Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वापराविना रस्ते बनताहेत ‘डेड’

$
0
0
एखाद्या रस्त्यावरुन जाण्याची दररोजची सवय लवकर बदलली जात नाही. त्या रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीत अनेकदा सापडूनही त्याला समांतर किंवा पर्याय असलेल्या रस्त्याचा नागरिक वापर करत नाहीत. त्यामुळे प्रचंड गर्दी असलेल्या रस्त्याशेजारील काही रस्ते ओस पडलेले असतात.

शाहू पुतळा परिसराचे सुशोभिकरण

$
0
0
छत्रपती शाहू महाराजांच्या दसरा चौकातील पुतळ्याच्या सभोवतालच्या चौथऱ्याला पुन्हा नव्याने ऐतिहासिक लूक मिळणार आहे. पुतळ्याभोवती अष्टकोनी चौथऱ्याचे नव्याने बांधाकाम केले जाणार आहे.

निवडणुकीमुळे मोर्चांचा ज्वर

$
0
0
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी राजकीय पक्ष व संघटनांकडून जानेवारी ते जून महिन्यात कोल्हापूर शहरात ५६ मोर्चे काढण्यात आले.

तांदूळही महागला !

$
0
0
मान्सूनने ओढ दिल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमंतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. भाजीपाल्याच्या किलोचा दर चाळीशीकडे वाटचाल करत आहे. तांदुळही किलोमागे दोन ते तीन रुपयांनी वाढले आहेत.

फँड्रीने आयुष्यच बदलून गेले

$
0
0
‘कधी अभिनेता होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण नागराज मंजुळेंच्या नजरेने माझ्यातील अभिनयगुण पाहिले. मी फँड्रीमध्ये अभिनय केला असे म्हणण्यापेक्षा अभिनय माझ्याकडून करवून घेतला, पण फँड्रीने मला माझ्यातील अभिनयाची जाणीव करून दिली इतकेच नव्हे तर या सिनेमाने माझे आयुष्यच बदलून गेले,’ अशा शब्दांत फँड्री फेम सोमनाथ अवघडे याने आपल्या व्यक्तिमत्वातील अंतरंग उलगडले.

प्रभाग संख्या घटणार

$
0
0
नवीन जनगणनेवर आधारित आगामी महापालिका निवडणूक होणार आहे. त्यासाठी शहराच्या नकाशावर ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे प्रत्येक प्रभागात एक महिला उमेदवार असणार आहे.

राष्ट्रवादीची भाकरी करपली

$
0
0
‘शरद पवार भाकरी फिरवण्यात माहीर आहेत. मात्र, त्यांची भाकरी फिरवून फिरवून आता करपली आहे. करपलेली भाकरी ते किती काळ फिरवणार आहात,’ असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केला.

वाचनालयात आता स्पर्धा परीक्षा केंद्र

$
0
0
स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे पण महागडी पुस्तके परवडत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे अनेकांचे स्वप्न अर्धवट राहते. अशी स्वप्ने बाळगून प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचे भास्करराव जाधव वाचनालय मात्र आधारवड ठरले आहे.

प्रवेशावरच कोल्हापुरात ‘कॅप’

$
0
0
गेल्या चार दिवसांपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होती. मात्र केंद्रीय प्रवेश प‌्रक्रियेला (कॅप) शहरात प्रथमच कमी प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या चार दिवसात केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांनी या माध्यमातून प्रवेश घेतला आहे.

आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

$
0
0
राज्यातील धनगर समाजाचा अनूसूचित जमातीत समावेश असूनही त्यांना सरकाच्या चुकीमूळे गेले साठ वर्षे आरक्षण मिळालेले नाही. हे आरक्षण तातडीने मिळावे यासाठी सोमवारी सातारा जिल्ह्यातील समस्त धनगर समाजाने सातारा मध्यवर्ती बसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

सांगली महापालिकेचे बजेट ४४२ कोटींचे

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या स्थायी समितीने ४४२ कोटी १४ लाखांचे अंदाज पत्रक सोमवारी महापालिकेच्या विशेष महासभेसमोर ठेवले.

व्यापाऱ्यांची खाती गोठविणार

$
0
0
मुदतीत एलबीटी भरणा न केल्याबद्दल तसेच विवरणपत्रे, खरेदी नोंद वही सादर केली नसल्याच्या कारणावरून महापालिकेत सुनावणीस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ३७५ व्यापाऱ्यांना सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते.

महावितरणकडून खबरदारी

$
0
0
पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडतात. याची कल्पना शेतकऱ्यांना नसल्याने शेतीच्या कामासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागतात. जून आणि जुलै महिन्यात विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्यू होणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

मूल्यमापन अहवाल अमान्य

$
0
0
राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार तयार करण्यात आलेला कामाच्या मूल्यमापन करणारा गोपनीय अहवाल मान्य नसल्याचे निवेदनपत्र शिवाजी विद्यापीठातील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांनी आस्थापना विभागाकडे सादर केले आहे.

‘बायोमेट्रिक कार्ड तीन वर्षाचे’

$
0
0
येत्या पंधरा दिवसांत वॉर्ड कमिटीची बैठक घेऊन शहरातील फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करण्याचा निर्णय सोमवारी महापालिकेतील बैठकीत घेण्यात आला. आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी आणि सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

१७ गावांचा हद्दवाढीस विरोध

$
0
0
बैलगाडी, घोडागाडी आणि सजवलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर हद्दवाढीला विरोध करणारे फलक, हलगी- ताशाच्या तालावर हद्दवाढीच्या विरोधातील घोषणा आणि महिलांचा लक्षणीय सहभाग असे चित्र सोमवारी हद्दवाढ विरोधी कृती समितीने काढलेल्या मोर्चात पहायला मिळाले.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा

$
0
0
विविध मागण्यांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. मागण्या पूर्ण करा, अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

प्रवेशद्वारांवर बॅग स्कॅनर

$
0
0
महालक्ष्मी मंदिराची सुरक्षा भक्कम करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्रवेशद्वारांवर बसविण्यासाठी बॅग स्कॅनर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्कॅनरची हाताळणी करण्याची पोलिसांनी तयारी दर्शविल्याने स्कॅनर खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘साने गुरुजी’तील मंडई रस्त्यावर

$
0
0
सानेगुरुजी वसाहत येथील तुळजाभवानी कॉलनी परिसरात रस्त्यावर भरणाऱ्या मंडईसाठी सिद्धेश्वर शाळेसमोरील सुमारे अर्धा एकर जागा दिली आहे. मात्र या ठिकाणी पुरेशा सुविधा नसल्याने पुन्हा तुळजाभवानी हाउसिंग सोसायटी, चावरेकर वसाहत येथील रोडवरच दुतर्फा मंडई भरते.

कॉलेजना मिळाले पूर्णवेळ प्राचार्य

$
0
0
प्राचार्य नसेल तर वेतन रोखण्याच्या आदेशाचा धसका तीन जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालकांनी घेतला. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यात आता केवळ १२ प्राचार्यांची पदे रिक्त राहिली आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images