Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पेट्रोल तपासणीचा हक्कच दुर्लक्षित

$
0
0

प्रकाश कारंडे, कोल्हापूर

पंपांवर मिळणाऱ्या पेट्रोल, डिझेलमध्ये भेसळ आहे की नाही हे तपासण्याचा ग्राहकांना हक्क आहे. शंका आल्यास पंपावर नियमानुसार ठेवलेला लिटमस पेपर घेऊन नियमानुसार ग्राहक पेट्रोलची तपासणी करू शकतो. मात्र, या हक्काची, लिटमस पेपरच्या सुविधेची माहितीच नसल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स'ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. भेसळयुक्त पेट्रोल ओळखण्यासाठी पांढऱ्या लिटमस पेपरचा उपयोग होतो. या पेपरवर पेट्रोलचे दोन थेंब टाकल्यावर तो निळा झाल्यास हे पेट्रोल भेसळयुक्त असल्याचे समजावे. लिटमस पेपरचा रंग नाही बदलल्यास पेट्रोलमध्ये भेसळ नसल्याचे प्रमाणित होते. याचबरोबर प्रत्येकाने ग्राहक म्हणून 'सजग' असणे गरजेचेच आहे.

पेट्रोलियम विभागाच्या नियमांनुसार पंपावर ग्राहकांसाठी लिटमस पेपर, सूचना बोर्ड, शिल्लक साठा भाव फलक, प्रसाधन गृह, पिण्याचे पाणी, फ्री-एअर चेकिंग २४ तास सेवा, या सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. याशिवाय स्त्रियांसाठी, सरकारी वाहने आणि महिलांना रांगेत उभा राहण्याची गरज नाही. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने याविषयी वाहनधारकांशी संपर्क साधला असता लिटमस पेपर आणि डेन्सिटीबाबत, त्याच्या उपयोगाविषयी अनेक वाहनधारकांना माहिती नसल्याचे समोर आले. प्रत्यक्षात प्रत्येक ग्राहकांना असलेली घाई, वाहनांच्या रांगा व त्यांच्या उदासिनतेचा फायदा उठवला जातो. कारण पेट्रोल टाकताना २०० रुपये की दोन लिटर याचे आकडेही तपासायलाही ग्राहकाला वेळ नाही. यासाठी पूर्वीच्या ग्राहकाचे रिडिंग शून्य झालेले बघायला पाहिजे. आपली मागणी लिटर आणि पैशामध्ये तपासावी. पंप मालकाच्या परस्पर काही कर्मचारी असा उद्योग करतात. पेट्रोलचे दर रोज बदलत असल्याने ग्राहकाने दरपत्रक आणि मशीन याची खातरजमा करावी. त्यातूनही गडबड वाटल्यास ऑफिसच्या बोर्डवर कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मोबइलवर संपर्क करावा. समर्पक उत्तर न मिळाल्यास कंपनीच्या वेबसाइटवर तक्रार करता येते. अगदीच शंका वाटल्यास वैधमापन शास्त्रानुसार दिलेल्या मापामध्ये पेट्रोल व डिझेल प्रमाणानुसार आहे की नाही हेदेखील बघून खात्री करण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर नया पैशात असल्याने शक्यतो राऊंड फिगरमध्येच पैसे देऊन पेट्रोल घ्यावे.

शिवाय ग्राहकाने एकाच पंपावर काही काळ पेट्रोल टाकून हवामान, हंगाम, घनता, आपली गाडीची स्थिती याचा विचार करून स्वतःचे मत बनवावे. ग्राहकांना वाहन दुरुस्त करणारे मेकॅनिक विचलित करतात. काहीवेळा त्यांनाच पंप मालकांनी हवे तसे बोलण्यास भाग पाडलेले असते. काहीवेळा अनेक मेकॅनिक स्वतःचे मार्केटिंग करतात असे चित्र आहे. अनेक पंपमालक रात्री ९ ते सायंकाळी ५ या वेळेत चोरीचे फंडे वापरतात. जास्तीत जास्त हायवेवर ग्राहकांनी याची दक्षता घ्यावी लागते. ऑटोमेशनपद्धतीने पेट्रोल दिल्या जाणाऱ्या ठिकाणीच पेट्रोल भरावे.



नियम काय सांगतो ?

पेट्रोलियम विभागाच्या नियमानुसार ग्राहक लिटमस पेपरची मागणी करू शकतो. शिवाय पंपांवर हवा, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे याची सोय करणे गरजेचे आहे. सोयी-सुविधा न पुरवणा-या पेट्रोल पंपधारकांना पहिल्या पाहणीत १० हजार रुपये, दुस-या वेळी २५ हजार रुपये व तिस-या वेळी एक लाख रुपयांचा दंड तसेच परवाना निलंबनाची कारवाई होऊ शकते.

अफवा आणि वास्तव .....!

प्रत्यक्षात गाडीचा वेग आणि खराबी केवळ पेट्रोल व डिझेलवर वर न ठरवता गाडी चालवणारी व्यक्तीचा तरबेजपणा, गाडीचा वेग, रस्ते, हवामान, गाडीवरील ओझे, तांत्रिक क्षमता, गाडीचे वय, टायरमधील हवा अशा अनेक बाबींवर अवलंबून असते. परंतु ग्राहक चिकित्सक नसल्याने फसतो. उदाहरणार्थ, पेट्रोलचा वास हा 'अॅडिक्टीव्ह’ मिसळल्याने येतो. ज्यामुळे इंजिनमधील कार्बन जातो. परंतु वास येणारे पेट्रोल खराब समजले जाते. शंभराच्या पटीत पेट्रोल टाकल्याने कमी मिळते. आणि ११० अथवा ५१० अशा पटीत वर थोडी रक्कम मिसळल्यास व्यवस्थित पेट्रोल मिळते हीदेखील अफवा आहे. कितीही रकमेचे पेट्रोल टाकल्यास तेवढ्या पटीत पैसे कट करण्याची सिस्टीम बसवली असते. शिवाय नोझलमधून पेट्रोलऐवजी हवाच येते हीदेखील अफवाच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेअर बाजाराचा वाढतोय टक्का

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस शेअर बाजारातील गुंतवणुकीचा टक्का वाढत आहे. जिल्ह्यात मुंबई शेअर बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या सबब्रोकर्सच्या शंभर शाखा आहेत. शेअर्स गुंतवणुकीत ७५ हजार गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. डे ट्रेडिंगसह दीर्घकालीन गुंतवणुकीकडे कोल्हापुरातील गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. नामांकित कंपनीत जिल्ह्यातून सुमारे चार ते पाच कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा इन्व्हेस्टर्स असोसिएशनचा अंदाज आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीने डीमॅट अकाउंटच्या संख्येतही वाढ झाली आहे.

शेअर बाजारमधील संभाव्य धोक्याचा अंदाज घेत गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळले आहेत. ए ग्रुप, बी ग्रुप आणि टी ग्रुपमध्ये गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. ए ग्रुपमध्ये नामांकित ३० कंपन्या आहेत. यामध्ये टाटा, बिर्ला, रिलायन्स, महिंद्रा, टीसीएस, बजाज, आदी नामांकित कंपन्या आहेत. बी ग्रुपमध्ये स्मॉल कॅपिटल कंपनी आहेत. त्यासह टी ग्रुपमध्ये शेअर बाजारातील ट्रेडिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीला पसंती दिली आहे.

जिल्ह्यात नामांकित कंपन्यांचे सबब्रोकर्स आहेत. कोटक महिंद्रा, मोतीलाल ओसवाल, जॉइंडर, निर्मल बंगच्या शाखा आहेत. इंडिया बुल कंपनीचे आउटलेट नुकतेच पुणे येथे स्थलांतर झाले आहे. या मोठ्या कंपन्यांसह दहाहून अधिक छोट्या कंपन्यांचे सबब्रोकर्स आहेत. त्यांचे ब्रोकर्स आणि सबब्रोकरची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यात साखर कारखाने, एमसीएक्स, धान्य, क्रूड ऑइलसह इंडो काउंट, मेनन अँड मेनन, मेनन बेअरिंग, मेनन पिस्टन, मनुग्राफ, आर. एम. मोहिते टेक्सटाइल, युरोटेक्ससह पंचतारांकित कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीला पसंती दिली जात आहे. डे ट्रेडिंगपेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात आहे. नियमित कालावधीनंतर ठराविक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या एसआयपीलाही प्राधान्य दिले जात आहे. एसआयपी पद्धतीने गुंतवणूकदार युनिट्स विकत घेत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना भांडवल बाजारात उतरण्याची संधी मिळत आहे. महिन्याच्या पगारातून गुंतवणुकीला शिस्त लागत असल्याने एसआयपीला गुंतवणूकदारांकडून प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे सबब्रोकर्ससह घरबसल्या ट्रेडिंग करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.


इन्व्हेस्टर्स असोसिएशनचा सल्ला

कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनची नोंदणी भारतीय रोखे बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज् अँड एक्स्चेंज ऑफ इंडिया (सेबी) आणि डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर्स (डीसीए)कडे आहे. या असोसिएशनचे ५६६ सभासद आहेत. असोसिएशनतर्फे शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन केले जाते. शेअर बाजाराचे धडे मिळण्यासाठी असोसिएशनच्या पुढाकाराने शेअर बाजारावरील आधारित अभ्यासक्रमाची सुरुवात येत्या १५ ऑगस्टपासून होत आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी किमान बारावी उत्तीर्ण पात्रता आहे. आठवड्यातून दोन दिवस वर्ग घेतले जाणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात एक दिवस आणि असोसिएशनच्या स्टर्लिंग टॉवर येथील कार्यालयात एक दिवस अध्यापन केले जाईल.


सबब्रोकर्सकडून मार्गदर्शन

जिल्ह्यातील सबब्रोकर्सकडून विविध कंपन्यांचे शेअरचे ट्रेडिंग केले जात आहे. जिल्ह्यात सध्या ३० ब्रोकर आणि सबब्रोकरची संख्या सुमारे ३०० आहे. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई), शेअरचे हाय लो, ओपनिंग क्लोजिंग भाव, ऑनलाइन ट्रेडिंग, डीमॅट खाते, ब्रोकर, शेअर्स कंपनी, शेअर्स खरेदी-विक्री, म्युच्युल फंडाच्या योजना, समभाग, वित्तीय संस्था, बँका, बिगर बँकिंग संस्था, परदेशी वित्तीय संस्थांची माहिती दिली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनावणीला उतरवली वकिलांची फौज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स स्टोअर्सच्या (जनता बझार) तत्कालीन संचालकांनी केलेल्या नुकसानीची सहकार कलम ‘८८’ नुसार कारवाई सुरू झाली आहे. कलम ७२ ‘३’ नुसार संचालकांवर आरोपपत्र निश्चित करण्यासाठी बुधवारी झालेल्या पहिल्याच सुनावणीला १९ संचालक व एक सचिव यांच्यावतीने पाच वकिलांची फौजच उभी राहिली. प्राधिकृत अधिकारी प्रदीप मालगावे यांच्यासमोर संचालकांच्यावतीने वकिलांनी म्हणणे मांडले. उर्वरीत संचालकांना म्हणणे मांडण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी तारीख निश्चित केली आहे.

जनता बझारच्या तत्कालीन संचालक मंडळावर जबाबदारी निश्चितीच्या दोन कारवाया सुरू आहेत. २००८ ते २०१२मध्ये झालेल्या लेखापरीक्षण अहवालात संचालकांनी बझारचे ८१ लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला होत्या. त्यानुसार प्राधिकृत अधिकारी मालगावे कलम ‘८८’ नुसार आरोप निश्चितीसाठी ७२ ‘३’ नुसार आरोप निश्चितीसाठी सुनावणी सुरू आहे. भाड्यापोटी बझारकडे ८१ लाख रुपये जमा न झाल्याचा मुख्य ठपका आहे. टीडीएस वसुलीचाही मुख्य मुद्दा आहे. त्यानुसार आरोपपत्र निश्चितीसाठी पहिली सुनावणी आज झाली.

सुनावणीला अॅड. के. डी. कापसे, लुईस शहा, अॅड. संकेश्वर, अॅड. अभिजित कापसे व अॅड. कांबळे उपस्थित होते. उदय पोवार यांच्यावतीने अॅड. पाटील, बिपिन जाजू यांच्यावतीने अॅड. शहा तर मधुकर शिंदे यांच्यावतीने अॅड. कापसे यांनी म्हणणे मांडले. तर एका पदाधिकाऱ्याने स्वत: म्हणणे सादर केले. अद्याप काही संचालकांचे म्हणणे मांडणे शिल्लक असल्याने पुढील सुनावणी २३ ऑगस्ट रोजी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौक आणि मैदाने बनली ओपन बार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महामार्गांवरील ५०० मीटर अंतरातील दारू विक्री दुकाने बंद झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी ओपन बार संकल्पना वाढली आहे. रात्र होताच रिकाम्या जागा, रिंगरोडचे फूटपाथ आणि शहरातील काही मोक्याच्या चौकांवर तळीरामांचे राज्य सुरू होते. पार्वती टॉकीज चौकालाही तळीरामांचा विळखा पडला असून, परिसरातील एका हायस्कूलच्या रिकाम्या मैदानावर रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन सुरू असते. याशिवाय चौकातील चिकनच्या गाड्यांवरही तळीरामांची सोय केली जाते, त्यामुळे पार्वती टॉकीज चौक तळीरामांसाठी अड्डा बनला आहे.

पार्वती टॉकीज चौक म्हणजे शहरातील मध्यवर्ती ठिकाण. या चौकाच्या परिसरातच बझार, थिएटर, काही हॉटेल्स, सर्वाधिक गर्दीचे वाइन शॉप आणि बिअर बारही आहे. गर्दी खेचण्याची महत्त्वाची साधने पार्वती टॉकीज चौकात उपलब्ध असल्याने रात्री उशिरापर्यंत या चौकात वर्दळ असते. चौकातून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाइन शॉपीमध्ये संध्याकाळपासूनच मद्यपींच्या अक्षरशः रांगा लागतात. जवळच एक बीअर बार आहे. हा बीअर बार नेहमीच ओव्हर फ्लो असतो. त्यामुळे अनेक तळीराम चौकातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांकडे वळतात. रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत चिकनच्या सर्वच गाड्यांवर केवळ मद्यपींचीच गर्दी असते. काही चिकनच्या गाड्या रात्री बारापर्यंत सुरू असतात. रात्री उशिरा चिकनच्या गाड्यांवर आणि परिसरातही मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतो. गाड्यांवरच प्लास्टिकचे ग्लास, पाणी आणि चकन्याचीही सोय केली जाते. त्यामुळे चौकात तळीरामांची गर्दी वाढत आहे.

पार्वती टॉकीज चौकाला लागूनच हायस्कूलचे मोठे मैदान आहे. मैदानाला संरक्षक भिंत नाही. त्यामुळे रात्रीच्या अंधारात या मैदानाचा ताबा मद्यपींकडेच असतो. मैदानावर ठिकठिकानी मद्यपींचे ग्रुप बसतात. रात्री उशिरापर्यंत हा ओपन बार फुल्ल असतो. पण, पोलिसांचे याकडे लक्ष जात नाही हे विशेष. अनेकदा या परिसरात मद्यपींचे आपसात वाद झाले आहेत. काही वेळा यातून जोरदार मारामारीचेही प्रकार घडले आहेत. पार्वती टॉकीजच्या आसपास, पार्वती टॉकीज चौक ते बागल चौक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बंद दुकानांच्या पायऱ्यांवर मद्यप्राशन सुरू असते. मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिकचे ग्लासही या परिसरात टाकले जातात. काही तळीराम तर बंद दुकानांच्या पायऱ्यांवरच काचेच्या बाटल्या फोडून तिथेच टाकल्या जातात. चित्रपट संपल्यानंतर रात्री घरी परतणाऱ्या महिला आणि तरुणींसाठी पार्वती टॉकीज चौक धोकादायक बनत आहे. त्यामुळे परिसरातील ओपन बारवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चिकन गाडी बार

परमिट रुममध्ये जास्तीचे पैसे मोजावे लागतात. जीएसटीने त्यात आणखी वाढ झाली आहे. शिवाय महामार्गांवरील परमि टरुम बंद झाल्याने मद्यपिंचा शहरातील रिकाम्या जागांवरील वावर वाढला आहे. चिकनच्या गाड्यांवरच मद्यपिंसाठी प्लास्टिकचे ग्लास, पाणी आणि चकन्याचीही सोय केली जाते. संध्याकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत मोक्याच्या जागी ढकल गाडी उभी करून हा चिकन गाडी बार चालवला जातो.

पार्वती टॉकीज चौकातून चारही दिशांना मोठी वर्दळ सुरू असते. महत्त्वाची दुकाने, थिएटर याच परिसरात असल्याने रात्री उशिरापर्यंत महिलांसह मुलींचाही वावर असतो. ओपन बारमुळे हा परिसर असुरक्षित बनत आहे. पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.

आनंद कांबळे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईत घुमला कोल्हापुरचा आवाज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘एक मराठा लाख मराठा’, ‘आता लक्ष्य मुंबई’ असा नारा देत सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित मोर्चामध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमुळे गुरुवारी मुंबईत कोल्हापूरचा आवाज चांगलाच घुमला. ‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज’ यांच्या नावाचा अखंड जयघोष गेल्या दोन दिवसांपासून राजधानातील दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमुळे घुमत होता. त्यामुळे अवघ्या मुंबईत कोल्हापूरचा बोलबाला असल्याचे दिसून आले. राजघराण्यापासून राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सहभागाने मोर्चातील सहभागी कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लींग निर्माण होत होते. सकल मराठा समाजाच्या प्रत्येक मोर्चातील शिस्त मुंबई येथील मोर्चातही पहायला मिळाली. मोर्चाच्या शिस्तीच्या नियोजनात कोल्हापुरातील स्वयंसेवक आघाडीवर असल्याचे पाहला मिळाले.

बुधवारी (ता. ९) क्रांतिदिनी मुंबईत निघालेल्या नि:शब्द हुंकाराला अखेर न्याय मिळाला. लाखो जनसमुदायाने काढलेल्या मोर्चाची दखल घेत बहुतांश मागण्या सोडवण्याचे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. कोल्हापुरातही आनंदोत्सव झाला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती सोशल मीडियावरून क्षणात मिळाल्यानंतर समाजाच्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या कार्यकर्त्यांनी परीश्रमाचे फळ मिळाल्याचा भावना व्यक्त केल्या. गेल्या वर्षापासून राज्यभरात सकल मराठा समाजाच्यावतीने ५७ क्रांती मूक मोर्चे काढण्यात आले आहे. लाखोंच्या संख्येचे मोर्चे असूनही सरकारीपातळीवर दखल घेतली गेली नसल्याने अंतिम मोर्चा मुंबईत काढण्याचा निर्णय मराठा संघटनांनी घेतला होता. मागण्या मान्य झाल्याशिवाय मोर्चा विसर्जित न करण्याचा निर्णय घेत विराट मोर्चा काढण्याचा निर्धार दीड महिन्यांपूर्वी प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतला होता.

मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी दीड महिन्यांपूर्वी मुंबई येथील मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. मोर्चाच्या माध्यमातून शाहू नगरीची वेगळी ताकद दाखवण्यासाठी गेल्या महिन्यापासून सभा, मेळावे, बैठकांच्या माध्यमातून जनजागृती केली होती. कोल्हापूर येथील मोर्चाप्रमाणे मुंबई येथील मोर्चासाठी जिल्ह्यात इतर समाजातील बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवत जनजागृती करण्यात आघाडी घेतली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत मराठा समाजातील ज्येष्ठ, महिला, युवतींसह युवकांचे जथ्थेच्या जथ्थे मुंबईकडे रवाने झाले. सोमवारी मुंबईत दाखल झालेल्या युवकांनी नंतर येणाऱ्या सर्व कोल्हापूरवासियांची राहण्याची व निवासाची सोय केली होती. मंगळवारी रात्री गेलेले कार्यकर्ते थेट मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यात एक हजार कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली.

राज्यातून मोर्चात सहभागी झालेल्या मराठा बांधवासाठी स्वयंसेवक विविध साहित्याचा पुरवठा करत शिस्तबद्ध मोर्चासाठी आवाहन करत होते. मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार सकारात्मक असून राज्य मागास आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी मर्यादा घालून देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर ६०५ अभ्यासक्रमांमध्ये मराठा व मुस्लिम समाजाला सवलत, तीन लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे केंद्राने मंजूर केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवन आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सहा लाखांचे उत्पन्न मर्यादेसह ५० गुणांची अट निश्चित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबईबरोबर कोल्हापूर येथेही जल्लाष केला.

मुंबईतील मोर्चामध्ये सहभागी न घेतलेल्या येथील सरकारी, निमसरकारी तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा व्यक्त केला होता. अनेक कार्यालयात दिवसभर मुंबईतील मराठा मोर्चाबाबत चर्चा सुरू होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षणाक्षणाला मोर्चाचे अपडेट घेतले जात होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची माहिती मोर्चातील सहभागी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी परतीची वाट धरली. रात्री उशीरा अनेक कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले होते.

श्रीमंती छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे, धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, सतेज पाटील, अमल महाडिक, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह जयेश कदम, शाहीर दिलीप सावंत, श्रीकांत भोसले, संदीप पाटील, उमेश पोवार, स्वप्निल पार्टे, संग्रामसिंह निकम, सुरेश जरग, संपतराव चव्हाण-पाटील, उदय जगताप, संग्रामसिंह गायकवाड, किशोर घाटगे, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत आदी मराठा समाजाचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.


सीमाभागातील कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग

सकल मराठा समाजाच्या मोर्चामध्ये राज्यातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते. जिल्ह्यातील मराठा समाजाबरोबर सीमाभागातील मराठा बांधवांचाही मोठा सहभाग होता. सीमाभागातील सुमारे पाच हजार मराठा बांधव गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत दाखल झाले होते. त्यातील काही कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत स्वयंसेवकांची भूमिका पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा उठावसाठी ‘स्वच्छता मैत्रिणी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवसभर व्यवसाय करायचा, रस्त्याकडेला-उघड्यावर कचरा टाकायचा. कचऱ्याचे वर्गीकरण नाही की योग्यरित्या विल्हेवाटही लावली जात नाही. कचरा उठावची जबाबदारी महापालिकेची म्हणत हात वर करणाऱ्या सर्वच व्यावसायिकांना आता कचरा उठावासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिका आणि एकटी या सामाजिक सेवा संस्थेत शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून उठाव करण्याबाबत करार झाला आहे. एकटी संस्थेच्या ‘स्वच्छता मैत्रिणीं’मार्फत शहरातील भाजी मंडई, फळ मार्केट, हार विक्रेते, फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यापासून मटण चिकन दुकानदार, खानावळ चालकाकडील कचरा उठाव करणार आहेत.

कचरा उठाव करण्यासंदर्भात प्रत्येक व्यवसायिकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जाईल. प्रतिदिन दोन ते वीस रुपयांची आकारणी करुन कचरा गोळा होणार आहे. केंद्र सरकारच्या घनकचरा नियम २०१६ अंतर्गत असंघटित क्षेत्रातील लोकांकडून कचरा उठाव करण्याची तरतूद आहे. त्यानुसार महापालिका आणि एकटी संस्थेमध्ये करार झाला. महापालिकेच्या स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेनेही त्याला मंजुरी दिली आहे.

हॉटेल्स, मॉल्समधील कचरा

हॉटेल्स, खानावळी, शॉपिंग मॉल्स व इतर व्यापारी घटकाकडील कचरा उठाव महापालिकेतर्फे करण्यात येतो. महापालिकेकडून यासाठी मासिक शुल्क आकारले जाते. त्या शुल्क आकारणीत बदल करुन आता एक टनापेक्षा कमी कचरा निर्माण करणाऱ्या घटकाकडून कचरा उठाव करण्यासाठी प्रति खेप ३२५ तर एक टनापेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या घटकाकडून कचरा उठावसाठी प्रति खेप ७५० रुपये शुल्क निश्चित केले आहे.

खाद्यपदार्थ्यांच्या गाड्या, फेरीवाले

वडापाव, भजी, डोसा, पावभाजी, भेळ, पाणीपुरीसह इतर प्रकारच्या खाद्यपदार्थांचे विक्रेते व हातगाडी व्यावसायिकाकडून कचरा निर्माण होतो. या व्यावसायिकांकडील कचरा उठावही एकटी संस्थेच्या कचरा वेचक महिला (मैत्रिणी) करणार आहेत. हातगाडी चालकांना यासाठी प्रतिदिन वीस रुपये मोजावे लागणार आहेत.

कचरा उठाव करण्यासंदर्भात महापालिका व एकटी संस्थेतील करारानुसार अंमलबजावणी होत आहे. एकटीच्या ‘स्वच्छता मैत्रिणी’ कचरा उठावासह ज्या त्या भागाची स्वच्छता करणार आहेत. शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी व्यावसायिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे. आरोग्य विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांचा वापर आता प्रभागातील कामासाठी होईल.

विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक

प्रकार दर रुपयांत (प्रतिदिन)

दुकाने, सर्व प्रकारची कार्यालये २

फळ, भाजी विक्रेते व्यावसायिक ५

फुले विक्रेते हार व्यावसायिक ५

हार व बुके विक्रेते व्यावसायिक १०

बेकरी उत्पादक विक्रेते १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानकावर सापळा रचून रवींद्र पाटीलला पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तपासाच्या बहाण्याने वारणानगर येथील शिक्षण संस्थेच्या इमारतीतून ९ कोटी १८ लाख रुपयांची लूट केल्याप्रक्रणी गुन्हे दाखल असलेल्या सात पोलिसांपैकी रवींद्र पाटील (वय ३८, रा. सांगली ) याला सीआयडीने बुधवारी (ता. ९) अटक केले. पाटील हा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, संध्याकाळी सापळा रचून पाटीलला ताब्यात घेण्यात आले असून, गुरूवारी (ता. १०) त्याला पन्हाळा येथील कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, अटकेतील विश्वनाथ घनवट याचा कोठडीत रक्तदाब वाढल्याने त्याच्यावर औषधोपचार सुरू केले आहेत.

वारणानगर येथे मैनुद्दीन मुल्ला या चोरट्याने सव्वातीन कोटी रुपयांची चोरी केल्यानंतर तो सांगली पोलिसांच्या हाती लागला होता. या चोरीचा तपास करताना सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चोरट्याशी संगनमत करून ९ कोटी १८ लाख रुपयांवर डल्ला मारला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील आणि कुलदीप कांबळे या सात पोलिसांसह नऊ जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल होण्यापूर्वीच संशयितांनी सांगलीतून पळ काढला होता. यातील घनवट, चंदनशिवे आणि दीपक पाटील सीआयडीकडे शरण आल्यानंतर सीआयडीने बुधवारी रवींद्र पाटील याला अटक केली. रवींद्र पाटील हा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती सीआयडीला मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रवींद्र पाटील याला ताब्यात घेतले. सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याची रवानगी करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत करण्यात आली. पाटील याला गुरूवारी (ता. १०) पन्हाळा कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, कुलदीप कांबळे हा गेली चार दिवस सीआयडीकडे हजेरी लावत आहे. कांबळेचा अहवाल गुरूवारी हायकोर्टात सादर केला जाणार असून, यावर त्याच्या जामिनाचा निर्णय होणार आहे.

सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी अटकेतील संशयित घनवट आणि चंदनशिवे यांची चौकशी केल्यानंतर दोघांना बुधवारी पहाटे कोल्हापुरात आणले. चौकशीदरम्यान घनवटचा रक्तदाब आणि मधुमेह वाढल्याने त्याला बुधवारी दुपारी उपारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर पुन्हा राजारामपुरी पोलिस ठाण्यात रवानगी करण्यात आली.

दरम्यान, अटकेतील संशयितांनी अद्याप गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. मुद्देमालाबाबतही सीआयडीला ठोस माहिती मिळालेली नाही. अटकेतील चारही संशयितांची स्वतंत्र चौकशी करून त्यांच्याकडून गुन्ह्याची महिती काढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडली पुराव्यांची साखळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दर्शन रोहित शहा या शालेय मुलाचे अपहरण आणि खूनप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी (ता. ९) कोर्टात पुराव्यांची साखळी उलगडली. घटनेशी संबंधितांच्या साक्षी आणि पोलिसांनी जमा केलेले पुरावे यानुसार संशयित आरोपी योगेश चांदणे यानेच दर्शनचा खून केल्याचे स्पष्ट होत असल्याचा युक्तीवाद अॅड. निकम यांनी केला. २५ डिसेंबर २०१२ रोजी संध्याकाळी चारूनेच दर्शनला पुंडलिक राऊळ यांच्या शेताकडे नेले होते, त्यामुळे चांदणेनेच दर्शनचा खून केल्याचे अॅड. निकम यांनी कोर्टासमोर मांडले. याप्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे. दरम्यान, दर्शनच्या आईने संशयिताला फाशीची शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

देवकर पाणंद येथील शालेय विद्यार्थी दर्शनचा (वय १०) संशयित आरोपी योगेश उर्फ चारू चांदणेनेच खून केल्याचा दावा विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केला. बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर युक्तीवाद करताना ते म्हणाले, ‘२५ डिसेंबरला संशयिताच्या घराच्या टेरेसवर दर्शन, आदित्य डावरे आणि संशयित आरोपी तिघेही होते. संध्याकाळी सव्वासात ते साडेसातच्या सुमारास आदित्य घरी निघाल्यानंतर दर्शनही घरी जाणार होता. मात्र संशयिताने त्याला थांबवून घेतले. ऊस खाण्याच्या आमिषाने तो दर्शनला पुंडलिक राऊळ यांच्या शेताकडे घेऊन गेला. त्यावेळी आदित्य डावरे आणि सागर चौगुले या दोघांनी त्याला पाहिले होते. पावणेनऊच्या सुमारास तो घाबरलेल्या अवस्थेत शेताकडून परत येताना निखिल मोहिते याने पाहिले होते. डावरे, चौगुले आणि मोहिते या तिघांच्या साक्षीवरून खून होण्यापूर्वी दर्शन योगेश चांदणेसोबतच होता हे स्पष्ट होते.’

अॅड. निकम म्हणाले, ‘२५ डिसेंबरला संध्याकाळी दर्शन माझ्यासोबत होता, हे कोणाला सांगू नको. नाहीतर तुझा खून करीन,’ अशी धमकी संशयिताने दर्शनचा मित्र आदित्यला दिली होती. खुनाचे बिंग फुटू नये, यासाठीच त्याने असे कृत्य केले. याशिवाय लॉँड्रीमालक अभिजित काटे याला आपल्या बाजुने साक्ष देण्याची विनंतीही संशयिताने केली होती. कोणी विचारलेच तर २५ डिसेंबरला रात्री आपण एकत्र होतो असे सांगण्याची विनंती संशयिताने केली होती. यातून त्याने स्वतःच्या बचावाची पूर्वतयारी केल्याचे स्पष्ट होते,’ असेही अॅड. निकम म्हणाले. पोलिसांनी जमवलेल्या पुराव्यांपैकी संशयिताचे शर्टचे बटण, गुन्ह्यातील दोरी, हस्ताक्षराचा अहवाल याबाबत संशयिताच्या वकिलांनी घेतलेले आक्षेपही अॅड. निकम यांनी खोडून काढले. सर्व साक्षी आणि पुराव्यांची साखळी उलगडून दाखवत चारूनेच दर्शनचे अपहरण आणि खून केला आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान, सुनावणीवेळी संशयित योगेशला पोलिस बंदोबस्तात कोर्टात हजर केले होते. संशयिताचे वकील पीटर बारदेस्कर, दर्शनचे नातेवाईक यांसह अन्य वकील सुनावणीसाठी उपस्थित होते.

फाशीच्या शिक्षेची मागणी

बुधवारी सुनावणीपूर्वी दर्शनच्या आईने विशेष सरकारी वकील निकम यांची भेट घेतली. दर्शनच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्या भावूक झाल्या होत्या. संशयिताला कडक शिक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही अॅड. निकम यांनी त्यांना दिली.

कोर्टात पंचाग सादर केले

दर्शनच्या घरात धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी चोरी झाली होती. चोरीच्या घटनेचा दिवस आणि तारिख याबाबत विसंगत साक्षी असल्याचा आरोप संशयिताच्या वकिलांनी केला होता. हा आरोप खोडून काढण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी २०१२ मधील पंचांग कोर्टासमोर सादर केले. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर २०१२ रोजी दर्शनच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. ११ नोव्हंबरला धनत्रयोदशीचा सण असल्याचा उल्लेख त्यांनी दाखवला.

दोरीच्या लांबीवरून विसंगती

दर्शनचा मृतदेह ज्या विहिरीत सापडला, तिथे जवळच नायलॉनची दोरीही मिळाली होती. संशयिताने स्वतःच ती शोधून दिली होती. पोलिसांच्या पंचनाम्यात दोरीची लांबी १५ फूट १० इंच आहे तर डॉ. अविनाश वाघमारे यांच्या अहवालात दोरीच्या लंबीचा उल्लेख १४ फूट १० इंच असा आहे. या विसंगतीवर बोट ठेवून पोलिसांचा तपास आणि डॉक्टरांच्या अहवालाबाबत संशयिताचे वकील पीटर बारदेस्कर यांनी शंका उपस्थित केली होती. ‘दोरीच्या लांबीपेक्षा दर्शनच्या गळ्यावरील दोरीचा व्रण आणि दोरीच्या जाडीचा अहवाल महत्त्वाचा आहे. अहवाल तंतोतंत बरोबर आहे. शिवाय गुन्ह्यातील दोरी स्वतः संशयिताने शोधून दिल्याने या पुराव्याबाबत शंका उपस्थित करणे योग्य नाही,’ असे अॅड. निकम कोर्टात म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलदीप कांबळेचा जामीन रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत चोरीच्या तपासाचा बहाणा करून ९ कोटी १८ लाख रुपयांची लूट करणाऱ्या पलिसांच्या टोळीतील कॉन्स्टेबल कुलदीप कांबळे याचा अंतरिम जामीन हायकोर्टाने फेटाळला. हायकोर्टाच्या निर्णयाने कांबळे सीआयडीला शरण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अटकेतील रवींद्र पाटील याला पन्हाळा कोर्टाने १६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विश्वनाथ घनवट आणि सूरज चंदनशिवे यांची कोठडी संपत असल्याने यांना शुक्रवारी पन्हाळा कोर्टात हजर केले जाणार आहे.

१३ मार्च, २०१६ रोजी वारणानगर येथील चोरीचा तपास करण्यासाठी सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गेले होते. या पथकात पोलिस कॉन्स्टेबल कुलदीप कांबळे याचाही सहभाग होता. कोडोली पोलिस ठाण्यात सात पोलिसांसह नऊ जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर यातील चौघांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. कुलदीप कांबळे यानेही हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर हायकोर्टाने कांबळे याला अंतरिम जामीन मंजूर करून कोल्हापुरातील सीआयडीच्या ऑफिसला हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. कांबळे यांची हजेरी आणि प्राथमिक चौकशीचा अहवाल सीआयडीने गुरुवारी (ता. १०) हायकोर्टात न्यायाधीश तानाजी नलवडे यांच्याकडे सादर केला. सराकरी अभियोक्ता अॅड. प्रजक्ता शिंदे यांनी युक्त‌िवाद केला. कांबळे याचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे, त्यामुळे हायकोर्टाने कांबळेचा अंतरिम जामीन फेटाळून सीआयडीकडे शरण येण्याचे आदेश दिले. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे कांबळे लवकरच सीआयडीकडे शरण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सीआयडीच्या पोलिस कोठडीत असलेले विश्वनाथ घनवट व सूरज चंदशिवे यांची पोलिस कोठडी शुक्रवारी (ता ११) संपत आहे, त्यामुळे या दोघांना शुक्रवारी पन्हाळा कोर्टात हजर केले जाणार आहे. संशयित तपासात सहकार्य करत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून चोरीतील रक्कम जप्त करण्यासाठी पोलिस कोठडी वाढवून घेतली जाणार आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्याने तपास करण्यासाठी सांगली, सातारा येथील अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. अद्याप शंकर पाटील, शरद कुरळपकर आणि कुंडलिक कांबळे या तिघांना अटक झालेली नाही. पोलिस कोठडीत असलेल्या चौघांकडे कसून चौकशी सुरू आहे.

रवींद्र पाटीलला सात दिवस कोठडी

निलंबित पोलिस नाईक रवींद्र बाबूराव पाटील (वय ३२, रा. सांगली) याला गुरुवारी पन्हाळा न्यायालयात हजर केले असता, १६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यापासून तो फरारी होता. बुधवारी अटक केल्यानंतर दोन तास तपासाचे कामकाज चालले. यावेळी न्यायालयात बघ्यांची मोठी गर्दी होती. संशयित आरोपीचे वकील हर्षवर्धन राणे बाजू मांडताना म्हणाले 'रवींद्र पाटील हे वरिष्ठ पोलिसांच्या सोबत गेले होते. त्यांचे अन्य साथीदार चोरीच्या ठिकाणी गेले होते. गुन्ह्यात त्यांचा थेट संबंध नाही, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी.’ सरकारी वकील अमोल कांबळे म्हणाले, ‘रवींद्र पाटील यांना चोरीबाबत माहिती आहे. वारणा कॉलनीतील चोरीच्या घटनेनंतर या सर्वांनी कट रचून चोरीची रक्कम लुटली आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे यासह कर्नाटकात या गुन्ह्याचा तपास करावा लागत आहे. तपासासाठी रवींद्र पाटील याची गरज असल्याने त्याला पोलिस कोठडी मिळावी.’ न्यायदंडाधिकारी व्ही. ए. अवघडे यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन पाटील याला १६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारी करा; कारवाई करू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सार्वजनिक गणेशोत्सवात काही मंडळांकडून आवाज मर्यादेचा भंग करून डॉल्बीचा दणदणाट केला जातो. विनापरवानगी रस्त्यात मध्येच मंडप उभा करून वाहतुकीला अडथळे केले जातात. असे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी थेट पोलिसांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. यासाठी पोलिसांच्या वेबसाइटवर सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, इ मेल आयडी, हेल्पलाइन नंबर आणि व्हॉट्स अप नंबर प्रकाशित केले आहेत. नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच नियमांना बगल देणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार आहे.

गणेशोत्सव आणि विधायक उपक्रमांचे पारंपरिक नाते आहे, मात्र अलीकडे काही मंडळांनी सवंग मनोरंजनाला महत्त्व दिल्याने सार्वजनिक गणेशोत्सवातील विधायक उपक्रमांची जागा डॉल्बी आणि अवैध प्रकारांनी घेतली आहे. मंडप उभारणे, ध्वनी यंत्रणा लावणे याची परवानगी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून घ्यावी लागते. वर्दळीचे रस्ते, सार्वजनिक वापराच्या जागा, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये यांच्या आसपास मंडप उभे करू नयेत, असे नियम आहेत. प्रत्यक्षात मात्र मंडळांकडून दुर्लक्ष होते. गणेशोत्सवाआधी पंधरा दिवासांपासून वर्दळीच्या रस्त्यांवर मंडप उभे केले जातात. राजारामपुरी, शाहूपुरी, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा बावडा परिसरात गणेशोत्सवाआधी १५ दिवस आणि नंतर आठवडाभर रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात. यावर आवाज उठवणाऱ्यांना धमकावले जाते, त्यामुळे नागरिकही दुर्लक्ष करतात.

आवाज मर्यादेचे पालन करण्याबाबत काही मंडळांचा अपवाद वगळता अनेक मंडळे अनुत्सुक असतात. पोलिसांसमोर बोलताना ते डॉल्बीमुक्तीची शपथ घेतात. प्रत्यक्षात मात्र लाखोंची डॉल्बी सिस्टिम आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. गतवर्षी डॉल्बीमुक्तीच्या आवाहनानंतर मंडळांनी शपथपत्रेही लिहून दिली. मात्र ऐनवेळी १६ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या भिंती उभ्या करून दणदणाट केला. डॉल्बीच्या आवाजाने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर बनतात. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून पोलिसांकडे तक्रारी केल्यास, वेळीच कारवाई करता येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील ३६ अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर, कार्यालयांचे संपर्क क्रमांक आणि ई मेल आयडीही पोलिसांच्या वेबसाइटवर प्रकाशित केले आहेत. शिवाय १०० नंबर, पोलिसांची बेवसाइट, फेसबुक, व्हॉट्स अप नंबरवरही तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. बेकायदेशीर मंडप आणि डॉल्बीच्या विरोधात नागरिकांनी तक्रारी करताच संबंधित मंडळांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली आहे.

इथे करा तक्रार

वाहतुकीस अडथळे निर्माण करणारे मंडप आणि आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांविरोधात तक्रारी करण्यासाठी पोलिसांनी विविध पर्याय उलब्ध केले आहेत. टोल फ्री १०० नंबर, ९५५२३२८३८३, ७२१८०३८५८५ हे व्हॉट्स अप नंबर,

cr.kop@mahapolice.gov.in हा ई मेल आयडी प्रकाशित केला आहे. शिवाय सर्व पोलिस ठाणी, पोलिस चौक्या आणि पोलिस अधीक्षक कार्यालयातही तक्रारी देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अशी होणार कारवाई

विनापरवानगी मंडप उभारून रस्ते अडवणारी मंडळे आणि आवाज मर्यादेचा भंग करणाऱ्या मंडळांवर ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २००० आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार कारवाई होणार आहे. मंडळांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले जाईल. या गुन्ह्यात आर्थिक दंडासह सश्रम कारावासाचीही शिक्षा होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा १४ ला चक्काजाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, उत्पादन खर्चाच्या दीडपड हमीभाव द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी सरकारला जाग आणण्यासाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती जिल्ह्यात १४ ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार आहे. शहरात शिवाजी पूल आणि पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलावर सकाळी अकरा वाजता चक्का जाम केला जाईल, अशी माहिती माजी आमदार संपतराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी आमदार पवार म्हणाले, ‘राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमुक्ती ही कर्जसक्ती ठरली आहे. प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या सुमारे ५० लाख शेतकरी आणि पीककर्ज सोडून मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा काहीही फायदा होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिलेल्या या योजनेला लाखो शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, यासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आजरा, लिंगनूर कापशी, सिद्धनेर्ली (ता.कागल), मुदाळतिट्टा, हळदी (ता. करवीर), आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी), कुडित्रे (ता. करवीर), हुपरी, रेंदाळ, कबनूर (ता. हातकणंगले), शिरोळ, हलकर्णी फाटा (ता. चंदगड) आणि शाहूवाडी तालुक्यात चक्का जाम केला जाईल. या वेळी नामदेव गावडे, शेतकरी संघटनेचे भगवान काटे, अतुल दिघे, भारत पाटील, वसंतराव पाटील, माणिक शिंदे, बाबासाहेब देवकर, संदीप देसाई आदी उपस्थित होते.


पालकमंत्र्यांनी ध्वजवंदन करू नये..

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने विशेष समिती नेमली होती. या समितीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्ष होते. संपूर्ण कर्जमाफी करण्याऐवजी कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांवर जाचक अटी लादून त्यांनी थट्टाच केली आहे. शेतकऱ्यांचा घोर वि‍श्वासघात केल्याने स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री पाटील यांनी ध्वजवंदन करू नये. पालकमंत्र्यांनी आवाहन धुडकावून लावल्यास स्वातंत्र्यदिनानंतर आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असा इशारा सुकाणू समितीने पत्रकार परिषदेत दिला.

१३ ऑगस्टला अधिवेशन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे करवीर तालुक्याचे १७ वे अधिवेशन हळदी (ता. करवीर) येथील रावजी कामते सांस्कृतिक भवनात सकाळी दहा वाजता होणार आहे. अधिवेशनात आमदार बाळाराम पाटील (पनवेल) मार्गदर्शन करणार असून कार्यकारिणी, आघाडी, युवक संघटनांच्या निवडी केल्या जाणार असल्याचे तालुका चिटणीस केरबा पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिरातील घागरा-चोलीच्या वादानंतर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती मिळवण्यासाठी पुजारी गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. गुरुवारी (ता. १०) वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका मांडली. जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी कोणताही निर्णय घेण्यासाठी नसून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील सुनावणी शुक्रवारी (ता. ११) होणार आहे.

श्री अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांनी देवीच्या मूर्तीला घागरा-चोलीचा पोषाख परिधान केल्याने पुजारी हटाओ संघर्ष समितीने मंदिरातील पुजाऱ्यांना हटवून पगारी पुजारी नेमण्याची मागणी केली आहे. या वादाने पुजारी आणि पुजारी हटाओ संघर्ष समिती आमने-सामने आल्याने संघर्ष निर्माण झाला होता. पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनासमोर झालेल्या संयुक्त बैठकीत पुजाऱ्यांविरोधातील असंतोष उफाळून आला होता. यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही बाजूची मते आणि कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची सूचना केली. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू झाली, मात्र या सुनावणीला स्थगिती मिळावी यासाठी पुजारी गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली. गुरुवारी न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली.

गजानन मुनीश्वर यांची बाजू मांडताना अॅड. नरेंद्र गांधी म्हणाले, ‘अंबाबाई मंदिरातील घडामोडींबाबत पालकमंत्र्यांना सुनावणीचे आदेश देण्याचा अधिकार नाही. मंदिरातील पुजारी परंपरेने आणि वहिवाटीने देवीची पूजा व विधी करतात. हा पुजाऱ्यांचा वैयक्तिक अधिकार तसेच हक्क आहे. जिल्हाधिकारी आणि पुजारी हटाव समितीचे संगनमत असल्याने जिल्हाधिकारी पुजारी हटाओ समितीचे ऐकतात. जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणीला स्थगिती मिळावी,’

विशेष सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी जिल्हाधिकाऱ्यांची बाजू मांडली. ते म्हणाले, ‘पालकमंत्री हे सरकारचे प्रतिनिधी आहेत. सरकारमधील ते जबाबदार मंत्री असून जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. त्यांचा आदेश किंवा सूचना चुकीची म्हणता येणार नाही. मंदिरातील वादानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूची मते आणि कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावीत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. पुजाऱ्यांच्या हक्कांबाबत निर्णय घेण्यासाठी ही सुनावणी नाही. दोन्ही बाजूंची मते ऐकूण याचा अहवाल विधी व न्याय विभागाकडे सादर केला जाणार आहे, त्यामुळे ही सुनावणी सुरू राहणे गरजेचे आहे.’

सुमारे अडीच तास चाललेली सुनावणी कामकाजाची वेळ संपल्याने थांबवण्यात आली. शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी पुजारी गजानन मुनीश्वर, जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी सल्लागार अॅड. वैभव इनामदार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’च्या निविदेवर आज मोहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अमृत योजनेंतर्गत शहरातील विविध भागात १२० किलो मीटर लांबीची ड्रेनेज लाइन व इतर कामाची ५९ कोटी रुपयांची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर करण्यात आली आहे. पुण्याच्या नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीने नऊ टक्के जादा दराने ही निविदा भरली आहे. इतर कंपन्यापेक्षा कमी दराने निविदा भरल्यामुळे ‘नोबल’च्या निविदेवर स्थायी समितीच्या शुक्रवारी (ता.११) होणाऱ्या सभेत मान्यतेची मोहर उमटण्याची औपचारिकता पार पाडली जाईल. दरम्यान अमृत योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या योजनेला मान्यता देण्यावरुन महापालिकेत घडामोडी वेगावल्या आहेत. गेले काही दिवस सातत्याने बैठका सुरु होत्या. यात अर्थपूर्ण घडामोडी घडल्याची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.

स्थायी समितीच्या मान्यतेनंतर महापालिकेकडून ड्रेनेजलाइनचा प्रस्ताव राज्य सरकारच्या स्टेल लेव्हल टेक्निकल कमिटीकडे मंजुरीसाठी सादर होईल. दरम्यान अमृत योजनेंतर्गतच शहरातील पिण्याच्या पाइपलाइन कामासाठीची १०७ कोटीच्या कामाची निविदा शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. १०७ कोटी आणि ५९ कोटी रुपयांच्या या दोन्ही योजनांची निविदा प्रक्रिया राबविण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. महापालिका निवडणुकीनंतर संपूर्ण शहरातील पायाभूत सुविधांसाठी पहिल्यांदाच कोट्यवधी रुपये उपलब्ध झाले आहेत. शहरातील बहुतांश भागात पिण्याची पाइपलाइन आणि ड्रेनेज लाइनची कामे होणार असल्याने नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. आपआपल्या प्रभागातील प्रस्तावित कामावर लक्ष ठेवून आहेत.

अमृत योजनेंतर्गत शहरातील ड्रेनेज लाइनची योजना ७० कोटी ७० लाख रुपयांची आहे. या योजनेतून १२० किलो मीटर लांबीची ड्रेनेज लाइन, दुधाळी येथे सहा एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि कसबा बावडा एसटीपी परिसरात चार एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. ७० कोटी ७० लाख रुपयांच्या योजनेपैकी पहिल्या टप्प्यात ५९ कोटीच्या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. तीन कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. इतर दोन कंपन्यांनी २३ व २५ टक्के जादा दराने निविदा भरली आहे. तर पुण्याच्या ​नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीने नऊ टक्के जादा दराची निविदा मंजूर होणार हे निश्चित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा विळखा घट्ट होत असून, संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत स्वाइन फ्लूच्या दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील एक रुग्ण फुलेवाडी येथील आहे, तर दुसरा रुग्ण बेळगाव जिल्ह्यातील माणकापूर येथील आहे. दरम्यान, सीपीआरसह खासगी रुग्णांलयांमध्ये २६ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील १७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या सात महिन्यात स्वाइन फ्लूने २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

स्वाइन फ्लूचा विळखा कायम असून, रुग्णांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसात स्वाइनचे दोन रुग्ण दगावल्याने पुन्हा याची धास्ती निर्माण झाली आहे. बुधवारी (ता. ९) संध्याकाळी फुलेवाडी येथील केदार हिंदुराव पाटील (वय ३५) यांचा शहरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाबूराव श्रावण चौगुले (वय ५५, रा. माणकापूर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) यांना मंगळवारी (ता. ८) उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. स्वाइन फ्लूसदृश्य आजारामुळे वैद्यकीय पथकाने चौगुले यांचा अहवाल तपासणीसाठी पाठवला आहे, मात्र उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी चौगुले यांचा मृत्यू झाला. त्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

दरम्यान, सीपीआरसह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे २६ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील १७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ९ रुग्ण संशयित आहेत. जानेवारी २०१७ पासून जिल्ह्यात २० रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याने याची पुन्हा धास्ती निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे २९ कर्मचारी बडतर्फ

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सातत्याने गैरहजर राहणाऱ्या २९ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने घरचा रस्ता दाखविला. प्रशासनाने वारंवार नोटिसा देऊनही कामावर हजर न झाल्याने या कर्मचाऱ्यांना अखेर नोकरीतून काढून टाकण्यात आले. पवडी विभागातील कामगार गणपती राजाराम कांबळे नेमणुकीच्या तारखेपासून एक दिवसही कामावर हजर राहिलेले नाहीत.

महापालिकेच्या इतिहासात एकाचवेळी २९ कर्मचारी बडतर्फ करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे कामचुकार आणि दांडीबहाद्दरांचे धाबे दणाणले आहे. बडतर्फीची कारवाई झालेल्यांत पवडी विभागातील तेरा, आरोग्य विभाग बारा, जकात विभागातील दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कारवाईमध्ये सफाई कामगार, शिफाई, झाडू कामगार, ड्रायव्हर आणि मुकादमांचा समावेश आहे. सहा महिन्यापेक्षा अधिक काळ गैरहजर राहिलेल्या ३५ कर्मचाऱ्यांना उद्देशून प्रशासनाने, २६ फेब्रुवारी २०१६ मध्ये दीर्घकाळ गैरहजर राहिल्यामुळे महापालिकेतील नोकरी सोडून गेले म्हणून आस्थापनावरुन कमी का करु नये, अशी नोटीस जाहीर केली. महापालिका नियमानुसार २९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय झाला. रचना व कार्य विभागाच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता व अतिरिक्त आयुक्तांनी सही केल्यानंतर गुरुवारी संबंधित कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले.

……….

बडतर्फ केलेले कर्मचारी

पवडी विभाग : विलास आप्पा कांबळे, गजानन सावळा समुद्रे, धोंडीराम लहू कांबळे, दिनकर गोविंद तिवार, बाबू रामचंद्र कांबळे, विलास दत्तात्रय बागडे, गणपती राजाराम कांबळे (कामगार), महादेव हरी कोळी व चंद्रकांत सदाशिव घाटगे (माळी), ज्योती रंगराव यादव (पहारेकरी), शिवाजी मल्लारराव वरकड (मेस्त्री), कामाबी महादेव डुकरे (पहारेकरी), प्रशांत सुभाष खोचे (कनिष्ठ अभियंता)

आरोग्य विभाग : इजाजअली शौकतअली उस्माने (लिपिक), लता राजाराम रास्ते (आया कम स्वीपर), सीताराम यशवंत हासुरे, मदन नरसिंह चव्हाण, राजेश रामदास दळे (वॉर्डबॉय), अनिल सोहनलाल छपरीबंद, उमेश रामचंद्र चंडाळे (कामगार), कुलदीपक भगवान गवंडी (ड्रेसर), शंकुतला मोहन सनगत, सुनील सोहनलाल छपरीबंद (सफाई कामगार), शरीफ दावल शेख (झाडू कामगार), पुरुषोत्तम रमेशचंद्र ठाकूर (मुकादम).


जकात विभाग : संजय दत्तात्रय नाईक (कनिष्ठ लिपीक), सुरेश आत्माराम लोखंडे (शिपाई)


आप्पासो मारुती लोहार (वर्कशॉप विभाग, डायव्हर), मंगेश शंकरराव केंबळकर (इस्टेट विभाग, कोच कम क्लार्क)


कर्मचाऱ्यांना सातत्याने नोटिसा काढल्या. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. आयुक्तांच्या मान्यता घेऊन नियमानुसार बडतर्फीची कारवाई केली.

श्रीधर पाटणकर, अतिरिक्त आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ अकरा पोलिस अधिकाऱ्यांचीकोर्टात हजेरी

$
0
0


सांगली :
पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याचा राग आल्याने फिर्यादीवर खोटे गुन्हे दाखल अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी तेरा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या गुन्ह्यात आरोपी का करू नये, अशी नोटीस बजावल्याने १३ पैकी ११ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगली कोर्टात हजेरी लावली. प्रत्येकांनी आपापल्या वकिलांमार्फत म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितल्याने कोर्टाने अकरा सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलीक, पुणे लाचलुचपत प्रतिबंधकचे अधीक्षक विश्वास पांढरे, पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, सुहास नाडगौडा, सेवा निवृत्त पोलिस उपअधीक्षक सुरेश पवार (कोल्हापूर) आदींसह अन्य अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. खानापूर तालुक्यातील बामणी येथे २० जानेवारी १९९० रोजी बाळासाहेब आनंदराव पाटील या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणी त्याचा भाऊ विजय पाटील यांनी विटा पोलिसांकडे गुन्हा दाखल करून तपास करण्याची मागणी केली होती. परंतु, पोलिस तपास करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे विजय यांनी संबधित अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सुरुवात केली. याचा राग आल्याने तत्कालीन विटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामचंद्र घुगे यांनी विजय यांच्या विरोधात तब्बल २५ खोटे गुन्हे दाखल केले. एका खुनाच्याही गुन्ह्यात त्यांना गोवले. अवघड जागेवर पेट्रोल टाकून टायरीत घालून अमानुष मारहाण केली. विजय पोलिस कोठडीत असल्याच्या दरम्यान पोलिस दलात कार्यरत असलेल्या तत्कालीन इतर अधिकाऱ्यांनीही विट्यात जावून विजय यांच्यावर अत्याचार केले. अपंग आणि अकार्यक्षम विजय हा दाद मागत फिरत राहिला. विधानसभेपासून ते दिल्लीच्या मानवाधिकारी विभागांपर्यंत ते न्याय मागत होते. त्यांच्यावरील अत्याचाराची दखल घेऊन पुणे सीआयडीकडे तपास देण्यात आला. परंतु, सीआयडीने केवळ घुगे यांनाच आरोपी करून तपास केला. दरम्यानच्या काळात विजय यांच्यावरील सर्व गुन्हे खोटे असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. त्यानंतर आपल्यावर अत्याचार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असा निर्धार करुन विजय यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला आहे. हायकोर्टाने जिल्हा कोर्टाला आदेश देवून त्यांच्या तक्रारीची शहनिशा करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पोलिस निरीक्षकावरठाण्यातच केला हल्ला

$
0
0

सातारा :
फटलण शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश धस यांच्यावर एका गुंडाने पोलिस ठाण्यातच हल्ला केला. या हल्ल्यात धस गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिस ठाण्यात संध्याकाळी पाचच्या सुमारास रणदिवे या गुंडाने धस यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या तोडाला जखम झाली आहे. या हल्ल्यात धस यांचे दात तुटले आहेत. हल्ल्यानंतर धस यांना जे. टी. पोळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना सातारा किंवा पुण्यातील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला आहे. प्रकाश धस यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. पोलिस ठाण्यातच त्यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘म्हैसाळ’ची थकबाकी टंचाईनिधीतून भरली जाणारआवर्तने तातडीने सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
पावसाने ओढ दिल्याने हवालदिल झालेल्या मिरजपूर्व भागासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता दूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला. या भागासाठी वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे थकीत वीजबिल टंचाईनिधीमधून भरण्याचे व म्हैसाळची आवर्तने तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खासदार संजय पाटील आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी या प्रश्नी मुख्यमंत्र्‍यांकडे पाठपुरावा केला होता.
म्हैसाळचे थकीत वीजबिल व बंद असलेली आवर्तने सुरू करण्यासाठी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीस खासदार संजय पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश गिरीश महाजन, पालकमंत्री सुभाष देशमुख आणि जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी, म्हैसाळ योजनेचे अधिकारी, वीज मंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हैराण झाला आहे. पाऊस नसल्याने पिके उगवली नाहीत. आता तर पिण्याच्या पाण्याची टंचाईही तीव्रतेने जाणवू लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्वांनी फडणवीस यांची भेट घेऊन म्हैसाळ योजनेचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी केली होती. मात्र म्हैसाळ योजनचे कोट्यवधीचे वीज आणि पाणी बिलथकीत असल्याने सदरचे बील कसे भरायचे हा प्रश्न होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी टंचाई निधीतून हे पाणी आणि वीजबील भरण्यात येणार असल्याचे आजच्या बैठकीत जाहीर केले.
दोन दिवसांतच म्हैसाळचे सर्व पंप टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ लोकमंगलने शेतमजुरांचीनावांवरील कर्ज परस्पर भरले

$
0
0

सोलापूर
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर लाखो रुपये परस्पर कर्ज उचलल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता स्वतः लोकमंगलने संबंधित शेतकऱ्यांच्या नावावरील कर्ज भरण्यास सुरूवात केली आहे.
१९ लाख रुपयांची नोटीस पाहून धक्का बसलेल्या बार्शी तालुक्यातील इंदापूर येथील महादेव मस्के या मजुराच्या नावावर त्याची परवानगी न घेता लोकमंगलने देना बँकेतून १५ लाखांचे कर्ज उचलले होते. व्याजासह १९ लाखांची नोटीस आल्यानंतर मस्के कुटुंबीय पुरते हादरून गेले होते. लोकमंगल साखर कारखान्याची बनवाबनवी उघड होऊ लागल्याने मस्के यांच्याकडे बँकेचे लोक येऊन मनधरणी करू लागले. प्रकरण शेकणार हे लक्षात येताच लोकमंगलने व्याजासह १९ लाखांची रक्कम देना बँकेत भरून मस्के यांना बेबाकी दाखला दिला. लोकमंगलकडे सभासद असलेल्या आणखी किती शेतकऱ्यांच्या नावावर लोकमंगलने कर्ज उचलले आहे त्याची आता देशमुख यांचे विरोधकच चौकशी करू लागले आहेत.
दरम्यान, लोकमंगलचे हे चौथे प्रकरण मिटत असतानाच आता आणखी एक पाचवे प्रकरण समोर आल्याने सभासद शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरातही सरकारी पुजारी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिरात पंढरपूरच्या धर्तीवर सरकारनियुक्त पुजारी नेमण्यात येतील. येत्या तीन महिन्यांत यासंबंधीची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून कायदा करण्यात येईल, अशी घोषणा विधी व न्यायमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केली. यासंबंधी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडलेल्या लक्षवेधीला ते उत्तर ‌देत होते. देवस्थानासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनीधींशी पुढील पंधरा दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

डॉ. पाटील यांच्या घोषणेने पुजारी हटवून सरकारनियुक्त पुजारी नेमणुकीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा पहिला निर्णायक टप्पा पूर्ण झाल्याचे मानले जात आहे. क्षीरसागर यांच्या लक्षवेधीवर बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, अंबाबाईला पारंपरिक वस्त्राऐवजी घागरा चोळीचा वेश परिधान करण्यात आल्याने भाविकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. यासंदर्भात २५ जुलै २०१७ रोजी कायदा करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली. सहसचिव दर्जाचा अधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीची बैठकही झाली आहे. पंढरपूर व शिर्डी देवस्थानाच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरातही वारसा हक्काने पुजारी नेमण्याऐवजी शैक्षणिक अर्हता धारण करणारे पुजारी नेमण्यात येण्याबाबत विचार सुरू आहे. देवस्थानातील भ्रष्टाचाराबाबत सीआयडी चौकशी अंतिम टप्प्यात आहे. भाविक, भक्तांना धमकीचे पत्र आल्याबाबत त्या पत्रावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

क्षीरसागर यांनी भाविकांत पुजाऱ्यांविरोधात असलेला असंतोष, आणि भाविकांची मंदिरात चाललेली लूट निदर्शनास आणून दिली. आमदार प्रकाश आबीटकर आणि चंद्रदीप नरके यांनी सरकारीस्तरावर पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय लवकरात लवकर कायद्याच्या रूपात यावा, अशी मागणी केली.

दरम्यान, सरकारनियुक्त पुजारी नेमण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झाल्याची वार्ता कळताच अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या सदस्यांनी भवानी मंडपात फटाके फोडले तसेच साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आंदोलनादरम्यान मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची आणि मागणीची दखल घेऊन सहकार्याची भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

९ जून रोजी पुजारी अजित ठाणेकर आणि त्यांचे वडील बाबुराव ठाणेकर यांनी योगेश जोशी या भाविकाने दिलेला घागराचोली पेहराव अंबाबाई मूर्तीला परिधान केला. अंबाबाईचा पारंपरिक पेहराव साडी असा असताना घागराचोली नेसवून मनमानी कारभार केल्याचा आणि भाविकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ठाणेकर यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला. त्यानंतर संघर्ष समितीने याविरोधात आंदोलन छेडले. गेल्या दोन महिन्यांपासून पुजारी हटाओ संघर्ष समितीने पंढरपूर धर्तीवर अंबाबाई मंदिरातही सरकार नियुक्त पुजारी नेमावेत या मागणीसाठी आंदोलनाची धग सुरू ठेवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images