Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोतदार आले शरण

$
0
0
गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांना जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या मारहाण प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहूवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती पोतदार व त्यांचे पती प्रकाश पोतदार बुधवारी सकाळी शाहूपुरी पोलिसांना शरण आले.

मुख्याध्यापिकेची शाळेत आत्महत्या

$
0
0
एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. विद्या दत्तात्रय जाधव (वय ५५, रा. सुभेदार रामजी आंबेडकर सोसायटी, आंबेडकर नगर विचारे माळ) असे त्यांचे नाव आहे. फॅनला ओढणीने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.

अजित बागडी सुपरपेसर

$
0
0
नागपूरमध्ये ‘मटा सुपरपेसर’च्या शानदार सुरुवातीनंतर बुधवारी (७ मे) कोल्हापुरात झालेल्या या टॅलेंट हंटमध्ये शाहूपुरी जिमखान्याच्या अजित मुकुंद बागडीने ताशी १२७ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करत कोल्हापूरचा सुपरपेसर होण्याचा बहुमान पटकावला.

आंबेडकरी जाणिवेचे लेखन

$
0
0
दया पवार यांच्या ‘कोंडवाडा’ (१९७४) या काव्यसंग्रहातील या ओळी आहेत. रामायण, महाभारत अशी महाकाव्ये रचणाऱ्या महाकवींना उद्देशून कवी आपल्या भावना व्यक्त करतो. झाडावर प्रणयात रममाण झालेल्या क्रौंच पक्ष्यांपैकी एकाची शिकाऱ्याकडून हत्या होते. विरहव्याकूळ क्रौंच पक्षी पाहून वा​ल्मीकीचे मन आक्रंदून उठते. त्यातून रामराज्याची स्तुती गाणारे महाकाव्य आणि महाकवी जगापुढे आले.

फसवणूकप्रकरणी दाम्पत्याला शिक्षा

$
0
0
धान्य खरेदीपोटी दिलेले धनादेश न वटल्याने येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी संपूर्णा कारंडे यांनी दोघांना साडेपाच वर्षे कैदेची शिक्षा सुनावली. तसेच धनादेशांची रक्कम २३ लाख रुपये नुकसान भरपाईपोटी देण्याचा आदेश दिला.

वीजचोरीचे १३ हजार खटले प्रलंबित

$
0
0
‘महावितरण’ने सन २००६ मध्ये स्वतंत्र पोलिस स्टेशनची स्थापना केल्यानंतर राज्यभरात आतापर्यंत वीजचोरीचे २२ हजार खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ९ हजार खटले निकाली काढण्यात आले असून १३ हजार खटले प्रलंबित आहेत.

सोन्यातील गुंतवणूक ठरते अनुत्पादक

$
0
0
‘सोन्यामध्ये गुंतवणूक करताना लोक भावनात्मक होतात. या गुंतवणुकीला प्रतिष्ठा प्राप्त होते आणि सोने विकणे हे अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. त्यामुळे सोने पडून राहते. ते गुंतवणूक म्हणून उपयोगात येत नसल्याने त्यातील गुंतवणूक ही अनुत्पादक ठरते’ असे प्रतिपादन ‘सीडीएसल’च्या शिक्षण विभागाचे प्रमुख चंद्रशेखर ठाकूर यांनी केले.

‘आजरा’चे अध्यक्षपद कुणाकडे?

$
0
0
आजरा तालुका सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या चौथ्या वर्षातील माळ आता कोणाच्या गळ्यात पडणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी तत्पर

$
0
0
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेला पोलिस विभाग गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी सदैव तत्पर आहे. परंतु त्यासाठी प्रसारमाध्यमे आणि समाजाचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पोलिसही कोणतीही घटना छोटी-मोठी न मानता होणाऱ्या अनर्थाला वेळीच आळा घालण्यासाठी सदैव तत्पर राहतील,’ असा विश्वास जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

विद्यापीठाकडून ‘नॅक’कडे पुनर्मूल्यांकन अहवाल

$
0
0
शिवाजी विद्यापीठामार्फत बेंगळुरू येथील नॅशनल असेसमेंट अॅक्रिडिटेशन कौन्सिल, राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) या संस्थेला पुनर्मूल्यांकनासाठी अहवाल बुधवारी सादर केला.

उद्योजकांच्या पुढाकारानेच विकास शक्य

$
0
0
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) ही उद्योजकांची संस्था. कोणतीही आर्थिक संस्था किंवा सोसायटी नसली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील पाच औद्योगिक वसाहतींपैकी सर्वात श्रीमंत संस्था म्हणून ती ओळखली जाते.

पोलिस करणार चार्जशिट ‘भक्कम’

$
0
0
पोलिसांची अपुरी संख्या, त्यांच्यावर बंदोबस्त व अन्य कामाचा ताण असल्याने तपासकामात फारसा वेळच मिळत नाही. त्यामुळे भक्कम पुराव्यासह न्यायालयात चार्जशिट दाखल होत नाही. त्यातून गेल्या काही वर्षात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.

विशाळगडावर गडकोटांचे कायमस्वरुपी प्रदर्शन

$
0
0
निसर्गवेध परिवार आणि विशाळगड येथील नागरिक बंडू भोसले यांच्यावतीने विशाळगड किल्ल्यावर गडकोटांचे कायमस्वरुपी छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यासाठीचा सर्व खर्च भोसले आणि निसर्गवेध परिवार संस्थेने केला आहे.

परमिट वाटपाचे मीटर डाउनच!

$
0
0
ऑटोरिक्षांसाठी परवाना वाटप करण्याच्या निकषांवरुन परमिट वाटपाचे मीटर डाउनच आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात दिली जाणारी सूट, वायू प्रदूषण आणि मोटार वाहन कायद्याची दुरुस्ती अशा अनेक प्रश्नांचे गुऱ्हाळ पुन्हा काही रिक्षाचालकांनी सुरु केले आहे.

...अखेर एसटीपीला मिळाला मुहूर्त

$
0
0
पाच वेळा मुदतवाढ घेतल्यानंतर अखेर शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) अखेर गुरुवारी कार्यान्वित झाली. पहिल्या टप्प्यात एसटीपीमध्ये २४ दशलक्ष लिटर सांडपाणी टाकण्यासाठी जयंती नाल्यातून सायंकाळनंतर सांडपाणी उपसण्यास सुरुवात झाली.

महिपतराव बोंद्रेंवर गुन्हा दाखल

$
0
0
डी. वाय. पाटील स्पोर्ट्स फुलेवाडी संघाचा नायजेरियन खेळाडू व्हिक्टर जॅक्सन याला मैदानात घुसून मारहाण करून सामना बंद पाडल्याप्रकरणी महिपतराव ऊर्फ पापा बोंद्रे (वय ९०, रा. शिवाजी पेठ), त्यांचा नातू व माजी महापौर सई खराडे यांचा मुलगा शिवतेज खराडे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

भाजप हाळवणकरांच्या पाठीशी

$
0
0
‘वीजचेरी प्रकरणी आमदार सुरेश हाळवणकर यांना इचलकरंजीतील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पुढील कायदेशीर लढाई लढण्यासाठी संपूर्ण ताकदीने हाळवणकर यांच्या पाठीशी राहील,’ अशी ग्वाही भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

टोलबंदीसाठी पवारांना साकडे?

$
0
0
शहरातील टोलबंदीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घालण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चालवले आहेत. विधानसभेच्या तयारीसाठी पवार यांनी जूनमध्ये बोलाविलेल्या बैठकीतही टोल, एलबीटीबाबत सडेतोड मत मांडणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर नको

$
0
0
आपण आपल्या कामात खूप बिझी असतो किंवा गाडीवरून कुठेतरी निघालेलो असतो किंवा मार्केटमध्ये एखाद्या दुकानात खरेदी करत असतो. असे काहीतरी आपले चाललेले असते आणि अचानक आपला मोबाइल वाजायला सुरुवात होते.

‘मराठी’चे भविष्य वितरकांच्या हातात

$
0
0
आज मराठीइतका आशय कुठल्याही भाषेतील सिनेमात नाही हे सांगताना मराठी कलाकार म्हणून अभिमान वाटतो. पण मराठी सिनेमाची अवस्था बॉक्सऑफिसवर खूप निराशाजनक आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images