Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूर शिवसेनेत राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील गटप्रमुखांच्या निवडीवरून शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांचे गट आमने सामने आल्याने संघर्ष निर्माण झाला. याच वादातून मंगळवारी (ता. २२) आमदार समर्थकांनी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या राजारामपुरीतील कार्यालयावर हल्ला केला. ट्युबलाइट आणि सोड्याच्या बाटल्या फोडण्यात आल्या. त्यामुळे परिसरात दहशत नि‌र्माण झाली.

दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप लिंग्रस यांनी केला आहे. ६० ते ७० जणांच्या जमावाने कार्यालयात गोंधळ घालून मोडतोडीचा प्रयत्न केल्याने लिंग्रस यांच्याकडून रात्री उशिरा राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला.

शिवसेनेतील पदाधिकारी निवडीवरून आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यात वाद आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या निवडीचे आदेश दिले आहेत. यानुसार शहरात दुर्गेश लिंग्रस यांच्याकडून गटप्रमुखांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार रविवारी (ता. २०) संजय पवार आणि विजय देवणे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यानंतर गटप्रमुखांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात केली. आमदार समर्थकांच्या प्रभागांमधून गटनिवडीला सुरुवात झाल्याने आमदार समर्थक सुनील जाधव यांनी निवडींना आक्षेप घेतला. सोमवारी रात्री लिंग्रस यांचा कार्यकर्ता विराज ओतारी याला सुनील जाधव यांनी फोन करून निवडीबाबत आपल्याशी चर्चा करावी, असा आग्रह धरला. याच मुद्यावरून जाधव आणि ओतारी यांच्यात सोमवारी रात्री शिवाजी चौक परिसरात शाब्दिक चकमक झाली होती. मंगळवारी सकाळी संजय पवार, दुर्गेश लिंग्रस समर्थकांसह कसबा बावडा परिसरातील निवडींचे काम करीत होते. यावेळी जाधव आणि ओतारी यांच्यात फोनवरून पुन्हा वाद झाला.

लिंग्रस यांनी आमदार समर्थक जाधव याला फोनवरून धमकी दिल्याचे सांगत मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास आमदारांचे स्वीय सहायक राहुल बंदोडे, सुनील जाधव यांच्यासह साठ ते सत्तर कार्यकर्त्यांनी लिंग्रस यांच्या राजारामपुरीतील कार्यालयावर हल्ला केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ट्युबलाइट आणि सोड्याच्या बाटल्या फोडल्या. विभागप्रमुख योगेश शिंदे यांना धक्काबुक्की केली. अर्वाच्च शिवीगाळ केली, याशिवाय एका दुचाकीचेही नुकसान केले. विराज ओतारी याला जिवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली, अशी माहिती लिंग्रस यांनी दिली. आमदारांनीच हल्ला करण्यासाठी समर्थकांना फूस लावल्याचा आरोप लिंग्रस यांनी केला आहे. या दरम्यान आमदार क्षीरसागर हे कार्यकर्त्यांसह कसबा बावड्यात ठाण मांडून बसले होते. या प्रकाराने बावडा आणि राजारामपुरीत काही काळ तणाव निर्माण झाला होता.

राजारामपुरीतील कार्यालयावर जमाव आल्याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला. या घटनेनंतर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, सुजित चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, राजू यादव, कमलाकर जगदाळे, आदींनी लिंग्रस यांच्या कार्यालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. भाजपचे शहराध्यक्ष संदीप देसाई यांनीही लिंग्रस यांच्या घरी जाऊन भेट घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करून घेण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयटी गुंतवणुकीसाठी कोल्हापूर परफेक्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तुमचं प्रॉडक्ट, आयडिया युनिक असेल तर जगभरातील सहा हजार कंपन्या तुमच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीसाठी सज्ज आहेत. आय. टी. क्षेत्रातील स्टार्ट्अप आणि विस्तारासाठी कोल्हापूरमध्ये पुरेपूर गुणवत्ता आहे. त्यामुळे आय. टी. क्षेत्रातील विकासात कोल्हापूर आजच्या बेंगळुरूशी स्पर्धा करेल’ असा विश्वास ‘मटा’च्या ‘मेक इन कोल्हापूर’ अंतर्गत आयोजित चर्चासत्रात आयटी तज्ज्ञांनी व्यक्त केला. सोमवारी सायंकाळी हॉटेल सयाजी येथे झालेल्या ‘आयटी स्टार्टअप आणि गुंतवणूक’ या चर्चासत्रात प्रतिथयश उद्योजकांनी आयटी क्षेत्रातील संधी आणि अडचणींवर भाष्य करीत नव उद्योजकांना मार्गदर्शन केले.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘मेक इन कोल्हापूर’ अंतर्गत चर्चासत्रात मनोरमा इन्फो सोल्युशन्सच्या सीईओ अश्विनी दानिगोंड, वेलसर्व्ह आयटीचे सीईओ अभिजित खोत, पीफॉरटू व्हेंचर्सचे सीईओ प्रण‌ित कुमार तसेच आयसायबरसेकचे सीईओ पंकज घोडे यांनी सहभाग घेतला.

मनोरमा इन्फो सोल्युशन्सच्या सीईओ अश्विनी दानिगोंड म्हणाल्या, ‘आय. टी. स्टार्टअप करताना जर ध्येय निश्चित असेल तुम्ही निश्चित केलं असेल तर भौगोलिक मर्यादा या तुमच्या ध्येयाआड येत नाहीत. आय. टी. कंपनीचा विचार करताना तुम्ही नव्या कल्पना, पद्धतींचा विचार करायला हवा. कोल्हापूरसारख्या ठिकाणी कंपनी सुरू केल्यानंतर तुम्ही बाहेरील देशांतही पोहोचू शकता. कारण तुमचं ध्येय कष्टाच्या आणि स्वप्नांच्या मदतीने चांगल्या बॅलन्सशीटमध्ये बदलता येऊ शकते. अर्थात यासाठी तयारी करायला हवी. कोल्हापूरमध्ये या क्षमता निश्चितच आहेत. त्याची संधी साधण्याचे प्रयत्न उद्योजकांच्या माध्यमातूनही व्हायला हवेत.’

पीफॉरटू व्हेंचर्सचे सीईओ प्रण‌ित कुमार म्हणाले, ‘आय. टी. क्षेत्रातील स्टार्टअपसाठी तुमच्या आयडिया, इनोव्हेशन्स खूप महत्त्वाची ठरतात. ती तुम्हाला लांबवरची स्वप्नं दाखवतात. खूप पैसे गुंतवणे किंवा रिटर्नची तातडीची अपेक्षा ही गोष्ट यात अपेक्षित नसते. तुमची युनिक आयडिया आसपासचं जगही बदलू शकते. मार्केटमध्ये आज अशा अनेक कंपन्या आहेत की ज्यांनी व्यवसायाच्या पारंपरिक पद्धती बदलून टाकून नव्या सिस्ट‌िम्स उभ्या केल्या. उबेर, ओला यांसारख्या कंपन्यांनी ट्रान्स्पोर्टेशन इंडस्ट्रीचे आयाम बदलून टाकले. अशा हटके संकल्पना तुम्हाला यशाच्या उंबरठ्याशी नेऊन ठेवतात. तशी चमक आपल्याला दाखवता आली पाहिजे.’

वेलसर्व्ह आयटीचे सीईओ अभिजित खोत म्हणाले, ‘तुमच्या संकल्पनांवर तुम्ही नवीन मार्केट निर्माण करू शकता. पण त्यासाठी मार्केटचा अभ्यास हवा. तुमच्या प्रॉडक्टमध्ये वेगळं काय आहे? हे समोरच्या गुंतवणूकदारासमोर सिद्ध करता यायला हवे. तुमचा आत्मविश्वास यासाठी महत्त्वाचा ठरतो. व्यवसायाची संधी नाही असे म्हणण्यापेक्षा ज्या क्षमता आहेत, त्यांचा वापर करून संधी कशा निर्माण करता येतील याचा विचार केला जायला हवा. तरच यश मिळवता येते. इंडस्ट्री आणि शिक्षण यांच्यात सांगड घालणे ही खूप महत्वाची बाब आहे. आपली प्रॉडक्ट्स बाजारात आणताना आपण संधी काय आहे, क्षमता काय आहेत यांचा विचार करायला हवा.’

आयसायबरसेकचे सीईओ पंकज घोडे म्हणाले, ‘आजघडीला कोल्हापुरात १२-१३ स्टार्टअप्स कार्यरत आहेत. पण कोल्हापूरची क्षमता खूप मोठी आहे हे लक्षात येते. जगभरात ६०१४ कंपन्या आय. टी. क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी सज्ज आहेत. त्यांच्याकडून आपण संधी कशी साधायची हे कोल्हापूरने लक्षात घ्यायला हवे. गुंतवणूकदार खूप आहेत. त्यापैकी फक्त शंभर गुंतवणूकदार जर पुढे आले, त्यांना आपण विकासाची शाश्वती देऊ शकलो तर कोल्हापूर हे आय. टी. क्षेत्रात बेंगळुरूशीच स्पर्धा करेल. कंपन्यांकडून कॅम्पस इंटरव्ह्यू घेताना स्कील आणि इंटरपर्सनल स्कील पाहिले जाते. यातही जगाची भाषा म्हणून इंग्रजीला महत्त्व दिले जाते. यासाठी आपण स्वतःचे अपग्रेडेशन कसे करायचे हे तरुणाईने लक्षात घ्यायला हवे. यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.’

चर्चासत्राच्या उत्तरार्धात उपस्थित आय. टी. क्षेत्रातील उद्योजकांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. प्रशांत पाटील, ए. बी. अत्तार, उद्योजक मनीष राजगोळकर यांनी आयटी उद्योगातील स्टार्टअपबाबतचे प्रश्न विचारले. त्यांच्या शंकांचे चर्चासत्रातील मान्यवरांनी निसरन केले. नितीश कामदार यांनी सूत्रसंचालन केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे रिस्पॉन्स हेड मधुर राठोड यांनी आभार मानले. टाइम्स ग्रुपचे जनरल मॅनेजर गौरव अहुजा प्रमुख उप‌स्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील आणि आय. टी. क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार-शहरप्रमुख आमने-सामने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गटप्रमुखांच्या निवड प्रक्रियेवरून शिवसेनेत सुरू असेलला वाद हातघाईवर आला आहे. कधी काळी आमदार राजेश क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असलेले शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस आता कट्टर विरोधक झाले असून निवडीवरून दोन गट आमने-सामने आले आहेत. मंगळवारी दुपारी कसबा बावडा येथे शहरप्रमुखांच्या गटाने तर आमदार समर्थकांनी राजारामपुरीत दहशत माजवली.

शिवसेनेतील गटबाजी नवीन नाही, मात्र मुद्यांवर होणारा वाद आता गुद्यांवर येऊन पोहोचला आहे. गटप्रमुखांच्या निवडीवरून सुरू झालेल्या वादाने आमदार राजेश क्षीरसागर आणि शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांचे गट थेट आमने-सामने उभे ठाकले आहेत. सोमवारी रात्री आमदार समर्थक उपशहरप्रमुख सुनील जाधव आणि शहरप्रमुख लिंग्रस यांचे समर्थक विराज ओतारी या दोघांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी सकाळी पुन्हा या दोघांमध्ये मोबाइलवरून शाब्दिक चकमक झाली. जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख लिंग्रस यांनी आमदार गटाचा विरोध डावलून मंगळवारी दुपारी कसबा बावडा परिसरात निवड प्रक्रियेचे काम सुरू ठेवले. यामुळे लिंग्रस आणि जाधव यांच्यात फोनवरून बाचाबाची झाली. जाधव आणि लिंग्रस यांची भेट होऊ शकली नाही. संजय पवार यांच्यासह लिंग्रस गट बावड्यातून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने आमदार राजेश क्षीरसागर आणि सुनील जाधव कार्यकर्त्यांसह बावड्यात पोहोचले. दुपारी एक वाजल्यापासून ते चारपर्यंत आमदार बावड्यात ठाण मांडून होते.

बावड्यात फिरल्याच्या रागातून सुनील जाधव, राहुल बंदोडे यांच्यासह साठ ते सत्तर कार्यकर्ते पारी अडीचच्या सुमारास जाब विचारण्यासाठी लिंग्रस यांच्या राजारामपुरीतील घरी गेले. यावेळी लिंग्रस याच्या घरावर सोडावॉटर आणि पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या. याशिवाय ट्युबलाईटही रस्त्यावर फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या आवाहनानंतरही कार्यकर्त्यांनी शिविगाळ करीत बाहेरील दुचाकीची मोडतोड केली. दुर्गेश लिंग्रस यांच्या पत्नी आणि बहिणीने काही कार्यकर्त्यांना घराच्या गेटवरच अडवण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने राजारामपुरीत प्रचंड दहशत निर्माण झाली. मोठा जमाव जमल्याने काही काळ तणावही निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह रवी चौगुले, विजय चव्हाण, दत्ताजी टिपुगडे आदींनी लिंग्रस यांच्या घरी जाऊन घटनेची माहिती घेतली. हल्ल्याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी राजारामपुरीत गर्दी केली होती. संजय पवार यांनी तातडीने मोबाइलवरून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेनंतर आमदार क्षीरसागर यांनीही शहरप्रमुख लिंग्रस यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेत त्यांची हकालपट्टी करण्यासाठी वरिष्ठांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. जिल्हाप्रमुखांचा गटही आक्रमक असल्याने शिवसेनेतील वाद टोकाला गेल्याचे दिसत आहे.

शिवसेनेचे पक्षसचिव खासदार अनिल देसाई आणि विनायक राऊत यांना घटनेची माहिती दिली आहे. गटप्रमुखांच्या निवडी करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाप्रमुखांना देण्यात आले आहेत. यात हस्तक्षेप करून दहशत माजवणे योग्य नाही. घडलेला प्रकार निषेधार्ह आहे. यापुर्वी रणजित आयरेकर या कार्यकर्त्यालाही मारहाण झाली.

संजय पवार,जिल्हाप्रमुख

केवळ विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. आमदारांचे स्वीय सहायक राहुल बंदोडे, सुनील जाधव यांनी घरावर केलेला हल्ला निंदनीय आहे. महिलांच्या विनंतीनंतरही अर्वाच्च शिवीगाळ करून तोडफोड करण्यात आली. दहशतीच्या बळावर दडपशाही करणे योग्य नाही.

दुर्गेश लिंग्रस,शहरप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर आय.टी.ला गरज दिशादर्शकाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आय. टी. क्षेत्राच्या स्टार्टअप आणि विस्तारासाठी कोल्हापूर हे चॅलेंज नसून ती एक सर्वोत्तम संधी आहे. मात्र, यासाठी कोल्हापूरला गरज आहे ती इथल्या तरुणाईच्या इंग्रजी भाषाविकास, व्यक्तिमत्त्व विकासाची आणि स्थानिक कंपन्यांना चांगल्या गुंतवणूक संधींबाबत मार्गदर्शनासाठी एखाद्या दिशादर्शकाची... अशा टिप्स दिग्गज आय. टी. कंपन्यांच्या सीईओंनी दिल्या. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मेक इन कोल्हापूर’ कॉन्क्लेवअंतर्गत हॉटेल सयाजी येथे झालेल्या ‘आयटी स्टार्टअप आणि गुंतवणूक’ या विषयावरील चर्चासत्रात मनोरमा इन्फो सोल्युशन्सच्या सीईओ अश्विनी दानिगोंड, वेलसर्व्ह आयटीचे सीईओ अभिजित खोत, पीफॉरटू व्हेंचर्सचे सीईओ प्रणीत कुमार तसेच आयसायबरसेकचे सीईओ पंकज घोडे यांनी कोल्हापूरच्या आय. टी. क्षेत्राच्या विकासासह स्टार्टअप्सची दिशा उलगडली.

अश्विनी दानिगोंड :

कोल्हापूर ही आय. टी. उद्योगाच्या स्टार्टअप, विस्तारासाठी संधी आहे. फक्त इथल्या तरुणाईने भाषाविकास आणि व्यक्तिमत्त्व विकास या दोन गोष्टींवर भर देण्याची गरज आहे. तुमच्याकडे स्कील्स काय आहेत, या क्षेत्राच्या कॅम्पसच्या गरज काय आहेत यांचा विचार केला पाहिजे. कामाचा प्रामाणिकपणा ही महत्त्वाची गोष्ट इथल्या तरुणाईत आहे, त्यामुळे त्यांच्यातील उणिवा दूर करण्यासाठी कंपन्यांना फार काही करावे लागत नाही. ब्रेनस्टॉर्मिंग, थॉट प्रोसोसवर भर दिल्यावर इथले विद्यार्थी विकसित होतात. वस्तुतः चांगल्या करिअरसाठी बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. मात्र, तुम्ही तुमच्या क्षेत्रात एक्स्पर्ट असाल तर भाषा हा करिअरमध्ये अडथळा येत नाही. कोल्हापूरला थोड्याफार स्कील्स अपग्रेडेशनची गरज आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ किंवा स्थानिक कॉलेजांतील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांवर भर देता येईल. संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा विकास या जोरावर येथील तरुणाई आय. टी. क्षेत्रात उज्ज्वल करिअर करू शकेल.

अभिजित खोत :

आय. टी. क्षेत्रात करिअरच्या निश्चितच खूप संधी आहेत. त्यातील टॅलेंट आपण लक्षात घ्यायला हवे. स्टार्टअप्ससाठी मार्केटपासून सर्वच बाबींचा तुम्हाला विचार करायला हवा. तुमच्याकडे स्कील असेल, तुमचं प्रॉडक्ट दमदार असेल तर लोक निश्चितच तुमच्यावर विश्वास ठेवतात. गुंतवणूकदार शोधताना आधी स्वतःच्या परिघात पाहा. तुमचे नातेवाईक, मित्र यांच्यापासून सुरुवात करा. घरातून, नातेवाइकांकडून आणि मित्रपरिवाराकडून मिळणारे पाठबळ अनेकदा नवे काही करण्याची उमेद देते. त्यांचा विश्वास आपण कसा जिंकतो हे खूप महत्त्वाचे असते. व्यवसाय सुरू करताना रिसर्च, आत्मविश्वास ही पहिली लढाई असते. ती जर तुम्ही जिंकली तर नंतर जग तुमचेच आहे. कोल्हापूरला योग्य दिशादर्शनाची गरज आहे. आय. टी. कंपन्यांतील गुंतवणुकीसाठी अडचणी येतात. कारण या क्षेत्रातील भौतिक गुंतवणूक खूप कमी आहे. बौद्धिक संपदेवर हा व्यवसाय चालत असल्यामुळे त्याविषयीची जागृती करणे महत्त्वाचे वाटते. बौद्धिक संपदेच्या जोरावरच आपण गुंतवणूकदार मिळवू शकतो. त्यामुळे त्यासाठीचे प्रॉडक्ट डॉक्युमेंटेशन हे महत्त्वाचे आहे.

प्रणीत कुमार :

आय. टी. क्षेत्रातील स्टार्टअपसाठी तुमचं व्हिजन क्लिअर हवं. स्टार्टअपसाठी पेपरवर्कवर भर हवा. तुम्ही कंपनीची पद्धतशीर बांधणी कशी करू शकाल याचा विचार करायला हवा. अनेकदा गुंतवणुकीच्या अनुषंगाने भेटीला येणाऱ्या व्यक्तींना आपण कंपनी रजिस्टर केली आहे का? असा प्रश्न केला तर बहुतांश वेळा उत्तर नकारार्थी मिळते. स्वतःच्या कल्पनांवर तुमचा विश्वास असायला हवा. सीए, कंपनी सेक्रेटरी, कॉर्पोरेट लॉयर अशा विविधांगी टप्प्यांवर लक्ष द्यायला हवे. कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करायची, त्याचे शेअर्स लिस्टिंग करायची याचा विचार स्थानिक उद्योजक करीत नाहीत. आपण किती टक्क्यांचा मालक व्हायचं हे ध्येय निश्चित करायला हवे. गुंतवणूकदाराकडे जाताना, ही गुंतवणूक कशासाठी हवी आहे या प्रश्नाचे समर्पक उत्तर देता यायला हवे. त्याचा विश्वास संपादन करता आला पाहिजे. गुंतवणूक भौतिक सुविधांमध्ये की मार्केटमध्ये याची निश्चिती आधीच करायला हवी. बौद्धिक संपदा मापन, ब्रँडनेम, ट्रेडमार्क, शेअर होल्डिंग अॅग्रीमेंट या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवे.

०००

पंकज घोडे :
आय. टी. कंपन्यांसाठी गुंतवणूकदार सज्ज आहेत. फक्त त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचता कसे?, त्यांच्यासमोर मांडणी कशी करता? त्यांचा विश्वास कसा संपादन करू शकाल? या बाबी महत्त्वाच्या आहेत. हे एखाद्या आयएएस परीक्षेसारखं आहे. तीन लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रयत्न करतात. त्यातील १००० विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यातील फक्त दहा विद्यार्थी सिलेक्ट होतात. भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा, शक्तिशाली देश आहे. त्यामुळे विकासाची संधी साधण्यासाठी फक्त योग्य दिशादर्शक पाहिजेत. या उद्योगातील यंग स्टार्टअप्ससाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन हवे. तुम्ही बड्या कंपन्यांना जर व्यवसायाची हमी दिली तर कोल्हापूरची इकोसिस्टीमही चेंज होऊ शकते. तेवढी क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. तुम्ही टार्गेट सेट करा. त्यातून आय. टी. कंपन्या कोल्हापुरातच निश्चितच गुंतवणूक करतील आणि कोल्हापूरची इकोसिस्टीमही बदलू शकेल.


- शिवाजी विद्यापीठ असो वा या परिघातील अन्य इन्स्टिट्यूट्स. त्यांनी विद्यार्थ्यांना डिग्री नव्हे तर स्कील देण्याची गरज आहे. आज तरुणांना नोकरी नाही असेही चित्र दिसते. तर त्याचवेळी सर्वच कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे हे चित्र दिसते. यासाठी प्रयत्न करायला हवेत. शिवाजी विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटर सुरू व्हायला हवे.


- कोल्हापूरच्या आय. टी. विकासाला फक्त एक मेंटॉर हवा आहे. इथल्या आय. टी. विकासासाठी स्थानिक उद्योजकांना प्रामाणिक सल्ला, मार्गदर्शन, दिशादर्शनाची गरज आहे. असा मेंटॉर शोधा. मात्र, त्याच्यावर अवलंबून राहू नका. त्याची मदत घ्या. व्यवसायात प्रगती करताना, कशाला त्रास घ्यायचा अशी मानसिकता ठेवायची की चॅलेंज स्वीकारायचं हे निश्चित करा.


- कोल्हापूर ही एक संधी आहे. इथे ऑपरेशनल युनिट्स आहेत. दळणवळणाची उत्तम सोय आहे. वर्क आणि लाइफ यांचा बॅलन्स साधता येऊ शकतो. व्यवसायातील विकासाची संधी गाठताना, वैयक्तिक, हेल्दी आयुष्य, सामाजिक जाणिवा यांची चांगली सांगड घालता येऊ शकते.


- आय. टी. कंपनीत बारा-पंधरा तास काम करून दहा मिनिटात घरी पोहोचणे कोल्हापुरातच शक्य आहे. इथे पब, मॉल संस्कृती फारशी नाही. त्यामुळे इथल्या तरुणाईत आणखी पैसे मिळवायचेत. त्यासाठी कष्ट करायचे आहेत ही तयारी निश्चितच आहे.


- कोल्हापूरमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे. फक्त विकासाची संधी साधण्याची गरज आहे. कॉर्पोरेट एन्व्हायरमेंटच्या पाठोपाठ कॉर्पोरेट कल्चर इथे रुजते आहे. इथे व्यवसायातील स्पर्धा तीव्र नाही. बिझनेस पॉलिटिक्स कमी आहे. त्यामुळे आयुष्य निरोगी जगून, आपले मन प्रफुल्लित ठेवून उन्नती साधू शकतो हे कोल्हापूरमध्येच शक्य आहे.


- आय. टी. क्षेत्रातील मार्केट ट्रेंड काय आहे, हे तपासून रिझर्ल्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट्स हवीत. गुंतवणूक मिळवल्यानंतर ती नेमकी कशात करणार, याचे प्लॅनिंग हवे. टॅलेंट डेव्हलपमेंट, स्कील्ड मॅनप़ॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर या सर्वच बाबींचा विचार करायला हवा.


- आय. टी. क्षेत्रातील स्टार्टअपसाठी भागौलिक मर्यादा नाहीत. या सेवा उद्योगात आपण कुठूनही काम करू शकतो. फक्त गुंतवणूकदार, ग्राहक आणि आपण यातील संवादाचा सेतू साधता आला पाहिजे.

- तुम्ही तुमची कंपनी सुरू करा. स्टार्टअपची आयडिया मांडा. नंतर गुंतवणूकदार शोधा. बिल्ड, ग्रोथ अँड सस्टेंड हे मॉडेल लक्षात छेवा. तुम्ही नक्कीच यशाच्या मार्गावर पोहोचाल.

- इन्फोसिस, येस बँक यांसारख्या कंपन्या आय. टी. क्षेत्रातील कंपन्यांना इन्क्युबेशन सेंटर्स डेव्हलप करून देण्यास तयार आहेत. बड्या कंपन्या आज तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर पुरवतील. असा एंजल इन्व्हेस्टर कोल्हापूरला हवा आहे. अर्थात यासाठी बिझनेसचं पर्सेप्शन हवं. आयडीयाज क्लिअर हव्यात.

- कोल्हापूरमध्ये ज्ञान आहे, प्रॉडक्ट्स आहेत. हवा फक्त निष्णात मार्गदर्शक. बिझनेसची नेक्स्ट ग्रोथ कशी हवी हे मांडणाऱ्या तज्ज्ञाची इथे गरज आहे. चांगल्या मार्केटिंग कौशल्याची गरज आहे.

- आय. टी. उद्योगाला विश्वासार्हतेची गरज असते. ती या उद्योगाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ही बाब कोल्हापूरचे बलस्थान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळ क्लस्टरला मिळणार बुस्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपरिकचा गोडवा राखत गुळापासून उपपदार्थांची निर्मिती करून गूळ उत्पादकांना अधिकाधिक नफा मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या गूळ क्लस्टर योजनेला गती मिळणार आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘मेक इन कोल्हापूर मटा कॉन्क्लेव’ मध्ये क्लस्टर योजनेला शंभर टक्के निधी देण्याची ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला जागेचा प्रश्नही निकालात निघणार आहे.

फाउंड्री उद्योग हा येथील उद्योगाचा पाया असला, तरी येथील कोल्हापुरी गूळ, चप्पल आणि तांबडा-पांढरा रस्सा आपली खासियत आहे. त्यामुळेच या पदार्थांच्या विकासाला चालना देण्याची आवश्यकता आहे. कोल्हापुरी गूळ निर्मितीला भौगिलक वातावरण पोषक असल्याने या उद्योगाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी निधीची तरदूत करू असे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र सकराच्या सुक्ष्म व लघू मंत्रालयाने गूळ क्लस्टर योजना मंजूर केली. त्यानंतर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शाहू गूळ खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नियुक्त केली. क्लस्टर योजनेसाठी १५ कोटी रुपयांचा खर्च येणार असून दीड कोटीचे भागभांडवल आवश्यक होते. केंद्राचे ९० टक्के अनुदान मिळणार असल्याने भागभांडवलाची उभारणी केली. मात्र नंतर जागेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर कागल येथील फाइव्ह स्टार एमआयडीमध्ये पाच एकर जागेचा प्रस्ताव पाठवण्यात आला. अनेक दिवस हा प्रस्ताव रेंगाळल्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांनी मुंबई औद्योगिक विकास महामंडळाकडून जमीन देणाच्या आदेशाचे पत्र दिले. त्याला अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नसला, तरी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी स्वत: लक्ष घालण्याचे अभिवचन दिल्याने हा प्रश्न तडीस निघणार आहे.

गूळ क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने गूळ निर्मिती होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाबरोबर सामजस्य करारही केला आहे. यासाठी बायाटेक्नॉलॉजी विभाग यावर परिश्रम घेत आहे. क्लस्टर योजना कार्यन्वित झाल्यानंतर गूळ उद्योगाला स्थिरता मिळण्याबरोबरच हंगामामध्ये दरामध्ये होणारी घसरण रोखण्यास मदत होणार आहे. गुळापासून चॉकलेट, पावडर, बिस्किट, आईस्क्रिम आदी पदार्थांची निर्मिती होऊ शकणार आहे. त्यामुळे उत्पादकांना अधिक दराची शाश्वत मिळणार आहे. तसेच गूळ निर्यातीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.


जागेचा प्रश्न सुटेल

केंद्र सरकारच्या सुक्ष्म व लघू मंत्रालयाने क्लस्टर योजना जाहीर केल्यानंतर आवश्यकता कागदपत्रासह संपूर्ण प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळाला सादर केला होता. प्रस्तावाला दिरंगाई होताच स्वत: आमदार चंद्रदीप नरके यांनी मुंबई येथून मंजुरीचे कागदपत्रे आणली. त्यामुळे कागल फाइव्ह स्टार एमआयडीसीतील पाच एकर जमीन देण्याचे आदेश उद्योग भवनाला दिले होते. पण त्यानंतर जिल्हा उद्योग भवनच्या एमआयडीसी अधिकाऱ्यांनी जमीन देता येत नसल्याचे पत्र दिले आहे. मात्र ‘मटा कॉन्क्लेव’ कार्यक्रमामध्ये अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी आश्वासन दिल्याने जागेचा प्रश्न निकालात निघणार आहे.

क्लस्टर योजना केंद्र सरकारच्या सुक्ष्म व लघू मंत्रालयाची आहे. योजना गती येण्यासाठी राज्य व केंद्रामध्ये समन्वय असण्याची आवश्यता आहे. केंद्राकडून क्लस्टर योजनेला ९० टक्के अनुदान मिळणार आहे. पण राज्य सरकार जर प्रयत्न करणार असले, संपूर्ण प्रश्नच निकालात निघेल. त्यामुळे येथील पारंपरिक गूळ उद्योगाला स्थिरता मिळेल.

राजाराम पाटील, चेअरमन, गूळ क्लस्टर योजना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोतिबा विकासासाठी पाच कोटींचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र जोतिबा विकास आराखड्यासाठी मंजूर झालेला निधी अद्याप मिळत नसल्याची वस्तुस्थिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने ‘मटा कॉन्क्लेव’च्या माध्यमातून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडताच बुधवारी सरकारने तातडीने ५ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला. यामुळे जोतिबा परिसराच्या विकासकामांना गती येणार आहे.

जोतिबा परिसराच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विकास आराखडा बनवण्यात आला. या आराखड्यानुसार २५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी सरकारकडे केली होती. त्यानुसार सरकारने निधीला मंजुरीही दिली होती. मात्र तो निधी मिळत नसल्याने विकासकामांना सुरूवात झाली नव्हती. परिणामी यात्रा तसेच वर्षभर येणाऱ्या भाविकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. कोल्हापूरच्या विकासाला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या ‘मटा कॉन्क्लेव’ मधून निधी अभावी रखडलेला जोतिबा विकासाचा प्रश्न मांडला होता.

यावेळी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी राज्याची तिजोरी उघडी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कॉन्क्लेव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी सरकारकडून जोतिबा विकास आराखड्यासाठी मंजूर केलेल्या २५ कोटी निधीपैकी पाच कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला. या आराखड्यामधून दर्शन मंडप, सेंट्रल प्लाझा, स्वच्छतागृहे, भक्त निवास सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणीपुरवठा, भूमिगत वीज पुरवठा अशी विकासकामे करण्यात येणार आहेत. सरकारने दिलेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून जोतिबा परिसराच्या विकासकामांना सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेत विद्यार्थिनीवर बलात्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
सातवीत शिकणाऱ्या एका मुलीवर वारंवार झालेल्या बलात्कारातून ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी या प्रकरणी दत्ता लक्ष्मण ढावरे (वय २४) याला ताब्यात घेतले आहे.
शहरातील एका चाळीत राहणाऱ्या सातवीत शिकत असलेल्या पीडित मुलीवर ढावरेने वारंवार बलात्कार केला. मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर कुटुंबीयांनी तिला डॉक्टरकडे नेले असता, ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबत ढावरेला जाब विचारले असता, ढावरेच्या घरच्यांनी वाच्यता न करण्याची धमकी देत पीडितेच्या कुटुंबीयांना हाकलून दिले. दरम्यान, अत्याचाराची माहिती कळताच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढावरेचे घर गाठून जाब विचारला. तोपर्यंत परिसरातील इतर नागरिकही तेथे जमा होऊन ढावरेची यथेच्छ धुलाई केली. हा प्रकार कळताच घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ लिंगायत मठाधीशांचा बेळगावातवेगळ्या धर्मासाठी मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून, त्याला तशी मान्यता देण्याच्या आणि जैन, शीख धर्माला असणारे अधिकार मिळण्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणांहून आलेल्या पन्नास मठाधीशांच्या नेतृत्वाखाली सुमारे पन्नास हजारांचा मोर्चा मंगळवारी बेळगावमध्ये काढण्यात आला.
धर्मवीर संभाजी चौकातून निघालेला या मोर्चाचे लिंगराज कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभेत रूपांतर झाले. ‘लिंगायत आणि वीरशैव धर्म हे वेगवेगळे आहेत. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. राज्य सरकारने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी,’ आदी मागण्या मठाधीशांनी या वेळी केल्या.
‘नऊशे वर्षांपासून आम्ही हिंदू धर्मापासून वेगळे आहोत. आजही आम्ही हिंदू धर्माबाहेर आहोत. आम्ही हिंदूविरोधी नाही. आम्ही लिंगायतच आहोत, हिंदू नव्हे. संत बसवेश्वरांनी शिकवलेल्या शिकवणुकीमुळे अन्य धर्मीयांनी देखील त्याकाळी लिंगायत धर्माचा स्वीकार केला होता. जैन, शीख धर्मियांप्रमाणे लिंगायतांना देखील घटनात्मक हक्क मिळाले पाहिजेत,’ अशी मागणी लिंगायत अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ए. एस. जामदार यांनी केली. नागनूर रुद्राक्ष मठाचे सिद्धराम स्वामीजी यांनी लिंगायत समाजाच्या मागण्यांचे निवेदन वाचून दाखवले. या वेळी उपस्थित मठाधीशानी घोषणा दिल्या.
लिंगायत समाजाच्या मठाधीशांनी मागणीचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मोर्चाच्या वेळी शहरातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. बाहेरगावाहून आलेल्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. कर्नाटकरोबरच महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर, सांगली आदी भागांतील लिंगायत समुदाय मोर्चात सहभागी झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ फौजदारी कारवाईची फाईल गायबसांगली महानगरपालिकेतील प्रकार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली महापालिकेच्या समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोत मांस टाकल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्याविषयीची फाईलच आयुक्तांच्या बंगल्यातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आला. या प्रकरणी सदस्यांनी आरोग्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर उपायुक्तांनी नवीन फाईल तयार करून चार दिवसांत कारवाई करण्याची ग्वाही सभेत दिल्यानंतर सदस्य शांत झाले.
सांगली महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी सभापती संगीता हारगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोत अन्य ठिकाणच्या शहरांतील मांसाचे तुकडे, जनावरांची हाडे ट्रकमधून आणून विल्हेवाट लावली जात होती. हा प्रकार नगरसेवक दिलीप पाटील यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता. त्यानंतर स्थायीच्या सभापतींनी ट्रक मालकावर फौजदारी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप फौजदारी दाखल का झाली नाही? असा सवाल सदस्य दिलीप पाटील यांनी बुधवारच्या सभेत उपस्थित केला. त्यावेळी आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी ट्रक मालकावर फौजदारी कारवाई करायची की दंडात्मक कारवाई करायची, या बाबतची फाईली आयुक्तांच्या सहीसाठी बंगल्यावर पाठविली होती. मात्र, ती फाईल गायब झाली असल्याचा खुलासा केला. आरोग्याधिकाऱ्यांच्या खुलाशाने सदस्य आक्रमक झाले. आयुक्तांच्या बंगल्यातून फाईल गायब झालीच कशी? असा संतप्त सवाल प्रशासनाला केला. अखेर उपायुक्त सुनील पवार यांनी ट्रक मालकावरील कारवाई संदर्भातील नवीन फाईल तयार केली आहे. त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी घेऊन चार दिवसांत कारवाई करण्याची ग्वाही दिली. सदस्यांनी आयुक्तांची सही न घेता आरोग्याधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली कारवाई करावी, अशी मागणी केली. मात्र, न्यायालयात खटला मजबूत होण्यासाठी आयुक्तांचे लेखी आदेश आवश्यक असल्याचे मत उपायुक्तांनी मांडले.
तातडीने पॅचवर्क करण्याचे आदेश
महापालिका क्षेत्रातील पॅचवर्कच्या कामाच्या चौकशीचे काय झाले? असा सवाल शिवराज बोळाज यांनी केला. पुढच्या सभेत अहवाल देण्याची ग्वाही उपायुक्तांनी दिली. शिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क करावे, अशी मागणी बोळाज यांनी केली. सभापती हारगे यांनी तातडीने खडी-डांबरचे पॅचवर्क करण्याचे आदेश दिले. वसंतदादा शेतकरी कामागार भवनच्या समोरील रस्त्याचे काम मंजूर असताना अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. ड्रेनेजच्या नावाखाली हा रस्ता केला जात नाही. मात्र, नागरिकांची गैरसोय होत असल्याने तातडीने रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी सदस्या सुनिता पाटील यांनी केला.
महापालिकेची ई-गर्व्हनन्सची स्वतंत्र यंत्रणा
महापालिकेने एचसीएलचा प्रकल्पाचा ठेका रद्द केल्यानंतर प्रशासनाने मनपास्तरावर ई-गर्व्हनन्स प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आवश्यक असणाèया साधनसामुग्री खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये वितराग कॉम्प्युटर्स प्रा. लि. या कंपनीची सर्वात कमी दराची म्हणजे २ कोटी ४८ लाख ५ हजार ९५८ रूपयांची निविदा आली आहे. ठेकेदाराने जीएसटीची रक्कम भरण्याची ग्वाही दिल्याने या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली. महिन्यात या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. पाच वर्षे साहित्य दुरूस्ती व देशभाल करण्याची जबाबदारी कंपनीची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरूण इंगवले यांचाजातीचा दाखला वैध

$
0
0

, कोल्हापूर

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अरूण इंगवले यांचा कुणबी जातीचा दाखला पात्र असल्याचा निकाल बुधवारी जात पडताळणी समितीने दिला. यामुळे इंगवले यांच्या सदस्यत्वचा धोका दूर झाला आहे. दरम्यान, तक्रारदार संदीप कारंडे, प्रविण जनगोंडा हे या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

इंगवले यांनी यापूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका राष्ट्रवादीकडून खुल्या प्रवर्गातून लढवल्या होत्या. यावेळी नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे इंगवले यांनी कुणबी जातीचा दाखला मिळवला. दाखल्यासाठी इंगवले यांनी रक्ताच्या नात्यानुसार स्वतःच्या आजोबांच्या वंशावळीचा पुरावा जोडलेला नाही. दत्तक आजोबा दत्तात्रय इंगवले यांचा पुरावा जोडला आहे. नियमानुसार असा पुरावा जोडता येत नाही. इंगवले यांनी राजकीय दबाव वापरून खोट्या कागदपत्राव्दारे दाखला मिळवला आहे, त्यामुळे त्यांचा दाखला अपात्र ठरवावे, अशी तक्रार पराभूत उमदेवार कारंडे, जनगोंडा यांनी समितीकडे केली. त्याची सुनावणी झाली. सुनावणीच्या निकालात त्यांचा दाखला पात्र ठरवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा प्रशासनावर गुन्हे दाखल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजेंद्रनगर येथील शाळेत क्रीडा शिक्षकानेच चार विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकावर गुन्हे दाखल केले, मात्र या प्रकरणी शाळा प्रशासनावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यासाठी बुधवारी (ता. २३) शाळेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

राजेंद्रनगरातील कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक विजय विठ्ठल मनुगडे (वय ३५, रा. फुलेवाडी) याने चार मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल आहे. याप्रकरणी क्रीडा शिक्षकासह शाळा प्रशासनावरही कारवाई केली जावी या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शाळेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, ‘५० ते ७० हजार रुपये फी भरून पालक मुलांना शाळेत प्रवेश घेतात. विद्यार्थी शाळेत पोहोचल्यानंतर त्याच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी शाळा प्रशासनाची आहे. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेत असेल, तर शाळेने वेळीच कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रशासन किंवा मुख्याध्यापकांना लैंगिक शोषणाचा प्रकार कसा लक्षात आला नाही? याबाबत संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि मुख्याध्यापकांवरही गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी करावी.

‍संजय पवार, विजय देवणे, रवी चौगुले, सुजित चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, राजू यादव, कमलाकर जगदाळे, आदींनी लैंगिक शोषणप्रकरणी शाळा प्रशासनाला धारेवर धरले. पोलिस निरीक्षक संजय साळुंखे उपस्थित होते. त्याचबरोबर पोलिस फौजफाटाही तैनात केला होता.

मनुगडेच्या पोलिस कोठडीत वाढ

क्रीडा शिक्षक विजय मनुगडे याची पाच दिवासांची पोलिस कोठडी बुधवारी संपल्याने त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी मनुगडेला पोलिस कोठडी आवश्यक असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली. कोर्टाने मनुगडेच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.

पीडितांचे इनकॅमेरा जबाब

दरम्यान, संशयिताच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधून पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. याची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. पीडित विद्यार्थिनींचे इनकॅमेरा जबाब नोंदवण्याचे कामही पूर्ण झाले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांच्या पीएसह ५० कार्यकर्त्यांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गटप्रमुखांच्या निवडीवरून शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्वीय सहायक राहूल बंदोडे, उपशहरप्रमुख सुनील जाधव यांच्यासह ५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. लिंग्रस यांच्या फिर्यादीवरून आमदार क्षीरसागर यांच्या समर्थकांवर दहशत माजवणे, मारहाण करण्याचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेत दुचाकीचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेतील गटबाजीमुळे पक्षांतर्गत धुसफूस आणखी वाढली आहे.

शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांनी फिर्यादीत म्हटले आहे, 'मी गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचा सक्रीय कार्यकर्ता आहे. गेल्या तीन वर्षापासून कोल्हापूर शहर उत्तर विभागाचा शहरप्रमुख आहे. माझा कार्यकर्ता विराज ओतारी हा शिवसेना पक्षाची गटप्रमुखांची यादी तयार करण्यासाठी इच्छुकांचे अर्ज भरून घेत होता. यावेळी संशयित बंदोडे याने त्याला आमच्या विभागामध्ये का फॉर्म भरले? अशी विचारणा करीत धमकावले. सोमवारी (ता. २१) रात्री ओतारी याला शिवीगाळ करुन पाय तोडण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर मंगळवारी (ता. २२) संशयित जमावासह राजारामपुरीतील शिवसेनेच्या कार्यालयात आले. राहुल बंदोडे, सुनील जाधव यांच्यासह पन्नास कार्यकर्त्यांनी कार्यालयावर हल्ला करुन दुचाकी फोडली. यावेळी विराज ओतारी हा जमावाला अडवत असताना त्याला मारहाण केली. या घटनेत मुलगी भूमी जखमी झाली आहे,’ अशी नोंद फिर्यादीत आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. संशयितांना नोटिसा पाठवल्या आहेत. फिर्यादी आणि नातेवाईकांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखाव्याचे सेट उभारण्यात कार्यकर्ते दंग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

घरगुती गणपतीचे आगमन उद्या (शुक्रवारी) होत आहे. घरगुती गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी आकर्षक मखरीसह सजावट करण्यात आली आहे. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची धामधूमही सुरू झाली आहे. बहुतांशी मडंळांचे स्टेज आणि अंतर्गत सजावट व्यवस्था पूर्ण झाली आहे. सर्व मंडळांच्या मंडपांशेजारी शेवटच्या टप्प्याची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. नोकरी आणि व्यवसाय सांभाळत संध्याकाळी कार्यकर्ते मंडळाच्या ठिकाणी एकत्र येतात. कोणती कामे तातडीने उरकण्याची गरज आहे, त्याची चर्चा होते आणि ती तातडीने मार्गीही लावली जातात. गणरायाच्या स्वागतासाठी आगमनासाठी शहरातील बाजारपेठाही हाऊसफुल्ल झाल्या आहेत.

श्री शिवाजी चौक तरुण मंडळ, नाथा गोळे तालीम मंडळ, संभाजीनगर मित्र मंडळ, कपिलतीर्थ मार्केट मित्र मंडळ, दिलबहार मित्र मंडळ, रंकाळा वेस तरुण मंडळांचे मंडप घालण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासह शहरांतील पेठांतील सार्वजनिक तरुण मंडळांमध्ये श्रींच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. घरगुती गणपती आगमनादिवशीच बहुतांशी सार्वजनिक तरुण मंडळांनी श्रींच्या प्रतिष्ठापनेचे नियोजन केले आहे. पूल गल्ली तरुण मंडळ, एसपी बॉईज, रंकाळा वेश गोल सर्कल मंडळाने श्रीं मूर्ती आणली आहे. काहींनी मुंबई, पुणे येथून मूर्ती आणल्या आहेत. मंडळाचे मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंडप डेकोरेटर्सकडून राजमहल, आकर्षक मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. राजारामपुरी, शाहूपुरी परिसरातील तरुण मंडळांत मंदिराची आकर्षक प्रतिकृती आणि तांत्रिक देखावे उभारण्याची तयारी सुरु झाली आहे. राजारामपुरीतील युवक मित्र मंडळ विमान आकाशात झेपावत असल्याचा तांत्रिक देखावा उभारणार असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. राजारामपुरी सहावी गल्ली येथील जय शिवराय तरुण मंडळाने ५० फूटी हनुमानाची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी गणेशोत्सवापूर्वीच नागरिकांची गर्दी होत आहे. शहरात सार्वजनिक तरुण मंडळांची संख्या सुमारे दोन हजार आहे. पैकी ९२२ सार्वजनिक तरुण मंडळांनी एक खिडकी योजनेकडे नोंदणी केली आहे. ‘श्री’च्या आगमनासाठी कार्यकर्त्यांची लगबग मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. रात्री बारा ते एक वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या बैठका रंगू लागल्या आहेत.

तरुण मंडळांनी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पुरुष आणि महिलांच्या स्वतंत्र रांगा करण्याचे नियोजन सुरु केले आहे. सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरु आहे. मंडळाच्या समोर बॅरिकेट लावण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी गणेश कार्यकारिणी समिती नेमून दिलेल्या पदानुसार कामाची जबाबदारी सोपविली आहे. मंडळ परिसरात प्लास्टिक आणि अन्य कचरा होऊ नये, यासाठी मंडळाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. कार्यकर्त्यांचे शेकडो हात श्रींच्या स्वागताच्या तयारीत गुंतले आहे. मंडप सजावटीसाठी झालर, पडदे, कंठी, मखर, आयुधे, भक्तिगीतांच्या सीडी, दिव्यांच्या माळा आदींनी बाजारपेठा सजल्या आहेत. महाव्दार रोड, पापाची तिकटी परिसर ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. पांरपरिक वाद्यांचे पथक, बेंजो, ढोल-ताशा वाजविणाऱ्या कलाकारांच्या वेळेचे नियोजन, मंडप उभारणी, प्रकाश व्यवस्था, पडदे, सजावट, मिरवणुकीची तयारी, दे‍खाव्यासाठीची धावपळ सर्वत्र सुरु असल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळत आहे. थर्माकोल आणि लाकडी मखरसह गणेशोत्सवात डिजिटल प्रिटिंग, थ्रीडी इफेक्ट, फोम मखर खरेदी, वजनाने हलकी, हाताळायला सोपी, वाजवी दरामुळे विविध प्रकारची मंदिरे, राजमहाल आणि डिजिटल मखरांना चांगली मागणी आहे. टिकल्यांचे नक्षीकाम, रेशमी, वेलवेट या प्रकारातील झालरी, मिरवणुकीचे खास आकर्षण असणारे झेंडे, विविध प्रकारचे दिवे, तोरण, ‘श्रीं’च्या हातातील त्रिशूल, पाश, कुऱ्हाड, परशु या आयुधांच्या प्रतिकृतींनाही चांगली मागणी आहे.

००

नो डॉल्बीसाठी आवाहन

गेल्यावर्षी डॉल्बीचा दणदणाट केलेल्या मंडळांसह शहरातील मंडळांना पोलिसांनी नो डॉल्बीचे आवाहन केले आहे. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी आयोजित केल्या जात आहेत. यामध्ये काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा गजर करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर काही मंडळांनी क्षमतेपेक्षा कमी डेसिबलमध्ये डॉल्बी लावण्याची हमी दिली आहे. मंडळाच्या अध्यक्षांसह कार्यकारिणीची नावे आणि दूरध्वनी क्रमांक पोलिसांनी नोंदवले आहेत.


देखाव्याची तयारी सुरु

यावर्षी घरगुती गणपती आठवडाभर आहेत. त्यानंतर सार्वजनिक मंडळांचे देखावे खुले होणार आहेत. १ ते ४ सप्टेंबर या चार कालावधीत मंडळे देखावे सादर करणार आहेत. काही मंडळात तांत्रिक देखावे आणि शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरात सजीव देखाव्याच्या तालमी सुरु आहेत. रात्री उशीरापर्यंत कलाकारांकडून सराव करुन घेतला जात आहे.


कुंभारवाड्यात रात्रीचा दिवस

कुंभारवाड्यात तर रात्रीचा दिवस झाला आहे. शेकडो कारागीरांचे हात श्रींच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहेत. अवघे कुटुंबच मूर्तीच्या कामात गुंतले आहे. बापट कॅम्प, शाहूपुरी, गंगावेश या ठिकाणी मूर्तीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरु आहे. त्यासह उपनगरातील मुख्य चौकात स्टॉल मांडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळ क्लस्टरसाठी मुंबईत तातडीची बैठक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या सूक्ष्म आणि लघू मंत्रालयाच्यावतीने मंजूर असलेल्या गूळ क्लस्टर योजनेला गती देण्याचा निर्धार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या योजनेला ‘बूस्ट’ देण्यासाठी त्यांनी तातडीने मुंबईत बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ‘मटा कॉन्क्लेव’मध्ये गूळ क्लस्टरला निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानुसार मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अल्पावधीत गूळ क्लस्टर योजना कार्यान्वित होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कोल्हापूरचे उद्योगक्षेत्र फाउंड्री उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे येथील संपूर्ण उद्योग फाउंड्री उद्योगावर अवलंबून आहे. फाउंड्री उद्योगासह इतर उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर गूळ, चप्पल, आजरा घनसाळ, पांढरा-तांबडा रस्सा आणि इतर कोल्हापूरची खासीयत असलेल्या वस्तू आणि पदार्थांच्या निर्मितीतून उद्योगवाढीच्या विपुल संधी आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मटा कॉन्क्लेव’मध्ये गूळ क्लस्टर योजनेला गती देण्याची मागणी पुढे आली होती.

कार्यक्रमात अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी गूळ क्लस्टरसाठी शंभर टक्के निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मंगळवारी या उद्योगाशी संबंधित सर्व घटकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मुनगंटीवार यांनी केवळ घोषणा न करता, कार्यक्रमानंतर मुंबईत दाखल झाल्यानंतर या विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी गूळ क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी मुंबईत तातडीने बैठक घेण्याची सूचना केली. बैठकीसाठी गूळ क्लस्टर योजनेशी संबंधित घटकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. गूळ क्लस्टर योजना कार्यन्वीत करण्यासाठी स्वत: अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्याने योजना त्वरित कार्यान्वित होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.


कोल्ड स्टोअरेज प्रस्ताव प्रलंबीत

गूळ हंगामाला सुरुवात झाल्यानंतर बाजार समितीत गुळाची एकाचवेळी आवक झाल्यानंतर दरात घसरण होण्याचा नेहमीचाच अनुभव आहे. यातून गूळ उत्पादकांची सुटका करण्यासाठी बाजार समितीने कोल्ड स्टोअरेज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे तीन हजार मेट्रिक टन क्षमतेच्या कोल्ड स्टोअरेजचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी कन्स्लटंटकडून तयार करुन पणन व वस्त्रोद्योग विभागाकडे समितीने पाठवला आहे. अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी गूळ क्लस्टरप्रमाणे यातही लक्ष घातल्यास गूळ उद्योगाच्या संपूर्ण समस्या निकालात निघण्यास मदत होणार आहे.


=========

कोल्हापूरच्या पारंपरिक गूळ निर्मितीला व्यावसायिक दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी क्लस्टर योजना तातडीने कार्यान्वित करण्यात येईल. यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेणार आहे. गूळ क्लस्टर समिती व कोल्हापूर बाजार समितीसह संबंधित घटकांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमबाह्य मंडप, कमानींवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सेफ सिटी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याच्या महापालिकेत हालचाली सुरु आहेत. व्हेइकल ट्रॅकिंग, पार्किग मॅनेजमेंट सिस्टीम, आपत्ती व्यवस्थापन आ​णि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांची यादी तयार करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. आयुक्त अभिजित चौधरी यांनी बैठकीत विभागनिहाय आढावा घेतला. वॉर्ड कमिटीच्या बैठकीत अधिक प्रश्नांची सोडवणूक करण्याची सूचना आयुक्तांनी केली. उत्सव कालावधीत नियमबाह्यरित्या मंडप, स्वागत कमानी उभारलेल्या मंडळांवर कारवाई करण्याचे आदेश उपशहर अभियंत्यांना दिले.

आयुक्तांनी, दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी सकाळी आठ वाजता अधिकाऱ्यांना शहरात फिरती करण्याचे आदेशही दिले. अनेक ​भागात अनधिकृत नळ कनेक्शनच्या तक्रारी आहेत. त्याला चाप लावण्यासाठी शाखा अभियंता, मीटर रीडर, दोन मजूरांना घेऊन फिरती करुन कारवाई करावी. जल अभियंत्यांनी दरमहा अतिरिक्त आयुक्तांना अहवाल द्यावा असे ठरले. सार्वजनिक मंडळांनी रस्त्यावर शेड, स्वागत कमानी उभ्या केल्या आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन नियमावलीच्या अनुषंगाने नियमांच्या तपासणीचे आदेश आयुक्तांनी उपशहर अभियंत्यांना दिले.

नगररचना विभागाकडून रेखांकन मंजुरी, बांधकाम भोगवट्याच्या अनुषंगाने वॉर्ड ऑफीस, पाणी पुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, विद्युत, इस्टेट विभागाच्या ना हरकत दाखल्यामध्ये कोणतीही अट न घालता आवश्यक कामे करून घ्यावीत. हरकत नसल्याबाबतचा उल्लेख करून दाखला द्यावा असे आदेश जल अभियंता, आरोग्य ​अधिकारी, शहर अभियंता, उपशहर अभियंत्यांना दिले.


बैठकीतील निर्णय

विद्युत विभागाकडे प्रत्येक वॉर्ड ऑफीसला दोन पवडी कामगार

निविदांबाबतची नियमावली निश्चित

पाणी कनेक्शनसाठी रस्ता खोदाईत शुल्क कमी केल्यास कारवाई

विद्युत व उद्यान विभागाने तक्रारींची पहिल्यांदा सोडवणूक करावी

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व शेवटच्या आठवड्यात बैठका

खासबाग मैदानाची देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

कुस्ती मैदानाच्या देखभाल, दुरुस्तीसंदर्भात तालीम संघाशी चर्चा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घराच्या वाटणीवरून भावावर तलवार हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घराच्या वाटणीवरून झालेल्या वादात सख्ख्या भावाने मोठ्या भावावर तलवार हल्ला केला. या घटनेत मनसेचे जिल्हा सचिव प्रसाद आनंदराव पाटील (वय ३९, रा. उभा मारुती चौक, शिवाजी पेठ) हे जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जयदीप आनंदराव पाटील याच्याविरोधात फिर्याद दाखल झाली आहे. पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनसेचे जिल्हा सचिव प्रसाद पाटील हे उभा मारुती चौकातील वडिलोपार्जित घरात वरच्या मजल्यावर विभक्त राहतात. याच घरात खालच्या मजल्यावर प्रसाद यांचे योगेश, जयदीप हे दोन्ही भाऊ आणि आई, वडील राहतात. प्रसाद यांनी साकोली कॉर्नर येथील जुन्या घराची डागडुजी करून तिथे कार्यालय सुरू केले आहे. या घरात वाटणी मिळावी असा योगेश आणि जयदीप यांनी आग्रह धरला आहे. वाटणीवरून तिन्ही भावांमध्ये वाद असल्याने गेल्या काही दिवसांपासून परस्परांचे बोलणेही बंद आहे.

बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास जयदीप याने प्रसाद यांच्याशी वाद घालत वाटणी मागितली. यावेळी जयदीप आणि प्रसाद या दोघांमध्ये वाद वाढला. रागाच्या भरात जयदीपने प्रसाद यांच्या डोक्यात तलवारसदृश्य शस्त्राने हल्ला केला. प्रसादची आई आणि पत्नीने दोघांचे भांडण सोडवले. प्रसाद यांना जखमी अवस्थेत नीलेश लाड या मित्राने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. जयदीप याने जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे प्रसाद यांच्या पत्नी स्वप्नगंधा पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सापीआरमध्ये स्वप्नगंधा पाटील यांचा जबाब नोंदवून घेतला.

जुना राजवाडा पोलिसांना घटनास्थळावर जाऊन मारहाणीची माहिती घेतली. सीपीआरमध्ये जाऊन जखमी प्रसाद पाटील यांच्याकडून घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण जखमी प्रसाद हे बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांना फारशी माहिती मिळाली नाही. संशयित हल्लेखोर जयदीप पाटील याचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकाराने उभा मारुती चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुसळे यांचा दाखला अवैध

$
0
0

कागल

माद्याळ पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आलेले पंचायत समिती सदस्य जोति दादू मुसळे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरले. जिल्हा जात पडताळणी समितीसमोर बुधवारी ही सुनावणी झाली. मुसळे यांना भारतीय संविधान अनुच्छेद २२६ नुसार उच्च न्यायालयाकडे दाद मागता येणार आहे. ते येथील माद्याळ (ता. कागल) मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून ६७ मतांनी विजयी झाले होते. विरोधी शिवसेनेच्या दिपक शिंदे यांनी याबाबत तक्रार केली होती.

एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुसळे यांनी तर विरोधी दिपक शिंदे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. मुसळे यांना सहा हजार १७२ तर शिंदे यांना सहा हजार १०५ मते मिळाली होती. त्यानंतर पराभूत शिंदे यांनी १० मार्च २०१७ रोजी मुसळे यांच्या कुणबी दाखल्याबाबत तक्रार केली. याबाबत न्यायालयातही दावा दाखल आहे. परंतु निवडणुकीनंतर सहा महिन्यात जात प्रमाणपत्र पडताळणी होणे आवश्यक असताना मुसळे हे प्रमाणपत्र सिद्ध करु शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा ३१ मे २०१० रोजीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले. तसेच त्यांना दिलेले जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी जप्त करुन त्याचा अहवाल समितीकडे दाखल करावा असे सांगण्यात आले. शिवाय उपविभागीय अधिकारी करवीर यांनी हे जातीचे प्रमाणपत्र जप्त करावे, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दिपक शिंदे यांनी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असल्याने कलम २७/५ नुसार आपल्याला विजयी घोषित करावे, असा जिल्हा न्यायालयात निवडणूक दावा दाखल केला आहे. शिंदे यांच्या बाजूने अॅड. संजय डी क्रुझ यांनी काम पाहिले.

-------------

चौकट

... तर शिवसेनची सत्ता

सध्या पंचायत समितीत शिवसेनेचे चार सदस्य तर मुसळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पाच सदस्य आहेत.तरीदेखील आमदार हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांच्याशी युती करुन मंडलिक गटाला सभापतीपद आणि आपल्या गटाकडे उपसभापती पद ठेवले आहे. मुसळे यांचे सदस्यत्व रद्द झाल्यास आणि शिंदे यांचा दावा त्यांच्या बाजूने झाल्यास शिवसेनेची एकहाती सत्ता कागल पंचायत समितीवर येवू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची गटबाजी विरोधकांच्या पथ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आतापर्यंत गटबाजीमुळे सवतासुभा मांडून स्वतंत्र कारभार करणाऱ्या शिवसेनेतील गटांची मजल आता एकमेकांवर हल्ले करण्यापर्यंत पोहचली आहे. राजकारण करत असताना ‘आंबे’ पाडण्याच्या पद्धतीचा जाहीर पंचनामा केला जात असल्याने जिल्हाप्रमुख व आमदारांमधील वितुष्ट कोणत्या थराला पोहचले आहे हे स्पष्ट होत आहे. अजूनपर्यंत वरिष्ठ पातळीवरुन सबुरीचेच धोरण अवलंबले गेल्याने या गटबाजीला एकप्रकारे चालना मिळत आहे. जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असताना शहरातील शिवसेनेतील ही गटबाजी विरोधी उमेदवारांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

शहरातील शिवसेनेमधील गटबाजीचे दर्शन यापूर्वी सातत्याने घडले आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यालयावरुन झालेले वाद, महापालिकेत पाठींबा देण्यावरुन नगरसेवकांमध्ये पडलेले गट, नेमणुकांबाबत संपर्क नेत्यांसमोरच उभे ठाकलेले गट, महापालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर झालेला हल्ला यामधून शिवसेना कायम वादग्रस्त राहिली आहे. आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या गटात तर सलगपणे सुरू असलेल्या वादामुळे शिवसेना म्हणजे गटबाजी हेच चित्र समोर येत आहे. या दोघांमध्ये कुणी, कुठे काम करायचे यावरुन सुरू झालेल्या वादाचे प्रकरण इतके ताणले गेले की पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त दोघे एकत्र येण्याचे प्रसंग फारच कमी वेळा आले. जरी ते एका कार्यक्रमात आले तरी शहराशी संबंधित आमदार व जिल्हाप्रमुख यांच्यामध्ये संवाद होतच नव्हता. या विसंवादाच्या फटक्यामुळे ​कार्यकर्त्यांची मोठी ससेहोलपट झाली. दोन्ही गटाकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी जाण्यासाठी अशा कार्यकर्त्यांची ओढाताण व्हायची. यामुळे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या गटात सहभागी होण्याशिवाय पर्याय राहिले नाहीत.

महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये समझोता झाला होता. पण त्यानंतर या गटांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. त्यानंतर सातत्याने एकमेकांना पाण्यात पाहिले जात होते. महापालिकेतील महापौर ते विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीनिमित्त तर शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये आमदार व संजय पवार गट दिसून आले. काँग्रेस आघाडीला पाठींबा दिला जात असताना ‘अर्थ’ व्यवहाराचे आरोप करण्यात आले. या प्रकारातून शिवसेनेचा कारभारच स्पष्ट होत होता. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या शहरातील उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. अशा परिस्थितीत कसबा बावडा परिसरातील मतदार एकसंघ ठेवण्याचे आव्हान आमदार क्षीरसागर यांना पेलावे लागणार आहे. तेथेच विरोधी संजय पवार गटाने पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यास सुरूवात केल्याने आमदार गटाला हा धोका वाटणे स्वाभाविक आहे. या परिसरातील वर्चस्व कमी होण्याच्या शक्यतेमुळे स्वत‍ः आमदार क्षीरसागर यांनी संजय पवार यांच्यावर आंबे पाडण्याचा प्रकाराच्या कारभारावर केलेल्या टिकेमुळे दोघांमधील वाद प्रचंड विकोपाला गेल्याचे स्पष्ट होत आहे. वैयक्तिक पातळीवर करण्यात आलेल्या टिकेमुळे शिवसेनेतील वातावरण ढवळून निघाले आहे.

भाजपकडून कोंडी... तरीही

राज्य पातळीवर शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने सातत्याने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मित्रपक्ष आमनेसामने उभे ठाकतील, असेच चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत एक आमदारही महत्वाचा ठरणार असल्याने विद्यमान आमदारांच्या ठिकाणी दगाफटका होऊ नये याची काळजी आतापासूनच घेण्याची आवश्यकता आहे. मात्र येथील वादाबाबत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ठोस पाऊले उचलली गेली नसल्याने हा वाद वाढतच चालला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झिरो पेंन्डसी’त कोल्हापूर टॉपवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘पुणे विभागात झिरो पेंन्डसी कामात कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय टॉपवर आहेत. त्यामुळे विविध प्रकरणांची निर्गत लवकर होणार आहे. पंचायत समितीमध्ये दाखल झालेले प्रकरण आयुक्त पातळीवर आल्यास ते सहा महिन्यांच्या आत निकालात निघेल’, अशी माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. झिरो पेंन्डसी कामाच्या तणावामुळे करवीर पंचायत समिती लिपीकाचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला. त्या पार्श्वभूमीवर दळवी यांची भेट महत्वाची ठरली. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदमधील विविध विभागात त्यांनी भेट दिली. झिरो पेंन्डसीचे चांगले काम झाल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

दळवी म्हणाले, ‘पुणे विभागातील पाच जिल्हयात झिरो पेंन्डसीचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्यात आहे. कामाचा आढावा आणि तपासणी करताना कर्मचाऱ्यांत आत्मविश्वास दिसत आहे. झिरो पेंन्डसीचे काम पूर्ण झाल्यानंतर सामान्य लोकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. प्रशासन गतीमान होईल. कार्यालयातील फाईलींचे ‌ढीग नाहीसे होतील. विभागीय पातळीवर सध्या विविध कामांची १ हजार ८६ प्रकरणे प्र‌लंबित आहेत.’

पंचगंगा प्रदूषणमुक्तीचे प्रयत्न

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी ९४ कोटींचा आराखडा सरकारकडे पाठवला. निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरूवात होईल. सातबारा उताराचे ऑनलाईन काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी डाटा सेंटरमध्ये इंटरनेटची गती कामी आहे. गती वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही दळवी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिद्री’ मतदारयादीवरील सुनावणी पूर्ण

$
0
0

कोल्हापूर

बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मतदारयादीवर घेण्यात आलेल्या हरकतींवरील सुनावणी बुधवारी (ता. २३) प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांच्यासमोर पूर्ण झाली. १०९ हरकतींपैकी सात संस्थांच्या हरकतींवर सुनावणी झाली. रामलिंग विकास सेवा सोसायटीने आपले म्हणणे वकिलांमार्फत सादर केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार पात्र-अपात्र ठरलेल्या सभासदांवरील हरकतींबाबतची सुनावणी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बिद्री कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून प्रारुप मतदारयादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार १०९ हरकती दाखल झाल्या होत्या. नावात बदल, चुकीच्या नावाची प्रसिद्धी, हयात असताना मयत म्हणून झालेली नोंद यासह आठ संस्था गटातील तर व्यक्ती सभासद गटातील २७ हरकती दाखल झाल्या होत्या. १७४ हरकती या सभासद पात्र-अपात्रतेसंबंधी होत्या. रावळ यांच्यासमोर बुध‍वारी तब्बल सहा तास सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान हरकतदार व त्यांच्या प्रतिनिधींनी म्हणणे सादर केले. त्यानुसार ३५ हरकतीवर सुनावणी झाली असून पात्र-अपात्र सभासदांच्या हरकतीसंबंधी सुनावणी राखून ठेवत स्वतंत्रपणे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बिद्री कारखान्यासाठी ५७ हजार ८०९ सभासद पात्र झाले आहेत. १०४२ संस्थांचे प्रतिनिधी संस्थागटातून मतदान करणार आहेत. त्यापैकी चार संस्थांचे दुबार ठराव कार्यालयास प्राप्त झाल्याने त्यावर सुनावणी घेण्यात आली. संस्थाध्यक्ष, सचिव व ज्यांच्या नावे ठराव आहेत, अशा व्यक्तींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. चार दिवसांत हरकतीवरील सुनावणीचा निकाल देऊन आवश्यकत्या बदलानुसार अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images