Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘स्मार्ट सिटी’साठी सज्जता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘शहराचा पाणीपुरवठा, आरोग्यासह मलनिःस्सारण योजना आदी पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी कोल्हापूर महापालिका प्रभावीपणे काम करत आहे. केंद्र ​आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांतून कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. शहर सुरक्षिततेसाठी ‘सेफ सिटी’प्रोजेक्ट कार्यान्वित आहे. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’संकल्पनेला आवश्यक सुविधा, सक्षमता कोल्हापुरात आहे’, अशा आत्मविश्वास आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी व्यक्त केला.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि विवेकानंद कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मटा संवाद’ कार्यक्रमात आयुक्त डॉ. चौधरी यांनी शहर विकासाची संकल्पना मांडली. विवेकानंद कॉलेजच्या सभागृहातील कार्यक्रमात आयुक्तांनी शहर ‘वाय-फाय’ बनविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या तांत्रिक समितीकडे सादर केला आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. कोल्हापुरात अद्ययावत आयटी पार्क व वाय-फाय शहर यावर त्यांनी भर दिला.

‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागासाठी महापालिकेची तयारी कुठल्या पातळीवर सुरू आहे ?

खरे तर, इतर शहरांशी तुलना करताना कोल्हापूर अनेक बाबतीत अग्रेसर आहे. पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, कामात तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये कोल्हापूरची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छ शहराची संकल्पना यातही कोल्हापूरची स्थिती चांगली आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या पहिल्या टप्प्यात कोल्हापूरचा समावेश झाला नाही. आता जेव्हा ‘स्मार्ट सिटी’चा दुसरा टप्पा सुरू होईल, त्यात कोल्हापूर सक्षमपणे प्रतिनिधीत्व करेल. पहिल्या टप्प्यातील त्रुटींचा अभ्यास करुन प्रभावी योजनेसाठी डाक्युमेंटेशन, प्रेझेंटेशन केले जाईल.

आयटी पार्क आणि वाय फाय शहर या योजना का रखडल्या?

कोल्हापूरकडे ‘नेक्स्ट आयटी डेस्टिनेशन’ म्हणून पाहिले जाते. महापालिकेने आयटी पार्कसाठी जागा निश्चित केली आहे. मात्र छोट्या उद्योजकांच्या वेगळ्या मागण्या आहेत. मोठ्या कंपन्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. अद्ययावत आयटी पार्क हे शहर विकास, रोजगाराला पूरक ठरणारे आहे. याची सांगड घालून आयटी पार्क विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. शहर वाय-फाय ब​नविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने ‘वाय-फाय’चा प्रस्ताव राज्य सरकारच्या तांत्रिक समितीकडे सादर केला आहे. याचा अभिप्राय, अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

प्रश्न : शहराच्या कचऱ्याच्या समस्येवर कसा तोडगा काढणार ?

शहरातील कचऱ्याची विल्हेवाट हे मोठे आव्हान आहे. सध्या कचरा कसबा बावड्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प (झूम) येथे टाकला जातो. घनकचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प रखडला ही वस्तुस्थिती आहे. हा प्रकल्प सुरू झाला की कचरा विल्हेवाटीची समस्या संपुष्टात येईल. त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय खतनिर्मितीचे प्रयत्न आहेत. याचा एक भाग म्हणून आठ प्रभागांत महापालिका आणि एकटी संस्थेच्या माध्यमातून ओला व सुका कचरा वर्गीकरण केले जाते. पुईखडी परिसरात बायोगॅस प्लान्ट कार्यान्वित करण्यात येत आहे. भविष्यात आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात आणखी एक बायोगॅस प्लँट सुरू केला जाईल.

प्रश्न : प्लास्टिकमुक्त कोल्हापूर आणि घन कचरा व्यवस्थापनचे नियोजन काय आहे?

प्लास्टिक कचरा हे अनेक समस्यांचे मूळ आहे. सध्या कायद्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांना बंदी आहे. आता शहरात टप्प्याटप्प्याने प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचे प्रयत्न आहेत. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरातील ‘घर टू घर’ कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे नियोजन आहे. घरातच कचऱ्याचे वर्गीकरण झाले तर विल्हेवाटीची प्रकिया सुलभ होईल. कचऱ्यावर प्रक्रिया, टाकाळा लँडफिल साइट आणि टोप येथील खणीत इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी प्रशासन कार्यवाही करत आहे. यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध झाला आहे. भाजी मंडई, हॉटेल्स येथे स्वतंत्रपणे कचरा वर्गीकरण आणि उठाव सुरू आहे.

प्रश्न : परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी काय योजना आहेत ?

महापालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत (केएमटी) बससेवा पुरविली जाते. ती शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मुख्य कणा आहे. मात्र कमी उत्पन्न आ​​णि जादा खर्च अशा स्थितीने केएमटी सध्या तोट्यात आहे. बसेचा देखभाल, दुरुस्ती खर्च आणि अवैध वाहतूक, वडाप व्यावसायिकांचे आव्हान यावर मात करुन केएमटी सक्षम कशी बनेल यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेकडून केएमटीला दरमहा ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. शिवाय महापालिकेच्या १३ पार्किंगच्या जागा केएमटीला दिल्या आहेत. प्रवाशांना जलद सेवा, सुविधा दिल्यास केएमटीकडे प्रवासी वाढतील.

प्रश्न : वाहतूक व्यवस्था, पार्किंगच्या प्रश्नाची सोडवणूक कशी करणार?

कोल्हापुरात पर्यटक आणि भाविकांची संख्या वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि मर्यादित ​जागा यामुळे वाहतूक कोंडी तयार होते. बहुमजली पार्किंग सुविधेची आवश्यकता आहे. बहुमजली पार्किंग उभारणीसाठी महापालिका प्रयत्नशील आहे. वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगसंदर्भात महापालिका, पोलिस प्रशासनाने संयुक्त पातळीवर कारवाई केली पाहिजे. अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत शहरात तीन ठिकाणी बहुमजली वाहनतळ प्रस्तावित आहेत.

कठोर निर्णय घ्यावे लागतात

महापालिकेचे कामकाज नियमानुसार झाला पाहिजे, नागरिकांना ​जलद सुविधा मिळायला हव्यात. कामकाज गतीमान होण्यासाठी प्रशासक म्हणून कठोर कारवाई लागते. त्याच भूमिकेतून आयुक्त म्हणून काम करण्याचा माझा शिरस्ता आहे. प्रशासकाने सर्वांशी गोडी-गुलाबीने वागून कसे चालेल ? महापालिकेच्या कामकाजात कुणी अडथळा आणत असेल, नियम आणि धोरणाच्या विसंगत कृती करत असेल तर आयुक्त म्हणून संबंधितांवर कारवाई करू. नियमबाह्य कामकाजाचा प्रयत्न केल्यास प्रशासक म्हणून कठोर निर्णय घेत आहे.

प्राध्यापक-विद्यार्थ्यांचा सहभाग

‘मटा संवाद’मध्ये प्रा. डॉ. डी. ए. देसाई, प्रा. पांडुरंग पाटील, प्रा. एम. एन. कारंजकर, प्रा. सुनील भोसले, विद्यार्थी सद्दाम मुजावर, एकता मोळे, शिवाली पोवार, संपदा पाटील, अमृता पाटील, विशाल पाटील, मच्छिंद्र दाते, सलोनी मेस्त्री आदींनी सहभाग घेतला. प्राचार्य एस. वाय. होनगेकर यांनी आयुक्त चौधरी यांचे स्वागत केले. प्रा.डॉ. ए. पी. जाधव आणि प्रा. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


विकासाच्या योजनेत नागरिकांना सामावून घेण्याचा ‘मटा संवाद’ हा उपक्रम स्तुत्य आहे. शहरासंदर्भात वेगवेगळ्या संकल्पना असतात. तरुणाईच्या नजरेतून शहराचा वेध घेणारा हा कार्यक्रम आहे. विद्यार्थी तरुणाईचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या माध्यमातून आशा, आकांक्षा उमटत असतात. त्यांच्या मनात रेंगाळलेले प्रश्न, संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध झाले.

- एस. वाय. होनगेकर, प्राचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एटीएम फोडणारे तिघे जेरबंद

$
0
0

कागल

बिद्री एसटी स्टँड परिसरातील अॅक्सीस बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडत असताना तीन शस्त्रधारी चोरट्यांना मुरगूड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. चोरट्यांपैकी दोघेजण घटनास्थळावरुन पळून गेले. सुमारे दीड किलो मीटर पाठलाग करुन पोलिसांनी चोरट्यांना पकडले.

चोरट्यांकडून एक गावठी बनावटीची पिस्तूल, एक इनोव्हा कार, गॅस कटर,पाच मोबाइल जप्त करण्यात आले. आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्याबद्दल या पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. हे तिघेही चोरटे कागल,भुदरगड व करवीर तालुक्यातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. रणजित आनंदा वायदंडे (रा.बस्तवडे, वय ३०, ता.कागल),उत्तम तानाजी वायदंडे (वय २४, रा.नाधवडे ता.भुदरगड) ,विशाल बाजीराव वायदंडे (वय २५, रा.येवती ता.करवीर) अशी चोरट्यांची नावे आहेत. महादेव आबिटकर, भारत मेटल, दिपक गुमाणे, कृष्णा पाटील व ठाणे अमंलदार सहाय्यक फौजदार अशोक पाटील या पोलिस कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून चोरट्यांना पकडले. एटीएममध्ये २० लाख रुपये होते.

१५ ऑगस्टच्या मध्यरात्री दोनच्या दरम्यान मुरगूड पोलिस स्टेशनचे आबिटकर, मेटल, गुमाणे, पाटील हे मुरगूड शहराच्या गावभागात गस्त घालत होते. यावेळी मुरगूड पोलिस स्टेशनला एक निनावी फोन आला. त्यावर ठाणे अंमलदारांनी गस्त घालणाऱ्या या चार कर्मचाऱ्यांना बिद्री येथे काही चोरटे एटीएम मशीन फोडत असल्याचे सांगितले. केवळ पाचच मिनिटात आठ कि.मी.वर असलेले हे चारही पोलिस घटनास्थळी पोहचले. तेथे एटीएमसमोर एक इनोव्हा गाडी उभी होती. तिचे चारही दरवाजे उघडे होते. एटीएममध्ये दोघेजण गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडत होते. चोरट्यांनी निम्मे एटीएम मशीन फोडले होते. त्याचवेळी हे चार पोलिस तेथे पोहचले. एटीएमच्या बाहेर उभे असलेल्या चोटरट्याच्या हातात गावठी बनावटीचे पिस्तुल होते. गाडीतून पोलिस उतरताच एकाने ते पिस्तूल पोलिसांवर रोखले. यावेळी अतिशय धाडसाने त्याच्या हातातील पिस्तूल पोलिस नाईक महादेव आबिटकर यांनी हिसकावून घेतले. पिस्तूल पोलिसांच्या हाती लागल्याचे पाहून दोन चोरटे तेथून पळून गेले. एक चोरटा एटीएमच्या आतील खोलीत सिलिंगच्या माळ्यावर दडून बसला. आबिटकर यांनी मेटल व गुमाणे या पोलिसांना पळालेल्या चोरट्यांचा पाठलाग करण्यास सांगितले. हे चोरटे बिद्री कारखान्याच्या गाडी अड्ड्यातून कुंभारवाड्याकडे पळाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. इतक्यात आबिटकर यांनी एटीएमचे शटर बंद करुन आतमध्ये जावून तिसऱ्याचा शोध सुरु केला. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांकडे कोणतेही हत्यार नसल्याने शेजारील बिद्री कारखान्याच्या व अन्य वॉचमनना बोलावले. दरम्यान, या मार्गावरुन जाणाऱ्या ट्रकनाही घटनास्थळी थांबवून तसेच वॉचमनना बोलावून त्यांच्याकडील बंदूक घेवून आतील चोरट्याचा शोध सुरु केला. दरम्यानच्या काळात ही सर्व माहीती मुरगूड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश हांडे व पी.एस.आय. तांबे यांना कळवली. हे दोन अधिकारी व अन्य पोलिस तत्काळ मोटरसायकलवरुन घटनास्थळी आले. त्यांनी एटीएमच्या आतील खोलीच्या माळ्यावरील लपलेल्या चोरट्याला पकडले.

तर दुसरीकडे दोन पोलिस एका चोरट्याचा पाठलाग करीत होते. सुमारे दीड ते दोन किमीपर्यंत हा पाठलाग सुरु होता. तेथे गेल्यावर एका ओढ्यावरील पुलाच्या आतील बाजूस एक चोरटा लपला होता. त्याला झडप घालून पकडून घटनास्थळी आणण्यात आले. तिसरा चोरटा सापडला नव्हता. पकडलेल्या चोरट्यास तिसऱ्या चोरट्याला फोन लावून त्याची माहीती घेतली आणि तेथे जावून पोलिसांनी त्याला पकडले. हा सारा थरार सुमारे एक तासभर चालला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेताजी पालकर पथक तीन लाखांचे मानकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुमारे पन्नास फूट उंचीवर फुलांनी सजवलेली दहीहंडी... त्यावर गोविंदा पथकांची खिळलेली नजर... दहीहंडी फोडण्याचा थरार नजरेत साठवण्यासाठी गर्दीने फुलून गेलेला रस्ता... पावसाच्या हलक्या सरी आणि ओसंडून वाहणारा सळसळता उत्साह अशा वातावरणात बुधवारी ऐतिहासिक दसरा चौक गोविंदा पथकांनी गाजवला. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील चुरस रंगत जाईल तसा दसरा चौकातील माहोलही उंची गाठत गेला. ‘गोविंदा गोविंदा...,’ ‘एक दोन तीन चार...,’ ‘गोविंदा रे गोपाला,’ यांसारख्या खास गाण्यांच्या ठेक्यावर थिरकणारी तरूणाई, ढोलताशाचा गजर आणि तीन तास सुरू असलेला गोविंदा पथकांचा उत्साह यामुळे दहीहंडी उत्सवानेही उंची गाठली. रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी गडहिंग्लजच्या नेताजी पालकर व्यायामशाळेच्या पथकाने शेकडो उपस्थितांचा हदयाचा ठोका वाढवित सात थराची दहीहंडी फोडली. मंडळाचा गोविंदा प्रकाश मोरे दहीहंडीचा मानकरी ठरला.

महाडिक युवाशक्तीच्या २०१४ च्या दहीहंडीचेही हेच पथक मानकरी ठरले होते. दसरा चौकात बुधवारी सायंकाळी सहापासून दहीहंडीचा थरार सुरू झाला. साडेसातनंतर थरारक प्रात्याक्षिके सुरु झाली. चार फेऱ्यांपैकी पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत अजिंक्यतारा मंडळ, नृसिंह मंडळ, संघर्ष, जय हनुमान, श्रीकृष्ण आदी मंडळांची पथके पोहोचली. तिसऱ्या फेरीतह सहाव्या थरापर्यंत मंडळांनी उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकविणारी प्रात्यक्षिके सादर केली. मात्र या पथकांना यश आले नाही. अखेर संयोजकांनी दहीहंडीची उंची तीन फुटांनी कमी केली आणि पालकर व्यायामशाळेचे पथक तीन लाखांचे मानकरी ठरले आणि शिट्ट्या आणि टाळ्यांचा गजर झाला.

खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती सांगितली. दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावतीने तीन लाखांचे बक्षीस देण्यात आले. पाच व सहा थर लावून सलामी देणाऱ्या पथकांना अनुक्रमे पाच व दहा हजारांचे बक्षीस देण्यात आले. दहीहंडीदरम्यान डॉल्बीला फाटा देत श्रीमंत प्रतिष्ठानचे १५० जणांचे ढोल-ताशा पथक सहभागी झाले. दहीहंडीपूर्वी सार्थक क्रिएशनच्या कलाकारांचा नृत्याविष्कार व श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण झाले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, अरुंधती महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, उद्योगपती शिवाजी मोहिते, रामराजे कुपेकर, मिलिंद धोंड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईचा जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फक्कड लावणीचा ठेका, हिंदी-मराठी गीतांवर दिलखेचक नृत्य, पावसाचा हलकासा शिडकवा, ढोल-ताशांच्या ठेक्यावर बेभान होऊन नृत्य करणारी तरुणाई अशा जल्लोषी वातावरणात शहरात दहीहंडीचा थरार बुधवारी ठिकठिकाणी पाहिला मिळाला. शिवाजी चौक, गुजरी कॉर्नर आणि गंगावेशमध्ये हा थरार पाहण्यासाठी युवकांनी तुफान गर्दी केली होती. मुंबई, पुणे येथील नृत्याविषकार सादर करून कोल्हापूर वासियांची मने जिंकली. दिलखेचक नृत्याला टाळा, शिट्ट्यांची दाद देत कलाकारांचा उत्साह दिगुणित केला. गुजरी कॉर्नरची तासगाव येथेली शिवनेरी तरुण मंडळाने तर शिवाजी चौकातील दहीहंडी शिरोळ येथील अजिंक्य तारा मंडळाने फोडत लाखांचे बक्षीस पटकावले.

छत्रपती शिवाजी संयुक्त मित्र मंडळातर्फे शिवाजी चौकात आयोजित दहीहंडी कार्यक्रमाचे उद‍्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. त्यांच्या पत्नी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली महाडिक प्रमुख उपस्थित होत्या. ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमातील जोया खानच्या नृत्याने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. बुवाफण तालीम मंडळ, अजिंक्य तारा मंडळ (शिरोळ), शिवनेरी तालीम मंडळ (तासगाव) व कन्हैया ग्रुप (भडगाव) यांनी सलामी दिल्यानंतर सर्वांचे श्वास रोखून धरले. सुमारे ४० फुटांवर असलेल्या दहीहंडी फोडण्यासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली होती. शेवटी शिरोळच्या ‘अजिंक्यतारा’ मंडळाने दहीहंडी फोडत एक लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. विजेत्या मंडळाला आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष कपील केसरकर, उपाध्य रोहित गवळी, विकी भुर्के, रुपेश गवळी, केदार भुर्के, अमित जाधव, रुपेश डोईफोडे आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गुजरी कॉर्नरी मित्र मंडळाची ४० फुटांवरील दहीहंडी दुसऱ्या प्रयत्नात तासगाव येथील शिवनेरी तरुण मंडळाने फोडली. गोविंदा दिलीप कदमने दहीहंडी फोडल्यानंतर लेझरच्या झगमगाटामध्ये आणि डॉल्बीच्या ठेक्यावर अक्षरश: जल्लोषाला उधाण आले. त्यापूर्वी मुंबईच्या अविष्कार ग्रुपने सादर केलेल्या नृत्याविष्काराने तरुणाईचा उत्साह टिपेला पोहोचला होता. हिंदी-मराठी गीतांवर युवकांनी ताल धरत कलाकारांना अधिक प्रोत्साहन दिले. विजेत्या मंडळाला नगरसेवक किरण नकाते यांच्या हस्ते संघाचा एक लाखाचे बक्षीस देऊन गौरव केला.

गंगावेश येथील भाऊ नाईक सांस्कृतिक मंडळाची दहीहंडी राशिवडे बुद्रुक येथील रासलिंग ग्रुपने दुसऱ्या प्रयत्नात फोडली. त्यांना ३० हजार रुपये व ट्रॉफी देऊन गौरव केला. यावेळी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद‍्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष निरंजन हुंडेकरी, विवेक महाडिक, नगरसेवक शेखर कुसाळे, प्रतापसिंह जाधव आदी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांनीच फोडली गोकुळची हंडी

मंगळवारी गोकुळच्या दूध प्रकल्पावर गोकुळ अष्टमीनिमित्त दहीहंडीचा थरार झाला. दुग्ध प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची पाच संघांनी सहभाग नोंदवला होता. उत्पादन विभागीतल कर्मचाऱ्यांनी चार थर रचून गोकुळची दहीहंडी फोडत ११ हजारांचे बक्षीस पटकावले. चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते त्यांना बक्षीस देण्यात आले. गोकुळच्या मुख्य डेअरीतील डॉक विभाग, उत्पादन विभाग, प्रीपॅक विभाग, सुरक्षा विभाग व इलेक्ट्रिक विभाग या विभागाकडील कर्मचाऱ्यांनी दहीहंडी फोडण्यात सहभाग घेतला. बक्षीस समारंभास सहायक व्यवस्थापक-प्रशासन डी. के. पाटील, स्वीय सहाय्यक संजय दिंडे, सचिन पाटील, उर्मिला पाटील, तुकाराम पाटील, बंदिनी पाटील, प्राजक्ता पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळ्याची शिरोलीत वायरमनला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माळ्याची शिरोली (ता. करवीर) येथे थकलेल्या वीजबिलाची माहिती देण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास बेदम मारहाण झाली. संदीप निवृत्ती पाटील (वय ३३, रा. येळवडे, ता. राधानगरी) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. युवराज राजाराम पाटील (वय ३५, रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर) यांनी मारहाण केल्याची तक्रार करवीर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्या पाटील याच्या अटकेसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून करवीर पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले.

संदीप हे महावितरणमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ पदावर काम करतात. महावितरणच्या माळ्याची शिरोली येथील विभागीय कार्यालयात ते कार्यरत आहेत. थकीत बिलांच्या वसुलीचे काम सध्या सुरू असल्याने ते रोज सकाळी थकबाकीदारांच्या घरी जाऊन थकीत वीजबिल भरण्याची विनंती करतात. बुधवारी (ता. १६) सकाळी साडेनऊच्या सुमारास ते युवराज पाटील यांच्या घरी गेले होते. वीजबिलाचे थकीत ११४० रुपये भरण्याची आठवण त्यांनी करून दिली. यावरून संतापलेल्या युवराज पाटील याने संदीप यास बेदम मारहाण केली. माळ्याची शिरोली येथील सहकारी कर्मचाऱ्यांनी जखमी संदीप पाटील यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच करवीर तालुक्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली.

मारहाण करणारा युवराज पाटील याच्याविरोधात करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्याला तातडीने अटक करावी, असा आग्रह महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धरला आहे. त्याच्या अटकेसाठी दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून करवीर पोलिस ठाण्याबाहेर दिवसभर धरणे आंदोलन केले. पोलिसांनी अटकेचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मारहाण करणाऱ्यांवर ठोस कारवाई न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील महावितरणचे कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, असा इशारा वरिष्ठ अभियंता राजेंद्र हजारे यांनी दिला आहे. सहायक अभियंता प्रसाद दिवाण, कनिष्ठ अभियंता पी. एम. वड्ड, कृष्णात चव्हाण, इंद्रजित पालकर, अंकुश म्हाळुंगेकर, विश्वास पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९० शिक्षकांचे उद्या समायोजन

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा बदलीने आलेल्या ९० शिक्षकांचे उद्या (शुक्रवारी) समायोजन करण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण प्रशासन समुपदेशानंतर त्यांना शाळा देणार आहे. त्यातील स्तनदा आणि गरोदर शिक्षिकांना सरकारी नियमानुसार सोयीच्या शाळा देण्यात येणार आहे. उर्वरित सर्व शिक्षकांना रिक्त शाळांत नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहे. दरम्यान, बहुतांशी शिक्षकांना सोयीच्या आणि शहरालगतच्या शाळांत नियुक्ती हवी आहे.

त्यामुळे संबंधीत आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना भेटून प्रशासनावर दबाव आणत आहेत. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया एक महिन्यापासून सुरू आहे. पहिल्या टप्यात आलेल्या १०३ शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली. त्यातील २१ शिक्षिका गैरसोयीच्या शाळा मिळाल्याचे कारण पुढे करीत हजर झाल्या नाहीत. प्रशासनाशी संपर्क साधून सोयीची शाळा द्यावी, अशी विनवणी करण्यासाठी त्या जिल्हा परिषदेत हेलपाटे मारत आहेत. बुधवारी आंतरजिल्हा बदलीने ६९ शिक्षक आले. त्यांच्यासह नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झालेल्या २१ शिक्षिका समायोजनाची प्र‌क्रियाही शुक्रवारी राबवण्यात येणार आहे. समायोजन करताना दूर्गम तालुक्यातील शाळांत पहिल्यांदा शिक्षक देण्याला प्रशासन प्राधान्य देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपलाइनच्या घोळात अधिकारीही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजनेच्या कामांत त्रुटी आणि घोळ झाला आहे. त्याला ठेकेदार जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर, सल्लागार युनिटी कंपनीसोबत महापालिकेतील काही अधिकारीही जबाबदार आहेत. जीवन प्राधिकरण विभाग व सार्वजनिक बांधकामच्या सचिवामार्फत या सर्व प्रकाराचा अहवाल तयार करुन चौकशी करण्याची शिफारस करणार असल्याची ग्वाही आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. थेट पाइपलाइन योजना बचाव सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

दरम्यान युनिटी कन्सल्टंट कंपनीने या प्रकल्पासंदर्भातील विविध जबाबदाऱ्याबाबत हात वर केली असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. यामुळे भविष्यात प्रकल्पाच्या जादा खर्चाचा भार महापालिकेवर पडण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचा खर्च वाढल्यास योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील, अशी भीतीही कृती समिती पदाधिकारी बाबा इंदूलकर व दिलीप देसाई यांनी व्यक्त केली. योजनेतील जवळपास १७० कोटींचा फुगवटा निर्माण केल्याचे समितीचे म्हणणे आहे.

निगेटिव्ह एक्सलेशन व अबकारी करातील सवलतीची रक्कम मिळून तब्बल १४५ कोटी रुपये योजनेच्या खर्चातून वजा करायला हवेत. अपेक्षित भाववाढ म्हणून योजनेत ४८ कोटी जादा धरले आहेत. सध्या स्टीलच्या दरात घसरण झाली आहे. ही रक्कम प्रकल्प खर्चातून कमी करावी अशी मागणी समितीने केली आहे. पुईखडी येथील पाइपलाइन योजनेचे काम हलक्या दर्जाचे झाले आहे. प्रकल्पाच्या किमतीत कोट्यवधींचा फुगवटा निर्माण केला आहे. याप्रश्नी संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

शिष्टमंडळात कॉम्रेड दिलीप पवार, भगवान काटे, किशोर घाडगे, बा.बा.महाडिक, प्रसाद जाधव, महादेव पाटील, अशोक रामचंदानी, राजवर्धन यादव आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-सेनेत समझोता

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष निवडीने दोन्ही पक्षातील दुरावा कमी होण्यास मदत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत भाजप आणि ​शिवसेना यांच्यातील दुरावलेले संबंध, आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपच्या नेत्यावर केलेली टीका या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र तयार झाले होते. या निवडीने दोन्ही नेते आणि पक्षातील संबंध सुधारण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्यानंतर काही महिन्यात विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसले. हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. शहरात राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात महेश जाधव यांनी निवडणूक लढवली. भाजपला ४२ हजारावर मते मिळाली. यामुळे यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत क्षीरसागर यांनी भाजपला साथ न देता काँग्रेसला मदत होईल, अशीच पावले टाकली. महापालिकेवर भाजपची सत्ता येऊ नये याची काळजी सेनेने घेतली​. याशिवाय हद्दवाढ आणि प्राधिकरणाच्या विषयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विराधी भूमिका घेतली. आमदार क्षीरसागर यांनी भाजप नेत्यावर जोरदार टीका केली. यामुळे या दोन्ही पक्षातील मतभेद वाढले.

या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक मंडळांच्या नियुक्त्या रखडल्या. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या निवडीतही काही वेळा राजकारण आले. त्यावर मात करत सुभाष वोरा व शिवाजी जाधव यांची सदस्य म्हणून निवड झाली. वोरा भाजपचे तर जाधव सेनेचे होते. त्यानंतर अध्यक्षपदासाठी महेश जाधव तर कोषाध्यक्षपदी वैशाली क्षीरसागर यांचे नाव पुढे आले. आगामी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या जाधव यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता होती. पण सोबत सौ. क्षीरसागर यांचे नाव आल्याने दोन्ही पक्षात समझोता झाला. यातून उशिरा का होईना या पदांची घोषणा झाली.

पालकमंत्र्यांची खेळी

या निवडीने पालकमंत्री पाटील यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. जाधव यांची प्रतीक्षा संपवताना त्यांना पुढील निवडणुकीच्या तयारीसाठी मदत केली आहे. क्षीरसागर यांच्या घरात पद देवून दोन्ही पक्षातील दुरावा कमी केला आहे. सध्या अंबाबाई मंदिराचा वाद चर्चेत आहे. दोन्ही पक्ष तेथे सत्तेवर पोहचल्याने आंदोलनाची धार कमी होण्यास मदत होणार आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील भ्रष्टाचारावर आमदार क्षीरसागर अ​धिक आक्रमक आहेत. त्यांच्या घरातच पद आल्याने भ्रष्ट्राचार उघड करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. शिवाय भाजपच्या अध्यक्षावर त्यांचे ‘लक्ष्य’ राहणार आहे. यातून वाद वाढणार की समझोता करत कारभार होणार हे वर्षभराच्या कारभारानंतरच कळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोतोलीत लाच घेतानामंडल अधिकारी अटकेत

$
0
0

पन्हाळा

कोतोली (ता. पन्हाळा) येथील मंडल अधिकारी अशोक अर्जुन बसवणे (वय ४३, रा. शिरोळ) याला घराची वारसा नोंद डायरी मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेतना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले. कोतोली येथील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. याबाबत राजाराम महादेव पाटील यांच्यासह ११ जणांनी तक्रार दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, मौजे माळवाडी (कोतोली, ता. पन्हाळा) येथील गटनंबर ८२६ ही जमीन पूर्व हक्कदार सोनू बाबाजी पाटील यांच्या नावावर होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सरळ वारस जोतिराम, श्रीपती, बाबू, आबाजी, दादू व महादेव यांच्या नावावर झाली. त्यावेळी एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून जोतिराम सोनू पाटील यांचे नाव नोंद झाले, परंतु जोतिराम हे विभक्त राहत असल्याने जमिनीवरील हक्क सोडून एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून बाबू सोनू पाटील यांचे नाव नोंद झाले. बाबू सोनू पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुले भीमराव,भिकाजी यांनी इतर वारसांचे हक्क डावलून वारस म्हणून आपली नावे नोंद केली, त्यामुळे इतर वारसदारांच्या नातलगांनी (राजाराम पाटील व इतर अकराजण ) याबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाद मागितली होती. त्याबाबत निकाल हा तक्रारदार यांच्या बाजूने लागला व मूळ कागदपत्राप्रमाणे सर्व वारसदारांची नोंद करण्याचे आदेश गावकामगार तलाठी यांना दिले. तलाठी श्रीमती उषा राबाडे यांनी त्याप्रमाणे डायरी नोंद केली, परंतु ती मंजूर करणेसाठी मंडल अधिकारी यांनी एक लाख रुपये मागणी केली. याबाबत तडजोड होऊन ३० हजार रुपयांवर बोलणी झाली. त्यातील २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरूवारी अशोक बसवणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी त्याला रंगेहाथ पकडले.

चौकट

चार तास ताटकळत ठेवले

मंडल अधिकारी बसवणे याला लाचेची रक्कम देण्यासाठी दुपारी एकच्या सुमारास तक्रारदार गेले होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला, मात्र बसवणे याने चार तास तक्रारदारास कार्यालयात बसवून घेतले. कार्यालयात सतत नागरिकांची वर्दळ असल्याने रक्कम स्वीकारण्यास विलंब लागला. अखेर चारच्या सुमारास लाचेची रक्कम स्वीकारताच तो पथकाच्या जाळ्यात सापडला. कारवाईनंतर बसवणे याच्या घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होणार विकासवाटा खुल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कोल्हापूर आवृत्तीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (ता. २१) ‘मटा कॉन्क्लेव’चे आयोजन केले आहे. ‘मेक इन कोल्हापूर’ संकल्पनेंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. हॉटेल सयाजी येथे सायंकाळी साडे चार वाजता राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉन्क्लेव होणार आहे. या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासवाटा खुल्या होणार आहेत. दरम्यान, दुसऱ्या सत्रात ‘आयटी स्टार्टअप आणि गुंतवणूक ’ यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

निधीअभावी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील रखडलेले प्रश्न मार्गी लागावेत आणि विकासाचा अजेंडा निश्चित व्हावा, याबाबत ‘मटा कॉन्क्लेव’मध्ये मान्यवरांची चर्चा होणार आहे उद्यमशीलतेसाठी अत्यंत पूरक वातावरण असलेल्या कोल्हापूरची भौगोलिक रचना महत्त्वाची आहे. येथे शेतीबरोबरच उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळाली. भरपूर महसूल देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाची कोंडी कशी फोडता येईल, प्रश्न गतीने सोडविण्यासाठी काय करता येईल, याबाबत यावेळी चर्चा घडवून आणण्यात येणार आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कॉन्क्लेवचे उद्घाटन होणार आहे. यात शहर आणि जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारे उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण, आयटी, वैद्यकीय क्षेत्रातील निवडक प्रतिनिधी, विद्यमान खासदार, आमदार, महापौर तसेच राज्य सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होणार आहेत.

कोल्हापूरचे उद्योग आणि आयटी हा कॉन्क्लेवचा मुख्य अजेंडा आहे. उद्योगवाढ आणि त्यासोबत रोजगारनिर्मिती हा यामागील हेतू आहे. यामुळे दुसऱ्या सत्रात ‘आयटी स्टार्टअप आणि गुंतवणूक ’ यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मनोरमा इन्फो. सोल्युशन्सच्या सीइओ अश्विनी दानिगोंड, वेलसर्व्ह आयटीचे सीइओ अभिजित खोत तसेच आयसायबरसेक चे सीइओ पंकज घोडे हे मार्गदर्शन करणार आहेत.

उद्योगांचे काही क्लस्टर प्रकल्प प्रलंबित आहेत. नवीन औद्योगिक क्षेत्रे, उद्योग, इचलकरंजीचा कापड उद्योग, गूळ क्लस्टर, शेतीपूरक उद्योग यांसह पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोल्हापुरी चप्पल, सराफ पेठ, भाजीपाला उत्पादन या पारंपरिक उद्योगांनाही झळाळी मिळाल्यास रोजगारनिर्मितीसह आर्थिक क्षमताही वाढू शकते. परिणामी जिल्ह्याच्या अर्थकारणावर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कोल्हापूरच्या औद्योगिक परंपरेचा विचार करता मुंबई, पुणे, बेंगळुरू कॉरिडॉरमध्ये जिल्ह्याचा समावेश असायलाच हवा. कोल्हापूर-कोकण रेल्वेला जोडण्याचा विषय याच पातळीवर अत्यंत जिव्हाळ्याचा म्हणून प्राधान्याने विचारात घेतला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतेच रेल्वे मार्गाच्या सर्व्हेचे उद्घाटनही केले. रेल्वे मार्गाद्वारे कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. गेली काही वर्षे ‘मटा’ने हा प्रश्न सातत्याने मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले होते. अखेर कोल्हापूर-कोकण मार्ग प्रत्यक्षात साकारण्याचे निश्चित झाले आहे. कोल्हापूरच्या विकासाला बळकटी देणाऱ्या मुद्यांवर ‘मटा कॉन्क्लेव’मध्ये सविस्तर चर्चा होणार आहे.

मटा कॉन्क्लेवसाठी मनोरमा इन्फोसोल्युशन प्रा. लि. पॉवर्ड बाय स्पॉन्सर आहेत. जाधव इंडस्ट्रीज स्पॉन्सर-पार्टनर आहेत. तर हॉटेल सयाजी हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत. चाटे एज्युकेशन ग्रुप एज्युकेशन पार्टनर आहेत, तर नंदादीप आय हॉस्पिटल आणि वार्डविझ इंडिया सोल्युशन प्रा. लि. हे स्पॉन्सर-पार्टनर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत नवविवाहितेची आत्महत्या

$
0
0

इचलकरंजी -

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या मंगळवार पेठ परिसरात राहणाऱ्या मोहिनी प्रथमेश लाटणे (वय २५) या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मोहिनीच्या संतप्त नातेवाईकांनी लाटणे यांच्या घरातील साहित्याची तोडफोड करत पती प्रथमेश व सासरे सीताराम लाटणे यांना मारहाण केली. त्यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्यामुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बंडगर माळ परिसरात राहणाऱ्या मोहिनी हिचा दोन महिन्यापूर्वी मंगळवार पेठ परिसरातील प्रथमेश लाटणे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. मोहिनी ही कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तर प्रथमेश हा डेंटीस्ट टेक्निशियन आहे. सकाळी मोहिनी प्रथमेश याला कामावर सोडून घरी परतली होती. त्यानंतर तिने घरातील एका खोलीत तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. खोलीतून आवाज ऐकू येऊ लागल्याने नातेवाईकांसह शेजाऱ्यांनी खोलीकडे धाव घेतली. दरवाजा बंद असल्याने तो तोडून आत प्रवेश केला असता मोहिनीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याने वैद्यकिय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मोहिनीच्या मृत्यूचे वृत्त कळताच तिच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येच्या घटनेमुळे मोहिनीच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी लाटणे यांच्या घरातील साहित्याची नासधूस केली. तसेच प्रथमेशचे व त्याचे वडील सीताराम व आई मालन यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

लग्नापूर्वी पुढील शिक्षणासाठी पाठविण्यात येणार असल्याचे सासरच्या मंडळींनी सांगितले होते. मोहिनीची इच्छा असताना पुढील शिक्षणासाठी पाठविण्यात आले नाही. तिला वेळप्रसंगी उपाशी ठेवून शारिरिक व मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप मोहिनीच्या नातेवाईकांनी केला आहे. मोहिनीच्या आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने तिच्या मामाने तिचा सांभाळ केला. मोहिनीचा मृतदेह पाहून तिच्या नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा मन हेलावून टाकणारा होता. मृत्यूपूर्वी मोहिनीने इंग्रजी भाषेत चिठ्ठी लिहून ठेवली असून ती तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. आयजीएम रुग्णालयात मोहिनीच्या पार्थिवाचे विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर मारहाणीत जखमी प्रथमेश व सिताराम लाटणे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आत्महत्येची घटना व त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे मंगळवारपेठ परिसरात तणावाचे वातावरण होते. आणखीन अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार

$
0
0

मटा प्रतिनिधी, कोल्हापूर

राजेंद्रनगर येथील कोल्हापूर पब्लिक स्लूलमधील क्राडी शिक्षक विजय विठ्ठल मनुगडे (वय ३५, रा. देवकरपाणंद) याने शाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याशिवाय शाळेतील चर मुलींचे लैंगिक शोषणही केले आहे. याबाबत पीडित मुलींनी पालकांना माहिती दिल्यानंतर पालकांनी शुक्रवारी (ता. १८) राजारामपुरी पोलिस ठाण्यात विजय मनुगडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रात्री उशिरा मनुगडे याला ताब्यात घेतले.

विजय मनुगडे क्रीड शिक्षक असून, गेली आठ वर्षे तो कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये नोकरी करीत आहे. शाळेतील मुलींचा हॉकीचा संघ करण्याची जबाबादारी त्याच्याकडे होती. यासाठी त्याने १३ ते १५ वयोगटातील मुलींची निवड केली होती. मे महिन्यापासून संघातील मुलींचा सराव सुरू होता. यातील काही मुलींशी लगट करून तो अश्लील चाळे करीत होता. कपड्यांचे माप घेण्याच्या निमित्ताने तो एका मुलीला शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील वर्गात घेऊन गेला. जबरदस्तीने मुलीवर बलात्कार करून या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास संघातून काढून टाकण्यासह बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली. यानंतर चार ते पाच वेळा असाच प्रकार घडला. मनुगडे याने पीडित मुलीला स्वतःच्या देवकर पाणंद येथील घरी नेऊनही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. शाळेतील इतर तीन मुलींचेही लैंगिक शोषण केले आहे.

मे महिन्यापासून वारंवार हा शिक्षक विद्यार्थिनींवर अत्याचार करीत होता. विद्यार्थिनींनी याबाबत विरोध केल्यानंतर बदनामीची भीती घालून त्यांचा गैरफायदा घेत होता. अखेर पीडित विद्यार्थिनींनी हा प्रकार घरात सांगितल्यानंतर पालकांना धक्का बसला. विश्वासाने ज्या शिक्षकांकडे विद्यार्थिनींना पाठवले जात होते, त्याच शिक्षकाने विश्वासघात केल्याने पालकांनी पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकाराचे गांभीर्य ओळखून राजारामपुरी पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीच्या घरी जाऊन फिर्याद घेतली. इतर तीन विद्यार्थिनीच्या पालकांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा मनुगडे याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.

बदनामीची धमकी

शालेय स्पर्धांच्या निमित्ताने शहराबाहेर गेल्यानंतर शिक्षक मनुगडे हा विद्यर्थीनींशी लगट करीत होता. संघात निवड करण्याचे आमिष दाखवून विद्यार्थीनींचा गैरफायदा घेतला जात होता. विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर याची माहिती शाळेत किंवा पालकांना समजू नये, यासाठी तो विद्यार्थीनींना धमकावत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालचित्रकारांचा आविष्कार

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

सुटी असूनही गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांची पावले राम गणेश गडकरी सभागृहाकडे वळत होती. नऊ वाजता गडकरी सभागृहाचा आवार चिमुकल्यांच्या उपस्थितीने भरुन गेला. गडकरी सभागृह, विमला गोयंका इंग्लिश स्कूलचे हॉल तुडुंब भरले. प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलचे वर्गही भरले. दहाच्या सुमारास कागदावर बालमनाचा आविष्कार सुरु झाला. मनातील कल्पना प्रत्यक्ष कागदावर रेखाटल्या जाऊ लागल्या आणि हळूहळू चित्रात रंग भरत कलाविष्कारची उधळण सुरू झाली. शेकडो चिमुकल्यांच्या प्रतिभेला महाराष्ट्र टाइम्सने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. महाराष्ट्र टाइम्सच्या पाचव्या वर्धापनादिनानिमित्त झालेल्या ‘कलासंगम’ उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या बालचित्रकला स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माँजिनीज केक अॅण्ड पेस्ट्रिज हे स्पर्धेचे प्रायोजक होते.

पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते चौथी गटातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाखण्याजोगा होता. फूल, फळ, प्राणी, पक्ष्यांची चित्रे काढण्यात मुले दंग झाली होती. फुलपाखरू आणि बाग हे लहान मुलांचे अत्यंत आवडते विषय. पाचवी ते सातवी या गटात आवडता खेळ या विषयाचे चित्र काढताना फुटबॉल, क्रिकेटबरोबर प्रो-कबड्डीचे वारे असल्याने कबड्डी खेळाची चित्रेही पाहायला मिळाली.

संवेदनशीलतेला बहर

वाहतूक सुरक्षेला प्राधान्य देताना हेल्मेटचा वापर आणि वृक्षारोपण अशा सामाजिक विषयांवरील चित्रांनी मुलांची कोवळी मने किती संवेदनशील असतात ते अनुभवता आले. आठवी ते दहावी या गटात बहुतांशी विषय सामाजिक जाणीवेशी निगडीत असल्याने बहुतांशी विद्यार्थी तयारीने आले होते. स्वच्छता मोहीम, आदर्श गणेश मिरवणूक हे विद्यार्थ्यांचे आवडते विषय होते. डॉल्बीचे दुष्परिणाम आणि प्लास्टिक मुक्ती या गंभीर विषयाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही यावेळी अधोरेखीत झाला. दीड तासाहून अधिक काळ चालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा उत्साहही वाखाणण्यासारखा होता.


स्पेशल मुलांनी वेधले लक्ष

स्पर्धेत अस्थी विकलांग आणि कर्णबधीर मुलेही सहभागी झाली होती. त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था उपलब्ध केली होती. हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्डचे विद्यार्थी व्हीलचेअर घेऊन आले होते. स.म. लोहिया व वि.म.लोहिया मूकबधीर स्कूलमधील विदयार्थी व विद्यार्थींनींचा उत्साहही वाखाखण्याजोगा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजरा शहरात टस्कर घुसला

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा शहरात भर दुपारी टस्कर घुसल्याने अनेकांची बोबडी वळाली. त्यात शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवस असल्याने प्रचंड खळबळ उडाली. याआधी महिन्यापूर्वी टस्कर आला होता. मात्र तो संध्याकाळी शहराच्या बाहेरच्या परिसरात होता. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास येथील आजरा महाविद्यालय व राईस मील दरम्यानच्या मशिद, मुस्लिम दफनभूमी आणि गंगाबागेमध्ये घुसलेल्या या सुळेधारी टस्कराच्या दर्शनाने अनेकांची तारांबळ उडाली. याबाबतची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि शहरवासीयांसह बाजारासाठी आलेल्या ग्रामस्थांच्या झुंडीही या परिसराकडे वळल्या. यामुळे जमलेल्या जत्रेसारख्या गर्दीवर नियंत्रण राखणे मुश्किल बनले. अखेर सायंकाळी साडेसातच्या सुमारास अंधारातून टस्कराने मसोली जंगलाकडे प्रयाण केले. मात्र यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आजरा तालुक्यात टस्करने नुकसानीचे सत्र सुरू ठेवले आहे, पण हा टस्कर चक्क आजऱ्याच्या मध्यवस्तीतच घुसेल, असे वाटले नव्हते. पण आज तसे घडले, तेही भरदुपारच्या सुमारास. दुपारी दोनच्या सुमारास अवतरलेला हा टस्कर येथील महाविद्यालय व राईस मिलजवळच्या प्रार्थनास्थळानजिक दफनभूमीत साडेपाच तास ठाण मांडून होता. ही दफनभूमी सुमारे अठरा एकर परिसर व्यापून आहे. त्याच्या चोहोबाजूंनी कुंभार गल्ली, एकता कॉलनी, मुल्ला कॉलनी, आयडीयल कॉलनी, शिव कॉलनी, रवळनाथ कॉलनी व गोठण गल्ली अशा नव्या-जुन्या वसाहती व भरवस्तींचा परिसर आहे. आठवडी बाजारामुळे शहर परिसरात मोठी गर्दी असते. त्यामुळे टस्कर आल्याची माहिती मिळताच सर्वांनी या परिसराकडे धाव घेतली. त्यामुळे गर्दी रोखण्याचे व टस्कराला पिटाळून लावण्याचे आव्हान होते.

येथील मशिदीमध्ये दररोज दुपारच्या सुमारास नमाजपठण होते. आजही नमाजपठणानंतर बाहेर पडलेल्या अनेकांना टस्कराच्या पावलांचे ठसे आणि माडांच्या झाडांचे नुकसान आढळून आले. त्या दिशेने टस्कर काही फुटांवरच पाठमोरा उभा होता. त्यामुळे अनेकजण घाबरून सैरावैरा पळत सुटले. दरम्यान, वनविभाग व पोलिस पथकही घटनास्थळी पोहोचले. मात्र टस्कराने दाट झाडीच्या दफनभूमी परिसरात आसरा घेतला. भलीमोठी झाडे, झुडपे, वेलींमुळे तेथे प्रवेश करणे खूपच जोखमीचे असल्याने फटाक्यांचा वापर करून टस्करला हुसकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र चोहोबाजूंनी सुरू असलेल्या गोंगाटामुळे टस्कर बिथरत होता. अखेर साडेसातच्या सुमारास दफनभूमीच्या पश्चिमेकडून आयडीयल कॉलनी, सिध्दीविनायक कॉलनी व मुल्ला कॉलनीमधून अंधारातूनच टस्कर निघून गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाळेतील क्रीडाशिक्षकाकडूनच चार विद्या‌र्थिनींचे लैंगिक शोषण होत असल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी राजेंद्रनगर येथील कोल्हापूर पब्लिक स्कूलचा क्रीडाशिक्षक विजय विठ्ठल मनुगडे (वय ३५, मूळ गाव कपिलेश्वर, ता. राधानगरी, सध्या रा. देवकर पाणंद) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडित मुलींनी पालकांना माहिती दिल्यानंतर पालकांनी शुक्रवारी (ता. १८) राजारामपुरी पोलिस ठाण्यात विजय मनुगडे विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रात्री उशिरा मनुगडेला अटक केली.

मनुगडे गेली आठ वर्षे कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये नोकरी करीत आहे. शाळेतील मुलींचा हॉकीचा संघ तयार करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. यासाठी त्याने १३ ते १५ वयोगटातील विद्यार्थिनींची निवड केली होती. मे महिन्यापासून संघातील विद्यार्थिनींचा सराव सुरू होता. यातील काही विद्यार्थिनींशी लगट करून तो अश्लील चाळे करीत होता. कपड्यांचे माप घेण्याच्या निमित्ताने तो एका विद्यार्थिनीला शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील वर्गात घेऊन गेला. जबरदस्तीने मुलीवर बलात्कार करून या प्रकाराची कुणाला माहिती दिल्यास संघातून काढून टाकण्यासह बदनामी करण्याची धमकीही दिली. यानंतर चार ते पाच वेळा असाच प्रकार घडला. मनुगडेने पीडित विद्यार्थिनीला स्वतःच्या देवकर पाणंद येथील घरी नेऊनही लैंगिक अत्याचार केले आहेत. शाळेतील इतर तीन विद्यार्थिनींचेही लैंगिक शोषण केले आहे.

मे महिन्यापासून तो वारंवार या विद्यार्थिनींवर अत्याचार करीत होता. विद्यार्थिनींनी याबाबत विरोध केल्यानंतर बदनामीची भीती घालून त्यांचा गैरफायदा घेत होता. अखेर पीडित विद्यार्थिनींनी हा प्रकार घरात सांगितल्यानंतर पालकांना धक्का बसला. विश्वासाने ज्या शिक्षकांकडे विद्यार्थिनींना पाठवले जात होते, त्याच शिक्षकाने विश्वासघात केल्याने पालकांत संतापाची लाट उसळली. या प्रकाराचे गांभीर्य ओळखून राजारामपुरी पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीच्या घरी जाऊन फिर्याद घेतली. इतर तीन विद्यार्थिनीच्या पालकांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी रात्री उशिरा मनुगडेला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. या गभीर प्रकाराने शैक्षणिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेकायदेशीर मंडपाकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवापूर्वी शहरातील सार्वजनिक मंडळे, दुकानदार, व्यापाऱ्यांनी १५ दिवस आधीच मंडप उभारणी करुन रस्ते अडविले आहेत. मात्र, याकडे प्रशानाने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले आहे. मुंबई हायकोर्टाचे सर्व निकष धाब्यावर बसवून मंडपांची उभारणी केली असताना करवीर प्रातांधिकारी कार्यालय, महानगरपालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि कोल्हापूर पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. मंडपाच्या विरोधात दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न विचारला जात आहे.

गणेशोत्सवासाठी मंडप उभारणी करण्यास महानगरपालिकेची परवानगी लागते. मात्र, विनापरवाना मंडपाचे सांगाडे उभे केले आहेत. सार्वजनिक मंडळांना महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार व अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याने कारवाई करण्यास मागेपुढे पाहिले जाते. शनिवार पेठेत लंबे तिकटी ते मणियार या मशिद या रस्त्यांवर मंडप घालण्यात आला आहे. या मंडळांना आमदार व स्थानिक नगरसेविकेचा पाठिंबा आहे. शिवाजी चौकात महानगरपालिकेच्या एका माजी महापौरांशी संबधित मंडळाने सार्वजनिक पार्किंगमध्ये नव्याने पेव्हिंग ब्लॉक टाकून मंडप उभारला आहे. शिवाजी मार्केटमध्ये महानगरपालिकेची अनेक कार्यालये असून पार्किंगमध्ये मंडप घातल्याने नागरिकांना रस्त्यांवर वाहने पार्क केली जात आहेत. कपिलतीर्थ मार्केटच्या पार्किंगमध्येही एका राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखांच्या मंडळाचा मंडप उभारल्याने ताराबाई रोडवर मंडईत खरेदी करण्यास आलेल्या ग्राहकांना वाहने रस्त्यावरच लावावी लागत आहेत.

राजारामपुरीतील बहुतांश गल्लीत मंडप घातल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील हॉस्पिटलजवळ मंडप उभारल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णवाहिकांनाही याचा फटका बसत आहे. मंगळवार पेठेतील पाण्याच्या खजिन्याजवळील एका चौकात रस्ता खोदून भला मोठा मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. मोठ्या मंडळांनी मंडप उभारल्याने गल्लीबोळातील छोट्या मंडळांनी मंडप उभारण्यास सुरुवात केली आहे.

परवाना आदेश धाब्यावर

मंडप उभारणीच्या परवानगीसाठी शनिवार पेठेतील डीवायएसपी कार्यालयात एक खिडकी योजना सुरू केली आहे. या ठिकाणी फारच कमी मंडळांनी परवानगी घेतली आहे. हायकोर्टाच्या निर्णयामुळे करवीर प्रांताधिकारी सर्व मंडपांना भेट देऊन परवानगी घेतली आहे का याची पडताळणी करणार आहेत. मंडप उभारणीचा परवाना दर्शनी भागावर लावावा असा आदेश दिला असला तरी मंडळांनी हा आदेश धाब्यावर बसवून मंडप उभारले आहेत. करवीर प्रातांधिकाऱ्यांच्या अहवालानंतर महानगरपालिका कारवाई करणार आहे. गणेशोत्सवास अवघे आठ दिवस राहिल्याने महानगरपालिका कशी कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

अग्निशमन दल, रुग्णवाहिकेसाठी वाट सोडलेली नाही

अग्निशमदलाचा फायटर जाण्यासाठी व रुग्णवाहिका ​जाण्याइतपत रस्ता सोडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. पण मंडळांनी हे आदेश धुडकावून रस्ते मंडपांनी व्यापले आहेत. प्रशासन कारवाई करत नसल्याने कार्यकर्त्यांची भीड चेपली असून रस्ते अडवण्याचे काम बिनबोभाटपणे सुरू आहे.

दुकानदारांचेही मंडप

गणेशोत्सवासाठी अनेक दुकानदारांनी रस्त्यांवरच मंडप उभारून साहित्य मांडला आहे. पानलाइन, महाद्वार रोड, पापाची तिकटी, हत्तीमहाल रोड, लक्ष्मीपुरी, शिवाजी रोड, ताराबाई रोड, राजारामपुरी, शाहूपुरीत दुकानदार, व्यापाऱ्यांनी मंडप उभारले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमच्या भानगडींचा मी साक्षीदार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

‘मी सामान्य शेतकरी असूनही माढा लोकसभा मतदारसंघात पाच लाख मते घेतली. हिम्मत असेल तर खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघाबाहेर जाऊन निवडून येऊन दाखवावे, असे थेट आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे दिले. तुमच्या सर्व भानगडींचा साक्षीदार असल्याचा सूचक इशाराही देऊन टाकला. मला आमदारपद, मंत्रिपद मिळाल्याने पोटशूळ उठल्यामुळेच शेट्टींनी आत्मक्लेष यात्रा काढली. ती यात्रा कर्जमाफीसाठी नव्हे तर सदाभाऊंचा द्वेष करण्यासाठी होती,’ अशी घाणाघाती टीकाही खोत यांनी केली.

खोत म्हणाले, सरकारमध्ये गेल्यानंतरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो. मंत्री झाल्यानंतरही छातीवरचा संघटनेचा बिल्ला मी काढला नव्हता. पण, माझे मंत्र‌िपद शेट्टींच्या डोळ्यात खुपत राहिल्याने त्यांनी वारंवार माझ्यावर टीका सुरू ठेवली. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवा व्हावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला. इतके होऊनही संघटनेचे काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. परंतु त्यांनी चौकशी समिती नियुक्तीचा स्टंट करून संघटनेतून हकालपट्टी केली. एवढ्यावर त्यांचे समाधान झाले नसल्यामुळे ते आता आपल्या विरोधात अगदी खालच्या भाषेत टीका करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी हितापेक्षा स्वहिताला नेहमीच प्राधान्य दिले. याचा आणि त्यांच्या इतर भानगडींचा मी साक्षीदार आहे. ऊस दराबाबत कारखानदारांच्या बैठकीत एक बोलायचे आणि शेतकजयांसमोर दुसरेच सांगायचे. त्यांच्या या भूमिकेमुळे आम्हीही चक्रावून जायचो. कर्जमाफीसंदर्भातही तसेच झाले. बैठकीत तोडगा मान्य करून उठले आणि बाहेर येऊन, संपूर्ण कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही, अशी घोषणा करून मोकळे झाले. भाजप सरकारला सत्तेवर आणून चूक झाल्याचे सांगून ते सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा सतत करतात. असे असेल तर मग त्यांना कोणी अडवलय?, सरकारमध्ये थांबायला कोणी सांगितले आहे.? सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत त्यांच्यात नाही. केवळ सरकारमध्ये सदाभाऊ आहे, याची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांचा हा निव्वळ खटाटोप सुरू आहे. मला काढण्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा तुमचा संबंधच काय? मी भाजपच्या कोट्यातून आमदार आणि मंत्री झालो आहे. त्यामुळे मला ठेवायचे की नाही, ते भाजपचे नेते ठरवतील.’

खोत पुढे म्हणाले, ‘जनाधाराची भाषा ते करत असतील तर त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर पडून कोठूनही निवडून येऊन दाखवावे. तसे झाले तर आपण कायमस्वरुपी राजकारण सोडून देईन, नसेल तर त्यांनी राजकारण सोडून दाखवावे. तुमच्यात दानत असेल तर हातकणंगले मतदारसंघातून अन्य कार्यकर्त्याला संधी द्या. मी माढा लोकसभा मतदारसंघात प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवून पाच लाख मते घेतली. तुम्ही अथवा तुमच्या कार्यकर्त्याने तेथे उभे राहून एक लाख तरी मते घेऊन दाखवावीत. तेथे गेल्यावरच तुमचा जनाधार आणि कार्यकर्ते किती तुमच्या सोबत आहेत ते समजून येईल.

‘त्यांचा व्यवसाय बंद करू’

शेट्टी यांना आपल्याशिवाय कोणीही मोठे झालेले चालत नाही. त्यामुळेच त्यांनी आपली संघटनेतून हकालपट्टी केली आहे. माझ्याप्रमाणेच त्यांनी उल्हास पाटील यांनाही तशीच वागणूक दिली होती. संघटनेतील प्रत्येकाला हुकूमशाही पद्धतीने वागणूक देतात. ते कार्यकर्त्यांना गुलामाप्रमाणे वागवतात. त्यांनी आजपर्यंत संघटनेचा केवळ स्वार्थासाठीच उपयोग केला आहे. शेट्टींनी शेतकऱ्यांचे भांडवल करून राजकारणाचा व्यवसाय चालू केला आहे. याला माझा विरोध होता. म्हणूनच त्यांनी माझी संघटनेतून हकालपट्टी केली आहे. पण, यापुढे त्यांचा राजकारणातील आणि संघटनेतील साखर सम्राटांबरोबरचा व्यवसाय बंद पाडण्यात येईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ टोळ्यांची हद्दपारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘गणेशोत्सव काळात जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवरील ११ टोळ्यांना गणेशोत्सव काळात हद्दपार केले जाणार आहे. कुठेही अनुचित प्रकार घडत असेल तर नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना कळवावे, त्याचबरोबर विधायक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी मंडळांचे प्रबोधन करावे,’ अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी (ता. १८) पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्याची माहिती अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील बैठकीला उपस्थित होते.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीची माहिती देताना अधीक्षक मोहिते म्हणाले, ‘गणेशोत्सव आणि ईद या सणांच्या काळात कायदा सुव्यवस्था सांभाळली पाहिजे. तसेच या काळात समाज विघातक कृत्ये करणाऱ्यांना चाप लावणे गरजेचे आहे. यंदाच्या गणेशोत्सवात गडहिंग्लज, आजरा, चंदगड हे तालुके पूर्णपणे डॉल्बीमुक्त झाले आहेत. हातकणंगले तालुक्याच्या ग्रामीण भागातील मंडळांनी डॉल्बीमुक्तीचा निर्धार केला आहे. कसबा वावडा येथे झालेल्या मंडळांच्या बैठकीतही सस्पेन्स स्पोर्टस असोसिएशन, भारतवीर मित्र मंडळ, मिनी चौपाटीचा राजा या तीन मंडळानी डॉल्बी लावणार नसल्याचे पत्र शाहूपुरी पोलिसांना दिले आहे. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एक उपअधीक्षक, पाच निरीक्षक, ४३० कर्मचारी आणि एक हजार होमगार्ड असा जिल्ह्याबाहेरील बंदोबस्त असेल.’ अशी माहिती नांगरे-पाटील यांनी दिली.

अलीकडे जिल्ह्यात जुगार, मटका, अवैध मद्य तस्करी, व्हिडिओ पार्लर, वेश्याव्यवसाय याचे गुन्हे वाढले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याने नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना कळवावी. अवैध धंदे बंद करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत.

११ टोळ्या होणार हद्दपार

समाज विघातक कृत्य करून दहशत माजवणाऱ्या कोल्हापूर जिल्हातील ११ टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. दोन दिवसांत संबंधित गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येणार आहे. मुंबई पोलिस अधिनियम ५५, ५६ नुसार १५५ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अधीक्षक मोहिते यांनी दिली.

३७० मंडळांचे सीसीटीव्ही कॅमेरे

जिल्ह्यात ३७० ठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये शहर उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत ५०, करवीर ७०, इचलकरंजी ५२, शाहूवाडी १२०, गडहिंग्लज ४० आणि जयसिंगपूर विभागातील ४० मंडळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत. यामुळे मंडळांच्या परिसरावर विशेष नजर राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींनी हातकणंगलेबाहेर लढून दाखवावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

मी सामान्य शेतकरी असूनही माढा लोकसभा मतदारसंघात पाच लाख मते घेतली. हिम्मत असेल तर खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघाबाहेर जाऊन निवडून येऊन दाखवावे, असे थेट आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे दिले. तुमच्या सर्व भानगडीचा साक्षीदार असल्याचा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. मला आमदारपद, मंत्रिपद मिळाल्याने पोटशूळ उठल्यामुळेच शेट्टी यांनी आत्मक्लेष यात्रा काढली. ती यात्रा कर्जमाफीसाठी नव्हती तर सदाभाऊंचा द्वेष करण्यासाठी होती, अशी घाणाघाती टीकाही खोत यांनी केली.

तुम्ही मला गद्दार म्हणता, मग शरद जोशींच्या संघटनेतून बाहेर पडला तेव्हा तुम्ही काय संत होता काय? असा सवालही त्यांनी शेट्टी यांचे नाव न घेता केला.

आपल्याला भाजपच्या कोट्यातून आमदार आणि मंत्रिपद मिळाले असल्याने खासदार शेट्टींनी हे पद काढण्याचा संबंधच कुठे येतो,? असा थेट सवाल करुन मला काढायचे की ठेवायचे ते भाजपचे नेतेच ठरवतील, असेही खोतांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लॅकमेलिंग करून लैंगिक शोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाळेतील हॉकीच्या संघात निवड झाल्यानंतर खेळातील नैपुण्य दाखवण्याची संधी मिळेल या आशेने विद्यार्थिनी क्रीडा शिक्षकांचे आदेश मनापासून पाळत हेत्या. शिक्षकच आपले भाग्यविधाते या भावनेने त्या शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करीत होत्या, मात्र पूज्य शिक्षकानेच लैंगिक शोषण केल्याने पीडित विद्यार्थिनींचा शिक्षक या संकल्पनेवरील विश्वासच उडाला आहे. शिक्षकाच्या बळजबरीला विरोध केल्यानंतर उलट बदनामीची भीती दाखवून ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकास पोलिसांनी गजाआड केले, मात्र या प्रवृत्तीने शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. याशिवाय या प्रकरणाला शालेय क्रीडा स्पर्धांमधील राजकारणाचीही किनार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

विजय मनुगडे हे कोल्हापूरच्या हॉकीतील नावाजलेले नाव. अलीकडे काही चांगले खेळाडू घडवण्याचेही काम या शिक्षकाने केले. मूळचा राधानगरी तालुक्याच्या कपिलेश्वर गावातील हा खेळाडू आहे. गेल्या आठ वर्षांपासून राजेंद्रनगर येथील कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करीत आहे. शाळेतील विद्यार्थिनींचा संघ तयार करण्याचे काम सध्या सुरू होते. १३ ते १५ वयोगटातील विद्यार्थिनींची निवड केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू होते. मे ते ऑगस्टच्या दरम्यान शिक्षक मनुगडे याने विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हॉकी संघात निवड करण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनींशी तो लगट करीत होता. जिल्ह्याबाहेरील स्पर्धांसाठी गेल्यानंतर तो विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करत होता, मात्र बदनामीला घाबरून विद्यार्थिनींनी याची वाच्यता केली नसल्याचे बोलले जात आहे. गेली साडेतीन महिने शाळेत मनुगडे या शिक्षकाकडून वेगळाच प्रकार सुरू होता. कपड्यांचे माप घेण्याच्या निमित्ताने तो विद्यार्थिनींना वरच्या मजल्यावरील वर्गात घेऊन जात होता. वर्गाचे दार बंद करून त्याने विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले.

लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी मुलींना तो बदनामी करण्याची धमकी देत होता. शाळेतील मुलांसोबत प्रेमसंबंध आहेत, या मुली प्रशिक्षणासाठी नियमित येत नाहीत, अशा तक्रारी करण्याची धमकी मनुगडे यांनी दिली होती. वारंवार लैंगिक शोषणाचा प्रकार घडत असल्याने अखेर पीडित विद्यार्थिनींनी पालकांकडे तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पालकांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात मनुगडे याच्याविरोधात गुन्हे दाखल केले असून, पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, स्मिता काळभोर आणि पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण हे तपास करीत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा मनुगडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाला शालेय स्पर्धांमधील राजकारणाचीही किनार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

शैक्षणिक वर्तुळात खळबळ

शहरातील एका नामांकित शाळेत क्रीडा प्रशिक्षकाने विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शुक्रवारी दिवसभर शैक्षणिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली होती. शिक्षकानेच विद्यार्थिनींशी गैरवर्तन करण्याचा हा महिन्याभरातील दुसरा प्रकार उघडकीस आल्याने शाळांमध्ये नेमके काय सुरू आहे? असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जात आहे. या प्रकाराने पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनाही मानसिक धक्का बसला आहे.

चौकशी करून कारवाई करू

‘कोल्हापूर पब्लिक स्कूल ही शहरातील नामांकित शाळा आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पूर्णवेळ वॉचमनही आहेत. पालकांशीही नियमित संवाद सुरू असतो. विद्यार्थिनींसह पालकांनीही अद्याप शाळेकडे तक्रार दिलेली नाही. लैंगिक शोषणाचा प्रकार नक्कीच निंदणीय आहे. पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी व्हावी. संबंधित दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी संस्था पूर्ण सहकार्य करेल.’ असा खुलासा आर. एल. तावडे फाउंडेशन संचलित कोल्हापूर पब्लिक स्कूलच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images