Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आलास येथे धुमश्चक्री

$
0
0
आलास (ता.शिरोळ) येथे शुक्रवारी रात्री दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यानंतर जमावाने मंदिरावर दगडफेक करून मंदिर परिसरातील १२ वाहनांची मोडतोड केली. या घटनेत दोघेजण जखमी झाले. गावात तणावपूर्ण वातावरण असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सावत्र मुलीचा खून करणाऱ्या पित्यास जन्मठेप

$
0
0
चार वर्षाच्या सावत्र मुलीला अमानुष मारहाण करून खून करणाऱ्या नवनाथ उत्तम घुले (गंगारामनगर, टोप, ता. हातकणंगले) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एल. आणेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात फिर्यादी साक्षीदार फितूर झाले असतानाही परिस्थितीजन्य पुराव्यावरून न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

बलात्कार करणाऱ्याला चोप

$
0
0
विवाहाचे अामिष दाखवून १७ वर्षाच्या युवतीवर बलात्कार करणाऱ्या रोहित नंदकुमार पोवार (वय २२, रा. खंडोबा तालीमजवळ) या तरूणाला युवतीच्या नातेवाईकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोवार याची शिवाजी पेठेतून जुना राजवाडा पोलिस ठाण्यापर्यंत मारहाण करत धिंड काढली.

कार्यमुक्त करण्याची मागणी

$
0
0
महापालिकेतील नगरसेवकांच्या दादागिरीला कंटाळलेल्या पाणीपुरवठा विभागातील सात अधिकाऱ्यांनी आम्हाला कार्यमुक्त करा, अशी लेखी मागणी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे शनिवारी केली.

सहा शिक्षक निलंबित

$
0
0
शाहूवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सहा शिक्षकांना निलंबित केले आहे. चौकशी समितीने याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अवजड वाहनांना बंदी कागदावरच

$
0
0
अवजड वाहनांना शहरातील गर्दीच्या ठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी एक तर दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंदी असताना शहरात सर्व मार्गावर बिनबोभाट अवजड वाहनांची ये जा सुरू आहे.

खूनप्रकरणी संशयितास अटक

$
0
0
येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीत झालेल्या गोविंद बाळू भिसे (वय ५५, रा. जीकेनगर, तारदाळ) या यंत्रमाग कामगाराच्या खूनप्रकरणी आप्पासो सखाराम चौगुले (वय ४०, रा. गणेशनगर गल्ली नं. ९) याला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे.

महाराष्ट्र टाइम्सतर्फे आज कार्यशाळा

$
0
0
महाराष्ट्र टाइम्सतर्फे फॅशन डिझायनिंग व व्हॉइस मॉड्यूलेशन या व्यावसायिक कोर्सेससंदर्भातील माहितीसह करिअर संधीविषयी माहिती देणारी कार्यशाळा रविवार (ता.४) होणार आहे.

डाव्या आघाडीचा विकास पॅटर्न राज्यात

$
0
0
पाणीप्रश्न, शैक्षणिक धोरण, आरोग्य योजना, पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्ती अशा विविध समस्यांवर मात करून विकासाचा अजेंडा तयार करण्यासाठी डावी आघाडीने मोट बांधली आहे.

रंकाळा परिसर चकाचक

$
0
0
महापालिका पदाधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व रंकाळाप्रेमींनी एकत्रित येऊन रंकाळा तलाव परिसर स्वच्छ केला. दीड महिन्याने एकत्रित रंकाळा परिसराची स्वच्छता करण्याचा उपक्रम महापालिकेने राबविला.

निपाणीजवळ अपघातात एक ठार

$
0
0
मुंबईहून मोटारसायकलवरून गावी येत असलेला तरूण निपाणीनजीक झालेल्या अपघातात जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दोघेही आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडी गावचे आहेत.

दुष्काळासाठी ३५३उपाययोजना

$
0
0
जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसू नये यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या दुष्काळी आराखड्यात ३५३ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यावर्षीचा दुष्काळी आराखडा हा २ कोटी ९४ लाख रुपयांचा असून विंधन विहीरी, टँकरने पाणी पुरवठा, नळयोजना विशेष दुरूस्ती, खासगी विहिरींचे अधिग्रहण आणि तात्पुरत्या पूरक योजना सुचविण्यात आल्या आहेत.

७०हून अधिक विद्यार्थी पात्र

$
0
0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या ‘जेईई मेन २०१४’ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ७० हून अधिक विद्यार्थी जेईई-अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत.

हाळवणकरांची आमदारकी रद्द

$
0
0
यंत्रमाग कारखान्यातील वीज मीटरमध्ये फेरफार करून २०.९७ लाख रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश हाळवणकर व त्यांचे बंधू महादेव यांना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. शहापूरे यांनी दोषी ठरविले.

ग्राहक कायद्यांविषयी जागृती करू

$
0
0
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरात होणाऱ्या खंडपीठासाठी कोल्हापूरसह अन्य सहा जिल्ह्यांतील वकिलांनी संघटितपणे केलेली मागणी असो किंवा स्थानिक वकिलांचे प्रश्न.

मानाच्या पुरस्कारांचा विसर

$
0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालकांमध्ये २०१२ पासून विसंवाद असून येथील कार्यपद्धीही बेभरवशी झाली आहे. याच विसंवादामुळे महामंडळातर्फे पुरस्काराच्या निमित्ताने होणाऱ्या कौतुकसोहळ्याचा संबंधितांना विसर पडला आहे.

‘शालार्थ प्रणाली’मुळे पगार रखडले

$
0
0
सांगली जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांचा पगार ‘शालार्थ प्रणाली’च्या लिंकमध्ये अडकला आहे. जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’ व ‘नेट’ कनेक्शनमुळे शिक्षकांची कुचंबना सुरू आहे.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

$
0
0
आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दोघांनी तिच्यावर बलात्कार करून अश्लील चित्रफीत तयार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुंडा विरोधी पथकाने सतीश प्रदीप जगताप (वय २३) आणि प्रवीण आनंदराव चव्हाण (वय २८) या दोघांना अटक करून रविवारी विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन केले.

वादळी पावसाने शेती, घरांचे मोठे नुकसान

$
0
0
मागील पाच-सहा दिवसांत सांगली जिल्ह्याला जोरदार वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सांगलीतील अनेक झोपड्या या वादळी पावसाने उध्वस्त झाल्या आहेत. झाडे व झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत.

शाळा प्रवेश होणार सुलभ

$
0
0
शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्क्यांतील प्रवेश घेण्यासाठी गरिबी रेषेखालील मुलांना येणाऱ्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images