Quantcast
Are you the publisher? Claim or contact us about this channel


Embed this content in your HTML

Search

Report adult content:

click to rate:

Account: (login)

More Channels


Showcase


Channel Catalog


Articles on this Page

(showing articles 1 to 25 of 25)
(showing articles 1 to 25 of 25)


Channel Description:

News from India by India number one website
  0 0

  Uddhav.Godase @timesgroup.com Tweet : Uddhavg_MT कोल्हापूर : एक ते १७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात आले. अभियानादरम्यान १२१ अपघातांची नोंद झाली, तर १५जण ठार झाले. दीडशेहून अधिक लोक जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दक्षता घेण्याच्या काळातही अपघातांचे प्रमाण गंभीर बनत असल्याचे हे निदर्शक आहे. वाढत्या अपघातांमुळे प्रवास सुरक्षित करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. देशात वर्षभर होणारे दहशतवादी हल्ले आणि सीमेवर शत्रूसोबत होणाऱ्या चकमकींमध्ये शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा अपघाती मृत्यूंची संख्या खुपच जास्त आहे. भरधाव वेग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी रोज एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो. अपघातांची संख्या कमी होऊन प्रवास सुरक्षित

  बनावा यासाठी पोलिस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळाकडून दरवर्षी रस्ते सुरक्षा अभियान राबवले जाते. एक ते १७ जानेवारीदरम्यान विविध उपक्रमांनी जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान राबवले. प्रबोधन फेरी, वाहनधारकांना मार्गदर्शन, गांधीगिरी पद्धतीने नियम मोडणाऱ्या वाहन धारकांना आवाहन करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातही वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. प्रत्यक्षात, रस्त्यांवर मात्र याचे नेमके काय परिणाम झाले? असा प्रश्न उपस्थित व्हावा असे अपघातांचे प्रमाण आहे. रस्ते सुरक्षा अभियानादरम्यान जिल्ह्यात १७ दिवसात लहान-मोठ्या १२१ अपघातांची नोंद झाली. गंभीर अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला, तर १६० लोक जखमी झाले. पुणे-बेंगलोर महामार्गावर गोकुळ शिरगावजवळ झालेल्या अपघातात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. गगनबावड्यात खराब रस्त्यावर दुचाकी घसरून तरुण ठार झाला. चंदगडमध्ये उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार झाला, तर तिघे जखमी झाले. हुपरीमध्ये उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार झाली. कागलमध्ये रस्त्यातील खड्डा चुकवताना दुचाकीवरील तरुणाचा जीव गेला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाच्या अपघातात तरुण ठार झाला. शहरात राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत

  अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रतिनिधिक अपघातांमध्ये बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था ही प्रमुख कारणे समोर आली आहेत. अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उद्‌धवस्त होते. जखमींना आयुष्यभरासाठी अपंगत्व येऊ शकते. आयुष्याची पुंजी उपचारामध्ये खर्च होते. विशेष म्हणजे अपघाताची अनेक उदाहरणे रोजच आसपास दिसत असूनही वाहनधारकांना याचे गांभीर्य नाही. हेल्मेट वापरासही विरोध होतो. पोलिस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, आदी सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नातून प्रवास सुरक्षित बनू शकतो. वाहनधारकांच्या स्वयंशिस्तीसह रस्ते सुस्थितीत

  ठेवणे, आवश्यक ठिकाणी सूचनाफलक लावणे, ट्रॅफिक सिग्नल, पांढरे पट्टे, स्पीड ब्रेकर, सदोष वाहनांवरील कारवाया

  यातून अपघातांची संख्या कमी होऊ शकते. मात्र, यासाठी इच्छाशक्ती गरजेची आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  'कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्य आणि देश पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त केले. या कार्यात कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच जिल्हा परिषदेच्या लौकिकात भर पडली,' असे गौरवोद्गार अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले.

  जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी, प्राथमिक शिक्षक बँक व जि.प. कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष पाटील बोलत होते. राजर्षी शाहू सभागृह येथे कार्यक्रम झाला.

  पाटील म्हणाले, 'राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कर्मचारी पार पाडतात. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून त्यांचे हक्क, सेवा, सरकारकडून मिळणाऱ्या विविध सुविधांची इत्थंभूत माहिती मिळण्यास मदत होणार आहे.' उपाध्यक्ष सतीश पाटील, सदस्य भगवान पाटील यांनी जि.प.च्या उपक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगे असल्याचे नमूद केले.

  दिनदर्शिकेचे संकल्पक व सोसायटीचे संचालक महावीर सोळांकुरे म्हणाले, 'कर्मचाऱ्यांना सेवा व कर्तव्याची माहिती मिळाली पाहिजे. दिनदर्शिकेच्या माध्यमातून सेवापुस्तिका, मिळणारे भत्ते, कालबद्ध पदोन्नती गट, विमा व्यवसाय आदीबांबत मार्गदर्शन होणार आहे.'

  याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे, शिक्षक समितीचे कृष्णात कारंडे, शिक्षक बँकेचे चेअरमन नामदेव रेपे, आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन राजीव परीट यांनी प्रास्ताविक केले. एम. आर.पाटील, एम, एम. पाटील, सुजाता सोलनकर, प्रकाश पाटील, संजय अवघडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला सभापती हंबीरराव पाटील, सभापती डॉ. पद्माराणी पाटील, सभापती स्वाती सासने, सभापती प्रवीण यादव प्रमुख उपस्थिती होते.

  ००००

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  'गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील यांनी आपल्याशी संपर्क साधलेला नाही, पण सत्ताधारी संचालक मंडळातील अनेकजण आमच्याकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत', असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गोकुळचा धंदा करणाऱ्या महादेवराव महाडिकांशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार विनय कोरे यांनी पालकमंत्री पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची स्वतंत्र भेट घेऊन गोकुळ निवडणुकीसंबधी चर्चा केली आहे.

  गोकुळच्या निवडणुकीसाठी ठराव गोळा करण्याची प्रक्रिया संपली असून मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. माजी अध्यक्ष पाटील, डोंगळे आणि शशिकांत पाटील,चुयेकर यांनी सत्ताधारी आघाडीतील नेते आमदार पी.एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी सवतासुभा मांडून बंड केले आहे. तिघेही एकत्रित निर्णय घेणार असून ते सत्ताधारी आघाडीशी फारकत घेऊन विरोधी आघाडीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  पालकमंत्री पाटील म्हणाले, 'गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमास अजून वेळ असून यावेळी गेल्यावेळेप्रमाणे तगडे विरोधी पॅनेल उभे केले जाणार आहे. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. यंदा परिवर्तन अटळ असून सत्ताधारी संचालक मंडळातील विरोधी पॅनेलमध्ये येण्यास इच्छुक आहेत. गेली पंचवीस वर्षे महाडिकांशी सोबत असणाऱ्या संचालकांनी त्यांची साथ का सोडली हे लक्षात घेतले पाहिजे. गोकुळ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा राहिला पाहिजे.'

  दरम्यान, जिल्हा नियोजन मंडळाची बैठक संपल्यानंतर सतेज पाटील आणि मुश्रीफ शासकीय विश्रामगृहावर गेले. तेथे आमदार विनय कोरे यांनी मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची भेट घेऊन स्वतंत्रपणे चर्चा केली. गोकुळबाबत ही चर्चा झाल्याचे समजते. कोरे यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा द्यावा, यासाठी सतेज पाटील यांनी विनंती केली. याबाबत कोरे यांना विचारले असता त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहता न आल्याने पालकमंत्र्याची भेट घेतल्याचे सांगितले. गोकुळबाबत त्यांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळले.

  ....

  शेतकरी संघाच्या अध्यक्षांच्या

  राजीनाम्याबाबत चर्चा

  मुश्रीफ आणि कोरे यांच्यामध्ये शेतकरी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली. माने यांची मुदत संपली असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी इच्छा मुश्रीफ यांनी कोरे यांच्याकडे व्यक्त केली. लवकरच माने राजीनामा देतील, असे कोरे यांनी मुश्रीफांना सांगितल्याचे कळते.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  अंबाई टँक परिसरात खाद्यपदार्थांच्या गाडीवर झालेल्या किरकोळ वादातून दोघा तरुणांवर तलवार हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचा माजी नगरसेवक दत्ता विलास टिपुगडे (वय ५०, रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ) याला जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दरम्यान, यापूर्वी त्याचा मुलगा सागर टिपुगडे याला अटक केली होती.

  पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल चंद्रकांत पाटील (वय ३२), अजय विलास पाटील (३६, दोघेही रा. माजगावकर मळा) हे दोघेजण ११ डिसेंबरला सायंकाळी शालिनी पॅलेसच्या पिछाडीस असलेल्या अंबाई टँक परिसरातील खाद्यपदार्थांच्या गाडीवर नाष्टा करण्यासाठी गेले होते. या वेळी या दोघांचा आइस्क्रीमचा गाडा चालविणाऱ्या कामगाराशी वाद झाला होता. त्याने मालक टिपुगडे बापलेकास बोलवून घेतल्यानंतर या बापलेकांनी तलवार हल्ला केला होता. दोघांच्या डोक्यात तलवारीचे घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी जखमी स्वप्निल पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गेले महिनाभर संशयित टिगुपडे हा पसार झाला होता.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  राज्य सरकारच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार शेतकरी पात्र ठरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या आकडेवारीमुळे कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांचा आकडा जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सहकार विभागाने थकीत कर्ज खात्यांचे लेखा परीक्षण केले. जिल्हा विशेष लेखा परीक्षक धनंजय पाटील आणि जिल्हा उप निबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ७३ लेखा परीक्षकांनी १९०१ विकास सेवा संस्थांतील थकीत कर्जखात्यांची पडताळणी केली. १३ जानेवारीपासून हे काम सुरू आहे.

  एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत वाटप करण्यात आलेले कर्ज आणि ३० सप्टेंबरपर्यंत असलेल्या थकबाकीत असलेल्या पीक कर्ज खात्यांची तपासणी करण्यात आली. तसेच १५ जानेवारीपर्यंत वाटप करण्यात आलेले कर्ज, मुदतीत पुनर्गठन कर्जाची तपासणी करण्यात आली. तपासणी करताना लेखा परीक्षकांनी वाटप केलेले कर्ज, थकबाकी खाती, थकीत कर्जाची वैयक्तिक खतावणी, बँकेकडील कर्ज उतारा, सेवा सोसायटीची उचल क्षमता व केलेली उचल याची माहिती तपासली.

  शनिवारी (ता.२५) कर्जदारांची यादी तयार करण्याची अंतिम मुदत असून सहकार खात्याने ९९ टक्के काम पूर्ण केले आहे. जिल्हा लेखापरिक्षक पाटील लेखा परीक्षण अहवाल सोमवारी (ता.२७) जिल्हा बँकेला सादर करणार आहेत. त्यानंतर ही यादी पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  भारत सरकार व महाराष्ट्र सरकारचा बनावट लोगो बेकायदेशीरपणे वापरुन, बनावट अर्ज तयार करुन कंपनीसह नागरिकांची २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इरफान आशरफ नदाफ (३२, रा. राजेंद्रनगर, रुकडी, ता. हातकणंगले) याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टासमोर हजर केले असता २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याच्यासह जया कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला.

  जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ॲण्ड फॅमिली वेल्फेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, नॅशनल हेल्थ एजन्सीचे बेकायदेशीरपणे लोगो वापरून फॉर्म तयार केले. त्यासाठी लोकांकडून प्रत्येकी १५ रुपये घेऊन २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी राज्य हमी आरोग्य सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक किरण प्रकाश कुंडलकर (वय ३६, रा. मरीआईचीवाडी, ता. खंडाळा, जि.सातारा) यांनी फिर्याद दाखल केली. संशयित जया कांबळे, इरफान नदाफ तसेच त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी संगनमत करुन भारत सरकार, महाराष्ट्र सरकारचा बनावट लोगो बेकायदेशीरपणे वापरून बनावट फॉर्म तयार केले. पीएसआय संस्थेचे बनावट अधिकारपत्र लेटर पॅड तयार केले. नागरिकांकडून १५ रुपये शुल्क आकारुन फॉर्म भरुन घेतले. त्यांनी ही संस्था सरकारच्या पॉप्युलेशन सर्व्हिस इंटरनॅशनल असल्याचे सांगितले होते. मात्र फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली. संशयित जया कांबळे हा पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  काही दिवसांपूर्वी राजारामपुरी खाऊ गल्लीतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन महापालिका प्रशासनाने रेल्वे फाटक पाच बंगला परिसरात केले. मात्र शुक्रवारी दुपारी त्यांना पूर्वीच्या फेरीवाल्यांनी मज्जाव केल्यानंतर वादाची ठिणगी पडली. पुनर्वसन करुनही जागा मिळत नसल्याने ते चांगलेच व्यथित झाले. त्याबाबतची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली. पण त्यांनी शनिवारी (ता. २५) अधिकारी भेट देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुनर्वसनावरुन फेरीवाले पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

  नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिक्रमण कारवाईदरम्यान राजारामपुरीतील जनता बाजार येथील खाद्य पदार्थांच्या गाड्या हटवण्यात आल्या. जागेच्या ताब्यावरुन जनता बझार व फेरीवाल्यांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया दोन महिने प्रलंबित राहिली होती. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्यांचे रेल्वे फाटक येथील पाच बंगला परिसरात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी यापूर्वी शिवाजी चौकातून पुनर्वसन केलेल्या ३४ फेरीवाल्यांनी विरोध केला होता. पण या फेरीवाल्यांवर अन्याय न करता उर्वरित जागेवर त्यांना जागा देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली.

  त्यानुसार सकाळी इस्टेट अधिकारी प्रमोद बराले, अतिक्रमण विभागाचे पंडित पोवार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी राजारामपुरीत गेले. तेथील २२ फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार सकाळी खाद्यपदार्थ स्टॉलच्या गाड्या लावण्यात आल्या. मात्र गाड्या लावताना भाजीपाला विक्रेते नसल्याने त्यामध्ये अडथळा आला नाही. त्यामुळे दोन महिन्यानंतर व्यवसाय सुरू होईल, अशी शक्यता होती. पण दुपारी भाजीपाला विक्रेते आल्यानंतर नव्या-जुन्या फेरीवाल्यांमध्ये वाद उफाळून आला. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. एका फेरीवाला नेत्याने येथे पुनर्वसन करु न देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पुनर्वसन केलेल्या फेरीवाल्यांना आजही आपला व्यवसाय सुरू करता आला नाही. याबाबतची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  कोल्हापूर टाइम्स टीम 'विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगिण विकासासाठी सखोल मार्गदर्शन, प्रेरणादायी व्यक्तींचा आदर्श व योग्य संधी या त्रिसूत्रीची सांगड घालावी' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी केले. न्यू कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रिन्स मराठा बोर्डिंगचे चेअरमन आर. डी. पाटील होते. बोर्डिंगचे चेअरमन वडगावकर म्हणाले, 'कष्ट व जिद्द या बळावर विद्यार्थ्यांनी कर्तृत्वाचे शिखर गाठावे. संस्कारांच्या पायावर वाटचाल केल्यास सुजाण नागरिक होता येते याचे विद्यार्थ्यांनी भान ठेवावे. यावेळी पळसे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. ए. डी. सासने यांनी अहवाल वाचन केले. व्हाइस चेअरमन डी. जी. किल्लेदार, संचालक ए. जी. वणिरे, वाय. एस. चव्हाण, सविता पाटील, उदय पाटील, टी. के. सरगर यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेले पारंपरिक खेळ, सहकुटुंब आनंदाचे क्षण अनुभवण्याचे निमित्त, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि कलागुणांना मिळणारे व्यासपीठ असा जल्लोषाचा रविवार येत्या आठवड्यात सर्किट हाउस रोडवर उगवणार आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या हॅपी स्ट्रीटचा माहोल आता रविवारी, २६ जानेवारी रोजी ताराबाई पार्कातील सर्किट हाउस ते लाइन बाजार रोड येथे फुलणार आहे. सकाळी सात वाजता हॅपी स्ट्रीटची चैतन्यदायी सुरूवात होणार आहे.

  दरवर्षी जानेवारी महिन्यात महाराष्ट्र टाइम्सतर्फे हॅपी स्ट्रीट उपक्रम घेण्यात येतो. रस्त्यावर सर्व प्रकारचे खेळ आणि मंचावर कलागुणांचा आविष्कार असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते. यानिमित्ताने लहान मुलांसाठी तर खेळाचे अनेक प्रकार असतातच, पण चाळीशीपासून सत्तरी ओलांडलेल्या कोल्हापूरकरांच्या लहानपणाचे खेळ खेळण्याचा आनंदही त्यांना हॅपी स्ट्रीटवर मिळतो. आल्हाददायक थंडी आणि सोबत आजच्या मोबाइलयुगात मागे पडत चाललेले खेळ खेळण्याची पर्वणी कोल्हापूरकरांना मिळणार आहे.

  यंदा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम मार्ग, रंकाळा पदपथ उद्यान व सायबर रोड येथे झालेल्या 'हॅपी स्ट्रीट' मध्ये शहरवासियांना मनोरंजनाचा आस्वाद लुटता आला. येत्या रविवारी सर्किट हाउस रोडवर नागरिकांना या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.

  'हॅपी स्ट्रीट'चे मुख्य प्रायोजक फ्रूस्टार संजय घोडावत ग्रुप, पॉवर्ड बाय प्रायोजक गोकुळ, एज्युकेशन पार्टनर विश्वकर्मा कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, रियल इस्टेट पार्टनर मेट्रो लाइफ सिटी डेव्हलपर्स व पायताण डॉट कॉम हे स्टार्ट अप पार्टनर आहेत. या उपक्रमासाठी कोल्हापूर पोलिस प्रशासन, कोल्हापूर महापालिका आणि शहर वाहतूक शाखा यांचे सहकार्य लाभले आहे. 'हॅपी स्ट्रीट'मधील पारंपरिक खेळ हे प्रत्येकाच्या आवडीचे खेळ ठरले आहेत. जुन्या काळातील या खेळांविषयी प्रत्येकाला आकर्षण आहे. रस्सीखेच, जिबली, लंगडी, पोत्यात पाय घालून पळणे, भोवरा खेळणे, टायर पळविणे या खेळात शाळकरी मुलांसह महिला व पुरुषही सहभागी होत आहेत. आपत्कालीन प्रसंगात काय काळजी घ्यावी, अचानक हृदयविकाराचा झटका आला तर प्रथमोपचार कसे करावेत याचीही माहिती यावेळी देण्यात येणार आहे. याशिवाय मर्दानी खेळांचा थरार, एनसीसी प्रात्यक्षिके,सायकलिंग, स्केटिंग, ब्रेनगेम असे अनेक खेळ आहेत.

  ...

  चौकट आहे ...

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  कोल्हापूर टाइम्स टीम

  लग्नसराईचे दिवस आले की सगळीकडे दागिने, सजावट इत्यादी गोष्टींची रेलचेल चालू होते. प्रत्येकीला लग्नात आपण छान दिसावे असे वाटत असते. मग त्यासाठी डिझायनर साडी, ज्वेलरी असे एक ना अनेक पर्यायांचा विचार चालू होतो. अशा प्रकारची ज्वेलरी शिकण्याची संधी महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लबतर्फे वाचकांना मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनी (ता. २६ जानेवारी) सकाळी ११ ते १ या वेळेत राजारामपुरीतील दुसऱ्या गल्लीतील कलर १४ आर्ट गॅलरीत ही कार्यशाळा होणार आहे.

  विविध समारंभात पारंपरिक ज्वेलरीच्या ठसकेपणातही वेगळेपण दाखवणारी ट्रेंडी डिझायनर ज्वेलरी परिधान करण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. अशा प्रकारची ज्वेलरी बनविण्याचे शिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे रविवारी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सिल्क थ्रेड ज्वेलरी प्रकारातील साडी पिन, छल्ला, पैंजण आणि काही नावीन्यपूर्ण प्रकार शिकविण्यात येणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी येताना कात्री घेऊन यावी. इतर साहित्य आयोजकांकडून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी कलर १४ आर्ट गॅलरीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  कौटुंबिक वादातून विभक्त असलेली पत्नी घरी आल्याच्या रागातून तिला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलिसासह त्याच्या मैत्रिणीला निलंबित करण्यात आले. करवीर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल अमर दत्तात्रय आडसुळे (वय ४०, रा. माजगावकर कॉलनी, कणेरकरनगर) आणि सायबर विभागातील महिला कॉन्स्टेबल स्मिता सचिन माने (३०, रा. पुलाची शिरोली, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही कारवाई केली.

  रश्मी आडसुळे (३५, रा. मंगळवार पेठ) व अमर आडसुळे हे पती-पत्नी आहेत. मात्र ते गेल्या पाच वर्षांपासून विभक्त राहतात. १९ जानेवारी रोजी रश्मी या पती राहत असलेल्या कणेरकरनगर येथील घरी गेल्या. यावेळी अमर यांनी 'रश्मी यांना तू का आलीस?, तुला नोटीस पाठविली आहे', असे म्हणून घरातून बाहेर ढकलले. केसांना धरून मारहाण केली. तसेच स्मिता माने यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, रश्मी आडसुळे यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन पती अमर व माने या दोघांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर ही कारवाई झाली.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  सामाजिक आशयातील उत्कृष्ट सिनेमा म्हणून गौरव

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  पश्चिम बंगाल येथे पार पडलेल्या एव्हरेट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'गावगाडा'हा सिनेमा सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा ठरला. या सिनेमाची निर्मिती कोल्हापुरात झाली होती. सिलीगुडी शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोल्हापुरात साकारलेल्या सिनेमाचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक झाल्यामुळे कलाकारांचा हुरुप वाढला आहे.

  'कोल्हापूरच्या रांगड्या मातीत आणि संस्कृतीने नटलेल्या या सिनेमाचे कथानक सामाजिक विषयावर बेतलेले आहे. फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही कलाकृती सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा ठरला. या सिनेमासाठी प्रत्येकाने घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले'अशा भावना सिनेमाशी निगडीत कलाकार व तंत्रज्ञांनी व्यक्त केल्या. निर्माती निशा गावकर, कार्यकारी निर्माता विजय माळी, लेखक व दिग्दर्शक संजय टिपुगडे, संवाद चंद्रशेखर जनवाडे व कॅमेरामन जयदीप निगवेकर यांच्या टीमने हा सिनेमा तयार केला आहे.

  या महोत्सवात १७ देशातील सिनेमांचा समावेश होता. तसेच देशातील विविध राज्यातील 'देश संस्कृती आणि आणि ग्रामीण जीवन'वर आधारित सिनेमांचा समावेश होता. यामध्ये हिंदी, मराठी, गुजराती, भोजपुरी, तमिळ, कन्नड, तेलगूसह अन्य भाषेतील सिनेमांचे नामांकन झाले होते. सिनेमात संजय तोडकर, चित्रा कुलकर्णी, धनंजय पोलादे, निकीता पाटील, संध्या वेल्हाळे, एन. डी. चौगुले, जितेंद्र पोळ, जगन्नाथ घाडगे आदींच्या भूमिका आहेत.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

  जयसिंगपूर बसस्थानकात शुक्रवारी झालेल्या १३ तोळे सोन्याचे दागिने चोरीचा छडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लावला. याप्रकरणी सांगली व हातकणंगले येथील दोन महिलांना अटक केली आहे. चांदणी दीपक कांबळे (वय २८, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली), अंबुबाई प्रकाश चौगुले (वय ५५, रा. आंबेडकर भवन जवळ, स्टेशन रोड हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

  याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास मेघा प्रविण भोसले (वय ३५, रा.स्टेट बँकेजवळ, माऊली कॉलनी शिरोळ, मूळ गाव खवनी, जि. सोलापूर) या माहेरी अनगर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे जाण्यासाठी जयसिंगपूर बसस्थानकात आल्या होत्या. अक्कलकोटकडे जाणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्या महिलांनी भोसले यांच्या पर्समधील पाच तोळे वजनाचे गंठण, चार तोळ्याचा हार, प्रत्येकी एक तोळा वजनाच्या तीन चेन, प्रत्येकी अर्धा तोळे वजनाचे दोन वेढण असे १३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास येताच भोसले यांनी जयसिंगपूर पोलिसांत धाव घेवून फिर्याद दिली होती.

  दरम्यान, फिर्याद दाखल होताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. जयसिंगपूर बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता संशयित महिला निदर्शनास आल्या. यानंतर पथकाने चांदणी कांबळे व अंबुबाई चौगुले यांना ताब्यात घेतले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. वृतसेवा, हातकणंगले

  हुपरी (ता. हातकणंगले) येथील एकाने खरेदी केलेल्या घराचे सात-बारा पत्रकी नोंद करण्यासाठी वीस हजारांच्या लाच प्रकरणी शनिवारी तलाठी अविनाश राजेश तांबवेकर याला चौकशी करुन अटक करण्यात आली. लाच स्वीकारताना तलाठी कार्यालयात खासगी पंटर बाबासाहेब कृष्णा सुतार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले होते. या कारवाईने तलाठी कार्यालयातील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे.

  हुपरी येथील एका चांदी व्यवसायिकाने दोन महिन्यांपूर्वी घर खरेदी केले. त्या घराची सातबारा पत्रकी नोंद करण्यासाठी संबंधित तक्रारदाराला तलाठी तांबवेकर याचा खासगी पंटर बाबासाहेब सुतार याने नोंद करण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. लाचलुचपत विभागाने पडताळणी करुन शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हुपरी तलाठी कार्यालयात सापळा लावून खासगी पंटर बाबासाहेब सुतार हा तक्रारदारांकडून वीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी तलाठी तांबवेकरची चौकशी करण्यात आल्यानंतर शनिवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

  या कारवाईने हुपरी शहरवासीयांतून स्वागत होत असून तलाठी कार्यालयातील अनेक भानगडी बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादर, सायबर विभागाचे निरीक्षक संजय मोरे यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवापदक जाहीर झाले. गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात नक्षलग्रस्त लोकांचे प्रबोधन करुन परिवर्तन करण्यात यशस्वी ठरले. त्यासह या भागात सलग दोन वर्षे चांगली सेवा देऊन एकही पोलिस शहीद झाला नाही. त्याच्या या कार्याबद्दल त्यांचा हा सन्मान होत आहे. याशिवाय १६ उपनिरीक्षकांनाही विशेष सेवापदक जाहीर झाले आहे.

  रविवारी, प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते या सर्वांना सन्मानित करण्यात येणार आहे. कोल्हापुरात रुजू होण्यापूर्वी डॉ. देशमुख २०१८ मध्ये गडचिरोली येथे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी भामरागडजवळच्या ताडगाव जंगलात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७३ माओवादी मारले गेले. पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या छावण्या उद्ध्वस्त केल्या. तेथील आदिवासी लोकांमध्ये प्रबोधन करून त्यांच्यात परिवर्तन घडविले. त्यांच्या सेवा कालावधीत एकही पोलिस शहीद झाला नाही. त्याबद्दल हे विशेष सेवापदक जाहीर करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारा पहिल्या 'लोकशाही पुरस्कार' पुरस्काराचेही डॉ. देशमुख मानकरी आहेत. त्यांच्यासह सेवा कालावधीत पोलिस उपअधीक्षक बिरादर, निरीक्षक मोरे यांच्यासह अन्य अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत होते. या कारवाईचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून या सर्वांना पोलिस महासंचालकांनी विशेष पोलिस पदक जाहीर केले आहे.

  पदकप्राप्त उपनिरीक्षक

  दीपक भांडलवकर (गांधीनगर), राहुल वाघमारे ( शाहूपुरी), रविकांत गच्चे (गोकुळ शिरगाव), प्रीतमकुमार पुजारी (कागल), सोमनाथ कुडवे, रोहन पाटील (इचलकरंजी), किशोर खाडे (मुरगड), विक्रांत चव्हाण, विवेकानंद राळेभात, अभिजित भोसले (करवीर), प्रमोद मगर, भागवत मुळीक (शिवाजीनगर), अजित बापूसो पाटील (जयसिंगपूर).

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. वृत्तसेवा पन्हाळा

  पर्यावरणाचा बिघडलेला समतोल आणखी बिघडू नये यासाठी नव्या पिढीची मानसिकता तयार व्हावी यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने पृथ्वी रक्षणाची शपथ देण्यात येत आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याच्या संजीवन नॉलेज सिटीतील १४०० विद्यार्थ्यांनी शनिवारी पृथ्वीरक्षणाची शपथ घेतली. संजीवन विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालय, संजीवन पब्लिक स्कूल आणि संजीवन बालोद्यानच्या पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

  संजीवन विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यानी, संजीवन पब्लिक स्कूलमध्ये शाळेतील अध्यापक पांडुरंग गांजवे आणि संजीवन बालोद्यानमध्ये अध्यापक रणजित रसाळ यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली.

  संजीवन शिक्षण समुहाचे संस्थापक पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांनी पर्यावरण रक्षणाबाबत महाराष्ट्र टाइम्सच्या या उपक्रमाचे स्वागत केले. संस्थापक भोसले म्हणाले, 'पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आणि काळाची गरज बनली आहे. लहान वयातच मुलांच्या मनावर पर्यावरणाबाबत जाणीव ठसली पाहिजे. त्यासाठी असे उपक्रम उपयुक्त आहे. संजीवनच्या कॅम्पसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचा जागर व्हावा यासाठी आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करतो. पर्यावरणाचा अभ्यासातच अनिवार्य असा अंतर्भाव करण्यात आला आहे. या परिसरातील समृद्ध पर्यावरणातच स्वानुभवातून विद्यार्थ्यांत ती जाणीव व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.'

  बालोद्यानचे प्राचार्य पी. एम. पाटील, पब्लिक स्कूलचे रोहन बेलेकर, संजीवन विद्यानिकेतनच्या एस. एस. कुमठेकर, के. के. पवार, एस. डी. तांदळे, व्ही. टी. गवाणे, एम. सी. कुलकर्णी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  आपल्या अवती-भवती अचानक आलेल्या संकटात मदतीचा हात पुढे करणाऱ्या व्यक्ती देवदूतांसारखी भासतात. स्वत:च्या प्राणाची बाजी लावत ही मंडळी मदतीसाठी धावून येतात. अशी मदत करणाऱ्या संस्था, व्यक्तींच्या पाठीवर थाप पडावी आणि त्यांच्या कार्याची स्फूर्ती सर्वांना मिळावा, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने हॅपी स्ट्रीट या उपक्रमात त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. रविवारी (ता. २६) सकाळी सर्किट हाऊस रोड ते लाइन बाजार रोडवर हॅपी स्ट्रीटचा हा कार्यक्रम होईल.

  बुडणाऱ्या महिलांना वाचविणारे पाडळीचे पाच वीर

  राधानगरी जलाशयाच्या पायथ्याशी पडळी गाव आहे. गावाजवळून वाहणारे भोगावती नदीचे पात्र रुंद असल्याने त्यातून नागरिक ये- जा करतात. एप्रिल २०१९मध्ये गावात अभिषेक निल्ले यांच्या घरी मीना सुल्ताने व अमृता साळवी या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आल्या होत्या. नदीपात्रात त्या आपल्या मुलांना घेऊन कोरड्या पात्रात फिरत होत्या. दरम्यान धरणातून अचानक जोरदार पाणी सोडण्यात आले. पाण्यात दोघी गटांगळ्या खाऊ लागल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून गणेश पाटील आणि त्यांचे अन्य जोडीदार धावून आले. जवळच्या दोरखंडाच्या मदतीने त्यांनी लहान मुले व दोन्ही महिलांना सुखरूप बाहेर काढले. गणेश पाटील, सतीश पाटील, गणेश घोरपडे, मारुती पाटील, रवींद्र पाटील यांनी अतिशय थरारक प्रसंगात महिलांना वाचविले. राधानगरी पोलिसांनीही त्यांना मदत केली होती.

  मटक्याची पाळेमुळे खणणाऱ्या उपाधिक्षक

  जिल्ह्यात अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी अवैध धंद्याविरुद्ध मोहीम सुरू केली. यापैकी शहर पोलिस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या मटक्याची पाळेमुळे खणून त्यांना नेस्तानाबूत करण्याचा चंग बांधला आहे. २०११ मध्ये पोलिस दलात सहभागी झालेल्या कट्टे यांनी कोल्हापुरात परिक्षेत्रात काम केले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव तालुक्यातील वाळू उपसा या विरोधात त्यांना जोरदार कारवाई केली. कोल्हापुरात मटक्याचे रॅकेट उद्ध्वस्त करताना त्यांना मटकाचालकांना मोक्का लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. मटकाचालकांच्या संपत्तीचा शोध घेत मुंबई, गोव्यापर्यंत तपास केला. त्यांच्या कारवाईचा धसका घेऊन मटका बुकींनी राज्याबाहेर पोबारा केला. अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार आघाडी उघडून कोल्हापूरची सामाजिक सुरक्षितता जपण्याचे मोठे काम केले आहे.

  अग्निशमन दलाने वाचवले १७ जणांचे जीव

  महापुरात रस्ते बंद झाल्याने कराड, सांगली, सातारा येथील भाजी विक्रेत्यांचा प्रवास अडला. शिरोली नाका परिसरात पाणी उतरण्याची वाट बघत त्यांनी तीन दिवस तळ ठोकला होता. घरच्या आठवणीने व्याकूळ भाजी विक्रेत्यांनी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या महामार्गावरुन जाण्याचा प्रयत्न केला. तो त्यांच्या अंगलट आला. महामार्गावरील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे सातजण वाहून गेले. पाण्यात बुडालेल्या झाडांच्या शेंड्याचा आधार घेऊन ते मध्येच अडकून बसले. आणखी दहा जणांनी डिव्हायडरचा आधार घेतला. सकाळी त्यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केला. ही माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान धाडसाने महापुरात उतरले. बोट, दोरखंडाच्या सहाय्याने १७ जणांचे जीव वाचवले. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी रणजीत चिले, मनीष रणभिसे, मधुकर जाधव, तानाजी वडर, प्रमोद मोरे, अभय कोळी, सुनील वायदंडे या जवानांचे कार्य कौतुकास्पद ठरले.

  'अष्टविनायक'चे कार्यकर्ते झाले विघ्नहर्ता

  महापुरात सरकारी यंत्रणेबरोबर सर्वसामान्य जनता मदतीसाठी सरसावली होती. न्यू शाहूपुरी, शाहुपरी कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर परिसराला महापुराने वेढले होते. त्यावेळी शाहूपुरीतील अष्टविनायक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कयाक बोट उपलब्ध करून नागरिकांना बाहेर काढले. व्हीनस टॉकीज परिसरात महिलांना बाहेर काढताना बोट उलटून महिला पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्याने त्या गटांगळ्या खाऊ लागल्या. मंडळाचे कार्यकर्ते शैलेश पाटील, रोहन खोत, निलेश शिंदे, अमर समर्थ, अवि मिस्त्री यांनी जीव धोक्यात घेऊन पाण्यात उड्या मारल्या. सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तीन महिलांना पाण्यातून सुखरुप बाहेर काढत जीव वाचवले. महापुराच्या काळात पाच दिवसात या कार्यकर्त्यांनी अडीचशे नागरिकांना बाहेर काढले.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  कोल्हापूर जिल्ह्यातील मूळचे दिंडनेर्ली (ता. करवीर) गावचे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना केंद्र सरकारने पद्मश्री सन्मान जाहीर केला. पद्मश्री सन्मानाने वाडकरांसह कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव झाल्याच्या भावना व्यक्त करीत वाडकरांचे मित्र आणि नातेवाईकांनी आनंदोत्सव साजरा केला. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री सन्मानाची घोषणा करताच दिंडनेर्ली, चिखली आणि आंबेवाडीत नातेवाईक, मित्रांनी आनंदोत्सव साजरा केला.

  'सुरेश वाडकर यांचे मूळ गाव दिंडनेर्ली. वडील मुंबईत नोकरी करीत असल्याने वाडकर कुटुंब मुंबईत राहत होतो. वडिलांना संगीताची आ‌वड असल्याने सुरेश वाडकर यांनाही गाण्यांची गोडी लागली. सुट्टीच्या काळात अवर्जून सगळे कुटुंब दिंडनेर्ली, चिखली आणि आंबेवाडीत राहायचे. सुट्टीला आल्यानंतर ते भजनांमध्ये रमायचे. मित्रांसोबत खेळणे, शेतांमध्ये फिरणे हे त्यांचे आवडते छंद होते. कोल्हापूरच्या ओढीतून त्यांनी गापोळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात अॅडमिशन घेतले होते. मात्र, करिअरसाठी ते पुन्हा मुंबईला परतले,' अशा आठवणी त्यांचे मित्र पांडबा यादव सांगतात.

  वाडकर यांनी कोल्हापुरातील अनेक कलाकारांना प्रोत्साहन आणि मदतीचा हात दिला आहे. मुंबईत राहूनही त्यांनी भाषेचा कोल्हापुरी बाज सांभाळला आहे. त्यांच्या बोलण्यात नेहमीच कोल्हापूरबद्दलचा अभिमान झळकतो. कोल्हापूरच्या नव्या कलाकारांबद्दल ते नहेमीच भरभरून बोलतात, अशा आठवणी कोल्हापुरातील कलाकार आणि गायक सांगतात. वाडकरांसोबत काम केलेले संगीतकार शशांक पवार म्हणाले, 'माझ्या वडिलांनीही वाडकरांसोबत काम केले. १९९९ मध्ये माझ्या पहिल्या चित्रपटातील गाण्याला त्यांनी आवाज दिला. त्यानंतर अनेकदा सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर काम करताना कोल्हापुरी असल्याचा अभिमान वाटतो. नव्या कलाकारांना समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा पद्मश्री पुरस्काराने उचित सन्मान झाल्याचा आनंद आहे. या पुरस्कारामुळे वाडकरांसह कोल्हापूरचाही सन्मान झाला.'

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेने पंचवार्षिक निवडणूकीसाठी मतदार जाहीर केली आहे. मात्र मृत सभासदांच्या यादीत सुमारे ५०० जिवंत सभासदांचा समावेश केल्याने खळबळ उडाली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष विश्वास माने, माजी संचालक माजी महापौर आर. के. पोवार यांच्यासह निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. सत्ताधारी आघाडीने जिवंत मतदारांची नावे मतदारयादीत घुसडल्याचा आरोप विरोधी आघाडीने केला आहे.

  गव्हर्न्मेंट बँकेची निवडणूक मार्च महिन्यात होणार असून त्यासाठी निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. बँकेने २३ मार्च २०१८ ही अंतिम तारीख निश्चित करुन प्राथमिक मतदार यादी जाहीर केली. १५ संचालकांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी १९ हजार ८०३ मतदार आहेत. मृत ११८२ सभासदांची यादी १० जानेवारी रोजी प्रसिद्ध केली. यादीतील ५०० हून अधिक सभासद जिवंत असल्याचे निदर्शनास आले आहे. महसूलसह अनेक सरकारी खात्यांतील निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे यात आहेत. बँकेने सभासदांची पडताळणी न करता मोघम यादी प्रसिद्ध केली आहे. ही सदोष यादी संचालक मंडळ आणि बँक प्रशासनाने यादी मागे घेतलेली नाही असा आरोप विरोधकांचा आहे.

  बँकेचे माजी अध्यक्ष आणि २७ वर्षे संचालक विश्वास माने यांचे नाव मृतांच्या यादीत आहे. आजही ते बँकेत निवृत्त वेतन घेण्यासाठी येतात. माजी महापौर आर. के. पोवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यावेळी संचालक मंडळाने निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तरीही त्यांचे नाव मृतांचा यादीत असल्याचा आरोप विरोधी आघाडीने केला आहे. यादीवर आक्षेप घेण्याची अंतिम मुदत सोमवारी (ता. २७) असून त्यावेळी हे सभासद यादीवर आक्षेप नोंदविणार आहेत.

  मृत सभासदांची यादी तपासली असता महसूल विभागातील अनेक जिवंत सभासदांची नावे आढळली. त्यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. सोमवारी आम्ही यादीवर हरकत घेणार आहे.

  - हिंदूराव पाटील, निवृत्त महसूल अधिकारी

  महसूल विभागातील मृतांच्या यादीतील सदोष नावे

  रमेश इनामदार, शिवाजीराव कांबळे, पद्मराज कुरणे, रमेश कुलकर्णी, बापूसाहेब गंगधर, बेबी गडकरी, रोहिणी ढवळे, गजानन पाटील, हिंम्मत पाटील, माधव पोखलेकर, राऊसाहेब पोवार, नारायण फराकटे, गोकुळ मवारे, सूर्यकांत माजगांवकर, दादू मुंडेकर, शिवा मंतेरो, रमाकांत कवरणकर.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  'कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सामावून घेऊन माया आणि प्रेम दिल्यास मनोरुग्ण निर्माण होणार नाहीत. बदललेली कुटुंबव्यवस्था त्यांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरत आहे. विश्वासाचा मार्ग पोटातून जातो. त्यांना प्रेमाची एक भाकरी दिल्यास त्यांचे जीवन बदलून जाईल. त्यामुळे सेवा संकल्प प्रकल्प बंद पडेल' असा विश्वास माऊली आनंद पुरस्कारप्राप्त नंदकुमार पालवे यांनी शनिवारी व्यक्त केला. अध्यक्षस्थानी आनंद महाराज सांगवडेकर होते. सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टच्यावतीने बुलढाणा (ता. चिखली) येथे मनोरुग्णासाठी चालविण्यात येत असलेल्या कार्याबद्दल पालवे दाम्पत्याचा माऊली आनंदी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, रोख रक्कम, ज्ञानेश्वरी व कुंभाराची प्रतिकृती देऊन पालवे दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. पालवे म्हणाले, 'मनोरुग्णामध्ये प्रचंड सहनशक्ती असते. त्यांच्या वेदनेला आवाज नसतो. त्यांच्या वेदनेचे कारण बनू नका. त्यासाठी कुटुंब व्यवस्था भक्कम करा. कुटुंबांचा आकार सिमीत राहत असल्याने मनोरुग्ण रस्त्यावर येत आहेत. त्यांना प्रेमाची एक भाकरी दिल्यास त्यांचे जीवन बदलून जाईल. त्यामुळे सेवा संकल्पसारख्या प्रकल्पांची आवश्यकता भासणार नाही. प्रत्येकाने कुटुंबातील व्यक्तीची काळजी घेतल्यास आपला प्रकल्प बंद पडेल. हा प्रकल्प बंद पडण्यासाठी आपले आशीर्वाद मिळावेत.'

  जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'कुटुंबातील अत्यंत जीवाभावाच्या व्यक्तीला वेडा शब्द आपण लडीवाळपणे वापरतो. पण हाच व्यक्ती ज्यावेळी मनोरुग्ण म्हणून समोर येते, त्यावेळी ती व्यक्ती आपल्याला नको असते. अशा व्यक्तींना आपलेसे करण्याचा प्रयत्न पालवे दाम्पत्याने केला. त्यांचे वेडे मन आपला प्रकल्प बंद पडावा, अशी अपेक्षा व्यक्त करते. त्यांनी स्वत:मधील नैतिकतेला अधिष्ठान प्राप्त करुन दिल्यानेच सेवा घडत आहे.'

  यावेळी आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शामलादेवी सांगवडेकर यांच्यासह भाविक उपस्थित होते. निरंजनदास सांगवडेकर यांनी स्वागत केले. अंजली बदी यांनी स्वागतगीत गायिले. भावना सांगवडेकर यांनी प्रास्ताविक केले. आनंद मानधने यांनी सूत्रसंचालन केले. रामराया सांगवडेकर यांनी आभार मानले.

  फोटो आहे (नंदकुमार व आरती पालवे दाम्पत्यांना माऊली आनंदी पुरस्कार देऊन सन्मान करताना जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई व शामलादेवी सांगवडेकर. यावेळी डावीकडून रामराया सांगवडेकर, भावना सांगवडेकर, आनंदनाथ महाराज सांगवडेकर)

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री आप्पाचीवाडी (ता. चिकोडी) येथे ओम्नी मोटारीला ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातातील जखमी मीना सुभाष सुलताने (वय ५७, रा. जरगनगर कमानीजवळ) यांचा शनिवारी उपचार सुरू असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मुलापाठोपाठ आईचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री अपघातात सूरज सुलताने (वय ३३) आणि श्रेया लागू (७७) यांचा मृत्यू झाला होता.

  पोलिसांनी सांगितले की, तवंदी (कर्नाटक) येथे देवदर्शनासाठी जरगनगर येथील सुलताने, पंडित आणि साळवी कुटुंबीय ओम्नी मोटारीतून गेले होते. सुलताने कुटुंबीय दर अमावस्येला देवदर्शनासाठी तेथे जातात. शु्क्रवारी रात्री नऊच्या सुमारास देवदर्शन आटोपून कोल्हापूरकडे परतताना आप्पाचीवाडी येथे एका ट्रकने ओम्नी मोटारीला दिलेल्या धडकेत आठजण गंभीर जखमी झाले. यामध्ये सूरज आणि श्रेया यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. अपघातातील गंभीर जखमी सूरज यांची आई मीना सुलताने यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी बारा वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने जरगनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आहे. सूरज याच्या पश्चात विवाहित बहीण आहे. दरम्यान अपघातातील जखमी अनीष नितीन साळवी, आर्या केदार कुलकर्णी, अमृता नितीन साळवी, विजयकुमार लागू (रा. सर्व जरगनगर), पोर्णिमा पंडीत (रा जयसिंपूर) यांच्यावर सीपीआर आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  जरगनगरातील सुलताने कुटुंबीय दर अमावस्येला तवंदी (ता. चिकोडी) येथे देवदर्शनासाठी जातात. त्याचप्रमाणे शुक्रवारी रात्री सुलताने, पंडित आणि साळवी कुटुंबीय ओम्नी कारमधून देवदर्शनासाठी बाहेर पडले. मात्र, यापैकी मीना आणि सूरज यांचे हे देवदर्शन अखेरचे ठरले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आप्पाचीवाडी (ता. चिकोडी) येथे शुक्रवारी रात्री ट्रकने मोटारीला दिलेल्या धडकेत आई मीना सुभाष सुलताने आणि मुलगा सूरज सुलताने (वय ३३, रा. जरगनगर कमानीजवळ) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सूरजचा मृतदेह ताब्यात घेण्यापूर्वी आईचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबावर शोककळा पसरली. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सूरजने देहदानाचा संकल्प केला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही इच्छाही अपुरीच राहिली. कुटुंबातील एकुलत्या बहिणीने फोडलेला टाहो पाहून अनेकांची मने हेलावली.

  जरगनगरात राहणाऱ्या सूरजचे याचे पदवीपर्यंत शिक्षण झाले होते. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याचे कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याने जरगनगर परिसरात किराणामालाचे दुकान सुरू केले होते. तो आणि आई मीना दोघे येथे राहत होते. त्याच्या बहिणीचे लग्न झाले असून तिचे सासर जयसिंगपूर येथे आहे. दर अमावस्येला सुलताने कुटुंबीय तवंदीला देवदर्शनासाठी जातात. शुक्रवारी मौनी अमावस्येनिमित्त ते ओम्नी मोटारीतून गेले होते. मात्र, भिषण अपघातामुळे ते देवदर्शन अखेरचे ठरले. आई आणि मुलाला वाटेतच काळाने गाठले. सूरजचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. अपघातात जखमी आई मीना यांना वाचविण्याच्यासाठी त्याच्या मित्र परिवाराने धडपड केली. खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

  सूरज याची देहदान करण्याची इच्छा होती. १ जानेवारी रोजी त्याच्यासह तीन मित्रांनी देहदान करण्याचे संकल्पपत्र भरले. सूरजचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह एका हॉस्पिटलच्या शवागृहात ठेवण्यात आला होता. त्याच्या मित्रपरिवाराने देहदानाची इच्छा डॉक्टरांना सांगितली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. ठराविक वेळात देहदानाविषयीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तांत्रिक अडचणींनी त्याची ही इच्छाही अपुरी राहिली.

  दरम्यान, त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यापूर्वीच आईचा मृत्यू झाल्याची बातमी नातेवाईक आणि मित्रांना कळाल्यानंतर धक्का बसला. सूरच्या आईच्या मृत्यूने कुटुंबीयाचा जरगनगर येथील फ्लॅट अखेर कुलूपबंद झाला.

  सामाजिक कार्यकर्ता

  सूरजचा सामाजिक कार्यात पुढाकार असायचा. महापुराच्या काळात त्याने घरची परिस्थिती हलाखीची असूनही दुकानातील वस्तू पूरग्रस्त १५० कुटुंबीयांना दिल्या होत्या. परिसरातील प्रत्येक रक्तदान शिबिरात त्याचा सहभाग असायचा. त्याला भटकंती, गिर्यारोहणाचा छंद होता. चारच दिवसांपूर्वी शिवाजी चौकातून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीविरोधातील आंदोलनात सहभाग घेतला होता.

  मित्राचा अखेरचा फोन

  सूरजचा मित्र परिवार मोठा होता. देवदर्शनाहून परतताना साडेसात वाजता त्याला एका मित्राचा फोन आला. 'कोल्हापूरजवळ आलो असून एका तासात पोहोचणार आहे. त्यानंतर मित्रांसोबत जेवायला जावू,' असा निरोप त्याने मित्राला दिला होता. त्यानंतर लगेच अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हा शेवटचा फोन ठरला.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  विनाअनुदानित शिक्षक गेली वीस वर्षे सरकारकडून सकारात्मक निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या पाच वर्षात १०० अनुदान देण्याचे ठरले असताना सरकारकडून केवळ २० टक्के अनुदानावर बोळवण केली जाते. सरकारने कोणतेही कारण न सांगता विनाअट नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे, अन्यथा एक फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात येतील. राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे, गजानन काटकर, आनंदा वारंग, जनार्दन दिंडे, शिवाजी खापणे, सावता माळी, शिवाजी घाटगे, यशराज गाडे यांनी दिला आहे.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

  जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणूकीत ३५ दुहेरी ठराव आले आहेत. या ठरावांवर सोमवारपासून (ता. २७) सहाय्यक दुग्ध निंबधकांकडे सुनावणी होणार असून ३१ जानेवारीपर्यंत अंतिम यादी तयार केली जाणार आहे.

  गोकुळच्या निवडणुकीसाठी ३६५४ ठराव दाखल झाले आहेत. एकाच नावाचे ठराव वेगवेगळ्या संचालकांना दिले आहे. मात्र त्याची छाननी सहाय्यक दुग्ध निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांनी केली आहे. जिल्ह्यातील ३५ संस्थांनी वेगवेगळ्या नावाने दुहेरी ठराव दाखल केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक आठ ठराव पन्हाळा तालुक्यातील आहेत. कागल, राधानगरी तालुक्यातून प्रत्येकी चार, गडहिंग्लज गगनबावडा तालुक्यातून प्रत्येकी तीन, तर करवीर आणि शाहूवाडी तालुक्यातून प्रत्येकी दोन दुहेरी ठराव आले आहेत. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातून एकही दुहेरी ठराव आलेला नाही.

  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


  0 0

  कोल्हापूर: वेळेत उसतोडण्या न दिल्याच्या कारणावरून आधीच पुरामुळे हवालदिल झालेल्या पाडळी खुर्द येथील संतप्त शेतकऱ्यांनी दोनवडे येथील कुंभी कासारी कारखान्याच्या गट कार्यालयाला कुलूप लावून कर्मचाऱ्यांना कोंडले. अखेर कार्यकारी संचालक आणि शेती अधिकाऱ्याने ऊसतोडणीसाठी ज्यादा यंत्रणा पुरवण्याचे आश्वासन दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांना मोकळे करण्यात आले.

  ५ वर्षाखालील मुलांचं 'असं' बनवा आधार कार्ड

  शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर तोडावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार करूनही त्यावर कोणत्याही हालचाली होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांना अजूनही तोडण्या दिलेल्या नाहीत. पाळीपत्रकाप्रमाणे तोडणी येऊनही चिटबॉयकडून राजकीय द्वेषभावनेने तोडण्या दिल्या जात नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कारखान्याने ऊसतोडणीचे पाळीपत्रक विस्कळीत केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आधीच इथल्या शेतकऱ्याला पुराने मारले आहे. अशात कारखाना तरी शेतकऱ्यांना तारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होत हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

  '१० ₹ची थाळी, २०₹ची बिस्लरी पिणारा गरीब'

  कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी कोंडले तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

  आमिरसाठी अक्षयने बदलली सिनेमाची तारीख!


  मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट