाबाबत यंत्रणा गंभीर असून आरोपी शिक्षेपर्यंत पोहोचतील’ असे सांगत ‘किरवले कुटुंबीयांना पोलिस संरक्षण द्यावे’, अशी सचना अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी केली. मंगळवारी (ता. ७) थूल यांनी किरवले कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.

आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. कृष्णा किरवले यांच्या हत्येची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. ही हत्या घरखरेदीच्या आर्थिक वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज असला तरीही हत्येमागील कोणतेही कारण निसटू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. यापर्श्वभूमीवर मंगळवारी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी किरवले कुटुंबीयांची भेट घेतली. न्यायमूर्ती थूल म्हणाले, ‘डॉ. किरवले हत्या प्रकरणी वैयक्तिक कारणांसह सामाजिक दृष्टिकोनातून तपास करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, उपअधिक्षक भरतकुमार राणे, समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, विष्णू किरवले उपस्थित होते.

अधिकाऱ्यांसोबत बैठक

किरवले कुटुंबीयांची भेट घेण्यापूर्वी शासकीय विश्रामगृहावर न्यायमूर्ती थूल यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक तांबडे, पोलिस उपअधीक्षक राणे, सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्यासमवेत बैठक घेतली. किरवले कुटुंबीयांना न्याय मिळेल यादृष्टीने आवश्यक कारवाई करण्याची सूचना त्यांनी बैठकीत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यू दाखल्यासाठी दोन हजारांची लाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या कार्यालयात सलग दुसऱ्या आठवड्यात लाचखोर कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. मृत्यू दाखला देण्यासाठी २ हजार रुपये घेताना एसीबीच्या पथकाने रेकॉर्ड विभागातील शिपाई लक्ष्मी जिवाजी चव्हाण (वय ५८, रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ) यांना रंगेहात पकडले. रेकॉर्ड विभागात मंगळवारी (ता. ७ मार्च) दुपारी दोन वाजता सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार महिलेने शेतीकामासाठी चार नातेवाईकांच्या मृत्यूच्या दाखल्यांसाठी महापालिकेच्या रेकॉर्ड विभागाकडे अर्ज केला होता. अर्ज दिल्यानंतर त्यांनी १६ जानेवारी आणि ४ फेब्रुवारीला रेकॉर्ड विभागात जाऊन शिपाई लक्ष्मी चव्हाण यांच्याकडे मृत्यूचे दाखले देण्याची विनंती केली. चव्हाण यांनी टाळाटाळ करून जुने रेकॉर्ड सापडत नसल्याचे सांगितले. दाखल्यांसाठी त्यांनी ३५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर २००० रुपायांच्या बदल्यात मृत्यू दाखले देण्याचे ठरले. तक्रारदार महिलेने याबाबत एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. पोलिस उपअधीक्षक राजेश गवळी आणि पद्मा कदम यांनी तक्रारीची पडताळणी करून मंगळवारी दुपारी महापालिकेत सापळा रचला. दुपारी दोनच्या सुमारास तक्रारदार महिलेकडून दोन हजार रुपये स्वीकारल्यानंतर पथकाने चव्हाण यांना रंगेहात पकडले. पोलिस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी लाचखोर शिपाई लक्ष्मी चव्हाण यांना ताब्यात घेतले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू होती. चव्हाण यांनी घेतलेली लाचेची रक्कम स्वतःसाठी की, इतर कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून घेतली याची चौकशी सुरू आहे.

गेल्याच आठवड्यात महापालिकेत कुंदन लिमकर हा लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडला होता. सलग दुसऱ्या आठवड्यात लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली. पद्मा कदम यांच्यासह पोलिस निरीक्षक सुनील वायदंडे, श्रीधर सावंत, मोहन सौंदत्ती, संदीप पावलेकर, सर्जेराव पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

कारवाईनंतर रडू कोसळले

लक्ष्मी चव्हाण शिपाई पदावर कार्यरत आहेत. विभागातील मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नोंदी शोधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका महिलेच्या तक्रारीनंतर महापालिकेतील महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडली. एसीबीच्या पथकातील उपअधीक्षक पद्मा कदम यांनी चव्हाण यांना ताब्यात घेताच त्यांना रडू कोसळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान समिती बरखास्त करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील भ्रष्टाचार प्रकरणी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दोन महिन्यांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरखास्त करावी, अशी मागणी श्रीमहालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी मंगळवारी केली.

हिंदु विधिज्ञ परिषदेने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील भ्रष्टाचाराला वाचा फोडली होती. यात देवस्थानच्या २५ हजार एकर जमिनीपैकी तब्बल ८ हजार एकर जमीन गायब असणे, देवीच्या चांदीच्या रथामध्ये संजय साडविलकर याने केलेला घोटाळा, दागिन्यांचा हिशोब नसणे, खाणकाम रॉयल्टीत अपहार आदी अनेक प्रकारच्या भ्रष्टाचारांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले; मात्र ही चौकशी कासवाच्या गतीने चालू आहे. दोषींवर विनाविलंब आणि कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समितीने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाउंड्रीतही राबतात महिलांचे पोलादी हात

$
0
0

Raviraj.gaikwad@timesgroup.com

Twitter - @rg_ravirajMT

दुपारच्या जेवणाचा डबा घरातून न्यायचा. केएमटी बसने कागल एमआयडीसी गाठायची. सकाळी आठ वाजता तेथील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये पोहचायचे. दिवसभर काम करायचे आणि चार वाजता बाहेर पडायचे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमधील धातूतंत्र प्रबोधिनीच्या कॉलेजमध्ये पोहचायचे. तेथे पाच ते नऊ कॉलेज करायचे आणि रात्री नऊनंतर घरी जायचे. हा दिनक्रम एखाद्या कामगाराचा नाही. तर फाउंड्रीतील कामाचे प्रशिक्षण घेत काम करणाऱ्या मुलींचा आहे. सध्या राजारामपुरी परिसरातील सहा मुली पुरुषांचेच क्षेत्र समजल्या जाणाऱ्या फाउंड्रीत काम करून स्वतःच्याच नव्हे, तर तमाम स्त्रीयांची पो‌लादी क्षमता सिद्ध करत आहेत.

धनश्री श्रीपती माने, संध्या शिवाजी घुणकीकर, शीतल मारुती चौगुले, ऐश्वर्या सुरेश कुंभार, शिवानी सुरेश नलवडे, बेबी राजेंद्र टकले या मुलींनी करिअरची नवी वाट धुंडाळली आहे. प्रबोधिनीतील कास्टिंग डेव्हलपमेंट अँड क्वालिटी अश्युअरन्स या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला आहे. अभ्यासक्रमाचे वर्ष पूर्ण केल्यानंतर पाच मुलींना कागलमधील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये सीएसआर उपक्रमातून नोकरी मिळाली. एआयसीटीकडून स्किल नॉलेज प्रोव्हायडर म्हणून मान्यता मिळालेली कंपनी मुलींना महिन्याला सहा हजार मानधन देते. त्याचबरोबर त्यांच्या तीन वर्षांच्या कोर्सची फीची जबाबदारीही कंपनीनेच उचलली आहे.

काम करण्याला घरच्यांनी किंवा इतर नातेवाईकांनी विरोध केला नाही का? या प्रश्नावर मुली म्हणाल्या, ‘सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता. पण, मेकॅनिकल डिपार्टमेंटचे दत्ता सुतार यांनी व प्रबोधिनीचे मुख्य समन्वयक एस. एम. मांडरे यांनी घरच्यांची भेट घेऊन त्यांना समजावल्यानंतर घरचेही तयार झाले. आज घरीच नव्हे, तर आमच्या शेजाऱ्यांकडूनही आम्हाला वेगळा सन्मान मिळतो आहे.’ काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशानेच हे क्षेत्र निवडल्याचे या मुली सांगतात. जिल्ह्यात जवळपास २८० फाउंड्री आहेत. त्यात काम करणाऱ्या या मुलींची संख्या प्रातिनिधीक असली तरी इतर मुली आणि महिलांना प्रोत्साहन देणारी नक्कीच आहे.

‘कुठेही काम करू शकतो’

कारखान्यामध्ये इतर विभागांत महिला आहेत. पण, कोअर मशिन ऑपरेट करणाऱ्या या चौघीच आहेत. त्यात चार मशिन चौघीजणी स्वतंत्रपणे हाताळतात. मशिनसाठी लागणारे दहा ते चौदा किलोचे कोअर उचलले कष्टाचे असते. आता त्याचे काही वाटत नाही, असे या मुली आत्मविश्वासाने सांगतात. कोअर मशीनबरोबरच मेल्टिंग पॉइंट, मोल्डिंग, असेंब्लीचे कामही मुलींनी शिकून घेतले आहे. यातील कोणत्याही विभागात सक्षमपणे काम करू शकतो, असा विश्वास त्या व्यक्त करतात.

===
सीएसआरच्या माध्यमातून आम्ही मुलींची जबाबदारी उचलली आहे. कंपनी आउट ऑफ वे जाऊन मुलींना सहकार्य करते. चारपैकी एका युनिटमध्ये केवळ महिलांनी काम करावे, असे आमच्या कंपनीचे स्वप्न आहे.

- गिरीष श्रीखंडे, एचआर विभागप्रमुख घाटगे-पाटील इंडस्ट्रीज

===

या मुलींना दहावीत ७० टक्के गुण आहेत. या मुली मात्र खूप सीन्सिअर आहेत. त्यांची प्रगती खूप चांगली आहे. यातील एका मुलीने कंपनीत चांगल्या अटेंडन्ससाठी बक्षीसही मिळवले आहे.

एस. एम. मांडरे, मुख्य समन्वयक, धातूतंत्र प्रबोधिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेपाळच्या सीमेवरून विवाहितेची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून अल्लाउद्दीन अन्सारी याच्यासोबत उत्तरप्रदेशात निघून गेलेल्या तरुणीला जुना राजवाडा पोलिसांनी तिच्या बाळासह नेपाळच्या सीमेवरून सुखरुप परत आणले. पोलिसांनी आठवडाभर शोध घेतल्यानंतर सीमेवरील कंटीछप्रा गावात ती सापडली. मात्र तिला फूस लावून घेऊन पळालेला संशयित अन्सारी पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिस हवालदार दिलीप सुतार आणि सुहास पोवार यांनी तपासात दाखवलेल्या तत्परतेमुळेच परराज्यात गेलेली तरुणी घरी परतली.

कळंबा जेलसमोरील मोहिते कॉलनीत राहणारी राधिका पंडित केणे (वय २१) हिचा दोन वर्षांपूर्वी पंडित केणे याच्याशी विवाह झाला. पंडितला नोकरी नसल्याने राधिकाच्या वडिलांनी त्याला शहरातील एका हॉटेलमध्ये काम मिळवून दिले. मुलीला आणि जावयाला त्यांनी कळंबा जेलसमोरील आपल्या घरात राहायला जागा दिली. कपिलतीर्थ मार्केटमध्ये राधिकाच्या वडिलांची वडापावची गाडी आहे. त्यामुळे ते दररोज पहाटे पत्नीसह घराबाहेर पडतात. रात्री उशिरा घरी परतत. तिचा पती पंडितही सकाळी लवकर हॉटेलमध्ये जाऊन रात्री उशिरा घरी परतायचा. पती व्यसनी असल्याने या दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होत होते. गर्भवती राधिका व्यसनी पतीला कंटाळली होती. सतत वादाला कंटाळून घर सोडून जाण्याचा तिचा विचार होता. दरम्यान, घराजवळचच टेलरकाम करणारा अल्लाउद्दीन अन्सारी (वय ४०, मूळ रा. कंटीछप्रा, उत्तरप्रदेश) याच्याशी तिची ओळख झाली.

अन्सारी हा २३ डिसेंबर २०१६ रोजी राधिकाला फूस लावून घेऊन पळाला. २४ डिसेंबरला याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी अन्सारीच्या मोबाइल लोकेशनवरून दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अन्सारीसह राधिकाचाही मोबाइल बंद असल्याने त्यांचा ठावठिकाणा मिळाला नव्हता. देशमुख यांनी हवालदार दिलीप सुतार आणि सुहास पोवार यांच्याकडे तपास सोपवला. दोघांनी अन्सारीच्या इतर नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एक महिन्यापूर्वी अन्सारीचा मोबाइल सुरू झाल्याने त्याचे लोकेशन मिळाले. अन्सारी नेपाळच्या सीमेलगत असल्याचे स्पष्ट होताच पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या परवानगीने पोलिस खासगी वाहनाने कंटीछप्राला पोहोचले. स्थानिक पोलिसांच्य मदतीने त्यांनी अन्सारीच्या घराची झडती घेतली. तेथे राधिका आणि तिचे एक महिन्याचे बाळ आढळले. पोलिसांनी तिला बाळासह ताब्यात घेतले, पण अन्सारी सिमल्याला पळाला. जुना राजवाडा पोलिसांच्या तत्परतेमुळे राधिकाची सुटका होऊ शकली.

नेपाळच्या सीमेलगत राधिकाची डिलेव्हरी

अन्सारी आणि राधिका हे कोल्हापुरातून पुण्याला गेले. पुण्यातून सिमला, कुशीनगर असा रेल्वेचा प्रवास करत ते उत्तरप्रदेशमधील नेपाळ सीमेलगतच्या कंटीछप्रा गावात पोहोचले. पंधरा दिवसांत राधिकाची डिलेव्हरी झाली. ती कंटीछप्रा येथे अन्सारीची पत्नी आणि अन्सारीच्या चार मुलींसह राहत होती. अतिशय दुर्गम, मागास परिसरात हे कुटुंब राहत होते.

अन्सारीच्या हेतूबद्दल शंका

पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या राधिकाला फूस लावून पळवल्यानंतर अन्सारी तिला घेऊन थेट नेपाळ सीमेलगतच्या घरी पोहोचला. आधीच लग्न झालेले आणि चार मुली असूनही त्याने राधिकाला पत्नीसोबतच घरी ठेवले. त्यामुळे अन्सारीच्या हेतूबद्दल पोलिसांची शंका बळावली आहे. मुलींना फूस लावून पळवून त्यांना वाममार्गाला लावण्याचे प्रकार घडतात या अनुषंगाने तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रूरकर्मा डॉ. खिद्रापुरेला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

म्हैसाळ येथे बेकायदेशीरपणे गर्भपात करणारा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे मंगळवारी पहाटे मिरज ग्रामीण पोलिसांना शरण आला. कोर्टाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. खिद्रापुरेच्या गोरखधंद्याला हातभार लावणाऱ्या अन्य डॉक्टरांची नावे पोलिस तपासात समोर आली आहेत. त्याचबरोबर लिंगनिदान करणारी काही सोनोग्राफी सेंटर्सही पोलिसांच्या यादीवर येत आहेत. दरम्यान हॉस्पिटलचया परिसरात पालापाचोळ्याखाली लपविलेले अद्ययावत एक्सरे मशिनही मंगळवारी पोलिसांनी शोधून काढले.

म्हैसाळमध्ये भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भाशय काढण्याची शस्रक्रीया करणाऱ्या डॉ. खिद्रापुरेबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, ‘आरोपी डॉ. खिद्रापुरे गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला. तो जेथे जात होता तेथे पोलिस पथकांचा पाठलाग सुरु होता. अखेर चारही बाजूनी पोलिस पथकांनी घेरल्याने त्याला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मंगळवारी पहाटे तो स्वतःहून मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याच्या हॉस्पिटलमध्ये स्वाती प्रविण जमदाडे (वय २६) या महिलेचा मृत्यू गर्भपात करतानाच ओढावल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांना भक्कम पुरावे मिळाले आहेत. शास्त्रीय पुराव्यांसाठी वैद्यकीय चाचण्यांची मदत घेतली जात आहे. खिद्रापुरेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे त्या सर्वांची सखोल चौकशी करू.’

ते म्हणाले, ‘खिद्रापुरेकडे गर्भपातासाठी रुग्ण आणला जाण्यापूर्वी संबंधित रुग्णांच्या गर्भलिंगनिदान कुठे केले जात होते, हा प्रश्न महत्त्वाचा होता. त्या अनुषंगाने सोनोग्राफी सेंटर्स आणि काही व्यक्तींची चौकशी सुरु आहे. खात्रीशीर माहिती मिळत असली तरी पुरावे हाती लागणे महत्त्वाचे आहे. तसे सबळ पुरावे मिळताच संबधितांवर कारवाई केली जाईल.’

तपासणीयोग्य नमुने सात कॅरीबॅगमध्ये

गर्भपातासाठी आल्यानंतर रुग्णाला तळघरातील खोलीत नेले जात असे. त्या ठिकाणी विशिष्ट गोळी दिली जाई. तीन तास रुग्णाला ठेवून गर्भपात झाल्यानंतरच रुग्णाला बाहेर सोडले जात असे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले, ‘म्हैसाळच्या ओढ्याकाठी सापडलेल्या १९ भ्रूणांपैकी काही कॅरीबॅगमध्ये मांसाचे आणि हाडांचे तुकडे होते तर काही कॅरीबॅगमध्ये द्रवरुपी पदार्थ असल्याचे समोर आले. त्यापैकी सात कॅरीबॅगमध्ये तपासणीयोग्य नुमुने सापडले आहेत. त्यांची डीएनए फिंगर प्रिंट तंत्रप्रणालीच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल. त्यानंतरच ते भ्रूण स्त्री की पुरुष जातीचे होते, हे समोर येणार आहे. ’

कमी कालावधीचे गर्भाचे तुकडे करुन शौचालयात टाकले जात होते. त्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यावर अ‍ॅसिड टाकले जात होते. त्याचे पुरावे जमा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालापाचोळ्यात आढळले अद्ययावत एक्सरे मशीन

भारती हॉस्पिटलच्या मागे पालापाचोळ्याखाली लपविलेले अद्ययावत एक्सरे मशिन सापडले आहे. ते २०१६ मध्ये हॉस्पिटलविरुद्ध आलेल्या तक्रारीची तपासणी करताना लपविले होते की, १ मार्चला गर्भपात करताना महिला दगावल्यानंतर लपविले आहे, याबाबतचा तपास सुरु आहे. अशी आणखी यंत्रे लपविली आहेत का? याची माहिती डॉ. खिद्रापुरेच्या तपासातून पुढे येण्याची शक्यता आहे.


खिद्रापुरेप्रकरणात यंत्रणेचा बेजबाबदारपणा

म्हैसाळमधील गर्भपात प्रकरण अतिशय गंभीर, संताप आणणारे आणि निंदनीय आहे. अक्षम्य असा गुन्हा करणाऱ्या डॉ. खिद्रापुरेच्या हॉस्पिटलबाबत यापूर्वी तक्रार आलेली होती. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडील यंत्रणेने जबाबदारीने काम केलेली नाही, हे उघड झाले आहे. चौकशीत जाणीवपूर्वक कमकुवत ठेवणाऱ्या संबधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकारांना दिली.


म्हैसाळ बंद कडकडीत बंद

दरम्यान, डॉ. खिद्रापुरेच्या कृत्याच्या निषेधार्थ म्हैसाळकरानी मंगळवारी कडकडीत बंद पाळला. या प्रकरणातील प्रमुख संशयित खिद्रापुरेसह सहभागी अन्य आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.


म्हैसाळमधील प्रकार संतापजनक आणि वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारा आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

- दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख विद्यार्थ्यांची परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालेय प्रवासानंतरच्या करिअरचे पहिले वळण असलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारी प्रारंभ झाला. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी मराठीची परीक्षा दिली. दरम्यान, कोल्हापूर विभागातून एक लाख ५१ हजार ६४२ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. एकूण ३५१ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीच्या परीक्षेसाठी यंत्रणा कार्यरत झाली. कोल्हापूर विभागातील कोल्हापूरसह सांगली व सातारा या जिल्ह्यात ४४ परिरक्षक केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक विभागासाठी सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ताणमुक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी समुपदेशकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर बोर्डातर्फे विशेष लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळी दहा वाजल्यापासूनच विद्यार्थी परीक्षा केंद्रांच्या आवारात जमण्यास सुरूवात झाली. परीक्षा क्रमांक आणि परीक्षागृह यांची माहिती घेण्यात काही विद्यार्थी दंग झाले. काही विद्यार्थी पालकांसमेवत तर काही विद्यार्थी ग्रुप करून परीक्षेसाठी आले होते. विद्यार्थिंनींसोबत मात्र पालकांनीच परीक्षा केंद्रांपर्यंत येण्यास प्राधान्य दिल्यामुळे सकाळी अकरा ते दोन या वेळेत केंद्राबाहेर पालक थांबल्याचे चित्र दिसले.

उपनगर किंवा लांब पल्ल्याच्या अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालकांनी रिक्षा व खाजगी वाहनांची व्यवस्था केल्यामुळे शाळांबाहेर वाहनांची गर्दी झाली. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शाळांच्या परिसरात सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत वाहतुकीची कोंडी झाली.

संवेदनशील केंद्रावर वॉच

शिक्षण मंडळाच्यावतीने विभागातील संवेदनशील व गैरप्रकारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या केंद्राची यादी तयार करण्यात आली असून या केंद्रावर भरारी पथकाचा वॉच राहणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण, मिरज तालुक्यातील एरंडोली, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, भवानीनगर, उमदी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर, किणी, पारगाव आणि मुरगूड या केंद्रांचा समावेश आहे. तर सातारा जिल्ह्यातील परळी, वाघोली, वाठार किरोली, सांगली जिल्ह्यातील मालगाव, शिराळा, वाळवा, येलूर, कुची, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, परिते, शाहूनगर, सोळांकूर ही केंद्रे उपद्रवी केंद्र म्हणून नोंद करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर होणार सिलिंडरमुक्त

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com
Tweet : @gurubalmaliMT

कोल्हापूर : केंद्राच्या पीएनजी गॅस वितरण योजनेत कोल्हापूर शहराचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दाभोळ ते बंगळुरू यांदरम्यानच्या मुख्य गॅस वितरण वाहिनीला उपवाहिनीद्वारे कोल्हापूरला स्वयंपाकासाठीच्या गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात शहर सिलिंडरमुक्त होण्याची शक्यता आहे. खासदार संभाजीराजे यांनी केंद्राच्या पेट्रोलियम खात्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले. यामुळे लाखावर कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे.

केंद्र सरकारच्या पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस नेटवर्ग) या प्रकल्पाचे चार वर्षापूर्वी तत्कालिन पंतप्र्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते उदघाटन झाले. १४१४ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. दाभोळ ते बंगळुरू दरम्यान पाइपलाइनद्वारे गॅस वितरण करण्याचा हा प्रकल्प आहे. ही पाइपलाइन कोल्हापूर शहराच्या शेजारून गेली आहे. पण, त्याचा कोल्हापूरला उपयोग होत नाही. कारण, त्यातून कोल्हापूरला गॅस देण्यात येत नाही. या गॅसचा उपयोग केवळ औद्योगिक वापरासाठी होते. आता मात्र गॅस पाइपलाइनला उपवाहिनी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेर्ले येथून उपवाहिनीव्दारे हा गॅस शहरात आणण्यात येईल. तो घराघरांत पाइपलानव्दारे पुरवठा करण्यात येईल. खासदार संभाजीराजे यांनी दोन ​महिन्यांपूर्वी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर त्याला गती आली. प्रधान यांनी ‘गॅस अॅथॉरटी ऑफ इंडिया’ची याबाबत बैठक घेतली. त्यामध्ये चर्चेनंतर कोल्हपूरच्या नव्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. या प्रकल्पांतर्गत कोल्हापूर एक छोटा प्रकल्प उभारण्यात येईल, त्याव्दारे शहरात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा होईल. यामुळे शहर सिलिंडरमुक्त होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाची तातडीने निविदा काढण्यात येणार असल्याने लवकरात लवकर प्रकल्प कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत.

छोट्या शहरांनाही लाभ शक्य

गॅस पाइपलाइन प्रकल्पाचा उपयोग केवळ मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरांनाच होणार होता. कोल्हापूरचा प्रकल्प मंजूर झाल्याने इतर काही शहरांनाही याचा लाभ होण्याची शक्यता आहे. इचलकरंजी, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, धारवाड, बेळगाव, गदग या शहरांतदेखील असा उपप्रकल्प उभारण्याची शक्यता आहे. तसे प्रस्ताव आल्यास त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

गॅस वितरणाच्या साडेचार हजार कोटींच्या प्रकल्पाची ही गॅसवाहिनी कोल्हापूरशेजारील हेर्ले येथून गेली आहे. पण याचा शहराला काहीच उपयोग होणार नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे याबाबत मी पाठपुरावा केला. पेट्रोलियम मंत्रालयाने मान्यता दिल्याने शहरातील घराघरात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्यात येईल. वर्षभरात प्रकल्प सुरू व्हावा यासाठी यापुढेही पाठपुरावा करू.

संभाजीराजे छत्रपती, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईतून ३४५ विद्यार्थ्यांना प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोफत व सक्तीच्या शिक्षणाधिकार कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या फेरीसाठी मंगळवारी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. या फेरीत ३४५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. या लॉटरी सोडतीसाठी दुधाळी येथील मामा भोसले विद्यालयात पालकांची गर्दी झाली.

आरटीई कायद्यानुसार प्राथमिक व पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये या कायद्याअंतर्गत प्रवेश देण्यासाठी ३२८६ जागा आहेत. यामध्ये ३२१ पात्र शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.

यामध्ये जिल्हा परिषदेच्या २७८ व महापालिकेच्या ४३ शाळांचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये १३२६ ऑनलाइन अर्ज मिळाले होते. मात्र ३४ शाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे पहिल्या फेरीसाठी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. बुधवारी प्रवेश निश्चितीबाबत विद्यार्थ्यांना कळवण्यात येणार आहे. २० मार्चनंतर प्रवेशाची दुसरी फेरी होणार आहे. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, उपशिक्षणाधिकारी ए. जी. मगदूम, शिक्षण विस्तार अधिकारी जे. टी. पाटील, अधीक्षक पी. एन. नलवडे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images